आता हृदय हे आपुले । चौफाळुनिया भले । वरी बैसऊ पाउले । श्रीगुरूंची ॥15-1॥
आता आपले अंत:करण शुद्ध करुन त्या चौरंगावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करु.
Now I will place the feet of my guru on the lotus flower of my heart which is fully blossomed.
Purushottama Yoga (The Yoga of the Supreme Person)
Original & Marathi meaning source: सार्थ ज्ञानेश्वरी (Sartha Dnyaneshwari) by Dhananjay Maharaj More — original ovi text and Marathi meaning
English meaning source: Dnyaneshwari, English translation by D. A. Ghaisas
Ovi numbers follow the Sartha Dnyaneshwari (96kulimaratha.com) edition; the chapter's own colophon confirms 599 ovis and 20 Gita shlokas. The Ghaisas English translation uses the same ovi numbering; several duplicated paragraph labels were resolved by comparing each candidate paragraph's content against the corresponding Marathi ovi rather than assuming a fixed numeric correction, since the two duplicates in this chapter resolved in opposite directions (one duplicate's FIRST occurrence was the mislabeled one, the other duplicate's SECOND occurrence was).
All 599 ovis are populated and cross-checked between the two sources. On the Marathi side, roughly half the ovis had a truncated ovi-number fragment (with or without a closing danda) trailing their meaning text, a systematic source-page counter artifact unrelated to content, which was stripped; a handful of ovis also had their Sanskrit-shloka and editorial-heading noise (using the same patterns established in Chapter 14) sitting between the marker and the real ovi text or between the original and its meaning. On the English side, two pairs of duplicate paragraph labels were found and resolved by content comparison against the Marathi (not a blind numeric shift), and one paragraph (labelled to match its predecessor by mistake) needed manual recovery for the ovi it actually covered. Sanskrit Gita shlokas are interspersed between ovis and are not counted as separate ovis or included as verse content here.
आता हृदय हे आपुले । चौफाळुनिया भले । वरी बैसऊ पाउले । श्रीगुरूंची ॥15-1॥
आता आपले अंत:करण शुद्ध करुन त्या चौरंगावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करु.
Now I will place the feet of my guru on the lotus flower of my heart which is fully blossomed.
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेद्रिय कुड्मुळी । भरूनिया पुष्पांजुळी । अर्घ्यु देवो ॥2॥
श्रीगुरू व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण कर्मेद्रिय- ज्ञानेद्रियरूपी फुलाच्या अनंत भावरुपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ.
I am offering flowery tributes of my slightly opened senses by holding them in the cup of my palms, which is the unity itself.
अनन्योदके धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ॥3॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी एकनिष्ठ असलेली जी वासना, तेच जणुकाय चंदन आहे असु मानुन श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू.
I also apply the sandal-wood paste which is purified by the one- pointed devotion.
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळूनि नूपरे । लेवऊ सुकुमारे । पदे तिये ॥4॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार चरणकमलामध्ये घालू.
I put around the tender ankles of my Guru, ankle-rings made of pure gold of my love for him.
घणावली आवडी । अव्यभिचारे चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळिया ॥5॥
अनन्य भावाने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच जणु रणजोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या बोटात घालू.
I also put the pair of toe-rings made of the pure undeviated love, around his toes.
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचे मुकुळ । ते उमलले अष्टदळ । ठेऊ वरी ॥6॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या चरणावरी वाहू.
On his feet, I put the fully blossomed lotus of eight petals which is of the eight Sattwic emotions and which has the fragrance of joy.
तेथे अहं हा धूप जाळू । नाहं तेजे वोवाळू । सामरस्ये पोटाळू । निरंतर ॥7॥
देहादिकाचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ.
Now I burn the incense of ego and wave before his feet, the sacred lamp of 'Soham' and then with the eager sense of unity, I hold his feet to my heart.
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊ श्रीगुरुचरण । करू भोगमोक्ष निंबलोण । पाया तया ॥8॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकु
I put the two shoes of my body and Pranas beneath his feet and throw the Neem and salt of enjoyment and liberation by waving them around his face, so as to ward off evil.
इया श्रीगुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥9॥
ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होवो.
I pray that I should be worthy of the service to the feet of my Guru to such an extent that all the capacities of the four human achievements are contained within it.
ब्रह्मीचे विसवणेवरी । उन्मेख लाहे उजरी । जे वाचेते इये करी । सुधासिंधु ॥10॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते
The flow of my knowledge may go straight to the final place of rest, which is the state of Brahman, in such a way that my speech should have the sweet taste of ocean of milk.
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापे कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षराते ॥11॥
✏कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते.
I also pray that there should be such sweetness in every letter and word of my speech that crores of full moons may prove less cool than those.
सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ॥12॥
✏ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
When the east is honoured by sunrise, it offers an empire of light to all the world. Similarly I pray that my speech should afford the festival of lights of knowledge to the listeners.
नादब्रह्म खुजे । कैवल्यही तैसे न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणे दैवे ॥13॥
✏ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तसा (व्याख्यानासारखा) शोभत नाही
There is such a fortune, by which when the words appear from the mouth, even the Vedas begin to become less effective and even the final liberation cannot be equal to them.
श्रवणसुखाच्या मांडवी । विश्व भोगी माधवी । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥14॥
✏श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतुचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते.
There is such a fortune, by which the creeper of speech develops with such a force that the whole universe experiences the beauty of the spring under the Pandal of Joy of Listening.
ठावो न पवता जयाचा । मनेसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥15॥
✏ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन करता येते) हे केवढे आश्चर्य आहे ?
There is a fortune by which the supreme God, from whom the mind and the speech turn back after a futile effort to find him, comes within the purview of words, most miraculously.
जे ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जे नागवे । ते अगोचर फावे । गोठीमाजी ॥16॥
✏जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते.
There is a fortune by which the absolute principle of Brahman, which is beyond the power of knowledge and beyond the capacity of meditation, becomes capable of being contained in words, though it is beyond all senses.
येवढे एक सौभग । वळघे वाचेचे आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जै का ॥17॥
✏गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते.
That fortune it is possible for the speech to enjoy by being lucky enough to get the touch of the particles of dust from the feet of the Guru.
तरी बहु बोलू काई । आजि ते आनी ठाई । मातेवाचूनि नाही । ज्ञानदेवो म्हणे ॥18॥
✏तर या संबंधाने फार काय सांगू ? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
What more can be said? I, Dnyanadeva, clearly declare that no other love except the mother's love can equal the Guru's love.
जे तान्हेनि मिया अपत्ये । आणि माझे गुरु एकलौते । म्हणौनि कृपेसि एकहाते । जाले तिये ॥19॥
कारण की मी श्रीगुरूचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. (म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे). म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो.
Because I am like an innocent child and my Guru is a mother having only one child, his love flows singularly to me only.
पाहा पा सरोवरी आघवी । मेघ चातकासी रिचवी । मजलागी गोसावी । तैसे केले ॥20॥
पहा चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला.
Dear listeners, please see how the cloud pours all the riches of its waters only for quenching the thirst of the bird Chataka. Similarly my Guru has showered me with his compassion.
म्हणौनि रिकामे तोंड । करू गेले बडबड । की गीता ऐसे गोड । आतुडले ॥21॥
म्हणून माझे रिकामे, शास्त्र वगैरे न शिकलेले, तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले.
Therefore, my empty mouth having nothing else to do, started casually uttering some words, and miraculously the great wisdom began to be expressed sweetly in them.
होय अदृष्ट आपैते । तै वाळूचि रत्ने परते । उजू आयुष्य तै मारिते । लोभु करी ॥22॥
दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.
When one is lucky, even the dust turns into a gem, and when the time of death has not come, a man who comes to kill, begins to love.
आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥23॥
श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात.
If the Lord of the world takes up on himself to provide good food at the time of dinner of his devotee, even the pebbles put in hot water to boil, will turn into rice as sweet as nectar.
तयापरी श्रीगुरु । करिती जै अंगीकारु । तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥24॥
त्याप्रमाणे श्रीगुरू जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते.
Similarly when the Guru kindly accepts disciple in his grace, even his ordinary worldly life becomes a saga of liberation.
पाहा पा श्रीनारायणे । तया पांडवाचे उणे । कीजेचि ना पुराणे । विश्ववंद्ये ? ॥25॥
गुरुस्तवनांतर्गत श्रीकृष्ण स्तवन असे पहा की त्या
Just see! Had the Lord Shrikrishna who is the eternal, the most ancient Narayana, worshipped by all the world, allowed Pandavas to feel any lacuna in their life?
तैसे श्रीनिवृत्तिराजे । अज्ञानपण हे माझे । आणिले वोजे । ज्ञानाचिया ॥26॥
(निवृत्तिनाथांच्या गुरुकृपेचे महत्व) त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले.
Similarly Shri Nivritti, the King (Of spiritual wisdom) has turned my ignorance to the high level of knowledge.
परी हे असो आता । प्रेम रुळतसे बोलता । के गुरुगौरव वर्णिता । उन्मेष असे ? ॥27॥
पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे ?
But let it be. While I talk, my love of my Guru is overflowing. But is anybody having knowledge enough to describe sufficiently the greatness of Guru?
आता तेणेचि पसाये । तुम्हा संताचे मी पाये । वोळगेन अभिप्राये । गीतेचेनि ॥28॥
आता त्याच श्रीगुरूच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगाण्याच्या साधनाने मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन.
And dear listeners! Now by the blessings of my guru whom I have just now praised, I am going to offer the meaning of Geeta at the feet of saints like you!
तरी तोचि प्रस्तुती । चौदाविया अध्यायाच्या अंती । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥29॥
चौदाव्या अध्यायाचा सिद्धांत ‘ज्ञानान्मोक्ष: ” तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला
Now the Lord Shrikrishna who is the ruler of total liberation of aloneness has at the end of the fourteenth chapter conclusively said that
जे ज्ञान जयाच्या हाती । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गीचिये ॥30॥
की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळावण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळवण्य़ास समर्थ होतो.
As Indra is the ruler of all the glory of heavens, similarly the man of knowledge is the ruler of liberation.
का शत एक जन्मा । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आन नोहे ॥31॥
अथवा जो शंभर जन्म, ब्रह्मकर्म करत करत घालवतो, तोच काय तो निश्चितपणे त्यास ब्रह्मदेवाचे पद भेटते दुसरे कुणासही ही नाही.
For example only the man who performs the rituals of Brahman for hundreds of incarnations becomes himself the God Brahma, and nobody else.
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवी डोळसु । तेवी ज्ञानेचि सौरसु । मोक्षाचा तो ॥32॥
ज्याप्रमाने डोळे चांगले असणार्या माणसाला जसा सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.
Or only man who has eyes can see the light of the Sun! So also the great bliss of liberation can be enjoyed only by the man of knowledge.
तरी तया ज्ञानालागी । कवणा पा योग्यता आंगी । हे पाहता जगी । देखिला एकु ॥33॥
ज्याप्रमाने ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगी पाञता आहे. याचा काही प्रमानात विचार करुन पाहिले असता, संपुर्ण जगामध्ये तोच एक योग्य आधिकारी दिसुन येतो.
And when the Lord Krishna desired to find out who is really capable of attaining that knowledge he found only one person.
जे पाताळीचेही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥34॥
ज्याप्रमाने जमिनीमध्ये असलेली साधन सामुग्री अर्थात द्रव्य डोळ्यात अंजन घातल्यास दृष्टीस पडते, परंतु ते अंजन घालण्यास डोळे सुद्धा पायाळू मनुष्याचेच पाहिजेत.
There is a divine ointment, which enables one to see the treasures hidden underground, but for that to become effective the man must be one, who is born with his feet first.
तैसे मोक्ष देईल ज्ञान । येथे कीर नाही आन । परी तेचि थारे ऐसे मन । शुद्ध होआवे ॥35॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना- पासुन मोक्ष प्राप्त होतो. यामध्ये शंका घेण्यास तिळमाञ जागा नाही. पंरतु ते ज्ञान आत्मसाथ करावयाचे झाल्यास प्रथमतःहा अंतकरणाची शुद्धता ही खुप महत्वाची आहे.
Similarly there is no doubt that the knowledge makes it possible to attain liberation, but in order to have this knowledge thoroughly imbibed in the heart, it is absolutely necessary that the mind should be very pure.
तरी विरक्तीवाचूनि कही । ज्ञानासि तगणेंचि नाही । हे विचारूनि ठाई । ठेविले देवे ॥36॥
ज्ञान टिकण्यास वैराग्याची आवश्यकता तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे.
And the Lord has further convincingly stated with full thought to the matter, that unless a man is really desireless, this knowledge will not abide in the heart for long.
आता विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनाते वरी । हेही सर्वज्ञे श्रीहरी । देखिले असे ॥37॥
आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील ? हे देखील सर्व जाणणार्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे.
Now the Lord has also thought, in what way the desirelessness comes to stay permanently in a man.
जे विषे रांधिली रससोये । जै जेवणारा ठाउवी होये । तै तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥38॥
ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणार्यास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो.
For example, suppose, a man knows that his food is prepared with some poison in it, he definitely abandons that plate and goes away.
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जै अनित्यता । तै वैराग्य दवडिता । पाठी लागे ॥39॥
त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्यावेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागते.
Similarly if the impermanance of life is keenly felt and fully experienced by a person, he may even forcefully turn away the quality of desirelessness but it again follows him closely.
आता अनित्यत्व या कैसे । तेचि वृक्षाकारमिषे । सांगिजत असे विश्वेशे । पंचदशी ॥40॥
आता या संसाराला क्षणभंगुरता कशा प्रकारे आहे, याचेच उदाहरण भगवान श्रीकृष्ण पंधराव्या अध्यायामध्ये वृक्षाची उपमा देऊन त्याचे वर्णन करत आहेत.
Now the Lord is telling allegorically the impermanence of the worldly life by using the image of a tree, in the present fifteenth chapter.
उपडिले कवतिके । झाड येरिमोहरा ठाके । ते वेगे जैसे सुके । तैसे हे नोहे ॥41॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असते, तेव्हा ते लवकर सुकते, त्याप्रमानेच हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली फांद्या असे जरी असले, तरी ते लवकर सुकुन जाणारे नाही. अर्जुना हे माञ लक्षात ठेव.
Now if we uproot a tree and put it with its foliage down and its trunk on the upper side, it dries up; but that is not the case of the tree of the worldly life.
याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥42॥
ज्याप्रमाने संसारविषयी झाडाचे कौशल्याने रुपक करुन भगवंतानी या जन्म आणि मृत्युच्या चक्रव्युहातुन संसाररुपी येरझार संपवुन टाकली आहे.
Thus by the skillful use of one image of the tree, the Lord is, in one sweep discarding the whole round of births and deaths.
करूनि संसार वावो । स्वरुपी अहंतेचा ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥43॥
संसार हा एक मिथ्या आहे हे सिद्ध करुन दाखवून आत्मस्वरूपामध्ये मी पणाचा अंतर्भाव व्हावा हाच ह्या पंधराव्या अध्यायाचा मुख्य विषय आहे.
This fifteenth chapter is told with the purpose of proving the futility of the worldly life and for the permanent establishment of the state that, "I AM BRAHMAN'' in the consciousness of the listener.
आता हेचि आघवे । ग्रंथगर्भीचे चांगावे । उपलविजेल जीवे । आकर्णिजे ॥44॥
आता हेच ग्रंथातील सर्व चांगले उत्तमोत्तम सिद्धांत विस्तारपुर्वक स्पष्ट करुन सांगण्यात येतील तरी ते तुम्ही श्रोत्यांनी तन मन लावून एकाग्रचित्ताने हे ज्ञान श्रवण करावे.
And I am going to explain clearly the secret of this chapter, with all my sincerity. Therefore I request you to please listen to this.
तरी महानंदु समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसे म्हणे ॥45॥
तर अनंत असणारा ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला. (संसारवृक्ष)
The Lord Shrikrishna, the ruler of Dwarka who is like the full moon who causes the high tide in the sea of the highest joy, said that
अगा पै पंडुकुमरा । येता स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥46॥
अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या ब्रम्हरुपी स्वरुपाच्या घरी येताना जे भ्रमरुपी द्वैत समोरुन झपाटणार्या वार्याप्रमाने अडवणुक करीत असते.
My dear son of Pandu, the illusion of this universe which becomes an impediment in the way to reach the Reality,
तो हा जगडंबरु । नोहे, येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांबला असे ॥47॥
ते हे भले मोठे अवाढव्य विशालकाय जगत् दिसत आहे, यालाच संसार असे म्हणतात. या विवेचनामध्ये हा संसार मुळीच नसुन सगळ्या बाजुनी पसरलेला मोठा वृक्ष असे, असे जानुन घेण्यास परमात्मा अर्जुनास सांगतात.
Should not be taken as the panorama of the universe as it appears, but should be seen as a great tree.
परी येरा रुखांसारिखा । हा तळी मूळे वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥48॥
परंतु इतर सर्वसामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे म्हणून या वृक्षाचे कोणासही वर्णन करता येत नाही कोणाला अंत लागत नाही.
But this tree has no roots down in the earth and branches above like any other tree and, therefore, generally nobody can grasp what is its structure and nature.
आगी का कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडी । तरी हो का भलतेवढी । वरिचील वाढी ॥49॥
ज्यावेळेस झाडाच्या बुडापाशी आग लावली असता अथवा कुर्हाडीचे कितीही घाव घातले असता तरी ही त्याचे कार्य बंद न पडता त्या झाडाची वाढ ही होतच असते.
If a tree is burnt or cut at the root, then even if it has great expanse of foliage;
जे तुटलिया मूळापाशी । उलंडेल का शाखांशी । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥50॥
ज्याप्रमाने सर्व साधारण असणारी झाडे ज्यावेळेस मुळासकट उपटले असता ते झाड फांद्यासकट उन्मळुन पडते. पंरतु तशा प्रकारे या संसाररुपी वृक्षाची अवस्था नसते कारण हा संसाररुपी वृक्ष तोडण्यास बोलण्या इतका सोप्पा नाही.
It immediately topples down, But this tree of worldly life is not so easily destroyed.
अर्जुना हे कवतिक । सांगता असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥
अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खालच्या बाजुस आहे.
Dear Arjuna, this is an extra-ordinary thing that this tree has its growth downwards.
जैसा भानू उंची नेणो के । रश्मिजाळ तळी फाके । संसार हे कावरुखे । झाड तैसे ॥५२॥
ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे कळत नाही, परंतु सुर्याच्या किरणसमुदाय संपुर्ण जग प्रकाशमय करते(यावरुन त्याची अथांगपणा जाणवेल) त्याचप्रमाने हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली शाखा पसरलेल्या असल्यामुळे विचिञ आश्चर्य आहे.
Just as the Sun is at an uncalculated height, and its rays spread downwards, similarly this tree of worldly life develops and expands downwards.
आणि आथी नाथी तितुके । रुंधले असे येणेचि एके । कल्पांतीचेनि उदके । व्योम जैसे ॥५३॥
ज्याप्रमाणे या विक्ष्वामध्ये जेवढ्या वस्तु आहेत, तेवढ्या सर्व वस्तु वृक्षाने व्यापुन टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाने कल्पातांच्या वेळेस संपुर्ण आकाश पाण्याने व्यापुन टाकले जाते.
Just as the waters at the time of final deluge occupy the whole sky, similarly this tree of worldly life fills every nook and corner of the universe.
का रवीच्या अस्तमानी । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनी । मांडला असे ॥५४॥
अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे.
Or as, when the Sun sets, the night is full of darkness; similarly the whole sky is totally filled by this tree.
यया फळ ना चुंबिता । फूल ना तुरंबिता । जे काही पंडुसुता । ते रुखुचि हा ॥५५॥
अर्जुना या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरता पाहवयास गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहयला गेले तर याला फूलही नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे.
Dear son of Pandu, it has no fruit which can be eaten, no flower which can be smelt. What is, is only this tree.
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेचि हा होये । शाड्वळु गा ॥५६॥
हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. या वृक्षाचे मुळ हे परब्रम्ह आहे. याच कारणाने अर्जुना हा संसारवृक्ष नेहेमी हिरवागार आणि टवटवित आहे.
Though it has its root above, it is always green because it is not like a tree uprooted and kept upside down.
आणि ऊर्ध्वमूळ ऐसे । निगदिले कीर असे । परी अधीही असोसे । मूळे यया ॥५७॥
आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत.
Though it is true that this tree is called to be having "roots above", it is a fact that there are more roots to this tree at the lower level also, which are innumerable.
प्रबळला चौमेरी । पिंपळा का वडाचिया परी । जे पारंबियांमाझारी । डहाळिया असती ॥५८॥
झपाट्याने वाढणार्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसाररुपीवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत.
Just as the banian and peepul trees have secondary roots growing out of their branches, similarly this tree has many roots at low level, which grow as fast as grass.
तेवीचि गा धनंजया । संसारतरु यया । अधीचि आथी खांदिया । हेही नाही ॥५९॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही.
Dear Dhananjaya, it is not that there are such extra roots and branches at only lower level,
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडे । सासिन्नले ॥६०॥
तरी याला वरच्या बाजूसही या संसारवृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात.
Because, there is great growth of branches at the highest level also.
जाले गगनचि पा वेलिये । का वारा मांडला रुखाचेनि आये । नाना अवस्थात्रये । उदयला असे ॥61॥
✏ह्या विशालमय वृक्षाचा विस्तार होण्यासाठी ज्याप्रमाने संपुर्ण आकाश आश्रयभुत कारण असुन संपुर्ण वारा या वृक्षाच्याच सामर्थ्याने वाहत असतो, हा संसाररुपी वृक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन अवस्थाच्या रुपाने प्रगट झाला आहे.
When we see this tree, we feel as if the whole sky has got tender leaves, or the wind has taken the shape of a tree or the three states of creation, existence and destruction have taken an incarnation of a tree.
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयाला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥62॥
✏असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज.
So, such a tremendous tree which fills the universe and is having roots at the highest level has come into existence.
आता ऊर्ध्व या कवण । येथे मूळ ते किं लक्षण । का अधोमुखपण । शाखा कैसिया ॥63॥
✏आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे ? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण कोणते आहे ? या वृक्षाच्या फांद्याना खाली मुख असणे आणि ते पसरणे, याचे कारण काय आहे ? व याच्या फांद्या कशा प्रकारच्या आहेत ?
Now, what is the meaning of the term 'Above', what are the signs of its roots, its nature, why it is growing downwards and what are its branches
अथवा द्रुमा यया । अधी जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥64॥
✏अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्यांचे स्वरुप काय आहे ? त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा प्रकारच्या आहेत ?
Or what are the roots of this tree which grow at the downward level and what is the nature of its branches which are at the highest level
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासी । निर्णयो केला ॥65॥
✏आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरता प्रात्त झाली आहे ? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे.
And why this tree is called 'Ashwattha'. are the questions, which are answered by those who are well-versed in the knowledge of Brahman.
हे आघवेचि बरवे । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगो सोलिवे । विन्यासे गा ॥66॥
✏अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला किंवा ध्यानात येतील अशा निर्मळ भाषेत विवरण करुन तुला सांगत आहे.
All this, I am going to tell you in such simple words as will be followed by you very easily.
पंरतु ऐके गा सुभगा । हा प्रसंगु असे तुमचिजोगा । कानचि करी हो सर्वांगा । हिंये आथिलिया ॥67॥
✏परंतु हे भाग्यवान अर्जुना, हे गितारुपी अमृत पिण्यास तुच योग्य आहेस. म्हणुन तुझ्या सर्व इंद्रियाचे कान करुन अंतकरणापासुन ऐक.
Therefore, O the most fortunate Arjuna, this is a subject which is fit for your listening only. Therefore make your mind steady and put all your attention into your ears.
ऐसे प्रेमरसे सुरफुरे । बोलिले जव यादववीरे । तव अवधान अर्जुनाकारे । मूर्त जाले ॥68॥
✏जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने मृतरुपी अवधान प्रगटले असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे,
When the Lord Shrikrishna, the leader of Yadavas said with great enthusiasm the above words, Arjuna became the very image of attention.
देव निरूपिती ते थेंकुले । येवढे श्रोतेपण फाकले । जैसे आकाशा खेंव पसरिले । दाही दिशी ॥69॥
✏ज्याप्रमाणे आकाश जसे विशाल असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे. त्याप्रमाने श्रीकृष्णाने जे विस्तारपुर्वक निरुपण केले. ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले.
Then the eagerness to listen became so great in the mind of Arjuna, that it was as if trying to embrace the sky from all the directions.
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोटु भरो पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥
श्रीकृष्णाच्या विचाररूपी समुद्रास गायब करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला.
Or Arjuna was the new sage Agasti, who had appeared in order to gulp down the whole teaching of Lord Shrikrishna, which was as vast as ocean.
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनी देवे देखिली । तेथ जालेनि सुखे केली । कुरवंडी तया ॥71॥
श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली
When the Lord saw that the eagerness in the heart of Arjuna is indescribably increased, he, with great satisfaction honoured that intensity to listen.
मग म्हणे धनंजया । ते ऊर्ध्व गा तरू यया । येणे रुखेचि का जया । ऊर्ध्वता गमे ॥15-72॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसारवृक्षामुळे वाटत आहे.
My dear Dhananjaya, the supreme Brahman is the root of this tree.
एऱ्हवी मध्योर्ध्व अध । हे नाही जेथ भेद । अद्वयासी एकवद । जया ठायी ॥73॥
(ब्रह्म) वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे ? ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे.
Actually, that which is the only one single principle has no such levels or parts like the top or the middle or the low.
जो नाइकिजता नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥74॥
जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादि साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय.
That principle is a sound which cannot be heard, the fragrance which cannot be experienced by nose, and the joy which is without contact with the objects of senses;
जया जे आऱ्हा परौते । जया जे पुढे मागौते । दिसतेविण दिसते । अदृश्य जे ॥75॥
ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पहाणार्यावाचून जे पहाणे आहे व स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे.
That which is itself nearer, which is itself beyond, which is both at the back and in the front, which is invisible but is seen without the observer;
उपाधीचा दुसरा । घालिता वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयाते ॥76॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो.
That which becomes the universe when name and form are attached to it;
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेचि जे ज्ञान । सुखा भरले गगन । गाळीव जे ॥77॥
जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय यावाचून केवळ ज्ञानमात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे.
That which is sheer knowledge without the knower and the object of knowing and which is the complete void of the sky, but is completely full of happiness.
जे कार्य ना कारण । जया दुजे ना एकपण । आपणया जे जाण । आपणचि ॥78॥
जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसर्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज.
That which is neither the cause nor the effect; that which is neither duality nor non-duality; and that which is with itself alone as Atman.
ऐसे वस्तु जे साचे । ते ऊर्ध्व गा यया तरूचे । तेथ आर घेणे मूळाचे । ते ऐसे असे ॥79॥
(माया) अशी जी सत्यवस्तू (ब्रह्मवस्तू), ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे अंकूर निघाले ते असे आहे. (तो प्रकार पुढीलप्रमाणे आहे.
That non-dual thing in itself is the top of this tree of the worldly life. I shall tell you now how this root is having sprouts.
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । का वांझेची संतती । वानणे जैशी ॥80॥
तर या संसारवृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत.
This name Maya is a false one given to the illusion, just like saying that a barren woman has a child.
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचे नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥81॥
त्याप्रमाणे जी माया ब्रम्हज्ञानाने बाधित असल्यामुळे खरी आहे म्हणता येणार नाही व ‘नाही ” म्हणता पण येत नाही कारण ‘आहे ” म्हणावे तर विचाराने तिचा बोध होतो व नाही ” म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी, असे तिचे अनुमान करता येते ज्या मायेस ब्रम्हविचाराचे नाव सहन होत नाही, अशा प्रकारची ती आहे व तिला अनादि (आरंभरहित) असे म्हणतात.
She is neither existing nor non-existing, she cannot stand the sharp probe of thought and still she is called 'Beginingless'.
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचे आकाश । जे आकारजाताचे दुस । घडी केले ॥82॥
जी अनेक तत्वं मिळुन तयार झालेली शक्तिची पेटी आहे. ती विक्ष्वरुप अभ्राला आधार आहे. आणि ती विक्ष्वाकाररुपी असणार्या वस्ञाची ती एकप्रकारे घडी आहे.
She is the box of various differences and she is, like having many clouds in it, containing many worlds and she is the original fold of the absolute Brahman after it becomes embodied.
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥83॥
संसाररुपी असणारी जी माया आहे ती संसारवृक्षाचे बीज असुन ती संसारविस्ताराची आधारभुमी आहे. अथवा जे काही विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे.
She is the tiny seed of the tree of the worldly life, she is the base of family life and mixture of five elements and she is the frozen flame of wrong type of knowledge.
ते माया वस्तूच्या ठायी । असे जैसेनि नाही । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होय ॥84॥
ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाहीच, अशा स्वरुपानेच ती असते. मग तीब्रम्ह तेजाच्या योगाने ब्रम्हाच्या तेजाने ती विक्ष्वरुपाने प्रगट होते.
She is within the abstract non- qualified Brahman in the state of non- existence and whatever activities are seen to have been done by her are actually the effect of the light of that absolute Brahman.
जेव्हा आपणया आली निद । करी आपणपे जेवी मुग्ध । का काजळी आणी मंद । प्रभा दीपी ॥85॥
जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा निजरुप करते अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी (जशी) दिव्याचा प्रकाश मंद करते.
For example, when we go to sleep, we make ourselves devoid of all knowledge or a lamp develops a little carbon on the wick.
स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी । निदेली चेववूनि वेगी । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥86॥
स्वप्नात आपल्या नवर्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवर्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते.
Also a man experiences a dream, and in it he sees a young lady by his side awake and so embraces her in the dream and becomes sexually disturbed even though actually there is no one to embrace.
तैसी स्वरूपी जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेचि रुखा यया । मूळ पहिले ॥87॥
त्याप्रमाणे स्वरूपाच्या धनजंया, ब्रम्हस्वरुपाच्या ठिकाणी जमा झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप, त्याच्या ठिकाणी नेणतेपणा किंवा अज्ञान आणते, आणि ब्रम्हस्वरुपालाच विषय करते. अशा प्रकारची माया संसारवृक्षाचे पहिले मूळ आहे.
Similarly, O Dhananjaya, this Maya comes into existence within the abstract Brahman and there is 'forgetting' of the Reality- this is the first root of the tree of worldly life.
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदु । वेदांती हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥88॥
जीवाला आपले वास्तव स्वरुप ब्रम्ह आहे. हे जिवास कळत नाही. जसे ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसारवृक्षाचा, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांसा आहे आणि उपनिषदांमध्येही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे.
This state of 'forgetting' which takes place in the original state of Brahman is the first and Primary root of this tree. This is called in Vedanta as Beeja- Bhava (The State of "Seed")
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥89॥
पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था, तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात.
The state of deep sleep, which is total ignorance is called "Beejankura-Bhava (the state of first sprout of the seed), and the two other states namely the dream state and the walking state are called the "Phala-Bhava" (The state of fruition) of the state of deep sleep.
ऐसी यया वेदांती । निरूपणभाषाप्रतीती । परी ते असो प्रस्तुती । अज्ञान मूळ ॥90॥
ज्याप्रमाने अशा प्रकारे वेदांतामध्ये सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती यांचे निरुपण करावयाची जी परिभाषा आहे, त्यावरुन बीज, अंकुर व फल याचा बोध प्राप्त होतो. पण ते आत्ता राहु दे. संसारवृक्षाचे मुळ घन अज्ञानात आहे, पार्था ते तु निश्चित जाणुन घे.
These are the terms used in Vedanta to explain the various states, but let it be. Our present intention is only to show that 'ignorance' is the root of this tree.
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचिती मूळे । बळिया बांधोनि आळे । मायायोगाचे ॥91॥
ज्याप्रमाने स्वच्छ आणि निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा काल्पनिक सबंध आहे. ते एकप्रकारे संसारवृक्षाचे बळकट असे जाळे असुन ते आळेच संसारवृक्षाचे मुख्य कारण आहे. असे मायासंबधीचे आळे झाल्यावर,
The top - most part of this is the pure Atman, and the roots which are said to be both in the lower level as well as on the higher level are grown in the garden bed of Maya.
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । ते चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥92॥
मग त्या मुळातच सुरुवातीला देह निर्माण होऊन खालच्या बाजुस चार प्रकारचे अंकुर निर्माण होतात.
Further, innumerable bodies are born at the lower level and on all the four sides, there are offshoots which spread tremendously.
ऐसे भवद्रुमाचे मूळ । हे ऊर्ध्वी करी बळ । मग आणियांचे बेंबळ । अधी दावी ॥93॥
असे जे संसारवृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस स्वरुपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर म्हणजे मग त्याला खाली अंकुराचे झुपके खाली येतात
Thus this root of this tree of worldly life gets its strength from the non-dual Brahman at the top and it projects bunches and bunches of offshoots at the lower level.
तेथ् चिद्वृत्ति पहिले । महत्तत्त्व उमलले । ते पान वाल्हेदुल्हे । एक निघे ॥94॥
त्या अंकुरात, चिद्वृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच काय ते एक उमलेले कोवळे लुसलुशीत पान निघते.
The first is the most tender leaf of the element 'Mahat', which is the 'consciousness' in each 'being'.
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥95॥
मग त्या पानास महत् तत्वापासुन अंहकार तयार होतो. तो अहंकार मुळात एकच असुन सात्विक, तामस, राजस असा तीन प्रकारचा होतो. त्यामुळे महत् तत्वाला सत्व, रज, तम अशी तीन पाने असलेला आणि मुळाशी विस्तारलेला अहंकाररुपी कोंब किंवा अंकुर फुटतो.
From it, at its lower end, another stem comes out which is 'Ego' and it has three leaves as Sattwa, Rajas and Tamas.
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणे ॥96॥
तो त्रिगुणात्मक अहंकाररुपी सत्वापासून उपन्न होणार्या बुद्धीचे शेंडा निर्माण करुन सर्व प्रकारच्या भेदभावांची वृद्धी करतो, त्याच वेळी तो अहंकाररुपी मनाची डहाळी विकसितपणाने धारण करतो.
From this offshoot of Ego, the branch of intellect is developed and it keeps the branch of mind always fresh by various different moods.
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥97॥
याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी कोवळ्या फांद्या, या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात.
From the original root, which is at the top, the offshoots of the branches of the four parts of consciousness grow and they are heavily saturated with the juice of Vikalpa (doubts), on this tree of worldly life.
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हे पांच फोंक । महाभूतांचे सरोख । सरळे होती ॥98॥
मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणार्या आकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे पाचही फोक वेगाने सरळ निघतात.
Then there are straight greater branches of the five elements namely, the sky, the Wayu (air), light, water, and earth.
तैसी श्रोत्रादि तन्मात्रे । तिये अंगवसा गर्भपत्रे । लुळलुळिते विचित्रे । उमळती गा ॥99॥
त्याचप्रमाणे राजस अहंकारापासुन महाभुत स्वरुप अशी श्रोञादी दहा इंद्रिये तयार होतात. शरिराच्या आश्रयाखाली राहतात, इकडे तिकडे डोलणारी, चिञविचिञ अशी लुसलुशीत पानाप्रमाने आहेत.
On these straight branches only there are the various leaves, which are curved inside and they consist of the five sense organs such as ears, eyes, etc. and their objects. These leaves are strangely fascinating and very delicate.
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडी । आकांक्षेची ॥100॥
ज्याप्रमाने त्या पंचमहा भुतांमध्ये एकमेकाबद्दल पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासुन शब्दाचा अंकुर तयार होतो. त्या अकुंराला भेटण्याकरता श्रोञेंद्रियांची दिडपट वाढ होत असताना ती वाढ अपेक्षेचे पेरे करीत असते.
Then the sprout of sound which is the object of the ear, grows very fast and the power of listening increases very much and there are visible the various stems growing one after another, which are innumerable desires.
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरी घेती धाव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचे ॥101॥
शरीरातील त्वचेइंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्श रुपी अंकुर येतो. त्यावेळी नव्या नव्या विकारांची खुपच पुष्कळ वाढ होते.
The creeper which is the body and the new foliage which is the skin, produce many sprouts of the sense of touch and quite a new powerful network of passions forms itself.
पाठी रूपपत्र पालोवेली । चक्षु लांब ते कांडे घाली । ते वेळी व्यामोहता भली । पाल्हाळी जाय ॥102॥
ज्याप्रमाने पुढे रुप नावाचे पान फुटते. आणि मग डोळा हा भ्रमाने त्याची गोडी चाखण्यासाठी धाव घेत असतो.
Then the tender leaves of shapes grows and when the stem of the power of eyes to see objects increases, there is an overflow of confusion and delusion.
आणि रसाचे आंगवसे । वाढता वेगे बहुवसे । जिव्हे आर्तीची असोसे । निघती बेंचे ॥103॥
आणि पाण्यापासुन तयार झालेल्या रसांच्या साली खुप वेगाने वाढत असतात. त्यावर जिभेच्या इच्छारुपी पानांचे पुष्कळ झुंबाडे निघत असतात.
And when the desire for taste creates another offshoot of 'juices', then there is the tongue having great desire for fulfillment of the instinct of tasting of various things.
तैसेचि कोंभैलेनि गंधे । घ्राणाची डिरी थांवु बांधे । तेथ तळु घे स्वानंदे । प्रलोभाचा ॥104॥
त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो.
Then there is another very powerful protrusion of desire for smelling, to fulfill which the nose becomes very active, and addicted to various smells.
एवं महदहंबुद्धि । मने महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासन्निजे ॥105॥
याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते.
Thus the elements of Mahat, the ego, the mind, the intellect, and the five elements like earth etc. enhance the expanse of this tree of the worldly life.
किंबहुना इही आठे । आंगी हा अधिक फाटे । परी शिंपीचियेवढे उमटे । रुपे जेवी ॥106॥
फार काय सांगावे ? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु (हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही). जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते.
Or rather, we can say that these eight factors produce more and more branches, but when silver appears to be on the inner surface of a shell, it is limited by the shape of that shell only.
का समुद्राचेनि पैसारे । वरी तरंगता आसारे । तैसे ब्रह्मचि होय वृक्षाकारे । अज्ञानमूळ ॥107॥
अथवा समुद्रावर तयार होणार्या लाटा ज्याप्रमाने समुद्राएवढ्याच असतात. त्याप्रमाणे ब्रह्मच हे अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते.
Or the waves on the sea spread only within the limits of the shores. Similarly the non - dual Brahman itself assumes the form of this worldly life.
आता याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपे स्वप्नी परिवारु । येकाकिया ॥108॥
अर्जुना संपुर्ण विक्ष्व हे अज्ञानाचा विस्तार असुन त्यावर त्याचा सर्व पसारा भासत आहे. ज्याप्रमाने स्वप्नात मनुष्य एकटा असुन जेवढे काही तो स्वप्न पाहतो.
For examples, in dream we ourselves project various people though we are only one individual. Similarly the whole expanse and shape of the apparent tree of this worldly life is the 'Brahman' only.
परी ते असो हे ऐसे । कावरे झाड उससे । यया महदादि आरवसे । अधोशाखा ॥109॥
परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात.
But let us stop here. In short, this strange and wonderful tree comes into existence and because it has various sprouts like 'Mahat' etc., its branches grow further on the lower levels.
आणि अश्वत्थु ऐसे ययाते । म्हणती जे जाणते । तेही परिस हो येथे । सांगिजेल ॥110॥
या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्य़ाचे कारण आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय ? तेही येथे सांगण्यात येईल, ऐक.
Now I shall tell you, why the men of knowledge give this tree the name of Ashwattha.
तरी श्व: म्हणिजे उखा । तोवरी एकसारिखा । नाही निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥111॥
तर क्ष्व: म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही. म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात.
The letter shwah ( )means the next dawn or the day of tomorrow and this tree has no endurance even up to the next day.
जैसा न लोटता क्षणु । मेघु होय नानावर्णु । का विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥112॥
ज्याप्रमाने एक क्षण लोटला नाही तोच मेघ विविध रंगांचा होतो अथवा वीज ही निमिषभर देखील पुर्णपणे टिकत नाही.
Every moment the colours of cloud undergo many changes and the lightning does not remain steady even for the moment of batting of the eye.
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाही जळा । का चित्त जैसे व्याकुळा । माणुसाचे ॥113॥
ज्याप्रमाने कमळाच्या हालणार्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते.
Or the trembling lotus-leaf cannot remain steady on the surface of water or the mind of a man who is suffering from something is never peaceful.
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययाते म्हणती । अश्वत्थु हा ॥114॥
त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात.
Similar is the case of this tree of worldly life. It is being destroyed every moment and therefore it is called 'Ashwattha.'
आणि अश्वत्थु येणे नांवे । पिंपळु म्हणती स्वभावे । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥115॥
आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही.
Some say that the meaning of the term Ashwattha is the common 'peepul' tree, but the lord Shri Krishna is not referring to it here.
एऱ्हवी पिंपळु म्हणता विखी । मिया गति देखिली असे निकी । परी ते असो काय लौकिकी । हेतु काज ॥116॥
एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे ? भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे.
But suppose we take that meaning, then also we can understand the imagery with proper sequence. But let us put it aside. What concern have we with common-place things?
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥117॥
म्हणून आता या संसारवृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले जाते.
Therefore, O listeners, please listen to the original text being explained, which is quite out of the ordinary. Thus this tree should be called Ashwattha because it is impermanent.
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥118॥
आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजेच नित्य या नावाने प्रसिद्ध आहे; परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे.
And yet there is one more thing special about this tree. This tree is called "unending" but its meaning is quite different.
जैसा मेघांचेनि तोंडे । सिंधु एके आंगे काढे । आणि नदी येरीकडे । भरितचि असती ॥119॥
ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचे बाष्पिकरण होऊन वाफेद्वारे मेघाना जाऊन मिळतात. व तेच मेघ पाऊसाचा वर्षाव करुन नदीपाञात ओढे, नाल्या द्वारे ते नद्याना भेटुन त्या सर्व नद्दा पुन्हा समुद्रास जाऊन भेटतात.
The sea is being dried up through heat and clouds are formed, and at the same time, on the other side, it is being filled in by rivers.
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जव नुघडे । मेघा नदींची ॥120॥
त्याचप्रमाने तो समुद्र कमी होत नाही अथवा जास्त होत नाही, असा चारही बाजुंनी परिपूर्णच आहे, असे वाटते, परंतु त्याचे परिपूर्णत्व, जोपर्यंत मेघ आणी नदी यांचे उपसने आणि भरणे, हे स्वरुप स्पष्ट झालेले नाही. तेवढ्या पुरताच समुद्र भरलेला आहे असेच वाटते.
Therefore, it does not become smaller or larger, but the chain of clouds and rivers should not be cut.
ऐसे या रुखाचे होणे जाणे । न तर्के होतेनि वहिलेपणे । म्हणौनि ययाते लोकु म्हणे । अव्ययु हा ॥121॥
त्याप्रमाणे या संसारवृक्षाची वाढ व लय अति प्रचंड गतीने होत असल्यामुळे त्याचा तर्क करता येत नाही, म्हणून सामान्य लोक याला अविनाशी असे म्हणतात.
Similarly the existence and the ending of this tree cannot be logically understood separately and, therefore, people say that this tree is unending.
एऱ्हवी दानशीळु पुरुषु । वेचकपणेचि संचकु । तैसा व्ययेचि हा रुखु । अव्ययो गमे ॥122॥
ऐरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाशी असा भासतो.
Just like a generous man spends money on one side and earns merit on the other side, so this tree seems to be unending because it is continuously ending from moment to moment.
जाता वेगे बहुवसे । न वचे का भूमी रुतले असे । रथाचे चक्र दिसे । जियापरी ॥12॥
ज्याप्रमाने रथाचे चाक अती वेगाने फिरत असताना देखील ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते.
For example, the wheel of a chariot which is moving very fast appears to be not moving or remaining fixed on the ground.
तैसे काळातिक्रमे जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥124॥
त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसारवृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसारवृक्षास फुटतात.
Similarly when one branch of beings of this tree dries up by a certain time, many other branches grow.
परी येकी केधवा गेली । शाखाकोडी केधवा जाली । हे नेणवे जेवी उमलली । आषाढ अभ्रे ॥125॥
ज्याप्रमाने आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या हे कळत नाही
But like the clouds at the onset of rainy season in the month of Ashadha, we cannot understand when one branch is lost and crores of other branches have grown.
महाकल्पाच्या शेवटी । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेचि आणिखीचे दांग उठी । सासिन्नले ॥126॥
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात.
At the end of the great world period, (Mahakalpa) the whole nature comes to an end and is dissolved, but at the same time, the whole jungle of another world is created.
संहारवाते प्रचंडे । पडती प्रळयातीची सालडे । तव कल्पादीची जुंबाडे । पाल्हेजती ॥127॥
संहारकारक प्रचंड वार्याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसारवृक्षाची साली गळून पडतात न पडतात तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय उत्पन्न होतात.
When by the great winds at that time, the outer forms of all beings are dissolved, other great complex structures of new creations at the time of the beginning of new Mahakalpa begin to have tender leaves.
रिगे मन्वंतर मनूपुढे । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडे । जिंके जेवी ॥128॥
कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसर्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो.
Just as the nodes of sugarcane grow one after another, similarly one `Manu' follows another `Manu,' and there is a continuous chain of races and sub-races.
कलियुगांती कोरडी । चहु युगांची साले सांडी । तव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥129॥
कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची नविन अतिशय रसरशीत अशी मोठी सालपटे जोमाने उत्पन्न होण्यास लागतात.
When at the end of Kaliyuga (the age of Kali), the dry peels of the four ages fall down, another fresh great skin of Kritayuga, suddenly spreads.
वर्तते वर्ष जाये । ते पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात की येत आहे । हे चोजवेना ॥130॥
चालू असलेले जे वर्ष संपुन जाते ते पुढच्या वर्षास आमञंन देते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही.
We do not understand properly whether the present year is passing or the new year is coming as if invited; or when this day is going into the past and when tomorrow is coming.
जैशा वारियाच्या झुळका । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणो किती ॥131॥
ज्याप्रमाणे वार्याच्या झुळुकांमागून झुळुका वहात असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्या व नाश पावणार्या फंद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही.
Just as there are no clear joints between the breezes of the wind, so it is not clearly understood how many branches of this tree fall and how many new come into being.
एकी देहाची डिरी तुटे । तव देहाकुरी बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥132॥
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्हेने हा संसारवृक्ष अव्यय, अविनाशी आहे असा वाटतो.
While the twig of one body is cut, twigs of many more bodies come into being and, therefore, this tree of the worldly life appears to be constant, without end.
जैसे वाहते पाणी जाय वेगे । तैसेचि आणिक मिळे मागे । येथ असंतचि असिजे जगे । मानिजे संत ॥133॥
जसे वहाणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वहाणारे पाणी मिळात असते, त्यामुळे पहाणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात.
Just as the water in a stream flows speedily and immediately its place is taken by more water following it, similarly this tree, though not the same at all times appears to be constant.
का लागोनि डोळा उघडे । तव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥134॥
अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटीवेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते.
For example, on the surface of water, there are waves after waves appearing in quick succession, within the time of batting of an eyelid, and the ignorant man things that the wave is permanent.
वायसा एके बुबुळे दोहींकडे । डोळा चाळीता अपाडे । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवी जगा ॥135॥
एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो.
It is just like the illusion of two pupils in both the eyes of a crow, caused by the quick movement of its one pupil in both the eyes.
पै भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥136॥
भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो.
When the 'top' is rotating fast around itself on the ground, it appears to be still, because of its great speed.
हे बहु असो झडती । आंधारे भोवंडिता कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥137॥
हे राहू दे, अंधारामधे कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंडचक्राच्या आकाराची दिसते.
When in darkness a torch is moved rapidly in a circular motion there appears to be a circle of light.
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥138॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळाल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात.
Similarly as this tree of worldly life is not clearly seen while coming into existence or being destroyed, ordinary ignorant people take it to be constant.
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळा निमिखे । होत जात ॥139॥
परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते,
But one who sees very quickly the constant becoming and ending of this tree within a second, crores of times, he recognises it to be really momentary.
नाही अज्ञानावाचूनि मूळ । ययाचे असिलेंपण टवाळ । ऐसे झाड सिनसाळ । देखिले जेणे ॥140॥
या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भासमात्र आहे असे ज्याने जाणले.
Really, he who recognizes that there is no other root except ignorance, for this tree and its existence is unreal, and this tree itself is false;
तयाते गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणे जाणता । पै वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥141॥
अर्जुना, त्याला संसारवृक्षाचे क्षणिकत्व जाणणार्याला मी जो सर्वज्ञ तोच ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे.
O the son of Pandu, I say that he is the man of complete knowledge and he is himself the ideal of the doctrine of Vedas.
योगजाताचे जोडले । तया एकासीचि उपेगा गेले । किंबहुना जियाले । ज्ञानही त्याचेनी ॥142॥
✏सर्वप्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे ? ज्ञान-उपदेशाचा संप्रदाय देखील त्या जिवनमुक्त पुरुषाच्या योगानेच सुरु असतो.
All the yogic practices are useful only for such a man of wisdom or we can say that the knowledge itself survives because of this man.
हे असो बहु बोलणे । वानिजैल तो कवणे । जो भवरुखु जाणे । उखि ऐसा ॥143॥
✏हे फार बोलणे राहू दे. अशा प्रकार हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल ?
But enough with the prolonged explanation. Who can really describe adequately the greatness of such a man who knows this tree to be ephemeral?
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥144॥
✏मग याच खाली असलेल्या या संसाररुपी झाडाला वरच्या बाजुस सुद्धा पुष्कळ फांद्या तयार होतात.
Then there are many branches which grow straight upwards to this tree of worldly life, which has, as already told, many downward branches.
आणि अधी फांकली डाळे । तिये होती मूळे । तयाही तळी पघळे । वेल पालवु ॥145॥
✏आणि तळाशी पसरलेल्या संसारवृक्षाच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मूळे होतात व त्या मुळांपासून खालच्या भागास वेल व पाला फुटुन त्याची विस्तार होत जातो.
Further even to the downward branches, there are more roots and below those roots are creepers having new tender leaves.
ऐसे जे आम्ही । म्हणितले उपक्रमी । तेही परिसे सुगमी । बोली सांगो ॥146॥
✏असे जे आम्ही सुरुवातीला (ओवी 57 ते 64 मधे) म्हटले होते तेच अजुन सोप्या भाषेत सांगतो ऐक.
This which we have already told you in the beginning, we shall now explain in details.
तरी बद्धमूळ अज्ञाने । महदादिकी सासिने । वेदांची थोरवने । घेऊनिया ॥147॥
✏तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने अष्टदा प्रकृती तयार होऊन वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो.
Now the eight - faceted Maya consisting of the elements like "Mahat" etc. comes into existence from the firm root of ignorance and then there grow great forests of Vedas, which embody all knowledge.
परी आधी तव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥148॥
परंतु प्रारंभी झाडाच्या बुडापासुन तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून (मुळापासून) चार मोठ्या मोठ्या फांद्दा उत्पन्न होतात.
But first there are four equally strong broad branches of the 'Born of sweat', 'Born of placenta'; 'Born of earth' and 'Born of eggs'.
यया एकैकाचेनि आणगटे । चौऱ्यांशी लक्षधा फुटे । ते वेळी जीवशाखी फाटे । सैंघचि होती ॥149॥
✏या एकेक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौर्यांशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे तयार होतात.
From each of these four branches, there are further strong offshoots of eighty-four lakhs of species and there are on the branch of living Beings further innumerable divergent stems of Beings.
प्रसवती शाखा सरळिया । नाना सृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥150॥
✏मागे सांगितलेल्या चार खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात. आणि अनेक जातिरूपी आडव्या फांद्या ह्या संसारवृक्षाला उत्पन्न होतात.
Some branches are straight, but there are many horizontal and crooked branches growing out of them which are the chains of innumerable species of Beings.
स्त्री पुरुष नपुंसके । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिके । विकारभारे ॥151॥
स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात.
By the distortions in the life force of these branches, various types moulded as male, female, and neutrals come into being and spread everywhere.
जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हेजे नवघनी । तैसे आकारजात अज्ञानी । वेली जाय ॥152॥
✏ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामधे नव्या नव्या मेघांच्या रूपाने दिसु लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी जगातील विविध आकारमात्राचा वेल पसरतो.
Then due to the ignorance, many forms and shapes come into existence like the innumerable shapes of clouds gathering in the sky in rainy season.
मग शाखांचेनि आंगभारे । लवोनि गुंफिती परस्परे । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥153॥
✏मग शाखेच्या स्वाभाविक ओझ्याने त्या शाखा आपआपल्या अंगभाराने खाली लवून एकमेकांमधे गुंततात व हे सर्व ञिगुणरुपी वाहु लागल्याने होत असते.
Afterwards, when these branches become heavy by their own weight and get entangled among themselves, the three qualities of Sattwa, Rajas and Tamas become agitated and they create great wind of turbulences.
तेथ तेणे अचाटे । गुणांचेनि झडझडाटे । तिही ठायी हा फाटे । ऊर्ध्वमूळ ॥154॥
✏ते गुण अती वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमूलाच्या वृक्षास खाली, वर व मध्ये असे तीन भेद तयार होऊन फाटे फुटतात.
Then this tree having its root at the highest level, becomes trisected by the forces of these qualities.
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडिता आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥155॥
✏रजोगुणाचा वारा वहात असताना होणारी वाढ रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजातीरूपी फांद्या जोराने वाढतात.
When the waves of the wind of Rajas begin very powerfully, the branch of human race becomes over-grown.
तिया ऊर्ध्वी ना अधी । माझारीचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥156॥
✏त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन, त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात.
It neither climbs up nor turns downward, but becomes more and more solid within itself, and there are transverse branches of the four classes of human beings.
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचे अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥157॥
✏विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते.
Then there are delicate and beautiful twigs of the dictum of Vedas, which have great tender leaves of 'What is right and what is wrong action."
अर्थु कामु पसरे । अग्रवने घेती थारे । तेथ क्षणिके पदांतरे । इहभोगाची ॥158॥
✏ज्याप्रमाने मनामध्ये अर्ध आणि कामाचा विस्तार होऊ लागतो. इहलोकात क्षणभंगुर असलेल्या जिवनास सुखाचे कोंभ फुटु लागतात.
From them the desire for money and lust for enjoyment grow tremendously and by ever new offshoots, there are many temporary spots or resorts or enjoyments of pleasures on these branches.
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभे । खांकरेजती शुभाशुभे । नानाकर्मांचे खांबे । नेणो किती ॥159॥
✏️त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभ आणि अशुभ कर्मांचे फाटे किती फुटतात हे कळत नाही.
And the extrovert projections of desires become so powerful that there is no limit to all the good or bad activities indulged into by men.
तेवीचि भोगक्षीणे मागिले । पडती देहातींची बुडसळे । तव पुढा वाढी पेले । नवेया देहांची ॥160॥
✏त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की मागची देहरुपी सुकलेली जुनी बुडे पडुन जातात. तोच पुन्हा पुढे नव्या देहाच्या नव्या सालीच्या शाखा तयार होऊन वाढु लागतात.
In this process, the broken trunks of old and weak, 'used-up' bodies which have become useless by over-indulgence, fall down, but at the same time new growths of new bodies come forth.
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगे हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥161॥
ज्याप्रमाने त्या संसारवृक्षाला मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आवड तयार करणारे आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवनव्याने तयार होत असते.
And new foliages of the objects of sense organs, such as the sound, the smell etc., grow up every moment which are very attractive because of their naturally brilliant colours.
ऐसे रजोवाते प्रचंडे । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥162॥
याप्रमाणे रजोगुणाचा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यशाखांचे समुदाय जेव्हा तयार होतात. त्यास या संसारवृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रघात आहे.
In this way, the human kingdom is established and developed by the great gusts of the wind of Rajas, forming great crowd of various human races.
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजो लागे घोरा । तमाचा तो ॥163॥
तमोगुणाचा वारा वहात असतांना होणारी वाढ) त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वहाण्याचा बंद होतो तेव्हा तमोगुणाचा भयंकर वारा वहाण्यास लागतो.
Later, when this hurricane of Rajas subsides to some extent another tornado of Tamas starts its noisy action.
तेधवा याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधी देखा । पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥164॥
तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना भोगाची निच वासना जेव्हा उत्पन्न होते. तेव्हा त्याच वाईट कर्माच्या डहाळ्या विस्ताराला पावतात असे समज.
Then on this very branch of human race, on its lower side, there are tender leaves of lowest type of passions, which grow into various branches of wicked and sinful deeds.
अप्रवृत्तीचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाची ॥165॥
ज्याप्रमाने वाईट मार्गाचे बळकट सरळ फोक निघुन (मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने व फांद्या उत्पन्न करीत फुटतात.
Then the dirty half burnt offshoots of sins come out straight, very forcefully, on which there are profusely developed twigs of vices which are full of very heavy growth of leaves.
बोलती निषेधनियमे । जिया ऋचा यजुःसामे । तो पाला तया घुमे । टकेयावरी ॥166॥
यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे (अमूक आहेत असे) सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर फुटु लागतो.
We should understand that the trinity of Vedas namely Rigveda, Yajurveda, and Samaveda which indicate the right and wrong actions is the delicate topmost group of tender leaves,
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिही पानी घेती प्रसार । वासना वेली ॥167॥
दुसर्याच्या नाशाकरता जारण, मारण स्तंभन, मोहन, , उच्चाटन, वशीकरण इत्यादी प्रतिपादन करणारी अविचाररुपी कर्मे आगम ग्रंथांनी सांगितलेली आहेत.
After that the tender leaves of Atharvaveda which has charms used for evil purposes grow into a creeper of desire.
तव तव होती थोराडे । अकर्मांची तळबुडे । आणि जन्मशाखा पुढे पुढे । घेती धाव ॥168॥
मागील ओवीत सांगितल्या प्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे वाढत जातात. अर्थात श्रेष्ठ योनीतून नीच योनीच्या जन्मास प्राप्त होतात.
As this activity goes on continuously, the trunks of bad deeds begin to become very broad and branches of re-births spread further and further on that tree.
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फाटा । जाळ पडे कर्मभ्रष्टा । भुलोनिया ॥169॥
तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते.
Then there is a great downward branch of human beings like Chandala etc. which is very low, and people who commit sinful actions get themselves entangled into that net.
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥170॥
ज्याप्रमाने जसजसा अधर्माची वाढ होऊ लागेल तसतसे पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आडव्या शाखांचे समुदाय विस्तार पावु लागतात.
Then more branches grow there, being the lives of animals and birds, viz. pigs, tigers, scorpions, and serpants etc., which spread horizontally.
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगीहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥171॥
परंतु अर्जुना, (तमोगुणाच्या उत्कर्षात) अशा या मनुष्यशाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते.
O Pandava, these branches are always fresh-looking and well-nourished because there are in store for them the fruits of bad deeds, in the form of hell.
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगे धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥172॥
आणि तेथे हिंसा व मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादि निषिद्ध कर्मांचे अंकूर अनेक जन्मातून वाढतच असतात.
These sprouts, constantly indulging into vices such as violence etc. continue to grow fast in births after births.
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवी जाण । फळेही हेची ॥173॥
(ज्या माणसांमधे तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे) ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच.
In this way, there come into being such things as iron, clod, stone, or grass or bushes and trees, their fruits being similar to them.
अर्जुना गा अवधारी । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥174॥
(मनुष्यरूपी डहाळ्या ह्या खालच्या शाखांची मुळे आहेत. ) अर्जुना, ऐक. याप्रमाणे या संसारवृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते.
Dear Arjuna, in this way the branches from the human races down to the inanimate things grow on and on.
म्हणौनि जी मनुष्यडाळे । तिये जाणावी अधीचि मूळे । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥175॥
म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की मग तेथून संसारवृक्ष विस्ताराला पावतो.
Therefore, we should consider these branches or the main branch of human beings to be the roots of downward growth, because this tree of worldly life spreads at the lower level from the human kingdom.
एऱ्हवी ऊर्ध्वीचे पार्था । मुद्दल मूळ पाहता । अधीचिया मध्यस्था । शाखा इया ॥176॥
एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत.
Otherwise O Partha, when we consider the primary root, which is at the top, we have to consider these offshoots in the middle and lower portions as branches only.
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखी । अधोर्ध्वींचिया ॥177॥
परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्यारूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात.
But for the branches of good action and bad actions belonging to the Tamas and Sattwa quality, which are developed downward and upward,
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागो अर्जुना । जे मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाही ॥178॥
अर्जुना तीन वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसर्या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही.
And the tender leaves of the three Vedas, which are already developed, have no other existence, O Arjuna, except in the human world.
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळे ॥179॥
म्हणून मनुष्यतनु ह्या जरी संसारवृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज.
Therefore, even though human body is a branch produced from the primary root at the topmost level, it must be understood that this branch becomes the root cause for the development of Karma.
आणि आनी तरी झाडी । शाखा वाढता मुळे गाढी । मूळ गाढे तव वाढी । पैस आथी ॥180॥
आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमधे खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो.
Similar is the case with all the trees. As the branches grow large and thick, the roots also go deeper and spread wider, and further, as the roots become stronger, the tree expands more and more.
तैसेचि इया शरीरा । कर्म तव देहा संसारा । आणि देह तव व्यापारा । ना म्हणोचि नये ॥181॥
या मनुष्यशरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. (ते असे की) जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे रहाणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही,
Similar is this human body. So long as action (Karma) takes place, there is the chain of bodies after bodies and so long as the bodies are there, there is no break in the chain of karma.
म्हणौनि देहे मानुषे । इये मुळे होती न चुके । ऐसे जगज्जनके । बोलिले तेणे ॥182॥
म्हणून मनुष्य देह ही (या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची) मुळे आहेत. यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने (श्रीकृष्णाने) सांगितले.
The Lord, the father of the world, said that, these human bodies are the roots of the wider spread of the worldly life.
मग तमाचे ते दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥183॥
(सत्वगुणाची वावटळ सुटल्यावर होणारी वाढ) मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते.
Then, the fast blowing wind of Tamas subsides, as the tremendous tempests of pious Sattwa quality begin.
तै याचि मनुष्याकारा । मुळी सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरी ॥184॥
त्याचवेळी ह्याच मनुष्याकाररूपी मुळांस सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन (म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात), नंतर त्यास (त्या कोंबास) सत्कर्मरूपी अंकुर फुटतात.
At that time, on this branch of human race, there come forth the sprouts of good desires and good deeds in a very large quantity.
उकलतेनि उन्मेखे । प्रज्ञाकुशलतेची तिखे । डिरिया निघती निमिखे । बाबळैजुनी ॥185॥
विकासणार्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात.
With the sudden advent of the light of knowledge, many new twigs start to grow in many branches, because of the great power of intellect.
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवे । बुद्धि प्रकाश घे धावे । विवेकावरी ॥186॥
बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते. म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो.
The trunks of intellect grow straight and they have subsidiary branches of inspiration and thereby the light of the intellect shines forth with the help of discriminative thought.
तेथ मेधारसे सगर्भ । अस्थापत्री सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥187॥
त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्तिरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था (आदर) रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात.
When from the foliage of devotion, which has the juice of intellect enriching it, there come forth beautiful and straight offshoots of benevolent thought;
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥188॥
सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात.
On these numerous sprouts of good thought and good action, there is recitation of Vedas, resounding very melodiously.
शिष्टागमविधाने । विविधयागविधाने । इये पानावरी पाने । पालेजती ॥189॥
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात.
Then there are leaves produced from innumerable leaves, which consist of good moral conduct, social behaviour, right ritualistic performance according to Vedas, and such performances as various Yadnyas (sacrifices).
ऐशा यमदमी घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोवळिया । वेल्हाळपणे ॥190॥
अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात.
From them further twigs of penances grow, having self-control in action and thought as fruits dangling from them, which in turn give birth to the delicate but very lengthy branches of desirelessness.
विशिष्टा व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगे ऊर्ध्वमुख । उंचावती ॥191॥
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात. श्रेष्ठव्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात.
On the sharp tip of courage, new tender offshoot of various vows are born, and they reach very quickly to a very high level.
माजी वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥192॥
जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मधे असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची, ज्ञानांची {झडझडाट} गर्जना करतो.
There is thick foliage of Vedas in it, and when the wind of Sattwa quality blows very fast, this foliage makes a rustling sound of 'good knowledge.'
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळी । स्वर्गादिकी ॥193॥
तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात.
Then a straight branch of religion grows and there is horizontal branch attached to it which is consisting of the fruits of heavenly pleasures.
पुढा उपरति रागे लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥194॥
पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच रहाते.
Then there is another reddish branch of disinterestedness to which there is constantly growing tender foliage of liberation.
पै रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥195॥
नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात.
Similarly there are further crosswise branches of the various heavenly bodies like the sun and the moon, planets, residents in the astral world, sages, angels of wisdom, etc.
याहीपासून उंचवडे । गुढले फळाचेनि बुडे । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥196॥
ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात.
There are, higher than these, other branches full of fruits, which are of the heaven world of Indra and others.
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानी उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥197॥
मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचि-कश्यपादि वरल्या शाखा आहेत.
Still higher are the branches which are created by various sages like Marichi, Kashyapa, etc. by the creative power of their penances.
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडी साना अग्री थोरु । फळाढ्यपणे ॥198॥
याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे.
Thus these higher branches are more and more escalating, which are very small at the beginning but grow large after they bear the fruits at the top.
वरी उपरिशाखाही पाठी । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटी । कोंभ निघती ॥199॥
अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच व फळही तेच.
Further, O the crowned Arjun, there are still higher offshoots of these and other subsidiary branches, which are the abodes of God the creator and Lord Shiva, etc.
फळाचेनि वोझेपणे । ऊर्ध्वी वोवांडे दुणे । जव माघौते बैसणे । मूळीचि होय ॥200॥
हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. ब्रह्माच्या जवळ येते.
The wonder of these higher branches in the heaven world is that by the weight of their fruits these become heavier and bending down, come to their primary place of birth, (which is the human world).
प्राकृताही तरी रुखा । जे फळे दाटली होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाचेही असेच आहे. तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते.
In the case of ordinary trees also they bend down when the weight of the fruits becomes heavier and the branches touch the roots.
तैसे जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तिये मूळी टेकती पांडवा । वाढतेनि ज्ञाने ॥202॥
त्याप्रमाने अर्जुना येथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात.
Similarly, O Pandava, this tree of worldly life comes down to its original ground, when it has tremendous growth due to knowledge.
म्हणौनि ब्रह्मेशानापरौते । वाढणे नाही जीवाते । तेथूनि मग वरौते । ब्रह्मचि की ॥203॥
म्हणून ब्रह्मदेव आणि देवाचे देव महादेव यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे.
Thus Jeeva has no further progress higher than the Brahma's world or the world of the Lord Shiva, and when they reach there, there is only the Absolute Brahman, beyond.
परी हे असो ऐसे । ब्रह्मादिक ते आंगवसे । ऊर्ध्वमुळासरिसे । न तुकती गा ॥204॥
परंतु हे असू दे. ब्रम्हादिक कितीही मोठे झाले. तरी उर्ध्वमुळ जे माया विशिष्ट ब्रम्ह म्हणजे ईश्वर, हे याच्या बरोबरीच्या तुलनेला येऊ शकत नाही. प्रलयाच्यावेळी ब्रम्हादिक संपुन जातील पण, ईश्वर कधीही नष्ट पावत नाही.
But, even these gods like Brahma, etc. cannot be equal to this tree of roots at the top, by their power.
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामे विख्याता । तिया फळी मूळी नाडळता । भरलिया ब्रह्मी ॥205॥
सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्ति मार्गाच्या) सनकादिरुपी प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी एकरुप झालेल्या असतात.
The branches of Sanat kumar and the like are still higher, which do not bear fruit or bend down but reach and merge into the Brahman.
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पै ॥206॥
याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज.
Thus the foliage of this tree which starts from the human kingdom, goes up to the level of Brahma by its large branches.
पार्था ऊर्ध्वीचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इये अधी । म्हणितली मूळे ॥207॥
अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच (मनुष्यपणा) मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे
The human world is called the lower roots because all the three higher branches of life start from the human kingdom.
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥15-208॥
याप्रमाने वर खाली फांद्या असलेला व वर मुळ असलेला हा अलौकिक भववृक्ष सांगितला आहे.
Thus we have now told you the wonderful allegory of this tree of the worldly life or Prakriti which has its roots at the top;
आणि अधीची ही मूळे । उपपत्ती परिसविली सविवळे । आता परिस उन्मूळे । कैसेनि हा ॥209॥
ह्या प्रमाणे या वृक्षाच्या अधोर्ध्व मुळाचे आम्ही तुला सविस्तर कथन केले, आता ह्याचे उन्मूलन (उच्छेद) कसे होवू शकेल ते ऐक.
And we have also explained to you the roots which are at the lower level and from which, animals, trees, minerals, etc. are born. Now please listen to how this tree of the worldly life can be uprooted. On careful observation this tree of worldly life does not prove to be of that nature as it seems apparently to be, because it has no beginning, no end nor even any stability. Therefore, felling with a formidable axe of unattachment, this Ashwatha tree
परी तुझ्या हन पोटी । ऐसे गमेल किरीटी । जे एवढे झाड उत्पाटी । ऐसे कायि असे ? ॥210॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनाला कदाचित असे वाटेल की या एवढ्या मोठ्या विशाल विस्तार पावलेल्या संसाररुपी झाड उपडले जाईल असे एवढे साधन काही आहे काय ?
O Crowned one! Perhaps in your mind there may be a question as to what instrument is there that can be useful to uproot this great tree!
के ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तव निराकारी । ऊर्ध्वी असे ॥211॥
कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे.
This tree has branches high enough to be in the region of Brahma and the root in the highest state of abstract Brahman.
हा स्थावराही तळी । फांकत असे अधींच्या डाळी । माजी धावतसे दुजा मूळी । मनुष्यरूपी ॥212॥
हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्या मनुष्यरूपी मुळांनी मधे विस्तारतो.
This tree has reached to depths of the mineral, elemental kingdom and there is yet another set of roots at the level of human Life which are separate than those.
ऐसा गाढा आणि अफाटु । आता कोण करी यया शेवटु । तरी झणी हा हळुवटु । धरिसी भावो ॥213॥
असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील ? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस.
You should not at all harbour in your mind the weak - willed thought of asking as to who can destroy this great menacing tree!
परी हा उन्मूळावया दोषे । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥214॥
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत ? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय ?
There is no necessity of taking too much trouble to topple down this tree! Is it really necessary to send the imaginary `scare' to other country in order to give assurance to a child?
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावे । होआवे मग तोडावे । खपुष्प की ? ॥215॥
ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहेत काय ? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय ? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का ?
Is it actually necessary to destroy the shapes of forts seen by us in the clouds? Or to break the horns of a rabbit or to actually pluck the proverbial flower of the sky?
तैसा संसारु हा वीरा । रुख नाही साचोकारा । मा उन्मूळणी दरारा । कायिसा तरी ? ॥216॥
त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही (केवळ मिथ्याभास आहे) तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली ?
Similarly, O the brave one, this tree of worldly life is not Real! Then what fear is there in the job of uprooting it?
आम्ही सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेची घरभरी । लेकुरे जैशी ॥217॥
आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय).
You should understand that the description of the roots and branches of this tree, which we have done, is like saying that the house is full with the crowd of little children of barren, childless woman.
कय कीजती चेइलेपणी स्वप्नीची तिये बोलणी । तैशी जाण ते काहाणी । दुगळीचि ते ॥218॥
जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची ? त्याप्रमाणे ह्या संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज.
What relevance has the things in a dream to the waking state? So, you should realize that the story of this so-called tree of the worldly life is only a myth.
वाचूनि आम्ही निरूपिले जैसे । ययाचे अचळ मूळ असे तैसे । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥219॥
याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसारवृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच (स्वरूपे करून) खरा असता.
Otherwise if this tree is really there as we have described, and if its root is really very firm;
तरी कोणाचेनि संताने । निपजती तया उन्मूळणे । काय फुंकिलिया गगने । जाइजेल गा ॥220॥
तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल ? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय ?
Then who is the man worth his name who can be able to uproot it? Can the sky be blown away by our blowing air through our mouth?
म्हणौनि पै धनंजया । आम्ही वानिले रूप ते माया । कासवीचेनि तुपे राया । वोगरिले जैसे ॥221॥
म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. (कसे तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे.
Therefore, O Dhananjaya! It is as false as serving Ghee of the female tortoise's milk to a king when he is taking his meals.
मृगजळाची गा तळी । तिये दिठी दुरूनि न्याहाळी । वाचूनि तेणे पाणिये साळी केळी । लाविसी काई ? ॥222॥
बा अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा, याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय ?
No doubt you see illusion of water in a mirage which looks like a lake, but can you sow the seeds of rice or grow bananas there?
मूळ अज्ञानचि तव लटिके । मा तयाचे कार्य हे केतुके । म्हणौनि संसाररुख सतुके । वावोचि गा ॥223॥
बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे ? (काय किंमतीचे असणार ?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार ? तर तो मिथ्याच आहे.
First of all, ignorance is itself unreal, then how far can its effect be true? Therefore, the tree of the wordly life is totally unreal.
आणि अंतु यया नाही । ऐसे बोलिजे जे काही । तेही साचचि पाही । येके परी ॥224॥
आणि या संसारवृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज.
And when it is said that there is no end or destruction of this tree is in one sense, a truth.
तरी प्रबोधु जव नोहे । तव निद्रे काय अंतु आहे ? । की रात्री न सरे तव न पाहे । तया आरौते ? ॥225॥
संसारवृक्ष कोठपर्यंत खरा वाटतो ? तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय ? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही.
Can the sleeping state end while waking state has not come into existence? Is dawn possible while the might has not ended?
तैसा जव पार्था । विवेकु नुधवी माथा । तव अंतु नाही अश्वत्था । भवरूपा या ॥226॥
त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.
Therefore, O Partha, so long as the discriminative intelligence has not arisen, the tree of this worldly life has no end.
वाजते वारे निवांत । जव न राहे जेथिचे तेथ । तव तरंगता अनंत । म्हणावीचि की ॥227॥
जोपर्यंत वहाणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे.
So long as the fast blowing wind has not become still, we have to say that waves are an unending fact.
म्हणौनि सूर्यु जै हारपे । तै मृगजळाभासु लोपे । का प्रभा जाय दीपे । मालवलेनि ॥228॥
(ज्ञानाने अविद्या नाहीशी झाली की संसारवृक्षाचा नाश होतो. ) येवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो
For example, when the Sun sets, then only mirage disappears; and when the lamp is extinguished, its light also disappears.
तैसे मूळ अविद्या खाये । ते ज्ञान जै उभे होये । तैचि यया अंतु आहे । एऱ्हवी नाही ॥229॥
त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे (नाहीसे करणारे) ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार-वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही.
So, this tree comes to an end only when knowledge, which destroys the basic Maya (or Avidya) comes into existence.
तेवीचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलाते या ॥230॥
(संसारवृक्ष अनादि कसा ?) त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि, (आरंभरहित) आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसारवृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे.
Similarly it is not wrong to say that this tree has no beginning; it is logical according to what we have just now said.
जे संसारवृक्षाच्या ठायी । साचोकार तव नाही । मा नाही तया आदि काई । कोण होईल ? ॥231॥
कारण की संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही त्याला कोणी आरंभ असेल काय ?
When there is no real existence to the tree of the worldly life, who can say that it has a beginning?
जो साच जेथूनि उपजे । तयाते आदि हे साजे । आता नाहीचि तो म्हणिजे । कोठूनिया ? ॥232॥
जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा ?
We can say that a certain thing has a beginning, if that thing really comes into existence somewhere, but how can there be a beginning to a thing which is not real?
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगो कवण माये । यालागी नाहीपणेचि होये । अनादि हा ॥233॥
म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण आई आहे म्हणून सांगू ? {अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा ?}
Therefore, who can be named as a mother of one who is not at all born? Thus, this tree is proved beginningless because it has no reality at all.
वांझेचिया लेका । कैची जन्मपत्रिका । नभी निळी भूमिका । के कल्पू पा ॥234॥
वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची ? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची ?
How can we prepare a horoscope of a child of a barrern woman? Can we imagine that there is blue land in the sky?
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणे देठु तोडावा । म्हणौनि नाही ऐसिया भवा । आदि कैची ? ॥235॥
अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा ? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला ?
O Pandava, who will pluck the stem of the flower of the sky? Therefore, how can there be a beginning to this world which has no reality?
जैसे घटाचे नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥236॥
ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज.
If an earthen pot is not prepared, its non-existence is always there, which has no beginning. Please know that this tree is non-existing and thus is without a beginning.
अर्जुना ऐसेनि पाही । आद्यंतु ययासि नाही । माजी स्थिती आभासे काही । परी टवाळ ते ॥237॥
(संसारवृक्षाचे भासणे मिथ्या आहे तरी भासतो) अर्जुना याप्रमाणे पहा की या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितीकाली तो काही भासत आसतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे.
O Arjuna, please see now. When there is no beginning and no end to anything, its existence in the middle is also a false thing.
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रीही कीर न रिगे । माजी दिसे वाउगे । मृगांबु जैसे ॥238॥
ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते.
It is like the mirage, which neither begins from any mountain, nor merges into a sea, and its appearance itself is an illusion.
तेसा आद्यंती कीर नाही । आणि साचही नोहे कही । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥
त्याप्रमाणे हे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो.
Similarly this tree has no beginning and no end, and gives a false notion of existence by a wonderful illusion, in the middle, the present.
नाना रंगी गजबजे । जैसे इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥
ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते.
Just like a rainbow with many brilliant colours is seen, so, this worldly life appears to be true to an ignorant person.
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥
अशा रीतीने स्थितीकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (साधूची सोंगे आणून) लोकांना फसवतो तसा.
Thus, just as a clever dramatist entertains spectators by his peculiar dress; this worldly life deludes the ignorant people by its false appearance.
आणि नसतीचि श्यामिका । व्योमी दिसे तैसी दिसो का । तरी दिसणेही क्षणा एका । होय जाय ॥242॥
आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का ? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते.
You see, we often see that suddenly there are dark clouds in the sky, which disappear after a short time.
स्वप्नीही मानिले लटिके । तरी निर्वाहो का एकसारिखे । तेवी आभासु हा क्षणिके । रिताचि गा ॥243॥
स्वपनातील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का ? तर टिकत नाहीत. (ते जसे क्षणिक भासणारे आहेत) तशा क्षणिक भासणार्या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे.
Though we think that a certain thing in the dream is real, can it be used in our waking state? Similarly this momentary appearance is unreal and has no real substance.
देखता आहे आवडे । घेऊ जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडे । जळामाजी ॥244॥
आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही.
It appears as real as the reflection of a monkey in the water, but cannot be caught in hand, just like that reflection.
तरंगभंगु सांडी पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणे पाडे । होणे जाणे गा ॥245॥
बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अती त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणे-जाणे आहे.
This illusive appearance is so quickly taking place and becomes so quickly invisible that the fickleness of waves prove to be slower and the electric lightning cannot compete with it.
जैसा ग्रीष्मशेषीचा वारा । नेणिजे समोर की पाठीमोरा । तैसी स्थिती नाही तरुवरा । भवरूपा यया ॥246॥
ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. म्हणजे संसाराला स्थितीही नाही.
Just like the wind in the pre-monsoon days comes from various directions and cannot be recognised from which direction it is coming, this tree of worldly life has no Reality in it.
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आता कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥
याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही. आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय ?
In short, this has no beginning, no end, no existence, no particular form. Then what is the problem in uprooting it?
आपुलिया अज्ञानासाठी । नव्हता थांवला किरीटी । तरी आता आत्माज्ञानाच्या लोटी । खांडेनि गा ॥248॥
या संसारवृक्षाच्या नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार
This tree has developed on the strength of ignorance, though it is not real. So this has to be cut by the axe of self-knowledge.
वाचूनि ज्ञानेवीण ऐके । उपाय करिसी जितुके । तिही गुंफसि अधिके । रुखी इये ॥249॥
याशिवाय एका ज्ञानावाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील.
Otherwise, whatever other actions you will take to cut it, except by knowledge, they will involve you further and further in this tree.
मग किती खांदोखांदी । यया हिंडावे ऊर्ध्वी अधी । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदी । सम्यक् ज्ञाने ॥250॥
मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे ? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक.
If you try like that, you will be just wandering endlessly among the branches. Therefore you must simply cut the very ignorance which is its cause, by the means of the knowledge of truth.
एऱ्हवी दोरीचिया उरगा । डांगा मेळविता पै गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥
या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते.
My dear, is not the trouble taken to collect sticks to kill the serpent, which appear on the rope, a useless errand?
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागी धावता दांगा- । माजी वोहळे बुडिजे पै गा । साच जेवी ॥252॥
मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी (होडी) रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खर्या ओढ्यात सापडून बुडावे,
In an effort to prepare a boat to ferry across the stream of the mirage, a man runs to bring wood in deep forest, but gets himself drowned in a real stream of water!
तेवी नाथिलिया संसारात्र । उपाई जाचतया वीरा । आपणपे लोपे वारा । विकोपी जाय ॥253॥
अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमधे खटपट करणार्याला साधनांचे जिवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वत: मरतो.
Similarly O Arjuna, the man who worries about various means to destroy this worldly life, misses the main issue of self-knowledge, and his delusion of this world gets worse.
म्हणौनि स्वप्नीचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवी अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥254॥
म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे.
Therefore, O Arjuna, just as for healing a wound sustained in a dream the only way is to become awake; so knowledge is the only sword to cut this root of ignorance.
परी तेचि लीला परजवे । तैसे वैराग्याचे नवे । अभंगबळ होआवे । बुद्धीसी गा ॥255॥
(ज्ञानखड्ग फिरवण्यास वैराग्याची आवश्यकता) परंतु अरे तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे.
And as step by step, this sword is used wisely and continuously the quality of desirelessness makes the intellect stronger and stronger.
उठलेनि वैराग्ये जेणे । हा त्रिवर्गु ऐसा सांडणे । जैसे वमुनिया सुणे । आताचि गेले ॥256॥
ज्या वैराग्याचा उठाव झाला असता ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू व पाताळाचा) असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे.
And when this desirelessness becomes prevalent, it throws away the three facets of human endavour, which are 'organised religion', 'earning of money,' and 'fulfilling passions' as quickly as a dog, who has eaten a wrong food, immediately vomits it out without delay and goes away.
हा ठायवरी पांडवा । पदार्थजाती आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥
अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे.
O Pandava, this austerity should be so strong that every object in this world should be easily abhored.
मग देहाहंतेचे दळे । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळे । हातवसावे ॥258॥
(हे ज्ञानखड्ग कसे चालवावे ?) मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे
Then one should take out the sheath of identification with the body, just like a coat and this weapon of self-knowledge should be held firmly and tightly in the hand of the 'conviction that one is Atman.'
निसळे विवेकसाहणे । जे ब्रह्माहमस्मिबोधे सणाणे । मग पुरतेनि बोधे उटणे । एकलेचि ॥259॥
ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘अहं ब्रह्मास्मि ” (मी ब्रह्म आहे ” अशा बोधाची त्यास सणसणीत (तीक्ष्ण) धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे.
This sword should be sharpened on the grinding stone of 'discrimination' by the grip of the self-knowledge of "I Am Brahman" and should be polished by the power of complete Realisation.
परी निश्चयाचे मुष्टिबळ । पाहावे एकदोनी वेळ । मग तुळावे अति चोखाळ । मननवरी ॥260॥
परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पहावे (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अती शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अती शुद्ध असे चिंतन करावे.
When this is achieved, we should make experiment in order to see, how tight is our grip of conviction. Then we should hold this sword properly balanced on the strength of deep thinking.
पाठी हतियेरा आपणया । निदिध्यासे एक जालिया । पुढे दुजे नुरेल घाया- । पुरते गा ॥261॥
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे (हत्यार) उरणार नाही.
Then by constant application of mind to this attitude, we ourselves become the sword, and there remains nothing else, which is to be cut by that weapon.
ते आत्मज्ञानाचे खांडे । अद्वैतप्रभेचेनि वाडे । नेदील उरो कवणेकडे । भववृक्षासी ॥262॥
ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही.
This sword of self-knowledge, by the decisive power of the Light of unity will not allow the tree of worldly life to exist anywhere.
शरदागमीचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोटु भरी ॥263॥
शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो,
Just as the wind at the beginning of the post-rainy season does not allow clouds to remain in the sky or just as the rising Sun swallows all darkness;
नाना उपवढ होता खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसे ॥264॥
अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही).
Or the moment a man awakes, all the games of the dream come to an end; similarly the sharp edge of self-knowledge will act.
तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ । का अधीचे हन शाखाजाळ । ते काहीचि न दिसे मृगजळ । चादिणा जेवी ॥265॥
तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही.
Then just as there is no mirage in moonlight, there will not be the topmost root nor the jumble of branches at lower level of this tree of worldly life visible anywhere.
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळाते ॥266॥
अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्मविचाराने त्याचा निरास करून)
O the bravest warrior of all, you have to cut this tree of worldly life having its root at the highest level, by the powerful sword of self-knowledge, and then
मग इदंतेसि वाळले । जे मीपणेवीण डाहारले । ते रूप पाहिजे आपले । आपणचि ॥267॥
(संसारवृक्षाच्या नाशानंतर येणारी आत्मानुभूती कशी घ्यावी) वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादि अनात्मतत्वरूप प्रपंचाचा निरास झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे ते पणा) स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदं स्फुरण नाही आणि इदं स्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते असे जे अहं-इदं-वृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे.
Having achieved this, the state which is beyond the indication that "This is it", and which is self-evident without our doing, is realized by itself.
परी दर्पणाचेनि आधारे । एकचि करून दुसरे । मुख पाहाती गव्हारे । तैसे नको हो ॥268॥
परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्हेने आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला दृश्य-द्रष्टा करून पहाणे नको.
But you should not accept the false duality like ignorant people who see their reflection in a mirror and think that they are two.
हे पाहाणे ऐसे असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमी झरा । भरोनि ठाके ॥269॥
अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतोच, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच.
O the brave one! This seeing oneself is just like the stream of water which is there hidden underground which is not manifest because a well is not dug.
नातरी आटलिया अंभ । निजबिंबी प्रतिबिंब । निहटे का नभी नभ । घटाभावी ॥270॥
अथवा पाणी आटाल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते,
Or like the reflection in water which disappears as soon as that water completely becomes evaporated, or the space within a pot which mergers itself in the wholeness of space as soon as the pot is broken.
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवी आपणपया । तैसे आपेआप धनंजया । न्याहाळणे जे गा ॥271॥
अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे.
Or fire merges into its invisible existence when fuel is all burnt; Similarly O Dhananjaya, this is seeing us by ourselves.
जिव्हे आपली चवी चाखणे । चक्षू निज बुबुळ देखणे । आहे तया ऐसे निरीक्षणे । आपुले पै ॥272॥
जिभेने जशी आपलीच चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पहाणे आहे.
This seeing oneself is like the tongue tasting itself and the eye seeing its own pupil.
का प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरले खोळे । पाणियाचिये ॥273॥
अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे
Or the light mixing itself into light, or the sky reclining on itself, or water being poured into a bag made of water only.
आपणचि आपणयाते । पाहिजे जे अद्वैते । ते ऐसे होय निरुते । बोलिजतु असे ॥274॥
आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पहावयाचे ते असे (वर सांगितल्याप्रमाणे) आहे हे मी खरे सांगतो.
Similarly seeing oneself by oneself is as described above.
जे पाहिजतेनवीण पाहिजे । काही नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष का म्हणिजे । जया ठायाते ॥275॥
जे आत्मस्वरूप पहाणेपणा घेतल्याशिवाय पहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य (आरंभीचा) पुरुष असे म्हणतात.
Which is seeing without the act of seeing, and knowing without the act of knowing, that is called the Primordial Purusha.
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वाया ॥276॥
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.
Even in this state, the Vedas take the support of the "qualities" and prattle endlessly about the name and form.
पै भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यो इया निगाले । पैजा जेथ ॥277॥
संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग (अष्टांग योग) व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले.
But those seekers who are bored of the worldly things as well as the heavenly pleasures, start to attain the knowledge of yoga, by taking a vow that they will not come back here after merging in this reality.
संसाराचिया पाया पुढा । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागा ॥278॥
ते वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद (सत्यलोक) हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात,
Taking a vow of austerity they run away from the base of the worldly life, and go beyond even the cliff of the region of the God Brahma.
अहंतादिभावा आपुलिया । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥279॥
आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात.
And by discarding every attachment like "me" and "mine", they become very pure and obtain as if a passport to go to their original nativity.
पै जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥280॥
ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मीतूपण जगात प्रचारात आणले.
From that original state, the whole expanse of the successive creation of universes becomes manifest, just as the futile hopes of an unfortunate man.
जिये का वस्तूचे नेणणे । आणिले थोर जगा जाणणे । नाही ते नांदविले जेणे । मी तू जगी ॥281॥
ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते.
By being ignorant of which state, people think that this vast expanse of the world is real, and the sense of 'me' and 'you', the duality, begins to assume a reality of its own.
पार्था ते वस्तु पहिले । आपणपे आपुले । पाहिजे जैसे हिंवले । हिंव हिंवे ॥282॥
अर्जुना, ती आपली पहिली वस्तू (आपले मूळ आत्मस्वरूप) आपण आपल्याच ठिकाणी पहावी. ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या) दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पहाणे होय).
O Partha, that reality of oneself should be seen by oneself only, as snow causes snow to be formed.
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया का भेटलिया । येणेचि नाही ॥283॥
अर्जुना, त्याला (आत्मवस्तूला) ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही.
O Dhananjaya, there is another sign of recognizing this state. Once you reach this state there is no coming back.
परी तया भेटती ऐसे । जे ज्ञाने सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसे । भरलेपण ॥284॥
परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो. असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात.
But only those who are replete with knowledge just as the waters at the time of final deluge are everywhere, can achieve this state.
जया पुरुषांचे का मन । सांडोनि गेले मोह मान । वर्षांती जैसे घन । आकाशाते ॥285॥
वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले.
Those men whose mind is emptied of the sense of pride and attraction, like the sky at the time when rainy season is over, which is left by all clouds;
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवी सोयरा । तैसे नागवती विकारा । वेटाळू जे ॥286॥
ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत.
Those who are left by all types of vices just as relatives of a poor and ruthless person get bored of him;
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभे प्रबळे । तयाची क्रिया ढाळेढाळे । गळती आहे ॥287॥
ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे (आत्मानुभावामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळू हळू (आपोआप) सुटत आहे.
Those whose activities are dropped gradually, because of the very firm self- realization which is attained by them,
आगी लगलिया रुखी । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसे सांडिले अशेखी । विकल्पी जे ॥288॥
ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले.
Those who have been deserted by all doubts just as a burning tree is left by birds,
आइके सकळ दोषतृणी । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाही जयाते ॥289॥
अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते.
Those who have no relationship with that discriminative, separatist intellect which is a land producing all types of grass of vices and defects.
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवे ॥290॥
सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली.
Those in whose case, the pride of physical body and other sorts pride have been destroyed, together with ignorance, just as night is itself gone at sunrise;
पै आयुष्यहीना जीवाते । शरीर सांडी जेवी अवचिते । तेवी निदसुरे द्वैते । सांडिले जे ॥291॥
किंवा आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर ज्याप्रमाणे अवचित सोडतो, त्याप्रमाणे अविद्यात्मक द्वैताने ज्यांना एकदम सोडले आहे.
Those whose sense of duality born of ignorance has left them just as the body gives up the life- force when time of death is there.
लोहाचे सांकडे परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥292॥
परिसाला लोखंडाचा सदा दुष्काळ, सूर्याला जसे अंधाराचे दर्शन नाही, तसा ज्याच्या बुद्धीत द्वैताचा सदा दुष्काळ म्हणजे कधी उदयच नाही.
Those in whose mind there is drought of sense of duality just as the magic stone Parees has no sense of duality about iron and the Sun has no recognition of darkness.
अगा सुखदुःखाकारे । द्वंद्वे देही जिये गोचरे । तिये जया का समोरे । होतीचिना ॥293॥
अर्जुना, देहाच्या ठायी अनुभवाला येणारी जी सुखदुःखादि द्वंद्वे ती ज्याच्या समोर येतच नाहीत
Those in front of whom the feelings of pain and pleasure, as different things do not stand even for a moment.
स्वप्नीचे राज्य का मरण । नोहे हर्षशोकासि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥294॥
स्वप्नात मिळालेले राज्य किंवा आलेले मरण हे जसे जागृतीत हर्षशोकाला कारण होत नाही.
Or, when one is awake, one is not having a feeling of elation or sorrow by gaining of a kingdom or meeting death respectively, in a dream.
तैसे सुखदुःखरूपी । द्वंद्वी जे पुण्यपापी । न घेपिजती सर्पी । गरुड जैसे ॥295
गरुड जसे सर्पाकडून धरले जात नाहीत, त्याप्रमाणे, सुखदुःख व पापपुण्यादि द्वंद्वांकडून ज्यांना धक्का पोचू शकत नाही.
Similarly, just as the serpents cannot attack the eagle, those who are not affected by the pleasures and pains, or the merits or sins.
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचे क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥296॥
आणि, (सत्य व अनृत ह्यांच्या मिश्रणाने उद्भवलेल्या जगद्व्यवहारातील) अनृत म्हणजे अनात्मवर्णरूप पाणी टाकून, जे विचारी ज्ञानी, राजहंसाप्रमाणे सत्य म्हणजे आत्मरसरूप दुग्ध सेवन करतात.
And those who are like swans who discard the things which are Non-Atman like water; and enjoy the milk of the juice of Atman;
जैसा वर्षोनि भूतळी । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळी । बिंबासीचि ॥297॥
सूर्य, आपला रस, म्हणजे तेजाचे कार्य जे पाणी, त्याचा पृथ्वीवर वर्षाव करून, पुन्हा ते पाणी किरणद्वारा आपल्या ठिकाणी जसे आकर्षण करून घेतो.
Like the Sun who gives rain to the earth but receives back by his rays the same water;
तैसे आत्मभ्रांतीसाठी । वस्तु विखुरली बारावाटी । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥298॥
त्याप्रमाणे, जे सर्वाधिष्ठान आत्मरूप, तद्विषयक भ्रांतीमुळे किंवा अनोळखी मुळे, अनेक अनात्मवस्तुरूपाने पसरलेले आहे ते, ज्यांची अखंड यथार्थ- ज्ञानदृष्टि आहे त्यांच्या दृष्टीने एकरूपाला येते. (म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पिलेले अनंतत्व जाऊन ” सर्व खल्विदं ब्रह्म ” असे अनुभवास येते. )
Similarly those who bring back together into themselves the Atman which was lost into wilderness due to delusion.
किंबहुना आत्मयाचा । निर्धारी विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजी जैसा ॥299॥
किंबहुना, गंगेचा ओघ सागरांत जसा सागररूप होतो, तसा आत्मनिर्धारविषयक ज्यांचा विवेकही आत्मरूपच होतो.
Or, those whose total concentration is in the Atman only just as the flow of Ganges merges into the sea,
पै आघवेचि आपुलेपणे । नुरेचि जया अभिलाषणे । जैसे येथूनि पऱ्हा जाणे । आकाशा नाही ॥300॥
आणि, सर्वव्यापक आकाशाला जसे अलीकडे किंवा पलीकडे जाणे संभवत नाही, त्याप्रमाणे, सर्वात्मभावामुळे त्याने अभिलाष (इच्छा ) धरावा अशी दुसरी वस्तूच उरत नाही.
And those who have no touch of any desire because everywhere they experience the oneness only, just as the sky has no other place where it can go by travelling beyond itself.
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनी जया विकारु । उदैजेना ॥301॥
आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनात विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही.
And those whose mind has no place for any distortions to be harboured, just as the great fire of the volcano does not grow any seed in it;
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जया सळु । कामोर्मीचा ॥302॥
रवि (मंथा) म्हणून योजलेला मंदारपर्वत काढल्यावर समुद्र जसा स्थिर झाला त्याप्रमाणे, सदैव शांत असल्यामुळे ज्याच्या चित्तात कामाची उर्मी उठत नाही.
Those whose consciousness is devoid of any craving and, therefore, is as calm as the sea which became calm when the mountain Mandar which was churning it, was removed from it.
चंद्रमा कळी धाला । न दिसे कोणे आंगी वोसावला । तेवी अपेक्षेचा अवखळा । न पडे जया ॥303॥
षोडषकलापूर्ण चंद्र जसा कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो, तसा पूर्णस्वरूप ह्याला कसलीच अपेक्षा असणे शक्य नाही.
Just as the Moon does not appear to be defective in its shape when it is full, so those people who have no defect of any hankering in their mind,
हे किती बोलू असांगडे । जेवी परमाणु नुरे वायूपुढे । तैसे विषयांचे नावडे । नांवचि जया ॥304॥
ह्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी तुला किती सांगाव्या ? वायूपुढे जसे परमाणूचे नावही घेण्याची सोय नाही, तसे ह्याला विषयाचे नांवही आवडत नाही.
But why lengthen this description? Those who have not even a particle of desire in them just as the dust particle cannot remain where wind is gushing speedily.
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशे । ते तेथ मिळती जैसे । हेमी हेम ॥305॥
ह्याप्रमाणे जे किंवा ज्ञानाग्नीने शुद्ध झाले आहेत, ते, सुवर्णातिसुवर्ण मिळावे त्याप्रमाणे क्षेत्रं प्राप्त होतात.
So, those who have become like this by the fire of knowledge, merge into that state like gold in gold.
तेथ म्हणिजे कवणे ठाई । ऐसेही पुससी काही । तरी ते पद गा नाही । वेचु जया ॥306॥
तेथे म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मवस्तु तेथे प्राप्त होतात. (तदरूप होतात)
You will ask what is that state; so, you should understand that it is a state which has no deterioration in any way.
दृश्यपणे देखिजे । का ज्ञेयत्वे जाणिजे । अमुके ऐसे म्हणिजे । ते जे नव्हे ॥307॥
जे दृष्टीचा विषय होईल, किंवा जे जाणले जाईल, जे असे किंवा तसे आहे असे म्हणता येईल, असे जे नाही (ते, ते पद होय. )
It is not a state which can be seen by eyes or known as an object of knowledge, or can be pointed out as "it is such and such a thing."
पै दीपाचिया बंबाळी । का चंद्र हन जे उजळी । हे काय बोलो अंशुमाळी । प्रकाशी जे ॥308॥
दिव्याच्या भडक तेजांत किंवा चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते, इतकेच काय सांगावे ? तर सूर्य ज्याचे प्रकाशन करितो.
A thing is seen in the light of a lamp, or it is illumined by the Moon, or it is illumined by the Sun;
ते आघवेचि दिसणे । जयाचे का न देखणे । विश्व भासतसे जेणे । लपालेनी ॥309॥
हा सर्व दिसण्याचा व्यवहार, म्हणजे ज्याचे अदर्शन किंवा अज्ञान आहे; कारण, त्या वस्तूच्या अदर्शन स्थितीतच (अज्ञानांतच) विश्वाभास होत असतो.
But the visibility of that state is not like this; It is the state which is understood by its being invisible; or we can say that the universe is visible because that state is hidden.
जैसे शिंपीपण हारपे । तव तव खरे होय रुपे । का दोरी लोपता सापे । फार होइजे ॥310॥
शिपीचा शिंपीपण जसा जसा नजरेआड होतो तसे तसे रुपे खरे वाटू लागते, किंवा दोरीचा दोरपणा लोपेल तोंवरच सापाची प्रतिष्ठा असणार.
As we do not see the shell as shell but to our eyes there is silvery sheen visible, or when we do not see a rope but to our eyes a serpent appears there.
तैसी चंद्रसूर्यादि थोरे । इये तेजे जिये फारे । तिये जयाचेनि आधारे । प्रकाशती ॥311॥
त्याचप्रमाणे, हे चंद्रसूर्यादि प्रकाशित थोर पदार्थ जिच्या अंधारांत म्हणजे (अज्ञानांत) प्रकाशित होतात.
Similarly, the great heavenly bodies such as the Sun and the Moon are visible because the light of this state is hidden.
ते वस्तु की तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसी । प्रकाशे जे ॥312॥
ती वस्तु तेजोराशि (तेजाची खाण) खरी; ती सर्व भूतांचा आत्मा असून सर्वत्र सम आहे, आणि चंद्र- सुर्यांनाही तिचाच प्रकाश आहे.
That thing is the Absolute Reservoir of light, and it permeates in every being and gives light to minds of the Sun and the Moon also.
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसा । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागी तेज जे तेजसा । ते वस्तूचे आंग ॥313॥
(अशी वस्तुस्थिति आहे) म्हणून, वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य हे कवडशासारखे क्षुद्र होत; यास्तव तेजिष्ठ वस्तूंच्या ठिकाणचे तेज ती वस्तुप्रभा होय.
The spots of light that are the Sun and the Moon are caused by the light of this Brahman, and therefore the light of the shining things is part of this Brahman only.
आणि जयाच्या प्रकाशी । जग हारपे चंद्रार्केंसी । सचंद्र नक्षत्रे जैसी । दिनोदयी ॥314॥
सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे जशी लोप पावतात, त्याप्रमाणे, जी आत्मवस्तु स्वप्रकाशत्वाने प्रकाशित झाली असता (आत्मानुभवकाली) चंद्रसूर्यासह जगाचा लोप होतो,
And when this Brahman is brilliantly visible, all the lights of all these and the world become invisible just as the stars becoming invisible at sunrise.
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नीची डिंडीमा मावळे । का नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥315॥
किंवा जागृतीत स्वप्नातील सर्व व्यवहार मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर ज्याप्रमाणे मृगजल आपोआप नाहीसे होते.
It is like all the sound of dream state being shut off when we wake up; or the scene of mirage disappearing when it is evening.
तैसा जिये वस्तूच्या ठायी । कोण्हीच का आभासु नाही । ते माझे निजधाम पाही । पाटाचे गा ॥316॥
त्याप्रमाणे, ज्या वस्तूच्या ठिकाण अन्य कसलाही आभास नाही ते, अर्जुना, माझे मुख्यस्थान म्हणजे स्वरूप होय.
Similarly that state is my supreme abode, where there is no scope for any duality and appearances.
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौती पाउले । महोदधी का मिनले । स्रोत जैसे ॥317॥
महासागराला मिळून सागररूप झालेले ओढे जसे माघारे येणे संभवत नाही, त्याप्रमाणे त्या स्थानाला जे गेले त्यांची पुन्हा जन्माला येण्याची गोष्टच नको.
Those who have reached that state, never come back, just like the streams of water meeting the sea.
का लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरी । होयचि ना माघारी । परती जैसी ॥318॥
किंवा मिठाची केलेली हत्तीण लवण सागरांत सोडली असता, जशी परत येणे शक्य नाही.
Or it is like a doll of salt, in the shape of an elephant, which merges in the sea and cannot come back.
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाही तप्तलोहौनि जळा । निघणे जेवी ॥319॥
अथवा आकाशांत गेलेल्या अग्निज्वाला जशा परत फिरत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी परत पाणीरूपाने आढळणे शक्य नाही.
Or like the flames of fire which go up in the sky and do not come back, or like water on a hot iron plate which cannot be retrieved.
तेवी मजसी एकवट । जे जाले ज्ञाने चोखट । तया पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥320॥
त्याप्रमाणे, यथार्थज्ञानाने जे माझ्याशी ऐक पावले म्हणजे मद्रूप झालेत्यांना पुन्हा मागे येण्याला रस्ता नाही. (पुनर्जन्म नाही)
Similarly for those who get united with me totally through knowledge, the path of return is closed.
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥321॥
हे भाषण ऐकून सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो म्हणाला, हो हो ! मजवर आपला केवढा प्रसाद आहे म्हणून सांगावे ! पण, प्रभो, आणखी एक शंका येते, तिचे निरसन व्हावे अशी इच्छा आहे.
On this, that intelligent Arjun said, `O Lord! I am much obliged by your explanation; but there is one request, to which I beg for your attention, please!
तरी देवेसि स्वये एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेसि भिन्न आथी । की अभिन्न जी ॥322॥
ती अशी – जे आपल्याशी एकवट झाले, म्हणजे ऐक्य पावले म्हणून माघारे येत नाहीत, ते, प्रभो, आपल्याहूनमूळचे भिन्न आहेत की अभिन्न आहेत ?
Are those who merge into you and never come back, really separate from you or united with you?
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हे असंबद्ध । जे फुला गेले षट्पद । ते फुलेचि होती पा ॥323॥
जर ते अनादिसिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील तर माघरे येत नाहीत हे म्हणणे जुळत नाही; पहा कि मधु सेवनार्थं पुष्पांशी ऐक्य पावलेले भ्रमर काय पुष्परूपच होतात म्हणावयाचे ?
If they are really separate by their very nature, the statement that they do not come back is not valid; because if the black bees go to the flowers (and enjoy the nectar) do they become those flowers?
पै लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यी शिवोनि जैसे । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥324॥
दुसरे असे की नेम मारावयाच्या वस्तुहून भिन्न असलेले बाण त्याला स्पर्शून जसे मागे खाली पडतात, तसे भिन्न असून आपल्याला मिळालेले परत आलेच पाहिजेत.
They return after touching you just like arrows, which hit the target and fall down.
नातरी तूचि ते स्वभावे । तरी कोणे कोणासि मिळावे । आपणयासी आपण रुपावे । शस्त्रे केवी ? ॥325॥
नाहीतर तुम्ही तेच ते अशी जर वस्तुस्थिति असेल, तर, कोणी कोणास मिळावयाचें ? शस्त्र आपले आपल्यालाच कसे खोचणार ?
If on the other hand, you and these souls are naturally united, then who is to be merged with whom? How can a weapon prick itself?
म्हणौनि तुजसी अभिन्ना जीवा । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलो अवयवा । शरीरेसी ॥326॥
देवा, अवयवांचा शरीराशी संयोग किंवा वियोग म्हणणे जसे अप्रस्तुत, तसे, तुझ्याशी अभिन्न असलेले जीव ह्यांचा तुझ्याशी संयोग किंवा वियोग होतो ही भाषा बोलण्याची सोय नाही.
So, just as we cannot speak about joining or separating of the limbs of a body, from the body, similarly the statement about joining or separation between both of you cannot be agreeable to my intellect.
आणि जे सदा वेगळे तुजसी । तया मिळणी नाही कोणे दिवशी । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥327॥
आणि जे तुमच्याहून नित्य वेगळे आहेत त्यांचे तुमच्याशी कधींही ऐक्य होणार नाही. मग, ते परत येतात आणि येत नाहीत व्यर्थ उठाठेव कसली ?
And those who are permanently separate from you, will never become homogeneous with you, and therefore the question whether they come back or not is meaningless.
तरी कोण गा ते तूते । पावोनि न येती माघौते । हे विश्वतोमुखा माते । बुझावी जी ॥328॥
असा दुहेरी पेंच असल्याने तुझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे ते आहेत तरी कोण, ह्याविषयीं, हे विश्वतोमुखा, माझी समजूत करावी.
So my Lord, please explain to me properly, who are the devotees, who do not return after being united with you.
इये आक्षेपी अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनिया ॥329॥
अर्जुनाच्या ह्या शंकेने, सर्वज्ञशिरोमणि भगवान् श्रीकृष्ण, शिष्याची धारणाबुद्धि पाहून मनात संतुष्ट झाला.
The Lord who is the wisest of all persons of knowledge, was very glad to listen to this question of Arjuna, because he was convinced about the intellect of his disciple.
मग म्हणे गा महामती । माते पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥330॥
मग भगवान् म्हणाले, अर्जुना, मोठा बुद्धिमान् आहेसरे ! अरे, माझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे सांगितले ते दृष्टि भेदाने माझ्याहून भिन्नही आहेत व अभिन्नही आहेत
Then the Lord Shrikrishna said, "O Arjuna, the clever man! Those who merge into me and do not come back are separate from me, and at the same time not separate from me.
जै विवेके खोले पाहिजे । तरी मी तेचि ते सहजे । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥331॥
खोल विचार करून पाहिला, तर, त्यांचे व माझे स्वभावसिद्ध ऐक्य आहे; आणि वरवरच्या (उथळ) दृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत असेही म्हणावे लागले.
If we see deeply using our observant faculty, we will realize that these devotees and myself are one, but if we just see casually, they appear to be separate from me.
जैसे पाणियावरी वेगळ । तळपता दिसती कल्लोळ । एऱ्हवी तरी निखिळ । पाणीचि ते ॥332॥
जशा पाण्यावरील लाटा ह्या पाण्याहून वेगळया आहेतशा दिसतात, पण वस्तुतः या जलरूपच असतात
For example, the waves appear dazzling separately on the water, but actually it is all water only.
का सुवर्णाहुनि आने । लेणी गमती भिन्ने । मग पाहिजे तव सोने । आघवेचि ते ॥333॥
अलंकार हे सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते; पण विचार केला म्हणजे ते सर्व सोनेच आहे असे ठरतें;
Or the ornaments appear different from the gold, but if we see properly, all is gold only.
तैसे ज्ञानाचिये दिठी । मजसी अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण ते उठी । अज्ञानास्तव ॥334॥
त्याचप्रमाणे अर्जुना, शुद्ध ज्ञानदृष्टया, त्यांच्यात व माझ्यात भेद नाहीच; पण भिन्न आहेत अशी जी बुद्धि होते, तो सर्व अज्ञानाचा प्रभाव होय.
Similarly, O the crowned one! If we see with the vision of intelligence, the devotees are completely united with me, but the separateness appears due to ignorance only.
आणि साचोकारेनि वस्तुविचारे । कैचे मज एकासि दुसरे । भिन्नाभिन्नव्यवहारे । उमसिजेल ॥335॥
सम्यकवस्तुविचारदृष्टीने, अद्वितीय एक जो मी, त्या माझ्यापुढे दुसरे येणार कोठून कीं. ते भिन्न आहे की अभिन्न आहे हे तुला सांगावे ?
And if we really meditate thoroughly, we will find that in me, who is Brahman alone how can there be any other thing, as can be verified whether it is united with me or separate from me?
आघवेचि आकाश सूनि पोटी । बिंबचि जै आते खोटी । तै प्रतिबिंब के उठी । के रश्मि शिरे ? ॥336॥
सूर्यबिंबानेच सर्व आकाश व्यापून पोटांत घातले तर, प्रतिबिंब होण्याला स्थलच कोठलें ? किंवा किरण तरी कोठे पडणार ?
Suppose the whole Sun spreads through out the sky from horizon to horizon, where will his reflection fall? And where will his rays go?
का कल्पांतीचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैचे अंश अविक्रिया । एका मज ॥337॥
अर्जुना, प्रलयकाळचे उदक, हे काय नदीनाले ह्यांच्या पाण्याने भरले जातें ? त्याचप्रमाणे सर्वव्यापक, अविक्रिय, अपरिच्छिन्न जो मी एक, त्या मला अंश कोठेच ?
O Dear Dhananjaya, when the water of final deluge is everywhere, is there any scope or possibility of small streams running towards it and merging into it? Therefore how can there be parts in me who am without any distortions and alone without a second?
परी ओघाचेनि मेळे । पाणी उजू परी वाकुडे जाले । रवी दुजेपण आले । तोयबगे ॥338॥
परंतु, उजू असलेले पाणीही ओघाच्या योगाने जसे वाकडे वाटू लागते, किंवा सूर्यबिंबालाच जलामुळे प्रतिबिंबरूप दुजेपणा येतो.
But it is also seen that if two streams have a confluence the water in either of the streams, though straight earlier, becomes curved at that place. By the medium of water, the sun is having the nature of duality through its reflection.
व्योम चौफळे की वाटोळे । हे ऐसे कायिसयाही मिळे । परी घटमठी वेटाळे । तैसेही आथी ॥339॥
आकाश चौकोनी की वाटोळे ? ह्याचे उत्तर ते कसल्याही आकाराचे आहे हे होय; पण, घटमठादि उपाधीमध्ये ते बाटोळे व चतुष्कोण असेही असते.
How can we say whether the sky is squarish or roundish? But if we consider the space, which is covered by the shape of a pot or a house, we can relatively say that the space has some shape.
हा गा निद्रेचेनि आधारे । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नीचेनि जै अवतरे । रायपणे ॥340॥
अरे, निद्रेच्या आधारावर पडणाच्या स्वप्नात, जेव्हा हा ‘राजा ” होतो तेंव्हा त्या अवस्थेतील राज्यादि सर्व प्रपंचरूपाने हा एकटाच नटलेला नसतो काय ?
When a man dreams that he is a king, does he not alone rule all the world due to his sleep, though it is he himself alone imagining it?
का मिनलेनि किडाळे । वानिभेदासि ये सोळे । तैसा स्वमाये वेटाळे । शुद्ध जै मी ॥341॥
किंवा, उत्तम सोने हिणकस धातूच्या मिश्रणाने जसे कसाला कमी भरते त्याप्रमाणे, शुद्धस्वरूप जो मी, त्या माझ्याशी स्वमायेचा जेव्हा योग किंवा संबंध घडतो (उपाधियुक्त होतो)
When the gold is mixed up with a metal of lesser value, the gold loses its purity, and shows itself to be of different quality. Similarly when my own Maya appears to be covering my real nature,
तै अज्ञान एक रूढे । तेणे कोऽहंविकल्पाचे मांडे । मग विवरूनि कीजे फुडे । देहो मी ऐसे ॥342॥
तेव्हा एका अज्ञानाचाच प्रादुर्भाव होऊन ‘मी कोण ?’ असा विकल्प उत्पन्न होतो व मग खऱ्या स्वरूपाचा विसर पडून ‘ देहच मी ” असा निश्चय ठरतो.
Ignorance is born and developed and asking the question with doubt, as 'who am I?', it ends that doubt and decides that 'I am body'.
ऐसे शरीराचि येवढे । जै आत्मज्ञान वेगळे पडे । तै माझा अंशु आवडे । थोडेपणे ॥343॥
ह्याप्रमाणे सर्वव्यापक आत्म्याचे शरीर तोच मी, असे वेगळे किंवा मर्यादित ज्ञान होते, त्यावेळी परिच्छिन्नत्वामुळे जीव हा माझा अंश आहे असे भासतें.
In this way when the concept of 'I' as 'body' becomes the boundary of self-knowledge, my nature seems to have a part (as Jeeva).
समुद्र का वायुवशे । तरंगाकार उल्लसे । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवी ॥344॥
वायूच्या योगाने समुद्रावर लाटा उठतात तेव्हा त्या समुद्राचाच लहानसा अंश आहे असे जसे दिसतें.
By the wind, the sea dances with waves and a man with lesser intellect thinks that the sea is only waves.
तेवी जडाते जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमे पंडुसुता । जीवलोकी ॥345॥
त्याप्रमाणे, जडदेहाला चेतना देणारा व तद्विषयक अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्यस्वरूप मी, तोच ह्या मृत्युलोकी जीवभावाने नांदतो.
Similarly, I appear in this world of the Jeevas, as one who gives quality of movement to the inanimate and one who produces pride about the body.
पै जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥346॥
जीवाच्या ज्ञानाचा विषय असणारी जी ही जगतांतील घडामोड, तो ” जीवलोक ” शब्दाचा अभिप्राय होय.
This great activity in this world which is perceived by the limited intellect of the Jeeva or soul is called the world of Jeeva.
अगा उपजणे निमणे । हे साचचि जे का मानणे । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥347॥
आपण देहाबरोबर जन्माला आलो व देहाबरोबर मरणार हा व्यवहार जो सत्य मानतो तोच जीवलोक (जन्ममृत्यु सत्य मानणे ही जीवसृष्टि) व संसारही तोच.
I call as Jeevaloka or the worldly life, the concept which thinks that 'to be born and to die' is a real thing.
एवंविध जीवलोकी । तू माते ऐसा अवलोकी । जैसा चंद्रु का उदकी । उदकातीत ॥348॥
उदकांत प्रतिबिबित झालेल्या चंद्राचा जसा उदकाला स्पर्शही नसतो, तसा ह्या जीवलोकाच्या ठिकाणी मी असंगत्वाने आहे असे तू समज.
You should see me in this world as the Moon which is reflected in the water, but is beyond and outside water.
पै काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥349॥
किंवा कुंकुमावर ठेवलेला स्फटिकमणि, पहाणाराला जरी तांबडा वाटला तरी, तो खरोखर तांबडा नसतो.
If a crystal is kept on a spot of red-lead, the crystal seems to be red, to ordinary persons, but it is not so.
तैसे अनादिपण न मोडे । माझे अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसे आवडे । ते जाण गा भ्रांती ॥350॥
त्याप्रमाणे माझे अनादिसिद्धत्व न मोडता, व अक्रियत्वाला बाध न येता, मी कर्ता भोक्ता आहे असे जे वाटते, ती, अर्जुना, भ्रांति आहे असे समज.
Similarly though my quality of having no beginning and not being a doer, is really not affected, I am thought to be the actor, the doer and the receiver of the results of action; which is a delusion.
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपया ॥351॥
काय सांगावे ! आत्मा चोखट खरा ! (शुद्धअसंग ) पण, प्रकृतीपाशी ऐक्य पावून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या माथ्यावर घेतो.
In short, Atman, who is pure becomes joint with Prakriti and himself assumes the qualities of Prakriti to be his own.
पै मनादि साही इंद्रिये । श्रोत्रादि प्रकृतिकार्ये । तिये माझी म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥352॥
मन धरून होणारी सहा ज्ञानेंद्रिये ही वस्तुतः प्रकृतिकार्ये आहेत, ती माझी असे म्हणून, त्यांच्याकडून होणाच्या व्यापाराचा हाच कर्ता होतो.
Then, by thinking that the mind and other sense organs like ears, etc., making a total of six, are his own, he starts functioning in this world.
जैसे स्वप्नी परिव्राजे । आपणपया आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धाविजे । मोहे सैरा ॥353॥
ज्याप्रमाणे स्वनांत एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून त्यांच्या मोहाने इतस्ततः धावावे,
This is like a monk becoming himself his own family in the dream, and running here and there to feed it.
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥354॥
याप्रमाणे, स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे (स्वप्नातील कुटुंबाप्रमाणे) आत्मा हा आपणच प्रकृतीसारख बनून पुन्हा तिचींच कार्यं करू लागतो.
Similarly Atman forgets himself, and thinks that he belongs to the Prakriti and is similar to her; and worships her.
मनाच्या रथी वळघे । श्रवणाचिया द्वारे निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजी ॥355॥
ती अशी-मनाच्या रथावर आरूढ होऊन, श्रवणेंद्रियद्वारा बाहेर पडून शब्दारण्यात प्रवेश करितो;
Then he rides up on the chariot of mind, enters into the hole of the ear and gets himself involved in the forest of words.
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥356॥
मग त्या रथाचा मोर्चा बदलून त्वगिंद्रियद्वारा स्पर्शरूपी घोर वनांत शिरतो.
The same Atman by holding the robe of Prakriti turns to the skin and enters the heavy forest of the objects of physical contacts.
कोणे एके अवसरी । रिघोनि नेत्राच्या द्वारी । मग रूपाच्या डोंगरी । सैरा हिंडे ॥357॥
कधी नेत्रद्वारा बाहेर पडून रूपविषयरुपी पर्वतावर स्वैर संचार करितो.
Further, he enters in the eyes and roams about at random on the mountain of the objects of shapes and forms.
का रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोचि लागे ॥358॥
किंवा, अर्जुना, जिव्हेच्या द्वाराने निघून रसांची दरी जे उदर तेच भरु लागतो.
He enters the tongue and gets himself bound in the narrow valley of taste.
नातरी येणेचि घ्राणे । जै देहांशु करी निघणे । मग गंधाची दारुणे । आडवे लंघी ॥359॥
किंवा घ्राणेंद्रियद्वारा, माझा अंश जो हा जीव तो जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा गंधाची मोठाली अरण्ये ओलांडतो.
And when this Atman being proud of his body enters into the nose, he walks in the meandering paths of the forest of various smells.
ऐसेनि देहेंद्रियनायके । धरूनि मन जवळिके । भोगिजती शब्दादिके । विषयभरणे ॥360॥
अशारीतीने देहेंद्रियांचा स्वामी जो जीव तो, मनाला हाताशी धरून शब्दस्पर्शादि पंचविषयांचा भोग घेतो.
In this way, this Jeeva who is proudly attached to his body, embraces the mind tightly and through it enjoys the various groups of sense objects like sound, sight, smell, etc.
परी कर्ता भोक्ता ऐसे । हे जीवाचे तैचि दिसे । जै शरीरी का पैसे । एकाधिये ॥361॥
पण जीवावे हे कर्तुत्व, भोक्तृत्व, तो जेव्हा एखाद्या शरीराचा आश्रय करील तेव्हांच अनुभवाला येतं.
When this Atman travels from one body to another, he feels that he is the doer and receiver of the results of his actions.
जैसा आथिला आणि विलासिया । तैचि वोळखो ये धनंजया । जै राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥362॥
पुरुषाची संपन्नता किंवा त्याचा विलासीपणा, हीं, तो जेव्हा एखाद्या राजवाडासारख्या बंगल्यात रहावयास येतो, तेव्हांच प्रत्ययाला येतात.
O Dhananjaya, when a man is actually living and enjoying in a place as rich as a palace, then only, we recognise him to be a rich person.
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । का विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तै निवाडु । जै देह पाविजे ॥363॥
जीवाला जेव्हा देह प्राप्त होतो तेव्हांच त्याच्या अहंकर्ता ह्या बुद्धीची वाढ, व विषयेंद्रियांचा धुमाकूळ ह्याचा निवाडा (स्पष्टता) होतो.
Similarly when the Atman takes up residence in a body, the concept of "I am the doer" becomes very strong, and then there is great havoc in the various senses and their objects.
अथवा शरीराते सांडी । तऱ्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवे काढी । घेऊनि जाय ॥364॥
अथवा, शरीरत्याग करतांना जीव आपल्याबरोबर येथील मन व ज्ञानेंद्रिये ह्यांचा समुदाय बरोबर घेऊन अन्य शरीरांत जातो.
If he leaves the body, he takes with him the whole caravan of the sense organs;
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । का साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥365॥
अपमान करून अतिथीला विन्मुख केल्यास तो आपल्याबरोबर जसे यजमानाचे आणखी पुण्यही हरण करून नेतो, अथवा कळसूत्री खेळाचा दोरा काढून नेल्यास त्याबरोबर त्या चित्रांची गतीही जाते.
Just as a guest when insulted takes away the spiritual merit of the host, or just as the string, which pulls the puppets takes away their movement.
नाना मावळतेनि तपने । नेइजेती लोकांची दर्शने । हे असो द्रुती पवने । नेईजे जैसी ॥366॥
अथवा सूर्य अस्तास जातांना बरोबर जशी लोकांची दृष्टीही नेतो, किंवा हे असो वारा आपल्याबरोबर जसा गंध (वास) नेतो.
Or just as the setting Sun takes away the power of vision of all the beings or just as the wind takes away the fragrance of flowers.
तेवी मनःषष्ठा यया । इंद्रियाते धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥367॥
त्याप्रमाणे, अर्जुना, हा देहस्वामी जो जीव, तो, हा देह सोडून जातांना, आपल्याबरोबर, मनासह असणाच्या सहा ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो.
Similarly O Dhananjaya, the Atman who is the owner of the body takes with him the mind and other sense organs and goes out.
मग येथ अथवा स्वर्गी । जेथ जे देह आपंगी । तेथ तैसेचि पुढती पांगी । मनादिक ॥368॥
मग येथे असो, अथवा स्वर्गात असो; त्याला जेथे जो देह प्राप्त होईल या देहांत ह्या मनादिकांची तशीच व्यवस्था लावतो.
And then either in this region of death or in the heaven, whatever body he occupies, he develops in the same body, the senses as well as the mind according to the conditions there.
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवा । तैसाचि फाके ॥369॥
अर्जुना, दिवा मालविला असता जसा आपल्या प्रभेसह जातो व पुन्हा लावला तर प्रभेसहच लावावा तेथे प्रकट होतो.
Dear Pandava, suppose a lamp is extinguished, it takes away its light, but if it is rekindled, it starts giving light again. This is like that.
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुले हे किरीटी । गमेचि गा ॥370॥
असे आहे, तरी, अर्जुना, हा क्रम चालू असता अविवेकी जनाला एवढे तरी वाटणारच:
O the crowned one, those who have insight can see this much.
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हे साचचि मानिती ॥371॥
की, आत्माच जन्माला आला, आणि विषयही त्यानेच भोगिला, तसेच आत्माच मेला; त्यांच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार सत्य आहे.
Because they think that everything is real, when Atman seems to have entered the body, to have enjoyed the objects; and to have left the body and gone out.
एऱ्हवी येणे आणि जाणे । का करणे हा भोगणे । हे प्रकृतीचे तेणे । मानियेले ॥372॥
एऱ्हवी विचारदृष्टीने पाहता, येणे, जाणे, करणं, भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत; पण तो ते आत्मधर्म असे मानतो.
But really, Atman who is not attached to the body knows that coming, going, doing and enjoying are all belonging to the Prakriti.
परी देहाचे मोटके उभे । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभे । आला म्हणती ॥373॥
देहाच्या आकाराच लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात.
When the form of the body appears to be standing and the power of movement has come in it and therefore the body is moving, people say that Atman has entered in it.
तैसेचि तया संगती । इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणे जया ॥374॥
त्याच प्रमाणे, अर्जुना, त्याच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली की तो त्याच भोग चालू आहे असे म्हणतात.
And O the husband of Subhadra! When the sense organs accompanying this body function in various respective objects, that is called 'enjoying';
पाठी भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथे गेला गेला ऐसे । बोभाती गा ॥375॥
भोग घेण्याचे संपून, आपोआप देह गेल्यावर चेतना दिसेनाशी झाली की, आत्मा गेला रे गेला अस एकच गिल्ला करितात.
And when naturally the body becomes weak and dies, people declare that the Atman has gone.
पै रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथे पांडवा । नाही तो गा ? ॥376॥
पण अर्जुना, असे पहा की, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावे ? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे वारा नाहीच असे का समजावयाचें ?
But O Pandava, is it correct to say that there is air when the trees are moving; and there is no air or wind, when the trees are not moving?
का आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपे तेथ देखिजे । तरी तेधवांचि जाले मानिजे । काय आधी नाही ? ॥377॥
किंवा, आरसा समोर ठेवून आपण आपले रूप त्यात पाहिले, म्हणजे मूळरूपही तेव्हांच झाले असे का समजावयाचे ? ते आधी नव्हते का ?
Or is it correct to say that, one is existing only when one sees one's reflection in the mirror, and one has got oneself and one was not there earlier?
का परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपे नाही ऐसा । निश्चयो करावा ? ॥378॥
किंवा आरसा परत नेला, आणि त्यातील आभासाचा लोप झाला म्हणजे आपलाच लोप झाला असा का निश्चय करावयाचा ?
Or is it correct to think that our own existence has gone, when the mirror is removed and the reflection disappears?
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळी पिटे मेघाचा । का चंद्री वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥379॥
वस्तुतः शब्द हा आकाशाच गुण आहे, पण ( मेघांचा ) गडगडाट झाला म्हणजे तो ध्वनि मेघांचा आहे असे सर्व लोक म्हणतात, किवा अभ्रांच्या गतीचा आरोप चंद्रावर करून चंद्रच चालतो आहे असे म्हणतात.
Sound is, in fact the quality inherent in the element of sky, but it is generally said that the clouds are thundering. Or when the clouds are running past the Moon, the Moon appears to be moving, which is an illusion.
तैसे होइजे जाइजे देहे । ते आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहे । आंधळे ते ॥380॥
उत्पन्न होणे किवा नष्ट होणे हे वस्तुतः देहाचे धर्म आहेत, पण, ज्यांची विचारशक्ति लोपली आहे असे अज्ञजन मोहाने, ते धर्म, अविक्रिय व सत्तास्वरूप जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करितात.
Similarly this appearing and dying of the body is blindly attributed by the ignorant, to the Atman, who is really without any modifications.
येथ आत्मा आत्मयाच्या ठायी । देखिजे देहीचा धर्मु देही । ऐसे देखणे ते पाही । आन आहाती ॥381॥
ह्या व्यवहारांत ( होणे जाणे ) आत्म्याचा काहीही संबंध नसून, तो स्वसत्तेनेच असंगत्वाने स्थित आहे; व हे केवल देहधर्म होत, अशी ज्यांची दृष्टि ( निश्चय ) आहे ते निराळेच अगर विरळा आहेत.
But only those who have discrimination and see that Atman is eternally as he is and the modifications of the body are natural for the body only, are really quite different persons from these.
ज्ञाने का जयाचे डोळे । देखोनि न राहती देहीचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मी जैसे ॥382॥
ग्रीष्म ऋतूतील सूर्याचे तीक्ष्ण किरण मेघांतून पार निघून खालील पृथ्वीतलापर्यंत जसे पोंचतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टि ( बुद्धि ) ज्ञानामुळे पांचभौतिक देहखोळ पाहून तेथेच कुंठित होत नाही.
Those wise people whose eyes do not limit their vision only to the physical body, and just as the sunrays are very powerful in summer season,
तैसे विवेकाचेनि पैसे । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसे । आत्मयाते ॥383॥
तर, वरील दृष्टांताप्रमाणंविवेकाच्या प्रकाशने ती दृष्टि देहाच्या पलीकडील जी आत्मवस्तु तेथवर पोचू शकते, असे जे ज्ञानी, ते, आत्म्याला असा पहातात.
Similarly those whose power of discrimination is completely developed and their intuition is established in the Reality, know the pure Atman himself.
जैसे तारांगणी भरले । गगन समुद्री बिंबले । परी ते तुटोनि नाही पडिले । ऐसे निवडे ॥384॥
जसे अनंत नक्षत्रयुक्त आकाश समुद्रात प्रतिबिंबित झाले असता, ते काही वरून तुटून पडले नाही असेच सर्व मानतात.
The whole sky with its stars is reflected in the sea, but it does not mean that it has fallen in the sea.
गगन गगनीचि आहे । हे आभासे ते वाये । तैसा आत्मा देखती देहे । गंवसिलाही ॥385॥
व आकाश होते तसेच आपल्या ठिकाणी आहे, हा दिसणारा केवळ मिथ्याभ्यास आहे असे म्हणतात; त्याचप्रमाणे देहस्थ वाटणारा आत्माही वस्तुतः देहस्थ नाही (तो स्वस्वरूपस्थित आहे) अशी ज्ञान्यांची दृष्टि असते
The sky is where it should be, and the reflection is a delusion. Similarly though the Atman seems to be involved in the body, it is only an unreal appearance.
खळाळाच्या लगबगी । फेडूनि खळाळाच्या भागी । देखिजे चंद्रिका का उगी । चंद्री जेवी ॥386॥
पाण्याच्या खळाळीची चंचलता, त्यात प्रतिफलित झालेल्या चंद्राचीही आहे असे जरी दिसले तरी, ती चंद्राची नसून केवळ पाण्याची आहे, चंद्र अचलच आहे असे जसे मानतात,
The turbulence of water is confined to the water only and though the reflection of the Moon seems to be moving in it, actually the light of the Moon is steady with the Moon only.
का नाडरचि भरे शोषे । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होता जाता तैसे । देखती माते ॥387॥
डबक्यातील सूर्याचे प्रतिबिंब दिसणे अगर लोपणे हा केवळ त्यात पाणी असणे अगर नसणे ह्याचा खेळ होय; सूर्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसून तो स्वस्थानी जसाच्या तसाच असतो, तसाच देहाच्या होण्याजाण्याने मला काहीही विकार होत नाही असे जे ज्ञानी पाहातात.
The pool of water is filled and is dried up and the reflection of the Sun appears in it and disappears, but the Sun itself is as he is in the sky. Similarly though the body may be there or may die, I am as I am, unaffected.
घटु मठु घडले । तेचि पाठी मोडले । परी आकाश ते संचले । असतचि असे ॥388॥
घट, मठ घडले आणि मागून मोडले तरी तेथील आकाश असते तसेच स्थित असते. (विकार पावत नाही. )
The pots and the houses may be made and destroyed but the space occupying all is as it is, self-existing.
तैसे अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पिते । हे देहचि होते जाते । जाणती फुडे ॥389॥
तसेच, अखंड जी आत्मसत्ता तिच्या आधारावर अज्ञान्यांनी कल्पिलेले हे देहच होतात जातात, त्याने (वरील आकाशाच्या दष्टांताप्रमाणे आत्मसत्तेत वर काहीही विकार नाही असे ते स्पष्ट जाणतात.
Similarly the men of wisdom know perfectly that while the existence of Atman is unbroken, the body appears to come into existence and end according to the ignorant's view only.
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसे आत्मज्ञाने चोखटे । जाणती ते ॥390॥
ज्यांना यथार्थ आत्मबोध झाला आहे त्यांच्या दृष्टीने, शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा कधी वाढतही नाही, किंवा घटतही नाही; तसाच तो काही चेष्टा करीतहि नाही किंवा करवीतही नाही.
The men of pure knowledge know well that the spirit does not increase or decrease, does not act or cause action.
आणि ज्ञानही आपैते होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचे येईल । सर्वस्व हाता ॥391॥
इतर ज्ञानाची गोष्ट घेतली तर, ते स्वाधीन होणे शक्य आहे, इतके की, त्यायोगे पृथ्वीचे परमाणूही मोजता येतील आणि सकल शास्त्रसार करतलामलकवत् ग्रहण होईल,
Suppose a man attains knowledge and his intellect becomes so sharp as to be able to measure the atom, and he becomes master of all sciences.
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसी । तरी सर्वात्मका मजसी । नव्हेचि भेटी ॥392॥
परंतु इतका व्युत्पन्न व ज्ञानसंपन्न होऊनही, जर अत:करणात वैराग्याचा प्रवेश नसेल तर, सर्वात्मक जो मी, त्या माझी भेट (ज्ञान) त्याला होणारच नाही.
Though he is so well-versed and learned, if there is no desirelessness, he will not be able to meet me in my all-pervading nature.
पै तोंड भरो का विचारा । आणि अंतःकरणी विषयासि थारा । तरी नातुडे धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥393॥
आणखीही असे की, सर्व शास्त्रे मुखोद्गत असूनही अंत:करणात विषयलालसा असेल, तरीही, अर्जुना, माझी त्याला कालत्रयी प्राप्ति होणार नाही.
And O the great Archer! A man may talk endlessly about the virtue of discrimination, but he will not understand my real nature if the lust for sensual pleasures is prevalent in his heart.
हा गा वोसणतयाच्या ग्रंथी । काई तुटती संसारगुंती ? । की परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥394॥
अरे, झोपेत बरळल्या गेलेल्या ग्रंथांतील वाक्यांनी कोणी संसारमुक्त झाला आहे काय ? किंवा पोथीचे नुसते रक्षण अगर तिची पूजा करून ती वाचल्याचे श्रेय येते काय ?
Further, can the problems of life be solved by the babbling of philosophy in a dream or can one understand the contents of a book by simply touching it?
नाना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळे । तरी तयांचे काय कळे । मोल मान ? ॥395॥
किंवा डोळे बांधुन परीक्षेसाठी मोती नाकास लाविले तर त्यांचे मुल्य अगर महत्व कळेल काय ?
Or can the value of pearls be known by closing one's eyes and holding the pearls near the tip of one's nose?
तै सा चित्ती अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते ॥396॥
त्याप्रमाणे, चित्तांत अहंकाराचे बिऱ्हाड, (पक्के ठाण) आणि जिव्हेवर सर्व शास्त्रे खेळती, असे कोट्यवधी जन्म गेले तरी मत्प्राप्ति होणे नाही.
Similarly while the ego is very powerful in the consciousness, your tongue may prattle about the word-knowledge of scriptures, for crores of reincarna-tions, but you may not come to me.
जो एक मी का समस्ती । व्यापकु असे भूतजाती । ऐक तिये व्याप्ती । रूप करू ॥397॥
एक असणारा जो मी, त्या माझी, सर्व भूतांत कधी व्याप्ति आहे तिची तुला फोड करून सांगू.
I shall explain to you the wholeness of my all-pervading nature, my being within each and every creature.
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंती आहे ॥398॥
सूर्य आणि ही सर्व विश्वरचना ज्या प्रकाशाने दिसते तो सर्व प्रकाश माझा आहे असे समज. तोच विश्वरचनेच्या आधी व नंतरही आहेच.
It should be known that the light which illuminates the Sun and the whole structure of this universe, is my own light from the beginning to the end.
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्री पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥399॥
अर्जुना, सूर्य, जळ शोषण करून गेल्यावर, तेथे, मागाहून ओलावा पुरविणारी जी चंद्रप्रभा, ती माझी होय.
O the son of Pandu! It is my soft light in the Moon which provides life-giving nectar to the world when the Sun sets.
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जे निरवधी । ते हुताशी तेजोवृद्धी । माझीचि गा ॥400॥
आणि, दहन किंवा पाचन करण्याची जी अग्नीच्या ठिकाणची अमर्याद शक्ति, तेही माझेच तेज होय.
And it is my enhanced heat which cooks the food, or burns, which is in the fire.
मी रिगालो असे भूतळी । म्हणौनि समुद्र महाजळी । हे पासूचि ढेपुळी । विरेचिना ॥401॥
मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयात, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही.
I have entered into the earth and, therefore, though the earth is full of dust, the great waters cannot dissolve it.
आणी भूतेही चराचरे । हे धरितसे जिये अपारे । तिये मीचि धरी धरे । रिगोनिया ॥402॥
आणि ही पृथ्वी, जी असंख्य स्थावरजंगमभूते आपल्यावर धारण करते त्या पृथ्वीमध्ये प्रवेशून मीच तिला धारण करतो.
And I myself enter the Earth and give the earth the strength by which it sustains the burden of all creatures.
गगनी मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसे अमृता । भरला जालो चालता । सरोवरु ॥403॥
अर्जुना, मी गगनांत चंद्राच्या रूपाने जणु काही अमृताचे चालते सरोवर झालो आहे.
O son of Pandu, by being the Moon I have become the moving lake of nectar.
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असे मी ॥404॥
तेथून (चंद्रापासून) अमृतश्राव करणारी किरणे फांकतात. त्यांचे ओघ बनवून सर्व औषधींच्या वनाचे मी पोषण करितों.
I make its rays into the streams of nectar and nourish plants on the Earth.
ऐसेनि सस्यादिका सकळा । करी धान्यजाती सुकाळा । दे अन्नद्वारा जिव्हाळा । भूतजाता ॥405॥
अशाप्रकारे सर्व जातीच्या धान्यादि पिकांचे पोषण करून, त्यांचा सुकाळ करितो व अन्नद्वारा सर्व भूतांचे मी रक्षण करतो.
Thus I produce grains etc. in plenty and feed all the creatures so that they live.
आणि निपजविले अन्न । तरी तैसे कैचे दीपन । जेणे जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥406॥
आणि अन्न जरी तयार केले तरी ते पचवून जीवांना समाधान होईल अशी त्यांच्या ठिकाणी दीपक (पाचक) शक्ति कोठची असणार ?
But though the grains are available who gives the heat necessary to cook food?
म्हणौनि प्राणिजातांच्या घटी । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरीही किरीटी । मीचि जालो ॥407॥
म्हणुन (पचन व्हावे म्हणून) प्राणिजातांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी ठेवून अर्जुना, जठराग्नीही मीच झालो.
For this, I become the oven on the navel of beings and the heat in their stomach.
प्राणापानाच्या जोडभाती । फुंकफुंकोनिया अहोराती । आटीतसे नेणो किती । उदरामाजी ॥408॥
प्राण व अपान या वायूच्या जोड भात्याने अहोरात्र ती शेगडी फुंकून, फुंकून उदरामध्ये किती अन्न जिरविले असेल ते सांगता नये.
And by bellows of Prana and Apana continuously functioning, I digest innumerable foods in the bellies of these beings.
शुष्के अथवा स्निग्धे । सुपक्वे का विदग्धे । परी मीचि गा चतुर्विधे । अन्ने पची ॥409॥
ओली, सुकी, शिजलेली, भाजलेली वगैरे चारी प्रकारची अन्ने मीच पचवितों.
I digest all the four types of food, viz dry, oily, boiled and roasted.
एवं मीचि आघवे जन । जना निरविते मीचि जीवन । जीवनी मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥410॥
अशाप्रकारे सर्व प्राणी मीच आहे, त्यांच्यानिर्वाहास लागणारे अन्न मीच आहे; व अन्न पचविण्याचे मुख्य साधन जो जठराग्नि तोही मीच आहे,
Thus I am the people, their life and the main means of their survival namely the fire.
आता ऐसियाहीवरी काई । सांगो व्याप्तीची नवाई । येथ दुजे नाहीचि घेई । सर्वत्र मी गा ॥411॥
आता याहीपेक्षा माझ्या व्यापकपणाची नवाई तुला काय सांगू ? अरे, जगात दुसरे असे काही नाहीच; सर्वत्र मीच आले असे जाणः
When this is the state of things, what further wonderful description should I tell you about my all-pervading nature? Really, I am everywhere. There is nothing else in the universe.
तरी कैसेनि पा वेखे । सदा सुखिये एके । एके तिये बहुदुःखे । क्रांत भूते ॥412
( पुढील दोन ओव्यात अर्जुनाच्या संभाव्य शंकेचे देव आपणच उत्थापन करून म्हणतात. ) तर मग काही भूतांचे आकार (मनुष्यादि) सुखी असावे व काहीचे (पश्वादि) सदा दुःखाक्रान्त असावे असे का ?
If this is true, then why some beings are always happy and some are unhappy?
जैसी सगळिये पाटणी । एकेचि दीपे दिवेलावणी । जालिया का न देखणी । उरली एके ॥413॥
जसे सर्व नगरांत एकाच जातीचे दिवे लावल्यास त्यातील काही प्रकाशतात, काही प्रकाशतच नाहीत असे होईल का ?
If throughout a city the same lamp gives light everywhere, why should there be darkness in some places?
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसी की । तरी परिस तेही निकी । शंका फेडु ॥414॥
अर्जुना, तुझ्या मनात असे तर्कवितर्क येत असणारच; पण त्या शंकेचेही निरसन करितो ते ऐक.
This may be perhaps your worry. This will also be removed. Please listen.
पै आघवा मीचि असे । येथ नाही कीर अनारिसे । परी प्राणियांचिया उल्लासे । बुद्धि ऐसा ॥415॥
हे पहा सर्वत्र माझी व्याप्ति आहे अथवा सर्व मीच आहे ह्याबद्दल विवादच नाही; परंतु, विचित्रता दिसण्याचे कारण प्राण्यांच्या बुद्धि उपाधींचे वैचित्र्य होय. (माझ्यात बदल नाही. )
No doubt I am alone permeating everywhere, but people see me only according to their conditioned intellect.
जैसे एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषी आनानी । वाजावे पडे भिन्नी । नादांतरी ॥416॥
आकाशाचा ध्वनि सदा एकरूप असूनही, भिन्न भिन्न वाद्यांच्या उपाधिद्वारा श्रवणावर येऊ लागला म्हणजे आकाशाच्या ध्वनीतच भिन्नता आहे अस वाटते.
This is like various sounds produced by various musical instruments though sound; as the quality of sky is one principle only.
का लोकचेष्टी वेगळाला । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥417॥
उगवलला एकच सूय किंवा सूर्यप्रकाश जस लोकांच्या भिन्नभिन्न व्यापाराला उपयोगी पडतो.
Or like the Sun who is only one and quite unrelated to all activities but the use of sunlight which people have is quite different for everyone.
नाना बीजधर्मानुरूप । झाडी उपजविले आप । तैसे परिणमले स्वरूप । माझे जीवा ॥418॥
किंवा पाणी तेच; पण त्या त्या बीजधर्मानुसार वृक्षांमध्ये भिन्न भिन्न परिणाम पावते, तसे मी नित्य एकरूप असता उपाधीच्या योगे भिन्न भिन्न स्वरूपाचा वाटतो.
My own nature becomes manifest separately for every person, just as water becomes differently useful for various kinds of trees according to their species.
अगा नेणा आणि चतुरा । पुढा निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वे जाला येरा । सुखालागी ॥419॥
अरे, अज्ञ आणि तज्ज्ञ (अशा दोन पुरुषांपुढे पडलेला एकच दोन पदरी नीलमण्यांचा हार पहिल्याला सर्पभ्रांतीमुळे दुःखाला कारण झाला तर दुसऱ्याला (तज्ज्ञाला) हार अशी प्रज्ञा होऊन सुखास कारण झाला.
For example, when a garland of blue jewels having two threads was seen by two men, the fool thought it to be serpent and a cause of fear, while the wise recognized it as a the garland and was glad.
हे असो स्वातीचे उदक । शुक्ती मोती व्याळी विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तो अज्ञानांसी ॥420॥
किंवा आणखी दृष्टांत एकाच स्वातिनक्षत्राचे पाणी शुक्तीत पडले तर मोती होते, सर्प मुखात पडले तर आणि विष रूपाने परिणाम पावते, त्याप्रमाणे ज्ञान्यांना सुखरूप जो मी, तो सुखाला कारण होतो व तोच सुखरूप मी अज्ञान्याला दुःखाला कारण होतो.
Or, the rain water which falls in the period of "Swati" (15th lunar asterism) becomes a pearl in a shell but if drunk by serpent it produces venom only. Similarly for the wise, I am a source of happiness and for the fools, I am a source of sorrow. And I am seated in the heart of all, being the source of memory, knowledge and the faculty of thinking and rethinking- I am alone the object of knowing, of the Vedic scriptures, and I am the creater of Vedanta and the knower of Vedas. (15).
एऱ्हवी सर्वाच्या हृदयदेशी । मी अमुका आहे ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशी । ते वस्तु गा मी ॥421॥
अरे, थोडक्यात माझी खूण अशी आहे. ” मी म्हणून एक असा आहे ” असे जे स्फुरण (ज्ञान) प्राण्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस असते, ते माझे स्वरूप होय.
There is a concept in everyone's mind, that "I AM". That concept is my own Nature.
परी संतासवे वसता । योगज्ञानी पैसता । गुरुचरण उपासिता । वैराग्येसी ॥422॥
परंतु (ते वस्तु, (मत्स्वरूप, ) यथार्थत्वाने केव्हा कळणार ? तर, ) संत समागम करशील, योग आणि ज्ञान अथवा ज्ञानयोगाचा अभ्यास करशील व वैराग्ययुक्त होत्साता सद्गुरू ह्या बुद्धीने त्यांची सेवा करशील
But when persons remain in the company of saints, practise yogic methods, serve the feet of the guru with complete desirelessness;
येणेचि सत्कर्मे । अशेषही अज्ञान विरमे । जयांचे अहं विश्रामे । आत्मरूपी ॥423॥
तेव्हां, आणि ह्याच एका पुण्याचरणाने (माझ्या प्राप्तीच्या आड येणारें, ) अज्ञान समूळ नाश पावतें; (त्याची खूण काय ?) ज्यांचा अहंकार, त्याला प्रकाशित करणाऱ्या आत्मस्वरूप दर्शनाने विश्रांतीला गेला आहे, (म्हणजे बाधित होऊन ज्याचे पूर्वस्वरूप गेले आहे)
By doing these good deeds, the ignorance of these persons disappears and their self-pride is dissolved in the Atman;
ते आपेआप देखोनि देखी । मिया आत्मेनि सदा सुखी । येथे मीवाचून अवलोकी । आन हेतु असे ? ॥424॥
त्यांना आत्मदर्शन म्हणजे सुखरूप जो मी त्या माझेच दर्शन झाल्यामुळे, ते सदा सुखी असतात. मग हे पहा ! या व्यवहारांत त्यांच्या सुखाचा माझ्यावाचून अन्य कोणता हेतु आहे ?
And they realized my nature and became happy with that realization. What other cause is there for their happiness?
अगा सूर्योदयो जालिया । सूर्ये सूर्यचि पहावा धनंजया । तेवी माते मिया जाणावया । मीचि हेतु ॥425॥
अर्जुना, दिवस उगवल्यावर, सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याप्रमाणे, माझे ज्ञाननही माझ्या सहाय्यानेच (मजकडूनच) होत असते.
O Dhananjaya, just as we see the Sun by his light only when it arises, I am known by my own knowledge only.
ना शरीरपराते सेविता । संसारगौरवचि ऐकता । देही जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥426॥
अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणीच दृढ झाला आहे.
On the other hand there are persons who hold fast to the pride of their being the body and listen constantly to the praise of this mundane life, and therefore their concept of self is limited to their body only.
ते स्वर्गसंसारालागी । धावता कर्ममार्गी । दुःखाच्या सेलभागी । विभागी होती ॥427॥
ते, स्वर्गातील किंवा संसारांतील विषयसुखासाठी कर्ममार्गाच्या मार्गे लागून अखेर शेलक्या म्हणजे गाळीव किंवा सुखलेशरहित दुःखाचे वांटेकरी होतात.
While running after the worldly and heavenly pleasures they get the heaviest suffering.
परी हेही होणे अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेते होय ॥428॥
पण ह्या अज्ञानी जीवांना ही स्थिति प्राप्त होण्यालाही, मुळात कारण ज्ञान स्वरूप जो मी, तोच होय; जसा जागा पुरुषच स्वप्नाला व निर्देला हेतु म्हणजे आधार असतो.
But the dream of a man who is asleep is caused by his waking state only. Just like this, it is I who am the primary cause of their suffering also.
पै अभ्रे दिवसु हरपला । तोहि दिवसेचि जाणो आला । तेवी मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूती ॥429॥
सूर्य मेघांनी आच्छादिला आहे हेही सूर्याच्या सत्तेने (प्रकाशाने) जाणता आलें; तसे मला नेणणे व विषय जाणणे हा प्राण्यांचा व्यवहारही माझ्या सत्तेवरच होतो.
Just as the cloud which brings darkness is seen by the light only, which it tries to cover; it is by my power only that people see the objects of senses through ignorance about my reality.
एवं निद्रा का जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवी ज्ञाना अज्ञाना जीवा या । मीचि मूळ ॥430॥
अर्जुना, निजलेला मनुष्यच जर जागा होतो तर, ह्या दोन्ही अवस्थाना हेतुभूत असणारी ” नित्यजागृति ” (प्रबोधता ) मुळात असतेच, त्याप्रमाणे या जीवांच्या जाणण्याच्या किंवा नेणण्याच्या दोन्ही व्यवहारांना केवल असा मीच मूळहेतु आहे.
O Dhananjaya, just as only because the man is conscious, we say whether he is awake or asleep, so, there is consideration of knowledge or ignorance, in a Jeeva, only because of my being the root cause.
जैसे सर्पत्वा का दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियाचि सिद्धु ॥431॥
सर्पभास होवो, की दोरीचे ज्ञान होवो, दोन्ही ज्ञाने जशी एका दोरीच्या सत्तेवरच होतात त्याप्रमाणे, व्यवहार ज्ञानाचा घडो की अज्ञानाचा घडो, तो, ज्ञानस्वरूप जो मी त्या माझ्याच आधारावर होतो.
O the great archer, only because the rope is existing, there is the question whether it appears as a rope or a serpent; similarly, for the state of ignorance or knowledge, I am the most evident root cause.
म्हणौनि जैसा असे तैसया । माते नेणोनि धनंजया । वेदु जाणो गेला तव तया । जालिया शाखा ॥432॥
म्हणून माझे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे, वेद ते जाणण्याचा उद्योग करू लागला, तेव्हा त्याच्या शाखा झाल्या (भाग झाले)
Not knowing me in my own reality, Veda tried to know me, but in that process, O Dhananjaya, it was divided into various branches.
तरी तिही शाखाभेदी । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥433॥
तरी, त्याच्या त्या तिन्ही शाखांनी (ऋक्, यजु, साम) खरोखर माझेच स्वरूप वर्णिले आहे; उदा. अशी नदी पूर्ववाहिनी असो की पश्चिमवाहिनी असो; अखेर मिळणार समुद्रालाच.
But please know that all there various branches indicate me only, just as the sea is the final aim for rivers running in the east or the west.
आणि महासिद्धांतापासी । श्रुति हारपती शब्देंसी । जैसिया सगंधा आकाशी । वातलहरी ॥434॥
आणि, पृथ्वीचा गंध घेऊन वाहणाऱ्या वाऱ्याच्या, लहरी ज्याप्रमाणे आकाशाच्या पोटांत मावळतात, त्याप्रमाणे, माझे वर्णन करीत महासिद्धांत प्रमेयापाशी (लक्ष्यार्थापाशी) येतांच त्यांची वाणी कुंठित होऊन त्या मौनावल्या.
And just as the fragrant breezes of the wind become merged into the sky, all the Vedas with all the words come to rest at the great Doctrine of "I AM BRAHMAN"
तैसे समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसे निवांत । ते मीचि करी यथावत । प्रकटोनिया ॥435॥
तसेच, माझ्या वर्णनांत सर्व श्रुति लज्जित (असमर्थ) होऊन त्यांनी मौन धरिले ते योग्यच होय, हे स्वप्रकाशत्वाने प्रगट होऊन मला दाखवावे लागते. (स्वप्रकाशत्व म्हणजे वेद्य न होता अपरोक्षत्व असणे; मग अवेद्यरूप श्रुतींना वर्णिता आले नाही तर नवल काय ? )
And also it is by my power only that all the Vedas become dumb and quiet at last.
पाठी श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । ते निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥436॥
आणि, सर्व श्रुतींसह जग जेथे पार लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणाराही मीच आहे.
And it is only I who knows the awareness that by knowledge of reality the whole world with the Vedas disappears totally.
जैसे निदेलिया जागिजे । तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे । परी एकत्वही देखो पाविजे । आपलेचि ॥437॥
निद्रिस्त पुरुष जागा झाल्यावर स्वप्नातील सर्व द्वैतव्यवहार तर जागृतीत नसतोच, पण, स्वप्नातही दुसरे काहीही नसून आपण एकटेच होतो असा निश्चय होतो
Just like a man does not get attached to anything in his dream after he wakes up, but knows himself to be alone;
तैसे आपले अद्वयपण । मी जाणतसे दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥438॥
तसाच माझा एकीएकपणा, दुजेपणाचा स्पर्शही होऊ न देता मी जाणतो आणि ह्याही स्वरूपबोधाला कारण ज्ञानरूप जो मी तोच.
I know the aloneness of mine without any duality and I am also the cause of the knowing of the self as such.
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणे नाही वीरा । जयापरी ॥439॥
अर्जुना, कापूर जळल्यावर जशी मागे काजळी रहात नाही व अग्नीही रहात नाही.
O the brave one! Just as there is neither flame nor soot remaining when camphor is totally burnt;
तेवी समूळ अविद्या खाये । ते ज्ञानही जै बुडोनि जाये । तऱ्ही नाही कीर नोहे । आणि न साहे असणेही ॥440॥
त्याप्रमाणे समूळ अविद्येचा ग्रास करणारे जे ज्ञान, ते ज्ञानही जेव्हा लय पावते वेळीं, ” काही नाहीं” असा अत्यंताभाव तर नाहीच, पण म्हणून ” आहे ” असे म्हणाल तर ” नाही ” ह्याच्या अपेक्षेने रूढ असलेले “आहे ” हे पद तरी, केवल अस्तिता=सत्तारूप असलेल्या वस्तूबद्दल कसे सहन होईल ?
So, when knowledge eats up all ignorance and that knowledge also becomes totally destroyed, there is no being or non-being.
पै विश्व घेऊनि गेला मागेसी । तया चोराते कवण के गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥441॥
(अज्ञान किंवा मूलाविद्या हे जगताचे उपादान कारण आहे; त्याचे नाशक असे एकच साधन म्हणजे अंतःकरणवृत्तिस्थ शुद्ध शास्त्रीय ब्रह्मज्ञान होय; ह्याच्या उदयाने उपादानकारण जे अज्ञान त्याचा ग्रास होत असल्याने तत्कार्य जे जगत् याचा कोठे मागमूसही उरत नाही; तसेच अज्ञाननाश झाल्यावर हे ब्रह्मज्ञान पुढे काही कर्तव्य उरले नाही म्हणून स्वभावत: आपले मूलस्वरूप मे सामान्यज्ञान त्यात लय पावते, तेव्हा त्याला शुद्ध ब्रह्मता आली. ह्या दोन्ही अभिप्रायांनी महाराज म्हणतात, असा जो अलौकिक चोर, की ज्याने सर्व विश्व त्यातील वाटांसह चोरून नेऊन त्या चोरीचा काही मागमूसही ठेविला नाही त्या चोराचा कोण व कसा पत्ता लावणार ? अशा ह्या लोकोत्तर चोराचे जे मूलस्थान हेच माझे शुद्धस्वरूप होय.
How can we find a "robber" who has stolen the whole universe with his clue also? Similarly I am that indescribable state which is pure itself.
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करिता कैवल्यपती । ठी केली निरुपहिती । आपुल्या रूपी ॥442॥
कैवल्यपति भगवान् श्रीकृष्ण, ह्यांनी स्थावरजंगमांमध्ये असलेल्या आपल्या ओतप्रोत व्याप्तीन्हे निरूपण करीत करीत ह्याप्रकारे आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या मुक्कामापर्यंत येऊन पोचले.
Thus when the animate and the inanimate are both filled completely by the Absolute Brahman, then the self rests in itself which is blotless.''
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनी उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवी ॥443॥
आकाशांतील चंद्राचे क्षीरार्णवांत जसे स्पष्ट प्रतिबिंब व्हावे तसा या सर्व बोधाचा अर्जुनाच्या चित्तावर एकदम ठसा उमटला.
All this teaching was totally reflected in the mind of Arjuna just like the reflection of the Moon in the ocean of milk.
का प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुने आणि वैकुंठे । नांदतसे बोधु ॥444॥
एका भिंतीवरील चित्र, समोरच्या आरशा सारख्या शुद्ध भितींत तंतोतंत उमटून, जसे दोन ठिकाणी नांदते असे दिसते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान् ह्यांच्या ठिकाणचा एकच बोध, शुद्ध भित्तिस्थान असलेल्या अर्जुनाच्या अंतःकरणात जसाच्या तसा उमटलेला दिसत होता.
Or the reflection of a wall in the wall opposite to it, when that wall is well polished. Such was the fullness of understanding in both Arjuna and the Lord of Vaikuntha (Shrikrishna).
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तव तव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥445॥
पण, महाराज, वस्तुमहिमाच असा आहे ! जशी ती अनुभवाला चढावी (अनुभव दृढ व्हावा) तशी तिजविषयींची गोडी वाढते, म्हणून, अशा जातीच्या भाग्यवंतांतील श्रेष्ठ अर्जुन म्हणाला.
But the peculiarity of self-knowledge is that it goes on increasing with the progress of learning. So, Arjuna, who was really the greatest among men of self-realization, said
जी व्यापकपण बोलता । निरुपाधिक जे आता । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥446॥
देवा, आपले व्यापकपण सांगता सांगता, प्रसंगानुरोधानेच, शेवटी आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचे जे वर्णन केले,
"My Lord, you have, while discussing about the quality of all-pervasiveness, indicated something about the blotless reality.
ते एक वेळ अव्यंगवाणे । कीजो का मजकारणे । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भले केले ॥447॥
ते पुन्हा एक वेळ माझ्यासाठी संपूर्णतया सांगावे अशी इच्छा आहे ! हे ऐकून देव म्हणाले, अर्जुना, शाबास शाबास !
Please tell me again for my sake, clearly about that reality. On this, the ruler of Dwarka said- "Very good!"
पै अर्जुना आम्हाहि वाडेकोडे । अखंडा बोलो आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसते ऐसे ॥448॥
खरे सांगू का ? (पै) अर्जुना, आम्हालाही ह्या गोष्टीची फार आवड आहे ! तिच्याच अखंड गोष्टी कराव्या असे वाटते; पण काय करावे ? कोणी विचारणाराच भेटत नाही रे.
O Arjuna, we also like to talk about this continuously! But what can be done? We do not get such an enquirer like you.
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तू केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसो ॥449॥
आज मात्र माझे मनोरथ फळले; आणि ते केवळ तुझ्यामुळे हो ! का म्हणशील तर काहीही आशंका न घरिता केवळ ह्याच म्हणजे निरुपाधिक स्वरूपाविषयींचा प्रश्न केलास म्हणून.
Today my aspirations are fulfilled, because you are asking questions very freely, without any inhibition.
जे अद्वैताहीवरी भोगिजे । ते अनुभवीच तू विरजे । पुसोनि मज माझे । देतासि सुख ॥450॥
(अद्वैतरूपतेनंतर) अद्वैतप्राप्तीच्या सुखाचा जो एक भोग आहे, तो देण्यास तू मला साह्य झाला आहेस. कारण, तुझा प्रश्न माझ्या निरुपाधिक स्वरूपाचा असल्याने माझ्या सुखाचाच मला पुन्हा भोग घडवीत आहेस.
You have made me even more happy by asking about the blotless bliss of Reality which can only be experienced after reaching the state of non-duality.
जैसा आरिसा आलिया जवळा । दिसे आपणपे आपला डोळा । तैसा संवादिया तू निर्मळा । शिरोमणी ॥451॥
आरसा जवळ आणिला असता जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा त्यात मला पुन्हा भोग घडणार आहे.
I have got in you the most skillful questioner and expert in the art of dialogue, which is like being able to see in a mirror held near our face, our own eye by our own eye.
तुवा नेणोनि पुसावे । मग आम्ही परिसऊ बैसावे । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥452॥
अर्जुना, तुला माहित नाही म्हणून तू विचारीत आहेस, आणि म्हणून आम्ही सांगतो अशातला हा प्रकार नाही.
My dear! This is not a type of dialogue where you are asking out of ignorance and we are then starting to teach you.''
ऐसे म्हणौनि आलिंगिले । कृपादृष्टी अवलोकिले । मग देवो काय बोलिले । अर्जुनेसी ॥453॥
असे म्हणून देवांनी अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याजकडे कृपादृष्टीने पाहून पुढे त्याला म्हणाले,
By saying thus, the Lord embraced Arjuna, looked at him most lovingly and then said
पै दोही वोठी एक बोलणे । दोही चरणी एक चालणे । तैसे पुसणे सांगणे । तुझे माझे ॥454॥
अरे, दोन ओठा मिळून शब्द एक, दोन पायांनी होणारे चालणे एक, त्याचप्रमाणे तुझे पुसणेआणि माझे सांगणे हा प्रकार आहे (प्रश्न आणि उत्तर दोही मिळून निष्पत्ति एक आत्मज्ञानच. )
``Your asking and my replying is so united as one speech in two lips or one walking by two feet.
एवं आम्ही तुम्ही येथे । देखावे एका अर्थाते । सांगते पुसते येथे । दोन्ही एक ॥455॥
एकंदरीत, त्या विषयाबद्दल तुझी व माझी अर्थदृष्टि एकच आहे, म्हणून, मी सांगणारा व तू विचारणारा असे दिसले, तरी आपण दोघे एकच म्हटले पाहिजेत.
Thus, we should see this occasion in such a way that the questioner and the responder are one person only.
ऐसा बोलत देवो भुलला मोहे । अर्जुनाते आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहे । आवडी हे ॥456॥
असे बोलणे चालले असता स्नेहाने मोहित होऊन गहिंवरून देवांनी अर्जुनाला पोटाशी आलिंगून धरिले व तसेच बसले; व थोडयाच वेळांत वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, ह्या प्रसंगी इतका मोह कामाचा नाही
While talking like this, the Lord was overwhelmed with love and he sat there embracing Arjuna for a while, but having some fear in his mind, said to himself-`This emotion is not good.'
जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणे किडाळ । जे संवादसुखाचे रसाळ । नासेल थिते ॥457॥
का की, उसाच्या रसाच्या ठेपीस नासू नये म्हणून क्षाराचे मिश्रण लागते. तसेच संवादसुख नुसते गोठू दिले तर नासेल. त्यालाही द्वैताचा, क्षार दिला तरच गोडी टिकेल.
Even if the cake of jaggery is prepared, some salt is required to be put in it to prevent its being fermented. Similarly by emotion, the pleasure of the dialogue may be spoiled.
आधीच आम्हा यया काही । नरनारायणासी भिन्न नाही । परी आता जिरो माझ्या ठाई । वेगु हा माझा ॥458॥
आम्हा नरनारायणात मूळचा भेद नाहीच; तरीही ह्या वेळी मला आलेला प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरविलाच पाहिजे.
Already as the sage Nara and the sage Narayana, there is unity between him and me, and therefore, I must control my emotions from within only.
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पै गा तो तुवा कैसा । प्रश्नु केला ? ॥459॥
असा विचार करून, देव सावध झाल्यासारखे करून एकदम म्हणाले, अर्जुना, आतांच तू मला काय प्रश्न केलास रे ?
Thinking on these lines, the Lord said quickly- "O the bravest warrior, what was the question that you asked?"
जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐको आला ॥460॥
इकडे अर्जुनाची वृत्तीही श्री कृष्णरूप होत होती, तो देवांच्या ह्या प्रश्नने देहभानावर येऊन, आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला.
At this, Arjun who was about to be dissolved with the Lord Shrikrishna in his consciousness, resumed his sense of objective reality about his question.
तेथ सद्गदे बोले । अर्जुने जी जी म्हणितले । निरुपाधिक आपुले । रूप सांगा ॥461॥
व सद्गदित वाणीने म्हणाला, “ हो, हो, देवा, आपले निरुपाधिक रूप सांगा” असे मी म्हटले होते.
He said with great affection, "Sir, sir! I asked you to tell me about your blemishless Reality.
यया बोला तो शारङ्गी । तेचि सांगावयालागी । उपाधी दोही भागी । निरूपीत असे ॥462॥
अर्जुनाचे हे भाषण ऐकून, ते निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधींचे दोन प्रकारे निरूपण केले.
The holder of Sharnga bow, who was going to tell the same thing to Arjuna, began to describe the Upadhi or attributes in two ways.
पुसिलिया निरुपहित । उपाधि का सांगे येथ । हे कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥463॥
आपले निरुपाधिक रूपवर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दर्शविली असता, देवांनी प्रथम उपाधींचे वर्णन का केले अशी जर कोणास शंका येईल.
Some will ask here as to why the Lord would describe the nature of attributes when the Reality without any attribute was what was asked about (by Arjuna).
तरी ताकाचे अंश फेडणे । याचि नांव लोणी काढणे । चोखाचिये शुद्धी तोडणे । कीडचि जेवी ॥464॥
तर असे पहा, की दह्यातील तक्रांश (तक) काढून टाकणे ह्याचेच नांव लोणी काढणे. (ती काही स्वतंत्र क्रिया नहीं) होय; किंवा शुद्ध सोने पाहिजे असेल तेव्हा त्यातील अशुद्ध धातु जाळून नाहीशी करणे हेच होय.
The answer is that to take out the essence of buttermilk is the same as obtaining butter out of it; or to burn the dirt means in other words to get pure gold.
बाबुळीचि सारावी हाते । परी पाणी तव असे आइते । अभ्रचि जावे गगन ते । सिद्धचि की ॥465॥
शेवाळ बाजूला करणे ह्याचाच अर्थ पाणी शुद्ध करणे होय; (हे तर प्रथमच शुद्ध असते, करावे लागत नाही) अथवा, अभ्र मावळले की आकाश मूळचेच स्वच्छ आहे.
Only when the moss is removed by hand from the surface, then the water is obtainable, and when clouds go away, then the sky is there eternally present.
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेता विरंगोळा । असे काई ? ॥466॥
अशुद्धता आणणाच्या वरील कोंडयाचे वेष्टन बाजूस झाडून टाकले की शुद्ध धान्य प्राप्तीला वेळ कसला ?
What delay is there to get the grain when the husk over it is thrashed away?
तैसा उपाधि उपहिता । शेवटु जेथ विचारिता । ते कोणातेही न पुसता । निरुपाधिक ॥467॥
(उपहित चैतन्य विचाराचा विषय होऊ शकतें; शुद्ध चैतन्य नव्हे उपहितांतीलही केवळ उपाधीच विचारार्ह आहे, चैतन्य नव्हे म्हणून ) उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा जेथे विचाराने शेवट अंत होतो, त्याच्या पलिकडे जे राहिले ते निरुपाधिक; ते स्वप्रकाश आहे त्याला कोणाची संमंति नको.
Similarly by thought when the covers of the attributes over the thing in itself are discarded, what remains is the sheer Brahman, without anybody's saying it in so many words.
जैसे न सांगणेवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणे विवरी । अचर्चाते ॥468॥
लग्न झालेली लहान मुलगी (घोडनवरी नव्हे) जे नांव घेतले असता होय किंवा नही काही न म्हणता, खाली मान घालून उगी रहाते, हे तिच्या पतीचे नांव तिच्या मनाने ठरले त्याप्रमाणे त्या शुद्ध, निरुपाधिक, अनिदं स्वरूपाच्या वर्णनात श्रुतीने मौन पत्करून त्यांचे “आवाङ्मनसगोचरत्व ” दर्शित केले.
When a lady is asked to take the name of her husband by her lady-friends, she says No, No, to each name asked about by them, but when the name of her husband is uttered, she indicates it to be true, not by saying so, but becoming shy!
पै सांगणेया जोगे नव्हे । तेथीचे सांगणे ऐसे आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदी ॥469॥
म्हणून जे शब्दाने सांगण्यासारखे नसते त्याचे असे आजूबाजूने वर्णन करावे लागते, हे मनात आणून लक्ष्मीपति भगवंताने प्रथम उपाधीचे वर्णन केले.
The way of describing that which in beyond description is like this, and therefore, the husband of the Goddess Laxmi described the attributes first.
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवी औपाधिका । बोली इया ॥470॥
शुद्ध प्रतिपदेच्या चंद्रदर्शनार्थ जसा एखाद्या खांदीचा (फांदीचा) आधार दृष्टीला द्यावा लागतो, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करितांना ते उपाधिद्वारांच करावे लागते.
The talk about anything which has attributes but cannot be separately indicated, is like showing the tiny slip of a moon on the first night of bright fortnight, by first pointing to a branch of a tree nearby, which gives right direction to the eyes of the beholder.
मग तो म्हणे गा सव्यसाची । पै इये संसारपाटणीची । वस्ती साविया टांची । दुपुरुषी ॥471॥
देव म्हणाले, अर्जुना, या संसाररूप नगरांत, फक्त दोनच पुरुषांची वस्ती आहे. (क्षर व अक्षर)
Then the Lord further said- "O the ambidextrous Archer, the town of this worldly life has a very small population- only of two Purushas.
जैसी आघवाचि गगनी । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानी । दोन्हीचि हे ॥472॥
ज्याप्रमाणे, सर्व आकाशांत दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे ह्या संसार राजधानीत हे दोनच पुरुष नांदतात.
Just as there are only day and the night residing in the sky, so, this is the only two-some residing in the capital city of this worldly life.
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहीचे नांव न साहे । जो उदेला गावेसी खाये । दोहीते यया ॥473॥
आणखीही एक तिसरा पुरुष आहे, पण त्याच्या पुढे या दोन पुरुषांचे नुसते नांवही घेण्याची सोय नाही; तो प्रगट झाला की, ह्या दोघांचा त्यांच्या नगरासह ग्रास करून टाकतो.
There is another third Purusha, but he cannot tolerate even the mention of the name of these two and who eats up both these, together with this city, if he arises.
परी ते तव गोठी असो । आधी दोन्हीची हे परियेसो । जे संसारग्रामा वसो । आले असती ॥474॥
पण ह्या तिसन्या पुरुषाची गोष्ट तूर्त राहू दे; ह्या संसारग्रामात प्रथम वस्तीला आलेले जे दोन पुरुष यांची गोष्ट ऐक.
But let us not talk about him now. We have to listen to the story of these two for the present. They have come to stay in this town of the worldly life.
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगे पुरता चांगु । परी ग्रामगुणे संगु । घडला दोघा ॥475॥
त्यातील एक आंधळा, वेडा व पंगु असून दुसरा सर्वागपूर्ण व चांगला आहे; पण एकाच गावात आल्याने ही विषम मैत्री जडली.
One of these is blind, mad, and lame while the second is quite healthy in all respects. Since they are living in one town, they have become friends.
तया एका नाम क्षरु । येराते म्हणती अक्षरु । इही दोहीचि परी संसारु । कोंदला असे ॥476॥
त्यातील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे.
One of these is called 'perishable', while the second is called 'imperishable'. This world is occupied completely by these two.
आता क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचू गा ॥477॥
आता ह्यातील क्षर कोणता व अक्षराचे लक्षण काय, ही सर्व तुला विशद करून सांगतो.
Now my dear, I shall explain who is the 'perishable' and what is the sign of the 'imperishable.'
तरी महदहंकारा- । लागुनिया धनुर्धरा । तृणांतीचा पांगोरा- । वरी पै गा ॥478
तरी, अर्जुना महत्तत्त्व व अहंकारापासून गवताच्या काडीपर्यंत.
O the great Archer, whatever is creation, animate or inanimate, right from the 'Mahat' to the little blade of grass,
॥ जे काही साने थोर । चालते अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धीसि जे ॥479॥
जे काही लहान थोर, स्थावर जंगम, किंवा मन व बुद्धि यांचा विषय होऊ शकणारे
Whatever is great or small, the moving or the fixed and whatever is perceptible by the mind and intellect,
जेतुले पांचभौतिक घडते । जे नामरूपा सांपडते । गुणत्रयाच्या पडते । कामठा जे ॥480॥
जे पंचमहाभूताचे कार्य आहे; नामरूपात सांपडले, व तीन गुणांच्या कक्षेत येते.
Whatever is made up of five great elements, whatever has name and form and whatever is within the scope of the three qualities.
भूताकृतीचे नाणे । घडत भांगारे जेणे । काळासि जू खेळणे । जिही कवडा ॥481॥
ज्या पंचमहाभूतरूप सुवर्णाने अनंत आकृतीचे प्राणीरूप नाणे पाडले गेले आहे, व ज्या आकाररूप कवड्यांनी काळाचा जुगार नित्य चालू आहे.
That gold from which the coin of each and every 'being' is minted, and whatever pawns are used in the game of gambling with 'Time';
जाणणेचि विपरीते । जे जे काही जाणिजेते । जे प्रतिक्षणी निमते । होऊनिया ॥482॥
जे जे काही विपरीत ज्ञानाचा विषय असते, व प्रतिक्षणी उपन्न होऊन नाश पावते.
Whatever is known by wrong knowledge or due to delusion, whatever is born from moment to moment and is destroyed.
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचे आंग । हे असो बहु जग । जया नाम ॥483॥
अरे, भ्रांतिरूप काष्ठांनी बनविलेला सृष्टीचा सांगाडा, हे असो; थोडक्यात म्हणजे जे जग या नांवाने प्रसिद्ध आहे.
Whatever false structure of the creation is posed as true through the great confusion of false concepts- in short, whatever is called 'the world'.
पै अष्टधा भिन्न ऐसे । जे दाविले प्रकृतिमिसे । जे क्षेत्रद्वारा छत्तिसे । भागी केले ॥484॥
जे सातव्या अध्यायात अष्टधा प्रकृतिरूपाने वर्णिले आहे व ज्यांचे तेराव्यात छत्तीस प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन आहे.
That which is consisting of eight divisions, because of the power of illusion and whatever is consisting of thirty-six different elements in the field which is our body.
हे मागील सांगो किती । अगा आताचि जे प्रस्तुती । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिले ॥485॥
हे मागील वर्णन कशाला ? आतांच ह्याच अध्यायात वृक्षाच्या रूपाने तुला जे वर्णन करून सांगितलें;
How much more should be told again, which has recently been described by the image of tree of worldly life?
ते आघवेचि साकारे । कल्पुनी आपणपया पुरे । जाले असे तदनुसारे । चैतन्यचि ॥486॥
त्या सर्व साकारवस्तु ह्या आपल्या वास्तव्याच्या जागा आहेत असे कल्पून. त्या त्या आकाराने हे चैतन्यच नटले आहे.
Thinking that, this is all its place of residence, the spirit itself has become of the shape of this world.
जैसा कुहा आपणचि बिंबे । सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे । मग क्षोभला समारंभे । घाली तेथ ॥487॥
ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपलेच प्रतिबिंब पाहून, त्यायोगे दुसऱ्या सिंहाच्या शंकेने क्रुद्ध होतो व त्या भरांत आत उडी घेतो.
Just like the lion seeing his reflection in a well, thinks that there is another lion there, gets angry and jumps into it.
का सलिली असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसे । अद्वैत होऊनि तैसे । द्वैत घेपे ॥488॥
(आकाश सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्या प्रतिबिंबाला वावच नाही तरीही ) जल ह्या उपाधीने युक्त असलेल्या आकाशांत पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे अद्वैत आमचैतन्य हे कधींही द्वैत होणे शक्य नसून उपाधियोगे द्वैत बनल्यासारखे दिसते,
Or just like the reflection of the sky above falls on the water, which is also of the nature of the sky, so the non-duality de-generates and accepts the state of duality.
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरी । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥489॥
अर्जुना, याप्रमाणे, साकार नगराची कल्पना करून आत्मा तेथे स्वस्वरूपविस्मृतीची निद्रा घेतो.
O Arjuna, in this way the Atman imagines that this is the city to be dwelt in, forgets his own real nature and goes to sleep there.
पै स्वप्नी सेजार देखिजे । मग पहुडणे जैसे तेथ कीजे । तैसे पुरी शयन देखिजे । आत्मयासी ॥490॥
स्वतः अंथरुणावर असतांनाच स्वप्नात पुन्हा जसे अंथरूण तयार करून त्यावर झोप घ्यावी, त्याप्रमाणे, सर्वगत आत्मा अज्ञानउपाधीने पुन्हा शरीररूप नगर उत्पन्न करून तेथे झोप घेतो.
Now just as a man sees a bed-room in his dream, and goes to sleep there in the dream only; the Atman goes to sleep in this imagined city.
पाठी तिये निद्रेचेनि भरे । मी सुखी दुःखी म्हणत घोरे । अहंममतेचेनि थोरे । वोसणाये सादे ॥491॥
मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी, मी दुःखी असे म्हणत घोरत पडतो व त्याच घोरांत मी आणि माझे असे मोठघाने बरळत असतो
In that sleep, he starts snoring to the effect that 'I am happy', and 'I am unhappy', and starts chattering in the dream with the words full of the notion of 'I' and 'Mine'.
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हे ना ॥492॥
हा पहा, माझा पिता, ही आई हा पहा मी गोरा आहे, काळा आहे, अव्यंग आहे, आणि हा मुलगा, ही स्त्री, हे द्रव्य, ही माझीच नव्हत का ?
"This is my father, this is my mother, I am fair, I am very poor, This is my son, this is my wife, they are mine, is it not?"
ऐसिया वेघोनि स्वप्ना । धावत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥493॥
अशा स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्गसंसारादि अरण्यात धावा ठोकणारे जे चैतन्य त्याला, अर्जुना, क्षर पुरुष म्हणतात.
Saying such things in that dream, he enters the forests of this world and the other world. O Arjuna, the consciousness which acts like this is called the "perishable."
आता ऐक क्षेत्रज्ञु येणे । नामे जयाते बोलणे । जग जीवु का म्हणे । जिये दशेते ॥494॥
त्याचा स्पष्ट अर्थ अस की, मागे जो क्षेत्रज्ञ म्हणून सांगितला किंवा येथे जगात ज्याला जीव असे म्हणतात.
He who is called the knower of the field, and the state which is called as "Jeeva" by all the people;
जो आपुलेनि विसरे । सर्व भूतत्वे अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षरे । पुरुष नामे ॥495॥
जो स्वस्वरूप विस्मृतीने सर्व भूतांसारखा होतो (म्हणजे ज्या ज्या उपाधीशी तादात्म्य पावेल ती मीच आहे असे म्हणतों) त्या जीवाम्याला क्षरपुरुष असे म्हणतात.
He who forgets himself and behaves in accordance with the conditionings of whatever body he occupies, that Atman is called the 'Perishable' or 'Kshara, Purusha'.
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरी निदैजता । पुरुषनामे ॥496॥
त्याच्या “ पुरुषतेची” उपपत्ति दोन तऱ्हेने लागते वस्तुस्थितीने तो परिपूर्ण आहे म्हणून तो ” पुरुष ” आहेच; किंवा देहपुरीमध्ये शयन करणारा अशा अर्थानेही त्याला “ पुरुषता ” आहे
Since, he is really the absolute Brahman, the name Purusha is proper for him and since he sleeps in the town of body the name Purusha is proper in that sense; also. (Pur = town; puri - in the town) shete- sleeps.
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधीचि आतला । म्हणौनिया ॥497॥
पण, असा हा “ पुरुष ” उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्याजवर क्षरपणाच नसता आळ आला.
And he has been wrongly accused of being perishable because he has become a slave to the conditionings and attributes of the body.
जैसी खळाळीचिया उदका- । सरसी आंदोळे चंद्रिका । तैसा विकारा औपाधिका । ऐसाचि गमे ॥498॥
खळाळीच्या पाण्याच्या हालचालीने जसा आतील चंद्रही हलत आहे असे दिसते, (वस्तुतः ते हलणे फक्त जलाचे आहे) त्याप्रमाणे, उपाधींच्या विकारांमुळे हाही विकारी आहे असे वाटते.
He appears to be undergoing changes, just like the reflection of moon fallen in moving waters appears to be moving.
का खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे । तैसा उपाधिनाशी न दिसे । उपाधिकु ॥499॥
ते खळाळीचे पाणी आटले की त्यातील प्रतिबिंबही त्याच क्षणी नाश पावते, त्याप्रमाणे उपाधीच्या नाशाने औपाधिक (उपाधि युक्त) क्षरचैतन्यही प्रतीतीला येत नाही.
Just as the light of the moon reflected in the water disappears, when the moving waters are completely dried-up, so, when the conditioning or attributes are eliminated, the distortions due to those attributes also disappear.
ऐसे उपाधीचेनि पाडे । क्षणिकत्व याते जोडे । तेणे खोंकरपणे घडे । क्षर हे नाम ॥500॥
ह्याप्रमाणे, उपाधीच्या योगाने चैतन्याला क्षणिकत्व येऊन त्यालाच न्यूनतादर्शक क्षर असे नांव प्राप्त झाले;
Since the Purusha becomes ephemeral by the force of the conditioning to which he becomes attached, he is called by the name of "Kshara Purusha."
एवं जीवचैतन्य आघवे । हे क्षर पुरुष जाणावे । आता रूप करू बरवे । अक्षरासी ॥501॥
ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आता पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतो.
Therefore, the spirit at the level of the Jeeva should be known as 'perishable male principle. Now I shall explain nicely what is the nature of the 'Imperishable.'
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पै धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरा । मेरु जैसा ॥502॥
अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष म्हणून आहे तो, पर्वतश्रेणींमध्ये मेरू पर्वत जसा मध्यभागी आहे तसा मध्यस्थ आहे. (म्हणजे एका टोंकास शुद्ध परमात्मा व दुसच्या टोकास अशुद्ध व क्षणिक जगत असे जे ” मध्यस्थ ” परमात्मविषयक अज्ञान ते आहे उपाधि ज्या चैतन्याला व अक्षर पुरुष होय=मायाविशिष्ट चैतन्य )
O the great Archer, this second Purusha is only a witness, just like the mountain Meru among all mountains.
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी । इही न भेदे तिही भागी । तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी । पडेना जो ॥503॥
तो मेरूपर्वत, स्वर्ग, पृथ्वी व पाताळ ह्या तीन लोकांपैकी अमक्या लोकातला असे म्हणता न येता जसा सर्वत्र समच आहे, तसा हा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नव्हे किंवा अज्ञानकार्य जगत् तद्रूपही नव्हे असा मध्यस्थ आहे.
Because just as the mountain Meru is not divided in three parts, in spite of its existence in the three worlds, namely the earth, the nether-world and the heaven, similarly this Prursha is not involved either in knowledge or ignorance.
ना यथार्थज्ञाने एक होणे । ना अन्यथात्वे दुजे घेणे । ऐसे निखिळ जे नेणणे । तेचि ते रूप ॥504॥
ज्या स्थितीत जीवाला यथार्थं ब्रह्मौक्य ज्ञानही नसते, किंवा विक्षेपकार्य जो व्यवहार तद्रूपही तो नसतो, अशी जी त्याची मध्यस्थ घनसुषुप्त अवस्था, ते अक्षर पुरुषाचे रूप होय.
He does not attain unity by right knowledge about truth, nor assumes duality by ignorance, Thus, pure, non-cognisant stability is his nature.
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसे आहे । मध्यस्थ जे ॥505॥
ढेपूळता तर निःशेष मोडलेली, पण अद्याप घडयागाडग्यांच्या आकाराला न आलेला असा जो मध्यस्थ मृत्पिंड (मातीचा गोळा) तसे ह्या अक्षर पुरुषाचे स्वरूप जाणावे.
For example, when the quality of earth is lost, neither pots nor vessels can be manufactured out of it. This witness, is the imperishable like the earth without its quality.
पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥506॥
ज्या स्थलावरील समुद्राचे पाणी ओहोटून ओसरले आहे, त्या स्थलाच्या निराकार दशेप्रमाणे जी स्थिति (निराकारता अशी की, त्या स्थलाला समुद्र म्हणावे, तर लाटाही नाहीत व पाणीही नाही; पृथ्वीचे क्षेत्र म्हणावे, तर, पुढल्या क्षणाला समुद्र तेथे आपला अंमल गाजवणार).
The abstract state of this disinterested 'Purusha' is like the condition in which there is neither wave, nor water, when the sea is dried up.
पार्था जागणे तरी बुडे । परी स्वप्नाचे काही न मांडे । तैसिये निद्रे सांगडे । न्याहाळणे जे ॥507॥
पार्था, जागृति लोप पावली आहे आणि स्वप्नादि व्यवहार बंद आहे अशी जी झोप याप्रमाणे हे समजावे.
O Partha, there is a condition in which wakefulness has been reduced to nil and actual dream has not started, and there is only a non-specific state in which the eyes neither 'see' nor 'do not see'. The state of this 'Purusha' is like this.
विश्व आघवेचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥508॥
सर्व विश्वदर्शन मावळले आहे पण आत्मबोधाचा तर उदय नाही अशी जी केवळ अज्ञानावस्था तिला “अक्षर” असे नांव आहे.
Awareness of the surrounding universe has ceased and the self-knowledge has not yet become quite clear. This state of nescience is called Akshara.
सर्वा कळी सांडिले जैसे । चंद्रपण उरे अंवसे । रूप जाणावे तैसे । अक्षराचे ॥509॥
सर्व कलाशून्य (गडद अंधकाररूप) अमावास्येच्या चंद्राप्रमाणे ” अक्षराचे रूप समजावे.
The nature of Akshara is like the invisibility of the Moon, having lost all her phases on the darkest night of the lunar month.
पै सर्वोपाधिविनाशे । हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसे । झाड बीजी ॥510॥
पक्वफळाच्या बीजांत तरु जसा सूक्ष्मरूपाने असतो त्याप्रमाणे जागृदादि सर्व उपाधिनाशानंतर ही जीवदशा ज्या ठिकाणी लीन होऊन असते.
The state of the Jeeva dissolves by elimination of all the attributes; and when the fruit of a tree is ripe, the whole tree is dormant in its seed.
तैसे उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयाते अव्यक्त । बोलती गा ॥511
तसेच उपाधि व उपाधीने युक्त असणारे जेथे लीन होतात त्या स्थानाला ” अव्यक्त ” असे म्हणतात.
Similarly when the attributes cease to exist, it remains dormant. That state is called 'Avyakta' or unmanifest.
॥ घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥512॥
गाढ अज्ञानरूप जी सुषुप्त्यवस्था तिला ” बीजभाव ” म्हणतात व दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती हा तिचा फलभाव होय.
The deep sleep is equivalent to deep ignorance, and the dream state and walking state are the fruits of that state of sleep.
जयासी का बीजभावो । वेदांती केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥513॥
वेदान्तांत ज्या स्थितीला ” बीजभाव ” असे म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय. ( तोच अक्षर पुरुष होय. )
What is called as the state of seed, in Vedanta terminology is the abode of this Akshara - Purusha.
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचे रान । रिगाले असे ॥514॥
जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन ते जागृति, स्वप्न व नाना तऱ्हेचे बुद्धितरंग या रूपांनी विस्तारते.
That is the place from which wrong type of knowledge comes forth and it roams about in the forest of logic and bad-logic through the states of dream and wakefulness.
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥515॥
अर्जुना, जीवत्व आणि विश्व ह्यांचा उदय जेथून होतो व हे दोन भेद पुन्हा शेवटी जेथे ऐक्य किंवा लय पावतात त्या अज्ञानोपहित चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात.
That is the place from where both the "I" as Jeeva and "All" as the Universe come about, and where the unmanifest and the manifest meet together- O Arjuna, that state is called Akshara Purusha or the imperishable principle.
येरु क्षर पुरुषु का जनी । जिही खेळे जागृती स्वप्नी । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥516॥
दुसरा जो क्षर पुरुष म्हणून म्हणतात व ज्याचा व्यवहार जागृति व स्वप्न ह्या अवस्थांत चालतो व त्या दोन्ही अवस्था जेथून उत्पन्न होतात.
The other Purusha, who is perishable, and who plays the games of dream and wakefulness in the outer world is born out of this state.
पै अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे का ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥517॥
किंवा गाढ अज्ञानदशा जी, लोकात “सुषुप्ति ” ह्या नांवाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्मा का म्हणू नये याला एकच कारण आहे.
Similarly the state just below or lower than the state of Brahman, which is well known as the state of sleep is of the nature of deep ignorance.
साचचि पुढती वीरा । जरी न येता स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणो येता ॥518॥
अर्जुना, खरोखर, ह्या सुषुप्त्यवस्थेतून जीव स्वप्न व जागृति ह्या अवस्थाना येताच ना, तर त्या सुषुप्तीलाच आम्ही ब्रह्मस्थिति असे म्हटले असते.
And O the brave warrior! If an appearance of two states of dream and wakefulness were not there, it would have been properly called the state of Brahman;
परी प्रकृतिपुरुषे दोनी । अभ्रे जाली जिये गगनी । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नी । देखिला जिये ॥519॥
पण त्या सुषुप्तिरूप ज्ञानशून्य गगनांत प्रकृति व पुरुष असे दोन ढग येऊन क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे भेद जिच्या स्वप्नात दिसतात. ( म्हणून सुषुप्त्यवस्थेला ब्रह्मस्थिति म्हणता येत नाही. )
But it is the state like the sky in which two clouds of Prakriti and Purusha (Matter and Spirit) are born and there is illusory perception of "The field" and "The knower of the field"
हे असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ ते रूप पुरुषा । अक्षराचे ॥520॥
हे राहू दे, अधःशाख ( खाली खांद्या असलेला ) अशा ह्या संसारवृक्षाचे जो प्रथम मूळ ( वस्तूच्या ठिकाणी अज्ञानाचे आर घेणे ) तो हा अक्षर पुरुष होय.
In short, that is the root called Akshara purusha, from which the tree of life with branches growing downwards are coming forth.
हा पुरुषु का म्हणिजे । जे पूर्णपणेचि निजे । पै मायापुरी पहुडिजे । तेणेही बोले ॥521॥
आता ह्याला पुरुष का म्हणतात ? तर- ” पूर्णतया शेते ” गाढ निद्रा घेतो म्हणून किंवा “ मायापुऱ्या शेते” मायापुरीमध्ये शयन करितो म्हणूनही पुरुष म्हणावा.
Then why is this called Purusha when he is complete in himself as Atman? That is because he sleeps in the town of this Maya.
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारी । ते सुषुप्ती गा हा ॥522॥
विपरीत ज्ञानाचे खेळ जे विकारादि ते ज्या अवस्थेत मुळींच नसतात ती सुषुप्ति (व तोच अक्षर पुरुष होय. )
The state in which the activities of various modifications and distortions, which is only a work of ignorance are not experienced, is this state of his sleep.
म्हणौनि यया आपैसे । क्षरणे या नसे । आणिकेही हा न नाशे । ज्ञानाउणे ॥523॥
त्या अक्षर पुरुषाच्या अज्ञानोपाधीचा स्वभावतः किंवा ज्ञानावाचून अन्य कशानेही नाश होणे शक्य नाही.
Therefore, He is never destroyed. He is also not affected by lack of knowledge.
यालागी हा अक्षरु । ऐसा वेदांती डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥524॥
म्हणूनच वेदान्त सिद्धान्ताच्या प्रदेशात ह्याला “ अक्षर ” अशी संज्ञा दिली आहे.
Therefore, in the terms used while explaining the final principles in Vedanta, He is called Akshara or non-perishable.
ऐसे जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य ते ॥525॥
ज्या चैतन्याशी असलेला मायेचा संबंध जीवत्वदशा व जगत् कार्यं ह्यांना कारण आहे ते मायोपहित चैतन्य अक्षर पुरुष जाण.
In short, know that it is spirit only which is called Akshara Purusha, who is the cause of the existence of Jeeva as a separate entity; and attachment with Maya is his sign of recognition.
आता अन्यथाज्ञानी । या दोनी अवस्था जया जनी । तया हरपती घनी । अज्ञानतत्त्वी ॥526॥
आता अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगात रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानात लय पावतात.
Both the states of dream and wakefulness, which are caused by wrong type of knowledge in this world, merge into this state of deep ignorance.
ते अज्ञान ज्ञानी बुडालिया । ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनिया । स्वये जळे ॥527॥
त्या अज्ञानाचा, जसा अग्नि, काष्ठ जाळून आपणही स्वतः जळतो म्हणजे स्वरूपात शांत होतो; तसा ज्ञानाने ग्रास करून ते ज्ञानही (काही कर्तव्य नाही म्हणून) मागल्या पावली निघून गेले. (शांत झालें)
But when that ignorance is destroyed by knowledge and when the knowledge comes ahead in its fullness, then just as the fire burns the wood and ends itself also;
तैसे अज्ञान ज्ञाने नेले । आपण वस्तु देऊनि गेले । ऐसे जाणणेनिवीण उरले । जाणते जे ॥528॥
ज्ञानाने समूळ अज्ञान नाहीसे होते, व अज्ञाननाशाचा क्षण तोच वस्तुप्राप्तीचा क्षण असल्याने वस्तुदर्शनही ज्ञानामुळेच होतें; व अज्ञाननाशाबरोबर ज्ञाताज्त्रयादि व्यवहाराचा लोप होत असल्याने ज्ञानाचे जीवनच जाऊन तेही अंग टाकतें. म्हणजे सामान्यज्ञानरूप किंवा द्रह्मरूप होतें; ही अवस्था जाणण्यात म्हणजे येणारी नसून स्वसंवेद्य आहे म्हणून काही निर्देशच करणे तर तेथे ‘जाणण्याशिवाय नुसते जाणणे’ म्हणजे ज्ञानमात्र स्थित असते असा उपचार करावा लागतो.
So, the knowledge destroys the ignorance and by indicating the state of Atman, it becomes itself destroyed. Then there is still something, which remains without the knowledge.
ते तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय का निष्कर्षु । दोहीहून आणिकु । मागिला जो ॥529॥
ही स्थिति तो उत्तम पुरुष होय. मागील क्षराक्षर पुरुषांच्या अपेक्षेने त्याला तिसरा असे म्हटले, तो शेवटचा शुद्ध परमात्मा होय.
He is the supreme person. He is proved to be different from the two persons described earlier as the 'Perishable' and 'Imperishable.'
सुषुप्ती आणि स्वप्ना- । पासूनि बहुवे अर्जुना । जागणे जैसे आना । बोधाचेचि ॥530॥
अर्जुना, सुषप्ति आणि स्वप्न ह्यापेक्षा जागृतीतील बोध जसा फार वेगळा असतो.
O Arjuna, for example, the waking state is quite different from the state of sleep and the state of dreams.
का रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवी वेगळा । उत्तमु गा ॥531॥
किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ यांहून सूर्य मंडल जसे फारच वेगळे, तसाच हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून अत्यंत वेगळा आहे.
Or the vastness of the solar effulgence is quite different from its normal rays and the illusory mirage. The supreme person (Uttama Purusha) should be known like the Sun.
हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥532॥
किंवा याहूनही, काष्ठांतीलच वन्हि जसा काष्ठाहून भिन्न असतो; तसा क्षराक्षरांत असूनही हा उत्तम पुरुष त्याहून वेगळाच आहे.
The fire which is in the wood is quite different from the wood. Similarly the supreme person is quite different from the Kshara and the Akshara persons.
पै ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदा । उठी कल्पांती उदावादा । एकार्णवाचा ॥533॥
कल्पांतकाळचा एकार्णव (व्यापक समुद्र) जशी आपली मर्यादा ओलांडून नदीनद जसे सर्व एकरूप म्हणजे जलमय करितो.
And the one totally pervasive sea at the time of final deluge, devours all the water sources, rivers and seas in one watery existence;
तैसे स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजे ॥534॥
प्रलयकालच्या तेजोमय स्थितीत जसा दिवस आणि रात्र हा भेद उरत नाही, तशी, ह्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी, सुषुप्ति, स्वप्न किंवा जागृति अशा अवस्थाभेदांची गोष्टच बोलणे नको.
Similarly, in Him not even the names of the three states of waking, dreaming and sleeping remain; just as day and night become extinct at the time of the final deluge, in the totality of light.
मग एकपण ना दुजे । असे नाही हे नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथे ॥535॥
मग ? ते द्वैत किं अद्वैत आहे, हे किंवा नाही काहीच सांगण्याची सोय नाही व त्रिपुटीच्या अभावी हा उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवही भयाने बुडी देऊन रहातो.
And as all the states are dissolved, there is no experience of duality or non-duality in his being.
ऐसे आथि जे काही । ते तो उत्तम पुरुषु पाही । जे परमात्मा इही । बोलिजे नामी ॥536॥
असे जे काही तत्व आहे, तो उत्तम पुरुष जाणावा; त्यालाच परमात्मा असे म्हणतात.
And that which is something still existing, is the supreme person, and is called by the name of Paramatman.
तेही एथ न मिसळता । बोलणे जीवत्वे पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥537॥
अर्जुना, हे वर्णनही या उत्तम पुरुषस्थितीच्या बाहेर असलेला जीवभाव पत्करून करून बोलावे लागते. बुडालेल्याची वार्ता काठावरील मनुष्य सांगू शकेल, बुडालेला नव्हे.
But, O the son of Pandu, that is only possible to say, by keeping our state of Jeeva active, and our not merging into that Paramatman, just as it is possible to talk about somebody's drowning, only for a man on the bank of the pond;
तैसे विवेकाचिये कांठी । उभे ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणे वेदा ॥538॥
त्याप्रमाणे अर्जुना, विचाराच्या तीरावरच जोपर्यंत वेद उभे आहेत तोंवरच त्यास अक्षर अलीकडले, उत्तमपुरुष यांच्या हि पलीकडला ” वगैरे अलिकडच्या पलिकडल्या गोष्टी करत आल्या.
Thus it is possible for Vedas to talk about what is here on this shore and what is beyond, only by standing on the bank of discriminative power of knowledge.
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । याते म्हणती परु । आत्मरूप ॥539॥
म्हणून. क्षर व अक्षरपुरुष हे‘ अवर’ म्हणजे कनिष्ठ आहेत असे पाहून ह्या उत्तम पुरुषाला ” पर ” म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा म्हणजे परमात्मा असे म्हणतात.
Therefore, the Vedas have called as 'lower person' both the perishable and imperishable, and called the supreme person who is beyond these as the 'Paramatman'.
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारी । पुरुषोत्तमु ॥540॥
अर्जुना ह्याप्रमाणे परमात्मा ह्या शब्दाने पुरुषोत्तम (उत्तमपुरुष) अते सुचविले आहे असे समज.
O Arjuna, please know that this supreme person is called "Purushottama".
एऱ्हवी न बोलणेचि बोलणे । जेथिचे सर्व नेणिवा जाणणे । काहीच न होनि होणे । जे वस्तु गा ॥541॥
आणखी त्या विषयी मौन धरणे हेच तद्विषयक बोलणे होय, जे कोणत्याही समजेत न येणे हेच त्याचे जाणणे ( अविजानता विज्ञातं = ज्यांनी ब्रम्ह जाणले नाही त्यानिंच खरे जाणले) ते होन्या जाण्यातले नाही असा समज हेच त्याचे होणे
Actually, not to talk is the talking in that state, not to know anything is the knowledge in that state, and not to be anything is the being in that state.
सोऽहं तेही अस्तवले । जेथ सांगतेचि सांगणे जाले । द्रष्टत्वेसी गेले । दृश्य जेथ ॥542॥
सोऽहं ही बुद्धि जेथे मावळली व सर्वाधिष्ठानत्वामुळे सांगणाराच सांगणेरूप झाला व दृङमात्र स्वरूपनिश्चयात द्रष्टत्व लोपले व त्यामुळे दृश्यही आटलें.
There the concept of 'SOHAM' (I AM THAT) does not remain, the speaker becomes the spoken, and the observer disappears together with the 'observable'.
आता बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजी कैची हे म्हणो नये प्रभा ? । जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥543॥
कोणत्याही प्रकारे ती प्रतीतीला आली नाही तरी बिंब आणि प्रतिबिंब ह्यांच्यामध्ये बिंबाची सूक्ष्म आकृति नाही असे कसे म्हणता येईल ?
We may not be able to see the light between the reflection and the original thing; but we should not say that it is not existing;
का घ्राणा फुला दोही । द्रुती असे जे माझारिला ठायी । ते न दिसे तरी नाही । ऐसे बोलो नये ॥544॥
किंवा प्राण आणि फुले ह्या दोघांच्यामधील प्रदेशांतही त्यांचा गंध, तो आपल्यास आहे असा वाटला नाही । तरी, आहे असे म्हटले पाहिजे.
Similarly, though the fragrance between the flower on one side and the nose on the other side may not be visible, but we cannot say that it is not existing;
तैसे द्रष्टा दृश्य हे जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेचि अनुभवे तेचि पाहे । रूप तया ॥545॥
तसे द्रष्टेपणा व त्याच्याबरोबर दृश्यवस्तु ह्यांचा लोप झाल्यावर तेथे अमुक एक आहे असे कोणी म्हणावे ? पण अशीच ती वस्तु आहे हे अनुभवानेच जाणावयाचे असते किंवा अनुभवी तेच जाणोतो; असे उत्तम पुरुषाचे रूप आहे.
Similarly though the observer on one part and the observable thing on the other part may disappear, it is not logical to say that nothing remains. Therefore what is experienced in that state should be known as the existence of the supreme person.
जो प्रकाश्येवीण प्रकाशु । ईशितव्येवीण ईशु । आपणेनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥546॥
जो प्रकाश्य वस्तूवाचून प्रकाशरूप आहे, नियम्य वस्तूवाचून जो स्वरूपतः ईश आहे व जो सर्व अवकाश व्यापून आपणच आहे.
He is not being illuminated by anything, but He is illuminating everything; He is not the controlled but is Himself the controller; and He is Himself the space and the occupier of the space;
जो नादे ऐकिजता नादु । स्वादे चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेचि ॥547॥
जो नादाचाही नाद (नादपणा ज्या सत्तेवर नांदतो आहे) तसाच जो स्वादाचाही स्वाद असून जो आपल्या आनंदस्वरूपानेच आनंदाचा भोग घेत असतो.
He is sound listening to sound, taste tasting the taste, and joy enjoying the joy.
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथे ॥548॥
जो पूर्णतेचा अंत ( किंवा परिणाम पावलेली अगर अवतरलेली अशी मूर्त पूर्णता ) सर्वपुरुषश्रेष्ठ व विश्रांतीचेही विश्रामस्थान.
He is the completeness of the complete. The Purusha is the supreme Purusha and the rest has come to rest in him.
सुखासि सुख जोडिले । जे तेज तेजासि सांपडले । शून्यही बुडाले । महाशून्यी जिये ॥549॥
जेथे सुखालाच सुखाची जोड, तेजालाच तेजोलाभ अगर महाशून्यामध्येच शून्याचा लय.
He is happiness getting happy, light finding the light and in him the void at the Jeeva level merges into the greater cosmic void.
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेही ग्रासूनि पुरता । जो बहुते पाडे बहुता- । पासूनि बहु ॥550॥
जो विकास संपून अवधिभूत असणारा, ग्रासाचाही ग्रास करून पूर्णत्वाने असणारा, जो सर्व बहुत्वाहुनही बहु म्हणजे श्रेष्ठ आहे.
He is beyond all development. He grasps the power of grasping; and He is more than the most of all the greatest.
पै नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपे न होनि शुक्ती । दावी जेवी ॥551॥
किंवा, ज्याप्रमाणे, शुक्ति स्वतः रूपे न होता नेणत्याला रुप्याचा भास होण्यास कारण होते
Just as a shell gives a false impression of silver to an ignorant, though it is not actually silver;
का नाना अलंकारदशे । सोने न लपत लपाले असे । विश्व न होनिया तैसे । विश्व जो धरी ॥552॥
नित्य प्रकट असणारे सोने अलंकाररूपाने स्थित असले म्हणजे नेणत्यांना लपाल्यासारखे होऊन त्यांना फक्त अलंकारच दिसतात; याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हांही विश्व न होता नेणत्यांच्या दृष्टीला दिसणाऱ्या विश्वाचा आधार आहे.
Or in an ornament, gold is hidden though not invisible. So, He is not universe but gives the visible effect of universe;
हे असो जलतरंगा । नाही सिनानेपण जेवी गा । तेवी दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥553॥
हे असो. जल व त्यावरील लाटा ह्यात जशी भिन्नता नसते (पाण्याच्या अस्तित्वावरच लाटांचे अस्तित्व असते) त्याप्रमाणे, उत्तम पुरुषाच्या अस्तितेवरच नांदनारे जगत् (अन्वयदृष्टीने) त्याहून वेगळे नाही
Or just as there is no essential difference between the water and the waves; He has become the support of the visibility of the world; while He is also the world.
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळी चंद्र हन जैसा । समग्र गा ॥554॥
केवळ चंद्राच्या संकोच विकासावरच जसा त्याच्या प्रतिबिंबाचा संकोच विकास अवलंबून आहे, त्याप्रमाणे आत्म्याचे प्रगट होणे अगर स्वरूपावस्थान असणे ह्यावर विश्वाचा प्रकटपणा अगर लोप अवलंबून आहे.
Just as the Moon is herself responsible for her reflection in the water which is smaller or longer according to the phase of the Moon; but the Moon is not dependent on the reflection.
तैसा विश्वपणे काही होये । विश्वलोपी कही न जाये । जैसा रात्री दिवसे नोहे । द्विधा रवि ॥555॥
तसाच विश्वस्थितीत तो काही होतही नाही अगर विश्वाच्या लोपाने तो कोठे जातही नाही. (आहे तसाच असतो ) ह्याला उदाहरण, रात्र आणि दिवस हे सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करू शकत नाहीत.
Similarly, He, the supreme person becomes somewhat manifest by the world, but He is not dissolved by the dissolution of the world, just as the Sun does not change by the night or day in this world;
तैसा काहीचि कोणीकडे । कायिसेनिहि वेची न पडे । जयाचे सांगडे । जयासीचि ॥556॥
याप्रमाणे तो कशांतही नसतो, कशानेहि न्यूनता पावत नाही; म्हणून तो कसा आहे हे सांगणे झाल्यास त्याच्यासारखाच तो आहे असे म्हणावे लागते.
Similarly He is not affected or spent up by anything coming to an end; and He is comparable with Himself only.
जो पापियाचा आपणपेचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलो जया । नाही दुजे ॥557॥
अन्यप्रकाशनिरपेक्ष जो आपला आपणच प्रकाश करितो (स्वप्रकाशरूप आहे) तो, अर्जुना, काय सांगावे ? केवल एकरूप आहे. त्यावांचुन दुसरे काही नाहीच.
O Dhananjaya, He illumines Himself; or, why go into lengthy description? There is none other, second to him.
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥558॥
असा क्षराक्षराहून उत्तम किंवा श्रेष्ठ जो मी, हे माझे निरुपाधिक स्वरूप होय; म्हणूनच वेदांनी व लोकांनी ह्यांचे पुरुषोत्तम असे वर्णन केले आहे.
That I am, without any attributes, beyond the perishable and the imperishable, and alone; so the Vedas and common people call me as the Supreme Person (Purushottama).
परी हे असो ऐसिया । मज पुरुषोत्तमाते धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे ॥559॥
परंतु हे असो, अर्जुना, असा जो भी पुरुषोत्तम त्याला तोच एक पाहू शकतो की, ज्याच्या अंतःकरणात यथार्थ ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे.
But dear Dhananjaya, let this be. He who has known me after the dawn of knowledge has arisen;
चेइलिया आपुले ज्ञान । जैसे नाहीचि होय स्वप्न । तैसे स्फुरते त्रिभुवन । वावो जाले ॥560॥
जागे झाल्यावर स्वप्नव्यवहार जसा नाहीसा होतो, तसेच ” चेइलिया आपुले ज्ञान ” म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर दिसणारे विश्व स्वप्नवत् वाव होते.
He who, after being endowed with self-knowledge, is feeling that this world is false like a dream.
का हाती घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा । तैसा माझेनि बोधे टवाळा । नागवे तो ॥561॥
जिच्यावर सर्पभ्रम झाला होता ती माळच हाती घेतल्यावर (अपरोक्ष झाल्यावर) जसा सर्पभ्रम व भीति नाहीशी होते, तसे ज्याला माझे ज्ञान झाले आहे तो ह्या टवाळ म्हणजे मिथ्या जगदाभासाने फसत नाही. (दृढमिथ्यात्वनिश्चयामुळे)
Or, just as when one actually holds in his hand a rosary, the illusion and fear of its being a serpent become nullified; so, he is not caught in the mundane life when he gains knowledge about me.
लेणे सोनेचि जो जाणे । तो लेणेपण ते वावो म्हणे । तेवी मी जाणोनि जेणे । वाळिला भेदु ॥562॥
अलंकाराला ज्याने सुवर्णत्वाने जाणले तो जसा अलंकार म्हणून काही स्वतंत्र वस्तु मानीत नाही त्याप्रमाणे ज्याला माझे ज्ञान झाले त्याची, अलंकाराच्या दृष्टांताप्रमाणे, भेदबुद्धि पार नाहींशी अगर बाधित होते.
He who knows that the ornament is really gold only, says that the shape of the ornament is false. Similarly he who has known me and therefore discarded duality;
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसी भेदु । नेणोनिया जाणे ॥563॥
मग, असा भेदबुद्धि बाधित झालेला पुरुष, स्वतःसिद्ध सच्चिदानंदस्वरूप असा मीच सर्वत्र आहे असे म्हणतो; व आपल्या स्वतःलाही दुजेपणाने न पहाता मला जाणतो.
And then he who says-"I am all- pervading, alone without a second; self-evident, complete in my existence, life and joy," and not harbouring any thought about his separateness, knows my reality as Atman
तेणेचि सर्व जाणितले । हेही म्हणणे थेंकुले । जे तया सर्व उरले । द्वैत नाही ॥564॥
आता त्याला त्या पुरुषालाच सर्व ज्ञान झाले हेही म्हणणे अपुरे म्हणजे वस्तुस्थितिदर्शक नाही; कारण, त्याला सर्व म्हणून काही द्वैत उरलेच नाही.
Has known all; but this statement is also short of truth; because in him there is no ``duality'' which is the object of description.
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसे आलिंगना । गगनाचिया ॥565॥
म्हणून, अर्जुना, माझे भजन करावयास तोच (मद्रूप झालेला) एक योग्य होय; अरे ! गगनाला आलिंगन देण्याची योग्यता एका गगनाचीच आहे, अन्याची नव्हे.
Dear Arjuna, therefore only such a person can be my true devotee; just as only sky can embrace the sky.
क्षीरसागरा परगुणे । कीजे क्षीरसागरचिपणे । अमृतचि होऊनि मिळणे । अमृती जेवी ॥566॥
क्षीरसागराचा पाहुणचार क्षीरसागरानेच करणे अथवा अमृतत्वानेच अमृतास मिळणे जसे योग्य
The sea of milk only can give a dinner to the sea of milk and only nectar can be mixed with nectar if its purity is to be maintained.
साडेपंधरा मिसळावे । तै साडेपंधरेचि होआवे । तेवी मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥567॥
उत्तम सुवर्णात तद्रूप होण्यास जसे उत्तम सुवर्णच पाहिजे, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला यालाच माझी भक्ति करणे शक्य व योग्य आहे.
Just as pure gold mixed with pure gold becomes pure gold only, so, by becoming me only, my true devotion is possible.
हा गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? । म्हणौनि मी न होता भक्ती । अन्वयो आहे ? ॥568॥
गंगा सिंधूहून जर भिन्न असती तर ती सिंधुरूप कशी झाली असती ? म्हणून “मी न होता “ म्हणजे माझी सर्वव्यापकता न बाणता परिच्छिन्न बुद्धी केलेली भक्ति खरी किंवा सार्थ होईल काय ?
Just see! If the Ganges will not be ready to be like the sea then how can it meet that sea?
ऐसियालागी सर्व प्रकारी । जैसा कल्लोळु अनन्यु सागरी । तैसा माते अवधारी । भजिन्नला जो ॥569॥
ह्यासाठी, समुद्राच्याच्या लाटा जशा समुद्राशी सर्वथैव अनन्य (अभिन्न) आहेत, त्याप्रमाणे माझे भजन करणारा अनन्य असा, अगर अनन्य असेल त्यानेच खरे भजन केले असे जाण.
So, he who worships me just like the wave which is totally inseparable from the water;
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणे लोभे । तो पाडु मानू लाभे । भजना तया ॥570॥
सूर्य आणि प्रभा यांचे जसे नित्य ऐक्य आहे तशी वरील अनन्यभजनाची योग्यता आहे.
Has such an intimate relationship with me that can be compared with the relationship between the Sun and his light.
एवं कथिलयादारभ्य । हे जे सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदा सौरभ्य । कमळदळा जेवी ॥571॥
ह्याप्रमाणे अध्यायाला आरंभ केल्यापासून येथवर जे सर्व सांगितले ते केवळ शास्त्रांपासूनच प्राप्त होत असते; आणि कमलांना सुगंध ही जशी शोभा, तसे हे गीताशास्त्र हे उपनिषद्रूप कमलांचा सुगंध होय.
(Saint Dnyaneshwar says) The Lord finally said- "Thus, right from the beginning of this chapter, the essence of all the scriptures is propounded, which gives fragrance of the Upanishads like that of the lotus petals.
हे शब्दब्रह्माचे मथिते । श्रीव्यासप्रज्ञेचेनि हाते । मथुनि काढिले आयिते । सार आम्ही ॥572॥
शब्दब्रह्मरूप जो वेदार्णव त्यापासून व्यासबुद्धिरूप रवीने मंथन करून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे.
That totality of the substantive meaning which is obtained after churning the Brahman in the form of words, (Vedas) which is the outcome of the intelligence of the great sage Vyasa, is offered to you very simply.
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥573॥
ही गीता ज्ञानामृताची गंगा, आनंदरूप चंद्राची सतरावी कला, अथवा विचाररूप क्षीरसागरांतून अवतरलेला नवीन लक्ष्मीचाच अवतार होय.
This is the river Ganges of the nectar of knowledge, or the seventeenth ultimate phase of the 'Moon' of joy, or a new 'Goddess Laxmi' emerging out of the sea of 'milk' of proper thought.
म्हणौनि आपुलेनि पदे वर्णे । अर्थाचेनि जीवेप्राणे । मीवाचोनि हो नेणे । आन काही ॥574॥
म्हणून ही, आपल्या प्रत्येक शब्दाने, वर्णनाने, आणि अर्थरूपी जिव्हाळयाने मजवाचून दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही.
Therefore, she does not know anybody else than me, by her 'terms', her 'letters' or the essence of love in the shape of their 'meanings'.
क्षराक्षरत्वे समोर जाले । तयांचे पुरुषत्व वाळिले । मग सर्वस्व मज दिधले । पुरुषोत्तमी ॥575॥
तिच्यासमोर क्षर व अक्षर असे दोन पुरुष आले असता (दर्शनानेच) त्यांचे पुरुषत्व तिने नाकारले, व मग, आपले सर्वस्व मज पुरुषोत्तमास अर्पिले.
The perishable and the imperishable came in front of this goddess but disregarding their masculinity or their being Purusha, she surrendered herself to me, the supreme person.
म्हणौनि जगी गीता । मिया आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवा आता । आकर्णिली ॥576॥
म्हणून प्रस्तुत तुला जिचे श्रवण घडले ती ही गीता, मला आत्मारामाला वरिल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे.
Therefore, Geeta is my beloved and loyal wife, the wife of Atman that I am; and you have heard this now.
साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र । पै संसारु जिणते हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरे इये ॥577॥
अर्जुना, खरे सांगतों; नुसत्या वाक्पांडित्यासठ हे गीताशास्त्र निर्माण झाले नाही, तर संसारशत्रुचा नाश करणारे हे शस्त्र आहे, अथवा, ही गीताक्षरे म्हणजे निर्गुण आत्म्याला मूर्त रूपाने अवतरित व्हावयास लावणारे जणु मंत्र आहेत.
This science of Geeta is not easy to explain in the ordinary language; but this is a weapon which conquers the mundane life; and it has letters which invoke the Atman!
परी तुजपुढा सांगितले । ते अर्जुना ऐसे जाले । जे गौप्यधन काढिले । माझे आजि ॥578॥
जवळचा गुप्त ठेवा बाहेर काढावा, तशासारखेच, आज तुला गीता ऐकविली, हे झालं.
O Arjuna, I have, however, revealed it to you, which is as if I have taken out a secret treasure in my heart and given it.
मज चैतन्यशंभूचा माथा । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था- । निधी तू गा ॥579॥
शंकराच्या जटेत गुप्त असलेल्या गंगेचे गौतमाच्या तपाने जसे अवतरण झाले त्याप्रमाणे चैतन्यशंभु जो मी, त्या माझ्या अंतःकरणात गुप्त असलेली जी ज्ञानगंगा, तिला मुखवाटे शब्दरूप प्रवाहाने अवतरविणारा तू दुसरा आस्थावान् गौतमच भेटलास म्हणावयाचा !
O Partha, I am the Lord Shankar in the field of spiritual knowledge and this Geeta is like the most valuable treasure like the Ganges held on the head of that god and just as sage Gautama became the man who brought down the Godawari (Southern Ganges) in this world you have become instrumental to bring this Geeta to the world, by your deep interest in it.
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हा ॥580॥
आपल्या स्वच्छपणामुळे आरसा जसा पुढील वस्तूचे प्रतिबिंब आपल्यात आणतो त्याप्रमाणे धनंजया, तू आमच्या समोरील आरसाच झाला आहेस.
O Dhananjaya, you have become a mirror which I hold before my eyes in order to be sure about my true nature.
का भरले चंद्रतारांगणी । नभ सिंधू आपणयामाजी आणी । तैसा गीतेसी मी अंतःकरणी । सूदला तुवा ॥581॥
किंवा चंद्रतारांगणांनी भरलेले आकाश, सिंधु जसे आपल्यात प्रतिबिंबित करून घेतो, त्याप्रमाणे गीते सह तु मला आपल्या हृदयात प्रतिबिंबित करून घेतलेस.
Just as the sea brings within it the whole sky with all the stars, as a reflection, you have got in your mind, Geeta as well as me, in totality, as 'Understanding.'
जे त्रिविधमळिकटा । तू सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसी मज वसौटा । जालासि गा ॥582॥
अर्जुना, तुझ्या चित्तातील तिन्ही सळ (सत्वरजतम) नाहीसे झाले आहेत म्हणून गीतेचे व माझे तू निवासस्थान झाला आहेस.
Arjuna! Since you are free from the blemishes of the three 'Gunas' or modifications, you have become the place of residence for Geeta.
परी हे बोलो काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥583॥
ह्या गीतेची थोरवी काय बोलावी ! ही माझी ज्ञानवल्लीच होय. तिये ज्याला समग्र आकलन झाले तो सर्व मोहांपासून मुक्त होतो
But how can I praise this Geeta adequately? He who knows this vine of knowledge, really becomes free from all attractions.
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचिता । देऊनि घाली ॥584॥
अमृतगंगेचे पान केल्यावर रोग दवडून वर ती योग्य असे अमरत्व देते
O! Son of Pandu, if a man drinks from the river of nectar, it definitely cures the disease and gives immortality to him.
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञाने आपणापया । मिळिजे येथ ॥585॥
त्याप्रमाणे गीता जाणल्यावर मोहमुक्त होईल ह्यात आश्चर्य हे काय ? पण आत्मज्ञानाने आपली आपल्याला भेट होणे (अपरोक्षज्ञान होणे) हे तिये जाणणे होय.
What wonder is there that by knowing this Geeta, the attraction of sense-object disappears? More than that it gives self-knowledge and makes it possible to attain the state of Atman.
जया आत्मज्ञानाच्या ठायी । कर्म आपुलेया जीविता पाही । होऊनिया उतराई । लया जाय ॥586॥
आजवरच्या आपल्या श्रमायै चीज झाले म्हणून कर्म, आत्मज्ञानप्राप्तीचे उतराई होऊन लय पावते
And when that self-knowledge is attained, Action also dissolves, knowing that its life's mission is finished.
हरपले दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥587॥
हरवलेली जिन्नस शोधण्यासाठी ज्या खाणाखुणा अवश्य असतात त्यांची वस्तुप्राप्तीनंतर जशी गरज नसते त्याप्रमाणे कर्मरूप देवळाचा ज्ञान रूप कळस हाच शेवट होय.
O the brave man! Just as the search comes to an end when the lost thing is found, the temple of Action has the dome of knowledge on it, completed; and therefore, action ceases to be.
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करू सरले देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥588॥
म्हणून ज्ञानवानाचे विधिकिंकरत्व ( कर्तव्यबुद्धीने कर्म करणे ) संपले असे अनाथाचे नाथ (रमा रंग) म्हणाले.
Therefore, a man of self- knowledge has no necessity of doing any action. -Thus the resort of all destitutes, the Lord Shrikrishna said- says Dnyaneshwara
ते श्रीकृष्णवचनामृत । पार्थी भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥589॥
ते श्री कृष्णवचनरूपी अमृत पार्थाच्या चित्तांत भरून वर उचंबळू लागले. तेच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले.
That nectar of the words of Shrikrishna was filling the mind of Arjuna and was overflowing from it which., by the grace of Vyasa, Sanjaya was also receiving.
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥590॥
ते अमृत, संजयाने राया धृतराष्ट्रास पाजिले. म्हणून त्याला (धृतराष्ट्राला) अंत समय कठिण गेला नाही.
Since Dhritarashtra was the recipient of it from Sanjaya, later on he did not suffer much at the time of his own death.
एऱ्हवी गीताश्रवण अवसरी । आवडो लागता अनधिकारी । परि सेखी तेचि उजरी । पातला भली ॥591॥
पाहू गेले तर गीताश्रवणाच्या वेळीं, धृतराष्ट्र हा श्रवणाचा अधिकारी नाही असे वाटत असे; परंतु अंती तो उपदेश त्याला कामाला आला.
Even if it is felt that a certain man is not worthy of listening to Geeta, later on Geeta definitely becomes his saviour.
जेव्हा द्राक्षी दूध घातले । तेव्हा वाया गेले गमले । परी फळपाकी दुणावले । देखिजे जेवी ॥592॥
द्राक्षाच्या वेलास खत म्हणून दूध घालतात तेव्हा ते व्यर्थ गेले असे वाटले, तरी त्याचा परिपाक होऊन उत्तम पीक आले म्हणजे दुप्पट फायदा झाला असे जसे अनुभवास येते.
We may think that milk poured at the roots of grape-vine plant is wasted, but when we taste the fruit, we see it to be doubly useful.
तैसी श्रीहरीवक्त्रीची अक्षरे । संजये सांगितली आदरे । तिही अंधु तोही अवसरे । सुखिया जाला ॥593॥
त्याप्रमाणे, श्रीहरीच्या मुखातील अक्षरे (उपदेश) संजयानं धृतराष्ट्रास सांगितली त्याने तो अंध धृतराष्ट्रही अंती सुखी झाला.
Thus Dhritarashtra listened to Sanjaya, who told him respectfully the words uttered by the Lord himself, and he became happy in the due course of time.
तेचि मऱ्हाटेनि विन्यासे । मिया उन्मेषे ठसेंठोंबसे । जी जाणे नेणे तैसे । निरोपिले ॥594॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच अक्षरे मराठी भाषेत माझ्या सामर्थ्याप्रमाणे मला समजली तशी ओबडधोबडपणे निरूपिली आहेत.
The same teaching, I have somehow, according to my ability, crudely put into Marathi language.
सेवंतीये अरिसि काही । आंग पाहता विशेषु नाही । परी सौरभ्य नेले तिही । भ्रमरी जाणिजे ॥595॥
शेवंतीच्या झाडाकडे पाहिले असता अरसिकला त्यात काही वैशिष्टय असेल असे वाटत नाही पण ते सुगंध सेवनाचे खरे अधिकारी जे भ्रमर त्यांनाच कळते
In the flower like 'Shevanti,' people may not find a much attractive shape, but its quality is known by the blue-beetles which take away the nectar.
तैसे घडते प्रमेय घेइजे । उणे ते मज देइजे । जे नेणणे हेचि सहजे । रूप की बाळा ॥596॥
त्याप्रमाणे आपण धड म्हणजे सिद्धांताशौं पटणारे प्रमेय स्वीकारावे, प्रमाद घडले असतील ते माझे पदरांत टाकावे; कारण, मुले सहजच अजाण असावी हेच त्यांचे बालपण होय.
So, I request you the listeners to please accept what seems to you the correct doctrine and leave untouched what is not, for me only, because it is but natural for a child not to know right or wrong.
तरी नेणते जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप की माये । हर्ष केहि न समाये । चोज करिती ॥597॥
पण नेणत्या मुलाला पाहूनही आई व बाप ह्यांना अति हर्षे होऊन ते त्याचे कौतुक करितात.
Even if the child is ignorant, the parents are happy beyond limits as soon as they see it and lovingly fondle it.
तैसे संत माहेर माझे । तुम्ही मिनलिया मी लाडैजे । तेचि ग्रंथाचेनि व्याजे । जाणिजो जी ॥598॥
तसे संत हे माझे माहेर (आईबाप ) होय. तुमची भेट झाल्यावर मी लाडांत येतो ( हर्ष होतो ). ह्या हर्षातीलच ही कृति ( ग्रंथरचना ) असे समजावे.
Similarly, the saints like you are my parental home and meeting you, I have become a bit bold and pampered. My commentary on Geeta may be seen as an example of my boldness.
आता विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वा{क्} पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥599॥
अध्याय समाप्तीला महाराज म्हणतात, विश्वात्मक असे माझे स्वामी श्रीनिवृत्तिराज ते माझी वाक्पूजा स्वीकारोत.
And now, the king Nivruttinath, who is Universal God for me, may please accept this worship in the form of these words!"- so says Dnyandeva.