अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग

Fully populated

Shraddhatraya Vibhaga Yoga (The Yoga of the Threefold Faith)

Original & Marathi meaning source: सार्थ ज्ञानेश्वरी (Sartha Dnyaneshwari) by Dhananjay Maharaj More — original ovi text and Marathi meaning

English meaning source: Dnyaneshwari, English translation by D. A. Ghaisas

Ovi numbers follow the Sartha Dnyaneshwari (96kulimaratha.com) edition; the chapter's own colophon confirms 433 ovis and 28 Gita shlokas. The Ghaisas English translation was found to be printed TWICE in full in the source text (an entire duplicate copy of the chapter, complete with its own repeated chapter heading, immediately follows the first) - only the first copy was used, and the second was discarded entirely. Ovi 433's English translation is an unlabeled closing paragraph with no number of its own, recovered by position and matched against the corresponding Marathi ovi's content.

All 433 ovis are populated and cross-checked between the two sources. The Marathi source had one marker printed with an en-dash instead of a hyphen ('212–17', silently unrecognized by the usual pattern), causing that ovi to be dropped entirely until the marker-matching regex was extended to accept en-dashes; and one marker misprinted with a dropped leading digit ('223-17' appearing a second time for what its own content confirms is really ovi 323, colliding with the genuine ovi 223), hand-corrected by recovering the real ovi 223 from its own earlier, correctly-labeled occurrence. Sanskrit Gita shlokas are interspersed between ovis and are not counted as separate ovis or included as verse content here.

1
मूळ

विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥1॥

मराठी अर्थ

ज्या जीवांवर तुझ्या स्वरूपसमाधीचा प्रसाद होत नाही त्यास हे चराचर विश्व सत्य वाटते, असे सर्व गणाधीशरूप श्रीगुरुराया जे तुम्ही, त्या तुम्हास प्रणाम असोत.

English meaning

O my teacher, you are like the Lord Ganesha, and in the experiencing of the trance taught by you, which is just like the yogic sleep, the hold of the exterior universal perception on the consciousness of a Jeeva is slackened, I bow before you!

2
मूळ

त्रिगुणत्रिपुरी वेढिला । जीवत्वदुर्गी आडिला । तो आत्मशंभूने सोडविला । तुझिया स्मृती ॥2॥

मराठी अर्थ

श्रीशंकर त्रिपुरासुराचा वध तुझ्या स्मरणानंतरच करू शकले, त्याप्रमाणे, त्रिगुणात्मक मायारूप असुराने वेढलेला जीवदशेमध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर तो ह्या संकटांतून गणाधीश, जो तू, त्या तुझ्या स्मरणाने मुक्त झाला.

English meaning

The three modifications as the Sattwa, the Rajas and the Tamas are like the city of Tripura, in which the soul who is like Lord Shiva, is caught in the castle of his soul-hood, but by remembering your name, the soul or the Atman, as Lord Shiva is released from that bondage.

3
मूळ

म्हणौनि शिवेसी काटाळा । गुरुत्वे तूचि आगळा । तऱ्ही हळु मायाजळा- । माजी तारूनि ॥3॥

मराठी अर्थ

आपल्या स्मरणाने आत्मशंभूते माया त्रिपुराचा वध केला असल्यामुळे तुलनेने आपण (गुरुत्वांत) शंकरापेक्षांही श्रेष्ठ असून, जीवांस मायानदींतून पैलतीरावर नेणारे म्हणून नौके पेक्षांही हलके आहां.

English meaning

Put in a weighing scale with the Lord Shiva, you are thus heavier in the role of a Guru, but light enough to be the "float" on the sea of Maya to ferry the seekers to the other shore.

4
मूळ

जे तुझ्याविखी मूढ । तयांलागी तू वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥4॥

मराठी अर्थ

ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही त्यांना तु वक्रतुंड आहेस असे वाटते, पण तत्त्ववेत्यांन तू सदैव उजु अथवा समच आहेस.

English meaning

You are the destroyer of the "twisted" for those who are ignorant about you, but for the wise people, you are completely straight- forward. (Vakratunda is the name of Lord Ganesha, which has one meaning that "He is having twisted mouth", and the other meaning is, "He is the destroyer (Tunda) of the twisted (Vakra)."

5
मूळ

दैविकी दिठी पाहता सानी । तऱ्ही मीलनोन्मीलनी । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥5॥

मराठी अर्थ

हे गुरु गणपते, आपली दृष्टि (नेत्र) स्वभावतःच लहान आहे खरी, पण त्यांच्या मीलनोन्मीलनाने (उघडझांपीनें) जगाचा उत्पत्ति प्रलयादि व्यवहार सहज व्हावा असे तिचे सामर्थ्य आहे.

English meaning

Your divine eyes appear to be very small but you are capable of creating the whole universe and destroying it by the mere opening and closing of your eyelids.

6
मूळ

प्रवृत्तिकर्णाच्या चाळी । उठली मदगंधानिळी । पूजीजसी नीलोत्पली । जीवभृंगांच्या ॥6॥

मराठी अर्थ

आपल्या प्रवृत्तिरूप कर्णाच्या चलनाते गंडस्थलांतून वाहणाऱ्या मदाचा सुगंध आसमंतात पसरून, त्यायोगे जीवरूपी नील भ्रमर तेथे जमा होतात व जणू काही नीलकमलांनीच आपले पूजन केल्याप्रमाणे आपण शोभतां.

English meaning

When you move swiftly your ear which denotes extrovert activity, there is the wind made fragrant by the juice percolating from your forehead by which Jeevas, like black-bees, sworn around you, and they seem like blue lotus flowers by which you are worshipped.

7
मूळ

पाठी निवृत्तिकर्णताळे । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हा मिरविसी मोकळे । आंगाचे लेणे ॥7॥

मराठी अर्थ

मागाहून निवृत्तिरूप कर्णाच्या गतीने ती बांधलेली पूजा उधळून गेली (अंतर्मुखता आली) म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन होते.

English meaning

But when you flutter the second ear of "withdrawal into abstract", the whole decoration of worship is disturbed, and you appear in your pure uncovered Being.

8
मूळ

वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसे कळासु । दाविसी तू ॥8॥

मराठी अर्थ

आपली वामांगा सरस्वती (आदिमाया) तिचा नृत्यविलासाचा प्रभाव, तोच हा जगदाभास होय; व ते तांडवकौशल्य प्रकाशन तुम्ही करितां. (तुमच्या प्रकाशाने होते)

English meaning

The whole attractive appearance of the world of name and form, which results because of the extra-ordinary beautiful dance of the damsel Maya is, really speaking, the exponance of the skill of your war-dance (Tandava dance).

9
मूळ

हे असो विस्मो दातारा । तू होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥9॥

मराठी अर्थ

हे असो; दयाळा, आपला दुसरा चमत्कार काय सांगावा ? की, तुझ्याशी सोयरीक जोडतो तो सोयरिकीच्या व्यवहारांतून कायमचा मुक्त होतो. ( त्वद्रूप होतो, भिन्नत्वाने उरत नाही. )

English meaning

O the most generous Ganesha! Not only this, but paradoxical effect of your intimacy is that one who is so closely related to you, loses all the sense of relationship which is implied in the world of duality.

10
मूळ

फेडिता बंधनाचा ठावो । तू जगद्बंधु ऐसा भावो । धरू वोळगे उवावो । तुझाचि आंगी ॥10॥

मराठी अर्थ

बंधनांतून मुक्त करणारे असे जगद्बंधु आपण आहां, ह्या भावनेने जो तुला शरण येऊ पहातो (त्याच्या ठिकाणी तुझ्याच आनंदाचा आविर्भाव होतो).

English meaning

Another riddle is that, you are called the brother of all the world (Bandhu), but actually you destroy all the bondage (Bandha) and yet there is the 'joy' in the mind of the devotee suddenly getting himself attached to you.

11
मूळ

तव दुजयाचेनि नांवे तया । देहही नुरेचि पै देवराया । जेणे तू आपणपया । केलासि दुजा ॥11॥

मराठी अर्थ

त्या योगे, हे गुरुराया, ज्या देहामुळे मी एक व तू एक असा दैतव्यवहार सिद्ध होतो तो त्याचा देहच (देहात्मभावच) आपण दुजेपणाने उरू देत नाही. (देहबुद्धि बाधित होते)

English meaning

But O Lord, when the duality is totally dissolved the devotee is not aware of his separate body.

12
मूळ

तूते करूनि पुढे । जे उपाये घेती दवडे । तया ठासी बहुवे पाडे । मागांचि तू ॥12॥

मराठी अर्थ

तुला दृश्य विषय मानून जे तुझ्या दर्शनार्थ अनेक प्रकारचे उपाय योजून धावाधाव करितात, त्यांच्या तर तू प्रायः मागेच असतोस. ( त्यांना तुझे दर्शन होतच नाही )

English meaning

But those who imagine you to be separate from them and try to reach you as a final goal through the practice of Yoga etc., find that you are quite at a distance from them and left unnoticed!

13
मूळ

जो ध्याने सूये मानसी । तयालागी नाही तू त्याचे देशी । ध्यानही विसरे तेणेसी । वालभ तुज ॥13॥

मराठी अर्थ

जे ध्यान करून तुला चित्तांत आणू पहातात, त्यांन तर तुझा पत्ताच लागत नाहीं; उलट ध्यानासह ज्यांना देहबुद्धीचा विसर पडतो ते तुला फार प्रिय असतात.

English meaning

You are not caught in the field of meditation of those, who try to concentrate upon you in their minds, but for him who even forgets to meditate upon you because of the arising of complete unity in him, you are the most beloved of all.

14
मूळ

तूते सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणे । वेदांही येवढे बोलणे । नेघसी कानी ॥14॥

मराठी अर्थ

ज्याची सिद्धि केली जावी असा तू नसून तू स्वतःसिद्ध आहेस हे न जाणतांही जो वेद सर्वज्ञ म्हणून गणला जातो त्याने (वेदाने ) केलेले एवढे मोठे वर्णनही तुम्ही कानावर घेत नाही.

English meaning

He who does not know that you are a completely self-sufficient totality, proudly totes his omniscience, but how can you listen to his babble? Because Vedas who are so talkative, do not get any hearing from you. (Vedas are not able to describe god (properly).

15
मूळ

मौन गा तुझे राशिनांव । आता स्तोत्री के बांधो हाव । दिसती तेतुली माव । भजो काई ॥15॥

मराठी अर्थ

पत्रिकेवरून ” मौन ” हे तुझी राशिनाम आहे, मग अशा वस्तूची स्तुति करण्याची का हाव धरावी ? शिवाय जेवढे म्हणून दृश्यजात आहे ही आपली माया होय; मग भजावे तरी कसे ?

English meaning

'SILENCE' is your name according to your zodiacal sign; then how can one think of praising you? This is because when in whatever form, you are visible, it is nothing but delusion, where is the scope for any devotion to be offered to you?

16
मूळ

दैविके सेवकु हो पाहो । तरी भेदिता द्रोहोचि लाहो । म्हणौनि आता काही नोहो । तुजलागी जी ॥16॥

मराठी अर्थ

तुम्हाला सेव्य मानून सेवक होऊ असे म्हणावे तरी ह्या भेदभावनेने मी एकप्रकारे द्रोहीच ठरेन, म्हणून ” तुझा मी अमुक ” असे नाते लावण्याच्या भानगडत न पडणेच बरे. (त्वद्रूप होणे उत्तम)

English meaning

If I try to conceive myself as your servant, by that very act I become accused of the crime of imposing a duality between us. Therefore it is best not to do anything about you.

17
मूळ

जै सर्वथा सर्वही नोहिजे । तै अद्वया तूते लाहिजे । हे जाणे मी वर्म तुझे । आराध्य लिंगा ॥17॥

मराठी अर्थ

हे आराध्य गुरुराज ह्या सर्व दृश्याचा तत्त्वतः मजपाशी काहीही संबंध नाही असे जेव्हा मी पूर्णपणे जाणेन तेव्हांच मला आपल्या अद्वयस्वरूपाचा लाभ होईल हे आपल्या स्वरूपाचे वर्म मी ओळखतों.

English meaning

O the symbol of all my worship! I have understood this very well as the most secret thing about you, that you are realised in oneness only when we totally drop every kind of distinction and duality.

18
मूळ

तरी नुरोनि वेगळेपण । रसी भजिन्नले लवण । तैसे नमन माझे जाण । बहु काय बोलो ॥18॥

मराठी अर्थ

तरी दुजेपणाने न राहता मीठ जलाशी जसे एकरूप होते त्याचप्रमाणे तुला खरे नमन करणे म्हणजे तुझ्या स्वरूपाहून भिन्नत्वे न उरणे हे होय; मी आणखी काय बोलावे ?

English meaning

Therefore what more can I say? Please accept my salutations as salt is absorbed in the liquid tasty juices of boiled vegetable!

19
मूळ

आता रिता कुंभ समुद्री रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । का दशी दीपसंगे । दीपुचि होय ॥19॥

मराठी अर्थ

असे पहा की, रिकामा कुंभ समुद्रांत बुडविला असता जसा भरून बाहेर येतो किंवा सुताची दशी ही दीपसंगानं दीपत्व पावते.

English meaning

Now just as an empty pot is dipped in the sea and taken out, it comes filled with water, or just as the wick, when touched by a flame, becomes itself a flame

20
मूळ

तैसा तुझिया प्रणिती । मी पूर्णु जाहलो श्रीनिवृत्ती । आता आणीन व्यक्ती । गीतार्थु तो ॥20॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हे निवृत्तिनाथ श्रीगुरुराया, तुम्हाला प्रणाम केल्याने माझे अपूर्णत्व फिटले; ( मी पूर्ण झालो ) आता गीतार्थ स्पष्टपणे मांडतो.

English meaning

Similarly O Shri Nivritti! by bowing before you I have become fulfilled. Therefore I will proceed to explain the meaning of Geeta further.

21
मूळ

तरी षोडशाध्यायशेखी । तिये समाप्तीच्या श्लोकी । जो ऐसा निर्णयो निष्टंकी । ठेविला देवे ॥21॥

मराठी अर्थ

तरी षोडशाध्यायाच्या अखेरच्या श्लोकात देवांनी जो असा असंदिग्ध निर्णय दिला आहे;

English meaning

(Dnyanadeva begins to talk about Geeta)- "Now at the end of the sixteenth chapter, in its last verse, the Lord has emphatically given direction to the effect that

22
मूळ

जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥22॥

मराठी अर्थ

की अर्जुना, कर्तव्य काय किंवा अकर्तव्य कोणते हे जाणणे तर शास्त्रप्रामाण्यावरूनच ती व्यवस्था तू ठरविली पाहिजे.

English meaning

"O Partha, you have to abide by the orders given by the scriptures as the standard in the matter of deciding right action and wrong action."

23
मूळ

तेथ अर्जुन मानसे । म्हणे हे ऐसे कैसे । जे शास्त्रेवीण नसे । सुटिका कर्मा ॥23॥

मराठी अर्थ

तेव्हा अर्जुन मनात म्हणतो, कर्मालाही शास्त्रावाचून सुटका नसावी असे का असावे ?

English meaning

There Arjuna thought, "How is it that no action can be done without the help of scriptures?

24
मूळ

तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कै तो मणि काढे । कै नाकीचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥24॥

मराठी अर्थ

पण सर्वाच्या फणेला हात घालून त्यावरील मणि काढणार कसा ? किंवा सिंहाच्या नाकांतील केस कोणी उपटून आणू शकतो काय ?

English meaning

How can one stand on the hood of the great serpent Takshaka and take out the gem from his head? And how can one pluck the hair from the nose of a lion?

25
मूळ

मग तेणे तो वोविजे । तरीच लेणे पाविजे । एऱ्हवी काय असिजे । रिक्तकंठी ? ॥25॥

मराठी अर्थ

पण, हे घडेल तेव्हा त्या केसांत तो मणि ओवून मगच ते भूषण गळ्यात घालावे आणि एऱ्हवी गळा काय रिकामा ठेवावा ?

English meaning

And then if we have to sew that gem by the thread of that hair, then only we can put the garland around our neck! If this is not possible, should we keep our neck without ornament?

26
मूळ

तैसी शास्त्रांची मोकळी । या कै कोण पा वेटाळी । एकवाक्यतेच्या फळी । पैसिजे कै ? ॥26॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून ती वाचावी कोणीं ? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार ?

English meaning

So how can we reconcile and bring together all the various scriptures and have the fruit of unanimous opinion?

27
मूळ

जालयाही एकवाक्यता । का लाभे वेळु अनुष्ठिता । कैचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥27॥

मराठी अर्थ

कदाचित् एकवाक्यता होऊ शकली तरी, अनुष्ठानाला वेळ कोणाला आहे ? आणि जीवाच्या आयुष्याचा तरी तस काय नेम सांगावा ?

English meaning

All right! Suppose we finally decide what is right action in this way, will we have enough time to actually perform that action? And is one life period enough to fulfill the orders of the scripture?

28
मूळ

आणि शास्त्रे अर्थे देशे काळे । या चहूही जे एकफळे । तो उपावो के मिळे । आघवयांसी ? ॥28॥

मराठी अर्थ

आणि समजा, शास्त्र, द्रव्य, देश, काल, ह्या सर्वाचा जरी क्वचित् एकत्र योग आला, तरी सर्वाना तो उपाय कसा साध्य व्हावा ?

English meaning

And how can all men get lucky enough to have co-ordination of the scriptures, their meaning, enough money, right place, and right time for all this? So

29
मूळ

म्हणौनि शास्त्राचे घडते । नोहे प्रकारे बहुते । तरी मुर्खा मुमुक्षा येथे । काय गति पा ? ॥29॥

मराठी अर्थ

अशा अनेक प्रकाराने शास्त्रवचन पाळून कर्म करणे अशक्य ठरते, मग अज्ञ जे मुमुक्षुजन ह्यांना काय तरणोपाय आहे ?

English meaning

It seems very difficult to do any action exactly according to the rules. Then where is the scope for ordinary men, who seek liberation, to do anything?"

30
मूळ

हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥30॥

मराठी अर्थ

अर्जुनाने मनातील हा अभिप्राय विचारण्यासाठी प्रस्तावना केली तोच ह्या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय होय.

English meaning

Arjuna desires to ask this question and that is the subject of the seventeenth chapter.

31
मूळ

तरी सर्वविषयी वितृष्णु । जो सकळकळी प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वे जो ॥31॥

मराठी अर्थ

तरी सर्व विषयांविषयी निरिच्छ असून सकलकलानिपुण असणारा व देवांना आनंद देणारा असा अर्जुनरूपाने अवतरलेला जो दुसरा कृष्णच असा.

English meaning

Arjuna was very disinterested in ordinary enjoyments of life; was already accomplished in all arts and skills, and as "Arjuna", he was alike Krishna for Krishna also.

32
मूळ

शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥32॥

मराठी अर्थ

जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण, ज्याची लीला म्हणजे सुखालाही उपचाररूप होय. (सुख रूप)

English meaning

He was the support of bravery, the ornament of the 'Soma' lineage of kings, and all the worldly happiness was a child's play for him.

33
मूळ

जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥33॥

मराठी अर्थ

जो बुद्धिमंतांमध्ये बुद्धिमंत असा प्रज्ञेचा लाडका, ब्रह्मविद्येचे विश्रांतिस्थान, व देवांच्या चित्तांत नित्य असणारा सहचर असा जो अर्जुन,

English meaning

He was the beloved of the 'lady intelligence', the maternal home of spiritual wisdom and the constantly accompanying consciousness of Lord Krishna.

34
मूळ

तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रिया फांवलिया ब्रह्मा । तुझा बोलु आम्हा । साकांक्षु पै जी ॥34॥

मराठी अर्थ

तो अर्जुन म्हणतो, हे तमालश्यामप्रभो, हे इंद्रियविषय ब्रह्ममूर्ते, आपण सांगितले खरे, पण त्यावर एक शंका येते ती अशी.

English meaning

Arjuna who was thus accomplished in every field of life asked- "O the darkly beautiful god, (like the leaf of Tamala tree), you are Brahman perceptible to our senses also! But your statement seems to us as leaving many loopholes of doubt.

35
मूळ

जे शास्त्रेंवाचूनि आणिके । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसे का कैपखे । बोलिलासी ॥35॥

मराठी अर्थ

प्राणिमात्राला शास्त्रज्ञानावाचून मोक्षाचा अनुभव अन्य कशानेही येणारच नाही असे आपण कैपक्षाने म्हणजे ” अन्यकशानेही नव्हे ” असे सांगितले ते का ?

English meaning

Why did you say that except following the scriptures, the soul has no other means of emancipation?

36
मूळ

तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥36॥

मराठी अर्थ

समजा; शास्त्राध्ययनाला अनुकूल असा देश लाभला नाही, आयुष्यही भरपूर नाही, असेल अध्यापक.

English meaning

My Lord, for studying the scriptures, right place, time and the teacher are necessary, but if these are not available;

37
मूळ

आणि अभ्यासी विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाही आपैतिया । तिये वेळी ॥37॥

मराठी अर्थ

व अभ्यासाला आवश्यक सामुग्रीही प्राप्त अशी होण्यासारखी नसेल अशा वेळी.

English meaning

And if there is shortage of many other things which are helpful for study;

38
मूळ

उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसे ठेले आपादन । शास्त्राचे जया ॥38॥

मराठी अर्थ

किंवा अदृष्ट अनुकूल नाहीं, बुद्धीचीही तेवढी धारणा नाही अशी शास्त्राविषयी ज्याची स्थितिअसेल,

English meaning

And again if there is no store of good fortune through good past Karma, and the resultant intellectual facility, then one finds that his study of scriptures is stopped; and in such a case,

39
मूळ

किंबहुना शास्त्रविखी । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिही ॥39॥

मराठी अर्थ

किंबहुना, शास्त्राचे अमुक एक निश्चित प्रमेय आहे ह्याचा निर्णय न झाल्यामुळे ज्यांनी त्याचा विचारच सोडून दिला आहे.

English meaning

If those have not any touch of the scriptural knowledge at all, and thus have given up any botheration about what the scriptures have to say;

40
मूळ

परी निर्धारूनि शास्त्रे । अर्थानुष्ठाने पवित्रे । नांदताति परत्रे । साचारे जे ॥40॥

मराठी अर्थ

पण, ज्यांनी त्यांचा अभ्यास करून, यथाविधि पवित्र अनुष्ठानाने परलोक गाठून तेथे जे खरोखर नांदत आहेत.

English meaning

But are such persons who have real desire to be equally happy in the other world,

41
मूळ

तया {ऐ}से आम्ही होआवे । ऐसी चाड बांधोनि जीवे । घेती तयांचे मागावे । आचरावया ॥41॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपणही व्हावे अशी इच्छा मनात बाळगून जे जीवेभावे त्यांच्या मार्गाचे अवलंबन करतात.

English meaning

Like those who are well versed in the knowledge of scriptures and perform the sanctimonious rites imitating those experts, (but without proper knowledge of it);

42
मूळ

धड्याचिया आखरा । तळी बाळ लिहे दातारा । का पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥42॥

मराठी अर्थ

म्हणजे प्रभो, धडयातील अक्षरे पाहून बाल जसा तशी अक्षरे खाली काढितो, किंवा डोळस मनुष्य पुढे घेऊन त्याच्या आधाराने जसा स्वतः असमर्थ अंधही चालतो

English meaning

O the generous Lord, just as a child rewrites and overwrites the characters of the alphabets already scribed by the expert teacher or just as a blind man walks taking the help of a man having sight;

43
मूळ

तैसे सर्वशास्त्रनिपुण । तयाचे जे आचरण । तेचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥43॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, सर्वशास्त्रनिपुण अशा लोकांचे जे आचरण हे प्रमाण मानून, त्यावर जे श्रद्धा ठेवितात.

English meaning

Similarly some people follow the acts of the well-versed experts in all the scriptures as the standard for performance of various rituals, by putting faith in them.

44
मूळ

मग शिवादिके पूजने । भूम्यादिके महादाने । आग्निहोत्रादि यजने । करिती जे श्रद्धा ॥44॥

मराठी अर्थ

आणि शिवादि देवतांचे पूजन, भूमीसारखे महादान देणे, अग्निहोत्रादि यज्त्रयाग करणे इयदि कर्म जे श्रद्धेने आचरतात.

English meaning

With that faith they perform the Shiva worships or generously give land in charity; or the practice of maintenance of sacred fire in the home, and fire sacrifice etc.,

45
मूळ

तया सत्त्वरजतमा- । माजी कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हा । सांगिजो जी ॥45॥

मराठी अर्थ

त्यांना, हे प्रभो, सत्व, रज, तमापैकी कोणत्या कर्माची गति प्राप्त होते ते कृपा करून सांगावे होय.

English meaning

O Purushottama, please tell what is the state and fate of these faithful souls according to the three qualities of Sattwa (piousness), Rajas (energetic activity) and Tamas (dirty laziness).

46
मूळ

तव वैकुंठपीठींचे लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हे जग । अंगच्छाया ॥46॥

मराठी अर्थ

तेव्हां, जो वैकुंठाधिपति असून वेदरूपी कमलाचा जणु परागच, व अंगाचा आधार जसा छायेला असतो तसे ज्याच्या सत्तेवर हे सर्वं जग जगते;

English meaning

Upon this, the Lord Shrikrishna who is the Ruler of the high seat of Vaikuntha, who is the fragrant pollen of the Lotus which is Veda, and by whose shadow, this whole universe functions.

47
मूळ

काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥47॥

मराठी अर्थ

व जो प्रत्यक्ष कालरूपच असून सहजच मोठा प्रौढ, लोकोत्तर, अद्वितीय, गूढ आणि आनंदघन आहे.

English meaning

Though time is naturally the mightiest of all, and non duality is the extra- ordinary and tremendously unfathomable state of bliss,

48
मूळ

इये श्लाघिजती जेणे बिके । ते जयाचे आंगी असिके । तो श्रीकृष्ण स्वमुखे । बोलत असे ॥48॥

मराठी अर्थ

आणि हे सर्व गुण जिच्या आधारावर वर्णिता येतात अशी जी शक्ति, तीही ज्यांच्या सत्तेवर नांदते, असा जो श्रीकृष्णश्रीकृष्ण भगवान तो स्वमुखाते सांगता झाला.

English meaning

The Lord by whose supreme power this Time and the non duality become so powerful, now answered personally- - The Lord said, "The faith of all who bear a body, a form, is naturally three-fold, such as Sattwic, Rajasic and Tamasic; Please listen to it. (2).

49
मूळ

म्हणे पार्था तुझा अतिसो । हेही आम्ही जाणतसो । जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि की ॥49॥

मराठी अर्थ

श्रीभगवान म्हणतात पार्था, शास्त्राभ्यासाला अनेक अडचणी असणे शक्य आहे असा तुझ्या शंकेचा भाव आम्ही जाणतो.

English meaning

The Lord said- "O Partha, I know the acute feeling in your heart. I am aware that this condition of the study of scripture is a great difficulty for you.

50
मूळ

नुसधियाची श्रद्धा । झोंबो पाहसी परमपदा । तरी तैसे हे प्रबुद्धा । सोहोपे नोहे ॥50॥

मराठी अर्थ

केवल श्रद्धेच्या जोरावर मोक्षप्राप्ति व्हावी असे तुला वाटते, पण ही गोष्ट काही इतकी सोपी नाही.

English meaning

You are trying to grasp the supreme state merely by your faith; but, O the wise one! That is not so simple!

51
मूळ

श्रद्धा म्हणितलियासाठी । पातेजो नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टी । अंत्यजु नोहे ? ॥51॥

मराठी अर्थ

केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हे पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय ?

English meaning

O the crowned one, it is not advisable to say that "This is our faith", and rely upon it to achieve liberation. My dear, if a Brahmin continuously lives with the low caste man, does not the Brahmin become also of the low caste?

52
मूळ

गंगोदक जरी जाले । तरी मद्यभांडा आले । ते घेऊ नये काही केले । विचारी पा ॥52॥

मराठी अर्थ

विचार कर की, गंगोदक जरी असले तरी, ते मद्याच्या भांड्यात भरले असता केव्हांही सेवनीय रहात नाही.

English meaning

Even though there is water of the river Ganges, if it is brought in a pot of liquor, it should not be accepted. You should think about this.

53
मूळ

चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तै हाती धरिता जाळू । न शकेकाई ? ॥53॥

मराठी अर्थ

चंदन अंगाने शीतळ खरा, पण त्याच्या काष्ठाला अग्निसंबंध झाला तर, त्याने हात भाजणार नाही काय ?

English meaning

Sandal-wood is cool, no doubt, but if it is burning, will it not burn your hand, if you hold it?

54
मूळ

का किडाचिये आटतिये पुटी । पडिले सोळे किरीटी । घेतले चोखासाठी । नागवीना ? ॥54॥

मराठी अर्थ

किंवा हिणकस सोन्याच्या आटणीत उत्तम सोने पडले आणि, नंतर अर्जुना, ते सर्व चोख सोन्याच्या भावाने खरेदी केले तर नुकसान होणार नाही काय ?

English meaning

O the crowned one, if pure gold is put into an urn in which already gold mixed with lesser metal is boiling and if it is again poured out, will it not be also causing loss, being impure?

55
मूळ

तैसे श्रद्धेचे दळवाडे । अंगे कीर चोखडे । परी प्राणियांच्या पडे । विभागी जै ॥55॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, श्रद्धा ही स्वरूपतः चांगली खरी, पण ती जेव्हा कोणा जीवांच्या वाटयास येते.

English meaning

Similarly faith as such is very pure, but to whatever types of beings it is attached,

56
मूळ

ते प्राणिये तव स्वभावे । आनादिमायाप्रभावे । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥56॥

मराठी अर्थ

तेव्हा ते जीव स्वभावतःच अनादि मायेच्या शक्तीने त्रिगुणांचेच बनलेले असल्यामुळे.

English meaning

Those beings having been subjected to the beginingless Maya, are moulded in the three qualities, and therefore faith becomes polluted.

57
मूळ

तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तै तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥57॥

मराठी अर्थ

व त्या त्रिगुणांतही नेहमी दोन गुण दबले जाऊन एकाच उन्नतगुणाचा प्रभाव सुरू असतो, तेव्हा जीवांची वृत्ति त्या गुणानुरोधाची असते.

English meaning

The two qualities out of the three become weak and the remaining one becomes powerful, and the attitude of those beings change according to that.

58
मूळ

वृत्ती{ऐ}से मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहे ॥58॥

मराठी अर्थ

वृत्तिप्रमाणे मनाची घडण, मनाप्रमाणे क्रिया, आणि क्रियेप्रमाणे मेल्यावर पुन्हा देह असे चक्र सुरु असते.

English meaning

Then their mind is moulded according to the attitude, action is committed according to the mind, and the beings are reborn in next bodies according to the actions committed in this birth.

59
मूळ

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजी सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥59॥

मराठी अर्थ

बीजाचे स्वरूप बदलून झाड होते आणि पुन्हा झाड नाश पावून त्याचा बीजांत अंतर्भाव होतो असे कल्पच्या कल्प गेले तरी, वृक्षत्वजातीचा काही नाश होत नाही.

English meaning

The seed is destroyed and the tree grows; the tree is destroyed, but it is still maintained in a small form in the seed. This cycle goes on for millions of years, but the 'die' of caste does not break.

60
मूळ

तियापरी यिये अपारे । होत जात जन्मांतरे । परी त्रिगुणत्व न व्यभिचरे । प्राणियांचे ॥60॥

मराठी अर्थ

ह्या क्रमाने, कित्येक जन्मच्या जन्म जरी गेले, तरी प्राण्यांचे त्रिगुणत्व नष्ट होत नाही.

English meaning

Similarly innumerable births take place again and again but the accretions of the three qualities around the souls are never dissolved.

61
मूळ

म्हणूनि प्राणियांच्या पैकी । पडिली श्रद्धा अवलोकी । ते होय गुणासारिखी । तिही यया ॥61॥

मराठी अर्थ

म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली श्रद्धा ही ह्या तीन गुणांपैक, एका कोणत्या तरी एका उन्नतगुणाच्या अनुरोधाची असते.

English meaning

Therefore, you should understand that the faith which every being has is according to these qualities only.

62
मूळ

विपाये वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हा ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥62॥

मराठी अर्थ

कदाचित् शुद्ध सत्व गुणाचा जोर असेल तर त्याला ज्ञानाची इच्छा होते; पण त्याला दुसरे दोन गुण जे आहेत ते प्रतिबंधक आहेत.

English meaning

Supposing by chance, the Sattwic quality is dominant in a person, it gives a call, an invitation to knowledge to join it but there are two antidotes to this one quality.

63
मूळ

सत्त्वाचेनि आंगलगे । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तव रज तम उगे । का पा राहाती ? ॥63॥

मराठी अर्थ

सत्वाच्या आधाराने ती श्रद्धा मोक्षफलाचा मार्ग धरिते; पण त्यावेळी रज व तम हे स्वस्थ कसे बसणार ?

English meaning

When with the help of Sattwa, the faith turns towards achieving the fruit of liberation, how would the two qualities of Rajas and Tamas sit quietly?

64
मूळ

मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशे जाये । तेव्हा तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥64॥

मराठी अर्थ

सत्व गुणाचे रक्षण मोडून जेव्हा रजोगुण उंचावतो तेव्हा तीच श्रद्धा कर्ममार्गाला लागते.

English meaning

The Rajas destroys the strength of Sattwa, and the same faith, when Rajas reaches its unlimited height, becomes the sweeper, who goes on sweeping Karma.

65
मूळ

मग तमाची उठी आगी । तेव्हा तेचि श्रद्धा भंगी । हो लागे भोगालागी । भलतेया ॥65॥

मराठी अर्थ

मागून तमोगुणाची आग भडकली की, तीच श्रद्धा भंग पावून वाटेल ते भोग भोगण्यास प्रवृत्त होते.

English meaning

Then if the fire of Tamas is flared-up, the same faith reaches such a low state that it runs after any objects.

66
मूळ

एवं सत्त्वरजतमा- । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाही गा जीवग्रामा- । माजी यया ॥66॥

मराठी अर्थ

ह्याप्रकारें, अर्जुना, ह्या अगत जीवांच्या वाट्यास आलेल्या श्रद्धेचे स्वरूप ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणासारखे असते; त्यावांचुन केवल श्रद्धा अशी असतच नाही.

English meaning

O the wise one! Know that there is no faith anywhere in the whole world of Beings, which is devoid of these qualities.

67
मूळ

म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पै त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदी इही ॥67॥

मराठी अर्थ

म्हणून श्रद्धा स्वभावतः सत्व, रज किंवा तम ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणभेदाची असते.

English meaning

Therefore again, though faith is only one natural thing, it is divided according to the three qualities of Sattwa, Rajas and Tamas.

68
मूळ

जैसे जीवनचि उदक । परी विषी होय मारक । का मिरयामाजी तीख । उसी गोड ॥68॥

मराठी अर्थ

जसे पाणी हे जीवन खरे, पण विषयुक्त झाले तर मारक होते, मिरचीत किंवा मिऱ्यात तिखट व ऊसात गोड होते.

English meaning

For example, water is one single element, but as poison it kills, in pepper it is pungent, and in sugarcane, it is sweet.

69
मूळ

तैसा बहुवसे तमे । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परीणमे । तेचि होऊनि ॥69॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ज्याचे मन नित्य तमोगुणा ग्रासलेले असते त्याच्या ठिकाणची श्रद्धाही तसाच परिणाम पावून तमोगुणरूपच असते.

English meaning

Similarly the faith of the man, who is completely Tamasic, and takes birth and dies again and again in the same quality, is also Tamasic.

70
मूळ

मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवी श्रद्धा तामसी । सिनी नाही ॥70॥

मराठी अर्थ

मग, काजळ आणि मस ह्यात जसः भेदाभेद करिता येत नाही, तसा तो तमोगुणी मनुष्य व त्याची तामसी श्रद्धा ह्यात भेद नसतो.

English meaning

Then just as the eye-black (collyrium) and soot (lamp-black) are not different, that faith is itself Tamas, and not different.

71
मूळ

तैसीच राजसी जीवी । रजोमय जाणावी । सात्त्विकी आघवी । सत्त्वाचीच ॥71॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे राजस स्वभावाच्या प्राण्याच्या ठिकाणची श्रद्धा राजस व सात्विक पुरुषाच्या अंगची श्रद्धा सत्वरूप असते.

English meaning

Similarly in the case of a soul, who is Rajasic, his faith is also Rajasic and in the man of Sattwa, it is Sattwic.

72
मूळ

ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥72॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे हा सर्व जगद्रूपी पसारा केवळ श्रद्धेचाच ओतला आहे.

English meaning

Thus the whole panorama of the universe is cast out of the three types of faith only.

73
मूळ

परी गुणत्रयवशे । त्रिविधपणाचे लासे । श्रद्धे जे उठिले असे । ते वोळख तू ॥73॥

मराठी अर्थ

परंतु, गुणत्रयवश असणाच्या या श्रद्धेवर तीन गुणांचे भिन्न भिन्न ठसे (चिन्हें) उठलेले तुला ओळखता येतील.

English meaning

But you should understand the three kinds of stamps which the faith bears according to the three qualities.

74
मूळ

तरी जाणिजे झाड फुले । का मानस जाणिजे बोले । भोगे जाणिजे केले । पूर्वजन्मीचे ॥74॥

मराठी अर्थ

कारण, झाड ही त्याच्या फुलावरून, मन हे त्यांच्या द्वारा होणाऱ्या भाषेवरून व पूर्वकर्मे कसे होते हे सांप्रतच्या भोगावरून ओळखता येते.

English meaning

For example, a tree is identified by its flowers, a man's mind is understood by the way he talks, and the past Karma of a man is known by his present conditions.

75
मूळ

तैसी जिही चिन्ही । श्रद्धेची रूपे तीन्ही । देखिजती ते वानी । अवधारी पा ॥75॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ज्या चिन्हावरून श्रद्धेची तिन्ही रूपे ओळखता येतात तो प्रकार कसा ते श्रवण कर.

English meaning

Similarly I shall tell you the signs by which the three kinds of faith can be recognised. Please listen.

76
मूळ

तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तया बहुतकरूनि मेधा । स्वर्गी आथी ॥76॥

मराठी अर्थ

तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो.

English meaning

Those whose character is made up of Sattwic quality are generally fond of heavenly life.

77
मूळ

ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकी ॥77॥

मराठी अर्थ

ते सर्व विद्या शिकतात, यज्ञक्रियेविषयी चर्चा करतात व आपण कोणता करावा हे ठरवितात; किंबहुना, ते देवलोकाला जातात.

English meaning

They study various sciences, select good systems of ritualistic sacrifices, and they enter the divine world.

78
मूळ

आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसा । खेचरा हन ॥78॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, ज्यांच्या ठिकाणी राजस श्रद्धेचा पगडा आहे ते राक्षस पिशाचादिकांच्या भजनी लागतात.

English meaning

And O great warrior! Those who are made up of Rajasic faith, worship the Rakshasas and angels who travel through the astral world.

79
मूळ

श्रद्धा जे का तामसी । ते मी सांगेन तुजपाशी । जे का केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वे ॥79॥

मराठी अर्थ

आणि तामस श्रद्धेचे जे लोक त्यांचे लक्षण तुला सांगावयाचे तर ते केवळ पापाची राशि, कठोर व निर्घृण (दयाशून्य) असतात.

English meaning

I shall also tell you about Tamasic faith, which is like a heap of sin and very cruel and devoid of pity.

80
मूळ

जीववधे साधूनि बळी । भूतप्रेतकुळे मैळी । स्मशानी संध्याकाळी । पूजिती जे ॥80॥

मराठी अर्थ

ते प्राणिवध करून बळी देतात आणि स्मशानांत सायंकाळी भूतप्रेतादि अमंगळ देवतांची पूजा करतात.

English meaning

They kill animals by cruel cunning, and worship the groups of ghosts in cemeteries in ghastly conditions in the greyish evenings.

81
मूळ

ते तमोगुणाचे सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचे घर । श्रद्धेचे ते ॥81॥

मराठी अर्थ

ते तमोगुणचा अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे माहेरघरच होय.

English meaning

Those men are moulded using the essence of Tamas; you may know them as the very home of Tamasic faith.

82
मूळ

ऐसी इही तिही लिंगी । त्रिविध श्रद्धा जगी । पै हे ययालागी । सांगतु असे ॥82॥

मराठी अर्थ

अशी या तीन श्रद्धांची तीन चिन्हे ह्या जगात दिसून येतात; पण तुला अशाकरिता सांगत आहे की,

English meaning

In this way, the three kinds of faith are recognized in this world by these different signs; but I am telling you this with a certain purpose.

83
मूळ

जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥83॥

मराठी अर्थ

त्यातील जी सात्विक श्रद्धा तिचे जतन करून अन्य तद्विरुद्धा ज्या दोन त्यांचा तू त्याग करावा.

English meaning

And that is, I advise you, O wise one, to take care to develop the Sattwic faith and to drop the other two faiths.

84
मूळ

हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य ते ॥84॥

मराठी अर्थ

अर्जुना, ज्याला अशा सात्विक बुद्धीचे संरक्षण किंवा आधार आहे त्याला ते कैवल्यपद म्हणजे काही बागुलबुवा (कठीण) नव्हे.

English meaning

O Dhananjaya! To a man whom this Sattwic faith protects, does not find the final state of aloneness, difficult or fearsome.

85
मूळ

तो न पढो का ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हाती ॥85॥

मराठी अर्थ

तो, वेद, ब्रह्मसूत्रादि न पढो, शास्त्रो अवगाहन (चर्चा) न करो, किंवा त्याला शास्त्रसिद्धांत हस्तगत नसोत.

English meaning

He may not study Brahmassootras; he may not be expert in various scriptures and he may not know the salient principles of philosophy.

86
मूळ

परी श्रुतिस्मृतीचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठाने जगा देत । वडील जे हे ॥86॥

मराठी अर्थ

परंतु जे श्रेष्ठ विद्वान श्रुतिस्मृतींच्या अर्थाची जणू मूर्तीच बनून त्यांचा अनुष्ठानाचा जगाला कित्ता घालून देतात.

English meaning

But there are elderly sages who themselves become the very embodiment of the meaning of Vedas and Smriti's and give by their own actions, codes of penance to the whole world;

87
मूळ

तयांची आचरती पाउले । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेचि फळ ठेविले । ऐसे लाहे ॥87॥

मराठी अर्थ

त्यांच्या आचरणाच्या पावलावर टाकून जो सात्विक श्रद्धावान् चालतो, त्याला, त्यांना जे फल मिळते, तेच फल प्राप्त होते.

English meaning

And people of such Sattwic quality follow the footsteps of these elders with faith; and so they also attain the same fruit like those elders.

88
मूळ

पै एक दीपु लावी सायासे । आणिक तेथे लाऊ बैसे । तरी तो काय प्रकाशे । वंचिजे गा ? ॥88॥

मराठी अर्थ

हे पहा, एकाने सर्व सामग्री जमा करून खटपटने दिवा लावला व तेथे दुसरा आयता येऊन बसला, तर प्रकाश काय त्याच्याशी प्रतारणा करील ?

English meaning

For example, if first, one man lights a lamp by gathering necessary material and if another person just touches his lamps to that lamp, will he be denied the light?

89
मूळ

का येके मोल अपार । वेचोनि केले धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥89॥

मराठी अर्थ

किंवा एखाद्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून घर बांधले आणि कोणी वाटसरू तेथे वस्तीस आला तर त्याला त्या घरातील सुखसोईचा काय भोग घडत नाही ?

English meaning

And if one man spends lot of money and builds a house, would not the tenant also who resides in it get the benefit of that house?

90
मूळ

हे असो जो तळे करी । ते तयाचीच तृषा हरी । की सुआरासीचि अन्न घरी । येरा नोहे ? ॥90॥

मराठी अर्थ

हे असो; जो तलाव बांधील त्याचीच तेवढी तृषा ते हरण करणार काय ? किंवा घरात सिद्ध झालेले अन्न एका स्वयंपाक्यापुरतेच असते आणि इतरास नाही असे का होते ?

English meaning

Also, for example, does a lake quench the thirst of only the man who builds it? Or is the food only for the cook and not for all members in the house?

91
मूळ

बहुत काय बोलो पै गा । येका गौतमासीचि गंगा । येरा समस्ता काय जगा । वोहोळ जाली ? ॥91॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे ? गौतमांनी दीर्घ प्रयत्नांनी आणिलेली गंगा काय त्यांनाच तेवढी गंगा ? आणि इतर जगाला ती ओहोळ होते काय ?

English meaning

What more should I say? Is the Ganges (Godawari, to be exact) meant only for the sage Gautama (who was instrumental to bring the river down on Earth) and for others it is only a brook of dirty water?

92
मूळ

म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयाते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥92॥

मराठी अर्थ

म्हणून, स्वतःसाठीच जे दक्षतेने (कुशलतेने) शास्त्रानुष्ठान करितात, त्यांचे जो श्रद्धाळू जाणून अनुकरण करतो, तो मूर्खही तरून जातो.

English meaning

So, he who faithfully follows the example of the wise persons who perform actions by knowing their essence, also becomes liberated even if he is not intelligent enough. The people who are full of hypocrisy and pride, accompanied by desire, attraction and strength, and who practise fierce penance not sanctioned by the ethics of the moral sciences, (5).

93
मूळ

ना शास्त्राचेनि कीर नांवे । खाकरोही नेणती जीवे । परी शास्त्रज्ञाही शिवे । टेको नेदिती ॥93॥

मराठी अर्थ

ज्याला आवाजी साफ करण्यासाठी ‘‘ हा हुं” ” वगैरे खाकरावे कसे इतकेच कळत नाही तो गाणार काय ? त्याप्रमाणे शास्त्राच्या नांवाने ज्याला स्वतःला काडीचेही ज्ञान नाही, पण कोणी शास्त्रज्ञ आला तर त्याला नुसता थाराही देत नाहीत.

English meaning

But there are some who do not spoil their tongue even by uttering the names of the sciptures, and who try to avoid with all their might any contact with the sages who know the sciences.

94
मूळ

वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडिता डाकुलिया । वाजविती ॥94॥

मराठी अर्थ

वडिल माणसांचे आचरणादि पाहून जे त्यांच्या चेष्टा करतात व पंडित काही सांगू लागले तर ते टाळ्या किंवा टिमक्या वाजवितात.

English meaning

Who mimicry the conduct of the elders to hoot at them and ridicule the scholars by derogatory pranks.

95
मूळ

आपलेनीचि आटोपे । धनित्वाचेनि दर्पे । साचचि पाखंडाची तपे । आदरिती ॥95॥

मराठी अर्थ

आपल्याच शहाणपणाच्या तोऱ्यात आणि धनाच्या गर्वात जे पाखंडी जनांच्या तपाचा व आचरणाचा आदर करतात.

English meaning

Commit most irreligious sins in the fever of their own self-declared importance and their power and prosperity.

96
मूळ

आपुलिया पुढिलांचिया । आंगी घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥96॥

मराठी अर्थ

आपल्या समोरील जीवांच्या अंगावर शस्त्र चालवून, रक्तमांसने यज्ञपात्र भरभरून,

English meaning

There are also those who even cut the limbs of their parents and elders to offer the flesh and blood in the sacrificial pit in order to propitiate evil demons;

97
मूळ

रिचविती जळतकुंडी । लाविती चेड्याच्या तोंडी । नवसिया देती उंडी । बाळकांची ॥97॥

मराठी अर्थ

जळत्या अग्नीकुडांत आहुति देतात; तसेच चेड्यादि देवतांना आहुति देऊन व नवस करून त्यांच्यापुढे बालकांचे बळी देतात.

English meaning

And they pour these things in the burning pits, or feed the powerful ghosts with them or even slay their own children in order to please the most cruel of denizens of the ghost-world.

98
मूळ

आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवता वरीया । अन्नत्यागे सातरीया । ठाकती एक ॥98॥

मराठी अर्थ

आग्रहास पेटून क्षुद्र देवतांचा प्रसाद व्हावा म्हणून अन्नत्यागपूर्वक सात दिवस जे स्वतः अनुष्ठान करितात.

English meaning

Being slaves to their own devilish determination, they observe fasts for seven days or more in order to obtain ill - omened boons of those lower Beings.

99
मूळ

अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्री सुहाडा । पेरिती मग पुढा । तेचि पिके ॥99॥

मराठी अर्थ

अरे, स्वतःला व अन्याला पीडा देऊन जे बीज तमोरूप भूमीत पेरतात तेच पुढेही पिकास येते.

English meaning

O Arjuna, these people sow the seeds of self-immolation and violence towards others in the field of Tamas quality and then that field yields, the same kind of crop!

100
मूळ

बाहु नाही आपुलिया । आणि नावेतेही धनंजया । न धरी होय तया । समुद्री जैसे ॥100॥

मराठी अर्थ

स्वतःला तरून जाण्यासारखे समर्थ बाहु नाहींत आणि नावे चाही आश्रय करावयास तयार नाही याची सागरांत जी स्थिति होते.

English meaning

O Dhananjaya, their plight is as pitiable as of a man who has no arms with which to swim and does not use a boat, but jumps in the ocean.

101
मूळ

का वैद्याते करी सळा । रसु सांडी पाय खोळा । तो रोगिया जेवी जिव्हाळा । सवता होय ॥101॥

मराठी अर्थ

किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेने उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित.

English meaning

Or like a patient who quarrels with the doctor and kicks the medicine and suffers more.

102
मूळ

नाना पडिकराचेनि सळे । काढी आपुलेचि डोळे । ते वानवसा आंधळे । जैसे ठाके ॥102॥

मराठी अर्थ

किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फोडून घेतो, तो जसा घरात आंधळा होऊन बसतो.

English meaning

Or their plight is like the plight of a blind man who quarrels with his escort and thus suffers difficulties in his own home.

103
मूळ

तैसे तया आसुरा होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धावताती मोहे । आडवी जे का ॥103॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, शास्त्रीय मार्गाची निंदा करून स्वैराचाररूपी अरण्यात जे भटकतात त्या आसुरांची तशी स्थिति होते.

English meaning

Similar is the tragedy of those who throw away the shelter of scriptures arrogantly and wander aimlessly in the forest of many sinister attractions.

104
मूळ

कामु करवी ते करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना माते पुरिती । दुःखाचा गुंडा ॥104॥

मराठी अर्थ

इच्छेस येईल ते करतात, ज्यावर क्रुद्ध होतील त्याला मारतात किंबहुना नसती पीडा म्हणून माझी मूर्तीही गाडून टाकतात.

English meaning

They do the bidding of their desire, kill those whom the anger wants to kill and even bury me deep in the pit of suffering, in their own hearts.

105
मूळ

आपुला परावा देही । दुःख देती जे जे काही । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥105॥

मराठी अर्थ

स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते ह्याप्रमाणे जी पीडा करितात, ती सर्व सर्वातर्यामी जो मी, त्या मलाच होते.

English meaning

Whatever trouble they give to their own body and others' bodies is indirectly a very acute trouble to me, the Atman.

106
मूळ

पै वाचेचेनिही पालवे । पापिया तया नातळावे । परी पडिले सांगावे । त्यजावया ॥106॥

मराठी अर्थ

ह्या पाप्यांच्या वर्णनाने वाणी विटाळणेही बरे नव्हे; पण, त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावे लागले.

English meaning

Actually we should not touch their aura even by speaking about them, but we have to mention these sinners in order to know whom we have to discard.

107
मूळ

प्रेत बाहिरे घालिजे । का अंत्यजु संभाषणी त्यजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मलाते ? ॥107॥

मराठी अर्थ

प्रेत घराबाहेर काढावे लागते, ‘दूर हो ” असे बोलूनच अंत्यजापाशी भाषण टाळावे लागते किंवा घाण ही हातनेच धुवून टाकावी लागते.

English meaning

A dead body has to be lifted by our hands in order to take it out of the house; we have to talk to dirty man in order to tell him to go away; and we have to clean any dirt by hand and then to wash our hands.

108
मूळ

तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयाते सांडावया तैसा । अनुवादु हा ॥108॥

मराठी अर्थ

येथे शुद्धतेचा हेतु असल्यामुळे ह्या अमंगल गोष्टी केल्या असे जसे कोणी समजत नाही, म्हणून त्यांच्या त्यागार्थ केलेला अनुवाद (वर्णन) दूषणीय म्हणता येत नाही.

English meaning

We do not give much importance to dirt because cleansing is the purpose and the expected thing. Similarly this demon- like nature is described here in order to drop it, to avoid it.

109
मूळ

परी अर्जुना तू तयाते । देखसी तै स्मर हो माते । जे आन प्रायश्चित्त येथे । मानेल ना ॥109॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, तुला त्यांचे दर्शन झाले (असुर=तामस) तर माझे स्मरण करत जा; येथे दुसरे प्रायश्चित्त कामाचे नाही.

English meaning

Therefore, O Arjuna, when you will by chance see them, you should immediately remember me because this sin cannot be washed clean by any other purificatiory action.

110
मूळ

म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पै येकी । जतन करावी निकी । सर्वापरी ॥110॥

मराठी अर्थ

तरी जी एक सात्विक श्रद्धा तिचेच इतःपर दक्षतेने सर्वाच्यावर जतन करावे.

English meaning

Thus only the Sattwic faith should be cared for and nurtured, about which I am going to tell you presently.

111
मूळ

तरी धरावा तैसा संगु । जेणे पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपे ॥111॥

मराठी अर्थ

म्हणून ज्यायोगे सत्वबुद्धीची वाढ होईल असाच संग धरावा आणि आहारही सत्वाची वृद्धि करील असाच सेवन करावा.

English meaning

So, one should seek such company and circumstances which will develop the Sattwa. Good food is very helpful in this respect.

112
मूळ

एऱ्हवी तरी पाही । स्वभाववृद्धीच्या ठाई । आहारावाचूनि नाही । बळी हेतु ॥112॥

मराठी अर्थ

अरे, पाहू गेले तर स्वभावामध्ये पालट अगर वृद्धि व्हावी अशी इच्छा असेल तर त्याला आहारावाचून अन्य बलवान हेतु नाही.

English meaning

Normally there is no other means except food which develops the desired kind of human nature.

113
मूळ

प्रत्यक्ष पाहे पा वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणी ॥113॥

मराठी अर्थ

ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, शुद्धीवर असलेला जो मनुष्य त्याने दारूचे सेवन केले तर तो तत्क्षणी माजून बरळतो.

English meaning

O the brave one! It is a common experience that even a sober man is influenced immediately if he drinks wine, and becomes intoxicated.

114
मूळ

का जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावी । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥114॥

मराठी अर्थ

किंवा जो मर्यादेबाहेर अन्नसेवन करतो त्याला वात व कफ ह्यांचा विकार होतो किंवा ज्वर आला असता दुधाच्या सेवनाने तो निघेल काय ?

English meaning

It is also generally seen that he who always takes sweet liquid diet, suffers from ailments caused by gasses and cough; and does anybody having fever etc. get cured only by drinking milk? (Medicine is necessary there.)

115
मूळ

नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । का आपुलिया{ऐ}से करी । जैसे विष ॥115॥

मराठी अर्थ

नाहीतर, अमृतसेवनाने जसे मरण टळते, किंवा विष घेतले असता त्याने मृत्यु येतो.

English meaning

Nectar if taken, saves one from death and poison if taken kills one by pervading all his body.

116
मूळ

तेवी जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥116॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारची धातु शरीरांत उत्पन्न होते व जशी धातु असेल त्याप्रमाणे अंतःकरणाचा (मनाचा) स्वभाव पोसला जातो.

English meaning

So, according to the quality of food intake, the elements of the body change and according to them the inner attitude of a man is nourished.

117
मूळ

जैसे भांडियाचेनि तापे । आंतुले उदकही तापे । तैसी धातुवशे आटोपे । चित्तवृत्ती ॥117॥

मराठी अर्थ

भांडे तापले म्हणजे आतले उदकही जसे तापते, त्याप्रमाणे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ति बनत असते.

English meaning

Just like the water contained in a pot becomes heated when the pot is heated, the elements like blood, flesh, bones, skin, hair, etc. in the body affect the attitude of the mind.

118
मूळ

म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तै सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसी ॥118॥

मराठी अर्थ

म्हणून सात्विक अन्नसेवनाने सत्वगुणाची व दुसऱ्या दोन जातीच्या अन्नाने रजोगुण व तमोगुण ह्यांची वाढ होते.

English meaning

Therefore, if one takes food with Sattwic quality, Sattwa is more developed in the nature of man, and by other kinds of foods, namely Rajasic and Tamasic those qualities increase in the consciousness.

119
मूळ

तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हे सांगो करी आदरु । आकर्णनी ॥119॥

मराठी अर्थ

तरी, कोणता आहार सात्विक आहे, राजस व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतो, नीट श्रवण कर.

English meaning

Therefore, we shall now tell what food is Sattwic and what types of foods are of Rajas and Tamas quality. Please be attentive in listening.

120
मूळ

आणि एकसरे आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडे दाऊ ॥120॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, सामान्य अन्नाचे तीन प्रकार (सत्व, रज, तम) कसे झाले ते स्पष्ट करून दाखवितों.

English meaning

O the brave one! We will show clearly to you how food is divided into three types.

121
मूळ

तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति की बोनियांची । आणि जेविता तव गुणांची । दासी येथ ॥121॥

मराठी अर्थ

हे पहा, भोक्त्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते आणि भोक्ता तर, गुणांचा ताबेदार आहेच.

English meaning

Food is generally prepared to suit the taste of one who is going to dine, and the diner himself is made up of the three qualities.

122
मूळ

जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनिया त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥122॥

मराठी अर्थ

कर्ता भोक्ता जो जीव, तो स्वभावतःच तीन गुणांप्रमाणे तीन प्रकारचा व्यवहार करीत असतो.

English meaning

The soul, Jeeva, who is the doer and the enjoyer of the fruits of action, is having three types according to the three qualities and his actions are also of three types.

123
मूळ

म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥123॥

मराठी अर्थ

म्हणून आहार तीन प्रकारचा आहे; यज्ञही तीन प्रकारचे आहेत व तप, दान व इतर क्रियाही तीन प्रकारच्या आहेत.

English meaning

Therefore his actions namely his food habits are threefold, his sacrifices are threefold and his penances and charities are also of three kinds.

124
मूळ

पै आहार लक्षण पहिले ? । सांगो जे म्हणितले । ते आईक गा भले । रूप करू ॥124॥

मराठी अर्थ

परंतु आधी प्रथम सांगितलेल्या आहाराचे लक्षण सांगतो, ते नीट श्रवण कर.

English meaning

Out of these, we shall tell you about the types of food, which we referred to earlier. Please listen. We will explain in detail in a simple way.

125
मूळ

तरी सत्त्वगुणाकडे । जे दैवे भोक्ता पडे । तै मधुरी रसी वाढे । मेचु तया ॥125॥

मराठी अर्थ

तरी, दैवयोगाने, जेव्हा भोक्ता सत्वगुणी असतो तेव्हां, मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो.

English meaning

The enjoyer, the Jeeva, who is fortunately having inclination towards the Sattwa quality has special liking for sweet foods, and

126
मूळ

आंगेचि द्रव्ये सुरसे । जे आंगेचि पदार्थ गोडसे । आंगेचि स्नेहे बहुवसे । सुपक्वे जिये ॥126॥

मराठी अर्थ

जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशी स्निग्ध, आणि सुपक्व असतात.

English meaning

Those food articles which are themselves naturally succulent, sweet and ripe.

127
मूळ

आकारे नव्हती डगळे । स्पर्शे अति मवाळे । जिभेलागी स्नेहाळे । स्वादे जिये ॥127॥

मराठी अर्थ

जे आकाराने अवजड नसतात, स्पर्शाला मऊ असतात, जिभेला स्निग्ध रुचीचे असून जे स्वादिष्ट असतात.

English meaning

These articles are not shapeles. They are soft to the touch. They are succulent and palatable. They are tasty.

128
मूळ

रसे गाढी वरी ढिली । द्रवभावी आथिली । ठाये ठावो सांडिली । अग्नितापे ॥128॥

मराठी अर्थ

रसयुक्त वरून मऊ, पाणीदार (सुकलेली नव्हेत) व अग्नितापादिकांनी कसलेली नव्हेत.

English meaning

These articles are full of juice, soft outwardly also, and the watery content is properly made juicy by process of heating.

129
मूळ

आंगे साने परीणामे थोरु । जैसे गुरुमुखींचे अक्षरु । तैशी अल्पी जिही अपारु । तृप्ति राहे ॥129॥

मराठी अर्थ

गुरूपदेशाची अक्षरे थोडी असली तरी अर्थ फार थोर असतो, तसा जो आहार आकाराने स्वल्प, पण परिणामाच्या दृष्टीने थोर असून ज्याचे अल्प सेवन करूनही तृप्ति टिकून असते.

English meaning

These articles are small in size but very good in effect, just like the few words of the Guru which are great in their meaning. They also give great satisfaction even though they are small.

130
मूळ

आणि मुखी जैसी गोडे । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नी प्रीति वाढे । सात्त्विकासी ॥130॥

मराठी अर्थ

आणि जे रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयी सात्विक जीवाचे प्रेम असते.

English meaning

These articles are as sweet inside as they are for the taste. Such food articles are very much liked by people of Sattwic quality.

131
मूळ

एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचे त्राण । नीच नवे हे ॥131॥

मराठी अर्थ

सात्विक अन्नाचे लक्षण असे असते; ह्याच्या सेवनाने नित्य आयुष्यवर्धन होत असते.

English meaning

Know that the Sattwic food is of these signs or qualities, which always give new protection to life.

132
मूळ

येणे सात्त्विक रसे । जव देही मेहो वरीषे । तव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥132॥

मराठी अर्थ

अशा सात्विक अन्नांचा वर्षाव देहावर होत असता दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो.

English meaning

When the 'cloud' of such Sattwic juice pours itself in the body the 'river' of our life goes on becoming fully flooded.

133
मूळ

सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥133॥

मराठी अर्थ

दिवसाच्या वृद्धीला जसा सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्ववृद्धीस व रक्षणास हाच आहार कारण आहे.

English meaning

O the wise one! Just as the Sun is the cause of the day becoming bright, so, such kind of food becomes the cause of development of the Sattwic quality.

134
मूळ

आणि शरीरा हन मानसा । बळाचा पै कुवासा । हा आहारु तरी दशा । कैची रोगा ॥134॥

मराठी अर्थ

आणि शरीराला व मनाला बल अर्पण करणाऱ्या ह्या आहाराचा आश्रय असल्यावर तेथे रोगाचा प्रवेश कसा होणार ?

English meaning

This type of food is the support of mental and physical strength. If such food is taken, how can diseases find place in the body?

135
मूळ

हा सात्त्विकु होय भोग्यु । तै भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयले जाणो ॥135॥

मराठी अर्थ

असा सात्विक आहार भोग्य म्हणून प्राप्त असेल तरच आरोग्याच भोग घडण्याचे शरीराचे भाग्य उदयाला आले आहे असे म्हणावे.

English meaning

When the food is of such Sattwic quality, the body is fortunate enough to enjoy good health.

136
मूळ

आणि सुखाचे घेणे देणे । निके उवाया ये येणे । हे असो वाढे साजणे । आनंदेसी ॥136॥

मराठी अर्थ

आणि त्याचे सर्व व्यापार या आहाराने सुखमय होतात; फार काय सांगावे ? त्याची वृत्ति सदा आनंदी असते.

English meaning

By such food it is possible to give happiness to others and to get the same; and joy becomes enhanced nicely.

137
मूळ

ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥137॥

मराठी अर्थ

ऱ्ह्याप्रमाणे सात्विक आहाराचा फार थोर परिणाम असून तो अंतर्बाह्य सर्वप्रकारे उपकारक आहे.

English meaning

When such food is properly digested it proves to be wholesome and health - giving both to the body and the mind.

138
मूळ

आता राजसासि प्रीती । जिही रसी आथी । करू तयाही व्यक्ती । प्रसंगे गा ॥138॥

मराठी अर्थ

आता प्रसंगवशांत ज्या रसांची राजस वृत्तीच्या माणसाला आवड असते त्याचेही वर्णन करू.

English meaning

Now, as this is the right occasion. I shall tell you about the food which is liked by a man of Rajas quality.

139
मूळ

तरी मारे उणे काळकुट । तेणे माने जे कडुवट । का चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥139॥

मराठी अर्थ

फक्त मरण आणीत नाही इतकेच काय ते कमी; बाकी कडूपणाला काळकूट विषासारखे; चुन्याहून दाह करणारे जे आंबट असते.

English meaning

The Rajasic food is so bitter that the greatest poison Kalakoot will be less bitter than that. It is more hot than calcium and it is very sour.

140
मूळ

कणिकीते जैसे पाणी । तैसेचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥140॥

मराठी अर्थ

कणीक भिजविण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आत मीठ व अन्य खारट तुरट रस मिळविणे.

English meaning

Salt is profusely used in preparing such food, like water which is added to flour to make a dhow; and many other salts are mixed in it.

141
मूळ

ऐसे खारट अपाडे । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषे तोंडे । आगीचि गिळी ॥141॥

मराठी अर्थ

असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कढत पदार्थ सेवन करितो की, तोंडाने जणु अग्नीच गिळतो !

English meaning

Rajasic man likes such heavily salty food and as he eats hot, chilli etc. articles, he as if swallows fire directly.

142
मूळ

वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसे उन्ह मागे । राजसु तो ॥1142॥

मराठी अर्थ

त्या पदार्थातून निघणाऱ्या वाफांवर जणु दिव्याची वातही पेटवित येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो.

English meaning

The vapours of such hot things are so hot that a wick of a lamp if put into their upward flow, it may catch a flame! Such things are demanded by Rajasic man.

143
मूळ

वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसे तीख तो खाये । जे घायेविण रुपे ॥143॥

मराठी अर्थ

वावटळीपेक्षांही तुफान उडविणारे व प्रहार करील असे तिखट तो खातो की, ज्याने प्रत्यक्ष घावाशिवाय जणु जखम झाली आहे असे वाटावे.

English meaning

The heavy iron bar used for breaking stones is well-known for its hardness, but he eats food which is harder than this bar, and it hurts the body without making any actual wound.

144
मूळ

आणि राखेहूनि कोरडे । आत बाहेरी येके पाडे । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥144॥

मराठी अर्थ

आणि आत बाहेर सारखे कोरडे व रूक्ष असे तोंडी लावणे त्याला फार आवडते.

English meaning

His food is as dry as ash inside as well as outside, and he likes the sudden shock which this type of food gives to the mouth.

145
मूळ

परस्परे दाता । आदळु होय खाता । तो गा तोंडी घेता । तोषो लागे ॥145॥

मराठी अर्थ

जे पदार्थ खाऊ गेले असता दांतावर दात आदळावे असे कडक पदार्थ खाण्यात त्याला संतोष वाटतो.

English meaning

He becomes more and more satisfied when he eats food while masticating it, and the lower and upper teeth chatter by its sourness.

146
मूळ

आधीच द्रव्ये चुरमुरी । वरी परवडिजती मोहरी । जिये घेता होती धुवारी । नाकेंतोंडे ॥146॥

मराठी अर्थ

जातीनेच पदार्थ झणझणीत, त्यात वर मोहरीसारखी फोडणी की, जी खातांना नाकातोंडातून श्वास अगर शिंका येतात.

English meaning

He eats articles which are very pungent in taste and over and above, they are seasoned and treated with mustard powder, which when eaten is very intoxicating and he sneezes, cries and laments!

147
मूळ

हे असो उगे आगीते । म्हणे तैसे राइते । पढिये प्राणापरौते । राजसासि गा ॥147॥

मराठी अर्थ

हे असो; आगीलाही मागे टाकणारे असे सणसणीत रायते त्या राजसाला प्राणापेक्षां आवडते.

English meaning

Then there are Raitas made so hot that fire may be less burning, which are to his great liking.

148
मूळ

ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषे अग्नि भडभडा । पोटी भरी ॥148॥

मराठी अर्थ

ज्याची कितीही भक्षण केले तरी तृप्ति होत नाही असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य, अन्नाच्या मिषाने जणू पोटात अग्नीच सांठवितो.

English meaning

Such a man, not being ever satisfied by continuously eating such food, becomes mad for it and as if fills his belly with fire only.

149
मूळ

तैसाचि लवंगा सुंठे । मग भुई गा सेजे खाटे । पाणियाचे न सुटे । तोंडोनि पात्र ॥149॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे लवंगा, सुंठ वगैरे खाऊन भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर जो लोळतो व तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही.

English meaning

He experiences such heat in his body, and such breathlessness, that he does not find any comfort on his bed or even on earth; he demands water again and again, as if he never leaves the pot away from the mouth.

150
मूळ

ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातले । माजवण पोटी ॥150॥

मराठी अर्थ

तो त्यांनी आहार केला असे न म्हणता शरीरांत सुप्त असलेले रोगरूपी सर्प जागे करण्यासाठी पोटात जणू माजोरी पदाथच भरले आहेत.

English meaning

My dear! These are not food articles. These are like fattening material used to instigate the black serpents of diseases lying dormant in the bodies of the intakers.

151
मूळ

तैसे एकमेका सळे । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखे ॥151॥

मराठी अर्थ

तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळी उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो.

English meaning

As soon as this nourishment is received all those diseases simultaneously attack the man. Thus this Rajas food results in suffering only.

152
मूळ

एवं राजसा आहारा । रूप केले धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥152॥

मराठी अर्थ

याप्रमाणे राजस आहाराची लक्षणे सांगून त्यांचा परिणाम कसा होतो हेही सांगितलें.

English meaning

O the great archer, in this way I have explained to you the characteristic of Rajas food and its results also.

153
मूळ

आता तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेही सांगो चिळसा । झणे तुम्ही ॥153॥

मराठी अर्थ

आता त्या तामसाला कोणता आहार प्रिय असतो ते सांगतो की, जो ऐकून तुम्हास खंतीच वाटेल.

English meaning

Now I am going to tell you what type of food a man of Tamas quality likes, but perhaps you may become disgusted by listening to it.

154
मूळ

तरी कुहिले उष्टे खाता । न मनिजे तेणे अनहिता । जैसे का उपहिता । म्हैसी खाय ॥154॥

मराठी अर्थ

तरी सडलेले अगर उष्टे अन्न खातांना हे अहितकर आहे अशी मुळीच शंका न येता जशी म्हैस आंबलेले आंबण तसा जो आहार आहे.

English meaning

My dear, just as a she buffalo eats the fermented mixture of grains, similarly the man of Tamasic nature does not feel awkward while eating food, spoiled by others and which is also stale.

155
मूळ

निपजले अन्न तैसे । दुपाहरी का येरे दिवसे । अतिकरे तै तामसे । घेईजे ते ॥155॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुस-या दिवशी शिळे करून खाणे तामसाला फार आवडते.

English meaning

The Tamasic man eats without any hesitation, in the evening that food which was prepared in the morning, and also food prepared today, he may eat tomorrow.

156
मूळ

नातरी अर्ध उकडिले । का निपट करपोनि गेले । तैसेही खाय चुकले । रसा जे येवो ॥156॥

मराठी अर्थ

किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निःसत्व झालेले अन्नही तो खातो.

English meaning

Or he eats half-boiled or over-boiled food, or which has been burnt and also which is not properly saturated with tasty juices.

157
मूळ

जया का आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । ते अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाही ॥157॥

मराठी अर्थ

जे पुरे शिजलेले आहे किंवा रसपूर्ण आहे ते अन्न खरे, ” ह्या तामसाला माहितही नसते.

English meaning

Food must be such that it is properly cooked, and the juices in it have been developed in the process so as to give good taste; but a man of Tamas quality does not care for this.

158
मूळ

ऐसेनि कही विपाये । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तव राहे । व्याघ्रु जैसा ॥158॥

मराठी अर्थ

एखादेवेळी अकस्मात् अशा अन्नाची व त्याची गाठ पडलीच तर वाघाप्रमाणे तो त्याला ( त्या अन्नाला) घाण सुटेपर्यंत शिळे होऊ देतो.

English meaning

And if at all by good fortune, he gets such a food, he does not eat it immediately, but keeps it, like a tiger, for such a long period that it starts giving bad smell.

159
मूळ

का बहुवे दिवशी वोलांडिले । स्वादपणे सांडिले । शुष्क अथवा सडले । गाभिणेही हो ॥159॥

मराठी अर्थ

किंवा फार दिवसांचे शिळे, रुचि गेलेली, शुष्क किंवा सडलेले किंवा आत जीव उत्पन्न झालेलें.

English meaning

He eats such food, which is kept to be fermented for days together, which has become tasteless, which is dried-up and devoid of any moisture or which is rotten and infested with germs.

160
मूळ

तेही बाळाचे हातवरी । चिवडिले जैसी राडी करी । का सवे बैसोनि नारी । गोतांबील करी ॥160॥

मराठी अर्थ

व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले व गोतांबील ( सर्व पदार्थाची एक रास) केलेले असे बायकांमुलांसह एकत्र खातो.

English meaning

Or such food, which has been carelessly eaten partly by children and left in a very shoddy manner, or food similar to the amalgamated articles of food, when many women sit around a plate and rub and mix by their hands, all foods together, in a propitiatory ceremony.

161
मूळ

ऐसेनि कश्मळे जै खाय । तै तया सुखभोजन ऐसे होय । परी येणेही न धाय । पापिया तो ॥161॥

मराठी अर्थ

अशी घाण जेव्हा तो भक्षण करील तेव्हा आज सुखभोजन झाले असे त्यास वाटते; पण त्या पाप्याचे एवढयानेच समाधान होत नाही.

English meaning

When a man of Tamas quality gets such a food, he feels that he has got a good feast, but this sinner is not satisfied with this.

162
मूळ

मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥162॥

मराठी अर्थ

चमत्कार असा की, जो घाणेरडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध अथवा त्याज्य आहे.

English meaning

See the wonder! He eats such articles of bad quality.

163
मूळ

तया अपेयांच्या पानी । अखाद्यांच्या भोजनी । वाढविजे उतान्ही । तामसे तेणे ॥163॥

मराठी अर्थ

तशा अपेय पदार्थाचे पान करण्याची व अभक्ष्य पदार्थांचे भक्षण करण्याची त्या तामसाला फार इच्छा होते.

English meaning

Which are completely prohibited by dietary rules and which are not fit to be eaten. He has a perverted taste for such food.

164
मूळ

एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचे फल दुसरा । क्षणी नाही ॥164॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे तामसाचा आहार असतो; त्याचे फल मिळण्यास त्यास पुढला क्षण लागत नाही.

English meaning

So, dear Arjuna, this is the food which is liked by a Tamasic man. And he has not to wait even for a moment more to suffer from it.

165
मूळ

जे जेव्हाचि हे अपवित्र । शिवे तयाचे वक्त्र । तेव्हाचि पापा पात्र । जाला तो की ॥165॥

मराठी अर्थ

कारण ज्या क्षणी हे अपवित्र अन्न तो तोंडात घालतो तेव्हांच तो पापी ठरतो.

English meaning

Because, as soon as his mouth touches the food or drink which is impure and prohibited, he becomes a victim to the sin.

166
मूळ

यावरते जे जेवी । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥166॥

मराठी अर्थ

याउपर जे जेवणे ते जेवण न म्हणता पोटात यातना भरण्यासारखेच होय असे जाणावे.

English meaning

Then what he eats is not a food, but it is the very pain filling his belly.

167
मूळ

शिरच्छेदे काय होये । का आगी रिघता कैसे आहे । हे जाणावे काई पाहे । परी साहातुचि असे ॥167॥

मराठी अर्थ

शिरच्छेद केला तर कसे काय होते, आगीत शिरले तर काय वाटते, हे प्रत्यक्ष का पहावयाचे असते ? पण त्यालाही याची तयारी असते.

English meaning

He is having such horrible experience, just as a man who is being beheaded may feel or a man entering into a big fire may feel but he goes on suffering like this.

168
मूळ

म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥168॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही असे देव म्हणाले.

English meaning

Therefore, if we want to describe the result of Tamasic food, it is nothing else than Tamas only.

169
मूळ

आता ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारी । त्रिधा असे ॥169॥

मराठी अर्थ

असे आहाराचे प्रकार झाल्यावर यज्ञाचेही तीन प्रकार आहेत ते ऐक.

English meaning

Just as the food has such three categories, similarly Yadnya, (sacrifice) is also of three kinds.

170
मूळ

परी तिहीमाजी प्रथम । सात्त्विक यज्ञाचे वर्म । आईक पा सुमहिम – । शिरोमणी ॥170॥

मराठी अर्थ

तर, ह्या तीन प्रकारापैकी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म, हे कीर्तिमंत शिरोमणे, तू ऐक.

English meaning

And O the crest-jewel of famous men! First, I am going to tell you about the signs of Pure sacrifice, which is Sattwic.

171
मूळ

तरी एकु प्रियोत्तमु- । वाचोनि वाढो नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥171॥

मराठी अर्थ

तरी, एक पति, किंवा पतीची इच्छा ह्यापलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते.

English meaning

The mind of a faithful wife is such that she does not have any desire taking roots in it for any other person except her husband.

172
मूळ

नाना सिंधूते ठाकोनि गंगा । पुढारा न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥172॥

मराठी अर्थ

किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतो, अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो.

English meaning

The river stops its flow when she meets and merges into the sea or, after realization of Atman, Vedas become quiet.

173
मूळ

तैसे जे आपुल्या स्वहिती । वेचूनिया चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागी ॥173॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, जे स्वहितार्थ सर्व चित्तवृत्तींचा व्यय किंवा वेचं करून जे फलाशेने अहंकार बाळगीत नाहीत.

English meaning

Similarly, there are some people who use their intellect only for the realization of Atman and do not have any selfish pride or desire for the benefit from their rituals etc.

174
मूळ

पातलेया झाडाचे मूळ । मागुते सरो नेणेचि जळ । जिराले गा केवळ । तयाच्याचि आंगी ॥174॥

मराठी अर्थ

पाणी जसे झाडाचे मूळ गांठल्यावर परत न फिरता त्याच्याच अंगांत जिरतें.

English meaning

When water is poured exactly at the roots of a plant, it does not turn away but is absorbed by the roots only.

175
मूळ

तैसे मने देही । यजननिश्चयाच्या ठायी । हारपोनि जे काही । वांछितीना ॥175॥

मराठी अर्थ

त्या प्रमाणे मनाने व देहाने निश्चयपूर्वक यज्ञांत फलेच्छा न करिता निमग्न होतात.

English meaning

Similarly they are mentally and physically completely concerned only in the performance of the sacrifice and have no desire for fruits.

176
मूळ

तिही फळवांच्छात्यागी । स्वधर्मावाचूनि विरागी । कीजे तो यज्ञु सर्वांगी । अळंकृतु ॥176॥

मराठी अर्थ

केवल स्वधर्म म्हणून, अन्य कशाच्याही इच्छेकरिता नव्हे अशा वैराग्यवृत्तीने ते तो यज्ञ सर्वागाने सालंकृत म्हणजे यथासांग करतात.

English meaning

The sacrifice performed by them only with the consideration of duty, and having given up the desire for fruit, is really a sacrifice, well-performed and accomplished in all respects.

177
मूळ

परी आरिसा आपणपे । डोळा जैसे घेपे । का तळहातीचे दीपे । रत्न पाहिजे ॥177॥

मराठी अर्थ

परंतु, आरशांत आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावरील रत्नाची दिव्याने परीक्षा करावी.

English meaning

And, just as the eye sees itself with the help of a mirror, or as we see a gem kept on our palm in the light of a lamp.

178
मूळ

नाना उदिते दिवाकरे । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारे । देखोनिया ॥178॥

मराठी अर्थ

किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून.

English meaning

Or just as when the Sun rises, we can see our way clearly; similarly, by carefully seeing clearly what are the directions of Vedas and the scriptures.

179
मूळ

तिये कुंडे मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी । ते मेळवणी जैसी विधी । आपणपा केली ॥179॥

मराठी अर्थ

कुंडे, मंडप, वेदी व आणखी लागणाऱ्या सामग्रीची सिद्धता करितात; ती अशी की, जणू विधीने मूर्तरूपाने अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे.

English meaning

And by collecting all the utensils and articles useful for the sacifice, and arranging them properly, as if placed by the god, the creator, himself for the sacrifice;

180
मूळ

सकळावयव उचिते । लेणी पातली जैसी आंगाते । तैसे पदार्थ जेथिचे तेथे । विनियोगुनी ॥180॥

मराठी अर्थ

सर्व देहाचे अवयव यथा योग्य आभरणांनी जसे श्रृंगारावे तशी यज्ञाची सर्व सामग्री जेथीच्या तेथे मांडतात.

English meaning

And if all the articles are properly placed in their respective places, just as ornaments properly used for each limb of the body,

181
मूळ

काय वानू बहुती बोली । जैसी सर्वाभरणी भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषे ॥181॥

मराठी अर्थ

त्याचे आणखी किती वर्णन करावे ? यज्ञाच्या निमित्ताने, सर्व साहित्यासह साक्षात् यज्ञविद्याच तेथे अवतरली आहे असे वाटते.

English meaning

What more should I describe? Then the very Goddess of sacrifice, ornamented, seems to have become manifest in the form of sacrificial ritual.

182
मूळ

तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनिया लागु । महत्त्वाचा ॥182॥

मराठी अर्थ

याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतु न बाळगता जो सांगोपांग यज्ञ केला जातो.

English meaning

So, when the sacrifice is so accomplished in all respects in which there is no iota of selfish desire for any self-importance.

183
मूळ

प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडी कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाही ॥183॥

मराठी अर्थ

फल, पुष्प, छाया यांपैकी काहीही प्राप्ति नसलेली तुळशीची झाडं लोक जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात.

English meaning

And just like a Tulsi plant though given water by a small water source does not give flowers, fruit or even a shade.

184
मूळ

किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥184॥

मराठी अर्थ

किंबहुना, फलाशेवीण अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा.

English meaning

Or in short, when the sacrifice is so performed without attachment or hope for its fruit, that sacrifice should be considered as of Sattwic quality.

185
मूळ

आता यज्ञु कीर वीरेशा । करी पै याचि{ऐ}सा । परी श्राद्धालागी जैसा । अवंतिला रावो ॥185॥

मराठी अर्थ

अर्जुना, दुसरा जो राजस यज्ञ तोही विधि असाच असतो, पण श्राद्धाच्या दिवशी इष्ट पंगतीला राजाला आमंत्रण देण्यासारखे हे असते.

English meaning

O the great warrior! Now if a sacrifice is done in the same maner as described above, but it is having a hidden selfish end, just like when a king is invited to attend somebody's ancestral rites,

186
मूळ

जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥186॥

मराठी अर्थ

राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो, लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडले

English meaning

The inviters think that if the king attends, much help it would be for them, they will be famous and there will not be any shortage of funds for the rites.

187
मूळ

तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोका । घडेल यागु ॥187॥

मराठी अर्थ

तसा तिहेरी हेतु मनात बाळगून तो मनात समजतो की, यज्ञफल म्हणून स्वर्ग ठेवलेलाच; दीक्षित म्हणून लोकात मान मान्यता होणारच; आणि यज्ञासारखे महत्कार्य घडल्याचे श्रेयही मिळाले.

English meaning

Similarly, when there is a desire to attain the whole heaven, and the performer hopes to be very famous by the sacrifice,

188
मूळ

ऐसी केवळ फळालागी । महत्त्व फोकारावया जगी । पार्था निष्पत्ति जे यागी । राजस पै ते ॥188॥

मराठी अर्थ

असा केवल फलाशेने व लोकात प्रसिद्धि व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय.

English meaning

O Partha, when the sacrifice is performed only to get its fruit and to boast about it and is to get social importance then that sacrifice is of Rajas quality.

189
मूळ

आणि पशुपक्षिविवाही । जोशी कामापरौता नाही । तैसा तामसा यज्ञा पाही । आग्रहोचि मूळ ॥189॥

मराठी अर्थ

आणि पशु व पक्षी ह्यांच्या विवाहांत कामेच्छेवाचून दुसरा जस कोणी जोशी म्हणून लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला एक आग्रहावाचून अन्य काही कारण लागत नाही.

English meaning

And as regards the Tamasic sacrifice, the adamant desire is the only reason just as in the wedding of animals and birds there is no other priest except their sexual desire.

190
मूळ

वारया वाट न वाहे । की मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसी बिहे । आगी जरी ॥190॥

मराठी अर्थ

वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो ? मरणाला काय मुहूर्त पाहिजे ? किंवा अग्नि काय पवित्र अपवित्र यास भितो ? हे जर होत असेल तर-

English meaning

If the wind will not find a way to blow and if death ever waits for some auspicious moment, or fire will turn back being afraid of anything which should not be burnt;

191
मूळ

तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥191॥

मराठी अर्थ

तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल; पण अर्जुना, तो स्वतःच निर्बंधरहित आहे.

English meaning

Then only there will be some control on the behaviour of a Tamasic man. O the great archer, this man is really uncontrolled.

192
मूळ

नाही विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजाता न सुये तोंड । मासिये जेवी ॥192॥

मराठी अर्थ

त्याला विधिची चाड नसते, मंत्राची गरज लागत नाही आणि त्या मंडपांत माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही.

English meaning

In his behaviour, there is no care for following the dictates of scriptures. He is having that much respect for them as a fly which does not hesitate to put its mouth in any food.

193
मूळ

वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ के रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥193॥

मराठी अर्थ

ब्राह्मण जेथे डोळ्यासमोर नको, तेथे दक्षिणेचा प्रश्न कोठून येणार ? आणि आगीला जसे वाऱ्याचे सहाय्य व्हावे.

English meaning

Which Brahmin would ever go shamelessly to attend his sacrifice ceremony for receiving money as religious charity, when Brahmins are really disinterested in worldly things? Just as a fire is soon destroyed in a great hurricane,

194
मूळ

तैसे वायाचि सर्वस्व वेचे । मुख न देखती श्रद्धेचे । नागविले निपुत्रिकाचे । जैसे घर ॥194॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे पुष्कळ द्रव्य खर्च होऊनही तेथे श्रद्धेचा लेशही नसतो; म्हणजे निपुत्रिकाचे घर त्याच्यामागून वाटेल त्याने बळकवावे तसेच हे होय.

English meaning

This man in his boastful nature, throws away all his belongings, and just as greedy relatives rob all things from the house of a childless man, people who have absolutely no respect or faith of any kind come and loot this man's belongings.

195
मूळ

ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइके म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥195॥

मराठी अर्थ

देव म्हणाले अर्जुना, ऐक बरे ! असा जो यज्ञाभास ‘ (नाममात्र यज्ञ ) तो तामस यज्ञ.

English meaning

Thus, a sacrifice where such things happen should be known as a Tamasic sacrifice. So said the Lord Shrikrishna who is the spouse of Laxmi, the goddess of riches.

196
मूळ

आता गंगेचे एक पाणी । परी नेले आनानी वाहणी । एक मळी एक आणी । शुद्धत्व जैसे ॥196॥

मराठी अर्थ

अरे, गंगोदक तेच; परंतु निरनिराळ्या प्रकाराने उपयोग केला म्हणजे गटारात सोडलेले अपवित्र होते, व दुसऱ्याने तीर्थ म्हणून शुद्धता येते.

English meaning

Then he further said, "Just as the waters of the river Ganges, either become polluted or remain clean according to the area through which it flows,

197
मूळ

तैसे तिही गुणी तप । येथ जाहले आहे त्रिरूप । ते एक केले दे पाप । उद्धरी एक ॥197॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे तपही तीन गुणांनी त्रिधा झाले आहे. त्यातील एकाचा आचार पापाला कारण होतो, तर एकाचा उद्धाराला कारण होतो,

English meaning

Similarly Penance is also threefold though penance as such is only one type of spiritual endeavour; thus one type of penance causes sin while another may liberate.

198
मूळ

तरी तेचि तिही भेदी । कैसेनि पा म्हणौनि सुबुद्धी । जाणो पाहासी तरी आधी । तपचि जाण ॥198॥

मराठी अर्थ

तरी त्याचेच तीन भेद कोणते हे जाणावयाची इच्छा असेल तर, प्रथम तप म्हणजे काय हे समजून घे.

English meaning

O Arjuna, of good mind, if you wish to know how there are three types of penances, you should first know penance itself.

199
मूळ

येथ तप म्हणजे काई । ते स्वरूप दाऊ पाही । मग भेदिले गुणी तिही । ते पाठी बोलो ॥199॥

मराठी अर्थ

आता, तप म्हणजे काय ते प्रथम सांगून तीन गुणांनी ते त्रिविध कसे झाले आहे हे मग सांगू

English meaning

I shall tell you the nature of penance as a whole, and then I will tell how its characteristics differ according to the three qualities

200
मूळ

तरी तप जे का सम्यक् । तेही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥200॥

मराठी अर्थ

तरी यथार्थ तपाचे, शरीर, मानसिक आणि शाब्द असे तीन भेद आहेत.

English meaning

Penance, which is called TAPAS, is in itself of three types, one kind is mental, the second is physical and the third is pertaining to words or the speech.

201
मूळ

आता गा तिही माझारी । शारीर तव अवधारी । तरी शंभु का श्रीहरी । पढियंता होय ॥201॥

मराठी अर्थ

आता या तीहींतील प्रथम शारीर तप कोणते ते ऐक; त्या तपस्व्याचे उपास्य शंकर असो किंवा विष्णू असो.

English meaning

Now, listen to the physical kind of penance. The Lord Shankara or the Lord Shrihari whoever deity you have faith in

202
मूळ

तया प्रिया देवतालया । यात्रादिके करावया । आठही पाहार जैसे पाया । उळिग घापे ॥202॥

मराठी अर्थ

त्या आपापल्या प्रिय देवतांच्या दर्शनार्थं अगर त्यांच्या यात्रादिकांसाठी, आठही प्रहर जणू त्याच्या पायात भोंवरे बांधले आहेत. (जो सारख्या यात्रा करीत राहतो)

English meaning

To go to the temple of that deity by undertaking pilgrimage, becomes a crazy habit of the feet of the devotee, and he is dreaming all day and night about it.

203
मूळ

देवांगणमिरवणिया । अंगोपचार पुरवणिया । करावया म्हणिया । शोभती हात ॥203॥

मराठी अर्थ

देऊळ वाडा स्वच्छ ठेवून व सुशोभित करून, पूजासाहित्य व अलंकारादि पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत.

English meaning

His hands are always eager to decorate the court-yards and precincts of temples, to provide various articles of worship like sandalwood paste, flowers etc., and to do any work that he may be asked to do by anybody in that respect.

204
मूळ

लिंग का प्रतिमा दिठी । देखतखेंवो अंगेष्टी । लोटिजे का काठी । पडली जैसी ॥204॥

मराठी अर्थ

शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती ह्यांचे दर्शन होताच जो दंडायमान भूमीवर साष्टांग नमस्कार घालतो.

English meaning

As soon as he happens to see any idol, image or divine symbol like that of Lord Shiva, his body automatically prostrates before it like a wooden stick.

205
मूळ

आणि विधिविनयादिकी । गुणी वडील जे लोकी । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥205॥

मराठी अर्थ

आणि विधिपालनाने वा विनयादिकाने गावात जे कोणी श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची जो सेवा करितो.

English meaning

He is very fond of doing all types of service respectfully, of Brahmins, who are endowed with virtues.

206
मूळ

अथवा प्रवासे का पीडा । का शिणले जे सांकडा । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥206॥

मराठी अर्थ

अथवा प्रवासादिक किंवा अन्यपीडेने संकटांत असलेले जे कोणी, त्यांची सुखसोय अथवा लावतो.

English meaning

He is eager to help those, who are tired by travel, suffering from any ailment or having calamities befallen on them.

207
मूळ

सकल तीर्थांचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । लोण कीजे ॥207॥

मराठी अर्थ

अथवा सकल तीर्थाचे तीर्थ जी मातापितरे त्यांच्या, जो सेवेपुढे आपले शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे.

English meaning

He feels that his body is better to be thoroughly used to its end in the service of parents, who are the greatest places of pilgrimage.

208
मूळ

आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानी सकरुणु । भजिजे गुरु ॥208॥

मराठी अर्थ

आणि संसारासारखा घोर शीण हरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरुण असलेले जे श्रीगुरु त्यांची जो सेवा करितो.

English meaning

He is always looking for an opportunity to serve a Master or a Guru whose very meeting relieves great sufferings of worldly life.

209
मूळ

आणि स्वधर्माचा आगिठा । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटी सुभटा । झाडी कीजे ॥209॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, जडदेहाभिमानरूपी जे बुद्धीवर कीट आलेले आहे ते झडून जावे म्हणून जो नित्य स्वधर्माचरणावृत्तिरूप अग्नीचा त्याला ताव देतो.

English meaning

And, O the great warrior! He is making every effort to burn all the dross of the pride of physical body, etc. by tempering his body, and scorching it in the oven of doing one's own duty.

210
मूळ

वस्तु भूतमात्री नमिजे । परोपकारी भजिजे । स्त्रीविषयी नियमिजे । नांवे नांवे ॥210॥

मराठी अर्थ

सर्वातर्यामी एकच परमात्मा आहे ह्या बुद्धीने जो भूतमात्राच्या ठिकाणी लीन असतो, नित्य परोपकाररत असतो, आणि स्त्रीविषयींची गोष्टही ऐकणेस जो तयार नसतो.

English meaning

He is having a great desire to oblige others, because of realization that Atman is dwelling in every being, and he bows before everybody with that respect, but with determination keeps proper control over enjoyment of sense objects.

211
मूळ

जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणे आंगे । तेथूनि जन्म आघवे । सोवळे कीजे ॥211॥

मराठी अर्थ

जन्माच्या वेळी जो मातेच्या देहाच स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्रीजातीचा स्पर्श; तेथून पुढे त्या विषयासंबंधी शरीर आजन्म सोवळे आहे.

English meaning

Even he feels that at the time of birth, it was unavoidable to be in touch with a female body, but from that moment onwards he should observe complete abstinence in respect of women.

212
मूळ

भुतमात्राचेनि नांवे । तृणही नासुडावे । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥212॥

मराठी अर्थ

गवतालाही जीव आहे म्हणून तेही उपटू नये, किंवा अन्य छेदक वा भेदक कायिक वाचिक क्रिया जो टाळतो.

English meaning

He does not dare to trample upon grass or even to cut its blades, thinking that all things are sacred.

213
मूळ

ऐसैसी जै शरीरी । रहाटीची पडे उजरी । तै शारीर तप घुमरी । आले जाण ॥213॥

मराठी अर्थ

असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण पडलेले असते ते मूर्त अथवा खरे शारीर तप असे समज.

English meaning

When the actions and behaviour of the physical body will be so pure and humble, one should know that the physical penance has become a perfected thing.

214
मूळ

पार्था समस्तही हे करणे । देहाचेनि प्रधानपणे । म्हणौनि ययाते मी म्हणे । शारीर तप ॥214॥

मराठी अर्थ

अर्जुना, ह्याला शारीर तप म्हणण्याचे कारण असे की ह्या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात.

English meaning

O Partha, since in all these activities, the main instrument is physical body, I call this penance as physical.

215
मूळ

एवं शारीर जे तप । तयाचे दाविले रूप । आता आइक निष्पाप । वाङ्मय ते ॥215॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे शारीरतपाचे लक्षण सांगितले; आता निष्पाप वाणीचे तप कोणते ते ऐक.

English meaning

Thus, I have discussed the physical penance. Now please listen to the purity of penance of Speech.

216
मूळ

तरी लोहाचे आंग तुक । न तोडिताचि कनक । केले जैसे देख । परीसे तेणे ॥216॥

मराठी अर्थ

परिस हा लोखंडाचा आकार, वजन वगैरे कशालाही न्यूनता न आणिता जसे याचे सुवर्ण करितो.

English meaning

As the magic-stone Parees transforms iron into gold without taking out any part from it;

217
मूळ

तैसे न दुखविता सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसे साधुत्व का देखिजे । बोलणा जिये ॥217॥

मराठी अर्थ

शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखविता त्याला सुख होईल अशी ज्याच्या भाषणात साधुता दिसेल.

English meaning

When the speech is similar to it, which does not hurt anyone's feelings and is kind and makes men happy who are near.

218
मूळ

पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेचि जिये । तैसे एका बोलिले होये । सर्वाहि हित ॥218॥

मराठी अर्थ

पाणी झाडाना म्हणून दिले जाते, पण, याच्या ओलाव्यावर गवत सहजच बाढते, त्याप्रमाणे एकापाशी केलेले भाषण सर्वाना हितकर असते.

English meaning

When the speech is addressed to one man but it also becomes helpful to all others like water given to the roots of one tree, gives life to the grass around it;

219
मूळ

जोडे अमृताची सुरसरी । तै प्राणांते अमर करी । स्नाने पाप ताप वारी । गोडीही दे ॥219॥

मराठी अर्थ

अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते, स्नानाने पाप व ताप जातात व प्राशनालाही गोड असते.

English meaning

If Ganges is of nectar, it certainly makes one deathless, but also makes us cool and pure by removing the heat and blemishes, by our bathing in it.

220
मूळ

तैसा अविवेकुही फिटे । आपुले अनादित्व भेटे । आइकता रुचि न विटे । पीयुषी जैसी ॥220॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरच्या भाषणाने अज्ञान नाहीसे होते, आत्मस्वरूपदर्शन (अनादित्व) होते आणि ते ऐकत असता, जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधी वीटही येत नाही.

English meaning

Similarly the speech which discards bad indiscriminate thinking, our real beginningless, eternal nature is revealed and one never gets bored while listening to it because it is sweet as nectar.

221
मूळ

जरी कोणी करी पुसणे । तरी होआवे ऐसे बोलणे । नातरी अवर्तणे । निगमु का नाम ॥221॥

मराठी अर्थ

जर कोणी काही प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो नाहीतर स्वाध्याय (वेदपाठ) अथवा हरिस्मरण चालू असते.

English meaning

If at all someone asks something, then there is talk, otherwise one may continue with one's study of Veda-recitation;

222
मूळ

ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनी । केली जैसी वदनी । ब्रह्मशाळा ॥222॥

मराठी अर्थ

ऋग्वेदादि तिन्ही वेदांची वाग्मंदिरांत प्रतिष्ठा करून वदन म्हणजे जणु ब्रह्मशाळाच बनवितात !

English meaning

Such a man, actually establishes all the three Vedas in the home of his speech and has as if started a Vedic school in his speech.

223
मूळ

ना तरी एकाधे नांव । तेचि शैव का वैष्णव । वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावे ॥223॥

मराठी अर्थ

किंवा, शिव अथवा विष्णु ह्यांपैकी एकाद्या देवतेचे नांव मुखात सारखे असते, तेच वाचिक तप होय.

English meaning

Or he continuously chants some name of God, either of the Lord Vishnu or that of the Lord Shiva- such is the nature of penance of speech.

224
मूळ

आता तप जे मानसिक । तेही सांगो आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥224॥

मराठी अर्थ

लोकनाथ नायक भगवान म्हणाले, आता मानसिक तप कथन करितों, तेही ऐक.

English meaning

After this the great leader of the Lords of all worlds, the Lord Shrikrishna, said "Now listen to the nature of penance by the mind, which we shall presently tell you.

225
मूळ

तरी सरोवर तरंगी । सांडिले आकाश मेघी । का चंदनाचे उरगी । उद्यान जैसे ॥225॥

मराठी अर्थ

तरी तरंगावाचून सरोवर, अभ्रांवाचून आकाश अथवा सर्पावाचून चंदनवन अथवा उद्यान.

English meaning

Just as there are no ripples on the surface of a lake, clouds have left the sky and it is clear; or serpents have left the garden of the sandalwood trees,

226
मूळ

नाना कळावैषम्ये चंद्रु । का सांडिला आधी नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळे ॥226॥

मराठी अर्थ

किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदर पर्वतावाचून समुद्र.

English meaning

Or, the changes in the shapes of the Moon which are her phases have left the Moon; or anxiety has left a king, or the Mandar mountain has left the sea (and the sea is calm),

227
मूळ

तैसी नाना विकल्पजाळे । सांडुनि गेलिया सकळे । मन राहे का केवळे । स्वरूपे जे ॥227॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे सर्व दूषने अथवा विकल्परहित अशी जी मनाची केवलस्थिति.

English meaning

When similar to these, the mind is left by various networks of complicated doubts and is thus free and pure in its real aloneness,

228
मूळ

तपनेवीण प्रकाशु । जाड्येवीण रसी रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥228॥

मराठी अर्थ

उष्णतेवाचून प्रकाश, जडत्वावाचून अन्न किंवा पोकळीवाचून आकाश, अशी जी स्थिति.

English meaning

Or light is without the troublesome heat, or juice is without its heaviness, or the sky is without its emptines;

229
मूळ

तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिके । हिवो नेदी निजांग ॥229॥

मराठी अर्थ

तसे आपण आहो असे जाणून जे मन आपला स्वभाव टाकते (चंचलता, संकल्प, विकल्प) म्हणजे थंडीलाच जशी थंडीची बाधा होत नाही, तसे ते स्वरूपस्थितीला पावले.

English meaning

Similarly he who achieves his own welfare and sees his own Self which is blissful and as the limbs already frozen do not feel the cold of ice afterwards, he forgets his own normal self;

230
मूळ

तैसे न चलते कळंकंवीण । शशिबिंब जैसे परीपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे ॥230॥

मराठी अर्थ

अचल, कलंकरहित परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावे त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी मनाची जी विश्रांति किंवा स्थापना.

English meaning

And when the mind is beautiful and without any dark spot, like the full moon who may be devoid of its dark spots and travels gracefully in the sky,

231
मूळ

जाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥231॥

मराठी अर्थ

या स्थितीत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन, मनाचे चांचल्य मोडून आमबोधाचे अंकुर यावे असा वाफसा त्या मनाच्या ठिकाणी तयार असतो. ( ते आत्मबोधाचे अधिकारी होते )

English meaning

In that state of mind, the cutting pains of maintaining ascetic desirelessness drop away, the wandering of the mind stops and only the fullness of self-knowledge remains within the mind.

232
मूळ

म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावे जे वक्त्र । ते वाचेचेही सूत्र । हाती न धरी ॥232॥

मराठी अर्थ

म्हणून, अशा स्थितीत ज्या वाणीने शास्त्राध्ययन व विचार करावयाचा ती एक शब्दही उच्चारण्यास प्रवृत्त होत नाही.

English meaning

Therefore, the mouth which is to be opened only to discuss the various scriptures, does not take the reins of speech, but keeps quiet.

233
मूळ

ते स्वलाभ लाभलेपणे । मन मनपणाही धरू नेणे । शिवतले जैसे लवणे । आपुले निज ॥233॥

मराठी अर्थ

व मिठाने आपले मूल तत्त्व जे पाणी त्याला पावून जसे निजस्वरूप टाकावे, त्याप्रमाणे, आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणाही उरत नाही इत्यर्थः

English meaning

As self-realisation has been attained, the quality of the mind is lost, and just as salt is dissolved in water, the mind is merged into the Atman.

234
मूळ

तेथ के उठिती ते भाव । जिही इंद्रियमार्गी धाव । घेऊनि ठाकावे गाव । विषयांचे ते ॥234॥

मराठी अर्थ

अशा स्थितींत, इंद्रियद्वारा धाव घेऊन विषयग्राम गांठावे, इत्यादि विकार तेथे उत्पन्न होण्याला अवसरच कोठला ?

English meaning

In such a condiion, how can the feelings and attitudes, which run towards objects through the path of sense organs, ever arise?

235
मूळ

म्हणौनि तिये मानसी । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥235॥

मराठी अर्थ

म्हणून तळहात जसा रोमरहित सहजच असतो, त्याप्रमाणे अशा स्थितींतील मन सहजच शुद्ध किंवा विकल्प रहित असते.

English meaning

Therefore, just as there are no hair on the palm, there are no thoughts about objects in such a mind, and there is purity of feeling.

236
मूळ

काय बहु बोलो अर्जुना । जै हे दशा ये मना । तै मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥236॥

मराठी अर्थ

अर्जुना, फार काय सांगावे ? मनाची जेव्हा अशी स्थिति होते तेव्हा ते मानसतप ह्या संज्ञेला पात्र होते.

English meaning

O Arjuna, what more should I say? When the mind attains such a state, then that is the right quality of mental penance.

237
मूळ

परी ते असो हे जाण । मानस तपाचे लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितले ॥237॥

मराठी अर्थ

पण, ते असो; हे सांगितले ते मानसतपाचे संपूर्ण लक्षण असे जाण.

English meaning

The Lord said, "Now let this be. I have completely told you the signs of mental penance.

238
मूळ

एवं देहवाचाचित्ते । जे पातले त्रिविधत्वाते । ते सामान्य तप तूते । परीसविले गा ॥238॥

मराठी अर्थ

असे कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन रूपांचे तप म्हणजे काय हे तुला सामान्यत्वे ऐकविले.

English meaning

Thus, the general classification of penance by way of the divisions of the body, the speech and the mind is explained to you.

239
मूळ

आता गुणत्रयसंगे । हेचि विशेषी त्रिविधी रिगे । तेही आइक चांगे । प्रज्ञाबळे ॥239॥

मराठी अर्थ

आता तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसे होते तेही लक्ष्य देऊन ऐक.

English meaning

Now I shall tell you about penance in its triple manifestation according to the three qualities, to which please listen with intelligence.

240
मूळ

तरी हेचि तप त्रिविधा । जे दाविले तुज प्रबुद्धा । तेचि करी पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥240॥

मराठी अर्थ

तरी, अर्जुना, जे हे तीन प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच फलशारहित पूर्ण श्रद्धेने आचरण कर.

English meaning

O the wise one, the very three-fold penance, which I have told you about, should be performed with great faith, but without hoping for the fruit.

241
मूळ

जै पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तै तयातेचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥241॥

मराठी अर्थ

अरे, पूर्ण शुद्ध मनाने ज्या वेळी ह्या तपाचे श्रद्धायुक्त आचरण केले जाते, तेव्हां, त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात.

English meaning

And when it is observed with piety and full belief in god, then it is called Sattwic penance, by wise-men.

242
मूळ

नातरी तपस्थापनेलागी । दुजेपण मांडूनि जगी । महत्त्वाच्या शृंगी । बैसावया ॥242॥

मराठी अर्थ

किंवा तपाच्या निमित्ताने, इतरांपेक्षा आपले वैशिष्टय दाखविण्याची व मोठेपणा मिरविण्याची व मिळविण्याची जे महत्त्वाकांक्षा धरितात.

English meaning

Otherwise also by creating discrimination among people, when penance is performed with a hope to sit on the high peak of self-importance.

243
मूळ

त्रिभुवनीचिया सन्माना । न वचावे ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागी ॥243॥

मराठी अर्थ

जगांतील सर्व मानमान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जाता आपल्याच वाट्यास यावी व भोजनादि समारंभांत आपल्यालाच अग्रस्थान असावे.

English meaning

Or with an intention to receive great honours in the social ceremonies, which is not in the lot of anybody in the three worlds, on occasions of conferences, dinner parties etc.,

244
मूळ

विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वे आपलिया यात्रा । कराविया यावे ॥244॥

मराठी अर्थ

साऱ्या जगाने आपली स्तुति करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वानी आपल्या भेटीस यावे अशी जो इच्छा करितो.

English meaning

Or with a motive to be the recipient of appaluse by the world, and that people should again and again come at one's door.

245
मूळ

लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥245॥

मराठी अर्थ

लोकांनी नानाप्रकारे आपलीच स्तुति करावी, इतरांचा आश्रय करू नये, व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच घडावे असे जो इच्छितो.

English meaning

Or with a hope to enjoy the honours of all kinds which should not be given to any other people.

246
मूळ

अंग बोल माखूनि तपे । विकावया आपणपे । अंगहीन पडपे । जियापरी ॥246॥

मराठी अर्थ

अंगहीनता म्हणजे कुरूपता झांकण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करितो, त्याप्रमाणे खरे स्वरूप झांकून आपली लोकात तपी म्हणून प्रसिद्धि व्हावी ह्यासाठी वरून तपाचा खूप आव आणतो.

English meaning

Or efforts are made by giving the polish of outward penance to increase the prestige of oneself, by adopting artificial attitudes and body and mannerisms of speech and a man thus deceives others just as an ugly person wears dandy dress, and affects a style to gain respect.

247
मूळ

हे असो धनमानी आस । वाढौनी तप कीजे सायास । तै तेचि तप राजस । बोलिजे गा ॥247॥

मराठी अर्थ

हे असो, द्रव्य व मानमान्यतेसाठी सायासाने जे तप केले जाते ते राजस तप होय असे म्हणतात.

English meaning

In short bad penance is called Rajasic which is performed with great troubles to oneself, motivated by extreme desire for money and social status.

248
मूळ

परी पहुरणी जे दुहिले । तै ते गुरू न दुभेचि व्याले । का उभे शेत चारिले । पिकावया नुरे ॥248॥

मराठी अर्थ

किंवा पहुरणी नामक रोगाने ज्या गाईचे दूध आटते ती गाय व्याली तरीही तिला दूध येत नाही किंवा शेतात उभे असलेले पीक जर गुरांकडून खावविले तर पीक कसे येणार ?

English meaning

Just as a cow which has some disease of udder, does not give milk eventhough it has given a calf or just as the field which has been grazed by animals while it is half ready with growth, does not yield crop.

249
मूळ

तैसे फोकारिता तप । कीजे जे साक्षेप । ते फळी तव सोप । निःशेष जाय ॥249॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, केवल प्रसिद्धीसाठी जे तप केले जाते त्याचे काहीही फल मिळत नसते.

English meaning

Similarly that penace which is performed with a big pomp and show becomes useless and fruitless;

250
मूळ

ऐसे निर्फळ देखोनि करिता । माझारी सांडी पंडुसुता । म्हणौनि नाही स्थिरता । तपा तया ॥250॥

मराठी अर्थ

शिवाय तप फळाला येत नाही असे दिसतांच ते मध्येच सोडून देतो ह्यामुळे त्याला स्थिरताही नसते.

English meaning

And O the son of Pandu, when the man sees that this penance is useless, he gives it up and therefore, there is no consistency in it.

251
मूळ

एऱ्हवी तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥251॥

मराठी अर्थ

अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकाली येणारा मेष काय फार काळ टिकतो ?

English meaning

For example, a cloud which has appeared in the sky out of season may thunder and fill the whole world with its echo, but will it remain so even for an hour?

252
मूळ

तैसे राजस तप जे होये । ते फळी कीर वांझ जाये । परी आचरणीही नोहे । निर्वाहते गा ॥252॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हे राजस तप त्याला फल तर येत नाहीच, पण, ते अखेरपर्यंत पुरे होण्याचीच मारामार असते.

English meaning

Similarly the penance which is Rajasic not only proves to be fruitless, but it is not even completed.

253
मूळ

आता तेचि तप पुढती । तामसाचिये रीती । पै परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥253॥

मराठी अर्थ

आता याच्यापुढे वर्णिले जाणारे जे तामस तप त्याला स्वर्गफल तर नाहीच, पण राजसा सारखी कीर्ती मिळण्याचाही संभव नाही.

English meaning

Now if that penance is Tamasic, when it is performed, the man loses both the happiness in heaven and the fame in this world.

254
मूळ

केवळ मूर्खपणाचा वारा । जीवी घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचे ॥254॥

मराठी अर्थ

अर्जुना, केवळ मूर्खपणाच्या भरी भरून शरीर हा जणू आपला वैरी आहे अशा जीवाची समजूत करून घेतो.

English meaning

O the great archer, when by being obsessed by stupidity our body is considered as our enemy..

255
मूळ

पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागी । का इंधन कीजे हे आगी । आंतु लावी ॥255॥

मराठी अर्थ

ते शरीर म्हणजे जसे काही काष्ठ आहे असे मानून त्याला सर्व बाजूनी पंचाग्नीची धग लावतो.

English meaning

And that body is subjected to five types of fire, and such articles are eaten which produce burning like fire inside the body,.

256
मूळ

माथा जाळिजती गुगुळु । पाठी घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीता ॥256॥

मराठी अर्थ

माथ्यावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नि पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात.

English meaning

They burn insense on their head, prick and poke their back with sharp hooks or they sit in a circle of fire and scorch their body.

257
मूळ

दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायाचि उपवास । का घेपती धूमाचे घास । अधोमुखे ॥257॥

मराठी अर्थ

श्वासोछवास बंद करून व्यर्थ उपवास करितात अथवा उलटे टांगून घेऊन धूम्रपान करतात

English meaning

By withholding breath they punish themselves and observe severe fast without reason and get themselves hung with their heads down and breathe smoke from burning artcles below on the ground!

258
मूळ

हिमोदके आकंठे । खडके सेविजती तटे । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥258॥

मराठी अर्थ

थंडीत गळयाइतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात, तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमट्याने तोडतात !

English meaning

They sit in extreme cold water upto their neck on the rocky banks of river or cut pieces of their own living flesh.

259
मूळ

ऐसी नानापरी हे काया । घाय सूता पै धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलाते ॥259॥

मराठी अर्थ

असे नानाप्रकारचे क्लेश शरीराल देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतु बाळगून तप करितात.

English meaning

O Dhananjaya, when the penance is performed by subjecting the body to various kinds of suffering, its main purpose is to create a mischief for others and destroy them.

260
मूळ

आंगभारे सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । का आड जालियाते रगडा । करी जैसा ॥260॥

मराठी अर्थ

भारानेच स्वतःच्या कडयाचा सुटणारा धोंडा खली पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडतांना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून जसा चूर करितो !

English meaning

Just as a big boulder on the slope of a hill escapes from its hold by its own weight and falls downwards, being itself shattered to pieces, and crushing anything that happens to be in its way.

261
मूळ

तेवी आपलिया आटणिया । सुखे असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥261॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात.

English meaning

The Tamasic man performs this type of penance, himself harassing his own life- element and by destroying them, for his own victory.

262
मूळ

किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे ते किरीटी । तामस होय ॥262॥

मराठी अर्थ

अर्जुना, ह्याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण ज केले जाते हे तामस तप होय.

English meaning

O the crowned one, in short, the penance of this type, resulting in suffering should be known as Tamasic penance.

263
मूळ

एवं सत्त्वादिकांच्या आंगी । पाडिले तप तिही भागी । जाले तेही तुज चांगी । दाविले व्यक्ती ॥263॥

मराठी अर्थ

एवं, सत्वादिक तीन जातीचे जे तप ते तुला । स्पष्टपणे सांगितले.

English meaning

Thus, I have shown you clearly how there are three types of penances according to the three qualities of Sattwa, Rajas and Tamas.

264
मूळ

आता बोलता प्रसंगा । आले म्हणौनि पै गा । करू रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥264॥

मराठी अर्थ

आत – ओघानेच आले म्हणून त्रिविध दानाचे लक्षण सांगू.

English meaning

Now, as a natural sequence, I will tell you the three types of "charities."

265
मूळ

येथ गुणाचेनि बोले । दानही त्रिविध असे जाले । तेचि आइक पहिले । सात्त्विक ऐसे ॥265॥

मराठी अर्थ

तीन गुणांच्या योगे ह्या दानाचेही तीन प्रकार होतात त्यातील सात्विक प्रकार प्रथम श्रवण कर.

English meaning

The charity is also having triple divisions according to the qualities. Please listen to the Sattwic charity first.

266
मूळ

तरी स्वधर्मा आंतौते । जे जे मिळे आपणयाते । ते ते दीजे बहुते । सन्मानयोगे ॥266॥

मराठी अर्थ

तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळेल ते जो सम्मान पूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो.

English meaning

Thus, whatever is earned by doing our own duty in our occupation, should be given in charity most respectfully.

267
मूळ

जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसे ॥267॥

मराठी अर्थ

दैवयोगाने उत्तम व बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र (शेत ) व वाफसा ह्यांची उणीव भासते, तशाच अडचणी दानांतही आहेत असे दिसून येते.

English meaning

Many times, it so happens that we have procured best grade seed, but a good cultivated field is not available. Similar thing happens in the case of charity.

268
मूळ

अनर्घ्य रत्न हाता चढे । तै भांगाराची वोढी पडे । दोनी जाली तरी न जोडे । लेते आंग ॥268॥

मराठी अर्थ

अमूल्य रत्न प्राप्त झाले तरी सोन्याची गरज असते ( कोंदण वगैरेसाठी ) व सोनेही प्राप्त झाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण.

English meaning

Or we have a priceless jewel, but good covering ring of gold is wanting and even if both are there a proper man to wear it is not available.

269
मूळ

परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकी मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयी ॥269॥

मराठी अर्थ

परंतु आपल्या भाग्याचा उत्कर्ष असतो तेव्हांच सणासारखा दिवस, जीवाचे आप्तेष्ट व द्रव्यानुकूलता असा एकत्र योग येतो.

English meaning

But if we are lucky, we have a good festival, an intimate friend and enough money, all at the same time.

270
मूळ

तैसे निफजावया दान । जै सत्त्वासि ये संवाहन । तै देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥270॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हांच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता ह्यांची जोड लाभते.

English meaning

Similarly when Sattwa is helpful for giving in charity, we get enough money, proper place and time as well as a really deserving man to receive it.

271
मूळ

तरी आधी तव प्रयत्नेसी । होआवे कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहीसी । तो देशुही हो ॥271॥

मराठी अर्थ

म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्ने करून, कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा ह्यांच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पहावा.

English meaning

Therefore, we should try to find a proper place like the sacred place of Kuru-kshetra or Kashi or any other sacred place equal to these.

272
मूळ

तेथ रविचंद्रराहुमेळु । होता पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥272॥

मराठी अर्थ

तेथे सूर्यग्रहण वा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल अथवा तत्सम दुसरा पुण्यकाल असावा,

English meaning

There, we should select any auspicious day like full-moon day or the last day of the lunar month, or any other day of spiritually good influence.

273
मूळ

तैशा काळी तिये देशी । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेचि का ॥273॥

मराठी अर्थ

तशा मुहूर्तावर या देशात असे सत्पात्र मिळावे की, जो शुचित्वाचा मूर्तीमंत अवतार होय.

English meaning

There, the man to whom charity is intended to be given should be selected, in such a way that he is the very image of pure life.

274
मूळ

आचाराचे मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसे द्विजरत्न चोखट । पावोनिया ॥274॥

मराठी अर्थ

तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदाचे वसतिस्थान, शुद्ध विद्वद्रत्न असा असावा.

English meaning

After we get such a pious well - versed Brahmin, who has good knowledge of Vedas and who is really the ideal of good conduct,

275
मूळ

मग तयाच्या ठाई वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढे कांता । रिगे जैसी ॥275॥

मराठी अर्थ

मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी; पण तीही, पतीपुढे कांता जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषावै करावी.

English meaning

We should give up our sense of ownership and possession upon the money etc.; to be given to him and it should be offered whole-heartedly, with that one-pointedness of a wife going to meet her husband;

276
मूळ

का जयाचे ठेविले तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपे विडा राया । दिधला जैसा ॥276॥

मराठी अर्थ

किंवा, जशी काही त्याची अ । पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असवी.

English meaning

Or like being free by giving back to the depositor what he had given us for safe-keeping or just like a servant offers Pan (betel-leaf preparation) to the king;

277
मूळ

तैसेनि निष्कामे जीवे । भूम्यादिक अर्पावे । किंबहुना हावे । नेदावे उठो ॥277॥

मराठी अर्थ

अशा निष्कामबुद्दीने भूमि आदिक दान ब्राह्मणास अर्पण करावे, पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्छा नसवी

English meaning

With similar sense of abandonment and unselfishness, we should give that man whatever is to be given, like a piece of land etc. and we should not allow any selfishness to rise in our mind in that action.

278
मूळ

आणि दान जया द्यावे । तयाते ऐसेया पाहावे । जया घेतले नुमचवे । कायसेनही ॥278॥

मराठी अर्थ

आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची उलटफेड करण्याची कधी संधि येणार नाही.

English meaning

And charity should be given to such a man who will never be able to refund it or return our obligations in any way.

279
मूळ

साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥279॥

मराठी अर्थ

आकाशाकडे मुख करून हाक मारिली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही, किंवा आरशाच्या मागील बाजूने पाहता प्रतिबिंब दिसत नाही,

English meaning

For example, if we give a call to the sky, the sky never answers it or if we see somewhere else and not in the mirror, the mirror does not give our reflection.

280
मूळ

नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुके । उधळौनि कवतिके । न येईजे हाता ॥280॥

मराठी अर्थ

किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्याघाताने परत आपल्या हात येत नाही.

English meaning

Or a ball thrown into a shallow pool of water does not rebound;

281
मूळ

नाना वसो घातला चारू । माथा तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥281॥

मराठी अर्थ

किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतघ्न मनुष्य हे जसे केव्हांही प्रत्युपकार करीत नाहीत.

English meaning

Or grass given to a bull which is left free to roam about as the god's animal, does not give us any fruit; or respect given to a man who is completely thankless and does not give us anything in return;

282
मूळ

तैसे दिधले दातयाचे । जो कोणेही आंगे नुमचे । अर्पिलया साम्य तयाचे । कीजे पै गा ॥282॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही, असे जे दान तेच श्रेयशसकर दान होय.

English meaning

Similarly, without any sense that we are the givers and the recipient is being obliged by us, we should give with a clear understanding that nothing in return is going to come back to us.

283
मूळ

ऐसिया जे सामग्रिया । दान निफजे वीरराया । ते सात्त्विक दानवर्या । सर्वाही जाण ॥283॥

मराठी अर्थ

अशा तजवीजीने केलेले जे दान ते, अर्जना, सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय.

English meaning

O the brave Arjuna, when anything is given with all these good things and conditions prevailing, it should be considered the best charity among all.

284
मूळ

आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥284॥

मराठी अर्थ

आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धामिक आचाराने मिळविलेले असावे.

English meaning

And the right place, the right time, the deserving Brahmin,- when all these are together, that giving, that charity becomes flawless and pure.

285
मूळ

परी मनी धरूनि दुभते । चारिजे जेवी गाईते । का पेव करूनि आइते । पेरू जाइजे ॥285॥

मराठी अर्थ

मनात दुधाची आशा धरून गाईला चारतात किंवा आधी पेवाची तयारी करून मग जसे शेत पेरतात.

English meaning

But just as a cow is fed with a motive that it will give milk or seeds are sown in a field with the aim of filling the godown with grains,

286
मूळ

नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतु जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥286॥

मराठी अर्थ

किंवा आहेर मिळेल ही पोटात आशा धरून मग जसे लग्नकार्यात सोयऱ्याला आमंत्रण देतात, किंवा जेथून वाण परत येईल अशाकडेच ते पाठवावयाचे.

English meaning

Or just as with an eye on the receiving of a good present, a relative is invited to attend some ceremony or to send some present to the home of an austere householder knowing that he will surely give something in return.

287
मूळ

पै कळांतर गाठी बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥287॥

मराठी अर्थ

किंवा लांच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावे अथवा द्रव्य घेऊन आर्त औषध जनांस द्यावे.

English meaning

Or just as a man first pockets the payment offered for a job and then starts doing it or as a doctor first gets the payment for medicine and then gives that medicine to a patient,

288
मूळ

तैसे जया जे दान देणे । तो तेणेचि गा जीवने । पुढती भुंजावा भावे येणे । दीजे जे का ॥288॥

मराठी अर्थ

तसे दान ज्याला द्यावयाचे, त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल अशी बुद्धि आत ठेवावयाची.

English meaning

Or as some charity is given or donation is given with a motive that one may go on taking benefit from that man in future in lieu of that donation,

289
मूळ

अथवा कोणी वाटे जाता । घेतले उमचो न शकता । मिळे जै पंडुसुता । द्विजोत्तमु ॥289॥

मराठी अर्थ

अथवा, सहज वाटेने जातांना एखादा पवित्र पण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला,

English meaning

Or when by chance a Brahmin meets us on the road, who is surely not able to give back anything.

290
मूळ

तरी कवड्या एकासाठी । अशेषा गोत्रांचीच किरीटी । सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी । तयाचिये ॥290॥

मराठी अर्थ

तर अधेल्या पैशाचे दानाकरिता त्याच्या हाता वर सर्व आप्तेष्टांच्या प्रायश्चित्तार्थ जे उदक सोडतात,

English meaning

One cunningly gives him a farthing and in return squeezes out from him a declaration that in that paltry fee, one's all ancestral and family sins are abated!

291
मूळ

तेवीचि पारलौकिके । फळे वांछिजती अनेके । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥291॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे, अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेही इतके की त्याने एक वेळची भूकही भागू नये

English meaning

Or when some insignificant amount, not enough even to meet one modest meal, is given with a view to obtain various kinds of pleasures in the higher worlds.

292
मूळ

तेही ब्राह्मणु नेवो सरे । की हाणिचेनि शिणे झांसुरे । सर्वस्व जैसे चोरे । नागऊनि नेले ॥292॥

मराठी अर्थ

आणि ते दान ब्राह्मण नेवू लगला की, चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानि झाली, असे मानून त्याबद्दल मनात झुरतात.

English meaning

And the giver, while giving even that little something is having a remoarse in his mind as if all his belongings are looted by robbers!

293
मूळ

बहु काय सांगो सुमती । जे दीजे या मनोवृत्ती । ते दान गा त्रिजगती । राजस पै ॥293॥

मराठी अर्थ

अर्जुना, फार काय वर्णावे ! अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजसदान म्हणून प्रसिद्ध आहे

English meaning

O the wise Arjuna, without explaining at length, I will simply say that when anything is given as charity etc. in such a selfish manner, it should be known as Rajasic charity.

294
मूळ

मग म्लेंच्छांचे वसौटे । दांगाणे हन कैकटे । का शिबिरे चोहटे । नगरींचे ते ॥294॥

मराठी अर्थ

मग म्लेच्छांच्या वस्तीची जागा, अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर, नगरांतले चव्हाटे,

English meaning

When money is spent in the locality of bad people, in a jungle, in a dirty slum area, or in the city square,

295
मूळ

तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु का रजनी । तेव्हा उदार होणे धनी । चोरियेच्या ॥295॥

मराठी अर्थ

अशा ठिकाणी बसून सायंकाळी अथवा रात्री चोरीने मिळविलेले द्रव्य उदारपणाने दान करितात.

English meaning

In menacingly ominous bad evening, or if stolen money is given at night,

296
मूळ

पात्रे भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररी । भुले तया ॥296॥

मराठी अर्थ

हे द्रव्य ज्यांना दिले जाते ते लोक म्हणजे भाट, तमासगीर, वेश्या, जुगारी, भुताटक्या, अथवा भूल घालणारे असे असतात.

English meaning

To the sooth-sayers, singers, court-singers, jugglers, gamblers or prostitutes or such people who are the very images of deception.

297
मूळ

रूपानृत्याची पुरवणी । ते पुढा डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणी । कर्णजपु ॥297॥

मराठी अर्थ

त्यातील रूपवानांनी त्यांच्यापुढे नृत्यगानादि प्रकार करून त्यास नेत्रकटाक्षाने वगैरे भुरळ पाडून त्याच्या कानांत जाईल असा स्तुतीचा जप केला;

English meaning

To some who have beautiful body and are dancing in drunken ecstacy and to them whose false flattery is ringing in the ears of the listeners.

298
मूळ

तयाहीवरी अळुमाळु । जै घे फुलागंधाचा गुगुळु । तव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥298॥

मराठी अर्थ

म्हणजे तल्लीन होऊन, अत्तर गुलाब वगैरे सुगंधी द्रव्यांचा चवीने भोग घेऊन मूर्तीमंत वेताळच बनतात !

English meaning

In addition there is good smell of flowers and fragrant articles in the atmosphere which has turned one into a Vetala (a Satan) of greed incarnate.

299
मूळ

तेथ विभांडूनिया जग । आणिले पदार्थ अनेग । तेणे घालू लागे मातंग । गवादी जैसी ॥299॥

मराठी अर्थ

मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थानि तेथे मांग गारोडीसारख्यांना अन्नछत्र घालतात.

English meaning

In such a state of mind and the surroundings when money or property which is robbed from all quarters of the earth, is given like a dinner party given by a man who is a `Mang'.

300
मूळ

एवं ऐसेनि जे देणे । ते तामस दान मी म्हणे । आणि घडे दैवगुणे । आणिकही ऐक ॥300॥

मराठी अर्थ

एकूण असा जो द्रव्याचा व्यय होतो त्याला मी तामसदान म्हणतो; आणि त्यातही एखादेवेळी कसा प्रकार घडतो, ते ऐक.

English meaning

When such charity is given, I call it the Tamasic charity. There is something else which takes place by such turn of luck, that

301
मूळ

विपाये घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसा पर्व जोडे । पुण्यदेशी ॥301॥

मराठी अर्थ

भुंग्याने कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असता त्यात कावळा सहज सापडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणाराला पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो.

English meaning

Sometimes by the little insects carving wood create a random pattern, which resembles a letter or sometimes when a crow perches on a little branch, it falls down. Similarly the Tamasic man luckily gets the benefit of auspcious time and sacred place.

302
मूळ

तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोही आला । तोही दर्पा चढला । भांबावे जरी ॥302॥

मराठी अर्थ

तेथे ह्याचे ऐश्वर्य पाहून सहज सत्पात्र ब्राह्मण दान मांगूआला, तेव्हा हा गर्वाने फुगून त्यास काही द्यावे असेही त्यास वाटले.

English meaning

And a deserving man also comes along to receive it, if he is a bit attracted to money.

303
मूळ

तरी श्रद्धा न धरी जिवी । तया माथाही न खालवी । स्वये न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥303॥

मराठी अर्थ

तरी त्याजबद्दल मनात श्रद्धा न धरिता किंवा त्याला नमस्कार न करिता स्वतः किंवा अन्याकडूनही त्याच्या हातावर दानाचे उदक सोडीत नाही.

English meaning

In that case, this Tamasic man has no faith in his mind, does not pay respects to that guest, does not welcome him with water etc. nor allows anybody to do so.

304
मूळ

आलिया न घली बैसो । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसी नरी ॥304॥

मराठी अर्थ

त्याला आसनही देत नाही, मग गंधअक्षतादिकांची गोष्ट कशाला ? असा तो त्याचा अपमान करितो

English meaning

He even does not offer a seat to the guest, not to speak about offering him any welcoming refreshments etc. O Arjuna, only Tamasic persons can behave in such an insulting way, devoid of ettiquettes.

305
मूळ

पै बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तू करणे याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥305॥

मराठी अर्थ

व एखाद्या ऋणकऱ्याची जशी बोळवण करावी त्याप्रमाणे, त्याच्या हातावर थोडेसे द्रव्य देतो व तेव्हांही त्याची ‘अरे तुरे ” अशा भाषेनेच संभावना करितो.

English meaning

If at all he gives him something, it is in an attitude of scorn as if trying to get rid of a beggar or a creditor, and he is uttering foul words continuously insulting him.

306
मूळ

आणि जया जे दे किरीटी । तयाते उमाणी तयासाठी । मग कुबोले का लोटी । अवज्ञेच्या ॥306॥

मराठी अर्थ

आणि ज्याला जे थोडे बहुत देतो, तेवढयाच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही.

English meaning

And O the crowned one, when such charity is given, the giver afterwards repeats what he has given and by speaking insulting words he puts that man in an ackward position.

307
मूळ

हे बहु असो यापरी । मोल वेचणे जे अवधारी । तया नांव चराचरी । तामस दान ॥307॥

मराठी अर्थ

हे पुरे; असे जे दान त्याला लोकात तामस दान असे म्हणतात.

English meaning

But let this be. Whatever is given in this way is called Tamasic charity.

308
मूळ

ऐशी आपुलाला चिन्ही । अळंकृते तिन्ही । दाने दाविली अभिधानी । रजतमाचिया ॥308॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे त्या त्या दानांची तिन्ही लक्षणे तुला सांगितली

English meaning

Thus I have told you all the three types of charity with the names also.

309
मूळ

तेथ मी जाणत असे । विपाये तू गा ऐसे । कल्पिसील मानसे । विचक्षणा ॥309॥

मराठी अर्थ

अर्जुना, मी समजतो की तुझ्या मनात ह्यावर अशी शंका येणे संभवनीय आहे की,

English meaning

But you may wisely think that since you very well know that

310
मूळ

जे भवबंधमोचक । येकले कर्म सात्त्विक । तरी का वेखासी सदोख । येर बोलावी ? ॥310॥

मराठी अर्थ

संसारबंधापासून मुक्त करणारे जे एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करावयाचे होते, अन्य सदोष कर्माचे का केले ?

English meaning

The only action which liberates us from this worldly life is Sattwic action, then why other types of actions which are bad should at all be described?

311
मूळ

परी नोसंतिता विवसी । भेटी नाही निधीसी । का धू न साहता जैसी । वाती न लगे ॥311॥

मराठी अर्थ

परंतु भूतसमंधादिकांची अडचण दूर केल्याशिवाय जसे जुने ठेवने प्राप्त होत नाही, किंवा, धूर सोसल्याशिवाय जसा अग्नि पेटत नाही.

English meaning

But, just as without evicting the ghost the hidden treasure cannot be had or just as a wick of lamp is not kindled without first experiencing a little smoke;

312
मूळ

तैसे शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचे कवाड । ते भेदणे याते कीड । म्हणावे का ? ॥312॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणाच्या आड रज व तम ह्यांचा प्रतिबंध आहे; अरे, त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय ?

English meaning

Similarly, how can the work of removing the Rajasic and Tamasic covers around the Sattwic actions be called an undesirable action?

313
मूळ

आम्ही श्रद्धादि दानात । जे समस्तही क्रियाजात । सांगितले का व्याप्त । तिही गुणी ॥313॥

मराठी अर्थ

श्रद्धे पासून दानापर्यंत जेवढया क्रिया सांगितल्या त्या सर्व ह्या तीन गुणांनी युक्त असतात.

English meaning

We have told you that all the actions as such are full of the three qualities, right from the faith upto the charity.

314
मूळ

तेथ भरवसेनि तिन्ही । न सांगोचि ऐसे मानी । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलो येरे ॥314॥

मराठी अर्थ

खरोखर त्या तीहीचे वर्णन आम्ही केलेच नसते हे ध्यानात ठेव; पण, सत्वगुणाची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या दोन गुणांची लक्षणे सांगणं प्राप्तच झाले.

English meaning

We have no intention to tell all the tree types, as a matter of fact, but in order to make the picture clear about what is Sattwic, we have simply touched the others in short.

315
मूळ

जे दोहीमाजी तिजे असे । ते दोन्ही सांडिताचि दिसे । अहोरात्रत्यागे जैसे । संध्यारूप ॥315॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे दिवस नाही व रात्र नाही अशा दोहीच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्टरूप ध्यानात येते; त्याप्रमाणे रज व तम ह्या दोहोंहून निराळा असा जो तिसरा गुण तो सत्व होय, हे स्पष्टपणे ध्यानात येते.

English meaning

That which is caught on both sides by two things can be clearly seen only when those two are removed, just as we know what is dawn or evening when we leave the day and night out of our consideration.

316
मूळ

तैसे रजतमविनाशे । तिजे जे उत्तम दिसे । ते सत्त्व हे आपैसे । फावासि ये ॥316॥

मराठी अर्थ

तसेच रज तम ह्यांच्या नाशाने (त्यागाने) तिसरा जो सत्वगुण तो आपोआप उत्तमपणे लक्ष्यात येतो.

English meaning

Similarly by destruction of Rajas and Tamas, the remaining Sattwa is clearly recognized.

317
मूळ

एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिले तम रज । ते सांडूनि सत्त्वे काज । साधी आपुले ॥317॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रज व तम ह्यांचे निरूपण केले; त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कार्य साधून घे.

English meaning

Thus, I have described Rajas and Tamas only to make you aware of them, discard them and take the best advantage of the Sattwa only.

318
मूळ

सत्त्वेचि येणे चोखाळे । करी यज्ञादिके सकळे । पावसी तै करतळे । आपुले निज ॥318॥

मराठी अर्थ

या सत्वाच्याच सहाय्याने यज्ञादि सर्व क्रियाजात आचर. म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची करतळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ति होईल.

English meaning

If you perform actions like sacrifices, rituals etc. by abiding by only the Sattwa quality, you will have experience of the self knowledge like a fruit kept on your palm.

319
मूळ

सूर्ये दाविले सांते । काय एक न दिसे तेथे । तेवी सत्त्वे केले फळाते । काय नेदी ? ॥319॥

मराठी अर्थ

सूर्यच स्वतः सहाय झाल्यावर कोणती वस्तु दिसणार नाही ? तसे सात्विक आचाराला कोणते फल येणार नाही ?

English meaning

If the Sun is showing everything, what is there that we will not see! Thus when Sattwic action is performed, what fruit is there which it will not give?

320
मूळ

हे कीर आवडताविखी । शक्ति सत्त्वी आथी निकी । परी मोक्षेंसी एकी । मिसळणे जे ॥320॥

मराठी अर्थ

सत्वाच्या आंगी असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी, मोक्षप्राप्ति म्हणून जो एक स्थिति आहे.

English meaning

Thus Sattwa has the power to give you any desired fruit, but the final liberation of the soul into the Brahman is quite different.

321
मूळ

ते एक आनचि आहे । तयाचा सावावो जै लाहे । तै मोक्षाचाही होये । गावी सरते ॥321॥

मराठी अर्थ

तिचे एक निराळेच तंत्र आहे; त्यांचे सहाय्य जेव्हा ह्या सत्वाला मिळेल तेव्हा त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारिता येईल.

English meaning

And with the help of Sattwa, one easily steps into the state of liberation or enters the town called 'liberation'.

322
मूळ

पै भांगार जऱ्ही पंधरे । तऱ्ही राजावळीची अक्षरे । लाहे तैचि सरे । जियापरी ॥322॥

मराठी अर्थ

पंधरा दराचे उत्तम सुवर्ण असले तरी त्यावर जेव्हा राजसत्तेचा शिक्का पडेल तेव्हांच हे जसे चालते.

English meaning

Though gold is pure and its value is fifteen rupees per "tola", it is used as a valid current coin only when the king's seal is imprinted on it.

323
मूळ

स्वच्छे शीतळे सुगंधे । जळे होती सुखप्रदे । परी पवित्रत्व संबंधे । तीर्थाचेनि ॥323॥

मराठी अर्थ

स्वच्छ, शीतळ व सुगंध असे आल्हादकारी उदक असले तरी, त्यास तीर्थासंबंधावाचून पवित्रता येत नाही. (आंत तीर्थ घालावे लागतं. )

English meaning

Though clean, cool and scented water is very soothing, the sacredness is added to it only when it is from a sacred place of pilgrimage.

324
मूळ

नयी हो का भलतैसी थोरी । परी गंगा जै अंगीकारी । तैचि तिये सागरी । प्रवेशु गा ॥324॥

मराठी अर्थ

सामान्य ओढयाला स्वतः थोरवी नसो; पण गंगेला तो मिळाला म्हणजे त्याला समुद्र प्रवेशाची योग्यता येते.

English meaning

Though a river may be quite wide, it can meet the sea only when it joins a great river.

325
मूळ

तैसे सात्त्विका कर्मा किरीटी । येता मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । ते वेगळे आहे ॥325॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अर्जुना, सात्विक कर्माचरणाने मोक्ष प्राप्तीकडे जात असता, ज्याचा प्रतिबंध होऊ नये ते एक वेगळेच आहे.

English meaning

Similarly, it is the Sattwic action which is really helpful to a man to reach liberation and there are no difficulties in his way and that is the speciality of it."

326
मूळ

हा बोलु आइकतखेवी । अर्जुना आधि न माये जीवी । म्हणे देवे कृपा करावी । सांगावे ते ॥326॥

मराठी अर्थ

हे भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनी कृपा करून ते सांगावेच.

English meaning

As soon as Arjuna listened to this, his eagerness could not be contained within himself and he asked the Lord-"O God! Please be kind and tell me all about it."

327
मूळ

तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणे सात्त्विक ते मुक्ती- । रत्न देखे ॥327॥

मराठी अर्थ

तेव्हा कृपाळ व चक्रवर्ती भगवान म्हणाले ज्याच्या योगे सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो त्याचे लक्षण ऐक.

English meaning

Then the greatest among the kind people, Lord Shrikrishna said- "All right! Please listen to the explanation as to how the man of Sattwic quality sees the jewel which is called Liberation."

328
मूळ

तरी अनादि परब्रह्म । जे जगदादि विश्रामधाम । तयाचे एक नाम । त्रिधा पै असे ॥328॥

मराठी अर्थ

तरी, परब्रह्म हे अनादि असून जगदादिकांचे विश्रांतिस्थान आहे; हे त्यांचे एकच नांव तीन प्रकारचे आहे.

English meaning

So, the beginningless absolute Brahman, which is the primary source of this world and also its final resting place is having one name with three syllables.

329
मूळ

ते कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती- । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥329॥

मराठी अर्थ

खरोखर पहाता वस्तुतः त्याला नाम किंवा जाति नाही, परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खूण म्हणून त्याचे ‘ब्रह्म ” असे नांव ठेविले.

English meaning

Actually it is nameless and birthless but in the night of ignorance of Maya, this is only a sign given to it by Vedas in order that we may recognize it.

330
मूळ

उपजलिया बाळकासी । नांव नाही तयापासी । ठेविलेनि नांवेसी । ओ देत उठी ॥330॥

मराठी अर्थ

मुलाला जन्मतः काही नांव नसते, पण नंतर त्याला जे नांव द्यावे त्या नांवाने हाक मारली असता ‘ ओ ‘देते.

English meaning

When a child is born it has no name, but we name it afterwards and when we call it by that name, it gives response and gets up.

331
मूळ

कष्टले संसारशीणे । जे देवो येती गाऱ्हाणे । तया ओ दे नांवे जेणे । तो संकेतु हा ॥331॥

मराठी अर्थ

संसाराच्या कष्टाने शीण पावलेले लोक जेव्हा वेदाकडे आपले गाऱ्हाणे सांगतात तेव्हा त्यांना ज्या नांवाने तो ‘ओ’ देतो. तो हा संकेत किंवा ती ही ब्रह्मनामक खुण होय.

English meaning

When people being exhausted by the troubles and tribulations of worldly life come to Brahman to complain and pray for relief, the Brahman gives the response to them and that is this word, viz. 'AUM'.

332
मूळ

ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वे तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदे बापे ॥332॥

मराठी अर्थ

ब्रह्मावरील अनिर्वाच्यतेचा आळ फिटावा व त्याची ऐक्यरूपाने भेट व्हावी अशा हेतूने वेदाने सकृप होऊन जीवांसाठीहे मंत्ररूप नाम शोधून ठेविले.

English meaning

The Veda has compassionately found out a Mantra, by which the silence of Brahman should be broken and non-duality should be attainable through duality.

333
मूळ

मग दाविलेनि जेणे एके । ब्रह्म आळविले कवतिके । मागा असत ठाके । पुढा उभे ॥333॥

मराठी अर्थ

मग ह्या खुणेच्या मंत्राने त्याला (ब्रह्माला) कौतुकाने हाक मारिलो असता, जे मार्ग म्हणजे दृष्टीआड असल्यासारखे असते ते प्रत्यक्ष पुढे उभे रहतें.

English meaning

Then only by using this one-syllabled Mantra, Brahman can be entreated to become manifest before us though it is invisible.

334
मूळ

परी निगमाचळशिखरी । उपनिषदार्थनगरी । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारी । तयांसीच कळे ॥334॥

मराठी अर्थ

पण, वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरुपी नगरांत ज्यांचा ब्रह्माशी सहसमागम असतो त्यासच हे नाम महात्म्य कळतें.

English meaning

But this Mantra is properly understood by those who are, in the purity of their consciousness seated on the same level as the god Brahma, in the abstract city of Upanishads on the highest peack of the mountain of Vedas.

335
मूळ

हेही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥335॥

मराठी अर्थ

हेही असो; ब्रह्मदेवाला सृष्टि उत्पन्न करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झाले ते ज्या एका नामाच्या आवृत्तीने म्हणजे जपाने च होय.

English meaning

Not only this, but by uttering this word only once, the God Brahma got the power to create this whole nature.

336
मूळ

पै सृष्टीचिया उपक्रमा- पूर्वी गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥336॥

मराठी अर्थ

अर्जुना, सृष्टि उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेडयासारखा (काही न सुचून ) बसला होता.

English meaning

O the great warrior Arjuna, before the beginning of the creation, Brahma, the god was alone without any wisdom and was so confused,

337
मूळ

मज ईश्वराते नोळखे । ना सृष्टिही करू न शके । तो थोरु केला एके । नामे जेणे ॥337॥

मराठी अर्थ

त्याला माझी ओळख नव्हती किंवा सृष्टि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ही नव्हते, पण, त्या वेदसांकेतिक नामाने त्याला एवढे सामर्थ्य आले.

English meaning

That he did not recognize me, the Lord also, and could not create anything at all; but he became quite able only by this one name.

338
मूळ

जयाचा अर्थु जीवी ध्याता । जे वर्णत्रयचि जपता । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥338॥

मराठी अर्थ

ज्या मंत्राच्या अर्थाचे मनात ध्यान करून व ज्या मंत्राच्या तीन अक्षरांचा जप करून त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता आली.

English meaning

By meditating on the meaning of this name and by respecting these three letters or utterances), God Brahma attained the power to create the universe.

339
मूळ

तेधवा रचिले ब्रह्मजन । तया वेद दिधले शासन । यज्ञा ऐसे वर्तन । जीविके केले ॥339॥

मराठी अर्थ

प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञरूपी आचाराचे बंधन लावून, निर्वाहार्थं यज्ञादि साधने स्वाधीन केली.

English meaning

Then he created the Brahmins and by ordering them to follow the Vedas He gave them the Yadnya, the sacrificial rituals as a means for their existence.

340
मूळ

पाठी नेणो किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्ही भुवने ॥340॥

मराठी अर्थ

मग आणखी किती लोक निर्माण केले त्याची गणतीच नाही; तसेच त्रिभुवन निर्माण करून त्यास व्यवहारार्थं बक्षीस करून दिले.

English meaning

Then how many creatures he brought into existence, is not possible to count, and for their subsistence, He gave them the rights of the three worlds.

341
मूळ

ऐसे नाममंत्रे जेणे । धातया अढंच करणे । तयाचे स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥341॥

मराठी अर्थ

ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला अशी प्रचंड शक्ति प्राप्त झाली, त्याचे स्वरूप तू आता श्रवण कर, असे श्रीनिवास भगवान् म्हणाले.

English meaning

The Lord said to Arjuna further- "Please listen to the nature of that Mantra by which Brahma the god, the creator, was able to bring into existence this wonderful universe.

342
मूळ

तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥342॥

मराठी अर्थ

तरी सर्व मंत्रांचा राजा जो ” प्रणव ” तोच “ॐ ” आदिवर्ण म्हणजे मूळ अक्षर असे जाण व ‘तत् ” हे दुसरे व ” सत्” हे या मंत्राचे तिसरे अक्षर होय.

English meaning

Thus, Pranava or 'AUM' is the king of all Mantras and 'Tat' is the second part while "Sat" is the third part of this Mantra.

343
मूळ

एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हे त्रिप्रकारु । हे फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचे ॥343॥

मराठी अर्थ

ह्याप्रकारे “ॐ तत्सत” आकाराचे हे त्रिप्रकारक ब्रह्मनाम हेच कोणी उपनिषदांचे सुंदर पुष्प त्याचा सुगंध तू सेवन कर.

English meaning

Thus this is the triple name OM TAT SAT for Brahman. You should enjoy the fragrance of this sweet and beautiful flower, which is the essence of the meaning of the Upanishads.

344
मूळ

येणेसी गा होऊनि एक । जै कर्म चाले सात्त्विक । तै कैवल्याते पाइक । घरीचे करी ॥344॥

मराठी अर्थ

ह्या वर्णत्रयाच्या ऐक्याने सात्विक कर्माचरण केले असता मोक्ष त्याचा दास होतो.

English meaning

When Sattwic action is done by being united with this name, it makes the 'liberation of absolute aloneness', a household servant of the man.

345
मूळ

परी कापुराचे थळीव । आणून देईल दैव । लेवो जाणणेचि आडव । तेथ असे बापा ॥345॥

मराठी अर्थ

दैवयोगाने, कापुराचे अलंकार जरी मिळाले, तरी ते ल्यावे कसे हे समजणेच मोठे कठीण असते.

English meaning

My dear, perhaps we may luckily get ornaments made of camphor! But it is very difficult to know how to wear them!

346
मूळ

तैसे आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचे ॥346॥

मराठी अर्थ

तसे, सत्कर्माचे आचरण व ब्रह्मनामाचा उच्चार जरी केला, तरी जर त्याच्या उपयोगाचे वर्म माहीत नसेल,

English meaning

Similarly, even if we perform a Sattwic action, and utter the name of Brahman, and still do not know for what purpose it is to be applied, then,

347
मूळ

तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानू नेणता परवडी । मुद्दल तुटे ॥347॥

मराठी अर्थ

तर, साधुसंत प्रेमाने घरी आले तरी त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे न जाणता जर अपमान झाला तर पुण्य लागण्याऐवजी पाप मात्र लागते.

English meaning

Just as our merit which is in our stock is lost, if we do not know how to welcome saints who have come to us in a large number;

348
मूळ

का ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवी ॥348॥

मराठी अर्थ

किंवा सोन्याचे उत्तम टीक वगैरे दागिने एकत्र गाठोडे करून जसे गळ्यात बांधावे

English meaning

Or just as with a strong desire to don golden ornaments one also puts on the joints of lesser metal together with the gold around one's neck;

349
मूळ

तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्त्विक कर्म । विनियोगेवीण काम । विफळ होय ॥349॥

मराठी अर्थ

तसे मुखाने ब्रह्म नामोच्चार, हाताने सात्विक कर्म, पण त्याचा विनियोग मात्र माहीत नाही असे असेल तर ते व्यर्थ जाते.

English meaning

Similarly, the name of Brahman is being uttered, Sattwic action is being done by hands but if we do not know for what pupose it is meant, then all this will be in vain.

350
मूळ

अगा अन्न आणि भूक । पासी असे परी देख । जेऊ नेणता बालक । लंघनचि की ॥350॥

मराठी अर्थ

अरे, पोटात भूक आहे, जवळ अन्नही आहे, पण कसे जेवावे ते माहित नसलेल्या बालकाला जसा उपवास घडतो.

English meaning

My dear, there is food and a child is hungry but if it does not know how to eat the food, it is but natural that it will be hungry only.

351
मूळ

का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणता वीरा । प्रकाशु नोहे ॥351॥

मराठी अर्थ

किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही.

English meaning

Or, O the brave one, even if oil, wick and fire are at hand, if we do not know how to utilize them together, we will not be getting light!

352
मूळ

तैसे वेळे कृत्य पावे । तेथिचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ ते आघवे । विनियोगेवीण ॥352॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, योग्य वेळी कर्म घडून त्यावेळचे मंत्रही जरी स्मरले तरी त्याच्या विनियोगाचे वर्म माहीत नसेल तर ते सर्व व्यर्थ होते.

English meaning

Similarly, at the right time good action is being performed, we also remember the sacred Mantra, but if we do not know its purpose, all will be futile.

353
मूळ

म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हे परब्रह्मनाम एक । विनियोगु तू आइक । आता याचा ॥353॥

मराठी अर्थ

म्हणून, ह्या परब्रह्माचे जे वर्णत्रयात्मक एक नाम आहे त्याचा विनियोग (उपयोग) कसा करावा ते तू आता श्रवण कर.

English meaning

Therefore, please listen to the way in which this triple name of Brahman is to be applied or utilized in our life.

354
मूळ

तरी या नामींची अक्षरे तिन्ही । कर्मा आदिमध्यनिदानी । प्रयोजावी पै स्थानी । इही तिन्ही ॥354॥

मराठी अर्थ

तरी ह्या ब्रह्मनामाची तिन्ही अक्षरे ” ॐ तत् सत् ” ह्यांची कर्मारंभाच्या आधी मध्ये व अंती योजना करावी.

English meaning

The three letters of this sacred name should be used in the beginning, the middle and the end of every action.

355
मूळ

हेचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥355॥

मराठी अर्थ

हेच विनियोगाचे वर्म जाणून, ब्रह्मवेत्ते (ब्राह्मण) ब्रह्मरूप झाले.

English meaning

By this method only those who know Brahman have achieved that state.

356
मूळ

ब्रह्मेसी होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकी । जे चावळले वोळखी । शास्त्रांचिया ॥356॥

मराठी अर्थ

ब्रह्मरूप होण्याची ज्यांना इच्छा आहे ते, ज्यांचे यथार्थ स्वरूप शास्त्रांत सांगितले आहे अशा, यज्ञादिक क्रियांचा त्याग करीत नाहीत.

English meaning

As they are having faith in the performance of right action due to their study of the scriptures, they do not remain without the right performance of Yadnyas, etc., or reaching unity with the Brahman.

357
मूळ

तो आदि तव ओंकारु । ध्याने करिती गोचरु । पाठी आणिती उच्चारु । वाचेही तो ॥357॥

मराठी अर्थ

ते प्रथम ॐकाराची ध्यानाने सिद्धि करून नंतर त्याचा वाणीने उच्चार करतात.

English meaning

But first they establish well in their mind through meditation the AUM, and then they utter it by their speech.

358
मूळ

तेणे ध्याने प्रकटे । प्रणवोच्चारे स्पष्टे । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥358॥

मराठी अर्थ

असे ध्यान करून नंतर प्रकट प्रणवोच्चार करून मग सर्व कर्माना आरंभितात.

English meaning

Then with the help of that concentration of AUM and its utterance, they proceed to the performance of Action.

359
मूळ

आंधारी अभंगु दिवा । आडवी समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभी ॥359॥

मराठी अर्थ

अंधारांत दिव्याचा, अरण्यात शूर सोबत्याचा जसा आधार असतो तसा ‘प्रणवाचा’ कर्मारंभांत रक्षक म्हणून उपयोग असतो.

English meaning

AUM should be resorted to at the beginning of action, like the taking of help of a lamp in the dark, or of a strong man in a jungle.

360
मूळ

उचितदेवोद्देशे । द्रव्ये धर्म्ये आणि बहुवसे । द्विजद्वारा हन हुताशे । यजिती पै ते ॥360॥

मराठी अर्थ

योग्य देवतांच्या उद्देशाने धर्माजित पुष्कळ द्रव्याने ते ब्राह्मणद्वारा अग्नींत यजन करतात.

English meaning

Those knowers of Brahman (in the form of Vedas) perform sacrifices by putting in the fire, the pure things earned through righteous activities, through the help of the Brahmin priests, so as to propitiate their dear deities.

361
मूळ

आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपी हवनी । यजिती पै विधानी । फुडे हौनी ॥361॥

मराठी अर्थ

आहवनीय, गार्हपत्य व दक्षिण ह्या तीन अग्नींत, हवनीय आज्यादि (तूप वगैरे) द्रव्यांनी ते हवन करतात.

English meaning

By being very careful they perform sacrifices in the three kinds of fires at three times a day, following strictly the rules laid down in the relevent scriptures.

362
मूळ

किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥362॥

मराठी अर्थ

किंबहुना अनेक यज्ञ करण्याच्या संकल्पाने आपल्यास न आवडणाच्या इतर उपाधींचा त्याग करितात (सांसारिक उपाधि)

English meaning

Or, by the very acceptance of the duty of peforming such sacrifices, they give up the impediments and bondages of the worldly life which they do not like anymore.

363
मूळ

का न्याये जोडला पवित्री । भूम्यादिकी स्वतंत्री । देशकाळशुद्ध पात्री । देती दाने ॥363॥

मराठी अर्थ

आणि न्यायाजित पवित्र द्रव्य व भूमि वगैरे दाने शुद्ध देशकाल पाहून सत्पात्र ब्राह्मणास देतात.

English meaning

They obtain, through legitimate means, land and other property and finding the auspicious time and place as well as the deserving recipients, they give these things to them.

364
मूळ

अथवा एकांतरा कृच्छ्री । चांद्रायणे मासोपवासी । शोषोनि गा धातुराशी । करिती तपे ॥364॥

मराठी अर्थ

अथवा एक दिवस आड भोजन करून किंवा कृच्छचांद्रायणादि मासिक उपवासाने शरिरांतील सप्त धातूचे शोषण करून जे तप करितात.

English meaning

Sometimes they continuously observe fast on particular alternate days or days after every two or three days or according to the phases of the moon and thus become lean and emaciated in that penance.

365
मूळ

एवं यज्ञदानतपे । जिये गाजती बंधरूपे । तिहीच होय सोपे । मोक्षाचे तया ॥365॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, जी यज्ञ, दान, तपे बंधरूप आहेत, अशी प्रसिद्धि आहे त्यांनीच, आरंभाला केलेल्या प्रणवोच्चाराच्या हातवटीने, त्यांना मोक्ष सुलभ होते.

English meaning

Thus, they perform the very activities like sacrifices, charity and penances which are normally a cause of bondage to the soul and through these, unselfishly performed, those knowers of Brahman attain liberation easily.

366
मूळ

स्थळी नावा जिया दाटिजे । जळी तियांचि जेवी तरीजे । तेवी बंधकी कर्मी सुटिजे । नामे येणे ॥366॥

मराठी अर्थ

जमिनीवर जी नाव मोठे ओझे अशी वाटते तीच पाण्यात लोटल्यावर हलकी वाटून तरणोपाय होते. त्याप्रमाणे कर्म बंधनकारक खरी, पण प्रणवोच्चाराने ती बंधनकारक होत नाहीत.

English meaning

For example, boats are heavy on the land but we cross waters by using the same boats. Similarly, by the help of this sacred name one is freed from binding actions.

367
मूळ

परी हे असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारे सावायिलिया । प्रवर्तती ॥367॥

मराठी अर्थ

परंतु हे राहो; ह्या यज्ञदानादि क्रिया ॐकाराच्या सहाय्याने मोठ्या योग्यतेस चढतात.

English meaning

But enough of this repetition. In short, with the help of 'AUM' the activities such as sacrifices, penances etc. become helpful towards liberation.

368
मूळ

तिया मोटकिया जेथ फळी । रिगो पाहाती निहाळी । प्रयोजिती तिये काळी । तच्छब्दु तो ॥368॥

मराठी अर्थ

ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळेस ” तत ” शब्दाचा ते प्रयोग करितात.

English meaning

When these activities seem to bring about some fruit in due course, the word "Tat" is used.

369
मूळ

जे सर्वाही जगापरौते । जे एक सर्वही देखते । ते तच्छब्दे बोलिजे ते । पैल वस्तु ॥369॥

मराठी अर्थ

जे सर्व जगाच्या पलीकडले असून सर्वसाक्षी आहे व ज्याचा ‘तत् ” ह्या । शब्दाने निर्देश करितात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म होय.

English meaning

The absolute Brahman which is beyond the whole world, which witnesses all, and which is a thing beyond all things, is denoted by the word "TAT"

370
मूळ

ते सर्वादिकत्वे चित्ती । तद्रूप ध्यावूनिया सुमती । उच्चारेही व्यक्ती । आणिती पुढती ॥370॥

मराठी अर्थ

अर्जुना, ते सर्वाच्याही आधीचे असे त्याच्या रूपाचे चित्तांत ध्यान करून नंतर त्याचा ‘तत् ” शब्द मे स्पष्ट निर्देश करितात.

English meaning

They meditate upon it as the root cause of all things and then those wise people utter the letter 'TAT'.

371
मूळ

म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेसी क्रिया इया । तेचि होतु आम्हा भोगावया । काहीचि नुरो ॥371॥

मराठी अर्थ

आणि म्हणतात तत् शब्दवाच्य जे ब्रह्म त्याला ह्या सर्व क्रिया त्यांच्या फलांसह अर्पण असोत, व त्या तद्रूपच होवोत; त्यांचा अगर त्यांच्या फळांचा आम्हास कोणत्याही प्रकारे भोग न घडो.

English meaning

They pray- "Let all these actions be offered to that Brahman which is called Tat, and no fruit may remain for us to enjoy, out of them.

372
मूळ

ऐसेनि तदात्मके ब्रह्मे । तेथ उगाणूनि कर्मे । आंग झाडिती न ममे । येणे बोले ॥372॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म त्याला सर्व कर्मे समधून “न मम” (माझे काहीही नव्हे) असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात.

English meaning

Thus, by offering all actions to the Brahman denoted by Tat, they say-"This is not mine" and escape from the involvement into the results of those actions.

373
मूळ

आता ओंकारे आदरिले । तत्कारे समर्पिले । इया रिती जया आले । ब्रह्मत्व कर्मा ॥373॥

मराठी अर्थ

आता प्रणब म्हणजे ॐ काराच्या उच्चाराने आरंभून जे कर्म ‘तत् ” शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मसमर्पण करून त्याला ब्रह्मत्व आणिलें.

English meaning

Now, that action which is begun by speaking the word Om and offered to Brahman with the word TAT,

374
मूळ

ते कर्म कीर ब्रह्माकारे । जाले तेणेही न सरे । जे करी तेणेसी दुसरे । आहे म्हणौनि ॥374॥

मराठी अर्थ

पण ते कर्म ब्रह्माकार झाले, एवढयानेच केवल भागत नाही. कारण त्यांचा कर्ता म्हणून एक दुसरेपणाने शिल्लक आहेच.

English meaning

Is only an action which is outwardly apparent but as the actor, the doer conceives himself as different, separate entity, it does not dissolve itself by this outward offering to Brahman.

375
मूळ

मीठ आंगे जळी विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसे कर्म ब्रह्माकारे । गमे ते द्वैत ॥375॥

मराठी अर्थ

मीठ पाण्यात विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार ह्या स्वभावाने त्याचे पृथकत्व उरतेच, त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झाले असे म्हणण्यातच त्याचे द्वितीयत्व सिद्ध होते.

English meaning

The salt gets dissolved into water but there is still salty taste to the water. Similarly the duality remains because the doer thinks that 'he' has offered the action to Brahman.

376
मूळ

आणि दुजे जव जव घडे । तव तव संसारभय जोडे । हे देवो आपुलेनि तोंडे । बोलती वेद ॥376॥

मराठी अर्थ

आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हे देवानी मुख्यतः सांगितले व वेदवचनही तसेच आहे.

English meaning

And so long as this duality persists, the fear of bondage of worldly life does not end. Vedas which are the mouth of the God have been declaring this with full force.

377
मूळ

म्हणौनि परत्वे ब्रह्म असे । ते आत्मत्वे परीयवसे । सच्छब्द या रिणादोषे । ठेविला देवे ॥377॥

मराठी अर्थ

म्हणून कर्मकर्त्याहून भिन्नत्वाने असणारे जे ब्रह्म त्याचे पर्यवसान कर्तृस्वरूपात व्हावे (कर्त्याला स्वयंब्रह्मत्व यावे) ह्या उद्देशाने अंती ” सत् ” म्हणजे त्रिकालाबाध्यत्व म्हणजेच नित्यत्व व एकत्व दर्शविणाऱ्या शब्दाची योजना देवांनी केली आहे.

English meaning

Therefore, in order that the Brahman which appears to be separate from the doer because of his concept of the doer-ship, should be experienced in the Unity of the Atman, the word "SAT" is used.

378
मूळ

तरी ओंकार तत्कारी । कर्म केले जे ब्रह्मशरीरी । जे प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिले ॥378॥

मराठी अर्थ

तरी ” ॐ तत ” ह्या दोन शब्दांनी आरंभिलेले व ब्रह्मरूप झालेले जे कर्म तेच प्रशस्त (स्तुत्य) होय असे वाखाणिले आहे.

English meaning

The action- which has been tranformed into Brahman by the words OM and TAT, is called "Auspicious" etc. and is praised.

379
मूळ

प्रशस्तकर्मी तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगो ॥379॥

मराठी अर्थ

असे जे प्रशस्त कर्म त्याचे ठिकाण “ सत्” ” शब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तोच आता सांगतो.

English meaning

The word SAT is used for that auspicious or praiseworthly action. Now I shall further explain that word SAT. Please listen.

380
मूळ

तरी सच्छब्दे येणे । आटूनि असताचे नाणे । दाविजे अव्यंगवाणे । सत्तेचे रूप ॥380॥

मराठी अर्थ

तरी ह्या अखेरच्या “ सत शब्दाने जगदादि सर्व असत् पसारा आटून म्हणजे बाध करून (तात्विक दृष्या त्रैकालिक अत्यंताभाव) अव्यंग म्हणजे शुद्ध, चोख, निर्भेळ सत्स्वरूप दर्शविले.

English meaning

By this word 'Sat' the coin of the manifest universe which is the product of ignorance is melted and the real gold of 'SAT' as Brahman becomes evident.

381
मूळ

जे सत् तेचि काळे देशे । होऊ नेणेचि अनारिसे । आपणपा आपण असे । अखंडित ॥381॥

मराठी अर्थ

जी सद्वस्तु ती देशाचे व कलाने बाधित न होता अखंड आपली आपण जशीच्या तशी असते.

English meaning

This reality which is called 'SAT' does not change by time and space; and is as it is, eternally without a break.

382
मूळ

हे दिसते जेतुले आहे । ते असतपणे जे नोहे । देखता रूपी सोये । लाभे जयाची ॥382॥

मराठी अर्थ

हे जेवढे म्हणून दृश्य आहे ते सर्वे असत् आहे म्हणून त्यासारखी जी सद्वस्तु नाही तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा अपरोक्षत्व म्हणजे आत्मदर्शनच होय.

English meaning

Now, this apparent world being impermanent, is not having any place in that SAT, and that SAT can be recognized only by realization of Atman.

383
मूळ

तेणेसी प्रशस्त ते कर्म । जे जाले सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधे ॥383॥

मराठी अर्थ

त्या सत् शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारे जे प्रशस्त कर्म ते करूनही ऐक्यबोधदृष्टीने त्याजबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टि असावी.

English meaning

The action which is made auspicious by the SAT principle, becomes united with Brahman and by the self knowledge of unity, it is perceived everywhere as Brahman only.

384
मूळ

तरी ओंकार तत्कारे । जे कर्म दाविले ब्रह्माकारे । ते गिळूनि होईजे एकसरे । सन्मात्रचि ॥384॥

मराठी अर्थ

म्हणजे, ॐ कार व तत् ह्या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितलेले जे कर्म, त्याजविषयींही सन्मात्र ब्रह्मत्वदृष्टीच्या उदयाने कर्मत्वदृष्टि हारपून जावी (त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टि उगवावी)

English meaning

Thus by OM and TAT, the action becomes one with Brahman and being meged, remains simply and wholly as SAT only.

385
मूळ

ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणे हो ॥385॥

मराठी अर्थ

अखेरच्या सत् शब्दाचा अंतस्थ हेतु असा आहे, असे भगवान् श्रीरंगच म्हणतात; मी सांगतो असे समजू नका हो.

English meaning

So one should take into consideration the inner utilization of the word 'SAT' - so said the Lord Shriranga! (Dnyanadev says- This is not my invention. It is what the Lord said.)

386
मूळ

ना मीचि जरी हो म्हणे । तरी श्रीरंगी दुजे हेचि उणे । म्हणौनि हे बोलणे । देवाचेचि ॥386॥

मराठी अर्थ

कारण, “ देव म्हणतात व मीही तसेच म्हणतो ” असे म्हणणे म्हणजे श्रीरंग आणि मी असे द्वैत उत्पन्न करणे होय, म्हणून हे सर्व भाषण देवांचेच होय. (यात मी आलोंच)

English meaning

He further says- "But if I say so, there is the error of thinking that the Lord has some duality in Him. Therefore, one should decidedly take this opinion to be of the Lord Himself.

387
मूळ

आता आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारी । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥387॥

मराठी अर्थ

आता आणखी एक प्रकाराने, हा सत् शब्द सात्विक कर्मात कसा कामाला येतो तेही ऐक.

English meaning

The Lord said- "Now listen to one other way in which this word 'SAT' is utilized, as helpful to Sattwic action."

388
मूळ

तरी सत्कर्मे चांगे । चालिली अधिकारबगे । परी एकाधे का आंगे । हिणावती जै ॥388॥

मराठी अर्थ

तरी सत्कर्मे यथाविधि व यथाधिकार उत्तम रीतीने चालू असता कदाचित् एखाद्या गोष्टीचे त्यात वैगुण्य उत्पन्न झाले,

English meaning

When good actions are being done by men according to their own standards and capacities, sometimes there appear some defects in them.

389
मूळ

तै उणे एके अवयवे । शरीर ठाके आघवे । का अंगहीन भांडावे । रथाची गती ॥389॥

मराठी अर्थ

एखाद्या अवयवाच्या व्यंगतेमुळे जसे सर्वं शरीर पंगु होते किंवा रथाच्या एखाद्या अंगाच्या उणीवेने जसा त्याच्या गतीला प्रतिबंध होतो.

English meaning

Then just as, when some limb of a body is defective, the body does not function normally or just as a chariot without wheels does not run.

390
मूळ

तैसे एकेचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥390॥

मराठी अर्थ

तसे, सत्कर्मच खरे; पण एखाद्या गुणाने विकल झाले तरी त्याला जेव्हा असतत्व येऊ पहाते.

English meaning

Similarly a good 'SAT' action becomes sometimes defective, due to some lacunae.

391
मूळ

तेव्हा ओंकार तत्कारी । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥391॥

मराठी अर्थ

तेव्हा “कार व तत् कार” ह्यांच्यासहवर्तमान उच्चारलेला सत् हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करितो.

English meaning

In such a case the word 'SAT' helps the two words 'AUM' and 'TAT', in making again that action perfectly auspicious.

392
मूळ

ते असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥392॥

मराठी अर्थ

आणि सत् शब्द हा आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेले ते असंतपण फेडून त्याला सद्भावाला आणितो.

English meaning

It destroys the badness of the action, and then by its own essential power, turns it into a perfect one.

393
मूळ

दिव्यौषध जैसे रोगिया । का सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥393॥

मराठी अर्थ

एखाद्या रोग्याला दिव्यौषधाची जोड व्हावी किंवा पराभूताला सहाय मिळावे, त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो.

English meaning

Just as a good medicine cures a patient of his ailment and makes him again healthy, this 'Sat' removes the defect in the action.

394
मूळ

अथवा काही प्रमादे । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥394॥

मराठी अर्थ

किंवा प्रमादाने कर्म मर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली;

English meaning

Or due to some mistake, action breaks the rules about right way of performance and turns to a wrong path.

395
मूळ

चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरे पडे । राहाटीमाजी न घडे । काइ काइ ? ॥395॥

मराठी अर्थ

नेहमी जाणाराही रस्ता चुकतो, किंवा परीक्षकालाही क्वचित् भ्रम होतो; अहो, ह्या व्यवहारांत कोणती गोष्ट होणार नाही असे निश्चयाने म्हणवेल ?

English meaning

It so happens that those who are walking straight suddenly go the wrong way and sometimes even an expert becomes confused. Thus, what may not happen in the course of events? Anything may happen.

396
मूळ

म्हणौनि तैसी कर्मा । राभस्ये सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवो पाहे जे ॥396॥

मराठी अर्थ

तशी अविचाराने (अवधान न राहून) जर कर्माच्या विधीचे उल्लंघन केले गेले आणि त्याची निषिद्धत्वांत गणना होण्याची पाळी आली;

English meaning

Therefore, when like this, suddenly action becomes bersirk and is then likely to be defamed as wrong action;

397
मूळ

तेथ गा हा सच्छब्दु । येरा दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्माते यया ॥397॥

मराठी अर्थ

अशावेळी दुसऱ्या ॐ व तत् ह्या शब्दांपेक्षां प्रबुद्ध (सावध) असलेला हा सच्छब्द त्याची योजना केल्याने त्या कर्माला साधुता येते.

English meaning

If the word 'SAT' is wisely used, even more so than the words 'AUM' and 'TAT', it gives that action the required purity.

398
मूळ

लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । का मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥398॥

मराठी अर्थ

लोखंडाला परिसाची भेट व्हावी, ओहोळाला गंगेची भेट व्हावी किंवा मृतावर जसा अमृतवर्षाव व्हावा;

English meaning

Like the friction of the magic stone 'Parees' to the iron, or like the meeting of a brook with the sacred Ganges or like the rain of nectar for a dead man;

399
मूळ

पै असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हे असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥399॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अर्जुना, विकल कर्माला ‘सत् ” ह्या शब्दप्रयोगाचा उपयोग होतो; हे असो; अरे, त्याच्या नामाची अशी प्रौढीच आहे.

English meaning

Similarly, O the great warrior Arjuna, the use of the word SAT is purifying to the defective or bad action. Such is the greatness of this word!

400
मूळ

घेऊनि येथिंचे वर्म । जै विचारिसी हे नाम । तै केवळ हेचि ब्रह्म । जाणसी तू ॥400॥

मराठी अर्थ

ह्यांचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असता तुला तेच ब्रह्मरूप आहे असे कळून चुकेल

English meaning

When having taken into consideration the importance of this word as explained, you will regard this word 'SAT', you will know for yourself that this is itself Brahman.

401
मूळ

पाहे पा ॐतत्सत् ऐसे । हे बोलणे तेथ नेतसे । जेथूनि का हे प्रकाशे । दृश्यजात ॥401॥

मराठी अर्थ

अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत ” हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो की जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते.

English meaning

Just see now in short - This uttering the words OM TAT SAT takes you to that supreme state from which all this manifest world receives illumination.

402
मूळ

ते तव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचे हे आंतुवट । व्यंजक नाम ॥402॥

मराठी अर्थ

सर्व विशेषभावरहित जे केवल शुद्ध परब्रह्म त्यांचे ‘ॐ तत्सत्’ हे अखेरच्या खुणेचे वाचक नांव आहे.

English meaning

That supreme state is alone, unbroken pure absolute Brahman and this word, this name is indicative of its inner power.

403
मूळ

परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥403॥

मराठी अर्थ

परंतु, आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसे स्वतःच्याच आधारावर स्थित आहे तसे ॐ तत्सत् नाम व नामी परब्रह्म ही अभेदत्वाने स्वरूपतः स्वाश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत.

English meaning

Just as sky itself is the support for the sky, this name has the support of this name only.

404
मूळ

उदयिला आकाशी । रवीचि रवीते प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥404॥

मराठी अर्थ

आकाशात सूर्योदय झाला हे सूर्यप्रकाशानेच जाणले जाते; तसे हे नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेदरूपाने प्रकाशित आहे.

English meaning

The Sun which rises in the sky illumined by himself and not by any other. Similarly this name itself is the manifest Brahman.

405
मूळ

म्हणौनि त्र्यक्षर हे नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागी कर्म । जे जे कीजे ॥405॥

मराठी अर्थ

म्हणून ॐ तत्सत् हे तीन अक्षरी नाम नांव नसून शुद्ध ब्रह्मच होय, म्हणून जे जे कर्म करिशील,

English meaning

This name should not be simply taken to be of three letters, but should be considered as Brahman. Thus, whatever is done for this purpose;

406
मूळ

ते याग अथवा दाने । तपादिकेंही गहने । तिये निफजतु का न्यूने । होऊनि ठातु ॥406॥

मराठी अर्थ

ते यज्ञकर्म असो, दान असो, अथवा तपादिकासारखे गहन कर्म असो; व ही सर्व कर्मे यथाविधि पार पडोत किंवा विकल होवोत.

English meaning

Whatever it be as sacrifice, charity or penance and may it be finalized or remain incomplete

407
मूळ

परी परीसाचा वरकली । नाही चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मी अर्पिता केली । ब्रह्मचि होती ॥407॥

मराठी अर्थ

परंतु परिसाच्या स्पर्शाने जे लोह सुवर्णत्व पावते त्या सोन्यात चांगलावाईटपणा कसून पाहाण्याचे कारण नसते, त्याप्रमाणे ॐ तत्सत् मंत्राणे ब्रह्मार्पण केलेली कर्मे ब्रह्मरूपच होतात.

English meaning

All of these become one with Brahman, just as by the touch of 'Parees', gold is always made pure, there is no gold of lesser mark.

408
मूळ

उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारी । निवडू न येती सागरी । जैसिया नदी ॥408॥

मराठी अर्थ

लक्ष्यात असावे की, त्या कर्मात उणे पुरे असे काही राहातच नाही. उदा. नद्या एकदां समुद्रास मिळाल्यावर जसा त्यांचा चांगलेवाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा नसतो.

English meaning

Just as rivers once merged into sea cannot be separately recognized, similarly in this action which is surrendered into Brahman there is no defect whatsoever.

409
मूळ

एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥409॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हे बुद्धिमंत पार्था, ब्रह्मनामाच्या अंगी असलेली शक्ति तुला दृष्टांतपूर्वक सांगितली.

English meaning

Thus, O the wise Arjuna, I have explained to you the power and the nature of this name of Brahman

410
मूळ

आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलो रीती ॥410॥

मराठी अर्थ

आणि त्र्यक्षरी मंत्रांतील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळयास्थली कसा विनियोग करावा ती रीतही सांगितली.

English meaning

And, O the brave warrior, I have also told you the hidden significance of each term contained in it.

411
मूळ

एवं ऐसे सुमहिम । म्हणौनि हे ब्रह्मनाम । आता जाणितले की सुवर्म । राया तुवा ? ॥411॥

मराठी अर्थ

अर्जुना, तुझ्या आता वर्म ध्यानात आले असेल की, अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध जी वस्तु, त्याला बृहत् (मोठे) ह्या धातूच्या अर्थानुसार “ ब्रह्म ” हे नांव प्राप्त झाले.

English meaning

Such is the significance of this name which indicates Brahman. My dear, have you now understood its importance?

412
मूळ

तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचे जाले बंधा । उरो नेदी ॥412॥

मराठी अर्थ

तरी अर्जुना, इतःपर ह्या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म केली असता ती जन्मबंधास कारणीभूत होणार नाहीत. (तू मुक्त होशील)

English meaning

Now, therefore, let your faith in this name be enhanced from today- the name which immediately destroys all bondage.

413
मूळ

जिये कर्मी हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥413॥

मराठी अर्थ

ज्या कर्मामध्ये ह्या मंत्राचा (प्रयोगाचा) यथाविधि विनियोग केला जातो तेथे सर्व वेदाचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय जोडले.

English meaning

When in any action this word 'Sat' is used, it will be tantamount to the performance of Veda recitation with all its facets.

414
मूळ

ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनिया ॥414॥

मराठी अर्थ

नाहीतर, हा मार्ग सोडून, श्रद्धेचा त्याग करून, दुराग्रहाच्या भरी भरून

English meaning

But if disregarding this facility and arrangement, leaving the help of faith aside and increasing the pride of adamant desires,

415
मूळ

मग अश्वमेध कोडी कीजे । रत्ने भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठीही तपिजे । तपसाहस्री ॥415॥

मराठी अर्थ

मग जरी करोडो अश्वमेध केले, रत्नपूर्ण पृथ्वी दान केले, किंवा एका अंगठयावर उभे राहून हजारो वर्षे कैक तपे केली.

English meaning

Crores of horse-sacrifices may be completed, the whole earth full of jewels may be given in charity and austere penances may be gone through for thousands of years, even standing on one toe

416
मूळ

जळाशयाचेनि नांवे । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवे । वृथाचि ते ॥416॥

मराठी अर्थ

किंवा परोपकारार्थं समुद्रासारखे महान तलावादि (जलाशय) बांधिले तरी ते जणू सर्व व्यर्थ होय.

English meaning

Or lakes and water reservoirs may be built as large as sea, but all these actions are simply futile.

417
मूळ

खडकावरी वर्षले । जैसे भस्मी हवन केले । का खेंव दिधले । साउलिये ॥417॥

मराठी अर्थ

खडकावर वृष्टि व्हाव, भस्मांत हवन करावे अथवा सावलीला आलिंगन देण्यास जावे,

English meaning

Just as rainfall on stones, oblations offered not in the fire but in the ashes, or embrace of a shadow,

418
मूळ

नातरी जैसे चडकणा । गगना हाणितले अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥418॥

मराठी अर्थ

किंवा, अर्जुना, आकाशाला ठोसे मारावे त्याप्रमाणे ही सर्व कमे वृथा होतात.

English meaning

Or a slap given to the sky - are all useless, all these activities are in vain, my dear Arjuna!

419
मूळ

घाणा गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसे दरिद्र तेवढे । ठेलेचि आंगी ॥419॥

मराठी अर्थ

घाण्यात पाषाणगोटे घालून गाळू गेले असता जसे तेल किंवा पेड (पेंड) काहीच मिळत नाही; त्याप्रमाणे ह्या कर्माची स्थिति होऊन व्यर्थ श्रम द्रव्यादि हानि मात्र होऊन दरिद्र जोडले जाते

English meaning

We do not get oil if stones are crushed in a pulverizer, nor do we get oil cake. Similarly all these actions become futile and only poverty becomes our lot.

420
मूळ

गाठी बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरी । न सरोनि जैसी मारी । उपवासी गा ॥420॥

मराठी अर्थ

पदरात खापऱ्या बांधून ह्या किंवा अन्य देशात गेले तरी त्यांचा द्रव्य म्हणून कोठेही स्वीकार न होऊन जशी उपाशी मरण्याची पाळी येते.

English meaning

If we take with us a piece of tile thinking that it is a coin, and if we go in the market of the home town or any other town, we will not get anything by selling it, but may die of hunger.

421
मूळ

तैसे कर्मजाते तेणे । नाही ऐहिकीचे भोगणे । तेथ परत्र ते कवणे । अपेक्षावे ॥421॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे त्या सर्वही कर्मापासून ऐहिक भोगप्राप्तीही होणार नाहीं, तर तेथे पारलौकिक भोगांची कोणी आशा करावी ?

English meaning

Similarly by doing any actions like this we will not get any enjoyments in this world nor can we expect anything pleasurable in the other world.

422
मूळ

म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हे असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टी तो ॥422॥

मराठी अर्थ

म्हणून ब्रह्मनामवर श्रद्धा न ठेविता जे जे कर्म करावे ते दुष्टफलाला किंवा अदृष्टफलालाही कारण न होता केवळ शीणमात्र होय.

English meaning

Therefore, if we do anything without faith in Brahman, that is simply an unnecessary trouble, in respect of this or the other world.

423
मूळ

ऐसे कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिले तेणे ॥423॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, पातकरूप हत्तीचा अंतक सिंहरूप, त्रिविध तापरूपी अंधकारनाशक सूर्य, लक्ष्मीचा पति, वीर नरहरी जे भगवान् श्रीकृष्ण त्यांनी कथन केले.

English meaning

Thus said the Lord Shikishna, who is the lion destroying the elephants of sins, the Sun who dissipates the darkness of triple calamities that befall a man in this life, who is the lover of goddess Laxmi, and who is the greatest among the bravest men.

424
मूळ

तेथ निजानंदा बहुवसा- । माजी अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥424॥

मराठी अर्थ

पौणिमेला शुद्ध चांदण्यात चंद्रापेक्षां चांदणेच आकर्षक होऊन, चंद्र जसा काही हरपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या भरतींत अर्जुन हरपल्याप्रमाणे म्हणजे देहभानविवर्जित झाला.

English meaning

At that time, Arjuna was so lost in the blissful state of Atman, as if Moon herself becomes dissolved in her own light!

425
मूळ

अहो संग्रामु हा वाणिया । मापे नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेसी ॥425॥

मराठी अर्थ

अहो ! युद्धप्रसंग ही एक हिशेब घेणारी वाण्याची पेढी आहे. तेथे बाणांच्या अग्रांनी प्राणांतापर्यंत माप घेतेले जाते.

English meaning

Really, the war is like a `groce'! He uses the sharp ends of arrows as measures and fills these measures by flesh and thus does a short work of finishing human life.

426
मूळ

ऐसिया समयी कर्कशे । भोगीजत स्वानंदराज्य कैसे । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाई ॥426॥

मराठी अर्थ

अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसे भोगीत आहे पहा ! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही !

English meaning

And the most wounderful thing is how could Arjuna in such a hard time be able to enjoy the bliss of inner self! Nobody else in the world is so fortunate as Arjuna!

427
मूळ

संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझो ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥427॥

मराठी अर्थ

संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, शत्रुपक्षाचा खरा, पण ह्या अर्जुनाच्या गुणाचे कौतुक वाटते, इतकेच नव्हे तर हा आम्हासही सुख देणारा गुरूच जणु भेटला आहे.

English meaning

Sanjaya said to the king of Kouravas- "By seeing the virtues of this our enemy, great respect arises for him in the mind, and in a sense, he has become a sort of Guru to us who gives us such happiness!

428
मूळ

हा न पुसता हे गोठी । तरी देवो का सोडिते गाठी । तरी कैसेनि आम्हा भेटी । परमार्थेसी ॥428॥

मराठी अर्थ

ह्याने देवांना ह्या गोष्टी विचारल्या नसत्या तर देवांना हे रहस्य सांगण्याचे काय कारण पडले होते ? व मग आमच्यासारख्यांना तरी परमार्थाच्या भेटीचा योग कसा येता ?

English meaning

Had he not asked this question, how could the Lord have revealed the hidden truths? And how could we have been acquainted with the spiritual wisdom?

429
मूळ

होतो अज्ञानाच्या आंधारा । वोसंतीत जन्मवाहरा । तो आत्मप्रकाशमंदिरा- । आंतु आणिले ॥429॥

मराठी अर्थ

अज्ञानांधकारांत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात होतो, त्या मला ह्याने आत्मप्रकाशमंदिरामध्ये आणून सोडले.

English meaning

We were moving aimlessly in the cycle of births and deaths in the darkness of ignorance, when, all of a sudden, he has brought us into the temple of light of self-knowledge.

430
मूळ

एवढा आम्हा तुम्हा थोरु । केला येणे उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वे होय ॥430॥

मराठी अर्थ

तुमच्या आमच्यावर इतका मोठा उपकार अर्जुनाने केला आहे, म्हणून हा जणु श्रीव्यासांचा सहोदरच (बंधु) गुरुरूपाने अवतरलासा वाटतो.

English meaning

What a great obligation has he done to you and me! Really, he seems to be a brother of Vyasa in his role of a Guru.

431
मूळ

तेवीचि संजयो म्हणे चित्ती । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असो ॥431॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे संजयाला मनात असेही वाटले की, राजाला ही अर्जुनाची स्तुति खूपेल म्हणून किती बोलावी ? आता पुरे.

English meaning

After saying so openly, Sanjaya wisely said to himself- "This king will find this praise of Arjuna a bit annoying. It is, therefore, wise not to talk about it.''

432
मूळ

ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थे का पुसिली । श्रीकृष्णाते ॥432॥

मराठी अर्थ

म्हणून हा स्तुतिवाद सोडून, पार्थाने देवांना विचारलेल्या अन्य प्रश्नाकडे संजय वळला.

English meaning

Thus thinking, he stopped his reporting. Afterwards he started to tell about some other things which Arjuna asked the Lord Shrikrishna. Saint Dnyandev said- "I am going to do exactly like Sanjaya now, - so requests Dnyanadeva, the disciple of Nivrutti, which please listen to."

433
मूळ

याचे जैसे का करणे । तैसे मीही करीन बोलणे । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥433॥

मराठी अर्थ

श्रीनिवृत्तिदास ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, अर्जुनाच्या गोड प्रश्नाचे मीही गोड व्याख्यान करितों. श्रवण करावे.

English meaning

Saint Dnyandev said- "I am going to do exactly like Sanjaya now, - so requests Dnyanadeva, the disciple of Nivrutti, which please listen to."