अध्याय 16: दैवासुरसंपद्विभागयोग

Fully populated

Daivasura Sampad Vibhaga Yoga (The Yoga of the Division between the Divine and the Demonic)

Original & Marathi meaning source: सार्थ ज्ञानेश्वरी (Sartha Dnyaneshwari) by Dhananjay Maharaj More — original ovi text and Marathi meaning

English meaning source: Dnyaneshwari, English translation by D. A. Ghaisas

Ovi numbers follow the Sartha Dnyaneshwari (96kulimaratha.com) edition; the chapter's own colophon confirms 473 ovis and 24 Gita shlokas. The Ghaisas English translation uses the same ovi numbering with no gaps or shifts for this chapter.

All 473 ovis are populated and cross-checked between the two sources. This chapter's opening invocatory ovis (1-18ish) use several alternate closing-marker formats not seen before ('॥16a1॥', '॥16 a10॥', '॥16. 7॥') instead of the usual plain '॥N॥'; several other ovis had a short spelling-correction annotation trailing their real closing marker (e.g. '॥120॥ झकऊ', echoing a curly-braced correction earlier in the same line), and a few had no closing danda at all. One marker was misprinted with a dropped leading digit ('152-16' appearing a second time for what its own content confirms is really ovi 452, colliding with the genuine ovi 152), hand-corrected by recovering the real ovi 152 from its own earlier, correctly-labeled occurrence. Sanskrit Gita shlokas are interspersed between ovis and are not counted as separate ovis or included as verse content here.

1
मूळ

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदू आता ॥16a1॥

मराठी अर्थ

महाराज, अध्यायाच्या आरंभी श्रीसद्गुरूचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करितात ते असे. ज्या सूर्याच्या उदयानी, अद्वयकमलिनी विकास पाऊन प्रकट असलेले विश्वदर्शन मावळन जाते, असा विलक्षण प्रकार बडतो; त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो.

English meaning

My Guru who, like the wonderful Sun, has arisen and is making the recognition of mundane universe disappear and is causing the lily of non-duality to blossom! I shall now offer my salutations to him!

2
मूळ

जो अविद्याराती रुसोनिया । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानिया । स्वबोधाचा ॥16a2॥

मराठी अर्थ

ज्याच्या उदयाने अविद्यारूप रात्र संपून ज्ञानाज्ञानरूपाने त्या रात्रींत चमकणाऱ्या चांदिण्या रात्री बरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानीजनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय.

English meaning

This is the Sun who makes the dark night of ignorance dissolve, devours the stars of knowledge as well as ignorance and causes the auspicious day of self-knowledge dawn for men of wisdom.

3
मूळ

जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी ॥16a3॥

मराठी अर्थ

ज्याच्या प्रभातकाळी जीवरूप पक्षांचे आत्मज्ञाननेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धिची घरटी सोडून बाहेर पडतात.

English meaning

When the day dawns by the power of this Sun, he gives the birds of Jeevas the visions of their reality and they leave their nests which are of the identification with their body.

4
मूळ

लिंगदेहकमळाचा । पोटी वेचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥16a4॥

मराठी अर्थ

ज्याच्या उदयानं लिंगदेहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीवचैतन्यरूप भ्रमर मुक्त होतो.

English meaning

This is the Sun by the rising of whom the blue-beetle of spirit caught in the lotus flower of the emotional body, becomes free.

5
मूळ

शब्दाचिया आसकडी । भेद नदीच्या दोही थडी । आरडाते विरहवेडी । बुद्धिबोधु ॥16a5॥

मराठी अर्थ

शास्त्रांतील विरूद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे, अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून, भेदसत्यत्व निश्चय होऊन, तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप (मादी) व बोधरूप (नर) चक्रवाक पक्षांची तटातूट होऊन (बुद्धीला परमात्मज्ञान न होऊन) ते जोडपे विरहदुःखाने ओरडत बसले आहे.

English meaning

This is the Sun by the rising of whom the Chakrawaka couple of intellect and knowledge, which was separated from each other by the crevices of words on both the banks of the river of duality, is joined together by the sky of spirituality being illuminated.

6
मूळ

तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान । भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा ॥16a6॥

मराठी अर्थ

चिदाकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे (जीव व परमात्मा) ह्यांचे ऐक्य होऊन समाधान.

English meaning

This is the Sun by the rising of whom the Chakrawaka couple of intellect and knowledge, which was separated from each other by the crevices of words on both the banks of the river of duality, is joined together by the sky of spirituality being illuminated.

7
मूळ

जेणे पाहालिये पाहाटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥16. 7॥

मराठी अर्थ

ज्या ज्ञानभानूच्या उदयाच्या किंचित् पूर्वीच (पहाटें) भेदरूपो चोर मागल्या पायाने जातात, व योगी जनरुपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करतात.

English meaning

This is such a Sun who by the dawn of his day the dark hours of duality are over and Yogis who travel on the path of liberation, come to the right path of self-realisation.

8
मूळ

जयाचेनि विवेककिरणसंगे । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगे । संसाराची ॥16a8॥

मराठी अर्थ

ज्या ज्ञानसूर्याच्या विचाररूप किरणांच्या योगे वृत्तिज्ञानरूप सूर्यकांतमणि प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकितो.

English meaning

This is such a Sun by whose rays of selective discrimination between right and wrong, there are embers of inspiration caused by the magnifying glass of knowledge and also, the jungles of mundane life are burned.

9
मूळ

जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरी स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ ते ॥16a9॥

मराठी अर्थ

ज्याचा तीव्र किरणसमूहप्रकाश जीवररूपी अज्ञानाच्या माळजमिनीवर स्थिर असतांना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो.

English meaning

This is such a Sun that when his rays become hot and relenteless and incessantly fall on the land of the state of Atman, there is a spate of the mirage of high occult power.

10
मूळ

जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्ही आलिया । लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपा तळी ॥16 a10॥

मराठी अर्थ

जो सूर्य “प्रत्यगात्मबोधरूप ” सोऽहं ” भावाच्या माध्यान्हकाली माथ्यावर आला असता, आत्मस्वरूपविषयक भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते.

English meaning

This is, however, such a Sun who shines in the noon of Brahma- Realisation on the head of the self-knowledge, the illusion which was confusing the Atman earlier, becomes a shadow hidden below his own Being.

11
मूळ

ते वेळी विश्वस्वप्नासहिते । कोण अन्यथामती निद्रेते । सांभाळी नुरेचि जेथे । मायाराती ॥16a11॥

मराठी अर्थ

ज्याच्या उदयाने मूळमायारात्रीचाच नाश होतो, तेथे विपरीत विश्वादि स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञाननिद्रा तिचा कसा पत्ता असणार ?

English meaning

And then as the night of Maya in not at all there, the awareness of the outer world and the sleep of wrong knowledge do not get any place to live.

12
मूळ

म्हणौनि अद्वयबोधपाटणी । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीची घेणी देणी । मंदावो लागती ॥16a12॥

मराठी अर्थ

मग अद्वयबोधरूपी नगरांत सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून, त्यामुळे सुखानुभवाची देवघेवही मंदावू लागते.

English meaning

And as there is the bliss of non-duality prevailing everywhere, there is some slackness in the trade of giving and receiving of the experience of happiness.

13
मूळ

किंबहुना ऐसैसे । मुक्तकैवल्य सुदिवसे । सदा लाहिजे का प्रकाशे । जयाचेनि ॥16a13॥

मराठी अर्थ

किंबहुना, ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ति किंवा कैवल्य ह्या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहीत नाही

English meaning

In short, he is such a sun, by whose light, such a day of complete freedom is eternally enjoyed.

14
मूळ

जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥16a14॥

मराठी अर्थ

जो बोध सूर्य आत्मस्वरूपाकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे; तरीही, अज्ञानप्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटतांच, पूर्वपश्चिमादि सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त ह्याचे नांवही उरू देत नाही.

English meaning

He is the ruler of the sky of self-abode, and when he rises, he dissolves the very phenomenon of rising and setting and the concept of ten directions.

15
मूळ

न दिसणे दिसणेंनसी मावळवी । दोही झाकिले ते सैंघ पालवी । काय बहु बोलो ते आघवी । उखाचि आनी ॥16a15॥

मराठी अर्थ

समजणे व न समजणे हे ज्ञानाज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूपज्ञानाच्या टेक्यावर चालतात, ते यथार्थत्वाने प्रकट झाले असता त्या उषःकालाची काही अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल ?

English meaning

He eliminates the seeing and not seeing i.e. the knowing and not knowing, but reveals that Atmic principle which is so far hidden by those both- such is the strange dawn of this Sun!

16
मूळ

तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणे देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥16a16॥

मराठी अर्थ

रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञानसूर्य तो कोणाच्या ज्ञानाचा होणार ? ज्याच्या स्वरूपप्रकाशपुढे प्रकाश्य असा अन्यपदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे.

English meaning

Who is capable of seeing that Sun of knowledge who is beyond the day and night? He is light eternal, without any object to be illuminated by him.

17
मूळ

तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आता नमो म्हणो पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥16a 7॥

मराठी अर्थ

असे चैतन्यसूर्य जे श्रीनिवृत्तिनाथ महाराज, त्यांना माझे वारंवार नमन असो; त्या अवाङ्मनमनसगोचरस्वरूपाची स्तुति करणे म्हणजे ही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पहाणे होय.

English meaning

I offer my salutions again and again to Nivruttinath, my Guru, who is such a Sun of knowledge, because if I try to praise him by so many words, I come to realize how weak is speech!

18
मूळ

देवाचे महिमान पाहोनिया । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसी लया । जाईजे का ॥16a 18॥

मराठी अर्थ

श्रीगुरूंच्या महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला असता जर स्तवन करणारा स्तव्यबुद्धी सह लयाला जाईल (स्तवन करणारा अद्वैत-भूमिकेवर येईल) तेव्हांच श्रीगुरूची खरी किंवा आवडणारी स्तुति होते.

English meaning

The praise can be worth its name only when the object of praise and the intellect become one, after understanding the greatness of the God in our heart.

19
मूळ

जो सर्वनेणिवा जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । काहीच न होनि आणिजे । आपणपया जो ॥16a19॥

मराठी अर्थ

जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे. त्याच्या स्वरूपवर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुति होय, व अशेषविशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय.

English meaning

O my Guru, you are only to be known when our awarenes of all objects with name and form comes to an end, you can only be experienced in the tight embrace of silence and can only be realized by a soul who has negated himself totally.

20
मूळ

तया तुझिया उद्देशासाठी । पश्यंती मध्यमा पोटी । सूनि परेसीही पाठी । वैखरी विरे ॥16a20॥

मराठी अर्थ

त्या तुमच्या स्वरूपाची स्तुति करू पहाणारी वैखरीवाणी, पश्यंती व मध्यमावाणींच्या पोटांत प्रवेश करून अखेर परावाणी सह लय पावते.

English meaning

In an effort to descirbe your greatness, the speech which is articulated, dissolves itself in the Madhyama and Pashyanti, together with the Para Vani, which is voice of silence.

21
मूळ

तया तूते मी सेवकपणे । लेववी बोलकेया स्तोत्राचे लेणे । हे उपसाहावेही म्हणता उणे । अद्वयानंदा ॥21॥

मराठी अर्थ

हे अद्वयानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे, सेवकभावाने मी केलेले स्तुतिस्तोत्र रूप भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणंही वस्तुतः न शोभणारे आहे.

English meaning

To say that you may please tolerate and consider good my effort to praise you in a prayer composed of words, by conceiving myself as your servant, is to bring at a lower level the bliss which is in the non- duality.

22
मूळ

परी रंके अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करू धावे पाहुणेरु । शाकाचा तया ॥22॥

मराठी अर्थ

एकाद्या दरिद्रयाने, अमृतसिंधु पाहुण आलेला पाहून, आपण काय करीत आहो त्याच्या औचित्याचे भान न राहून जसा त्याला भाजीपाल्यांचा पाहुणचार केला असता.

English meaning

But suppose a poor man sees the ocean of nectar, he becomes confused and forgetting the propriety or otherwise of his actions, he offers ordinary vegetables as a welcome to the ocean.

23
मूळ

तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥23॥

मराठी अर्थ

त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाकपाहुणचारही मोठा म्हणावा लागतो, किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळिले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य होय.

English meaning

And as it is proper to kindly consider the great respect, which he has and to accept that humble offering with benevolent kindness, I request you to please accept the little wick lighted by me by your own radiant light.

24
मूळ

बाळा उचित जाणणे होये । तरी बाळपणचि के आहे ? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥24॥

मराठी अर्थ

बालवयात उचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय ! म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक मानून संतोष पावते.

English meaning

If at all a little child would know what is right and what is wrong, where is his childhood? But the kind-hearted mother always becomes pleased by its inarticulated words.

25
मूळ

हा गा गावरसे भरले । पाणी पाठी पाय देत आले । ते गंगा काय म्हणितले । परते सर ? ॥25॥

मराठी अर्थ

अहो; गावचा ओढा गावातील घाणीसह गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असे का गंगा त्याला म्हणेल ?

English meaning

If the water from storm water drains comes with all force towards the river Ganges, does the Ganges reject it and says "Go back! Don't touch"?

26
मूळ

जी भृगूचा कैसा अपकारु । की तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासी ? ॥26॥

मराठी अर्थ

पाहू गेले तर, भृगूने केवढा अपराध केला ? पण त्याने केलेला लत्ताप्रहार हा गुरुप्रसादच समजून, भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसादचिन्ह म्हणून हृदयावर धारण केले.

English meaning

Sir, see what a great insult was done by the sage Bhrugu, but his kick was considered by the God Narayana as a great boon and he respectfully bears its mark on his own chest.

27
मूळ

की आंधारे खतेले अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणे तयाते पऱ्हा सर । म्हणितले काई ? ॥27॥

मराठी अर्थ

किंवा अंधकाराने गच्च भरलेले व्योम सूर्यासमोर आले असता, त्याने, तू असे मजसमोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय ?

English meaning

Or if the sky full of very dense darkness, dares to come forward in front of the Sun, does the Sun ask it to go away?

28
मूळ

तेवी भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचे काटाळे । तुकिलासि ते येकी वेळे । उपसाहिजो जी ॥28॥

मराठी अर्थ

तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुला करु गेलो त्याची श्रीगुरो, मला क्षमा असावी.

English meaning

Therefore if I, on rare occasions use the scales of the image of Sun, which is hung from the beam of duality to appreciate your greatness by comparison, it may kindly be connived at.

29
मूळ

जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी । वेदादि वाचा वानिलासी । जे उपसाहिले तयासी । ते आम्हाही करी ॥29॥

मराठी अर्थ

(तू ध्यानाचा विषय नसतां) ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदांदिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन केले, तीच दृष्टि माझ्याबद्दलही असावी.

English meaning

I only request that you should forgive me in the same manner as you have forgiven those who have tried to see you by the eyes of meditation and the Vedas, who have tried to describe you in words.

30
मूळ

परी मी आजि तुझ्या गुणी । लांचावलो अपराधु न गणी । भलते करी परी अर्धधणी । नुठी कदा ॥30॥

मराठी अर्थ

परंतु, तुमचे अखंड गुणगान करावे ह्याची मला अत्यंत हौस वाटते किंवा ही मला खोडच लागली आहे; म्हणून, तो अपराध असे गणू नये; आपण काय वाटेल ते करा; मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावाचून येथून हालणार नाही.

English meaning

Sir, I have become addicted to praise you. Please do not consider this as my crime. But one thing I wish to mention most respectfully; that you may do anything but I am not stopping this praise until I am satisfied.

31
मूळ

मिया गीता येणे नांवे । तुझे पसायामृत सुहावे । वानू लाधलो ते दुणेन थावे । दैवलो दैवे ॥31॥

मराठी अर्थ

मी, गीतानामक आपले प्रसादामृत सेवू लागलो तों, मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले.

English meaning

Sir, as soon as I started to eagerly describe your nectar of a bliss called Geeta, I have become doubly strong by my great fortune.

32
मूळ

माझिया सत्यवादाचे तप । वाचा केले बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातली प्रभु ॥32॥

मराठी अर्थ

हे प्रभो, मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला सत्यभाषणाचे तपाचरण घडले आहे. त्याचेच फल म्हणून मला ह्या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे.

English meaning

My speech had observed the practice of speaking the truth for many many Kalpas and O the Great Teacher! It has attained this benevolent state, as the supreme fruit of that penance.

33
मूळ

पुण्ये पोशिली असाधरणे । तिये तुझे गुण वानणे । देऊनि मज उत्तीर्णे । जाली आजी ॥33॥

मराठी अर्थ

मी आजवर असामान्य पुण्याई संपादन केली त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे.

English meaning

I have had done many meritorious acts in the past and that is why I had the right inclination to praise your virtuous greatenes and it has paid me back so nicely.

34
मूळ

जी जीवित्वाच्या आडवी । आतुडलो होतो मरणगावी । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥34॥

मराठी अर्थ

देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यात गुंतून जन्ममृत्युच्या कचाट्यात आड्कलो होतो, ती माझी अवदशा, माझी जीवदशाच आज संपल्यामुळे, सर्व नष्ट झाली आहे.

English meaning

I was entangled in the forest of the false concept of Jeeva, and was held bound in the town of Death, but today the whole bad condition is over.

35
मूळ

जे गीता येणे नांवे नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हाजोगी । वानावया जाली ॥35॥

मराठी अर्थ

जी गीता ह्या नांवाने ख्यातनाम्नी (प्रसिद्ध) असून अविवेचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करणच योग्य होय.

English meaning

I say this because I have got the fortune to praise your fame which has been well known as Geeta, which detroys the heaviest appearance of the unreal universe.

36
मूळ

पै निर्धना घरी वानिवसे । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयाते निर्धन ऐसे । म्हणो ये काई ? ॥36

मराठी अर्थ

कल्पना करा, की दरिद्रयाच्या घरी महालक्षमीने एकाएक प्रवेश केला तरीही त्याला मग दरिद्री म्हणता येईल काय ?

English meaning

Just see this. Can we call a man penniless pauper in whose house the Goddess of Prosperity, Mahalaxmi, comes of her own accord, to stay happily?

37
मूळ

का अंधकाराचिया ठाया । दैवे सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥37॥

मराठी अर्थ

किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थली दैववशात् सूर्य पातला, तर तो अंधकारच ह्या जगाला प्रकाशरूप होत नाही काय ?

English meaning

And if by luck, the Sun comes to stay in the house of the darkness, can we not say that this darkness is itself the light of the world?

38
मूळ

जया देवाची पाहता थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥38॥

मराठी अर्थ

ज्या परमात्मस्वरूपाचे महिमान पाहू गेले असता विश्वाला परमाणुइतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाही तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही ? अगर होणार नाही ?

English meaning

Does not the God in comparison of whose greatness the whole universe is only a speck of dust, comes within the grasp of a devotional yearning?

39
मूळ

तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थे तुवा शिरयाणी । फेडिली ते ॥39॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे मी टीका व्याख्यान करावे, ही वस्तुतः आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट होय; परंतु आपणा समर्थाच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली.

English meaning

Similarly, my writing in praise of Geeta by my commentary is as impossible as enjoying the fragrance of the flower of the sky; but you being the most powerful Guru, have fulfilled even that aspiration of mine!

40
मूळ

म्हणौनि तुझेनि प्रसादे । मी गीतापद्ये अगाधे । निरूपीन जी विशदे । ज्ञानदेवो म्हणे ॥40॥

मराठी अर्थ

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल आर्थाप्रमाणे विवरण करीन.

English meaning

Therefore, by your grace, I shall explain lucidly the deep meaning of the verses of the Geeta- so says Dnyanadeva.

41
मूळ

तरी अध्यायी पंधरावा । श्रीकृष्णे तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥41॥

मराठी अर्थ

देवांनी, पंधराव्या अध्यायात अर्जुनाला सकलशास्त्र-सिद्धांत कथन केला आहे.

English meaning

Now, let us recapitualate. In the fifteenth chapter, the Lord Shrikrishna has explained for Arjuna the whole doctrine. (about the structure of the universe, the Jeeva and the Supreme Person)

42
मूळ

जे वृक्षरूपक परीभाषा । केले उपाधि रूप अशेषा । सद्वैद्ये जैसे दोषा । अंगलीना ॥42॥

मराठी अर्थ

उत्तम वैद्याने अंगांत मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी त्याप्रमाणे ब्रह्म बस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादि अनिर्वचनीय माया ह्या उपाधीच्या संबंधाने, ही त्रैलोक्यरचना कीशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले.

English meaning

He has used the figurative language of the image of a tree and described the essence of the universe, just like an expert doctor diagnosing a disease hidden in a body.

43
मूळ

आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणे उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥43॥

मराठी अर्थ

आणि कूटस्थ (मायारूप उपाधि ज्याला आहे असा) अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहितचैतन्याचेही वर्णन केले.

English meaning

He has also described in clear phrases the imperishable universal person, by whose being subjected to attributes, the spirit becomes en- formed.

44
मूळ

पाठी उत्तम पुरुष । शब्दाचे करूनि मिष । दाविले चोख । आत्मतत्त्व ॥44॥

मराठी अर्थ

नतर उत्तमपुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्ताने केवल शुद्ध जे आत्मतत्त्व (ब्रह्म) त्याचे स्पष्टीकरण केले

English meaning

Then by taking the support of words, he has described the Supreme Person and shown the principle of Atman in very clear terms.

45
मूळ

आत्मविषयी आंतुवट । साधन जे आंगदट । ज्ञान हेही स्पष्ट । चावळला ॥45॥

मराठी अर्थ

व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान याचेही कथन केले.

English meaning

Then he also said that knowledge is the only means of attaining the state of self-realization.

46
मूळ

म्हणौनि इये अध्यायी । निरूप्य नुरेचि काही । आता गुरुशिष्या दोही । स्नेहो लाहणा ॥46॥

मराठी अर्थ

म्हणून ह्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही, परंतु गुरुशिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू.

English meaning

Therefore, in this chapter there is nothing more to be explained and what remains in only the divine love beteen the teacher and the disciple.

47
मूळ

एवं इयेविषयी कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥47॥

मराठी अर्थ

याप्रमाणे पंधराव्या अध्यायाने अनेक बुद्धिमंताची योग्य समज पडली तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही.

English meaning

In short, the intelligent seekers are well satisfied about this subject, but there are other seekers of the state of self-realization, who are still hoping to be enlightened.

48
मूळ

त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञाने भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥48॥

मराठी अर्थ

असा जो मी “पुरुषोत्तम ” त्या माझे वर्म जाणून जो ज्ञानद्वारा मल भेटतो (मद्रूप होतो) तोच सर्वज्ञ होय व त्याची मजविषयींची भक्ति हीच सीमेची (कडेची) भक्ति होय.

English meaning

"That devotee who meets me through knowledge is the real devotee who knows the Supreme Person."

49
मूळ

ऐसे हे त्रैलोक्यनायके । बोलिले अध्यायात श्लोके । तेथे ज्ञानचि बहुतेके । वानिले तोषे ॥49॥

मराठी अर्थ

असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटी संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायःज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे.

English meaning

This is what the Lord has said in effect, in the last verse of the fifteenth chapter, and has explained the importance of knowledge in various ways.

50
मूळ

भरूनि प्रपंचाचा घोटु । कीजे देखताचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यी पाटु । बांधिजे जीवा ॥50॥

मराठी अर्थ

प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होतांच, द्रष्टयाला दृश्यही आत्मस्वरूपाने दिसू लागते (सर्वात्मभाव होतो) व त्यायोगे जीवाला ब्रह्मात्मभाव येऊन तो आनंदसाम्राज्याचा स्वामी होतो.

English meaning

Thus Lord Shrikrishna who is the last word in regard to pure knowledge, has said that there is no other path effective enough as the path of knowledge which makes a man capable of destroying all the attachment with the mundane life and he as observer being himself merged into the Brahman- the 'observed', and the Jeeva becoming the emperor of the empire of the bliss of Brahman.

51
मूळ

येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहीचि म्हणे देवो । हा सम्यक्‌ज्ञानाचा रावो । उपायांमाजी ॥51॥

मराठी अर्थ

ब्रह्मप्राप्तीला इतके बलवत्तर दुसरे साधनच नाही; सर्व उपायांमध्ये सम्यक् ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले.

English meaning

Thus Lord Shrikrishna who is the last word in regard to pure knowledge, has said that there is no other path effective enough as the path of knowledge which makes a man capable of destroying all the attachment with the mundane life and he as observer being himself merged into the Brahman- the 'observed', and the Jeeva becoming the emperor of the empire of the bliss of Brahman.

52
मूळ

ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिही तोषलेनि चित्ते । आदरे तया ज्ञानाते । वोवाळिले जीवे ॥52॥

मराठी अर्थ

इतक्या अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते, त्यांनी संतुष्टचित्त होऊन, त्या ज्ञानोपायावरून आपले प्राण ओवाळन टाकिले.

English meaning

Those who had that devout faith in the knowledge and keen interest to acquire that knowledge, were completely satisfied in their hearts and as if offered as an oblation their very self-hood as Jeeva, for that knowledge.

53
मूळ

आता आवडी जेथ पडे । तयाचि अवसरी पुढे पुढे । रिगो लागे हे घडे । प्रेम ऐसे ॥53॥

मराठी अर्थ

ज्याला ज्या विषयाची अत्यंत आवड असते, त्याची त्या विषयात पुढे पुढे गति असते हे प्रेमाचे लक्षणच आहे.

English meaning

Now, love is that state of mind which goes on increasingly involved in the subject in which it has deep interest.

54
मूळ

म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकी । ज्ञानी प्रतीती होय ना जव निकी । तव योग क्षेमु ज्ञानविखी । स्फुरेलचि की ॥54॥

मराठी अर्थ

व प्राप्त झाले असता कसे टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार.

English meaning

Therefore, it is quite natural for those people among the inquisitive, who have not got this experience of the love, to feel eager to attain knowledge and be anxious to maintain that state of knowledge ever afterwards.

55
मूळ

म्हणौनि तेचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्‌न । घडेल केवी ॥55॥

मराठी अर्थ

म्हणून ते सम्यक् ज्ञान कसे हस्तगत (अपरोक्षत्वाने) होईल व झाल्यास त्याच्या वृद्धीचा यत्न कोणता करावा.

English meaning

So, their anxiety is about how that pure knowledge can be attained and how it will go on increasing when once it is gained.

56
मूळ

का उपजोचि जे न लाहे । जे उपजलेही अव्हांटा सूये । ते ज्ञानी विरुद्ध काय आहे । हे जाणावे की ॥56॥

मराठी अर्थ

किंवा, ज्या कारणास्तव मे ज्ञान उत्पन्नच न व्हावे, अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावे, अशी ज्ञानाला प्रतिबंधक कोणती गोष्ट आहे ते कळावे.

English meaning

Or, they have also to think as to why they are not obtaining that knowledge, and what force is there against it, which may mislead the seeker to wrong paths.

57
मूळ

मग जाणतया जे विरू । तयाची वाट वाहती करू । ज्ञाना हित तेचि विचारू । सर्वभावे ॥57॥

मराठी अर्थ

म्हणजे त्यायोगे तो ज्ञानाला विघ्न करणारा मार्ग सोडून देऊन, त्याला हितकर असेल त्याच मार्गाचा सर्वभावे आदर करू

English meaning

Then they think of avoiding anything that is against knowledge and doing everything with one-pointed attention that which will be helpful in increasing the knowledge.

58
मूळ

ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्ही समस्ती । भावो जो धरिला असे चित्ती । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥58॥

मराठी अर्थ

तुम्हा सर्व जिज्ञासूंच्या मनात हे कळावे असा जो भाव आहे तो पुरविण्यासाठी लक्ष्मीपति भगवान् पुढे सांगतील.

English meaning

You, the listeners, must be having this kind of wish in your mind and now the Lord is going to talk in such a way that this wish will be fulfilled.

59
मूळ

ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥59॥

मराठी अर्थ

जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी, त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आता करितील.

English meaning

Now the glory of that divine virtue which is the real riches, will be sung by the Lord of glory which gives fourth knowledge and brings in real peace.

60
मूळ

आणि ज्ञानाचेनि कामाकारे । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥60॥

मराठी अर्थ

आणि ज्ञानप्राप्तीच्या मिषाने रागद्वेषांदिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ति तिचेही देव वर्णन करितील.

English meaning

So also, there will be description of the evil quality of the mind, by which quality the likes and dislikes become very powerful in the creation; and that description is going to be fearsome.

61
मूळ

सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायी उभारणी । केली होती ॥61॥

मराठी अर्थ

ह्या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात, हे सांगण्याचा उपक्रम नवव्या अध्यायात केला होता.

English meaning

In the ninth chapter this subject was cursorily touched while considering the good and bad deeds, etc.

62
मूळ

तेथ साउमा घेयावया उवावो । तव वोडवला आन प्रस्तावो । तरी तया प्रसंगे आता देवो । निरूपीत असे ॥62॥

मराठी अर्थ

तेथे त्यांचा समग्र विचार करावयाचा होता, पण दुसराच प्रसंग (विषय) पुढे येऊन ते तसेच राहिले, म्हणून देव आता त्या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करितील.

English meaning

And it was proper to dwell upon this subject more precisely but some other subjects being more imperative, it was left unattended in that chapter. Therefore the Lord is explaning it further now.

63
मूळ

तया निरूपणाचेनि नांवे । अध्याय पद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिलावरी ॥63॥

मराठी अर्थ

अध्यायाच्या अनुक्रमाने पहाता हे निरूपण सोळाव्यात पडते हे खरे; पण तो मागील विषयाचाच विस्तार होय.

English meaning

This sixteenth chapter should, therefore, be taken as a continuum of that part; as a supplement.

64
मूळ

परी हे असो आता प्रस्तुती । ज्ञानाच्या हिताहिती । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥64॥

मराठी अर्थ

पण हे आता असो; ज्ञानाला हितकारिणी व अहितकारिणी अशा ह्या दोनच संपत्ति समर्थ आहेत.

English meaning

In fine, let us turn to the consideration that these two kinds of glories, the divine and the demonic, are responsible to turn knowledge either to be desirable or undesirable.

65
मूळ

जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । ते आधी तव दैवी । संपत्ती ऐका ॥65॥

मराठी अर्थ

जी मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोहांधकारांतून प्रवास करतांना दिव्याप्रमाणे वाट दाखविणारी, ती दैवी संपत्ति प्रथम श्रवण करा.

English meaning

First you may please listen to the description of the glory of divine virtues which is a guide to the seekers of liberation and is like a lamp which dissipates the darkness of the night of confusion.

66
मूळ

जेथ एक एकाते पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकी । संपादिजती ते लोकी । संपत्ति म्हणिजे ॥66॥

मराठी अर्थ

जेथे एक पदार्थ दुसऱ्याला पोषक असतो असे अनेक पदार्थ एकत्र जमले म्हणजे त्याला संपत्ति असे म्हणतात.

English meaning

The "riches" is the word used in the common life, for the process by which things are added one to the other to make a good collection.

67
मूळ

ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणे येकोपजीवी । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥67॥

मराठी अर्थ

दैवयोगाने, अशी सुखप्राप्ति करून देणारी साधने एकत्र झाली म्हणजे ती दैवी संपत्ति होय.

English meaning

The riches of virtue is called divine riches because it gives happiness and one can get it only by divine blessing or good luck.

68
मूळ

आता तयाचि दैवगुणा- । माजी धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसे ॥68॥

मराठी अर्थ

आता ह्या दैवी संपत्तीमध्ये ज्याला प्रमुखस्थान लाधले आहे त्याला ‘अभय ” अशी संज्ञा आहे.

English meaning

Fearlessness is the most prominent and leading virtue of all the divine virtues.

69
मूळ

तरी न घालूनि महापुरी । न घेपे बुडणयाची शियारी । का रोगु न गणिजे घरी । पथ्याचिया ॥69॥

मराठी अर्थ

जो महापुरांत उडी घेत नाही त्याला जसे बुडण्याचे भय नसते, किंवा जो नित्य पथ्य पाळितो त्याला रोग जसा गांठीत नाही.

English meaning

Just as he who does not jump into a flood, has no fear of being drowned, or just as no disease can attack a person who follows strict regimen;

70
मूळ

तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठू नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणे येणे ॥70॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे कर्म करणे अगर न करणे ह्यांविषयी जो अत:करनात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे कारण नाही.

English meaning

Similarly, the quality by which a man drops all fear of worldly involvement by not allowing pride to raise its head in the performance of right action or not doing wrong actions.

71
मूळ

अथवा ऐक्यभावाचेनि पैसे । दुजे मानूनि आत्मा ऐसे । भयवार्ता देशे । दवडणे जे ॥71॥

मराठी अर्थ

अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशाप्रकारे विस्तारला आहे की जे काही दिसेल ते आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाही.

English meaning

Or, the quality by which a man banishes the feeling of fear because his sense of total unity with the world has become fully effective;

72
मूळ

पाणी बुड{ऊ} ये मिठाते । तव मीठचि पाणी आते । तेवी आपण जालेनि अद्वैते । नाशे भय ॥72॥

मराठी अर्थ

पाणी मिठाला बुडवू लागले तर, मीठच जलरूप होते, त्याप्रमाणे सर्वत्र अद्वैतभावना झाल्यावर (म्हणजे भय कारण जे द्वितीयत्व हे नाहीसे झाल्यावर) भयाला अवसरच कसा असणार ? (ते नष्टच होते)

English meaning

The fear totally disappears, just as salt when water tries to sink it, becomes itself one with the water,- because he dwells in complete non-duality.

73
मूळ

अगा अभय येणे नांवे । बोलिजे ते हे जाणावे । सम्यक्‌ज्ञानाचे आघवे । धावणे हे ॥73॥

मराठी अर्थ

अरे, अभय असे म्हणतात ते ह्याप्रकारे जाणावे; सम्यक् ज्ञानाशिवाय ते साध्य होत नाही.

English meaning

This should be known as the virtue of fearlessness, which is the function of right knowledge.

74
मूळ

आता सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्ही जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥74॥

मराठी अर्थ

आता ज्याला सत्वशुद्धि म्हणतात ती ह्या चिन्हांवरून ओळखावी; जशी राखोंडी जळतही नाही किंवा विझविणेचेही कारण नसते.

English meaning

Now the purity of consciousness should be known by the signs as follow. The ash does not burn nor does it get extinguished.

75
मूळ

का पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजी अतिसूक्ष्म अंगे । चंद्रु जैसा राहे ॥75॥

मराठी अर्थ

किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ति झाली व पाडव्याच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितीत चंद्राचे जसे अतिसूक्ष्मरूप असते.

English meaning

Like the Moon who is not affected by the increasing phases from the first day of the lunar month or not decreased by the last night of the lunar month, but she is actually constant in her own existence;

76
मूळ

नातरी वार्षिया नाही मांडिली । ग्रीष्मे नाही सांडिली । माजी निजरूपे निवडली । गंगा जैसी ॥76॥

मराठी अर्थ

किंवा, वर्षाऋतु संपून गेला आहे व ग्रीष्मऋतूस आरंभ नाही ह्या मधल्या कालांत गंगा जशी स्वत:च्या नित्यशुद्ध स्वरूपाने असते.

English meaning

Like the Ganges which does not overflow in the rainy season nor becomes dry in the summer, but has a continuous medium flow.

77
मूळ

तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगिता निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥77॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, संकल्प व विकल्प ह्यांची ओढ व रज, तम, गुण, ह्यांची वस्ती ज्या बुद्धींतून । पार नाहीशी होऊन जिला निजधर्माची म्हणजे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे.

English meaning

When the intellect drops the two qualities of Rajas and Tamas, which are like a pair of scales causing imbalance and when it is completely fixed in the performance of the ordained duties only with faith and love;

78
मूळ

इंद्रियवर्गी दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो काही केलिया । नुठी चित्ती ॥78॥

मराठी अर्थ

इष्ट अगर अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रियवर्गाने दर्शन करविले तरी ज्याचे चित्त चलित होत नाही.

English meaning

When the mind neither becomes elated nor depression affects it, either by pleasurable or uncomfortable sensations brought to it by the sense-organs;

79
मूळ

गावा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनी जेवी ॥79॥

मराठी अर्थ

पतीच्या परदेश गमनामुळे विरहदुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रापंचिक इतर लहानमोठी हानि मनावरही घेत नाही.

English meaning

And just as the faithful and devoted wife of a husband who has gone away to another town, does not relish any pleasure in anything else; or care for any loss; but remains apathetic towards everything.

80
मूळ

तेवी सत्स्वरूप रुचलेपणे । बुद्धी जे ऐसे अनन्य होणे । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥80॥

मराठी अर्थ

तशी सत्वरूपाची आवड उत्पन्न जी बुद्धि त्या ठिकाण (सत्स्वरूपी) अनन्य होते तिला सत्वशुद्धि असे म्हणावे असे केशी दैत्यहन्त्या भगवंतांनी सांगितले.

English meaning

Or when the intellect is really enjoying the bliss in its Reality, and so there is full merger of it in the Reality, that state is the virtue called purity of consciousness, by the Lord Shrikrishna, who is the slayer of the demon Keshi.

81
मूळ

आता आत्मलाभाविखी । ज्ञानयोगामाजी एकी । जे आपुलिया ठाकी । हावे भरे ॥81॥

मराठी अर्थ

आता, आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग ह्या दोन साधनांपैकी आपली बुद्धि ज्यावर स्थिर होईल.

English meaning

And the steadiness of the intellect in its abiding love for self- knowledge;

82
मूळ

तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणे या रीती । निष्कामे पूर्णाहुती । हुताशी जैसी ॥82॥

मराठी अर्थ

निष्काम यज्ञकर्म करणाराने अग्नीमध्ये जशी पूर्णाहुति द्यावी त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तीचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणी लय करावा.

English meaning

Thus to relinquish all the desires or tendencies of the mind in the state of the merger of one's selfishness, is called "the Yoga of knowledge fully achieved." The seeker should offer as an oblation, the final sacrifice of his very being, by banishing all desires.

83
मूळ

का सुकुळीने आपुली । आत्मजा सत्कुळीचि दिधली । हे असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदी जैसी ॥83॥

मराठी अर्थ

किंवा कुलीन गृहस्थाने सत्कुलांत अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुळात अनन्य होते अथवा लक्ष्मी जशी श्रीमुकुंदचरण अनन्य आहे.

English meaning

This is like a daughter of a noble person given in marriage to bridegroom who is also from a noble family; or like the goddess Laxmi (Riches) staying permanently with the Lord Mukunda, (Vishnu).

84
मूळ

तैसे निर्विकल्पपणे । जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥84॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे, योग अथवा ज्ञान ह्यापैकी एका विषयाविषयी विकल्परहितत्वाने अनन्य असणे हा तिसरा गुण होय, असे भगवान् श्रीकृष्ण म्हणतात.

English meaning

To banish all doubts from the mind and be totally involved in the knowledge of Yoga is the third virtue, called as "the state of Yoga of knowledge" by the Lord Shrikrishna.

85
मूळ

आता देहवाचाचित्ते । यथासंपन्ने वित्ते । वैरी जालियाही आर्ताते । न वंचणे जे का ॥85॥

मराठी अर्थ

आता कायावाचामने व शक्यनुसार धनी, आपला शत्रूही जर आर्त होऊन (अडून) पुढे आला तर त्याला विन्मुख न करणे असा जो गुण,

English meaning

And not to deny every kind of help even to our enemy who is suffering; may the help be physical, or by a consoling speech or giving some money to him.

86
मूळ

पत्र पुष्प छाया । फळे मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥86॥

मराठी अर्थ

वाटेवरील वृक्षाची आलेल्या वाटसरूला, आपल्या फल, मूल, छाया वगैरेंचा उपभोग घेण्याला जशी कधी ना नसते.

English meaning

O Dhananjaya, this quality is like the charitable attitude of a tree which gives the leaves, the fruit, the shade, the flowers and even the roots to any traveller who comes near it;

87
मूळ

तैसे मनौनि धनधान्यवरी । विद्यमाने आल्या अवसरी । श्रांताचिये मनोहारी । उपयोगा जाणे ॥87॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे, असलेल्या धनधान्यादिकाचा आलेल्या याचकाला अथवा अतिथीला त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे,

English meaning

In the same way, when a man offers everything including money, foodgrains etc. to anyone who comes to his house,

88
मूळ

तया नांव जाण दान । जे मोक्षनिधानाचे अंजन । हे असो आइक चिन्ह । दमाचे ते ॥88॥

मराठी अर्थ

ह्याला ” दान ” असे म्हणतात व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय; आता “दम” म्हणजे काय त्याचे लक्षण ऐक.

English meaning

That is called "charity" - This is such a divine ointment that opens the vision to see the total freedom. Now, I shall tell you about control of the sense-organs.

89
मूळ

तरी विषयेंद्रिया मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसे तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥89॥

मराठी अर्थ

शस्त्रधारी ज्याप्रमाणे शत्रूचा संबंध त्याच्या नाशाने तोडून टाकतो त्याचप्रमाणे, विषय व इंद्रिये यांचे सान्निध्य झाले असता जो त्याची ताटातुट करितो.

English meaning

This control is cutting the connection between the sense organs and their objects just as a brave soldier cuts to pieces his enemy by his sword.

90
मूळ

तैसा विषयजातांचा वारा । वाजो नेदिजे इंद्रियद्वारा । इये बांधोनि प्रत्याहारा । हाती वोपी ॥90॥

मराठी अर्थ

तसाच विषयमात्राचा उपद्रव इंद्रियद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना (इंद्रियांना) प्रत्याहाराचे बंधन घालितो.

English meaning

In this, the sense-organs are subjected to severe withdrawal so that they should not be affected by the onslaught of the sense-objects.

91
मूळ

आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहीहि द्वारी । वैराग्याची ॥91॥

मराठी अर्थ

दशेंद्रियांच्या द्वारांवर वैराग्यरूप अग्नि घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ति बाहेर पळून जाते.

English meaning

Then the outgoing desire becomes afraid by the moral strength of the mind and leaves the mind to save itself from death, and there is fire of deirelessness guarding the doors of all the organs.

92
मूळ

श्वासोश्वासाहुनी बहुवसे । व्रते आचरे खरपुसे । वोसंतिता रात्रिदिवसे । नाराणुक जया ॥92॥

मराठी अर्थ

योग्याच्या प्राण निरोधनापेक्षांही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरीत असल्याने ज्याला दुसरी सवडच नसते.

English meaning

This man practises such penances which are more constant than breathing and vigourously maintains it day and night;

93
मूळ

पै दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपे । यागार्थुही संक्षेपे । सांगो ऐक ॥93॥

मराठी अर्थ

ज्याला दम असे म्हणतात. त्यांचे हे स्वरूप होय. आता यज्ञ तो काय संक्षेपाने सांगतो ते श्रवण कर.

English meaning

So, this is the nature of control, told to you in measured pharases. Now, I shall tell you the signs of "sacrifice."

94
मूळ

तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारी अधिकारे । आपुलालेनि ॥94॥

मराठी अर्थ

तरी ब्राह्मणांपासून आरंभ करून स्त्रियांदिकापर्यंत आपापल्या अधिकारा प्रमाणे,

English meaning

Thus, consider on one side the well-versed Brahmins with their supreme authority in performance of fire-sacrifices, and on the last line, women, etc, who have no authority to perform these; and consider all the castes which have their own grades of being authorised in this respect.

95
मूळ

जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणे यथागम । विधी यजिजे ॥95॥

मराठी अर्थ

ज्याला जे उचित असे भजनपूजनादि देवताधर्म शास्त्रविहित असतील, ते त्या आज्ञेप्रमाणे त्याने आचरावे.

English meaning

In this range, those who worship their respective deities, may do so with the sense of duty as ordained by the scriptures;

96
मूळ

जैसा द्विज षट्कर्मे करी । शूद्र तयाते नमस्कारी । की दोहीसही सरोभरी । निपजे यागु ॥96॥

मराठी अर्थ

उदाहरणार्थ, ब्राह्मणाने षट्कर्माचरण करावे व शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा, तरी दोघासही यज्ञाचे पुण्य घडते.

English meaning

And you may know that both the well versed Brahmin performing his six duties and the lowly caste man who simply bows before him, reap the same kind of fruit; because their actions are equal in respect of "sacrifice".

97
मूळ

तैसे अधिकारपर्यालोचे । हे यज्ञ करणे सर्वाचे । परी विषय विष फळाशेचे । न घापे माजी ॥97॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वानी यज्ञाचरण करावे, पण, त्यापासून अमुक फलप्राप्ति व्हावी असे आशेचे विष मात्र पोटांत नसावे.

English meaning

Similarly, it is the duty of each man to perform some kind of sacrifice according to his own status and authority, but it should not be poisoned by the poison of craving for results.

98
मूळ

आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारे जावो । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वये ॥98॥

मराठी अर्थ

आणि ह्या यज्ञाचा मी कर्ता आहे असा देहबुद्धिद्वारा भाव उत्पन्न न होऊ देतांही वेदांज्ञा यथासांग पाळावी.

English meaning

And he should not allow the concept that he is the actor, to ener in it. Anyway, everyone has to obey the dictates of Vedas in the performance of one's duties.

99
मूळ

अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥99॥

मराठी अर्थ

अर्जुना, ह्याप्रमाणे यज्ञ हा सर्वत्र शास्त्राज्ञेप्रमाणेच असावा लागतो. (अथवा तसा असेल तोच यज्ञ होय) हा मोक्षमार्गातील एक उत्तम सोबती होय.

English meaning

O Arjuna, this is the nature of sacrifice which touches every caste in the society and you should know that this sacrifice then becomes a wise companion on the path towards liberation.

100
मूळ

आता चेंडुवे भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । की शेती बी विखुरिजे । परी पिकी लक्ष ॥100॥

मराठी अर्थ

कोणीही भूईवर चेंडू आपटतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा ह्या उद्देशानेच होय (इतस्ततः जावा म्हणून नव्हे) अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच होय.

English meaning

Now, a ball is hit on the gorund, only to get it back in our hand, and similarly, seeds are sown in the field keeping an eye on the crop which we will reap.

101
मूळ

नातरी ठेविले देखावया । आदर कीजे दिविया । का शाखा फळे यावया । सिंपिजे मूळ ॥101॥

मराठी अर्थ

अंधारांतील जिन्नस सांपडावा म्हणून दिव्याला जपतात; किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून खाद्यांना (फांद्याना) फळे यावी म्हणून होय.

English meaning

This is like using a lamp with all the care hoping to find out what is in a dark place, or sprinkling water at the root of a tree with a hope to pluck its fruit.

102
मूळ

हे बहु असो आरिसा । आपणपे देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥102॥

मराठी अर्थ

किंवा हे असो, आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा जसा वारंवार साफ करितात.

English meaning

Or, in other words, it is like wiping clean again and again a mirror in order to see our own reflection clearly in it;

103
मूळ

तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागी गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणे ॥103॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे वेदांनीच ज्याचे प्रतिपादन केले आहे, अस जो ईश्वर त्याचे दर्शन (प्राप्ति) होण्यासाठी जो निरंतर श्रुत्यर्थाचा अभ्यास करितो.

English meaning

So, it is necessary to take the help of the Vedas, in order to understand the real nature of god who is the subject of knowledge of the Vedas.

104
मूळ

तेचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र का नाममंत्र । आवर्तवणे पवित्र । पावावया तत्त्व ॥104॥

मराठी अर्थ

द्विजांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्रद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाममंत्रादिकांच्या आवर्तनाने करावा म्हणजे त्यांना तत्त्वज्ञान होईल.

English meaning

For attaining the Brahman, study of Brahma Sutras, etc. is useful for the Brahmins and other "twice-born" and prayers or repetition of the sacred name of God is sufficient for others.

105
मूळ

पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आता तप शब्दाभिप्रावो । आईक सांगो ॥105॥

मराठी अर्थ

पार्था, ज्याला स्वाध्याय म्हणतात, तो देवांनी ह्याप्रमाणे सांगितला आहे. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो तो श्रवण कर.

English meaning

O Arjuna, this is called self-study or Swadhyaya. Now I shall tell you the definition of penance.

106
मूळ

तरी दाने सर्वस्व देणे । वेचणे ते व्यर्थ करणे । जैसे फळोनि स्वये सुकणे । इंद्रावणी जेवी ॥106॥

मराठी अर्थ

आपले सर्वस्व दान करण्यात खर्च करणे ते दान होय; नुसते वाटेल तसे द्रव्य खर्च करणे ते दान न होता व्यर्थ हानि होय. कसे तर, कडूवृंदावन वृक्ष वाटेल तेवढा फळांनी लादूनही व्यर्थ सुकून जातो. त्याप्रमाने

English meaning

To give up every possession in charity is the real fulfilment of life; it is like the natural drying up of a plant when it bears the seeds;

107
मूळ

नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकी तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता ऱ्हासु । चंद्राचा जैसा ॥107॥

मराठी अर्थ

अथवा धूपाचा व कनकाचा अग्निप्रवेश हा जसा गुणविकासामुळे त्यांचा एकप्रकारचा उत्कर्ष होय किंवा चंद्र कलांकलांनी कृश झाला तरी पितृपक्षाचे वनस्पतीचे जसे पोषण होते.

English meaning

Or the ending of the incense after being burnt or the reduction in the weight of gold when the dirt is burnt from it; or the waning of the Moon in the process of giving nectar, during the fortnight earmarked for ancestral rituals.

108
मूळ

तैसा स्वरूपाचिया प्रसरा – । लागी प्राणेंद्रियशरीरा । आटणी करणे जे वीरा । तेचि तप ॥108॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अर्जुना, स्वस्वरूप (ब्रह्म) प्राप्तीसाठी, प्राण, इंद्रिये, व शरीर ह्यांचा वेच करणे तेच तप होय.

English meaning

So, penance is the privations to which a man subjects his vitality, his organs and even the whole body, in order to achieve self-realization.

109
मूळ

अथवा अनारिसे । तपाचे रूप जरी असे । तरी जाण जेवी दुधी हंसे । सूदली चांचू ॥109॥

मराठी अर्थ

अथवा याहून अन्य असे गणले गेलेले जे तप, ती शुद्ध तप नसल्यामुळे त्यातील शुद्धाशुद्धतेला हंसक्षीरन्याय लावणं प्राप्त आहे.

English meaning

Many other forms of penance are described in this respect but it is mainly like the bifureation of milk and water done by a swan.

110
मूळ

तैसे देहजीवाचिये मिळणी । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणी । जागवीजे ॥110॥

मराठी अर्थ

म्हणून देह व जीव ह्यांचे तादात्म्य जन्मतःच तोडून टाकण्याकरिता ज्या विवेकाची आवश्यकता आहे तो विवेक अंतःकरणात जागा असू दे.

English meaning

Similarly, in penance the quality of discrimination which separates the Jeeva from the body to which it is normally attached, is required to be constantly kept alert and alive.

111
मूळ

पाहता आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडे । सनिद्र स्वप्न बुडे । जागणी जैसे ॥111॥

मराठी अर्थ

जागृतीत निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो, त्याचप्रमाणे अंतर्मुखतेने बुद्धि आत्म्याकडे वळली असता तिची विषयाकडील धाव सहजच कुंठित होते.

English meaning

The intellect often becomes confused in an effort to meditate on the reality of Atman; at that time, just as the sleep and the dream come to an end when one wakes up;

112
मूळ

तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥112॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धि ह्याप्रमाणे प्रवृत्त होते, ते, अर्जुना, तप असे म्हणतात.

English meaning

The man who uses intense discrimination in his effort for perception of Atman, can only be successful in this penance.

113
मूळ

आता बाळाच्या हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य । तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव ते ॥113॥

मराठी अर्थ

आता स्तन्य (आईचे अथवा गाईचे दूध) जसे बालाचे व चैतन्य जसे भूतमात्राचे कल्याण होय, त्याचप्रमाणे, सर्व प्राणिमात्रांच्याविषयी ज्याच्या ठिकाणी सौजन्य असते ते “आर्जव” होय.

English meaning

Now, humble simplicity or straightness of behaviour is described as the quality of milk in the breast of a mother only for the careful nurture of a child or the life principle which is the same in all the creatures of various forms, and consists of kind and courteous behaviour with all.

114
मूळ

आणि जगाचिया सुखोद्देशे । शरीरवाचामानसे । राहाटणे ते अहिंसे । रूप जाण ॥114॥

मराठी अर्थ

आणि सर्व जगाला जेणकरून सुख होईल, असा कायावाचामने ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो ते ‘अहिसेचे रूप ” होय असे समज.

English meaning

And know that non-violence implies every effort taken in order that the world should be happy.

115
मूळ

आता तीख होऊनि मवाळ । जैसे जातीचे मुकुळ । का तेज परी शीतळ । शशांकाचे ॥115॥

मराठी अर्थ

आता कमलकळिका जशी पाण्याचा भेद करते म्हणून तीक्ष्ण व स्पर्शाला पहावे तर अत्यंत मृदु असते किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज शीतल असते.

English meaning

The bud of jasmine flower is pointed but very soft, and the brightness of Moon is not hot but cool. His talk is like this, and that is the definition of Truth.

116
मूळ

शकेदाविताचि रोग फेडू । आणि जिभे तरी नव्हे कडु । ते वोखदु नाही मा घडू । उपमा कैची ॥116॥

मराठी अर्थ

ज्याच्या दर्शनानेच रोगनिवृत्ति होते व जे सेवन केले असता कटु अगर अरोचक नसते असे औषधच दिसत नाही; मग ती उपमा कशी द्यावी ?

English meaning

As there is no medicine which cures the disease only by seeing it, and is not bitter to the taste; it is very difficult to give a simile to the Truth.

117
मूळ

तरी मऊपणे बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवी फोडी कोंराळे । पाणी जैसे ॥117॥

मराठी अर्थ

आणि मृदुपणा पाहू गेले तर जे डोळयाच्या बुबुळालाही खुपणार नाही असे असून कठोरता पाहू गेले तर पर्वताचे कडे फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यासारखे आहे.

English meaning

Water has such a softness that if you splash it in the eyes it does not harm the pupils, but it is so hard that by its constant fall on a stone, it creates a hole in it.

118
मूळ

तैसे तोडावया संदेह । तीख जैसे का लोह । श्राव्यत्वे तरी माधुर्य । पायी घाली ॥118॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे संदेहनिवृत्तिमध्ये जे लोखंडाच्या हत्याराप्रमाणे तीक्ष्ण असून, माधुर्यालाहि मागे टाकील असे श्रवण करितांना गोड वाटते.

English meaning

Like that, the speech which is true, is very sharp in cutting away the confusion and illusion, just as tempered steel, but it is very pleasant to listen to.

119
मूळ

ऐको ठाता कौतुके । कानाते निघती मुखे । जे साचारिवेचेनि बिके । ब्रह्मही भेदी ॥119॥

मराठी अर्थ

ज्याचे कौतुकाने ही श्रवण केले असता कानाला अधिक सेवनाची इच्छा होऊन जणू मुखेच फुटतात व सत्यत्वाच्या सामर्थ्याच्या दृष्टीने जे ब्रह्मालाही मागे टाकील अथवा हार जाणार नाही.

English meaning

While listening to it, the ears develop tongues so that they can eat it but by its acute truthfulness it analyses even the Brahman.

120
मूळ

किंबहुना प्रियपणे । कोणातेही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणे । नाही कवणा ॥120॥

मराठी अर्थ

किंबहुना, प्रियपणाच्या दृष्टीने पाहू गेले त्याचे शब्द कोणालाही फसविणारे नसतात व यथार्थ असूनही ते कोणालाही खुपण्यासारखे नसतात.

English meaning

It is very lovable but does not deceive or irritate anybody;

121
मूळ

एऱ्हवी गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळी कीड । आगीचे करणे उघड । परी जळो ते साच ॥121॥

मराठी अर्थ

नाहीतर, फांसेपारध्याचे गायन अगर ध्वनि कानास गोड लागतो खरा; पण त्यात सत्याच लेश नसतो; किंवा अग्नि आपले कर्म चोरून नव्हे तर उघडपने करितो, पण त्या उघड अगर सत्य कर्माला काय आग लावावयाची आहे ?

English meaning

Otherwise the song of the hunter is sweet but very dangerous to the animals and the fire, no doubt, purifies very thoroughly but it burns down anything!

122
मूळ

कानी लागता महूर । अर्थे विभांडी जिव्हार । ते वाचा नव्हे सुंदर । लांवचि पा ॥122॥

मराठी अर्थ

वरून कानारा गोड वाटणारे, पण, अर्थदृषष्ठया काळजाला घर पाडणारे भाषण सुंदर न म्हणत ती शुद्ध मायावी राक्षसीच म्हणावी.

English meaning

That speech which is sweet to the ear but its meaning is cruelly killing cannot be said to be a sweet speech.

123
मूळ

परी अहिती कोपोनि सोप । लालनी मऊ जैसे पुष्प । तिये मातेचे स्वरूप । जैसे का होय ॥123॥

मराठी अर्थ

परंतु अहितापासून रक्षण करण्याकरिता वरून रागाचा आव आणणारी, पण, अंतःकरणात रक्षणाविषयी पुष्पाप्रमाणे मृदु असणारी अशी आई असते.

English meaning

The nature of this true speech is like the mother's harsh words of admonishing her child for its naughty behaviour, which is for his welfare only; and like her very tender words like flowers while caressing it.

124
मूळ

तैसे श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणे जे अविकार । ते सत्य येथे ॥124॥

मराठी अर्थ

तसे ऐकतांना मधुर व कौतुकास्पद, परिणामी सत्य व कोणाचेही वर्म न दुखविणारे जे भाषण ते ” सत्य ” असे म्हणतात.

English meaning

This speech is thus pleasant to the ears, good in its effect and is free from evil thoughts. That should be known as truth.

125
मूळ

आता घालिताही पाणी । पाषाणी न निघे आणी । का मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥125॥

मराठी अर्थ

किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही किंवा कांजी घुसळली असता जसे लोणी निघणे शक्य नसते.

English meaning

Now, a stone does not have sprouts and rice-wash water does not yield butter by churning it.

126
मूळ

त्वचा पाये शिरी । हालेयाही फडे न करी । वसंतीही अंबरी । न होती फुले ॥126॥

मराठी अर्थ

सर्पाच्या कांतेच्या शिरावर पाय दिला असता ती जशी फडा वर करीत नाही, किंवा वसंत ऋतु प्राप्त झाला तरीही आकाशात जशी पुष्पे निर्माण होत नाहीत.

English meaning

The discarded skin of a serpent does not spread its hood though beaten by stick, and the sky has no flowers even though it is spring time on the earth.

127
मूळ

नाना रंभेचेनिही रूपे । शुकी नुठिजेचि कंदर्पे । का भस्मी वन्हि न उद्दीपे । घृतेही जेवी ॥127॥

मराठी अर्थ

अथवा, रंभेचे लावण्यही जसे शुकाच्या चित्तांत विषयवासना उत्पन्न करू शकले नाही, किंवा भस्मात तूप घातले तरीही जशी अग्निज्वाला उत्पन्न होत नाही.

English meaning

Or the mind of the sage Shuka is not disturbed by the supreme beauty of Rambha the divine damsel, and ashes will not be flared up even if ghee is poured on them.

128
मूळ

तेवीचि कुमारु क्रोधे भरे । तैसिया मंत्राची बीजाक्षरे । तिये निमित्तेही अपारे । मीनलिया ॥128॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे लहान मुलालाही राग येईल अशा शेलक्या शिव्या जरी कोणी दिल्या अथवा आणखींही अशी काही कारणे घडलीं.

English meaning

Similarly, even if anybody utters such harsh words by which even a child will get angry;

129
मूळ

परी धातयाही पाया पडता । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजविता । क्रोधोर्मी गा ॥129॥

मराठी अर्थ

किंवा, अर्जुना, जो मृत झाला आहे तो, जसा ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी उठत नाही. तसा काहीही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तांत ऋोध उत्पन्न होत नाही.

English meaning

O Arjuna, this man's peace does not get disturbed just as a dead man does not get up even if we may prostrate ourselves before God the creator and pray!

130
मूळ

अक्रोधत्व ऐसे । नांव ते ये दशे । जाण ऐसे श्रीनिवासे । म्हणितले तया ॥130॥

मराठी अर्थ

अशी जी चित्ताची स्थिति तिला अक्रोधत्व असे म्हणावे असे भगवंतांनी सांगितले आहे.

English meaning

That peaceful state is called lack of anger.

131
मूळ

आता मृत्तिकात्यागे घटु । तंतुत्यागे पटु । त्यजिजे जेवी वटु । बीजत्यागे ॥131॥

मराठी अर्थ

आता मृत्तिकेच्या त्यागाने, तंतुत्यागाने, किंवा बीजत्यागाने जसा अनुक्रमे घट, पट व वृक्ष त्याग सहज व केल्या सारखा होतो.

English meaning

Now, by discarding the clay one discards the pot, by giving up a thread the piece of cloth is also given up, and by rejecting a seed one automatically rejects the banyan tree;

132
मूळ

का त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेचि चित्र । का निद्रात्यागे विचित्र । स्वप्नजाळ ॥132॥

मराठी अर्थ

किंवा भिंत त्यागिली असता तिजवरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखे होते, किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होते.

English meaning

Or by giving up a wall, the painting on it is also given up and by ending of sleep, the whole activities in the dream are finished.

133
मूळ

नाना जळत्यागे तरंग । वर्षात्यागे मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागे ॥133॥

मराठी अर्थ

किंवा जलत्यागाने तरंग, वर्षाऋतूच्या अंताने जसे मेघ किंवा धन त्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात.

English meaning

Even by denying the water we deny the waves on it, by denying the rainy season, clouds are automatically given up; and by relinquishing money, all the enjoyments are also dropped.

134
मूळ

तेवी बुद्धिमंती देही । अहंता सांडूनि पाही । सांडिजे अशेषही । संसारजात ॥134॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे विचारी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव त्यागिला अथवा बाधित केला असता, त्याचा सर्व संसार त्यक्तप्राय होतो.

English meaning

Similar to these examples, the wise people should give up their pride and with it all the worldly affairs.

135
मूळ

तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥135॥

मराठी अर्थ

अशा स्थितीला ” त्याग” म्हणावे असे यज्ञभोक्ता भगवान् श्रीकृष्ण परमात्मा ह्यांनी सांगितले. ते ऐकून भाग्यवान अर्जुना पुन्हा विचारिता झाला.

English meaning

That is the real renunciation, the real giving up- so said the Lord Shrikrishna whose very being is the image of sacrifice. On this the most fortunate Partha asked him:

136
मूळ

आता शांतीचे लिंग । ते व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देई ॥136॥

मराठी अर्थ

देवा, शांति कशाला म्हणावे ते मला स्पष्ट करून सांग; तेव्हा देव म्हणाले, सांगतो, लक्ष देऊन श्रवण कर.

English meaning

"Now please tell me the manifest nature of peace." Upon this, the Lord said, "Please listen."

137
मूळ

तरी गिळोनि ज्ञेयाते । ज्ञाता ज्ञानही माघौते । हारपे निरुते । ते शांति पै गा ॥137॥

मराठी अर्थ

ज्ञात्याने प्रथम सर्व ज्ञेयमात्राचा (त्याला स्वस्वरूपाहून पृथक् सत्ता नाही अशा बोधाने) ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेही पाठोपाठ जेथे लय पावते अशी जी वस्तु (ब्रह्मवस्तु) तीच शुद्ध शांति होय.

English meaning

Peace is that state of existence in which the knower, after merging within him the knowable,becomes non-existent together with the knowledge.

138
मूळ

जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपे निबिडु । आपणचि ॥138॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे प्रलयकालाचे जळ वाढू लागले म्हणजे, विश्वचा थांगपत राहू न देता, सर्व दिशा आपणच व्यापून आपल्याच स्वरूपाने केवल स्थित असते.

English meaning

This is like the great deluge of final dissolution, which wipes away all the various bodies of waters by merger and remains an all-pervading one totality

139
मूळ

मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥139॥

मराठी अर्थ

व मग, उगम, प्रवाह, अगर विश्रांतिस्थान जो सागर इत्यादि व्यवहारभेद सर्व लोपून जातात, तेथे, ” सर्व जलमय आहे ” असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो व्हावा ?

English meaning

Then, there is no separate recognition of river, its beginning, its flow, its final stage of merger into the sea, and the totality is water only, where there is nobody else to say that it is "water"

140
मूळ

तैसी ज्ञेया देता मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटी । मग उरे तेचि किरीटी । शांतीचे रूप ॥140॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अर्जुना, सर्व ज्ञेय आटून गेले असता (बाधित झाले असता ) ज्ञातृत्वही आपोआपच आपल्याच ठिकाणी लयाला जाऊन केवळ ज्ञप्तिमात्र (ज्ञानमात्र) असणारी जी वस्तु, तेच शान्तीचे खरे स्वरूप होय.

English meaning

Thus, O the crowned one! The factor as knower, becomes one with the object of knowledge; and does not remain as any separate entity. That is the nature of peace.

141
मूळ

आता कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधी । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥141॥

मराठी अर्थ

आता व्याधिग्रस्त रोग्याला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपपर भाव बाळगीत नाही.

English meaning

Now I shall tell you about lack of evil intent. A god doctor, while trying to cure his patient of a disease, does not consider his patient as his enemy, when the latter is suffering by his ailment and he is using medicines for it.

142
मूळ

का चिखली रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥142॥

मराठी अर्थ

किंवा चिखलांत रुतलेली गाय पाहून ज्याचे अंत:करण व्यथित होते तो जसा तिचा उद्धार करतांना ती दुभती आहे की भाकड आहे ह्याचा विचार करीत बसत नाही.

English meaning

Or a man sees a cow drowning in a rut of mud and tries to save her life, without checking whether she is barren or milk-giving.

143
मूळ

नाना बुडतयाते सकरुणु । न पुसे अंत्यजु का ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेचि जाणे ॥143॥

मराठी अर्थ

किंवा बुडणाऱ्या मनुष्याची करुणा येणारा समर्थ मनुष्य जसा तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे ह्याचा विचार न करिता त्याला तीराला पोंचवून त्याचा प्राण रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य समजतो.

English meaning

Or, a compassionate life-guard who tries to save a drowning man, does not check whether he belongs to the Brahmin caste or a low caste. His only concern is to save his life.

144
मूळ

की माय वनी पापिये । उघडी केली विपाये । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥144॥

मराठी अर्थ

किंवा पाप्यांनी एखादी गरीब अबला अरण्यात उघडीनागडी केलेली दिसतांच तिचे शरीर आच्छादित केल्याशिवाय कोणीही शिष्ट स्वस्थ असत नाही.

English meaning

Or, if a noble person happens to glance at a woman who is made naked by a sinner in a jungle, he does not look at her again without first throwing some cover over her;

145
मूळ

तैसे अज्ञानप्रमादादिकी । का प्राक्तनहीन सदोखी । निंदत्वाच्या सर्वविखी । खिळिले जे ॥145॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जे अज्ञान व घोर चुका ह्यांनी युक्त असून, पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वथैव निदेला पात्र आहेत.

English meaning

Similar to these examples, the persons when they see others who are either due to ignorance or delusion, or due to their wrong past deeds, rotting in the evil and miserable conditions,

146
मूळ

तया आंगीक आपुले । देऊनिया भले । विसरविजती सले । सलती तिये ॥146॥

मराठी अर्थ

त्यांना स्वतःसहाय्य होऊन त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडून सुखविण्याचा प्रयत्न करतात.

English meaning

Give them their full personal strength and make them forget their acute pangs of sufferings due to their bad conditions;

147
मूळ

अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥147॥

मराठी अर्थ

अरे, पुढील म्हणजे गाठ पडणाच्या अंगी जर काही दोष दिसले तर ते वर्ज्य करून, मग त्याच्यापाशी तो सलगी करितो.

English meaning

O Arjuna, they cleanse the defects of others by their kind gaze and then they start observing them in details.

148
मूळ

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥148॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे देव पूजेनं सुशोभित करून मग प्रसन्नचित्ताने पहावा, शेतात पेरणी करून मग फलाशेने तिकडे जावे, किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशिर्वाद घ्यावा.

English meaning

It is like doing meditation on 'God' by first performing worship of his image with all beautiful things or by sowing seeds in a field and then going to guard it, or to receive blessings of a guest by first giving him in reception everything which satisfies him.

149
मूळ

तैसे आपुलेनि गुणे । पुढिलाचे उणे । फेडुनिया पाहणे । तयाकडे ॥149॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, आपल्या आंगच्या गुणांनी अगर साधनांनी पुढील व्यक्तींतील उणीव भरून काढून मग त्यांच्याकडे (आदराने) अवलोकन करावे.

English meaning

Similarly, they make good by their virtue, whatever is wanting in another person and then they look at him.

150
मूळ

वाचूनि न विंधिजे वर्मी । नातुडविजे अकर्मी । न बोलविजे नामी । सदोषी तिही ॥150॥

मराठी अर्थ

इतकेच नव्हे तर, त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असेही करू नये,

English meaning

Further they do not speak out openly any shameful actions of others that may hurt them, and they do not slander anybody.

151
मूळ

वरी कोणे एके उपाये । पडिले ते उभे होये । तेच कीजे परी घाये । नेदावे वर्मी ॥151॥

मराठी अर्थ

तर, जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये.

English meaning

By whatever means possible, they try to re-build that man's fallen prestige or position but never castigate him about his failings.

152
मूळ

पै उत्तमाचियासाठी । नीच मानिजे किरीटी । हे वाचोनि दिठी । दोषु न घेपे ॥152॥

मराठी अर्थ

किंवा, अर्जुना, एखाद्या उत्तम किंवा पुरुषाची तुलना मनात आणून त्यामानाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणिता जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करितो.

English meaning

They never scorn at some as lowly in order to give esteem to some others; not only that, but normally they do not see for faults in the behaviour of others.

153
मूळ

अगा अपैशून्याचे लक्षण । अर्जुना हे फुडे जाण । मोक्षमार्गींचे सुखासन । मुख्य हे गा ॥153॥

मराठी अर्थ

अर्जुना, ” अपैशुन्याचे ” अथवा सुजनतेने हे लक्षण होय व मोक्षमार्गातील हे एक सुखसाधन आहे.

English meaning

O Arjuna, this is the virtue called lack of evil gossip, and know that this is one of the steps on the path of liberation.

154
मूळ

आता दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निवविता न कडसी । साने थोर ॥154॥

मराठी अर्थ

आता दया म्हणजे काय विचारशील, तर ती अशी असावी की, पूर्णचंद्र परतापहरण करितांना जसा भेदाभेद राखीत नाही, तशी ती प्राणिमात्राच्या ठिकाणी सारखी असावी.

English meaning

Now I shall tell you what is pity. This quality is like the Moon who does not discriminate between anybody as greater or smaller while bestowing the coolness of her light on the world.

155
मूळ

तैसे दुःखिताचे शिणणे । हिरता सकणवपणे । उत्तमाधम नेणे । विवंचू गा ॥155॥

मराठी अर्थ

म्हणून कोणाही दुःखितांचे दुःख पाहून, त्याचा उत्तमपणा अगर अधमपणा मनात न आणिता त्याची करुणा करावी.

English meaning

The man who is having compassion, does not become partial to anybody, as greater or smaller when he is trying to alleviate the sufferings of people.

156
मूळ

पै जगी जीवनासारिखे । वस्तु अंगवरी उपखे । परी जाते जीवित राखे । तृणाचेहि ॥156॥

मराठी अर्थ

किंवा जगात जीवनासारखी (जलासारखी) दुसरी कोणती वस्तु आहे की जी आपला सर्वस्व वेच करून घेऊनही गवतासारख्याचेही जीवित रक्षण करिते.

English meaning

In this world water itself is perishable but it gives new life to grass, even while it dries up in that process.

157
मूळ

तैसे पुढिलाचेनि तापे । कळवळलिये कृपे । सर्वस्वेसी दिधलेहि आपणपे । थोडेचि गमे ॥157॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे दुःखातं पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो व जो त्याच्या सहाय्यार्थं आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही असे चित्तांत मानतो.

English meaning

Similarly, the compassion of this man is so ardent that he does not mind even to give up everything to give relief to a sufferer.

158
मूळ

निम्न भरलियाविणे । पाणी ढळोचि नेणे । तेवी श्रांता तोषौनि जाणे । सामोरे पा ॥158॥

मराठी अर्थ

सखल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काहीही करणे सुचत नाही.

English meaning

Just as a stream of water does not flow forward unless the ditch in the way is first filled up; so also, he does not go forward unless he gives relief to a sufferer who comes along.

159
मूळ

पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनि ॥159॥

मराठी अर्थ

किंवा पायात मोडलेला काटा असेपर्यंत जसे जीवाला त्याचे दुःख होते, त्याप्रमाणे पुढीलाचे संकट पाहून जो नित्य पाळतो.

English meaning

Just as when a thorn pricks a foot of a man, his face is distorted with pain, so, this man feels the pangs of the suffering of other people.

160
मूळ

का पावो शीतळता लाहे । की ते डोळ्याचिलागी होये । तैसा परसुखे जाये । सुखावतु ॥160॥

मराठी अर्थ

किंवा पावलाला शीतलोपचार केले तर त्यांचा जसा त्यांच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्यायाचे सुख पाहूनच मनात सुखी होतो.

English meaning

He becomes very happy by the happiness of others, just as the coolness felt by the feet has a cooling effect on the eyes also.

161
मूळ

किंबहुना तृषितालागी । पाणी आरायिले असे जगी । तैसे दुःखितांचे सेलभागी । जिणे जयाचे ॥161॥

मराठी अर्थ

किंबहुना, तृषितांची तृषा हरण व्हावी म्हणूनच जस जगात पाण्याचा जन्म आहे, त्याप्रमाणे दुःखितांचे दुःख हरण करावे हेच ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे.

English meaning

In short, his very life is meant for giving happiness to others just like water which is created as if only for quenching the thirst of beings.

162
मूळ

तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजताचि तया । ऋणिया लाभे ॥162॥

मराठी अर्थ

अर्जुना, असा जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तींच होय; तो जन्मत:च मला ऋणी करून ठेवितो.

English meaning

O the great warrior! Know that he is the very image of compassion, and I am indebted to him right from his birth.

163
मूळ

आता सूर्यासि जीवे । अनुसरलिया राजीवे । परी ते तो न शिवे । सौरभ्य जैसे ॥163॥

मराठी अर्थ

आता, कमल जरी, सूर्यापाशी जीवे भावे अनन्य असले तरी, तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही,

English meaning

Now, I shall tell you about not being attached to all things. This virtue is like the Sun who does not touch the lotus though the lotus may turn its face towards the Sun with all its devotion.

164
मूळ

का वसंताचिया वाहाणी । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥164॥

मराठी अर्थ

किंवा वसंतऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पत्र, पुष्प, फल युक्त ऐश्वर्याला धारण करते तरी, तो त्या ऐश्वर्याकडे ढंकूनही न पहाता जसा सरळ निघून जातो.

English meaning

Or like the spring season, which does not stay on even though it is the cause of great efflorence in the whole gardens of trees.

165
मूळ

हे असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशी । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥165॥

मराठी अर्थ

किंवा, ही राहो, सर्व सिद्धींसह लक्ष्मी पायाशी आली असतांही श्रीमहाविष्णु जसे तिला मुळीच महत्त्व देत नाही.

English meaning

Even if goddess Laxmi with all the great occult powers may approach and kneel before him, he will not give her respect, just like the Lord Vishnu.

166
मूळ

तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हे न रुचे । मनामाजी ॥166॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ऐहिक किंवा पारत्रिक भोग ह्याच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी, त्यांच्या भोगाविषयी ज्याला यत्किंचितही इच्छा होत नाही.

English meaning

Similarly even if all the pleasures of this world or the heaven may become slaves to his wish, he will not like to enjoy them.

167
मूळ

बहुवे काय कौतुकी । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्‌त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥167॥

मराठी अर्थ

बहुत काय सांगावे ? कौतुकाखातरही ज्याला कधी विषयसेवनाची इच्छा होत नाही. अशी जी दशा ते “अलोलुप्त्व” होय.

English meaning

In short, when a man does not have any desire for enjoyment of any objects of senses, you should know that state as lack of attachment to all things.

168
मूळ

आता माशिया जैसे मोहळ । जळचरा जेवी जळ । का पक्षिया अंतराळ । मोकळे हे ॥168॥

मराठी अर्थ

आता, मधमाशांना जसे मोहोळ किंवा जलचरांना जसे जल, किंवा पक्षांना जसे आकाश नित्यप्रिय असते.

English meaning

Now, please listen to the signs of mildness in the man's character. It is like the honey-comb for bees, like water to aquatic animals, and the sky to the birds,

169
मूळ

नातरी बाळकोद्देशे । मातेचे स्नेह जैसे । का वसंतीच्या स्पर्शे । मऊ मलयानिळु ॥169॥

मराठी अर्थ

किंवा, बालकाविषयी मातेचे चित्त जसे नित्य प्रेमयुक्त असते अथवा मलयागिरीवरून वसंतात येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो.

English meaning

Or like the mother's love for the child, or the delicacy of the breeze which is touched by the spring.

170
मूळ

डोळ्या प्रियाची भेटी । का पिलिया कूर्मीची दिठी । तैसी भूतमात्री राहटी । मवाळ ते ॥170॥

मराठी अर्थ

पतिव्रतेला पतिदर्शन, किंवा कांसवीच्या पिलांना मातृदृष्टि, ह्याप्रमाणे भूतमात्राविषयी ज्याच्या अंतःकरणात नित्यप्रेम व मार्दव असते.

English meaning

His behaviour with all beings is as soft as the tender glance of lovers, or the tender gaze of the mother tortoise towards her young ones.

171
मूळ

स्पर्शे अतिमृदु । मुखी घेता सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगे ॥171॥

मराठी अर्थ

स्पर्श केला तर मृदु, सेवन केला तर रुचकर, वास घेतला तर सुगंधित, व रूपाने शुभ्र असा जो कापूर.

English meaning

Camphor which is very smoth to touch, tasteful, fragrant and clean white in appearance,

172
मूळ

तो आवडे तेवढा घेता । विरुद्ध जरी न होता । तरी उपमे येता । कापूर की ॥172॥

मराठी अर्थ

तो वाटेल तेवढा सेवन करून जर बाधा न करिता, तर, त्याची उपमा देता आली असती.

English meaning

Could have compared well with this behaviour, if it were taken in plenty, but not become poisonous;

173
मूळ

परी महाभूते पोटी वाहे । तेवीचि परमाणूमाजी सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसे ॥173॥

मराठी अर्थ

परंतु ज्याच्या पोटांत पंचमहाभूतांचा समावेश होऊनही जे परमाणूमध्येही प्रविष्ट असते व जे विश्वाचा आकार धारण करिते असे जे गगन.

English meaning

His attitude is such that he in his greatness may allow all the five great elements to live happily in his belly, or he may himself remain contented to live within an atom, or he may be as vast as the sky which covers the universe;

174
मूळ

काय सांगो ऐसे जिणे । जे जगाचेनि जीवे प्राणे । तया नांव म्हणे । मार्दव मी ॥174॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे ! याचे जिणे म्हणजे केवळ जगाच्या कल्याणार्थच असते त्याला ‘मार्दव ” असे मी म्हणतों

English meaning

O Arjuna, such way of living which is completely in unison with the world by his breath and soul, is what I call mildness of nature.

175
मूळ

आता पराजये राजा । जैसा कदर्थिजे लाजा । का मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥175॥

मराठी अर्थ

आता पराभव पावलेला राजा जसा लज्जेने व्यथित होतो, किंवा मानी पुरुष निकृष्ट स्थिति प्राप्त झाली असता जसा निस्तेज होतो.

English meaning

Now I shall define what is the quality of feeling ashamed. It is a condition similar to what a king feels when he is defeated or what a respectable man feels when he is insulted.

176
मूळ

नाना चांडाळ मंदिराशी । अवचटे आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥176॥

मराठी अर्थ

किंवा एखादा संन्यासी आकस्मिकपणे चांडाळगृह आला असता या श्रेष्ठ पुरुषाला जशी लज्जा उत्पन्न होते.

English meaning

Or similar to a feeling of awkward disposition of a mendicant when he by chance stands before the house of a man of the caste of Chandala,

177
मूळ

क्षत्रिया रणी पळोनि जाणे । ते कोण साहे लाजिरवाणे । का वैधव्ये पाचारणे । महासतियेते ॥177॥

मराठी अर्थ

रणांतून पळून जाणे ही लाजिरवाणी गोष्ट कोणता जातिवंत क्षत्रिय सहन करील ? किंवा महापतिव्रतेला वैधव्यबोधक शब्द लावणे कोणास आवडेल ?

English meaning

It is like the feeling of shame when a fighter has to run away from the battle ground or the widowhood of a grently devoted wife.

178
मूळ

रूपसा उदयले कुष्ट । संभाविता कुटीचे बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसे ॥178॥

मराठी अर्थ

देखण्या व्यक्तीला अंगावर कोड उठावे, किंवा एखाद्या सन्माननीय गृहस्थावर वेडावांकडा आळ यावा हे जसे प्राणसंकटासारखे होते.

English meaning

It is the feeling like the depression and self pity which a handsome man may experience when he is afflicted by leprosy, or the great moroseness a man of righteousness feels if he is slandered by others.

179
मूळ

तैसे औटहातपणे । जे शव होऊनि जिणे । उपजो उपजो मरणे । नावानावा ॥179॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे साडेतीन हात प्रेतरूप शरीर त्याच्या आधारावर स्वतःचे जगणे अथवा आस्तित्व मानून पुनःपुन्हा जन्माला यावे व मरावे.

English meaning

Thus, this shame is like living as a dead man in this body of three and a half arms' length, or to be dying from moment to moment as soon as one is born.

180
मूळ

तिये गर्भमेदमुसे । रक्तमूत्ररसे । वोतीव होऊनि असे । ते लाजिरवाणे ॥180॥

मराठी अर्थ

व त्या गर्भाशयरूप मुशीत (सांच्यात) रक्तमूत्रादि रसांची ओतीव मूर्ति होऊन राहणे हा जो लाजिरवाणा भोग.

English meaning

This is the feeling of great abhorance when one thinks of the vicissitudes of life in the womb covered by the blood, urine and fluids, as if an effigy of all these cast by destiny;

181
मूळ

हे बहु असो देहपणे । नामरूपासि येणे । नाही गा लाजिरवाणे । तयाहूनी ॥181॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे ! देहपणाने नामरूपाला येऊन मिरवणे ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही.

English meaning

There is nothing more shameful than to become a body and bear a name and form.

182
मूळ

ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पै निर्मळा । निसुगा गोड ॥182॥

मराठी अर्थ

स्वतःला अशा हीन दशेला आणणान्या शरीराचे धारण करण्याचा भोग वांटयास यावा ह्याची साधुपुरुषांना लाज व खंती वाटते; परंतु निर्लज्जाला तेच गोड वाटते.

English meaning

The feeling of disgust about such body should be known as the quality of shame; which feeling is only true in case of wise persons. For ignorant, to be attached to the body is pleasant.

183
मूळ

आता सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसे प्राणजये कर्मेंद्रिया । खुंटे गती ॥183॥

मराठी अर्थ

आता चलन देणारी दोरी तुटल्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या सर्व चेष्टा जशा बंद पडतात, त्याप्रमाणे प्राणांचा जय (योग) केला असता सर्व कमेंद्रियांच्या चेष्टा बंद पडतात.

English meaning

Now listen to the quality known as lack of frivolity. If the string on which a puppet is hung is broken, the movement of the puppet is stopped! Similarly by strict discipline of control of breath, the activities of organs become slow, or they cease.

184
मूळ

की मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजये प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥184॥

मराठी अर्थ

किंवा सूर्यास्ताबरोबर सर्व किरणांचा पसारा जसा संपतो त्याप्रमाणे मनोजय केला असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद होतात.

English meaning

When the Sun sets, the rays are also withdrawn. Similarly the sense-organs are also withdrawn when the mind is brought under control.

185
मूळ

एवं मनपवननियमे । होती दाही इंद्रिये अक्षमे । ते अचापल्य वर्मे । येणे होय ॥185॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे प्राणजय व मनोजय केल्याने दशेंद्रियांच्या सर्व चेष्टा थांबून ती स्तब्ध होतात त्यालाच ” अचापल्य” असे म्हणतात.

English meaning

Thus by control of the mind and control of breath, all the ten organs become steady and not over-active. This state is called lack of frivolity.

186
मूळ

आता ईश्वरप्राप्तीलागी । प्रवर्तता ज्ञानमार्गी । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥186॥

मराठी अर्थ

आता ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ति झाली असता धैर्याची उणीव भासत नाही.

English meaning

When the mind has complete determination while stepping on the path of yoga of knowledge, then one does not feel lack of strength.

187
मूळ

वोखटे मरणा{ऐ}से । तेही आले अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशे । न गणीचि सती ॥187॥

मराठी अर्थ

मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग, व तोही जिवंतपणी अग्निप्रवेश करून येणार; पण, प्राणपतीच्या उद्देशाने तो ओढवून घेतांना पतिव्रता सतीला त्याचे काहीच वाटत नाही.

English meaning

A devout wife who intends to be a "Suttee", by burning herself on the pyre of her husband, is not afraid though death in itself is fearsome and death by burning is still more ghastly;

188
मूळ

तैसे आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धावो आवडे पाणधी । शून्याचिये ॥188॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ज्याला आत्मप्राप्तीची तळमळ लागली आहे, तो, विषयांचा विषवत् त्याग करून, आवश्यक तर, प्राणनिरोधनाने शून्यसमाधीसारखे कठीण साधनही करण्यास तयार होतो.

English meaning

Similarly, Jeeva first destroys the poison of objects of the senses in order to reach the state of Atman, and starts progressing by the path of Yoga leading to the great void, which path is really narrow like a foot-way.

189
मूळ

न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवी कोड । महासिद्धीचे ॥189॥

मराठी अर्थ

विधिनिषेधाचे भान रहात नाही किंवा महासिद्धीसारखी प्राप्ति झाली असतांही त्याला तिचे कौतुक वाटत नाही.

English meaning

Then he does not care for what is sanctioned by scriptures as rightful action and what is called as prohibited action, nor is he enticed by any great occult powers.

190
मूळ

ऐसे ईश्वराकडे निज । धावे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक ते ॥190॥

मराठी अर्थ

ज्याच्या वृत्तीचा स्वाभाविक ईश्वर प्राप्तीकडे असा ओढा असतो, त्याला अध्यात्मिक (शारीरिक) तेज असे म्हणतात.

English meaning

When the Jeeva, of his own force of earnestness, starts to run towards the God, that quality is called "Brilliance".

191
मूळ

आता सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसे देह वाहोनि रोमा । वाहणे नेणे ॥191॥

मराठी अर्थ

आता येईल तो घोर किंवा थोर प्रसंग सहन करूनही ज्याला, देहाला आपण अनंत रोम धारण केले आहेत ह्याचे जसे भानही नसते त्याप्रमाणे, मुळीच गर्व अगर स्वतःच्या सहनशीलतेचे भानही नसते ती “ क्षमा” होय.

English meaning

Similarly, the quality of forgiveness is an attitude which is not proud with a concept that "I am the greatest of persons who forgives others freely." For example, there are innumerable hair all over our body but we are not very cognizant that we are bearing the burden of those hair.

192
मूळ

आणि मातलिया इंद्रियांचे वेग । का प्राचीने खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥192॥

मराठी अर्थ

आणि इंद्रियांच्या वृत्ति अनावर झाल्या असता, किंवा अदृष्टाने रोगादि भोग उभे राहिले असता, अथवा प्रिय किंवा अप्रिय वस्तूंचा योग किंवा वियोग घडला असता.

English meaning

When the sense organs go out of control or some hidden ailments suddenly become manifest in the body or if he comes into contact with an undesirable thing or person,

193
मूळ

यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य का होऊनि धीरु । उभा ठाके ॥193॥

मराठी अर्थ

किंवा हे प्रसंग पृथक् पणे न येता एकाच वेळ ह्या सर्वाचा पूर आला तरी जो अगस्ति ऋषीप्रमाणे ह्या सर्वाचा एकदम ग्रास करून टाकतो व अकंप असतो.

English meaning

Or if the whole group of such painful situations attack him, he stands with great fortitude like the sage Agastya.

194
मूळ

आकाशी धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवी ॥194॥

मराठी अर्थ

आकाशात धुराचा केवढाही स्तंभ उंच गेला असला तरी, वाऱ्याची एकच झळूक तो जसा मोडून टाकते.

English meaning

And when there is tremendous smoke enveloping great area of the sky, by sudden strong winds it is dissipated in no time.

195
मूळ

तैसे अधिभूताधिदैवा । अध्यात्मादि उपद्रवा । पातलेया पांडवा । गिळुनि घाली ॥195॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुना, आध्यात्मिक, आधिभौतिक अथवा आधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असता, त्या सर्व जो गिळून जातो.

English meaning

Similarly this man by sheer force of his will devours the triple attack of the calamities, which are physical, cosmic or coming from other sources outside the body.

196
मूळ

ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी । उचलूनि धैर्या जे चांगावे करी । धृति म्हणिपे अवधारी । तियेते गा ॥196॥

मराठी अर्थ

अशा चित्तक्षोभाच्या प्रसंगांत ज्याचे धैर्य टिकून राहते त्याला धृति म्हणतात, हे लक्षात असूदे.

English meaning

And in any situation which may otherwise totally disrupt the inner poise of other people, this man remains unruffled. This quality is called fortitude, which O Arjuna, you should carefully understand.

197
मूळ

आता निर्वाळूनि कनके । भरिला गांगे पीयूखे । तया कलशाचियासारिखे । शौच असे ॥197॥

मराठी अर्थ

आता सुवर्णकलश स्वच्छ करून आत शुद्ध गंगोदक भरावे, त्याप्रमाणे ” शौच ” म्हणजे शुद्धतेचे स्वरूप आहे.

English meaning

Now about cleanliness, I will say that it is like a vessel with gold plating, which is filled with the water of the Ganges.

198
मूळ

जे आंगी निष्काम आचारु । जीवी विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥198॥

मराठी अर्थ

ज्याचे आचरण निष्काम असून, चित्तांत विवेक नित्य जागा असतो, तो सबाह्य शुचित्वाची मूर्तीच होय असे समज.

English meaning

This is because the obvious signs of purity or cleanliness are the doing of actions by the body without selfish motive, and to be well-armed with the quality of discrimination in the behaviour.

199
मूळ

का फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥199॥

मराठी अर्थ

समुद्राकडे वाहणारे गंगोदक जसे स्नान करणान्यांच्या पापाचा व तापाचा नाश करून तीरावर असलेल्या वृक्षांचे सहज पोषण करिते.

English meaning

Further just as the water of the Ganges proceeds finally towards the sea, by quenching the thirst of all the beings in that course and giving nourishment to the trees on its banks.

200
मूळ

का जगाचे आंध्य फेडितु । श्रियेची राउळे उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥200॥

मराठी अर्थ

किंवा सूर्य नित्याच्या फेरीला निघाला असता जगांतील अंधकाराचा नाश करून सर्व व्यवहार व्यापार प्रकट करितो.

English meaning

Or just as the Sun dissipates the blindness of the world, opens the great glorious temples of heavenly riches, and starts his travel in the sky.

201
मूळ

तैसी बांधिली सोडिता । बुडाली काढिता । सांकडी फेडिता । आर्ताचिया ॥201॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे बद्धांना मुक्त करणारा, बुडणारांचा उद्धार करणारा, व संकटग्रस्तांचे संकट निवारण करणारा.

English meaning

Similarly this man frees the men in bondage, saves persons who are drowned and removes the calamities of the sufferers.

202
मूळ

किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उन्नति । आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥202॥

मराठी अर्थ

किंबहुना स्वार्थाच्या व्यापारांत रत असतांनाही सभोवारच्या जीवांच्या सुखाचे व उन्नतीचे ज्याच्या चित्तांत नित्य चिंतन चालू असते.

English meaning

He is satisfied by giving happiness to others continuously and more and more day by day.

203
मूळ

वाचूनि आपुलिया काजालागी । प्राणिजाताच्या अहितभागी । संकल्पाचीही आडवंगी । न करणे जे ॥203॥

मराठी अर्थ

किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे यत्किंचितही अहित करावे असा नुसता संकल्पही ज्याला शिवत नाही.

English meaning

He never thinks of hurting others in order to be successful in his own undertakings.

204
मूळ

पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । ते सांगितले हे दिठी । पाहो ये तैसे ॥204॥

मराठी अर्थ

अर्जुना, अशी वागणूक जेथे दिसेल अगर ऐकू येईल ते “अद्रोहत्व” होय असे तुला पटण्यासारखे सांगितले.

English meaning

O Arjuna, these signs which you have just now listened to, are indicative of non-enmity aginst anybody.

205
मूळ

आणि गंगा शंभूचा माथा । पावोनि संकोचे जेवी पार्था । तेवी मान्यपणे सर्वथा । लाजणे जे ॥205॥

मराठी अर्थ

आणि, अर्जुना, गंगेला शंकरांनी आपल्या जटेत धारण करून जिरविल्यावर तिच्या स्वतःच्या वेगाचा गर्व जसा हरण झाला व ती जशी लज्जित झाली, तसा लोकांनी अतिशय मानमान्यता केली असता जो चित्तांत संकोच पावतो.

English meaning

And when the Ganges was held by the Lord Shankara in the tangle of hair on his head, she became very bashful and small. Similarly, when a man is honoured, he feels very awkward and withdraws into himself.

206
मूळ

ते हे पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागा सांगितलेसे किती । तेचि ते बोलो ॥206॥

मराठी अर्थ

इत्यादि जे वर्तन हेच अमानित्व होय; अर्जुना मागे ह्याचे दिग्दर्शन आले आहेच; पुन्हा तेच ते सांगणे कशाला ?

English meaning

This is absence of self-pride, which I have already described earlier which need not be repeated. You should understand this by observation.

207
मूळ

एवं इही सव्विसे । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचे जैसे । अग्रहार होय ॥207॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे सव्वीस प्रकारची ही दैवी किंवा ब्रह्मसंपत्ति आहे व ती मोक्षसम्राटांचे जणू वतनच होय.

English meaning

In this way, these are the twenty-six qualities or divine virtues, which are like the citations awarded in the empire of the great emperor called liberty.

208
मूळ

नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥208॥

मराठी अर्थ

किंवा, नित्य नवे वाटावे अशा ह्या सव्वीस पवित्र गुणरूपांची ही दैवी संपत्ति म्हणजे वैराग्यरूपी सगरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी जणू गंगाच अवतरली आहे !

English meaning

Or this divine riches is like the river Ganges, which is always full of the waters of the virtues and is flowing with all her force towards the sons of Sagara and this virtue is embodied as desirelessness.

209
मूळ

की गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥209॥

मराठी अर्थ

किंवा ही मुक्ति नवरी ह्या सव्वीस गुणरूपी पुष्पांची माला घेऊन वैराग्यादि साधनांनी संपन्न असलेल्या वराच्या गळ्यात ती घालावी म्हणून जणू त्याचा शोधच करीत आहे !

English meaning

Or this divine glory of virtues is a garland of flowers of good qualities and it is held by the bride named 'liberation' who is putting the garland around the neck of the bridgegroom, who is desirelessness itself.

210
मूळ

की सव्विसे गुणज्योती । इही उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥210॥

मराठी अर्थ

किंवा ह्या सव्वीस गुणरूप ज्योतींनी युक्त अशी आरती घेऊन; आपला पति जो आत्मराज त्याला ओवाळण्यासाठ गीता ते ताट घेऊन पुढे आली आहे.

English meaning

Or the wife named Geeta is lighting the wicks of these twenty-six virtues, and is waving these lights respectfully before her husband, who is Atmaram.

211
मूळ

उगळिते निर्मळे । गुण इयेचि मुक्ताफळे । दैवी शुक्तिकळे । गीतार्णवीची ॥211॥

मराठी अर्थ

गीतारूप समुद्रांतील शिंपल्यातून ही दैवीसंपत्तिरूप मुक्ताफळेच जणु बाहेर पडली आहेत.

English meaning

These virtues are like brilliant lustrous pearls from the shell of divine riches obtained from the ocean of Geeta.

212
मूळ

काय बहु वानू ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केले दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥212॥

मराठी अर्थ

ह्या दैवीसंपत्तीरूप गुणराशीचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णन करावे ?

English meaning

How far can I describe the greatness of this riches adequately? It is most naturally experienced automatically. Thus I have described the divine riches, which is the store-house of good qualities.

213
मूळ

आता दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥213॥

मराठी अर्थ

आता, अंतर्बाह्य दुःखरूप असलेली व दोषादि कंटकांनी युक्त असलेली अशी जरी आसुरी संपत्ति असली तरी, तीही तुला माहीत असू दे.

English meaning

Now the demonic qualities which make for evil, are being described in the flow of my address to you, which is like a creeper full of thorns of various vices.

214
मूळ

पै त्याज्य त्यजावयालागी । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥214॥

मराठी अर्थ

कारण, ती त्याज्य व निरुपयोगी अशी जरी असली तरी जिचा त्याग करावयाचा तिची लक्षणेही चांगल्या प्रकारे ऐकलेली पाहिजेतच.

English meaning

My dear, in order to discard something which is very bad we have to observe it and know that it is so. Therefore, though this evil group of qualities is absolutely undersirable, it is necessary to listen to their exact nature.

215
मूळ

तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषीघोरी । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥215॥

मराठी अर्थ

तरी जीवांना घोर नरकव्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर दोष एकत्र जमून त्यांचा मेळावा झाला, ती ही “आसुरी” संपत्ति होय.

English meaning

Dear Arjuna, in order to earn the great suffering of total degradation, the whole gang of sins has come together with ferocious intent and in this way, this evil property has come into being.

216
मूळ

नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥216॥

मराठी अर्थ

जगांतील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे एक “कालकूट” विष म्हणावे त्याप्रमाणे जगांतील सर्व दोषांचे एकत्रीकरण ती ही आसुरी संपत्ति होय.

English meaning

Or just as when all the poisons are mixed together, the mixture is called Kalakoot, similarly when all the sins are rolled together into a ball, it is called the demonic riches or evil property.

217
मूळ

तरी तयाचि असुरा । दोषांमाजी जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥217॥

मराठी अर्थ

तरी, अर्जुना, ह्या दोषयुक्त आसुर संपत्तीमध्ये जो प्रमुख म्हणून गणला जातो असा जो दंभ तो असा असतो.

English meaning

And O the great warrior, now I will tell you the characteristics of hypocrisy, which is famous for its great power.

218
मूळ

जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनी । ते तीर्थचि परी पतनी । कारण होय ॥218॥

मराठी अर्थ

आपल्या जननीचे स्मरण केव्हांही पवित्रच होय; पण, तेच जनांत तिच्या आंगच्या दोषाविष्करणाच्या निमित्ताने केले असता जसे पतनाला कारण होते.

English meaning

No doubt, a man's mother is really venerable and sacred but if he exposes her naked in a public place it will be disastrous for his spiritual merit.

219
मूळ

का विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटा । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥219॥

मराठी अर्थ

किंवा गुरूपासून प्राप्त झालेली गुह्यविद्या चव्हाट्यावर उघडी मांडली असता, ती मूळची हितकारिणी खरी, पण तीच अनिष्टाला कारणीभूत होते.

English meaning

No doubt, the knowledge or the techniques taught by a man's teacher is very useful to him, but if he reveals the secrets to others, that action will be detrimental to his welfare.

220
मूळ

पै आंगे बुडता महापूरी । जे वेगे काढी पैलतीरी । ते नांवचि बांधिलिया शिरी । बुडवी जैसी ॥220॥

मराठी अर्थ

जिचे स्वतःचे बहुतेक अंग पुरांत अगर पाण्यात बुडालेले असते तरी जी वेगाने पैलतीराला पोंचविते ती नावच डोक्यावर घेऊन पाण्यात शिरणारा जसा निश्चित बुडणार.

English meaning

If a boat which helps a man to cross the flooded river, is lifted and placed on the head of a man, it will only cause the man to be drowned.

221
मूळ

कारण जे जीविता । ते वानिले जरी सेविता । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥221॥

मराठी अर्थ

जीवन रक्षण करणारे म्हणून अन्न सेवनसमयी स्तुतियोग्य असले, तरी अर्जुना, तेच प्रमाणाबाहेर सेवन केले असता विषाप्रमाणे बाधक होते.

English meaning

No doubt, food is helpful for keeping oneself alive, but if it is gulped down profusely, it may be like a poison.

222
मूळ

तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागी होय ॥222॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे इहपरलोकींचा सखा असा जो स्वधर्म घडेल त्याची चव्हाटयावर टिमकी वाजविल्यास तोच पतनाला कारणीभूत होतो.

English meaning

No doubt, religions performances are helpers both in this life and the other world, but if one publicly advertises about one's good deeds, it becomes a blemish.

223
मूळ

म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥223॥

मराठी अर्थ

म्हणून आचरलेल्या धर्माचा स्वत:च्या वाचेने डांगोरा अगर प्रसिद्धि करीत बसले असता त्यालाच अधर्माचे फल प्राप्त होतें; व अर्जुना, दंभ म्हणतात तो हाच होय. 23]

English meaning

O the great warrior! If we babble and proudly declare about our own religious rituals or other actions done through sympathy, and propagate them in all the quarters of this world; then that religion become irreligious. That is called hypocrisy.

224
मूळ

आता मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥224॥

मराठी अर्थ

आता, मुर्खाला चार अक्षरे येत झाली की तो जसा ब्रह्मसभेलाही तुच्छ लेखतो !

English meaning

Now I shall describe what is arrogance. When a foolish person learns something about literature, he becomes so proud that he begins to criticize the conference of people who have realized Brahman.

225
मूळ

का मादुरी लोकाचा घोडा । गजपतिही मानी थोडा । का कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥225॥

मराठी अर्थ

किंवा एखाद्या शिलेदाराला आपला घोडा गजराजापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वाटावे, किंवा, काट्यांच्या वईवरील सरडयाला आपण आकाश पायांखाली आणिले असे वाटावे,

English meaning

Or a wild horse of a horse-rider thinks itself superior to even the divine elephant Airawata, or a chamelion on the top of a thorny hedge thinks that heaven is not so far away.

226
मूळ

तृणाचेनि इंधने । आगी धावे गगने । थिल्लरबळे मीने । न गणिजे सिंधु ॥226॥

मराठी अर्थ

गवताच्या मोळीचा जाळ जसा तात्काळ आकाशात उंचवर जातो, किंवा डबक्यातील माशाला जसा सागर तुच्छ वाटतो.

English meaning

A little fire when it touches a heap of dried grass, flares up with such a force that we feel that it wants to touch the sky; or a fish in a little pond thinks very little of the vast sea, because it is satisfied with the pond.

227
मूळ

तैसा माजे स्त्रिया धने । विद्या स्तुती बहुते माने । एके दिवसीचेनि परान्ने । अल्पकु जैसा ॥227॥

मराठी अर्थ

एखादे दिवशी मिळणाऱ्या परान्नावर जसे दारिद्रयाने मातावे त्याप्रमाणे, स्त्री, धन, विद्या, स्तुति, मान वगैरे क्षणिक अनुकूल गोष्टींनी जो उन्मत्त होतो.

English meaning

Similarly a man becomes proud and arrogant by various causes such as possesion of beautiful woman, money, education, praise done by others and honour; like a beggar thinks himself very rich even by one day's food given to him by others.

228
मूळ

अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडे मूर्ख ॥228॥

मराठी अर्थ

अभ्रांच्या छायेच्या प्राप्तीवर विश्वासून निदैव्याने आपले घर मोडावे, किंवा, मृगजलाची नदी पाहून मुर्खाने आपले जलसंचय फोडावे.

English meaning

This foolish arrogance is like the stupid action of a man who thinks that the shade of a cloud is sufficient and therefore demolishes his house, or like the stupidity of a man who demolishes his water tank by seeing the illusory waters of mirage.

229
मूळ

किंबहुना ऐसैसे । उतणे जे संपत्तिमिसे । तो दर्पु गा अनारिसे । न बोले घेई ॥229॥

मराठी अर्थ

किंबहुना, संपत्तीच्या वगैरे योगाने अशा प्रकारे डोळ्यांवर जो धूर चढतो तो दर्प म्हणावा, हे वचन मुळीच अन्यथा नव्हे.

English meaning

In short, to be proud by possession of anything is called arrogance. There is no exception to this.

230
मूळ

आणि जगा वेदी विश्वासु । आणि विश्वासी पूज्य ईशु । जगी एक तेजसु । सूर्युचि हा ॥230॥

मराठी अर्थ

आणि सर्व लोकाचा वेदांच्या ठिकाणी विश्वास असून ते ईश्वर हीच जगात पूज्य वस्तु आहे, असे विश्वासाने मानितात, व जगात सर्वात तेजिष्ठ व्यक्ते एक सूर्यच होय.

English meaning

Now I shall tell you about self-esteem or pride. In the world, all the people have faith in Vedas and in this faith God is believed to be the Supreme; and that God is like the Sun who illuminates all the universe.

231
मूळ

जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणे निर्विवाद । जगा पढिये ॥231॥

मराठी अर्थ

जगांतील लोकांच्या इच्छेची सीमा म्हणजे एक सार्वभौम, (पृथ्वीची मालकी) पद हीच होय; तसेच केव्हांही मरण येऊ नये हीच सर्वाची नित्य इच्छा असते.

English meaning

All the world has hopes for great all-embracing glory and it always hopes not to die at all;

232
मूळ

म्हणौनि जग उत्साहे । याते वानू जाये । की ते आइकोनि मत्सरु वाहे । फुगो लागे ॥232॥

मराठी अर्थ

वगैरे कारणांस्तव वेदाची व ईश्वराची थोरवी कोणी वर्णन करू गेल्यास ज्याच्या चित्तांत मत्सर उत्पन्न होऊन जो स्वतःबद्दलच्या प्रतिष्ठेच्या बुद्धीने फुगतो.

English meaning

If the world praises God because of this, what strange or wrong is there in that? But a man of pride, who has this vice, becomes bitter and jealous about it all and by being puffed up, says

233
मूळ

म्हणे ईश्वराते खाये । तया वेदा विष सूये । गौरवामाजी त्राये । भंगीत असे ॥233॥

मराठी अर्थ

आणि म्हणतो-ईश्वर वगैरे आम्ही गिळून बसलो आहो, वेद वगैरे आम्ही मारून टाकले आहेत, व श्रेष्ठांतील श्रेष्ठ रक्षण करणाराचाही आम्ही पराभव करू.

English meaning

"I will eat up your God! I will put Vedas to death by poisoning and by my own powers I will destroy all their importance!"

234
मूळ

पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेने आपांपती । वैरी केला ॥234॥

मराठी अर्थ

पतंग ज्याप्रमाणे दीपज्योतीचा द्वेष करितो, काजवा जसा सूर्यप्रकाशाचा तिटकारा करितो, किंवा टिटवीने जसा समुद्राशी वैरभाव जोडावा.

English meaning

Just as a moth hates a flame, a firefly disrespects the Sun or just as the little bird became the enemy of the ocean because its young ones fell in the ocean;

235
मूळ

तैसा अभिमानाचेनि मोहे । ईश्वराचेही नाम न साहे । बापाते म्हणे मज हे । सवती जाली ॥235॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अभिमानाच्या भरी भरून ज्याला ईश्वराचे नांव घेतलेलेही (सामर्थ्यवान् म्हणून) सहन होत नाही किंवा जो स्वत:च्या पित्यालाही हा जेथे तेथे एक सवतीप्रमाणे प्रतिबंधच आहे असे मानितो.

English meaning

Similarly, this man, out of his misplaced pride, cannnot tolerate even the mention of the name of God. He even hates his father because he fears that his father may share his property.

236
मूळ

ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥236॥

मराठी अर्थ

असा फाजील मानाच्या भावनेने खुंटयाप्रमाणे ताठ झालेला व अभिमानाने कोणासही न लेखणारा जो, तो खरोखर नरक प्राप्तीचा सीधा रस्ताच होय.

English meaning

He is thus sullenly arrogant and very much proud of himself. He should be known as the highway to hell.

237
मूळ

आणि पुढिलांचे सुख । देखणियाचे होय मिख । चढे क्रोधाग्नीचे विख । मनोवृत्ती ॥237॥

मराठी अर्थ

आणि दुसरा सुखी आहे असे पहातांच ज्याचे मन क्रोधाग्निविषाने संतप्त होते.

English meaning

What is the sign of anger? When this man sees someone else happy, he invardly becomes poisoned by anger.

238
मूळ

शीतळाचिये भेटी । तातला तेली आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटी । कोल्हा जैसा ॥238॥

मराठी अर्थ

उकळणारे तेलांत थंड पाणी टाकले असता जसा भडका उडतो किंवा चंद्रोदय पाहून कोल्हा जसा मनात तडफडतो.

English meaning

Just as hot oil flares up if a little water falls in it and just as a fox becomes irritated at the sight of the moon;

239
मूळ

विश्वाचे आयुष्य जेणे उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥239॥

मराठी अर्थ

ज्याच्या उदयानं सर्वं विश्वाचे व्यापार सुरू होतात, तो प्रातःकाळ येतांच पापी घुबडाचे जसे डोळे फुटतात ! (त्यास दिसेनासे होते )

English meaning

Just as when the Sun rises illuminating the life of the world in the morning, the eyes of an owl become useless;

240
मूळ

जगाची सुखपहांट । चोरा मरणाहूनि निकृष्ट । दुधाचे काळकूट । होय व्याळी ॥240॥

मराठी अर्थ

रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेचा काळ साऱ्या जगास सुखकर वाटतो खरा; पण तोच चोरांना प्राणसंकटाचा वाटतो किंवा, दुधा सारखा पवित्र व मिष्ट पदार्थही सापास पाजिला असता जसे विष बनते.

English meaning

Just as the dawn which gives happiness to the world, becomes a source of great annoyance to the robbers, or just as milk sipped by a serpent turns into venom only.

241
मूळ

अगाधे समुद्रजळे । प्राशिता अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कही ॥241॥

मराठी अर्थ

अगाध अशा सागराच्या पोटांतही वडवानल अधिकच भडकतो व त्याला जशी कधी शांति लाभत नाही.

English meaning

Or just as the fire in the sea does not become extinguished by its waters but becomes more aggravated.

242
मूळ

तैसा विद्याविनोदविभवे । देखे पुढिलांची दैवे । तव तव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥242॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या, विनोद, ऐश्वर्य व सौभाग्य जो जो दृष्टीस पडेल तो तो ज्याचा राग वाढतो तो “क्रोध” होय असे समज.

English meaning

Similarly this man of devilish character becomes greatly annoyed and irritated at the sight of happiness, learning, and other virtues of others. This disturbance should be called "Anger".

243
मूळ

आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणे ते वृष्टी । इंगळांची ॥243॥

मराठी अर्थ

ज्याचे मन म्हणजे जणु सर्पाचे वसतिस्थान होय, ज्याची दृष्टि बाणाग्रांसारखी तीक्ष्ण (असहिष्णु) व ज्याचे भाषण जणु अग्निवर्षाव होय.

English meaning

Now I shall tell you what is the quality of stern-ness. His mind is just like the hole where a serpent lies hidden, his eyes are as sharp as arrows and his talk is like the downpour of burning coal.

244
मूळ

येर जे क्रियाजात । ते तिखयाचे कर्वत । ऐसे सबाह्य खसासित । जयाचे गा ॥244॥

मराठी अर्थ

ज्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवताप्रमाणे कांपणाऱ्या, असे ज्याचे अंतर्बाह्य व्यापार दुसऱ्याला झोंबणारे असतात.

English meaning

All other actions of this man are like the sharp saw. All his mental and outward life is sharp and hard like this.

245
मूळ

तो मनुष्यात अधमु जाण । पारुष्याचे अवतरण । आता आइक खूण । अज्ञानाची ॥245॥

मराठी अर्थ

तो पारुष्याची (काठिण्य) मूर्ती असून मनुष्यातील अधम मनुष्य होय असे जाण. आता अज्ञानाची लक्षणे सांगतो, ती श्रवण कर.

English meaning

Know this man as the lowest of human beings. He is the incarnation of stern-ness. Thus I have told you about this vice. Now listen to the mark of ignorance.

246
मूळ

तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणे पाषाणु जैसा । का रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥246॥

मराठी अर्थ

तरी शीत किंवा उष्ण स्पर्शाची दगडाला जशी भिन्नत्वाते जाण नसते किंवा रात्र आणि दिवस हा भेद जात्यंधाला जसा ज्ञात नसतो.

English meaning

Just as a stone does not feel the difference between hot and cold touch, or a born-blind man does not know the difference between day and night;

247
मूळ

आगी उठिला आरोगणे । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । का परिसा पाडु नेणे । सोनया लोहा ॥247॥

मराठी अर्थ

अग्नि भडकल्यावर त्याला जसा भक्ष्य काय किंवा अभक्ष्य काय हा विचार नसतो किंवा सोने व लोखंड हा भेद जसा परिसाला माहित नसतो. (भेद पहाण्यासाठी स्पर्श होतांच लोह लोहत्वाला मुकते म्हणून).

English meaning

Just as a fire which is conflagrated does not care what is to be gutted and what is not, or a stone of 'Parees', does not know the difference between the gold and the iron;

248
मूळ

नातरी नानारसी । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखो नेणे ॥248॥

मराठी अर्थ

किंवा अनेक प्रकारच्या रसांत प्रवेशूनही पळी जशी त्यातील एकाहि रसाची चव जाणत नाही.

English meaning

Or just as the ladle dipped in all kinds of food articles of various tastes, does not know any of those tastes;

249
मूळ

का वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखी । तैसे कृत्याकृत्यविवेकी । अंधपण जे ॥249॥

मराठी अर्थ

किंवा वाऱ्याला वाहतांना मार्गाच्या योग्यायोग्यतेची जशी परीक्षा नसते, तसे कर्तव्य काय की अकर्तव्य काय इत्यादि विवेक ज्याला कधीही शिवत नाही असा अंध असतो.

English meaning

Or just as the wind does not examine what is the highway and what is the by- lane; there is in a man, total insensitivity about what is the right action and what is prohibited action.

250
मूळ

हे चोख हे मैळ । ऐसे नेणोनिया बाळ । देखे ते केवळ । मुखीचि घाली ॥250॥

मराठी अर्थ

हे चांगलं, हे घाणेरडे वगैरे काहीही न जाणता बालक जसे हाताला लागेल ते तोंडात घालते.

English meaning

This is like a child which puts anything in its mouth without knowing what is good or what is bad.

251
मूळ

तैसे पापपुण्याचे खिचटे । करोनि खाता बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥251॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणेपापपुण्य इत्यादि भेदाभेद न मानता त्याची खिचडी (एकत्र) करून ज्याच्या सर्व क्रिया चालतात, व ज्याला इष्टानिष्ट भोग अशी काही कल्पनाही नसते, अशी जी स्थिति,

English meaning

This is a state of mind which does not feel anything in committing sinful or good actions.

252
मूळ

तिये नाम अज्ञान । या बोला नाही आन । एवं साही दोषांचे चिन्ह । सांगितले ॥252॥

मराठी अर्थ

त्याला अज्ञान असे म्हणावे ह्यात शंका नाहीं; ह्याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे आम्ही सांगितली.

English meaning

This is called ignorance. Thus I have shown to you the marks of all the six bad qualities.

253
मूळ

इहीच साही दोषांगी । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंग साने ॥253॥

मराठी अर्थ

हे सहाच दोष खरे, पण, त्यांनीच ती फार बलिष्ठ झाली आहे. (सव्वीस गुण असलेल्या देवी संपत्तीपेक्षांही) (कारण पराक्रम संख्येवर अगर आकारावर नसतो). भुजंगी म्हणजे नागीण अंगाने दोरीप्रमाणे लहान असली तरी तिचे विष सर्व विषांत श्रेष्ठ असते.

English meaning

With these six vices the demonic qualities are made more forceful just as there is very severe poison even in a small serpent.

254
मूळ

का तिघा वन्हीच्या पांती । पाहता थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करू न पुरे ॥254॥

मराठी अर्थ

तीन प्रकारचे अग्नि (प्रलयाग्नि, विद्युदग्नि, वडवाग्नि ) ही संख्या लहान खरी, पण त्यांच्या प्राणाहुतीला विश्वही पुरे पडत नाही.

English meaning

There are three types of fires, one is the fire at the time of total destruction, fire in the lightning and in the sea. Though these fires may appear small at the beginning, they devour all the universe like nothing! These six vices are like those fires.

255
मूळ

धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण । तया तिहीची दुणी जाण । साही दोष हे ॥255॥

मराठी अर्थ

त्रिदोष झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेल्यानेही मरण चुकत नाही; हे सहा दोष म्हणजे त्या. तीन दोषांची सर्व बाजूनी दुप्पट आहे असे समज.

English meaning

When all the three products in the body, namely cough, gasses and the bile, become united, death cannot be averted even if God is propiated. These six vices are double than those three!

256
मूळ

इही साही दोषी संपूर्णी । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥256॥

मराठी अर्थ

ह्या संपूर्ण सहा दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली म्हणून काही ती आसुरी संपत्ति पराक्रमांत कमी नाही.

English meaning

The demonic quality is built up on the support of all these six vices. Therefore it is never weakened.

257
मूळ

परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । का येती निंदकापासी । अशेष पापे ॥257॥

मराठी अर्थ

किंवा सर्व पापग्रहांची एकाच राशीवर एकेवेळी दृष्टि यावी, किंवा निंदकापाशी (पदरात) जशी अशेष पापे येतात.

English meaning

Just as there is a concentration of bad planets in one Rashi (zodiacal sign) or just as all the sins gather near a man who is a cynic.

258
मूळ

मरणाराचे आंग । पडिघाती अवघेचि रोग । का कुमुहूर्ती दुर्योग । एकवटती ॥258॥

मराठी अर्थ

मरणाराच्या शरीराला जसे सर्व रोग व्यापतात किंवा कुमुहूर्तावर सर्वच कुयोग एकत्र येतात.

English meaning

Or just as all the diseases attack a man whose death is near, or just as at a bad time all unauspicious planetary conjunctions happen to be evident,

259
मूळ

विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसे दोषी इही नरा । अनिष्ट कीजे ॥259॥

मराठी अर्थ

चोराला त्याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य सांपडावा, शिणलेला मनुष्य महापुरांत लोटावा, त्याप्रमाणे, ह्या सहा दोषांनी जीवाचे अत्यंत अहित होते.

English meaning

Or just as a trusting man should be handed over to a robber, or a man who is already tired should be thrown in a great flood; so, these six vices cause very evil things to happen.

260
मूळ

का आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥260॥

मराठी अर्थ

किंवा मरण ओढवले म्हणजे शेळीला जशी सात नाग्यांची इंगळी चावावी तसे हे साही दोष ज्याचे वाटोळे व्हावयाचे आहे त्याच्या वाट्यास येतात.

English meaning

When the life of a she-goat is at an end, she suffers pain as if bitten by a very poisonous scorpion, Similarly all these six vices bite the man.

261
मूळ

मोक्षमार्गाकडे । जै यांचा आंबुखा पडे । तै न निघे म्हणौनि बुडे । संसारी तो ॥261॥

मराठी अर्थ

मोक्ष म्हणजे काय ह्याचे ह्याला मुळीच ज्ञान नसल्यामुळे, जो अखंड संसारसागरांत बुडलेलाच असतो.

English meaning

Even if there is a little tendency to turn towards the path of liberation, he adamantly decides not to do so and plunges into his mundane life;

262
मूळ

अधमा योनींच्या पाउटी । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटी । बैसणे घे ॥262॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, एकापेक्ष एक नीच योनीच्या क्रमाने घसरत घसरत जो अखेर स्थावर योनींतीलही शेवटची पायरी गांठतो.

English meaning

He goes further and further down the steps of lower categories of rebirths and lastly goes even below the category of stone;

263
मूळ

हे असो तयाच्या ठायी । मिळोनि साही दोषी इही । आसुरी संपत्ति पाही । वाढविजे ॥263॥

मराठी अर्थ

हे असो; हे सहाही दोष एकत्र होऊन त्याच्या ठिकाणी ह्या आसुरी संपत्तीची अत्यंत वाढ करितात.

English meaning

But enough with this description. All these vices increase his character of demonic nature.

264
मूळ

ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनी । सांगितलिया चिन्ही । वेगळाल्या ॥264॥

मराठी अर्थ

अशा जगात प्रसिद्ध असलेल्या ह्या दोन संपत्तींची लक्षणे आम्ही वेगवेगळाली सांगितली.

English meaning

So, I have told you these two separate types of characters or qualities which are well - known in the world.

265
मूळ

इया दोन्हीमाजी पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्ये पाहली । उखाचि जाण ॥265॥

मराठी अर्थ

ह्या दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवसंपत्ति, तो मोक्षसूर्याचा उषःकालच समज.

English meaning

Know that the first of these two which is divine property, is as if the dawn of the Sun of liberation.

266
मूळ

येरी जे दुसरी । संपत्ति का आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवा ॥266॥

मराठी अर्थ

दुसरी जी आसुरी संपत्ति, ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोहबेडीच होय.

English meaning

The second which is the demonic property is really the iron chain of enticement and attraction for all the Jeevas.

267
मूळ

परी हे आइकोनि झणे । भय घेसी हो मने । काय रात्रीचा दिने । धाकु धरिजे ॥267॥

मराठी अर्थ

पण हे ऐकून तु कदाचित् मनात कचरशील हो ! अरे, रात्र गांठील अशी सूर्याला कधी भीति पडली आहे काय ?

English meaning

But you may perhaps be afraid by hearing this. But do not fear. Can the day become afraid of the night?

268
मूळ

हे आसुरी संपत्ति तया । बंधालागी धनंजया । जो साही दोषा यया । आश्रयो होय ॥268॥

मराठी अर्थ

जो ह्या सहाही दोषांचे आश्रयस्थान असतो, त्यालाच ही आसुरी संपत्ति बंधनाला कारण होते.

English meaning

Only he who harbours these six vices, O Dhananjaya, is bound by this evil property, not by anybody else.

269
मूळ

तू तव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥269॥

मराठी अर्थ

अर्जुना, तु तर वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खाणच जन्माला आला आहेस.

English meaning

O Pandava, you are, however, born with the divine qualities which are just now described.

270
मूळ

म्हणौनि पार्था तू या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावे उवाया । कैवल्याचिया ॥270॥

मराठी अर्थ

म्हणून पार्था, ह्या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन कैवल्यरूप सुखाचा धनी हो.

English meaning

Therefore, O Partha, you should own these divine virtues and enjoy the bliss of Freedom, the Absolute one-ness.

271
मूळ

आणि दैवा आसुरा । संपत्तिवंता नरा । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥271॥

मराठी अर्थ

अरे, ह्या दैवी आणि आसुरी संपत्तींनी युक्त असलेल्या मनुष्यांचे जे अनादिसिद्ध असे रुळलेले मार्ग आहेत.

English meaning

There are, right from the beginning, the two streams of people either with divine qualities or bad qualities, continuously flowing in this world.

272
मूळ

जैसे रात्रीच्या अवसरी । व्यापारिजे निशाचरी । दिवसा सुव्यवहारी । मनुष्यादिकी ॥272॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे, निशाचरादिकांचे व्यवहार रात्रीच्या वेळी चालतात व दिवसा मनुष्यादिकांचे सरळ व्यापार सुरू असतात.

English meaning

This division is like the activities of creatures of the night going on at night and the activities of human and other beings going on smoothly in the daytime.

273
मूळ

तैसिया आपुलालिया राहाटी । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥273॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, पार्था, या जगात आपापल्या अधिकाराप्रमाणे दैवी व असुरी संपत्तीचे लोक ठरलेल्या भिन्न भिन्न मार्गानी रहाटत असतात.

English meaning

O the crowned one! Like this, both the divine and the demonic divisions of people function according to their nature in this world.

274
मूळ

तेवीचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावी । मागील ग्रंथी बरवी । सांगितली ॥274॥

मराठी अर्थ

त्याच प्रमाणे, मागे ज्ञानकथनप्रसंग (9 अध्यायात ) दैवी संपत्तीचे विस्ताराने आम्ही वर्णन केले आहे.

English meaning

Out of these two, I have earlier described properly the divine quality in the chapter devoted to the path of knowledge, etc.

275
मूळ

आता आसुरी जे सृष्टी । तेथिची उपलऊ गोठी । अवधानाची दिठी । दे पा निकी ॥275॥

मराठी अर्थ

आता जी आसुरीसृष्टि किंवा संपत्ति तिचे तुला अधिक कथन करितों; तिकडे नीट अवधान ठेव.

English meaning

Now we will tell about the demonic property. Please listen to it carefully.

276
मूळ

तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । का अपुष्पी मकरंदु । न लभे जैसा ॥276॥

मराठी अर्थ

अरे, वाद्यादि साधनांशिवाय नाद जसा श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, किंवा जेथे पुष्पादि पदार्थ नाहीत, तेथे जसा सुगंध येत नाही.

English meaning

There is no sound without any instrument to produce it; and without a flower, honey cannot be had.

277
मूळ

तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जव एकाधे शरीर । माल्हातीना ॥277॥

मराठी अर्थ

तशी ही आसुरी संपत्ति, एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय स्वतंत्रतया दृष्टिगोचर होण्यासारखी नाही.

English meaning

Similarly, this evil nature cannot be manifest until it gets some 'body' to reside in it.

278
मूळ

मग आविष्कारला लांकुडे । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेही सांपडे । आटोपली हे ॥278॥

मराठी अर्थ

काष्ठाचा आश्रय केलेला अग्नि जसा स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे, प्राणिदेहाच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ति नजरेस येते.

English meaning

But when it gets some such body, then it occupies it and fills it like fire occupying any wood and burning it.

279
मूळ

ते वेळी जे वाढी ऊसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥279॥

मराठी अर्थ

उसाच्या वाढीबरोबर जशी त्यातील रसाचीही वाढ होत असते, त्याप्रमाणे, प्राण्यांच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने असणाच्या ह्या आसुरी संपत्तीचीही वाढ होत असते.

English meaning

Then, just as the shape of the juice in the sugar-cane is equal to the shape of that cane, so, the evil property takes the shape of the body in which it thrives.

280
मूळ

आता तयाचि प्राणिया । रूप करू धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदी ॥280॥

मराठी अर्थ

आता अर्जुना, अशा ह्या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले जे प्राणी आहेत, त्यांचेच वर्णन करू.

English meaning

O Dhananjaya, now we will describe the nature of those beings in whom the vices of the evil are fully developed.

281
मूळ

तरी पुण्यालागी प्रवृत्ती । का पापाविषयी निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचे मन ॥281॥

मराठी अर्थ

तरी पुण्याचरणाविषयी प्रवृत्ति असावी व पापमार्गापासून निवृत्त व्हावे ह्या जाणीवेचा ज्याच्या मनात पूर्ण अंधार आहे.

English meaning

In their mind there is dark night of ignorance regarding positive attitude about good deeds and avoidance of sins.

282
मूळ

निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पै ॥282॥

मराठी अर्थ

निर्गमन व प्रवेश करण्याला द्वार आहे की नाही ह्याचा विचार न करता आवेशाने घरटे बांधणारा कोशकीटक जसा आत कोंडून जाऊन संकटांत पडतो.

English meaning

They have no knowledge how to be free and how a man gets involved, just like the silkworm asleep in its pupae.

283
मूळ

का दिधले मागुती येईल । की न ये हे पुढील । न पाहाता दे भांडवल । मूर्ख चोरा ॥283॥

मराठी अर्थ

किंवा दिलेले पुढे येईल की नाही हा विचार न करता जो मूर्ख चोरांना भांडवल देतो.

English meaning

Or, they are as stupid as a fool who gives money to a robber, without caring whether that money will be received back from him or not.

284
मूळ

तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरी जनी । आणि शौच ते स्वप्नी । देखती ना ते ॥284॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ति किंवा निवृत्ति ह्या दोन्ही गोष्टींचा गंधही नसतो व शुद्धतेचे तर त्यांना कधी स्वप्नही पडत नाही.

English meaning

Similarly, the people with the domonic vice in them, do not know whether to do a certain thing or not to do it, and they do not see what is cleanliness, even in their dream.

285
मूळ

काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटो शके॥285॥

मराठी अर्थ

कदाचित् कोळसाही आपली काळिमा टाकील, कावळाही कदाचित् शुभ्र होईल, किंवा राक्षसांनाही कदाचित् मांसाचा वीट येईल !

English meaning

Perhaps a coal may be free of its black, a crow may look fair, or a monster may be tired of eating flesh.

286
मूळ

परी आसुरा प्राणिया । शौच नाही धनंजया । पवित्रत्व जेवी भांडिया । मद्याचिया ॥286॥

मराठी अर्थ

परंतु मद्याने भरलेले भांडे जसे केव्हांही पवित्र म्हणण्याची सोय नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध असण्याची गोष्टच नको !

English meaning

But, O Dhananjaya, the demon-like peple have no cleanliness, just as a pot of wine is never clean.

287
मूळ

वाढविती विधीची आस । का पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥287॥

मराठी अर्थ

कारण, विधीचे पालन करणे, वाडवडिलांची चालरीत पहाणे, शुद्धाचाराची चाड राखणे वगैरे भाषाही त्यांचे गावी नसते.

English meaning

They have no thought about performance of rites and rituals, have no respect for their forefathers and do not care for proper action.

288
मूळ

जैसे चरणे शेळियेचे । का धावणे वारियाचे । जाळणे आगीचे । भलतेउते ॥288॥

मराठी अर्थ

शेळीच्या चरण्यात जशी वगळावगळ नसते, वारा जसा कोठेही वाहतो कि वा आग जशी सांपडेल तो भाग जाळीत सुटते

English meaning

Just as a she-goat goes on grazing or the wind blows continuously or the fire simply goes on burning things;

289
मूळ

तैसे पुढा सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येसि कीर वैर । सदाचि तया ॥289॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीचे लोक इच्छेला प्राधान्य देऊन स्वैराचार करतात व सत्याचे व त्यांचे हटकून नित्य वैर असते

English meaning

Similarly these persons behave without any inhibition or check, and they have enmity with truth at all times.

290
मूळ

जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥290॥

मराठी अर्थ

आपल्या नांगीने लोकांना विंचू गुदगुल्या करितो हे जितके खरे. तितकीच ते सत्य बोलतात हे खरे समजावे !

English meaning

If a scorpion will ever tickle instead of biting with its sting, if that is at all possible, then only one can expect these people to speak truth.

291
मूळ

आपानाचेनि तोंडे । जरी सुगंधा येणे घडे । तरी सत्य तया जोडे । आसुरांते ॥291॥

मराठी अर्थ

अपानवायु ( गुदद्वारचा वास ) सुगंधी असतो असे कधी घडले. असेल तर तो कधीतरी सत्य बोलला असेल ही तितकेच शक्य आहे.

English meaning

If the intestinal gas will ever give good fragrance from its farting, then only these demons will have an iota of truth in them.

292
मूळ

ऐसे ते न करिता काही । आंगेचि वोखटे पाही । आता बोलती ते नवाई । सांगिजैल ॥292॥

मराठी अर्थ

अरे, त्यांनी काहीही क्रिया केली नाही तरी ते स्वभावतः किंवा आंगानेच टाकाऊ असतात; आता त्यांच्या बोलण्याचा चमत्कार तुला सांगतो.

English meaning

Even if they do not actually do any evil things, by nature itself they are falsifiers. Now I will tell you the strangeness of their talk.

293
मूळ

एऱ्हवी करेयाच्या ठायी चांग । ते तयासि कैचे नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगे परीस ॥293॥

मराठी अर्थ

उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की, तो सरळ आहे असे म्हणता येईल ? असुरांची गोष्ट तशीच आहे. त्यांचे काय चांगले आहे असे म्हणावे ? पण प्रसंगाने सांगतों; श्रवण कर.

English meaning

Can we tell which of the limbs of a camel is proportionate so that we could call it as a beautiful limb? Similar is the nature of these demonic people.

294
मूळ

उधवणीचे जेवी तोंड । उभळी धुंवाचे उभड । हे जाणिजे तेवी उघड । सांगो ते बोल ॥294॥

मराठी अर्थ

यांच्या बोलाचे उघड वर्णन करणे म्हणजे, धुराडाच्या तोंडातून धुराच्या लोटाशिवाय दुसरे काय निघणार आहे ? तसेच ते ठरेल हे लक्षात असू दे.

English meaning

I will tell you. Please listen. Just as great gushes of smoke are emitted from the top hole of a tall chimney, similar are their words.

295
मूळ

तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥295॥

मराठी अर्थ

तरी विश्व हे अनादि असून त्याचा सर्वाधीश ईश्वर नियंता आहे व त्याच्या दरबारात धर्म्यक अधर्म्य ( न्याय की अन्याय ) हा निवाडा वेदनिर्णयावर अवलंबून असतो.

English meaning

The fact is that this universe is without beginning, and God is the conroller of this universe, which is declared to be true by Vedas on the open platform of the world.

296
मूळ

वेदी अन्यायी पडे । तो निरयभोगे दंडे । सन्यायी तो सुरवाडे । स्वर्गी जिये ॥296॥

मराठी अर्थ

वेदाज्ञेप्रमाणे जो अन्यायी असेल, त्याला नरकादि भोगांचा दंड भोगणे पडेल व न्यायी असेल त्याला सुखाने स्वर्गप्राप्ति होईल.

English meaning

It is the faith of all, that he who is decided by Vedas to be a sinner, suffers punishment in the hell and he who is decided by them to be a just man, enjoys happiness in the heaven.

297
मूळ

ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेते म्हणती ते वृथा । अवघेचि हे ॥297॥

मराठी अर्थ

अशी ही जी विश्वाची अनादि व्यवस्था अथवा घडी आहे, ती अर्जुना, हे सर्व लोक झुट किंवा व्यर्थ आहे असे म्हणतात.

English meaning

Now, O Partha, these demonic people call this whole arrangement which is proved to be without beginning in a time-frame, as false and they do not at all give credance to it.

298
मूळ

यज्ञमूढ ठकिले यागी । देवपिसे प्रतिमालिंगी । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे ॥298॥

मराठी अर्थ

यज्ञाच्या व्यसनाने वेडे झालेले यागाने ठकले, देवाचे वेड लागलेले प्रतिमादिकांनी ठकले, व समाधिभ्रमाने अणवी वस्त्रे परिधान केलेल्या योग्यांना नागविलें.

English meaning

They further say that: "Stupid people fond of ritualistic sacrifices are fooled by it, the worshippers of images are caught in the net of idol-worship and the so- called monks who don the saffron robes, are baffled by the idea of trance.

299
मूळ

येथ आपुलेनि बळे । भोगिजे जे जे वेटाळे । हे वाचोनि वेगळे । पुण्य आहे ? ॥299॥

मराठी अर्थ

ह्या जगात आपल्या सामर्थ्यावर जे जे भोगता येण्यासारखे असेल ते ते भोगण्यावाचून दुसरे कसले पुण्य आहे ?

English meaning

They say that whatever is available around us, should be enjoyed with all our strength. What other merit is there than this?

300
मूळ

ना अशक्तपणे आंगिके । वेगळवेटाळी न टके । ऐसा गादिजेवीण विषयसुखे । तेचि पाप ॥300॥

मराठी अर्थ

किंवा अंगच्या नेभळे पणामुळे विषयसुख साधने एकत्र करता न येऊन किंवा भोगता न येऊन जो दुःख भोगतो तेच पाप होय.

English meaning

And if a man cannot possess various things of enjoyment and simply has self-pity because he is too weak to enjoy them- that is the greatest sin.

301
मूळ

प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचे । तरी सर्वस्व हाता ये तयांचे । हे पुण्यफळ की ? ॥301॥

मराठी अर्थ

श्रीमान् लोकांचे प्राण घेणे हे जर पापच असेल तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हेही पुण्यफळ मानावयास नको काय ?

English meaning

They say that it is a sin to kill people who are rich, but it is also true that we get all their possessions, which is a merit.

302
मूळ

बळी अबळाते खाय । हेचि बाधित जरी होय । तरी मासया का न होय । निसंतान ? ॥302॥

मराठी अर्थ

सामर्थ्यवानाणे दुर्बळाला खावे हे जर खरोखर पाप असेल तर, माशांचे आजवर निसंतान का झाले नाही ?

English meaning

They further ask that if it is a sin that the stronger should eat the weaker, why are not the bigger fish without any progeny when they eat the smaller ones?

303
मूळ

आणि कुळे शोधूनि दोन्ही । कुमारेचि शुभलग्नी । मेळवीजती प्रजासाधनी । हेतु जरी ॥303॥

मराठी अर्थ

आणि कुलशील पाहून कुमार व कुमारी यांचा शुभमुर्हुतावर विवाह करणे हे जर प्रजाप्राप्ती चे साधन असेल.

English meaning

They say that people arrange marriages by carefully enquiring about the family background of the bride and bridegroom, after matching their horoscopes, and on a very auspecious day, but the main purpose of marriages is to produce children.

304
मूळ

तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाही संतती । तया कोणे प्रतिपत्ती । विवाह केले ? ॥304॥

मराठी अर्थ

तर- ज्यांच्या प्रजेला गणित नाही असे पशुपक्षादिकार्य विवाह कोणत्या मुहूर्तावर व कोणी लाविले होते ?

English meaning

Then, the beasts and the birds produce so many young ones, but what scriptures and horoscopes do they follow?

305
मूळ

चोरियेचे धन आले । तरी ते कोणासि विष जाले ? । वालभे परद्वार केले । कोढी कोणी होय ? ॥305॥

मराठी अर्थ

चोरीने मिळविलेले धन विषाप्रमाणे कोणास बांधिले आहे ? अथवा प्रेमाखातर केलेल्या परस्त्रीगमनाते कोणाच्या अंगावर कुष्ठ उठले आहे सांगा !

English meaning

Even if the money is earned by robbery, does that money become a poison? If there is love in extra- marital relationship, does it follow that the result of it is leprosy?

306
मूळ

म्हणौनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गावी । करी तो भोगी ॥306॥

मराठी अर्थ

म्हणून ईश्वर हा सर्वसत्ताधीश असून तो जीवांना धर्माधर्माचे फल भोगवितो व येथील शुभकर्माचे भोग त्यांना परलोकी (स्वर्गत) देतो.

English meaning

Therefore, if we go on to believe that God is the controller of all, he makes a man to reap the results of his good or bad actions, and the enjoyment or suffering in the other world depends upon what we do here,

307
मूळ

परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि ते वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥307॥

मराठी अर्थ

असे म्हणावे तर, परलोक किंवा देव हे केवळ परोक्ष किंवा प्रत्ययाला कधीही न येणारे असल्याने सर्व व्यर्थ आहेत, आणि शुभाशुभकर्मे करणाराच जर नाहीसा होऊन जातो तर भोग्य भोगणार तरी कोण ?

English meaning

Then we do not see the other world nor is God found anywhere. Therefore, all this doctrine is false. If the existence of the doer is disproved, where is the question of reaping the fruits of actions?

308
मूळ

येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा का स्वर्गलोकी । तैसाचि कृमिही नरकी । लोळतु श्लाघे ॥308॥

मराठी अर्थ

उर्वशीच्या उपभोगाने इंद्र जर स्वर्गात सुखी आहे असे म्हणाल किंवा म्हणावे तर येथे प्रत्यक्ष नरकांतील कीटकही तशा तऱ्हेचे स्त्रीसुख भोगून संतुष्ट आहेत !

English meaning

When we see the conditions in both the worlds as described, we find that the worm is equally enjoying its muddy environment as the God Indra is enjoying the company of Urvashi, the divine damsel.

309
मूळ

म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोही ठायी सुखभोगु । कामाचाचि तो ॥309॥

मराठी अर्थ

म्हणून नरकलोक किंवा स्वर्ग, तसेच पाप व पुण्य वगैरे काहीही नसून दोहीकडे कामतृप्तीनेच सुखभोग सारखा घडतो.

English meaning

Therefore, it is not proper to say that the heaven and the hell are the results of merit and sin respectively because the sexual passion is equally safisfied in both the conditions.

310
मूळ

याकारणे कामे । स्त्रीपुरुषयुग्मे । मिळती तेथ जन्मे । आघवे जग ॥310॥

मराठी अर्थ

म्हणून कामेच्छेने जेणे स्त्री व पुरुष ही एकत्रसंलग्न होतात तेथे जगांतील सर्व प्राण्यांची सहजच उत्पत्ति होते.

English meaning

So it is obvious that when male and female come together to satisfy their lust and sex, all the beings are born.

311
मूळ

आणि जे जे अभिलाषे । स्वार्थालागी हे पोषे । पाठी परस्परद्वेषे । कामचि नाशी ॥311॥

मराठी अर्थ

आणि स्वार्थाच्या इच्छेने आपण जे जे काही जोडतों, त्याचा वीट आल्यावर अगर द्वेष उत्पन्न झाला असता, आपली इच्छाच नाश करिते.

English meaning

Further just as this desire which nourishes people by mutual attraction, also becomes itself destroyer of all, due to mutual hatred.

312
मूळ

एवं कामावाचूनि काही । जगा मूळचि आन नाही । ऐसे बोलती पाही । आसुर गा ते ॥312॥

मराठी अर्थ

ह्या प्रमाणे सर्व लोकव्यवहाराला त्यांच्या इच्छेवाचून अन्य कहीही कारण नाही, असे आसुरीसंपत्तिमानांचे म्हणणे आहे.

English meaning

Such is the train of thought of these demonic people who say that there is no other base for the whole world except sexual desire.''

313
मूळ

आता असो हे किडाळ । बोली न करू पघळ । सांगताचि सफोल । होतसे वाचा ॥313॥

मराठी अर्थ

आता ह्या निंद्य कथा पुरेत; त्यांची अधिक चर्चा नको; कारण तसे करणे म्हणजे वाचा व्यर्थ शिणविण्यासारखे होय.

English meaning

But enough of this undesirable and dirty description because by going into prolonged explanation of these tendencies, we will only spoil our tongue.

314
मूळ

आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेही नाही चित्ती । निश्चयो एकु ॥314॥

मराठी अर्थ

आणि ईश्वराच्या नास्तित्वाबद्दल नुसती वायफळ बडबड करितात इतकेच नसून त्यांच्या चित्ताचही तसाच निश्चय असतो.

English meaning

And being jealous of god they go on simply giving vent to their bitterness, but they are not so firm in their opinions.

315
मूळ

किंबहुना उघड । आंगी लाऊनिया पाखांड । नास्तिकपणाचे हाड । रोविले जीवी ॥315॥

मराठी अर्थ

किंबहुना, असा उघडपणे अभिमानाने पाखांड मताचा स्वीकार करणारे हे लोक म्हणजे हा नास्तिकाचा बाजार आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्या हद्दीवर पुरलेले नास्तिकतेचे हाडुकच होय.

English meaning

Or we may say that just as a bone is buried vertically at the boundary of the locality of lower class people outside the main town, they bury the bone of atheism into their beings, by sponsoring the heretic atheism.

316
मूळ

ते वेळी स्वर्गालागी आदरु । का नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥316॥

मराठी अर्थ

अशा स्थितींत, स्वर्गाविषयी आदर, किंवा नरकाविषयी भय वगैरे चित्तांतील सर्व अंकुर जळून गेलेले असतात.

English meaning

In that event, both the respect for heavenly life and fear of hell, are burned down in their life.

317
मूळ

मग केवळ ये देहखोडा । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकी सुहाडा । बुडाले गा ॥317॥

मराठी अर्थ

मग, अर्जुना, हे आसुरी संपत्तीचे जन देहरूप खोड्यात गुंतून पडून, अपवित्र जलांतील बुडबुड्याप्रमाणे विषयरूप चिखलात बुडून राहातात.

English meaning

Dear Arjuna, thus they simply get caught in the strait-jacket of this body and get drowned in the, bubbling abnoxious material of sense-objects.

318
मूळ

जै आटावे होती जळचर । तै डोही मिळती ढीवर । का पडावे होय शरीर । तै रोगा उदयो ॥318॥

मराठी अर्थ

जलचरांचे निःसंतान होण्याचा योग आला की, त्या जलाशयापाशी कोळयांची गर्दी होते किंवा शरीरक्षय होण्याचा काल आला की, रोगोद्भव होत असतो.

English meaning

For example, when water in a pond begins to be dried up, the fish have their doom's day at hand because the fishermen come with their net; or when the time of death comes near, diseases become more prevalent.

319
मूळ

उदैजणे केतूचे जैसे । विश्वा अनिष्टोद्देशे । जन्मती ते तैसे । लोका आटू ॥319॥

मराठी अर्थ

धूमकेतूचा उदय म्हणजे जगावर कोसळणया अरिष्टाचे जसे पूर्वचिन्ह होय, त्याप्रमाणे असुरी संपत्तीच्या लोकाचा उदय किंवा भरणा म्हणजे लोकक्षयाचेच लक्षण होय.

English meaning

Or just as the very rise of the planet Ketu is indication of worse conditions on the earth; the very birth of these evil men is indicative of destruction of people.

320
मूळ

विरूढलिया अशुभ । फुटती तै ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥320॥

मराठी अर्थ

जसे पेरावे तसे उगवतो ह्या न्यायाने अशुभ पेरणीला अशुभच अकुर येतात तसेच हे लोक म्हणजे पापाचा डंका पिटणारे चालते जाहिरातीचे खांबच होत.

English meaning

When the seed of evil sprouts, these young offshoots of demonish people grow and we can say that these people are living pillars of victory of sins.

321
मूळ

आणि मागांपुढा जाळणे । वाचूनि आगी काही नेणे । तैसे विरुद्धचि एक करणे । भलतेया ॥321॥

मराठी अर्थ

आणि आग पुढे व मागे जे सांपडेल ते जसे जाळीत सुटते तशी ह्यांची कोणतीही कृति म्हणजे विरुद्ध अथवा करू नये तीच नेमकी असावयाची,

English meaning

And just as the fire does not know anything else than to burn both the back side and the front side, these people know only to do evil things.

322
मूळ

परी तेचि गा करणे । आदरिती संभ्रमे जेणे । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥322॥

मराठी अर्थ

परंतु तीच त्यांची क्रिया कशा तयारीने होत असते ते अर्जुना, तू श्रवण कर असे भगवान् म्हणाले.

English meaning

And listen how these people justify their stupid actions by tremendous pride- so said Shriniwas, the lord Shrikrishna.

323
मूळ

तरी जाळ पाणिये न भरे । आगी इंधन न पुरे । तया दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥323॥

मराठी अर्थ

अरे, जाळे पाण्याने भरले असे कधी होत नाही, किंवा अग्नीला काष्ठे पुरे झाली असेही कधी होत नाही; ह्या दुर्भर पदार्थाप्रमाणे ज्याची क्षुधा कधी शान्त नसते.

English meaning

The Lord said, "A net is not filled by water and the fire never finds fuel enough. Similarly these people have in them that desire, which is the most leading vice of unsatiable nature.

324
मूळ

तया कामाचा वोलावा । जीवी धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥324॥

मराठी अर्थ

मनामध्ये काम किंवा इच्छा यास आश्रय देऊन, अर्जुना, जे त्यांना दंभ व मान ह्यांची आणखी जोड देतात.

English meaning

And they hold fast to that desire and develop aound them the hypocrisy of devilish intention as well as insolence.

325
मूळ

मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तव जरा । चढता आंगी ॥325॥

मराठी अर्थ

आधीच माज आलेल्या हत्तीला आणखी दारू पाजावी त्याप्रमाणे हे जसेजसे वृद्ध होतात, तसा तसा त्यांच्या अंगात उन्मत्तपणा वाढत जातो.

English meaning

Then they have that pride and stubborness in their character even in their old age, similar to a wild elephant, who is given intoxicating liquor to drink.

326
मूळ

आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानू निर्वाहो । निश्चयाचा ॥326॥

मराठी अर्थ

मुळात आग्रही स्वभाव आणि त्यात मूर्खपणाची भर, मग अशा स्थितीत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे कोठवर वर्णन करावे ?

English meaning

They have already an adamant nature over and above their foolishness; then their adamancy really becomes indescribable.

327
मूळ

जिही परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिही कर्मी होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥327॥

मराठी अर्थ

ज्याने दुसऱ्याला पीडा होईल किंवा ज्यांच्या जीवाला धोका पोचेल अशा कर्माविषयी ज्यांची जन्मत:च प्रवृत्ति असते.

English meaning

Right from the birth, these people are expert in comitting such actions, which are definitely harmful to others and which even crush people to death.

328
मूळ

मग आपुले केले फोकारिती । आणि जगाते धिक्कारिती । दाही दिशी पसरिती । स्पृहाजाळ ॥328॥

मराठी अर्थ

मग आपल्या कृत्यांची चहूकडे बढाई मिरवितात आणि साऱ्या जगाला तुच्छ लेखतात आणि आपल्या इच्छा दाही दिशांकडे मोकळ्या सोडतात.

English meaning

Furthermore they boast of their own preposterous crimes all over the world and scornfully disregard all others. In short the net of their desires is spread by them in all the ten directions.

329
मूळ

ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणती पापे । धर्मधेनु खुरपे । सुटले जैसे ॥329॥

मराठी अर्थ

देवाप्रीत्यर्थ मोकळी सोडलेली गाय जशी निष्प्रतिबंध वाटेल तिकडे चरते, त्याप्रमाणे अशा अभिमानाच्या वृत्तीने आपली पापे वाढवीत जातात.

English meaning

Just as the mouth of a cow, which is not tethered and is allowed to roam free, cuts anything that comes in her grazing way, these demonich people increase continuously their sins with sullenness beyond limits.

330
मूळ

याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥330॥

मराठी अर्थ

अशाच प्रकारच्या पापसाधनांनी त्यांची सर्व कर्मप्रवृत्ति असते आणि ज्यांचे चित्त मरेपर्यंत (परौती-पर्यंत) असंख्य चिंतांनी व्याप्त असते.

English meaning

All their activities are aimed at enjoyment and they are worried about the enjoyment of pleasures beyond the earthly life also.

331
मूळ

पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये साने गगन । जे पाहाता त्रिभुवन । अणुही नोहे ॥331॥

मराठी अर्थ

या चिंतेचे स्वरूप पाहू जाता ते पाताळाहून खोल व गगनापेक्षाही उंच असून तिच्यापुढे विश्वाला अणूचीही उपमा शोभत नाही. (इतकी ती मोठी असते)

English meaning

Now the worry which is deeper than the abyss of nether-world, and higher than the sky, and even the whole universe is smaller than a molecule compared to it;

332
मूळ

ते योगपटाची मवणी । जीवी अनियम चिंतवणी । जे सांडू नेणे मरणी । वल्लभा जैसी ॥332॥

मराठी अर्थ

संन्यासाच्या योगपट दीक्षेस नियम व माप आहे; पण ह्यांची ही भोगपट चिंता हिला नियम नाही व मापही नाही; पतिव्रता स्त्री पतीला जशी कधीही अंतर देत नाही, तशी ही चिंता ह्यांना मरणापर्यंत सोडीत नाही.

English meaning

That worry which using the measurement of the cloth of sensual pleasures, tries to harass the soul, and does not think to leave the soul, who is its beloved even at the time of death,

333
मूळ

तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवी सूनि असार । विषयादिक ॥333॥

मराठी अर्थ

तसेच, असार अशा विषयांदिकांची मनात लालसा धरून त्यांच्या प्राप्तीविषयींची अपार चिंता हे नित्य वाढवितात.

English meaning

Is constantly nourished by them and they get themselves addicted to the empty and perishable sensual pleasures.

334
मूळ

स्त्रिया गाइले आइकावे । स्त्रीरूप डोळा देखावे । सर्वेंद्रिये आलिंगावे । स्त्रियेतेचि ॥334॥

मराठी अर्थ

स्त्रीचे गाणे ऐकावे, तिचे सौंदर्य पाहावे. व सर्वागाने तिलाच आलिंगन द्यावे.

English meaning

They harbour in their mind very firmly the concept that one should listen to the song of women, one should constantly look upon with lust at their beauty and one should embrace them with all one's limbs.

335
मूळ

कुरवंडी कीजे अमृते । ऐसे सुख स्त्रियेपरौते । नाहीचि म्हणौनि चित्ते । निश्चयो केला ॥335॥

मराठी अर्थ

ज्यावरून अमृतही ओवाळून टाकावे अशा स्त्रीच्या भोगापरते दुसरे सुखच नाही असा त्यांच्या मनाचा निश्चय झालेला असतो.

English meaning

Even the nectar should be discarded before these women, and in short they believe that there is no better pleasure than that which is in them.

336
मूळ

मग तयाचि स्त्रीभोगा- । लागी पाताळ स्वर्गा । धावती दिग्विभागा । परौतेही ॥336॥

मराठी अर्थ

मग त्याच स्त्रीभोग प्राप्तीसाठी, स्वर्ग, पाताळ किंवा वाटेल त्या दिशेला धावण्याची त्यांची तयारी असते.

English meaning

Then, only to gain that enjoyment with women they go beyond the limits of the world either to the nether world or to the heaven world.

337
मूळ

आमिषकवळु थोरी आशा । न विचारिता गिळी मासा । तैसे कीजे विषयाशा । तयासि गा ॥337॥

मराठी अर्थ

मोठया आशेने गळाला लावलेले आमिष काहीही विचार न करता मासा गिळतो व नाश पावतो, तशी विषयांची आशा ह्या जीवांची स्थिति करिते.

English meaning

These demonic people become victims of their desires just as fish bites the bait without thinking about its result,

338
मूळ

वांछित तव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊ वाढऊ होती । कोशकिडे ॥338॥

मराठी अर्थ

त्यांना इच्छित विषय तर कधी प्राप्त होत नाहीतच, पण नुसत्या कोरडया आशेचे मनोरे रचून कोशकीटकाप्रमाणे बंधन मात्र पावतात.

English meaning

When they do not get what they wished they start increasing the tensions of their anxieties just as a worm in a pupae state which goes on increasing the threads around itself.

339
मूळ

आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाही ॥339॥

मराठी अर्थ

आणि केलेली अभिलाषा अपूर्ण राहिली की त्यामुळेच चित्तांत द्वेष उत्पन्न होतो; एवंच काम आणि क्रोध ह्यावाचून अधिक कोणताच पुरुषार्थ त्यांच्या पदरात पडत नाही.

English meaning

When the desire is not fulfilled, it turns into hatred. Thus they have no horizon in their lives to reach, except the desire and hatred.

340
मूळ

दिहा खोलणे रात्री जागोवा । ठाणांतरीया जैसा पांडवा । अहोरात्रीही विसावा । भेटेचिना ॥340॥

मराठी अर्थ

अर्जुना, ठाणेदाराला ज्याप्रमाणे दिवसा कामगिरी व रात्री पहारा, मिळून अहोरात्र विसावा मिळतच नाही.

English meaning

O Pandava, for example, a sentry at a watchpost walks to and fro during the day and keeps constant alert watch at night, and thus never gets rest during day and night.

341
मूळ

तैसे उंचौनि लोटिले कामे । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमे । न माती केही ॥341॥

मराठी अर्थ

तसेच, मोठमोठया आशेच्या पर्वतांवरून खाली क्रोधाच्या टेकडयांवर आदळले (निराशेने क्रोधाविष्ट झाले) तरी, विषयांविषयींचे प्रेम इतके अनावर असते की त्या विषयीचे रागद्वेष कोठेही मावत नाहीत.

English meaning

Similarly these people fall on the hills of anger when unfulfilled desire throws them down from great height and they know no limits in their attachment to desire and hatred.

342
मूळ

तेवीचि जीवीचिया हावा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थे की ना ? ॥342॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे मनात वाटेल तेवढे विषयभोगाचे बेत जुळविले तरी ते भोगणेकरिता तर द्रव्य पाहिजे की नको ?

English meaning

Suppose one works up himself in the ferver of lust and desires to enjoy mundane pleasures, is it not necessary to have enough money to obtain the objects of pleasure?

343
मूळ

म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पै गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥343॥

मराठी अर्थ

म्हणून त्या वांच्छित भोगास लागणारे द्रव्य मिळविणेसाठी मग ते जगांतील लोकांना उपद्रव देण्यास सुरवात करतात.

English meaning

So, in order to amass sufficient money for obtaining the objects of their desires these people run throughout the world with great greed.

344
मूळ

एकाते साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वे हरिती । एकालागी उभारिती । अपाययंत्रे ॥344॥

मराठी अर्थ

एखाद्याला खिंडीत गाठून मारतात, एखाद्याला फसवून त्याचे सर्वस्व लांबवितात, व एखाद्याच्या घातासाठी अघोरी मंत्रादि उपायही योजितात.

English meaning

They kill someone by treachery, rob someone of all his belongings, and indulge in devilish magic to finish somebody else.

345
मूळ

पाशिके पोती वागुरा । सुणी ससाणे चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसे ॥345॥

मराठी अर्थ

पारधी रानात शिकारीसाठी जातांना ज्याप्रमाणे बरोबर पाश, पोती, जाळी, शिकारी कुत्रे, ससाणे, घोरपडी व भाले वगैरे घेतात.

English meaning

Just like hunters going on the errand of a big hunt in a jungle they start, armed with various nets, sacks, nooses, accompanied by hunting dogs, and hawks, taking with them wooden snaps and pricks etc.

346
मूळ

ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसे निकृष्ट । तेही करिती ॥346॥

मराठी अर्थ

आणि आपले पोट भरण्यासाठी ते जसे अनेक प्राणी ठार मारितात, तसलेच दुष्ट कृत्य हे आसुरी संपत्तीचे लोकही (द्रव्यप्राप्तीसाठी) करितात.

English meaning

And just as those hunters kill many animals to fill their bellies. these evil persons commit horrendous sins.

347
मूळ

परप्राणघाते । मेळविती वित्ते । मिळाल्या चित्ते । तोषणे कैसे ॥347॥

मराठी अर्थ

आणि ह्याप्रमाणे दुसऱ्यांचा प्राणघात करून मिळविलेल्या द्रव्याने चित्ताचे कसे समाधान करून घेतात म्हणशील तर असे.

English meaning

They obtain things they want by killing others and the proud pleasure they feel by that is worth describing.

348
मूळ

म्हणे आजि मिया । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हाती केलिया । धन्यु ना मी ? ॥348॥

मराठी अर्थ

तो म्हणतो, ” आज मी कित्येकांचे द्रव्य आपल्या हाती हस्तगत करून घेतले आहे, तेव्हा बरोबर मी धन्य नाही काय ? ”

English meaning

He says- "How great I am! I have taken in my hand so many possessions of so many people!

349
मूळ

ऐसा श्लाघो जव जाये । तव मन आणीकही वाहे । सवेचि म्हणे पाहे । आणिकांचेही आणू ॥349॥

मराठी अर्थ

अशी स्वतःपाशीच प्रौढीची भाषा चालू असतांना त्याच्या मनात दुसरे असे विचार येतात की, असेच इतरांचेही आणखी द्रव्य मिळवून आणावे.

English meaning

When he praises himself like this, his mind goes further and he says- "I shall get more wealth from others also.

350
मूळ

हे जेतुले असे जोडिले । तयाचेनि भांडवले । लाभा घेईन उरले । चराचर हे ॥350॥

मराठी अर्थ

आजवर जेवढे मिळविले आहे, त्या भांडवलावर आणखी जेवढे स्थावरजंगम मिळविता येण्यासारखे उरले असेल तेवढे जोडीन.

English meaning

This much I have already added to my property. Using this as capital, I will do business and even possess the whole world!

351
मूळ

ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरो नेदी ॥351॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे जगांतील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईन; मग ज्याच्यावर माझी दृष्टि पडेल तो उरणारच नाही !

English meaning

He says : "I will be the owner of all the money in this world and then I will not let alone anything that I will see!

352
मूळ

हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडे । येकलाचि मी ॥352॥

मराठी अर्थ

आतांपर्यंत मारले हे शत्रू काहीच नाहीत, आणखी जे पराक्रमी आहेत त्यांनाही मारून मग एकटा मीच सर्व मालक अशा थाटाने राहीन.

English meaning

"I have killed these few enemies. I am going to kill still greater enemies and then I will rule alone in this world.

353
मूळ

मग माझी होतील कामारी । तियेवाचूनि येरे मारी । किंबहुना चराचरी । ईश्वरु तो मी ॥353॥

मराठी अर्थ

माझे दास होतील तेवढे ठेवीन; बाकी सर्वाचा नाश करीन; किंबहुना ह्या चराचराचा मालक ईश्वर म्हणून जो म्हणतात, तो मीच होय. अन्य कोणी नाही.

English meaning

Then all will work for me. I will kill the others who will not obey me. Actually I am the God of the whole world.

354
मूळ

मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । माते पाहुनि ॥354॥

मराठी अर्थ

सर्व भोग्यसृष्टीचा मी राजा असून सर्व सुखांचाही मीच आधार व भोक्ता होय; म्हणून माझे ऐश्वर्य पाहून मनात इंद्रही लज्जित होईल.

English meaning

"I am the king of the land which is to be enjoyed by me only, I am the home of all kinds of pleasures! Even the God Indra will be nobody before me!"

355
मूळ

मी मने वाचा देहे । करी ते कैसे नोहे । के मजवाचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥355॥

मराठी अर्थ

मग मी कायावाचा मनाने जे करीन ते कसे घडणार नाही ? माझ्या आज्ञेवाचून दुसरी कोणती गोष्ट सिद्धीस जाणार आहे ?

English meaning

"How is it possible that anything which I do by my mind, my speech and my body, will not be successful? Who else is there except me who has the power to give orders?"

356
मूळ

तवचि बळिया काळु । जव न दिसे मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥356॥

मराठी अर्थ

अतुल पराक्रमी जो मी, त्या मला पाहिले नाही तोंवरच काळाच्या सामर्थ्याची प्रतिष्ठा ! अरे, सर्व सुखांची मी केवळ रास आहे.

English meaning

"The Time as death is powerful so long as He has not met me! If there is a totally highest peak of happiness, I am that peak!"

357
मूळ

कुबेरु आथिला होये । परी तो नेणे माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥357॥

मराठी अर्थ

कुबेर श्रीमंत असे म्हणतात खरे; पण त्याला माझी बरोबरी येणार नाही; श्रीविष्णू ही माझ्याइतका श्रीमंत नाहीं !

English meaning

Such a man says -"No doubt, Kubera is very rich, but he cannot be equal to me. Even the husband of goddess Laxmi has no riches as I have."

358
मूळ

माझिया कुळाचा उजाळू । का जातिगोतांचा मेळू । पाहता ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥358॥

मराठी अर्थ

माझ्या कुळाचा नांवलौकिक व आप्तेष्टांचा समुदाय पहाता, ब्रह्मदेवालाही ती सर येणार नाही;

English meaning

Even Brahma the God is inadequate when my large family and my relatives are considered."

359
मूळ

म्हणौनि मिरविती नांवे । वाया ईश्वरादि आघवे । नाही मजसी सरी पावे । ऐसे कोण्ही ॥359॥

मराठी अर्थ

म्हणून ईश्वरादिकांची थोरवी लोक गातात ती व्यर्थच होय; माझा बरोबरी करील असे कोणीही नाही.

English meaning

"These so-called Gods who call themselves as God, are really not real Gods. Nobody can be equal to me."

360
मूळ

आता लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥360॥

मराठी अर्थ

सांप्रत अभिचार (जारणमारण) मंत्राचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकाचा उच्छेद करणारे याग त्यांचे अनुष्ठान करीन.

English meaning

"I will revive the black magic which has been recently neglected by people and I shall re- establish those rituals which are useful in destroying others."

361
मूळ

माते गाती वानिती । नटनाचे रिझविती । तया देईन मागती । ते ते वस्तु ॥361॥

मराठी अर्थ

माझे स्तुतिस्तोत्र गातील, माझे नटनाचादिकांनी रंजन करितील, त्यांचे इच्छित ते ते त्यांना देईन.

English meaning

"I shall give whatever those people want who will praise me and please me by their poetry, dance and other entertainments.

362
मूळ

माजिरा अन्नपानी । प्रमदांच्या आलिंगनी । मी होईन त्रिभुवनी । आनंदाकारु ॥362॥

मराठी अर्थ

अन्नपानादिकांनी मत्त होऊन तरुणींच्या भोगालिंगनादिकांनी मी जगतांत आनंदरूप होऊन राहीन.

English meaning

"I shall be expert in taking intoxicating drinks and I shall be happy in the embrace of beautiful women and thus I will proudly show off how I am the happiest man in the world.

363
मूळ

काय बहु सांगो ऐसे । ते आसुरीप्रकृती पिसे । तुरंबिती असोसे । गगनौळे तिये ॥363॥

मराठी अर्थ

आसुरी संपत्तीने पिसे झालेले ते लोक असे काय काय बरळतात म्हणून सांगावे ? अरे, गगनकुसुमांचा वास घेण्यासारख्या गोष्टींचे मनोरे ते रचीत असतात.

English meaning

What to say about these people! These are so maddened by evil character that they in vain try foolishly to smell the flowers in the sky!

364
मूळ

ज्वराचेनि आटोपे । रोगी भलतैसे जल्पे । चावळती संकल्पे । जाण ते तैसे ॥364॥

मराठी अर्थ

तापाच्या भरात रोगी वाटेल ते जसे बरळतो, त्याप्रमाणे, हे लोक मुखाने वाटेल ते संकल्प बरळत असतात असे समज.

English meaning

Like a man in delirium babbles anything, these people talk nonsense by the force of their misguided concepts.

365
मूळ

अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळी । मनोरथांच्या ॥365॥

मराठी अर्थ

यांच्या आशेच्या वावटळीने (माट्या) चित्तांतील अज्ञानरूप धुळीचे मनोराज्यरूप स्तंभ आकाशात गरगर फिरत असतात.

English meaning

Being filled up by the dust of ignorance, they are blown away by the hurricane of hope and whirl round in the air of aspirations.

366
मूळ

। का समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥366॥

मराठी अर्थ

आषाढांत ढगावर ढग यावे, किंवा समुद्राच्या लाटांना जसा खंड नसतो, त्याप्रमाणे त्यांच्या वैषयिक इच्छांची अखंड रांग चालू असते.

English meaning

They continuously desire many objects of senses, just as the clouds at the pre-monsoon period know no break, or the sea waves never stop.

367
मूळ

मग पै कामनाचि तया । जीवी जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळे जैसी ॥367॥

मराठी अर्थ

मग मनोरथरूपी वेलींचे जाळे त्यांच्या चित्तांत पसरल्यावर, कांटयावरून जशी कमळे ओढावीं.

English meaning

Then these desires become the inner bunch of creepers in their consciousness and jus as lotus may be scratched by thorns,

368
मूळ

का पाषाणाचिया माथा । हांडी फुटली पार्था । जीवी तैसे सर्वथा । कुटके जाले ॥368॥

मराठी अर्थ

किंवा दगडावर पडून मातीच्या हांडीचे शतशः तुकडे व्हावे, त्याप्रमाणे, अर्जुना, त्यांच्या मनोरथांची दशा होते,

English meaning

Or Arjuna, just as an earthen pot should be broken on a stove, the souls of these people are shattered.

369
मूळ

तेव्हा चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणी । वाढोचि लागे ॥369॥

मराठी अर्थ

त्यायोगे, रात्रीच्या वाढीबरोबर जसा अंधकारही वाढतो, तसा, त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो.

English meaning

Just as with advancing dark night, the darkness deepens, the confusion in the minds of these people goes on increasing.

370
मूळ

आणि वाढे जव जव मोहो । तव तव विषयी रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥370॥

मराठी अर्थ

आणि जसा जसा मोह वाढेल तशी तशी वैषयिक इच्छा वाढत जाते; आणि विषय म्हटले की, पातकाचे मूळ कारणच होय.

English meaning

With increasing confusion, their attraction towards sense-objects also increases, and in the very growing attraction, sins easily find anchor.

371
मूळ

पापे आपलेनि थांवे । जव करिती मेळावे । तव जिताचि आघवे । येती नरका ॥371॥

मराठी अर्थ

पापांचा जोर होत होत ती जशी वाढतील तसा त्यास (आसुरी लोकास) जीवंतपणींच नरकयातनांचा भोग घडतो.

English meaning

When their sins increase, they suffer so much that their life is a living hell.

372
मूळ

म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथा पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥372॥

मराठी अर्थ

म्हणून, अर्जुना, ज्यांच्या चित्तांत कुवासना नांदतात ते असुर लोक त्या ठिकाणी जन्माला येतात.

English meaning

Therefore, O wise one, where do they go at last, who pamper and indulge into satisfying their evil desires?

373
मूळ

जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेली सागर । उतताती ॥373॥

मराठी अर्थ

जेथील वृक्षांची तलवारी-प्रमाणे तीक्ष्ण धारेचे पाने असतात, खैराच्या इंगळाचे डोंगर व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत असतात.

English meaning

They go where there are trees with leaves as swords, mountains of burning coals of Khaira wood, and seas of boiling oil.

374
मूळ

जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणी । नरकलोकी ॥374॥

मराठी अर्थ

जेणे यातनांना खंड नसून नित्य नवी यमजाचणी असते अशा घोर नरकलोकींचा वास त्यास घडतो.

English meaning

Where there is a continuous chain of sufferings and an ever new harassment and torture by the king of Death, which place is called the hell.

375
मूळ

ऐसे नरकाचिये शेले । भागी जे जे जन्मले । तेही देखो भुलले । यजिती यागी ॥375॥

मराठी अर्थ

असे शेलक्या नरक भोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही, पाहू गेले असता, यज्त्रयागादिकांच्या भरीस भरतात.

English meaning

Even when they suffer the cruelest punishment in hell; when they take next birth, they are seen again performing evil sacrifices in their confused state of mind.

376
मूळ

एऱ्हवी यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनिया । नाटकी जैसी ॥376॥

मराठी अर्थ

अर्जुना, एऱ्हवी पाहू गेले असता, त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभानं नांटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात.

English meaning

O Dhananjaya, really the various performances of sacrifices are misused by them with great hypocrisy and are made useless by them.

377
मूळ

वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणे ॥377॥

मराठी अर्थ

आपल्या यजमानाच्या आश्रयावर, वेश्या ज्याप्रमाणे स्वतःस सौभाग्यवती समजून समाधान मानीत असतात, तसेच हे होय.

English meaning

Just as a bad woman though only a keep of a certain man, shows off like a legally married wife,

378
मूळ

तैसे आपणया आपण । मानिता महंतपण । फुगती असाधारण । गर्वे तेणे ॥378॥

मराठी अर्थ

आपली प्रतिष्ठा आपणच मानिता मानिता जे असामान्य गर्वाने फुगून जातात.

English meaning

Similarly, by thinking themselves to be very important persons, they become sullen by their conceit.

379
मूळ

मग लवो नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । का उधवले आकाशे । शिळाराशी ॥379॥

मराठी अर्थ

मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होता सदा ताठ असतात किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसेच हे होत.

English meaning

Then, like steel pillars, or a cliff rising high in the sky they do not bend at all.

380
मूळ

तैसे आपुलिये बरवे । आपणचि रिझता जीवे । तृणाहीहूनि आघवे । मानिती नीच ॥380॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे, आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून रमता रमता त्यास आजूबाजूचे जग तृणापेक्षांही हलके वाहू लागले.

English meaning

They are so filled with self-esteem that they consider the whole world more insignificant than even a blade of grass.

381
मूळ

वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवते केले ॥381॥

मराठी अर्थ

मग अर्जुना, संपत्तिमदाने माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार फाटा देतात.

English meaning

Further, O the great archer! They are so swollen - headed by the money they possess that they do not care at all about what is good action and what is pohibited.

382
मूळ

जया आंगी आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसी । न करिती गा ? ॥382॥

मराठी अर्थ

अरे, ज्याची वृत्ति अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार आहे ? पण, पिसाट लोक काय करतील किंवा न करितील कोणी सांगावे ?

English meaning

How can such people who are so proud, ever perform proper sacrifices? But there is no saying what these mad people will do!

383
मूळ

म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळे । यागाचींही टवाळे । आदरिती ॥383॥

मराठी अर्थ

म्हणून, लहरीखातर एखादे वेळी मूर्खपणाच्या मदिरेच्या भरांत यज्ञादिक सोंगेही आरंभितात.

English meaning

So, in a fit they decide to show off by performing the outward details of the sacrificial rituals to deceive others.

384
मूळ

ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तव विधी । द्वंद्वचि सदा ॥384॥

मराठी अर्थ

त्यात त्यांना कुंड, मंडप, वेदी आणि तदनुषंगाने लागणारी अन्यसामग्री काही लागत नाही, आणि विधिविषयी बोलावे तर त्यांचे त्याच्याशी सदैवच वैर असते.

English meaning

But, there is no proper sacrificial pit, nor the canopy or the place of putting idol of various gods, called Vedi and there is no question of proper discipline nor collection of necessary utensils.

385
मूळ

देवा ब्राह्मणांचेनि नांवे । आडवारेनहि नोहावे । ऐसे आथी तेथ यावे । लागे कवणा ? ॥385॥

मराठी अर्थ

देव, ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नांवाचाही वारा त्यांना सोसत नाही, मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला ?

English meaning

They do not tolerate even the casual hearing of the names of Brahmins or the gods! Then who would attend their ceremonies?

386
मूळ

पै वासरुवाचा भोकसा । गाईपुढे ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥386॥

मराठी अर्थ

परंतु धूर्तलोक गाईपुढे मेलेल्या वासराची पेंढा वगैरे भरून रक्षण केलेली आकृति ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात.

English meaning

But cunning men put before the cow the dead body of a calf properly stuffed by grass etc., to create illusion that it is alive; and then induce the cow to give milk.

387
मूळ

तैसे यागाचेनि नांवे । जग वाऊनि हावे । नागविती आघवे । अहेरावारी ॥387॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे यज्ञाचा आव घालून तन्निमित्त इतरांना आमंत्रणे देऊन, त्यांच्याकडून सांपडेल तो आहेर घेऊन त्यांना फसवितात.

English meaning

Similarly, here people send invitations to various persons for attending their fictitious ceremonies and simply rob them by way of presents and offer-ings.

388
मूळ

ऐशा काही आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणे कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥388॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्यांच्या सर्वनाशाची इच्छा करितात.

English meaning

So, in this way such evil persons sometimes perform sacrifices and in these sacrifices, they desire to kill many animals.

389
मूळ

मग पुढा भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगी फोकारिती आण । वावो वावो ॥389॥

मराठी अर्थ

मग स्वत:पुढे डंका, ध्वज वगैरे लाऊन आपल्या यज्ञदीक्षिततेची लोकात व्यर्थ प्रसिद्धि करितात.

English meaning

Then they make a great show of their initiations, etc., by drums and bugles in public, which is only false!

390
मूळ

तेव्हा महत्त्वे तेणे अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥390॥

मराठी अर्थ

अशा वृथा महत्त्वाने, त्या नीच जनांस अधिकच गर्व चढतो, व जणू काही अंधकाराला काजळाची पुटं द्यावी त्या प्रमाणे

English meaning

In this way their pride reaches the highest peak, and just as if darkness is painted by black paint;

391
मूळ

तैसे मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥391॥

मराठी अर्थ

त्यांचा मूर्खपणा अधिकच घट्ट होतो, उद्धटपणा वाढतो, आणि अहंकार व अविवेकही दुणावतो.

English meaning

Their stupidity becomes more solid, their arrongance reaches its height, ego is doubled and their thoughtless behaviour becomes more emphatic.

392
मूळ

मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥392॥

मराठी अर्थ

मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान् आहे अशी कोणी भाषाही काढू नये असे त्याला बळ चढते.

English meaning

Then in order to wipe out the name of anybody else from the face of the earth, their arrogant strength becomes very dominant.

393
मूळ

ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥393॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार ह्यांचे ऐक्य झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाह्या मर्यादा सोडून उचंबळू लागतात.

English meaning

So, when their pride and power become stronger, the sea of their ego overflows the shores of restraint.

394
मूळ

मग वोसंडिलेनि दर्पे । कामाही पित्त कुरुपे । तया धगी सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥394॥

मराठी अर्थ

वर्षाची अशी वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नीही भडकतो.

English meaning

When their pride so overflows, their desires develop devilishly giving vent to anger,

395
मूळ

तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥395॥

मराठी अर्थ

मग उन्हाळघांत प्रखर अग्नि तेलातुपाच्या कोठारास लागून त्यातच आणखी जसा वारा सुटावा.

English meaning

Which flares off like a store house of oil and Ghee being gutted by fire, and aggravated by winds.

396
मूळ

तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधी गूढला । या दोहीचा मेळु जाला । जयांच्या ठायी ॥396॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, बलवान असा अहंकार व कामक्रोध ह्यांनी गुफुटून गेलेला उन्मतपणा ह्या दोघांचे ऐक्य ज्यांच्या ठायी होते.

English meaning

When the pride and ego become so smeared by desire and anger,

397
मूळ

ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियाते वीरेशा । न साधती गा ? ॥397॥

मराठी अर्थ

ते आपल्या इच्छेखातर किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्यांची हिंसा करणार नाहीत ?

English meaning

Would such demonic people hesitate to commit any kind of violence, which they fancy?

398
मूळ

पहिले तव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेचु करिती अभिचारा- । लागोनिया ॥398॥

मराठी अर्थ

अर्जुना, अभिचारमंत्रसिद्धीकरिता हे प्रथम आपल्या अंगांतील रक्तमांस खर्च करितात.

English meaning

Then, O the great archer, these people sacrifice their own flesh and blood in the pits of sacrifice in order to achieve their aims of destroying others.

399
मूळ

तेथ जाळिती जिये देहे । यामाजी जो मी आहे । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥399॥

मराठी अर्थ

असा ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात, त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी यालाच हे चटके बसतात.

English meaning

They burn living bodies and thus give trouble to me, who dwell as Atman in that body.

400
मूळ

आणि अभिचारकी तिही । उपद्रविजे जेतुले काही । तेथ चैतन्य मी पाही । सीणु पावे ॥400॥

मराठी अर्थ

आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव द्यावयाचा असतो त्यांच्या ठिकाणी जीवचैतन्यरूपाने वास करणारा जो मी, त्या मलाच ते चटके बसतील;

English meaning

Now as I am the spirit and the life force in all those bodies, they harass me only, when they burn these bodies.

401
मूळ

आणि अभिचारावेगळे । विपाये जे अवगळे । तया टाकिती इटाळे । पैशून्याची ॥401॥

मराठी अर्थ

आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यास छळतात)

English meaning

Now if some people luckily escape the ghastly destruction done by their black magic, they also do not escape the slanders which are thrown at them like stones.

402
मूळ

सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥402॥

मराठी अर्थ

सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक तपी असे संन्यासी जे असतील.

English meaning

The pious women who are faithful to their husbands, the saintly persons, men of generosity, performers of good sacrifices, those who observe extra-ordinary penance and those who are Sanyasis,

403
मूळ

का भक्त हन महात्मे । इये माझी निजाची धामे । निर्वाळली होमधर्मे । श्रौतादिकी ॥403॥

मराठी अर्थ

किंवा भक्त आणि महात्मे, ही माझी श्रौतादि यज्त्रयागाने शुद्ध झालेली निवास संस्थानेच होत.

English meaning

Similarly those who are my esteemed devotees, and by whose right performance, the rituals according to Shrutis and Smrutis become purified, are all very dear to me, as if my own 'homes'.

404
मूळ

तया द्वेषाचेनि काळकूटे । बासटोनि तिखटे । कुबोलांची सदटे । सूति कांडे ॥404॥

मराठी अर्थ

अशा पवित्र जनांवर व्देषरूपी कालकूट विषाचे जे तीक्ष्ण वाग्बाण, यांचा वर्षाव करितात.

English meaning

But even these are made targets of the sharp arrows which are smeared by the poison of hatred and brightened by acute enmity, by these devilish persons.

405
मूळ

ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तया पापिया जे मी करी । ते आइक पा ॥405॥

मराठी अर्थ

याप्रकारे जे सर्व प्रकारांनी मजपाशी वैर करण्यास प्रवृत्त होतात, त्या पाप्याना मी जे शासन करितों, तो ऐक.

English meaning

Now, please listen to what I do to these sinners who actively hate me.

406
मूळ

तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पै गा । ऐसे ठेवी ॥406॥

मराठी अर्थ

तरी, जगात मनुष्याच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्ये मात्र करीत नाहीत, त्यांचा तो देह हरण करून अशा स्थितीत ठेवितो,

English meaning

I punish them because taking the benefit of the human birth, they harass the world most cruelly.

407
मूळ

जे क्लेशगावीचा उकरडा । भवपुरीचा पानवडा । ते तमोयोनि तया मूढा । वृत्तीचि दे ॥407॥

मराठी अर्थ

क जी योनि अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरणरूप यातनेची पायवाट असून अंधकारमय (अज्ञानरूप) असते तशी योनि त्यांना देतों.

English meaning

I put them in the obnoxious gutters of the town of sufferings or the dumping ground of all the discarded refuse of the city of mundane life, where stinking waters of Tamasic tendencies give out nauseating smell!

408
मूळ

मग आहाराचेनि नांवे । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करी ॥408॥

मराठी अर्थ

मग क्षुधा लागली तर गवतही उपयोगी पडू नये अशा व्याघ्र वृश्चिकादि जातींचा त्यास अरण्यात जन्म देतों.

English meaning

I put them into the lives of tigers or scorpions in such barren lands where there is not even a morsel of grass to eat.

409
मूळ

तेथ क्षुधादुःखे बहुते । तोडूनि खाती आपणयाते । मरमरो मागुते । होतचि असती ॥409॥

मराठी अर्थ

तेथे अत्यंत क्षुधित झाले असता, आपल्याच शरीराचे लचके तोडून खाण्याची पाळी येते आणि मरून पुनःपुनः त्याच योनीत जन्म घेतात.

English meaning

There they pluck their own limbs to satisfy their pangs of acute hunger and die only to be bom in the same disgusting conditions.

410
मूळ

का आपुला गरळजाळी । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करी बिळी । निरुंधला ॥410॥

मराठी अर्थ

किंवा ज्याचा आपल्या विषाच्याच दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो अशा सर्पयोनीत घालून त्यास बिळात कोंडून ठेवितो.

English meaning

Or I put them to the birth of serpents and venomous reptiles where they are affected by the vapours of their own poisonous breath in the suffocating narrow holes in the earth.

411
मूळ

परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापे । विसावा तया नाटोपे । दुर्जनांसी ॥411॥

मराठी अर्थ

परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका थोडा वेळ लागतो तितकीही मी त्यास विश्रांति लाभू देत नाही.

English meaning

I do not give them any respite from their acute suffering, even for a moment that one takes to exhale the breath once taken.

412
मूळ

ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तया ॥412॥

मराठी अर्थ

अशा अगणित कल्पांच्या कोडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यास त्या योनींतून बाहेर काढीत नाही.

English meaning

I do not let them out of those dungeons of life for such uncountable long periods which are more than crores of Kalpas!

413
मूळ

तरी तयांसी जेथ जाणे । तेथिचे हे पहिले पेणे । ते पावोनि येरे दारुणे । न होती दुःखे ॥413॥

मराठी अर्थ

तरी त्यांना पुढे जेथे जावयाचे आहे त्यातील हा पहिला मुक्काम होय; तर मग त्यापुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय ?

English meaning

And this is the first step only towards the ghastly and hideous places of torture where they are to go later on. How can they escape fiercer frustrations later on?

414
मूळ

हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारी । जोडिली तिही ॥414॥

मराठी अर्थ

त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होत असते हे लक्ष्यात ठेव.

English meaning

Thus by the demonic vices they fall to such deep detestable conditions.

415
मूळ

पाठी व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥415॥

मराठी अर्थ

पण, व्याघ्रादि तामस योनींमध्येही देहाच्या आधाराने त्यास अधूनमधून तरी थोडी विश्रांति मिळते.

English meaning

But in a way, in the life of a tiger or other wild animals, they can get some rest from time to time for their bodies and can relax.

416
मूळ

तोही मी वोल्हावा हिरे । मग तमचि होती एकसरे । जेथे गेले आंधारे । काळवंडैजे ॥416॥

मराठी अर्थ

तेवढी थोडी विश्रांतीही हिरावून घेऊन जेणे अंधारही काळिमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवल तमोरूप योनीमध्ये मी त्यांना घालतो.

English meaning

Then I throw them in such dark conditions of total blackness of ignorance, which if applied to dark colour, that colour will become more pitch black!

417
मूळ

जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणे जेणे ॥417॥

मराठी अर्थ

ज्या तमोयोनीचा पापालाही किळस येतो किंवा नरकही जिला भितो, किंवा जेथे श्रमही श्रमून मूर्च्छित होतो.

English meaning

They are the lowest of the lowly people in whose case, the sins get disgusted, hells get nauseated, suffering also becomes unconscious by their sight.

418
मूळ

मळु जेणे मैळे । तापु जेणे पोळे । जयाचेनि नांवे सळे । महाभय ॥418॥

मराठी अर्थ

जेथे मलही मलिन होतो, तपालाही ताप होतो, किंवा ज्या योनीचे नुसते नांव घेतले असता महाभयही भयभीत होते.

English meaning

Dirt becomes dirty by their touch, the fever becomes feverish, and the great fear becomes itself afraid of them.,

419
मूळ

पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥419॥

मराठी अर्थ

जेथे पापही कंटाळते, अमंगलव देखील अमंगल होते व विटाळही आपण विटाळू अशी भीत बाळगतो.

English meaning

The sins become bored by them, unauspicious things become more aggravated by their contact, an infection gets contaminated by their vicinity and becomes afraid of being more virulent.

420
मूळ

ऐसे विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । ते ते होती भोगूनिया । तामसा योनी ॥420॥

मराठी अर्थ

अर्जुना, साऱ्या विश्वांत अधमांतील अधम अशी जी ही तामस योनी तिच्यात त्यांची अशा भोगांनी अशी दुर्दशा होते.

English meaning

O Dhananjaya, by reaching such very deplorable conditions in the lowest categories of life, they become the Tamas Quality personified.

421
मूळ

अहा सांगता वाचा रडे । आठविता मन खिरडे । कटारे मूर्खी केवढे । जोडिले निरय ॥421॥

मराठी अर्थ

तिचे वर्णन करितांना वाणीला कष्ट होतात, मन कच खाते आणि असे वाटते की केवढा रे घोर अनर्थ ह्यांनी ओढवून घेतला !

English meaning

Alas! How worst hellish conditions have they created and suffered! The speech stammers while trying to describe their misery, the mind is warped and withered to consider all this.

422
मूळ

कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधले घोर । पतन ऐसे ॥422॥

मराठी अर्थ

जिच्यामुळे असा घोर पतनप्रसंग प्राप्त होतो ती आसुरी संपत्ति हे मूर्ख कशाला रे अशी वाढवितात असे वाटू लागले.

English meaning

It cannot be sanely imagined why these people thrive in such evil vices by which their whole life is destroyed so pitiably!

423
मूळ

म्हणौनि तुवा धनुर्धरा । नोहावे गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥423॥

मराठी अर्थ

म्हणून, अर्जुना, तू त्या संपत्तीकडे किंवा जेथे आसुरी संपत्तिमान वास करतात त्या योनीकडे नुसते ढुंकूनही पाहू नको. की त्यांचे नांवही घेऊ नको.

English meaning

Therefore, O the great archer! You should never turn towards the places where these demon- like villains live.

424
मूळ

आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायी । ते त्यजावे हे काई । म्हणो कीर ? ॥424॥

मराठी अर्थ

मग, दंभादि सहा दोषांची खाण जी आसुरी संपत्ति तिच तू त्याग कर, हे काय निराळे सांगावयाची आवश्यकता आहे ?

English meaning

And should not step in the situations where the hypocrisy and other five vices earlier described are prevalent.

425
मूळ

परी काम क्रोध लोभ । या तिहीचेही थोंब । थांवे तेथे अशुभ । पिकले जाण ॥425॥

मराठी अर्थ

परंतु, काम, क्रोध आणि लोभ ह्यांच्या एकीचा वृक्ष जेथे जोरावतो जेथे शुभफलनिष्पत्ति होत असते हे लक्षात असू दे.

English meaning

One must know for sure that all evil gathers together where lust, anger and greed thrive.

426
मूळ

सर्व दुःखा आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधले आहाती ॥426॥

मराठी अर्थ

ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हे अर्जुना, ध्यानात असावे.

English meaning

O Dananjaya, these three are as if guides appointed by all the sorrows so that people could be able to find them and see them.

427
मूळ

का पापिया नरकभोगी । सुवावयालागी जगी । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥427॥

मराठी अर्थ

किंवा पापी लोकास नरकभोग घडविण्यासाठी पातकांची ही एक मोठी सभाच होय.

English meaning

Or this is a big gang of sins to judge the sinners and throw into hell.

428
मूळ

ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरी । जव हे तिन्ही अंतरी । उठती ना ॥428॥

मराठी अर्थ

जोपर्यंत काम, क्रोध व लोभ ह्या तीन दोषांचा चित्तांत उद्भव झाला नाही तोपर्यंतच पुराणांती वर्णलेल्या रौरव नरकादिकांच्या गोष्टी ऐकाव्या.

English meaning

So long as these three have not arisen in the mind of man, the names of Rourav etc. hells remains only a story in mythological lore.

429
मूळ

अपाय तिही आसलग । यातना इही सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥429॥

मराठी अर्थ

ह्यांनी अपाय प्राप्ति त्वरित होते, यातनाही सवंग होतात व ह्यांनी हानि होते असे म्हणण्यापेक्षा हे तिघे म्हणजेच ” मूर्त हानि ” होत.

English meaning

All types of troubles immediately touch man as soon as these three enter the consciousness and loss as such is not existing separately, because these three are the very essence of loss.

430
मूळ

काय बहु बोलो सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥430॥

मराठी अर्थ

अर्जुना, तुला फार काय सांगावे ! वर वर्णीलेल्या निकृष्टस्थितिरूप नरकाचे जे प्रवेशद्वार त्याच्या हे तीन दोष म्हणजे उंबरठाच होत.

English meaning

O the great warrior! What more should I tell you about these? This triple lance is the very threshold of the meanest and the worst hell ever known.

431
मूळ

या कामक्रोधलोभा- । माजी जीवे जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥431॥

मराठी अर्थ

ह्या कामक्रोधलोभांना जो जीवे वाहिला तो नरकपुरीच्या सभेत सन्मानाचे पद पावेल.

English meaning

He who stands at the three-fold threshold of these evils, becomes the most honoured soul in the city of hell!

432
मूळ

म्हणौनि पुढत पुढती किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावीचि गा वोखटी । आघवा विषयी ॥432॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, सर्वप्रयत्ने करून ही कामादि दोषांची त्रिपुटी अत्यंत घातक म्हणून तिचा त्याग करच.

English meaning

O the crowned one! I therefore advice keenly that among all things to be avoided by a wise man, these three, viz. lust, anger and greed must be clearly avoided at all times.

433
मूळ

धर्मादिका चौही आंतु । पुरुषार्थाची तैचि मातु । करावी जै संघातु । सांडील हा ॥433॥

मराठी अर्थ

पुरुषार्थाची सीमा जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष त्यांची गोष्ट तेव्हांच बोलता की येईल ज्यावेळी हे दोषत्रय जीवांच्या पदरी नसेल.

English meaning

A man may talk of fulfillment of the four human life-time achievements like Religion, etc. only if he has given up this triple alliance of evil forces.

434
मूळ

हे तिन्ही जीवी जव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥434॥

मराठी अर्थ

हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जो वर जागे आहेत, तोपर्यंत या चार पुरुषार्थापैकी एकाची तरी प्राप्ति जीवास होईल हे ऐकण्यास माझे कान धजत नाहीत असे देवही म्हणाले.

English meaning

Here, the Lord Shrikrishna said- 'So long as these three are actively awake in a man's mind, even I cannot be able to hear anything positive about achievement of real welfare!

435
मूळ

जया आपणपे पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणे न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥435॥

मराठी अर्थ

ज्याला आपल्या हिताची इच्छा आहे व जो आत्मनाशाला भितो त्याने ह्या त्रयीचा संग सोडावा; सावध असा बरें.

English meaning

He further said "He who loves his own soul and fears about his self destruction should never go to their path. He must be very alert.

436
मूळ

पोटी बांधोनि पाषाण । समुद्री बाही आंगवण । का जियावया जेवण । काळकूटाचे ॥436॥

मराठी अर्थ

पोटाशी पाषाण बांधून बाहुंनी समुद्रतरण करू पहाणे किंवा जीवन जगविण्याकरिता काळकूट अन्न सेवन करणे.

English meaning

Otherwise it will be like jumping into the sea by tying a big stone around one's body or to take the Kaalakoot poison as a good meal;

437
मूळ

इही कामक्रोधलोभेसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसी । ययाचा गा ॥437॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे ह्या कामक्रोधलोभांनी कार्यसिद्धि साधण्यासारखी आहे, म्हणून त्यांच्या वाटेलाही जाऊ नकोस हो !

English meaning

Thus is the result achieved through these three! Therefore you should completely wipe out the very existence of these vices.

438
मूळ

जै कही अवचटे । हे तिकडी सांखळ तुटे । तै सुखे आपुलिये वाटे । चालो लाभे ॥438॥

मराठी अर्थ

जेव्हा केव्हा अकस्मात् ही तीन दुव्यांची (पायातील) सांखळी तुटेल, तेव्हा सुखाने आपले मार्गक्रमण करणे शक्य होईल.

English meaning

Only when this evil chain of these three is broken, then we can walk towards happiness.

439
मूळ

त्रिदोषी सांडिले शरीर । त्रिकुटी फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसे होय ॥439॥

मराठी अर्थ

वात, पित्त, कफ, ह्या तीन दोषांपासून मुक्त असलेले शरीर, तीन कुटाळक्या ( चोरी, चहाडी, शिंदळकी ? ) मुक्त असलेले नगर व त्रिविध तापांपासून (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी असते.

English meaning

Just as a body free of the three elements of cough, gas and bile which cause ailmens becomes healthy, just as city free of gossiper, robbery and adultery is a happy city, and just as a life free of troubles due to our own physical body, troubles caused by foreign objects and troubles caused by divine providence, is a happy life;

440
मूळ

तैसा कामादिकी तिघी । सांडिला सुख पावोनि जगी । संगु लाहे मोक्षमार्गी । सज्जनांचा ॥440॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ ह्या तिघांपासून मुक्त असलेला जगात सुखी होऊन मोक्षमार्गदायी सज्जन संगतीचा त्यास लाभ होतो.

English meaning

Similarly a soul whom these three evils of lust, anger etc. leave, becomes happy in this life and by turning towards the path of liberation, gains the blissful company of saints and godmen.

441
मूळ

मग सत्संगे प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळे । जन्ममृत्यूची निमाळे । निस्तरे राने ॥441॥

मराठी अर्थ

मग सत्संगतीच्या जोरावर, सच्छास्त्राच्या सहाय्याने जन्ममृत्युरूप अरण्याची बिकट वाट तो चुकवू शकतो.

English meaning

Then, with the influence of saintly company and by the actual effect of actions done in accordance with the orders laid down in the scriptures, he travels sccessfully through the desertlike region of birth and death and goes beyond.

442
मूळ

ते वेळी आत्मानंदे आघवे । जे सदा वसते बरवे । ते तैसेचि पाटण पावे । गुरुकृपेचे ॥442॥

मराठी अर्थ

अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान अशी जी गुरुकृपा, ती त्याला प्राप्त होते.

English meaning

He then reaches the city where Atmic joy is perpetually reigning, because he gets the blessings of his Guru.

443
मूळ

तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥443॥

मराठी अर्थ

व तिच्या योगे परमानंदतेची अखेरची सीमा अशी जी आत्मराज माउली तिचे अपरोक्ष (आविर्भाव) होऊन त्याचक्षणी “ आपण संसारी आहो ” अशा असलेल्या त्याच्या भ्रमाचा निरास होतो.

English meaning

There he meets his mother, the Atman, which is the highest place of love, and in that state of embrace, the hubbub of all the worldly life wanes totally.

444
मूळ

ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥444॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, कामक्रोधलोभ यांची झाडणी करून जो सिद्ध होतो, तोच अशा लाभाचा धनी होत असतो,

English meaning

Thus, only he who throws away these three vices of lust, anger and greed and stands firm in his decision, alone, can be entitled for this great bliss.

445
मूळ

ना हे नावडोनि काही । कामादिकांच्याचि ठायी । दाटिली जेणे डोई । आत्मचोरे ॥445॥

मराठी अर्थ

किंवा हे न आवडून जो आत्मवंचक कामादिकांच्या ठिकाणी डोके देऊन व्यवहरतो;

English meaning

But not liking any of these rules of conduct he who indulges himself in the desires, etc. by destroying his soul.

446
मूळ

जो जगी समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणे ॥446॥

मराठी अर्थ

ज्याची सर्व जगावर समान कृपादृष्टि आहे, हित काय व अहित काय ह्यांचे मार्गदर्शन करणारा जो जणू दीपस्तंभ आहे असा जो वेद, तो ज्यांनी अप्रमाण केला.

English meaning

He who has disregarded the Veda who is like a father having the same kindness and justice for all, and is the light which shows both the good things and bad things in the world.

447
मूळ

न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचे ॥447॥

मराठी अर्थ

विधिनिषेधाची पर्वा न करिता, आपल्या हिताकडे दुर्लक्ष्य करून जो केवळ इंद्रियांचे लळे पुरे करितो.

English meaning

He who does not regard the code of conduct, does not care about himself, and goes on pampering his sense-organs etc.

448
मूळ

कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचे असोस । वळघला रान ॥448॥

मराठी अर्थ

काम क्रोधादिकांची कास न सोडता जो त्यांच्या तंत्राप्रमाणे चालतो व स्वैराचाराच्या अरण्यात संचार करितो.

English meaning

He who does not leave the desire, anger etc. and never disobeys their provocative impulses, and roams about in the jungle of wild behaviour.

449
मूळ

तो सुटकेचिया वाहिणी । मग पिवो न लाहे पाणी । स्वप्नीही ते कहाणी । दूरीचि तया ॥449॥

मराठी अर्थ

त्याला त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर आपण यावे अशी इच्छा होणे शक्य नाही, इतकेंच नव्हे, तर त्याला तसे नुसते स्वप्न पडणेही शक्य नाही.

English meaning

Never gets the taste of the waters of the river of freedom. He does not see even in a dream this river which is freedom itself.

450
मूळ

आणि परत्र तव जाये । हे कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगू ॥450॥

मराठी अर्थ

आणि संसारबंध सुटून परलोकप्राप्ति होईल ही गोष्ट तर राहो; पण त्याला येथील भोगही सुखाने भोगत येत नाहीत.

English meaning

And it is not worth counting upon what progress he makes in the other world; because he does not even get ordinary worldly pleasures and comforts.

451
मूळ

तरी माशालागी भुलला । ब्राह्मण पाणबुडा रिघाला । की तेथही पावला । नास्तिकवादु ॥451॥

मराठी अर्थ

ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातीत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला !

English meaning

For example, a vegetarian Brahmin being provoked to catch a fish from water for eating it, jumped into that water but instead of catching fish, he got the blame of being an irreligious person.

452
मूळ

तैसे विषयांचेनि कोडे । जेणे परत्रा केले उबडे । तव तोचि आणिकीकडे । मरणे नेला ॥452॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे विषयांच्या लालचीने त्याने परलोक तर लाथाडलाच; पण विषयभोग तरी घडेल म्हणावे तर इतक्यात त्यास मृत्यूने गाठले ! ( सारांश, दोन्ही अंतरला ! )

English meaning

Similarly by greed of enjoying the objects of senses, he who tries to achieve heaven, etc. becomes a victim of death in that effort and is thrown somewhere else in the next birth.

453
मूळ

एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥453॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, परलोक किंवा स्वर्ग नाही व ऐहिक विषयभोगही नाही, अशा स्थितीत मोक्षाची गोष्टच कशाला पाहिजे ?

English meaning

So, he does not get the heavenly pleasures nor does he get the pleasures in this life also. What to say about his liberation in such a situation?

454
मूळ

म्हणौनि कामाचेनि बळे । जो विषय सेवू पाहे सळे । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥454॥

मराठी अर्थ

म्हणून कामाच्या नादी लागून जो विषयांचे बळाने सेवन करू पाहतो, त्याला विषयही नाही व स्वर्गही नाही असे होते; उद्धार तर.

English meaning

So, he who is intent upon enjoying pleasures by the impulsions of desires etc.; does not get objects of pleasures here or state of happiness in the heaven and he does not get emancipation.

455
मूळ

याकारणे पै बापा । जया आथी आपुली कृपा । तेणे वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥455॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, ज्याला आपल्या स्वतःवरच कृपा करणे असेल त्याने वेदाज्ञेचे उल्लंघन करू नये.

English meaning

Therefore, dear Arjuna, he who cares atleast something about his own welfare and has respect for himself should not disregard the sayings of Vedas.

456
मूळ

पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासे आत्महिता । भेटेचि ते ॥456॥

मराठी अर्थ

पतीच्या मनोगताप्रमाणे वागल्याचे श्रेय जोडून त्यातच पतिव्रता जसे आत्मकल्याणही साधिते.

English meaning

When the faithful wife obeys her husband fully, she automatically earns her spiritual welfare.

457
मूळ

नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना- । माजी पैसे ॥457॥

मराठी अर्थ

किंवा श्रीगुरुवचनाकडे लक्ष्य देऊन त्याचे काळजीपूर्वक जतन (चिंतन) करणारा शिष्य जसा आत्मभुवनामध्ये म्हणजे स्वरूपच्या ठिकाणी स्थित होतो.

English meaning

Or, a disciple who carefully follows the orders of his preceptor, automatically has his Atman realized completely.

458
मूळ

हे असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरे जेवी दिवा । पुढा कीजे ॥458॥

मराठी अर्थ

हेही असो; आपलाच ठेवा खरा; पण सांपडावा असे वाटत असेल तर जसे दीपाचे सहाय्य घ्यावे लागतं,

English meaning

Or taking another example, if we want to find out any thing kept by us in the dark, we have to take a light in our hand, with care.

459
मूळ

तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणे श्रुतिस्मृति माथा । बैसणे घापे ॥459॥

मराठी अर्थ

तसे, अशेष पुरुषार्थाचा धनी होण्याची ज्याची इच्छा असेल त्याने श्रुति व स्मृति ह्यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्या.

English meaning

Similarly, dear Partha, he who wishes to gain all the four achievements of human life, has to give full respect to Vedas and the books of Laws.

460
मूळ

शास्त्र म्हणेल जे सांडावे । ते राज्यही तृण मानावे । जे घेववी ते न म्हणावे । विषही विरु ॥460॥

मराठी अर्थ

शास्त्र ज्याचा निषेध करील ती राज्यासारखी वस्तूही तृणवत् मानावी व ज्याचा स्वीकार कर असे शास्त्रवचन असेल ती वस्तु विषाप्रमाणे असली तरीही आपला वैरी अहितकारी आहे असे म्हणू नये.

English meaning

He should give up whatever these scriptures order to give up, may it be even the kingdom and he should take what they say, even if it is poison.

461
मूळ

ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी के आहे अनिष्टा । भेटणे गा ? ॥461॥

मराठी अर्थ

अर्जुना, अशा वैदिकनिष्ठ पुरुषाला कधीतरी अनिष्टाची गाठ पडेल काय ?

English meaning

And O, the great warrior, if such is his firm faith in Veda, how can any bad thing happen to this man?

462
मूळ

पै अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाही गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥462॥

मराठी अर्थ

हे पहा; अहितापासून रक्षण करणारी व हितबोध करून वाढविणारी अशी श्रुतीसारखी साऱ्या जगाची माउली कोणी नाहीच नाही.

English meaning

You see, there is no other better mother than the Vedas, who saves you from danger and nourish you by giving you what is good for you.

463
मूळ

म्हणौनि ब्रह्मेशी मेळवी । तव हे कोणे न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेसी ॥463॥

मराठी अर्थ

म्हणून जिच्या योगे ब्रह्मप्राप्ति होते अशा ह्या श्रुतीची कोणीही करू अवज्ञा नये आणि अर्जुना, तू तर तिचे विशेषच पालन कर.

English meaning

Therefore, nobody should neglect this mother, who is Veda or Shruti, who enables us to reach the sate of Brahman, and I say that you also should specially follow the dictates of this Shruti.

464
मूळ

जे आजि अर्जुना तू येथे । करावया सत्य शास्त्रे सार्थे । जन्मलासि बळार्थे । धर्माचेनि ॥464॥

मराठी अर्थ

कारण अर्जुना, शास्त्र सत्य व सार्थ आहे हे लोकांना स्पष्टपणे पटवून देण्याकरिता म्हणून महान् पूर्वपुण्याचरणाने तुझा येथे जन्म झाला आहे.

English meaning

Because you are born to perform action here which is to be proved as true according to the natural law of religion and the dictates of scriptures and that also with the power of Dharma vested in you.

465
मूळ

आणि धर्मानुज हे ऐसे । बोधेचि आले अपैसे । म्हणौनि आनारिसे । करू नये ॥465॥

मराठी अर्थ

आणि सहज ओघाने तु धर्मानुजहि आहेस; म्हणूनही तुझा त्याबद्दल विशेष आदर असावा.

English meaning

And you are also called as the younger brother of Dharma (Religion in its occult sense). So you should not act contrary to that.

466
मूळ

कार्याकार्यविवेकी । शास्त्रंचि करावी पारखी । अकृत्य ते कुडे लोकी । वाळावे गा ॥466॥

मराठी अर्थ

कार्य काय व अकार्य काय हा विचार किंवा निर्णय शास्त्राज्ञे प्रमाणेच करावा व जे अकृत्य ते अनिष्ट मानून त्याचा त्याग करावा.

English meaning

When considering what is the right action and what is wrong action, these scriptures should be made the judge and wrong action must be avoided here.

467
मूळ

मग कृत्यपणे खरे निगे । ते तुवा आपुलेनि आंगे । आचरोनि आदरे चांगे । सारावे गा ॥467॥

मराठी अर्थ

व जे कर्तव्य असे ठरेल, ते आदरपूर्वक तू जातीने आचरून पुरे करावे.

English meaning

Then we should execute with all our might and with all our respect that which is decidedly found to be truly the right action, and complete it.

468
मूळ

जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हाती असे सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥468॥

मराठी अर्थ

कारण तुझे शुद्ध बुद्धि असून, तुझा आचार लोकांनी प्रमाणभूत मानावा, असा तुझा व्यावहारिक अधिकारही आहे; व म्हणूनच लोकसंग्रहदृष्टयाही तु निःसंशय योग्य आहेस.

English meaning

My dear, you have in your possession the stamp of authentication of the universe, which is the Good Intellect and you are thrice worthy of guiding the whole social structure.

469
मूळ

एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिचा निगावा । तोहि देवे पांडवा । निरूपिला ॥469॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे आसुरी संपत्ति व तिचे परिणाम ह्यांचे देवांनी अर्जुनास निरूपण केले.

English meaning

(Saint Dnyaneshwar says-) In this manner the Lord has explained the signs of demonic characters, and told also the result of those vices.

470
मूळ

इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवीचा । पुसेल तो चैतन्याचा । कानी ऐका ॥470॥

मराठी अर्थ

ह्यापुढे तो पंडुकुमर जे काही सद्भावपूर्वक विचारील ते सावधान चित्ते ऐकावे.

English meaning

Now the son of Pandu will ask a question about the inner faith of human beings, to which it is requested that you may kindly listen by the ears of spiritual attention.

471
मूळ

संजये व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हा ॥471॥

मराठी अर्थ

श्रीव्यासाचे आज्ञे प्रमाणे संजयाने ह्या निरोपाने राजा धृतराष्ट्राचा जसा कालक्षेप केला तसा मीही तुमचा करीन.

English meaning

I am going to tell you about it by the grace of my Guru Nivruttinath, just as Sanjaya told it to the king by the blessings of Bhagwan Vyasa.

472
मूळ

तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हा माने येवढा । होईन मी ॥472॥

मराठी अर्थ

तुम्ही संतजन जर मजवर आपला कृपावर्षाव कराल तर तुम्हाला मान्य व्हावा अगर पटावा असा (व्याख्यान करणारा) मी ही होईन.

English meaning

If you, the benevolent saints, turn your blissful gaze towards me, I will become as worthly as you wish.

473
मूळ

म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥473॥

मराठी अर्थ

म्हणून महाराज संतांस म्हणतात, आपले अवधान देऊन मज शिष्यावर प्रसाद व्हावा म्हणजे मी अनाथ राहाणार नाही.

English meaning

So, my only request is, you may please give me the blessings of paying attention- so that I, Dnyandeva says, will be protected by you - my Masters.