नामरूप — समास 2: सारासारनिरुपण

Fully populated

Sarasar Nirupan (A Discourse on Essence and Non-Essence)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका सारासार विचार । उभारलें जगडंबर । त्यांत कोण सार कोण असार । विवेकें वोळखा ॥ १ ॥

मराठी अर्थ

आतां सारासार विचार ऐका. विश्र्वाचा हा जो मोठा पसारा समोर आहे, त्यांतून सार कोणतें व असार कोणतें हें विवेकानें ओळखावें.

English meaning

If you listen then, there can be the vivek between that thoughtless essence and non- essence. This whole structure of the world is imagined. Therefore within this, recognize by vivek what is the essence and what is the non-essence.

2
मूळ

दिसेल तें नासेल । आणि येईल तें जाईल । जें असतचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥

मराठी अर्थ

जें दिसतें तें नासतें, जें येतें तें जातें, हें असार होय. पण जें नेहमी सदैव आहेंच आहे तें सार होय.

English meaning

When a world is seen then, that Reality will not recognized and when this mula maya comes then, that Reality will go away. But when this mula maya (ie. non-essence) becomes That which always is and always will be, then there is that essence.

3
मूळ

मागां आत्मानात्माविवेक बोलिला । अनात्मा वोळखोन सांडिला। आत्मा जाणतां लागला । मुळींचा मूळतंतु ॥ ३ ॥

मराठी अर्थ

मागें आत्मानात्मविवेक सांगितला त्यांत जो अनात्मा त्याला ओळखून बाजूला काढला. आत्मा जाणून घेतां घेतां मुलांतील आरंभीचा धागा हाताला लागला.

English meaning

Previously there was this `speech' of atma/non-atma vivek and the non-atma was recognised and left aside. Then what remained is the atma knowing this original `I am' connection at the source (therefore He is witnessing mula maya and He is appearing as His reflection).

4
मूळ

मुळीं जे राहिली वृत्ति । जाली पाहिजे निवृत्ति । सारासार विचार श्रोतीं । बरा पाहावा ॥ ४ ॥

मराठी अर्थ

वृत्ति मूळमायेपाशीं जाऊन बसली पण तेथून देखील ती निवृत्त झाली पाहिजे. यासाठीं श्रोत्यांनी सारासार विचारच केला पाहिजे.

English meaning

At this source, this knowing vritti of mula maya remains and this should become nivritti. Within the listener, there is that essence and this non-essence (ie. vritti) and therefore the wise listener should understand thoughtlessness. (First the listener knows the moving, this is the non-essence. Now the wise listener should discover that essence that is the still thoughtless Self)

5
मूळ

नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला । निवृत्तिरुपें हेत उरला । निराकारीं ॥ ५ ॥

मराठी अर्थ

नित्यानित्यविवेक बरोबर झाल्यानें नित्य अंतरात्मा निवडून तेथें वृत्ति चिकटवली, पण तेथून निवृत्त होऊन निराकारांत जावें हा हेतु शिल्लक राहतोच.

English meaning

The vivek of the indestructible/destructible was made and the indestructible atma was chosen. But still there is this knowing vritti (then that atma is appearing as its reflection; knowledge). It is the original desire/intent remaining within that formless nivritti.

6
मूळ

हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्र्चळ । सारासारविचारें चंचळ । होऊन जातें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

हेतु हा अशाश्वतच असतो. आणि निर्गुण स्वरुप तर शाश्वत असतें. जें येतें तें जातें तें अशाश्वत असतें, हें सारासार विचार केल्यानें समजते.

English meaning

This original intent means that atma and this moving `all' and that nirgun means the still. Due to the thoughtlessness of essence/non-essence, this moving gets destroyed.

7
मूळ

चळे म्हणोनि तें चंचळ । न चळे म्हणोनि निश्र्चळ । निश्र्चळीं उडे चंचळ । निश्र्चयेसीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

चळतें म्हणून त्यास चंचळ म्हणतात. चळत नाहीं म्हणून त्यास निश्र्चळ म्हणतात. निश्र्चळ स्वरुपांत चंचळतेला वाव नाहीं. हें निःसंशय समजावें.

English meaning

There is some agitation and therefore there is the moving. If there is no agitation then, there is the still. And in the still, this moving completely flies away.

8
मूळ

ज्ञान आणि उपासना । दोनी येकचि पाहाना । उपासनेकरितां जना । जगोद्धार ॥ ८ ॥

मराठी अर्थ

अखेर ज्ञान व उपासना दोन्ही एकरुपच होतात. पण उपासनेमुळें जगाचा उद्धार होतों हें खरें.

English meaning

When knowledge/gnyan and *worship/upasana remain, then that One within this prakruti/purush has not been understood. Still, on account of this worship, the mind gets lifted out of this gross world (through worship one becomes this world beyond, knowledge). *(To take the mind that was sitting with the objects and place it near God; and the one who is in the vicinity of God is this moving form)

9
मूळ

द्रष्टा साक्षी जाणता । ज्ञानधन चैतन्यसत्ता । ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥

मराठी अर्थ

द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता ज्ञान व देव ही सगळीं एकाच अंतरात्म्याची वेगवेगळीं नांवे आहेत. हें समजून घेणें जरुर आहे.

English meaning

When there is the seer or Witness or Knower then, there is this full of knowledge and this power or creative energy or chaitanya. Then that God has in truth become this knowledge; therefore understand the best (ie. thoughtlessness).

10
मूळ

त्या ज्ञानाचें विज्ञान होतें । शोधून पाहा बहुत मतें । चंचळ अवघें नासतें । येणें प्रकारें ॥ १० ॥

मराठी अर्थ

या ज्ञानाचेच मग विज्ञान होतें. निरनिराळ्या अनेक मतांचा अभ्यास केला कीं असें आढळतें जेव्हां सारें चंचळ नाहींसे होतें तेव्हां ज्ञानाचे विज्ञान होते.

English meaning

Then this knowledge/gnyan is vignyan (beyond knowledge). If you search with the mind then, this `all' can be understood and when both the gross creation and this moving `all' get destroyed by thoughtlessness then, there is that essence.

11
मूळ

नासिवंत नासेल किं नासेना । ऐसा अनुमानचि आहे मना । तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आत्मानात्मविवेकानें जें नाशवंत आहे असे ठरलें तें नाश पावतें किंवा नाहीं असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होत नाहीं.

English meaning

Has the destructible been destroyed or has it not? If such conjecture remains then, there is doubt and it means the mind still remains. Then that purush is not worthy of that nirgun understanding (as long as you continue to look for that indestructible within the destructible, you remain a separate mind. He is no-mind and you must become thoughtless).

12
मूळ

नित्य निश्र्चये केला । संदेह उरतचि गेला । तरी तो जाणावा वाहावला । माहा मृगजळीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

अनात्म नाशवंत आहे असा निश्र्चय नेहमी केला आणि तरीसुद्धा त्याबद्दल संशय राहीला, तर तो माणूस दृश्याच्या मोहांत अडकून वाहावला आहे असें समजावें.

English meaning

If there is the conviction of that indestructible but doubt still remains then, you should know that, the atma has been sweep away in this great mirage of maya (this conviction is for that indestructible atma's reflection; and you are being deceived by maya).

13
मूळ

क्षयेचि नाहीं तो अक्षई । व्यापकपणें सर्वां ठाईं । तेथें हेत संदेह नाहीं । निर्विकारी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

परब्रह्माला कधीहीं क्षय नाहीं म्हणून तें अक्षय असतें. व्यापकपणें तें सर्वत्र भरुन राहीलेलें आहे. अशा त्या निर्विकार स्वरुपांत हेतु व संशय याला जागाच नाहीं.

English meaning

That *purush which cannot be destroyed is the indestructible and due to His per- vasiveness there is this place of the `all' (His presence illuminates this destructible `all'). But `there' in that unmodified, this original intent and doubt are not. *(He uses knowledge but remains untouched)

14
मूळ

जें उदंड घनदाट । आद्य मध्य सेवट । अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

निश्चळ परब्रह्म अति विशाल आहे. आणि सगळीकडे अगदी दाटपणें भरुन आहे. आरंभ, मध्य व शेवट या तिन्ही अवस्थांत तें अगदी जसेंच्या तसें अचळ, अढळ व अतूट असतें.

English meaning

Then this mula maya, full of knowledge, is that vast paramatma, at the beginning, middle and end. That does not change, fall down or break. It is, as It is.

15
मूळ

पाहाता जैसें गगन । गगनाहून तें सघन । जनचि नाहीं निरंजन । सदोविरहदित ॥ १५ ॥

मराठी अर्थ

त्याचा अनुभव आला म्हणजे तें आकाशासारखें वाटतें. परंतु आकाशापेक्षांही तें अधिक दाट आहे. आकाशाशिवाय एखादें ठिकाण सापडेल पण ब्रह्मविरहीत असें ठिकाण आढळणार नाहीं. ज्याच्या ठिकाणीं प्राण्यांचा संबंध नाहीं असें तें निरंतर निरंजनपणानें असतें.

English meaning

If you see it, then it is like the *sky. But that Reality is fuller than the sky. It is void of mind and is the niranjan/beyond knowledge and ever-arisen/sadodita. *(Sky/space has this quality of ignorance in it; see 13.6.19- Due to the union with the limiting concept of wind there is space and when there is no limiting concept then there can be no space and what remains is that inconceivable Self)

16
मूळ

चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तों अवघाच पूर्वपक्षु । निर्गुण ठाईंचा अलक्षु । लक्षवेना ॥ १६ ॥

मराठी अर्थ

चर्मचक्षूनें अनुभव घेणें हीं देहबुद्धीची भूमिका, तर ज्ञानचक्षूनें अनुभव घेणें ही आत्मबुद्धीची भूमिका होय. पण या दोन्ही भूमिका ब्रह्मानुभवाच्या अलीकडील आहेत. निर्गुण ब्रह्मरुप हे स्वभावतःच जाणण्याच्या पलीकडे असल्यानें त्यास जाणूं म्हटलें तरी जाणता येत नाहीं.

English meaning

When you see with these physical eyes then that thoughtless Self is all these gross objects and when you see with the eyes of knowledge then, that atma is this original hypothesis (`I am He'). In that place of nirgun, one cannot concentrate on That which cannot be concentrated on.

17
मूळ

संगत्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । संगत्याग करुन पाहीं । मौन्यगर्भा ॥ १७ ॥

मराठी अर्थ

मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यावाचून कोणालाही ब्रह्मस्वरुप होता येत नाहीं. म्हणून साधकानें मीपणाचा निःशेष त्याग करावा. आणि मौनगर्भ म्हणजे शब्दातीत असणारें परब्रह्म अनुभवावें.

English meaning

Without giving up the company of this `thing', that parabrahman will not be. By giving up this attachment, one understands that `essence of silence'.

18
मूळ

निर्शतां अवघेंचि निर्शलें । चंचळ तितुकें निघोन गेलें । निश्र्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥

मराठी अर्थ

असाराचें निरसन करतां करतां सारें असार बाजूस सरलें, जेवढें अशाश्वत होतें, तें सगळें नाहीसें झालें; मगजें निश्र्चळ परब्रह्म उरलरं तेंच सार होय.

English meaning

The inferior gross objects get destroyed and whatever is moving, that much also goes away. The still parabrahman remains. This only is the essence.

19
मूळ

आठवा देह मूळमाया । निर्शोन गेल्या अष्टकाया । साधु सांगती उपाया । कृपाळुपणें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

पिंडब्रह्मांडांच्या देहापैकी आठवा देह म्हणजे मूळमाया होय. तिच्यास आठही देहांचा निरास करण्याची तयारी झाल्यावर साधुपुरुष अतिकृपाळूपणें ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात.

English meaning

The eighth body is mula maya. When it is wiped out then, the eight bodies are all gone. To this remedy of `I am' the sadhu tenderly tells, `No, you do not exist'.

20
मूळ

सोहं हंसा तत्वमसी । तें ब्रह्म तूं आहेसी । विचार पाहातां स्थिति ऐसी । सहजचि होतें ॥ २० ॥

मराठी अर्थ

सः अहं म्हणजे तो मी आहे, हंसः म्हणजे अहं सः म्हणजे मी तो आहे. तत्त्वमसि म्हणजे तें ब्रह्म तूंच आहेस. साधकानें सारासार विचार केल्यास आपलें ब्रह्मस्वरुप सहज अनुभवास येते.

English meaning

so-ham, ham-sa and tattvamasi. They mean, `You are that brahman'. When one understands thoughtlessness then, this state does not remain and there is that natural state (ie. stateless state).

21
मूळ

साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिसुन्य जालें । सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

साधकपणानें राहून संपूर्णसंग त्याग केला कीं केवल ब्रह्म उरतें. साधकाची वृत्तिशून्य अवस्था होते. सारासार विचारानें हेंच साधायचे असतें.

English meaning

If though being brahman, the sadhak remains then, `there' the `vritti of zero' has arisen. Still on account of this zero-form, there can be that thoughtless essence when this knowing vritti is destroyed (maharaj- when you know all is zero then, you are beyond zero or not?).

22
मूळ

तें तापेना ना निवेना । उजळेना ना नासेना । डहुळेना ना निवळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

तें परब्रह्म तापत नाहीं निवत नाहीं. तें चकचकीत होत नाहीं कीं काळवंडत नाहीं. तें ढवळून गढूळ होत नाहीं कीं निवळून स्वच्छ होत नाहीं.

English meaning

That parabrahman does not get hot or cold. It does not shine or become dark. It does not get spoiled nor does it become pure.

23
मूळ

दिसेना ना भासेना । उपजेना ना काळवंडेना । तें येना ना जाईना । परब्रह्म तें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

तें इंद्रियांना दिसत नाहीं आणि मनाला भासत नाहीं. तें उत्पन्न होत नाहीं व नाश पावत नाहीं, तें येत नाहीं व जात नाही.

English meaning

That parabrahman is not seen nor does it appear. It does not take birth nor does it die. That Reality neither comes nor goes.

24
मूळ

तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना । जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

तें भिजत नाहीं वा वाळत नाहीं, तें जळत नाहीं आणि विझत नाहीं, त्यास कोणीही कोठे नेऊं शकत नाहीं.

English meaning

That Reality does not get wet or dry. That Reality cannot be extinguished or set ali- ght. When that purush does not get lead away to this `all' then, it is that parabrahman.

25
मूळ

जें सन्मुख चि चहुंकडे । जेथें दृश्य भास उडे । धन्य साधु तो पवाडे । निर्विकारीं ॥ २५ ॥

मराठी अर्थ

चहुकडे जिकडे बघाल तिकडे तें समोर उभें राहातें. त्याच्या ठिकाणी सार्‍या दृश्याचा भास नाहींसा होतो. अशा त्या निर्विकार ब्रह्माशी तदाकार होतो तो मोठा साधु होय.

English meaning

mula maya is facing you, in every direction. When this visible appearance `here' takes flight then, blessed is that sadhu for He has entered within the unmodified.

26
मूळ

निर्विकारी कल्पनातीत । तोचि वोळखावा संत । येर अवघेचि असंत । भ्रमरुप ॥ २६ ॥

मराठी अर्थ

स्वतः कल्पनातीत होऊन जो निर्विकल्प ब्रह्मामध्यें लीन होतो तोच संत म्हणून ओळखावा. बाकीचे सगळे मायेच्या कक्षेंतील असंत समजावेत. ते भ्रमरुप असतात.

English meaning

In that nirvikalpa `beyond imagination', the Saint should be recognized. The rest, due to these `many' things, are not Saints and are caught in delusion.

27
मूळ

खोटें सांडून खरें घ्यावें । तरीचं परीक्षवंत म्हणावें । असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

जो खोटे बाजूल सारुन खरें ग्रहण करतो, त्याला परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्यानें भ्रमरुप असार टाकून परब्रह्मस्वरुप सार तें घ्यावें.

English meaning

2The zero vritti understands `nothing is there'. But still he is there and this is a sadhak and not a siddha 27. Leaving aside the false, one should accept the Truth; then only should one be called a true examiner. When the non-essence is throw off then, that essence can be accepted and that is parabrahman.

28
मूळ

जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ति तद्रूप होते । आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे ॥ २८ ॥

मराठी अर्थ

सार जाणतां जाणतां अखेर आपली जाणीव नाहींशी होतें, वृत्ति ब्रह्मस्वरुपाशी तदाकार होतें. खरी आत्मनिवेदन भक्ति अशी आहे.

English meaning

By continuously knowing, that knowing goes off and your vritti becomes like that nivritti. This is the ninth devotion and it is the `surrender to the atma' and it is that Reality.

29
मूळ

वाच्यांशें भक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी । विवरतां हेतु नुरावी । ते तद्रूपता ॥ २९ ॥

मराठी अर्थ

भक्ति आणि मुक्ति यांचें शब्दांनीं वर्णन करावें. त्या शब्दांचा अर्थ ध्यानांत घेऊन तद्रूपता कशी असते तें बुद्धिनें आकलन करावें. त्यावर चिंतन करतांकरतां मी पण नाहींसें झालें की तद्रूपता साधते.

English meaning

Due to this `word' meaning there is this `spoken' liberation *(`I am He'/knowledge) and due to the implied meaning, there is the thoughtlessness of pure knowledge. And due to this thoughtlessness, this original intent does not remain and there is that Reality. *(tattwasmi means, You are That. First this You must be understood. It is the `word' meaning and this `I am' remains. Then That should be understood. It is the implied meaning and it is what remains when you do not)

30
मूळ

सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । स्वस्वरुप म्हणिजे आपलें रुप । आपलें रुप म्हणिजे अरुप । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥

मराठी अर्थ

जें परब्रह्म सद्रुप आहे व चिद्रूप आहे त्याच्याशी आपलें स्वस्वरुप तद्रूप आहे, पण सर्व तत्वांचें निरसन झाल्यावर आपलें रुप अरुपच आहे असा अनुभव येतो.

English meaning

There is this existence-form/satrup, this knowledge-form/chidrup and that pure knowledge. That is the true swarup and it means your form. And your form means without form, when the elements are eliminated (when even the space and wind are no more). (Existence and knowledge are qualities of sagun and not pure knowledge. Your swarup is formless, free of existence and knowledge) .