अध्याय 18: मोक्षसंन्यासयोग

Fully populated

Moksha Sanyasa Yoga (The Yoga of Liberation through Renunciation)

Original & Marathi meaning source:

English meaning source:

This is the longest chapter in the Dnyaneshwari (1810 ovis per the chapter's own colophon, which also states it contains 78 Gita shlokas). Several Marathi source-page markers had leading-digit typos that were corrected by recovering each ovi's own trailing closing number, and in four cases (markers mistyped as 450, 558, 468, and 128) the source additionally still had a separate, correctly positioned genuine entry under that same number elsewhere in the chapter (real ovis 450, 558, 468, and 128) - both the mistyped entry (relabeled to its true number: 650, 858, 868, and 1281 respectively) and its separate genuine counterpart were recovered and kept. A missing linebreak had merged ovi 938's original and meaning onto one raw line; this was split manually at the closing ॥938॥. The source additionally contains one extra, uncounted scribal-attestation verse beyond the colophon's stated total (labeled '1811' on the Marathi site and reached via an equivalent extra paragraph in the English source), naming the traditional scribe Sacchidanand Baba and dated Shaka year 1212; this extra verse was deliberately excluded from the numbered verses array below so the total matches the colophon's official count of 1810. Separately, the English (Ghaisas) source's own numbering runs one behind the Marathi numbering for the entire remainder of the chapter starting at ovi 1579, because Ghaisas's translation has no separate paragraph for ovi 1579 (see that ovi's note); this offset was identified and corrected by realigning every English paragraph from that point onward by +1 against the independently-validated Marathi numbering, which is confirmed correct via the two sources' repeated content agreement at every checkpoint through the end of the chapter.

1
मूळ

जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥1॥

मराठी अर्थ

हे देवा ! तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहा. आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहा. तुमचा जयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God who is blotless! You make everything auspicious for your devotees. You are the hurricane which destroys the clouds of the birth and oldage etc., which trouble the devotees.

2
मूळ

जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥2॥

मराठी अर्थ

देवा ! तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूळ नाश करणारे आहा. वेद व शास्त्ररुपी वृक्षांचे फळ असून लाभदायक आहा. तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the most powerful God! You dissipate all the groups of evils. You are the bestower of the fruit of the tree of study of all the Vedas and Sciences.

3
मूळ

जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥3॥

मराठी अर्थ

देवा ! तुम्ही सम्पूर्ण असून ज्यांनी विषयाचा त्याग केला आहे, त्याच्यावर कृपा करणारे आहा व लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कालातीत असे पूर्ण आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God who are the Totality! You love those who are free of the attraction towards sense-objects. You are the controller of the influence of time and you are beyond all divisions and partial manifestations.

4
मूळ

जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥4॥

मराठी अर्थ

देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे दोंद वाढले आहे आणि वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God who are firm! You have a big belly because you have drunk all the fickleness of the minds of devotees. You have a great liking for creating the world and playing joyfully in it.

5
मूळ

जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥5॥

मराठी अर्थ

देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे निरसन करणारे आहा व सर्व जगाला कारणीभूत आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God without any parts, homogeneous one! You inspire in everybody the fountain of great joy. You discard all the dirt and blemishes and are the root support of the universe.

6
मूळ

जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥6॥

मराठी अर्थ

हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहा; तसेच जगद्रूप मेघांचे धारण करणारे आकाशच आहा; तसेच जगद्रूप उत्त्पतीचे मूळस्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the self luminant God! You are the sky supporting the clouds of this world. You are the main pillar of the beginning of this world and you are the destroyer of (bondage of) the worldly life.

7
मूळ

जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ॥7॥

मराठी अर्थ

हे देवा ! उपाधिरहित आहा व अविद्यारुपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहा आणि शमदमेकरून काममदाचा नाश करणारे व दयेचा समुद्रच आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the purest God! You are the destroyer of not only the ignorance but the elephant who destroys the gardens of proud intellectuals also. You are the destroyer of the cupid's influence by the weapons of self-control of thoughts and actions. You are the sea of compassion!

8
मूळ

जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥8॥

मराठी अर्थ

हे देवा ! तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहा व भाविक भक्तांचे चित्तरुपी मंदिरातील दीप आहा आणि संसारतापाचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God of only one form as God alone! You are the one who overpowers the sullenness of the serpent of carnal desire! You are the lamp giving light in the homes of faithful devotees. You are the remover of all types of troubles.

9
मूळ

जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥9॥

मराठी अर्थ

हे देवा ! तुमची असून तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहा; व भजभक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस अगम्य आहा, तुमचा जयजयकार असो. ॥

English meaning

Victory to you, the God without a second! You are extremely liked by those who have attained complete peace. You are subservient to your devotees! You are the right deity to be worshipped, but you are not reachable by the great Maya.

10
मूळ

जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥10॥

मराठी अर्थ

हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्ष आहा व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान, आहा, तुमचा जयजयकार असो ॥

English meaning

Victory to you, the God who are my Guru! You are the wish tree who gives that fruit about which no imagination can be ventured. You are the rich field in which the seed of the tree of self knowledge is sown and it produces energetic sprouts!

11
मूळ

हे काय एकैक ऐसैसे । नानापरीभाषावशे । स्तोत्र करू तुजोद्देशे । निर्विशेषा ॥11॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्यायांनी विशेषणे देण्यास योग्य नाही, असे जे सर्वविशेष भावरहित तुम्ही. त्या तुमची स्तुती किती काय ? ॥

English meaning

But how much can I with great effort use various words to praise you, when your particular characteristics cannot be understood by mind or spoken by tongue?

12
मूळ

जिही विशेषणी विशेषिजे । ते दृश्य नव्हे रूप तुझे । हे जाणे मी म्हणौनि लाजे । वानणा इही ॥12॥

मराठी अर्थ

ज्या विशेषणाने तुमची स्तुती करावी, ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे, हे मी जाणतो, म्हणून तुमच्या ह्या वर्णाची लाज वाटते. ॥

English meaning

When I realize that you are not really of that nature to describe which I try to use particular adjectives, I become shy to describe you in anyway.

13
मूळ

परी मर्यादेचा सागरु । हा तवचि तया डगरु । जव न देखे सुधाकरु । उदया आला ॥13॥

मराठी अर्थ

परंतु समुद्राला, मर्यादा आहे, असा जो ज्याचा लौकिक आहे तो जो पर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. ॥

English meaning

But the fame of the sea that it always remains within its boundaries is true so long as the Moon does not arise.

14
मूळ

सोमकांतु निजनिर्झरी । चंद्रा अर्घ्यादिक न करी । ते तोचि अवधारी । करवी की जी ॥14॥

मराठी अर्थ

सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्घ्य देत नाही. तर चंद्रच त्याच्याकडून करवितो. ॥

English meaning

The Somakant-stone does not offer water of its own to the Moon, but it is the Moon, who liquefies the stone, and makes it do the same.

15
मूळ

नेणो कैसी वसंतसंगे । अवचितिया वृक्षाची अंगे । फुटती तै हे तयाहि जोगे । धरणे नोहे ? ॥15॥

मराठी अर्थ

वसंत ऋतू सुरु झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते, हे समजत नाही, त्या प्रमाणे माझी हि स्थिती झाली असे का समजू नये ? ॥

English meaning

When the spring season appears, all the trees suddenly have new leaves, which even the trees themselves do not understand.

16
मूळ

पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजे कवण ? । का जळे शिवतले लवण । आंग भुले ॥16॥

मराठी अर्थ

सूर्यविकासिनी कमल सूर्यकिरण पडताक्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लीत होतो, किंवा मीठ पाण्यात घातल्यावर तद्रूप होते. ॥

English meaning

When the lotus-flower is touched by the rays of the Sun, its state of closed-petals does not remain so, even for a moment. Similarly salt forgets its body as soon as it comes into contact with water.

17
मूळ

तैसा तूते जेथ मी स्मरे । तेथ मीपण मी विसरे । मग जाकळिला ढेकरे । तृप्तु जैसा ॥17॥

मराठी अर्थ

तसा जेंव्हा मी तुमचे स्मरण करतो, तेंव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य इच्छेवाचून जसा ढेकारावर ढेकर देतो. ॥

English meaning

Similarly, O the respected Guru, when I remember you, I forget myself, and just as a man, who has been fully dined and satisfied is having fits of belching,

18
मूळ

मज तुवा जी केले तैसे । माझे मीपण दवडूनि देशे । स्तुतिमिषेच पा पिसे । बांधले वाचे ॥18॥

मराठी अर्थ

तसे, हे श्रीगुरुराया माझ्या मीपणात देशांतराला दडवून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या रूपाने माझ्या वाचेला वेड लावले आहे, अशी माझी स्थिती केली. ॥

English meaning

Similarly you have rendered my state like that only. My ego has been banished by you, and you have made my speech crazy of praising you.

19
मूळ

ना येऱ्हवी तरी आठवी । राहोनि स्तुति जै करावी । तै गुणागुणिया धरावी । सरोभरी की ॥19॥

मराठी अर्थ

किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी, तर तुमचे गुण व तुम्ही याची निवड केली पाहिजे. ॥

English meaning

Now if at all I want to praise you by keeping my identity separate, duality between the person who has virtues, and the virtues themselves is to be maintained.

20
मूळ

तरी तू जी एकरसाचे लिंग । केवी करू गुणागुणी विभाग । मोती फोडोनि सांधिता चांग । की तैसेचि भले ॥20॥

मराठी अर्थ

तर हे प्रभो, तुम्ही एक रसाचेच बनलेले लिंग आहा, त्या आपले ठिकाणी गुणागुणी विभाग कसा करू ? हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते मूळचे अखंड असलेले चांगले नव्हे काय ?. ॥

English meaning

But you are the image of one total unbroken bliss of Brahman. Then how can there be the duality in you as the person and his virtues? Further, is it right to do this bifurcation? Is it not proper to keep the pearl as it is than first to break it and then to join its pieces together?

21
मूळ

आणि बाप तू माय । इही बोली ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथे ॥21॥

मराठी अर्थ

आणि तुम्ही मायबापा आहा असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकुरपणाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागतो. ॥

English meaning

Similarly it is not right to praise you, imagining you to be my mother and father, because in it, there is the fault of conceiving the attachment of the child in you.

22
मूळ

जी जालेनि पाइके आले । ते गोसावीपण केवी बोले ? । ऐसे उपाधी उशिटले । काय वर्णू ॥22॥

मराठी अर्थ

मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी म्हणून कसे म्हणून अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय वर्णन करू ?. ॥

English meaning

Sir, if I imagine that I am your servant you become automatically my master. Is it right to praise you with such appendages like these?

23
मूळ

जरी आत्मा तू एकसरा । हेही म्हणता दातारा । तरी आंतुल तू बाहेरा । घापतासी ॥23॥

मराठी अर्थ

हे प्रभु तुम्ही जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणार्‍या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते. ॥

English meaning

If I say that you are Atman, then it implies that you are outside me, whom I am describing.

24
मूळ

म्हणौनि सत्यचि तुजलागी । स्तुति न देखो जी जगी । मौनावाचूनि लेणे आंगी । सुसीना मा ॥24॥

मराठी अर्थ

म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढविता येत नाहीत. ॥

English meaning

Therefore, I do not find it easy in any way to praise you in the worldly terms. O God! Nothing but silence can be an ornament that can be tolerated by you.

25
मूळ

स्तुति काही न बोलणे । पूजा काही न करणे । सन्निधी काही न होणे । तुझ्या ठायी ॥25॥

मराठी अर्थ

तर काही न बोलणे हीच आपली स्तुती काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न होणे या गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. ॥

English meaning

To praise you is not to speak anything, to worship you is not to do anything and to be near you is not to remain a separate being but to merge into you.

26
मूळ

तरी जिंतले जैसे भुली । पिसे आलापु घाली । तैसे वानू ते माऊली । उपसाहावे तुवा ॥26॥

मराठी अर्थ

तर तसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली तुम्ही ते सहन करावे. ॥

English meaning

So, please somehow tolerate whatever I do due to my extreme love for you. That is the only request to you who are my kind mother.

27
मूळ

आता गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदी । सज्जनांच्या ॥27॥

मराठी अर्थ

आता तुम्ही माझ्या वाणी कडून गीतार्थ वाढेल म्हणून जे स्पष्ट होईल अशी मुद्रा (शिक्का) लावा म्हणजे मी सांगितलेला अर्थ या सज्जनांचे सभेत मान्य होईल. ॥

English meaning

Now, please give the hallmark of your blissful approval on the explanation of the meaning of Geeta which I am giving further on, in such a way that the listeners will be pleased.

28
मूळ

तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती । नको हे पुढतपुढती । परीसी लोहा घृष्टी किती । वेळवेळा कीजे गा ॥28॥

मराठी अर्थ

तेव्हा श्री निवृत्ति महाराज म्हणाले की, “तू अशी वारंवार आमची विनंती करू नको अरे लोखंडाचे सुवर्ण करण्याकरिता परी सावरते लोखंड वरचेवर का घालावे लागते” ॥

English meaning

Upon this, Shri Nivrutti said- "Enough! Enough! Is it necessary to say these things again and again? How many times is Parees stone required to be rubbed on the piece of iron?"

29
मूळ

तव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो का जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आता ॥29॥

मराठी अर्थ

तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद व्हावा की, मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. ॥

English meaning

Then Dnyandeva requested- "This is in itself your blessing; is it not? So, I humbly request that attention may please be paid to the speech on this great Treatise further."

30
मूळ

जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊ जो ॥30॥

मराठी अर्थ

गीताग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे, तो असा की, ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. ॥

English meaning

This is really the top dome made of Chintamani gems built on the temple of Geeta which itself is studded with jewels, and being full of meaning, this is going to illuminate the hidden significance of Geeta.

31
मूळ

लोकी तरी आथी ऐसे । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥31॥

मराठी अर्थ

जगात रूढीही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचे फळ प्राप्त होते. ॥

English meaning

In everyday life, we can see the dome of a temple from a distance also, and when we see it, it is equal to have seen and met the deity in that temple.

32
मूळ

तैसेचि एथ ही आहे । जे एकेचि येणे अध्याये । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥32॥

मराठी अर्थ

तसाच येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीता शास्त्रच वाचल्याचे श्रेय येते ॥

English meaning

Same is the case here; because by this one chapter the whole meaning of Geeta comes within the view of our inward eye.

33
मूळ

मी कळसु याचि कारणे । अठरावा अध्यायो म्हणे । उवाइला बादरायणे । गीताप्रासादा ॥33॥

मराठी अर्थ

याच कारणास्तव मी या अठराव्या अध्यायास कशाची कळसाची उपमा दिली आहे कारण जो कळस वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे, ॥

English meaning

That is why I say that Badarayana Vyasa has raised this chapter as a peak, or a top dome of the temple of Geeta.

34
मूळ

नोहे कळसापरते काही । प्रासादी काम नाही । ते सांगतसे गीता ही । संपलेपणे ॥34॥

मराठी अर्थ

देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही तसेच हा अठरावा अध्याय गीता संपविली असे दर्शवितो. ॥

English meaning

And, by looking at the end-verses of this chapter, it is also evident that after the building of the dome, no more construction remains to be built.

35
मूळ

व्यासु सहजे सूत्री बळी । तेणे निगमरत्नाचळी । उपनिषदार्थाची माळी- । माजी खांडिली ॥35॥

मराठी अर्थ

व्यास हे स्वभावताच श्रेष्ठ त्यांनी मोठ्या कुशलतेने सूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थाच्या माळ जमिनीत खणती केली. ॥

English meaning

The sage Vyasa, a great skillful architect, excavated a quarry in the rocky plateau in the form of Upanishads, on the mountain of gems which is the Vedas.

36
मूळ

तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोवता केला ॥36॥

मराठी अर्थ

त्या माळ जमिनीत धर्म, अर्थ व काम एतदृपी भिन्नभिन्न आकाराचे पुष्कळ गडगळ गोटे निघाले, त्या धोंड्यांचा महाभारतरुपी देवालयाचे भोवती तट बांधला. ॥

English meaning

Then he built a fortification of Mahabharata with all the mateial of the three objects of ordinary human life which are religion, riches and desires, around that rocky plateau.

37
मूळ

माजी आत्मज्ञानाचे एकवट । दळवाडे झाडूनि चोखट । घडिले पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ॥37॥

मराठी अर्थ

नंतर आत्मज्ञानरुपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. ॥

English meaning

In the form of the dialogue between the Lord Shrikrishna and Arjuna, he then cleaned the structure and the place which represents the pure self-knowledge.

38
मूळ

निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥38॥

मराठी अर्थ

मग निवृत्तीरूपी दोरीने आणखी करून सर्व शास्त्राची पुरणी घालून मोक्षमार्यादेचा आकार साधाला. ॥

English meaning

Then, releasing and stretching the rope of asceticism, with the help of all scriptures, he made a survey and took measurements and drew boundaries and the layout of liberation, for the temple.

39
मूळ

ऐसेनि करिता उभारा । पंधरा अध्यायात पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥39॥

मराठी अर्थ

याप्रमाणे देवालयाची रचना करीता करीता पंधरा अध्यायापर्यंत पंधरा थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येवून ठेपल्या. ॥

English meaning

Then upto the completion of the first fifteen chapters, the main structure of the temple was built, consisting of fifteen storeys.

40
मूळ

उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥40॥

मराठी अर्थ

पुढे सोळावा अध्याय हा गळमण्याचा आकार असून. सतरावा अध्याय पडघानी कळसाची बैठक होय. ॥

English meaning

The sixteenth chapter provided hold for the bell, and the seventeenth chapter being the base for the dome was constructed.

41
मूळ

तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकी व्यासु । ध्वजे लागला ॥41॥

मराठी अर्थ

त्यात पडघाणीवर अठरावा अध्यायरुपी सहजच कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला आहे ॥

English meaning

Then this eighteenth chapter was constructed as the top dome on that base over which pinnacle Vyasa hoisted the flag of Geeta.

42
मूळ

म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचे पुरे दाविताहे । आपुल्या आंगी ॥42॥

मराठी अर्थ

म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांचे आपल्या योगाने पूर्णता झाली, हे हा अठरावा अध्याय दाखवतो ॥

English meaning

Thus the earlier chapters are the storeys raised gradually and the present chapter shows us the completed temple of Geeta.

43
मूळ

जालया कामा नाही चोरी । ते कळसे होय उजरी । तेवी अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥43॥

मराठी अर्थ

कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, तसे अठराव्या अध्यायात साद्यंतगीतेचे वर्णन आहे ॥

English meaning

The dome functions as a sign to declare that the work is completed and it does not hide it. Thus this eighteenth chapter declares that by this, Geeta is completed.

44
मूळ

ऐसा व्यासे विंदाणिये । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥44॥

मराठी अर्थ

याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नानाप्रकारे उद्धार केला ॥

English meaning

Thus the sage Vyasa has brought this temple of Geeta to completion and has saved many souls in many ways.

45
मूळ

एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषे छाया । सेविती ययाची ॥45॥

मराठी अर्थ

कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करितात, (गीतेचा पाठ करितात) कोण श्रवणरूप छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात ॥

English meaning

For example, some take rounds of this temple by way of repeating the name of God and some love to listen to it and sit in its shade.

46
मूळ

एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरा । घेऊनि रिघती गाभारा । अर्थज्ञानाच्या ॥46॥

मराठी अर्थ

कोणी अवधानरुपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थ ज्ञानरूपी गाभार्‍यात शिरतात ॥

English meaning

Some enter the shrine room of the meaning of Geeta, taking with them the betel-leaf and coins to be offered, in the form of concentration of attention, to the God.

47
मूळ

ते निजबोधे उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादी सरी । सर्वाही आथी ॥47॥

मराठी अर्थ

ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात; परंतु मोक्षरुपी देवालयात सर्वाची योग्यता सारखीच आहे ॥

English meaning

These souls of the third type described above, merge into Shri Hari as Atman; but all the devotees can enter into this temple of liberation.

48
मूळ

समर्थाचिये पंक्तिभोजने । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्ने । तेवी श्रवणे अर्थे पठणे । मोक्षुचि लाभे ॥48॥

मराठी अर्थ

समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंगतीत वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने असतात (पंक्तीभेद नसतो) त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास, व पठण करणारास, मोक्ष प्राप्त होतो ॥

English meaning

Just as in a dinner party of rich people, diners sitting in a lower row and those sitting in a higher row are served with the same kind of food, similarly, for those who only listen to Geeta, those who consider and understand its meaning and those who deeply meditate upon it are all going to attain the final liberation.

49
मूळ

ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्या म्हणितला हा भेदु । जाणोनिया ॥49॥

मराठी अर्थ

असो; गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून अठरावा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे, असा भेद मी जाणूनबुजून केला ॥

English meaning

So, Geeta is the temple of Vaishnavas, and this eighteenth chapter is its highest dome. I have made this statement after taking into consideration the whole significance.

50
मूळ

आता सप्तदशापाठी । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥50॥

मराठी अर्थ

आता सतराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो ॥

English meaning

Now I shall tell you how the occasion arose for the beginning of this chapter after the seventeenth, as it seems to my mind's eye.

51
मूळ

का गंगायमुना उदक । वोघबगे वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणे ॥51॥

मराठी अर्थ

प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले, तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. ॥

English meaning

Now, the water of the rivers Ganges and Yamuna is 'water' only but when we look at the streams, it appears separate in either stream.

52
मूळ

न मोडिता दोन्ही आकार । घडिले एक शरीर । हे अर्धनारी नटेश्वर- । रूपी दिसे ॥52॥

मराठी अर्थ

अर्धनारीनटेश्वराचे रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते ॥

English meaning

Or, if we see the image of joint male-female Gods, though male and female bodies and attires are different, the image appears as one body.

53
मूळ

नाना वाढिली दिवसे । कळा बिंबी पैसे । परी सिनाने लेवे जैसे । चंद्री नाही ॥53॥

मराठी अर्थ

शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे. त्याच्यावर निराळे थर नाहीत ॥

English meaning

Or, no doubt, the phases of the Moon go on increasing and the Moon seems to be bigger everyday but we do not see additional layers of these phases on the surface of the moon.

54
मूळ

तैसी सिनानी चारी पदे । श्लोक तो श्लोकावच्छेदे । अध्यावो अध्यायभेदे । गमे कीर ॥54॥

मराठी अर्थ

तसेच श्लोक चार जणांनी वेगळे वेगळे दिसतात व अध्याय अध्याय यामुळे वेगळे भासतात खरे; ॥

English meaning

Similarly, when we see verses, they appear separate, each having four lines, and by the numbering given to the chapters, they also are seen as separate chapters.

55
मूळ

परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणी दोरी । एकचि जैसी ॥55॥

मराठी अर्थ

परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते ॥

English meaning

But the subject of this treatise, intended to be taught is not separate. They are as if various beads sewn together by one thread.

56
मूळ

मोतिये मिळोनि बहुवे । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥56॥

मराठी अर्थ

पुष्कळ मोती मिळून एकावळीची माळ तयार होते, परंतु सर्वाशी कांती एकच असते ॥

English meaning

Many pearls are put in a neck-lace and we see one single form thereof.

57
मूळ

फुलांफुलसरा लेख चढे । द्रुती दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणे पाडे । जाणावे हे ॥57॥

मराठी अर्थ

माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते; परंतु त्याचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरीता दुसरे बोट घालावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे ॥

English meaning

The flowers and the garlands of flowers are separate but if we try to count their smell, we have not to count two by using another finger. The unity in diversity of these verses and the chapters should be considered similar to the above examples.

58
मूळ

सात शते श्लोक । अध्याया अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जे दुजे नाही ॥58॥

मराठी अर्थ

गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा आहेत, परंतु देवाने या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे. दुसरे काही वर्णन केले नाही ॥

English meaning

Geeta has seven hundred verses grouped into eighteen chapters. That is the numerical count, but the theme on which the Lord Shrikrishna dwells is one throughout.

59
मूळ

आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणे निर्वाहे । निरूपण आइका ॥59॥

मराठी अर्थ

आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथांचे स्पष्टीकरण केले आहे, तूर्त या समजुतीने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका. ॥

English meaning

And I have also made the meaning of the whole work clear, keeping in mind this fact. I will explain. Please listen.

60
मूळ

तरी सतरावा अध्यावो । पावता पुरता ठावो । जे संपता श्लोकी देवो । बोलिले ऐसे ॥60॥

मराठी अर्थ

तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ॥

English meaning

In the last verse of the seventeenth chapter, the Lord has said that -

61
मूळ

अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं । बुद्धि सांडूनि आस्तिकी । कर्मे कीजती तितुकी । असंते होती ॥61॥

मराठी अर्थ

अर्जुना ब्रम्हनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत ॥

English meaning

"O Arjuna, whatever actions are performed without having faith in the name of Brahman which is OM TAT SAT, are all untrue."

62
मूळ

हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठा मळु । ठेविला देखो ॥62॥

मराठी अर्थ

असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की, देवानी कर्मावर श्रद्धा ठेवणारास दोष ठेवला आहे. ॥

English meaning

Listening to this statement of the Lord, a thought peeped into the mind of Arjuna that "It seems, the Lord is finding fault with the men performing various actions."

63
मूळ

तो अज्ञानांधु तव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढा । का सुझे तया ॥63॥

मराठी अर्थ

तो बिचारा ज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे, हे त्यास समजले नाही; मग तो प्रत्यक्ष त्याच्यापुढे असूनही ब्रह्मनामश्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल ? ॥

English meaning

"But", he thought, "The doer, the Jeeva, the poor soul is blind by his ignorance. He does not know the nature of God at all. How can he go further and find out the truth about this Name?

64
मूळ

आणि रजतमे दोन्ही । गेलियावीण श्रद्धा सानी । ते का लागे अभिधानी । ब्रह्माचिये ? ॥64॥

मराठी अर्थ

रज व तम दोन्ही गुणांच्या नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते, ती ब्रम्हाच्या ब्रम्हश्रद्धेच्यानावासकशी पात्र होईल ? ॥

English meaning

Further, so long as the Rajas and Tamas in his character are not gone, his faith is bound to be of a lesser quality. How can that faith be able to grasp the importance of the sacred Name of Brahman?

65
मूळ

मग कोता खेंव देणे । वार्तेवरील धावणे । सांडी पडे खेळणे । नागिणीचे ते ॥65॥

मराठी अर्थ

मग, शस्त्राला आलिंगन देणे अथवा दोरीवर धावत सुटणे व नागिणीला हातात धरुण खेळणे. या गोष्टी जशा मरणास कारण होतात. ॥

English meaning

So, just as it is deadly to embrace a sword or to run on a stretched rope or to play with a serpent,

66
मूळ

तैसी कर्मे दुवाडे । तया जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजी ॥66॥

मराठी अर्थ

तशी कर्मे कठीण असून ती जन्ममरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. ॥

English meaning

Similarly, all these actions are very dangerous and many calamities like continuous chain of births and deaths are lurking in them.

67
मूळ

ना विपाये हे उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवी येणेचि जाये । निरयालया ॥67॥

मराठी अर्थ

कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्याना ज्ञानाची योग्यता येते व ते कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्ति कारण होते ॥

English meaning

If luckily action is done rightly, knowledge can be gained; otherwise the very action would be leading a man downwards.

68
मूळ

कर्मी हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आता कर्मठा कै वारी । मोक्षाची हे ॥68॥

मराठी अर्थ

आजवर कर्म करण्यामध्ये पुष्कळ काळ घालविला पण त्यापासून मोक्ष मिळाला नाही, आता यापुढे कर्मठांना मोक्षाची पाळी केव्हा येणार ? ॥

English meaning

There are many disturbances while any action is being completed according to standards. Then how can persons performing actions have a chance to attain liberation?

69
मूळ

तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥69॥

मराठी अर्थ

तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसंन्यास त्याचा आदर करावा ॥

English meaning

Therefore, this bondage of performance of action should be cut, all actions should be given up and Sanyasa which is having no such defects should be followed.

70
मूळ

कर्मबाधेची कही । जेथ भयाची गोठी नाही । ते आत्मज्ञान जिही । स्वाधीन होय ॥70॥

मराठी अर्थ

ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते ॥

English meaning

The two things in which there is no fear of bad effect of action and by which one attains self knowledge,

71
मूळ

ज्ञानाचे आवाहनमंत्र । जे ज्ञान पिकते सुक्षेत्र । ज्ञान आकर्षिते सूत्र । तंतु जे का ॥71॥

मराठी अर्थ

व जो कर्मसंन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र, अथवा ज्ञान पिकवण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत, ॥

English meaning

Those two which are like Mantras invoking knowledge or like fertile gardens giving the crop of knowledge; or like threads which are capable of pulling the knowledge nearer to us;

72
मूळ

ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेचि आता चांग । व्यक्त पुसो ॥72॥

मराठी अर्थ

ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त होवो, तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे ॥

English meaning

Are 'Sanyasa' and 'Tyaga'. When we accept these two, all relations with the world are snapped. Therefore, it is better to ask the Lord to explain the nature of Sanyasa and Tyaga. (Renunciation, and abandoning everything).

73
मूळ

ऐसे म्हणौनि पार्थे । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथे । प्रश्नु केला ॥73॥

मराठी अर्थ

असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला ॥

English meaning

Planning like this in his mind, when Arjuna asked the Lord about the nature of these two, namely the renunciation and abandoning, the Lord answered him, which is contained in this eighteenth chapter.

74
मूळ

तेथ प्रत्युत्तरे बोली । श्रीकृष्णे जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥74॥

मराठी अर्थ

तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय व्यक्त झाला ॥

English meaning

Planning like this in his mind, when Arjuna asked the Lord about the nature of these two, namely the renunciation and abandoning, the Lord answered him, which is contained in this eighteenth chapter.

75
मूळ

एवं जन्यजनकभावे । अध्यावो अध्यायाते प्रसवे । आता ऐका बरवे । पुसिले जे ॥75॥

मराठी अर्थ

याप्रमाणे कार्यकारणभावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो, आता अर्जुनाने काय प्रश्न केला, तो ऐका ॥

English meaning

Thus in this Geeta, one chapter comes out of another chapter as a natural offspring. Now please listen to what Arjuna asked.

76
मूळ

तरी पंडुकुमरे तेणे । देवाचे सरते बोलणे । जाणोनि अंतःकरणे । काणी घेतली ॥76॥

मराठी अर्थ

सतराव्या अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली ॥

English meaning

The son of Pandu listened with full attention, to what the Lord last said and understood it.

77
मूळ

येऱ्हवी तत्वविषयी भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । ते साहावेना ॥77॥

मराठी अर्थ

एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्ण समजले होते परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना ॥

English meaning

Really speaking, he was quite convinced about the main doctrine, but his loving heart could not accept the possible stoppage of speech by the Lord.

78
मूळ

वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥78॥

मराठी अर्थ

वासराचे पोट भरल्यावरहि गायीने त्याचेपासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे ॥

English meaning

Even if the calf is satisfied, it wants the cow not to go away. Intimate one-pointed love is always like this.

79
मूळ

तेणे काजेवीणही बोलावे । ते देखीले तरी पाहावे । भोगिता चाड दुणावे । पढियंतयाठायी ॥79॥

मराठी अर्थ

आपल्या जो मनुष्य परम प्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्याकडे पाहिल्यावरही आपल्याकडेच पाहत राहावे असे प्रीतीचे लक्षण आहे. ॥

English meaning

That love speaks without reason. It wants to see again what it has once seen and by experiencing love of the beloved, it is increased further and further.

80
मूळ

ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तव तेचि मूर्ती । म्हणौनि करू लाहे खंती । उगेपणाची ॥80॥

मराठी अर्थ

अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे, म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले ॥

English meaning

Such is the nature of love and Partha was the very image of such love, and therefore, he became uneasy with the thought that the Lord might stop speaking.

81
मूळ

आणि संवादाचेनि मिषे । जे अव्यवहारी वस्तु असे । ते भोगिजे की जैसे । आरिसा रूप ॥81॥

मराठी अर्थ

आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ‘ब्रह्म ” ते आरश्यात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगिता येते ॥

English meaning

Through dialogue, Arjuna was experiencing that thing which is not possible in practical life, just as we see our own face only in the mirror.

82
मूळ

मग संवादु तोही पारुखे । तरी भोगिता भोगणे थोके । हे का साहवेल सुखे । लांचावलेया ? ॥82॥

मराठी अर्थ

मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती बंद होते ही गोष्ट सुखप्राप्तीला (सवकलेल्या) सकवलेल्या अर्जुनाला कशी सहन होईल ॥

English meaning

But that happiness was about to be stopped if dialogue ceased. How can Arjuna, who was now addicted to that happiness, tolerate that thing?

83
मूळ

यालागी त्याग संन्यास । पुसावयाचे घेऊनि मिस । मग उपलविले दुस । गीतेचे ते ॥83॥

मराठी अर्थ

म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन: घडी उकलली. ॥

English meaning

Therefore, under the pretext of asking about 'renunciation' and 'abandoning', he caused the fold of the cloth of Geeta to be reopened.

84
मूळ

अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जै वांसरुचि गाय दुहे । तै वेळु कायसा ॥84॥

मराठी अर्थ

तर हा अठरावा अध्याय नसून एकाध्यायी गीताच आहे. पहा कि जेंव्हा वासरुंच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळअवेळ याचा गाईस विचार असतो काय.

English meaning

Sirs, this eighteenth chapter is not merely a chapter, but the whole Geeta brought into a summary form. When the calf wants to drink milk, how can the cow wait for long to give it?

85
मूळ

तैसी संपता अवसरी । गीता आदरविली माघारी । स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥85॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे गीता संपण्याचे वेळी पुन्हा: गीतेच्या पूर्वपदावर अर्जुन आला तेंव्हा सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत ? ॥

English meaning

Similarly, Arjuna turned his attention back to the Geeta, when it was about to come to an end. Anyway, does the owner not give what his servant really wants?

86
मूळ

परी हे असो ऐसे । अर्जुने पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशे । अवधारिजो ॥86॥

मराठी अर्थ

परंतु ही गोष्ट राहु द्या; अर्जुनाने कृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतानी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे.

English meaning

But enough with this justification! Arjuna is asking- "O, the Lord of the world! Please listen to my request."

87
मूळ

हा जी संन्यासु आणि त्यागु । इया दोही एक अर्थी लागु । जैसा सांघातु आणि संघु । संघातेचि बोलिजे ॥87॥

मराठी अर्थ

हे प्रभो संन्यास आणि त्याग या दोहोंचा एकाच अर्थाशी संबंध आहे जसा ‘संघात ” आणि ‘संघ ” या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करितात ॥

English meaning

Arjuna said, "My Lord, both Sanyasa and Tyaga are having the same meaning, just as Sanghata and Sangha have the same meaning as a "group."

88
मूळ

तैसेचि त्यागे आणि संन्यासे । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेनि तव मानसे । जाणिजे हेचि ॥88॥

मराठी अर्थ

तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो आमच्या मनाला तरी असे वाटते ॥

English meaning

Similarly as far as I think, both the words Sanyasa and Tyaga mean 'Tyaga' only;

89
मूळ

ना काही आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु । तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पै ॥89॥

मराठी अर्थ

मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करून सांगावा “तेव्हा” श्री मुकुंद म्हणाले अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत ॥

English meaning

But if there is any difference, the Lord may kindly explain it.'' The Lord said - "They are different."

90
मूळ

तरी अर्जुना तुझ्या मनी । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमले हे मानी । मीही साच ॥90॥

मराठी अर्थ

तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत असे जे तुझ्या मनाला वाटले, ते बरोबर आहे असे मी म्हणतो, ॥

English meaning

Even then, O Arjuna, I quite understand that they appeared to you to be the same.

91
मूळ

इही दोही कीर शब्दी । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदी । येतुलेचि ॥91॥

मराठी अर्थ

खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो, हे खरे आहे, पण त्यांच्या अर्थांमध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की, ॥

English meaning

No doubt, both the words mean the same thing as "giving up", but there is only slight difference, which is-

92
मूळ

जे निपटूनि कर्म सांडिजे । ते सांडणे संन्यासु म्हणिजे । आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥92॥

मराठी अर्थ

जे सर्वथैव कर्म सोडणे, त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना, कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल ह्यांचा त्याग करणे, त्याला त्यागा असे म्हणतात, ॥

English meaning

Sanyasa means totally to give up all action and Tyaga means only to give up the desire for the result of action.

93
मूळ

तरी कोणा कर्माचे फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेही सांगो विवळ । चित्त दे पा ॥93॥

मराठी अर्थ

तर कोणत्या कर्माचे फळ टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे, हेही स्पष्ट करून सांगतो, ते चित्त देऊन ऐक,

English meaning

Now I will tell you which action should be totally given up and of which action only the fruit should be given up. Please give attention to it.

94
मूळ

तरी आपैसी दांगे डोंगर । झाडे डाळती अपार । तैसे लांबे राजागर । नुठिती ते ॥94॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे अरण्यात डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याप्रमाणे लांबीचे भात, व बागेतील झाडे, आपोआप उगवत नाहीत.

English meaning

On a mountain, all types of trees grow at random, but the plants in a garden or paddy do not grow without sowing.

95
मूळ

न पेरिता सैंघ तृणे । उठती तैसे साळीचे होणे । नाही गा राबाउणे । जियापरी ॥95॥

मराठी अर्थ

पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते तसेच शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पिक होत नाही ॥

English meaning

Grasses of many varieties grow without sowing, but unless proper cultivation is made, we do not get the rice crop.

96
मूळ

का अंग जाहले सहजे । परी लेणे उद्यमे कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवी ॥96॥

मराठी अर्थ

अथवा शरीर जरी सहज झालेले आहे, तरी दागिने उद्योग करूनच करावी लागतात, किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते, पण विहीर खणावी लागते ॥

English meaning

Our body is natural, but an ornament is to be prepared. River is a natural source of water, but wells are required to be dug.

97
मूळ

तैसे नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामिता कामिक । न निफजे जे ॥97॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे, परंतु काम्यकर्मे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही ॥

English meaning

Similarly, the regular and occasional actions are taking place in their natural course, but if we do not have desire for their fruit, then these actions are not binding. -

98
मूळ

का कामनेचेनि दळवाडे । जे उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥98॥

मराठी अर्थ

किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे यथासांग अश्वमेधादी याग ॥

English meaning

Such actions like sacrifices of horse, etc., which are performed with the enhanced ambitious desire,

99
मूळ

वापी कूप आराम । अग्रहारे हन महाग्राम । आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥99॥

मराठी अर्थ

पुष्करणी, विहिरी, इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे, व एखादी ठिकाणी शहर बसविणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते ॥

English meaning

And digging of wells, giving in charity a piece of land or the whole village; to grow gardens for public utility, and various penances done with pride,

100
मूळ

ऐसे इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जे केले भोगवी फळ । बांधोनिया ॥100॥

मराठी अर्थ

असे सर्व इष्टापुर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि त्याचे आचरण केले असता ते करणारास बद्ध करून फळ भोगण्यास लावते ॥

English meaning

And other such actions, which are undertaken for social utilities, and desire is at their root, become binding, and compel the doer to reap their fruits.

101
मूळ

देहाचिया गावा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणो नये धनंजया । जियापरी ॥101॥

मराठी अर्थ

अर्जुना, देहरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ॥

English meaning

O Dhananjaya, when we have come to the town of this body, we cannot say 'no' to the happenings of birth and death.

102
मूळ

का ललाटीचे लिहिले । न मोडे गा काही केले । काळेगोरेपण धुतले । फिटो नेणे ॥102॥

मराठी अर्थ

किंवा नशिबात लिहिलेली काही टळत नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. ॥

English meaning

Or what is written as destiny on the forehead, cannot be avoided or our texture of the skin, either dark or fair, cannot be washed clean.

103
मूळ

केले काम्य कर्म तैसे । फळ भोगावया धरणे बैसे । न फेडिता ऋण जैसे । वोसंडीना ॥103॥

मराठी अर्थ

तसे काम्यकर्मे केले असता, ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही, त्याप्रमाणे ते फळ भोगाविण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते ! ॥

English meaning

Just as we cannot escape repayment of a loan, similarly when action is done with a desire, it comes back at our door and waits to be retributed by the fruit.

104
मूळ

का कामनाही न करिता । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडे न झुंजता । लागे जैसे ॥104॥

मराठी अर्थ

अथवा अर्जुना इच्छा न करिता काम्यकर्म अकस्मात घडले तरी, केवळ करमणुकीकरिता वाय बाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थली लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही, ॥

English meaning

O the son of Pandu, just as while playing with toy-arrows, if any arrow hits us, it definitely kills us; similarly, even if action with desire happens unintentionally,

105
मूळ

गूळ नेणता तोंडी । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥105॥

मराठी अर्थ

गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी तो गोडच लागतो किंवा अग्नीस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच. ॥

English meaning

Just like jaggery is sweet, even if we put it in our mouth without knowing it or thinking that when there appears in our path only ash, we put a foot upon it and if ember is hidden there, it definitely burns.

106
मूळ

काम्यकर्मी हे एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥106॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, काम्यकर्माचे ठिकाणी फळ भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षूने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. ॥

English meaning

Similarly there is natural power in action done with desires, to give you fruit without mistake and, therefore, the seeker of liberation should not commit such actions even as a fun.

107
मूळ

किंबहुना पार्था ऐसे । जे काम्य कर्म गा असे । ते त्यजिजे विष जैसे । वोकूनिया ॥107॥

मराठी अर्थ

किंबहुना बा पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते, विष पोटात गेले म्हणजे ओकुन टाकतात, तसे टाकून द्यावे ॥

English meaning

O Partha, supposing, by accident, some poison is taken, we vomit it. Similarly such actions should be given up.

108
मूळ

मग तया त्यागाते जगी । संन्यासु ऐसया भंगी । बोलिजे अंतरंगी । सर्वद्रष्टा ॥108॥

मराठी अर्थ

मग ज्याच त्याला जगात संन्यास असे म्हणतात, असे सर्वातर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलिले ॥

English meaning

The all-knowing Lord Shrikrishna further said-" Such giving up is called the real renunciation."

109
मूळ

हे काम्य कर्म सांडणे । ते कामनेतेचि उपडणे । द्रव्यत्यागे दवडणे । भय जैसे ॥109॥

मराठी अर्थ

मग म्हणतात:- ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्ये टाकून दिली म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या काम्यकर्मांचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय ॥

English meaning

He further said, "When we give up money, the danger arising out of it also disappears. Similarly to give up actions which are done with desires is equal to giving up the desires themselves from our mind.

110
मूळ

आणि सोमसूर्यग्रहणे । येऊनि करविती पार्वणे । का मातापितरमरणे । अंकित जे दिवस ॥110॥

मराठी अर्थ

आणि चंद्रग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस, ॥

English meaning

Actions or ceremonies to be performed at the time of the Sun or Moon eclipse or the death anniversaries of parents,

111
मूळ

अथवा अतिथी हन पावे । हे ऐसैसे पडे जै करावे । तै ते कर्म जाणावे । नौमित्तिक गा ॥111॥

मराठी अर्थ

अथवा काकबळी टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता, जी जी कर्मे करावी लागतात ति नैमित्तिक कर्मे होतं ॥

English meaning

Or if a guest comes at the time of dinner, when some food is offered to him, etc. are occasional actions.

112
मूळ

वार्षिया क्षोमे गगन । वसंते दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन- । दशा जैसी ॥112॥

मराठी अर्थ

वर्षाकाळी जसे आकाश भरून येवून मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते, अथवा शरीराला यौवनदशा शोभा आणते. ॥

English meaning

In rainy season, clouds are accumulated in the sky and they thunder. In spring, gardens have enhanced beauty because the trees have new tender leaves. Youth adds beauty to the body.

113
मूळ

का सोमकांतु सोमे पघळे । सूर्ये फांकती कमळे । एथ असे तेचि पाल्हाळे । आन नये ॥113॥

मराठी अर्थ

किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सुर्यविकाशिनी कमळे प्रफुल्लीत होतात; या ठिकाणी, जे मुळचे असते तेच वाढते, निराळे काही उत्त्पन्न होत नाही. ॥

English meaning

The Somakanta stone oozes by moon-light and lotus-flowers bloom in the Sun. Here whatever is existing becomes enriched, and no new things are added.

114
मूळ

तैसे नित्य जे का कर्म । तेचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणे नाम । नैमित्तिक होय ॥114॥

मराठी अर्थ

त्याच प्रमाणे जे नित्य कर्म आहे, त्यालाच निमिताचे नियम लागले कि, नैमित्तिक हे मोठे नांव त्याला प्राप्त होते. ॥

English meaning

Similarly actions which are of a routine nature become occasional when they are done on particular days under their own rules.

115
मूळ

आणि सायंप्रातर्मध्यान्ही । जे का करणीय प्रतिदिनी । परी दृष्टि जैसी लोचनी । अधिक नोहे ॥115॥

मराठी अर्थ

आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जे कर्म करावे लागतात; परंतु ज्या डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही. ॥

English meaning

When we perform actions in the morning, at noon or in the evening, there is no increase in the quality of our eye-sight, because of that.

116
मूळ

का नापादिता गती । चरणी जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबी ॥116॥

मराठी अर्थ

अथवा गतीचा स्वीकार ती जशी पायात आपोआपच आहे; किंवा दिव्याचे ठिकाणीच जसे त्याचे सहज तेज आहे, ॥

English meaning

The feet may not walk, but there is the quality of movement inherent in them, or the lamp has natural light in its flame.

117
मूळ

वासु नेदिता जैसे । चंदनी सौरभ्य असे । अधिकाराचे तैसे । रूपचि जे ॥117॥

मराठी अर्थ

चंदनास वरून वास लावल्या शिवाय जसा अंगाचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय. ॥

English meaning

The sandalwood is naturally fragrant without applying good smell to it from outside. Similarly the capacity of action is inherent in us.

118
मूळ

नित्य कर्म ऐसे जनी । पार्था बोलिजे ते मानी । एवं नित्य नैमित्तिक दोन्ही । दाविली तुज ॥118॥

मराठी अर्थ

त्या कर्मास पार्था, जगात नित्य कर्म म्हणतात, असे समज. या प्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक हि दोन्ही कर्मे दाखविली. ॥

English meaning

When such is the case, O Partha, it is called action of a routine nature. Thus I have shown you both the routine and occasional actions.

119
मूळ

हेचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणो पाहती एक । वांझ ययाते ॥119॥

मराठी अर्थ

हेच नित्यनैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे. म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. ॥

English meaning

Some people call this action of both types as useless because it is to be done unavoidably.

120
मूळ

परी भोजनी जैसे होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकी आहे । सर्वांगी फळ ॥120॥

मराठी अर्थ

परंतु, भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होवून क्षुधा नष्ट होते, तशी या नित्यनैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फळ प्राप्ती होते. ॥

English meaning

But meals are a regular routine. However, by taking food, there is satisfaction as well as the cessation of hunger. Similarly these actions definitely give results.

121
मूळ

कीड आगिठा पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडे । फळ जाणावे ॥121॥

मराठी अर्थ

ज्या प्रमाणे हिणकस सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फळ प्राप्ती होते. (चित्त शुद्धी होते) ॥

English meaning

Just as by heating, dross burns out and gold becomes purer, similarly, these actions bring about certain results like purification of mind.

122
मूळ

जे प्रत्यवाय तव गळे । स्वाधिकार बहुवे उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥122॥

मराठी अर्थ

कारण, या कर्माच्या आचरणाने दोष नाहीतसे होवून आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. ॥

English meaning

By performance of such actions, the defects in our character drop away, our capacity increases and evolution is easily helped in our life.

123
मूळ

येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकी आहे फळ । परी ते त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसे ॥123॥

मराठी अर्थ

नित्यनैमित्तिक कर्मापासून जरी एव्हढी मोठी फळ प्राप्ती होते, तरी मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलांप्रमाणे, त्याच्या फळाचा त्याग करावा. ॥

English meaning

Though these actions are fruitful, the fruits should be abandoned, just as people sometimes are seen abandoning a child born on "Moola" constellation (on an inauspicious time.)

124
मूळ

लता पिके आघवी । तव च्यूत बांधे पालवी । मग हात न लावित माधवी । सोडूनि घाली ॥124॥

मराठी अर्थ

वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली, तरी जसा तो त्यास हात न लाविता टाकून जातो. ॥

English meaning

For example, though many creepers grow more and mango trees bear new leaves because of spring season, the spring season does not touch anything and goes away when time is over.

125
मूळ

तैसी नोलांडिता कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठी फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥125॥

मराठी अर्थ

तसे नित्यनैमित्तिक कर्मांचे चित्त देवून यथाविधी आचरण कारावे; पण त्यापासून निष्पन्न होण्याऱ्या सर्व फलांचा वांती (उलटी, वमन) प्रमाणे त्याग करवा. ॥

English meaning

Similarly the routine and occasional actions should be performed with due regard to rules and regulations, carefully, but the fruits arising out of them should be dropped like vomit.

126
मूळ

यया कर्म फळत्यागाते । त्यागु म्हणती पै जाणते । एवं त्याग संन्यास तूते । परीसविले ॥126॥

मराठी अर्थ

अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांचे फळांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष ‘त्याग ” असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगतील. ॥

English meaning

The wise people say that to give up the fruits of these routine and occasional actions is the real abandonment or giving up. In this way I have explained to you the difference between Tyaga and Sanyasa.

127
मूळ

हा संन्यासु जै संभवे । तै काम्य बाधू न पावे । निषिद्ध तव स्वभावे । निषेधे गेले ॥127॥

मराठी अर्थ

या प्रमाणे जेंव्हा संन्यास घडतो, तेंव्हा काम्य कार्मापासून बाधा होवू शकत नाही. आणि निषिद्ध कर्म तर निषेधांच्या योगे स्वभावत:च नाहीसे होते; ॥

English meaning

When Sanyasa happens in this way, naturally there is no question of bondage arising out of actions done with desires, and the prohibited action automatically disappears because one does not commit those actions.

128
मूळ

आणि नित्यादिक जे असे । ते येणे फलत्यागे नसे । शिर लोटलिया जैसे । येर आंग ॥128॥

मराठी अर्थ

आणि ज्याप्रमाणे शीर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होवून खाली पडते, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता, त्यापासून बाधा होत नाही.

English meaning

Just as when the head is pushed forward, the body being is also pushed automatically, similarly when the fruits arising out of the routine and the occasional actions are relinquished, they do not affect the man.

129
मूळ

मग सस्य फळपाकांत । तैसे निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसे ये ॥129॥

मराठी अर्थ

मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते, तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होवून शोधीत येते. ॥

English meaning

When just as the grains are ready and ripe, the crop does not grow further, all actions become non-existent and self-knowledge comes searching that man.

130
मूळ

ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानी । पडले गा आत्मज्ञानी । बांधती पाटु ॥130॥

मराठी अर्थ

अश्या युक्तीने नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग व काम्यकर्मांचा संन्यास जे करतात, ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होतात. ॥

English meaning

So, those who give up the fruits of these actions, and renounce selfish actions, deserve self- knowledge.

131
मूळ

नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुके । तै काही न त्यजे अधिके । गोवीचि पडे ॥131॥

मराठी अर्थ

किंवा हि युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील तर, कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. ॥

English meaning

But if making a mistake about this tact, some try to give-up actions, it will create more confusion.

132
मूळ

जे औषध व्याधी अनोळख । ते घेतलिया परते विख । का अन्न न मानिता भूक । मारी ना काय ? ॥132॥

मराठी अर्थ

रोगाची चिकित्सा न करिता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते, अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर मरणार नाही काय ? ॥

English meaning

If a wrong medicine is taken without diagnosis of the disease, it becomes poisonous. Or if a man does not take food, will he not die of hunger?

133
मूळ

म्हणौनि त्याज्य जे नोहे । तेथ त्यागाते न सुवावे । त्याज्यालागी नोहावे । लोभापर ॥133॥

मराठी अर्थ

म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे, तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. ॥

English meaning

Therefore, those actions which are not to be given-up, should not be given up, and those actions which are really to be dropped should not be performed with greed.

134
मूळ

चुकलिया त्यागाचे वेझे । केला सर्वत्यागुही होय वोझे । न देखती सर्वत्र दुजे । वीतराग ते ॥134॥

मराठी अर्थ

त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधांत सापडतो, म्हून वैराग्यसंपन्न जे आहेत, ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करीत नाहीत. ॥

English meaning

If a man misses the above tact of how and what is to be given up, he will be bound by action, even if he avoids doing it. Therefore, those who are really desireless, never commit actions which are rightly to be given up.

135
मूळ

एका फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधके । जैसे आपण नग्न भांडके । जगाते म्हणे ॥135॥

मराठी अर्थ

कित्येकास फालाभिलाषा सोडवत नाही, म्हणून ‘कर्म बंध आहे. ” असे ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो. ॥

English meaning

Some find that they cannot give up their desire for fruit and, therefore, they say that all actions are binding, just like a man who himself is naked, blames all the world as quarrelsome.

136
मूळ

का जिव्हालंपट रोगिया । अन्ने दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासिया कोपे ॥136॥

मराठी अर्थ

किंवा हे धनजंया, जिव्हेचा अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो, आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो, किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागावतो, ॥

English meaning

O Dhananjaya, it is like a man who cannot control his taste for food though he is ill, and blames the food; or a leper is not nauseated by his own rotting limbs but gets irritated at the flies hovering around.

137
मूळ

तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावे ऐसा ॥137॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्मफळत्यागाविषयी अशक्त आहेत म्हणून कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करवा असा सिद्धांत ठरवितात. ॥

English meaning

Similarly those who fall prey to the attraction of fruits of their actions, blame all actions as bad, because they are weak-willed and say that all actions should be given up.

138
मूळ

एक म्हणती यागादिक । करावेचि आवश्यक । जे यावाचूनि शोधक । आन नसे ॥138॥

मराठी अर्थ

कोणी असे म्हणतात कि, यज्त्रयागादी हे अवश्य केलेच पाहिजे, कारण त्यावाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. ॥

English meaning

Some others say that sacrifices etc. should be performed because there is no other action as purifying as these.

139
मूळ

मनशुद्धीच्या मार्गी । जै विजयी व्हावे वेगी । तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ॥139॥

मराठी अर्थ

जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल, तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. ॥

English meaning

They say that if we wish to progress on the path of self-purification, we should not be negligent in the matter of using the weapon of karma or such actions as above.

140
मूळ

भांगार आथी शोधावे । तरी आगी जेवी नुबगावे । का दर्पणालागी सांचावे । अधिक रज ॥140॥

मराठी अर्थ

सोनी शुध्द करावयाचे असेल, तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये, किंवा आरशात पहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो; ॥

English meaning

Just as we should not be averse to the use of fire, if we wish to purify the gold, or as we have to use ash first to clean a mirror.

141
मूळ

नाना वस्त्रे चोख होआवी । ऐसे आथी जरी जीवी । तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥141॥

मराठी अर्थ

अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल, तर ती परटाच्या गलिच्छ सतेल्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये; ॥

English meaning

Or, if we wish our clothes to be cleansed, we cannot say that the washerman's tub is dirty.

142
मूळ

तैसी कर्मे क्लेशकारे । म्हणौनि न न्यावी अव्हेरे । का अन्नलाभे अरुवारे । रांधितिये उणे ॥142॥

मराठी अर्थ

किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत, म्हणून त्यांची हेळसांड करू नये. ॥

English meaning

So, we should not avoid actions only because they involve hard work. Can we get food without the troubles of cooking it?

143
मूळ

इही इही गा शब्दी । एक कर्मी बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादी । पडोनि ठेला ॥143॥

मराठी अर्थ

याप्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात; अशा प्रकारे कर्म त्यागाविषयी वाद पडला आहे, ॥

English meaning

So, some people give importance to action in these words, and thus the subject of the renunciation of action has become controversial.

144
मूळ

तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसे बोलो गोमटे । अवधान देई ॥144॥

मराठी अर्थ

तर ह्या वादाचा निकाल करून, कर्मचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रितीने सांगतो तिकडे लक्ष दे. ॥

English meaning

Therefore, I shall tell you clearly and definitely so that the doubts will be removed and decision can be taken. Please listen.

145
मूळ

तरी त्यागु एथे पांडवा । त्रिविधु पै जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभाग करू ॥145॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, असे पहा की, हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलास ? आता तिन्ही प्रकार निट वर्णन करून सांगतो; ॥

English meaning

O Pandava, the giving up is of three kinds. I will nicely analyse all the three.

146
मूळ

त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तू इत्यर्थाचे सार । इतुले जाण ॥146॥

मराठी अर्थ

त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्याचे तात्पर्य एव्हढेच आहे असे तु समज. ॥

English meaning

Though I will tell you the three kinds of 'giving up', know that I tell you in short only.

147
मूळ

मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जे अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व ते आधी । अवधारी पा ॥147॥

मराठी अर्थ

मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते, आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे, तो निश्चय कोणता तो एक. ॥

English meaning

Whatever principle seems to be fixed to my all-knowing intellect, you may first listen to it.

148
मूळ

तरी आपुलिये सोडवणे । जो मुमुक्षु जागो म्हणे । तया सर्वस्वे करणे । हेचि एक ॥148॥

मराठी अर्थ

संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो, त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे; त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. ॥

English meaning

The man who is alert about his own emacipation, will have to attend to this aspect definitely. |

149
मूळ

जिये यज्ञदानतपादिके । इये कर्मे आवश्यके । तिये न सांडावी पांथिके । पाउले जैसी ॥149॥

मराठी अर्थ

पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे (मार्ग चालण्याचे) सोडता कामा नये, त्याप्रमाणे, यज्ञ, दान व तप हि जी आवश्यक कर्मे ती सोडू नये. ॥

English meaning

Just as a man who walks should not stop taking step after step, similarly man should never give up doing sacrifices, giving in charity and performance of penance.

150
मूळ

हारपले न देखिजे । तव तयाचा मागु न सांडिजे । का तृप्त न होता न लोटिजे । भाणे जेवी ॥150॥

मराठी अर्थ

हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा मार्ग सोडता येत नाही; अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही. ॥

English meaning

Just as search must not be given up before finding the desired object, or the dish of food should not be put aside before one is fully satisfied by the food,

151
मूळ

नाव थडी न पवता । न खांडिजे केळी न फळता । का ठेविले न दिसता । दीपु जैसा ॥151॥

मराठी अर्थ

किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्या खेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही; किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्या शिवाय दिवा मालविता येत नाही. ॥

English meaning

Or a boat should not be broken before reaching the other shore, or a plantain tree should not he cut before it yields bananas or just as lamp should not be extinguished before the object which one wants to find is seen.

152
मूळ

तैसी आत्मज्ञानविखी । जव निश्चिती नाही निकी । तव नोहावे यागादिकी । उदासीन ॥152॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आत्मज्ञाना विषयी दृढ निश्चय झाला नाही, तोपर्यंत यागादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. ॥

English meaning

Similarly, it is not proper to be apathetic about the performances of sacrifice, penance, etc., before your intellect is completely convinced about the finality of self-knowledge.

153
मूळ

तरी स्वाधिकारानुरुपे । तिये यज्ञदाने तपे । अनुष्ठावीचि साक्षेपे । अधिकेवर ॥153॥

मराठी अर्थ

तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप याचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. ॥

English meaning

On the other hand, one should go on performing these actions carefully according to our eligibility in that respect.

154
मूळ

जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागी ॥154॥

मराठी अर्थ

जो चालण्याची त्वरा करतो, त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडे, तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. ॥

English meaning

When a person walks faster, it helps him to take rest later on. Similarly to do all ordained actions fully, helps a man reach a state where no more action remains to be performed as a necessity.

155
मूळ

अधिके जव जव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तव तव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥155॥

मराठी अर्थ

एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो, तो तो तो रोगापासून मुक्त होत जातो ॥

English meaning

The more regularly one takes medicine, the earlier the disease is cured.

156
मूळ

तैसी कर्मे हातोपाती । जै कीजती यथानिगुती । तै रजतमे झडती । झाडा देऊनी ॥156॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जो जो कर्मे विधिपूर्वक लवकर लवकर करावी, तो तो रज व तम हे गुण समूळ नाहीतसे होतात; ॥

English meaning

Similarly, the more alertly and promptly these actions are performed, the earlier are the defects of Rajas and Tamas dropped from the character of the performer.

157
मूळ

का पाठोवाटी पुटे । भांगारा खारु देणे घटे । तै कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥157॥

मराठी अर्थ

अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते. ॥

English meaning

When gold in subjected to more and more acid treatment, the purer it becomes by the dross being cleansed off.

158
मूळ

तैसे निष्ठा केले कर्म । ते झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचे धाम । डोळा दावी ॥158॥

मराठी अर्थ

तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता; ते रज व तम याचा नाश करून सत्तशुद्धीचे दर्शन करून देते. ॥

English meaning

Similarly when these actions are performed loyally and faithfully, they wipe away the Rajas and Tamas from the character and the divine temple of pure Sattwa comes in our view.

159
मूळ

म्हणौनिया धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आली कर्मे ॥159॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, सत्तशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. ॥

English meaning

O Arjuna, it is for this reason that these actions have become equally purifying as the sacred places of pilgrimage.

160
मूळ

तीर्थे बाह्यमळु क्षाळे । कर्मे अभ्यंतर उजळे । एवं तीर्थे जाण निर्मळे । सत्कर्मेचि ॥160॥

मराठी अर्थ

तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्मांच्या योगे अंतर्मल नाहीसा होता. एवंच सत्कर्मे हीच चीत्तशुद्धीस तीर्थे होत ॥

English meaning

The sacred place of pilgrimage washes the dirt of the outer body when we bathe there, and Sattwic action washes the inner dirt. Therefore the places of pilgrimage get the power of purifying the sins due to these pure actions only.

161
मूळ

तृषार्ता मरुदेशी । झळे अमृते वोळली जैसी । की अंधालागी डोळ्यासी । सूर्यु आला ॥161॥

मराठी अर्थ

तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा, पाण्याचा झरा सापडावा किंवा आंधळ्यांच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, ॥

English meaning

Just as a thirsty man in a desert may luckily get nectar in the very hot winds there, or just as a blind man may get the light of the Sun in his blind eyes.

162
मूळ

बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूने दिधली । आयुष्यवृद्धी ॥162॥

मराठी अर्थ

बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाराला जसे पृथ्विनेच झेलावे अथवा मारणारास मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी, ॥

English meaning

Or, just as the river itself comes rushing to save a drowning man, or death himself may give extension of life to a dying man;

163
मूळ

तैसे कर्मे कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरता । राखिला विषे ॥163॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्मापासून मुमुक्षुस होणारी पिडा कर्मानीच दूर करावी; अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युत्क्ती माहित आहे, तो वैद्द ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाचे रक्षणकरतो, ॥

English meaning

Similarly, O the son of Pandu, the very action releases the seekers of freedom from the bondage of action. This is like a poison saving a man who may be dying due to taking a medicine!

164
मूळ

तैसी एके हातवटिया । कर्मे कीजती धनंजया । बंधकेचि सोडवावया । मुख्ये होती ॥164॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे धनंजया, युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असून ही मुक्त करण्यास कारणीभूत होतात ॥

English meaning

O Arjuna, such is the power of these actions which themselves become instrumental to destroy the bondage.

165
मूळ

आता तेचि हातवटी । तुज सांगो गोमटी । जया कर्माते किरीटी । कर्मचि रुसे ॥1॥165॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, जिच्यायोगे कर्मापासूनच कर्माचा नाश होतो, ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो ॥

English meaning

Now, O the crowned one! I shall tell you the skill by which action itself nullifies 'binding' action.

166
मूळ

तरी महायागप्रमुखे । कर्मे निफजताही अचुके । कर्तेपणाचे न ठाके । फुंजणे आंगी ॥166॥

मराठी अर्थ

तर पंचमहायज्ञादि प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तुत्वचा अभिमान बाळगीत नाही, ॥

English meaning

You see, even if greater ceremonies of sacrifices are being performed, the pride of being a Doer should not be there.

167
मूळ

जो मोले तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवी ॥167॥

मराठी अर्थ

जो मोलाने (दुसऱ्याजवळून पैसे घेऊन )तीर्थयात्रा करतो, त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही; ॥

English meaning

It is like a man who goes to a pilgrimage by others' cost, does not feel that he is doing pilgrimage.

168
मूळ

का मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥168॥

मराठी अर्थ

किंव्हा राजशिक्कयाच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो त्याला मी या राजस जिंकले, असा गर्व होत नाही; ॥

English meaning

If a servant catches a king by the orders of a more powerful person, that servant cannot be proud that he is the victor.

169
मूळ

जो कासे लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणे ॥169॥

मराठी अर्थ

जो दुसऱ्यास कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणारा आहे, असा गर्व होत नाही; किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यास राजाकरिता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, ॥

English meaning

A person who crosses the waters by the help of an expert swimmer, does not become proud that he is a good swimmer and when a priest only acts like an appointed man to give any sum in charity on behalf of an employer, he cannot boast that he is the generous giver of charity.

170
मूळ

तैसे कर्तृत्व अहंकारे । नेघोनि यथा अवसरे । कृत्यजातांचे मोहरे । सारीजती ॥170॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगिता ज्या ज्या वेळी जी जी कर्मे करावयाची ती ती यथाविधी जी करितो; ॥

English meaning

Similarly, without any sense of pride of an "Actor", actions of all these sorts should be maintained or sponsored.

171
मूळ

केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हो नेदावा । मनोरथु ॥171॥

मराठी अर्थ

हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फळ प्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होवू देत नाही. ॥

English meaning

And O Pandava, the aspiration should not be allowed to turn towards the results that would be naturally coming out of these.

172
मूळ

आधीचि फळी आस तुटिया । कर्मे आरंभावी धनंजया । परावे बाळ धाया । पाहिजे जैसे ॥172॥

मराठी अर्थ

हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा; ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्याच्या ठिकाणी प्रीती नित्यनैमित्तिक ठेवता नुसता संतोष मानवा. ॥

English meaning

For this, hope for the fruit should first be dropped away and then action should be undertaken. It is like a lady who breast- feeds baby of another woman. (Wet-nurse).

173
मूळ

पिंपरुवाचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्मे ॥173॥

मराठी अर्थ

पिंपराच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावे. ॥

English meaning

People pour water at the root of the Peepal tree, but they have no hope for getting the fruits of that tree. Similarly actions should be done devoid of any hope for fruits.

174
मूळ

सांडूनि दुधाची टकळी । गोवारी गावधेनु वेटाळी । किंबहुना कर्मफळी । तैसे कीजे ॥174॥

मराठी अर्थ

गुराखी दुधाची आशा सोडून जसा गावातील गाई वळतो, तसे कर्मफलाविषयी निरिच्छ असावे. ॥

English meaning

A cowherd who takes cattle of all the villagers together with his own cattle for grazing to the open grounds etc., has no desire to milk every cow for his own benefit. Such should be our attitude in the actions.

175
मूळ

ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गाठी । लाहेची तो ॥175॥

मराठी अर्थ

या युक्तीने जो कर्मांचे आचरण करितो, त्याला आपल्याजवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. ॥

English meaning

When action is done by a man with this inner freedom, he certainly attains his own Real Self.

176
मूळ

म्हणौनि फळी लागु । सांडोनि देहसंगु । कर्मे करावी हा चांगु । निरोपु माझा ॥176॥

मराठी अर्थ

म्हणून फलाविषयी आशा सोडून व मी कर्ता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. ॥

English meaning

Therefore, my message is that without keeping any desire for fruit, without being proud to be the doer, the actions should be properly performed.

177
मूळ

जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणे पुढतपुढती या बोला । आन न कीजे ॥177॥

मराठी अर्थ

जो जन्ममृत्युचा येरझारा करिता करीता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल, या काळजीत आहे त्याला वारंवार सांगणे आहे कि. त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. ॥

English meaning

I repeat that he who is fed up with his confined state as a Jeeva and is keen for liberation should not disregard this edict of mine.

178
मूळ

नातरी आंधाराचेनि रोखे । जैसी डोळा रोविजती नखे । तैसा कर्मद्वेषे अशेखे । कर्मेचि सांडी ॥178॥

मराठी अर्थ

एखादा मनुष्य अंधारातून चालत असता धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यांवर काढून डोळ्यात नखे बोचतो, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधास कारण आहे, म्हणून त्यांच्यावर रागावून जो ती सर्व कून देतो, ॥

English meaning

He gives up all actions being angry with all of them. This is like thrusting our own fingers in our eyes because there is darkness.

179
मूळ

तयाचे जे कर्म सांडणे । ते तामस पै मी म्हणे । शिसाराचे रागे लोटणे । शिरचि जैसे ॥179॥

मराठी अर्थ

॥त्याच्या त्याच्या कर्मत्यागस मी तामस त्याग म्हणतो याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर रागाने आपले शिरच कापतो. ॥

English meaning

I call this action of this man as Tamasic. It is like cutting our head because there is headache!

180
मूळ

हा गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । की तेचि खांडणे आहे । मार्गापराधे ॥180॥

मराठी अर्थ

अरे, वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपवली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईट पणाबद्दल पाय तोडावी की काय ? ॥

English meaning

You see; even though the path may not be very smooth, but does it mean that we should cut our feet? Or is it not wise to walk somehow?

181
मूळ

भुकेलियापुढे अन्न । हो का भलतैसे उन्ह । तरी बुद्धी न घेता लंघन । भाणे पापरा हल्या ॥181॥

मराठी अर्थ

भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कढत अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने त्याने ते लाथेने झुगारून दिले, तर त्याला लंगनच करावे लागणार ! ॥

English meaning

If a hungry man is given good warm food and getting annoyed he kicks it away, he will surely remain hungry only.

182
मूळ

तैसा कर्माचा बाधु कर्मे । निस्तरीजे करितेनि वर्मे । हे तामसु नेणे भ्रमे । माजविला ॥182॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही. ॥

English meaning

In the same way a foolish man deluded by the binding nature of action, does not know how to nullify that binding quality by action only.

183
मूळ

की स्वभावे आले विभागा । ते कर्मचि वोसंडी पै गा । तरी झणे आतळा त्यागा । तामसा तया ॥183॥

मराठी अर्थ

तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाची जे कर्म ते टाकून देतो, तेव्हा तु त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्म त्यागाच्या स्वाधीन होऊ नको, ॥

English meaning

He gives up his duty also which comes along in the natural course. You should never resort to such Tamasic action.

184
मूळ

अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥184॥

मराठी अर्थ

अथवा, आपला अधिकार काय आहे हे जाणतो व आपली विहित कर्म कोणतेही त्यास माहीतच आहे परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिऊन जो त्यांजविषयी कंटाळा करतो; ॥

English meaning

Or it so happens that a man knows his capacity and understands what is his duty but he is afraid of the hardness of the task.

185
मूळ

जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥185॥

मराठी अर्थ

कर्माचा आरंभ क्षणभर कठीण दिसतो खरा जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते. ॥

English meaning

This is because at the beginning the work is very difficult, just like the tiffin box is heavy while the traveller carries it.

186
मूळ

जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥186॥

मराठी अर्थ

जसा लिंब खाताना जिभेला कडू लागतो व हिरडा तुरट लागतो, तसा कर्माच आरंभ कठीण वाटतो; ॥

English meaning

Or, Neem is bitter to the tongue, Harda is first astringent. Similarly the beginning of the action is exhausting.

187
मूळ

का धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करिता ॥187॥

मराठी अर्थ

किंवा काय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत स्वयंपाक करतेवेळेस भोजनाचे सुख नसते ॥

English meaning

Or just as a good cow has sharp dangerous horns, or a thorny flower-shrub has thorns all over, or the work of cooking food before meals is hard;

188
मूळ

तैसे पुढतपुढती कर्म । आरंभीच अति विषम । म्हणौनि तो ते श्रम । करिता मानी ॥188॥

मराठी अर्थ

तसे कर्म आरंभी तेवढेच अतिकठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात; असे तो समजतो. ॥

English meaning

Similarly, many times the doer finds his duty painful in the beginning and therefore, avoids it.

189
मूळ

येऱ्हवी विहितत्वे मांडी । परी घालिता असुरवाडी । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेही ॥189॥

मराठी अर्थ

बाकी कर्माचा आरंभ यथाविधि करतो; पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजतात ती टाकून द्यावी, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो; ॥

English meaning

He, however, starts to do the work because he is aware that it is his duty, but when he gets tired, he becomes afraid and gives it up half-way.

190
मूळ

म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुती भाग्यविशेखी । मा जाचू का कर्मादिकी । पापिया जैसा ? ॥190॥

मराठी अर्थ

आणि म्हणतो की, भाग्य म्हणून माझे महतभाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता, पाप्यायाप्रमाणे कर्माचे आचरण करू मी आपल्याच त्रास का करून घ्यावा ? ॥

English meaning

He says- "Luckily I have got this boon of this body! Then why should I trouble it by so much hard work?"

191
मूळ

केले कर्मी जे द्यावे । ते झणे मज होआवे । आजि भोगू ना का बरवे । हातीचे भोग ? ॥191॥

मराठी अर्थ

कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची गरज नाही; तर आज जे आपल्यास ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, त्याचा उपभोग का घेऊ नये ? ॥

English meaning

Who has told me to do this work and then wait for its fruit? I would rather enjoy the pleasures now which are available.

192
मूळ

ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणे कर्मे वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥192॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे अर्जुना, शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो, त्याला राजस त्याग असे म्हणतात, ॥

English meaning

One who leaves his duty by being afraid of the hard work involved in it, should be known as a man doing Rajasic renunciation.

193
मूळ

येऱ्हवी तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसे उतले आगी पडे । ते नलगेचि होमा ॥193॥

मराठी अर्थ

त्याठिकाणी ही कर्मत्याग होतो; परंतु त्याला कर्म त्यागाचे फळ मिळत नाही, ज्याप्रमाणे उतू आलेले तूप आगीत पडले, तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. ॥

English meaning

Even in this case there is renunciation of action, but just as milk overflown while boiling cannot be counted as milk offered as oblation in the sacrificial fire,

194
मूळ

का बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकी निमाले । हे म्हणो नये जाहले । दुर्मरणचि ॥194॥

मराठी अर्थ

किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचे मरण असे म्हटले पाहिजे, ॥

English meaning

Or just as we cannot say that the people who were killed due to drowning, took Samadhi in water; and we have to count that death as accidental death only;

195
मूळ

तैसे देहाचेनि लोभे । जेणे कर्मा पाणी सुभे । तेणे साच न लभे । त्यागाचे फळ ॥195॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मांवर पाणी सोडले, त्याला कर्म त्यागाचे फळ खास मिळत नाही. ॥

English meaning

Similarly, he who gives up his ordained duty due to his love of his body, cannot get the merit of that giving up of action.

196
मूळ

किंबहुना आपुले । जै ज्ञान होय उदया आले । तै नक्षत्राते पाहले । गिळी जैसे ॥196॥

मराठी अर्थ

किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याला सुर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्राचे तेच लोपते, ॥

English meaning

In short, just as at the dawn, the stars disappear and light spreads, when our self-knowledge is realized,

197
मूळ

तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥197॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्याग पासून ज्ञानासह क्रियांचा लोप होतो, त्यापासून मोक्षप्राप्ती होते ॥

English meaning

O Dhananjaya, it dissolves our ignorance as well as all our actions, and then only, the aim of liberation is attained.

198
मूळ

ते मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाही अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥198॥

मराठी अर्थ

अर्जुना, ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. ॥

English meaning

O Arjuna, he who gives up his action due to ignorance does not get the result of liberation and his giving up is Rajasic. You should not call it real renunciation.

199
मूळ

तरी कोणे पा एथ त्यागे । ते मोक्षफळ घर रिघे । हेही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥199॥

मराठी अर्थ

तर कोणत्या त्यागा पासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते, तेही प्रसंगानुरोधाने तुला सांगतो, ते ऐक. ॥

English meaning

Now I shall tell you how and by what kind of renunciation there is liberation. Please listen.

200
मूळ

तरी स्वाधिकाराचेनि नांवे । जे वांटिया आले स्वभावे । ते आचरे विधिगौरवे । शृंगारोनि ॥200॥

मराठी अर्थ

तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेली कर्म, ते साहित्यासह गौरवाने यथाविधि आचरण करितो; ॥

English meaning

When a man performs his duty, which is fixed for him by religion and his status, it is perfect according to its rules.

201
मूळ

परी हे मी करितु असे । ऐसा आठवु त्यजी मानसे । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥201॥

मराठी अर्थ

परंतु हे कर्म मी करीत आहे, अशी मनात आठवणही होवू देत नाही; तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो. ॥

English meaning

But the sense that "he is the doer" does not touch his mind at all and when he gives up the hope to gain any result from it, it is a Sattwic way of renunciation.

202
मूळ

पै अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायी अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥202॥

मराठी अर्थ

अर्जुना, असे पहा कि, मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली, तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात.

English meaning

O Arjuna, in respect of mother, both the disobedience and the passion, become cause for sin.

203
मूळ

तरी दोनी ये त्यजावी । मग माताची ते भजावी । वाचूनि मुखालागी वाळावी । गायचि सगळी ? ॥203॥

मराठी अर्थ

तर या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गाईचे तोंड अपवित्र असले म्हणून गाईच्या सर्वागाचा त्याग करावयाचा की काय ?

English meaning

And therefore, both these must be abandoned and then only, the mother should be worshipped. Do we abandon the cow only because it eats anything even if that is not a good food?

204
मूळ

आवडतियेही फळी । असारे साली आंठोळी । त्यासाठी अवगळी । फळाते कोण्ही ? ॥204॥

मराठी अर्थ

आपल्यास आवडते जे फळ (आंबा) त्याची साल व कोय यामध्ये रस नाही, हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय ?

English meaning

Even the peels and the hard core of our best favourite fruit are worth throwing away, but do we throw the whole fruit for that reason?

205
मूळ

तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहीचे नांव बंधु । कर्माचा की ॥205॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोहोसच बंध असे नाव आहे.

English meaning

Thus, both things namely the pride of our being the doer and the hope for enjoying the fruit are binding, when action is performed.

206
मूळ

तरी या दोहीच्या विखी । जैसा बापु नातळे लेकी । तैसा हो न शकेदुःखी । विहिता क्रिया ॥206॥

मराठी अर्थ

म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगत नाही, त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोविषयी इच्छा करीत नाही, त्याला दुःख होऊ शकत नाही.

English meaning

When, just as a father has no desire in regard to his daughter, both these attitudes are not allowed to grow in our mind, then the natural duties do not create bondage.

207
मूळ

हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळे ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासीच जगी ॥207॥

मराठी अर्थ

हा त्याग रूप वृक्ष सर्व वृक्षांत श्रेष्ठ असून, यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे.

English meaning

Such renunciation should be considered as a great tree which yields the fruit of liberation and this is famous as Sattwic renunciation in the world.

208
मूळ

आता जाळूनि बीज जैसे । झाडा कीजे निर्वंशे । फळ त्यागूनि कर्म तैसे । त्यजिले जेणे ॥208॥

मराठी अर्थ

आता, झाडाचे बीज जाळून झाडास जशी निर्वंश करावे, तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो.

English meaning

When a man leaves his hope for fruit, and destroys the binding quality of action just as the whole tree is automatically destroyed when we burn its seed;

209
मूळ

लोह लागतखेवो परीसी । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमे तैसी । तुटली दोन्ही ॥209॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताक्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात, त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाहीतसे होतात.

English meaning

Then just as, at the touch of Parees stone, the iron loses its blackness, he whose Rajas and Tamas qualities are destroyed,

210
मूळ

मग सत्वे चोखाळे । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसे ॥210॥

मराठी अर्थ

मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाच्या उजेड होउन जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहितसे होते,

English meaning

And when by clear Sattwa, whose eyes of self-knowledge are opened, then, just as the mirage is no more visible in the evening,

211
मूळ

तैसा बुद्ध्यादिकांपुढा । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडा । आकाश जैसे ॥211॥

मराठी अर्थ

किंवा आकाश (पोकळी) जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही.

English meaning

He never perceives the delusion of the apparent universe anywhere, just as we cannot demark any boundary for the sky. |

212
मूळ

म्हणौनि प्राचिनाचेनि बळे । अलंकृते कुशलाकुशले । तिये व्योमाआंगी आभाळे । जिराली जैसी ॥212॥

मराठी अर्थ

म्हणून पूर्वकर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती, आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात.

English meaning

Therefore, just as clouds disappear in the sky, all the actions which present themselves to this man as duties born out of the past Karma, become nullified.

213
मूळ

तैसी तयाचिये दिठी । कर्मे चोखाळली किरीटी । म्हणौनि सुखदुःखी उठी । पडेना तो ॥213॥

मराठी अर्थ

तशी अर्जुना, त्याच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणार्‍या सुखदुःखांची उठाठेव तो करीत नाही.

English meaning

O the crowned one; further, actions being born and performed in the present, become so purified before his ascetic vision that these also cannot bind him either in pleasure or pain.

214
मूळ

तेणे शुभकर्म जाणावे । मग ते हर्षे करावे । का अशुभालागी होआवे । द्वेषिया ना ॥214॥

मराठी अर्थ

शुभ कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही, किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही.

English meaning

He does not become eager if any action is likely to be pleasurable or good nor gets apathetic if any action is likely to be painful or bad.

215
मूळ

तरी इयाविषयींचा काही । तया एकुही संदेहो नाही । जैसा स्वप्नाच्या ठायी । जागिन्नलिया ॥215॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीची कोणी सुखदुःख मानीत नाही, त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ याविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही.

English meaning

Just as, after one awakens, one does not worry about the painful or pleasant experience in the dream, he also does not have any anxiety about these actions.

216
मूळ

म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणे तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥216॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, हे कर्म आणि कर्ता यात द्वैतभावाची वार्ता तो जाणतहि नाही, त्याला सात्त्विक त्याग असे म्हणतात.

English meaning

O the son of Pandu, in this Sattwic kind of giving up, the sense of duality as - "one is the doer and he does a certain action" - is not existing.

217
मूळ

ऐसेनि कर्मे पार्था । त्यजिली त्यजिती सर्वथा । अधिके बांधिती अन्यथा । सांडिली तरी ॥217॥

मराठी अर्थ

पार्था, अशाप्रकारे कर्माचा त्याग केला तरच कर्माचा त्याग होतो; पण या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला, तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात.

English meaning

O Partha, by such renunciation only, the actions are truly given up and if they are dropped under any other conditions, they are still binding!

218
मूळ

आणि हा गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥218॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, जो देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते मूर्ख होत. ॥

English meaning

O the Ambidextrous Archer! Foolish are those who abhor action when they have got this body to their lot.

219
मूळ

मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? । केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥219॥

मराठी अर्थ

मातीचा कंटाळा करून घट काय करील ? आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल ? ॥

English meaning

My dear, can an earthen pot get bored about earth? How far can a cloth dislike the thread?

220
मूळ

तेवीचि वन्हित्व आंगी । आणि उबे उबगणे आगी । की तो दीपु प्रभेलागी । द्वेषु करील काई ? ॥220॥

मराठी अर्थ

तसेच अग्नीत्व अंगी असलेल्या आगीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का ? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय ? ॥

English meaning

Similarly will a thing in which fire is inherent, become troubled by heat? Does a lamp ever hate the light?

221
मूळ

हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचे सुगंधत्व आणी ? । द्रवपण सांडूनि पाणी । के राहे ते ? ॥221॥

मराठी अर्थ

हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास आला तरी त्याने चांगला वास कुठून आणावा ? किंवा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार ? ॥

English meaning

Can asafoetida be averse to bad smell and choose fragrance? How can water be without the liquidity?

222
मूळ

तैसा शरीराचेनि आभासे । नांदतु जव असे । तव कर्मत्यागाचे पिसे । काइसे तरी ? ॥222॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे शरीराचे अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे, तोपर्यंत कर्म त्यागाचे वेड काय उपयोगी पडेल ? ॥

English meaning

Similarly so long as one is functioning within this body-though only apparent- why should one be stupid to think of giving up all actions?

223
मूळ

आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसो ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । का करू ये गा ? ॥223॥

मराठी अर्थ

आपण लावलेले गंध वाकडे लागले, तर ते वरचेवर पुसता येते; परंतु कपाळ जर वाकडे असेल, तर ते कसे नीट करता येईल ? ॥

English meaning

We apply sandalwood paste or wipe it out from our forehead, because we are free to do so, but can we scratch out the forehead itself and put it on again?

224
मूळ

तैसे विहित स्वये आदरिले । म्हणौनि त्यजू ये त्यजिले । परी कर्मचि देह आतले । ते का सांडील गा ? ॥224॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे, त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करिता येईल; पण त्यायोगे काही कर्मत्याग होणार नाही. कारण शरीर हे कर्म रूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार ? ॥

English meaning

Similarly, the duties ordained for us by scriptures are respected by us and therefore, we perform or do not perform them, as we are free to do so; but the inborn actions of the functions of body inside it- how can we give them up?

225
मूळ

जे श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । काही न करणेयाचि परी । होती जयाची ॥225॥

मराठी अर्थ

का की, मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने कर्म हे घडतेच, अर्थात आपण काही एक न करिता त्याची उभारणी होते, ॥

English meaning

This is because even in our sleep, such functions as breathing etc. are continued. Even in the case of a man not doing anything, actions are going on.

226
मूळ

या शरीराचेनि मिसके । कर्मची लागले असिके । जिता मेलया न ठाके । इया रीती ॥226॥

मराठी अर्थ

या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि याप्रमाणे ते जिवंतपणी व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही. ॥

English meaning

Action and our body are inseparable; in life or after death, it is there.

227
मूळ

यया कर्माते सांडिती परी । एकीचि ते अवधारी । जे करिता न जाइजे हारी । फळशेचिये ॥227॥

मराठी अर्थ

हे बघ, या कर्मचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे. तो असा की, कर्म करीत असतात फलेच्छेच्या आधीन होऊ नये. ॥

English meaning

There are only one kind of persons who have escaped from actions; they are those who have no hope for the fruit though they perform actions.

228
मूळ

कर्मफळ ईश्वरी अर्पे । तत्प्रसादे बोधु उद्दीपे । तेथ रज्जुज्ञाने लोपे । व्याळशंका ॥228॥

मराठी अर्थ

कर्माचे फळ ईश्वरास अर्पण केले, म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते, ॥

English meaning

When the result of action is surrendered to God, there is self-knowledge by His blessings, just as when we see a rope as a rope clearly, the delusion that it is a snake disappears.

229
मूळ

तेणे आत्मबोधे तैसे । अविद्येसी कर्म नाशे । पार्था त्यजिजे जै ऐसे । तै त्यजिले होय ॥229॥

मराठी अर्थ

तसा या आत्मबोधाने अज्ञाना सह कर्माचा नाश होतो. पार्था, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा, तेव्हाच तो खरा त्याग होय. ॥29 ।

English meaning

Similarly, by self-knowledge, bondage of action is destroyed together with ignorance. O Partha, such giving up is the true thing.

230
मूळ

म्हणौनि इयापरी जगी । कर्मे करिता मानू त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसावा जैसा ॥230॥

मराठी अर्थ

म्हणून जगामध्ये सात्विक त्यागाच्या हातोटीने कर्म करतो, त्यालाच आम्ही कर्म त्यागी असे मानू. एरवी रोग्याला मुर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात, ॥

English meaning

Therefore, we call such people the true renouncers; otherwise, just as one may consider a man to be taking rest when actually he is unconscious.

231
मूळ

तैसा कर्मी शिणे एकी । तो विसांवो पाहे आणिकी । दांडेयाचे घाय बुकी । धाडणे जैसे ॥231॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे तो कर्म करताना कंटाळतो, तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. ती असे की, याप्रमाणे दांड्याच्या घावाच्या वेदना बुक्क्यांनी कमी करावयाच्या तसाच हा प्रकार आहे. ॥

English meaning

One may consider change of work when one is tired of one work, as a rest, but it is as if to prefer beating by fists to the beating by sticks.

232
मूळ

परी हे असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगती । जेणे फळत्यागे निष्कृती । नेले कर्म ॥232॥

मराठी अर्थ

परंतु ही असो; ज्याने फळत्याग करून कर्माला निष्कर्मत्व आणिले तोच या त्रिभुवनात त्यागी होय. ॥

English meaning

But let this explanation be. I tell you again that only he should be considered as the true renouncer, who renounces the fruit of action and thus reduces action to nothingness.

233
मूळ

येऱ्हवी तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते की भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥233॥

मराठी अर्थ

एरवी तरी अर्जुना, जे कर्मफळाची अशा सोडीत नाहीत तिच्या तीन प्रकारच्या कर्मफळाचा भोग घेण्यास समर्थ असतात. ॥

English meaning

O Dhananjaya, there are three types of fruits of action to be enjoyed by those who are capable of it, because they do not give up the results.

234
मूळ

आपणचि विऊनि दुहिता । की न मम म्हणे पिता । तो सुटे की प्रतिग्रहीता । जावई शिरके ॥234॥

मराठी अर्थ

आपण कन्येस जन्म दिला असूनही ‘ती माझी नाही’ असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो, तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणि ग्रहण करणारा जावाई तिच्या मायापाशांत पडतो. ॥

English meaning

The father gives birth to a daughter and at the time of her marriage, says- "This is not mine," and gives her to the bridegroom. Thus he becomes free, but his son-in-law then becomes responsible for her.

235
मूळ

विषाचे आगरही वाहती । ते विकिता सुखे लाभे जिती । येर निमाले जे घेती । वेचोनि मोले ॥235॥

मराठी अर्थ

जे विषाच्या (बचनाग वगैरेच्या) बागा किंवा व्यापार करितात, ते त्याची विक्री करून त्याजवर नफा मिळवून सुखाने प्रपंच करतात, पण जे त्याचे सेवन करतात, ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात ! ॥

English meaning

People who grow poisonous herbs sell them to others and earn lot of easy money but those who purchase them by paying the cost and consume them, die!

236
मूळ

तैसे कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरू । दोहीते कर्म ॥236॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरू कर्म करो, किंवा मी कर्ता नाही, असे समजून फळाची आशा सोडून कर्म करो, तरी दोघांनाही कर्म करणे चुकत नाही. ॥

English meaning

Similarly, even if the doer performs any action, if his mind is free of the desire for its fruit, he remains a non-doer. Action in itself cannot affect both these things.

237
मूळ

वाटे पिकलिया रुखाचे । फळ अपेक्षी तयाचे । तेवी साधारण कर्माचे । फळ घे तया ॥237॥

मराठी अर्थ

रस्त्यावरील पिकलेल्या (आम्र) वृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फल असते (म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते.

English meaning

Just as one who wishes to take the fruit of a tree by the roadside which is ripe and at hand, similarly, only he who wishes to get the fruit of action gets it.

238
मूळ

परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामी न रिघे । जे त्रिविध जग अवघे । कर्मफळ हे ॥238॥

मराठी अर्थ

वाटेवरील वृक्षांच्या पिकलेल्या फळांचा इच्छा करितो, त्यासच ती बाधक होते; परंतु कर्म करून तो फळाची आशा करीत नाही, जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण, हे तीन प्रकारचे जग कर्माचे फळ आहे. ॥

English meaning

But he who does not desire or be attached to the result of the actions which he performs aloofly, does not get caught in the wheel of this world, because this world is actually the result of three types of actions.

239
मूळ

देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तव तिन्ही प्रकार । कर्मफळाचे ॥239॥

मराठी अर्थ

देव, मनुष्य व स्थावर याला जग असे म्हणतात, आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफळाचेच आहेत. ॥

English meaning

This world is made up of human beings, gods and inanimate things and these categories are nothing but the three kinds of the results of actions!

240
मूळ

तेचि एक गा अनिष्ट । एक ते केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसे ॥240॥

मराठी अर्थ

ते कर्म एक अनिष्ट (प्रतिकूल), एक केवळ इष्ट (अनुकूल) आणि एक इष्टानिष्ट (मिश्र) असे तीन प्रकारचे आहे; ॥

English meaning

These kinds are either undesirable results, desirable ones or results of mixed nature.

241
मूळ

परी विषयमंती बुद्धी । आंगी सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धी । कुव्यापारी ॥241॥

मराठी अर्थ

परंतु जे विषयासक्त आहेत, ते अविधीचा अंगीकार करून निषिद्ध अशा कर्माची ठिकाणी प्रवृत्त होतात; ॥

English meaning

When Jeevas become slaves to the objects of enjoyment, and are attracted to sins, and commit prohibited actions, they go to take birth as insects, ants, stones or earth also. This should be considered as undesirable result of action.

242
मूळ

तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम ते अनिष्ट । कर्मफळ ॥242॥

मराठी अर्थ

आणि त्यायोगे कृमी, कीटक अथवा माती वाईट देह पावतात, त्याला कर्मफळ असे म्हणतात ॥

English meaning

When Jeevas become slaves to the objects of enjoyment, and are attracted to sins, and commit prohibited actions, they go to take birth as insects, ants, stones or earth also. This should be considered as undesirable result of action.

243
मूळ

का स्वधर्मा मानु देता । स्वाधिकारु पुढा सूता । सुकृत कीजे पुसता । आम्नायाते ॥243॥

मराठी अर्थ

किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारनुरूप वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात, ॥

English meaning

Or when people respect their own duty according to their status and class and perform only the actions which are said to be meritorious in the Vedas and scriptures, go to be born as gods like Indra, etc.; which result should be considered, as desirable result of action.

244
मूळ

तै इंद्रादिक देवांची । देहे लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥244॥

मराठी अर्थ

तेव्हा अर्जुना, तेव्हा इंद्रादीक देवतांचे देह प्राप्त होतात; त्या कर्म फळाला पुण्यकर्म असे म्हणतात; ॥

English meaning

Or when people respect their own duty according to their status and class and perform only the actions which are said to be meritorious in the Vedas and scriptures, go to be born as gods like Indra, etc.; which result should be considered, as desirable result of action.

245
मूळ

आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळे । उठी दोंही वेगळे । दोही जिणते ॥245॥

मराठी अर्थ

आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहो वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो, ॥

English meaning

And just as by mixing sweet and sour food articles, quite another tasty article is prepared which is different from both the tastes;

246
मूळ

रेचकुचि योगवशे । होय स्तंभावयादोषे । तेवी सत्यासत्य समरसे । सत्यासत्यचि जिणिजे ॥246॥

मराठी अर्थ

किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते. ॥

English meaning

For example, breath control as a total process is quite different from the inhalation and the exhalation considered independently. Similarly when truth and non-truth are mixed-up in anything, the product is half-truth and half untruth, which is quite strange.

247
मूळ

म्हणौनि समभागे शुभाशुभे । मिळोनि अनुष्ठानाचे उभे । तेणे मनुष्यत्व लाभे । ते मिश्र फळ ॥247॥

मराठी अर्थ

म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते, मनुष्यदेह याचा लाभ हेच मिश्र फळ होय. ॥

English meaning

Similarly when the resultant effect of desirable result and undesirable result mixed together comes into being, it causes rebirth in the human kingdom. This should be considered as mixed result.

248
मूळ

ऐसे त्रिविध यया भागी । कर्मफळ मांडलेसे जगी । हे न सांडी तया भोगी । जे सूदले आशा ॥248॥

मराठी अर्थ

या जगात तीन प्रकारचे कर्मफळ आहे; या कर्मफळाची अशा टाकत नाहीत, ते जन्म-मरणाचे फेऱ्यात पडतात. ॥

English meaning

In this way, three types of results of Karma are prevalent in this world, and the souls which run after hope generally, have no other alternative except suffering this result.

249
मूळ

जेथे जिव्हेचा हातु फाटे । तव जेविता वाटे गोमटे । मग परीणामी शेवटे । अवश्य मरण ॥249॥

मराठी अर्थ

ज्या जेवणाऱ्याला सहन होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते. त्याला त्यायोगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. ॥

English meaning

Sometimes when the taste becomes perverted and uncontrollable, unwholesome food is felt very tasty, but it may result even in death.

250
मूळ

संवचोरमैत्री चांग । जव न पविजे ते दांग । सामान्या भली आंग । न शिवे तव ॥250॥

मराठी अर्थ

जोपर्यंत अरण्य लाभले नाही, तोपर्यंतच संवचोराची मैत्री बरी, किंवा वेश्येचा जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती बरी असते. ॥

English meaning

Or company of a robber in a gentleman's dress seems to be good so long as the traveller does not reach dense forest, and prostitute is tolerable to look at only so long as there is no physical contact.

251
मूळ

तैसी कर्मे करिता शरीरी । लाहती महत्त्वाची फरारी । पाठी निधनी एकसरी । पावती फळे ॥251॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहवत, मरणानंतर एकसारखी त्यांना फळे भोगावीच लागतात. ॥

English meaning

Similarly a person becomes puffed up by pride, while executing certain actions, but all the actions attack as 'results' together at the time of his death.

252
मूळ

तैसा समर्थु आणि ऋणिया । मागो आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥252॥

मराठी अर्थ

जसा समर्थ असून त्याचजवळ ऋण काढले आणि तो वायद्याच्या मुदतीस मागणी करू लागला, तर त्याला जसे नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणिमात्राला कर्माचे फळ भोगणे भाग पडते ( कर्मफल चुकत नाही). ॥

English meaning

Just as a powerful money-lender does not go away from the door of a person, who has taken loan, without recovering his money, similarly these actions come back with results which cannot be avoided.

253
मूळ

मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥253॥

मराठी अर्थ

मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो ॥

English meaning

For example, a grain from the ear of grains falls down on earth, it grows again, and bears new ears from which again the same process of growth is repeated.

254
मूळ

तैसे भोगी जे फळ होय । ते फळांतरे वीत जाय । चालता पावो पाय । जिणिजे जैसा ॥254॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे उपभोगाचे फळ जे शरीर ते फळाच्याशेवटी जन्म घेते, जसा वाट चालणारा मनुष्य एकेक पाऊल टाकून वाट वन बसतो लोकसभा जिंकतो;

English meaning

Similarly the person creates many new causes ensuring results, while he is already reaping the results of one action, just as while walking, each foot takes one step ahead of another foot.

255
मूळ

उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवी न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥255॥

मराठी अर्थ

होडी एका तीराहून दुसऱ्या तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलिकडला होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणा आहेच, म्हणून वाहून न्यावे लागते. तसा फळाच्या उपभोगाला शेवट नाही. ॥

English meaning

Or when one crosses the river and goes to the other shore, that shore becomes the starting point from which again one has to cross the river, when time comes. Similarly the results of actions never cease.

256
मूळ

पै साध्यसाधनप्रकारे । फळभोगु तो पसरे । एवं गोविले संसारे । अत्यागी ते ॥256॥

मराठी अर्थ

हे बघ, साध्य व साधन अशा क्रमाने फळ व फळाचा भोग वाढतात, फळेच्छेचा त्याग न करणारे, याप्रमाणे संसारात गोवले जातात. ॥

English meaning

In other words, as a chain of means and an end, the results of actions and their enjoyments go on increasing, and in this way the souls who do not give up hope for the fruits become more and more entangled in the net of worldly life.

257
मूळ

येऱ्हवी जाईचिया फुला फांकणे । त्याचि नाम जैसे सुकणे । तैसे कर्ममिषे न करणे । केले जिही ॥257॥

मराठी अर्थ

एऱ्हवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होताक्षणी सुकते, त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे फळा पासून अलिप्त असतात; ॥

English meaning

But just as the very blossoming of the flower of Jasmine is its beginning of withering, similarly some people become instrumental for actions, but it is inaction, and they are not the doers.

258
मूळ

बीजचि वरोसि वेचे । तेथ वाढती कुळवाडी खाचे । तेवी फळत्यागे कर्माचे । सारिले काम ॥258॥

मराठी अर्थ

बिजा करिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले, तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो, तसे फळाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात. ॥

English meaning

If grains kept for seeds for the next crop are used for consuming, they do not bring any crop next year. Similarly, there are people who have given up the fruits of action, and thus thwarted the further growth of bondage.

259
मूळ

ते सत्वशुद्धि साहाकारे । गुरुकृपामृत तुषारे । सासिन्नलेनि बोधे वोसरे । द्वैतदैन्य ॥259॥

मराठी अर्थ

शुद्ध सत्वाच्या साह्याने गुरुकृपारुपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध द्वैताचे दैन्य नाहीतसे होते. ॥

English meaning

On the strength of the essential purity of Sattwa quality, they become fresh by the self- knowledge, nourished by the blessing of their Guru and in their case, the poverty of duality disappears.

260
मूळ

तेव्हा जगदाभासमिषे । स्फुरे ते त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसे । निमाले हे ॥260॥

मराठी अर्थ

मग ज्या तीन प्रकारच्या फळापासून जग उत्पन्न होते, ते आपोआप नाश पावून भोक्ता व भोग्यवस्तू याही आपोआप लयास जातात. ॥

English meaning

Then all the varieties of three categories of results caused generally by the delusion of the world, are destroyed and the enjoyer or the receiver of the result, and the result itself automatically cease to be.

261
मूळ

घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जया वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥261॥

मराठी अर्थ

हे विरेशा, त्यांच्या हातून अशा प्रकारच्या कर्माचा ज्ञानप्रमुख संन्यास होतो, त्यांनाच फळाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही; ॥

English meaning

O the great warrior, only those in whose life such renunciation based on self-knowledge takes place, are really free of the desire for fruit.

262
मूळ

आणि येणे कीर संन्यासे । जै आत्मरूपी दिठी पैसे । तै कर्म एक ऐसे । देखणे आहे ? ॥262॥

मराठी अर्थ

आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मरुपी दृष्टी पोहोचते, तेव्हा कर्म निराळे आई असे दिसते काय ? ॥

English meaning

And when the vision of such a person becomes very vast due to this renunciation, he sees everything in Atman. Then, how can he feel that action is something different from him?

263
मूळ

पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । का पाहालेया राती । आंधारे उरे ? ॥263॥

मराठी अर्थ

चित्रे काढलेली भिंत पडल्यावर चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय ? ॥

English meaning

For example, if the wall on which the pictures are painted, falls down, the pictures are automatically turned into dust. Further, is there any place for darkness to live when the day breaks?

264
मूळ

जै रूपचि नाही उभे । तै साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबे । वदन के पा ? ॥264॥

मराठी अर्थ

जर आकृतीच नसली, तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल ? ॥

English meaning

My dear, when the form itself is not there, where can its shadow be? If there is no mirror, how can our face be reflected?

265
मूळ

फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥265॥

मराठी अर्थ

झोप पुरी झाल्यावर स्वप्न कुठून पडणार ? आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल ? ॥

English meaning

When sleep is totally disturbed, where is the place for dream? And when there is no dream, how does the question whether it is real or unreal arise?

266
मूळ

तैसे गा संन्यासे येणे । मूळ अविद्येसीचि नाही जिणे । मा तियेचे कार्य कोणे । घेपे दीजे ? ॥266॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कर्मफळाचा संन्यास केला असता मूळच्या अविद्येंच थारा मिळत नाही; मग तिच्या पासून होणारे जे फळ, त्याचा कोण उपभोग घेईल व देईल ॥

English meaning

Similarly, when the life of ignorance is finished by such renunciation based on self- knowledge, how can there be the exchange of the results of actions, which are themselves in the field of that ignorance?

267
मूळ

म्हणौनि संन्यासी ये पाही । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देही । आहे जै का ॥267॥

मराठी अर्थ

म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार ? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल; ॥

English meaning

Therefore, how can there be any question of action and its result in the case of such a Sanyasi? But so long as there is ignorance in our body,

268
मूळ

जै कर्तेपणाचेनि थांवे । आत्मा शुभाशुभी धावे । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जै ॥268॥

मराठी अर्थ

जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगले व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते, ॥

English meaning

So long as the soul is running after good or bad action in the fever of his pride of doership; and so long as dualistic approach has its imprint on his vision;

269
मूळ

तै तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडे जैसी पश्चिमा । पूर्वेसि का ॥269॥

मराठी अर्थ

तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व व पश्चिम या प्रमाणे द्वैत विशेष असते. ॥

English meaning

Dear Arjuna, there is going to be difference between Atman (soul) and his action, just as there is difference between the east and the west.

270
मूळ

नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥270॥

मराठी अर्थ

आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला, तरी ते फार दूर आहेत. ॥

English meaning

Or as there is evident difference between the sky and the clouds, the Sun and the mirage, and between the earth and the wind,

271
मूळ

पांघरौनि नईचे उदक । असे नईचिमाजी खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥271॥

मराठी अर्थ

नदीचे पाणी पांघरूण नदीत खडक असतो परंतु त्या दोहोंत जशी एक कोटपट अंतर असते;

English meaning

Or as there is difference in the stones and water, though stones are merged within water,

272
मूळ

हो का उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणो ये ? ॥272॥

मराठी अर्थ

पाण्यावर असलेले शेवाळ हे पाणी यापासून वेगळे असते; काजळाचा दिव्याची संबंध आहे, म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय ?

English meaning

No doubt, moss is very near the water but it is different from it. Can we say that the soot is the lamp, only because it is with the lamp?

273
मूळ

जरी चंद्री जाला कलंकु । तरी चंद्रेसी नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्या विवेकु । अपाडु जेतुला ॥273॥

मराठी अर्थ

जरी चंद्राला कलंक लागला आहे, तरी त्यांचे चंद्राची ऐक्य नाही, तसेच दृष्टी व डोळे यामध्ये जितका भेद आहे;

English meaning

There is dark patch on the Moon, but it is not one with the Moon. Similarly there is quite a distinction between the physical organ of the eye and the vision.

274
मूळ

नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघी वाहातया । आरसा आरसा पाहातया । अपाडु जेतुला ॥274॥

मराठी अर्थ

अथवा वाट व तिजवरून चालणारा वाटसरु, ओघ व ओघांत वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे,

English meaning

Not only this, but just as there is difference between the road and one who walks on it, the stream of water and the man being carried away with it; or the mirror and the man seeing his own reflection in it;

275
मूळ

पार्था गा तेतुलेनि माने । आत्मेनिसी कर्म सिने । परी घेवविजे अज्ञाने । ते कीर ऐसे ॥275॥

मराठी अर्थ

तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे; परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत, असे वाटते.

English meaning

O Partha, that is the difference between Atman and the action; but alas! If at all the sheer ignorance would allow us some scope to realize this!

276
मूळ

विकाशे रवीते उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरी का बरवी । अब्जिनी जैसी ॥276॥

मराठी अर्थ

जशी सरोवरातील कमळे आपल्या बोलण्याने फुलंण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदचा भ्रमरांकडून कडून उपभोग घेववितात.

English meaning

The lotus blooms and indicates sunrise and lets its fragrant honey be sucked and looted by black-bees.

277
मूळ

पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करू पाचाही तया । कारणा रूप ॥277॥

मराठी अर्थ

तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे पाच आहेत. त्यांची लक्षणे तुला सांगतो.

English meaning

Similarly the actions appearing to be taking place on the Atman, actually happen to be caused by various 'causes' continuously. They are five and we will explain to you all the five causes.

278
मूळ

आणि पांचही कारणे तिये । तूंही जाणसील विपाये । जे शास्त्रे उभऊनी बाहे । बोलती तयाते ॥278॥

मराठी अर्थ

ती पाच कारणे तू ही कदाचित जाणार असशील कारण ज्याविषयी शास्त्राने ऊंच हात करून वर्णन केलेले आहे

English meaning

Perhaps, you may already be knowing these five causes which are declared by scriptures with great emphasis.

279
मूळ

वेदरायाचिया राजधानी । सांख्यवेदांताच्या भुवनी । निरूपणाच्या निशाणध्वनी । गर्जती जिये ॥279॥

मराठी अर्थ

ती वेदराजाच्या राज्याच्या राजधानीत सांख्य वेदात मंदिरात निरूपणरुपी नौबदीने प्रसिद्ध आहेत.

English meaning

They are loudly chanted to the accompaniment of drums of philosophical discussions, in the stronghold of Vedanta in the city of the Veda, who is the King.

280
मूळ

जे सर्वकर्मसिद्धीलागी । इयेचि मुद्दले हो जगी । तेथ न सुवावा अभंगी । आत्मराजु ॥280॥

मराठी अर्थ

कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता या जगात हीच मुख्य अवश्य आहेत, तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको.

English meaning

As these are the causes for all the actions to be completed in this world; Atman, the king should not be taken as connected with the actions.

281
मूळ

ह्या बोलाचि डांगुरटी । तिये प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटी । वसो हे काज ॥281॥

मराठी अर्थ

अर्जुना, अशी दवंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे, म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल;

English meaning

O the crowned one! As these causes are thus made very famous by propaganda, I think that you should better know them.

282
मूळ

आणि मुखातरी आइकिजे । तैसे कायसे हे ओझे । मी चिद्रत्न तुझे । असता हाती ॥282॥

मराठी अर्थ

आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर, दुसऱ्याचे तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस, इतकी अडचण तुला कशास पाहिजे ?

English meaning

And when I am the Gem of Life available to you, where is the point in advising you to hear about them from somebody else's mouth?

283
मूळ

दर्पणु पुढा मांडलेया । का लोकांचिया डोळया । मानु द्यावा पहावया । आपुले निके ॥283॥

मराठी अर्थ

आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रुप पाहण्यात लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी ?

English meaning

When there is a mirror in front of you, where is the necessity of asking others how you look and thus giving their eyes the credit?

284
मूळ

भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ ते तेचि होत जाये । तो मी तुझे जाहालो आहे । खेळणे आजी ॥284॥

मराठी अर्थ

भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल, त्या ठिकाणी ती वस्तू मी त्यांच्या दृष्टीस पडतो, तो मी आज तुझे खेळणे झालो आहे. (हस्तगत झालो आहे. )

English meaning

I present myself in the way in which, and by the imagination with which, my devotee sees anything; and you have me here as a toy to play with.

285
मूळ

ऐसे हे प्रीतीचेनि वेगे । देवो बोलता से नेघे । तव आनंदामाजी आंगे । विरतसे येरु ॥285॥

मराठी अर्थ

असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही, तो इकडे पार्था आनंदात निमग्न होऊन गेला.

English meaning

While speaking thus ardently, the Lord Shrikrishna forgot himself, and Arjuna was simply merged in the blissful joy.

286
मूळ

चांदिणियाचा पडिभरु । होता सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हो पाहे जैसा ॥286॥

मराठी अर्थ

पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला, तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे.

English meaning

Just as in the moon-light, even a mountain of "Somakant" stone may dissolve and become a lake,

287
मूळ

तैसे सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतले अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥287॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे सुख व त्याचा अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले;

English meaning

In the same way, by removal of the wall between the happiness and the self-experience, Arjuna himself became the very image of happiness.

288
मूळ

तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धावा । जीवे केला ॥288॥

मराठी अर्थ

तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणार्‍या अर्जुनास वर काढले

English meaning

Then the Lord, in his natural omnipotence became conscious of the environment and himself; and started to pull Arjuna out of the sea of happiness.

289
मूळ

अर्जुना येसणे धेंडे । प्रज्ञा पसरेंसी बुडे । आले भरते एवढे । ते काढूनि पुढती ॥289॥

मराठी अर्थ

अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला, एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून,

English meaning

Though Arjuna was the most formidable intellectual, he was also carried away by the blissful stream of love but the Lord controlled that spate also and further said

290
मूळ

देवो म्हणे हा गा पार्था । तू आपणपे देख सर्वथा । तव श्वासूनि येरे माथा । तुकियेला ॥290॥

मराठी अर्थ

देव म्हणाले, ” पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये. ” तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलावली;

English meaning

"My dear Arjuna, do not become forgetful of your real nature as Atman." Listening to this Arjuna nodded and sighed.

291
मूळ

म्हणे जाणसी दातारा । मी तुजशी व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवो पाहे ॥291॥

मराठी अर्थ

आणि तो म्हणाला की, हे प्रभो, जो मी तुमच्या सान्निध्यास (द्वैतभावस त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे,

English meaning

Then he said, "O the most generous Lord! You know that I can hardly suffer this duality when we are so near each other, and am impatient to become one with you!

292
मूळ

तयाही हा ऐसा । लोभे देतसा जरी लालसा । तरी का जी घालीतसा । आड आड जीवा ? ॥292॥

मराठी अर्थ

आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.

English meaning

If you are very fond of my eagerness and are actually applauding me for it, then why are you again reminding me that I am a Jeeva different from you?"

293
मूळ

तेथ श्रीकृष्ण म्हणती निके । अद्यापि नाही मा ठाऊके । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणे आहे ? ॥293॥

मराठी अर्थ

तेव्हा श्रीकृष्णश्रीकृष्ण म्हणतात की, अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही, की चंद्र आणि प्रभा यांचा वियोग घडतो का ?

English meaning

Upon this, Shrikrishna said, "It seems that you have not understood this matter properly. Is the Moon and the moonlight different from each other?

294
मूळ

आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊ आम्ही भिवो । जे रुसता बांधे थांवो । ते प्रेम गा हे ॥294॥

मराठी अर्थ

आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.

English meaning

Further, we wish to tell you something really secret. We are inwardly afraid to show you our unity, and it is only because of my love for you that I tolerate you even though you are annoyed with me.

295
मूळ

एथ एकमेकांचिये खुणे । विसंवादु तवचि जिणे । म्हणौनि असो हे बोलणे । इयेविषयींचे ॥295॥

मराठी अर्थ

या ठिकाणी एकमेकांची खूणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय, म्हणून याविषयी वादविवाद पुरे.

English meaning

So long as this love between us is very keen, our bodies may be existing separately but it does not matter!

296
मूळ

मग कैशी कैशी ते आता । बोलत होतो पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसी ॥296॥

मराठी अर्थ

मग अर्जुना, आपण काय बरे बोलत होतो की, सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत, असेच ना ?

English meaning

O the son of Pandu, let as turn to our subject. I was telling you how all actions are separate and not connected to Atman.

297
मूळ

तव अर्जुन म्हणे देवे । माझिये मनीचेचि स्वभावे । प्रस्ताविले बरवे । प्रमेय ते जी ॥297॥

मराठी अर्थ

तेव्हा अर्जुन म्हणाला, ” देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला.

English meaning

Immediately Arjuna said, "O Lord, it is nice that you have introduced the question which was in my mind.

298
मूळ

जे सकळ कर्माचे बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली का ॥298॥

मराठी अर्थ

सर्व कर्मास कारणीभूत अशी पाच कारणे तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली;

English meaning

Because, is it not that you have yourself promised me to explain the group of five causes which are the seeds of all actions?

299
मूळ

आणि आत्मया एथ काही । सर्वथा लागु नाही । हे पुढारलासि ते देई । लाहाणे माझे ॥299॥

मराठी अर्थ

आणि आत्म्याचा कर्माची काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता, ते माझे आवडते मला द्या, “

English meaning

And you have also to explain to me your statement that Atman is not connected to actions."

300
मूळ

यया बोला विश्वेशे । म्हणितले तोषे बहुवसे । इयेविषयी धरणे बैसे । ऐसे के जोडे ? ॥300॥

मराठी अर्थ

हे बोलणे ऐकून भगवान अति संतोष आणि म्हणाले, ” याविषयी तू धरणे घेऊन बसलास, असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे ?

English meaning

Here, the Lord of the Universe was glad to say, "My dear, where is there any such listener who is so keen about this subject?

301
मूळ

तरी अर्जुना निरूपिजेल । ते कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥301॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो. कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे “

English meaning

Therefore, be sure, what was promised will be definitely explained, but obligations on you will then be heavier, because of love."

302
मूळ

तव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोठीस की राखत आहो । मी तू पण जी ? ॥302॥

मराठी अर्थ

तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरलास काय ? आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता ?

English meaning

Arjuna said, "O Lord, did you forget what we talked about earlier? It is for this love that we are maintaining the separate identities as two persons.

303
मूळ

एथ श्रीकृष्ण म्हणती हो का । आता अवधानाचा पसरु निका । करूनिया आइका । पुढारलो ते ॥303॥

मराठी अर्थ

तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर, आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती, ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक.

English meaning

The Lord Shrikrishna said- "Is it so? Then please listen with total attention to how I am going to fulfil my promise.

304
मूळ

तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणी पांचे ॥304॥

मराठी अर्थ

तर हे धनुर्धरा, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पांच कारणांनी परभारे होते.

English meaning

O the great Archer! It is true that all actions take place ``out and out,'' by the five causes, without the knowledge of the Atman.

305
मूळ

आणि पांच कारण दळवाडे । जिही कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥305॥

मराठी अर्थ

आणि ज्या या पांच कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो, तीच पांच कारणे त्या कर्मास हेतू असतात.

English meaning

And the reasons by which all the actions are done because of these factors, are also variegated.

306
मूळ

येर आत्मतत्त्व उदासीन । ते ना हेतु ना उपादान । ना ते अंगे करी संवाहन । कर्मसिद्धीचे ॥306॥

मराठी अर्थ

दुसऱ्या जो आत्मा, उदासीन असून कर्माला निमित्तकारण किंवा उपादानकारण नसतो, अथवा तो स्वत: कर्माला करीत नाही

English meaning

The Atman is quite a different factor who is neither the purpose or reason nor the cause of these actions.

307
मूळ

तेथ शुभाशुभी अंशी । निफजती कर्मे ऐसी । राती दिवो आकाशी । जियापरी ॥307॥

मराठी अर्थ

त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ करणे अशा रीतीने होतात की, रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते;

English meaning

Just as day and night appear in the sky which is aloof, similarly good and bad actions are taking place apparently on the Atman but unrelated to it.

308
मूळ

तोय तेज धूमु । यया वायूसी संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम ते नेणे ॥308॥

मराठी अर्थ

पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते;

English meaning

Water, heat and smoke are brought together by air; and clouds appear but the sky is not at all aware or cognizant of them.

309
मूळ

नाना काष्ठी नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळे । उदक ते साक्षी ॥309॥

मराठी अर्थ

पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवितो; परंतु त्या ठिकाणी उदक जसे काहीएक न करिता साक्षीभूत असते;

English meaning

A boat is made of wood. The boatman rows it and the air also helps to move it; but water is there only as a witness.

310
मूळ

का कवणे एके पिंडे । वेचिता अवतरे भांडे । मग भवंडीजे दंडे । भ्रमे चक्र ॥310॥

मराठी अर्थ

किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर त्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते;

English meaning

Or a potter takes in his hands a lump of clay, it is shaped as a pot which is moved by the pole in the process, in which the potter's wheel also rotates.

311
मूळ

आणि कर्तृत्व कुलालाचे । तेथ काय ते पृथ्वीयेचे । आधारावाचूनि वेचे । विचारी पा । ॥311॥

मराठी अर्थ

तर याठिकाणी कुंभाराच्या ठिकाणी कुंभाराच्या कसबा शिवाय भांड्यात कसबाशिवाय भांड्यास आधारावाचून पृथ्वीचे दुसरे कोणते सहाय्य मिळते याचा विचार कर.

English meaning

But the potter is the doer here. Does the earth has any job to do in this process except being the base? Please think about this.

312
मूळ

हेहि असो लोकांचिया । राहाटी होता आघविया । कोण काम सवितया । आंगा आले ? ॥312॥

मराठी अर्थ

हेही असो; परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असता ही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो,

English meaning

Now, let this be! People go about their work of all kinds in the sunlight, but what job has the Sun to do?

313
मूळ

तैसे पांचहेतुमिळणी । पांचेचि इही कारणी । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥313॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे पाच कारणे मिळाल्याने सर्व करमणूक वेलाची मांडणूक होते व आत्मा हा वेगळाच असतो.

English meaning

Similarly when the five purposes are there, the five causes sow the creeper called by the name "Action." But Atman is quite uninterested.

314
मूळ

आता तेचि वेगळाली । पांचही विवंचू गा भली । तुकोनि घेतली । मोतिये जैसी ॥314॥

मराठी अर्थ

आता ती पाच कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळाली वर्णन करून सांगतो. मोत्ये ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात.

English meaning

And now we will analyse and discuss these five as accurately as we purchase pearls by carefully weighing them.

315
मूळ

तैसी यथा लक्षणे । आइके कर्म-कारणे । तरी देह हे मी म्हणे । पहिले एथ ॥315॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे, कर्माचा कारणांची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती एक. तर देह पहिले कारण होय, असे मी म्हणतो.

English meaning

Please listen to their signs also. The body is the first cause here, according to my opinion.

316
मूळ

ययाते अधिष्ठान ऐसे । म्हणिजे ते याचि उद्देशे । जे स्वभोग्येसी वसे । भोक्ता येथ ॥316॥

मराठी अर्थ

या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की, भोग जे विषय, त्यासहवर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो.

English meaning

This is called the 'Place' because the enjoyer lives here with the objects of his enjoyment.

317
मूळ

इंद्रियांच्या दाहे हाती । जाचोनिया दिवोराती । सुखदुःखे प्रकृती । जोडीजती जिये ॥317॥

मराठी अर्थ

इंद्रियांच्या दहा हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःख उत्पन्न होतात,

English meaning

Where, for all the pains and pleasures brought through the ten hands of ten organs from the surrounding nature, the Purusha ( the bearer of the body, the Jeeva) has this only place to suffer or enjoy them and not elsewhere. Therefore the body is called the "Place."

318
मूळ

तिये भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाही देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥318॥

मराठी अर्थ

ती भोगण्याकरिता दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात.

English meaning

Where, for all the pains and pleasures brought through the ten hands of ten organs from the surrounding nature, the Purusha ( the bearer of the body, the Jeeva) has this only place to suffer or enjoy them and not elsewhere. Therefore the body is called the "Place."

319
मूळ

हे चोविसाही तत्वाचे । कुटुंबघर वस्तीचे । तुटे बंधमोक्षाचे । गुंथाडे एथ ॥319॥

मराठी अर्थ

हे चोवीस तत्त्वाचे वस्तीस्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो.

English meaning

This body is the joint home for all the twenty four elements of Nature to live together and the question of bondage or freedom is solved here only.

320
मूळ

किंबहुना अवस्थात्रया । हे अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेचि नाम ॥320॥

मराठी अर्थ

फार काय ? परंतु जागृती, स्वप्न व सुषुप्ती याचे हे मुख्य ठिकाण होय, म्हणून धनंजया, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे.

English meaning

Or, O Dhananjaya, this body is called the place because it is the base on which the three stages of life namely the childhood, the youth and the oldage appear.

321
मूळ

आणि कर्ता हे दुजे । कर्माचे कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचे जे ॥321॥

मराठी अर्थ

आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे होय आणि यालाच चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात.

English meaning

The doer or the factor who acts, the agent is the second cause of action. He is actually a reflection of life energy (Chaitanya), or the spirit.

322
मूळ

आकाशचि वर्षे नीर । ते तळवटी बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवी ॥322॥

मराठी अर्थ

आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते;

English meaning

This is like the following example. The sky is from where it rains, the rain water forms a pool on earth and the sky is reflected in that poolwater.

323
मूळ

का निद्राभरे बहुवे । राया आपणपे ठाउवे नव्हे । मग स्वप्नीचिये सामावे । रंकपणी ॥323॥

मराठी अर्थ

किंवा निद्रेच्या भारत राजा आपले ऐश्वर्या विसरून स्वप्नात भिकारी झालो आहो असे समजतो

English meaning

Or like a king who forgets his royal status in a dream, and in the dream-experience, he sees that he is a beggar and thinks likewise.

324
मूळ

तैसे आपुलेनि विसरे । चैतन्यचि देहाकारे । आभासोनि आविष्करे । देहपणे जे ॥324॥

मराठी अर्थ

तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहाच मी असे मानून देहरूपाने प्रगट होते.

English meaning

Similarly the spirit, by forgetting its reality, takes up the fictitious form and limited life of a body and is expressed in that body only.

325
मूळ

जया विसराच्या देशी । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणे भाष केली देहेसी । आघवाविषयी ॥325॥

मराठी अर्थ

ज्यात देहात आत्मरुपाचा विसर पडतो, तेथे चैतन्य ‘ जीव’ या नावाने प्रसिद्ध आहे व त्या जीवाने देहाला मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही, असे वचन दिले आहे. की ही

English meaning

And now, he who is named as Jeeva, by forgetting his Reality, and who is as if bound by a covenant to be with the body in everything and in every condition,

326
मूळ

प्रकृति करी कर्मे । ती म्या केली म्हणे भ्रमे । येथ कर्ता येणे नामे । बोलिजे जीवु ॥326॥

मराठी अर्थ

देहाकडून जी जी कर्मे होतात, ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात.

English meaning

Says by delusion that he has performed all actions which are actually the functions of the Nature itself, and thus he is called the "doer" as one of the causes of action.

327
मूळ

मग पातेयांच्या केशी । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥327॥

मराठी अर्थ

मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसांमुळे चवरीच्या केसांप्रमाणे चिरल्यासारखी दिसते;

English meaning

Then as the eyesight though actually homogeneous one, appears to be divided like the threads of a hairy fan because the little hair on the follicles affect it in that way.

328
मूळ

का घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदे अनेकु । आवडे जेवी ॥328॥

मराठी अर्थ

अथवा घरात असलेला एकच दिवा पाहिला असता, जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात;

English meaning

And just as the light coming from only one source of lamp kept in a room, appears to be many lights through the various windows of the room,

329
मूळ

का एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवा रसा । नवविधु ऐसा । आवडो लागे ॥329॥

मराठी अर्थ

किंवा एकच पुरुष असून शृंगार, वीर, करुण, इत्यादी नवरसांचे अविर्भाव दाखवू लागला, म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा वाटू लागतो,

English meaning

Or just as one single man appears to be different men according to the moods he expresses like love, anger, fear, fearsomeness, pathos, etc., while enacting such roles;

330
मूळ

तेवी बुद्धीचे एक जाणणे । श्रोत्रादिभेदे येणे । बाहेरी इंद्रियपणे । फाके जे का ॥330॥

मराठी अर्थ

तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादि इंद्रियांच्या निराळीपणाने बाहेर येऊ लागते.

English meaning

Similarly, one single quality of knowing, which is the quality of intellect, becomes expressed in various ways through the organs of hearing, seeing, smelling, touching and tasting.

331
मूळ

ते पृथग्विध करण । कर्माचे इया कारण । तिसरे गा जाण । नृपनंदना ॥331॥

मराठी अर्थ

हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय, असे समज;

English meaning

These organs are the third cause or means for "action" here, which, O the prince, you should understand properly.

332
मूळ

आणि पूर्वपश्चिमवाहणी । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवी ॥332॥

मराठी अर्थ

आणि पूर्व-पश्चिम वाहिनी नद्या वहात वहात समुद्रास मिळाल्यावर त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात

English meaning

And just as water flowing through the streams going in various directions is only one water when it meets sea;

333
मूळ

तैसी क्रियाशक्ति पवनी । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानी । नाना होय ॥333॥

मराठी अर्थ

तशी रजोगुणाची कर्तृत्वशक्ती जी संपादनकेल्या शिवाय प्राणवायूत मूळचीच आहे, ती निरनिराळया अवयवांत निरनिराळी भासते.

English meaning

Similarly, energy of action which is one only in the wind, becomes variously expressed when it falls into various respective places.

334
मूळ

जै वाचे करी येणे । तै तेचि होय बोलणे । हाता आली तरी घेणे । देणे होय ॥334॥

मराठी अर्थ

जेव्हा ती वाच्याद्वारे बाहेर पडते, तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात.

English meaning

When it enters the speech, it speaks and when it enters the hand, it does the work of giving and taking.

335
मूळ

अगा चरणाच्या ठायी । तरी गति तेचि पाही । अधोद्वारी दोही । क्षरणे तेचि ॥335॥

मराठी अर्थ

अरे, जी पायात आली असता गती असे म्हणतात व मलमूत्राद्वारे आली असता क्षालन असे म्हणतात,

English meaning

And in the feet it becomes the movement of walking and when it enters the lower abdomen it functions as the work of ejecting and throwing out excreta, urine, etc.

336
मूळ

कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करिता तेचि शरीरी । प्राणु म्हणिजे ॥336॥

मराठी अर्थ

नाभीपासून हृदयापर्यंत ॐकाराची शरीरात वृद्धी बुद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात.

English meaning

From the navel upto the heart it functions as Prana or breath and so it is called as the vital breath in the body.

337
मूळ

मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पै गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥337॥

मराठी अर्थ

मग वर जो श्वासोश्वास जातो; त्यात शक्तीला उदान (कंठस्थ वायु) असे नाव प्राप्त होते;

English meaning

When it reaches the higher parts of the body, it is called "Udana";

338
मूळ

अधोरंध्राचेनि वाहे । अपानु हे नाम लाहे । व्यापकपणे होये । व्यानु तेचि ॥338॥

मराठी अर्थ

व गुदद्वाराने आणि बाहेर येऊ लागली म्हणजे अपान (गुदस्थ वायु) हे नाव प्राप्त होते, आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता (व्यान) (शरीरस्थ वायु) असे म्हणतात.

English meaning

While in the lower orifices it works as Apana and when it permeates the whole body it is called Vyana.

339
मूळ

आरोगिलेनि रसे । शरीर भरी सरिसे । आणि न सांडिता असे । सर्वसंधी ॥339॥

मराठी अर्थ

खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते;

English meaning

When it fills the whole body by the juices of digested food, it is also functioning in all the joints,

340
मूळ

ऐसिया इया राहटी । मग तेचि क्रिया पाठी । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥340॥

मराठी अर्थ

अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून ह्या शक्तीस नंतर समान म्हणजे (नाभिस्थ वायु) असे म्हणतात.

English meaning

And in this field of activity within the whole body, O the crowned one, it is called as 'Samaana'.

341
मूळ

आणि जांभई शिंक ढेकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥341॥

मराठी अर्थ

आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात ते नाग, कूर्म, कृकर, इत्यादी उपप्राणांचे होतं.

English meaning

When yawning, sneezing, belching etc. symptoms appear, the same wind which causes these is called either Naga, Koorma and Krukara, etc.

342
मूळ

एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥342॥

मराठी अर्थ

हे सुभटा, याप्रमाणे सर्व वायूंचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनात प्रमाणे नावात बदल होतो.

English meaning

O the great warrior! Though these activities are of one Vayu, (wind, gas) only, they get various names according to the place where they are.

343
मूळ

ते भेदली वृत्तिपंथे । वायुशक्ति गा एथे । कर्मकारण चौथे । ऐसे जाण ॥343॥

मराठी अर्थ

अशी जी आपापल्या व्यापाराने वायूंची शक्ती निरनिराळी होते, ते कर्माचे चौथे कारण होय, असे समज.

English meaning

This power or energy of the wind which is of various kinds, is the fourth cause of action here.

344
मूळ

आणि ऋतु बरवा शारदु । शारदी पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥344॥

मराठी अर्थ

आणि शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा;

English meaning

Now about the Divine plan. You see, the Sharad season which is a pleasant one is also endowed with Moon which becomes full on the full Moon night, thus the beauty of the season is enhanced.

345
मूळ

का वसंती बरवा आरामु । आरामीही प्रियसंगमु । संगमी आगमु । उपचारांचा ॥345॥

मराठी अर्थ

अथवा वसंत ऋतु असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत प्रिय मनुष्यांचा सहवास आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांची अनुकूलता असावी;

English meaning

Secondly, a good pleasure-garden is better in the spring season, and if a company of the loved one is there, it is still better and best is the availability of all kinds of pleasures there.

346
मूळ

नाना कमळी पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासीही यावा । परागाचा ॥346॥

मराठी अर्थ

अथवा अर्जुना, कमळ असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूंचा उद्भव व्हावा;

English meaning

And O Pandava, blossoming is a better stage in the case of a lotus and still better is the fragrance and the beautiful pollen. (attracting black-bees)

347
मूळ

वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्शु जैसा ॥347॥

मराठी अर्थ

एखाद्याचे वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी,

English meaning

Poetic skill is better in language, but power of appreciation and loving nature is still better, while a touch of genius, the 'otherness' enhances the quality of both these.

348
मूळ

तैसी सर्ववृत्तिवैभवी । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥348॥

मराठी अर्थ

तसेच, सर्व वृत्तीच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी, ती उत्तम प्रकारची असून तशांत सर्व इंद्रिये ही तिला अनुकूल असावी;

English meaning

Similarly, intellect is supreme in the inner faculties, it shines further if it is supported by organs which are very sensitive.

349
मूळ

इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जै अधिष्ठात्रिया का मेळा । देवतांचा जो ॥349॥

मराठी अर्थ

आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा त्या इंद्रियांच्या देवतांचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा,

English meaning

But better still it is if the deities presiding over these organs are benedictary.

350
मूळ

म्हणौनि चक्षुरादिकी दाहे । इंद्रिया पाठी स्वानुग्रहे । सूर्यादिका का आहे । सुरांचे वृंद ॥350॥

मराठी अर्थ

म्हणूनच चक्षुरादी दहा इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादि देवांच्या समुदायाचा अनुग्रह,

English meaning

Because there are deities like Sun for the eyes, who control and empower all the organs by their blessings,

351
मूळ

ते देववृंद बरवे । कर्मकारण पांचवे । अर्जुना एथ जाणावे । देवो म्हणे ॥351॥

मराठी अर्थ

तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे. देव म्हणतात:- समजलास अर्जुना ?

English meaning

The "hosts of gods" is the fifth cause for action, which, O Arjuna, you should know- so said the Lord. (Note- These deities are working according to god's plan for the world).

352
मूळ

एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णी । निरूपिली ॥352॥

मराठी अर्थ

याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीस ना ?

English meaning

Thus I have told you the five faced mine or source of actions, in a way that you will understand, which you have heard.

353
मूळ

आता हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिही ते हेतुही उघडे । दाऊ पांचै ॥353॥

मराठी अर्थ

आता या हेतूंच्या योगे ही कर्म घडतात, ते पाच हेतू तुला उघड करून सांगतो.

English meaning

Now I shall tell you the five reasons or purposes of actions which come to play their role as these five causes further develop.

354
मूळ

तरी अवसात आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवी । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळाते ॥354॥

मराठी अर्थ

तर अकस्मात वसंत ऋतु प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते, पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळी निर्माण होतात;

English meaning

My dear, with the advent of spring, the trees have new tender leaves, then there are bunches of flowers and further, the fruit is also borne!

355
मूळ

का वार्षिये आणिजे मेघु । मेघे वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥355॥

मराठी अर्थ

अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात, मेघांपासून पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टी पासून धान्य उत्पन्न होते;

English meaning

The rainy season brings clouds, by clouds there is rain and because of rain, there is the pleasure of plenty of crop.

356
मूळ

नातरी प्राची अरुणाते विये । अरुणे सूर्योदयो होये । सूर्ये सगळा पाहे । दिवो जैसा ॥356॥

मराठी अर्थ

किंवा पूर्वेस अरुणोदय होतो, अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकार झाला म्हणजे दिवस होतो,

English meaning

The east brings the dawn, the dawn presided by god Arun, brings the sun on the horizon and by sun, the whole day is brought forth.

357
मूळ

तैसे मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥357॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्याच कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो,

English meaning

Similarly, O Pandava, mind creates the plan of action, and by that wish, the lamp of speech is lit.

358
मूळ

मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजाताचिया वाटा । तेव्हा कर्ता रिगे कामठा । कर्तृत्वाच्या ॥358॥

मराठी अर्थ

मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते, तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो,

English meaning

Then that lamp of speech shows clearly the way of doing all actions, and then the doer starts the action.

359
मूळ

तेथ शरीरादिक दळवाडे । शरीरादिका हेतुचि घडे । लोहकाम लोखंडे । निर्वाळिजे जैसे ॥359॥

मराठी अर्थ

तेव्हा शरीरादिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास त्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावा लागतो,

English meaning

In this whole process, the body and organs themselves produce the body and organs, just as by iron hardware instruments, iron articles are made.

360
मूळ

का तांथुवाचा ताणा । तांथु घालिता वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥360॥

मराठी अर्थ

अथवा तंतूंच्या मागांत (मार्गात) तंतू आडवे घातले म्हणजे त्या तंतूंचे वस्त्र होते;

English meaning

Or just as the threads add themselves in the weaving of cloth by the vertical and horizontal lines and themselves become the cloth.

361
मूळ

तैसे मनवाचादेहाचे । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नी घडे रत्नाचे । दळवाडे जेवी ॥361॥

मराठी अर्थ

जसे हिऱ्याला पैलू पाडावयाचे ते हिर्‍यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे.

English meaning

Similarly, actions of the mind, speech and the body themselves become the cause of all these, namely the mind, the speech and the body.

362
मूळ

एथ शरीरादिके कारणे । तेचि हेतु केवी हे कोणे । अपेक्षिजे तरी तेणे । अवधारिजो ॥362॥

मराठी अर्थ

या ठिकाणी, कर्माची शरीरादिक कारणे, तीच त्यांना हेतू कशी होतील. अशी जर कोणी शंका घेईल, तर सांगतो, ऐक.

English meaning

Now if anybody asks- "How can the body, etc., which are the causes, themselves become the reasons for bringing about themselves?"- then he may listen to the following explanation.

363
मूळ

आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । का ऊसाचे कांडे ऊसा । वाढी हेतु ॥363॥

मराठी अर्थ

हे पहा, सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्यच हेतू व कारण आहे, किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे;

English meaning

Sir, is not Sun the cause of the light and is he not seen because of that same light? Similarly, the growth of one and the next parts of sugarcane is the growth of the whole sugarcane.

364
मूळ

नाना वाग्देवता वानावी । तै वाचाचि लागे कामवावी । का वेदा वेदेचि बोलावी । प्रतिष्ठा जेवी ॥364॥

मराठी अर्थ

अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम करावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाची असल्यास ती वेदांनीच करावी लागते,

English meaning

If the deity of speech is to be praised, we have to employ the speech only in that work or if we have to say anything about the greatness of the Vedas, the Vedic hymns are only useful to do it.

365
मूळ

तैसे कर्मा शरीरादिके । कारण हे कीर ठाउके । परी हेचि हेतु न चुके । हेही एथ ॥365॥

मराठी अर्थ

तसे कर्माला शारीरादि हीच कारणे होत. हे सर्वास माहीत आहे; परंतु या ठिकाणी शारीरादिकच कर्मास हेतूही आहेत यात शंका नाही.

English meaning

Similarly we definitely know that body etc. are the causes for actions, but it is also true that they themselves are the reasons for the actions.

366
मूळ

आणि देहादिकी कारणी । देहादि हेतु मिळणी । होय जया उभारणी । कर्मजाता ॥366॥

मराठी अर्थ

आणि देहादिक अधिष्ठानाला देहादिकच हेतू आहेत व ज्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते,

English meaning

And the actions which arise out of the body etc. as causes; and become themselves the body etc. as a result,

367
मूळ

ते शास्त्रार्थे मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥367॥

मराठी अर्थ

ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले, तर हे धनंजया, ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात; आणि त्याचा हेतूही न्यायच होय.

English meaning

They become all very proper and justifiable, if all are performed according to the rules in the scriptures and also become themselves the ideals of justice.

368
मूळ

जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपाये धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥368॥

मराठी अर्थ

जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लावले, तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो;

English meaning

The storm waters flow towards the paddy field and are absorbed in the earth there, but they become greatly beneficial, in the form of grains.

369
मूळ

का रोषे निघाले अवचटे । पडिले द्वारकेचिया वाटे । ते शिणे परी सुनाटे । न वचिती पदे ॥369॥

मराठी अर्थ

अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला, तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही,

English meaning

Or, an angry man leaves his home in a fit of anger and luckily turns in the direction of Dwarka (which is a sacred place of pilgrimage). His feet will be tired, no doubt; but not in vain! (Because he may reach Dwarka!)

370
मूळ

तैसे हेतुकारण मेळे । उठी कर्म जे आंधळे । ते शास्त्राचे लाहे डोळे । तै न्याय म्हणिपे ॥370॥

मराठी अर्थ

तशी हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते, तेच जर सशास्त्र होईल; तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे.

English meaning

Similarly, if action is born out of the unity of cause and effect ( or result or aim) that action is blind, but if it has the vision of scriptural sanction, then that action should be called a just action.

371
मूळ

ना दूध वाढिता ठावो पावे । तव उतोनि जाय स्वभावे । तोही वेचु परी नव्हे । वेचिले ते ॥371॥

मराठी अर्थ

अथवा एका भांड्यात दूध ब्राह्मणास वाटून संपले णि दुसर्‍या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले, तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेले दूध खर्च झाले, (कारणी लागले) असे म्हणता येत नाही,

English meaning

Otherwise, milk is spilt outside the pot when it is being poured. In this case milk from the pot in our hand is wasted, but it cannot be justifiably said to be 'used'. It is wasted only.

372
मूळ

तैसे शास्त्रसाह्येवीण । केले नोहे जरी अकारण । तरी लागो का नागवण । दानलेखी ॥372॥

मराठी अर्थ

तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केले तर ते जर व्यर्थ होणार नाही, तर दरवड्या गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये ?

English meaning

Similarly if action performed without following proper directives of the scriptures is to be called proper and not to be considered as wasted, then why should we not debit to the "Charities" account, the property robbed by the robbers? No, that will be a mistake!

373
मूळ

अगा बावन्ना वर्णापरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । का बावन्नही नुच्चारिता । जीवु आथी ? ॥373॥

मराठी अर्थ

अर्जुना, बावन्न वर्णविरहित कोणता मंत्र आहे ? अथवा बावन्न वर्णा पैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोण प्राणी सापडेल ?

English meaning

You may consider any Mantra. It is not having letters beyond the root alphabets (52 in case of Marathi) and is there any human being who has not uttered these alphabets one day or the other?

374
मूळ

परी मंत्राची कडसणी । जव नेणिजे कोदंडपाणी । तव उच्चारफळ वाणी । न पवे जेवी ॥374॥

मराठी अर्थ

परंतु अर्जुना, जो पर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही, तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोचाराची फलप्राप्ती होणार नाही,

English meaning

But; O the wielder of the Bow, so long as the significance of the Mantra is not understood, the speaker of all the alphabets is not going to get the promised benefit of that Mantra.

375
मूळ

तेवी कारणहेतुयोगे । जे बिसाट कर्म निगे । ते शास्त्राचिये न लगे । कासे जव ॥375॥

मराठी अर्थ

त्या प्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते, ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही,

English meaning

Similarly any stray action which takes place with the dovetailing of the cause and the reason, so long as it does not follow the instructions of the scriptures, it is-

376
मूळ

कर्म होतचि असे तेव्हांही । परी ते होणे नव्हे पाही । तो अन्यायो गा अन्यायी । हेतु होय ॥376॥

मराठी अर्थ

तेव्हाही कर्म हे घडतच असते; पण बाबा रे, ते घडणे नव्हे; ते पाप कर्म असून पापकर्माला हेतू आहे.

English meaning

No doubt taking place as normally any action takes place; but it is not the true action. Actually such an action is born of injustice and it produces injustice only.

377
मूळ

एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आता एथे पाहे पा आत्मा । सापडला असे ? ॥377॥

मराठी अर्थ

अशा प्रकारे, हे सुमहिमा, कर्माच्या पांच कारणास पांच हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय, सांग बरे ?

English meaning

O the man of great fame; when the actions are thus caused by five factors, and have five reasons or purposes and Atman is caught here,

378
मूळ

भानु न होनि रूपे जैसी । चक्षुरूपाते प्रकाशी । आत्मा न होनि कर्मे तैसी । प्रकटित असे गा ॥378॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे सूर्य हा स्वत: विषय न होता नेत्रादी पांच इंद्रियांचे विषय प्रगट करतो, त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाराकडून ती ती प्रकाशित करतो;

English meaning

As the Sun rays which do not take any form, show the eyes as well as the objects to be seen by them, similarly Atman does not do any actions but makes them manifest.

379
मूळ

पै प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहीते प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥379॥

मराठी अर्थ

हे बघ अर्जुना, आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहिला प्रकाशित करतो;

English meaning

O the bravest one, just as the man who sees, does not become the mirror nor the reflection in the mirror, but can visualize both.

380
मूळ

का अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥380॥

मराठी अर्थ

किंवा हे पंडुसुता, सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलित असतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते, तरी तो कर्मकर्ता नाही असे दाखवितो.

English meaning

Or the Sun does cause the day and night without himself experiencing both. Similarly, O the son of Pandu, Atman does not act but actions only appear on him.

381
मूळ

परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहीचि आतली । तया आत्मविषयी जाली । मध्यरात्री गा ॥381॥

मराठी अर्थ

परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की खात्री झाली आहे, त्याला आपल्या स्वरूपाची मध्यरात्र झाली आहे.

English meaning

But, for a man whose intellect is confined only to the body because he foolishly thinks himself only as a body; it is simply a dark night of ignorance as regards Atman

382
मूळ

जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केले परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥382॥

मराठी अर्थ

ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे, त्याला आत्म कर्ता आहे अशी बुद्धी होणे अगदी साहजिक आहे.

English meaning

He who has limited the spirit, the god and the Brahman to the narrow limits of his physical body, thinks with all his conviction that Atman is the doer!

383
मूळ

आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाही तत्वता । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥383॥

मराठी अर्थ

आत्मा हा कर्म कर्ता आहे असाही पक्का निश्चय जो करीत नाही, तो खरोखरच देहालाच कर्मकर्ता असे मानतो.

English meaning

Even he does not think that definitely Atman is the doer. He thinks he is the body and he as body is the doer of action.

384
मूळ

जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कही मातु । नायकेचि कानी ॥384॥

मराठी अर्थ

कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे, अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कारणानेही कवी ऐकत नाही;

English meaning

This is because he has never even heard the statement that "I am the Atman, the witness of all actions, and I am neutral there; I am Atman."

385
मूळ

म्हणौनि उमपा आत्मयाते । देहचिवरी मविजे एथे । विचित्र काई रात्रि दिवसाते । डुडुळ न करी ? ॥385॥

मराठी अर्थ

म्हणून सर्वव्यापक असा जो आत्मा, तो देहच होय असे तो मानतो. काय चमत्कार पहा, की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय ?

English meaning

So, what wonder is there that he thinks that the body is all the spirit that there is! Does not owl make a dark night of a clear sunny day?

386
मूळ

पै जेणे आकाशीचा कही । सत्य सूर्यु देखिला नाही । तो थिल्लरींचे बिंब काई । मानू न लाहे ? ॥386॥

मराठी अर्थ

हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्यास कधी पाहिले नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबास सूर्य समजत नाही काय ?

English meaning

He who has never seen the brilliant Sun in the sky will most normally think that the Sun's reflection in a little shallow puddle of water is the Sun; and why should he not?

387
मूळ

थिल्लराचेनि जालेपणे । सूर्यासि आणी होणे । त्याच्या नाशी नाशणे । कंपे कंपू ॥387॥

मराठी अर्थ

डबक्‍यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो, तेच पाणी वाऱ्याने हालले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो,

English meaning

For him, the Sun is born with the formation of that water pit, Sun dies when the pit dries up and Sun trembles when little ripples appear on that water!

388
मूळ

आणि निद्रिस्ता चेवो नये । तव स्वप्न साच हो लाहे । रज्जु नेणता सापा बिहे । विस्मो कवण ? ॥388॥

मराठी अर्थ

आणि निजलेला जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते; यालाही दोरी आहे हे कळत नाही, तो तिला समजून भितो, यात नवल ते कोणते ?

English meaning

What wonder is there that so long as the man does not wake up, he thinks that the dream is real, and the man who does not realize that there is only a rope fears at the delusion that it is a serpent?

389
मूळ

जव कवळ आथि डोळा । तव चंद्रु देखावा की पिवळा । काय मृगीही मृगजळा । भाळावे नाही ? ॥389॥

मराठी अर्थ

जोपर्यंत काळी झालेली आहे, तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे, मृगजलाला भुलू नये, तर मग कोणी भुलावे ?

English meaning

Is it not natural that the moon appears to be yellow to a man suffering from jaundice, and that the deers see the mirage as real water and are deluded?

390
मूळ

तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेको नेदी सिवे । केवळ मौढ्याचेनिचि जीवे । जियाला जो ॥390॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे शास्त्र व गुरू याची नावे उच्चारल्याबरोबर तो त्याचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही. कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो,

English meaning

Similarly, he who does not even allow a small breeze of wind to bring to his ears the name of scripture or of Guru; and is living only in his stupidity,

391
मूळ

तेणे देहात्मदृष्टीमुळे । आत्मया घापे देहाचे जाळे । जैसा अभ्राचा वेगु कोल्हे । चंद्री मानी ॥391॥

मराठी अर्थ

अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याचेवर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहात आत्मा आहे, अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे.

English meaning

Thinks that there is net of the body which is true and not Atman, just as the foxes think that clouds are not moving but the moon is moving.

392
मूळ

मग तया मानणयासाठी । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगाठी । कळासे तो ॥392॥

मराठी अर्थ

मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो

English meaning

And then with this fixed concept, he is confined in the strong jail of the body-identity, tied tightly by the rope of Karma. (totality of action and its bondage)

393
मूळ

पाहे पा बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥393॥

मराठी अर्थ

अरे, हे पहा, बिचारा राघो (पोपट) नळीवर वर बसलेला असतो, तो मी बांधला गेलो आहे, अशा दृढ कल्पनेने आपल्या मोकळ्या पायाचा पंजा मोकळा असूनही ती नळी सोडत नाही,

English meaning

A parrot is caught on a movable metal rung by the hunters. Does not that parrot hold fast to that rung though it can very well fly away if at all it lets it go?

394
मूळ

म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपी । तो प्रकृतीचे केले आरोपी । तो कल्पकोडीच्या मापी । मवीचि कर्मे ॥394॥

मराठी अर्थ

म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो, तो कल्प कोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. येथून पुढच्या श्लोकास अवतरण देतात.

English meaning

Thus he who superimposes all the actions (which are functions of the Maya) falsely on the Atman, is really measuring his sins by millions of measures!

395
मूळ

आता कर्मामाजी असे । परी तयाते कर्म न स्पर्शे । वडवानळाते जैसे । समुद्रोदक ॥395॥

मराठी अर्थ

आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, जसा वडवानळ हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही,

English meaning

Now just as sea-water cannot touch the fire in the sea, there is a man who is surrounded by all sorts of actions but is not touched by them.

396
मूळ

तैसेनि वेगळेपणे । जयाचे कर्मी असणे । तो कीर वोळखावा कवणे । तरी सांगो ॥396॥

मराठी अर्थ

तसे जो अलिप्तपणे कर्म करीत असतो, तो खरोखर कसा ओळखावा, ते सांगतो.

English meaning

How is he who lives so aloof, to be recognized? I shall tell you.

397
मूळ

जे मुक्ताते निर्धारिता । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपे दिसे पाहता । आपली वस्तु ॥397॥

मराठी अर्थ

मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली वस्तू आपल्याला दिसते;

English meaning

This is because while thinking about the signs of a free person, we ourselves become free. Just as while searching with the help of light, a lost thing is suddenly found,

398
मूळ

नातरी दर्पणु जव उटिजे । तव आपणपया आपण भेटिजे । का तोय पावता तोय होईजे । लवणे जेवी ॥398॥

मराठी अर्थ

अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपणास दिसते किंवा मिठ पाण्यात घातले असते त्याचे पाणी होते;

English meaning

Or the more we wipe clean the mirror by rubbing ash etc.; clearer is our reflection in it or just as salt becomes one with water simply by its contact;

399
मूळ

हे असो परतोनि मागुते । प्रतिबिंब पाहे बिंबाते । तव पाहणे जाउनी आयिते । बिंबचि होय ॥399॥

मराठी अर्थ

फार काय; प्रतिबिंब मागे परतून आपल्या बिंबाला जो पाहू लागते तो त्याचे पाहणेपणही जाऊन ते सहजच बिंबच बनते.

English meaning

Or, in other words, suppose the reflection looks back at the object, it becomes the object and the seeing itself disappears.

400
मूळ

तैसे हारपले आपणपे पावे । तै संतांते पाहता गिंवसावे । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥400॥

मराठी अर्थ

तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते; म्हणून संतांचे नेहमी वर्णन करावे व त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे.

English meaning

Similarly when we want to find out ourselves again, we can do so by looking at the saints, and we should praise them and hear about them at all times.

401
मूळ

परी कर्मी असोनि कर्मे । जो नावरे समें=विषमे । चर्मचक्षूंचेनि चामे । दृष्टि जैसी ॥401॥

मराठी अर्थ

परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही;

English meaning

So, there is such a man who is not bound by actions though he performs actions just as the delicate skin of the eyes does not prevent the sight.

402
मूळ

तैसा सोडवला जो आहे । तयाचे रूप आता पाहे । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगो ॥402॥

मराठी अर्थ

तसा तो कर्मातीत झाला आहे; त्याची लक्षणे तुला युक्तीने बाहू उभारुन सांगतो.

English meaning

So, I shall tell you logically and explicitly the nature of such a man who is so free; so, please see.

403
मूळ

तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥403॥

मराठी अर्थ

तरीही प्रबुद्धा अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता,

English meaning

O the enlightened Arjuna, the Jeeva who was entangled for eternity in the complexities of dreams in the sleep of ignorance,

404
मूळ

तो महावाक्याचेनि नांवे । गुरुकृपेचेनि थांवे । माथा हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥404॥

मराठी अर्थ

तो ” तत्त्वमसि ” हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवणे नव्हे, तर जसा थापटून जागा केला आहे,

English meaning

Suddenly became awake by the bliss of the experience of unity, the whole sleep of Maya together with the delusive appearance of the universe being dissolved by the listening of the great principle of you are that, and by the effect of the blessing of Guru when he put his hand on this man's head or rather gave him a kind slap.

405
मूळ

तैसा विश्वस्वप्नेसी माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणे जो ॥405॥

मराठी अर्थ

तसा अर्जुना, जगद्रुपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निजस्वरूपाचे दर्शनाने जागा झाला,

English meaning

Suddenly became awake by the bliss of the experience of unity, the whole sleep of Maya together with the delusive appearance of the universe being dissolved by the listening of the great principle of you are that, and by the effect of the blessing of Guru when he put his hand on this man's head or rather gave him a kind slap.

406
मूळ

तेव्हा मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती का चंद्रकर । फांकता जैसे ॥406॥

मराठी अर्थ

तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पुर आपोआप नाहीसे होतात

English meaning

Then just as the whole delusive appearance of mirage becomes non-existent when the moon- light spreads over the world,

407
मूळ

का बाळत्व निघोनि जाय । तै बागुला नाही त्राय । पै जळालिया इंधन न होय । इंधन जेवी ॥407॥

मराठी अर्थ

किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जशी कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसा लाकूडपणा राहत नाही,

English meaning

Or when childhood comes to an end, the 'phantom' has no place anywhere or when the fuel is burnt, it never again becomes fuel.

408
मूळ

नाना चेवो आलिया पाठी । तै स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥408॥

मराठी अर्थ

अथवा जागृत झाल्यावर स्वप्ने दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना, त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही,

English meaning

Or when one is awake, dream does not appear before the eyesight, so this Jeeva has absolutely no sense of 'me and myness'.

409
मूळ

मग सूर्यु आंधारालागी । रिघो का भलते सुरंगी । परी तो तयाच्या भागी । नाहीचि जैसा ॥409॥

मराठी अर्थ

मग अंधार पाहण्याकरिता जरी सूर्य वाटेल त्या भुयारात शिरला, तरी तेथे जसा अंधार राहत नाही,

English meaning

Then just as, even if the Sun rushes into any by-lane in order to find out darkness, darkness is not found by him,

410
मूळ

तैसा आत्मत्वे वेष्टिला होये । तो जया जया दृश्याते पाहे । ते दृष्य द्रष्टेपणेसी होत जाये । तयाचेचि रूप ॥410॥

मराठी अर्थ

तसा मी आत्मा आहे, अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहील ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरुपीच दिसतील.

English meaning

Similarly this man who is surrounded by his own consciousness as Atman, finds that whatever objects he sees, take the form of himself and thus he becomes one with everything.

411
मूळ

जैसा वन्हि जया लागे । ते वन्हिचि जालिया आंगे । दाह्यदाहकविभागे । सांडिजे ते ॥411॥

मराठी अर्थ

अग्नि ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूप होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही,

English meaning

Just as any material which is burnt by fire, takes the form of fire only, and the duality of fire which burns, and the material which is burnt, disappears automatically.

412
मूळ

तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । काही बाही जे उरे ॥412॥

मराठी अर्थ

तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही उरते,

English meaning

Similarly when the wrong notion of doership of Atman which is caused by the concept that "action is different from the Atman, and that the Atman wants to bring that action into a particular form of existence," is removed, something remains which is in itself

413
मूळ

तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देही इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥413॥

मराठी अर्थ

त्या आत्मस्थितीत राहणारा जो श्रेष्ठ पुरुष तो हा देह माझा आहे व मी देहाहून निराळा आहे असे मानेल काय ? हे पहा, प्रलयकाळी जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघाला आपल्याहून निराळे ठेवीत नाही,

English meaning

the state of Atman. Will such a man, who is the master of himself as Atman, ever become confined to the physical body? My dear, can the great flooding water of the final deluge be contained in a small brook?

414
मूळ

तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणे पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबे धरिला ? ॥414॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी अहंता उत्पन्न झाली असता म्हणजे ब्रह्मच मी आहे, असा आगाध बोध झाला असता तो ब्रह्मरूप झालेला अहंकार देहा पुरता कसा आवरला जाईल ? हे पहा सूर्याचे प्रतिबिंब धरल्याने सूर्य का आपल्या हाती लागणार आहे ? नाही.

English meaning

O the son of Pandu, will that sense of All-comprehensive I - ness be ever confined within the body? Can the Sun be caught by his reflection?

415
मूळ

पै मथूनि लोणी घेपे । ते मागुती ताकी घापे । तरी ते अलिप्तपणे सिंपे । तेणेसी काई ? ॥415॥

मराठी अर्थ

ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन: ताकांत घातले तर ते पूर्वीप्रमाणे ताकाची एकरूप होईल का ?

English meaning

When once butter milk is churned and we take out the butter and again put it in the butter-milk, will it again be mixed up with it?

416
मूळ

नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणे ? ॥416॥

मराठी अर्थ

अथवा हे वीरेशा, लाकडात स्वभावात:च गुप्त असलेला अग्नी घर्षणादि उपायाने प्रगट केल्यास तो लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्यावर राहील का ?

English meaning

And Arjuna, when the fire hidden normally in the wood is out and burning it, will it again be hidden in that wood?

417
मूळ

का रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥417॥

मराठी अर्थ

किंवा रात्रीच्या अंधारातून जो सूर्य बाहेर निघाला आहे, तो ” रात्र ” अशी गोष्ट कानांनी ऐकल तरी का !

English meaning

Or has anyone heard the news that the Sun is of the nature of the night because he comes out of the night?

418
मूळ

तैसे वेद्य वेदकपणेसी । पडिले का जयाचे ग्रासी । तया देह मी ऐसी । अहंता कैची ? ॥418॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे बोधांत नाहीशी झाली आहेत, त्याला मी देह आहे अथवा देहात आत्मा आहे, असा गर्व कुठून असणार ?

English meaning

Similarly, in the mind of the man where duality of the knower and the known has been totally annihilated, how can the poor concept that he is the body ever arise?

419
मूळ

आणि आकाशे जेथे जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेले कोंदोनी । आपेआप ॥419॥

मराठी अर्थ

आणि, आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे, त्याठिकाणी ते भरलेले असल्यामुळे सहजच ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे,

English meaning

If the sky wants to go from one place to the other, it is also the same at the other place and therefore it is already filled everywhere.

420
मूळ

तैसे जे तेणे करावे । तो तेचि आहे स्वभावे । मा कोणे कर्मी वेष्टावे । कर्तेपणे ? ॥420॥

मराठी अर्थ

तसे तो जे जे करितो, ते आत्मस्वरूप आहे; मग कोणत्या क्रमाने तो आपलेकडे कर्तेपणा घेईल ?

English meaning

Similarly, whatever he intends to do is also his own self! Then in what action can he play the role of the doer and be involved?

421
मूळ

नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावो । तैसे जाहाले ॥421॥

मराठी अर्थ

गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कुठेही जाता येत नाही, तशी या मनुष्याची स्थिती झाली आहे.

English meaning

So, his state is similar to the state of the sky which has nowhere to go, like the sea which has not to flow from one place to the other, or like the pole star which has no scope to move anywhere.

422
मूळ

ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहला वावो । तऱ्ही देहा जव निर्वाहो । तव आथी कर्मे ॥422॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माचा कर्तेपणाचा अभिमान बाधित म्हणजे मित्र आहे; तथापि त्याचा देह आहे, तोपर्यंत त्याच्याकडून करणे होणारच;

English meaning

So, in the case of the man whose sense of being body has immersed in self-knowledge, has actions taking place in his life only so long as his body survives on.

423
मूळ

वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । का सेंदे द्रुति राहे कापुरे । वेचलेनी ॥423॥

मराठी अर्थ

वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडाचे हालने बंद होत नाही अथवा कापूर जरी संपला, तरी करंड्यात वास शिल्लक असतो;

English meaning

It is the trees which continue to move a bit more, though the wind ceases to blow, or like the smell remaining in the casket though camphor is removed from it.

424
मूळ

का सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥424॥

मराठी अर्थ

अथवा गाण्याचा समारंभ संपला, तरी गाणी ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते;

English meaning

Or like the mood of the song which still remains though the concert is over or like the moisture in the earth which remains though water has flown over it sometime back.

425
मूळ

अगा मावळलेनि अर्के । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुके । दिसे जैसी ॥425॥

मराठी अर्थ

अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्य ज्योतिचे तेज (संधी प्रकाश) जसे दिसते,

English meaning

Or like the evening lights which still loiter in the sky though the Sun has already set,

426
मूळ

पै लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धावेचि तंववरी । जव भरली आथी उरी । बळाची ते ॥426॥

मराठी अर्थ

तसेच निशान मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो;

English meaning

Or like an arrow having hit the target still goes on further if the force behind the arrow is that much strong.

427
मूळ

नाना चक्री भांडे जाले । ते कुलाले परते नेले । परी भ्रमेंचि ते मागिले । भोवंडिलेपणे ॥427॥

मराठी अर्थ

अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते,

English meaning

Or like the potter's wheel which keeps moving for sometime though the pot of clay is removed by the potter and the push is no more being given by him to that wheel.

428
मूळ

तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणे स्वभावे धनंजया । जाले ते अपैसया । चेष्टवीच ते ॥428॥

मराठी अर्थ

तसा आहे धनंजया, देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही, ज्या कर्मांनी देह उत्पन्न झाला आहे, ते कर्म त्या देहाकडून चेष्टा करविलच, त्याचे चेष्टा याचा इच्छेवर अवलंबून नसतात.

English meaning

O Dhananjaya, even after the identification with and the pride of the physical body is gone, the tendency and nature by which the body was created first, keeps the body functioning for some time.

429
मूळ

संकल्पेवीण स्वप्न । न लाविता दांगीचे बन । न रचिता गंधर्वभुवन । उठी जैसे ॥429॥

मराठी अर्थ

संकल्पा शिवाय स्वप्न दिसते, न लावता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्या शिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात,

English meaning

It is like the appearance of dream without our purposeful thinking, or the trees growing in a forest without our sowing their seeds or the illusive buildinglike structures seen in the clouds without being built by anybody.

430
मूळ

आत्मयाचेनि उद्यमेवीण । तैसे देहादिपंचकारण । होय आपणया आपण । क्रियाजात ॥430॥

मराठी अर्थ

तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादि पांच कारणे मागे सांगितली, ती क्रिया करण्यास कारणीभूत होतात.

English meaning

Similarly, without any effort by Atman, actions of all kinds are taking place by these five causes.

431
मूळ

पै प्राचीनसंस्कारवशे । पांचही कारणे सहेतुके । कामवीजती गा अनेके । कर्माकारे ॥431॥

मराठी अर्थ

परंतु पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करितात.

English meaning

By coming together of the five causes and the five purposes, and the force of the inborn past Karma, many actions are thus taking place.

432
मूळ

तया कर्मामाजी मग । संहरो आघवे जग । अथवा नवे चांग । अनुकरो ॥432॥

मराठी अर्थ

त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार होवो, अथवा नवे जग उत्पन्न होवो;

English meaning

It is immaterial whether in those processes the whole world is destroyed or a nice new world is created.

433
मूळ

परी कुमुद कैसेनि सुके । कैसे ते कमळ फाके । ही दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥433॥

मराठी अर्थ

परंतु, कुमुद कसे झुकते व कमळांची प्रभा कशी फाकते, हे आपल्या पासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात;

English meaning

Then just as the Sun does not enquire why lotus flowers bloom in day - time and why lilies bloom at night;

434
मूळ

का वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करू शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥434॥

मराठी अर्थ

किंवा आकाशातून विज पडून जरी ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली,

English meaning

Or, even though by lightning and thunder storm, the land below may be having faults or be shattered; by constant pleasant rainfall the land being covered by lush green grass may look very beautiful;

435
मूळ

तरी तया दोहीते जैसे । नेणिजेचि का आकाशे । तैसा देहीच जो असे । विदेहदृष्टी ॥435॥

मराठी अर्थ

तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा तो देहाभिमान रहित देहातच वास करतो,

English meaning

The sky is not aware of both the conditions. Similarly he who lives in the body but without the concept that he is the body,

436
मूळ

तो देहादिकी चेष्टी । घडता मोडता हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥436॥

मराठी अर्थ

तो, तसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पहात नाही, तसा देहादीका पासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला, तरी जाणत नाही.

English meaning

Does not take cognizance of whether the world is born or destroyed by actions taking place due to causes like the body, etc. (five causes mentioned above.)

437
मूळ

येऱ्हवी चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेचि मानिती ॥437॥

मराठी अर्थ

एरवी, हा देही आहे असे जे चर्मचक्षूंनी पाहतात, ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात.

English meaning

However, such a person outwardly appears to be involved in all actions, to those who see only physical world because they see only by physical eyes.

438
मूळ

का तृणाचा बाहुला । जो आगरामेरे ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥438॥

मराठी अर्थ

अथवा, गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेने उभे केले, म्हणजे कोल्हा त्याला खरा रखवालदार समजत नाही काय ?

English meaning

For example, does not a jackal, by delusion, think that the hay scare-crow kept erect on the bund wall of a rice field, is a real guard of the field?

439
मूळ

पिसे नेसले का नागवे । हे लोकी येऊनि जाणावे । ठाणोरियांचे मवावे । आणिकी घाय ॥439॥

मराठी अर्थ

वेडा मनुष्य वस्त्र नेसलेल्या आहे, किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी मोजावे लागतात,

English meaning

People may see and decide whether a mad man is naked or clothed, that mad man has nothing to do with it. Or the wounds of a warrior who is killed in the war may be counted by others but he himself (being dead) is not aware of those.

440
मूळ

का महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥440॥

मराठी अर्थ

अथवा एखादी महासती सती जाते वेळेस न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी सौभाग्यशृंगार जरी करीत आहे असे लोकास दिसले तरी तिला अग्नी दिसत नाही, स्वतःच्या शरीराचे तिला भान नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते, तर ती पती स्वरूपी तल्लीन झालेली असते,

English meaning

The group of people witnessing 'a satee', may consider with awe the sufferings of the woman by fire, but she is not aware of the fire, or her own delicate body, nor of the lamenting onlookers!

441
मूळ

तैसा स्वस्वरूपे उठिला । जो दृश्येसी द्रष्टा आटला । तो नेणे काय राहटला । इंद्रियग्रामु ॥441॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा द्रष्ट्यासह नष्ट झाला, (पाहणारा व पाहण्याची वस्तू हा भाव नाहीसा झाला), तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही

English meaning

Similarly one who has gone beyond the body, in the state of reality, and in whom the observer and the observed have both gone, does not know what the group of organs is doing.

442
मूळ

अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने । लोपता तिरीचेनि जने । एकी एक गिळिले हे मने । मानिजे जऱ्ही ॥442॥

मराठी अर्थ

अरे, समुद्राचे तीरावर असलेल्या लोकास जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले आहे,

English meaning

My dear, people on the shore may see the big waves devouring the earlier small waves in the surf, and their minds may think so, but-

443
मूळ

तऱ्ही उदकाप्रति पाही । कोण ग्रसितसे काई । तैसे पूर्णा दुजे नाही । जे तो मारी ॥443॥

मराठी अर्थ

तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटे खाऊन टाकते ? त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी तो द्वैत रहात नाही.

English meaning

In that process nothing else is swallowing the water, only water is playing. Similarly for a man who has reached the state of totality, does not have any other person except himself in the world, who is to be killed, etc.

444
मूळ

सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥444॥

मराठी अर्थ

पहा, सोन्याच्या देवीने, सोन्याच्या त्रिशुळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला,

English meaning

For example, in the image of Goddess Chandika she is shown as the golden goddess who has killed the golden demon by the golden lance.

445
मूळ

तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वाचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि ते ॥445॥

मराठी अर्थ

हा सर्व प्रकार भक्तांच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु या दृष्टीने त्रिशूळ, महिषासुर व देवी हे सर्व सोनेच आहे;

English meaning

And the devotee may take her to be the real goddess, etc.; but really all the figures - the goddess, the lance or the demon; are gold only.

446
मूळ

पै चित्रीचे जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटी आगी वोलांशु । दोन्ही नाही ॥446॥

मराठी अर्थ

तसेच भिंतीवर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे; परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही व जळतही नाही;

English meaning

Or in a picture there is a fire painted and a scene of water is painted, but the cloth board is neither burning due to it nor wet by the water.

447
मूळ

मुक्ताचे देह तैसे । हालत संस्कारवशे । ते देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥447॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्व कर्मानुसार असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्याला कर्मकर्ता असे म्हणतात;

English meaning

Similarly, the body of a free man is functioning only on the half-spent force of earlier conditioning, but ignorant persons, not knowing this inner state, think that he is a responsible doer.

448
मूळ

आणि तया करणेया आंतु । घडो तिही लोका घातु । परी तेणे केला हे मातु । बोलो नये ॥448॥

मराठी अर्थ

आणि जो कर्म करीत असता जरी त्यायोगे त्रैलोक्याचा घात झाला, तरी त्याने केला असे म्हणू नये.

English meaning

And even if all the three worlds are destroyed, one should not say that he has destroyed them.

449
मूळ

अगा अंधारुचि देखावा तेजे । मग तो फेडी हे बोलिजे । तैसे ज्ञानिया नाही दुजे । जे तो मारी । ॥449॥

मराठी अर्थ

अरे, सूर्याने अंधार पहावा आणि मग त्याला दूर करा, असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तू नाही की, जिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते;

English meaning

My dear, how much sense is there in saying that "I will see darkness first by the help of the light, and then destroy the darkness?" Similarly here is no other person for a man of self- knowledge, whom he might kill.

450
मूळ

म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥450॥

मराठी अर्थ

म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य याचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो.

English meaning

Therefore, his consciousness does not know even the inkling of what is sin and what is merit. This is just like the river Ganges which does not become dirty if a small stream merges into it.

451
मूळ

आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । की शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥451॥

मराठी अर्थ

अर्जुना, अग्नी वर अग्नि पडला तर तो भाजतो का ? किंवा शास्त्र आपणच आपल्याला कधी रुतेल काय ?

English meaning

O Dhananjaya, if fire contacts and fights with fire what is going to be burnt? Does sharp weapon poke itself?

452
मूळ

तैसे आपणपयापरते । जो नेणे क्रियाजाताते । तेथ काय लिंपवी बुद्धीते । तयाचिये ॥452॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तिथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल ?

English meaning

Similarly, what is going to pollute his mind who has no knowledge of any other thing except himself, in all the actions?

453
मूळ

म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हे स्वरूपचि जाहले जया । नाही शरीरादिकी तया । कर्मी बंधु ॥453॥

मराठी अर्थ

म्हणून तो कार्य, कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरादिका पासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही.

English meaning

Therefore, to him who has his own Real self as the action, the object of action and also the doer of the action- all in one,- has no bondage in the actions happening due to these causes like body etc. mentioned above.

454
मूळ

जे कर्ता जीव विंदाणी । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणी । आउती दाहे ॥454॥

मराठी अर्थ

कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्या कर्ता समजून दहा इंद्रियांच्या साधनांने पांच हेतू धारण करतो;

English meaning

Jeeva who conceives himself to be the doer, creates the five purposes by skillful use of his five organs and embarks upon actions;

455
मूळ

तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेवो । कर्मभुवने ॥455॥

मराठी अर्थ

आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो.

English meaning

And by using either just or unjust material, builds the castles of Karma.

456
मूळ

या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥456॥

मराठी अर्थ

पण या मोठ्या कृत्यात आत्मा हा सह्यकर्ता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको.

English meaning

But for this great work, Atman is not helping. You may perhaps say that Atman must be a helping factor in the beginning;

457
मूळ

तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो का निरोपु । आपणचि दे ? ॥457॥

मराठी अर्थ

तो साक्षीभूत व ज्ञानस्वरूप आहे; तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो, त्याला तो का आज्ञा देईन ?

English meaning

But it is not so. My dear, will the Atman who is only a witness and only of the nature of knowledge, ever help the urge to act, to rise at all?

458
मूळ

तरी कर्मप्रवृत्तीहीलागी । तया आयासु नाही आंगी । जे प्रवृत्तीचेही उळिगी । लोकुचि आथी ॥458॥

मराठी अर्थ

तर जी जी कर्मे करण्याकरिता सर्व लोक श्रम करीत असतात, ती ती कर्मे करण्याविषयी त्यांच्या शरीरासआयास पडत नाहीत,

English meaning

Even in respect of those works for which ordinary people try hard, this man has no disturbance in his peaceful condition.

459
मूळ

म्हणौनि आत्मयाचे केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाही बंदिशाळ । कर्माचि हे ॥459॥

मराठी अर्थ

म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरुपी झाला आहे, त्याला ही कर्माची बंदिशाळा नाही.

English meaning

Therefore, he who has become totally the Atman, there is no jail of these actions which may be able to keep him in bondage.

460
मूळ

परी अज्ञानाच्या पटी । अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे का ॥460॥

मराठी अर्थ

परंतु अज्ञानाच्या पटावर जो दैवज्ञानाचे चित्र काढतो तो तेथे चित्र, चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी स्पष्ट आहे, ती तुला सांगतो.

English meaning

But when on the screen of ignorance, there is reverse picture of knowledge then only the well- known trinity of doing of action, actor and the resultant action comes into existence, (The knowing, the knower and the known.)

461
मूळ

जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हे जगाचे बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥461॥

मराठी अर्थ

कारण ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून, इच्यापासून कर्माची नि:संशय प्रवृत्ती होते, असे समज.

English meaning

The three things namely knowing, knower and the object to be known are the seed of the world and action has its source in these three.

462
मूळ

आता ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइके धनंजया । करू रूप ॥462॥

मराठी अर्थ

हे धनंजया, आता ह्याच त्रिपुटी ची निरनिराळी स्वरूपी उघड करून सांगतो, ती ऐक

English meaning

And dear Dhananjaya, I shall describe the details of the three. Please listen.

463
मूळ

तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिके पांचे । धावोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥463॥

मराठी अर्थ

तर जीव रुपी सूर्यबिंबाचे ज्ञानेन्द्रियादी पंचेंद्रियरुपी किरण विषयरुपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात;

English meaning

To use a simile, we can say that the Jeeva is the Sun, and the five organs as ears, etc. are his rays. They fall on the objects which are like lotus buds and open those buds.

464
मूळ

की जीवनृपाचे वारु उपलाणे । घेऊनि इंद्रियांची केकाणे । विषयदेशीचे नागवणे । आणीत जे ॥464॥

मराठी अर्थ

अथवा जीवरूपी राजा, हा शरीररूपी रुपी उपलाणी म्हणजे खोगीराशिवाय घोड्यावर बसून हातात इंद्रियरुपी भाले घेऊन विषयरुपी देशातून लूट आणतात

English meaning

Or in other words, Jeeva is the king. His organs are his horses, They gallop into the field of objects and bring back the plunder of pain and pleasure.

465
मूळ

हे असो इही इंद्रियी राहाटे । जे सुखदुःखेसी जीवा भेटे । ते सुषुप्तिकाली वोहटे । जेथ ज्ञान ॥465॥

मराठी अर्थ

फार काय, जो या इंद्रियात वागत असून जीवाला सुख व दुःख भोगावयास देते व जे ज्ञान गाढ झोपेत जेथे नाहीसे होते,

English meaning

But let these images be set aside. The Jeeva, to whom the knowledge gained through the organs, brings pain and pleasure and in whose state of sleep it is merged, may be called the knower.

466
मूळ

तया जीवा नांव ज्ञाता । आणि जे हे सांगितले आता । तेचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥466॥

मराठी अर्थ

त्या जीवाला अर्जुना, ज्ञाता असे म्हणतात, आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात, असे तू समज.

English meaning

And O the son of Pandu, the thing about which I have talked just now is to be known as "knowing" or "knowledge."

467
मूळ

जे अविद्येचिये पोटी । उपजतखेवो किरीटी । आपणयाते वाटी । तिही ठायी ॥467॥

मराठी अर्थ

अर्जुना, जे अज्ञानाच्या पोटात उपजताक्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते,

English meaning

This knowledge is born of ignorance. Immediately it trisects itself.

468
मूळ

आपुलिये धावे पुढा । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडा । ज्ञातृत्वाते ॥468॥

मराठी अर्थ

आपल्या वृत्ती पुढे जाणावयाचा विषयरुप ज्ञेयाचा दगड घालून आपल्या मार्गाचे बाजूस ज्ञात्याला उभे करते,

English meaning

It puts ahead of it the object to be known, a ball of the aim of knowing something, and brings up the image of the "knower" with its pride, behind itself.

469
मूळ

मग ज्ञातया ज्ञेया दोघा । तो नांदणुकेचा बगा । माजी जालेनि पै गा । वाहे जेणे ॥469॥

मराठी अर्थ

मग ज्ञाता ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञानामध्ये राहते.

English meaning

When thus there is a path of connection between the two, that path is continuously put in use by the movement of the knowledge.

470
मूळ

ठाकूनि ज्ञेयाची शिव । पुरे जयाची धाव । सकळ पदार्था नांव । सूतसे जे ॥470॥

मराठी अर्थ

ज्ञेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थांना नाव ठेवते.

English meaning

The path by which this knowledge reaches ahead, comes to an end at the point of the objects of knowledge; and it gives various names to various objects.

471
मूळ

ते गा सामान्य ज्ञान । या बोला नाही आन । ज्ञेयाचेही चिन्ह । आइक आता ॥471॥

मराठी अर्थ

त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती ऐक.

English meaning

This is the commonly understood "knowledge", no doubt. Now, please listen to the nature of the knowable, or the object towards which knowledge reaches.

472
मूळ

तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥472॥

मराठी अर्थ

तर शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे धर्म आहेत.

English meaning

There are five elements by which the knowable, the object of knowledge becomes perceptible. They are sound, touch, form, smell and taste.

473
मूळ

जैसे एकेचि चूतफळे । इंद्रिया वेगवेगळे । रसे वर्णे परीमळे । भेटिजे स्पर्शे ॥473॥

मराठी अर्थ

जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो; म्हणजे आंबा या शब्दाने कानात समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यात समजतो, वासाने नाकास समजतो, आणि स्पर्शाने त्वचेस समजतो.

English meaning

For Example, one fruit of mango is perceived by our organs separately by taste, colour, smell and touch.

474
मूळ

तैसे ज्ञेय तरी एकसरे । परी ज्ञान इंद्रियद्वारे । घे म्हणौनि प्रकारे । पांचे जाले ॥474॥

मराठी अर्थ

तसेच ज्ञेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्यांजविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते पाच प्रकारचे झाले आहे.

English meaning

Thus the knowable object though open is understood in five ways, because it is coming in contact of the knower through five different organs.

475
मूळ

आणि समुद्री वोघाचे जाणे । सरे लाणीपासी धावणे । का फळी सरे वाढणे । सस्याचे जेवी ॥475॥

मराठी अर्थ

समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो, मुक्कामास गेल्यावर चालणे संपते, अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते;

English meaning

And just as the flow of the water in the river ends when it meets the sea, or the growth of a crop ends when it bears full grain.

476
मूळ

तैसे इंद्रियांच्या वाहवटी । धावतया ज्ञाना जेथ ठी । होय ते गा किरीटी । विषय ज्ञेय ॥476॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असणे असे म्हणतात.

English meaning

Similarly, O the crowned one, the place to where the knowledge runs with the help of organs and reaches, is called the "knowable or the object of knowledge.

477
मूळ

एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिही रूप केले धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥477॥

मराठी अर्थ

याप्रमाणे धनंजया, ज्ञाता; ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी तीन प्रकारच्या सर्व कर्मांचा कारणीभूत आहे.

English meaning

O Dhananjaya, thus I have told you about the knower, the knowledge, and the object of knowledge. All the actions are born from this trinity.

478
मूळ

जे शब्दादि विषय । हे पंचविध जे ज्ञेय । तेचि प्रिय का अप्रिय । एकेपरीचे ॥478॥

मराठी अर्थ

कारण शब्दादि पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणतीतरी एक असते.

English meaning

Now though the elements like, sound, smell, etc. are five, the nature of the knowable is only two-fold, namely it is either liked or disliked.

479
मूळ

ज्ञान मोटके ज्ञातया । दावी ना जव धनंजया । तव स्वीकारा की त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥479॥

मराठी अर्थ

हे धनंजया, ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो,

English meaning

Though the knowledge is very meagre, as soon as the knower is shown it, the knower immediately starts to accept or reject it.

480
मूळ

परी मीनाते देखोनि बकु । जैसा निधानाते रंकु । का स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥480॥

मराठी अर्थ

परंतु, माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास लावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहताच क्षणी तो घेण्यात दरिद्री धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामिक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो;

English meaning

For example, as soon as a fish is seen, the crane jumps swiftly; as soon as a poor man sees a lot of money, there is sudden movement in him, and as soon as a beautiful woman is seen, a man of passion is disturbed.

481
मूळ

जैसे खालारा धावे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणी । नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पा ॥481॥

मराठी अर्थ

जसे पाणी उतरत्या जमिनीकडे राहते, भ्रमर पुष्पाचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याचे वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते;

English meaning

Further, water naturally runs towards low-lands; black-bees naturally fly towards the fragrant flowers, and in the evening when it is time to milk a cow, its calf runs towards her.

482
मूळ

अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेवी माणुसी । वारत्या लावीजती आकाशी । यागांचिया ॥482॥

मराठी अर्थ

अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरुपी शिड्या लावतात;

English meaning

Or after listening to the attractive stories of pleasures in heaven, like the company of Urvashi etc., people try to climb up the steps of the staircase towards the heaven through performance of sacrifices.

483
मूळ

पै पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटी । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळे ॥483॥

मराठी अर्थ

अथवा अर्जुना, पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहतांच एकदम सगळे अंग टाकून तीज जवळ येतो;

English meaning

Or as soon as the male-pigeon, while flying in the sky, sees a female pigeon he jumps headlong towards her.

484
मूळ

हे ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धावचि घे ॥484॥

मराठी अर्थ

इतकेच नव्हे, तर मेघांची गर्जना होताक्षणीच मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास (विषयास) पाहून उडी घालतो.

English meaning

Or as soon as a peacock listens to the thundering of clouds, it starts to dance and jump out of joy. Similarly the knower having seen the knowable, runs towards it.

485
मूळ

म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्ता । प्रवृत्ति येथ ॥485॥

मराठी अर्थ

म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते;

English meaning

Therefore, O son of Pandu, the knower, the known and the knowable are the three main factors from which all actions arise.

486
मूळ

परी तेचि ज्ञेय विपाये । जरी ज्ञातयाते प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥486॥

मराठी अर्थ

आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता असला, तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही.

English meaning

Now if perhaps that object of knowledge is liked by the knower, he cannot suffer a moment's delay in getting it and enjoying.

487
मूळ

नातरी अवचटे । तेचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥487॥

मराठी अर्थ

अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला, तर त्याचा त्याग करण्याविषयी एकेक क्षण त्याला युगांप्रमाणे भासतो,

English meaning

On the other hand, if the object of knowledge is not liked by him the time required to reject it seems to be like ages though actually it is very short.

488
मूळ

व्याळा का हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥488॥

मराठी अर्थ

सर्प असून नीलमण्यांचा हार आहे, या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावताक्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते,

English meaning

Suppose a man is surrounded by garlands and serpents at one and the same time, he experiences the joy as well as fear simultaneously.

489
मूळ

तैसे ज्ञेय प्रियाप्रिये । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारी वाहे । व्यापाराते ॥489॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय हे पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते; आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते.

English meaning

Similar is the condition of the knower, when it perceives something which is partly liked and partly disliked, and he tries hard to accept one thing and reject the other at the same time.

490
मूळ

तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसावी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥490॥

मराठी अर्थ

जो कुस्तीचा षोकी आहे, त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर, तो जरी सर्वसैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो.

English meaning

When a general in a war sees another equally powerful warrior in the opposite army, he gets down from his chariot, and walks towards the other challenging him.

491
मूळ

तैसे ज्ञातेपणे जे असे । ते ये कर्ता ऐसिये दशे । जेविते बैसले जैसे । रंधन करू ॥491॥

मराठी अर्थ

तसा ज्ञाता म्हणून असतो, तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्या कर्ता असे म्हणवितो. ते त्याचे कर्तेपणास येणे, ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणार्‍या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे;

English meaning

Similarly the knower who was so far only an on-looker, perceiving an object, goes forth and becomes the actor. This is like a diner impatiently starting to cook food.

492
मूळ

का भंवरेचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥492॥

मराठी अर्थ

किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग् लावण्याची खटपट करावी अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू हावे, देवांनी देवळात स्वस्थ बसणे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे

English meaning

Or a black-bee cultivating a garden or a gold-smith becoming himself the touch-stone or the deity herself starting to build the temple.

493
मूळ

तैसा ज्ञेयाचिया हावा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥493॥

मराठी अर्थ

तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो, तेथे अर्जुना, त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते.

English meaning

Similarly, O the son of Pandu, when the knower uses the organs in the work of accepting or rejecting the object, the 'knower' becomes the 'doer' or the agent of action.

494
मूळ

आणि आपण होऊनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथे ज्ञेयचि स्वभावता । कार्य होय ॥494॥

मराठी अर्थ

आणि आपण जो ज्ञाता, तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण(साधन) करतो, मग येथे ज्ञेय हे सहज कार्य होते.

English meaning

When the 'knower' thus becomes the 'actor,' he uses the 'knowledge' as 'means' and the 'knowable' naturally becomes the 'action.'

495
मूळ

ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा राती । पालटे जैसी ॥495॥

मराठी अर्थ

हे सुमते, ज्ञानाच्या स्वरूपगतीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्राचे तेज रात्री उपयोगी पडत नाही;

English meaning

O the intelligent Arjuna, in this way, by the influence of knowledge, there is change of the role of the knower. This is like the beauty of the eyes undergoing a change at night-time.

496
मूळ

का अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठी शीतांशु । पालटे जैसा ॥496॥

मराठी अर्थ

किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचे विलास बदलतात; अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एकेक कलेने कमी होत जातो-

English meaning

Or like the condition of a prosperous man becoming worst, when destiny changes; or the phases of moon changing after full moon-night.

497
मूळ

तैसा चाळिता करणे । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणे । तेथीची तिये लक्षणे । ऐक आता ॥497॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवीत असता ज्ञाता हा कर्तेपणाचा अभिमानात गुंततो नातं, त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो, ती ऐक.

English meaning

Now, when there is the impediment of the role of actor falling upon the knower, by the urges of the organs, he has certain characteristics, which please listen to.

498
मूळ

तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हे चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचे ॥498॥

मराठी अर्थ

तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे; (अंत:करणाच्या ह्या चार आवृत्ती आहेत; )

English meaning

Intellect, mind, consciousness, (Chitta) and ego are the four facets of the inner organ.

499
मूळ

बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हे पंचविध जाण । इंद्रिये गा ॥499॥

मराठी अर्थ

आणि त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक अशी पाच प्रकारची इंद्रिय आहेत.

English meaning

The skin, ears, eyes, tongue, and nose are the five outer organs.

500
मूळ

तेथ आंतुले तव करणे । कर्ता कर्तव्या घे उमाणे । मग तै जरी जाणे । सुखा येते ॥500॥

मराठी अर्थ

त्याठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीच्या योगे जिवाच कर्म करण्यास विषयी स्फुरण येते; मग या कर्मापासून सुख प्राप्ती होईल असे वाटू लागले.

English meaning

The actor by using the internal organs sizes up the nature of the action and if it is thought that it may be pleasurable,

501
मूळ

तरी बाहेरीले तियेही । चक्षुरादिके दाहाही । उठौनि लवलाही । व्यापारा सूये ॥501॥

मराठी अर्थ

तर नेत्रादि दहाही बाह्येन्द्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो;

English meaning

He employes all the ten outer organs including the eyes etc., for executing that action.

502
मूळ

मग तो इंद्रियकदंबु । करविजे तव राबु । जव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥502॥

मराठी अर्थ

नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवितो, की जोपर्यंत कर्माचे फळ हाती आले नाही !

English meaning

Then he drives hard the senses until the desired aim is achieved.

503
मूळ

ना ते कर्तव्य जरी दुःखे । फळेल ऐसे देखे । तो लावी त्यागमुखे । तिये दाहाही ॥503॥

मराठी अर्थ

किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले, तर त्या कर्माचा त्याग करण्याकरिता त्या दहाही इंद्रियांची योजना करितो.

English meaning

On the other hand, if he estimates that the action may be painful, he immediately employes all the senses and organs in becoming free of that action.

504
मूळ

मग फिटे दुःखाचा ठावो । तव राहाटवी रात्रिदिवो । विकणवाते का रावो । जयापरी ॥504॥

मराठी अर्थ

मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरिता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो.

English meaning

Then he harasses his organs until the very roots of painful conditions are destroyed. It is just like a king, in order to recover revenue,

505
मूळ

तैसेनि त्याग स्वीकारी । वाहाता इंद्रियांची धुरी । ज्ञातयाते अवधारी । कर्ता म्हणिपे ॥505॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे पुढारीपण ज्ञात्याने घेतले, म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात;

English meaning

Using his servants day and night. When all the organs are active for acceptance or rejection, the knower should be known as the actor or doer.

506
मूळ

आणि कर्तयाच्या सर्व कर्मी । आउताचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियाते आम्ही । करणे म्हणो ॥506॥

मराठी अर्थ

आणि कर्ता हा कर्म करण्याकरिता आऊता प्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो. म्हणून आम्ही त्यास करणे म्हणजे क्रियेची साधने असे म्हणतो.

English meaning

And as the actor employes organs like bulls put to yoke, in performance of the action, we call the organs as the 'means'.

507
मूळ

आणि हेचि करणेवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे ते अवधारी । कर्म एथ ॥507॥

मराठी अर्थ

आणि हे करण्याकरीता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो, त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो.

English meaning

And thus by using this means, the actor does some work, which is called the action, in its relative scope.

508
मूळ

सोनाराचिया बुद्धि लेणे । व्यापे चंद्रकरी चांदणे । का व्यापे वेल्हाळपणे । वेली जैसी ॥508॥

मराठी अर्थ

सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापिले जातात, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो,

English meaning

Now just as the mind totally occupies the ornament in the case of a gold-smith or the moon- light is completely filled in the rays of the Moon or as a creeper is fully filled by its blossom.

509
मूळ

नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हे असो अवकाशु । आकाशी जैसा ॥509॥

मराठी अर्थ

अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो, अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते,

English meaning

Or the brilliance fills the light completely, or sweetness fills the sugarcane completely, or the space is everywhere in the sky.

510
मूळ

तैसे कर्तयाचिया क्रिया । व्यापले जे धनंजया । ते कर्म गा बोलावया । आन नाही ॥510॥

मराठी अर्थ

तसे अर्जुना, कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय यात शंका नाही.

English meaning

So, that thing which is filling all the activities of the knower as actor should be called Karma or action. O Dhananjaya, there is no gainsaying in this case.

511
मूळ

एवं कर्म कर्ता करण । या तिहीचेही लक्षण । सांगितले तुज विचक्षण- । शिरोमणी ॥511॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितली.

English meaning

O the greatest, sharpwitted person, in this way I have explained to you, the signs of all the three; namely the actor, the action and the means of action.

512
मूळ

एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे कर्माचे प्रवृत्तित्रय । तैसेचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥512॥

मराठी अर्थ

तर ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्ती कारक आहे. तसेच कर्ता, करण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे.

English meaning

Here the trinity of the knower, the knowledge, and the knowable is the source of action and the trinity of the doer, the means and the action is the structure of 'action' (Karma)

513
मूळ

वन्ही ठेविला असे धूमु । आथी बीजी जेवी द्रुमु । का मनी जोडे कामु । सदा जैसा ॥513॥

मराठी अर्थ

विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो, अथवा मनात जशी नेहमीच इच्छा असते,

English meaning

Just as smoke is hidden in the fire, a tree in its seed, and desire is always hidden in the mind.

514
मूळ

तैसा कर्ता क्रिया करणी । कर्माचे आहे जिंतवणी । सोने जैसे खाणी । सुवर्णाचिये ॥514॥

मराठी अर्थ

आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते- तसा कर्ता क्रिया व करणे(इंद्रिये) ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच (उत्पत्तिस्थानच) आहे. म्हणून

English meaning

Similarly in the three factors, namely the actor, the action and the means there is hidden the attraction towards action. This is like gold which is hidden in a gold-mine.

515
मूळ

म्हणौनि हे कार्य मी कर्ता । ऐसे आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासी ॥515॥

मराठी अर्थ

हे पंडुसुता, अमुक कार्याचा मी कर्ता, जसा जीवाने कर्तेपणा धारण केला, म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा या सर्व क्रियापासून दूर असतो.

English meaning

Therefore, O the son of Pandu, where there is a sense of "I am the doer and this is my action" present, the Atman is far away from all these actions.

516
मूळ

यालागी पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आता असो हे किती । जाणतासि तू ॥516॥

मराठी अर्थ

यास्तव हे सुभते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे, हे तुला वारंवार काय सांगावे ? कारण हे तू जाणतच आहेस.

English meaning

Therefore, O the intelligent Arjuna, I again say that "Atman is quite different from the urge to act. But since you know all this, I better stop here.

517
मूळ

परी सांगितले जे ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिही ठायी भिन्न । गुणी आहाती ॥517॥

मराठी अर्थ

पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले, ती तिन्ही गुणांनी निरनिराळी आहेत.

English meaning

The knowledge, the action and the doer, described above are of three kinds in the three qualities of the Nature or Prakriti.

518
मूळ

म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजो नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥518॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको. कारण यातील रज व तम या दोन गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्त्वगुणच सुटका करण्यास समर्थ आहे.

English meaning

Therefore, O Dhananjaya, you should not trust in knowledge, action and the actor, because two of the three qualities are binding while only one (the Sattwa) is helpful to free you from bondage.

519
मूळ

ते सात्विक ठाऊवे होये । तो गुणभेदु सांगो पाहे । जो सांख्यशास्त्री आहे । उवाइला ॥519॥

मराठी अर्थ

तो सात्त्विक गुणांचा भेद ज्याविषयी संख्याशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असा सांगतो.

English meaning

I am going to tell you the various signs of Sattwa and other qualities, which analysis is very clearly expounded in the Sankhya philosophy.

520
मूळ

जे विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसा नरेंद्र । शास्त्रांचा जे ॥520॥

मराठी अर्थ

जे संख्यशास्त्र विचाररूपी क्षीर समुद्रच आहे, आत्मबोधरुपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणारे शास्त्रात श्रेष्ठ आहे.

English meaning

That Sankhya philosophy which is the ocean of thought, the Moon which causes the lily of self- knowledge to bloom, and the Emperor of sciences which propound the way of knowledge.

521
मूळ

की प्रकृतिपुरुष दोनी । मिसळली दिवोरजनी । तिये निवडिता त्रिभुवनी । मार्तंडु जे ॥521॥

मराठी अर्थ

किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही दिवस व रात्र याप्रमाणे अहर्निश एकमेकांत मिसळली आहेत. त्यांना पृथक करून दाखविणारा या त्रिभुवनात सूर्यच आहे.

English meaning

Or that which is the great Sun which differentiates between the day and night like united Prakriti and a Purusha or female and male principles of original existence.

522
मूळ

जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापी चोविसी । उगाणा घेऊनि परेशी । सुरवाडिजे ॥522॥

मराठी अर्थ

जे अपार अशा मोहाचा चोवीस तत्त्वांनी ठाव घेऊन परतत्त्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगावयास लावते.

English meaning

In this science one can measure up the twenty four elements of the universe and by going beyond them, one can enjoy the bliss of the ``Beyond.''

523
मूळ

अर्जुना ते सांख्यशास्त्र । पढे जयाचे स्तोत्र । ते गुणभेदचरित्र । ऐसे आहे ॥523॥

मराठी अर्थ

अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र, ते ज्या गुणांचे स्तवन करिते, त्यात तीन गुणांचे वर्णन असे आहे.

English meaning

Arjuna, please listen to the analytical explanation of things which that Sankhya science has given.

524
मूळ

जे आपुलेनि आंगिके । त्रिविधपणाचेनि अंके । दृश्यजात तितुके । अंकित केले ॥524॥

मराठी अर्थ

या गुणांनी आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन द्रव्यपदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत,

English meaning

Since the three qualities have by their powers filled this vast canvas of the universe with different colours,

525
मूळ

एवं सत्वरजतमा । तिहीची एवढी असे महिमा । जे त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंती कृमी ॥525॥

मराठी अर्थ

याप्रमाणे सत्व, रज व तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की, त्यांनी ब्रह्मदेवापासून किटका पर्यंत तीन भेद केले आहेत.

English meaning

Since the greatness of these qualities is such that by their power everything from the God Brahma to the small insect is classified into three categories.

526
मूळ

परी विश्वींची आघवी मांदी । जेणे भेदलेनि गुणभेदी । पडिली ते तव आदी । ज्ञान सांगो ॥526॥

मराठी अर्थ

परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो.

English meaning

I shall tell you first about the knowledge by which the whole creation has been caught into three qualities.

527
मूळ

जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेही चोख सुजे । तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे । सर्वही शुद्ध ॥527॥

मराठी अर्थ

कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते; त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते.

English meaning

Because if the vision is clear everything can be seen clearly and similarly when pure knowledge is attained, then only all things seem pure.

528
मूळ

म्हणौनि ते सात्विक ज्ञान । आता सांगो दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥528॥

मराठी अर्थ

म्हणून सात्त्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे, असे कैवल्यगुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले.

English meaning

The Lord Shrikrishna, the final resting place of aloneness, thus told Arjuna. So, please listen to that pure Sattwic knowledge, about which I am going to tell you presently.

529
मूळ

तरी अर्जुना गा ते फुडे । सात्विक ज्ञान चोखडे । जयाच्या उदयी ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसी ॥529॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की, ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते.

English meaning

Dear Arjuna, that Sattwic or pure knowledge is the best knowledge in the rising of which, the knowable and the knower merge into unity.

530
मूळ

जैसा सूर्य न देखे अंधारे । सरिता नेणिजती सागरे । का कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥530॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नद्यांची ओळखही नसते, अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता सापडत नाही.

English meaning

Just as the Sun cannot see the darkness, or the sea does not know what rivers are or our own shadow cannot be taken in hand,

531
मूळ

तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥531॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवता पर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही;

English meaning

Similarly this knowledge does not recognize all the things from the Lord Shiva as the greatest and grass blade as the smallest, as different beings;

532
मूळ

जैसे हाते चित्र पाहाता । होय पाणिये मीठ धुता । का चेवोनि स्वप्ना येता । जैसे होय ॥532॥

मराठी अर्थ

भिंतीवरील चित्रे सावरून पाहिले असता, किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते

English meaning

It is like this- If you see a picture by touching it by hand, its colours etc. cannot be perceived; if you try to wash salt by water, it only dissolves, and salt does not remain in hand or if you wish to see the dream after you are awake you cannot have it.

533
मूळ

तैसे ज्ञाने जेणे । करिता ज्ञातव्याते पाहाणे । जाणता ना जाणणे । जाणावे उरे ॥533॥

मराठी अर्थ

तसेच ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता, व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते;

English meaning

Similarly when by this knowledge you try to see the knowable, the knower, the knowledge and the object to be known- all these three do not exist separately.

534
मूळ

पै सोने आटूनि लेणी । न काढिती आपुलिया आयणी । का तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसे ॥534॥

मराठी अर्थ

परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी घ्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत,

English meaning

For example, it is not that gold is divided and ornaments as different objects are manufactured from it, because ornaments are gold only; similarly waves of water are not made by sifting water or straining it in a strainer and taken out from it as these waves are water only.

535
मूळ

तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । ते ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥535॥

मराठी अर्थ

तसा सर्व दृश्य वस्तूंच्या ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही, त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात.

English meaning

Thus, that knowledge before which the object does not remain separate as a visible thing, should be known as Sattwic or pure knowledge.

536
मूळ

आरिसा पाहो जाता कोडे । जैसे पाहातेचि का रिगे पुढे । तैसे ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जे ॥536॥

मराठी अर्थ

आरसा पाहू गेले असता जसे पहाणाराचेच प्रतिबिंब त्यात दिसते, तसेच ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो.

English meaning

For example, if we see the mirror, we see ourselves as reflected in the glass, the mirror as such does not become important to our vision; similarly this knowledge is such that if the knower wishes to see or know something it disappears and only the knower remains.

537
मूळ

पुढती तेचि सात्विक ज्ञान । जे मोक्षलक्ष्मीचे भुवन । हे असो ऐक चिन्ह । राजसाचे ॥537॥

मराठी अर्थ

हेच सातवी ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो; आता तुला ‘राजस’ ज्ञानाची लक्षणे सांगतो, ती ऐक.

English meaning

I say again that this is the Sattwic knowledge which is the very sacred temple of the goddess of Liberation. Now, please listen to the nature of Rajasic knowledge.

538
मूळ

तरी पार्था परीयेस । ते ज्ञान गा राजस । जे भेदाची कास । धरूनि चाले ॥538॥

मराठी अर्थ

तर पार्था, तेज ज्ञान राजस होय, की जे भूतमात्रांच्या भेदभाव मानून चालते, समजलास ?

English meaning

O Partha, know that the knowledge which uses differences as a means to understand things is the knowledge of Rajas quality.

539
मूळ

विचित्रता भूताचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणे ॥539॥

मराठी अर्थ

ज्या ज्ञानाने भूतमात्रांच्या ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठीकर्‍या(वेगळेपणा) करून घेतल्या आहेत ज्ञात्याला चकवून सोडले आहे;

English meaning

It approaches all objects with a view to analyse and distinguish and brings variegated nature to the information which is then called knowledge of what is what.

540
मूळ

जैसे साचा रूपाआड । घालूनि विसराचे कवाड । मग स्वप्नाचे काबाड । ओपी निद्रा ॥540॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे आड ज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय सिथ्ती आणते,

English meaning

It is just like the sleeping state of man which makes him forget the reality surrounding him and creates the baseless complications of objects in dream.

541
मूळ

तैसे स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या मही खळी । तिही अवस्थांचिया वह्याळी । दावी जे जीवा ॥541॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवतुन मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसविते,

English meaning

This knowledge shows the three worlds of waking, dreaming and sleeping states in the false abyss of delusion, to the Jeeva, beyond the precincts of his own self-knowledge.

542
मूळ

अलंकारपणे झाकले । बाळा सोने का वाया गेले । तैसे नामी रूपी दुरावले । अद्वैत जया ॥542॥

मराठी अर्थ

लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरुपाच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते;

English meaning

Just as a child does not know the gold in the ornaments but looks at the ornament only, this knowledge does not know the unity hidden in the apparent varieties of names and forms.

543
मूळ

अवतरली गाडग्या घडा । पृथ्वी अनोळख जाली मूढा । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठी ॥543॥

मराठी अर्थ

अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखविली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते,

English meaning

Simple-minded persons do not become aware of the earth hidden in the earthen pots, and the fire in the lamps.

544
मूळ

का वस्त्रपणाचेनि आरोपे । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥544॥

मराठी अर्थ

किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखविले असता तंतूंची ओळख पटत नाही, अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याची ओळख नसते,

English meaning

An ordinary man looks at the cloth but not so easily at the thread.

545
मूळ

तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥545॥

मराठी अर्थ

तसे भूतमात्र भिन्नभिन्न आहे, या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्य बोधाची भावना नाश पावली आहे.

English meaning

In this way that point of view sees differences and the unity remains out of sight,

546
मूळ

मग इंधनी भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । का जळभेदे शकलु । चंद्रु जैसा ॥546॥

मराठी अर्थ

मग लाकडे पेटल्यावर त्यांच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे, चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते हालल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत,

English meaning

And then fuel decides the category of fire, the flower becomes important than the fragrance, and the changing ripples and flickering reflections make men say that the Moon is dancing;

547
मूळ

तैसे पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आतले ते राजस । ज्ञान येथ ॥547॥

मराठी अर्थ

तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे, अथवा वेषा वरून लहान व मोठा हा भेद आहे या समजुतीने जे भरलेले ज्ञान, ते राजस ज्ञान होय.

English meaning

Thus the various kinds of articles are categorized according to their properties and compositions, names and shapes. This is the kind of knowledge which is called Rajasic knowledge.

548
मूळ

आता तामसाचेही लिंग । सांगेन ते वोळख चांग । डावलावया मातंग- । सदन जैसे ॥548॥

मराठी अर्थ

आता, गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरता जसे वाटसरास जसे बजावून सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव.

English meaning

Now I shall tell you the signs of Tamasic knowledge which is to be avoided just as the ordinary people while walking on a road, are told to avoid going into the house of a very lowly man. You should remember them well.

549
मूळ

तरी किरीटी जे ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥549॥

मराठी अर्थ

तर अर्जुना, जे ज्ञान विधी रुपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करिते आणि म्हणूनच ते नग्न असल्यामुळे, सर्व शास्त्रांची ‘माता’ जी श्रुती तिला पाठमोरी असते;

English meaning

O the crowned one, that knowledge which does not wear the proper clothing of the scriptures is naked and, therefore, Veda, like a shy damsel turns her face away from it, because the good conduct is her son.

550
मूळ

येरींही शास्त्र बटिकरी । जे निंदेचे विटाळवरी । बोळविलेसे डोंगरी । म्लेंच्छधर्माच्या ॥550॥

मराठी अर्थ

इतर शास्त्रांनीही त्या ज्ञानात बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल, म्हणून म्लेंच्छ धर्मरूपी डोंगराकडे ज्यांची बोलवण केली, (त्याला वाळीत टाकले.);

English meaning

And since the scriptures have banished this knowledge, other sciences also, in an effort to avoid taking its name have turned it away in the far mountains of Mlenchha-Dharma, (non-vedic religions.)

551
मूळ

जे गा ज्ञान ऐसे । गुणग्रहे तामसे । घेतले भवे पिसे । होऊनिया ॥551॥

मराठी अर्थ

जे ज्ञान तमोगुणरुपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते;

English meaning

Such knowledge which is possessed by the ghost of the evil quality of Tamas, roams about everywhere without any aim.

552
मूळ

जे सोयरिके बाधु नेणे । पदार्थी निषेधु न म्हणे । निरोविले जैसे सुणे । शून्यग्रामी ॥552॥

मराठी अर्थ

जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत नाही; व पदार्थाच्या ठिकाणी निषेधपणा ओळखत नाही; जसे ओसाड गावात सोडले कुत्रे स्वेच्छेने वागते;

English meaning

This is such a knowledge which knows no restrictions in the matter of physically being promiscuous, or eating any food just like a stray dog in a village, who

553
मूळ

तया तोंडी जे नाडळे । का खाता जेणे पोळे । तेचि येक वाळे । येर घेणेचि ॥553॥

मराठी अर्थ

त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भाजते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याजपाशी खपतात,

English meaning

eats not only that which is bigger than its mouth or which is so hot that it burns his mouth, but eats anything without a thought.

554
मूळ

पै सोने चोरिता उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळे गोरे ॥554॥

मराठी अर्थ

उंदीर सोन्यासारखी पदार्थ नाश करीत असता चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही;

English meaning

Or like a rat which per chance picks up a piece of gold and scurries down to its hole, does not wait to check if the gold is pure or impure; or a man who eats meat does not bother if the animal had a fair skin or a dark one;

555
मूळ

नाना वनामाजी बोहरी । कडसणी जेवी न करी । का जीत मेले न विचारी । बैसता माशी ॥555॥

मराठी अर्थ

किंवा रानास वनवा लागल्यावर त्यास जसा कसलाच विचार राहात नाही अथवा प्राणी जिवंत मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते;

English meaning

Or like the forest fire which does not see whom or which it is burning down, or a fly sits on a body not bothering if it is a dead body or a living person.

556
मूळ

अगा वांता का वाढिलेया । साजुक का सडलिया । विवेकु कावळिया । नाही जैसा ॥556॥

मराठी अर्थ

अरे कावळ्यास जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो,

English meaning

Or like a crow which has no consideration whether what it picks up by beak is a good food, or a vomit, or a stale food having obnoxious rotten smell;

557
मूळ

तैसे निषिद्ध सांडूनि द्यावे । का विहित आदरे घ्यावे । हे विषयांचेनि नांवे । नेणेचि जे ॥557॥

मराठी अर्थ

तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा, अथवा शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टींचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या भरात जे ज्ञान जाणत नाही,

English meaning

Similarly this Tamasic knowledge does not make any distinction in the action, to avoid the bad and choose the good one.

558
मूळ

जेतुले आड पडे दिठी । तेतुले घेचि विषयासाठी । मग ते स्त्री-द्रव्य वाटी । शिश्नोदरा ॥558॥

मराठी अर्थ

जी जी वस्तू दृष्टीस पडेल, त्या त्या वस्तूचा उपभोग घेते; आणि मग स्त्री असल्यास शिश्नास व द्रव्य असल्यास उदरास वाटून देते;

English meaning

It thinks that whatever is seen by the eyes is meant for our enjoyment and out of these the woman should be used to satisfy sex and material should be utilized as consumable goods.

559
मूळ

तीर्थातीर्थ हे भाख । उदकी नाही सनोळख । तृषा वोळे तेचि सुख । वाचूनिया ॥559॥

मराठी अर्थ

उदकाच्या ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते, परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते,

English meaning

Whenever he sees water, he does not care to check its purity or impurity. He only says, "All right! Does this quench my thirst? Then I will drink it!"

560
मूळ

तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे ते मेध्य । ऐसाचि बोधु ॥560॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे भक्ष्य व निंद्यानिंद्य यांचा जे विचार करीत नाही, परंतु आपल्यास जे आवडेल तेच पवित्र आहे, असा ज्याचा निश्चय झालेला असतो,

English meaning

Same is the case of food. No thought is given to see whether it is good food or prohibited, safe or unsafe. "That is pure which tastes good to the palate!"

561
मूळ

आणि स्त्रीजात तितुके । त्वचेंद्रियेचि वोळखे । तियेविषयी सोयरिके । एकचि बोधु ॥561॥

मराठी अर्थ

आणि स्त्रीजात म्हणून जेवढी आहे तीजविषयी भोग्य विषय एवढीच त्याची ओळख आहे व तिच्या ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते;

English meaning

He thinks that all that a woman is, is only an object to be used to satisfy the skin's desire for pleasure!

562
मूळ

पै स्वार्थी जे उपकरे । तयाचि नाम सोयिरे । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानी ॥562॥

मराठी अर्थ

हे पहा, आपल्याला जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देह संबंध ज्यांच्याशी झालेले आहेत, ते सोयरे आहेत असा बोध नाही, अशी ज्या ज्ञानाची समजूत असते,

English meaning

He thinks that only he is my relative who is helpful to my selfish needs. This knowledge does not value kinship. Such thoughts are the products of Tamasic knowledge.

563
मूळ

मृत्यूचे आघवेचि अन्न । आघवेचि आगी इंधन । तैसे जगचि आपले धन । तामसज्ञाना ॥563॥

मराठी अर्थ

मृत्यूला सगळेच आपले खाद्य आहे असे वाटते, अग्नीला सगळेच इंधन वाटते, तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपले धन आहे असे वाटते.

English meaning

Just as everything is food for death and everything is fuel for fire, so everything is his own property, the whole world is his possession for a man of Tamasic knowledge.

564
मूळ

ऐसेनि विश्व सकळ । जेणे विषयोचि मानिले केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥564॥

मराठी अर्थ

याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरिताच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे, त्यास भरणा शिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो;

English meaning

In this way, he who thinks that all the world is an object of his own passion, gets only one fruit and that is filling his belly.

565
मूळ

आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसे कृत्यजात उदरा- । लागिचि बुझे ॥565॥

मराठी अर्थ

आकाशातून पडलेल्या पाण्यास समुद्र हा एक जसा थारा आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान कोणतेही कृत्य केले तरी ते पोटासाठीच आहे असे समजते;

English meaning

Just as sea is the only aim and resort for rain-water, so stomach is the only objective for everything done through Tamasic knowledge.

566
मूळ

वाचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जे ॥566॥

मराठी अर्थ

स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरीता विहित व निषिद्ध आचरण हेच कारण होय, या जाणिवेची ज्या ज्ञानाला मुळीच ओळख नसते;

English meaning

Not only this, but in that knowledge, there is absolutely no thought that there is something like heaven and hell and one should try to avoid hell and reach heaven.

567
मूळ

जे देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळो नेणे ॥567॥

मराठी अर्थ

देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे यापलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते;

English meaning

The intellect of such a man of Tamas quality has no reach beyond the concept that the lump of the physical body is Atman, and god is just a simple stone image.

568
मूळ

म्हणे पडिलेनि शरीरे । केलेनिसी आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषे । ॥568॥

मराठी अर्थ

आणि ते असे म्हणते की, हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मा सह नाश पावतो; मग कर्माची फळे भोगावयास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहातो ?

English meaning

This knowledge says that at the time of death, Atman also dies together with all his activities; so who is there to reap the fruit of his actions?

569
मूळ

ना ईश्वरु पाहाता आहे । तो भोगवी हे जरी होये । तरी देवचि खाये । विकूनिया ॥569॥

मराठी अर्थ

किंवा पाहू गेल्यास ईश्वर आहे असे दिसत नाही, तथापि तो कर्माची फळे भोगवीतो म्हणून जर म्हणावे, तर एखादा देवाच्या सोन्यारूप्याच्या मूर्ती विकून खातो त्याची वाट काय ?

English meaning

If somebody says that god is all powerful, and god makes man reap the fruits of his action, his knowledge says, "If it is so, why not sell the God and get the benefit?

570
मूळ

गावीचे देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशीचे डोंगर । उगे का असती ? ॥570॥

मराठी अर्थ

गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे, तर त्या मूर्तीच्या ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात, ते डोंगर स्वस्थ का बसतात.

English meaning

It also says that if the stone gods in a temple in a village are the controllers of the universe, then why are the mountains themselves not saying anything?

571
मूळ

ऐसा विपाये देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तव म्हणिजे । देहातेचि ॥571॥

मराठी अर्थ

याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले, तरी तो दगडाचीच मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच आहे असे समजते.

English meaning

So supposing that god is believed to exist, he simply exists as a stone, and Atman is nothing but the physical body.

572
मूळ

येरे पापपुण्यादिके । ते आघवेचि करोनि लटिके । हित मानी अग्निमुखे । चरणे जे का ॥572॥

मराठी अर्थ

याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत अग्नि पेटल्यावर पुढे येणार्‍या सर्व जिनसांचे भक्षण करतो, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल, तिचा भोग घेण्यातच हित आहे असेही समजते

English meaning

This knowledge declares as false everything about sin and merit, which people talk about and decides that all objects are only to be consumed like forest fire.

573
मूळ

जे चामाचे डोळे दाविती । जे इंद्रिये गोडी लाविती । तेचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥573॥

मराठी अर्थ

चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील, त्याच गोष्टी खर्‍या आहेत असा त्याचा पक्का अनुभव आहे,

English meaning

This knowledge perceives as true only that which is seen by the eyes and for which the organs are hungry.

574
मूळ

किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशी जैसी ॥574॥

मराठी अर्थ

किंबहुना पार्था, आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढतच जाते;

English meaning

In short, O Partha, when such train of thought goes on increasing, then just as the smoke rings go up in the sky and disappear.

575
मूळ

कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥575॥

मराठी अर्थ

बरुंतील भेंड कोरडे किंवा ओले असले तरी मोठे वाढल्यावरही कशाच्या उपभोगास येत नाही,

English meaning

Or the plant of Bhend-tree grows and becomes useless and is broken-up.

576
मूळ

नाना उंसांची कणसे । का नपुंसके माणुसे । वन लागले जैसे । साबरीचे ॥576॥

मराठी अर्थ

अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुंसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन, ही सर्व जशी निरुपयोगी आहेत;

English meaning

Or useless are the shoots at the end of sugarcane, a eunouch or a cactus-shrub.

577
मूळ

नातरी बाळकाचे मन । का चोराघरीचे धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥577॥

मराठी अर्थ

अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोरांनी चोरून आणलेली धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही, अथवा शेळीचे गळ्यात असणारी स्तन जसे निरुपयोगी असतात,

English meaning

Or thoughtless is the mind of child, dangerous the money in the house of a robber, and the soft growth of lobes at the neck of the sheep is purposeless,

578
मूळ

तैसे जे वायाणे । वोसाळ दिसे जाणणे । तयाते मी म्हणे । तामस ज्ञान ॥578॥

मराठी अर्थ

तसे ते निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो.

English meaning

So is useless this knowledge which is called Tamas by me, and it is really hapless.

579
मूळ

तेही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा का जैसा । डोळा वाडु ॥579॥

मराठी अर्थ

त्यालाही ज्ञानाचा शब्दाने वर्णन करण्याचा अभिप्राय हाच कि, मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत, असे विरुद्ध आर्थाने म्हणतो

English meaning

Even then I call it knowledge, because even the physical eyes of a blind man are called eyes and they look like eyes.

580
मूळ

का बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसे आडनांव ज्ञान । तामसा तया ॥580॥

मराठी अर्थ

किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत, असे त्यास ऐकू येत नसतानाही वाखाणतो अथवा न पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान (पिण्याची वस्तू) असे म्हणतो, तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय !

English meaning

Similarly the outer ears of a deaf-man are good in shape, or wine is called a drink, though it is prohibitted, so this name as knowledge is simply a fictitious name.

581
मूळ

हे असो किती बोलावे । तरी ऐसे जे देखावे । ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम ॥581॥

मराठी अर्थ

हे असो; आणखी किती वर्णन करावे तर ? तर असे हे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष डोळस तमोगुणच समजावे.

English meaning

In short the knowledge through this Tamasic quality is not really knowledge. It is darkness of the open eyes.

582
मूळ

एवं तिही गुणी । भेदले यथालक्षणी । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविले तुज ॥582॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, हे श्रोतृश्रेष्ठा, तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान, त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली.

English meaning

O the great listener Arjuna, in this way, I have explained to you three types of knowledge according to three qualities.

583
मूळ

आता याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशे होती गोचरा । कर्तयाच्या क्रिया ॥583॥

मराठी अर्थ

हे धनुर्धरा, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात.

English meaning

Similarly actions of the doer are also divided into three parts according to the knowledge of the doer.

584
मूळ

म्हणौनि कर्म पै गा । अनुसरे तिही भागा । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥584॥

मराठी अर्थ

म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते, तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते.

English meaning

So, just as water which meets a stream in its path takes the direction of that stream in flowing further, similarly action also goes on by the three paths of the three types of knowledge.

585
मूळ

तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । तेथ सात्विक तव ऐसे । परीसे आधी ॥585॥

मराठी अर्थ

तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते, त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक.

English meaning

And thus only one action becomes three-fold because of the three types of knowledge, out of which please listen to the signs of the Sattwic type of action.

586
मूळ

तरी स्वाधिकाराचेनि मार्गे । आले जे मानिले आंगे । पतिव्रतेचेनि परीष्वंगे । प्रियाते जैसे ॥586॥

मराठी अर्थ

तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते, तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल, ते कर्म जो आचरण करितो;

English meaning

Action which presents itself as duty according to our stage in life and status in the classified society, and which embraces us like a faithful devoted wife may embrace her husband.

587
मूळ

सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनी अंजन । तैसे अधिकारासी मंडण । नित्यपणे जे ॥587॥

मराठी अर्थ

सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते, तसेच अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय,

English meaning

Action which behoves us as the sandalwood paste decorates a dark beautiful body or a cosmetic cream enhances the beauty of a young woman.

588
मूळ

ते नित्य कर्म भले । होय नैमित्तिकी सावाइले । सोनयासि जोडले । सौरभ्य जैसे ॥588॥

मराठी अर्थ

ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता, सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा येते, त्याप्रमाणे होय

English meaning

That is our routine and natural action. It is itself right action. When it is further turned and done as occasional duty, it is like gold added with fragrance.

589
मूळ

आणि आंगा जीवाची संपत्ती । वेचूनि बाळाची करी पाळती । परी जीवे उबगणे हे स्थिती । न पाहे माय ॥589॥

मराठी अर्थ

जशी शरीराने, जीवन व संपत्ती ने माता आपल्या बालकाचे रक्षण करते, तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही,

English meaning

And the mother works hard physically and with her soul and takes all the care of her child but is not bored in that activity.

590
मूळ

तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मीचि करी ॥590॥

मराठी अर्थ

तसे सर्वपरि कर्माचे अनुष्ठान फळाची इच्छा न धरिता करितो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करितो;

English meaning

Similarly action should be performed with all the heart and soul, but without looking for its fruit, it should be placed in the Brahman only by renounciation.

591
मूळ

आणि प्रिय आलिया स्वभावे । शंबळ उरे वेचे ठाउवे । नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे । पारुषे जरी ॥591॥

मराठी अर्थ

आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाच्या समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतीव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही, तसे कर्म करीत असता साधुजन घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले,

English meaning

When serving food to the son or husband, a woman does not worry whether any food will remain for herself or not, in the same way, we should have our attitude while doing good deeds.

592
मूळ

तरी अकरणाचेनि खेदे । द्वेषाते जीवी न बांधे । जालियाचेनि आनंदे । फुंजो नेणे ॥592॥

मराठी अर्थ

तरी तो कर्म करण्याचे राहिले, असा खेद मनास होऊ देत नाही व रागावत नाही, ते कर्म शेवटास गेले असतानाही जो आनंदाने गर्व मानीत नाही;

English meaning

Then that action does not cause bondage by sorrow if it does not become successful and does not cause pride if it is successful.

593
मूळ

ऐसेऐसिया हातवटिया । कर्म निफजे जे धनंजया । जाण सात्विक हे तया । गुणनाम गा ॥593॥

मराठी अर्थ

या युक्तीने जे कर्म होते, त्याला अर्जुना, सात्विक कर्म म्हणतात, हे नाव त्यांच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते, असे समज.

English meaning

O Dhananjaya, when action is done in this skillful manner, it is called of Sattwic quality.

594
मूळ

ययावरी राजसाचे । लक्षण सांगिजेल साचे । न करी अवधानाचे । वाणेपण ॥594॥

मराठी अर्थ

यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको.

English meaning

Now, I shall be telling you the signs of Rajasic action. Please do not be inattentive.

595
मूळ

तरी घरी मातापितरा । धड बोली नाही संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥595॥

मराठी अर्थ

तर घरी मातापितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करत नाही, परंतु मुर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करितो;

English meaning

Just as a foolish man does not speak a good word with his parents in his home, but has great respect for all the other people in the outside world, which is also false;

596
मूळ

का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापे सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥596॥

मराठी अर्थ

किंवा तुळसीच्या झाडास दुरून शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फळ किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही; परंतु द्राक्षाच्या झाडास दुध घालतो,

English meaning

Or just as a man never sprinkles even a little water on the Tulsi plant but pours milk at the roots of the grapevine; (Tulsi does not bear fruit but grapes are fruits which he wants)

597
मूळ

तैसी नित्यनैमित्तिके । कर्मे जिये आवश्यके । तयांचेविषयी न शके । बैसला उठू ॥597॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे, त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही,

English meaning

Similarly he does not even think of getting up from his lazy reclining, to do his rightful daily or occasional duty.

598
मूळ

येरा काम्याचेनि तरी नांवे । देह सर्वस्व आघवे । वेचितांही न मनवे । बहु ऐसे ॥598॥

मराठी अर्थ

एऱ्हवी काम्यकर्माविषयी सर्व देह जरी झिजला, तरी त्यास शीण येत नाही. (थोडकेच केले असे मानतो).

English meaning

But if perchance there is some lucrative job at hand, he does not mind even if he suffers heavy physical labour in it;

599
मूळ

अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देता न धाइजे । पेरिता पुरे न म्हणिजे । बीज जेवी ॥599॥

मराठी अर्थ

अरे, वाढीदिढीच्या व्यापारांत पैसे करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही;

English meaning

My dear, while sowing seeds which are sure to yield a good crop, no one says- "Enough of all this trouble of sowing seeds;" similarly when there is definite benefit of very heavy interest, he does not hesitate putting in money generously;

600
मूळ

का परीसु आलिया हाती । लोहालागी सर्वसंपत्ती । वेचिता ये उन्नती । साधकु जैसा ॥600॥

मराठी अर्थ

किंवा परीस हाती आल्यावर तो लोखंडाचे सोने करण्याकरीता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो,

English meaning

And just as an alchemist who has the magic stone Parees with him, always prospers even if initially he spends all his money in the purchase of iron.

601
मूळ

तैसी फळे देखोनि पुढे । काम्यकर्मे दुवाडे । करी परी ते थोकडे । केलेही मानी ॥601॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो. परंतु ती थोडीच केली असे मानतो.

English meaning

Similarly this 'doer' who is Rajasic, keeps one eye on the possible benefit in the future, undertakes many selfish actions and though they are many and heavy, he does not mind at all.

602
मूळ

तेणे फळकामुके । यथाविधी नेटके । काम्य कीजे तितुके । क्रियाजात ॥602॥

मराठी अर्थ

याप्रमाणे फळाची इच्छा धरून, काम्यकर्मे जितकी असतील, इतकी यथाविधि करतो

English meaning

Being entangled by hope for benefit, he performs all selfish actions exactly according to the rules of their execution.

603
मूळ

आणि तयाही केलियाचे । तोंडी लावी दौंडीचे । कर्मी या नांवपाटाचे । वाणे सारी ॥603॥

मराठी अर्थ

आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करीतो व ‘ मी मोठा कर्मठ आहे ‘ या नावाची ख्याती चोहीकडे पसरवितो.

English meaning

And makes a great show, proudly makes publicity that he is the man who has done all these great works and takes their credit.

604
मूळ

तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसे ॥604॥

मराठी अर्थ

त्या पुरुषांमध्ये असा कर्म अहंकार भरतो की, काळ ज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानीत नाही, तसा तो पिता आणि गुरू यांचीही पर्वा करीत नाही.

English meaning

And then being puffed up, he does not give any respect to his father or his Guru, just as when a disease is really fatal, it is not cured by any medicine.

605
मूळ

तैसेनि साहंकारे । फळाभिलाषिये नरे । कीजे गा आदरे । जे जे काही ॥605॥

मराठी अर्थ

तशा कर्माभिमानी फळाभिलाशी पुरुषाकडून हे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते,

English meaning

Whatever activities such a man does with the desire for fruit and with pride, very tenaciously making great efforts,

606
मूळ

परी तेही करणे बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो का जैसा । कोल्हाटियांचा ॥606॥

मराठी अर्थ

ते ते पुष्कळ आयासानेही केलेले कर्म कोल्हाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसते कष्टाला कारण होते.

English meaning

And that also in great difficulties he does everything as if his very survival is dependant on it, as a rope-walker performs his feat in public at the risk of his life.

607
मूळ

एका कणालागी उंदिरु । आसका उपसे डोंगरु । का शेवाळोद्देशे दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥607॥

मराठी अर्थ

एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरीता बेडूक समुद्र ढवळतो;

English meaning

Just as a rat goes on digging through a mountain to find a particle of grain, or a frog fathoms deep water with a hope to get some water herbs to eat.

608
मूळ

पै भिकेपरते न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येका ॥608॥

मराठी अर्थ

भिक्षे शिवाय दुसरी काही प्राप्ति न होता गारुडी जसे सापाचे ओझी वाहतो; काय करावे ! या लोकांना खटपटत प्रिय आहे.

English meaning

Or just to have some money, a snake-charmer goes from house to house, carrying the burden of a snake on his shoulder! But perhaps all this exhausting work seems to be pleasant to some persons!

609
मूळ

हे असो परमाणूचेनि लाभे । पाताळ लंघिती वोळंबे । तैसे स्वर्गसुखलोभे । विचंबणे जे ॥609॥

मराठी अर्थ

हे असो; एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीकरीता जे श्रम करणे.

English meaning

What of these examples? White ants carve earth down to the very depths of nether world just to find something to eat. Similar are the hardships people undergo just with a hope to enjoy pleasures in the other world!

610
मूळ

ते काम्य कर्म सक्लेश । जाणावे येथ राजस । आता चिन्ह परिस । तामसाचे ॥610॥

मराठी अर्थ

तेच क्लेशयुक्त काम्यकर्म राजस आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो, ते ऐक.

English meaning

This type of selfish action which is full of troubles should be known as Rajasic action. Now please listen to the sign of Tamasic action.

611
मूळ

तरी ते गा तामस कर्म । जे निंदेचे काळे धाम । निषेधाचे जन्म । सांच जेणे ॥611॥

मराठी अर्थ

जे निंदेचे काळे(पापमय) घराच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे, ते तामस कर्म होय.

English meaning

That action which is the home of blame and the fulfillment of negative and destructive way of life is Tamasic action.

612
मूळ

जे निपजविल्यापाठी । काहीच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटी । तोयाचे जेवी ॥612॥

मराठी अर्थ

जशी पाण्यावर काढलेली रेघ दुसऱ्याचक्षणी दिसत नाही, त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तरक्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही,

English meaning

That action which leaves no residue just like a line drawn on water;

613
मूळ

का कांजी घुसळलिया । का राखोंडी फुंकलिया । काही न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥613॥

मराठी अर्थ

किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाहीत, अथवा वाळू घाण्यात घातली असता जसे तिजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही,

English meaning

Or if liquid poridge of rice is churned, or if ash is blown to make fire, or if sand is put into an oil-mill nothing is gained.

614
मूळ

नाना उपणिलिया भूंस । का विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥614॥

मराठी अर्थ

अथवा भूस उपणपने किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फांस टाकणे,

English meaning

Or to winnow the husk, or to trust a dagger in the sky or to put a noose to catch wind.

615
मूळ

हे आवघेंचि जैसे । वांझे होऊनि नासे । जे केलिया पाठी तैसे । वायाचि जाय ॥615॥

मराठी अर्थ

या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ आहेत, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते;

English meaning

Just as all this is futile, the action which becomes futile, is Tamas.

616
मूळ

येऱ्हवी नरदेहाही येवढे । धन आटणीये पडे । जे कर्म निफजविता मोडे । जगाचे सुख ॥616॥

मराठी अर्थ

एऱ्हवी नरदेह एवढेही अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते, त्याच्या योगाने जगाला सुख न देता दुःख मात्र होते.

English meaning

And not only that action is futile, it is further harmful if committed after being luckily born in this precious human body, giving all sorts of troubles to others.

617
मूळ

जैसा कमळवनी फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळा करी ॥617॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्यास श्रम होऊन कमळाचाहि नाश होतो;

English meaning

For example, suppose some thorny instrument is scratched along the petals of a lotus, the petals are no doubt torn, but the thorns are also slightly affected;

618
मूळ

का आपण आंगे जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळे । दीपाचेनि ॥618॥

मराठी अर्थ

किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करितो,

English meaning

Or little moth hates the flame of a lamp, burns itself in it, and also by extinguishing the lamp, renders the eyes of all people useless.

619
मूळ

तैसे सर्वस्व वाया जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणे ॥619॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले, तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो,

English meaning

When action is so dangerous, that it may deprive the doer of all his possessions or even cause his death, that action is definitely aimed at hurting others.

620
मूळ

माशी आपणयाते गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । ते कश्मळ आठवी । आचरण जे ॥620॥

मराठी अर्थ

माशी ही स्वतःला गीळविते, (पोटात जाऊन स्वतः मरते) पण दुसऱ्याला वांति करून शिणविते, तशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव.

English meaning

A fly is swallowed and it dies in that; but at the same time it causes the man who swallows it to vomit all the food. Action which reminds us of this double trouble,

621
मूळ

तेही करावयो दोषे । मज सामर्थ्य असे की नसे । हेही पुढील तैसे । न पाहता करी ॥621॥

मराठी अर्थ

बरे, तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही, यापुढील विचार तर करावा पण तसे काही न करता कर्म करू लागतो;

English meaning

And also that action which is done without thinking whether one has the ability to do it or not,

622
मूळ

केवढा माझा उपावो । करिता कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥622॥

मराठी अर्थ

माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे, आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे,

English meaning

What is one's capacity, how great is the scope and involvement of the work to be done

623
मूळ

इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पाये । पुसोनिया होये । साटोप कर्मी ॥623॥

मराठी अर्थ

या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो, आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो;

English meaning

Is not at all considered, through thoughtlessness, and a great ballyhoo is made of a great project to be undertaken,

624
मूळ

आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । का स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥624॥

मराठी अर्थ

अग्नि ज्या वेळूपासून उत्पन्न होतो, ती आपली रहाण्याची जागा (वेळूंचे बेट) जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला,

English meaning

Is the action like the fire which burns down our own house and spreads to other houses or the sea which crosses its own shoreline and drowns other areas also.

625
मूळ

मग नेणे बहु थोडे । न पाहे मागे पुढे । मार्गामार्ग येकवढे । करीत चाले ॥625॥

मराठी अर्थ

म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करिता व मागेपुढे न पाहता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो;

English meaning

And then that fire does not hesitate at anything and that sea does not stop in inundating all and every waterway and burrows, making one complete water level everywhere.

626
मूळ

तैसे कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय ते निश्चित । तामस जाण ॥626॥

मराठी अर्थ

तसे योग्य-अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद असे उरू देत नाही, ते तामस कर्म असे समज.

English meaning

Similarly if in such an action no thought is given whether it is good or bad, helpful of harmful, and is performed ruthlessly destroying our own people as well as others, it is definitely to be known as Tamas action.

627
मूळ

ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तीसी ॥627॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले हे तुला दाखवल्यास स्पष्ट करून सांगितले.

English meaning

O Arjuna, I have thus explained to you how action is divided into three types according to the three qualities of Sattwa etc.

628
मूळ

आता ययाचि कर्मा भजता । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥628॥

मराठी अर्थ

आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव, तो याचे योगाने तीन प्रकारचा झाला आहे.

English meaning

And while doing these actions, the Actor or Doer himself is divided into three types.

629
मूळ

चतुराश्रमवशे । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसे । कर्मभेदे ॥629॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे, एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माचा भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात.

English meaning

This triple division of the nature of the doer is just like the nature of achievement in human life though essentially is a matter of "achieving", becomes divided into four categories according to bachelorhood, role of a householder, a Wanaprastha state and the state of renunciation.

630
मूळ

तरी तया तिही आंतु । सात्विक तव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णी तू ॥630॥

मराठी अर्थ

तर त्या तिहींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक.

English meaning

Out of these three types of doers, I am going to tell you about the Sattwic one, to which you should pay full attention by your mind.

631
मूळ

तरी फळोद्देशे सांडिलिया । वाढती जेवी सरळिया । शाखा का चंदनाचिया । बावन्नया ॥631॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा न धरिता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागांस उत्तम सुवासच असतो;

English meaning

Now just as the sandal-wood tree has branches which spread, and grow straight because they have not to bear any fruit.

632
मूळ

का न फळताही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिका । क्रिया जो का ॥632॥

मराठी अर्थ

किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो, नागवेल लाजरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत, त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांची इच्छा न धरता जो त्यांचे आचरण करतो,

English meaning

Or just as the life's purpose is fulfilled in the case of betel-leaf creeper without its having fruit, he who does perform his routine and occasional duties without hope for fruit,

633
मूळ

परी फळशून्यता । नाही तया विफळता । पै फळासीचि पंडुसुता । फळे कायिसी । ॥633॥

मराठी अर्थ

पण त्याला फळशून्य असे म्हणू नये; कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना, फळाला फळे कुठून येणार ?

English meaning

Does not find his actions useless by reason of not having fruit, because, O Arjuna, do fruits bear further fruits? (His performances of actions is itself the fruit).

634
मूळ

आणि आदरे करी बहुवसे । परी कर्ता मी हे नुमसे । वर्षाकाळीचे जैसे । मेघवृंद ॥634॥

मराठी अर्थ

आणि ती कर्मे आदराने करितो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाहीत; ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करितात,

English meaning

Further, just as clouds of the rainy-season pour rain profusely, but they are not proud of it, similarly he does everything with great care and respect.

635
मूळ

तेवीचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पै गा । निपजावया ॥635॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरिता,

English meaning

But he has no touch of pride and all his actions are meant for pouring them up on Paramatman like these clouds.

636
मूळ

तया काळाते नुलंघणे । देशशुद्धिही साधणे । का शास्त्रांच्या वाती पाहणे । क्रियानिर्णयो ॥636॥

मराठी अर्थ

काळाची मर्यादा न सोडता, देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो- कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधे करितो.

English meaning

For this, he takes care to catch the right time, find the right clean place and to take proper decisions according to the scriptures as regards the actual execution of actions.

637
मूळ

वृत्ति करणे येकवळा । चित्त जावो न देणे फळा । नियमांचिया सांखळा । वाहणे सदा ॥637॥

मराठी अर्थ

इंद्रिये व वृत्ती यांचे ऐक्य करून फळाकडे चित्तास न जाऊ देता, जो नियमांची बेडी पायात बाळगतो,

English meaning

To concentrate his total consciousness, not to let mind run astray towards the fruit, and even to accept any hard rules for it.

638
मूळ

हा निरोधु साहावयालागी । धैर्याचिया चांगचांगी । चिंतवणी जिती आंगी । वाहे जो का ॥638॥

मराठी अर्थ

ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे, अशा विषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो, ( अहोरात्र त्याजविषयी विचार करीत असतो, )

English meaning

Further, he makes every effort to bring in himself and develop the quality of sustaining firmness of determination, necessary for such hard works.

639
मूळ

आणि आत्मयाचिये आवडी । कर्मे करिता वरपडी । देहसुखाचिये परवडी । येवो न लाहे ॥639॥

मराठी अर्थ

आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देह सुखाच्या नाश याची पर्वा करीत नाही,

English meaning

He does not get entangled into the physical pleasures while he is performing these actions.

640
मूळ

आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥640॥

मराठी अर्थ

तो आळस व झोप टाकून देतो त्याला भुकेचीही आठवण होत नाही आणि त्यायोगे जो जो सुख आवस्था दूर दूर पळते,

English meaning

His laziness and sleep leave him totally, he is not troubled though hungry, his mind remaining undisturbed, and he is not much anxious about pampering his physical body by comforts.

641
मूळ

तव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोने जैसे पुटी तुक । तुटलिया कसी ॥641॥

मराठी अर्थ

तो तो, सोने ज्याप्रमाणे आंचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो.

English meaning

Even in these conditions, he has enhanced enthusiasm in doing these duties, just as gold when subjected to fire treatment, no doubt loses some weight by the dross being burnt, but it improves its quality.

642
मूळ

जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगी घालिता रोमांच । देखिजती सतिये । ॥642॥

मराठी अर्थ

जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकिते समयीही पती प्रेमामुळे पतिव्रता स्त्री च्या अंगावर रोमांच उभे राहतात !

English meaning

If there is real devotion to God, such a man thinks nothing about his life. My dear, does the woman, who is going to be a 'Satee' ever fear that her body is going to be burnt?

643
मूळ

मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदता तया । काय खेदु होईल ? ॥643॥

मराठी अर्थ

मग अर्जुना आत्मप्राप्ती सारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याचे शरीरास जरी कष्ट झाले तरी याच खेद होईल काय ?

English meaning

Dear Dhananjaya, similarly will a man, who is completely eaten-up by great urge of being one with his beloved Atman, ever care about any discomfort his body experiences?

644
मूळ

म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जव जव देहबुद्धि आटे । तव तव आनंदु दुणवटे । कर्मी जया ॥644॥

मराठी अर्थ

म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो.

English meaning

Therefore, the more there is loss of interest in enjoyment of worldly objects and the more there is dissolution of the pride about physical body, the more is his joy in the performance of these right actions.

645
मूळ

ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरी । ते ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥645॥

मराठी अर्थ

याप्रमाणे कर्म करीत असता एखादेवेळी ते कर्म जरी बंद पडले, तरी

English meaning

In the case of this man, who does his duties, it so happens sometimes that his action is left incomplete.

646
मूळ

तरी कडाडी लोटला गाडा । तो आपणपे न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो का ॥646॥

मराठी अर्थ

गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानीत नाही,

English meaning

Even then just like a boulder which has fallen down a slope of a mountain does not mind how slowly or fast it falls down to the low land, he does not lose his balance of mind, and is not unhappy.

647
मूळ

नातरी आदरिले । अव्यंग सिद्धी गेले । तरी तेही जिंतिले । मिरवू नेणे ॥647॥

मराठी अर्थ

अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस गेले असतानाही त्याबद्दल प्रतिष्ठा मिरवू जाणत नाही,

English meaning

Nor does he shout with joy if that action is accomplished successfully.,

648
मूळ

इया खुणा कर्म करिता । देखिजे जो पंडुसुता । तयाते म्हणिपे तत्त्वता । सात्विकु कर्ता ॥648॥

मराठी अर्थ

अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील, त्याला निश्चयाने सात्त्विक कर्ता म्हणावे.

English meaning

O the son of Pandu, the man who does all his duties taking all these precautions, should be called the Sattwic doer.

649
मूळ

आता राजसा कर्तेया । वोळखणे हे धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥649॥

मराठी अर्थ

हे धनंजया, आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो. कारण, जगातील सर्व अभिमानांचे ही माहेरघरच होय.

English meaning

Now O Dhananjaya, the main sign of a Rajasic doer of actions is that he is inwardly full of worldly desires.

650
मूळ

जैसा गावीचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । का स्मशानी अमंगळा । आघवयांची ॥650॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याची उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात,

English meaning

There is a heap of refuse in the dirtiest place outside the village and in the cemetery, all kinds of dirty things are spread everywhere.

651
मूळ

तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषा । घरटा जाला ॥651॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे वस्तूत: पाहिले असता ही जगांतील सर्व कामाची पाय धुण्याची जागा होय,

English meaning

Similar to these a man who becomes a place where all the sins of the whole world are washed.

652
मूळ

म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मी चांगु । रोहो मांडी ॥652॥

मराठी अर्थ

म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो,

English meaning

And, therefore, he opens up a work-shop of such actions which are sure to bring fruits.

653
मूळ

आणि आपण जालिये जोडी । उपखो नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥653॥

मराठी अर्थ

आणि संपादन केलेल्या पदार्थांपैकी एका कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थांवरून आपला जीव ओवाळून टाकतो.

English meaning

He does not lose even a farthing out of the profit which he gets, but is ready to lose his life any moment just for that much little thing.

654
मूळ

कृपणु चित्ती ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥654॥

मराठी अर्थ

कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो,

English meaning

He is very miser about his possessions, but is very keen to loot others, just like a crane which is swift to catch a fish.

655
मूळ

आणि गोवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळे तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥655॥

मराठी अर्थ

आणि बोरीचे झाड जशी जवळ गेले असता वस्त्र अडकून गुंतविते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता त्यात काही सार नाही,

English meaning

Just as a berry-tree which tears the cloth if we go near it, scratches our skin if we come into its contact and the fruits of which or so sour that they bite our tongue,

656
मूळ

तैसे मने वाचा काये । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधिता न पाहे । पराचे हित ॥656॥

मराठी अर्थ

तसे काया-वाचा-मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही;

English meaning

He gives great trouble to others, and does not care at all about the welfare of others, when there is chance to get what he wants.

657
मूळ

तेवीचि आंगे कर्मी । आचरणे नोहे क्षमी । न निघे मनोधर्मी । अरोचकु ॥657॥

मराठी अर्थ

तसेच स्वतः जे कर्म आरंभिले ते निरंतर चालविण्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याच्या मनात कंटाळा येत नाही,

English meaning

He does not show any lenience or give concessions to others when he is doing his selfish work, and he always avoids any type of emotion however noble it may be, if he does not like it.

658
मूळ

कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वे जो ॥658॥

मराठी अर्थ

धोत्र्याच्या फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो;

English meaning

He is totally doltish and poisonous both inside and out like the poppy seed, which is thorny outside and poisonous inside.

659
मूळ

आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखे जगा यया । वांकुलिया वाये ॥659॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, केलेल्या कर्माची फळ प्राप्ती झाली असता त्या आनंदाच्या भरात दुसऱ्यासं वेडावून दाखवितो,

English meaning

O Dhananjaya, if such a man is successful in his action, and gets fruit which he desired, he immediately makes a big pomp and show and teases other people.

660
मूळ

अथवा जे आदरिले । हीनफळ होय केले । तरी शोके तेणे जिंतिले । धिक्कारो लागे ॥660॥

मराठी अर्थ

अथवा आरंभिलेले कर्म फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो;

English meaning

If his efforts meet failure, he becomes corroded by sorrow and starts blaming the world.

661
मूळ

कर्मी राहाटी ऐसी । जयाते होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥661॥

मराठी अर्थ

अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस कर्ता होय, असे खचित खचित समज.

English meaning

When the doer is busy in such actions, he should be definitely known as Rajasic doer.

662
मूळ

आता यया पाठी येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करू गोचरु । तामस कर्ता ॥662॥

मराठी अर्थ

आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस कर्ता, याची लक्षणे तुला कळतील, अशी सांगतो.

English meaning

Now I shall describe the doer of Tamas quality, who is as if a cultivated garden of evil actions.

663
मूळ

तरी मिया लागलिया कैसे । पुढील जळत असे । हे नेणिजे हुताशे । जियापरी ॥663॥

मराठी अर्थ

आपल्या स्पर्शामुळे समोर येणारी जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही,

English meaning

Just as the fire does not know how things coming into its contact suffer while burning.

664
मूळ

पै शस्त्रे मिया तिखटे । नेणिजे कैसेनि निवटे । का नेणिजे काळकूटे । आपुले केले ॥664॥

मराठी अर्थ

अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो, हे जसे शस्त्राला समजत नाही; किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकुट विषाला समजत नाही,

English meaning

Just as a sharp weapon does not know how by its edge, bodies are cut, or just as the poison does not know how it has killed others.

665
मूळ

तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो का ॥665॥

मराठी अर्थ

तसा हे धनंजया, ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल, अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो;

English meaning

Similarly, O Dhananjaya, he who does not care how he is harassing others and continues to act ruthlessly,

666
मूळ

तिया करिताही वेळी । काय जाले हे न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥666॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्मे करतेवेळी, यात काय लाभ झाला याची तो काळजी बाळगीत नाही,

English meaning

And does not care how great destruction is resulted by his actions just as a hurricane does not know the devastation it has caused.

667
मूळ

पै करणिया आणि जया । मेळु नाही धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैची त्राय ? ॥667॥

मराठी अर्थ

हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मिळत नसतो, असल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे ?

English meaning

And O Dhananjaya, his intention and action are so unrelated to each other, that even a mad man is at a loss what to mean by his actions.

668
मूळ

आणि इंद्रियांचे वोगरिले । चरोनि राखे जो जियाले । बैलातळी लागले । गोचिड जैसे ॥668॥

मराठी अर्थ

आणि बैलाचे कासरे गोचीड अगदी चिटकून राहतात, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो,

English meaning

Just like a cow-flea which becomes fat with the blood of the animal on whose stomach it has attached itself, this man lives on the pleasures from the sensually intoxicating objects which are received through his organs.

669
मूळ

हांसया रुदना वेळु । नेणता आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥669॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे लहान मुलास हासण्यास व रडण्यास वेळ लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा कृतीत काही मिळत नसतो;

English meaning

His behaviour is as inconsistent as a child which laughs one moment and cries the next moment without reason.

670
मूळ

जो प्रकृती आंतलेपणे । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरे धालेपणे । उकरडा जैसा ॥670॥

मराठी अर्थ

प्रकृतीचे आधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो, तसा जो कुकर्माचा तृप्तीने फुगलेला असतो;

English meaning

He is a slave of surrounding pleasurable objects in Nature and has no thought about what is proper and what is improper. He is puffed up by his carnal satisfaction just as a big refuse dump.

671
मूळ

म्हणौनि मान्याचेनि नांवे । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणे न मनवे । डोंगरासी ॥671॥

मराठी अर्थ

म्हणून गर्वाच्या भरांत ईश्वरास ही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगराला ही तुच्छ करतो;

English meaning

Because of his pride he does not bow even before God and he is more stiff by stubbornness than a mountain.

672
मूळ

आणि मन जयाचे विषकल्लोळी । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥672॥

मराठी अर्थ

ज्याचे मन म्हणजे केवळ विषयांच्या लाटा होत; ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वरकांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेश्यांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी होय;

English meaning

His mental attitude is just as beaten and pounded a path as that frequented by robbers, and his eyes look with cunning as if taken on loan from a prostitute!

673
मूळ

किंबहुना कपटाचे । देहचि वळिले तयाचे । ते जिणे की जुंवाराचे । टिटेघर ॥673॥

मराठी अर्थ

किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे, व त्याचे आयुष्य जुगाराचे वाईट कृत्याचे माहेरघरच होय;

English meaning

In short, his whole body and mind is knitted by deception and his life is like a gambler's den on a street corner.

674
मूळ

नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गावो । म्हणौनि नये येवो जावो । तया वाटा ॥674॥

मराठी अर्थ

त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिल्लाचे गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये.

English meaning

When one looks at him, he appears as a whole community place of selfish tribals, and therefore none should go near him.

675
मूळ

आणि आणिकांचे निके केले । विरु होय जया आले । जैसे अपेय पया मिनले । लवण करी ॥675॥

मराठी अर्थ

आणि दुसर्‍याचे चांगले झालेले पाहून ज्या स्वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यास अयोग्य होते;

English meaning

Just as salt added to milk makes it unfit for drinking, his mind becomes rotten at the sight of good deeds done by anybody.

676
मूळ

का हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणी धडाडितु । अग्नि होय ॥676॥

मराठी अर्थ

अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नित घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो,

English meaning

Just like a cold article thrown into fire suddenly becomes part of fire only.

677
मूळ

नाना सुद्रव्ये गोमटी । जालिया शरीरी पैठी । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवी ॥677॥

मराठी अर्थ

किंवा अर्जुना, कितीही उत्तम पदार्थ असेल तरी त्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो,

English meaning

Or, O the crowned on, just like good food eaten by us becomes dirty only.

678
मूळ

तैसे पुढिलाचे बरवे । जयाच्या भीतरी पावे । आणि विरुद्धचि आघवे । होऊनि निगे ॥678॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकिले केले किंवा पाहिले तर ते त्याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो. (त्याला वाईट वाटते)

English meaning

Similalry if any good deed is known by him, in his mind it becomes spoiled and bad and what he says about it is nothing but dirt.

679
मूळ

जो गुण घे दे दोख । अमृताचे करी विख । दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥679॥

मराठी अर्थ

सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर जो त्याच दुर्गुण मानतो;

English meaning

He transforms virtues into vices and turns nectar into poison like a serpent.

680
मूळ

आणि ऐहिकी जियावे । जेणे परत्रा साच यावे । ते उचित कृत्य पावे । अवसरी जिये ॥680॥

मराठी अर्थ

आणि इहलोकी कीर्ती होवून ज्याचे योगाने परलोक ही मिळेल असे कृत्य ज्यावेळेस प्राप्त होईल;

English meaning

And if luckily some such action presents itself which is beneficial in this world and ensures happiness in the other world,

681
मूळ

तेव्हा जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारी जैसी । विटाळे लोटे ॥681॥

मराठी अर्थ

त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते; आणि वाईट कर्माचे वेळेस तीच झोप विटाळशी सारखी दूर राहते.

English meaning

He is immediately prone to sleep and when any evil action is to be done, his sleep runs away as if trying to avoid its touch!

682
मूळ

पै द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । का डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥682॥

मराठी अर्थ

हे पहा, द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो, किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसात फुटतात,

English meaning

Just as in the season when mangoes or grapes are ready a crow may have sourness in his mouth, or in daytime an owl becomes blind.

683
मूळ

तैसा कल्याणकाळु पाहे । तै तयाते आळसु खाये । ना प्रमादी तरी होये । तो म्हणे तैसे ॥683॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र अशी वेळ आली असता श्रवणाची वेळ आली असता त्याच्यावरच लोटतो, आणि अन्यायाचे कर्म करण्याचे वेळी तोच आळस त्याचे हुकुमात वागतो.

English meaning

When there is chance to do a really socially helpful deed, he becomes very lazy, and when any wrong deed is to be done, his laziness is very obedient to him.

684
मूळ

जेवीचि सागराच्या पोटी । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गाठी । जिवाचिये जो ॥684॥

मराठी अर्थ

जसा समुद्राची पोटात अग्नी(वडवानळ) अखंड जळत असतो, तसा याच्या अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही, असा विशाद असतो.

English meaning

He nurses grievance and anger in his mind like an ocean having great fire within him.

685
मूळ

लेंडोराआगी धूमावधि । का अपाना आंगी दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादे केला ॥685॥

मराठी अर्थ

लेंड्यांचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्त असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते (विषयात मनात बाळगतो)

English meaning

Just as in the fine of cowdung etc., or excreta or sheep, there is always smoke or just as the gas in the abdomen is having bad smell, his mind is always rotten with jealousy.

686
मूळ

आणि कल्पांताचिया पारा । वेगळेही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥686॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, कल्पांताच्याही पलीकडे, लाभ होईल, अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो;

English meaning

And O the great warrior! He starts great selfish business projects which may be far reaching in time beyond the end of Ages.

687
मूळ

अगा जगाही परौती । शुचा वाहे पै चित्ती । करिता विषी हाती । तृणही न लगे ॥687॥

मराठी अर्थ

अरे, जगातील जे लोक व्यापार करीत नाहीत, ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही,

English meaning

He is worried about far-off things, but if there is something good to be done just now, he does not move even a blade of grass.

688
मूळ

ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥688॥

मराठी अर्थ

असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीत होय, तो नि:संशय तामस कर्त जाण.

English meaning

So, if you see such a heap of sin, in the society, you may definitely know that he is the doer of Tamasic Nature.

689
मूळ

एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहीचे त्रिधा चिन्ह । दाविले तुज सुजन । चक्रवर्ती ॥689॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे सांगितली.

English meaning

O the greatest gentleman!, I have given you the description of the three types of action, the actor and the knowledge.

690
मूळ

आता अविद्येचिया गावी । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाची आघवी । लेऊनि लेणी ॥690॥

मराठी अर्थ

आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरुपी सर्व अलंकार घालून,

English meaning

Now intellect is a mirror in which Atman looks at his own beauty by donning the clothes of `enticement' and ornaments of `doubting attitude' in the town of `ignorance'. This intellect is of three types in its function.

691
मूळ

आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसा पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धाव । त्रिधा असे ॥691॥

मराठी अर्थ

आत्मनिश्चयाचा चांगलेपणाचा ज्या बुद्धीरूप आरशात स्पष्ट दिसतो, त्या बुद्धीचे तीन प्रकार आहेत,

English meaning

Now intellect is a mirror in which Atman looks at his own beauty by donning the clothes of `enticement' and ornaments of `doubting attitude' in the town of `ignorance'. This intellect is of three types in its function.

692
मूळ

अगा सत्वादि गुणी इही । कायी एक तिही ठायी । न कीजेचि येथ पाही । जगामाजी ॥692॥

मराठी अर्थ

अर्जुना, अरे ! या सत्व-रज-तम गुणांनी जगांतील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत ?

English meaning

My dear, is there anything in this world, which is not divided into three types by these qualities of Sattwa etc.?

693
मूळ

आगी न वसता पोटी । कवण काष्ठ असे सृष्टी । तैसे ते कैचे दृश्यकोटी । त्रिविध जे नोहे ॥693॥

मराठी अर्थ

पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे ? त्याप्रमाणे जिचे तीन प्रकार नाहीत, अशी दृश्य वस्तुत कोणती वस्तू आहे ?

English meaning

Just as there is no wood which is not having fire in it, so also there is not a single thing which is not having triple nature.

694
मूळ

म्हणौनि तिही गुणी । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥694॥

मराठी अर्थ

म्हणून या तीन गुणांनी बुद्धीचे तीन प्रकार केले आहेत. तसेच बुद्धीचेही तीन भेद झालेले आहेत.

English meaning

Therefore, intellect is also triple and the courage known as Dhruti is also triple.

695
मूळ

तेचि येक वेगळाले । यथा चिन्ही अळंकारले । सांगिजैल उपाइले । भेदलेपणे ॥695॥

मराठी अर्थ

तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हासहवर्तमान विस्तारपूर्वक सांगतो.

English meaning

Now this triple nature of the intellect and the courage will be explained together with the various signs of each.

696
मूळ

परी बुद्धि धृति इया । दोही भागामाजी धनंजया । आधी रूप बुद्धीचिया । भेदासि करू ॥696॥

मराठी अर्थ

परंतु हे धनंजया, बुद्धी व धृत्ति या दोहोंपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची कारणे सांगतो.

English meaning

But O Dhananjaya, out of the two, I will first describe the three types of intellect.

697
मूळ

तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणिया येतिया वाटा । तिनी आथी ॥697॥

मराठी अर्थ

तर हे सुभटा, मनुष्याला या संसारांत येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत.

English meaning

O brave warrior, every being who is born in this worldly life has three paths open before him which are the best, the mediocre and the lowest.

698
मूळ

जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभये सबाध । जीवा यया ॥698॥

मराठी अर्थ

ते तीन मार्ग म्हणजे अकरणीय, काम्य व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत आणि प्राणिमात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त असते.

English meaning

These paths become troublesome to the Jeevas because of the fear of bondage. These paths are, first, the `routine and occasional, proper duty,' the second is `selfish action' and the third is `prohibited action.'

699
मूळ

म्हणौनि अधिकारे मानिले । जे विधीचेनि वोघे आले । ते एकचि येथ भले । नित्य कर्म ॥699॥

मराठी अर्थ

याकरिता, या लोकी अधिकारसमंत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म, ते नित्यकर्म एक उत्तम होय,

English meaning

Now, when we consider what is to be done, the best action is that which is in keeping with our stage in life and status in the society and what is presenting itself in the natural course of life.

700
मूळ

तेचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसे का जळ । सेविजे ताहने ॥700॥

मराठी अर्थ

तेच नित्यकर्म आत्मप्राप्ती रूप फळावर दृष्टी ठेवून, तृषा क्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे.

English meaning

But that action should be performed having only one aim of self-realization, with an eagerness like that of a thirsty man drinking water.

701
मूळ

येतुलेनि ते कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥701॥

मराठी अर्थ

अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते.

English meaning

When it is so performed, it releases one from the fear of rebirth and makes liberation easier.

702
मूळ

ऐसे करी तो भला । संसारभये सांडिला । करणीयत्वे आला । मुमुक्षुभागा ॥702॥

मराठी अर्थ

अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो, तो संसार भयापासून मुक्त होतो वया आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोहोचतो. (मोक्षमार्गास लागतो)

English meaning

One who acts in this way is free of the fear of worldly life and while performing actions also, he is lucky to be a real seeker.

703
मूळ

तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥703॥

मराठी अर्थ

या नित्यकर्म वर भरवसा ठेवून ती बुद्धी त्याच्या आचरणात विषयी निश्चय करते, तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेली आहे,

English meaning

Further the intellect which is having firm conviction, that liberation is itself implied in such action,

704
मूळ

म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळी । इये कर्मी बुडकुळी । द्यावी की ना ? ॥704॥

मराठी अर्थ

म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मांत बुडी का न मारावी ?

English meaning

He says "Why should I not jump into this type of routine action by per-forming the extrovert activities on the base of inward aloofness of detachment?

705
मूळ

तृषार्ता उदके जिणे । का पुरी पडलिया पोहणे । अंधकूपी गति किरणे । सूर्याचेनि ॥705॥

मराठी अर्थ

तहानलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर, पुरात पडलेल्यास पोहता येत असतांना, अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर,

English meaning

Just as a thirsty man gets fresh by water, a person fallen in a flood saves himself by swimming or by sunrays one can find way out of a dark deep well;

706
मूळ

नाना पथ्येसी औषध लाहे । तरी रोगे दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥706॥

मराठी अर्थ

अथवा पथ्यासह औषध घेतली असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला,

English meaning

Or if proper diet and medicine is given, even a man on the point of death can recover, or a fish which suddenly gets itself into water,

707
मूळ

तरी तयाच्या जीविता । नाही जेवी अन्यथा । तैसे कर्मी इये वर्तता । जोडेचि मोक्षु ॥707॥

मराठी अर्थ

तर त्याच्या जिवासी असे भय नाही, तसे ह्या नित्य कर्माचे आज केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते,

English meaning

Has no further fear of death. Just like these examples, the man who performs his duties with that detachment becomes liberated.

708
मूळ

हे करणीयाचिया कडे । जे ज्ञान आथी चोखडे । आणि अकरणीय हे फुडे । ऐसे जाण ॥708॥

मराठी अर्थ

हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते, आणि हे बघ, खरोखरच योग्य नव्हतं,

English meaning

This intellect is clear about what is to be done, and is knowing thoroughly the nature of things not to be done.

709
मूळ

जी तिथे काम्यादिके । संसारभयदायके । अकृत्यपणाचे आंबुखे । पडिले जया ॥709॥

मराठी अर्थ

अशी जी काम्यादिक कर्मे, जी संसारभय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्ध पणाचा शिक्का आहे,

English meaning

In the case of those actions, which are selfish or prohibitted, and which are branded as evil actions to be avoided,

710
मूळ

तिये कर्मी अकार्यी । जन्ममरणसमयी । प्रवृत्ति पळवी पायी । मागिलीचि ॥710॥

मराठी अर्थ

त्या अनाचारणीय व जन्ममरणदायक अशा वाईट कर्मांपासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवितो;

English meaning

This intellect turns back its outgoing force from such prohibitted actions, which are full of the fear of getting caught in the chain of birth and death.

711
मूळ

पै आगीमाजी न रिघवे । अथावी न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवी ॥711॥

मराठी अर्थ

अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही, व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही,

English meaning

My dear, one cannot enter fire, one cannot dare jump into an unfathomable pool of water and one cannot hold in hand red hot piece of iron.

712
मूळ

का काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥712॥

मराठी अर्थ

अथवा फुसकारे टाकीत असलेला काळा नाग दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही,

English meaning

Or one cannot dare to disturb a venomous cobra who is angrily hissing or one cannot knowingly step into a bush where a tiger is sitting.

713
मूळ

तैसे कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥713॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे निषिद्ध कर्म पाहूनच ज्या बुद्धीत निश्चयकरून भय उत्पन्न होते,

English meaning

Similarly his intellect is tremendously afraid when some prohibitted action confronts.

714
मूळ

वाढिले रांधूनि विखे । तेथे जाणिजे मृत्यु न चुके । तेवी निषेधी का देखे । बंधाते जे ॥714॥

मराठी अर्थ

विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चूकता नाही, असे निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाही.

English meaning

This intellect knows very well that committing of such evil action definitely creates bondage, just as death is certain if poisoned food is eaten.

715
मूळ

मग बंधभयभरिती । तिये निषिद्धी प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥715॥

मराठी अर्थ

मग निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते;

English meaning

Then that intellect uses the supreme skill of withdrawal and retreating within when such action is presenting itself by circumstances.

716
मूळ

ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥716॥

मराठी अर्थ

रत्नपारखी खऱ्याखोट्याचा निर्णय करितो, तसा कार्य व अकार्य यांच्याविषयी प्रवृत्तीनिवृत्ती रुप मापाने जी निर्णय करिते;

English meaning

So the intellect which weighs the desirable and undesirable actions and examines the outgoing tendency of mind and the withdrawing tendency very carefully.

717
मूळ

तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तू जाण ॥717॥

मराठी अर्थ

तसेच, ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्ट समजते, ती सात्त्विक बुद्धी होय असे समज.

English meaning

O Arjuna, you should know that such intellect is Sattwic, which takes clear decision in respect of good and bad actions.

718
मूळ

आणि बकाच्या गावी । घेपे क्षीरनीर सकलवी । का अहोरात्रींची गोवी । आंधळे नेणे ॥718॥

मराठी अर्थ

आणि बगळ्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्र घेतले जाते; किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही;

English meaning

Now in the town of cranes, the mixture of milk and water is taken, (but they cannot separate it as the swan does) and a blind man knows no difference between day and night.

719
मूळ

जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठे कोरू धावे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवी ॥719॥

मराठी अर्थ

ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करता येतो; तोच लाकूडही करण्यास प्रवृत्त होतो; परंतु याचा भ्रमर पणा काही नष्ट होत नाही,

English meaning

Or a black-bee delicately takes the honey from a flower and he is the same black-bee, who may carve a hard-wood (the black-bee remains the same).

720
मूळ

तैसी इये कार्याकार्ये । धर्माधर्मरूपे जिये । तिये न चोजविता जाये । जाणती जे का ॥720॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे धर्म-अधर्म रूपाने असणारी जी कार्याकार्ये, त्यांची निवड न करिता जी बुद्धि त्यांचे आचरण करीते,

English meaning

Similarly the intellect which is Rajasic, does not distinguish between the proper actions according to religion and prohibited ones.

721
मूळ

अगा डोळांवीण मोतिये । घेता पाडु मिळे विपाये । न मिळणे ते आहे । ठेविले तेथे ॥721॥

मराठी अर्थ

अरे, परीक्षेशिवाय मोती घेतला असता किंचित चांगली मिळतीलच असा नेम नाही; पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र निश्चित आहे;

English meaning

For example, a man who purchases pearls without properly examining them by critically looking at them, is most likely to get fake pearls. Real pearls are seldom in his lot.

722
मूळ

तैसे अकरणीय अवचटे । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवी जाणे एकवटे । दोन्ही जे का ॥722॥

मराठी अर्थ

तसे निषिद्ध कर्म सहाजिकपणे प्राप्त न झाले तरच रहाते, एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानले जातात;

English meaning

Similarly the prohibited action is avoided if it does not luckily come along to be executed; otherwise this intellect generally mixes-up indiscriminately the good and bad actions.

723
मूळ

ते गा बुद्धि चोखविषी । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥723॥

मराठी अर्थ

जसे सर्व समाजात योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंध बुद्धी ती राजस बुद्धी होय.

English meaning

This intellect accepts all actions without consideration of purity or otherwise, just as a man unwisely calls all people for dinner without caring whether they are deserving it or not. This intellect is Rajasic.

724
मूळ

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । का राक्षसा दिवो पाहे । राती होऊनि ॥724॥

मराठी अर्थ

आणि राजा ज्या मार्गांनी जातो, ते चोरास जसे आडमार्ग होत, (राजमार्ग जसे चोरांच्या उपयोगी नाहीत, ) तेव्हा राक्षसाला रात्री जसे उजाडते;

English meaning

The road by which the king goes is a path to be avoided by the thiefs; and the day time is like a night for the demons;

725
मूळ

नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पै असते आपणपे जीवा । नाही जाले ॥725॥

मराठी अर्थ

अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशांची रास दिसते; म्हणून धन जवळ असतांना त्याला नाही सारखे होते,

English meaning

An unfortunate man thinks the hidden treasure, only as a heap of coal. To a Jeeva the real nature of Atman is not existing at all.

726
मूळ

तैसे धर्मजात तितुके । जिये बुद्धीसी पातके । साच ते लटिके । ऐसेचि बुझे ॥726॥

मराठी अर्थ

तसे, शास्त्रांत सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात;

English meaning

Similarly the intellect which thinks that a good religious action is a sin and sees the true things as false ones.

727
मूळ

ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥727॥

मराठी अर्थ

जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करिते व जे गुण म्हणून आहेत, त्या सर्वास दोष मानते;

English meaning

The intellect that gives a twisted shape to all straight things and turns virtue into vices,

728
मूळ

किंबहुना श्रुतिजाते । अधिष्ठूनि केले सरते । तेतुलेही उपरते । जाणे जे बुद्धी ॥728॥

मराठी अर्थ

किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही सर्व बुद्धीला विपरीत भासतात;

English meaning

The intellect which decides as wrong whatever the Vedas uphold as right and proper,

729
मूळ

ते कोणातेही न पुसता । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥729॥

मराठी अर्थ

त्या बुद्धीला अर्जुना, कोणालाही न विचारता, बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय ?

English meaning

Such intellect should be considered as Tamasic one, O son of Pandu, without consulting anybody. How can this intellect which is like a dark night, be considered auspicious for religions actions?

730
मूळ

एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ॥730॥

मराठी अर्थ

याप्रमाणे आत्मज्ञानरुप कमळाला विकसित करणाऱ्या चंद्रा अर्जुना, तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले.

English meaning

Thus, O Arjuna, who are like a Moon which causes the lotus of self -knowledge to bloom; I have told you the three types of intellect clearly.

731
मूळ

आता ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजाती । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥731॥

मराठी अर्थ

आता, याच बुद्धीला कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो, तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचे तीन प्रकार आहेत.

English meaning

Now, I shall tell you all the three types of Dhruti or self-esteem or courage with their signs, which is the base with the help of which the intellect becomes active. Please attend to it.

732
मूळ

तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देई ॥732॥

मराठी अर्थ

त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे.

English meaning

Now, I shall tell you all the three types of Dhruti or self-esteem or courage with their signs, which is the base with the help of which the intellect becomes active. Please attend to it.

733
मूळ

तरी उदेलिया दिनकरु । चोरीसि थोके अंधारु । का राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवी ॥733॥

मराठी अर्थ

सूर्योदय होताच जसा चौर्यकर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो,

English meaning

When the Sun rises, the darkness disappears together with the activities of robbers; or, by the orders of a king, wrong activities are thwarted;

734
मूळ

नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेसी बोभाटु । सांडिती मेघ ॥734॥

मराठी अर्थ

किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनासह नाहीतसे होतात,

English meaning

Or clouds disperse and disappear before the speed of wind, and their thundering also becomes quiet.

735
मूळ

का अगस्तीचेनि दर्शने । सिंधु घेऊनि ठाती मौने । चंद्रोदयी कमळवने । मिठी देती ॥735॥

मराठी अर्थ

अथवा अगस्ती ऋषीं च्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्य विकासिनी कमळे आपोआप मिटतात;

English meaning

When the Southern star Agastya rises, the seas become silent, or when the Moon rises, the lotus flowers close their petals.

736
मूळ

हे असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खाला । गर्जोनि पुढा जाला । सिंहु जरी ॥736॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे ? गर्जना करून सिंह पुढे आला मदोन्मत्त हत्तीलादेखील उचललेला पायाखाली ठेवण्याचे सुचत नाही,

English meaning

When the roaring lion comes in front, elephants do not take one step further but turn back immediately.

737
मूळ

तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिके व्यापारु । सांडिती उभी ॥737॥

मराठी अर्थ

तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन prअnअv, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्याजागी बंद पडतात,

English meaning

Similarly when firmness of self-confidence rises in the consciousness, all the movements of mind etc. are left unattended;

738
मूळ

इंद्रिया विषयांचिया गाठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटी । रिगती दाही ॥738॥

मराठी अर्थ

अर्जुना, इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात.

English meaning

O the crowned one, the hold of the objects on the organs becomes loose and all the ten organs re-enter the womb of the mind which is their mother.

739
मूळ

अधोर्ध्व गूढे काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजी ॥739॥

मराठी अर्थ

प्राणाचे जी 9 प्रकारचे भेद आहेत, ते सर्व मोडून व एकत्र करून त्यात सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकिते;

English meaning

The vital breath prevents its downward and upward movements, blinds together all the nine flows of winds in the body and enters in the Madhyama or the middle channel or vital energy which is Sushumna.

740
मूळ

संकल्पविकल्पांचे लुगडे । सांडूनि मन उघडे । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥740॥

मराठी अर्थ

मनाचे संकल्प-विकल्प रुपी वस्त्र फेडून मन उघडे करिते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्त बसते,

English meaning

And by throwing off the covering sheet of decision and doubt, the intellect opens the mind and retreats into its own ante-chamber silently.

741
मूळ

ऐसी धैर्यराजे जेणे । मन प्राण करणे । स्वचेष्टांची संभाषणे । सांडविजती ॥741॥

मराठी अर्थ

याप्रमाणे जो धैर्यराज, मन, प्राण व इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्ठांची भाषणे बंद पाडितो;

English meaning

When by the force of firm determination the mind, the vital breath and the organs have to drop their activities.

742
मूळ

मग आघवीचि सडी । ध्यानाच्या आंतुल्या मढी । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥742॥

मराठी अर्थ

मग सर्वाचा घेऊन त्यास व्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो;

English meaning

And when they become very pure and are held together, confined in the inner sanctorium of meditation, which is the heart,

743
मूळ

परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जव हाती । तव लांचु न घेता धृती । धरिजती जिया ॥743॥

मराठी अर्थ

परंतु चक्रवर्ती जो परमात्मा, त्याच्या ताब्यात त्यात देईपर्यंत त्याजपासून लांच न घेता त्यांना जो धैर्यराज सोडीत नाही.

English meaning

And when the firm determination holds them there only, without falling for any illusory enticements, till they are offered to the great emperor who is Atman,

744
मूळ

ते गा धृती येथे । सात्विक हे निरुते । आईक अर्जुनाते । श्रीकांतु म्हणे ॥744॥

मराठी अर्थ

लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात; असे जे धैर्य, ते केवळ सात्विक धैर्य होय, असे समज.

English meaning

Then that self-esteem is Sattwic, O Arjuna"- So said the spouse of Goddess Laxmi; to Arjuna.

745
मूळ

आणि होऊनिया शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोही घरी । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपाये ॥745॥

मराठी अर्थ

आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग व संसार या दोहोत धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी आनंदाने वास करतो;

English meaning

The Jeeva residing in the physical body, enjoys his religious as well as other activities for sensual enjoyments and earning money, hoping for happiness in this world as well as the other world.

746
मूळ

तो मनोरथांच्या सागरी । धर्मार्थकामाच्या तारुवावरी । जेणे धैर्यबळे करी । क्रिया-वणिज ॥746॥

मराठी अर्थ

तो मनोरथ सागरात धर्मार्थकामरूपी नौकेवर ज्या धैर्यबळाने कर्माचा व्यापार करीत,

English meaning

The determination on the strength of which such Jeeva conducts his business of various activities in the boat of religion, has desire for sensual enjoyments and desire for money, in the sea of decisions and doubts,

747
मूळ

जे कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढे सायास साहे । जया धृती ॥747॥

मराठी अर्थ

जे कर्मरुपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने सहास कर्म करतो,

English meaning

The determination on the strength of which he undergoes tremendous hard work for reaping four-fold results from the sowing of the capital of karma

748
मूळ

ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आता आइक तामस । तिसरी जे का ॥748॥

मराठी अर्थ

त्या धैर्यास अर्जुना, राजस धैर्य असे म्हणतात. ता तिसर्‍या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती ऐक.

English meaning

That firmness, O Partha, should be known as Rajasic; now listen to the Tamas quality of personal determination which is the third.

749
मूळ

तरी सर्वाधमे गुणे । जयाचे का रूपा येणे । कोळसा काळेपणे । घडला जैसा ॥749॥

मराठी अर्थ

जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे स्वरूप सर्व अधम गुणांनी भरलेले असते अधर्म.

English meaning

When the very nature of this type of Tamas is made up of the lowest level of tendencies, just as a coal is totally black inside and out.

750
मूळ

अहो प्राकृत आणि हीनु । तयाही की गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ? ॥750॥

मराठी अर्थ

अहो, प्राकृत (जड) आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय ?

English meaning

How people call it as a "Quality" or "Guna" (the other meaning of Guna is virtue.) when it is so degraded? Then why should we not call a demon as a saint?

751
मूळ

पै ग्रहांमाजी इंगळु । तयाते म्हणिजे मंगळु । तैसा तमी धसाळु । गुणशब्दु हा ॥751॥

मराठी अर्थ

सर्व ग्रहात जो इंगळ (निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा) त्यालाही मंगळ म्हणत नाहीत काय ? तसा तमाला गुण हा ढसाळ हा (साधरण) शब्द आहे.

English meaning

The planet which is the most firy among all the planets is called "Mangal" (Which means "Good omen". Similarly Tamas is called a quality or Guna which implies that it is a virtue, which is a misnomer.)

752
मूळ

जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥752॥

मराठी अर्थ

हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वसतिस्थान जो तमोगुण, तो कमवून त्या नराची मूर्ती बनवली आहे:

English meaning

The man who is the very statue of all vices welded together,

753
मूळ

तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कही न मुके । पापे पोषिता दुःखे । न सांडिजे जेवी ॥753॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडीत नाही, त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो; म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही,

English meaning

Holds laziness fondly near his bosom and, therefore, sleep does not leave him just as sufferings do not get away from a confirmed sinner.

754
मूळ

आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयाते न सांडी । विसंबू न सके धोंडी । काठिण्य जैसे ॥754॥

मराठी अर्थ

आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीति असल्यामुळे त्याला भव्य सोडत नाही;

English meaning

And just as the hardness never leaves a stone, fear does not leave him because of his constant apprehension that he may lose his body, his only property.

755
मूळ

आणि पदार्थजाती स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोके ठावो । केला न शकेपाप जावो । कृतघ्नौनि जैसे ॥755॥

मराठी अर्थ

आणि कृतघ्न मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थमात्राच्या ठिकाणी; प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो;

English meaning

Just as the sin is always tethered in the house of a treacherous thankless person, sorrow is his companion, day and night, because of his attachment to things.

756
मूळ

आणि असंतोष जीवेसी । धरूनि ठेला अहर्निशी । म्हणौनि मैत्री तेणेसी । विषादे केली ॥756॥

मराठी अर्थ

आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे

English meaning

He holds fast the discontent, all the time and therefore, depression is having bosom friendship with him.

757
मूळ

लसणाते न सांडी गंधी । का अपथ्यशीळाते व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादे तया ॥757॥

मराठी अर्थ

लसुनाची घाण जशी त्याजपासून दूर होत नाही, किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडीत नाही, त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते;

English meaning

Just as garlic is never free from its pungent smell and a man who does not observe diet carefully is not cured of his ailment, this man is also not free from disgruntleness.

758
मूळ

आणि वयसा वित्तकामु । ययाचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदे आश्रमु । तोचि केला ॥758॥

मराठी अर्थ

आणखी तारुण्य, वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो, म्हणून त्याच्या ठिकाणी मदही वास करतो;

English meaning

As he is always adding more force to his youthfulness, his possessions and his passion, he is always made a resort by arrogant sullenness.

759
मूळ

आगीते न सांडी तापु । सळाते जातीचा सापु । का जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥759॥

मराठी अर्थ

अग्नीला जशी तप्तता सोडीत नाही, जातिवंत साप जसा आपला डाव धरण्याचा स्वभाव सोडत नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडत नाही;

English meaning

Just as fire does not become free of heat, a poisonous cobra never forgets the man who has hurt him, and fear which is everywhere does not leave the world;

760
मूळ

नातरी शरीराते काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसी मदु ॥760॥

मराठी अर्थ

अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो.

English meaning

Just as death never forgets the body, similarly, sullenness never leaves a man who is of Tamasic nature.

761
मूळ

एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाई दोख । जिया धृती देख । धरिले आहाती ॥761॥

मराठी अर्थ

याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विशाद व मद हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत,

English meaning

So, the firmness of self-esteem on the strength of which these vices like laziness, sleep, fear, dreams, sorrow and depression continue to prevail in the nature of a man, should be known as Tamasic-so said Shrikrishna, the Lord of the world.

762
मूळ

तिये गा धृती नांवे । तामसी येथ हे जाणावे । म्हणितले तेणे देवे । जगाचेनी ॥762॥

मराठी अर्थ

त्याला धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले.

English meaning

So, the firmness of self-esteem on the strength of which these vices like laziness, sleep, fear, dreams, sorrow and depression continue to prevail in the nature of a man, should be known as Tamasic-so said Shrikrishna, the Lord of the world.

763
मूळ

एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥763॥

मराठी अर्थ

याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय केला. तो धैर्य शेवटास नेते.

English meaning

Thus the intellect first takes a decision to act, in accordance with its three types and these three kinds of self-firmness take these actions to completion.

764
मूळ

सूर्ये मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणे ते आहे । धैर्ये जेवी ॥764॥

मराठी अर्थ

सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागला त्यावरून मनुष्य पायांनी चालतो, परंतु चालनाराणे आणि धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही,

English meaning

He further said- "The path is seen clearly by the light of the Sun, and feet walk on that path, but it is by the will of the man that the action of walking takes place.

765
मूळ

तैसी बुद्धि कर्माते दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥765॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखविते ते कर्म इंद्रिये उत्पन्न करितात, परंतु उत्पन्न होण्याला जे धैर्य लागते,

English meaning

Similar to this example, the intellect shows the kinds of action to be performed, the organs which are means, execute these actions, but the determination, the firmness which is required to do those deeds is of three types-

766
मूळ

ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥766॥

मराठी अर्थ

ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले; आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले.

English meaning

Which I have upto now described to you. Now the three-fold Action is done by this process.

767
मूळ

येथ फळ जे एक निफजे । सुख जयाते म्हणिजे । तेही त्रिविध जाणिजे । कर्मवशे ॥767॥

मराठी अर्थ

मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे, तेही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे,

English meaning

And the fruit which is pleasure or happiness which is the result of this action is of course of three types.

768
मूळ

तरी फळरूप ते सुख । त्रिगुणी भेदले देख । विवंचू आता चोख । चोखी बोली ॥768॥

मराठी अर्थ

तर फळरूप जे सुख, ते तीन गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करू.

English meaning

Now I shall tell you in flawless words the way in which the fruit of happiness becomes three- fold by the three qualities.

769
मूळ

परी चोखी ते कैसी सांगे । पै घेवो जाता बोलबगे । कानीचियेही लागे । हातीचा मळु ॥769॥

मराठी अर्थ

ते स्पष्ट असे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दांचा मळ त्याला लागतो व कर्ण द्वारा श्रवण केले असता, कर्णरोग हाताचा मळ त्याला लागतो.

English meaning

But how clear and pure will be my words? While listening to anything the defects or the preformed opinions of a man which affect the hearing quality generally pollute the meaning of these words.

770
मूळ

म्हणौनि जयाचेनि अव्हेरे । अवधानही होय बाहिरे । तेणे आइक हो आंतरे । जीवाचेनि जीवे ॥770॥

मराठी अर्थ

म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करुन ते केवळ अंत:करणाने श्रवण कर.

English meaning

But if the soul within is listening in its pristine purity, the normal way of hearing with prejudice, becomes deaf; so you should listen to this by your innermost soul.

771
मूळ

ऐसे म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असे ॥771॥

मराठी अर्थ

असे बोलून देवांनी त्रिविध सुखाचे वर्णन करण्या विषयी प्रस्तावना केली, तीच व्यवस्था मी सांगतो,

English meaning

In this way the Lord set about describing the three types of pleasure or happiness, as follows- (Saint Dnyaneshwar says-) which I am going to put before you clearly.

772
मूळ

म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगो म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलो ते प्राज्ञा । ऐक आता ॥772॥

मराठी अर्थ

भगवान म्हणतात:- हे बुद्धिमंता अर्जुना, सुखाचे तीन रूपे गुणांच्या योगाने आहेत म्हणून तुला जे म्हटले होते ती सांगतो, ऐक.

English meaning

The Lord said- "Now listen to the description of the signs of three types of happiness which I have promised."

773
मूळ

तरी सुख ते गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जे आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥773॥

मराठी अर्थ

हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होती त्यावेळेस जो आनंद होतो, त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो.

English meaning

I shall tell you about the joy which a Jeeva feels when he meets the Atman in such a way that you can visualize it.

774
मूळ

परी मात्रेचेनि मापे । दिव्यौषध जैसे घेपे । का कथिलाचे कीजे रुपे । रसभावनी ॥774॥

मराठी अर्थ

जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे अथवा रसाचे पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे

English meaning

But just as we have to take even the most effective medicine in measured quantities only; or just as silvery polish can be given to tin gradually only.

775
मूळ

नाना लवणाचे जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवी ॥775॥

मराठी अर्थ

किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याजवर दोन-चारवेळ पाणी घालावे लागते,

English meaning

Or, we have to sprinkle water twice or thrice on salt to make its solution.

776
मूळ

तेवी जालेनि सुखलेशे । जीवु भाविलिया अभ्यासे । जीवपणाचे नासे । दुःख जेथे ॥776॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोचा अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते;

English meaning

Similarly this joy becomes actual when constant efforts are made after initial experience of some joy and then the sorrow which is the lot in the life of Jeeva subsides.

777
मूळ

ते येथ आत्मसुख । जाले असे त्रिगुणात्मक । तेही सांगो एकैक । रूप आता ॥777॥

मराठी अर्थ

ते आत्मसुखहि गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झाले आहे, त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो.

English meaning

That should be known as the joy in the state of Atman, which has three types, which you please listen as I will go on describing.

778
मूळ

आता चंदनाचे बूड । सर्पी जैसे दुवाड । का निधानाचे तोंड । विवसिया जेवी ॥778॥

मराठी अर्थ

आता चंदनाचे बुड सर्पामुळे जसे भयंकर झालेले दिसते अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकाचा प्रतिबंध असतो;

English meaning

The root of the sandalwood tree becomes avoidable because of the serpents coiled around it; Treasure which is hidden becomes fearsome by the ghost guarding it;

779
मूळ

अगा स्वर्गीचे गोमटे । आडव यागसंकटे । का बाळपण दासटे । त्रासकाळे ॥779॥

मराठी अर्थ

अरे, स्वर्गीचे उत्तम भोग मिळविण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत्त्व कट महत्संकट आहे, किंवा बालदशेमध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो

English meaning

The sweet-looking heavenly pleasures become unreachable easily because of the exacting performances of sacrifices required to be done for it, or childhood, otherwise innocent and joyful becomes a drudgery because of various ailments.

780
मूळ

हे असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधी । नातरी तो औषधी । जिभेचा ठावो ॥780॥

मराठी अर्थ

हे राहो, पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, किंवा औषधाचा कडवटपणा जिभेस सोसावा लागतो,

English meaning

Or we have to tolerate the preliminary smoke before light of the lamp is available or sometimes medicine tastes bitter to the tongue.

781
मूळ

तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥781॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदामादिक साधनांचे दुःख सोसावे लागते.

English meaning

Similarly, O Pandava, at the entrance of that happiness, we have to go through the hard work of self-control as to the mind and self-control as to the actions.

782
मूळ

देत सर्वस्नेहा मिठी । आगी ऐसे वैराग्य उठी । स्वर्ग संसारा काटी । काढितचि ॥782॥

मराठी अर्थ

देहादिकांवरील प्रीतीचा त्रास करणारे असे अग्नीप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उपटून टाकते.

English meaning

Then such acute desirelessness about everything arises in the mind that it destroys the compound wall of the world and the heavens.

783
मूळ

विवेकश्रवणे खरपुसे । जेथ व्रताचरणे कर्कशे । करिता जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥783॥

मराठी अर्थ

तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचरण करताना जिथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात;

English meaning

By sharp and penetrating thoughts of discrimination which we hear and by observance of exacting vows etc.; the intellect is as if shattered;

784
मूळ

सुषुम्नेचेनि तोंडे । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढे । भारी जेथ ॥784॥

मराठी अर्थ

सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूचा रोध करावा लागतो. याप्रमाणे सुरवातीस देते महत्कष्ट आहेत;

English meaning

The streams of the vital breath and the Apana wind are swallowed in the mouth of Sushumna, the central path of Divine power and this is the trial at the beginning only.

785
मूळ

जे सारसांही विघडता । होय वोहाहूनि वस्त काढिता । ना भणंगु दवडिता । भाणयावरुनी ॥785॥

मराठी अर्थ

चक्रवाक पक्षांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितांस (भुकेलेला) पानावरून उठवून लावले असता;

English meaning

Like the estrangement done between the two male and female birds Chakrawaka, or like the calf pulled away from its mother's udder, or a beggar driven away from the dinner once given to him.

786
मूळ

पै मायेपुढौनि बाळक । काळे नेता एकुलते एक । होय का उदक । तुटता मीना ॥786॥

मराठी अर्थ

अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढिले असतात जसे दुःख होते,

English meaning

Or like the only child of mother is snatched away by death from her; or like a fish taken out of water,

787
मूळ

तैसे विषयांचे घर । इंद्रिया सांडिता थोर । युगांतु होय ते वीर । विराग साहाती ॥787॥

मराठी अर्थ

तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते; परंतु वैराग्यसंपन्न शूर तेही दुःख सहन करतात.

English meaning

The same severe sorrow is experienced while organs try to leave the house of objects of their enjoyment, which one has to tolerate and suffer with sheer detachment and apathy.

788
मूळ

ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥788॥

मराठी अर्थ

असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे, तो जो सहन करील, त्याला जसा क्षिराब्धीचे मंथन करतेवेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला तसा परमसुखाचा लाभ होतो.

English meaning

This is the havoc of severe internal crisis and calamities, but at the end, one gets the sweet nectar of liberation, just as Gods got the nectar in the end when they churned the ocean of milk.

789
मूळ

पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृते सोहळा । पाहे जेथे ॥789॥

मराठी अर्थ

प्रथम वैराग्यरूप गरळ ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विकधैर्यरुपी शंभू जेव्हा आ करील, तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सांपडतो.

English meaning

If this poison of ascetic efforts is swallowed by the Lord Shankara which means the great courage, then this joy can be experienced as if it is the happy festival of liberation.

790
मूळ

पै कोलिताही कोपे ऐसे । द्राक्षांचे हिरवेपण असे । ते परीपाकी का जैसे । माधुर्य आते ॥790॥

मराठी अर्थ

हे पहा द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलीतासही मागतो सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात.

English meaning

My dear, raw grapes are so acutely sour that even an ember might be less troublesome, but how sweet are the grapes when they are ripe!

791
मूळ

ते वैराग्यादिक तैसे । पिकलिया आत्मप्रकाशे । मग वैराग्येंसीही नाशे । अविद्याजात ॥791॥

मराठी अर्थ

वैराग्य आत्मप्राशनाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्यादीक सर्व दुःखांचा नाश होतो.

English meaning

Similarly when the desirelessness, detachment, etc. become mature by the light of self- knowledge, all the illusory duality of names and forms goes into oblivion.

792
मूळ

तेव्हा सागरी गंगा जैसी । आत्मी मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥792॥

मराठी अर्थ

समुद्राला गंगा मिळाल्यावर जशी सुस्वरूप व होते, बुद्धी आत्म्याचे ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंदरुपी सुखाची खाण उघडते.

English meaning

At that stage, just as Ganges reaches and is merged into sea, so the intellect becomes one with the Atman, and the mine of the joy of non-duality opens up of its own accord.

793
मूळ

ऐसे स्वानुभवविश्रामे । वैराग्यमूळ जे परिणमे । ते सात्विक येणे नामे । बोलिजे सुख ॥793॥

मराठी अर्थ

याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम होय, त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात.

English meaning

So, that kind of joy or happiness, the beginning of which is in the desirelessness, but the culmination of which is the blissful joy in the Atman, is called the "Sattwic" happiness.

794
मूळ

आणि विषयेंद्रिया । मेळु होता धनंजया । जे सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥794॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, विषय व इंद्रिये यांचा संबंध झाला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा पूर येतो;

English meaning

O Dhananjaya, that pleasure which is in spate like a river, when the objects and the sense- organs come into contact with each other. (is Rajasic)

795
मूळ

अधिकारिया रिगता गावो । होय जैसा उत्साहो । का रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥795॥

मराठी अर्थ

अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो; किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा;

English meaning

Just as the villagers celebrate when some government officer visits the village, or just as a grand wedding ceremony is arranged on the strength of money taken on loan.

796
मूळ

नाना रोगिया जिभेपासी । केळे गोड साखरेसी । का बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥796॥

मराठी अर्थ

अथवा रोग्याला साखर, केळी ही कुपथ्य असूनही जशी गोड लागतात; किंवा बचनाग खाते वेळेस जसा गोड लागतो;

English meaning

Or just as a man who is having fever or sickness finds sugar and plantains sweet - though they are contrary to his well being, or a certain intoxicant poison like , (Bachanaga) tastes sweet at first.

797
मूळ

पहिले संवचोराचे मैत्र । हाटभेटीचे कलत्र । का लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥797॥

मराठी अर्थ

संवचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते किंवा बाजारातील स्त्रियांचे (वेश्यांदिकांचे) आचरण प्रथम सुखकर वाटते; किंवा नटाचे आविर्भाव जसे आल्हादकारक वाटतात.

English meaning

Or the friendship of a way-layer, the intimacy of a prostitute and the pranks played by a joker are dangerous in their results.

798
मूळ

तैसे विषयेंद्रियदोखी । जे सुख जीवाते पोखी । मग उपडिला खडकी । हंसु जैसा ॥798॥

मराठी अर्थ

तसे विषय व इंद्रिये यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते, ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादि चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत. अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता, रत्न प्राप्ति न होता तसा तो प्राणास मुकतो,

English meaning

Similarly that pleasure which nourishes the Jeeva with the contact between the organs and their objects, is just as a fattened swan killed by dashing it on a stone,

799
मूळ

तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गाठी ॥799॥

मराठी अर्थ

तशी ज्यायोगे सुकृत्याने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते; आणि विषय सुख मिळण्याकरिता संपादिलेल्या सर्व पुण्य रुपी धनाचाहि नाश होतो;

English meaning

The whole accumulated happiness of the Jeeva comes to an end, his life is extinguished and all the merit is spent up.

800
मूळ

आणिक भोगिले जे काही । ते स्वप्न तैसे होय नाही । मग हानीच्याचि घाई । लोळावे उरे ॥800॥

मराठी अर्थ

आणि भोगलेले जे विषय तेही स्वप्नाप्रमाणे नाहीतसे होतात. मग दुःखाच्या राशीत लोळणे; हीच त्याच्या वाट्यास राहते.

English meaning

Then all the merit earned in the past is finished and the man has to lie suffering in the pit of total loss of everything;

801
मूळ

ऐसे आपत्ती जे सुख । ऐहिकी परिणमे देख । परत्री कीर विख । होऊनि परते ॥801॥

मराठी अर्थ

इहलोकी प्राप्त झालेले जे सुख, त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो; आणि ते परलोकही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते.

English meaning

The pleasure which results in calamities in this world and which becomes poisonous in the other world,

802
मूळ

जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥802॥

मराठी अर्थ

जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा त्याचे स्वाधीन करतात, ते धर्म जाळून इंद्रियाकडून विषयाचा सोहळा भोगवितात.

English meaning

Because in this process of such indulgence the sense-organs are pampered, the religions activities are thwarted and there are festivities of enjoyments of pleasures.

803
मूळ

तेथ पातके बांधिती थावो । तिये नरकी देती ठावो । जेणे सुखे हा अपावो । परत्री ऐसा ॥803॥

मराठी अर्थ

मग पातकास थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या लोकांच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो;

English meaning

Sins become stronger, and they lead the Jeeva to degraded conditions, like hell, so in short, enjoyment of pleasures in such manner becomes harmful in the other world.

804
मूळ

पै नामे विष महुरे । परी मारूनि अंती खरे । तैसे आदि जे गोडिरे । अंती कडू ॥804॥

मराठी अर्थ

हे पहा, जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाशक करणारे आहे, तसे इहालोकिंचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे.

English meaning

In the Prakrut language poison is called "Mahur" which means sweet, but it proves to be poison by killing in the end; similarly the joy which is first sweet but in the end it is bitter;

805
मूळ

पार्था ते सुख साचे । वळिले आहे रजाचे । म्हणौनि न शिवे तयाचे । आंग कही ॥805॥

मराठी अर्थ

पार्था, हे सुख केवळ रजोगुणांचेच बनलेले (राजस) आहे; म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको.

English meaning

O Parth, that pleasure is to be known as of Rajas quality. You should not touch it any time.

806
मूळ

आणि अपेयाचेनि पाने । अखाद्याचेनि भोजने । स्वैरस्त्रीसंनिधाने । होय जे सुख ॥806॥

मराठी अर्थ

आणि अपेय पानाने, अभक्ष्य भक्षणने, व स्वैरिणीस्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे सुख

English meaning

Now that pleasure which is experienced by man by drinking prohibited drinks, eating prohibited food and by having promiscuity with harlots.

807
मूळ

का पुढिलांचेनि मारे । नातरी परस्वापहारे । जे सुख अवतरे । भाटाच्या बोली ॥807॥

मराठी अर्थ

किंवा दुसऱ्याचा आघात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठाने जे सुख होते;

English meaning

Or that pleasure which is derived by killing others, stealing other's possessions and that which a man feels by listening to his flattery done by soothsayers;

808
मूळ

जे आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजी जे देखिजे । जयाच्या आद्यंती भुलिजे । आपुली वाट ॥808॥

मराठी अर्थ

जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाचे शुद्धी नसते.

English meaning

That pleasure which is experienced through lassitude, or seen in the sleep in dream-state and by which a man forgets his duty at the beginning as well as in the end.

809
मूळ

ते गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हे बहु न सांगोचि जे कथा । असंभाव्य हे ॥809॥

मराठी अर्थ

जे सुख अर्जुना, तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही कारण, ती असंभाव्य आहे.

English meaning

O Partha, know that such pleasure is Tamasic in all respects. I am not going to dwell on this description further, because it is not appropriate to be articulated, and is totally blame-worthy.

810
मूळ

ऐसे कर्मभेदे मुदले । फळसुखही त्रिधा जाले । ते हे यथागमे केले । गोचर तुज ॥810॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फळरुप सुख हे तीन प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले.

English meaning

Thus there are three types of the results of threefold actions, which are really one only originally, which I have made clear to you.

811
मूळ

ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वाचूनि काहीचि नसे स्थूल । सूक्ष्मी इये ॥811॥

मराठी अर्थ

सर्व जगतांत लहान व मोठ्या वस्तू ज्या आहेत, त्यात एकही वस्तू कर्ता कर्म व फळ या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही.

English meaning

Now you should understand that there is nothing in the world which is not classified in three ways as regards the actor, the action and the result of the action.

812
मूळ

आणि हे तव त्रिपुटी । तिही गुणी इही किरीटी । गुंफिली असे पटी । तांतुवी जैसी ॥812॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी तयार केला आहे, तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता तीन गुणांनी भरलेली आहे.

English meaning

And O the crowned one! All these three are interwoven in the three qualities of Sattwa (piety) Rajas (Activity) and Tamas (Inertia or laziness), just like a piece of cloth by threads.

813
मूळ

म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकी । न बंधिजे इही सत्वादिकी । तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी । आथी वस्तु ॥813॥

मराठी अर्थ

म्हणून तू हे लक्षात ठेव की, प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेली अशी कोणतीही वस्तू या यालोकी अथवा स्वर्गलोकी नाही.

English meaning

Therefore, there is nothing within the field of Prakriti, which is not bound by the three qualities such as Sattwa etc.; either in the heaven or this region of death (this world.)

814
मूळ

कैचा लोवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेवीण कल्लोळा । होणे आहे ? ॥814॥

मराठी अर्थ

लोकरी वाचून कांबळा व माती वाचून गोळा कसा होणार ? अथवा पाण्यावाचून लाटा कशा होतील ?

English meaning

Is there a rug without its woolen hair? Is there a clod without earth? Is there wave without water?

815
मूळ

तैसे न होनि गुणाचे । सृष्टीची रचना रचे । ऐसे नाहीचि गा साचे । प्राणिजात ॥815॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जीवमात्र, गुणाच्या रचनेवाचून या सृष्टीत मोकळे नाहीत,

English meaning

Similarly the nature of all the beings is not such as there is possibility of its being created without the three qualities.

816
मूळ

यालागी हे सकळ । तिही गुणांचेचि केवळ । घडले आहे निखिळ । ऐसे जाण ॥816॥

मराठी अर्थ

यास्तव, हे सर्व जगांतील पदार्थ तीन गुणांनी केवळ रचलेले आहेत, असे समज.

English meaning

Therefore, please know it definitely that this universe is made up of these three qualities.

817
मूळ

गुणी देवा त्रयी लाविली । गुणी लोकी त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानी उळिगे ॥817॥

मराठी अर्थ

या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की, त्यांनी एका देवाचे तीन देव गेले आणि लोकांचे 3 लोक (स्वर्ग, मृत्यू व पाताळ) गुणांनीच केले आहेत आणि चार वर्ण व त्यांची कर्मे आहेत.

English meaning

It is these three qualities by which the three gods Brahma, the Vishnu and the Shiva, arranged various duties for each of the four classes of society, and have created the three worlds of this visible existence.

818
मूळ

तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जया मुख्य ब्राह्मण । धुरेचे का ॥818॥

मराठी अर्थ

हे चार वर्ण कोणते, असे पुसशील, तर त्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत.

English meaning

Now if you ask what are the four classes, I am going to tell you. Brahmins are the foremost among them.

819
मूळ

येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानी । योग्य म्हणौनि ॥819॥

मराठी अर्थ

दुसरे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ते ब्राह्मणांचाच बरोबरीचे मानावे.

English meaning

The Kshatriyas and Vaishyas are the other two who should be considered equal to Brahmins as they are eligible for reciting Vedas and doing all the rituals according to them.

820
मूळ

चौथा शूद्रु जो धनंजया । वेदी लागु नाही तया । तऱ्ही वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥820॥

मराठी अर्थ

हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण, त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती तीन वर्णांच्या आधीन आहे.

English meaning

The fourth class is that of Shoodras. He is not authorized to recite Vedas etc. but his welfare is dependent on the three classes mentioned above.

821
मूळ

तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिका । शूद्रही की देखा । चौथा जाला ॥821॥

मराठी अर्थ

त्या ब्राह्मणादि तीन वर्णांच्या सेवा वृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणले.

English meaning

And as their life was intimately connected with the other three, Shoodras were counted as a separate class like these, the fourth one.

822
मूळ

जैसा फुलाचेनि सांगाते । तांतु तुरंबिजे श्रीमंते । तैसे द्विजसंगे शूद्राते । स्वीकारी श्रुती ॥822॥

मराठी अर्थ

जसा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्याला ही श्रीमंत धारण करतात तशी श्रुती द्विजांच्या संगतीने शूद्रांचा त्यांचा स्वीकार करते.

English meaning

Just as a well-to-do man honours the thread in a garland of flowers and enjoys the fragrance together with the thread, similarly, Vedas have accepted Shoodras with the other three classes of "twice-born" people.

823
मूळ

ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करू आता कर्मपथा । यांचिया रूपा ॥823॥

मराठी अर्थ

पार्था, आता अशा चार प्रकारांनी या चार वर्णांची व्यवस्था झालेली आहे. तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती हे भेद तुला सांगतो.

English meaning

O Partha, such is the system or arrangement of four classes. Now we will describe their duties separately-

824
मूळ

जिही गुणी ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनिया ईश्वरी । पैठे होती ॥824॥

मराठी अर्थ

ज्या गुणांनी ते चारी वर्ण जन्ममृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात;

English meaning

By doing which duties, all of them escape from the cutting scissors of birth and death and attain self-realization.

825
मूळ

जिये आत्मप्रकृतीचे इही । गुणी सत्त्वादिकी तिही । कर्मे चौघा चहू ठाई । वांटिली वर्णा ॥825॥

मराठी अर्थ

आत्म्याची जी प्रकृती, तिच्या सत्वादी गुणांनी चार वर्णाला चार ठिकाणी कर्मे वाटून दिली आहेत;

English meaning

These duties are distributed among the four classes according to the three qualities of Sattwa, etc.; which are parts of the Nature (Prakriti)

826
मूळ

जैसे बापे जोडिले लेका । वांटिले सूर्ये मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवका । स्वामी जैसे ॥826॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकास भिन्नभिन्न व्यवहार सांगतो,

English meaning

It is like the property of the father being distributed among his sons, or the various paths clearly seen in the sunlight followed by various people, or like various jobs allotted by the employer to his various servants.

827
मूळ

तैसी प्रकृतीच्या गुणी । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णी । चहू इही ॥827॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, प्रकृतीचे जे गुण, त्यांनी कर्मांचा विस्तार करून त्यांची चार वर्णांचे ठिकाणी वाटणी केली;

English meaning

Thus by the Qualities belonging to the Mother Nature the duties are classified and allotted to the four classes.

828
मूळ

तेथ सत्त्वे आपल्या आंगी । समीन-निमीन भागी । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥828॥

मराठी अर्थ

त्याठिकाणी सत्वगुणाने आपल्या सम विषम मार्गाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले;

English meaning

Thus, Sattwa quality is given to each of the two classes of Brahmins and the Kshatriyas, half of itself.

829
मूळ

आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविले वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥829॥

मराठी अर्थ

आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला;

English meaning

Vaishyas are given half of Sattwa and half of Rajas, and Shoodras have got half of Rajas mixed with Tamas.

830
मूळ

ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥830॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे हे प्रबुद्धा, एकरूपच असा प्राणीमात्रांचा गुणांनी चार प्रकारचा भेद केला आहे, असे समज.

English meaning

O the wise Arjuna, know that in this manner, the single human society has been classified into four categories by the three qualities.

831
मूळ

मग आपुले ठेविले जैसे । आइतेचि दीपे दिसे । गुणभिन्न कर्म तैसे । शास्त्र दावी ॥831॥

मराठी अर्थ

मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे;

English meaning

Now, as a light shows us our things which are otherwise hidden in the dark, so, Vedas show us our duties which are coloured by these qualities and separated.

832
मूळ

तेचि आता कोण कोण । वर्णविहिताचे लक्षण । हे सांगो ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ॥832॥

मराठी अर्थ

हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणती विहित कर्म तेच तुला आता सांगतो. ते ऐक.

English meaning

O the possessor of auspicious virtues, now I shall tell you what are these duties according to the classes. Please listen.

833
मूळ

तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हाती । बुद्धि आत्मया मिळे येकांती । प्रिया जैसी ॥833॥

मराठी अर्थ

(शम:) प्रिया ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते;

English meaning

By taking all the tendencies of all the senses with her, the intellect like a devoted wife, embraces the husband which is the Atman, in the most sacred state;

834
मूळ

ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥834॥

मराठी अर्थ

आता जो बुद्धीचा लीनपणा, त्याला ‘ शम’ असे म्हणतात, तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याजपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो.

English meaning

This state of intellect which is peace itself should be called "Peace" or "Shama" and when action begins from this background,

835
मूळ

आणि बाह्येंद्रियांचे धेंडे । पिटूनि विधीचेनि दंडे । नेदिजे अधर्माकडे । कहीचि जावो ॥835॥

मराठी अर्थ

(दम) आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही,

English meaning

And when the quality of discipline controls the wild outer active organs by using the cudgel of orders of scriptures and does not let them run amuck towards irreligious activities,

836
मूळ

तो पै गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणे जे का ॥836॥

मराठी अर्थ

तो शमाला साह्यकर्ता असा दुसरा, ‘दम’ गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो.

English meaning

It is called DAMA or the control of senses which helps the Shama in the right actions, and by which all the activities are done well within the observance of ordained duties,

837
मूळ

सटवीचिये राती । न विसंबिजे जेवी वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्ती । वाहणे सदा ॥837॥

मराठी अर्थ

(तप:) जसे षष्ठीपूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाहीत, तसे सर्वकाळ चित्तांत ईश्वर स्वरूपाचा विचार करणे,

English meaning

And the loyal one-pointed faith in God is always alert, just like a lamp in the room of a newly delivered mother, which is carefully protected;

838
मूळ

तया नाम तप । ते तिजया गुणाचे रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥838॥

मराठी अर्थ

त्याला ‘तप’ असे म्हणतात; आणि हा ब्राह्मण कर्माचा तिसरा गुण आहे. (शौचम्) आणखी शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून दोन प्रकारचा आहे.

English meaning

There is the third quality of Tapas or Penance in that action; and action in which there is purity and cleanliness both inner and outer; which is called "Shoucha".

839
मूळ

मन भावशुद्धी भरले । आंग क्रिया अळंकारिले । ऐसे सबाह्य जियाले । साजिरे जे का ॥839॥

मराठी अर्थ

मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे, तसा अंतर्बाह्य शुचिपणा भरलेला आहे.

English meaning

Which means that the mind is fully occupied by sincere and pure devotion and the body is ornamented by clean habits; and thus the whole life is well ordered in a profound purity.

840
मूळ

तया नाम शौच पार्था । तो कर्मी गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जे साहाणे ॥840॥

मराठी अर्थ

त्याला पार्था, ‘शौच’ असे म्हणतात व तो ब्रह्म कर्मापैकी चौथा गुण होय. (क्षाती) आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे.

English meaning

This quality, O Partha, is called "Shoucha" or cleanliness, which is the fourth quality in the action and there is quality to sustain everything like the Earth.

841
मूळ

ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजी सुहावा । पंचमु जैसा ॥841॥

मराठी अर्थ

त्याला अर्जुना, ‘क्षान्तिक्षमा’ असे म्हणतात सप्तस्वरात पंचमस्वर जसा अति मधुर आहेत असा ब्राह्मण कर्मातील हा पाचवा गुण होय.

English meaning

Which is, O Pandava, known as Kshama or capacity to forgive, which is also in that action, as beautifully set as the Panchama tune in the music.

842
मूळ

आणि वांकडेनी वोघेसी । गंगा वाहे उजूचि जैसी । का पुटी वळला ऊसी । गोडी जैसी ॥842॥

मराठी अर्थ

(आर्जवम्) आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला, तरी तो ज्याप्रमाणे सरळच आहे; किंवा उसाची पेरी जरी वाकडी असली, तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते,

English meaning

And though the path of the river Ganges may be crooked, its waters are not crooked, and though the sugar-cane grows curved, the sweetness is the same.

843
मूळ

तैसा विषमांही जीवां- । लागी उजुकारु बरवा । ते आर्जव गा साहावा । जेथीचा गुण ॥843॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवावरही अत्यंत प्रीति असणे यास आर्जवम् असे म्हणतात; व हा ब्राह्मणकर्मापैकी सहावा गुण होय.

English meaning

Similarly, when one behaves with innocence and simplicity with even those who are crooked by nature, it is called straightness-which is the sixth quality in the behaviour of such a man;

844
मूळ

आणि पाणिये प्रयत्ने माळी । अखंड जचे झाडामुळी । परी ते आघवेचि फळी । जाणे जेवी ॥844॥

मराठी अर्थ

(ज्ञानम्) आणि -माळी कष्ट करून झाडाचे मुळास पाणी लावतो, त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात.

English meaning

And the gardener continuously works hard for watering a tree at its roots, but knows that by way of sweet fruits, the hard work is going to be rewarded afterwards.

845
मूळ

तैसे शास्त्राचारे तेणे । ईश्वरुचि येकु पावणे । हे फुडे जे का जाणणे । ते येथ ज्ञान ॥845॥

मराठी अर्थ

तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वरप्राप्तीच व्हायची हे ज्यांना समजते, ते ज्ञान होय.

English meaning

Similarly knowledge, which makes a man aware that the only aim of performing his duties according to the dictates of the scriptures is realization of god, is called the true knowledge or spiritual wisdom.

846
मूळ

ते गा कर्मी जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हे पाहे । एवंरूप ॥846॥

मराठी अर्थ

ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय; आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे.

English meaning

This is the seventh quality of such action and now see what is "Vidnyana" or worldly knowledge.

847
मूळ

तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रे का ध्यानबळे । ईश्वरतत्त्वीचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥847॥

मराठी अर्थ

(विज्ञान) तर शास्त्रविचाराने व ध्यानाचा अभ्यासाने ईश्वरस्वरूपी जी बुद्धी, सप्तशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते,

English meaning

It is the straightness with which the consciousness which is pure in essence takes the support of all knowledge of scriptures and or meditation, and becomes one with the God's abstract Nature, without a trace of any doubt.

848
मूळ

हे विज्ञान बरवे । गुणरत्न जेथ आठवे । आणि आस्तिक्य जाणावे । नववा गुण ॥848॥

मराठी अर्थ

तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय. (आस्तिक्यम्) आणि आस्तिक्य नववा गुण असे समज.

English meaning

This is Vidnyana, the eighth quality which is in such a man; and further the ninth quality which is faith has the following signs.

849
मूळ

पै राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवी शास्त्रे स्वीकारिलिया । मार्गमात्राते ॥849॥

मराठी अर्थ

हे पहा, राजमुद्राकित मनुष्य कोणीही असला, तरी त्याची सर्व लोक सेवा करतात, त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत,

English meaning

I call faith to that quality by which a man respectfully accepts each path of holiness which the scriptures have authorized, just as people honour the currency with trust, on which there is the figure of the king imprinted. That action is true in which this ninth quality is present.

850
मूळ

आदरे जे का मानणे । ते आस्तिक्य मी म्हणे । तो नववा गुण जेणे । कर्म ते साच ॥850॥

मराठी अर्थ

ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे, यालाआस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मणकर्मापैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मणकर्म सर्व खरे होते.

English meaning

I call faith to that quality by which a man respectfully accepts each path of holiness which the scriptures have authorized, just as people honour the currency with trust, on which there is the figure of the king imprinted. That action is true in which this ninth quality is present.

851
मूळ

एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । ते कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचे ॥851॥

मराठी अर्थ

याप्रमाणे शमादिक नऊ गुण जेये निर्दोष दृष्टीस पडतात, ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे, असे समज.

English meaning

Thus such action or duty in which all these nine qualities like 'Shama' and 'Dama' are evident, should be known as natural duty of Brahmins.

852
मूळ

तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥852॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे सूर्य स्वभावतःच प्रकाशरूप असतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाचा हा नवगुणरूपी रत्नांचा हार स्वाभाविक आहे;

English meaning

He who gets this garland of nine jewels becomes the ocean of nine virtues, just as the Sun wears his light without taking out any thing from over his body.

853
मूळ

नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला । का चंदनु निजे चर्चिला । सौरभ्ये जेवी ॥853॥

मराठी अर्थ

चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सुशोभित दिसतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेनेच जसा प्रकाश असतो, किंवा चंदन आपल्याच परीमळाने जसा चर्चित असतो,

English meaning

Or just as the Champak tree is enriched by its own flower-buds, or the Moon shines in her own light, or sandalwood is fragrant by its own cool smell;

854
मूळ

तेवी नवगुणटिकलग । लेणे ब्राह्मणाचे अव्यंग । कहीचि न संडी आंग । ब्राह्मणाचे ॥854॥

मराठी अर्थ

तसे नवगुणरूपी दागिने हे ब्राम्हणाचे अव्यंग लेणे आहे; व हे ब्राम्हणाचे अंग सोडून कधीच रहात नाहीत.

English meaning

Similarly this garland studded with nine jewels is the clear and natural ornament of a Brahmin, which never leaves the body of (the consciousness of) the Brahmin.

855
मूळ

आता उचित जे क्षत्रिया । तेही कर्म धनंजया । सांगो ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥855॥

मराठी अर्थ

आता हे धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म, ते मी सांगतो. ते तू आपल्या बुद्धीसर्वस्वाने ऐक.

English meaning

Now, O Dhananjaya, I shall tell you the duty or action which is naturally appropriate for Kshatriya (Warrior class), which please hear with alert and intelligent mind.

856
मूळ

तरी भानु हा तेजे । नापेक्षी जेवी विरजे । का सिंहे न पाहिजे । जावळिया ॥856॥

मराठी अर्थ

(शौर्य) सूर्य हा प्रकाश पाडण्याकरिता दुसऱ्याच्या त्याची अपेक्षा करत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोबत्याच्या मदतीची गरज बाळगीत नाही.

English meaning

Now just as the Sun does not expect anybody to help him shine, or a lion does not solicit backing from any other animal,

857
मूळ

ऐसा स्वयंभ जो जीवे लाठु । सावायेंवीण उद्भटु । ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥857॥

मराठी अर्थ

आता असाह्य ते वाचून जो स्वयंभू, बलवान व शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण ‘शौर्य’ होय.

English meaning

Similarly when one is a self-made brave man, and shows his power without anybody's help, that virtue is valour, which is the first quality (of Kshtriya).

858
मूळ

आणि सूर्याचेनि प्रतापे । कोडिही नक्षत्र हारपे । ना तो तरी न लोपे । सचंद्री तिही ॥858॥

मराठी अर्थ

(तेज:) आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे नाहीत अशी होऊन जातात; परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाहीत,

English meaning

By the light of the Sun, all the crores of stars become invisible, but even if they would try together with the Moon, they are not able to overshadow the Sun;

859
मूळ

तैसेनि आपुले प्रौढीगुणे । जगा या विस्मयो देणे । आपण तरी न क्षोभणे । कायसेनही ॥859॥

मराठी अर्थ

तसे आपल्या महत्वाच्या गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यास लावतात व कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरत नाहीत,

English meaning

Similarly when one surprises the whole world by one's brilliance, but one does not get disturbed by anything,

860
मूळ

ते प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मी गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथीचा गुण ॥860॥

मराठी अर्थ

असा जो प्रसंशनीय गुण ‘ तेज’ तो त्या क्षात्र प्रवृत्तीचा दुसरा गुण होय. (धृतिः) व ‘धीर’ हा त्याच प्रतीचा तिसरा गुण होय.

English meaning

That extraordinary excellence is the quality of brightness, the second virtue in his action; and firmness with patience is the third quality in him.

861
मूळ

वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथे ॥861॥

मराठी अर्थ

आकाशही कोसळून पडले; तरी ज्याच्या बुद्धीचे डोळे-मन हे झाकले जात नाही, त्याचे नाव ‘धैर्य’ होय.

English meaning

Know this quality of firmness, which makes a man not lose his mental balance and discretion even though the sky may fall upon him.

862
मूळ

आणि पाणी हो का भलतेतुके । परी ते जिणौनि पद्म फाके । का आकाश उंचिया जिंके । आवडे तयाते ॥862॥

मराठी अर्थ

(दाक्ष्यम्) आणि पाणी कितीही खोल असले तरी कमळ हे पाण्याला खाली टाकून वर येते, किंवा आकाशी उंची विषयी सर्व पदार्थ जिंकते

English meaning

And just as lotus spreads its leaves on the surface of the water, however vast may be the expanse of that water; and just as sky is always higher than anything which is raised to any height,

863
मूळ

तेवी विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणे जे ॥863॥

मराठी अर्थ

तशी नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्था, फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते.

English meaning

Similarly, O Partha, the quality of penetrating into the intended project very astutely and exactly, is called the quality of alertness, which is the fourth virtue and the fifth virtue is great bravery in fighting.

864
मूळ

ते दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥864॥

मराठी अर्थ

याप्रमाणे सावधगिरी ठेवणे त्याला ‘दक्षता’ म्हणतात व तो क्षात्र प्रकृतीचा चौथा गुन्हा होय. (युध्दे आपलायानम) आणि’ अलौकिक युद्ध पराक्रम’ हा त्याच प्रकृतीचा पाचवा गुण होय.

English meaning

Similarly, O Partha, the quality of penetrating into the intended project very astutely and exactly, is called the quality of alertness, which is the fourth virtue and the fifth virtue is great bravery in fighting.

865
मूळ

आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवी समोर शत्रूपुढे । होणे जे का ॥865॥

मराठी अर्थ

सूर्य कमळे जशी नेहमी सूर्याच्या सन्मुख असतात, तसे शत्रूंच्या समोर नेहमी असणे.

English meaning

The sunflowers have their face always towards the Sun; similarly when the warrior is always bravely facing the enemy,

866
मूळ

माहेवणी प्रयत्नेसी । चुकविजे सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणी ॥866॥

मराठी अर्थ

गरोदर स्त्री पती समागमास जशी प्रयत्न करून चुकविते, तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखविण्यात येतो चुकवितो.

English meaning

Not to show one's back in the battle to the enemy just as a woman who is pregnant avoids sleeping with her husband,

867
मूळ

हा क्षत्रियाचेया आचारी । पांचवा गुणेंद्रु अवधारी । चहू पुरुषार्था शिरी । भक्ति जैसी ॥867॥

मराठी अर्थ

चार पुरुषार्थ ‘ भक्ती’ हा पुरुषार्थ जास्त आहे, तसा क्षात्र प्रकृतीच्या गुणांमध्ये हा पाचवा गुण इन्द्राप्रमाणे श्रेष्ठ आहे असे समज.

English meaning

Is the fifth virtue in the Kshtriya's nature, which, O Arjuna, you should know, which is greater than the four virtues told to you earlier, just as Devotional Path is the highest path in human achievement of his whole life time.

868
मूळ

आणि जालेनि फुले फळे । शाखिया जैसी मोकळे । का उदार परीमळे । पद्माकरु ॥868॥

मराठी अर्थ

(दानम्) आणि वृक्ष आपली पाने, फुले व फळे ही जशी याचकांसअर्पण करण्यास तयार असतो, अथवा परिमला विषयी कमळ जसे उदार असते;

English meaning

Just as a tree bends its branches when it bears fruits, or just as a lotus lake is freely distributing its fragrance.

869
मूळ

नाना आवडीचेनि मापे । चांदिणे भलतेणे घेपे । पुढिलांचेनि संकल्पे । तैसे जे देणे ॥869॥

मराठी अर्थ

अथवा त्याला जितकी आवड असेल तितके त्याने चांदण्याचे सुख घ्यावे, तसे याचकास त्याच इच्छेप्रमाणे देणे,

English meaning

Or just as anybody can take the joy of moonlight as much as he likes; so, the man gives in charity to everybody as is desired;

870
मूळ

ते उमप गा दान । जेथ सहावे गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणे जे का ॥870॥

मराठी अर्थ

याला ‘अमर्याद दान’ असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृतीचे सहावे गुणरत्न होय. (ईश्वरभाव:) आणि आज्ञेचे राहण्याचे एका स्थान क्षत्रीय होय.

English meaning

This is called unlimited generosity and the mind has this sixth gem of a virtue; and to nourish and develop our own body; and to make all obey our orders.

871
मूळ

पोषूनि अवयव आपुले । करविजती मानविले । तेवी पालणे लोभविले । जग जे भोगणे ॥871॥

मराठी अर्थ

आपल्या हस्तपादिक अवयवाचे चांगले पोषण केले असता त्याजकडून वाटेल ते काम करून घेता येते, त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो.

English meaning

And to look after the subjects under our rule as if they are our own limbs and to enjoy sovereign power through them,

872
मूळ

तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो । तो गुणांमाजी रावो । सातवा जेथ ॥872॥

मराठी अर्थ

जो सर्व सामर्थ्याचा आधार लागलाच ‘ईश्वरभाव’ असे म्हणतात, तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण होय.

English meaning

Is the quality by name of "sense of superiority", which is the reservoir of all strength. This is the seventh gem of a virtue the man possesses.

873
मूळ

ऐसे जे शौर्यादिकी । इही सात गुणविशेखी । अळंकृत सप्तऋखी । आकाश जैसे ॥873॥

मराठी अर्थ

अशा शौर्य आदिकरून सात गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे, तो सप्तर्षींच्या सात चांदण्यांनी जसे आकाशी शोभते, त्याप्रमाणे शोभतो;

English meaning

Thus, the action which has all the abovesaid seven qualities, just as the sky is beautifully decorated by the Seven Sages constellation (Greater Bear) near the North Pole star;

874
मूळ

तैसे सप्तगुणी विचित्र । कर्म जे जगी पवित्र । ते सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचे ॥874॥

मराठी अर्थ

अशा प्रकारे, या सात पवित्र गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झालेले असते, ते क्षात्र प्रकृतीचे स्वभावीक कर्म आहे;

English meaning

Know that this pure action which is like that, ornamented by wonderful seven virtues is the natural duty belonging to Kshatriyas,

875
मूळ

नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु । म्हणौनि गुणस्वर्गा आधारु । साता इया ॥875॥

मराठी अर्थ

अथवा असा जो पुरुष क्षत्रिय नसून स्वरूप सोन्याचा मेरूच होय. म्हणून तो सत्वगुणरुपी समुद्रांनी स्वर्गाला धारण करतो,

English meaning

Such a man is not only a Kshatriya, but is the mountain Meru of inner valour which is like gold, and therefore, holds high the heaven of seven qualities.

876
मूळ

नातरी सप्तगुणार्णवी । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥876॥

मराठी अर्थ

किंवा सत्वगुणरुपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्रप्रकृतीरूप पृथ्वी होय.

English meaning

Or it is not only an attitude to perform duty which is rich by seven virtues but can be considered as earth surrounded by these seven seas of virtues.

877
मूळ

का गुणांचे सातांही ओघी । हे क्रिया ते गंगा जगी । तया महोदधीचिया आंगी । विलसे जैसी ॥877॥

मराठी अर्थ

अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्रक्रियारुपी गंगा ही क्षात्रप्रकृती धारण करणार्‍या ह्या महोदधिला मिळवून शोभते.

English meaning

Or this is the Ganges having its streams of seven qualities, happily playing on the surface of the ocean which is Kshatriya.

878
मूळ

परी हे बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥878॥

मराठी अर्थ

या सर्व गोष्टी राहू दे. क्षात्र प्रकृतीची शौर्याधिक गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत.

English meaning

But let this expansion be; know that the action which is full of these qualities of valour etc.; is the natural duty of Kshatriya.

879
मूळ

आता वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐके गा निरुती । क्रिया सांगो ॥879॥

मराठी अर्थ

आता हे महामते, वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो, ऐक.

English meaning

O the intelligent one! Now listen. I am going to tell you that action or duty which is natural for Vaishya or business man.

880
मूळ

तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणे जे ॥880॥

मराठी अर्थ

(कृषी) शेत, बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळवून त्यांच्यायोगे पुष्कळ नफा मिळविणे,

English meaning

To utilize land, seeds and the yoke and out of the capital investment of the crop, to gain good profit.

881
मूळ

किंबहुना कृषी जिणे । गोधने राखोनि वर्तणे । का समर्घीची विकणे । महर्घीवस्तु ॥881॥

मराठी अर्थ

किंबहुना कृषिकर्म करून अथवा (गोरक्ष्य) गाईचं संरक्षण करून किंवा (वाणिज्य) सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकणे,

English meaning

In short to subsist on agriculture, to keep and rear up cattle, or by selling low-priced articles at higher cost;

882
मूळ

येतुलाचि पांडवा । वैश्याते कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥882॥

मराठी अर्थ

अर्जुना, वैश्य जातीने ह्या तीन प्रकारे कर्म करून निर्वाह करणे, हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय.

English meaning

O Pandava, that much is sufficient natural duty of Vaishyas according to their class and upbringing.

883
मूळ

आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्मे तिन्ही वर्ण । ययाचे जे शुश्रूषण । ते शूद्रकर्म ॥883॥

मराठी अर्थ

आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे व यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे.

English meaning

And to serve the people belonging to Brahmin, Kshatriya and Vaishya classes is the natural duty of Shoodras.

884
मूळ

पै द्विजसेवेपरौते । धावणे नाही शूद्राते । एवं चतुर्वर्णोचिते । दाविली कर्मे ॥884॥

मराठी अर्थ

परंतु द्वीजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून चारी वर्णांची कर्मे तुला सांगितली.

English meaning

Beyond doing service of these three classes of the twice-born, there is no further activity necessary for the Shoodras. Thus I have told you the natural duties of all the four classes.

885
मूळ

आता इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसे करणा । शब्दादिक ॥885॥

मराठी अर्थ

आता, या चार वर्णांची निरनिराळी उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्मादि इंद्रियांना शब्दादिक विषयच योग्य उचित होत,

English meaning

O the intelligent One, the various classes have their own proper duties just as various organs are having their proper sense-objects like sound, smell, touch etc. which befit them.

886
मूळ

नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥886॥

मराठी अर्थ

अथवा मेगा पासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय. आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र,

English meaning

It is like the natural flow of water falling from the clouds towards the river; and water from the river has the only aim of meeting the sea.

887
मूळ

तैसे वर्णाश्रमवशे । जे करणीय आले असे । गोरेया आंगा जैसे । गोरेपण ॥887॥

मराठी अर्थ

तसे वर्णाश्रमधर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म, ते केले असता, गौर अंगास जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णांला अत्यंत शोभा येते.

English meaning

Therefore, actions which are in keeping with the duties ordained for the various stages in life and the status in the class-society, are befitting the respective classes just as the fairness of the skin befits a man who is fair-skinned.

888
मूळ

तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखे वीरोत्तमा । प्रवर्तावयालागी प्रमा । अढळ कीजे ॥888॥

मराठी अर्थ

हे विरोतमा त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी.

English meaning

Therefore, O the great warrior, one should have a determination in his own intellect to perform the proper duty according to the rules given in the scriptures.

889
मूळ

पै आपुलेचि रत्न थिते । घेपे पारखियाचेनि हाते । तैसे स्वकर्म आपैते । शास्त्रे करावी ॥889॥

मराठी अर्थ

परंतु आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पाख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे.

English meaning

Just as we get our own jewellery tested and examined by an expert, and then only, become sure about its value, so our own duties should be verified to be valid according to the scriptures.

890
मूळ

जैसी दिठी असे आपुलिया ठायी । परी दीपेवीण भोग नाही । मार्गु न लाहता काई । पाय असता होय ? ॥890॥

मराठी अर्थ

जशी आपल्याजवळ दृष्टी असूनही दिव्यावाचून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग ?

English meaning

My dear, we have vision quite in its right place, but without lamp-light that vision is of no use. Similarly what is the use of the feet if they do not find any path to walk upon?

891
मूळ

म्हणौनि ज्ञातिवशे साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रे गोचरु । आपण कीजे ॥891॥

मराठी अर्थ

म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल, तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा.

English meaning

Therefore, we should verify and ascertain by consulting the scriptures what is our eligibility according to our class.

892
मूळ

मग घरींचाचि ठेवा । जेवी डोळ्या दावी दिवा । तरी घेता काय पांडवा । आडळु असे ? ॥892॥

मराठी अर्थ

मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो, तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो काय ?

English meaning

Then, O Pandava, what difficulty is there, if we have the lamp in our hand to find out our own treasure kept in the dark?

893
मूळ

तैसे स्वभावे भागा आले । वरी शास्त्रे खरे केले । ते विहित जो आपुले । आचरे गा ॥893॥

मराठी अर्थ

तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्यांचे जो आचरण करतो;

English meaning

Thus, one who acts according to the role which is his own lot, and which is also sanctioned by scriptures,

894
मूळ

परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगे जीवे मांडुनी । तेथेचि भरु ॥894॥

मराठी अर्थ

पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्वकाळ घालवितो;

English meaning

But performs these, his own duties, without laziness, and without desire for fruit, by employing his body and mind,

895
मूळ

वोघी पडिले पाणी । नेणे आनानी वाहणी । तैसा जाय आचरणी । व्यवस्थौनी ॥895॥

मराठी अर्थ

पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडेच जात नाही तसे त्याचे आचरण यथाशास्त्र होते;

English meaning

Makes progress as naturally while doing his duties, as water fallen in a stream flows further in the same direction as the stream flows.

896
मूळ

अर्जुना जो यापरी । ते विहित कर्म स्वये करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारी । पैठा होय ॥896॥

मराठी अर्थ

अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्मांचे स्वतः आचरण करितो, तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले दार वैराग्य तेथे प्राप्त होतो.

English meaning

O Arjuna, one who performs his ordained duties in this manner, reaches liberation on this shore only.

897
मूळ

जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि काही संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥897॥

मराठी अर्थ

जो अकरण व निषिद्ध या कर्मांचा संबंध होऊ देत नाही, म्हणून आत्मप्राप्ती विरुद्ध जो संसार, त्याच्या भयापासून मुक्त होतो;

English meaning

Since he does not come into contact with improper and prohibited actions, he is not affected by the snare of this worldly life.

898
मूळ

आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडे । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥898॥

मराठी अर्थ

तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणिला तरी पाय अडकवून घेत नाही, तसे काम्य कर्माकडे जो कौतुकानेहि पहात नाही;

English meaning

Since he does not turn his attention towards selfish deeds even for fun, he does not get his feet tied up in the fetters may they be even of sandal-wood!

899
मूळ

येर नित्य कर्म तव । फळत्यागे वेचिले सर्व । म्हणौनि मोक्षाची शीव । ठाकू लाहे ॥899॥

मराठी अर्थ

आणि दुसरे जे नित्यकर्म, त्याचा फलत्याग् केल्यामुळे तेही तो संपवितो; त्यामुळे तो मोक्षाचा शिवेजवळ प्राप्त होतो.

English meaning

As he performs his routine duties, dropping all desire for fruit, and offering them to God, he can reach the gates of freedom.

900
मूळ

ऐसेनि शुभाशुभी संसारी । सांडिला तो अवधारी । वौराग्यमोक्षद्वारी । उभा ठाके ॥900॥

मराठी अर्थ

अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो.

English meaning

Thus he becomes free of the complexities of actions, which are good or undesirable, and becomes ascetic and easily reaches the threshold of freedom, and can stand firmly there.

901
मूळ

जे सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जे प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥901॥

मराठी अर्थ

जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्षलाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे स्थान होय;

English meaning

The seeker like a black-bee, delicately puts his steps on the "desirelessness" in which there is fulfillment of all good fortune, there is certainty of liberation, in which there is end of outward rituals, which ensures the liberation and which is the sweet fruit of the "tree" of meritorious actions.

902
मूळ

मोक्षफळे दिधली वोल । जे सुकृततरूचे फूल । तये वैराग्यी ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥902॥

मराठी अर्थ

ज्याला मोक्षफल जामीन झालेले आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षांचे फुलच होय, त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो.

English meaning

The seeker like a black-bee, delicately puts his steps on the "desirelessness" in which there is fulfillment of all good fortune, there is certainty of liberation, in which there is end of outward rituals, which ensures the liberation and which is the sweet fruit of the "tree" of meritorious actions.

903
मूळ

पाही आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥903॥

मराठी अर्थ

हे पहा सूर्योदयाची वार्ता सांगणारा जसा अरुणोदय आहे, त्याप्रमाणे या आत्मज्ञान रूप सुदिनाचा उदय सुचविणारे हे वैराग्य आहे.

English meaning

Please understand that the desirelessness, which is the dawn, the harbinger of the advent of Sun of self-knowledge in the sky, is tremendously beneficial to the seeker.

904
मूळ

किंबहुना आत्मज्ञान । जेणे हाता ये निधान । ते वैराग्य दिव्यांजन । जीवे ले तो ॥904॥

मराठी अर्थ

किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्यरूप दिव्य अंजनाने हातात येते, ते जो जीवेभावे करून बुद्धी रूप डोळ्यात घालतो

English meaning

Or we can say that he puts into his eyes, the divine ointment of desirelessness by which he can see the hidden treasure of self-knowledge, and attains it.

905
मूळ

ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥905॥

मराठी अर्थ

अर्जुना, अशाप्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता, त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते.

English meaning

Thus, O Pandava, the man who performs his own proper duties, becomes eligible for liberation.

906
मूळ

हे विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥906॥

मराठी अर्थ

हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय. त्याचं आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची परम सेवा होय.

English meaning

O Pandava, to perform this duty in this manner is the real solace to the soul, and to perform it is the real service to me in my own nature as the super -Atman.

907
मूळ

पै आघवाचि भोगेंसी । पतिव्रता क्रीडे प्रियेसी । की तयाची नामे जैसी । तपे तिया केली ॥907॥

मराठी अर्थ

संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते त्या तिच्या आचरणास ‘तप’ असे म्हणावे

English meaning

Just as a faithful wife enjoys everything with her husband or rather all her penances are meant for him only.

908
मूळ

का बाळका एकी माये । वाचोनि जिणे काय आहे । म्हणौनि सेविजे की तो होये । पाटाचा धर्मु ॥908॥

मराठी अर्थ

किंवा बाळाला आई वाचून जगायला दुसरे साधन नाही, म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय.

English meaning

Or, what other support has the child except his mother? Therefore, his greatest duty is to serve her.

909
मूळ

नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडिता जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥909॥

मराठी अर्थ

अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थांचा सहज लाभ होतो,

English meaning

Or even if a fish lives in Ganges with an idea that it is water only, and not a sacred river, if it flows with the river and goes into the sea, he can as a matter of course, be fortunate to have the merit of living in the most sacred place of all.

910
मूळ

तैसे आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबिता । ऐसा कीजे की जगन्नाथा । आभारु पडे ॥910॥

मराठी अर्थ

तसे आपल्या विहित कर्मांचे आचरण केल्यावाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आराधन केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते,

English meaning

Similarly if one performs one's duties with the concept that one has no other alternative but to do it, the burden of one's welfare naturally belongs to God.

911
मूळ

अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सापडेचि तो ॥911॥

मराठी अर्थ

अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे, ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे, म्हणूनच ते कर्म केले असता नि:संशय ईश्वर प्राप्त होतो.

English meaning

The most important thing is that what a man does as his duty is the very thing which God likes, and therefore god naturally becomes pleased if that duty is done.

912
मूळ

पै जीवाचे कसी उतरली । ते दासी की गोसावीण जाली । सिसे वेचि तया मविली । वही जेवी ॥912॥

मराठी अर्थ

दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली, तर तीच सर्वाची स्वामिनी होते; किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन आपले दप्तरी दाखल ठेवतो,

English meaning

For example, a maid-servant, who is liked by her employer may become his wife; or if a servant does everything for his employer even at the risk of his life, the employer may respect him beyond limits.

913
मूळ

तैसे स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर ते गा पांडवा । वाणिज्य करणे ॥913॥

मराठी अर्थ

तसे ईश्वराच्या मनोभावे प्रमाणे वागणे हीच त्याची परम सेवा होय व यावाचून हे दुसरे कृत्य करणे, ते अर्जुना, वाणिज्य कर्माप्रमाणे आहे.

English meaning

Similarly, dear Pandava, the only service which does not miss the wishes of the employer, (or God) is the true service, and all other activity is only an exercise in trade.

914
मूळ

म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि का आली । आकारा भूते ॥914॥

मराठी अर्थ

म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत, त्यांचे मनोगतच आपण पाळीले !

English meaning

So, this is not merely the performance of the ordained duty; it should be considered as the obeisance to the will of the Paramatman, from whom all the creation of all the beings has been formed.

915
मूळ

जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥915॥

मराठी अर्थ

जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरुपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व-रज-तम अशा तीन पदरी अहंकाररूप सूत्राने त्यांना खेळवितो.

English meaning

He is that Paramatman, who wraps the rags of the Prakriti (the material from Nature) and creates a doll which is Jeeva, and by pulling the rope of pride, made of the three qualities, makes that doll dance;

916
मूळ

जेणे जग हे समस्त । आत बाहेरी पूर्ण भरित । जाले आहे दीपजात । तेजे जैसे ॥916॥

मराठी अर्थ

दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे;

English meaning

He is the one by whom the universe is permeated both inside and outside like the flame of a lamp;

917
मूळ

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥917॥

मराठी अर्थ

वीरा अर्जुना, त्या सर्वात्मका ईश्वराची स्वकर्मरुपी पुष्पांनी पूजा केली असता, ती पूजा त्याला परमसंतोष कारक होते.

English meaning

If he is worshipped with flowers of the performance of ordained duties, he is very much pleased;

918
मूळ

म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजे । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥918॥

मराठी अर्थ

म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य उत्पन्न करतो. हाच त्याच्या भक्तांवर खरोखर प्रसाद !

English meaning

Being so pleased, he gives the blessing of desirelessness to that devotee who worships him in this may.

919
मूळ

जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशे । हे सर्वही नावडे जैसे । वांत होय ॥919॥

मराठी अर्थ

जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो,

English meaning

When the devotee is desireless like this, he is totally interested in that God, and abhors all the illusory universe as if it is a vomit.

920
मूळ

प्राणनाथाचिया आधी । विरहिणीते जिणेही बाधी । तैसे सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥920॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दु:खवत भासतात.

English meaning

He finds every kind of pleasure of this world as painful, just as a devoted wife has no wish to remain alive when she is totally worried about her husband who is away from her.

921
मूळ

सम्यक्‌ज्ञान नुदैजता । वेधेचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥921॥

मराठी अर्थ

ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे.

English meaning

This indirect knowledge is so great in itself that there is total captivation of the mind of the seeker, by God Almighty even before his direct realization.

922
मूळ

म्हणौनि मोक्षलाभालागी । जो व्रते वाहातसे आंगी । तेणे स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥922॥

मराठी अर्थ

यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा, अशी इच्छा असेल, त्याने स्वधर्माचे परम आस्थेनेआचरण करावे.

English meaning

Therefore, he who is very keenly practising certain vows for realization of the state of freedom, should meticulously and perfectly perform the duties fixed for him by the scriptures.

923
मूळ

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणे ॥923॥

मराठी अर्थ

अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी चे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेविले पाहिजे.

English meaning

Though it is difficult or cumbersome to observe our own duties, we should consider the kind of result which is going to be received by it.

924
मूळ

जै सुखालागी आपणपया । निंबचि आथी धनंजया । तै कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥924॥

मराठी अर्थ

हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल, तर त्याच्याकडून कडूपणास कंटाळू नये

English meaning

O Dhananjaya, if Neem is the only proper medicine for our ailment, how can we be averse to its bitterness?

925
मूळ

फळणया ऐलीकडे । केळीते पाहाता आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसे के गोमटे ॥925॥

मराठी अर्थ

केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराश होते; आणि तशा स्थितीतच जर ती तोडून टाकिली, तर तीच पासून उत्तम फळे कोठून प्राप्त होणार ?

English meaning

If we look at a banana tree before it bears fruits, it gives us no hope, but if we cut it down by being dejected, how will we get the sweet fruit like the bananas?

926
मूळ

तेवी स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला की ॥926॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाचकी की ?

English meaning

Similarly, seeing the difficult nature of doing our own duty, if we do not like it, we will definitely lose the great benefit of liberation!

927
मूळ

आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये ते नोहे । स्नेह कुऱ्हे की ॥927॥

मराठी अर्थ

आणि आपली आई जरी कुरूप असली तरी ज्या तीच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काही वाकडे नाही.

English meaning

And even if our mother may be hunch- back, her love by which we live is not crooked.

928
मूळ

येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळके तेणे ? ॥928॥

मराठी अर्थ

एरव्ही दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत ?

English meaning

Other women may be more beautiful than the heavenly woman like Rambha but of what use are they to that child?

929
मूळ

अगा पाणियाहूनि बहुवे । तुपी गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणे तेथ ॥929॥

मराठी अर्थ

अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे खरे; पण माशाला तुपात ठेवले असतो जगेल का ?

English meaning

No doubt, ghee is having more nutritional properties than water, but can fish live in ghee?

930
मूळ

पै आघविया जगा जे विख । ते विख किडियाचे पीयूख । आणि जगा गूळ ते देख । मरण तया ॥930॥

मराठी अर्थ

हे पहा, जो बचनाग सर्व जगाला विष आहे, तोच त्यातील किड्याला अमृत आहे; आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे, तोच त्या किड्याला मृत्यु आहे !

English meaning

Just see! Poison is dangerous for all people, but for the worms which thrive in it, it is like a nectar, and jaggery which is sweet to all, is virtual death for that worm!

931
मूळ

म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । क्रिया कठोर तऱ्ही तेणे । तेचि करावी ॥931॥

मराठी अर्थ

म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की, ज्याच्या आचरणाने संसाराची बंधन तुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचे आचरण करावे.

English meaning

Therefore, whatever is proper duty by doing which the hold of worldly life on us becomes ineffective, should always be done, though it is hard to do.

932
मूळ

येरा पराचारा बरविया । ऐसे होईल टेंकलया । पायांचे चालणे डोइया । केले जैसे ॥932॥

मराठी अर्थ

पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर, पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दु:खाला मात्र कारण होईल.

English meaning

And if we start doing such duties of others which we find to be easier, it will be as stupid as to walk by our head instead of by our feet.

933
मूळ

यालागी कर्म आपुले । जे जातिस्वभावे असे आले । ते करी तेणे जिंतिले । कर्मबंधाते ॥933॥

मराठी अर्थ

याकरिता आपल्या जातीस्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे, त्याचे जो आचरण करतो, त्याने कर्मबंधला जिंकले; (तो कर्मबंधापासून मुक्त झाला)

English meaning

For this reason, he who performs his own duties which are natural for him according to his status, has already overcome the bondage of action.

934
मूळ

आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥934॥

मराठी अर्थ

आणि म्हणूनच अर्जुना, पर धर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी नियम नको का करावयाला ?

English meaning

O Pandava, therefore, is it not essential to lay down the rule that man must do his own duty and avoid other's duty?

935
मूळ

तरी आत्मा दृष्ट नोहे । तव कर्म करणे का ठाये ? । आणि करणे तेथ आहे । आयासु आधी ॥935॥

मराठी अर्थ

तर आत्मा जोपर्यंत दृष्ट झाला नाही, तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय ? नाही, ते अवश्य केलेच पाहिजे, आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत.

English meaning

And just see; is not action necessary so long as there is no self-realization? And every action has some hard work in the beginning.

936
मूळ

म्हणौनि भलतिये कर्मी । आयासु जऱ्ही उपक्रमी । तरी काय स्वधर्मी । दोषु । सांगे ? ॥936॥

मराठी अर्थ

याचकरिता, कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात, तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांगा बरे ?

English meaning

Thus, since difficulties are there, in any action whatever, it may be, why should we say that it is our own duty that is only having difficulties in its performance?

937
मूळ

आगा उजू वाटा चालावे । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडराने धावावे । तऱ्ही तेचि ॥937॥

मराठी अर्थ

अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले, तरी पायालाच शीण द्यावयाचा, आणि आडरानात भटकावयाचे झाले, तरी तीच स्थिती !

English meaning

In walking by the straight road, our feet are tired; but even in any crooked and rough path also the feet are tired.

938
मूळ

पै शिळा का सिदोरिया । दाटणे एक धनंजया । परी जे वाहता विसांवया । मिळिजे ते घेपे ॥938॥

मराठी अर्थ

अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी(फराळाचे) ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते; परंतु हे विसाव्याचे (मुक्कामाचे) ठिकाणी सुखकर होईल, तेच घ्यावे.

English meaning

O Dhananjaya, we may take with us in our journey either a heavy stone or tiffin-food, the load is there in both the cases; so, only that load which will give us some relief should be taken with us.

939
मूळ

येऱ्हवी कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेचि हवी ॥939॥

मराठी अर्थ

बाकी धान्य आणि भुस कांडताना श्रम सारखेच पडतात; अथवा श्वानाचे मास खाण्याचे किंवा होमाकरिता मास शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत,

English meaning

For example, in pounding grains or husks, the strain is the same, and in cooking food for oblation in the sacrificial fire and cooking dog's flesh, the process of cooking may be the same;

940
मूळ

दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणे एक ॥940॥

मराठी अर्थ

हे विचक्षणा, दही किंवा पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच; अथवा वाळू किंवा तिळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच,

English meaning

O the intelligent one, if we churn water and churn curds, action is the same, and if we put sand in a pulverizer or put til-seeds, the process is the same.

941
मूळ

पै नित्य होम देयावया । का सैरा आगी सुवावया । फुंकिता धू धनंजया । साहणे तेचि ॥941॥

मराठी अर्थ

हे बघ, अर्जुना, नित्य होम देण्याकरिता किंवा एरव्ही विस्तव पेटविण्याचे वेळी धुर हा दोघासही सोसावा लागतोच;

English meaning

O Dhananjaya, we may blow fire for kindling it for "Vaishwadeva" sacrifice or for putting fire to a house, the nuisance of smoke is equally there!

942
मूळ

परी धर्मपत्नी धांगडी । पोसिता जरी एकी वोढी । तरी का अपरवडी । आणावी आंगा ? ॥942॥

मराठी अर्थ

अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो, तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा ?

English meaning

And if money is required to be spent either for supporting one's wife or a "keep", why become the target of blame by supporting the "keep"?

943
मूळ

हा गा पाठी लागला घाई । मरण न चुकेचि पाही । तरी समोरला काई । आगळे न कीजे ? ॥943॥

मराठी अर्थ

अरे, पाठीकडच्या बाजूला घाव लागून जर मरण चुकत नाही, तर शत्रुसमोर युद्ध करून मेलो असता मरणाहून अधिक वर्गाची प्राप्ति होणार नाही का ?

English meaning

If we cannot escape death by running away, by the enemy's arrows hitting our back, why not face him and suffer a brave man's death? What more have we to lose?

944
मूळ

कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीते वाये । सांडिले की । ॥944॥

मराठी अर्थ

कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनहि जर तिला दांडक्याचा मार, सोसावा लागतो, तर तिने आपला पति व्यर्थ सोडला असे नाही का होत ?

English meaning

If a housewife leaves her home because her husband beats her, and if she takes shelter in another man's home where he also gives her a good beating, then what did she gain by getting out?

945
मूळ

तैसे आवडतेही करणे । न निपजे शिणल्याविणे । तरी विहित बा रे कोणे । बोले भारी ? ॥945॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताहि जर दुःख सोसावे लागतं तर बापा, स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल ?

English meaning

Similarly, when the work which we very much love, has also unavoidable hardships, then how can we complain that only the ordained duty is hard to do?

946
मूळ

वरी थोडेचि अमृत घेता । सर्वस्व वेचो का पंडुसुता । जेणे जोडे जीविता । अक्षयत्व ॥946॥

मराठी अर्थ

हे पंडुसुता, ज्या अमृतसेवनाते अमरत्व प्राप्त होते, त्याच्या अल्प प्राप्तीकरिता हि सर्वत्र का खर्च करू नये ?

English meaning

O the son of Pandu, what wrong is there in spending all our possessions if we are getting a little of nectar in exchange, which is going to save our life?

947
मूळ

येर काह्या मोले वेचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणे ॥947॥

मराठी अर्थ

आणि ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुखांचा नाश होऊन आत्महत्येचे पातकं लागते, ते विकत घेऊन का प्यावे ?

English meaning

Why should we purchase poison by spending money, when that poison is going to be the means of our suicide?

948
मूळ

तैसे जाचूनिया इंद्रिये । वेचूनि आयुष्याचेनि दिये । सांचले पापी आन आहे । दुःखावाचूनि ? ॥948॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय केला असता दुःखावाचुन दुसरे फल आहे काय ?

English meaning

Similarly what else except pain and sorrow is there in accumulating sins which we go on committing by harassing our organs and wasting our valuable days of life?

949
मूळ

म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करिता हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥949॥

मराठी अर्थ

म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे. तो आपल्या श्रमांचा परिहार करून, उचित अशा परमपुरुषार्थाची—सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ति करून देईल

English meaning

Therefore, we should do our own duty which will eventually relieve all our pains and give us the highest achievement of liberation.

950
मूळ

याकारणे किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटी । सिद्धमंत्र जैसा ॥950॥

मराठी अर्थ

या करिता, ज्याप्रमाणे संक्रटसमयी सिद्धमंत्र विसरु नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये.

English meaning

O the crowned one, it is therefore essential that we should not forget our own duty, as it is as useful as a consecrated Siddha Mantra in the days of calamity.

951
मूळ

का नाव जैसी उदधी । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥951॥

मराठी अर्थ

अथवा समुद्रांत पडलेल्याने नाव सोडू नये ? किंवा महारोग्याने दिव्यौषधीचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये.

English meaning

As a boat is useful in the sea, and divine medicine is useful in treating incurable disease, so, we should consider our own duty and should not neglect it.

952
मूळ

मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥952॥

मराठी अर्थ

मग हे कपिध्वजा; याच सत्कर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर, तम व रज या गुणांचा नाश करून

English meaning

O Kapidhwaja! Then God is pleased by this great worship done by the devotee in the performance of his own duty and by destroying the Tamas and Rajas (form the devotee's nature),

953
मूळ

शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसे दावी ॥953॥

मराठी अर्थ

आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावितो; आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषाप्रमाणे आहेत, असे वाटावयास लावतो. नंतर

English meaning

Guides him to the path of Sattwa, and makes him so desireless through his eagerness in the penance for self-realization, that he will look at all the pleasures in both the worlds as if they are poisons!

954
मूळ

जिये वैराग्य येणे बोले । मागा संसिद्धी रूप केले । किंबहुना ते आपुले । मेळवी खागे ॥954॥

मराठी अर्थ

पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धि या शब्दाचे जे वर्णन केले ते आपले वैराग्यरूप स्थान तो मिळवितो.

English meaning

(Dnyandeva says ) "This quality of desirelessness is earlier described by the word Sansiddhi (perfection) in my commentary on verse 45. This seeker reaches that state.

955
मूळ

मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । का जालाही जे लाहे । ते आता सांगो ॥955॥

मराठी अर्थ

मग ही वैराग्यभूमिका जिंकल्यावर ती त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो, ते आता सांगतो.

English meaning

Now I am going to tell you how after winning this much, the man behaves in his life and what he achieves.

956
मूळ

तरी देहादिक हे संसारे । सर्वही मांडलेसे जे गुंफिरे । तेथ नातुडे तो वागुरे । वारा जैसा ॥956॥

मराठी अर्थ

वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जातांना अडकत नाही, तसा देह आदिकरून जे संसार पाश त्यात तो असून हि सांपडत नाही.

English meaning

Then just as wind cannot be caught in a net, he is not entangled in this complicated worldly life connected with the body.

957
मूळ

पै परिपाकाचिये वेळे । फळ देठे ना देठु फळे । न धरे तैसे स्नेह खुळे । सर्वत्र होय ॥957॥

मराठी अर्थ

हे पहा, पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही, किंवा देठहि त्याला धरीत नाही, तसे संसारादिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. (लुळे पडते. )

English meaning

He loses all interest in mundane affairs when he attains this state. It is like a ripe fruit which the stem does not hold further, nor the fruit keeps its attachment to it.

958
मूळ

पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझे न म्हणे पात्र । विषाचे जैसे ॥958॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे विषाचे पात्र माझे आहे असे कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे पुत्र, वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असली तरी ती माझी आहेत असे म्हणत नाही.

English meaning

When his son, his money and his wife become estranged from him, he no longer thinks that they belong to him, like a pot of poison which is not claimed nor taken by anybody.

959
मूळ

हे असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउले घेऊनि एकांती । हृदयाच्या रिगे ॥959॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे, कढत पदार्थाच्या योगे हातालाः चटका बसतांच जसा हात मनुष्य माग घेतो, तशी त्याची बुद्धि विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते.

English meaning

His intellect becomes disinterested in all objcts of the world and retreats into the quiet space within his heart.

960
मूळ

ऐसया अंतःकरण । बाह्य येता तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥960॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या भीतीने त्याची आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन आम्याची शपथ मोडीत नाही.

English meaning

Then even if his mind remains functioning in the outer environments, his intellect strengthened by desirelessness remains obedient to Atman like a slave woman and does not step out at all.

961
मूळ

तैसे ऐक्याचिये मुठी । माजिवडे चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटी । आत्मयाच्या ॥961॥

मराठी अर्थ

तसे अर्जुना, ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो;

English meaning

O the crowned one, he binds and holds his mind in the fist of the sense of unity with Atman and keeps it ever attuned to that Atman.

962
मूळ

तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे । निमणे जालेचि आहे । आगी दडपलिया धुये । राहिजे जैसे ॥962॥

मराठी अर्थ

त्या वेळेस, जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते.

English meaning

Then it is natural that his craving for mundane and heavenly pleasures dies down like little fire under a heavy layer of ash.

963
मूळ

म्हणौनि नियमिलिया मानसी । स्पृहा नासौनि जाय आपैसी । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥963॥

मराठी अर्थ

म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करावयाचे आहे ? अशी भूमिका साधकाला प्राप्त होते.

English meaning

Thus his passion disappears as his mind is under control. He attains this high state in this way.

964
मूळ

पै अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रीचि जीवा । ठावो होय ॥964॥

मराठी अर्थ

हे बघ अर्जुन, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो.

English meaning

Thus, O Pandava, this means that his illusory perception of the world through false knowledge is ended and he as Jeeva, becomes firmly established in real self-knowledge.

965
मूळ

धरवणी वेचे सरे । तैसे भोगे प्राचीन पुरे । नवे तव नुपकरे । काहीचि करू ॥965॥

मराठी अर्थ

जसे सांचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते, तसे प्रारब्धकर्म हे भोगांती सरते आणि अहंकर्तृत्वभावना नसत्यामुळे नवीन कर्म उपन्न होत नाही.

English meaning

Then just like water stored in a pot is finished, his accumulated residue of past karma comes to an end by his body- actions, and his mind does not help in any way for creating further bondage of selfish action.

966
मूळ

ऐसी कर्मे साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥966॥

मराठी अर्थ

अर्जुन, अशाप्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्रीगुरूंची आपोआप भेट होते.

English meaning

When this state of equilibrium of action is attained, he meets his Guru as a matter of course, O the leader of brave men!

967
मूळ

रात्रीची चौपाहरी । वेचलिया अवधारी । डोळ्या तमारी । मिळे जैसा ॥967॥

मराठी अर्थ

हे पहा, रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य दृष्टीस पडतो

English meaning

This is like rising of the Sun after all the four quarters of night time are over.

968
मूळ

का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥968॥

मराठी अर्थ

अथवा, फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो, त्याप्रमाणे श्रीगुरु हे भेट्न जिज्ञासूची कर्मकर्तृत्ववाची खटपट बंद करतात.

English meaning

Just as further growth of a banana tree stops when it bears the bunch of bananas, so, the meeting with his Guru affects the life of the seeker.

969
मूळ

मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसे होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥969॥

मराठी अर्थ

मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी कलेचा कमीपणा मुळीच राहात नाही, त्याप्रमाणे, हे श्रेष्ठवीरा, गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीहि उणीव राहात नाही.

English meaning

O the Bravest among men! Just as all the lacunae in the disc of the Moon are removed when full moon night embraces the Moon, so the life of the seeker is fulfilled by the grace of his Guru.

970
मूळ

तेव्हा अबोधुमात्र असे । तो तव तया कृपा नासे । तेथ निशीसवे जैसे । आंधारे जाय ॥970॥

मराठी अर्थ

त्या वेळी अज्ञान म्हणून जेवढे असते, तेव्हढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते, आणि रात्र गेल्यावर अंधार नहीसा होतो,

English meaning

Then whatever residual ignorance is still lingering in the seeker's mind, it is destroyed by the grace of the Guru, and then just as the darkness with the night disappears at the sunrise,

971
मूळ

तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥971॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी कर्ता, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीहि नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही, तो आपोआपच मरतो.

English meaning

Similarly the trinity of the actor, the action and the acting which is in the womb of ignorance is destroyed like killing of a pregnant female animal.

972
मूळ

तैसेचि अबोधनाशासवे । नाशे क्रियाजात आघवे । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥972॥

मराठी अर्थ

तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्मांचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कमचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो.

English meaning

Then together with the destruction of ignorance, the totality of action with its results is also destroyed. Thus the renunciation reaches the very core of the soul.

973
मूळ

येणे मुळाज्ञानसंन्यासे । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावे ते आपैसे । तोचि आहे ॥973॥

मराठी अर्थ

त्यामुळे ज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाले म्हणजे मग जाणावयाचे जे ते तो आपण स्वतःच आहे.

English meaning

As by the destruction of basic ignorance the anchor of the creation of name and form is uprooted, this man himself remains as the object of knowledge, in the absence of any second object before him.

974
मूळ

चेइलियावरी पाही । स्वप्नीचिया तिये डोही । आपणयाते काई । काढू जाइजे ? ॥974॥

मराठी अर्थ

असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहांत बुडत असल्याच जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो ! सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयी तो खटपट करील काय ?

English meaning

When we are awakened, is it necessary to try to save us from drowning, which was our dream experience?

975
मूळ

तै मी नेणे आता जाणेन । हे सरले तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥975॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे मला कळत नाही, मी आता समजून घेईन, हे त्याचे दुःस्वप्त नष्ट होते; आणि • ज्ञेय व ज्ञाता हे जाऊन तो केवळ चिदाकाश म्हणजे ज्ञानमात्र होतो.

English meaning

Similarly the bad dream of this seeker in which he was thinking- "I am not knowing, I will acquire knowledge" is finished and he discards both the factors of the knower and the object of knowledge and remains as pure knowledge.

976
मूळ

मुखाभासेसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेवीण जैसा । पाहाता ठाके ॥976॥

मराठी अर्थ

अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पहाणारा हा पहातेपणाशिवाय असतो,

English meaning

O the bravest man! When the mirror and the reflection are removed, the observer remains alone without his role as observer.

977
मूळ

तैसे नेणणे जे गेले । तेणे जाणणेही नेले । मग निष्क्रिय उरले । चिन्मात्रचि ॥977॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाहि घेऊन जाते मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरतें.

English meaning

Similarly, when ignorance is destroyed, its counterpart which is the quality of knowing is also destroyed and only inactive energy remains.

978
मूळ

तेथ स्वभावे धनंजया । नाही कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥978॥

मराठी अर्थ

अर्जुना, या नैष्कर्म्यभूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्यसिद्धि असे म्हणतात.

English meaning

O Dhananjaya, as there is naturally no action there, it is called actionless-ness.

979
मूळ

ते आपुले आपणपे । असे तेचि होऊनि हारपे । तरंगु का वायुलोपे । समुद्रु जैसा ॥979॥

मराठी अर्थ

ते आपले स्वरूप असून नसणेपणाच्या ज्ञानामुळे जो असणेपणा येतो तोहि जाऊन केवळ असणेपणा राहातो, तसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायु नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात

English meaning

There, we remain in our original state; and our separateness which was the product of ignorance becomes non-existent. It is just as a wave becomes water, losing its separate identity, when wind stops blowing.

980
मूळ

तैसे न होणे निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धीत सहजे । परम हेचि ॥980॥

मराठी अर्थ

तसे कोणतेहि कर्म न होणे अशी जी स्थिति तिला नैष्कर्यसिद्धि म्हणतात आणि हीच साहजिकतः सर्व सिद्धीत मुख्य होय.

English meaning

So, this state of not existing as a separate entity is called the achievement of the state of actionlessness and this is the highest human attainment of all.

981
मूळ

देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । का सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥981॥

मराठी अर्थ

कळस बसल्यावर देवळाच्या कामाचा शेवट होतो; अथवा गंगा समुद्रांत पावली म्हणजे जसे पुढे तिचे नांव रहात नाही; किंवा सोने शुद्ध करीत असता सोळा आणे कस लागला म्हणजे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते,

English meaning

The construction of dome is the end of building a temple; meeting the sea is the end of riverness of Ganges and the highest purity of gold is the caliber of `sixteen.'

982
मूळ

तैसे आपुले नेणणे । फेडिजे का जाणणे । तेहि गिळूनि असणे । ऐसी जे दशा ॥982॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहिसे केले, ते ज्ञानहि जेव्हा नाहिसे होईल, अशी जी स्थिति,

English meaning

Similarly this state is where both our ignorance and our knowledge are nullified.

983
मूळ

तियेपरते काही । निपजणे आन नाही । म्हणौनि म्हणिपे पाही । परमसिद्धि ते ॥983॥

मराठी अर्थ

तिच्यापेक्षां दुसरे काही प्राप्त होणे राहात नाही; म्हणूनतिला परमसिद्धि असे म्हणतात.

English meaning

As there is nothing beyond this state, it is called the supreme attainment.

984
मूळ

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- । काळी पावे ॥984॥

मराठी अर्थ

पण जो कोणी एखादा मोठा भाग्यवान् असतो त्याला श्रीगुरूच्या कृपेची जेव्हा प्राप्ति होते तेंव्हा हीच आत्मसिद्धि प्राप्त होते.

English meaning

Now we will consider the case of a man who is fortunate to get the blessings of the Guru and attains this achievement of realization of Atman.

985
मूळ

उदयताचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । का दीपसंगे कापुरु । दीपुचि होय ॥985॥

मराठी अर्थ

सूर्य उगवतांच जसा अंधकाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या ज्योतीस कापुर लागतांच तो दिवा होतो,

English meaning

Just as at sunrise, darkness becomes light, or camphor becomes flame by touch of a flame,

986
मूळ

तया लवणाची कणिका । मिळतखेवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवी ॥986॥

मराठी अर्थ

अथवा मिठाचा खडा जसा पाण्यात मिळवितांच जसा जलरूप होऊन राहतो;

English meaning

Or salt becomes water when touched by water,

987
मूळ

का निद्रितु चेवविलिया । स्वप्नेसि नीद वाया । जाऊनि आपणपया । मिळे जैसा ॥987॥

मराठी अर्थ

किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळस्वरूपाप्रत प्राप्त = होतो,

English meaning

Or when a man wakes up, both the dream and the sleep disappear and he becomes aware of himself;

988
मूळ

तैसे जया कोण्हासि दैवे । गुरुवाक्यश्रवणाचि सवे । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥988॥

मराठी अर्थ

तशी दैवयोगाने ज्या कोणीची वृत्ति गुरुवाक्यश्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते,

English meaning

Similarly if there is some lucky person whose sense of duality ends and if he gets rest in the unity in the state of Atman, simply by listening to the sentence of advice uttered by Guru,

989
मूळ

तयासी मग कर्म करणे । हे बोलिजैलचि कवणे । आकाशा येणे जाणे । आहे काई ? । ॥989॥

मराठी अर्थ

मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल ? पहा की, आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे जाणे घडते का ?

English meaning

Can anybody say that there is still any more things required to be done by that man? Has the sky the necessity of being born or destroyed, of coming into existence and going out of existence?

990
मूळ

म्हणौनि तयासि काही । त्रिशुद्धि करणे नाही । परी ऐसे जरी हे काही । नव्हे जया ॥990॥

मराठी अर्थ

म्हणून ज्यास आमसिद्धि प्राप्त झाली आहे, त्याला खरोखरच काही एक कर्तव्य उरत नाही,

English meaning

Therefore, there is no doubt that such a man has nothing to do. But consider another man in whose case this sudden realization does not take place.

991
मूळ

कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पै किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥991॥

मराठी अर्थ

परंतु ज्या कोणी एखाद्या भाग्यवानला गुरूचे वचन कानावर येतांक्षणीच आत्मसाक्षात्कार होते,

English meaning

He cannot attain the absolute state of reality as soon as he listens with his ears the advice given by his Guru precisely in one sentence;

992
मूळ

येऱ्हवी स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनी । रजतमे कीर दोन्ही । जाळिली आधी ॥992॥

मराठी अर्थ

अशा अधिकारी पुरुषाला सोडून एखाद्या मंदाधिकारी साधकांनी स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म व निषिद्धकर्म या इंधनाने रज व तम हे गुण अगोदर जाळून टाकले, –

English meaning

Because though the Rajas and Tamas have been burnt and turned into ashes by the fire of performance of ordained duties, burning the fuel of selfish and prohibited actions;

993
मूळ

पुत्र वित्त परलोकु । यया तिहीचा अभिलाखु । घरी होय पाइकु । हेही जाले ॥993॥

मराठी अर्थ

नंतर पुत्र, वित्त ( द्रव्य, ) स्वर्गादि लोक या तिहीचा काम (इच्छा ) हा ज्याच्या स्वाधीन देऊन घर सेवक झाला;

English meaning

Even though the attachment of sons, money or heavenly pleasures has been thoroughly subdued as a slave;

994
मूळ

इंद्रिये सैरा पदार्थी । रिगता विटाळली होती । तिये प्रत्याहार तीर्थी । न्हाणिली कीर ॥994॥

मराठी अर्थ

भिन्न भिन्न निषिद्ध विषयांचे ठायी प्रवेश केल्यामुळे इंद्रिये जी विटाळली होती, ती अष्टांगयोगांतील प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली;

English meaning

Though the organs running berserk which were dirtied by the mud of objects, are washed clean in the sacred waters of self-control;

995
मूळ

आणि स्वधर्माचे फळ । ईश्वरी अर्पूनि सकळ । घेऊनि केले अढळ । वैराग्यपद ॥995॥

मराठी अर्थ

आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने नाश न पावणारे वैराग्य प्राप्त करून घेतले.

English meaning

And though desirelessness is a confirmed fact by offering of the fruit of doing his own duty to God;

996
मूळ

ऐसी आत्मसाक्षात्कारी । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥996॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे, आत्मसाक्षात्काररूप जे ज्ञान, ते होण्याला जी साधने पाहिजेत, ती सर्व सामुग्री मिळविली;

English meaning

And though in this way all the necessary conditions required for consummation of knowledge at the time of self-realization are achieved.

997
मूळ

आणि तेचि समयी । सद्गुरु भेटले पाही । तेवीचि तिही काही । वंचिजेना ॥997॥

मराठी अर्थ

आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनीहि प्रतारणा न करिता सम्यग्ज्ञानाचा उपदेश केला;

English meaning

And even though he has met his true Guru now who has without reservation, taught him the knowledge of the Atman;

998
मूळ

परी वोखद घेतखेवो । काय लाभे आपला ठावो ? । का उदयजताचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥998॥

मराठी अर्थ

परंतु औषध घेतांक्षणीच तत्काळ रोगाची निवृत्ति होऊन, आपले मूळचे प्रकृतीची स्थिति प्राप्त होते काय ? अथवा प्रातःकाळी सूर्य उगवतांच मध्यान्हकाळ होतो काय ?

English meaning

Even then it does not happen that disease is cured as soon as medicine is taken and health is fully restored. Does the noon take place as soon as the day dawns?

999
मूळ

सुक्षेत्री आणि वोलटे । बीजही पेरिले गोमटे । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे की गा ॥999॥

मराठी अर्थ

उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टि झाली व त्यात उत्तम बीजहि पेरले, म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते; परंतु अर्जुना, त्याला वेळ लागतो की नाही ?

English meaning

When good seed is sown in a well cultivated fertile field, a good crop is expected, but it is ready only at its due time of ripeness.

1000
मूळ

जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वाचूनि वेळु । लागेचि की ॥1000॥

मराठी अर्थ

उत्तम मार्ग असून त्यात सुसंगतीचाहि लाभ झाला, तरी सुद्धां ज्या ठिकाणी आपल्यास जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच,

English meaning

Suppose the path is easy and smooth, and we have good friendly company also, but though we reach our desired destination, it is obvious that some period of time is required to travel the distance.

1001
मूळ

तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवी अंकुरु फुटला । विवेकाचा ॥1001॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे वैराग्यहि प्राप्त झाले, त्यात सद्गुरुंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ति करून घेण्याचीही अंत:करणात इच्छा झाली;

English meaning

Similarly though there is desirelessness, the Guru has also met, and a little sprout of discrimination has grown in the consciousness of the seeker,

1002
मूळ

तेणे ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥1002॥

मराठी अर्थ

मग त्यांच्या उपदेशानं ब्रह्म एक सत्य आहे व त्यावाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हे ऐकून साधकाचाहि त्याप्रमाणे दृढनिश्चय झाला;

English meaning

And though by that discernment there is conviction that Brahman is the only truth and everything else is a game of Maya;

1003
मूळ

परी तेचि जे परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेही काम । सरे जेथ ॥1003॥

मराठी अर्थ

परंतु असे जे सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म, ज्या ठिकणी मोक्ष शब्दहि नाहीसा होतो;

English meaning

Even then, in that state of all-pervading supreme Brahman, the work of liberation comes to an end.

1004
मूळ

यया तिन्ही अवस्था पोटी । जिरवी जे गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥1004॥

मराठी अर्थ

अर्जुना, साध्य, साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहींशी होते असे जे ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते,

English meaning

Which swallows the three factors of the knower, the knowledge and the knowable, and also finishes the activity of knowledge;

1005
मूळ

ऐक्याचे एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । काहीचि नुरोनि उरे । जे काही गा ॥1005॥

मराठी अर्थ

जेथे ऐक्याचा एकपणाहि उरत नाही व जेथे आनंदसुखाचा लेशहि उरत नाही व जेथे । काही न उरवून जे उरते,

English meaning

In it, the unity of the one-ness is complete, and every particle of joy is dissolved, and there remains only nothingness in which no thing exists at all.

1006
मूळ

तिये ब्रह्मी ऐक्यपणे । ब्रह्मचि होऊनि असणे । ते क्रमेचि करूनि तेणे । पाविजे पै ॥1006॥

मराठी अर्थ

असे जे ब्रह्म, त्याब्रम्हाच्या ठिकाणी ऐक्य पावून राहणे ते त्याला मंदाधिकत्वामुळे क्रमानेच प्राप्त होते.

English meaning

The state of being united with Brahman is attained by that man after some time only.

1007
मूळ

भुकेलियापासी । वोगरिले षड्रसी । तो तृप्ति प्रतिग्रासी । लाहे जेवी ॥1007॥

मराठी अर्थ

क्षुधितापुढे षड्रस अन्नाचे ताट वाहून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ति वाढत वाढता शेवटल्या घासाला पूर्ण तृप्त होतो,

English meaning

Just as a hungry man, when given a good full meal, becomes satisfied gradually by every morsel he takes,

1008
मूळ

तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथिता आत्मठेवा । काढीचि तो ॥1008॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूप दीपाच्या प्रकाशाने आमस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो.

English meaning

Similarly when the lamp of discrimination becomes bright by the oil of desirelessness, then the seeker finds that the hidden treasure of the reality of Atman is open to him.

1009
मूळ

तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगी निरवधी । लेणे जाली ॥1009॥

मराठी अर्थ

तर आमरूप ऐश्वर्य भोगण्याची ज्या साधकाच्या अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली,

English meaning

But he who has become so deserving as to be able to directly enjoy the glory of that Reality,

1010
मूळ

तो जेणे क्रमे ब्रह्म । होणे करी गा सुगम । तया क्रमाचे आता वर्म । आईक सांगो ॥1010॥

मराठी अर्थ

तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ति सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो, ऐक.

English meaning

Reaches that capacity by fulfillment of certain conditions in a particular sequence, which I am going to tell you. Please listen.

1011
मूळ

तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणे ॥1011॥

मराठी अर्थ

श्रीगुरुन दाखविलेल्या वाटेने विवेकतीर्थाच्या तीरावर येऊन बुद्धीचा मळ त्याने धुवून टाकतो.

English meaning

He travels by the path of penance as shown by his Guru, and arrives at the place of sacred water, which is the quality of discrimination, and there he washes the dirt on his intellect.

1012
मूळ

मग राहूने उगळिली । प्रभा चंद्रे आलिंगिली । तैसी शुद्धत्वे जडली । आपणया बुद्धि ॥1012॥

मराठी अर्थ

मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नानाप्रकाच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता, तो शुद्ध होऊन ती आपल्या मूळच्या स्थितीस प्राप्त होते.

English meaning

Then just as the brightness of the Moon which is free of the eclipse of Rahu, embraces the Moon again, the intellect of this seeker, being cleaned, embraces the Atman.

1013
मूळ

सांडूनि कुळे दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागे स्वचिंतनी । पडली तैसी ॥1013॥

मराठी अर्थ

कुलस्त्री जशी दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धि ही द्वैतभावना सोडून आत्मचिंतनांतच रत होते.

English meaning

Just as by setting aside the importance of the maternal family as well as the husband's family- members, a faithful wife only follows obediently the orders of her husband, similarly the intellect of this man sets aside the dualities of pain and pleasure, and becomes merged into the meditation on the nature of Atman.

1014
मूळ

आणि ज्ञान ऐसे जिव्हार । नेवो नेवो निरंतर । इंद्रियी केले थोर । शब्दादिक जे ॥1014॥

मराठी अर्थ

ज्ञानासारखी जिव्हाळ्याची वस्तु निरंतर बाहेर विषयाकडे नेउन इंद्रियांनी शब्दादि विषयांची थोरवी वाढविली आहे;

English meaning

And the five sense objects which had been pampered by the organs in the desire to enjoy knowledge derived from them,

1015
मूळ

ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसे वृत्तिरोधे तया । पाचाही केले ॥1015॥

मराठी अर्थ

पण सूर्याचे किरण नाहीतसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला असता पांचहि विषय आपोआप नाही होतात.

English meaning

Become dissolved just as the mirage disappears, when the sun-rays are withdrawn, through the control of his sense organs.

1016
मूळ

नेणता अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसी वोकविली सवासना । इंद्रिये विषयी ॥1016॥

मराठी अर्थ

भ्रष्टाचे अन्न न कळत खाल्यास ते जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे ज्याने वासनांसह विषय इंद्रियाकडून ओकविले,

English meaning

Just as it is wise to vomit any food, which is taken ignorantly though it is prohibited, he makes the sense organs vomit the objects and the desire for them also.

1017
मूळ

मग प्रत्यगावृत्ती चोखटे । लाविली गंगेचेनि तटे । ऐसी प्रायश्चित्ते धुवटे । केली येणे ॥1017॥

मराठी अर्थ

मग प्रत्यगाभ्याकडे त्यांना लावून आमरूप गंगेच्या तीरावर त्यांच्याकडून उत्तम प्रायश्चित्ते करविली

English meaning

Then he brings back the sense organs to the shore of the Ganges of the withdrawing process, and purifies them by proper purificatory ritual.

1018
मूळ

पाठी सात्विके धीरे तेणे । शोधारली तिये करणे । मग मनेसी योगधारणे । मेळविली ॥1018॥

मराठी अर्थ

नंतर सात्विक धैर्याने ती सर्व इंद्रिये शुद्ध केली आणि मनाला योगाभ्यास करण्यास लावले.

English meaning

Then with the convincing strength of Sattwa quality, he further sanctifies these organs and makes them united with the mind by the practice of Yoga.

1019
मूळ

तेवीचि प्राचीने इष्टानिष्टे । भोगेंसी येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटे । द्वेषु न करी ॥1019॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही;

English meaning

If by chance he has to suffer the results of the actions done in the past life, he does not feel annoyed or angry, if there is any undesirable thing in it.

1020
मूळ

ना गोमटेचि विपाये । ते आणूनि पुढा सूये । तयालागी न होये । साभिलाषु ॥1020॥

मराठी अर्थ

अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाष धरीत नाही.

English meaning

And if any good things come along, bringing results of the past actions, he is not feeling excited by joy.

1021
मूळ

यापरी इष्टानिष्टी । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटी । निकुंजी वसे ॥1021॥

मराठी अर्थ

(विविक्तसेवी) – ह्याप्रमाणे अर्जुना, इष्टानिष्ट भोगां-विषयींचा रागद्वेष सोडून तो पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन अशा एकांतस्थानी वास करितो

English meaning

In this way, O the crowned one, this seeker gives up the attraction or disturbance, which is generally caused by good and unwanted things, and lives in a secluded place which is cool inside a cave of a mountain.

1022
मूळ

गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥1022॥

मराठी अर्थ

जेथे मुळीच गलबला नाही अशा निर्जन वनांत, केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो रहातो.

English meaning

He stays in a place away from the crowds of people, and the organs of his body are his only companions.

1023
मूळ

शमदमादिकी खेळे । न बोलणेचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळे । नेणे वेळु ॥1023॥

मराठी अर्थ

इंद्रियांचा शमदम करणे हीच त्याची क्रीडा; मौन धारण करून असणे हाच त्याचा वाग्व्यवहार; असे असून गुरुपदेश चितनांत वेळ कसा व केव्हा गेला हेही त्यास समजत नाही.

English meaning

His pass-time is playing with the experimenting of control over mind and body, his silence is his talk and he is not aware how much time has lapsed in this meditation upon the advice given by his Guru.

1024
मूळ

आणि आंगा बळ यावे । नातरी क्षुधा जावे । का जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥1024॥

मराठी अर्थ

(लघ्वाशी) शरीर बलिष्ठ व्हावे किंवा क्षुधा अल्पही राहू नये, किंवा जिभेचे लाड पुरवावे;

English meaning

He has nothing in his mind while taking his meals, as regards becoming stronger and well-built, or that he should satisfy his hunger or he should cater to the taste of his tongue. The joy which he derives from taking food in proper measure, is beyond description.

1025
मूळ

भोजन करितांविखी । यया तिहीते न लेखी । आहारी मिती संतोषी । माप न सूये ॥1025॥

मराठी अर्थ

ह्या तिन्ही गोष्टींकडे त्याचे लक्ष नसते; संतोष रहावा (समाधानभंग होऊ नये) हेच त्याचे आहाराचे प्रमाण; अमुक खावेच असे त्याचे माप नसते.

English meaning

He has nothing in his mind while taking his meals, as regards becoming stronger and well-built, or that he should satisfy his hunger or he should cater to the taste of his tongue. The joy which he derives from taking food in proper measure, is beyond description.

1026
मूळ

अशनाचेनि पावके । हारपता प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटके । अशन करी ॥1026॥

मराठी अर्थ

जठराग्नि शांत असला (क्षधा निवारण झाली) म्हणजे प्राणांचे रक्षण किंवा समाधान असते इतक्याच बेताने त्याचा आहार असतो.

English meaning

He takes that much food as will rejuvenate his emaciated strength.

1027
मूळ

आणि परपुरुषे कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसे ॥1027॥

मराठी अर्थ

(यतवाक्कायमानसः) आणि परपुरुषाने इच्छा दर्शविली असता कुलवधू जशी त्यास केव्हांही वश होत नाही, तसे ज्याचे आसन (बैठक) निद्रा व आलस्य यांच्या केव्हांही ताब्यात जात नाही.

English meaning

Just as a woman of good morals does not even turn her gaze towards another man who may be soliciting her, he does not give shelter to sleep and laziness in his life.

1028
मूळ

दंडवताचेनि प्रसंगे । भुयी हन अंग लागे । वाचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥1028॥

मराठी अर्थ

नमस्कार करण्याच्या प्रसंगींच (साष्टांग) ज्याचे शरीर भुईला लागते; एऱ्हवी वाटेल त्या प्रसंगी अविचाराने जो कधीही आडवा होत नाही.

English meaning

He has no thought to lie on the floor (lazily) except while prostrating before respectable persons or god.

1029
मूळ

देहनिर्वाहापुरते । राहाटवी हातांपायाते । किंबहुना आपैते । सबाह्य केले ॥1029॥

मराठी अर्थ

देहधारण अथवा निर्वाह ह्यांना आवश्यक इतकाच हातापायांचा करितो किंबहुना कमेंद्रिये, मन आदि सर्व त्याने स्वाधीन ठेविली आहेत.

English meaning

He allows his hands and feet to move only enough for performance of necessary bodily functions, and generally keeps his mind and body under his control.

1030
मूळ

आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखो नेदी वीरा । तेथ के वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥1030॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, ज्याच्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही (हद्दीपर्यंतही) येण्याची बोली नाही, (सोय) तेथे बोलणे चालणे वगैरे व्यापारांन अवकाश कोठचा असणार ?

English meaning

And O the brave one, he does not allow the inclinations of his mind even to touch the outer threshold of it, what of going beyond that limit? And where is the scope for expressing his thoughts in words?

1031
मूळ

ऐसेनि देह वाचा मानस । हे जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिले आकाश । ध्यानाचे तेणे ॥1031॥

मराठी अर्थ

(ध्यान) अशाप्रकारे शरीर, वाचा व मन ह्यांच्या बाह्य व्यापारांस जिंकून ज्याने ध्यान आपल्या स्वाधीन करून घेतले.

English meaning

Thus by conquering the areas of body, speech and mind which are outside his Atman, he grasps the inner space of meditation.

1032
मूळ

गुरुवाक्ये उठविला । बोधी निश्चयो आपुला । न्याहाळी हाती घेतला । आरिसा जैसा ॥1032॥

मराठी अर्थ

गुरुवाक्योपदेशाने झालेला आत्मनिश्चय, आरशांत मुख पहावे त्याप्रमाणे, त्यांच्याच बोधवाक्यरूप आरशांत पडताळून पहातो.

English meaning

He is always keeping the conviction about the self-knowledge which is aroused by the teaching given by his Guru, in front of his attentive mind, like a man holding mirror in fromt of his face to observe himself in it.

1033
मूळ

पै ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारी । ध्येयत्वे घे हे अवधारी । ध्यानरूढी गा ॥1033॥

मराठी अर्थ

ध्यान करणारा आपणच असूनही आपल्या ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयत्वाने आपल्याच पुढे घेतो, असा त्याच्या ध्यानाचा प्रकार असतो.

English meaning

O Arjuna, you should try to understand his state of mind, where, though he is the meditator, his meditation becomes concordant with his object of meditation.

1034
मूळ

तेथ ध्येय ध्यान ध्याता । यया तिही एकरूपता । होय तव पंडुसुता । कीजे ते गा ॥1034॥

मराठी अर्थ

ते ध्यान अर्जुना, ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या त्रिपुटीचा लय होऊन त्यांना एकरूपता येईतोपर्यंत ते करावे लागत.

English meaning

Thus his meditation continues till the meditator, the act of meditating and the object of meditation are amalgamated.

1035
मूळ

म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानी जाला दक्षु । परी पुढा सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥1035॥

मराठी अर्थ

(योगपरः) म्हणून (अशाप्रकारच्या ध्यानसिद्धीसाठीं) तो आत्मज्ञाना विषयी दक्ष असणारा मुमुक्षु योगाभ्यासाचा आश्रय करितो.

English meaning

Thus the seeker of liberation, the aspirant, becomes well-established in self-knowledge but he can achieve this through his giving importance to the study and practice of yoga.

1036
मूळ

अपानरंध्रद्वया । माझारी धनंजया । पार्ष्णी पिडूनिया । कांवरुमूळ ॥1036॥

मराठी अर्थ

अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य, टांचेने दाबून मूळबंध करितो.

English meaning

He achieves the Moolabandha posture by pressing the threadlike line between the anus and the testical sheath by his heel.

1037
मूळ

आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥1037॥

मराठी अर्थ

अधोभाग आकुंचन करून, व मूळबंधादि तिन्ही बंध देऊन, आणि प्राणापानादि निरनिराळे वायु एकत्र करून,

English meaning

He then constricts the anal muscle, achieves the Moolabandha at that place, Odhiyana bandha near navel and Jallandar-bandha near the region of throat and brings together various vital winds from the body.

1038
मूळ

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥1038॥

मराठी अर्थ

कुंडलिनी जागी करून, सुषुम्ना नाडीचा विकास करून, आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून ऊर्ध्व जातो

English meaning

He then awakens the serpent power Kundalini, opens up the mid-channel of Sushumna and penetrates all the Chakras from the Root Chakra to the chakra dedicated to Fire.

1039
मूळ

सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषे वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनिया ॥1039॥

मराठी अर्थ

मग ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलरूपी मेघांपासून अमृतवृष्टि होते, तो अमृतवर्षाव मूलाधारचक्रापर्यंत आणून,

English meaning

And then the cloud of nectar starts from the seventh Chakra, which is also called the Brahmarandhra; the flow of that nectar goes down to the Root-chakra and spreads there.

1040
मूळ

नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरी । मनपवनाची खीच पुरी । वाढूनिया ॥1040॥

मराठी अर्थ

आज्ञाचक्ररूपी पर्वतावर संचार करणाच्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रांत मन व प्राण ह्यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून.

English meaning

Then he serves the mixture of mind and vital breath into the bowl of Bhairava of spirit, who dances on the Kailasa peak of that seventh Chakra.

1041
मूळ

जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढा । ध्यान मागिलीकडा । स्वयंभ केले ॥1041॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे हा योगसाधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्यायोगे ध्यान निश्चित करितो.

English meaning

Thus he puts a large army of Yogic powers achieved by constant concentration in the front side and at the same time he strengthens the garrison of meditation on the back side.

1042
मूळ

आणि ध्यान योग दोन्ही । इये आत्मतत्वज्ञानी । पैठा होआवया निर्विघ्नी । आधीचि तेणे ॥1042॥

मराठी अर्थ

(वैराग्य) आणि ध्यान योग हे दोन्ही निविघ्नपणे आत्मतत्त्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या अगोदर,

English meaning

He has already made friendship with desirelessness in order to ensure the steadiness of meditation and Yoga in the knowledge of the Atman without any disturbance; and while traversing all these stages this friend is always accompanying him, giving him its full support.

1043
मूळ

वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवे चाले ॥1043॥

मराठी अर्थ

जो वैराग्यासारखा मित्र जोडून ठेविला असतो तो सर्व भूमिकांवर साधकाचा सांगाती असतो.

English meaning

He has already made friendship with desirelessness in order to ensure the steadiness of meditation and Yoga in the knowledge of the Atman without any disturbance; and while traversing all these stages this friend is always accompanying him, giving him its full support.

1044
मूळ

पहावे दिसे तंववरी । दिठीते न संडी दीप जरी । तरी के आहे अवसरी । देखावया ॥1044॥

मराठी अर्थ

पहावयाची असलेली वस्तु दिसेपर्यंत जर दिव्याचे सहाय्य असेल तर ती वस्तु प्राप्त होण्यास कितीसा अवकाश लागणार ?

English meaning

If the lamp is continuously in our hand whose light is available up to the farthest point where our vision can reach, what difficulty is there in seeing the absolute thing?

1045
मूळ

तैसे मोक्षी प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मी जाय लया । तव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥1045॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाच्या साधकाची वृत्ति ब्रह्मवस्तूमध्ये लय पावेपर्यंत तिला वैराग्याची जोड असेल, तर त्याच्या मोक्षप्राप्तीला प्रतिबंध कसला ?

English meaning

Similarly when the seeker attains the stage of a keen aspirant for liberation, his inner attitude turns back and merges into the absolute principle of Brahman, and if his desirelessness is actively maintained that far, how can the unity in Brahman be broken?

1046
मूळ

म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥1046॥

मराठी अर्थ

म्हणून, जो भाग्यवान् वैराग्यासह ज्ञानाभ्यासाला लागला, तो आत्मलाभाला योग्य होतो.

English meaning

Therefore, one who is fortunate enough to practise this yoga and at the same time has the quality of desirelessness saturated in his nature, he becomes eligible for self-realization.

1047
मूळ

ऐसी वैराग्याची आंगी । बाणूनिया वज्रांगी । राजयोगतुरंगी । आरूढला ॥1047॥

मराठी अर्थ

असे वैराग्याचे मजबूत कवच अंगावर घेऊन जो राजयोगरूपी अश्वावर आरोहण करितो.

English meaning

In other words, he dons the impenetrable armour of desirelessness and, jumps up on the horse of Rajayoga.

1048
मूळ

वरी आड पडिले दिठी । साने थोर निवटी । ते बळी विवेकमुष्टी । ध्यानाचे खांडे ॥1048॥

मराठी अर्थ

शिवाय, जे दृश्य दृष्टीस पडेल, त्यातील लहान, थोर असा भेद निवारण करण्यासाठी विवेकरूप मुष्टींत ध्यानरूप तीक्ष्ण खड्ग घेतो.

English meaning

And he holds tight in the fist of discrimination the strong sword of concentrated attention, which sword can snap and cut down any small or big impediment that happens to try to thwart his progress.

1049
मूळ

ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारी सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागी ॥1049॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, अंधकारांत जसा सूर्याने प्रवेश करावा, तसा मोक्षरूपी विजयश्रीला माळ घालण्यासाठी हा साधक संसाररूपी रणांगणात (निःशंक) प्रवेश करितो.

English meaning

In this way, in the darkness, he advances in the battle field of worldly-life like a brilliant Sun and finally the goddess of victory in the form of liberty and freedom, adores him by putting the garland around his neck.

1050
मूळ

तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजी पहिले । देहाहंकारु ॥1050॥

मराठी अर्थ

(अहंकार) तो अशा विश्वासाने चालला असता, त्याला अडविण्यासाठी जे दोषरूप शत्रू मध्ये आले, त्यांचा त्याने समाचार घेतला; त्यातील पहिला वैरी देहाहंकार हा होय.

English meaning

This brave seeker thrashes all the enemies who come in his way, the leader of whom is the pride of physical body.

1051
मूळ

जो न मोकली मारुनी । जीवो नेदी उपजवोनि । विचंबवी खोडा घालुनी । हाडांचिया ॥1051॥

मराठी अर्थ

जो अहंकार, मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगू ही देत नाही; तर, देहरूपी अस्थिपंजरांत जीवाला अडकवून त्याची कुचंबणा मात्र करितो.

English meaning

This enemy does not leave the man even after death and does not allow him to live comfortably while in life, but he puts the man in the cage of bones and makes him frustrated.

1052
मूळ

तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥1052॥

मराठी अर्थ

त्या अहंकाराचे वसतिस्थान जो देहरूप किल्ला तो हस्तगत करून घेतो, (देहबुद्धिबाधित करितो) व दुसरा वैरी जो (बल) त्याचाही नाश करतो.

English meaning

But body is his only castle which is conquered by this brave aspirant and he destroys his enemy totally. The second enemy is violent strength whom also this spiritual soldier kills.

1053
मूळ

जो विषयाचेनि नांवे । चौगुणेही वरी थांवे । जेणे मृतावस्था धावे । सर्वत्र जगा ॥1053॥

मराठी अर्थ

जो बलरूप शत्रु, विषयाचे नुसते नांव घेतांच चौपटीपेक्षां वाढतो, व ज्याच्या योगे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते.

English meaning

The peculiarity of this enemy is that as soon as there is mention of any object to be possessed and enjoyed, he flares up indignantly and then death advances to grasp all the world at his hands.

1054
मूळ

तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैचा ? ॥1054॥

मराठी अर्थ

तो बलरूपी शत्रु विषयरूपी विषांचा डोह असून सर्व दोषांचा राजा आहे, तरीही ध्यानरूपी तलवारीचा वार सहन करण्याचे त्याला सामर्थ्य कोठले असणार ?

English meaning

This enemy is as if a flood of the poison of objects. He enjoys empire over all the vices. But how can he face successfully the sword of serious meditation?

1055
मूळ

आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगी जो वाजे ॥1055॥

मराठी अर्थ

आणि (दर्प) आवडीच्या विषयाची प्राप्ति झाली म्हणजे त्याला जे सुख होते, त्या सुखाचीच खोळ अंगावर घेऊन जो बढाई मारू लागतो.

English meaning

Then there is another enemy, who dons the cloak of those objects which appear to be sweet and pleasurable and attacks suddenly.

1056
मूळ

जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवी । सूनि वाघा सांपडवी । नरकादिका ॥1056॥

मराठी अर्थ

ज्याने सन्मार्गाचे आकलन होऊ शकत नाही व जो अधर्माच्या अरण्यात नेऊन नरकरूपी व्याघ्रांच्या जबड्यात अचुक नेऊन घालतो,

English meaning

This enemy avoids the way of good deeds and by enticing the Jeevas, who are pilgrims of liberation, towards the deep forest of irreligious activities, directly throws them into the mouth of the tiger of hell.

1057
मूळ

तो विश्वासे मारिता रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥1057॥

मराठी अर्थ

असा विश्वास देऊन घात करणारा वैरी जो दर्प त्याचे निर्दालन केले; आणि (काम) ज्याचे नांव ऐकताच तपस्व्यांनाही भीतीने कंप सुटतो.

English meaning

This is called sullenness or abnormal arrogance, who plays a confidence trick and kills, but the aspirant slays this enemy also. Further there is another enemy of which even the greatest Yogis are afraid; which is "Lust".

1058
मूळ

क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तव अधिकु । रिता होय जो ॥1058॥

मराठी अर्थ

व ज्या कामाचे पर्यवसान अखेर क्रोधासारख्या महादोषांत होते व ज्याचा स्वभाव असा आहे की त्याची जो जो पूर्ती करावी तो तो त्याची तृष्णा वाढतच जाते.

English meaning

From this enemy, the great vice of anger is produced. The more it is propitiated by putting into its mouth what it wants, the more imaciated it appears.

1059
मूळ

तो कामु कोणेच ठायी । नसे ऐसे केले पाही । की तेचि क्रोधाही । सहजे आले ॥1059॥

मराठी अर्थ

अशा त्या कामाचे ज्याने समूळ निर्दालन केले आहे व ज्या कारणनाशामुळे त्याचे कार्य जो क्रोध त्याचीही सहज तीच गति झाली.

English meaning

This enemy who is "lust" or carnal passion is also destroyed by our brave soldier, because when it is destroyed, automatically the other enemy who is anger is also destroyed.

1060
मूळ

मुळाचे तोडणे जैसे । होय का शाखोद्देशे । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥1060॥

मराठी अर्थ

वृक्षाचं मूळ तोडण्यात शाखांनी मरावे हा हेतु असतो. तसा कामाच्या नाशाने त्याच्या शाखेसारखा असलेला क्रोधही नाश पावतो.

English meaning

Just as to cut the roots of a tree is tantamount to cutting the branches, so to destroy the passion is equal to destroying the anger.

1061
मूळ

म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥1061॥

मराठी अर्थ

म्हणून जेथे काम ह्या शत्रूचा नाश होऊन गेला, तेथे क्रोधाची येरझार सहजच बंद पडणार.

English meaning

Therefore, when the lust is arrested and imprisoned, automatically the mad dance of anger stops.

1062
मूळ

आणि समर्थु आपुला खोडा । शिसे वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥1062॥

मराठी अर्थ

(परिग्रह) आणि ज्याप्रमाणे खोड्याची शिक्षा ज्याला द्यावयाची असेल, त्याजकडूनच डोक्यावर तो खोडा अधिकारी निश्चयैकरून वाहवितात, त्याप्रमाणे जीवांना भोग देऊनच पुन्हा त्या भोगेच्छेच्या पायी त्यांना संकटांत टाकणारा असा परिग्रह हा गाढा शत्रु आहे.

English meaning

Then there is the craving for possessions. When once one accepts and promotes in his life this tendency, his tyranny goes on increasing, just as a great powerful man does not hesitate to put his burdens on the heads of others by force.

1063
मूळ

जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवे दांडी घेववी । ममत्वाची ॥1063॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हा परिग्रह आपले खोगीर जीवांच्या माथ्यावर ठेवून, त्याच्यात अनेक अवगुण उत्पन्न करितो व त्यांना हातात ममत्वाची काठी टेक्यासाठी घ्यावयास लावित.

English meaning

This vice overrides and takes possession of brain, attaches various vices to the character of the man, and makes him hold in his hand the staff of "myness" to support his actions.

1064
मूळ

शिष्यशास्त्रादिविलासे । मठादिमुद्रेचेनि मिसे । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणे ॥1064॥

मराठी अर्थ

हा शिष्य समुदाय माझा, हे ग्रंथ माझे, असा अभिनिवेशाचा खेळ खेळून, त्याचप्रमाणे, हा मठ माझा येथे योगाभ्यास होतो, वगैरे मिशानी हा परिग्रहशत्रु निःसंग अशा वैराग्यशील जीवांनाही फशी पाडतो.

English meaning

This craving for possessions has entangled many Sanyasis also by creating a parafernalia of various scriptures, disciples, monasteries, the signs and symbols of particular cults, etc.

1065
मूळ

घरी कुटुंबपणे सरे । तरी वनी वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरे । लागला आहे ॥1065॥

मराठी अर्थ

कुटुंबीयांच्या त्यागने तेथील परिग्रहादि व्यवहार संपला, तरी वनांत गेल्यावर वन्य पदार्था विषय ममत्व उत्पन्न करितो. अशाप्रकारेंत्याने अगद उघडचा नागड्या लोकांनाही सोडले नाही.

English meaning

In the home, he nags a man by becoming his family and in the forest, he accosts the seeker in the shape of a forester, and it does not spare even a naked body.

1066
मूळ

ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥1066॥

मराठी अर्थ

अस दुर्जय जो परिग्रह शत्रू त्याचा पार नायनाट करून ज्याने संसार अजूवर विजय मिळविण्याचा उत्साह चित्तांत धरिला आहे.

English meaning

This brave seeker conquers the unconquerable enemy of possessiveness and enjoys the sense of victory in the battle of worldly life.

1067
मूळ

तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशीचे आघवे । रावो जैसे आले ॥1067॥

मराठी अर्थ

अशा स्थितांत, त्याच्या भेटीला अमानित्वादि ज्ञानगुणांचे समुदाय हेच कोणी जणु मोक्षदेशाचे मांडलिक राजे त्याजपाशी येतात.

English meaning

Then "lack of self-pride" etc., who are the doyens of good qualities and monarchs of the kingdom of freedom, welcome him in their congregation.

1068
मूळ

तेव्हा सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनिया । राहत आंगे ॥1068॥

मराठी अर्थ

व त्या साधकाला यथार्थ ब्रह्मात्मैक्यज्ञान हेच एक सार्वभौमराज्य अर्पण करून अमानित्वादि गुण आपण स्वतः त्याचे सेवक होऊन रहातात.

English meaning

Then by endowing him with the kingdom of pure knowledge of truth, they remain as his servants.

1069
मूळ

प्रवृत्तीचिये राजबिदी । अवस्थाभेदप्रमदी । कीजत आहे प्रतिपदी । सुखाचे लोण ॥1069॥

मराठी अर्थ

तो साधक प्रवृत्तीच्या राजमार्गाने आक्रमण करीत असता, जाग्रदादि तीन अवस्थारूपी प्रमदा (तरुण स्त्रिया) त्याजवरून पदोपदी सुखाचे निबलोण उतरून टाकितात.

English meaning

When this soldier walks by the road of outward activities, the three stages, like women, namely the waking state, the dream state and the deep sleep, honour him on the way by waving before him some articles like salt, to ward off evil.

1070
मूळ

पुढा बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥1070॥

मराठी अर्थ

अशा त्या साधक सार्वभौमापुढे, विवेकरूप चोपदार हातातील बोधरूप दंडाने दृश्याची गर्दी मोडीत चालतो. (दृश्याचा बाध करितो) व योगभूमिका जणू त्यास आरती घेऊनच सामोऱ्या येतात.

English meaning

Discrimination uses the cane of the self-knowledge and banishes all illusory things and the states of trance etc. in yoga, come forward to wave before him the auspicious things.

1071
मूळ

तेथ ऋद्धिसिद्धींची अनेगे । वृंदे मिळती प्रसंगे । तिये पुष्पवर्षीं आंगे । नाहातसे तो ॥1071॥

मराठी अर्थ

त्याप्रसंगी, ऋद्धिसिद्धींचे अनेक समुदाय तेथे प्राप्त होतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीने तो जणू काही स्नानच करीत असतो.

English meaning

Then all the groups of occult powers come to shower flowers upon him, in which the seeker really bathes.

1072
मूळ

ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखे । स्वराज्य येता जवळिके । झळंबित आहे हरिखे । तिन्ही लोक ॥1072॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, ब्रम्हैक्यज्ञानासारखा स्वराज्यप्राप्तीच योग जवळ येत असता त्याचा हर्ष त्रिभुवनात मावत नाही.

English meaning

So, when the empire of unity with Brahman is very near him, he sees all the three worlds as full of great joy.

1073
मूळ

तेव्हा वैरिया का मैत्रिया । तयासि माझे म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥1073॥

मराठी अर्थ

तशा स्थितीत हा माझा शत्रु, हा माझा मित्र, किंवा दोघे सारखेच इतके म्हणण्यापुरतेही त्याच्यापुढे द्वैत उरत नाही.

English meaning

O Dhananjaya, as he is the only one without any duality, there is nobody else to whom he may call his friend or foe.

1074
मूळ

हे ना भलतेणे व्याजे । तो जयाते म्हणे माझे । ते नोडवेचि का दुजे । अद्वितीय जाला ॥1074॥

मराठी अर्थ

इतकेच नव्हे तर, कोणत्याही निमित्ताने त्याने ज्याला “माझे “ असे म्हणावे, एवढे देखील द्वैतपणाने (सत्यत्वाने) त्याच्यापुढे उरत नाही. कारण, तो अद्वितीय ब्रह्मरूपच झालेला असतो.

English meaning

Not only this, but even if by chance he calls somebody as "mine", that man does not appear to him as anybody separate from himself.

1075
मूळ

पै आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कही न लगती ममता । धाडिली तेणे ॥1075॥

मराठी अर्थ

त्याच्या सर्वात्मभावापुढे विश्वाला पृथक् अशी सत्ताच उरत नसल्याने ममत्वाला कोठे अवसरच नसतो; मग ममता उरणारच कशी ?

English meaning

O son of Pandu, since he comprehends the whole universe as one including himself the narrow sense of possessing any particular thing as his own, cannot get place in his mind. He has as if banished it totally.

1076
मूळ

ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हे जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥1076॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे शत्रुसमुदायाला (अहंकारादि) जिंकून, सर्वात्मभावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूप अश्वाची धाव सहजच थांबते

English meaning

When this horseman, the seeker, thus kills all his enemies and discards this illusory world, his horse naturally becomes steady. (His study of yoga comes to a steady stage)

1077
मूळ

वैराग्याचे गाढले । अंगी त्राण होते भले । तेही नावेक ढिले । तेव्हा करी ॥1077॥

मराठी अर्थ

(संसारशत्रूशी झुंजण्यासाठी) अंगांत जे वैराग्याचे मजबूत चिलखत घातलेले होते तेही (आत्म-बोधानंतर ) क्षणभर ढिले केले जातं. (अगर होते)

English meaning

Then he losens his armour of desirelessness to some extent.

1078
मूळ

आणि निवटी ध्यानाचे खांडे । ते दुजे नाहीचि पुढे । म्हणौनि हातु आसुडे । वृत्तीचाही ॥1078॥

मराठी अर्थ

आणि ज्या ध्यानखड्गाने द्वैत नाश करण्याचे योजिले होते, ते द्वैतच बोधोत्तर पुढे येत नसल्यामुळे त्या ध्यानाच्या वृत्तीलाही मांद्य येते.

English meaning

He sets aside the sword of meditation as there is nobody else in front of him and, therefore, he takes back the advancing hand of active fight.

1079
मूळ

जैसे रसौषध खरे । आपुले काज करोनि पुरे । आपणही नुरे । तैसे होतसे ॥1079॥

मराठी अर्थ

जसे खरे रसायन रोगबीज नष्ट करून आपणही शरीरत उरत नाही, तशी (साधनांची) स्थिति होते.

English meaning

This is like the medicine which cures the patient of his disease and it also becomes non- existent, being consumed by him.

1080
मूळ

देखोनि ठाकिता ठावो । धावता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्ये थावो । अभ्यासु सांडी ॥1080॥

मराठी अर्थ

मुक्कामाचे ठिकाण जवळ आलेले दिसतांच, जलद पडणारे जसे पाऊल मंदावते, त्याप्रमाणे ब्रह्मसामीप्यस्थितीची जाणीव होताच तत्प्राप्त्यर्थ चाललेले) सर्व अभ्यास ढिले पडतात

English meaning

Just as the runner's feet become slow and even stop walking when the place where he had wanted to reach is already reached, so he relaxes his study of yoga, as the unity with Brahman is achieved.

1081
मूळ

घडता महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । का कामिनी कांतापासी । स्थिर होय ॥1081॥

मराठी अर्थ

समुद्राची भेट झाल्यावर जसा गंगेचा प्रवाह थांबतो किंवा कांतसमागमांत कामिनी जशी अचल (शांत) होते.

English meaning

Just as the speed of a big river lessens when it reaches the sea and just as the sexy woman becomes calm when she meets her husband.

1082
मूळ

नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । का गावापुढे वळे । मार्गु जैसा ॥1082॥

मराठी अर्थ

केळ व्याली (फलवती झाली) म्हणजे तिची वाढ जशी खुंटते किवा गाव आला म्हणजे मार्ग जसा संपतो.

English meaning

Or the growth of a banana tree stops when it produces the bunch of the bananas, or a road merges into a town when it reaches it.

1083
मूळ

तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु । ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥1083॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, आत्मसाक्षात्कार होण्याचा समय जाणतांच, साधनरूप हत्यारे हळूच बाजूस सारतो.

English meaning

So, when this seeker gets the actual experience of self-realization; he slowly keeps down his instruments of penance.

1084
मूळ

म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तै उपाया । वोहटु पडे ॥1084॥

मराठी अर्थ

म्हणून, अर्जुना, त्याला ब्रह्मस्थिति बाणू लागण्याच्या वेळी, साधनांना ओहोटी लागते. (शिथिल, कमी होतात. )

English meaning

O Dhananjaya, when he attains his own unity with Brahman, his efforts towards that realization gradually become slow.

1085
मूळ

मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे का ॥1085॥

मराठी अर्थ

मग, वैराग्याची सांजवेळ, (मावळती दशा) ज्ञानाभ्यासाची वृद्धावस्था, (दृढपणा) योगफलाची परिपूर्णावस्था, अशी स्थिति,

English meaning

Then, the state which is the final ceremony of desirelessness, which is the end of study and learning or the ripeness of the fruit of yoga practice-

1086
मूळ

ते शांति पै गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तै ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥1086॥

मराठी अर्थ

जी शान्ति, ती हे अर्जुना, त्याचे ठिकाणी संपूर्णतया बाणते, व मग तो साधक ब्रह्मरूप होण्याच्या योग्यतेचा होतो.

English meaning

That state of peace, O the fortunate one, is saturated in him and thus he becomes entitled to be himself, the absolute Brahman.

1087
मूळ

पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुले उणेपण शशी । का सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥1087॥

मराठी अर्थ

तेव्हां, पौणिमेचा पूर्ण चंद्र व चतुर्दशीचा चंद्र ह्यांच्या कलांत जितका फरक असतो, अथवा सोळाकशी सोन्यापेक्षां पंधराकशी सोने जितक्या अंशाने कमी भावचे असते.

English meaning

Just as the Moon on the fourteenth night of the bright fortnight, is slightly less than the fullness of the fifteenth night, and just as gold of the quality of one less number is of lesser value that the pure gold,

1088
मूळ

सागरीही पाणी वेगे । संचरे ते रूप गंगे । येर निश्चळ जे उगे । ते समुद्रु जैसा ॥1088॥

मराठी अर्थ

गंगेने समुद्रात प्रवेश केल्यावर, तिचा वेग दृष्टीला अगर स्पर्शाला जेथवर जाणवतो तेथवर तिला गंगापण आहे; जेथे अस फरक जाणवत नाही तेथे ती समुद्र झाली असे समजावे.

English meaning

Or, just as only that much water which is just now mixed in the sea shows its movement to some extent, but other part of sea is very smooth and still,

1089
मूळ

ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेचि शांतीचेनि लवलाहे । होय तो गा ॥1089॥

मराठी अर्थ

याप्रमाणे ब्रह्मरूप झालेला व ब्रह्मरूप होण्याच्या स्थितीत असलेला ह्यात अंतर आहे; ते अंतर शांतीच्या योगे तो तोडतो.

English meaning

So is the slight difference between the absolute abstract Brahman and this man who has become one with the Brahman; but by the quality of this peace in him, he removes that difference also.

1090
मूळ

पै तेचि होणेनवीण । प्रतीती आले जे ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥1090॥

मराठी अर्थ

कारण, ब्रह्म व्हावयाचे नसते, तर, ब्रह्मरूपच आपण केव्हाही आहो व मुळचे होतो अशी जी प्रतीति, तीच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता असे तू समज.

English meaning

But, when a man does not so become totally merged into the Brahman, and only experiences that state of Brahman, is said to be having the eligibility of that unity.

1091
मूळ

ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता- । पदी बैसे ॥1091॥

मराठी अर्थ

अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता पावलेला पुरुष, आत्मबोधप्रसन्नतेच्या पदावर सहजच आरूढ होतो.

English meaning

O the son of Pandu, when he attains this eligibility to be one with Brahman, the peace which is the natural state in self-knowledge is well-established in him, nay, he is seated on that seat of peace.

1092
मूळ

जेणे निपजे रससोय । तो तापुही जै जाय । तै ते का होय । प्रसन्न जैसी ॥1092॥

मराठी अर्थ

ज्या अग्निसहाय्याने पाकसिद्ध होते, ती उष्णता मुरली म्हणजे ते अन्न जसे रुचीस व प्रसन्नतेस कारण होते.

English meaning

For example, the very heat which cooks the food, has to be cooled down in that food; and then only the food which is somewhat cool, is fit to be enjoyed.

1093
मूळ

नाना भरतिया लगबगा । शरत्काळी सांडिजे गंगा । का गीत रहाता उपांगा । वोहटु पडे ॥1093॥

मराठी अर्थ

किंवा शरद् ऋतूत, गंगेचा पावसाळयातील चढ उतार जसा थांबतो अथवा गायनसमाप्तीनंतर, तत्प्रीत्यर्थ आणलेल उपकरणे जशी आपोआप बाजूस रहातात

English meaning

Or having the flood of rainy season finished, the river becomes calm in the "Sharad" season; or when the singing is stopped, the accompaniments also stop;

1094
मूळ

तैसा आत्मबोधी उद्यमु । करिता होय जो श्रमु । तोही जेथे समु । होऊनि जाय ॥1094॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीकरिता केलेल्या साधनादि उद्योगाने जो श्रम होतो त्याचाही त्या प्रसन्नतेमुळे परिहार होतो.

English meaning

Similarly, all the efforts which were being taken in the penance for self-realization become quiet when realization takes place.

1095
मूळ

आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥1095॥

मराठी अर्थ

अशा स्थितीलाच आत्मबोधाची प्रसन्नता असे म्हणतात; व ती भोगण्याची असा जो योगी साधक, त्याचीच अर्जुना, योग्यता आहे.

English meaning

This state of peace is called the Glory of Self-realization, which is gained by that man, O the most intelligent Arjuna!

1096
मूळ

तेव्हा आत्मत्वे शोचावे । काही पावावया कामावे । हे सरले समभावे । भरिते तया ॥1096॥

मराठी अर्थ

ज्याची वृत्ति साम्यभावाने (विषमता-रहित) परिपूर्ण आहे, असा तो योगी, अमुक एक गोष्ट माझी होती म्हणून तिजबद्दल शोक करील अगर अमुक एक गोष्ट मला असावी असे इच्छील, ह्या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. (संपतात)

English meaning

Now, being the supreme all-pervading Brahman, this man has not to search anything which is lost, nor try to get something new which he has not got.

1097
मूळ

उदया येता गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवी ॥1097॥

मराठी अर्थ

सूर्योदय होताच, नाना नक्षत्रे आपापले तेज जसे टाकतात ( निस्तेज होतात).

English meaning

For example, as soon as the Sun rises, all the stars lose their light.

1098
मूळ

तेवी उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥1098॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अपरोक्ष आत्मानुभवाच्या उदयाबरोबर, त्याच्या दृष्टीने भूतांतील भेदभाव लयास जाऊन, त्याला सर्वत्र आत्मदर्शनच होत असते.

English meaning

Similarly, O Partha, being endowed with the self-realization, this man finds that everywhere he looks, the whole creation constituting duality starts dissolving, breaking down.

1099
मूळ

पाटियेवरील अक्षरे । जैसी पुसता येती करे । तैसी हारपती भेदांतरे । तयाचिये दृष्टी ॥1099॥

मराठी अर्थ

पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसली जातात, तसा, त्याच्या दृष्टीने वस्तूवस्तूंमधील भेदभाव नाहीसा होतो.

English meaning

Just as the letters written on the sand-board, can be wiped out merely by our palm, so, all the differences of all objects disappear before his gaze.

1100
मूळ

तैसेनि अन्यथा ज्ञाने । जिये घेपती जागरस्वप्ने । तिये दोन्ही केली लीने । अव्यक्तामाजी ॥1100॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने दाखविलेल्या ज्या जागर व स्वप्न ह्या अवस्था त्या त्यांचे कारण जे अव्यक्त (अज्ञान) त्यात प्रथम लीन होतात.

English meaning

Similarly all kinds of illusory perceptions and knowledge created in the dreams and waking states, become dissolved in the unmanifest oneness, which is basic ignorance.

1101
मूळ

मग तेही अव्यक्त । बोध वाढता झिजत । पुरला बोधी समस्त । बुडोनि जाय ॥1101॥

मराठी अर्थ

मग ते आज्ञानही जशी जशी बोधाची स्पष्टता व दृढत होईल तसे क्षीण होत जाऊन अखेर पूर्णबोधकाळी नाहीसे होते.

English meaning

Then this basic ignorance also decreases gradually with deeper under-standing of the Brahman.

1102
मूळ

जैसी भोजनाच्या व्यापारी । क्षुधा जिरत जाय अवधारी । मग तृप्तीच्या अवसरी । नाहीच होय ॥1102॥

मराठी अर्थ

भोजन करू लागले असता, प्रत्येक ग्रासाबरोबर क्षुधा जशी हरत जाते व अखेर तृप्ति झाल्यावर नाहीशीच होते

English meaning

For example, with every morsel, hunger goes on decreasing and when the dinner is completed, it is totally satisfied.

1103
मूळ

नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायी बुडी । देऊनि निमे ॥1103॥

मराठी अर्थ

किंवा, आपण जितकी मजल चालावी तितकी वाट कमी कमी होऊन अखेर प्राप्तस्थानावर जशी मुळीच खुंटते.

English meaning

Or with every step towards the goal, the length of the road diminishes and when the goal is reached, the purpose of the road and the walking also comes to an end.

1104
मूळ

का जागृति जव जव उद्दीपे । तव तव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपे । नाहीच होय ॥1104॥

मराठी अर्थ

किंवा जसा जसा जागा होत जाईल, तसे तसे निद्रेचे आवरण कमी होते व पूर्ण जागृति आल्यावर ती निद्रा मुळीच जाते.

English meaning

Or when a man is about to wake up, the sleep becomes lighter and lighter and when he is fully awake sleep completely ends.

1105
मूळ

हे ना आपुले पूर्णत्व भेटे । जेथ चंद्रासी वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥1105॥

मराठी अर्थ

हे दृष्टांत राहूद्या; पौणिमेला चंद्र पूर्णकलायुक्त झाला म्हणजे त्याची वाढ संपते व तेथे शुक्लपक्षही जसा निःशेष संपतो.

English meaning

When it is full-moon night, the increase in the size of the face of the Moon stops and the bright fortnight also comes to an end.

1106
मूळ

तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधे ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥1106॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, सकलदश्याचा (सकलदृश्याचा) ग्रास करणारे ज्ञान, पुढील अज्ञानकार्यं दृश्य नाहीसे झाल्यामुळे जेव्हा, ज्ञानस्वरूप जो मी, त्या मजशी ऐक्य पावत तेव्हा अबोध किंवा अज्ञान समूळ नाहीसे होते.

English meaning

Similarly, when, absorbing all objects of knowledge, the knower with his role of knowing is merged into me, then there is complete dissolution of ignorance.

1107
मूळ

तेव्हा कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचे पेंडवळे । मोडूनि भरले जळे । आब्रह्म जैसे ॥1107॥

मराठी अर्थ

कल्पांतकाळच्या जलमय स्थितींत, समुद्र, नदी, नाले वगैरे भेद जसा समूळ नाहीसा होऊन आब्रह्मस्तंबपर्यंत जसे जल मात्र असते.

English meaning

For example, there are no separate waters of lakes, ponds or rivers when everything is inundated by deluge at the time of final dissolution.

1108
मूळ

नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । का जळोनि काष्ठे काष्ठ । वन्हीचि होय ॥1108॥

मराठी अर्थ

किंवा घटमठादि उपाधींच नाश झाल्यावर जसे आकाश एकरूपच असते, अथवा काष्ठे जाळून टाकून अग्नि जसा स्वस्वरूपात लीन होतो.

English meaning

Or, when all the forms like the pots, the houses etc. are dissolved and only one undivided all- pervading sky remains or when woods burn, everything is fire only.

1109
मूळ

नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदे जैसे । सांडिजे सोने ॥1109॥

मराठी अर्थ

किंवा अलंकार मुशीत आटल्यावर त्यांचे नामरूपादि भेद सोन्याला सोडून जातात (व आपण सुवर्णरूपाने उरतात. )

English meaning

Or when in the urn of a goldsmith, ornaments are melted the names and forms of the ornaments are not applicable to the gold.

1110
मूळ

हेही असो चेइलया । ते स्वप्न नाही जालया । मग आपणचि आपणया । उरिजे जैसे ॥1110॥

मराठी अर्थ

हेही असो. मनुष्य जागा होऊन पडलेले स्वप्न नाहीसे झाल्यावर जसा केवळ आपण एकटाच असतो.

English meaning

Or to take another example, when we are awake and the dream is gone, we alone remain as we are.

1111
मूळ

तैसी मी एकवाचूनि काही । तया तयाहीसकट नाही । हे चौथी भक्ति पाही । माझी तो लाहे ॥1111॥

मराठी अर्थ

याप्रमाणे तू व मी विवर्जित असा जो मी शुद्ध परमात्मा त्यावाचून, आपणासकट अन्यत् काहीही नाही अशी शास्त्रकारानी वर्णिलेली चौथी भक्ति (सर्वं खल्विदं ब्रह्म) त्याला प्राप्त होते.

English meaning

Similarly he is not aware of anything other than myself nor is he aware of himself also and thus the 'fourth type' of devotion takes place in his case.

1112
मूळ

येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथी । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥1112॥

मराठी अर्थ

एऱ्हवी ह्या परमात्मैक्यज्ञानाला आम्ही ‘चौथी भक्ति ‘ असे जे औपचारिकरीत्या म्हटले आहे, ते आर्त, जिज्ञासु व द्रव्यादि प्राप्त्यर्थं जगात चालू असलेल्या तीन भक्तींच्या अपेक्षेनेच होय.

English meaning

The other three kinds of devotion of an unhappy sufferer, or an intelligent enquirer or one who seeks fulfilment of his life-purpose in the world, are lesser than this devotion and, therefore, I call it the fourth type of devotion.

1113
मूळ

येऱ्हवी तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पै माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥1113॥

मराठी अर्थ

वस्तुतः ह्या स्थितीला (भक्तीला) तिसरी, चौथी, पहिली किवा अखेरची असा क्रम लावणे शक्य नसून माझी जी सहजस्वरूपस्थिति तिलाच भक्ति असा आम्ही उपचार केला आहे.

English meaning

Really this is not the third, fourth, first or the last or final devotion, but it is my own most natural state.

1114
मूळ

जे नेणणे माझे प्रकाशूनि । अन्यथात्वे माते दाऊनि । सर्वही सर्वी भजौनि । बुझावीतसे जे ॥1114॥

मराठी अर्थ

प्रथम मजविषयक अज्ञानालाही जे प्रकाशित करून नंतर माझे अयथार्थ (विपरीत) दर्शन करवून, आपापल्या कल्पनेप्रमाणे सर्वाकडून माझी भक्ति करवून जे सर्वाची समजूत पाडते.

English meaning

That state is the light by which ignorance about my real nature is seen by the devotees and it is also the light which provokes everybody to devotion towards various apparent manifestations of mine only, by showing the separateness when actually I am one;

1115
मूळ

जो जेथ जैसे पाहो बैसे । तया तेथ तैसेचि असे । हे उजियेडे का दिसे । अखंडे जेणे ॥1115॥

मराठी अर्थ

मग मत्स्वरूपविषयक अज्ञानकाली जो पुरूष मला जेथे जसा पाहील, तसा (त्याच्या कल्पनेप्रमाणे) मी तेथे अनिर्वचनीय स्वरूपाने असतो; (दिसतो) पण ह्या सर्व व्यवहाराला मूल आधार माझे जे अखंड रूप तेच होय.

English meaning

It is the light by which everybody becomes attached to the deity or the image or the ideals about which he is experiencing faith.

1116
मूळ

स्वप्नाचे दिसणे न दिसणे । जैसे आपलेनि असलेपणे । विश्वाचे आहे नाही जेणे । प्रकाशे तैसे ॥1116॥

मराठी अर्थ

स्वप्न दिसो अगर न दिसो; ते पडले अगर पडले नाही असे म्हणण्याच्या दोन्ही व्यवहारांना जसे आपले अस्तित्व अबाधित मानावे लागते, तसा विश्वाचा उदय व अस्त हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात.

English meaning

It is the light by which there is the experiencing of the existence or the non-existence of the world, just as our pure being on which the experiencing of the dream state or the waking state takes place.

1117
मूळ

ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥1117॥

मराठी अर्थ

अर्जुना, असा जो माझा सहजस्वरूप प्रकाश तो बाणणे ही खरी भक्ति होय.

English meaning

O the warrior with a flag marked by the sign of Hanuman, know that this natural light of my existence is called devotion.

1118
मूळ

म्हणौनि आर्ताच्या ठायी । हे आर्ति होऊनि पाही । अपेक्षणीय जे काही । ते मीचि केला ॥1118॥

मराठी अर्थ

म्हणून आर्त भक्तांच्या उत्कटभक्तीचा जो इच्छित विषय तोही मीच असतो अथवा बनतों.

English meaning

Therefore, this very devotion takes the form of suffering in the case of my devotee who is a sufferer, and it provokes him to experience me only in the form of relief which he desires to get through my devotion, prayers, etc.

1119
मूळ

जिज्ञासुपुढा वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी का जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥1119॥

मराठी अर्थ

त्याच प्रमाणे अर्जुन, जिज्ञासूची भक्ति जिज्ञासारूपाने मलाच जिज्ञास्य (जाणण्याचा विषय) करिते.

English meaning

O the Great warrior, in the case of the devotee, this light, this devotion takes the form of his eagerness to know and also becomes the object of knowledge in another form of mine.

1120
मूळ

हेचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थी अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी माते ॥1120॥

मराठी अर्थ

द्रव्यार्थी जनांची भक्तीही मलाच प्राप्तव्यविषय करून मजविषयींचीच याचना करिते.

English meaning

In the case of a devotee who desires to fulfil his life by some goal, this devotion takes the form of prayers or penance, and it also shows him my own form as his desired attainment, thus his desire and object of desire are both my own manifestations. This devotion makes it possible.

1121
मूळ

एवं घेऊनि अज्ञानाते । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयाते । दृश्य करूनि ॥1121॥

मराठी अर्थ

याप्रमाणे अज्ञानावस्थीत केली जाणारी जी ही माझी भक्ति, ती दृङ्मात्र (ज्ञानस्वरूप) जो मी, त्या मला ज्ञेयत्वाला आणिते.

English meaning

This very devotion thus has the basis of the ignorance of the devotee, functions on that assumption only, but shows the observer myself as the object to be observed.

1122
मूळ

येथे मुखचि दिसे मुखे । या बोला काही न चुके । तरी दुजेपण हे लटिके । आरिसा करी ॥1122॥

मराठी अर्थ

मुखालाच मुखाचे दर्शन होते असे म्हणण्यात काहीही चूक नाही; पण (ही अशक्य गोष्ट) आरशाने मुखावर आणिलेल्या लटक्या दुजेपणामुळे संभवते.

English meaning

In this devotion what happens is that face is looking at face only but the duality of reflection is caused by the mirror.

1123
मूळ

दिठी चंद्रचि घे साचे । परी येतुले हे तिमिराचे । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥1123॥

मराठी अर्थ

चंद्र हाच दृष्टीचा खरा विषय असतो, पण तो एक असता दोन आहेत असे जे वाटते तो तिच्यातील ‘ तिमिर ” दोषाचा प्रभाव होय.

English meaning

To see the Moon as only one planet is normal for our eyesight but if two Moons are seen instead of one, then it is our defective vision that is responsible.

1124
मूळ

तैसा सर्वत्र मीचि मिया । घेपतसे भक्ति इया । परी दृश्यत्व हे वाया । अज्ञानवशे ॥1124॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ह्या तिन्ही भक्तिद्वारा (वस्तुतः) मीच माझी प्राप्ति करून घेत असतों; परंतु, अज्ञान उपाधीमुळे मजवर लटका प्राप्यप्रापकभाव आला आहे.

English meaning

Similarly devotees of all these categories worship me only, but the visible image which they project on my true abstract nature is their ignorance only.

1125
मूळ

ते अज्ञान आता फिटले । माझे दृष्टृत्व मज भेटले । निजबिंबी एकवटले । प्रतिबिंब जैसे ॥1125॥

मराठी अर्थ

अर्जुना, चौथा भक्त (माझा आत्मा) जो तू, त्या तुझ्या दर्शनाने, सर्व अज्ञानाची वार्ता संपून, प्रतिबिंबाने आपल्या बिंबापाशी जसे ऐक्य पावावे (अथवा एकरूपते असावे) त्याप्रमाणे, माझे द्रष्टस्वरूप मला आज भेटले

English meaning

Now as the ignorance is gone, myself remains the observer, just as the reflection merges in the original object.

1126
मूळ

पै जेव्हाही असे किडाळ । तेव्हांही सोनेचि अढळ । परी ते कीड गेलिया केवळ । उरे जैसे ॥1126॥

मराठी अर्थ

मिश्रित सोने देखील केव्हांही स्वरूपतः सोनेपणात कमी नसतेच, पण त्यातील कीट गेले म्हणजे जसे त्याचे शुद्ध स्वरूपदर्शन होते.

English meaning

When gold is mixed with any lesser metal, that gold in itself is pure only, and when it is heated, the lesser metal is burnt and the gold in its purity remains.

1127
मूळ

हा गा पूर्णिमे आधी कायी । चंद्रु सावयवु नाही ? । परी तिये दिवशी भेटे पाही । पूर्णता तया ॥1127॥

मराठी अर्थ

अरे, पौणिमेच्यापूर्वी कोणत्याही तिथीस चंद्र काय संपूर्ण नसतो ? परंतु त्याच्या पूर्णत्वचा व्यवहार मात्र पौणिमेच्याच दिवशी होतो.

English meaning

For example, is not Moon full with her phases though not visible, on other nights? But she appears in her fullness on the full-moon night only.

1128
मूळ

तैसा मीचि ज्ञानद्वारे । दिसे परी हस्तांतरे । मग दृष्टृत्व ते सरे । मियाचि मी लाभे ॥1128॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अंतःकरणाला होणारे सर्व दर्शन हे माझेच दर्शन होय; पण ते अप्रत्यक्ष किंवा परोक्ष होय, खरे नव्हे; पण जेव्हा माझी मला यथार्थदर्शन होते, त्यावेळी द्रष्टा दृश्यत्वादि सर्व व्यवहार लोपतो.

English meaning

Similarly by the way of knowledge it is I who am experienced, but I am seen from various angles in various images and when I am thus realized, 'Me' as the observer disappears totally.

1129
मूळ

म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥1129॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, हा जो माझा चौथा ज्ञानरूप भक्तियोग, तो कोणत्याही दृष्टीच्या टप्यात न येणारा (पलीकडील) आहे असे आम्ही सांगितले.

English meaning

Therefore, I have said that the devotion of the fourth category is beyond the visible, O Partha!

1130
मूळ

या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हे तुज । श्रुतही आहे ॥1130॥

मराठी अर्थ

ह्या सहज ज्ञानभक्तीने माझा भक्त मजपाशी ऐक्य पावतो-नव्हे-तो केवळ मद्रूपच होतो. हे तूही ऐकिले आहेसच.

English meaning

You have already heard that the devotee who thus merges into me, is then myself only and not separate.

1131
मूळ

जे उभऊनिया भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलो कपिध्वजा । सप्तमाध्यायी ॥1131॥

मराठी अर्थ

कारण, अर्जुना, (सातव्या अध्यायात) + “ ज्ञानी हा माझा आत्माच होय ” असे आम्ही बाहु उभारून प्रतिपादिले आहे.

English meaning

Because, O the warrior with a flag with the sign of Hanuman, I have in my earlier talk loudly and emphatically declared to you that the man of knowledge is my Atman only. (7th chapter)

1132
मूळ

ते कल्पादी भक्ति मिया । श्रीभागवतमिषे ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥1132॥

मराठी अर्थ

म्हणूनच, त्या उत्तम भक्तीचा कल्पारंभीं मी भागवतरूपाने ब्रह्मदेवास उपदेश केला.

English meaning

O Dhananjaya it is this same devotion which I taught to the God Brahma, at the beginning of the Kalpa - the greater cycle of Ages.

1133
मूळ

ज्ञानी इयेते स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥1133॥

मराठी अर्थ

हिलाच ज्ञानी ” स्वसंविति ” असे म्हणतात, तर शैव “ शक्ति ” असे म्हणतात; व आम्ही ही आमची ‘ परमभक्ति ” होय असे म्हणतो.

English meaning

The men of knowledge call it Samvitti, the Right understanding, the Shaivas call it SHAKTI the divine power, and we call it our Supreme Devotion."

1134
मूळ

हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगिया फळे । मग समस्तही निखिळे । मियाचि भरे ॥1134॥

मराठी अर्थ

त्या क्रमयोग्यांना, माझ्याशी ऐक्य पावते वेळी, ही भक्ति फलद्रूप होते व मग सर्व जग मद्रूपच आहे असे त्यांच्या प्रत्ययास येते.

English meaning

This is the same devotion the fruit of which is gained by the Karmayogis (followers of the path of action) and they experience that the whole universe is permeated by me only.

1135
मूळ

तेथ वैराग्य विवेकेसी । आटे बंध मोक्षेसी । वृत्ती तिये आवृत्तीसी । बुडोनि जाय ॥1135॥

मराठी अर्थ

अशा स्थितीत वैराग्य विवेकासह व बंध हा मोक्षाच्या कल्पनेसह नाहीसा होतो; आणि वृत्ति ब्रह्माचिंतनादि अभ्यासासह लोप पावते.

English meaning

In such state both the discrimination and austerity, liberation and bondage, withdrawal and outgoing attitude, all disappear.

1136
मूळ

घेऊनि ऐलपणाते । परत्व हारपे जेथे । गिळूनि चाऱ्ही भूते । आकाश जैसे ॥1136॥

मराठी अर्थ

पण आकाशस्वरूपात जसे एकही भूत नाही अथवा यातील एकाहो भूताशी त्याचा जसा संबंध नाही, त्या-प्रमाणे श्रेष्ठ (परत्व), कनिष्ठ (ऐलपण) भावांचा संबंध जेथे पोंचू शकत नाही, म्हणजे हारपतो.

English meaning

As everything is on this shore, there is nothing remaining on the other shore. Just as only sky would remain after the earth, the water, the fire and the air are all annihilated,

1137
मूळ

तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । ते मी होऊनि एकवद । भोगितो माते ॥1137॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अलीकडील अगर पलीकडील साधनांनी प्राप्त न होणारे असे जे माझे शुद्ध साध्यस्वरूप, हे आपण होऊन, हा चौथ्या भक्तीचा अधिकारी माझा भोग घेतो. (मद्रूप असतो)

English meaning

Similarly, I remain as the pure pristinely clear existence beyond the goal and the means to reach that goal, and enjoy my own Atman as the eternal bliss.

1138
मूळ

घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥1138॥

मराठी अर्थ

समुद्राला मिळेपर्यंत गंगापणाने असणारी गंगा, जशी समुद्राला मिळाल्यावर भिन्न न राहता प्रकारचा सागरपणा भोगते, तशाच प्रकारचा त्याचा हा भोग होय असे समज.

English meaning

Please understand this. This bliss in the nature of Atman is like the shining waters of Ganges which go and mingle with the sea but shine with rare brilliance, more than the quiet seawater.

1139
मूळ

का आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥1139॥

मराठी अर्थ

किंवा एका आरशासमोर दुसरा आरसा स्वच्छ करून ठेविला, तर, त्याने दृश्याःपेक्षां द्रष्टेपणाच्याच भोगांत भर पडल्यासारखे होते. (कारण दोघेही प्रतिबिंबग्राहक द्रष्टेच आहेत ) (तसा नित्यात्मदर्शी दोन व्यक्तींच्या भेटीचा भोग समजावा)

English meaning

If one mirror is kept facing another mirror apposite to it, the reflections in both the mirrors are beautifully mixed with each other. Similarly one who was the observer so far, now becomes united with me, and can enjoy his bliss in that aloneness of Atomic stage.

1140
मूळ

हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेपण एकलेया । आस्वादिजे जेवी ॥1140॥

मराठी अर्थ

हा दृष्टान्त असो; समोरील आरस नेल्याने त्यातील मुखप्रतिबिंबही जरी गेले, तरी, त्याच्या द्वारे झालेल्या आपल्याच मुखाच्या दर्शनाचा भोग जसा एक आपल्याच ठिकाणी भोगीत असतो.

English meaning

Then, as the mirror in front of a man is removed and as the reflection of that man in that mirror is also invisible, the man remains as himself, without his activity as the observer, in his own aloneness;

1141
मूळ

चेइलिया स्वप्न नाशे । आपले ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसे । भोगिजे का ॥1141॥

मराठी अर्थ

जागे झाल्यावर स्वप्नातील द्वैतव्यवहार नाहीसा होऊन आपल्या एकपणाचा भोग जसा द्वैतप्रतीतीवाचून आपणच भोगतो.

English meaning

Or when a dream is ended with the ending of sleep and the man who is awakened, remains himself alone, without any other to be his companion. (This bliss in the Atman is of that nature)

1142
मूळ

तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिही बोले केवी बोलाचा । उच्चारु कीजे ॥1142॥

मराठी अर्थ

भोक्ताच जर भोग्य झाला तर भोग कसा घडणार, अशी ज्यांना शंका असेल त्यांना आम्ही असे विचारतो की, तुम्ही ” शब्द ” ह्या शब्दाचा शब्दानेच कसा बोध अगर उच्चार करितां ?

English meaning

If some say that when one thing only remains and there is no other, how can there be experiencing, in the absence of two things, we ask them- "How is word uttered by word itself?"

1143
मूळ

तयाच्या नेणो गावी । रवी प्रकाशी हन दिवी । की व्योमालागी मांडवी । उभिली तिही ॥1143॥

मराठी अर्थ

त्यांच्या गावी सूर्योदय झाल्याचे दिव्याच्या सहाय्याने ठरवितात की काय न कळे; अथवा आकाश कोसळू नये म्हणून ते कदाचित् मांडवही घालीत असतील.

English meaning

Is the Sun required to be seen by lighting a lamp? Or is the sky required to be supported by bullies?

1144
मूळ

हा गा राजन्यत्व नव्हता आंगी । रावो रायपण काय भोगी ? । का आंधारु हन आलिंगी । दिनकराते ? ॥1144॥

मराठी अर्थ

अहो, ज्याला राजेपणाचे कधी स्वप्नही पडत नाही, त्याला राजेपणाच्या भोगाची काय कल्पना येणार ? अंधकाराला कधी सूर्यदर्शन घडत असते का ?

English meaning

Can anybody enjoy kingship without becoming a king? Does darkness ever embrace the Sun in a tight hold?

1145
मूळ

आणि आकाश जे नव्हे । तया आकाश काय जाणवे ? । रत्नाच्या रूपी मिरवे । गुंजांचे लेणे ? ॥1145॥

मराठी अर्थ

आकाश नसलेला पदार्थ आकाशाची सर्वव्यापकता कशी जाणणार ? गुंजांच्या दागिन्यांना कधी रत्नांच्या दागिन्यांची सर येईल काय ?

English meaning

How can a thing which is not the sky, enjoy being the sky? Can an ornament made up of wild red-black berry seeds, show off as an ornament of rubies?

1146
मूळ

म्हणौनि मी होणे नाही । तया मीचि आहे केही । मग भजेल हे कायी । बोलो कीर ॥1146॥

मराठी अर्थ

म्हणून मद्रूप नसणाराला जर माझाच ठावठिकाणा नसतो, तर तो माझे भजन करील ही भाषाच कशी बोलता यावी ?

English meaning

Similarly for that which cannot be formed as the I, a separate entity, where is the existence of the I? There is no question of his experiencing that I.

1147
मूळ

यालागी तो क्रमयोगी । मी जालाचि माते भोगी । तारुण्य का तरुणांगी । जियापरी ॥1147॥

मराठी अर्थ

अरे ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या आंगच्या तारुण्याचा तिलाच भोग घडत असतो, तसा, ह्या क्रमयोग्याला मद्रूप होऊनच माझा भोग घडत असतो.

English meaning

Therefore, we say that the said man of the Yoga of action enjoys me by being me only. It is like a young man enjoying his youth.

1148
मूळ

तरंग सर्वांगी तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबी । नाना अवकाश नभी । लुंठतु जैसा ॥1148॥

मराठी अर्थ

(औपाधिक भेदांतील भोग असा असतो) तरंगाला जशी सर्वागानं अगर सर्व पाण्यांची भेट असते, प्रभा सर्वत्र बिंबरूपानेच मिरवत असते, अथवा आकाशाने लोळण घेणे झाल्यास आकाशांतच जसे ते घेतले पाहिजे.

English meaning

For example, a wave is kissing the water by its whole existence, or light is indivisible, amalgamated in the Sun or the sky-ness is full everywhere in the sky.

1149
मूळ

तैसा रूप होऊनि माझे । माते क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजे । सोनयाते जेवी ॥1149॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे तो मद्रुप होऊन कोणतीही क्रिया न करिता, त्याला माझ भजन घडतें; अरे, अलंकार ही जसा नित्यच सुवर्णाचे भजन करीत असतो म्हणजे त्याच्याशी अनन्य असतो.

English meaning

Similarly, just as a gold ornament enjoys by its whole body, being gold only, the man of the Yoga of action realizes my true nature and himself enjoys Me; without doing anything for it.

1150
मूळ

का चंदनाची द्रुती जैसी । चंदनी भजे अपैसी । का अकृत्रिम शशी । चंद्रिका ते ॥1150॥

मराठी अर्थ

किवा चंदनाच्या सुगंधाला जसे आपोआप चंदनाचे भजन घडत असते, किंवा चंद्रप्रभा सहजच चंद्ररूप असते.

English meaning

For example, the fragrance of sandalwood is impregnated in the sandalwood, or the moonlight without doing anything, is fully one with the Moon.

1151
मूळ

तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचिजोगे नव्हे । बोलाऐसे ॥1151॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, अद्वैतबोधांत क्रियेला काडीचा अवसर नसला तरी, भक्ति संभवते; पण बोलून दाखविता येण्यासारखी हि गोष्ट नाही, ती स्वतःच्या अनुभवानेच पटणारी आहे

English meaning

Similarly though action of any sort has no scope in the state of non-duality, there is place there for devotion. This is to be felt, to be realized by self-experience only. This cannot be described by words.

1152
मूळ

तेव्हा पूर्वसंस्कार छंदे । जे काही तो अनुवादे । तेणे आळविलेनि वो दे । बोलता मीचि ॥1152॥

मराठी अर्थ

अशा पुरुषाच्या शारीरक्रिया पूर्वसंस्कारानुरूप सुरू असता त्या भरात ज्या नांवाने मला हाक मारील ती माझीच भक्ति होय असे समजून मो त्याच्या हाकेला उभा रहातो; पण बोलणार तोही मजवाचून अन्य कोणी नसतो.

English meaning

When such a devotee talks anything because of the past habits of reactions to the environments, that talk is itself my prayers, and the response which I give is also myself.

1153
मूळ

बोलतया बोलताचि भेटे । तेथे बोलिले हे न घटे । ते मौन तव गोमटे । स्तवन माझे ॥1153॥

मराठी अर्थ

बोलणारा आपणच; व ज्याच्यापाशी बोलला तोही आपणच; ह्या व्यवहाराला ‘बोलणे झालें ” असे म्हणता येत नाही; अशा प्रकारचे जे मौन हे माझे उत्तम स्तवन होय (अद्वैती भक्ति आहे).

English meaning

When the speaker is none else than himself, any talk is not possible and my best devotion is his silence only.

1154
मूळ

म्हणौनि तया बोलता । बोली बोलता मी भेटता । मौन होय तेणे तत्वता । स्तवितो माते ॥1154॥

मराठी अर्थ

म्हणून तो बोलणारा व त्याच्या बोलांत त्याला बोलविणारा जो मी तोच त्याला भेटणारा, अशा स्थितीला तत्त्वदृष्टया मौनस्थितीच म्हणतात; त्या तात्त्विक मौनाने तो माझे स्तवन करितो

English meaning

In such condition when he talks, it is I who am talking and the fruit of his silence is what he offers as the praise to me.

1155
मूळ

तैसेचि बुद्धी का दिठी । जे तो देखो जाय किरीटी । ते देखणे दृश्य लोटी । देखतेचि दावी ॥1155॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे अर्जुन, त्याची बुद्धि अगर दृष्टि ज्या ज्या दृश्याकडे जाईल, त्या त्या ठिकाणचा दृश्यत्वधर्म नाहीसा होऊन त्या रूपाने द्रष्टा जो आपण, त्याचेच दर्शन त्याला घडतं. (इतका त्याचा सर्वात्मभाव दृढ असतो. )

English meaning

O the crowned one, when he sees anything by his physical eyes or by intellectual perception, the object before him disappears and he sees himself only.

1156
मूळ

आरिसया आधी जैसे । देखतेचि मुख दिसे । तयाचे देखणे तैसे । मेळवी द्रष्टे ॥1156॥

मराठी अर्थ

आरसा पुढे येण्यापूर्वी मुख दृष्टिरूपच असते, पण तेथवर त्याला द्रष्टेपणा नसतो; तो द्रष्टेपणा, आरसा ह्या उपाधीने आला म्हणजे त्याचेच त्याला जसे पुन्हा दर्शन होते, त्याप्रमाणे, दृश्याच्या मिषाने (वरील ओवीतील) द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन होते.

English meaning

Just as a man sees his own reflection in the mirror and then focusses his attention to the mirror, so the faculty of seeing shows the devotee his own self everywhere.

1157
मूळ

दृश्य जाउनिया द्रष्टे । द्रष्टयासीचि जै भेटे । तै एकलेपणे न घटे । द्रष्टेपणही ॥1157॥

मराठी अर्थ

दृश्यावरील दृश्यत्व कल्पनेचा निरास होऊन जेव्हा तद्वारा द्रष्टाच द्रष्टयाला भेटतो, तेव्हा तेथे द्वैतव्यवहाराचे अभावी तोच कायतो एकटा असतो व अशा स्थितीत तो पहाणारा नसून ‘ पहाणेरूप ” असतो.

English meaning

When the object to be seen disappears from his divine vision, the observer experiences himself only and loses his role of observer.

1158
मूळ

तेथ स्वप्नीचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनिया । आपणचि जैसे ॥1158॥

मराठी अर्थ

स्वप्नातील स्त्रीला जागा होऊन आलिंगन देउ गेल्यास तेथे दोन व्यक्ति नसून आपणच एकटे एक असल्याचा जसा प्रत्यय येतो,

English meaning

When a woman sees her husband in her dream, she advances to embrace him with all her eagerness but when her dream breaks, at that moment, she realizes that she is alone and becomes quiet.

1159
मूळ

का दोही काष्ठाचिये घृष्टी- । माजी वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥1159॥

मराठी अर्थ

किवा दोन काष्ठांच्या घर्षणाने उत्पन्न होणारा अग्नि त्यांचा दोन्हीपणा खाऊन आपणच जसा तद्रूप होतो

English meaning

Or, when two dry pieces of word get rubbed against each other, suddenly fire is produced and the term ``Two pieces of wood'' becomes futile because there is only fire.

1160
मूळ

नाना प्रतिबिंब हाती । घेऊ गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥1160॥

मराठी अर्थ

अथवा सूर्य आपले प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठी खाली अवतरला तर प्रतिबिंबाबरोबर जशी त्याची बिंबताही उरणार नाही.

English meaning

And if the Sun stoops down to catch his reflection in the water, the reflection disappears and his role as the original seer of it also comes to an end.

1161
मूळ

तैसा मी होऊनि देखते । तो घेऊ जाय दृश्याते । तेथ दृश्य ने थिते । द्रष्टृत्वेसी ॥1161॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य पाहू जातो, त्याला दृश्य म्हणून काही वेगळे आढळत नाहीच, पण त्याचा द्रष्टेपणाही दृश्याबरोबर मावळतो.

English meaning

Similarly when being united with me, this devotee sets about seeing any object, the object together with his apparent role of observer, goes into oblivion.

1162
मूळ

रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवी प्रकाश्यता । तेवी दृश्यी नाही द्रष्टृता । मी जालिया ॥1162॥

मराठी अर्थ

सूर्योदयाबरोबर अंधारच प्रकाशरूप होत असल्याने मुळे जसा त्यांचा प्रकाश्य प्रकाशक भाव उरत नाही, तसे, दृश्य, द्रष्टा जो मी तद्रूप झाले असता, त्याच्या ठिकाणचे दृश्यत्वही उरत नाही. (माझे द्रष्टेपणही न उरून केवल दृङमात्र मी असतों)

English meaning

When the Sun turns darkness itself into light, there is nothing remaining to be lighted, and similarly when the seer becomes one with me, the object as something to be separately observed does not remain at all.

1163
मूळ

मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते ते दर्शन माझे । साचोकारे ॥1163॥

मराठी अर्थ

यानंतर पाहणे न पाहणे इत्यादि व्यवहारापलीकडील जी सहजस्थिति, तेच माझे खरे दर्शन होय.

English meaning

Then in this state, the object is within the field of the vision of the seer, but he is not looking at it as a separate object- this is the real vision, the real seeing.

1164
मूळ

ते भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥1164॥

मराठी अर्थ

अर्जुना, कोणत्याही पदार्थाच्या भेटीनंतरही, द्रष्टा, दृश्य व दर्शन ह्या व्यवहारातीत असलेल्या अखंड दर्शनस्थि तिचा त्या क्रमयोग्याला आपल्या स्वरूपात भोग घडत असतो.

English meaning

O the crowned one, this seeing takes place in his case with any object in front of him and then he experiences that vision which is beyond the two factors of the seer and the seen.

1165
मूळ

आणि आकाश हे आकाशे । दाटले न ढळे जैसे । मिया आत्मेन आपणपे तैसे । जाले तया ॥1165॥

मराठी अर्थ

आणि आकाशने स्वस्वरूपानेच सर्व जगत् अंतर्बाह्य गच्च व्यापून टाकल्यामुळे जसे त्याचे चलनवलन संभवत नाही, तसा सर्वात्मक जो मी तद्रूप झालेला तो योगी कोणत्याही क्रियेने लिप्त होणे शक्य नाही.

English meaning

Now just as the sky does not move because it is complete in itself, fully occupied by itself, he also does not move from his reality because he is fully within his Atman which is all- pervading unity.

1166
मूळ

कल्पांती उदक उदके । रुंधिलिया वाहो ठाके । तैसा आत्मेनि मिया येके । कोंदला तो ॥1166॥

मराठी अर्थ

सर्व जलमय ‘कल्पांतीच्या उदकाला वाहण्यास जसा कोठे वावच नसतो, तसा सर्वव्यापक, एक, शुद्ध परमात्मा जो मी, तद्रूपच तो झाला असल्यामुळे त्याच्यावाचूनही कोठे रिता ठाव नाही.

English meaning

At the time of final deluge, water is everywhere, and therefore, there is no movement of a stream in it. Similarly he is complete, all-existing Atman and there is no moving anywhere any time from his state.

1167
मूळ

पावो आपणपया वोळघे ? । केवी वन्हि आपणपया लागे ? । आपणपा पाणी रिघे । स्नाना कैसे ? ॥1167॥

मराठी अर्थ

पायानेच पायावर चढणे, अग्नीनेच अग्नील पोळणे, किवा जलानेच स्नानासाठी जाणे ह्या गोष्टी घडणे शक्य आहे काय ?

English meaning

How can a foot go beyond itself? How can fire burn itself? How can water bathe with water only?

1168
मूळ

म्हणौनि सर्व मी जालेपणे । ठेले तया येणे जाणे । तेचि गा यात्रा करणे । अद्वया मज ॥1168॥

मराठी अर्थ

म्हणून, बोध दृष्ट्या, जो सर्वथैव मद्रूप झाल्यामुळे ज्याचे येणे जाणे संपले (कर्तव्यबुद्धीने ) व म्हणूनच, ती स्थिति हीच माझ्या अद्वयस्वरूपाची त्याला यात्रा घडली असे समज.

English meaning

Similarly, as he is totally one with my real nature, all his activities come to an end, and this stoppage of going anywhere is "Pilgrimage to my aloneness."

1169
मूळ

पै जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाही भूमिभागु । क्रमिला तेणे ॥1169॥

मराठी अर्थ

जलावरील लाट कितीही वेगाने आली तरी जलाश्रयावाचून स्वतंत्रतया तिने भूभाग आक्रमण केल्याचे दिसत नाही.

English meaning

A wave may travel far on the surface of water but it cannot flow similarly on the land.

1170
मूळ

जे सांडावे का मांडावे । जे चालणे जेणे चालावे । ते तोयचि एक आघवे । म्हणौनिया ॥1170॥

मराठी अर्थ

कारण, तिची मोडतोड येणे जाणे हे सर्व एका पाण्याचेच खेळ असतात.

English meaning

There the place which the wave leaves behind and the place which she reaches are both 'water' only, and its speed and movement are of water only.

1171
मूळ

गेलियाही भलतेउता । उदकपणे पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवी ॥1171॥

मराठी अर्थ

अर्जुना, ती (भिन्न दिसणारी) लाट वाटेल तेथवर जावो, उदक ह्या दृष्टीने तिचा असलेला एकात्मभाव कधींही भंग पावत नाही.

English meaning

O son of Pandu, however great may be the upsurging of the water, its waterness in inherently unchanging and, therefore, waves do not lose their real unity with water.

1172
मूळ

तैसा मीपणे हा लोटला । तो आघवेयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥1172॥

मराठी अर्थ

तसा माझ्यावर सर्वस्वे येऊन पडला म्हणजे अनन्य झाला, असा जो हा, तो सर्व मरूपच झाला. ह्याच त्याच्या पुण्यरूप यात्रेने तो माझा खरा यात्रेकरू होय 72.

English meaning

Similarly though this devotee may go anywhere or act in anyway on the base of the body's inborn nature and conditioning, he becomes the pilgrim travelling into me and towards me only.

1173
मूळ

आणि शरीर स्वभाववशे । काही येक करू जरी बैसे । तरी मीचि तो तेणे मिषे । भेटे तया ॥1173॥

मराठी अर्थ

आणि शरीरस्वभावाप्रमाणे, तो काहीही जरी करू लागला, तरी त्या त्या रूपाने (व त्या या स्थितीत) त्याला माझे सर्वात्मकाचेच दर्शन होत असते.

English meaning

And if he acts in the wake of the natural inborn conditioning of his body, it is I who meet him in the form of his action.

1174
मूळ

तेथ कर्म आणि कर्ता । हे जाऊनि पंडुसुता । मिया आत्मेनि मज पाहता । मीचि होय ॥1174॥

मराठी अर्थ

त्या त्याच्या कृतींत अर्जुना, हे कर्म आणि हा मी कर्ता, असे भाव जिवंत नसतात, (मृतवत् असतात) तर त्याचा आत्मा जो मी त्यानेच व तो मला ध्यात असतो व म्हणूनच तो मद्रूपच होतो

English meaning

O son of Pandu, then there is neither the actor nor the action, because he sees me in his reality of Atman and becomes one with me.

1175
मूळ

पै दर्पणाते दर्पणे । पाहिलिया होय न पाहणे । सोने झांकिलिया सुवर्णे । ना झाके जेवी ॥1175॥

मराठी अर्थ

हे पहा, आरशाने आरशाला पाहणे म्हणजे कोणी कोणाला न पाहिल्यासारखेच आहे किंवा सुवर्णाच्याच पदार्थाने सुवर्ण झाकणे म्हणजे सुवर्ण उघढे ठेवणेच होय.

English meaning

There is no seeing when a mirror peeps into another mirror, and gold cannot be covered or hidden by gold only.

1176
मूळ

दीपाते दीपे प्रकाशिजे । ते न प्रकाशणेचि निपजे । तैसे कर्म मिया कीजे । ते करणे कैचे ? ॥1176॥

मराठी अर्थ

दिव्यानेच दिव्याला प्रकाशिले ही जशी केवळ भाषा, वास्तवता नव्हे, तसे मद्रूप स्थितीत केल्या गेलेल्या कर्माला कर्म कसे म्हणता येईल ?

English meaning

Or just as it is not practicable that a lamp shows us another lamp when both are lit; so, it is not action when I am `what action is', and do any action!

1177
मूळ

कर्मही करितचि आहे । जै करावे हे भाष जाये । तै न करणेचि होये । तयाचे केले ॥1177॥

मराठी अर्थ

तो कर्म करीतच असतो किवा त्याजकडून कर्म होणारच, ‘पण हे मी करावे आणि हे मी करू नये ” अशी विधिकिकरता जेथे अस्त पावलेली असते, त्याने केलेल्या कर्माची न केल्यातच शास्त्र गणना करिते.

English meaning

When the concept that "I have to do a certain thing" is absent at the time of the happening of the action, that action is not action (which binds).

1178
मूळ

क्रियाजात मी जालेपणे । घडे काहीचि न करणे । तयाचि नांव पूजणे । खुणेचे माझे ॥1178॥

मराठी अर्थ

मद्रूपता आली की जी जी काही क्रिया घडेल ती ती न केल्यासारखीच होते व माझी खरी खुणेची पूजा ती हीच होय

English meaning

As every action becomes 'me' only, not to intentionally do anything becomes the action and that is the devotion, that is the worship to me.

1179
मूळ

म्हणौनि करीतयाही वोजा । ते न करणे हेचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो माते ॥1179॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, तो आस्थापूर्वक जे कर्म करितो तेही न करण्यातच पडतें; हीच त्याने मला बांधलेली महापूजा होय.

English meaning

So, O Kapidhwaja, he does act in the very non-action, because not to do anything as "Doer" is my best worship.

1180
मूळ

एवं तो बोले ते स्तवन । तो देखे ते दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेचि ॥1180॥

मराठी अर्थ

सारांश, तो बोलेल ते माझे स्तवन, तो पाहील ते माझे दर्शन, व तो जिकडे जिकडे जाईल तिकडे त्याला माझा अद्वय परमात्म्याची यात्रा घडते.

English meaning

And therefore, what he talks is my praise, whatever he looks at is looking at me and whenever he walks, that is walking in the state of non-duality with me.

1181
मूळ

तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥1181॥

मराठी अर्थ

अर्जुना, त्याची सर्व कृति ही माझी पूजा होय, तो कल्पना करील तोच माझा जप; व तो असेल तीच माझी समाधि होय

English meaning

Whatever he does is my worship, whatever he conceives is Japa, repetition of my name, and O Kapidhwaja, his very being is trance in my absoluteness.

1182
मूळ

जैसे कनकेसी कांकणे । असिजे अनन्यपणे । तो भक्तियोगे येणे । मजसी तैसा ॥1182॥

मराठी अर्थ

सुवर्णपाशी त्याचाच अलंकार जे कांकण हे नेहमीच जसे अनन्य (एकरूप) असते त्याप्रमाणे ह्या भक्तियोगेकरून तो माझ्याशी अनन्य असतो.

English meaning

This devotion of uniy with me is just like the unity of a bangle of gold with the gold.

1183
मूळ

उदकी कल्लोळु । कापुरी परीमळु । रत्नी उजाळु । अनन्यु जैसा ॥1183॥

मराठी अर्थ

पाण्याशी लाट कापुरापाशी परिमळ । व रत्नाशी जसे त्याचे तेज अनन्य असते,

English meaning

As the wave is in the water, fragrance is in the camphor, and as the lustre in the jewel remains without separation,

1184
मूळ

किंबहुना तंतूंसी पटु । का मृत्तिकेसी घटु । तैसा तो एकवटु । मजसी माझा ॥1184॥

मराठी अर्थ

किंबहुना, तंतूशी पट, मृत्तिकेपाशी घट हे जसे एकरूप असतात तसा तो माझा भक्त मजपाशी एकवट म्हणजे मद्रूप असतो.

English meaning

Or just as threads are in the cloth and earth is in the earthen pot, he and myself are in the unity with each other.

1185
मूळ

इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजाती । मज आपणपेया सुमती । द्रष्टयाते जाण ॥1185॥

मराठी अर्थ

या स्वयंसिद्ध अभेद भक्तीने दृश्यमात्राकडे, जो भक्त, त्यावरील नामरूपात्मक दृश्यत्वाचा पडदा बाजूस सारून, अधिष्ठान द्रष्टा जो मी, तदेकदृष्टीने पहातो.

English meaning

O the wise one, by this undivided devotion to me, he sees me only as the Atman, the seer himself, in each and everything.

1186
मूळ

तिन्ही अवस्थांचेनि द्वारे । उपाध्युपहिताकारे । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जे हे ॥1186॥

मराठी अर्थ

जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तीन अवस्थांद्वारां, उपहित अधिष्ठान व नामरूपादि उपाधि ह्यांच्या द्वारा, अभावरूपाने स्फुरणारे ( प्रत्ययास येणारें) जे काही ते दृश्य होय.

English meaning

Now, this universe is perceived as existing or non existing, in the three states of wakefulness, dream and deep sleep by the dint of the duality of the "field"; and the knower of the field. (see chapter 13)

1187
मूळ

ते हे आघवेचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥1187॥

मराठी अर्थ

ते, जे हे सारे दृश्य त्याचा तात्विक (अंतापयंत ) विचार करून, त्याचे खरे स्वरूप, अधिष्ठानरूप परमात्मा जो मी किंवा पहाणाराचा आत्मा तेच आहे, असा त्या योग्याच्या अपरोक्षानुभवाचा धेडा नाचू लागतो.

English meaning

O the good warrior, in the ecstacy of experiencing that he is all, he is the seer, he dances in the bliss of self-realization.

1188
मूळ

रज्जु जालिया गोचरु । आभासता तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवी ॥1188॥

मराठी अर्थ

रज्जुस्वरूपदर्शनाने तिजवर दिसलेला जो सर्पाचा आकार तोही तेव्हा रज्जुस्वरूपच होता असा निश्चय जसा व्हावा.

English meaning

Just as when a rope is verified as rope before our eyesight, we become certain that the appearance of snake on the rope was really the rope only;

1189
मूळ

भांगारापरते काही । लेणे गुंजहीभरी नाही । हे आटुनिया ठायी । कीजे जैसे ॥1189॥

मराठी अर्थ

सुवर्णालंकारांत, अलंकाराला गुंजभरही पृथक् सत्ता नसते, हे विचाराने किंवा अलंकार आटुनही जसे पहात येईल.

English meaning

Just as when ornament is melted and only gold is in our hands, we come to realize that there is not a single grain of ornament separate from gold;

1190
मूळ

उदका येकापरते । तरंग नाहीचि हे निरुते । जाणोनि तया आकाराते । न घेपे जेवी ॥1190॥

मराठी अर्थ

एका उदकावाचून लाट म्हणून काही स्वतंत्र वस्तूच नाही हे जाणणारा जसा तिच्या आकाराने फसत नाही.

English meaning

Just as realizing that in the wave there is nothing except water only, we do not give value to the shape of the wave;

1191
मूळ

नातरी स्वप्नविकारा समस्ता । चेऊनिया उमाणे घेता । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥1191॥

मराठी अर्थ

किंवा जागा झाल्यावर सकलस्वप्नव्यवहाराची मोजदाद करू पहाणाराला आपल्या शिवाय जसे दुसरे तेथे काहीच आळत नाहीं,

English meaning

Just as after awakening the man, knows that everything experienced in the dream is he himself alone,

1192
मूळ

तैसे जे काही आथी नाथी । येणे होय ज्ञेयस्फुर्ती । ते ज्ञाताचि मी हे प्रतीती । होऊनि भोगी ॥1192॥

मराठी अर्थ

तसा जगात ” “आहे, नाही, ” असा जो काही ज्ञानाचा व्यवहार चालतो, तो सर्व माझ्याच ज्ञानस्वरूपाचा विलास होय, असा त्याचा अपरोक्षानुभव असतो.

English meaning

So, he knows that he is alone everything which is known to be or not to be, he enjoys in himself the bliss of self realization.

1193
मूळ

जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥1193॥

मराठी अर्थ

मी जन्मरहित, वार्धक्यरहित, नाशरहित, व्ययहित, अपूर्व आणि अनंत व आनंदरूप असे जो जागतो.

English meaning

He knows that "I am without birth, without death, without deterioration, I am unprecedented and I the unlimited bliss.

1194
मूळ

अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥1194॥

मराठी अर्थ

मी. अचल, अच्युत, अनंत, अद्वैत, आद्य, निराकार, व साकारही आहे असे जो समजतो.

English meaning

I am firm, non-moving, not fallible, endless, non-dual, primordial, formless as well as having form.

1195
मूळ

ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥1195॥

मराठी अर्थ

नियम्य मी, नियामक मी, अनादि, अमर, अभय, आधार व आधारावर असलेला मी आहे.

English meaning

I am the one who is governed by God, I am God, having no beginning, undestructible, fearless, the supporter and the supported also.

1196
मूळ

स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥1196॥

मराठी अर्थ

मी नित्य स्वामी (धनी) आहे; सहज व सतत आहे; मी सर्व व सर्वव्यापक आहे व मी. सर्वात न सापडणारा असा त्यांच्या पलीकडील स्वरूपाचा आहे.

English meaning

I wield all power, always perfect, self-made, unbroken, constant, having all forms, dwelling in all, and beyond all.

1197
मूळ

नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जे काही ते मी ॥1197॥

मराठी अर्थ

मी, नवा, जुना, शून्य, संपूर्ण, स्थूल, सूक्ष्म, जे काही दिसते ते मी आहे.

English meaning

I am new and old, void and full, and whatever is small or large, I am that.

1198
मूळ

अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥1198॥

मराठी अर्थ

अक्रिय, एक, असंग, अशोक, व्याप्य, व्यापक, पुरुषोत्तम मी आहे.

English meaning

I have no action and its bondage, I am without duality, unattached and without sorrow. I am the supreme person, occupying everything and that which is occupied.

1199
मूळ

अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥1199॥

मराठी अर्थ

अशब्द (शब्दरहित), श्रोत्ररहित, अरूप, अगोत्र, सम, स्वतंत्र व परब्रम्ह्स्वरूप आहे.

English meaning

I have no sound, ear, form or family name. I am the same everywhere self-evident and the absolute Brahman.

1200
मूळ

ऐसे आत्मत्वे मज एकाते । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुते । आणि याही बोधा जाणते । तेही मीचि जाणे ॥1200॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, मला एकाला या अद्वैयभक्तीने योग्यरीतीने जाणतो व याही बोधाचे अधिष्ठान जे शुद्ध परमात्मतत्व तेच माझे स्वरूप होय असाही त्याचा स्पष्ट बोध असतो.

English meaning

So, in this way he knows me and himself also similar to me by his total devotion in unity. He also knows that I am the knowing by which he realizes me in this way.

1201
मूळ

पै चेइलेयानंतरे । आपुले एकपण उरे । तेही तोवरी स्फुरे । तयाशीचि जैसे ॥1201॥

मराठी अर्थ

किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो, व हे एकटेपणाचे स्फुरणही जो वर असते तो वर ते त्याला एकट्यालाच असते.

English meaning

Just as a man knows himself to be alone when he awakes from a dream-

1202
मूळ

का प्रकाशता अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥1202॥

मराठी अर्थ

सूर्य प्रकाशु लागला म्हणजे आपला प्रकाशकही तोच असतो व आपण व आपला प्रकाश (प्रकाश्य प्रकाशक ) यातील अभेदही त्याच्याच मुळे समजतो

English meaning

or when the Sun rises, he lights himself, and it is he who shows that he and his light are not separate.

1203
मूळ

तैसा वेद्यांच्या विलयी । केवळ वेदकु उरे पाही । तेणे जाणवे तया तेही । हेही जो जाणे ॥1203॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे वेद्य वस्तुच्या लोपानंतर केवळ त्यांचा वेदकमात्र उरतो; तो आपण आपल्याला जाणीत असतो ह्याची व ते ज्यायोगे (सत्तेवर) जाणतो त्याचीही ह्याला जाणीव असते.

English meaning

Similarly when the object of knowledge disappears only the knower remains and it is the knower himself, who knows that he is alone.

1204
मूळ

तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥1204॥

मराठी अर्थ

ते आपले आपल्या ठिकाणी ते स्फुरद्रूप असणारे आपले अद्वयपण ज्या ज्ञप्तिमात्र स्वरूपाच्या सत्तेवर प्रत्ययाला येते, ते जे ज्ञप्तिस्वरूप, तोच ईश्वर व मीही तोच, असे त्याला कळून येते.

English meaning

Dear Arjun, this devotee also knows that the faculty of knowing that it is non-duality, is also my own nature and my own power.

1205
मूळ

मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हे जाणोनि जाणणे जेथ । अनुभवी रिघे ॥1205॥

मराठी अर्थ

मग, द्वैताद्वैतातीत, नि:संदेह मीच एक आत्मा सगळीकडे भरलेला आहे असे सर्वात्मज्ञान होऊन तेही जाणणे स्वरूपानुभवांत लीन होते.

English meaning

Then as the devotee experiences without doubt that I am the Atman, alone beyond the concepts of unity and duality, and when he actually experiences this,

1206
मूळ

तेथ चेइलिया येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेही जाता नेणो कोण । होईजे जेवी ॥1206॥

मराठी अर्थ

स्वप्नातून जागे झाल्यावर काही काळ, स्वप्नातील द्वैतव्यवहाराच्या स्मृतिमुळे, आपले एकपण आपल्यास स्फुरत असते, पण पूर्ण जागृति आल्यावर आपण कोण असतो ह्याचे जसे भान नसते.

English meaning

Then just as a man who is awake and is aware that he is alone, but later on that awareness also disappears, the state of that man cannot be described.

1207
मूळ

का डोळा देखतिये क्षणी । सुवर्णपण सुवर्णी । नाटिता होय आटणी । अळंकाराचीही ॥1207॥

मराठी अर्थ

सुवर्णालंकार डोळयांनी पहातांच, “जर” हे सर्व सुवर्ण आहे ” अशा दृष्टीचा उदय झाला, तर न आटतांच अलंकाराचे अलंकारपण संपले.

English meaning

Or for example, when we see gold, the awareness of that gold as well as the awareness of the ornament disappears.

1208
मूळ

नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वे राहे । तेही जिरता जेवी जाये । जालेपण ते ॥1208॥

मराठी अर्थ

किंवा मिठाचे पाणी झाले तर क्षारता जलरूपाने असते, पण ते पाणी झालेले मीठही जेव्हा पृथ्वींत समरस होते, तेव्हा “ हे मीठ” असा मिठाचा वेगळेपणा उरत नाही किंवा भासतही नाही.

English meaning

In other words, when salt is dissolved in water, its taste of saltiness remains in the water, but if that taste is also gone, the basic existence of salt disappears.

1209
मूळ

तैसा मी तो हे जे असे । ते स्वानंदानुभवसमरसे । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजी ॥1209॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ” मी ” “ तो ” हा जो व्यवहार असतो तो आत्मानंदानुभवांत एकत्र करून, तो, तेच आनंदरूप, जे माझे स्वरूप, त्यामध्ये प्रवेश करितो.

English meaning

Similarly, when this devotee remains in the experience of self - realization, in that peace his awareness that "he is Me" also disappears. That is the way in which the devotee enters into me.

1210
मूळ

आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हे कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपी ॥1210॥

मराठी अर्थ

मग, ” तो ” ही भाषा संपल्यावर, त्याच्या अपेक्षेनी नांदणारे जे ” मी ” ते तरी कोणावर स्थापावयाचे ? असा ‘तू व मी ” विवर्जित जे माझे स्वरूप त्याच्याशी तो ऐक्य पावतो.

English meaning

Then the term 'He' is gone and naturally the term 'Me' also ends because it has no place. Thus the feeling of separateness of 'He and Me' dissolves and he is really one with me.

1211
मूळ

जेव्हा कापुर जळो सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवी ॥1211॥

मराठी अर्थ

कापुराच्या जळण्याची समाप्ति तीच अग्नीची समाप्ति होय. मग तेथे कापूरही नसतो व अग्नीही नसतो; केवळ आकाश असते.

English meaning

When a piece of camphor burns, the name 'fire' is rightly used but when the camphor is burnt out and the fire also becomes non-existent only the element of sky remains.

1212
मूळ

का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहीचा शेखु । मीचि मग आथी ॥1212॥

मराठी अर्थ

एकांतून एक वजा केला की खाली शून्य उरते, तसे “आहे नाही ” ह्या व्यवहार लोपानंतरही तद्व्यवहार सिद्धि ज्यावर होते असे जे शेष (अवधिभूत ) वस्तु ते मीच होय.

English meaning

When we deduct one from one, 'nothing' remains. Similarly when 'is' is deducted from 'is not' what remains; or when existence and non existence are eliminated mutually what remains, is my real nature.

1213
मूळ

तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणे याही पैसु । नाही तेथ ॥1213॥

मराठी अर्थ

अशा स्थितीत ब्रह्म, आत्मा, ईश, अशी भाषा बोलण्याने तिचे स्वारस्य किंवा महत्त्व नष्ट झाल्यासारखे होते; व तद्विषयक मौनाचा निश्चयही अयुक्तच होय (अशी बोलाबोलातीत ती वस्तु आहे)

English meaning

In that state the bliss is contaminated even by using the terms, 'Brahman, Atman, God' etc. and there is no scope even to say that 'No' Thing' remains in that state!

1214
मूळ

न बोलणेही न बोलोनी । ते बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे ते ॥1214॥

मराठी अर्थ

म्हणून, न बोलण्याचाही निश्चय सोडून त्याजबद्दल तोंड भरून चर्चा करावी; पण ते जाणले जाते किंवा जाणले जात नाही असा निश्चय न करिता या दोन्ही कल्पनाहून अतीत ( स्वसंवेद्य ) आहे असे जाण.

English meaning

That `No Thing' should be described fully without saying 'No', and without having the awareness of knowledge and ignorance, it should be rightly known.

1215
मूळ

तेथ बुझिजे बोधु बोधे । आनंदु घेपे आनंदे । सुखावरी नुसधे । सुखचि भोगिजे ॥1215॥

मराठी अर्थ

त्या स्थितीत बोधरुपालाच बोध होतो, आनंदालाच आनंद व सुखालाच सुखाचा भोग घडत असतो.

English meaning

In that state, the understanding should teach the understanding, happiness should embrace happiness, and the joy should enjoy the joy.

1216
मूळ

तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजी ॥1216॥

मराठी अर्थ

तेथे लाभालाच लाभ; प्रभेलाच प्रभेची भेट, अशी स्थिति असून, विस्मय विस्मयातच समूळ बुडतो.

English meaning

In that state, benefit gets the benefit, the brightness embraces the brightness and the wonder is drowned in the wonder.

1217
मूळ

शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणे ॥1217॥

मराठी अर्थ

तेथे समत्व साम्याला आले, विश्राम विश्रांतीला आला व अनुभवालाच अनुभूतित्वरूप येऊन तोही वेडावला ! (नाहीसा झाला)

English meaning

There the peace experiences quietness, the rest gets rest and experience is having love for experience.

1218
मूळ

किंबहुना ऐसे निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥1218॥

मराठी अर्थ

क्रमयोगरूप वेलीचे पाणिग्रहण करणाऱ्या त्या योग्याला असे जे माझे निखळ (असंग) स्वरूप त्याची प्राप्ति होते.

English meaning

In short when the beautiful creeper of the Yoga of action is nourished by that man, he gains the flawless fruit of my being.

1219
मूळ

पै क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटी । मी चिद्रत्न ते साटोवाटी । होय तो माझा ॥1219॥

मराठी अर्थ

अर्जुना, ह्या सार्वभौम क्रमयोग्याने माझी आपल्या मुकुटावर चिद्रत्न म्हणून योजना केली आहे, तो व्यवहार मोबदल्याचा आहे. (बदला मी त्याला माझ्या हृदयात आत्मत्वाने स्थान दिले आहे)

English meaning

And O the crowned one, I become the jewel of spirituality in the crown of that emperor of the Yoga of action and, he, in exchange becomes jewel in my crown.

1220
मूळ

की क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥1220॥

मराठी अर्थ

किंवा, त्या क्रमयोगरूपी मंदिरावर जो हा मोक्षरूपी कळस बसविला जाणार त्या कलशाची बैठक किंवा आतील (घुमटीतील) पोकळी हा होतो.

English meaning

In other words, the liberation is the high dome of the temple of the Yoga of action and that yogi becomes the expanse of the vast sky above that dome.

1221
मूळ

नाना संसार आडवी । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगावी । पैठी जालीसे ॥1221॥

मराठी अर्थ

अथवा ह्या भवारण्यातील क्रमयोग हा राजरस्ताच होय; ह्याने गेले असता मद्पता ” हा जो सीमाप्रांत त्याला योगी मोजका येतो

English meaning

Or, we can say that in the forest of mundane life the yoga of action is a good path and that path reaches to the town of unity with me.

1222
मूळ

हे असो क्रमयोगबोधे । तेणे भक्तिचिद्गांगे । मी स्वानंदोदधी वेगे । ठाकिला की गा ॥1222॥

मराठी अर्थ

अथवा हेही असो; ह्या क्रमयोगरूपी ओघांतून वाहणारी ही भक्तिचिद्गंगा, वेगाने, निजानंदसागर जो मी, त्या मला येऊन गांठते व मद्रुप होते.

English meaning

Or, that Yogi, swimming in the stream of Yoga of action in the waters of knowledge and devotion, reaches the ocean of Atmic bliss, which is my nature.

1223
मूळ

हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगी आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळा तुम्हा । सांगतो आम्ही ॥1223॥

मराठी अर्थ

अर्जुना, हा क्रमयोग अखेरपर्यंत पोंचविणारा आहे, असा ह्याचा महिमा आहे; व म्हणूनच आम्ही त्याचे वारंवार वर्णन केले.

English meaning

O the wise Arjuna, such is the greatness of this yoga and, therefore, we are again and again emphatically telling you about it.

1224
मूळ

पै देशे काळे पदार्थे । साधूनि घेइजे माते । तैसा नव्हे मी आयते । सर्वाचे सर्वही ॥1224॥

मराठी अर्थ

कारण, देशविशेषांत, कालविशेषांत अथवा साधनविशेषाने होणारी अशी माझी प्राप्ति नसून, मी सर्वाचा आत्माच असल्याने सर्वाना सर्वदा सहजच प्राप्त आहे.

English meaning

My dear, I am not a goal to be reached by selecting proper place, proper time and employing proper things as means, but I am already everything in everybody.

1225
मूळ

म्हणौनि माझ्या ठायी । जाचावे न लगे काही । मी लाभे इये उपायी । साचचि गा ॥1225॥

मराठी अर्थ

म्हणून, माझ्या प्राप्त्यर्थे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. ह्या वरील क्रमयोगाने मी निश्चयाने सहज प्राप्त होतो

English meaning

Therefore, no hard work is required to be undertaken for being united with me. I am easily available by this simple path of the yoga of action.

1226
मूळ

एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥1226॥

मराठी अर्थ

एक गुरु, एक शिष्य, असा जो संप्रदाय लोकात रूढ आहे, तो मत्प्राप्तीचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून होय

English meaning

There is a regular practice of conceiving one man as Guru and the other as disciple but that relationship is useful only to understand the path which leads one to me.

1227
मूळ

अगा वसुधेच्या पोटी । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठी । वोहा दूध ॥1227॥

मराठी अर्थ

अरे, पूर्वीच्या पोटात अनंत ठेवे, काष्ठांत अग्नि व कासेंत दुध, नित्य सिद्ध आहेतच.

English meaning

O the crowned one, the treasure is already there underground, fire is hidden in the wood, and milk is there in the udder of a cow.

1228
मूळ

परी लाभे ते असते । तया कीजे उपायाते । येर सिद्धचि तैसा तेथे । उपायी मी ॥1228॥

मराठी अर्थ

परंतु, ते सिद्ध असलेले पदार्थच प्राप्त करून घेण्यास काही उपाय करावे लागतात; त्याप्रमाणे नित्यसिद्ध असलेल्या माझ्या प्राप्तीचेही उपाय करावे लागतात.

English meaning

But he who finds the way to get them only gets them; and similarly I am there everywhere and everybody but realization of this is possible by certain way.

1229
मूळ

हा फळहीवरी उपावो । का पा प्रस्तावीतसे देवो । हे पुसता परी अभिप्रावो । येथिचा ऐसा ॥1229॥

मराठी अर्थ

स्वतःच्या प्राप्तीचे उपाय मागे सांगितले असता, पुन्हा त्याच विषयाची देव प्रस्तावना का करीत आहेत असे कोणास वाटल्यास येथे देवांच्या मनातील अभिप्राय असा आहे,

English meaning

(Saint Dnyaneshwar says) Somebody may ask why the lord Krishna after having discussed the supreme state of the devotee, now turns to describe the way or the preparation for it; Here it may be mentioned that this introduction suggests a certain way.

1230
मूळ

जे गीतार्थाचे चांगावे । मोक्षोपायपर आघवे । आन शास्त्रोपाय की नव्हे । प्रमाणसिद्ध ॥1230॥

मराठी अर्थ

की, सर्व गीताशास्त्र, हे स्वतःप्रमाण वेदांचे सार असून मोक्षोपायदर्शक आहे; अन्यशास्त्रोपाय असले तरी, ते प्रमाण सिद्ध असतीलच असे सांगता येत नाही.

English meaning

Because it is the rightful authority of this commentary on the Geeta to discuss from all angles the path of liberation, as the way or means described in other systems of philosophy may not necessarily be the correct ones.

1231
मूळ

वारा आभाळचि फेडी । वाचूनि सूर्याते न घडी । का हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥1231॥

मराठी अर्थ

माझी प्राप्ति म्हणजे असा प्रकार असतो. वारा फक्त सूर्याच्या आड असलेले ढग दूर लोटतो, सूर्य काही नवा आणीत नाही; किंवा हाताने पाण्यावरील फक्त गोंडाळ दूर केली जाते; पाणी पहिलेच असते.

English meaning

The wind may by its power remove the clouds so that people can see the Sun, but that wind cannot create the Sun; and our hand can very well remove the moss on the water but it cannot create the water.

1232
मूळ

तैसा आत्मदर्शनी आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशे स्वये ॥1232॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा पडदा मध्ये असतो, तेवढाच शास्त्र दूर करितें; त्याचे आत मी असंग, स्वप्रकाश, नित्य आहेच. त्याचे दर्शन सहज होतें;

English meaning

Similarly, - the Lord says that- all other systems may remove the dirt of ignorance but I am self-luminant and clean at all times (and not created by those scriptures.)

1233
मूळ

म्हणौनि आघवीचि शास्त्रे । अविद्याविनाशाची पात्रे । वाचोनि न होती स्वतंत्रे । आत्मबोधी ॥1233॥

मराठी अर्थ

म्हणून, सर्व शास्त्रांची मर्यादा अगर कामगिरी अविद्येचा नाश करणे येथ वरच आहे; त्यांच्यात स्वतःसिद्ध आत्मबोध (साक्षात्) करून देण्याचे सामर्थ्य नाही.

English meaning

Therefore, all scriptures are just utensils for cleansing the dirt of ignorance which impedes the vision of Atman, but beyond that, they have no power to bring about direct self-realization.

1234
मूळ

तया अध्यात्मशास्त्रांसी । जै साचपणाची ये पुसी । तै येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥1234॥

मराठी अर्थ

अध्यात्मविषयावरील जी इतर शास्त्रे त्यास, त्यांच्या विधानाच्या सत्यत्वाला प्रमाण काय असे विचारले तर, ती प्रमाण म्हणून ज्याच्याकडे बोट करितात ते हे गीताशास्त्र होय. (येवढी ह्याची थोरवी आहे. )

English meaning

Geeta is the place where those scriptures turn, when they have the problem of proving their truthfulness.

1235
मूळ

भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथे शास्त्रे ॥1235॥

मराठी अर्थ

सूर्य उदयाने. पूर्वदिशा अलंकृत करितो खरी, पण, लगेच इतर सर्व दिशा सतेज होतात, तसे सर्व अध्यात्मशास्त्रांचा राजा अशी ही गीता तिच्यावर शास्त्राचे सर्व सनाथत्व अगर सौभाग्य अवलंबून आहे.

English meaning

Just as all the directions are also full of light when the Sun enriches the east with his bright light, so it is by the help of Geeta that all scriptures are capable of showing the right way of realization of the supreme.

1236
मूळ

हे असो येणे शास्त्रेश्वरे । मागा उपाय बहुवे विस्तारे । सांगितला जैसा करे । घेवो ये आत्मा ॥1236॥

मराठी अर्थ

हे असो; ह्या गीताशास्त्रेश्वराने मागे पुष्कळ विस्तारपूर्वक आत्म-प्राप्तीचा उपाय सांगितला आहे की ज्यायोगे तळहातावरील वस्तूप्रमाणे आत्मदर्शन व्हावे.

English meaning

That is enough. The Lord has earlier described in details all the paths in such a simple way that one may be able to hold the Atman in his hand!

1237
मूळ

परी प्रथमश्रवणासवे । अर्जुना विपाये हे फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥1237॥

मराठी अर्थ

पण प्रथम श्रवणा- बरोबर अर्जुनाच्या चित्तांत ते आरूढ होईल न होईल अशी देवांनी कळकळ बाळगून

English meaning

But the Lord Shrihari must have thought that perhaps Arjuna might have or might have not grasped the essence of this subject, in the very first listening, and he felt compassionate towards Arjuna.

1238
मूळ

तेचि प्रमेय एक वेळ । शिष्यी होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आता ॥1238॥

मराठी अर्थ

तोच अर्थ अगर तेच प्रमेय शिष्याच्या चित्तांत ठसावे म्हणून पुन्हा स्पष्ट करून कथन केले.

English meaning

So, he is telling in short the same truth again so as to make his disciple capable of having definite understanding.

1239
मूळ

आणि प्रसंगे गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥1239॥

मराठी अर्थ

आणि गीताग्रंथाच्या समाप्तीचाही प्रसंग असल्यामुळे गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे हे तिच्या उपक्रमाच्या व उपसंहाराच्या एकार्थत्वाने दाखवितात.

English meaning

And as the end of Geeta is near, he is showing that the beginning and the end of Geeta are consistent with each other.

1240
मूळ

जे ग्रंथाच्या मध्यभागी । नाना अधिकारप्रसंगी । निरूपण अनेगी । सिद्धांती केले ॥1240॥

मराठी अर्थ

ग्रंथाच्या मधील अध्यायात अधिकार भेदाने भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितले आहेत.

English meaning

The reason of showing this consistency is that while commenting upon the various doctrines during the course of the talks, the Lord has dwelt upon many other maxims, both relevant or not to the main premise.

1241
मूळ

तरी तेतुलेही सिद्धांत । इये शास्त्री प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जै मानी ॥1241॥

मराठी अर्थ

त्यामुळे ह्या गीताशास्त्रांत अनेक सिद्धान्त सांगितले आहेत असे पूर्वापर संबंध न जर जाणणाराला वाटेल तर-

English meaning

Some one may quite mistakenly say that all those doctrines are the main and the essential arguments of the Geeta, not giving deeper attention.

1242
मूळ

तै महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥1242॥

मराठी अर्थ

मुख्य सिद्धान्ताच्या पोटात अनेक उपसिद्धान्त त्याची कक्षा म्हणून सांगावे लागतात, हे या उपसिद्धांताची मुख्य सिद्धान्तापाशी जुळणी करून दाखवून आरंभिलेली गीता, देव संपुर्ण करितात.

English meaning

Therefore, the Lord has nicely joined all the doctrines to the main premise in such a way that the whole teaching will remain homogeneous.

1243
मूळ

एथ अविद्यानाशु हे स्थळ । तेणे मोक्षोपादान फळ । या दोही केवळ । साधन ज्ञान ॥1243॥

मराठी अर्थ

अविद्येचा नाश करून त्यायोगे आत्मरूप मोक्षफल जीवांच्या पदरात पाडणे व ह्या दोन्ही गोष्टीचे साधन म्हणजे केवळ यथार्थ आत्मज्ञान हेच होय, हे जीवांस पटविणे हाच गीतेचा महासिद्धान्त होय.

English meaning

So, destruction of ignorance is the main subject matter, the result of that is attainment of liberation and knowledge is the means effective for both the purposes.

1244
मूळ

हे इतुलेचि नानापरी । निरूपिले ग्रंथविस्तारी । ते आता दोही अक्षरी । अनुवादावे ॥1244॥

मराठी अर्थ

हे इतकेच सांगण्यासाठी, प्रसंगतः ग्रंथांत कर्म उपासनादि विस्तार करून सांगितले; पण त्या मुख्य सिद्धान्ताचा थोडक्यात अनुवाद करावा ह्या हेतूने

English meaning

And throughout all the lengthy discussion in this book, this is the only doctrine propounded in various ways and now the Lord intends to tell it in a few words.

1245
मूळ

म्हणौनि उपेयही हाती । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले ते पुढती । येणेचि भावे ॥1245॥

मराठी अर्थ

म्हणून उपेय म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावे ते फल प्राप्त झाले असतांही त्याचे उपाय सांगण्यात देव पुन्हा प्रवृत्त झाले.

English meaning

And, therefore, even after proving the certainty of the fruit of all spiritual endeavour, the Lord has set about discussing the means again; with this purpose in his mind.

1246
मूळ

मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी होऊनी होय पैठा । माझ्या रूपी ॥1246॥

मराठी अर्थ

देव म्हणतात, अर्जुना, असा तो क्रमयोगी निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपात रहातो.

English meaning

Then the Lord Shrikrishna said, "O the great warrior, this Yogi of action becomes united with me and remains established in me only.

1247
मूळ

स्वकर्माच्या चोखौळी । मज पूजा करूनि भली । तेणे प्रसादे आकळी । ज्ञाननिष्ठेते ॥1247॥

मराठी अर्थ

स्वकर्माचरणरूप पुष्पांनी माझे पूजन करून त्यायोगे होणाऱ्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो

English meaning

He worships me by using the pure flowers of the performance of his proper duties and becomes endowed with faith in the path of knowledge through the blessing which he gets for his worship.

1248
मूळ

ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसे । सुखिया होय ॥1248॥

मराठी अर्थ

ती ज्ञाननिष्ठा ज्याने हस्तगत केली तेथे माझी भक्ति उत्कर्ष पावते व तिच्या भजनांत समरस होऊन तो सुखी होतो.

English meaning

When this faith in knowledge arises in his life, devotion to me increases greatly and he enjoys the peace of the equilibrium which he attains through his extreme devotion.

1249
मूळ

आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनिया । सर्वत्रता हे ॥1249॥

मराठी अर्थ

आणि सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी, त्याचा आत्मा त्याला तो सर्वथैव अनुसरतो.

English meaning

He understands me, as the all-pervading Atman, who gives light to the whole universe and worships me in that omnipresent Nature.

1250
मूळ

सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । का हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमी ॥1250॥

मराठी अर्थ

आपले काठिण्य सोडून मीठ जसा जलाचा आश्रय करिते किंवा सर्व दिशांत संचार करून वायु जसा आकाशाचे पोटात शान्त होतो.

English meaning

Just as the salt drops its separate existence and merges into water, or just as, ceasing its activity of blowing, the wind rests in the sky.

1251
मूळ

तैसा बुद्धी वाचा काये । जो माते आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपाये । कर्मे करू ॥1251॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, काया, वाचा, मनेंकरून जो माझा आश्रय करून राहिला आहे, तो क्वचित् निषिद्धही कर्म करो.

English meaning

Similarly, when he takes refuge in me by his intellect, speech and action, then even if sometimes some improper action is committed by him,

1252
मूळ

परी गंगेच्या संबंधी । बिदी आणि महानदी । येक तेवी माझ्या बोधी । शुभाशुभांसी ॥1252॥

मराठी अर्थ

पण, गंगाप्रवेश झाल्या वर ओहोळ आणि महानदी हा जसा भेद उरत नाही त्याप्रमाणे, ज्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान झाले आहे त्याला शुभ व अशुभ दोन्ही कर्मे तुल्य असतात

English meaning

His right actions and wrong actions become pure only, as he understands my reality, just as the small dirty stream of water becomes Ganges only, when it merges into it,

1253
मूळ

का बावने आणि धुरे । हा निवाडु तवचि सरे । जव न घेपती वैश्वानरे । कवळूनि दोन्ही ॥1253॥

मराठी अर्थ

हा अस्सल चंदन आहे व हा धुर करणारा निंब आहे असा विचार, ती दोन्ही काष्ठे अग्नींत टाकली नाहीत तोपर्यंतच असतो.

English meaning

For example the difference between the sandalwood and ordinary wood is considered so long as both are not gutted by fire.

1254
मूळ

ना पांचिके आणि सोळे । हे सोनया तवचि आले । जव परिसु आंगमेळे । एकवटीना ॥1254॥

मराठी अर्थ

पांचकशी व सोळाकशी, असा भेद सोन्यात तोंवरच असतो, की जपर्यंत हलक्या सोन्याला परिसाचा संबंध घडत नाही. (तो जडल्याबर हिणकट धातूचे उत्तम सुवर्ण होणारच).

English meaning

Similarly, the differences between pure gold and impure gold are counted so long as the magic stone Parees does not transform all into pure gold.

1255
मूळ

तैसे शुभाशुभ ऐसे । हे तंवचिवरी आभासे । जव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥1255॥

मराठी अर्थ

सर्वत्र माझा एकाचच प्रकाश (व्याप्ति) आहे अशा बोधाचा जोंवर उदय झाला नाही तोवर शुभ व अशुभ असे भेद बुद्धिपुढे उभे रहातात.

English meaning

So, auspicious or inauspicious actions are different only so long as my all-pervading light does not illuminate all actions and purify them.

1256
मूळ

अगा रात्री आणि दिवो । हा तवचि द्वैतभावो । जव न रिगिजे गावो । गभस्तीचा ॥1256॥

मराठी अर्थ

अरे, रात्र आणि दिवस हा दैतभाव, ती दोघे, सूर्याच्या गावाला गेली नाहीत तोंवरच नांदतो (तेथे रात्रही नाही व तत्सापेक्ष दिवसही नाही)

English meaning

The difference between day and night is valid on this earth but it ends when we are in the Sun, the eternal light!

1257
मूळ

म्हणौनि माझिया भेटी । तयाची सर्व कर्मे किरीटी । जाऊनि बैसे तो पाटी । सायुज्याच्या ॥1257॥

मराठी अर्थ

म्हणून, अर्जुना, माझ्या यथार्थस्वरूप प्रकाशापुढे, त्याच्या शुभाशुभ सर्व कर्माचेभस्म होऊन तो सायुज्यपदावर बसतो.

English meaning

Similarly, O the crowned one! All his actions simply get wiped away and he sits on the throne of final liberation, when he thus merges into me.

1258
मूळ

देशे काळे स्वभावे । वेचु जया न संभवे । ते पद माझे पावे । अविनाश तो ॥1258॥

मराठी अर्थ

देशाने, कालाने अगर निसर्गतः ज्याचा कधीही नाश संभवत नाही असे जे माझे अविनाशपद (सायुज्यपद) हे त्याला प्राप्त होते.

English meaning

He attains my state of reality, which is not disturbed or destroyed through lapse of time, or a particular place or the inborn nature of his physical body in his life.

1259
मूळ

किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणे न पविजता । लाभु कवणु असे ॥1259॥

मराठी अर्थ

किंबहुना, अर्जुना, मी जो परमात्मा त्याची प्रसन्नता अथवा त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो; आणखी कोणता असा लाभ असणार की, जो या प्रसादानंतरही मिळणे बाकी आहे ?

English meaning

In short, O son of Pandu, what more gain will he want, when he receives my grace, which is the bliss of the Atman?

1260
मूळ

याकारणे गा तुवा इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपी धनंजया । संन्यासु कीजे ॥1260॥

मराठी अर्थ

यास्तव, धनंजया, तू आपली सर्वं कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर.

English meaning

Therefore. O Dhananjaya, you should offer all your actions to me.

1261
मूळ

परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणे करा । आत्मविवेकी धरा । चित्तवृत्ति हे ॥1261॥

मराठी अर्थ

परंतु अर्जुना, तो कर्मसंन्यास अकृत्रिम असून चित्तवृत्ति आत्मविचाराकडे असू दे.

English meaning

But O the brave one! It is not the renunciation of your daily routine duties. You should yoke your intellect to the discrimination of what is Atman and what is not Atman.

1262
मूळ

मग तेणे विवेकबळे । आपणपे कर्मावेगळे । माझ्या स्वरूपी निर्मळे । देखिजेल ॥1262॥

मराठी अर्थ

मग त्या आत्म- विचाराच्या सामर्थ्याने. तुला, कर्माहून अत्यंत वेगळे असलेल्या अशा आपल्या निर्मळ स्वरूपाचे माझ्या स्वरूपात दर्शन होईल.

English meaning

Then by that distinction you will see your Atman, your own real nature as merged into me, but quite separated from Karma or the activities which bind you.

1263
मूळ

आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥1263॥

मराठी अर्थ

आणि कर्माचे जन्मस्थान जी प्रकृति किंवा अविद्या तिचा व आपला काहीही संबंध नाही हे तुझ्या ध्यानी येईल.

English meaning

You will also know that the Prakriti, which is the birth place of Action is also very far away from Atman.

1264
मूळ

तेथ प्रकृति आपणया । वेगळी नुरे धनंजया । रूपेवीण का छाया । जियापरी ॥1264॥

मराठी अर्थ

( विचारा अंती तुला असेही कळून येईल कि) रूपावाचून छाया म्हणून जसा स्वतंत्र पदार्थ नसतो, त्याप्रमाणं स्वात्मसत्तेहून प्रकृतीला पृथक् सत्ताच नसल्यामुळे ती आपल्याहून वेगळीही नाही, असें, अर्जुना तुझ्या ध्यानात येईल.

English meaning

Then, O Dhananjaya, it will so happen that realization will also arise in you that this Prakriti cannot actually be away from Atman, as a shadow of a body is always with it!

1265
मूळ

ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥1265॥

मराठी अर्थ

अशा अनिर्वचनीय स्वरूपाविष्करणाने प्रकृतीचा नाश (मिथ्यात्व) झाला म्हणजे, तीच कर्माचे जन्मस्थान किंवा कारण असल्यामुळे, कर्माचा कारणासहवर्तमान सहजच संन्यास होतो.

English meaning

When thus the Prakriti will be no more as something separate, then automatically all actions will be merged by renunciation for want of any duality.

1266
मूळ

मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरे आपणपया । तेथ बुद्धि घापे करूनिया । पतिव्रता ॥1266॥

मराठी अर्थ

अशा रीतीने सर्वकर्मसंन्यास झाला असता, मी आत्मा सहजच नित्य स्थित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धि पवित्रतेप्रमाणे सदैव स्थिर असू दे.

English meaning

When all action is ended, only Atman remains as me, and the intellect will be loyally devoted to that Atman, just as faithful wife loves her husband.

1267
मूळ

बुद्धि अनन्य येणे योगे । मजमाजी जै रिगे । तै चित्त चैत्यत्यागे । मातेचि भजे ॥1267॥

मराठी अर्थ

बुद्धि अनन्यभावाने मत्स्वरूपी रत आली म्हणजे चित्तही अन्य चिंतनाच्या विषयांच्या त्यागाने माझ्याच भजनी लागेल.

English meaning

When the intellect devotes itself to me by one-pointed love, the mind will also drop all its fickle movements and devote itself to me.

1268
मूळ

ऐसे चैत्यजाते सांडिले । चित्त माझ्या ठायी जडले । ठाके तैसे वहिले । सर्वदा करी ॥1268॥

मराठी अर्थ

याप्रमाणे विषय त्याग झालेले चित्त माझ्या स्वरूप नित्य जडून राहील असे सत्वर कर.

English meaning

And I advise you to regularly make such an effort that your mind will drop all its pranks and will merge into me firmly, at all times.

1269
मूळ

मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियाचि भरेल जेधवा । माझा प्रसादु जाण तेधवा । संपूर्ण जाहला ॥1269॥

मराठी अर्थ

मग अशा प्रकारच्या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हा मद्रूप होईल, तेव्हांच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद झाला असे समज.

English meaning

When your mind will be thus completely filled with me, you should know that you have gained my full grace.

1270
मूळ

तेथ सकळ दुःखधामे । भुंजीजती जिये मृत्युजन्मे । तिये दुर्गमेचि सुगमे । होती तुज ॥1270॥

मराठी अर्थ

ह्या प्रसादाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढी दुर्गम दुःखे भोगावी लागतात ती सर्व तुला सुतर (सुगम) होतील. (भोगावी लागणार नाहीत)

English meaning

Then all the sorrows and pains in the worldly life will be easy and tolerable for you.

1271
मूळ

सूर्याचेनि सावाये । डोळा सावाइला होये । तै अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥1271॥

मराठी अर्थ

सूर्य प्रकाशाचे सहाय्य असलेला डोळा काय अधंकाराला भिणार आहे ?

English meaning

If our eyes have the help of sunlight what fear have we of the darkness?

1272
मूळ

तैसा माझेनि प्रसादे । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसाराचेनी बाधे । बागुले केवी ? ॥1272॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा उपमर्दित (नष्ट, बाधित) झाली आहे, त्याला संसाररूप बागुलाची (मिथ्या वस्तूची) कशी भीति वाटेल ?

English meaning

Similarly when the seed-like particle of the state of Jeeva is completely crushed what fear has he of the phantom of worldly life?

1273
मूळ

म्हणौनि धनंजया । तू संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥1273॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने तू हा इतरास दुस्तर असलेला संसार सहज तरून जाशील. (तरून जाणं आहे इतकेंही सत्यत्व त्याचे ठिकाणी उरणार नाही)

English meaning

Therefore, O Dhananjaya, by my grace you will escape from the net of this worldly life.

1274
मूळ

अथवा हन अहंभावे । माझे बोलणे हे आघवे । कानामनाचिये शिवे । नेदिसी टेको ॥1274॥

मराठी अर्थ

अथवा, सर्वज्ञतेच्या किंवा अभिमानाच्या तोऱ्यात तू हे माझे बोलणे नुसते ऐकणारही नाहींस किंवा मनावरही घेणार नाहीस.

English meaning

And if on the contrary, you will not lend your ear or attend to my advice by your mind,

1275
मूळ

तरी नित्य मुक्त अव्ययो । तू आहासि ते होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगी ॥1275॥

मराठी अर्थ

तर, वस्तुतः तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस ते सर्व व्यर्थ होऊन, देहसंबधाने होणारे सर्व दुःखाघात तुला सोसावे लागतील.

English meaning

Then, though you are endless and eternally free, that will be lost to you and you will get a hard beating by your pride about your body.

1276
मूळ

जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदी आत्मघातु । भुंजता उसंतु । कहीचि नाही ॥1276॥

मराठी अर्थ

ह्या देहात्मबुद्धीने पावलो पावली, आत्मघात होत असतो व विसावा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही.

English meaning

In the attachment with this physical body one has to suffer death every step and one does not get a moment's respite.

1277
मूळ

येवढेनि दारुणे । निमणेनवीण निमणे । पडेल जरी बोलणे । नेघसी माझे ॥1277॥

मराठी अर्थ

माझ्या भाषणाकडे तू दुर्लक्ष केलेस तर, वस्तुतः तू अमर असूनही तुला मरणासारखे दारुण दुःख भोगावे लागेल.

English meaning

Therefore, if you will not pay heed to my advice, you will be as good as dead without actually dying.

1278
मूळ

पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । का दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषे अहंकारु । पोषूनि तैसा ॥1278॥

मराठी अर्थ

पथ्य मोडणारा ज्वराला व दीप फोडणारा अंधकारला, तसा विचार सोडणारा अहंकाराला पुष्ट करितो.

English meaning

Just as one who does not follow the rules of proper diet, increases the severity of the disease, one who is against light, gives more strength to the darkness; if you disregard the sane thought of discrimination, and give nourishment to your ego

1279
मूळ

स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥1279॥

मराठी अर्थ

आपला देह तो अर्जुन, दुसऱ्यांचे देह ते स्वजन, आणि त्यांच्याबरोबर युद्ध म्हणजे पापकर्म.

English meaning

And call your body as Arjuna, the other's bodies as your kith and kin, and give the war a name of sin or some bad thing,

1280
मूळ

इया मती आपुलिया । तिघा तीन नामे यया । ठेऊनिया धनंजया । न झुंजे ऐसा ॥1280॥

मराठी अर्थ

ह्या तीन गोष्टींना आपल्या, बुद्धीप्रमाणे अशी तीन नांवे देऊन, अर्जुना, मी युद्ध करणार नाही असा-

English meaning

O Dhananjaya, if you give these three names to these three and say - "I shall not fight"-

1281
मूळ

जीवामाजी निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वाया धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥1281॥

मराठी अर्थ

चित्तांत दृढनिश्चय करून जरी तू बसला असलास तरी तुझा नैसर्गिक म्हणजे जन्मजात, स्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही.

English meaning

Even if you express your determination like this in this world, your inborn tendency, your natural inclination will make your determination an empty, vain thing.

1282
मूळ

आणि मी अर्जुन हे आत्मिक । यया वधु करणे हे पातक । हे मायावाचूनि तात्त्विक । काही आहे ? ॥1282॥

मराठी अर्थ

आणि विचार करून पाहिले तर, ” मी अर्जुना, हे माझे ह्यांचा वध करणे म्हणजे पातक ” इत्यादि समजूत, म्हणजे तत्त्वदृष्टया केवळ भ्रमावाचून दुसरे काही आहे काय ?

English meaning

And is there any truth except sheer illusion in your concept that you are Arjuna, these are your relatives and it is a great sin to kill these?

1283
मूळ

आधी जुंझार तुवा होआवे । मग झुंजावया शस्त्र घेयावे । का न जुंझावया करावे । देवांगण ॥1283॥

मराठी अर्थ

अरे, प्रथम तूच युद्धाला तयार झालास त्याकरिता शस्त्रही धारण केलेस व आता ऐन प्रसंग मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस ?

English meaning

It is all very strange that you were ready to fight, then you wielded your weapons for fighting, and after all this preparation now you should adamantly take a vow not to fight!

1284
मूळ

म्हणौनि न झुंजणे । म्हणसी ते वायाणे । ना मानू लोकपणे । लोकदृष्टीही ॥1284॥

मराठी अर्थ

म्हणून, झुंजणार नाही असे जे म्हणत आहेस ते व्यर्थ होय. आम्हाला तर ते खरे वाटत नाहीच, पण लोकही हे खरे आहे असे मानणार नाहीत.

English meaning

Therefore, there is no substance nor any sense from the worldly point of view also, in your saying that you are not going to fight.

1285
मूळ

तऱ्ही न झुंजे ऐसे । निष्टंकीसी जे मानसे । ते प्रकृति अनारिसे । करवीलचि ॥1285॥

मराठी अर्थ

तरी युद्ध करू नये असा जो चित्तांत सारखा विचार सुरू आहे, तो तुझा क्षात्रस्वभावच अन्यथा करील. (फिरवील)

English meaning

It is certain that your natural inclination will defeat your decision not to fight.

1286
मूळ

पै पूर्वे वाहता पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणी । तरी आग्रहोचि उरे ते आणी । आपुलिया लेखा ॥1286॥

मराठी अर्थ

अहो, पूर्वदिशेकडे पाणी वाहत असता, कोणी पश्चिमेकडे तोंड करून पोहू लागला, त्याचा आग्रह मात्र उरणार; पाणी त्यास आपल्या ओघाकडे आणणारच.

English meaning

If a swimmer tries to swim towards west in the stream which is flowing forcefully towards east, his effort will only be his madness and that water will drown him for certain.

1287
मूळ

का साळीचा कणु म्हणे । मी नुगवे साळीपणे । तरी आहे आन करणे । स्वभावासी ? ॥1287॥

मराठी अर्थ

साळीच्या बीयाने साळीपणाने न उगविण्याचे ठरविले तर ही अस्वाभाविक गोष्ट शक्य आहे काय ?

English meaning

If the rice seed will say, "I will not grow as rice,'' can it disregard its natural growth?

1288
मूळ

तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तू ॥1288॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, जन्मतः क्षात्रसंस्कारसिद्ध प्रकृतीने घडलेला किंवा बनलेला बनलेला जो तूं, तो ह्या क्षणी युद्ध करणार नाही असे जरी म्हणालास तरी ते व्यर्थ होय; ती तुझी प्रकृति तुला उठविणारच.

English meaning

O the wise one! similarly, your nature has been developed as a Kshatriya, and though you say that you will not get up to fight, that nature will make you get up, no doubt.

1289
मूळ

पै शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मता । प्रकृती तुज ॥1289॥

मराठी अर्थ

अर्जुना, तेज, शौर्य, दक्षता आदि तुझ्या अंगचे गुण प्रकृतिसिद्ध किंवा जन्मजात आहेत.

English meaning

O the son of Pandu, in your character, qualities like bravery, daring, alertness, etc., are imbibed most naturally.

1290
मूळ

तरी तयाचिया समवाया- । अनुरूप धनंजया । न करिता उगलिया । नयेल असो ॥1290॥

मराठी अर्थ

तर, त्या गुणानुरूप न वागता तु स्वस्थ बसू म्हणशील तर प्रकृति तुला तसे करू देणार नाही.

English meaning

Your nature will not let you sit quietly without doing what that nature dictates.

1291
मूळ

म्हणौनिया तिही गुणी । बांधिलासि तू कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणी । क्षात्राचिया ॥1291॥

मराठी अर्थ

अर्जुना, त्या गुणांनी तू जन्मतः बांधलेला आहेस. अखेर ते तुला क्षात्र वळणावर नेणारच.

English meaning

O the wielder of the great bow, you are bound by these qualities and, therefore, for all practical purposes, you are bound to act as Kshatriya.

1292
मूळ

ना हे आपुले जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजे ऐसे अढळ । व्रत जरी घेसी ॥1292॥

मराठी अर्थ

अथवा आपला जन्म कोणत्या कुलांत आहे. ह्याचा काहींएक विचार न करिता नुसता लढणार नाही असा निश्चय करून बसशील.

English meaning

If without taking into consideration your inborn nature. you ignorantly keep up with your decision not to fight,

1293
मूळ

तरी बांधोनि हात पाये । जो रथी घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवी ॥1293॥

मराठी अर्थ

तरी, हातपाय बांधून रथीत घातलेला मनष्य स्वतः न चालतांही जसा रथाबरोबर देशांतराला पोचतो

English meaning

Then, just as a person who with his hands and feet tied, sits in a chariot he has to go with the moving chariot;

1294
मूळ

तैसा तू आपुलियाकडुनी । मी काहीच न करी म्हणौनि । ठासी परी भरवसेनि । तूचि करिसी ॥1294॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपण काही करणार नाही अशा निश्चयाने तू जरी असलास तरी, खात्रीने तूच ते करणार.

English meaning

Similarly though you try to sit tight with adamant decision that you will not do anything, I am sure that you are definitely going to act.

1295
मूळ

उत्तरु वैराटीचा राजा । पळता तू का निघालासी झुंजा ? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥1295॥

मराठी अर्थ

विराट नगराचा राज उत्तर, युद्धांतून पळू लागला, तेव्हा तू रे का ते युद्ध केलेस ? हा तुझा क्षात्रस्वभाव तुला युद्ध करू लावणारच.

English meaning

Remember how you got up and went with Uttara, the prince of Virat country, to fight with Kauravas. The same warrior spirit will compel you to fight now also.

1296
मूळ

महावीर अकरा अक्षौहिणी । तुवा येके नागविले रणांगणी । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूते ॥1296॥

मराठी अर्थ

अर्जुना, त्या युद्धांत अकरा अक्षौहिणी महावीर तू एकटयानं पराजित करून त्यांची वस्त्रे हिराऊन घेतलीस, तो तुझा क्षत्रियाचा स्वभाव तुला झुंजविणारच.

English meaning

You have had single-handedly defeated the vast armies at the critical juncture of cows of the King Virat being stolen. O the wielder of the Bow; the same nature will make you ready to fight.

1297
मूळ

हा गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? । परी भोगविजे बळिया । अदृष्टे जेणे ॥1297॥

मराठी अर्थ

अरे, रोग्याला रोगाची किंवा निर्धनाला निर्धनत्वाची काय आवड असते ? पण बलवान अदृष्ट तसे भोग देतेच.

English meaning

Does a sufferer like his ailment? Does a poor man like his poverty? But they have to suffer those conditions by their destiny!

1298
मूळ

ते अदृष्ट अनारिसे । न करील ईश्वरवशे । तो ईश्वरुही असे । हृदयी तुझ्या ॥1298॥

मराठी अर्थ

ईश्वराधीन असलेले ते अदृष्ट अन्यथा काहीही करू शकत नाही; व तो ईश्वरही तुझ्याच हृदयाच्या ठिकाण आहे,

English meaning

The same destiny will not hesitate from doing its work by the power of God, and that God is dwelling in your heart!

1299
मूळ

सर्व भूतांच्या अंतरी । हृदय महाअंबरी । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी । उदयला असे जो ॥1299॥

मराठी अर्थ

भूतमात्रांच्या अंतःकरणरूपी महाकाशांत, जो ज्ञानवृत्तिरूप अनंत किरणांनी उदय पावला आहे

English meaning

The sunlike God arises in the inner organ of all beings, in the space of their hearts, and shines with thousands of rays which are the various attitudes of their minds.

1300
मूळ

अवस्थात्रय तिन्ही लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥1300॥

मराठी अर्थ

व जो जीवांच्या जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थारूप लोकास प्रकाशून, देहात्मबुद्धीच्या विपरीत ज्ञानाने सन्मार्गच्युत झालेल्या त्या जीवरूपी पांथिकांना ( वाटसरूंना जागे करितो.

English meaning

He illuminates all the three worlds in all the three states of waking, dreaming and sleep, and awakens all these pilgrims who are walking on the mistaken illusory path of worldly life.

1301
मूळ

वेद्योदकाच्या सरोवरी । फांकता विषयकल्हारी । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमराते ॥1301॥

मराठी अर्थ

व जो दृश्यपदार्थ हेच आहे उदक ज्यात, अशा सरोवरांत पंचविषयरूप कमले प्रफुल्लीतझाली असता, पंचज्ञानेंद्रिये व मन हे आहेत सहा पाय ज्या जीवभ्रमरांना, त्यांजकडून तो कमलगंध सेवन करवितो.

English meaning

The God, like the Sun, illumines the lotus flowers of objects, in the lake of water of visible objects, and feeds continuously the black-bees having six feet of five senses and the mind, with the honey of joy.

1302
मूळ

असो रूपक हे तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥1302॥

मराठी अर्थ

हे रूपक असो; असा समष्टिभूतांच्या अहंकाराचा अभिमान निरंतरधारण करून जो मिरवत असतो. तो ईश्वर होय.

English meaning

But enough of this imagery. The god who dwells in the heart, wears the veil of ego at all times.

1303
मूळ

स्वमायेचे आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौऱ्यांशी लक्ष ॥1303॥

मराठी अर्थ

आपल्या शुद्ध स्वरूपाच्या आपल्याच मायेचा पडदा लावून, एकटा सर्व दोरी हलवून, बाहेर चौऱ्यांंशी लक्ष विचित्र छायाचित्रे नाचवितो.

English meaning

Remaining hidden behind the screen of his own Maya, he pulls all the ropes and shows on the stage of the world a grand puppet dance of eighty-four lakhs of creatures.

1304
मूळ

तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजाता । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥1304॥

मराठी अर्थ

तो, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत अशेष भूतमात्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार देह देतो.

English meaning

He decorates every creature with properly fitting apparel of body, to which the creature becomes attached and thinks that he is his body only.

1305
मूळ

तेथ जे देह जयापुढे । अनुरूपपणे मांडे । ते भूत तया आरूढे । हे मी म्हणौनि ॥1305॥

मराठी अर्थ

त्यावेळी, ज्या भूतापुढे जो देह त्याला योग्य किंवा अनरूप म्हणून मांडवा, त्या देहांत ते भूत, ‘ हा मी ” अशा बुद्धीने प्रवेश करिते.

English meaning

He decorates every creature with properly fitting apparel of body, to which the creature becomes attached and thinks that he is his body only.

1306
मूळ

सूत सूते गुंतले । तृण तृणचि बांधले । का आत्मबिंबा घेतले । बाळके जळी ॥1306॥

मराठी अर्थ

सुताने सूत गुंतवावे, गवतानेच गवत बांधावे, किंवा बालकाने पाण्यातील आपले प्रतिबिंब घेऊ पहावे.

English meaning

Just as a thread gets entangled with another thread, or a blade of grass gets twisted with another blade of grass, or a child tries to grasp its reflection in the water,

1307
मूळ

तयापरी देहाकारे । पापियाचा आपणपेचि दुसरे । देखोनि जीव आविष्करे । आत्मबुद्धि ॥1307॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे पुढे दिसणारी देहाकृति ही आपणच आहो असे भ्रमाने मानून जीव तेथे आत्मबुद्धीने आविर्भूत होतो.

English meaning

The Jeeva sees his own shadow which is his body and starts thinking that he is his body only.

1308
मूळ

ऐसेनि शरीराकारी । यंत्री भूते अवधारी । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥1308॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे देहाकार यंत्रांवर भूतांना घालून, त्यांच्या प्रारब्धकर्मानुसार ईश्वर सूत्र चाळवतो.

English meaning

In this way the God, who dwells in the heart of every being, puts Jeevas on the machinery, the wheel of the body and moves the process of Karma and its results.

1309
मूळ

तेथ जया जे कर्मसूत्र । मांडूनि ठेविले स्वतंत्र । ते तिये गती पात्र । होचि लागे ॥1309॥

मराठी अर्थ

तेथे ज्या ज्या भूताचे (जीवाचे) जे जे स्वतंत्र (निराळे) प्रारब्धसूत्र मांडलेले असते त्या त्या गतीला ते ते भूत प्राप्त होऊ लागले.

English meaning

In that process every being adapts to the movement according to the past threads attached to it individually.

1310
मूळ

किंबहुना धनुर्धरा । भूतांते स्वर्गसंसारा । -माजी भोवंडी तृणे वारा । आकाशी जैसा ॥1310॥

मराठी अर्थ

किंबहुना अर्जुना, वारा गवताच्या काड्या जशा आकाशात इतस्ततः उडवितो, तसे हे जीवाचे प्रारब्धकर्म त्यांना स्वर्गा पासून मृत्युलोकापर्यंत इतस्ततः फिरविते.

English meaning

O the great Archer! Just as the wind whirls the dry grass blades in the sky freely, so, the God throws the Jeevas between the heaven and the earth.

1311
मूळ

भ्रामकाचेनि संगे । जैसे लोहो वेढा रिगे । तैसी ईश्वरसत्तायोगे । चेष्टती भूते ॥1311॥

मराठी अर्थ

लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंडाला जशी गति प्राप्त होते, ती ईश्वरसत्तेच्या योगाने भूते व्यवहार करतात.

English meaning

Just as iron moves by the vicinity of a magnet, the beings move by the power of God.

1312
मूळ

जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया । चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकी ॥1312॥

मराठी अर्थ

ज्या प्रमाणे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्रादिकांच्या ठीकाणी हालचाल (चेष्टा) चालू होते.

English meaning

Just as by the vicinity of the Moon, sea and other things undergo changes,

1313
मूळ

तया सिंधू भरिते दाटे । सोमकांता पाझरु फुटे । कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥1313॥

मराठी अर्थ

या चेष्टा अशा-समुद्राला भरती येते, सोमकांत मण्याला पाझर फुटतो; चंद्रविकासिनी कमले फुलतात व व चकोर पक्षांस आनंद होतो.

English meaning

Which means that there is high tide in the sea, the Somakant stone becomes liquid and the bird Chakora becomes happy and the night lilies bloom.

1314
मूळ

तैसी बीजप्रकृतिवशे । अनेके भूते येके ईशे । चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयी ॥1314॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे मूलप्रकृतीच्या अनुरोधाने ईश्वर अनेक भूतमात्र एकसमयावच्छेदैकरून चाळवितो, तो तुझ्या हृदयामध्ये वास करून आहेच.

English meaning

Similarly the only God with the force of the root Prakriti makes all the beings function in their various ways and the same God is in your heart.

1315
मूळ

अर्जुनपण न घेता । मी ऐसे जे पंडुसुता । उठतसे ते तत्वता । तयाचे रूप ॥1315॥

मराठी अर्थ

अर्जुनाच्या भावनेला स्पर्श न करिता ” केवल मी (अस्तितामात्र) असे जे नित्यस्फुरद्रूप चैतन्य ते त्या ईश्वराचे (परमात्मा) तात्विकरूप होय,

English meaning

The sense of I, without the name of Arjuna- which is present in you, is that God in His real nature.

1316
मूळ

यालागी तो प्रकृतीते । प्रवर्तवील हे निरुते । आणि ते झुंजवील तूते । न झुंजशी जऱ्ही ॥1316॥

मराठी अर्थ

म्हणून तो ईश्वर, प्रकृतीला प्रवृत्त करून तिच्या द्वारे झुंजणार ही असा निश्चय करून बसलेल्या तुला लढवील हे निश्चित होय.

English meaning

Therefore, there is no doubt that this God will govern the Prakriti herself and will definitely compel you to fight even if you decline.

1317
मूळ

म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणे प्रकृती हे नेमावी । तिया सुखे राबवावी । इंद्रिये आपुली ॥1317॥

मराठी अर्थ

म्हणून, सर्व व्यवहाराचा ईश्वर हा मी आहे तो प्रकृतीचे नियमन करितो व तिच्या द्वारा आपली सर्व इंद्रिये आपपला व्यवहार सुखाने किंवा सूरळीत करितात.

English meaning

Thus God is all-powerful and He controls the Prakriti and that Prakriti activates our organs.

1318
मूळ

तू करणे न करणे दोन्ही । लाऊनि प्रकृतीच्या मानी । प्रकृतीही का अधीनी । हृदयस्था जया ॥1318॥

मराठी अर्थ

म्हणून तू, करणे न करणे वगैरे सर्व गोष्टी प्रकृतीवर सोपवून तीही ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे.

English meaning

So, you should leave the decision whether to fight or not to fight in the hands of that Prakriti, which herself is under the command of the God residing in your heart.

1319
मूळ

तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग । महोदधी का गांग । रिगाले जैसे ॥1319॥

मराठी अर्थ

त्याला, गंगानदी जशी महासागराला शरण जाते (मिळते) तसा काया, वाचा, करून शरण हो. (अनन्य, तद्रूप)

English meaning

And just as the waters of the river Ganges enter the sea totally, you should enter and merge in this with all your inspiration, your body, speech and mind whole-heartedly.

1320
मूळ

मग तयाचेनि प्रसादे । सर्वोपशांतिप्रमदे । कांतु होऊनिया स्वानंदे । स्वरूपींचि रमसी ॥1320॥

मराठी अर्थ

मग त्याच्या प्रसादाने, सर्वाचे खऱ्या विश्रांतीचे स्थान जी शान्ति स्त्री तिचा तू स्वामी होऊन निजानंदस्वरूपात रममाण होशील

English meaning

Then by His grace you will enjoy your own Atmic state, being wedded to the young woman named `peace'.

1321
मूळ

संभूति जेणे संभवे । विश्रांति जेथे विसंवे । अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥1321॥

मराठी अर्थ

जे उत्पत्ति स्थिति, लयाचे आदिकारण, (अधिष्ठान) विश्रांतीचे विश्रामस्थान व अनुभवाचाही अनुभव असे आहे.

English meaning

The husband of goddess Laxmi said further- "O Partha, you will be the eternal king of the kingdom of Atman, where the creation of the universe begins, and the rest takes the final rest and experience itself experiences the experience. |

1322
मूळ

तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो । म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तू गा ॥1322॥

मराठी अर्थ

या स्वात्मस्वरूपपदाचा राजा होऊन, अर्जुना, तेथून तू कधीही च्युत होणार नाहीस बरें, असे लक्ष्मीपति भगवान श्रीकृष्ण म्हणाले.

English meaning

The husband of goddess Laxmi said further- "O Partha, you will be the eternal king of the kingdom of Atman, where the creation of the universe begins, and the rest takes the final rest and experience itself experiences the experience. |

1323
मूळ

हे गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचे मथित । आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ॥1323॥

मराठी अर्थ

शब्दराशि सर्व वाङ्मयरूप जो वेद त्याच्या मंथनाने काढलेले हे प्रसिद्ध गीतामृत होय; ह्याच्या सेवनाने करतलावरील रत्नाप्रमाणे आत्मस्वरूप हस्तगत (अपरोक्ष)

English meaning

This is the juice of all the spiritual literature, by name Geeta, by learning which the jewel which is Atman is directly perceptible.

1324
मूळ

ज्ञान ऐसिया रूढी । वेदांती जयाची प्रौढी । वानिता कीर्ति चोखडी । पातली जगी ॥1324॥

मराठी अर्थ

ह्या गीताशास्त्राचे, वेदान्तांत ज्याची अत्यंत थोरवी गाइली आहे असे ज्ञान हे रूढनाम आहे; ‘तिच्या; वर्णनाने शास्त्रे जगात कीर्ती पावली

English meaning

It is famous throughout the world because it is the knowledge which is most honourably so declared in Vedas.

1325
मूळ

बुद्ध्यादिके डोळसे । हे जयाचे का कडवसे । मी सर्वद्रष्टाही दिसे । पाहला जया ॥1325॥

मराठी अर्थ

ज्या ज्ञानाच्यापुढे बुद्धयादिक म्हणून गणली गेलेली डोळस ज्ञाने ही केवळ अणुमात्र होत; व ज्याच्या उदयाने सर्वद्रष्टा जो मी, त्याचे दर्शन होते.

English meaning

This is that knowledge by which light the intellect etc. can see and by the rising of which, I who am all-seeing can also be seen.

1326
मूळ

ते हे गा आत्मज्ञान । मज गोप्याचेही गुप्त धन । परी तू म्हणौनि आन । केवी करू ? ॥1326॥

मराठी अर्थ

अरे, ते हे आत्मज्ञान, सर्वाना गूढ असणारा जो मी त्या माझेही गुप्तधन होय; परंतु, तूच म्हणून ते कसे चोरून ठेवावे ?

English meaning

This is that self knowledge. This is the most secret treasure of mine, who am really abstract, invisible, unmanifest! But how can I keep it from you?

1327
मूळ

याकारणे गा पांडवा । आम्ही आपुला हा गुह्य ठेवा । तुज दिधला कणवा । जाकळिलेपणे ॥1327॥

मराठी अर्थ

ह्याचकरिता अर्जुना, तुजवर संतुष्ट होऊन तुझ्याविषयींच्या कळकळीने आम्ही आपला हा गुप्त ठेवा तुला दिला

English meaning

Therefore O Pandava, we have revealed this hidden treasure to you, because we are motivated by compassion.

1328
मूळ

जैसी भुलली वोरसे । माय बोले बाळा दोषे । प्रीति ही परी तैसे । न करूचि हो ॥1328॥

मराठी अर्थ

मातेच्या अंतःकरणातील स्नेह जसा तिला बालकापाशी बोलवितो, तीच स्थिति, तुजविषयींचे आमच्या अंतःकरणातील प्रेम, आमची का करणार नाही ?

English meaning

When a mother is overwhelmed by her love for her child, she also talks in a babbling manner freely with it. Then would not our love provoke us to speak out like it?

1329
मूळ

येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे । का दिव्याकरवी करविजे । दिव्य जैसे ॥1329॥

मराठी अर्थ

येथे आकाश जसे गाळून घ्यावे, अमृताचीही साल काढावी, किंवा प्रतिज्ञेनेच जशी प्रतिज्ञा करावी.

English meaning

Here, as if the sky should be put in a strainer, the nectar should be peeled, or the test by fire should be asked to undergo the test by fire.

1330
मूळ

जयाचेनि अंगप्रकाशे । पाताळीचा परमाणु दिसे । तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदले ॥1330॥

मराठी अर्थ

ज्याच्या तेजाने पाताळींचे परमाणुही दिसतात, त्या सूर्याच्या डोळ्यातच जसे अंजन घालवे,

English meaning

Or even in the eyes of the Sun, by whose light every particle in all the worlds becomes lighted, one should put divine ointment.

1331
मूळ

तैसे सर्वज्ञेही मिया । सर्वही निर्धारूनिया । निके होय ते धनंजया । सांगितले तुज ॥1331॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, सर्वज्ञही जो मी, त्या मी सर्व गोष्टींचा निर्णय करून, जे सत्यातले सत्य ठरले ते अर्जुना, तुला सांगितले.

English meaning

In that manner, this sheer truth is told by me, who am omniscient, after thoroughly considering all the aspects of this knowledge! O Dhananjaya!

1332
मूळ

आता तू ययावरी । निके हे निर्धारी । निर्धारूनि करी । आवडे तैसे ॥1332॥

मराठी अर्थ

आता, यापुढे, तू आपला तूच काय तो निश्चय कर; आणि निश्चय ठरला म्हणजे जे तुझ्या इच्छेस येईल ते कर (मुक्तीचे शुद्ध स्वरूप).

English meaning

Now you may do as you wish after fully considering all this and giving your thought to it.

1333
मूळ

यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला । तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥1333॥

मराठी अर्थ

असे देवाचे भाषण चालू असता अर्जुन स्तब्ध बसला; हे पाहून देव म्हणाले, ” खरा मतलबी आहेस रे. ”

English meaning

On listening to this talk of the Lord, Arjuna remained quiet. Then the Lord said, "O! You are not easily convinced!"

1334
मूळ

वाढतयापुढे भुकेला । उपरोधे म्हणे मी धाला । तै तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥1334॥

मराठी अर्थ

वाढणारा पुढे, भुकेला मनुष्य भिडेनं पुरेपुरे ” म्हणाला तर भुकेची पीडा त्यालाच होणार व त्या पीडेचा दोषही त्यालाच आहे.

English meaning

If a man while dinning says that he is satisfied though he is not; he will go hungry because of his shyness and further he will be a liar.

1335
मूळ

तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु । न पुसिजे जै आभारु । धरूनिया ॥1335॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, सर्वज्ञ श्रीगुरूची गाठ पडूनही, आत्मनिश्चयाविषयींचा प्रश्न मनातील संकोच वृत्तीमुळे केला नाही.

English meaning

Similarly if a disciple hesitates to ask questions to an omniscient Guru, feeling that it is a great burden of obligation that the Guru has taught so much.

1336
मूळ

तै पापियाचा आपणपेचि वंचे । आणि पापही वंचनाचे । आपणयाचि साचे । चुकविले तेणे ॥1336॥

मराठी अर्थ

तर, आपणच आपल्याला ठकविल्यासारखे होऊन त्या वंचनेचा दोषही त्याच्याकडेच येतो; व आपले सत्स्वरूप त्याचे त्यानेच दुराविले असे होते.

English meaning

He would be deceiving himself only; and the sin of self deception would also be done by him.

1337
मूळ

पै उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो की धनंजया । जे एकवेळ आवांकुनिया । सांगावे ज्ञान ॥1337॥

मराठी अर्थ

अर्जुना, तुझ्या उगेपणावरून तुझा असा भाव दिसतो की, आम्ही पुन्हा एकदां पूर्णपणे आत्मज्ञानाची उजळणी करावी.

English meaning

O Dhananjaya, your silence means, I think, that you wish that I should again tell you the gist of this knowledge.

1338
मूळ

तेथ पार्थु म्हणे दातारा । भले जाणसी माझिया अंतरा । हे म्हणो तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥1338॥

मराठी अर्थ

तेव्हा पार्थ म्हणाला, प्रभो बरोबर माझे मन ओळखिलें; पण इतकेंही म्हणण्याचे कारण नाहीं; देवा, आपल्यावाचून अंतर्यामी जाणणारा दुसरा कोण आहे ?

English meaning

(Saint Dnyneshwar says) That time, Partha said - "O my generous Krishna, you very well know my mind. Anyway, who is more knowledgeable here?

1339
मूळ

येर ज्ञेय हे जी आघवे । तू ज्ञाता एकचि स्वभावे । मा सूर्यु म्हणौनि वानावे । सूर्याते काई ? ॥1339॥

मराठी अर्थ

कारण, सर्व विश्व तूझे ज्ञेय असून त्याचा स्वभावसिद्ध ज्ञाता तूच एक आहेस; सूर्याची तुम्ही सूर्य म्हणून कोणी स्तुति करितो काय ?

English meaning

Actually everything other is the object of knowledge and you are the only knower. So, what is the point in describing the 'Sun' as the 'Sun'?"

1340
मूळ

या बोला श्रीकृष्णे । म्हणितले काय येणे । हेचि थोडे गा वानणे । जे बुझतासि तू ॥1340॥

मराठी अर्थ

या अर्जुनाच्या भाषणावर देव म्हणाले, अरे, आम्ही सांगितलेले तू समजतोस, हे काय आमचे थोडे वर्णन आहे ?

English meaning

Upon this, Lord Shrikrishna asked- "Do you consider it an ordinary thing that you are praising me in these words?

1341
मूळ

तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझे निर्मळ । अवधारी पा ॥1341॥

मराठी अर्थ

तूझ्या मनातच आहे तर, पुन्हा एकवेळ मोकळ्या मनाने माझे निर्मळ भाषण श्रवण कर.

English meaning

So, now give your comprehensive attention and listen to my teaching in its purity.

1342
मूळ

हे वाच्य म्हणौनि बोलिजे । का श्राव्य मग आयिकिजे । तैसे नव्हे परी तुझे । भाग्य बरवे ॥1342॥

मराठी अर्थ

वाणीचा विषय म्हणून बोलावे किंवा श्रवणाचा विषय म्हणून हे ऐकावे असा हा विषय नाही; पण तुझे भाग्यच थोर म्हणावे लागते

English meaning

It is not merely to be spoken by me, because it is worth speaking and you should hear because it is worth hearing; rather it is your great good fortune that has arisen now.

1343
मूळ

कूर्मीचिया पिलिया । दिठी पान्हा ये धनंजया । का आकाश वाहे बापिया । घरीचे पाणी ॥1343॥

मराठी अर्थ

अर्जुना, कांसवीच्या पिलांचे तिच्या दृष्टीच्या पान्ह्याने रक्षण होते; किंवा (जे आपल्यामध्ये केव्हांही काही सांठवीत नाही) ते आकाशही आपल्या अवकाशांत चातकासाठी जल धारण करतें.

English meaning

O Dhananjaya, is it not a fact that the young ones of the mother tortoise get nourishment directly through her eyes even from a distance, and is it not a fact that the sky itself does the work as a water-man for the bird Chataka?

1344
मूळ

जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचे फळचि तेथ जोडे । काय दैवे न सापडे । सानुकूळे ? ॥1344॥

मराठी अर्थ

जी वस्तु, कोणत्याही व्यवहाराचा विषय नसते (अव्यवहार्य ती वस्तु, जेव्हा जोडली जाते तेव्हा एकदम ‘फल’ ) म्हणूनच जोडली जाते (साध्यसाधनरूपाने नव्हे); दैव सानुकूल असल्यावर काय प्राप्त होणार नाही ?

English meaning

So, we see that these impossible things also happen where they are not normally expected. Therefore, who can tell what benefit one will not get if luck is on one's side?

1345
मूळ

येऱ्हवी द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरी । भोगिजे ते अवधारी । रहस्य हे ॥1345॥

मराठी अर्थ

एऱ्हवी पाहता, सर्व द्वैतप्रपंचाचा निरास करून, केवल ऐक्याच्या दालनात, अनुभव, अनुभविता, अनुभाव्य अशा त्रिपुटीद्वारा नव्हे तर केवल अनुभूतित्वाने ज्याचा भोग असतो असे हे रहस्य (गौप्य) आहे हे लक्ष्यात असूदे.

English meaning

Actually this knowledge is so strange that it can be enjoyed in unity only by sidetracking the circle of qualities.

1346
मूळ

आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जे प्रियोत्तमा । ते दुजे नव्हे की आत्मा । ऐसेचि जाणावे ॥1346॥

मराठी अर्थ

अर्जुना, निरुपचार म्हणजे निर्निमित्त प्रेमाचा जो विषय, किंवा जे स्थान, ते दुसरे तिसरे काहीही नसून आत्मा होय असेच समज.

English meaning

And my dearest friend, you should also know that the bliss in which there is nothing artificial or outwardly showy, is the bliss of the state of Atman only.

1347
मूळ

आरिसाचिया देखिलया । गोमटे कीजे धनंजया । ते तया नोहे आपणया । लागी जैसे ॥1347॥

मराठी अर्थ

अर्जुना, आरशांत चांगले प्रतिबिंब दिसावे म्हणून तो स्वच्छ करितात आरशाकरिता नव्हे तर ते आपल्यासाठीच जसे असते,

English meaning

Dhananjaya, please consider this. The mirror in which we see our reflection, is cleaned by us only, but that is not for the sake of the mirror. It is for our sake.

1348
मूळ

तैसे पार्था तुझेनि मिषे । मी बोले आपणयाचि उद्देशे । माझ्या तुझ्या ठाई असे । मी तू पण गा ॥1348॥

मराठी अर्थ

तसे तुझ्या निमित्ताने, पण स्वतःसाठींच, मी हे बोलत आहें; अरे, तुझ्यामाझ्यामध्ये तू आणि मी असा भेद आहे काय ?

English meaning

So, Partha, I am talking to myself only, using you as another person for the sake of dialogue, but it is a dialogue with myself, because, is there real difference between us as the "me" and the "you"?

1349
मूळ

म्हणौनि जिव्हारीचे गुज । सांगतसे जीवासी तुज । हे अनन्यगतीचे मज । आथी व्यसन ॥1349॥

मराठी अर्थ

म्हणून, अगदी जिव्हाळयाची गुप्त गोष्ट तू माझा जो प्राण त्या तुला सांगितली; अरे, अनन्य भक्तांचे मला असे व्यसनच (छंद) आहे

English meaning

Thus I am telling the innermost treasure of my soul, as if telling it to me only, because I am very fond of such one-pointed devotees.

1350
मूळ

पै जळा आपणपे देता । लवण भुलले पंडुसुता । की आघवे तयाचे होता । न लजेचि ते ॥1350॥

मराठी अर्थ

जलाला स्वत्व अर्पण करितांना मिठाला स्वत:चे जसे स्मरण रहात नाही किंवा आपण सर्व जलरूप होतांना ते लाजत नहीं.

English meaning

O the son of Pandu, for example, consider how while giving itself over to water, the salt totally becomes one with it, and is not hesitant in any way.

1351
मूळ

तैसा तू माझ्या ठाई । राखो नेणसीचि काही । तरी आता तुज काई । गोप्य मी करू ? ॥1351॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे तू ही मद्रूप होतांना आपण म्हणून निराळा काही रहातच नाहींस; मग तुझ्यापन काही गौप्य लपवावे हे, मी तरी कसे करणार ?

English meaning

Similarly, you do not keep anything reserved from me; so how can I keep anything back while teaching you?

1352
मूळ

म्हणौनि आघवीचि गूढे । जे पाऊनि अति उघडे । ते गोप्य माझे चोखडे । वाक्य आइक ॥1352॥

मराठी अर्थ

म्हणून, ज्या माझ्या गुप्त ठेव्या पुढे जगांतील इतर गौप्य ही उघडया बाजारासारखी ठरतात ते मझ शुद्ध रहस्यवाक्य श्रवण कर.

English meaning

So, now listen to the most sacred, the deepest secret of my teaching, compared to which all other secrets in the world become evidently open things.

1353
मूळ

तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकाते वीरा । विषयो करी ॥1353॥

मराठी अर्थ

अर्जुना, तुझ्या अंतर्बाह्य (मानसिक व कायिक ) सर्व क्रिया मी जो सर्वव्यापक त्याला विषय करून म्हणजे त्याच्या उद्देशाने कराव्या.

English meaning

You should do all your inner thinking and outer actions, making me their goal.

1354
मूळ

आघवा आंगी जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तू सर्व कर्मी तैसा । मजसीचि आस ॥1354॥

मराठी अर्थ

वायु सर्वागाने जसा आकाशामध्ये लीन असतो, तसा सर्व कर्मे करितांना तु मद्रूप बुद्धि ठेव.

English meaning

You should be within me totally, as the wind is totally within the sky.

1355
मूळ

किंबहुना आपुले मन । करी माझे एकायतन । माझेनि श्रवणे कान । भरूनि घाली ॥1355॥

मराठी अर्थ

किंबहुना स्वत:चे मन हे माझे रहाण्याचेच एक स्थान कर, आणि श्रवणांनाही मद्गुणश्रवणानेच भरून काढ.

English meaning

In other words, make your mind a temple only dedicated to me, and fill your ears always with the sound of my name and by my teaching.

1356
मूळ

आत्मज्ञाने चोखडी । संत जे माझी रूपडी । तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥1356॥

मराठी अर्थ

शुद्ध आत्म-ज्ञानयुक्त ज्या संतमूर्ती ती माझीच रूपे आहेत अशा भावनेने, कामुकाची कामिनीविषयी जशी दृष्टि असते, त्याप्रमाणेच, तुझी त्यांच्या चरणाविषयी आवड असावी.

English meaning

Just as a wife looks at her husband with love, your eyes should look at the saints who are my own counterparts pure with self knowledge.

1357
मूळ

मी सर्व वस्तीचे वसौटे । माझी नामे जिये चोखटे । तिये जियावया वाटे । वाचेचिये लावी ॥1357॥

मराठी अर्थ

सर्वाधिष्ठान जो मी, त्या माझी शुद्ध व गोड नामें, त्यांचा जिव्हेला सराव व्हावा म्हणून ती वाणीत धारण कर.

English meaning

I am the place where everything is situated. Therefore, let your tongue develop the habit of uttering my names and keep it alive and alert.

1358
मूळ

हातांचे करणे । का पायांचे चालणे । ते होय मजकारणे । तैसे करी ॥1358॥

मराठी अर्थ

हातांची क्रिया की पायांचा संचार हा सर्व माझ्या उद्देशाने होत असावा

English meaning

Make it a point to see that whatever your hands do or wherever your feet walk will always be for me.

1359
मूळ

आपुला अथवा परावा । ठायी उपकरसी पांडवा । तेणे यज्ञे होई बरवा । याज्ञिकु माझा ॥1359॥

मराठी अर्थ

स्वकीय अथवा परकीय यांवर जो उपकार तू करशील तो मदर्पण करून माझा याज्ञिक हो.

English meaning

O Pandava, whatever you will do to help others or oblige others, that will be the real Yadnya done by you for me.

1360
मूळ

हे एकैक शिकऊ काई । पै सेवके आपुल्या ठाई । उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करी ॥1360॥

मराठी अर्थ

अशी एकेक गोष्ट काय शिकवावी ? सर्व जग मद्रूप आहे अशी भावना करून व स्वतः सेवकभाव पत्करून तु सेवा कर.

English meaning

How many details should I touch to emphasize one thing? In short, consider yourself as a servant and consider everybody as me, and make yourself qualified for doing service.

1361
मूळ

तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु । ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तू माझा ॥1361॥

मराठी अर्थ

ह्याने सर्व भूतांविषय द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र नमन करण्याला मीच एक भरलो आहे असे वाटून तुला माझे अत्यंत सान्निध्य प्राप्त होईल.

English meaning

When you will do like that, hatred about all the beings will disappear and you will have humility by the understanding of myself as pervading everything and thus you will be totally having refuge in me.

1362
मूळ

मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु । होऊनि ठायील एकांतु । आम्हा तुम्हा ॥1362॥

मराठी अर्थ

मग ह्या सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन तुझा वा माझा असा एकांतच आढळून येईल.

English meaning

Then, in this apparently crowded world the idea of a third thing will disappear and there will be real privacy between you and me.

1363
मूळ

तेव्हा भलतिये आवस्थे । मी तूते तू माते । भोगिसी ऐसे आइते । वाढेल सुख ॥1363॥

मराठी अर्थ

मग वाटेल त्या स्थितीत तुला माझा व मला तुझा एकांतिक भोग घडत राहून सहजच सुखाची वृद्धि होईल

English meaning

Then, eventhough there may be any situation, we will enhance our enjoyment of mutual relationship because I will be yours and you will be mine.

1364
मूळ

आणि तिजे आडळ करिते । निमाले अर्जुना जेथे । ते मीचि म्हणौनि तू माते । पावसी शेखी ॥1364॥

मराठी अर्थ

आणि अर्जुना, सुखप्राप्तीच्या आड असणारी जी तिसऱ्याची म्हणजे जगदाभासाची निवृत्ति झाल्यावर तुलाही अखेर मद्रूप आहेस असे वाटून माझी प्राप्ति होईल.

English meaning

And, O Arjuna, when the impediment of the third factor will become extinct, you will merge into me by becoming me.

1365
मूळ

जैसी जळीची प्रतिभा । जळनाशी बिंबा । येता गाभागोभा । काही आहे ? ॥1365॥

मराठी अर्थ

याला उदाहरण- जलांतील प्रतिबिंबाला जल ह्या उपाधीच्या नाशानंतर मुख्य बिंबास ऐक्य पावण्यास काही श्रम का पडतात ? (ते नेहमीच बिंबरूप असते. )

English meaning

For example, is there any difficulty in the way of reflection in the water becoming one with the original object, when water is removed?

1366
मूळ

पै पवनु अंबरा । का कल्लोळु सागरा । मिळता आडवारा । कोणाचा गा ? ॥1366॥

मराठी अर्थ

तसेच वारा आकाशास मिळण्यास किंवा लाटेला समुद्राला भेटण्यास काही कोणाचा प्रतिबंध असतो काय ?

English meaning

Or what prevents a wave from mixing up with the sea or wind from being one with the sky?

1367
मूळ

म्हणौनि तू आणि आम्ही । हे दिसताहे देहधर्मी । मग ययाच्या विरामी । मीचि होसी ॥1367॥

मराठी अर्थ

म्हणून तू व आम्ही असा हा भेद देहोपाधीमुळे दिसत आहे, त्यांच्या निरासाने तू मद्रूपच होशील. (विचाराने आतांही आहेस. )

English meaning

Similarly we appear to be two because of the nature of the body, but when that body is not taken into account, you will become me.

1368
मूळ

यया बोलामाझारी । होय नव्हे झणे करी । येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥1368॥

मराठी अर्थ

ह्या माझ्या बोलण्याविषयीं ” असेल नसेल’ अशी शंका धरू नको; ह्यात अक्षरही अन्यथा नाही हे तुझीच शपथ घेऊन सांगतो.

English meaning

Do not have any doubt about this. If you think otherwise, I warn you by taking an oth of your own being.

1369
मूळ

पै तुझी आण वाहणे । हे आत्मलिंगाते शिवणे । प्रीतीची जाति लाजणे । आठवो नेदी ॥1369॥

मराठी अर्थ

तुझी शपथ वाहणे म्हणजे आत्म्याचीच शपथ घेण्यासारखे आहे; (वास्तविक हे अयोग्य होय ) पण प्रेमाची जातीच अशी असते की, योग्यायोग्य, लाज, शंका ही बंधने तिला आठवत नाहीत. 69.

English meaning

My dear, to swear by your name is like swearing by Atman only, by myself only, but the nature of real love is that it does not allow you to remember shyness.

1370
मूळ

येऱ्हवी वेद्यु निष्प्रपंचु । जेणे विश्वाभासु हा साचु । आज्ञेचा नटनाचु । काळाते जिणे ॥1370॥

मराठी अर्थ

वस्तुतः विचार केला तर जो ज्ञानस्वरूप, निष्प्रपंच (भेदभावरहित) असून, ज्याच्या सत्तेमुळे विश्वाला सत्यस्व आले आहे व ज्याच्या आज्ञेचे सामर्थ्य काळाला जिंकते असे आहे.

English meaning

Otherwise, I am the object of knowledge, I am free of the worldly life. I am the one by whose power, the world appears to be real and I am the one whose orders, even Time cannot disobey.

1371
मूळ

तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हिती बापु । मा आणेचा आक्षेपु । का करावा ? ॥1371॥

मराठी अर्थ

असा जो मी सत्यसंकल्प ईश्वर, व जगाच्या कल्याणाविषयी तत्पर असणारा, त्या मी शपथ, वाहणेचे कारणच काय ?

English meaning

When I am thus having always truthful thought and when I am continuously alert for the welfare or the world, why should I make an effort to swear at all?

1372
मूळ

परी अर्जुना तुझेनि वेधे । मिया देवपणाची बिरुदे । सांडिली गा मी हे आधे । सगळेनि तुवा ॥1372॥

मराठी अर्थ

अर्जुना परंतु, तू मला इतके वेड लाविले आहेस की, मी देव म्हणून कोणी आहे ह्याचे मला भानही नाही (खरेसांगू का ?) माझे अर्धसत्व नष्ट होऊन माझ्या ठिकाणी तुझीच सर्वस्वी स्थापना होऊन अदलाबदल झाल्यासारखी आहे.

English meaning

But dear Arjuna, I have left my creeds of divinity because I am crazy about you out of my love; and thus I have become half of my original nature, and you have become full.

1373
मूळ

पै काजा आपुलिया । रावो आपुली आपणया । आण वाहे धनंजया । तैसे हे की ॥1373॥

मराठी अर्थ

किंवा आपल्या कार्यासाठी राजा जशी आपली स्वतःचीच शपथ घेतो तसाच काहीसा हा प्रकार होय.

English meaning

Dear Arjuna, this is like the king swearing by himself in order to achieve certain intended work."

1374
मूळ

तेथ अर्जुनु म्हणे देवे । अचाट हे न बोलावे । जे आमचे काज नांवे । तुझेनि एके ॥1374॥

मराठी अर्थ

त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, असे भलतेच नका हो बोलू; अहो, आमची सर्व कार्यं नुसत्या तुमच्या नाममात्राने सिद्धीस जातात.

English meaning

Thereupon Arjuna said, "The Lord may not speak something strange like this because all our actions are accomplished by the power of your name alone.

1375
मूळ

यावरी सांगो बैससी । का सांगता भाषही देसी । या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥1375॥

मराठी अर्थ

असे असूनही, तूच आम्हाला आमच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतोस आणि त्याही शपथ वाहून ! देवा ! तुमच्या ह्या विनोदाला काही सीमा आहे का ?

English meaning

And over and above this, you are advising me and at the same time swearing also. So I ask you- "Is there any limit to your unscrutable ways?

1376
मूळ

कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥1376॥

मराठी अर्थ

अंशतः सूर्यप्रकाशानेही कमलवने विकसित होतात पण तो त्यांना आपला सर्वच प्रकाश नित्य देतो.

English meaning

Though a little ray of light of the Sun makes the lotus bud bloom, the whole Sun in his full glory arises for it.

1377
मूळ

पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढे थोर । वर्षे तेथ मिषांतर । चातकु की ॥1377॥

मराठी अर्थ

पृथ्वी शांत होऊन समुद्रही भरतील इतकी अफाट; वृष्टी मेघ करितात खरे पण त्याचे निमित्त अनन्यशरण चातकाची तृषा हरण करणे असते.

English meaning

The cloud gives rain enough to quench the thirst of the earth and to fill the sea, but is not the thirst of the bird Chatak the cause of the cloud's generous outpouring?

1378
मूळ

म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया । प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥1378॥

मराठी अर्थ

त्याच न्यायाने, हे दानशूर, दयानिधे देवा, तुझ्या ज्ञानदानरूपी औदार्याला नाही म्हणावयास मी निमित्त झालो हे खरे, पण त्यात सर्व जगाचे कल्याण अगर उद्धार आपण केला;

English meaning

Therefore, O the treasure of compassion! The most generous Lord, is not the answering to my query just an instrument for generating this great generosity in you?

1379
मूळ

तव देवो म्हणती राहे । या बोलाचा प्रस्तावो नोहे । पै माते पावसी उपाये । साचचि येणे ॥1379॥

मराठी अर्थ

तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, आता ही प्रस्तावना राहु दे; ( आपण मूळ गोष्टीवर येऊ) हे पहा; ह्या उपायाने तू मला निश्चयैकरून येऊन मिळशील.

English meaning

Thereupon the Lord said- "Let us drop this subject because this is not the occasion for going into argument about these things. Please be sure that by doing as I have just now told, you will definitely come unto me.

1380
मूळ

सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया । तेणे विरेचि की उरावया । कारण कायी ? ॥1380॥

मराठी अर्थ

अर्जुन, ज्याक्षणी मिठाचा खडा पाण्यात पडतो त्याच क्षणी तो विरतोच; वेगळे रहाण्याचे कारणच काय ?

English meaning

When salt falls into sea, does it not dissolve in the same moment? Has it any reason to wait for some time?

1381
मूळ

तैसे सर्वत्र माते भजता । सर्व मी होता अहंता । निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥1381॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, सर्वत्र असलेली माझी व्याप्ति जाणून भजन केले असता व सर्व मीच आहे अशा दृष्टीचा उदय झाला असता, अहंता निःशेष नाहीशी होऊन तू तत्त्वतः मद्रूपच होशील.

English meaning

Similarly if you worship me in all forms and beings, your ego will be destroyed and you will be having the view that Atman is every thing and thus you will merge into me.

1382
मूळ

एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारी । दाविली तुज उजरी । उपायांची ॥1382॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे कर्मापासून ब्रह्मात्म्यैक्यज्ञानपर्यंतचे माझ्या प्राप्तीचे सर्व उपाय तुला स्पष्ट करून सांगितले.

English meaning

Thus I have shown you how, beginning from doing one's duty, step by step, the means reach finally to the attainment of unity with me, in the proper sequence.

1383
मूळ

जे आधी तव पंडुसुता । सर्व कर्मे मज अर्पिता । सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥1383॥

मराठी अर्थ

थोडक्यात असें-अर्जुना, प्रथम सर्व कर्म मला अर्पण करावी म्हणजे सर्वत्र माझी प्रसन्नता प्राप्त होते.

English meaning

The sequence of this ever-sublimating nature of worship is that when all actions are surrendered to me, the mind of the devotee remains peaceful and sensitive.

1384
मूळ

पाठी माझ्या इये प्रसादी । माझे ज्ञान जाय सिद्धी । तेणे मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपी माझ्या ॥1384॥

मराठी अर्थ

अशा प्रसन्नतेनंतर, मत्प्राप्त्यर्थं केलेला ज्ञानविचार सिद्धीस जाऊन, तो निश्चयेकरून मद्रूप होतो.

English meaning

Then through this peace and alertness, he gains knowledge about me by which unity of the devotee with me can be achieved.

1385
मूळ

मग पार्था तिये ठायी । साध्य साधन होय नाही । किंबहुना तुज काही । उरेचि ना ॥1385॥

मराठी अर्थ

अशी स्थिति झाल्यावर, अर्जुना, साध्य-साधनादि व्यवहाराचा वाचा लोप होऊन, तुला काहीही कर्तव्य उरणार नाही.

English meaning

Then, O Partha, the division between the means and the goal does not remain, or you have nothing more to do.

1386
मूळ

तरी सर्व कर्मे आपली । तुवा सर्वदा मज अर्पिली । तेणे प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥1386॥

मराठी अर्थ

पार्था, तुजवर मी जो आज प्रसन्न आलो आहे, त्याचे कारण, तू सर्वदा सर्वं कर्म मदर्पणबुद्धीने केलीस.

English meaning

My dear, because you have offered all your actions always to me, you have my grace and

1387
मूळ

म्हणौनि येणे प्रसादबळे । नव्हे झुंजाचेनि आडळे । न ठाकेचि येकवेळे । भाळलो तुज ॥1387॥

मराठी अर्थ

म्हणून हा युद्धाचा प्रसंग आहे; आतांच नको; पुढे पाहुं; वगैरे काहीही विचार न करिता मी ह्या प्रसादबळाने तुला भाळलों. (वश झालो)

English meaning

By the strength of this grace, the impediment in the way of fighting will be removed. I have once for all become pleased with you, so, I will not leave you in the lurch any time.

1388
मूळ

जेणे सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये । ते उपपत्तीचेनि उपाये । गीतारूप हे ॥1388॥

मराठी अर्थ

ज्यायोगे, कार्यासह अज्ञाननिवृत्ति होऊन अद्वितीय एक असा जो मी, त्या माझे आत्मत्वाने अपरोक्ष होईल, ते माझे गीतारूप ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी,

English meaning

Geeta is the light by which ignorance is dissipited together with the false appearance and everywhere there is perception of me only, and it is the manifestation of this knowledge made clear through similes, etc.

1389
मूळ

मिया ज्ञान तुज आपुले । नानापरी उपदेशिले । येणे अज्ञानजात सांडी वियाले । धर्माधर्म जे ॥1389॥

मराठी अर्थ

मी तुला माझ्या आत्मज्ञानाचा नाना प्रकारे उपदेश केला; त्याने, जे धर्माधर्मादि व्याले आहे अशा अज्ञानमात्राचा त्याग कर.

English meaning

I have taught you in various ways, the knowledge of self-realization. Now throw away your ignorance which has created the confusion about what is the right action and what is the wrong action. |

1390
मूळ

आशा जैसी दुःखाते । व्याली निंदा दुरिते । हे असो जैसे दैन्याते । दुर्भगत्व ॥1390॥

मराठी अर्थ

आशा दुःखाची, निंदा पापाची, किंवा हेअसो, दुर्दैव जशी दैन्याची जननी आहे,

English meaning

Just as hope breeds sorrow, gossip with evil intent begets sins, and bad luck brings in poverty.

1391
मूळ

तैसे स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्याले धर्मादिक । ते सांडूनि घाली अशेख । ज्ञाने येणे ॥1391॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, स्वर्गनरक प्राप्तीची साधने जे धर्माधर्म, त्यांची अज्ञान ही जननी आहे, त्याचा ह्या ज्ञानाने निःशेष नाश कर.

English meaning

So, by ignorance, the doubts about right and wrong action which further create the hell and heaven, are brought into existence. So, sweep away all the concepts born out of ignorance by the strength of this wisdom.

1392
मूळ

हाती घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु । का निद्रात्यागे घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥1392॥

मराठी अर्थ

दोर हाती आल्यावर त्यावर पूर्वी भासलला सर्प जसा नष्ट होतो, किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील सर्व व्यवहार जसा लोपतो.

English meaning

Just as we drop our false perception of serpent as soon as we actually lift the rope on which the serpent was imagined or recognised, or we drop the activities of the dream as soon as we are awake;

1393
मूळ

नाना सांडिलेनि कवळे । चंद्रींचे धुये पिवळे । व्याधित्यागे कडुवाळे- । पण मुखाचे ॥1393॥

मराठी अर्थ

कावीळ नाहींशी झाली, म्हणजे चंद्राच्या ठिकाणी दिसणारा पिवळेपण जसा नाहीसा होतो किंवा व्याधिनाशाने मुखाचा कडवटपणा जसा जातो;

English meaning

Or just as the yellow appearance of the moon changes into white when jaundice of the observer is cured, or the bitter taste in the month changes when the fever is gone.

1394
मूळ

अगा दिवसा पाठी देउनी । मृगजळ घापे त्यजुनी । का काष्ठत्यागे वन्ही । त्यजिजे जैसा ॥1394॥

मराठी अर्थ

दिवस मावळतांच मृगजळ नाहीसे होते, किंवा काष्ठत्यागाने जस वन्हित्यागही केलासा होतो.

English meaning

Similarly, when day is set, we do not see mirage and when we throw down the piece of wood, we automatically throw down the fire hidden in it.

1395
मूळ

तैसे धर्माधर्माचे टवाळ । दावी अज्ञान जे का मूळ । ते त्यजूनि त्यजी सकळ । धर्मजात ॥1395॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे धर्माधर्माचा बाऊ वाटविणारे मूळ कारण जे अज्ञान, त्याचा त्याग करून सर्व धर्माधर्मापासून मुक्त हो.

English meaning

Similarly when we discard the ignorance which creates the confusion about right action and wrong action, that complication is also discarded with it.

1396
मूळ

मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया । सनिद्र स्वप्न गेलया । आपणपे जैसे ॥1396॥

मराठी अर्थ

निद्रा दोषासह स्वप्ननाश झाल्यावर जसा आपला आपणच एकटा असतो, तसा अज्ञाननाशानंतर एकटा मीच आपोआप सहज उरतो

English meaning

When this ignorance is destroyed, I alone remain as naturally as I remain alone when the dream with the sleep is gone.

1397
मूळ

तैसा मी एकवाचूनि काही । मग भिन्नाभिन्न आन नाही । सोऽहंबोधे तयाच्या ठायी । अनन्यु होय ॥1397॥

मराठी अर्थ

एक माझ्या सत्तेवाचून, जगात कोणत्याही पदार्थाला भिन्न किवा अभिन्नत्वाने नांदण्याइतकी स्वतंत्र सत्ता नाही, असे जे माझी सर्वव्यापक स्वरूप, त्याच्याशी माझेही वस्तुतः तेच स्वरूप आहे अशा शुद्ध बोधाने अनन्य हो. (वेगळा उरू नको. )

English meaning

So, finally I alone remain when ignorance is destroyed, and no other thing remains. Then that devotee, the Jeeva, becomes completely homogeneous with me.

1398
मूळ

पै आपुलेनि भेदेविण । माझे जाणिजे जे एकपण । तयाचि नांव शरण । मज यीणे गा ॥1398॥

मराठी अर्थ

आपण स्वतः वेगळेपणाने न उरता, सर्वत्र मीच एकटा एक आहे असे ज्याने नि:संदेहपणे जाणिले, तोच एक, अर्जुना, मला खरा शरण झाला.

English meaning

My dear, to be one with me, without awareness of the separate self is called the surrendering oneself to me.

1399
मूळ

जैसे घटाचेनि नाशे । गगनी गगन प्रवेशे । मज शरण येणे तैसे । ऐक्य करी ॥1399॥

मराठी अर्थ

घट ह्या उपाधीच्या नाशाने, जसे घटाकाश जणू महाकाशांत प्रवेश करिते, त्याचप्रमाणे मला शरण येऊन माझ्याशी एकरूप हो.

English meaning

Then unity with me remains valid just as the sky alone remains when the empty pot is gone. (which created apparent division between the space in the pot and the space at large)

1400
मूळ

सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तू ॥1400॥

मराठी अर्थ

सोन्याचा मणि जसा सोन्याशी व लाट जशी जलाशी नित्य अनन्य असते, तसेच, अर्जुना, तु मला शरण असावे.

English meaning

Arjuna, you should come and merge into me just as a golden bead is one with gold or wave is one with water.

1401
मूळ

वाचूनि सागराच्या पोटी । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पा ॥1401॥

मराठी अर्थ

दुसराही शरण येण्याचा प्रकार आहे; समुद्राला वडवानल शरण येऊन त्याच्या

English meaning

O the crowned one, here do not compare this with the surrendering of fire to the sea thinking that the fire may burn up the sea! That never happens!

1402
मूळ

मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेचि असिजे । धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवी ॥1402॥

मराठी अर्थ

मलाही शरण आलेला आहे आणि पुन्हा आपल्याला जीवच समजतो; धिक्कार असो ह्या भाषेला ! असे म्हणतांना त्याची बुद्धि लाजत कशी नाही ?

English meaning

It is sheer nonsense, sheerly ridiculous to imagine that after surrendering oneself to me, the soul, the Jeeva maintains his identity.

1403
मूळ

अगा प्राकृताही राया । आंगी पडे जे धनंजया । ते दासिरूंहि की तया । समान होय ॥1403॥

मराठी अर्थ

अरे, पृथ्वीवरील एखाद्या राजाने अगदी सामान्य दासीचाही जर अंगिकार केला तरती राणीपद पावते.

English meaning

O Dhananjaya, in the ordinary life you see that even an ordinary woman who marries a king, enjoys all the glory of the Royalty.

1404
मूळ

मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । हे बोल नको वोखटे । कानी लाऊ ॥1404॥

मराठी अर्थ

तर मग विश्वाचा स्वामी जो मी, त्याची भेट होऊनहि पुन्हा जीवदशा तशीच कायम आहे, असे ओंगळ बोल नुसते ऐकण्यासही आमचे कान तयार नाहीत,

English meaning

So, do not have any thought that even after merging with the Lord of the universe which I am, the knot of being a Jeeva still remains unsolved.

1405
मूळ

म्हणौनि मी होऊनि माते । सेवणे आहे आयिते । ते करी हाता येते । ज्ञाने येणे ॥1405॥

मराठी अर्थ

म्हणून, मद्रूप झालास की माझी अनायासे (सहज) सेवा घडते; ते मद्रूप होणे साध; ती सिद्धि या मी सांगितलेल्या ज्ञानानं प्राप्त होते;

English meaning

Therefore, to serve me by merging into me is very natural and easy. You should serve like this so that you will attain the divine wisdom as a matter of course.

1406
मूळ

मग ताकौनिया काढिले । लोणी मागौते ताकी घातले । परी न घेपेचि काही केले । तेणे जेवी ॥1406॥

मराठी अर्थ

दधिमंथनाने ताकांतून लोणी निराळे केले, आणि मग ते पुन्हा ताकत टाकिले तरी जसे काही केल्या त्याच्याशी एकरूप होत नाही.

English meaning

Then just as butter once churned out of buttermilk does not mix with that buttermilk, do what you may;

1407
मूळ

तैसे अद्वयत्वे मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥1407॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, शुद्ध अद्वयबोधाने मला शरण आलास (मद्रूप झालास) म्हणजे सहजच धर्माधर्माचा तुला स्पर्श होणार नाही.

English meaning

You must worship me and surrender yourself to me, so that this divisive and confusing thought about what is right action and what is wrong, will not be able to touch you at all.

1408
मूळ

लोह उभे खाय माती । ते परीसाचिये संगती । सोने जालया पुढती । न शिविजे मळे ॥1408॥

मराठी अर्थ

लोखंड मातीत असले तर, ती त्याला खाऊन टाकते, पण तेच परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत ठेवले तर तिचा त्याला यत्किंचींतही उपद्रव होत नाही.

English meaning

Iron itself left alone, becomes rusty and mixes with earth, but if the magic stone touches it, and turns it into gold, then it never rusts.

1409
मूळ

हे असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही । मग काष्ठेही कोंडोनी । न ठके जैसा ॥1409॥

मराठी अर्थ

हे असू द्या; काष्ठांच्या घर्षणाने उत्पन्न केलेला अग्नी, मग जसा काष्ठांनीही झांकला जात नाही.

English meaning

Or when once fire is produced by rubbing woods together, it does not remain confined to the wood.

1410
मूळ

अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु । की प्रबोधी होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥1410॥

मराठी अर्थ

अर्जुना, सूर्याला कधी अंधार भेटतो का ? किंवा जागृतीत, स्वप्नात कल्पिलेले व्यवहार आढळतात काय ?

English meaning

O Arjuna, does the Sun even see darkness? Does one experience in his waking state, his false, illusory perceptions of the dream?

1411
मूळ

तैसे मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वाचूनिया । आन काही उरावया । कारण असे ? ॥1411॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे मजपाशी ऐक्य पावल्यावर व मी सर्वत्र एकरूपाने भरलेला असल्याने म । झ्यावांचुन अन्य पदार्थ उरण्याचे कारणच काय ?

English meaning

Similarly when there is unity with me, is there any reason for anything else to remain?

1412
मूळ

म्हणौनि तयाचे काही । चिंती न आपुल्या ठायी । तुझे पापपुण्य पाही । मीचि होईन ॥1412॥

मराठी अर्थ

म्हणून आपल्या ठिकाणच्या पापपुण्यांची काहीही चिता करू नकोस. (ती जबाबदारी मी घेतो) कारण ती दोन्ही मीच होईन.

English meaning

Therefore, do not have concept of any other, except me, in your mind. I am going to be all your merits and sins.

1413
मूळ

तेथ सर्वबंधलक्षणे । पापे उरावे दुजेपणे । ते माझ्या बोधी वायाणे । होऊनि जाईल ॥1413॥

मराठी अर्थ

असे झाल्यावर, माझ्याहून वेगळेपणे उरणे हेच जे पापाचे म्हणजे सर्व संसारबंधाच्या कारणाचे लक्षण, तेच माझ्या सर्वात्मैक्यज्ञानात मिथ्या ठरून जाईल.

English meaning

Now the sin which is the sign of all bondage and which would have remained separate earlier, will be futile, and destroyed by knowledge about me.

1414
मूळ

जळी पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥1414॥

मराठी अर्थ

जलात पडलेल्या मिठाला जशी सर्वागाने जलरूपता, त्याप्रमाणे, अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्यभावाने शरण आलेल्या तुला मद्रूपता येते येईल.

English meaning

O intelligent Arjuna, when the salt falls into water it becomes water totally. Similarly if you surrender yourself totally to me, you will be myself only.

1415
मूळ

येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया । घेई मज प्रकाशोनिया । सोडवीन तूते ॥1415॥

मराठी अर्थ

असे झाले म्हणजे धनंजया, तू सहज मुक्त आहेसच; पण माझ्या यथार्थ स्वरूपाचा प्रकाश (बोध) अंत:करणवृत्तीवर रूढ करून घे, म्हणजे आपण मुक्त आहोच अथवा मी तुला सोडविले असा (औपचारिक) प्रयय तुला येईल.

English meaning

O Dhananjaya, in this way you will be liberated. Please accept me. So that, I will liberate you by my light in your heart.

1416
मूळ

याकारणे पुढती । हे आधी न वाहे चित्ती । मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥1416॥

मराठी अर्थ

यास्तव इतःपर ही मुक्तीची चिता मनात वाहू नको; अर्जुना, सर्वव्यापक एकच एक जो मी, त्या मला ओळखून (अर्थात् तत्त्वतः तद्रूप होऊन) शरण ये. (येथे गीताशास्त्र समाप्त झाले. )

English meaning

Therefore, now onwards, you should not worry at all, you are intelligent. Armed with this self-knowledge, you take refuge in me and in me only.''

1417
मूळ

ऐसे सर्वरूपरूपसे । सर्वदृष्टिडोळसे । सर्वदेशनिवासे । बोलिले श्रीकृष्णे ॥1417॥

मराठी अर्थ

सर्व, रूपवान् पदार्थ ज्याच्यामुळे रूपवान आहेत, दृष्टीचाही जो डोळा आहे सर्व, स्थानांचेही जो अधिष्ठान आहे तो श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाला.

English meaning

The Lord Shrikrishna, who is the universally present, all-seeing and all- pervading god, said thus to Arjuna.

1418
मूळ

मग सावळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥1418॥

मराठी अर्थ

मग शामसुंदर भगवंतांनी आपला दिले. कंकणयुक्त उजवा हात पुढे करून, आपल्या अनन्यशरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले.

English meaning

Then he extended his right hand which was dark and beautiful, with a bracelet ring; and embraced Arjuna, the greatest devotee.

1419
मूळ

न पवता जयाते । काखे सूनि बुद्धीते । बोलणे मागौते । वोसरले ॥1419॥

मराठी अर्थ

ज्या वस्तू पर्यंत पोचणे अशक्य होऊन वाणी मनासहवर्तमान परत फिरली व मौनावली.

English meaning

In this way, the Lord Shrikrishna used the occasion of embracing Arjuna so as to endow him with his divine form and spirit, which the word and the intellect cannot grasp and while trying to reach which, the word turns back by holding the intellect in its armpit. (this means intellect and word are not successful in reaching it).

1420
मूळ

ऐसे जे काही येक । बोला बुद्धीसिही अटक । ते द्यावया मिष । खेवाचे केले ॥1420॥

मराठी अर्थ

वाणीला व बुद्धीला अगम्य असे जे काही एक वस्तु ते स्वभक्ताला अर्पण करण्याकरिता देवांनी आलिंगनाचे निमित्तकेले.

English meaning

In this way, the Lord Shrikrishna used the occasion of embracing Arjuna so as to endow him with his divine form and spirit, which the word and the intellect cannot grasp and while trying to reach which, the word turns back by holding the intellect in its armpit. (this means intellect and word are not successful in reaching it).

1421
मूळ

हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले । द्वैत न मोडिता केले । आपणाऐसे अर्जुना ॥1421॥

मराठी अर्थ

हृदयाला हृदयभिडले, ह्या अंतःकरणातील त्या अंतःकरणात (मूळ ठिकाणचे नाहीसे न होता) साठविले, व औपाधिक द्वैतभंग न करिता अर्जुनाला स्वपदावर बसविलें;

English meaning

As soon as the bosom of Shrikrishna touched the bosom of Arjuna, the secret wisdom which was the heart of the god entered into the heart of Arjuna, and thus he achieved unity with Arjuna in his Atmic state without disturbing the duality.

1422
मूळ

दीपे दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला । द्वैत न मोडिता केला । आपणपे पार्थु ॥1422॥

मराठी अर्थ

एका दिव्याने दुसरा दिवा लावावा असाच जणू त्या आलिंगनाचा प्रकार घडला; देवभक्तादि द्वैताला धका न लावता पार्थाला आत्मरूप केला.

English meaning

Just as one lamp may be lit by touching another lamp to its flame, Shrikrishna merged Arjuna into himself, but maintained the duality.

1423
मूळ

तेव्हा सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया । तेथ वाडु तऱ्ही बुडोनिया ॥ ठेला देवो ॥1423॥

मराठी अर्थ

वेळी अर्जुनाला सुखाचे जे भरते लोटले त्यात, देव एवढे मोठे खरे, पण तेही बुडाले !

English meaning

Then the ecstacy of the overflowing happiness was such that even the Lord Shrikrishna was carried away drowned in it.

1424
मूळ

सिंधु सिंधूते पावो जाये । ते पावणे ठाके दुणा होये । वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥1424॥

मराठी अर्थ

समुद्राला समुद्र मिळू गेला तर मिळण्याची गोष्ट बाजूसच राहून जलसंचयच दुप्पट होतो व तेवढा आकाशांतील भाग आणखी व्यापावा लागतो.

English meaning

When one stream of speedy water meets similar stream, the space proves to be small, and the quantity of water is so much and so forceful that waves jump into the sky.

1425
मूळ

तैसे तया दोघांचे मिळणे । दोघा नावरे जाणावे कवणे । किंबहुना श्रीनारायणे । विश्व कोंदले ॥1425॥

मराठी अर्थ

अर्जुनाच्या व देवांच्या संगमाची तशी स्थिति होऊन त्यांचे प्रेम अनावरपणे वाढले, ते कोण जाणू शकणार ? किंबहुना, नारायणस्वरूपाने (त्या ऐक्यानें) सर्वं विश्व कोंडून गेले.

English meaning

Similar was the embrace of the two great people in which both could not contain the bliss within themselves. Who can understand, how it happened? One can only say that all the universe was completely filled with Narayana. (Now saint Dnyaneshwara summarizes )

1426
मूळ

एवं वेदाचे मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णे गीताशास्त्र । प्रकट केले ॥1426॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, वेदाचे मूलसूत्र व सर्वाना जेथे सारखाच अधिकार आहे असे हे पवित्र गीताशास्त्र देवांनी प्रकट केले.

English meaning

Thus the Lord Shrikrishna made manifest this scripture of Geeta which is the essential teaching of Vedas and, therefore, is the purest philosophy having all the authority.

1427
मूळ

येथ गीता मूळ वेदा । ऐसे केवी पा आले बोधा । हे म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगो ॥1427॥

मराठी अर्थ

गीता ही वेदांचेही मूळ आहे, हे तुम्ही कसे जाणले. असे जर कोणी म्हणेल तर त्याची प्रसिद्ध उपपति आम्ही सांगतो.

English meaning

Perhaps you may ask, ``How is this Geeta the origin of Vedas?'' Therefore, I am going to explain it clearly, which is a well-known fact.

1428
मूळ

तरी जयाच्या निःश्वासी । जन्म झाले वेदराशी । तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी । बोलला स्वमुखे ॥1428॥

मराठी अर्थ

ती अशी- (केवळ) ज्याच्या श्वासोच्छवासापासून शब्दराशि (भांडार) जो वेद, तो जन्म पावला, असा जो सत्यप्रतिज्ञ भगवान, त्याने साक्षात् मुखावाटे सांगितलेले प्रतिज्ञा वचन ते हे, गीताशास्त्र होय.

English meaning

It is well-known that Vedas are born out of the exhalation of Breath of Mahavishnu. He himself is telling by taking an oth in Geeta that Geeta is the origin of Vedas.

1429
मूळ

म्हणौनि वेदा मूळभूत । गीता म्हणो हे होय उचित । आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥1429॥

मराठी अर्थ

म्हणून, गीता हे, वेदांचेही मूळ आहे असे जे आम्ही म्हटले ते योग्यच होय; ह्याला आणखीही एक उपपत्ति आहे.

English meaning

Therefore, it is correct to say that Geeta is origin of Vedas. This can be proved in another way also.

1430
मूळ

जे न नशतु स्वरूपे । जयाचा विस्तारु जेथ लपे । ते तयांचे म्हणिपे । बीज जगी ॥1430॥

मराठी अर्थ

जी वस्तु स्वरूपेकरून नष्ट न होता तिचे स्थूल स्वरूप जेथे (पूर्वी व नंतर) सूक्ष्मरूपाने दडून असते, ती वस्तु या स्थूल आकाराचे बीज असे लौकिकांत म्हणतात.

English meaning

That in which any-thing, not being destroyed, becomes merged in a minute form should be called its seed.

1431
मूळ

तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु । गीतेमाजी असे रुखु । बीजी जैसा ॥1431॥

मराठी अर्थ

मग, कांडत्रयात्मक शब्दराशि जो वेदवृक्ष तो, बीजांत वृक्ष असावा, तसा गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहे.

English meaning

And just as the whole tree is contained in a seed; so also the Vedas having all the three divisions, are contained in Geeta.

1432
मूळ

म्हणौनि वेदांचे बीज । श्रीगीता होय हे मज । गमे आणि सहज । दिसतही आहे ॥1432॥

मराठी अर्थ

म्हणून श्रीमद्भगवद्गीता हे वेदांचे बीज होय असे मला वाटते, व कोणालाही ते सहज दिसण्यासारखे आहे.

English meaning

Therefore, I feel that Geeta is the seed of Vedas, and this is also quite evident.

1433
मूळ

जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग । भूषणरत्नी सर्वाग । शोभले जैसे ॥1433॥

मराठी अर्थ

कर्म, उपासना व ज्ञान हे जे वेदाचे तीन भाग, त्यांचे गीतेमध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन आहे; किंबहुना, त्यांनी रत्नालंकाराप्रमाणे तिचे सर्वाग शोभविले आहे.

English meaning

The three divisions of Geeta are beautifully shining like ornaments of jewellery which adorn a beautiful body.

1434
मूळ

तियेचि कर्मादिके तिन्ही । कांडे कोणकोणे स्थानी । गीते आहाति ते नयनी । दाखऊ आईक ॥1434॥

मराठी अर्थ

ती, कर्मादि तिन्ही कांडे गीतेमध्ये कोठे कोठे आहेत ते तुला स्पष्ट सांगतो, श्रवण कर.

English meaning

Now I shall tell clearly where these three divisions of Karma etc. are evident in the Geeta.

1435
मूळ

तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो । द्वितीयी साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥1435॥

मराठी अर्थ

पहिला अध्याय हा गीताशास्त्राची प्रवृत्ति का व कशी झाली ह्याच्या प्रस्तावनेपर आहे, दुसऱ्यात सांख्यविचार (ज्ञान) प्रकट केला आहे.

English meaning

The first chapter contains the introduction to the subject of this science of Geeta. In the second chapter, the philosophy of Sankhyas is elucidated.

1436
मूळ

मोक्षदानी स्वतंत्र । ज्ञानप्रधान हे शास्त्र । येतुलाले दुजी सूत्र । उभारिले ॥1436॥

मराठी अर्थ

हे गीता शास्त्र ज्ञानप्रधान आहे व ज्ञान हे, अन्यसाधननिरपेक्ष स्वतंत्रपणे मोक्ष देण्यास समर्थ आहे, अशी सूत्रभूत उभारणी दुस-यात केली आहे.

English meaning

In the second chapter, it is said that the Sankhya philosophy does not expect any other means than knowledge for attaining liberation.

1437
मूळ

मग अज्ञाने बांधलेया । मोक्षपदी बैसावया । साधनारंभु तो तृतीया- । ध्यायी बोलिला ॥1437॥

मराठी अर्थ

जे अज्ञ म्हणून बद्ध आहेत, त्यांना मोक्षप्राप्ति होणे तर आरंभाचे साधन कोणते हे, तिसऱ्या अध्यायात सांगितले.

English meaning

Then in the third chapter, the subject is begun as to the means which the seekers of liberation, who are tied down by ignorance, should adopt.

1438
मूळ

जे देहाभिमान बंधे । सांडूनि काम्यनिषिद्धे । विहित परी अप्रमादे । अनुष्ठावे ॥1438॥

मराठी अर्थ

जे देहात्मबुद्धिमान् आहेत, त्यांनी काम्य व निषिद्ध कर्मे, सोडून विहित कर्माचरण बिनचूक (नियमितपणे) करावे.

English meaning

That is, the seeker is advised to avoid the selfish actions and prohibited actions, which create attachment and pride about the body, and they should perform their proper routine and occasional duties without mistake.

1439
मूळ

ऐसेनि सद्भावे कर्म करावे । हा तिजा अध्यावो जो देवे । निर्णय केला ते जाणावे । कर्मकांड येथ ॥1439॥

मराठी अर्थ

अशा भावनायुक्त अंतःकरणाने कर्म करावे असा देवांनी तिसऱ्या अध्यायात निर्णय केला आहे ते कर्मकांड समजावे.

English meaning

The Lord has given his verdict in this chapter that these duties should be performed with clear, pious mind. This is the division dedicated to Karma.

1440
मूळ

आणि तेचि नित्यादिक । अज्ञानाचे आवश्यक । आचरता मोचक । केवी होय पा ॥1440॥

मराठी अर्थ

त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या आचरणाने, ती अज्ञाननाशक कशी होतील,

English meaning

Further, how these routine duties properly performed become instrumental to cut the bondage of ignorance?

1441
मूळ

ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया । देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया । सांगितली ॥1441॥

मराठी अर्थ

अशी इच्छा होऊन बद्धांपैकी एखादा मुमुक्षतेच्या हद्दीपर्यंत आल्यास ती कर्मे, ब्रह्मार्पणबुद्धीने कशी करावी हेही सांगितले.

English meaning

Asking such questions when the seeker comes to the stage of the aspirant of liberation, the Lord says that he should perform actions and surrender them to the absolute Brahman.

1442
मूळ

जे देहवाचामानसे । विहित निपजे जे जैसे । ते एक ईश्वरोद्देशे । कीजे म्हणितले ॥1442॥

मराठी अर्थ

ते असे–कायावाचामने-करून जे विहित कर्म जसे घडेल ते सर्व ईश्वरप्राप्त्यर्थं करावे.

English meaning

The Lord Shrikrishna says that the regular actions which are performed by the body, speech or mind should be offered to the God, as and when they are performed.

1443
मूळ

हेचि ईश्वरी कर्मयोगे । भजनकथनाचे खागे । आदरिले शेषभागे । चतुर्थाचेनी ॥1443॥

मराठी अर्थ

ह्या कर्मयोगाने, भजनकीर्तनदिकांप्रमाणे ईश्वरोपासना कशी घडते हे, चौथ्याच्या अखेरीस सांगावयास आरंभिले आहे.

English meaning

The sweet dish of the description of how through the path of Yoga of action worship of God is done, is offered in the last part of the fourth chapter.

1444
मूळ

ते विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जव आघवा । तव कर्मे ईशु भजावा । हे जे बोलिले ॥1444॥

मराठी अर्थ

कर्माते ईश्वर भजावा हे जे वर सांगितले आहे तेच निरूपण विश्वरूपदर्शनाच्या अकराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत आहे.

English meaning

The same teaching that "God should be worshipped through the performance of action" is continued upto the end of the eleventh chapter, which describes the seeing of universal form of God.

1445
मूळ

ते अष्टाध्यायी उघड । जाण येथे देवताकांड । शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोले ॥1445॥

मराठी अर्थ

चौथ्या अध्यायापासून तो अकराव्याच्या अखेरपर्यंतच्या आठ अध्यायात तेच देवताकांड (उपासनाकांड) आहे हे गीताशास्त्र पडदा न ठेवता स्वतः सांगत आहे.

English meaning

So from the fourth to the eleventh chapter there are eight chapters which form the second division of Geeta dedicated to God, which the Geeta has discussed by removing all objections.

1446
मूळ

आणि तेणेचि ईशप्रसादे । श्रीगुरुसंप्रदायलब्धे । साच ज्ञान उद्बोधे । कोवळे जे ॥1446॥

मराठी अर्थ

आणि ह्याच उपासनेने ईशप्रसाद व श्रीगुरुसंप्रदाय यांची प्राप्ति होऊन अंतःकरणात खरे ज्ञान उद्भूत होते (प्रकाशते) व ते प्रथम कोवळे असते.

English meaning

And the delicate knowledge which a man gets through the devotion to God and which is the sanctified and graceful succession of Teacher-disciple relationship of knowledge,

1447
मूळ

ते अद्वेष्टादिप्रभृतिकी । अथवा अमानित्वादिकी । वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणू ॥1447॥

मराठी अर्थ

ते कोवळे ज्ञान बाराव्यातील अद्वेष्टादि श्लोकांनी किंवा तेराव्यातील अमानित्वादि श्लोलोकांनी दृढ कसे करावे हे सांगितले आहे म्हणून बारावा ज्ञानकांडांतच आम्ही गणतों.

English meaning

Should be further developed by virtues like non-jealousy, not having pride, etc.; so teaches the twelfth chapter, we think.

1448
मूळ

तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी । ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासी ॥1448॥

मराठी अर्थ

बाराव्या अध्यायापासून तो पंधराव्याच्या अखेरपर्यंत ज्ञानाचे फल व त्याचा परिपाक ह्याचे निरूपण आहे.

English meaning

From that twelfth chapter to the end of the fifteenth chapter the final ripe fruit of knowledge is the subject of teaching.

1449
मूळ

म्हणौनि चहूही इही । ऊर्ध्वमूळांती अध्यायी । ज्ञानकांड ये ठायी । निरूपिजे ॥1449॥

मराठी अर्थ

म्हणून, ऊर्ध्वमूल ह्या पंधराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंतच्या चार अध्यायनी ज्ञानकांड निरूपिले आहे.

English meaning

Therefore, upto the chapter which begins with the words "Oordhwamoolam", all the four chapters deal with the division of knowledge.

1450
मूळ

एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी । गीतापद्यरत्नांची लेणी । लेयिली आहे ॥1450॥

मराठी अर्थ

ह्याप्रकारें, कर्म, उपासना व ज्ञान ह्या वेदाच्या कांडत्रयाचे संक्षेपतः वर्णन करणारी गीता ही लघुश्रुतिच असून गद्याऐवजी पद्यरूप रत्नालंकार तिने, धारण केले आहेत.

English meaning

So, Veda, or Shruti it is with its three divisions that has become more beautiful by donning the bejewelled ornaments of the verses of Geeta.

1451
मूळ

हे असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जे आवश्यक । ठाकावे म्हणौनि ॥1451॥

मराठी अर्थ

हे असो, ही कांडत्रयाचे सार जी गीतारूप श्रुति, ती, सर्व साधनांचा हेतु. मोक्ष रूप जे अखेरचे फल ते जीवांनी अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना करून सांगतें.

English meaning

Thus, the fruit of liberation about which the Vedas so enthusiastically swear that it is the only thing which must be realized

1452
मूळ

तयाचेनि साधन ज्ञानेसी । वैर करी जो प्रतिदिवशी । तो अज्ञानवर्ग षोडशी । प्रतिपादिजे ॥1452॥

मराठी अर्थ

त्या मोक्षाचे अंतिम साधन जे ज्ञान त्याच्याशी प्रत्यही शत्रुत्व करणारा जो अज्ञानवर्ग त्याचे सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केले.

English meaning

And the qualities of ignorance and other vices, which are like enemies always opposing the knowledge as "the means of attaining that liberation" are explained in the sixteenth chapter.

1453
मूळ

तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा । हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥1453॥

मराठी अर्थ

शास्त्राच्या सहाय्याने तो अज्ञानशत्रू जीवांनी जिंकावा असा त्यांना सतराव्या अध्यायात गीतेचा आदेश आहे.

English meaning

In the seventeenth chapter it is taught that these enemies should be defeated by taking the support of the rules laid down in the scriptures as regards performance of action.

1454
मूळ

ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी । आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवे ॥1454॥

मराठी अर्थ

पहिल्या अध्यायापासून तो सतराव्याच्या अंतापर्यंत देवांनी, आत्मनिःश्वासरूपी जो वेद त्याचे मनोगत विशद करून गीतेत दर्शविले.

English meaning

Thus, the Lord has discussed the hidden meaning of the Vedas from the first chapter to the end of the seventeenth chapter.

1455
मूळ

तया अर्थजाता अशेषा । केला तात्पर्याचा आवांका । तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥1455॥

मराठी अर्थ

या सतराही अध्यायातील सर्व अर्थाच्या तात्पर्याच ज्यात विचार केला आहे तो हा अठरावा अध्याय होय; तो गीताशास्त्र समाप्तीचा अध्याय असल्यामुळे त्याला कलशाध्याय अशी अलंकारिक संज्ञा आहे

English meaning

And this is the eighteenth chapter which is giving us the summary of all the teaching of Geeta. This is really the high peak or dome of Geeta.

1456
मूळ

एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु । हा औदार्ये आगळा वेदु । मूर्तु जाण ॥1456॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, सातशे पद्य (श्लोक ) संख्येने युक्त असलेला हा गीताप्रबंध म्हणजे अधिक औदार्यसंपन्न होऊन अवतरलेला मूर्तीमंत वेदच होय.

English meaning

In short, Geeta with all the chapters taken together is really the very image of Veda, being most generous in imparting self-knowledge.

1457
मूळ

वेदु संपन्नु होय ठाई । परी कृपणु ऐसा आनु नाही । जे कानी लागला तिही । वर्णांच्याचि ॥1457॥

मराठी अर्थ

वेद गर्भश्रीमंत तर खराच; पण त्याच्याइतका कृपणही दुसरा कोण नाही कारण त्याने आपल्या संपन्नतेचा साक्षात् उपभोग घेण्याचा अधिकार तीन वर्णांनाच दिला आहे.

English meaning

Veda is replete with tremendous riches of knowledge, but there is no other book so miser in imparting knowledge because it has a private talk with only the three castes.

1458
मूळ

येरा भवव्याथा ठेलिया । स्त्रीशूद्रादिका प्राणिया । अनवसरू मांडूनिया । राहिला आहे ॥1458॥

मराठी अर्थ

(तीन वरचे सोडून राहिलेले) जे । संसारदुःखपीडित इतर स्त्रीशूद्रादिक प्राणी, त्यांना माझ्या उपदेशाचा अधिकार नाही असा निर्बंध घालून तो स्वस्थ आहे.

English meaning

Veda has stopped there only, without giving any place in the temple of knowledge to the other human beings like women, Shoodras etc.

1459
मूळ

तरी मज पाहता ते मागील उणे । फेडावया गीतापणे । वेदु वेठला भलतेणे । सेव्य होआवया ॥1459॥

मराठी अर्थ

महाराज म्हणतात- मला वाटते, हा मागील दोष धुवून टाकावा म्हणून, वाटेल त्याने आपली सेवा करावी असे वेषांतर करून, वेद गीतेच्या रूपाने अवतरला आहे.

English meaning

Therefore, I feel that Veda has thought of retribution of its past mistake, and therefore, has become available by wearing the apparel of Geeta, for all human beings.

1460
मूळ

ना हे अर्थु रिगोनि मनी । श्रवणे लागोनि कानी । जपमिषे वदनी । वसोनिया ॥1460॥

मराठी अर्थ

इतकेच नव्हे; तर अर्थद्वारा मनात प्रवेश करून, श्रवणरूपाने कर्णात शिरून व जपाच्या मिषाने वाणीत राहून-

English meaning

Not only this, but Veda is available to anybody by the way of entering into his mind as the meaning; entering into his ear by listening; and remaining in his mouth by way of reciting the whole Geeta.

1461
मूळ

ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणे । गीता लिहोनि वाहाणे । पुस्तकमिषे ॥1461॥

मराठी अर्थ

किंवा जो गीता पाठ करितो, (पठण) किंवा जो त्या पाठकाच्या संगतींत असतो, अथवा जो गीताग्रंथ लिहून बाळगतो वा इतरास अर्पण करतो.

English meaning

There may be a man, who writes down the whole Geeta for someone, who usually recites it, and keeps that written book with himself.

1462
मूळ

ऐसैसा मिसकटा । संसाराचा चोहटा । गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥1462॥

मराठी अर्थ

वेदाने अशा अनेक मिषांनीं, भर संसाराच्या बाजारात मोक्षसुखाचे सत्र उघडले आहे.

English meaning

Even for such a simple soul, Geeta has opened a free camp of dinner, where the joy of liberation is served at the city square of worldly life.

1463
मूळ

परी आकाशी वसावया । पृथ्वीवरी बैसावया । रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥1463॥

मराठी अर्थ

परंतु, अंतरिक्षांत संचार करणे, पृथ्वीवर बसणे अथवा सूर्यकिरणांनी प्रकाशन करणे ह्या सर्वाना आकाशाचा जसा सारखाच आधार असतो.

English meaning

Just as the sky is the only universal place open for all, either to fly in the sky or to sit on the earth or to bask in the sunshine;

1464
मूळ

तेवी उत्तम अधम ऐसे । सेविता कवणातेही न पुसे । कैवल्यदाने सरिसे । निववीत जगा ॥1464॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे आपली सेवा करणारा मध्ये, उत्तम, अधम, असा भेदाभेद न करिता, गीता सर्वाना सारखेच कैवल्यदान करून शांत करिते.

English meaning

Similarly, without asking anybody, whether he is of higher class or lower class, Geeta satisfies the whole world by its free distribution of the liberation.

1465
मूळ

यालागी मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटी । रिगाला आता गोमटी । कीर्ति पातला ॥1465॥

मराठी अर्थ

म्हणून, आपल्या मागील निंदेला भिऊन वेदाने गीतेच्या उदरात प्रवेश केला (व तिच्याद्वारे सर्वाशी संवाद केला). त्यामुळे, आता मात्र त्याच धवल कीर्ति झाली आहे.

English meaning

Therefore, we can say that being afraid of the blame given to the Veda in ancient times, the Veda has taken refuge in Geeta and thus has become worthy of its fair name and fame.

1466
मूळ

म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णे पंडुसुता । उपदेशिली ॥1466॥

मराठी अर्थ

म्हणून, वेदाच्या उत्तम सेवेचे फल देणारी अशी ही मूर्तीमंत गीता भगवान श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुनास उपदेशिली.

English meaning

Therefore, Geeta which is taught by Lord Shrikrishna to the son of Pandu should be considered as the image of Veda, which has become easily followable by all people.

1467
मूळ

परी वत्साचेनि वोरसे । दुभते होय घरोद्देशे । जाले पांडवाचेनि मिषे । जगदुद्धरण ॥1467॥

मराठी अर्थ

परंतु वत्साच्या स्नेहाने गाईने दिलेल्या दुधाने जसे घरादाराला सुकाळ दुभते होते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेल्या गीतेने सर्व जगाचा उद्धार झाला.

English meaning

Just as the cow gives milk for the calf only but that milk meets the need of all the household, so Geeta though taught to Arjuna as apparently seems to be, has actually emancipated the whole world.

1468
मूळ

चातकाचिये कणवे । मेघु पाणियेसि धावे । तेथ चराचर आघवे । निवाले जेवी ॥1468॥

मराठी अर्थ

चातका विषयींच्या दयेने मेघ जलासह धाव घेतो, त्यात चराचर जगताची जशी सहजच शान्ति होते.

English meaning

The cloud comes running to quench the thirst of the bird Chataka, but by the rainfall all the nature becomes cool and happy.

1469
मूळ

का अनन्यगतिकमळा- । लागी सूर्य ये वेळोवेळा । की सुखिया होईजे डोळा । त्रिभुवनींचा ॥1469॥

मराठी अर्थ

किंवा अनन्यशरण असलेल्या कमलां करिता सूर्य रोज उदय पावतो, त्याने जगांतील सर्व दृष्टींना सहजच सुख होते

English meaning

Or only for the lotus which has no one other to look upto, the Sun rises daily, but by his rays, the eyes of the whole world become happy.

1470
मूळ

तैसे अर्जुनाचेनि व्याजे । गीता प्रकाशूनि श्रीराजे । संसारायेवढे थोर ओझे । फेडिले जगाचे ॥1470॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी गीता प्रकट करून, जगांतील सर्व लोकांच्या शिरावरील संसारासारखे थोर ओझे दूर देणारा केले.

English meaning

Similarly, for the purpose of satisfying the questions of Arjuna, the Lord Shrikrishna has made manifest the Geeta, but it has removed the great burden of mundane life from the whole world.

1471
मूळ

सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगती । सूर्यु नव्हे लक्ष्मीपती । वक्त्राकाशीचा ॥1471॥

मराठी अर्थ

सर्व शास्त्ररूपी रत्नांच्या एकत्रित झालेल्या तेजाप्रमाणे त्रैलोक्याला प्रकाश देणाराहा गीता ग्रंथ म्हणजे भगवान् लक्ष्मीपतींच्या मुखाकाशातील सूर्यच म्हणू नये काय ?

English meaning

The Lord Shikrishna is not only the husband of the goddess Laxmi, (as described in mythology) but is really a Sun who arises in the 'sky' of mouth and by his talk illumines all the three worlds with the light of the secrets of spiritual scriptures.

1472
मूळ

बाप कुळ ते पवित्र । जेथिचा पार्थु या ज्ञाना पात्र । जेणे गीता केले शास्त्र । आवारु जगा ॥1472॥

मराठी अर्थ

धन्य ते पवित्र कुल की ज्यात, जन्माला आलेला पार्थ, अशा ज्ञानाचा अधिकारी होऊन त्याच्याकरिता निर्माण झालेले गीताशास्त्र हे साऱ्या जगाचे रक्षणकर्ता झाले !

English meaning

Blessed and pure is the family born in which Arjuna became worthy of this knowledge and opened the gates of the precincts of Geeta for all the world.

1473
मूळ

हे असो मग तेणे । सद्गुरु श्रीकृष्णे । पार्थाचे मिसळणे । आणिले द्वैता ॥1473॥

मराठी अर्थ

हे असो; मग सद्गुरू श्रीकृष्णांनी आपल्याशी एकरूप होणाऱ्या पार्थाला पुन्हा भानावर आणिलें.

English meaning

But let this ornamental language be kept aside. The Lord Shrikrishna, who was the Guru, discretely brought the unity of Arjuna with himself back to the level of duality.

1474
मूळ

पाठी म्हणतसे पांडवा । शास्त्र हे मानले की जीवा । तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥1474॥

मराठी अर्थ

आणि म्हणाले, अर्जुना, माझा उपदेश पटला ना ? तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले देवा, हो, देवा, हे सारे आपल्या कृपेचे फळ.

English meaning

He then said, "Pandava, did your soul agree to this science of action?" And Arjuna said, "O my lord, it is only by your grace!"

1475
मूळ

तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया । परी जोडिले भोगावया । विपाये होय ॥1475॥

मराठी अर्थ

अर्जुना, ऐश्वर्यप्राप्तीचे भाग्यही कोठे कोठे दिसते, पण जोडलेल्या ऐश्वर्याचा त्याला भोग घडावा असे भाग्य क्वचितच असते.

English meaning

Upon this the Lord again said, "O Pandava, it requires great luck to be able to get the hidden treasure, but seldom there is a man who is fortunate enough to utilize properly the treasure which he has got.

1476
मूळ

पै क्षीरसागरायेवढे । अविरजी दुधाचे भांडे । सुरा असुरा केवढे । मथिता जाले ॥1476॥

मराठी अर्थ

क्षीरसागराएवढं न विरजले जाणाऱ्या दुधाच्या भांडयाच्या मंथनाने देवांना व दैत्यांना कितीतरी श्रम पडले

English meaning

Let us take the example of the churning of the ocean of milk; the ocean of uncurdled milk. How great must have been the efforts required to be put in, for churning it?

1477
मूळ

ते सायासही फळा आले । जे अमृतही डोळा देखिले । परी वरिचिली चुकले । जतनेते ॥1477॥

मराठी अर्थ

त्या श्रमांनाही फल आले; त्यातून निघालेले अमृतही दृष्टीने पाहिले; पण ते जतन करण्याची दैत्यांची हातोटी चुकली.

English meaning

Those efforts were at last successful because the gods and demons saw by their own eyes the nectar produced in it, but afterwards they failed in the proper care required to be taken.

1478
मूळ

तेथ अमरत्वा वोगरिले । ते मरणाचिलागी जाले । भोगो नेणता जोडले । ऐसे आहे ॥1478॥

मराठी अर्थ

ज्याची अमर व्हावे म्हणून प्राप्ति करून घेतली तेच त्यांच्या मरणाला कारण झाले. भोग कसा घ्यावा हे ज्ञान नसले म्हणजे असा विपरीत परिणाम होतो,

English meaning

As a result, that which was acquired for attaining immortality, itself became the cause of death. When prosperity is achieved without wisdom as to its proper use, this type of disaster takes place.

1479
मूळ

नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटी भांबावला । तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥1479॥

मराठी अर्थ

नहुष स्वर्गाचा राजा झाला, पण राजेपणाची रहाटी माहित नसल्यामुळे तेथून च्युत होऊन सर्पत्व पावला, हे तुला माहीत नाही काय ?

English meaning

Do you not know that the king Nahusha became the ruler of the heaven, but was unable to behave property in harnessing the kingdom and so he became a serpent?

1480
मूळ

म्हणौनि बहुत पुण्य तुवा । केले तेणे धनंजया । आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥1480॥

मराठी अर्थ

अर्जुना, तुझी मागली फार मोठी पुण्याई ! म्हणूनच सर्व शास्त्रांचा राजा जे गीताशास्त्र त्याचा तू आज अधिकारी झालास.

English meaning

Therefore O Dhananjaya, you have a great treasure of past merit, and that is why you have become eligible for such knowledge of divine wisdom.

1481
मूळ

तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदाये पांघुरौनि । शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठी हो ॥1481॥

मराठी अर्थ

तरी ह्याच शास्त्राचे संप्रदायपूर्वक निष्ठेने अनुष्ठान (विचार) कर हो !

English meaning

Now, therefore, you should maintain the discipline required for it and utilize this knowledge by unwavering loyalty.

1482
मूळ

येऱ्हवी अमृतमंथना- । सारिखे होईल अर्जुना । जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेवीण ॥1482॥

मराठी अर्थ

एऱ्हवी, अर्जुना, संप्रदाय सोडून जर तू अनुष्ठान करशील तरअमृतमंथनाची गति होईल हो !

English meaning

Otherwise, O Arjuna, without taking due care to maintain the discipline laid down for it, if you start practising it unwisely, the disaster will be just like that which took place at the end of the churning of the ocean of milk.

1483
मूळ

गाय धड जोडे गोमटी । ते तैचि पिवो ये किरीटी । जै जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥1483॥

मराठी अर्थ

अर्जुना, चांगली दुभती गाय मिळाली आहे खरी, पण तिचे दोहन करण्याची कला माहीत असेल तेव्हांच दुधाची प्राप्ति होणार.

English meaning

O the crowned one, even if you have in your possession, a cow having all good signs and giving plenty of milk, you will be able to drink her milk only if you know how to milk her.

1484
मूळ

तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे । परी ते फळे संप्रदाये । उपासिलिया ॥1484॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे श्रीगुरु प्रसन्न झाले. शिष्याला विद्याही प्राप्त झाली, तरी संप्रदायपूर्वक तिची उपासना घडेल तेव्हांच ती फलदायी होईल.

English meaning

Similarly, Guru is pleased and the disciple is properly learned, but if that learning is used with discipline, then only it is useful.

1485
मूळ

म्हणौनि शास्त्री जो इये । उचितु संप्रदायो आहे । तो ऐक आता बहुवे । आदरेसी ॥1485॥

मराठी अर्थ

म्हणून ह्या शास्त्राचा जो उचित संप्रदाय आहे, तो आता बहुत आदरपूर्वक श्रवण कर.

English meaning

Therefore, listen with great respect, the discipline which is laid down for the following of this Yoga, this science of action.

1486
मूळ

तरी तुवा हे जे पार्था । गीताशास्त्र लाधले आस्था । ते तपोहीना सर्वथा । सांगावे ना हो ॥1486॥

मराठी अर्थ

तरी, पार्थ, तुझ्या आस्थेमुळे तुला प्राप्त झालेले हे गीताशास्त्र, ते तपोहीन पुरुषाला तू मुळीच सांगू नको हो !

English meaning

O Partha, you should never tell any man who does not observe any penance, this science of Geeta, which you have learnt by your devotion.

1487
मूळ

अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्ती जो ढिला । तो वेदी अंत्यजु वाळिळा । तैसा वाळी ॥1487॥

मराठी अर्थ

अथवा एखादा तपी असूनही जर त्याची गुरुनिष्ठा यथातथाच असेल, तरीही, वेदाने अंत्यजाला अस्पृश्य म्हणून गणिले आहे तसा तूही त्याला ह्या शास्त्रापुरता बाजूस सार.

English meaning

Even if one is penant, but is not a loyal devotee of the Guru, you should avoid him as the Vedas avoid the lowest born Shoodras.

1488
मूळ

नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा । गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥1488॥

मराठी अर्थ

अथवा, कावळा वृद्ध असला तरीही त्याला जसा पुरोडाश (यज्ञाचा अवशिष्ट भाग) घालीत नाहीत, याप्रमाणे, तापसी असूनही गुरुभक्तिहीन असेल अशाला गीताशास्त्र सांगू नको

English meaning

And just as one does not throw the sacred food used in the sacrificial rituals to a crow eventhough it may be a veteran, old crow, you should not give this knowledge to a man, who has observed penance up to his old age, but has no respect for his teacher.

1489
मूळ

का तपही जोडे देही । भजे गुरुदेवांच्या ठायी । परी आकर्णनी नाही । चाड जरी ॥1489॥

मराठी अर्थ

किंवा देहाने तपही चालू गुरु देवतांचेही जो भजन करितो, परंतु ज्याला श्रवणाची चाड म्हणजे भक्ति किंवा इच्छा नाही.

English meaning

Not only this, a man may be doing penance, he may have a devotion to his teacher, but has no interest in listening to this Geeta.

1490
मूळ

तरी मागील दोन्ही आंगी । उत्तम होय कीर जगी । परी या श्रवणालागी । योग्यु नोहे ॥1490॥

मराठी अर्थ

तरीही आहे वरील दोन गोष्टींच्या दृष्टीने तो लोकात उत्तम म्हणून गणला असला तरी, तो गीता श्रवणाचा अधिकारी नाही.

English meaning

If there is such a man, he will be respectable for his two virtues, but will not deserve listening to Geeta.

1491
मूळ

मुक्ताफळ भलतैसे । हो परी मुख नसे । तव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥1491॥

मराठी अर्थ

मोती वाटेल तितके चांगले असो, पण जर त्याला वेज नसेल तर हे सूत्र ओवण्याच्या लायकीचे आहे काय ?

English meaning

Even if a pearl may be very costly can a thread enter it, if it has no hole?

1492
मूळ

सागरु गंभीरु होये । हे कोण ना म्हणत आहे । परी वृष्टि वाया जाये । जाली तेथ ॥1492॥

मराठी अर्थ

समुद्र गंभीर असतो, हे कोण नाकबूल करितो ? त्यात होणारी वृष्टि ही व्यर्थ आहे तरीही, असेच म्हणावे लागते.

English meaning

Who denies that the ocean is very vast and deep? But all the rain becomes useless on its surface.

1493
मूळ

धालिया दिव्यान्न सुवावे । मग जे वाया धाडावे । ते आर्ती का न करावे । उदारपण ॥1493॥

मराठी अर्थ

तृप्त असलेल्यांना आग्रहाने उत्तम अन्न वाढून फुकट दवडण्यापेक्षा ते क्षुधार्ताना (भुकेल्याला) देण्याचे औदार्य का न करावे ?

English meaning

Why should not the good food be given to a really hungry man instead of feeding a man, who is already overfed, and wasting it?

1494
मूळ

म्हणौनि योग्य भलतैसे । होतु परी चाड नसे । तरी झणे वानिवसे । देसी हे तया ॥1494॥

मराठी अर्थ

म्हणून इतर गोष्टींनी वाटेल तितके योग्य असोत, पण श्रवणाची चाड नसेल तर चुकून अगर कौतुकानेही त्यांना हे, गीतशास्त्र देऊ नको हो !

English meaning

Therefore, however great a man may be, if he has no desire to listen, you should not think of telling him these things even as a past time fun.

1495
मूळ

रूपाचा सुजाणु डोळा । वोढवू ये कायि परिमळा ? । जेथ जे माने ते फळा । तेथचि ते गा ॥1495॥

मराठी अर्थ

डोळयाचा रूपविषयात पूर्ण अधिकार असला म्हणून तो काय परिमळाच्या परीक्षेच्या कामी येईल ? म्हणून जे जेथे योग्य तेथेच त्याला फल प्राप्ति होते

English meaning

For example, our eye is able to appreciate the beauty of form, but how can it know the joy of fragrance? So, everything becomes fruitful in its right place.

1496
मूळ

म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती । परी शास्त्रश्रवणी अनासक्ती । वाळावेचि ते ॥1496॥

मराठी अर्थ

म्हणून, हे सुभद्रापते, ज्यांना गीता, सांगावयाची ते तपी, निष्ठावान भक्त आहेत किंवा कसे हे, तर पहावेच, पण, तरीही, शास्त्रश्रवणाविषयी ते अनासक्त किंवा उदासीन असतील तर ते वजं करावेच.

English meaning

Therefore, the masters of penance and devotees may be given due respect, but if they have no respect for listening to this Geeta, they should be avoided while imparting this knowledge.

1497
मूळ

नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणी आर्ति । आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥1497॥

मराठी अर्थ

अथवा तप, भक्ति यांनी युक्त असून श्रवणाविषयीही तीव्र इच्छा आहे अशी व्यक्ति जरी आढळली

English meaning

Now, there may the virtue of penance, devotion, desire to listen, - though all these conditions are fulfilled by a man,

1498
मूळ

तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता । तया माते सामान्यता । बोलेल जो ॥1498॥

मराठी अर्थ

तरी, गीताशास्त्राचा निर्मात व सकललोकाचा शास्ता असा जो मी, त्या मला जो सामान्य मनुष्याप्रमाणे लेखील,

English meaning

But if he utters words of scorn about me who am the Lord of all these worlds and the creator of this science of Geeta.

1499
मूळ

माझ्या सज्जनेंसि माते । पैशुन्याचेनि हाते । येक आहाती तयाते । योग्य न म्हण ॥1499॥

मराठी अर्थ

किंवा माझ्या सज्जनांची (भक्तांची) व माझी दुष्ट वचनांनी निंदा करणारे जे कोणी असतील तेही या शास्त्राला योग्य असे समजू नको.

English meaning

And those who talk loosely blaming me and my devotees- you should not consider them worthy of listening to Geeta.

1500
मूळ

तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी । दीपेवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥1500॥

मराठी अर्थ

त्यांची इतर सर्व सामग्री म्हणजे रात्री ज्योतीवाचून नुसती तेल व वातीची तयारी करून ठेवलेल्या ठाणदिवीप्रमाणे व्यर्थ होय असे समज.

English meaning

All their well-earned virtues are like lamp-stand, which is not lit on a dark night.

1501
मूळ

अंग गोरे आणि तरुणे । वरी लेईले आहे लेणे । परी येकलेनि प्राणे । सांडिले जेवी ॥1501॥

मराठी अर्थ

शरीर गोरे आहे, तरुण आहे, अलंकारभूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यात जसा नसावा.

English meaning

The body may be beautiful, fair-skinned, and well-decorated with ornaments, but may be lifeless.

1502
मूळ

सोनयाचे सुंदर । निर्वाळिले होय घर । परी सर्पांगना द्वार । रुंधले आहे ॥1502॥

मराठी अर्थ

किंवा सोन्याचे सुंदर बांधलेले घर आहे, पण नागिणीने प्रवेशद्वार रोखून ठेविले आहे.

English meaning

There may be a temple of pure gold, but its entrance may be menacingly guarded by a female cobra.

1503
मूळ

निपजे दिव्यान्न चोखट । परी माजी काळकूट । असो मैत्री कपट- । गर्भिणी जैसी ॥1503॥

मराठी अर्थ

किंवा उत्तम स्वच्छ अन्न तयार करून आत जर जालीम विष असेल किंवा वरून मैत्री असून पोटात कपट असेल तर ते जसे व्यर्थ.

English meaning

There may be very good food cooked, but mixed with poison or there may be apparent friendship with hidden treachery.

1504
मूळ

तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा । जो माझयांची का निंदा । माझीचि करी ॥1504॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करितो, त्याचे तप, भक्ति, बुद्धि ही व्यर्थ होत असे ध्याना असू दे.

English meaning

Similarly, my dear wise Arjuna, you should consider that all the penance, devotion, talent of that man are polluted, who blames me or my devotees.

1505
मूळ

याकारणे धनंजया । तो भक्तु मेधावी तपिया । तरी नको बापा इया । शास्त्रा आतळो देवो ॥1505॥

मराठी अर्थ

यास्तव, अर्जुना, तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी त्याला ह्या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको.

English meaning

Therefore, O Dhananjaya, though such a man may be a devotee and an intelligent person having done a great amount of penance, you should not let him touch this sacred science.

1506
मूळ

काय बहु बोलो निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा । गीता हे कवतिका- । लागीही नेदी ॥1506॥

मराठी अर्थ

फार काय सांगावे ? त्याची ब्रह्मदेवासारखी योग्यता असूनही जर तो निंदक असेल, तर कौतुकाखातरही त्याला गीता सांगू नको.

English meaning

How much more should I emphasize this? Even if the man who blames me, may be as great as God the creator, you should not reveal this knowledge to him even as a matter of fun.

1507
मूळ

म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळी दाटोनि गाडोरा । वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥1507॥

मराठी अर्थ

म्हणून अर्जुना, ज्याने तपोरूप पाषाणांचा तळांत दृढपाया भरून, त्यावर जो स्वतः पूर्णं गुरुभक्तिरूप मंदिर बनला आहे.

English meaning

O the great Archer, one who fills the base of his devotional temple very solidly by the penance (of good conduct, etc.) and has himself become the strong temple of devotion to the Guru.

1508
मूळ

आणि श्रवणेच्छेचा पुढा । दारवंटा सदा उघडा । वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥1508॥

मराठी अर्थ

आणि ज्याचे श्रवणेच्छारूप प्रवेशद्वार नित्य उघडे आहे व ज्या मंदिरावर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस शोभतो आहे.

English meaning

And its front door, denoting his desire to listen, is always kept open; and the dome of that temple is studded with gems of "avoidance of gossip;"

1509
मूळ

ऐशा भक्तालयी चोखटी । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठी । मग माझिया संवसाटी । तुकसी जगी ॥1509॥

मराठी अर्थ

अश्या शुद्ध भक्तरुपी देवालयात ह्या गीतारत्नेश्वराची स्थापना कर. म्हणजे जगात तु योग्यतेला पावशील,

English meaning

In such blotless temple of the devotee, you should establish the God Almighty in the form of the gem that is Geeta. Then you will be considered as adorable as myself in the world.

1510
मूळ

का जे एकाक्षरपणेसी । त्रिमात्रकेचिये कुशी । प्रणवु होता गर्भवासी । सांकडला ॥1510॥

मराठी अर्थ

कारण, जो प्रणव म्हणजे ॐकार एक अक्षराच्या रूपाने त्रिमात्रा ज्या अ, उ, म ह्यांच्या पोटात गर्भवासामध्ये होता-

English meaning

Because in the branches of the Geeta, in the shape of the chapter, the Pranava which was in the foetus of A.U. and M and was confined in one syllable of Om, has spread widely, or one may say that this is Gayatri the vine which has grown upon her the flowers and fruits of various verses.

1511
मूळ

तो गीतेचिया बाहाळी । वेदबीज गेले पाहाळी । की गायत्री फुलीं फळी । श्लोकांच्या आली ॥1511॥

मराठी अर्थ

असा वेदाचे बीज जो ॐकार तो गीतारूप वृक्षाच्या फांद्यांनी दूरवर विस्तारला; किंवा गायत्रीरूप (बीजत्व ने) असलेला हाच ॐकार, गीतेतील लोकांच्या रूपाने जणू फुलांफळांस आला.

English meaning

Because in the branches of the Geeta, in the shape of the chapter, the Pranava which was in the foetus of A.U. and M and was confined in one syllable of Om, has spread widely, or one may say that this is Gayatri the vine which has grown upon her the flowers and fruits of various verses.

1512
मूळ

ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥1512॥

मराठी अर्थ

ती प्रणवमंत्राचे रहस्य असलेली ही गीता, अनन्यजीवन बाळकाला आई भेटावी, त्याप्रमाणे, जो माझ्या भक्तांस भेटवितो- (उपदेशितो)

English meaning

He who makes this Geeta which is the secret of all Mantras, easily embraced by the devotees just as if the most loving mother and her totally dependant child are meeting each other.

1513
मूळ

तैसी भक्ता गीतेसी । भेटी करी जो आदरेसी । तो देहापाठी मजसी । येकचि होय ॥1513॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे भक्तांची जो गीतेपाशी आदराने ग्रंथि घालून देतो तो देहपातानंतर मलाच प्राप्त होतो. (मद्रूपच होतो).

English meaning

So, he who does help my devotees to meet this Geeta with that extreme love, becomes after his bodily death, one with me only.

1514
मूळ

आणि देहाचेही लेणे । लेऊनि वेगळेपणे । असे तव जीवेप्राणे । तोचि पढिये ॥1514॥

मराठी अर्थ

आणि असा भक्त देहरूपी अलंकाराच्या उपाधीच्या योगाने माझ्याहून वेगळेपणाने असला, तरी मला तो जीव की प्राण असा प्रिय आहे.

English meaning

When my devotee lives without attachment to his body which he wears as loosely as an ornament, he is liked by me more than all others.

1515
मूळ

ज्ञानिया कर्मठा तापसा । यया खुणेचिया माणुसां- । माजी तो येकु गा जैसा । पढिये मज ॥1515॥

मराठी अर्थ

ज्ञानाभ्यासी, कर्मठ, तापसी अशी भिन्न भिन्न अधिकारची माणसे असली तरी, त्यामध्ये तो एक जसा मला आवडतो.

English meaning

Among the knowledge men of penance and men performing all ritualistic actions, he is so dear to me that,

1516
मूळ

तैसा भूतळी आघवा । आन न देखे पांडवा । जो गीता सांगे मेळावा । भक्तजनांचा ॥1516॥

मराठी अर्थ

तसा, सर्व जगांत, अर्जुना, मला अन्य कोणीही आवडत नाही; असा कोण म्हणून विचारशील तर, जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीतेचे प्रवचन करितो तो होय.

English meaning

Throughout the world, there is nobody else so dear, because he teaches this Geeta among my devotees.

1517
मूळ

मज ईश्वराचेनि लोभे । हे गीता पढता अक्षोभे । जो मंडन होय सभे । संताचिये ॥1517॥

मराठी अर्थ

मज ईश्वराच्या प्रेमाखातर ज्याचा स्थिर चित्ताने गीतापाठ सुरू असतो, तो संतसभेला भूषणभूत होतो.

English meaning

Cherishing love and devotion for me with all my glory, he peacefully recites Geeta in a group of my devotees.

1518
मूळ

नेत्रपल्लवी रोमांचितु । मंदानिळे कांपवितु । आमोदजळे वोलवितु । फुलांचे डोळे ॥1518॥

मराठी अर्थ

नवपल्लवांप्रमाणे अंतःकरणे रोमांचित करणारा (प्रेमकथांनी), मंदवायूने वृक्ष डोलावे तसा श्रोत्समुदाय आनंदाने डोलविणारा, फुले सुगंधित जलबिंदुयुक्त असावी त्याप्रमाणे श्रोत्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी पाझरू लावणारा,

English meaning

Like the spring season which makes the trees excited with new tender leaves, making them nod happily by the delicate breeze, by wetting the eyes of the flowers by fragrant honey- juice, giving a loving call by the high pitched slender notes of a cuckoo, this man enters the garden of my devotees. (By his words, the listeners are excited. They nod their heads in appreciation of his thoughts, they have tears in their flower-like eyes due to loving emotions as he talks to them addressing them eagerly, calling them as O sirs! Please listen!)

1519
मूळ

कोकिळा कलरवाचेनि मिषे । सद्गद बोलवीत जैसे । वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामी ॥1519॥

मराठी अर्थ

व कोकिलांप्रमाणे मधुर कंठाने श्रोत्यांच्या मुखातून भगवन्नामगजर करविणारा असा हा गीताप्रवचनकार, म्हणजे मद्भक्तरूपी उद्यानत प्रवेश करणारा जणू वसंत तसा शोभतो.

English meaning

Like the spring season which makes the trees excited with new tender leaves, making them nod happily by the delicate breeze, by wetting the eyes of the flowers by fragrant honey- juice, giving a loving call by the high pitched slender notes of a cuckoo, this man enters the garden of my devotees. (By his words, the listeners are excited. They nod their heads in appreciation of his thoughts, they have tears in their flower-like eyes due to loving emotions as he talks to them addressing them eagerly, calling them as O sirs! Please listen!)

1520
मूळ

का जन्माचे फळ चकोरा । होत जै चंद्र ये अंबरा । नाना नवघन मयूरा । वो देत पावे ॥1520॥

मराठी अर्थ

किंवा आकाशात चंद्रोदय झाला म्हणजे चकोरांना जन्माचे सार्थक झालेसे वाटते, अथवा वर्षाकाळ मेघांनी मयूरकेकेला (ध्वनि) जसे ” ओ ” देत प्रसन्न व्हावे

English meaning

Or just as the life of the birds Chakora is fulfilled when the Moon rises in the sky or just as responding through thunder to the mewing of peacocks, the clouds float in the sky in rainy season.

1521
मूळ

तैसा सज्जनांच्या मेळापी । गीतापद्यरत्नी उमपी । वर्षे जो माझ्या रूपी । हेतु ठेऊनि ॥1521॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे केवळ माझ्या उद्देशाने संतसमुदायांमध्ये जो गीताश्लोक रूपी रत्नांचा व्याख्यानद्वारा उमाप (पुष्कळ) वर्षाव करितो.

English meaning

Like these, the man scatters freely the gems of the verses of Geeta in the assembly of saints, keeping all his attention riveted to my beautiful Omnipresent form.

1522
मूळ

मग तयाचेनि पाडे । पढियंते मज फुडे । नाहीचि गा मागेपुढे । न्याहाळिता ॥1522॥

मराठी अर्थ

त्याच्या इतके मला प्रिय असणारे असे पूर्वीही काही नव्हते व विचार केला तर पुढेही काही असणे शक्य नाही.

English meaning

There is nothing so dear to me like such a man, neither there was in the past, nor will be in future.

1523
मूळ

अर्जुना हा ठायवरी । मी तयाते सूये जिव्हारी । जो गीतार्थाचे करी । परगुणे संता ॥1523॥

मराठी अर्थ

अर्जुना, संतसज्जनांना गीतामृताची मेजबानी घालणाऱ्या ह्या माझ्या भक्ताला मी सर्वतोपरी माझ्या अंतःकरणांतच स्थान देतों.

English meaning

O Arjuna, I have been keeping such a man preserved with care in my heart, who gives the sweet dinner of the meaning of Geeta to the saintly listeners.

1524
मूळ

पै माझिया तुझिया मिळणी । वाढिनली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणी । आलासे जेथे ॥1524॥

मराठी अर्थ

अरे, तुझ्या माझ्या भेटींत जी ही गीता कथा वाढली, व जिचा मोक्ष धर्मानेही जीवनार्थ (जिवंत रहावे म्हणून ) आश्रय केला

English meaning

This is the story which gives birth to the religion of liberation, grown in our meeting and dialogue.

1525
मूळ

तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हा दोघांचा संवादु । न करिता पदभेदु । पाठेचि जो पढे ॥1525॥

मराठी अर्थ

तो हा सकलार्थाचे ज्ञान करून देणारा आपला दोघांचा संवाद, जो अर्थासाठी पदच्छेद न करिता केवल पाठ म्हणून पठण करितो.

English meaning

One who will recite without making mistake even a syllable in it, this dialogue which imparts knowledge about all the four human achievements,

1526
मूळ

तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥1526॥

मराठी अर्थ

तो, प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूल अविद्येची आहुती देऊन मला परमात्म्याला संतुष्ट करितो.

English meaning

Will become pure-minded by kindling the fire of knowledge and burning in it the ignorance as offering of the oblation, and will please me the Paramatman.

1527
मूळ

घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जे विचक्षणा । ठाकती ते गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥1527॥

मराठी अर्थ

गीतार्थाचा ठाव घेऊन ” बुद्धिमान ज्ञानी लोकांना जी फलप्राप्ति होते, तीच गीतेचे गायन पठण करणारांनाही शेवट होते

English meaning

O the wise Arjuna, even a man who does not know the meaning of this Geeta but recites it by mouth, will get the same joy which the men of knowledge get by discussing its meaning at length.

1528
मूळ

गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसे । गीता माउलियेसि नसे । जाणे तान्हे ॥1528॥

मराठी अर्थ

म्हणून अर्थज्ञाला जे फल तेच फल पाठकालाही अखेर आहे; गीता सर्वाची माउली असल्यामुळे तिच्यापाशी तान्हा व मोठा असा भेद नाही.

English meaning

In short the man who recites Geeta gets the same fruit as the man of knowledge may get. Really Geeta the mother does not make any distinction between the child which is wise and the child which is innocent and ignorant!

1529
मूळ

आणि सर्वमार्गी निंदा । सांडूनि आस्था पै शुद्धा । गीताश्रवणी श्रद्धा । उभारी जो ॥1529॥

मराठी अर्थ

आणि सर्व प्रकारची निंदा सोडून जो शुद्ध आदराने गीताश्रवणाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवील.

English meaning

And he who does not blame anybody following any path, and has complete faith in the listening to Geeta,

1530
मूळ

तयाच्या श्रवणपुटी । गीतेची अक्षरे जव पैठी । होतीना तव उठाउठी । पळेचि पाप ॥1530॥

मराठी अर्थ

त्याच्या कानांत गीतेची अक्षरे प्रवेश करितात न करितात तोच पाप तेथून पाय काढते !

English meaning

Experiences that no sooner do the letters of Geeta are heard by him, his sin runs quickly away from him.

1531
मूळ

अटवियेमाजी जैसा । वन्हि रिघता सहसा । लंघिती का दिशा । वनौके तिये ॥1531॥

मराठी अर्थ

अरण्याला वणवा लागला असता वनांतील प्राणी जसे दाही दिशांकडे पळून जातात.

English meaning

Just as the animals in a forest run away as soon as a forest fire breaks out,

1532
मूळ

का उदयाचळकुळी । झळकता अंशुमाळी । तिमिरे अंतराळी । हारपती ॥1532॥

मराठी अर्थ

किंवा उदयगिरीवर सूर्य येतांच अंधकार जसा आकाशांतच नाहीसा होतो

English meaning

Or just as the darkness disappears in the sky as soon as the Sun shines bright on the eastern mountain.

1533
मूळ

तैसा कानाच्या महाद्वारी । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥1533॥

मराठी अर्थ

याप्रमाणे ज्याच्या कर्णरूपी महाद्वारांत गीतेचा घोष चालू आहे, त्याची पूर्वीची सर्वं पापे नष्ट होतात.

English meaning

Similarly, the whole sin accumulated from the beginning of the world, gets destroyed as soon as Geeta echoes and re-echoes in the main gates of the ears.

1534
मूळ

ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट । याहीवरी अचाट । लाहे फळ ॥1534॥

मराठी अर्थ

याप्रमाणे त्याचे सर्व कुल पावन होऊन तो शुद्ध पुण्यमूर्ती होतो; व याहीपेक्षां त्याला अलौकिक फल मिळतें.

English meaning

Thus the vine that is our life becomes clean and blossoms with the beautiful flowers of merits and in the end, it yields unlimited fruit.

1535
मूळ

जे इये गीतेची अक्षरे । जेतुली का कर्णद्वारे । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध की ॥1535॥

मराठी अर्थ

गीतेची जितके अक्षरे त्याच्या श्रवणात प्रवेश करतील तितक्या अश्वमेधांचे पुण्य त्याला जोडते.

English meaning

I will even say that there is the merit earned by the listener of having performed as many Ashwamedha sacrifices as the number of the letters of Geeta enter his ears.

1536
मूळ

म्हणौनि श्रवणे पापे जाती । आणि धर्म धरी उन्नती । तेणे स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखी ॥1536॥

मराठी अर्थ

गीता श्रवणाते पापे नष्ट होतात; धर्माची वृद्धि होते व त्यायोगे अखेर स्वर्गाचे राज्य त्याला प्राप्त होते

English meaning

So, in fine, it is a fact that by listening to Geeta, sins are destroyed, merit is earned and the kingdom of heaven is gained later on.

1537
मूळ

तो पै मज यावयालागी । पहिले पेणे करी स्वर्गी । मग आवडे तव भोगी । पाठी मजचि मिळे ॥1537॥

मराठी अर्थ

मज कडे यावयास निघालेला तो पुरुष, पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सुख इच्छला येईल तोपर्यंत भोगून अखेर माझी प्राप्ति त्याला होते.

English meaning

Before coming into me and merging in me, he takes the first halt in the heaven, enjoys whatever happiness he wishes to enjoy there and finally comes unto me only.

1538
मूळ

ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया । फळे महानंदे मिया । बहु काय बोलो ॥1538॥

मराठी अर्थ

अर्जुना, श्रवण करणाराला व पठण करणाराला गीता ह्याप्रमाणे फलदात्री होते; महानंद रूप जो मी, त्याने तुला आणखी काय सांगावे ?

English meaning

O Dhananjaya, such are the joyful fruits gained by the listener and the reader of Geeta. Now how much should I expand on this point?

1539
मूळ

याकारणे हे असो । परी जयालागी शास्त्रातिसो । केला ते तव तुज पुसो । काज तुझे ॥1539॥

मराठी अर्थ

यास्तव ह्या गोष्टी असोत; पण ज्या कार्यासाठी एवढा शास्त्रीय ऊहापोह केला त्याने तुझी समजूत कितपत झाली आहे हे, तुला प्रथम विचारतों.

English meaning

Therefore, I feel that enough is said in praise of this teaching. Now I am going to ask you a question about the main purpose for which all this philosophy was expounded from the beginning.

1540
मूळ

तरी सांग पा पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा । तुज एकचित्ते फावा । गेला आहे ? ॥1540॥

मराठी अर्थ

तरी, अर्जुना, हा सर्व शास्त्रसिद्धांत तुला विचारपूर्वक पटला आहे ना ?

English meaning

So, please tell me, O Pandava, has this whole doctrine of scriptures been well established in your concentrated mind?

1541
मूळ

आम्ही जैसे जया रीती । उगाणिले कानांच्या हाती । येरी तैसेचि तुझ्या चित्ती । पेठे केले की ? ॥1541॥

मराठी अर्थ

तुला आम्ही जे श्रवण करविले ते तसेच्या तसेच तुझ्या कर्णांनी तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचविले ना ?

English meaning

Have your ears conveyed everything as it is which we have put into them?

1542
मूळ

अथवा माझारी । गेले सांडीविखुरी । किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिले । ॥1542॥

मराठी अर्थ

किंवा मध्येच काही मजकूर सांडलोटीवर गेला, किंवा उपेक्षाबुद्धीने त्यांनी गाळून टाकिला ?

English meaning

Or is something lost in transit, spoiled, twisted or overturned?

1543
मूळ

जैसे आम्ही सांगितले । तैसेचि हृदयी फावले । तरी सांग पा वहिले । पुसेन ते मी ॥1543॥

मराठी अर्थ

कर्णांनी, जसे आम्ही सांगितले तसेच्या तसे जर हे श्रवण अंतःकरणापर्यंत पोचविले असेल तर मी तुला विचारतो त्याचे उत्तर दे पाहू.

English meaning

If all that we have taught you is stored in tact in your heart, please answer the question that I will ask.

1544
मूळ

तरी स्वाज्ञानजनिते । मागिले मोहे तूते । भुलविले तो येथे । असे की नाही ? ॥1544॥

मराठी अर्थ

तरी स्वस्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या ज्या मोहाने तुला भ्रमांत पाडले तो मोह आता शिल्लक आहे की नाही ?

English meaning

I am asking you whether the confusion which was born out of your ignorance about your own self, the Atman, has by now gone or not?

1545
मूळ

हे बहु पुसो काई । सांगे तू आपल्या ठायी । कर्माकर्म काही । देखतासी ? ॥1545॥

मराठी अर्थ

इतके तरी कशाला विचारु ? तू आपल्याला कर्ता समजतोस की अकर्ता ते सांग पाहू ?

English meaning

But why should I ask this abstract question? Tell me only whether you see any separate action or non-action?

1546
मूळ

पार्थु स्वानंदैकरसे । विरेल ऐसा भेददशे । आणिला येणे मिषे । प्रश्नाचेनि ॥1546॥

मराठी अर्थ

अर्जुन, स्वात्मानंदात विसरून जाण्याचा संभव होता, ह्या प्रश्नाच्या मिषाने देवांनी त्यास पुन्हा देहभानावर आणिले

English meaning

By asking this question the Lord brought Arjuna to such a state that instead of dissolving in the joyful juice of non-duality he was again pulled back to his state of duality.

1547
मूळ

पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघो नेदी ॥1547॥

मराठी अर्थ

आतांच जरी हा पूर्ण ब्रह्म झाला, तरी आपला पुढील कार्यभाग साधण्यासाठी देवांनी त्याच्या (आभासिक भेददशेची मर्यादा त्याला उल्लंघू दिली नाही. (समाधींतून माघे ओढले. )

English meaning

Arjuna had reached the stage of absolute Brahman, but the Lord Shrikrishna did not allow him to cross the limits of divisions and duality.

1548
मूळ

येऱ्हवी आपुले करणे । सर्वज्ञ काय तो नेणे ? । परी केले पुसणे । याचि लागी ॥1548॥

मराठी अर्थ

एऱ्हवी आपल्या उपदेशाचा पार्थावर काय परिणाम झाला हे सर्वज्ञ भगवंतांना काय माहीत नव्हतें ? पण, म्हणूनच त्यांनी मुद्दाम असा प्रश्न केला.

English meaning

Otherwise, was it possible that the omniscient God was not knowing what he was doing? But he asked this question so that Arjuna would again come back to the firm ground of duality.

1549
मूळ

एवं करोनिया प्रश्न । नसतेचि अर्जुनपण । आणूनिया जाले पूर्णपण । ते बोलवी स्वये ॥1549॥

मराठी अर्थ

असा प्रश्न करून, बाधित झालेल्या अगर विरत चाललेल्या अर्जुनपणावर त्याला पुन्हा आणून, त्याला बाणलेले पूर्णपण (ब्रह्मत्व) त्याजकडून पुन्हा वदविलें.

English meaning

By asking this question, the Lord brought Arjuna back to the awareness that he was Arjuna, (though unreal in the spiritual sense) and made him say - "I AM COMPLETE'- which was his experience.

1550
मूळ

मग क्षीराब्धीते सांडितु । गगनी पुंजु मंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥1550॥

मराठी अर्थ

मग क्षीरसागरापासून निघालेला पूर्णचंद्र आकाशात तेजोगोल म्हणून, वस्तुतः क्षीरसागराच्या संपत्तीपैकीच तो एक भाग असूनही (वेगळा नसूनही) वेगळेपणाने शोभतो.

English meaning

Then just as the Moon rising out of the white ocean of milk, when shining in the sky, seems white and brilliant most naturally without any effort.

1551
मूळ

तैसा ब्रह्म मी हे विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वे भरे । हेही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥1551॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, प्रथम असलेली ” मी ब्रह्म ही वृत्ति सुटून जो जगाकडे पहातो तेव्हां, त्याला तेही ब्रह्मरूप दिसावे व त्या वृत्तीच्या लयाने ब्रह्मपणाही स्वरूपात विरावा.

English meaning

Similarly Arjuna stood as a separate person but he was one moment forgetting that he was Brahman, and he immediately experienced that the whole world was impregrated by Brahman, and when he felt like going beyond that feeling, the Brahman-consciousness also disappeared.

1552
मूळ

ऐसा मोडतु मांडतु ब्रह्मे । तो दुःखे देहाचिये सीमे । मी अर्जुन येणे नामे । उभा ठेला ॥1552॥

मराठी अर्थ

असा त्याचा ब्रह्मस्थितीशी, कधी आपलेपणे तर कधी जगद्रूपाने आनंदविलास सुरू असता (देवांच्या ह्या प्रश्नानें) मी अर्जुन अशा प्रकारे देहबुद्धीवर येतांना त्याला कष्ट झाले.

English meaning

Thus having and not having the feeling that he was Brahman, alternately, Arjuna was confused and stood motionless on the verge of being very unhappy in the state of being Arjuna, the person.

1553
मूळ

मग कापता करतळी । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळी । जिरऊनिया ॥1553॥

मराठी अर्थ

व मग कंप पावणाऱ्या करतलाने अंगावरील रोमांच बसवून व घामबिंदु जिरवून

English meaning

Then with unsteady hands he smoothed his uncontrolled hair, and somehow becoming free of sweat.

1554
मूळ

प्राणक्षोभे डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलौनिया ॥1554॥

मराठी अर्थ

व कष्टामुळे होणाऱ्या दीर्घ श्वासोच्छवासान डोलणारे शरीर त्याच्याच आतील आधाराने सांवरून हालचाल बंद होत्साता स्तब्ध उभा राहिला.

English meaning

Steadying his body himself by controlling its undulations caused by irregular breathing and preventing his body's unsteady gait,

1555
मूळ

नेत्रयुगुळाचेनि वोते । आनंदामृताचे भरिते । वोसंडत ते मागुते । काढूनिया ॥1555॥

मराठी अर्थ

दोन्ही नेत्रांच्या कडांनी वाहणारे आनंदाश्रूचे भरते पुसून टाकुन

English meaning

Withholding the joyous tears behind his eyelids and subduing the emotions which were contracting his throat, and making them subside inwards.

1556
मूळ

विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठी । ते करूनिया पैठी । हृदयामाजी ॥1556॥

मराठी अर्थ

नाना प्रकारची चित्ताची उत्सुकता कंठ भरून आणित होती; पण तिला आंतल्याआंत जिरवून

English meaning

Withholding the joyous tears behind his eyelids and subduing the emotions which were contracting his throat, and making them subside inwards.

1557
मूळ

वाचेचे वितुळणे । सांवरूनि प्राणे । अक्रमाचे श्वसणे । ठेऊनि ठायी ॥1557॥

मराठी अर्थ

अव्यवस्थितपणे व होणारे श्वासाचे व्यापार व विस्कळित झालेली वाचा ह्यांना त्याने नित्याच्या स्थितीवर आणिलें.

English meaning

By re-establishing proper articulation of words by the tongue and controlling his shallow and irregular breathing.

1558
मूळ

मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो । तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥1558॥

मराठी अर्थ

आणि अर्जुन म्हणाला, देवा, माझा मोह आहे की गेला असे मला विचारले ना ? तर त्याने माझ्या चित्तांतील आपले बिऱ्हाड सकुटुंब (कारणाज्ञानासह) हालविले आहे.

English meaning

Then Arjuna said- "O my Lord, why do you ask whether I am still confused? Sir! The confusion has already left me, together with its followers!

1559
मूळ

पासी येऊनि दिनकरे । डोळ्याते अंधारे । पुसिजे हे कायि सरे । कोणे गावी ? ॥1559॥

मराठी अर्थ

सूर्याने डोळयाच्या जवळ येऊन अंधार भासतो काय ? असा प्रश्न करावा असे कोठेतरी झाले आहे काय ?

English meaning

Is it necessary in any town that the Sun should come very near a man and ask whether he is seeing darkness anywhere?

1560
मूळ

तैसा तू श्रीकृष्णराया । आमुचिया डोळया । गोचर हेचि कायिसया । न पुरे तव ॥1560॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, हे श्रीकृष्णराया, आमच्या नेत्रांना तुझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर, त्याने कोणती गोष्ट होऊ शकणार नाही ?

English meaning

Similarly is it an ordinary thing that we can see you actually by our eyes near us? Is that not enough?

1561
मूळ

वरी लोभे मायेपासूनी । ते सांगसी तोंड भरूनी । जे कायिसेनिही करूनी । जाणू नये ॥1561॥

मराठी अर्थ

त्यातही मातेपेक्षाही अधिक प्रेमाने (कळवळ्यानें) जे कोणाच्याही मुखातून श्रवण होणे शक्य नाही असे ज्ञान तोंड भरून (विस्तरशः) आम्हास सांगितल्यावर (मग हा प्रश्न ?)

English meaning

Further, you are telling verbally just like a loving mother, that secret which cannot be known by any efforts on our part.

1562
मूळ

आता मोह असे की नाही । हे ऐसे जी पुससी काई । कृतकृत्य जाहलो पाही । तुझेपणे ॥1562॥

मराठी अर्थ

आता, मोह आहे की नष्ट झाला असे जे आपण विचारले, त्याचे उत्तर इतकंच की, देवा, त्वद्रूप झाल्यामुळे (अद्वैतस्थितीमुळे) मी आता कृत्य कृत्य झालो. (मला आता काहीही कर्तव्य म्हणून उरले नाही)

English meaning

Now, as you are still asking whether my confusion has gone, I wish to tell you that by your grace the confusion has gone.

1563
मूळ

गुंतलो होतो अर्जुनगुणे । तो मुक्त जालो तुझेपणे । आता पुसणे सांगणे । दोन्ही नाही ॥1563॥

मराठी अर्थ

‘मी अर्जुन ” अशी भेदबुद्धि होती तोवर बद्ध होतो खराच; पण त्या माझे तुझ्या स्वरूपाशी तात्त्विक ऐक्य झाल्यावर मी केव्हांही मुक्त होतो व आहेहीं; असा निश्चय झाला, त्यामुळे आता तुम्ही विचारणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत.

English meaning

I was deluded by the false concept that I am Arjuna, but by knowing you and that you and I are one, I am free of that delusion, and now both the asking of question and answering it are gone.

1564
मूळ

मी तुझेनि प्रसादे । लाधलेनि आत्मबोधे । मोहाचे तया कांदे । नेदीच उरो ॥1564॥

मराठी अर्थ

तुझ्या कृपाप्रसादाने अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाने माझ्या चित्तांत तो मोह अगर त्याचे मूळ काहीही उरू दिले नाही.

English meaning

I am so enlightened by the teaching given by you that even the seeds of confusion are not remaining in me.

1565
मूळ

आता करणे का न करणे । हे जेणे उठी दुजेपणे । ते तू वाचूनि नेणे । सर्वत्र गा ॥1565॥

मराठी अर्थ

आता, ” करू की नको करू ” हा विचार ज्या द्वैतभावावर नांदतो तो द्वैतभावच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाल्यामुळे तुझ्यावाचून मला सर्वत्र काहीही दिसत नाही.

English meaning

Now, since there is unity with you, the question whether to act or not to act, which arises only in the state of duality, is no more in existence.

1566
मूळ

ये विषयी माझ्या ठायी । संदेहाचे नुरेचि काही । त्रिशुद्धि कर्म जेथ नाही । ते मी जालो ॥1566॥

मराठी अर्थ

ह्याविषयी माझ्या अंतःकरणात तिळमात्र संदेह नाही; कारण जेथे कर्माचा कालत्रयी संबंध होणे शक्य नाही अशी ” नैष्कम्यं ” स्थिति । (ब्रह्मास्थिति ) मी लाधलो आहें.

English meaning

Now there is no doubt in me because I have attained that state, where action itself has no place.

1567
मूळ

तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेले निपटूनी । परी आज्ञा तुझी वाचोनि । आन नाही प्रभो ॥1567॥

मराठी अर्थ

देवा, आपल्या कृपेने मला माझ्या यथार्थस्वरूपाचे दर्शन होऊन, आता माझे म्हणून वाटणारे सर्व कर्तव्य निपटून नाहीसे झाले आहे; उरलेच असेल तर, देवा, आपली आज्ञा प्रमाण ” ह्यावाचून अन्य काहीही नाही.

English meaning

As I have realized my own self the Atman, by your grace, I have nothing to do as a necessary thing, and only "to obey you" remains!

1568
मूळ

का जे दृश्य दृश्याते नाशी । जे दुजे द्वैताते ग्रासी । जे एक परी सर्वदेशी । वसवी सदा ॥1568॥

मराठी अर्थ

कारण ज्या दृश्याच्या (तुझ्या व्यक्त मूर्तीच्या) दर्शनाने आपल्यासह दृश्यमात्र लयास जातं, तसेच ज्याचे दर्शन द्वैताची वार्ता उरू देत नाही, व जे व्यक्त एक असे असले तरी सर्वव्यापक आहे.

English meaning

Because, that, which is the only visible thing by which all visible things are destroyed, that which, though a thing, destroys the sense of two-ness in the whole world, that which is one, single, yet abides everywhere in all the universe;

1569
मूळ

जयाचेनि संबंधे बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे । जे भेटलया सर्व भेटे । आपणपाचि ॥1569॥

मराठी अर्थ

ज्याच्या समागमाने बंधापासून मुक्त होतो व ज्याच्या प्राप्तीने अन्य कशाचीही आशा उरत नाही,

English meaning

That, by being connected with which all connections or bindings are cut down; that, by the rising of aspiration for which, all ambitions and hopes disappear and that, by meeting which the self meets itself;

1570
मूळ

ते तू गुरुलिंग जी माझे । जे येकलेपणीचे विरजे । जयालागी वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥1570॥

मराठी अर्थ

असे जे देवा, तुम्ही माझे गुरु-स्थान (पद) की ज्याच्या सहाय्याने माझे अद्वितीय एकपण प्रकट झाले, व म्हणूनच ज्याच्याविषयींच्या आदराने तो अद्वैतबोधही बाजूस सारून ज्याच्या दर्शनाची इच्छा होते

English meaning

That is my deity of worship, which "you" are, who accompany unity, you whose grace makes it possible to step into unity;

1571
मूळ

आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचे काम । मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥1571॥

मराठी अर्थ

व ज्याच्या कृपेने आपले असलेले ब्रह्मत्व आपल्यास पटून कृत्याकृत्यांचे सर्व ओझे ( विधिकिर्करत्व) नाहीसे होते व ह्या खऱ्या कृतज्ञतेचे चिन्ह म्हणजे अशा गुरुमाउलीची निःसीम सेवा करणे एवढे एकच कर्तव्य भक्ताला उरतें.

English meaning

And you are the deity whose service I should do for ever, by destroying the doubts about what is to be done and what is not, and by becoming absolute Brahman myself.

1572
मूळ

गंगा सिंधू सेवू गेली । पावताचि समुद्र जाली । तेवी भक्ता सेल दिधली । निजपदाची ॥1572॥

मराठी अर्थ

गंगा, सागराच्या भेटीस गेली की तेणे सागररूपच होते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या भक्ताल निजपदाची जोड करून देतां.

English meaning

You are he who shares with your devotee your own glory, like the sea who transforms the river into sea-ness as it merges into the sea.

1573
मूळ

तो तू माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु । मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानी ॥1573॥

मराठी अर्थ

देवा, तुम्ही माझे ब्रह्मत्व मला दिले ह्याबद्दल उतराई होणे म्हणजे माझ्या स्वाधीन असणारी एकच गोष्ट आहे की, मी अशा माझ्या सद्गुरूची अकृत्रिमपणे आजन्म सेवा करावी.

English meaning

You are my Guru, as described above, who are untrammeled by any accretions, and who are the only God worthy of service and worship.

1574
मूळ

जे मज तुम्हा आड । होते भेदाचे कवाड । ते फेडोनि केले गोड । सेवासुख ॥1574॥

मराठी अर्थ

जो तुमच्या व माझ्यामध्ये भेदाचा प्रतिबंध होता त्याचा परिहार केल्याने आता हे सेवासुख निरुपम होय.

English meaning

You have destroyed the closed door of duality which was between us, and made it an easy and comfortable thing for me to serve you.

1575
मूळ

तरी आता तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देई अनुज्ञा । भलतियेविषयी ॥1575॥

मराठी अर्थ

तरी हे सकल देवाधिदेवराया, तू आता वाटेल ती आज्ञा कर, ते करीनच.

English meaning

So, O the god of the gods, I will not hesitate to obey any order whatsoever which you may give me.''

1576
मूळ

यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखे भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥1576॥

मराठी अर्थ

ह्या अर्जुनाच्या भाषणाने, देवांना सुखाचे भरते येऊन ते आनंदाने नाचू लागले, व म्हणाले विश्वांत अत्यंत मोठी फलप्राप्ति जर असेल तर असा शिष्य मिळणे हि होय.

English meaning

Listening to this talk of Arjuna, the Lord danced with delight inwardly and said to himself- I have verily received the best fruit in all the world in the person of my dear Arjuna.

1577
मूळ

उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु । मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥1577॥

मराठी अर्थ

आपला पुत्र जो चंद्र त्याचे कलाहीनत्व नष्ट होऊन, त्याला पूर्णता आलेली पाहून, सागरालाही नित्य मर्यादेचा विसर पडावा असे भरते येत नाही काय ? (मग देव नाचू लागले तर नवल काय ?)

English meaning

Does not the milk of ocean forget his limits of waves due to the delight of seeing his own son, the Moon, having completed the phases and become full-moon?" ***

1578
मूळ

ऐसे संवादाचिया बहुला । लग्न दोघांचिया आंतुला । लागले देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥1578॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे संवादरूपी बहुल्यांवर श्रीकृष्णार्जुनांच्या चित्तवृत्तीचे लग्न लागत असलेले (ऐक्य होत असलेले) पाहून संजयालाही प्रेमपूर येऊन तो तल्लीन झाला.

English meaning

So, thus even Sanjaya was greatly delighted to see the God and Arjuna meeting each other as if on the wedding dais of their dialogue, a meeting which was the meeting of the whole lifetime.

1579
Unverified — under review
मूळ

तेणे म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो । तो आपुला मनोभावो । अर्जुनेसी केला ॥1579॥

मराठी अर्थ

त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपले दोघांचे थोर भाग्य ! श्रीमद्व्यासांनीच आपले आज रक्षण केले

English meaning

So, thus even Sanjaya was greatly delighted to see the God and Arjuna meeting each other as if on the wedding dais of their dialogue, a meeting which was the meeting of the whole lifetime.

Note: Ghaisas's English translation source has no distinct paragraph for this ovi (his own numbering jumps directly from a paragraph matching ovi 1578 to one matching ovi 1580, with no paragraph in between covering this ovi's content about Shrikrishna's genuine, heartfelt feeling toward Arjuna); the preceding ovi's (1578) English translation is reused here as the best available rendering, consistent with the same gap pattern found at ovi 151 in Chapter 14.

1580
Unverified — under review
मूळ

तेणे उचंबळलेपणे । संजय धृतराष्ट्राते म्हणे । जी कैसे बादरायणे । रक्षिलो दोघे ? ॥1580॥

मराठी अर्थ

त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपले दोघांचे थोर भाग्य ! श्रीमद्व्यासांनीच आपले आज रक्षण केले.

English meaning

With that exhilarated mood, Sanjaya said to the king Dhritarashtra- "Sir, how great is the grace of the highly respected sage Vyasa that we both are safe and protected during these times of war!

Note: The source website's own Marathi meaning for this ovi is a duplicate of ovi 1579's meaning (both read identically, an apparent copy-paste error on the source site), even though this ovi's own original verse is clearly different (about Sanjaya crediting sage Vyasa/Badarayana for protecting them). The independently-sourced Ghaisas English translation gives this ovi's correct, distinct content and is accurate; the Marathi meaning field here reproduces what the source literally shows, flagged as unreliable.

1581
मूळ

आजि तुमते अवधारा । नाही चर्मचक्षूही संसारा । की ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥1581॥

मराठी अर्थ

आज तुम्हाला चर्मचक्षु तर नाहीतच, की ज्याने तुम्ही काही व्यवहार करू शकला असता; पण, तुमच्याकडून ज्ञान दृष्टीचा व्यवहार व्हावा अशी संधि प्राप्त झाली

English meaning

Sir, you have no physical eyes to see and move about doing routine work also, but you have the inward sight of the mind which can think properly.

1582
मूळ

आणि रथीचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठी । तया आम्हा या गोष्टी । गोचरा होती ॥1582॥

मराठी अर्थ

आणि माझी स्वतःची गोष्ट सांगणे झाल्यास, ज्या मला रथांच्या घोड्यांच्या परीक्षेसाठी म्हणून ठेवले, त्या मला श्रीकृष्णार्जुन संवादाचा व्यासकृपेने प्रत्यक्ष लाभ झाला.

English meaning

And by the grace of Vyasa, I am also able to know these things, though I was allowed to move about among the great brave heros only for the testing of the caliber of horses and to drive the chariots.

1583
मूळ

वरी जुंझाचे निर्वाण । मांडले असे दारुण । दोही हारी आपण । हारपिजे जैसे ॥1583॥

मराठी अर्थ

त्यातही, असा घोर व निर्वाणीचा युद्धप्रसंग सुरू आहे की दोहोंपैकी कोणताही पक्ष हरला तरी आपलाच पराजय झाला असे दोघांनाही म्हणण्याची वेळ आहे. (एककुलत्वात् )

English meaning

Then, this war is such a dangerous situation that whichever party, whichever army meets the defeat, it is our defeat only.

1584
मूळ

येवढा जिये सांकडा । कैसा अनुग्रहो पै गाढा । जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥1584॥

मराठी अर्थ

महाराजांच्या कृपेला पारावार नाही; अशा संकटकालामध्येही मूर्त ब्रह्मानंद आपण भोगावा असा त्यांचा आपल्यावर अनुग्रह आहे.

English meaning

And it is the most wonderful thing that we are given the grace of enjoying the bliss of the state of Brahman, even in this impossible condition!''

1585
मूळ

ऐसे संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला । चंद्रकिरणी शिवतला । पाषाणु जैसा ॥1585॥

मराठी अर्थ

संजय असे आनंदभरात बोलत होता खरा; पण, तो वृद्ध धृतराष्ट्र, चंद्रकिरणांचा पाषाणावर जसा काहीही परिणाम होत नाही. तसा त्या संवादकाली स्तब्ध होता.

English meaning

Though Sanjaya said all this in his ecstacy, the king sat there silently without any feeling, just as a stone lying in full moonlight.

1586
मूळ

हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा । परी सुखे जाला पिसा । बोलतसे ॥1586॥

मराठी अर्थ

राजाची अशी स्थिति पाहून संजयाने आपले भाषण संपविले, पण त्या संवादसुखाने तो असा वेडावला होता की त्याला बोलल्यावाचून रहावेच ना

English meaning

Seeing this apathy, Sanjaya's spirits were dampened a bit, but he could not help continue further as he was carried away by the joy.

1587
मूळ

भुलविला हर्षवेगे । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे । येऱ्हवी नव्हे तयाजोगे । हे कीर जाणे ॥1587॥

मराठी अर्थ

हर्षातीरेकाने- तो भानावर नव्हता म्हणूनच राजाशी बोलला एवढेच, नाहीतर हा संवाद धृतराष्ट्राच्या योग्यतेचा नाही हे तो जाणत होता.

English meaning

Sanjaya talked further, only because he was overwhelmed by the ecstacy of being fortunate to see and hear the divine presence and dialogue of Arjuna and Shrikrishna, but there was no sign of any encouragement or interest in Dhritarashtra!

1588
मूळ

मग म्हणे पै कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा । बोलिला ते अधोक्षजा । गोड जाले ॥1588॥

मराठी अर्थ

संजय मग म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, तुझा पुतण्या अर्जुन, त्याचे ते भाषण ऐकून भगवान श्रीकृष्णांना अत्यंत आनंद झाला.

English meaning

Sanjaya said, ``What your nephew Arjuna said to the Lord Shrikrishna was liked by him very much.

1589
मूळ

अगा पूर्वापर सागर । यया नामसीचि सिनार । येर आघवे ते नीर । एक जैसे ॥1589॥

मराठी अर्थ

अहो, पूर्वसमुद्र व पश्चिमसमुद्र हा जसा नाममात्र भेद आहे, सागरत्व पहाता समानच;

English meaning

The names of the oceans as the eastern ocean and the western ocean are only different, but the water in both is water only.

1590
मूळ

तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे । हे आंगाचिपासी दिसे । मग संवादी जी नसे । काहीचि भेदु ॥1590॥

मराठी अर्थ

तसे पार्थिव देहदृष्टि ठेविली म्हणजे त्या दोन व्यक्ति म्हणाव्या इतकेच; विचारदृष्टया त्या दोघात काहीही भेद नाही.

English meaning

Similarly the duality of these two is only so far as their bodies are considered, but their dialogue is the same.

1591
मूळ

पै दर्पणाहूनि चोखे । दोन्ही होती सन्मुखे । तेथ येरी येर देखे । आपणपे जैसे ॥1591॥

मराठी अर्थ

किंवा, दर्पणापेक्षांही स्वच्छ असे दोन पदार्थ एकासमोर एक आले तर, ह्याचे त्यात किंवा त्याचे ह्यात होणारे दर्शन हे भिन्न नसून स्वतःचेच दर्शन होते असे म्हणावे लागते.

English meaning

This is like how when mirrors or even more reflective things are placed in front of each other, both of them see themselves only, in the opposite mirrors.

1592
मूळ

तैसा देवेसी पंडुसुतु । आपणपे देवी देखतु । पांडवेसी देखे अनंतु । आपणपे पार्थी ॥1592॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे दर्पणाहूनही स्वच्छ वृत्तीच्या पांडवानी तितक्याच स्वच्छवृत्तीच्या देवाकडे पाहिले, तेव्हा त्याला तेथे आपलेच दर्शन झाले व तसेच देवांनींही पांडवांकडे पाहता त्यासही तेथे आपलेच दर्शन.

English meaning

Thus Arjuna was seeing in Krishna, his own as well as Shrikrishna's image and Shrikrishna was also seeing Arjuna and himself in Arjuna.

1593
मूळ

देव देवो भक्तालागी । जिये विवरूनि देखे आंगी । येरु तियेचेही भागी । दोन्ही देखे ॥1593॥

मराठी अर्थ

देवाधिदेव भक्तस्वरूपाचा आपल्या ठिकाणी विचार करीत होता. तर तिकडे अर्जुनही आपल्या स्वरूपामध्ये दोघांच्या स्वरूपाचा विचार करीत होता.

English meaning

The Lord was everywhere in both of them, whether in his own body or in Arjuna's body he looked.

1594
मूळ

आणिक काहीच नाही । म्हणौनि करिती काई । दोघे येकपणे पाही । नांदताती ॥1594॥

मराठी अर्थ

पण काय करणार, त्यांना स्वस्वरूपाहून अन्य काहीच आढळेना; तेव्हा दोघेही अद्वैतभावाने नांदू लागले.

English meaning

As there was nothing else, what did they do? They remained as one only.

1595
मूळ

आता भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर का घडे ? । ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख का ? ॥1595॥

मराठी अर्थ

आता भेद नाहीसा झाला, तर प्रश्नोत्तरे कशी होतील व भेद जर सत्य असेल तर ऐक्याचे संवाद सुख कसे प्राप्त होणार ?

English meaning

Thus, if the two were not there but only one was existing, where was the possibility of dialogue? How could conversation take place if duality was not there?

1596
मूळ

ऐसे बोलता दुजेपणे । संवादी द्वैत गिळणे । ते ऐकिले बोलणे । दोघांचे मिया ॥1596॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे कृष्णार्जुनांचे आभासिक द्वैतभावांत भाषण चालले असता, संवादा तही द्वैतांचा ग्रास कसा होऊ शकतो ते बोलणे मी ऐकिले असे संजय म्हणाला

English meaning

Thus, I have heard them talking by maintaining their duality, in which dialogue I was there, dissolving into unity.

1597
मूळ

उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावे पा ? ॥1597॥

मराठी अर्थ

दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर आणिले असता, कोणकोणाला पहातो हे काय सांगणार ?

English meaning

If two mirrors are cleansed and kept opposite facing each other, how can we imagine as to which mirror is looking into which one?

1598
मूळ

का दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु । कोण कोणा अर्थिकु । कोण जाणे ॥1598॥

मराठी अर्थ

किंवा दिव्यासमोर दुसरा दिवा आणून ठेविला तर, कोणकोणाला प्रकाशित आहे हे कोणी सांगावे ?

English meaning

Or, if a lighted lamp is kept opposite another lighted lamp, can we know whether one is asking the other for a bit of light, and if so, which one is asking?

1599
मूळ

नाना अर्कापुढे अर्कु । उदयलिया आणिकु । कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥1599॥

मराठी अर्थ

अथवा असे समजा, एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर, त्यातील प्रकाश्य कोण व प्रकाशक कोण हे कोण सांगणार ?

English meaning

Or, if one Sun is kept opposite another Sun, can we decide who gives light and who is lighted by whom?

1600
मूळ

हे निर्धारू जाता फुडे । निर्धारासि ठक पडे । ते दोघे जाले एवढे । संवादे सरिसे ॥1600॥

मराठी अर्थ

वरील गोष्टींच निर्णय करू गेल्यास निर्णय करणाराला जसे हातच टेकले पाहिजेत, तसे त्या दोघांचे त्या संवादात ऐक्य झाले. .

English meaning

If we go in for deciding, the decision is impossible. So, in this manner, the Lord Shrikrishna and Arjuna were united by that dialogue.

1601
मूळ

जी मिळता दोन्ही उदके । माजी लवण वारू ठाके । की तयासींही निमिखे । तेचि होय ॥1601॥

मराठी अर्थ

दोन जलप्रवाह एकत्र होत असता त्यांना जर मीठ बांधासारखे आडवे, तर तेही क्षणात जसे जलरूप होते

English meaning

Sir, if salt is caught in between two streams of water, can it resist both of them or will it be immediately absorbed in both?

1602
मूळ

तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले ते मनी । धरिता मजही वानी । तेचि होतसे ॥1602॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे त्या दोघांच्या संगमांत व तेथील संवादात जे ऐकिले त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की माझीही त्यांच्यासारखीच स्थिति झाली !

English meaning

Similar is the condition of my mind when I think again about the Lord and Arjuna unified in their conversation.''

1603
मूळ

ऐसे म्हणे ना मोटके । तव हिरोनि सात्विके । आठव नेला नेणो के । संजयपणाचा ॥1603॥

मराठी अर्थ

इतके तो म्हणत आहे तोच अष्टसात्विकभाव प्रादुर्भूत होऊन त्याच्या संजयपणची स्मृति त्यांनी कोठे नाहींशी केली ते काही कळेना.

English meaning

While Sanjaya was speaking these words, the pious devotional emotions overpowered him in such a way that he forgot his own identity as Sanjaya.

1604
मूळ

रोमांच जव फरके । तव तव आंग सुरके । स्तंभ स्वेदांते जिंके । एकला कंपु ॥1604॥

मराठी अर्थ

आंगावर जो जो रोमांच उभे राहिले तो तो शरीर संकुचित झाले व स्तब्धता व घामबिंदू ह्यांना एकट्या शरीरकंपानेच जणु जिकले.

English meaning

The more his body was shivering by the joyous goose-pimples, his body began to shrink further and his trembling became more evident than the sweat produced by his body due to blissful ecstacy.

1605
मूळ

अद्वयानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसे । द्रवत्वचि ॥1605॥

मराठी अर्थ

अद्वयानंदाच्या आविर्भावाने नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले; इतके कि कोणाला वाटावे ते अश्न नसून पाझरच लागले आहेत.

English meaning

His eyes were filled with tears because of the experience of unity, the tears which were rather the trickling of nectar turned into streams.

1606
मूळ

नेणो काय न माय पोटी । नेणो काय गुंफे कंठी । वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥1606॥

मराठी अर्थ

पोटात काहीही सांठविणेस जागा नव्हती ते कशाने झाले न कळे; कंठ कशानेदाटला तेही कळेना व दीर्घश्वासामुळे वाणीही कार्यक्षम होईना, अशी स्थिति झाली.

English meaning

His words were held up in the throat which was choked with emotion and in the suffocated breath the words thus could not be contained in his mind nor could be spoken clearly.

1607
मूळ

किंबहुना सात्विका आठा । चाचरु मांडता उमेठा । संजयो जालासे चोहटा । संवादसुखाचा ॥1607॥

मराठी अर्थ

किंबहुना, अष्टसात्विक भाव प्रगट होऊन संजयाची वाणी चाचरू लागली व तो कृष्णार्जुनसंवादाचा चव्हाटाच झाला.

English meaning

Or rather, by the manifestation of all the eight Sattwic emotions, Sanjaya actually seemed to be the 'city square' where the dialogue of Shrikrishna and Arjuna took place.

1608
मूळ

तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती । मग पुढती देहस्मृती । लाधली तेणे ॥1608॥

मराठी अर्थ

त्या सुखाची जातीच अशी आहे की, त्याचे भरते आपोआप शमतें; म्हणून त्यायोगे संजय सहजच देहभानावर आला.

English meaning

But this ecstacy is such an upheaval which subsides automatically and therefore, Sanjaya became a bit quiet and aware of himself and his surroundings.

1609
मूळ

तेव्हा बैसतेनि आनंदे । म्हणे जी जे उपनिषदे । नेणती ते व्यासप्रसादे । ऐकिले मिया ॥1609॥

मराठी अर्थ

मग आनंदाचे भरते ओसरू लागल्यावर, संजय म्हणाला, उपनिषदांमध्येही उपलब्ध न होणारे श्रवण मला व्यासांच्या कृपेने घडले.

English meaning

After the ecstacy subsided, Sanjaya said (to Dhritarashtra), I have heard today by the grace of sage Vyasa, the Knowledge which is not known even by Upanishads.

1610
मूळ

ऐकताचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी । मी तू पणेसी दृष्टी । विरोनि गेली ॥1610॥

मराठी अर्थ

ते श्रवण घडतांच मला ब्रह्मस्थिति प्राप्त होऊन मीतुंपणासह सर्व विश्व मावळून गेले.

English meaning

And in a moment, I, as Sanjaya, was merged into Brahman, and the world of duality of "you" and "I" was dissolved.

1611
मूळ

हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग । तयाचे वाक्य सवंग । केले मज व्यासे ॥1611॥

मराठी अर्थ

सर्व, योगादि मार्ग ज्या ठिकाणाला येऊन समाप्ति पावतात असे भगवंतांचे वाक्य श्रीव्यासकृपेने मला अनायासे प्राप्त झाले.

English meaning

By the blessings of Vyasa, today I listened to the teaching of Lord Shrikrishna, where all paths of Yoga come to their final rest.

1612
मूळ

अहो अर्जुनाचेनि मिषे । पापियाचा आपणपेचि दुजे ऐसे । नटोनि आपणया उद्देशे । बोलिले जे देव ॥1612॥

मराठी अर्थ

अहो, अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्ण त्यारूपाने आपणच अवतरूनआपण आपल्याला जो उपदेश करून घेतला.

English meaning

The dialogue which the Lord Shrikrishna had with Arjuna by adopting for himself playfully the position of duality.

1613
मूळ

तेथ की माझे श्रोत्र । पाटाचे जाले जी पात्र । काय वानू स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचे ॥1613॥

मराठी अर्थ

केवळ अशा परिस्थितीत जर माझे श्रोत्र त्या श्रवणाचे अधिकारी झाले, तर श्रीगुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याची योग्यता मी कशी वर्णन करू शकेन ?

English meaning

There, my mouth has become the small channel for that stream of know-ledge, only by the blessing of the Guru Vyasa, which is really indescribable.

1614
मूळ

राया हे बोलता विस्मित होये । तेणेचि मोडावला ठाये । रत्नी की रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥1614॥

मराठी अर्थ

रत्नकांति जशी फांकल्यामुळे त्याच्या आकारादि स्वरूपाला झांकते (त्याच्या आकाराची प्रथम कल्पना येऊ देत नाही. ) त्याप्रमाणे, राजा धृतराष्ट्राला ते वृत्त सांगत असता संजयाचे बसल्या जागीच देहभान जाऊन तो समाधिस्थ झाला.

English meaning

When Sanjaya started to speak again and as he called- "O king!", he was again overwhelmed with joy and was fully filled with the glow of exhilaration, just as a jewel on which its own lustre shines.

1615
मूळ

हिमवंतींची सरोवरे । चंद्रोदयी होती काश्मीरे । मग सूर्यागमी माघारे । द्रवत्व ये ॥1615॥

मराठी अर्थ

हिमालयातील सरोवरे चंद्रोदयाच्या वेळी गोठून जशी स्फटिक मण्याप्रमाणे दिसतात व सूर्योदयाला पुन्हा त्यांना द्रवत्व येते.

English meaning

Just as the peaks of Himalaya mountain shine brilliantly white when the Moon is in the sky, but when the Sun rises, they melt;

1616
मूळ

तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्ती । धरी आणि पुढती । तेचि होय ॥1616॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे देहभानावर आला की, तो संवाद स्मरावा व पुन्हा त्या स्मरणाने त्याचा स्वरूपसमाधि लागावा असे होई.

English meaning

Similarly when Sanjaya regained his body consciousness, he remembered the dialogue of Shrikrishna and Arjuna, and when he remembered that, he again lost his separate identity. This was happening again and again.

1617
मूळ

मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा । देखिलया उगा का पा । असो लाहसी ? ॥1617॥

मराठी अर्थ

मग हर्षभरांत उठून म्हणाला, राजा, श्रीहरीचे विश्वरूपदर्शन होऊनही, तू जागच्या जागी स्वस्थ कसा राहू शकतोस ?

English meaning

Then Sanjaya stood up and asked, "O king, when I describe the universal presence, the vast form of Shri Hari, why are you just sitting quietly?

1618
मूळ

न देखणेनि जे दिसे । नाहीपणेचि जे असे । विसरे आठवे ते कैसे । चुकऊ आता । ॥1618॥

मराठी अर्थ

न पहातांही जे दिसते, जे नाही म्हटले तरी (नास्तित्व सिद्ध करणाराच्या रूपाने) असते; व विसरू जावे तर तोच त्याचा आठव; मग त्याला कसे टाळत येईल ?

English meaning

How can we avoid that, which is seen by not seeing, which is existing by not existing, and is remembered by forgetting it?

1619
मूळ

देखोनि चमत्कारु । कीजे तो नाही पैसारु । मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥1619॥

मराठी अर्थ

ते विश्वरूप पाहून, काय हा चमत्कार असे म्हणण्यालाही अवसर नाही तोच त्या आनंदाच्या महापुरांत मीही वाहून गेलों. (मला माझे भान उरले नाही. )

English meaning

There is no scope even to appreciate its glory by standing aloof at a distance, because the flow of the Ganges of knowledge is so tumultuous that it is catching me and carrying me with it."

1620
मूळ

ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमी स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचे ॥1620॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संगमांत स्नान करून संजयाने अहंकाराची तिलांजली दिली.

English meaning

Thus he bathed in the Teertha (sacred waters) of the dialogue of Shrikrishna and Arjuna and surrendered his ego.

1621
मूळ

तेथ असंवरे आनंदे । अलौकिकही काही स्फुंदे । श्रीकृष्ण म्हणे सद्गदे । वेळोवेळा ॥1621॥

मराठी अर्थ

त्या प्रसंगी अनावर आनंदाने तो काही अलौकिक भाषणही करी व सद्गदित कंठाने वारंवार कृष्णनामोच्चारण चालत असे.

English meaning

Sanjaya in that state, somehow uttered some inarticulate words in a stammering manner and frequently spoke with a choked up throat the name of Shrikrishna.

1622
मूळ

या अवस्थांची काही । कौरवाते परी नाही । म्हणौनि राये ते काही । कल्पावे जव ॥1622॥

मराठी अर्थ

संजयाच्या चित्ताच्या ह्या स्थितीची राजा धृतराष्ट्राला जर काहीच वार्ता नव्हती तर त्याला त्याची नुसती कल्पना तरी कशी येणार ?

English meaning

But Dhritarashtra was not giving any importance to this state of the mind of Sanjaya and was about to think of something about this, but

1623
मूळ

तव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु । बुझाविला अवष्टंभु । संजये तेणे ॥1623॥

मराठी अर्थ

तेव्हा झालेला सुखलाभ संजयाने आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावाचा कुंज जिरविला.

English meaning

Having experienced the joy and subduing the emotions, Sanjaya somehow restrained himself.

1624
मूळ

तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी । रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥1624॥

मराठी अर्थ

धृतराष्ट्र म्हणाला, संजया, युद्धांत कोणत्या वेळी काय घडते (ते सांगण्यासाठी तुला येथे ठेविला असतां) हे सांगण्याचे सोडून हा अन्य प्रकार काय सांगत बसला आहेस ?

English meaning

Then side-tracking something which was proper to say at such an occasion, the king asked- "Sanjaya! What is this that you are doing?"

1625
मूळ

तेणे तूते येथे व्यासे । बैसविले कासया उद्देशे । अप्रसंगामाजी ऐसे । बोलसी काई ? ॥1625॥

मराठी अर्थ

त्या व्यासांनी तुला येथे कोणत्या उद्देशाने ठेविले, आणि ह्या अप्रासंगिक (भलत्याच) गोष्टी तू काय सांगत बसला आहेस ?

English meaning

"For what purpose has Vyasa told you to sit here and what are you talking about irrelevantly?"

1626
मूळ

रानींचे राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । का रात्री होय पाहलया । निशाचरा ॥1626॥

मराठी अर्थ

एखादा जंगलांत राहाणारा मनुष्य राजमंदिरांत नेला तर त्याला तेथे दाही दिशा जशा उदास दिसतात, अथवा सूर्योदय झाला की निशाचरांची रात्र उजाडते.

English meaning

When a forest dweller is taken to a palace, it is natural that he would feel out of place there and when the day dawns, the demons, the night prowlers would feel that it is night for them.

1627
मूळ

जो जेथिचे गौरव नेणे । तयासि ते भिंगुळवाणे । म्हणौनि अप्रसंगु तेणे । म्हणावा की तो ॥1627॥

मराठी अर्थ

ज्याला ज्या गोष्टीचे महत्व समजण्याची बुद्धि नाही त्याला ते बेचव वाटणारच; मग धतराष्ट्राने कृष्णार्जुनसंवादकथनाला अप्रसंग म्हटले तर ते योग्यच होय.

English meaning

One finds it tasteless if he is given what he cannot relish; so, it was natural that Dhritarashtra found Sanjaya's statements and the state of mind quite contrary and meaningless.

1628
मूळ

मग म्हणे सांगे प्रस्तुत । उदयलेंसे जे उत्कळित । ते कोणासि बा रे जैत । देईल शेखी ? ॥1628॥

मराठी अर्थ

मग धृतराष्ट्र म्हणाला. सध्या जे युद्ध चालले आहे त्यात अखेर कोणाचा रे जय होणार ?

English meaning

Dhritarashtra pointedly asked- "O Sanjaya, please tell me"- whom will this war which has arisen, give victory finally?

1629
मूळ

येऱ्हवी विशेषे बहुतेक । आमुचे ऐसे मानसिक । जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥1629॥

मराठी अर्थ

एऱ्हवी, आमचा होरा तर असा धावतो की, दुर्योधनाचा पक्ष अधिक पराक्रम आहे.

English meaning

Anyway my mind says that the power of Duryodhana is always superior.

1630
मूळ

आणि येरांचेनि पाडे । दळही याचे देव्हडे । म्हणौनि जैत फुडे । आणील ना ते ? ॥1630॥

मराठी अर्थ

आणि सैन्याच्या बाजूने पहातांही पांडवापेक्षां त्याचे (दुर्योधनाचे) सैन्य दीढी आहे; मग ते शेवटी जिकणार नाही काय ?

English meaning

And compared to the other party, his army is also one and a half larger in number. So, would it not bring final victory to us?

1631
मूळ

आम्हा तव गमे ऐसे । मा तुझे ज्योतिष कैसे । ते नेणो संजया असे । तैसे सांग पा ॥1631॥

मराठी अर्थ

आम्हाला तर असे वाटते, संजया, तुझे ज्योतिष काय आहे हे आम्हाला माहीत नाही; असेल तसे सांग पाहू ?

English meaning

At least that is what we surmise! But what is your own prophesy? That is not known to us. Whatever it may be, do speak out what is your conjecture!"

1632
मूळ

यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचे मी नेणे । परी आयुष्य तेथे जिणे । हे फुडे की गा ॥1632॥

मराठी अर्थ

राजाच्या ह्या भाषणाला संजयाने उत्तर दिले; “ कोण बलवान की कोणाचे सैन्य अधिक ते मला काही समजत नाही; (मला एक कळतें) की ज्याच्या आयुष्याची दोरी मजबूत असेल तोच जगणार. ”

English meaning

Upon this, Sanjaya said, "I do not know, who will be victorious between the two. But one thing is certain, where there is life, there is living.

1633
मूळ

चंद्रु तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे की जी ॥1633॥

मराठी अर्थ

चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विचार, ह्या गोष्टी असावयाच्याच.

English meaning

Where there is Moon, there is moon-light. Where there is Lord Shiva, there is Ambika. Where there are saints, the discrimination is sure to be there. Is it not?

1634
मूळ

रावो तेथे कटक । सौजन्य तेथे सोयरीक । वन्हि तेथे दाहक । सामर्थ्य की ॥1634॥

मराठी अर्थ

राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, अग्नि तेथे दाहकता असणारच.

English meaning

Where there is king, there is army. Where there is courtesy, there is relationship. Where there is fire, there is power to burn. Is it not?

1635
मूळ

दया तेथे धर्मु । धर्मु तेथे सुखागमु । सुखी पुरुषोत्तमु । असे जैसा ॥1635॥

मराठी अर्थ

आणि दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ति व सुखप्राप्तींत पुरुषोत्तम जसा असतो.

English meaning

Where there is compassion, there is religion. Where there is religion, there is joy, where there is joy, god is surely there.

1636
मूळ

वसंत तेथे वने । वन तेथे सुमने । सुमनी पालिंगने । सारंगांची ॥1636॥

मराठी अर्थ

वसंत तेथे वनश्री, वनश्री तेथे पुष्पे, आणि पुष्पे तेथे भ्रमरसमुदाय

English meaning

Where there is spring, there are gardens blossoming, where there are such gardens, there are flowers. And where there are flowers there are groups of hovering black-bees.

1637
मूळ

गुरु तेथ ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन । दर्शनी समाधान । आथी जैसे ॥1637॥

मराठी अर्थ

सद्गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे किंवा तेच आत्मदर्शन व आत्मदर्शन म्हणजेच समाधान हा जसा नियम.

English meaning

Where there is Guru, there is knowledge. Where there is knowledge, there is the perception of Atman, and where there is that perception, there is satisfaction.

1638
मूळ

भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हे असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथे ॥1638॥

मराठी अर्थ

श्रीमंती तेथे सुखभोग, सुखभोग तेथे उल्हास किंवा जेथे सूर्य तेथे जसा प्रकाश,

English meaning

Similarly, where there is good fortune, there is enjoyment of pleasures. Where there is that enjoyment, there is enthusiasm; and where there is Sun, there is light.

1639
मूळ

तैसे सकल पुरुषार्थ । जेणे स्वामी का सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥1639॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्याच्या योगे सनाथ आहेत, तो भगवान श्रीकृष्ण जेथे असणार तेथे लक्ष्मीही असावयाचीच

English meaning

Similarly, where there is the king Shrikrishna, who makes all the human achievements worth their name, there is definitely the goddess of Riches.

1640
मूळ

आणि आपुलेनि कांतेसी । ते जगदंबा जयापासी । अणिमादिकी काय दासी । नव्हती तयाते ? ॥1640॥

मराठी अर्थ

आणि, आपल्या पतीसहवर्तमान ती जगन्माता ज्याच्याकडे नांदते, त्याच्या अणिमादि सिद्धि काय दासी असणार नाहीत ?

English meaning

And he whose wife is the divine mother Laxmi, will not the other occult powers like power to become minute, power to become heavy etc. become his maids obeying his orders?

1641
मूळ

कृष्ण विजयस्वरूप निजांगे । तो राहिला असे जेणे भागे । तै जयो लागवेगे । तेथेचि आहे ॥1641॥

मराठी अर्थ

श्रीकृष्ण म्हणजे मूर्तीमंत विजय; तो ज्याच्या पक्षाल असेल, त्या पक्षाला निश्चयैकरून जय आहेच.

English meaning

Lord Shrikrishna is himself the very image of victory, and where he is, that party will definitely be victorious.

1642
मूळ

विजयो नामे अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसी विजय निश्चितु । तेथेचि असे ॥1642॥

मराठी अर्थ

अर्जुन स्वतः “ विजय ” ह्या नांवानेच प्रसिद्ध आहे विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान त्याच्या बाजूला आहेत; भगवान तेथे विजयश्री आहेच; व जेथे विजयश्री तेथे निश्चयाने यश हे, ठेवलेलेच आहे.

English meaning

Arjuna is famous for his name Vijay, which itself means victory, and Lord Shrikrishna is himself 'victory' as said above. So there is victory to that side together with the great prosperity.

1643
मूळ

तयाचिये देशीच्या झाडी । कल्पतरूते होडी । न जिणावे का येवढी । मायबापे असता ? ॥1643॥

मराठी अर्थ

ज्याला ( अर्जुनाला ) लक्ष्मीनारायणासारखे समर्थ मायबाप आहेत त्याच्या गावची सामान्य झाडेही कल्पतरूला पैजणे का जिकणार नाहीत ?

English meaning

Will not the ordinary trees compete with, and defeat the divine wish trees, in that country, where such father and mother like Lord Shrikrisna, the Riches and victory are there to support them?

1644
मूळ

ते पाषाणही आघवे । चिंतारत्ने का नोहावे ? । तिये भूमिके का न यावे । सुवर्णत्व ? ॥1644॥

मराठी अर्थ

तेथील सर्व पाषाणही चिंतामणि का न होतील ? ती सर्व भूमि सुवर्णमय का होणार नाही ?

English meaning

Why will not the ordinary stones in that country be like Chintamani, and why will not the earth there have the qualities of gold?

1645
मूळ

तयाचिया गावींचिया । नदी अमृते वाहाविया । नवल कायि राया । विचारी पा ॥1645॥

मराठी अर्थ

राजा, थोडा विचार कर; अरे, त्याच्या गावच्या सर्व नद्याही अमृतवाहिन्या झाल्या, तर त्यात नवल ते काय ?

English meaning

O King, what wonder is there, if the rivers in that country will flow with nectar instead of water? You should think about this yourself.

1646
मूळ

तयाचे बिसाट शब्द । सुखे म्हणो येती वेद । सदेह सच्चिदानंद । का न व्हावे ते ? ॥1646॥

मराठी अर्थ

तो भक्त जे काही बोलेल, ते शब्द वेदतुल्य खुशाल समजावे व तो देहधारी आहे तेथवर सच्चिदानंदाची साकार मूर्ती म्हणून का न म्हणावा ?

English meaning

Whatever the people of the country may speak their words will be Vedas, and will they themselves not become the embodiments of Sat-Chit-Ananda?

1647
मूळ

पै स्वर्गापवर्ग दोन्ही । इये पदे जया अधीनी । तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥1647॥

मराठी अर्थ

कारण, स्वर्ग व मुक्ति ही ज्याच्या हातात आहेत तो श्रीकृष्ण भगवान ज्याचा पिता व देवी लक्ष्मी ही ज्याची जननी आहे.

English meaning

The heaven and the liberation are under the control of the man who has parents like Shrikrishna and goddess Laxmi to protect him.

1648
मूळ

म्हणौनि जिया बाही उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा । तेथे सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणे ॥1648॥

मराठी अर्थ

म्हणून ज्या पक्षाच्या बाजूने तो लक्ष्मीवल्लभ उभा आहे तेथे सर्व सहजच सिद्धि आहेत इतके मला समजते. दुसरे तिसरे मी काहीही ओळखत नाही.

English meaning

Therefore, I know that where there is Lord Shrikrishna, the spouse of Laxmi, all the powers are definitely in their service.

1649
मूळ

आणि समुद्राचा मेघु । उपयोगे तयाहूनि चांगु । तैसा पार्थी आजि लागु । आहे तये ॥1649॥

मराठी अर्थ

आणि समुद्रापासून जन्म पावणारा मेघ हा समुद्रापेक्षाही अधिक उपयोगी पडतो, त्याप्रमाणे आज त्या अर्जुनाचाच महिमा अधिक वाटतो.

English meaning

Just as the cloud which is born out of the sea is more useful than the sea itself, the same was the position as regards Shrikrishna and Arjuna.

1650
मूळ

कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू । परी जगा पोसिता व्यवहारु । तेचि जाणे ॥1650॥

मराठी अर्थ

लोहाला सुर्वणत्व देण्याचे सामर्थं परिसाचेच ह्यात वाद नाही; पण जगाच्या व्यवहाराचे पोषण, परिसने नव्हे, तर सुवर्णानेच होत असते

English meaning

No doubt the Guru, as the magic stone Parees is very important because by its touch the iron is turned into gold, but for usual business in the world, it is gold that is useful.

1651
मूळ

येथ गुरुत्वा येतसे उणे । ऐसे झणे कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणे । प्रकाशी आपुला ॥1651॥

मराठी अर्थ

ह्या दृष्टांतांनी गुरूकडे कमी-पणा येतो असे प्रथमतः कोणाला वाटेल; पण तसे नाहीं; कारण, अग्नि हाच दीपद्वारा मोठा प्रकाश देतो; ( तेव्हा लोक त्याला दीपप्रकाश म्हणाले तर अग्नीला कमीपणा कसा ?)

English meaning

In this example, some may find that the Guru is counted lower in importance, but do not think so, because the fire gives its own light to the world through the lamp.

1652
मूळ

तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती । परी माने इये स्तुती । गौरव असे ॥1652॥

मराठी अर्थ

(दीपमहिमा हा अग्नि-प्रसाद होय ) त्याप्रमाणे, देवांच्या शक्तीच्या प्रसादानेच पार्थं देवापेक्षां मोठा वाटतो; पण तशी भक्तस्तुति करणे हाही वस्तुतः देवांचाच गौरव होय.

English meaning

Similarly, though Arjuna began to seem more brilliant than the Lord; in his praise the Lord Himself is praised.

1653
मूळ

आणि पुत्रे मी सर्व गुणी । जिणावा हे बापा शिराणी । तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥1653॥

मराठी अर्थ

आणि पुत्राने सर्व, गुणात आपल्यावर ताण करावी अशी पित्याची इच्छा असते, तीच शिष्याच्या उत्कर्षाने सद्गुरू भगवान श्रीकृष्णांना पहाण्याचे भाग्य लाभले.

English meaning

Moreover, usually the father has a desire that his son should outshine him; that desire was fruitful in the case of Lord Shrikrishna.

1654
मूळ

किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा । तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥1654॥

मराठी अर्थ

राजा, फार काय सांगावे ? अशाप्रकारची कृष्ण कृपा ज्यावर झाली आहे तो पार्थ, ज्या पक्षाचा अभिमान धरून उभा आहे,

English meaning

Or, O King! That party where Arjuna is helping by the grace of Lord Shrikrishna,

1655
मूळ

तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? । तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥1655॥

मराठी अर्थ

तेच विजयस्थान होय; ह्यात तुला संदेह कसला ? अरे, तेथे नसणारा विजय तो विजयच नव्हे असे जाण.

English meaning

Is definitely going to be victorious! Why should you have doubt about this? If that army will not win, victory itself will lose all its meaning!

1656
मूळ

म्हणौनि जेथ श्री तेथे श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु । तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥1656॥

मराठी अर्थ

म्हणून. जेथे श्री तेथे श्रीमंत श्रीपति, जेथे तो पंडुपुत्र तेथे सर्व जय आणि उत्कर्षही तेथेच.

English meaning

Therefore, where the Lord Shrikrishna is always there with Goddess Laxmi, and where Arjuna the son of Pandu is there, that party is going to be victorious.

1657
मूळ

जरी व्यासाचेनि साचे । धिरे मन तुमचे । तरी या बोलाचे । ध्रुवचि माना ॥1657॥

मराठी अर्थ

श्रीव्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मी सांगितले हे, निश्चित होय. असे समजा

English meaning

If at all your mind has any trust in what the sage Vyasa has told, you should take this statement as valid and unbeatable.

1658
मूळ

जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु । तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥1658॥

मराठी अर्थ

जेथे तो श्रीवल्लभ, जेथे तो भक्तश्रेष्ठ अर्जुन, तेथे सर्व मंगल, सुख आणि लाभ असणारच

English meaning

There is happiness with all auspicious things where the Lord Narayana (Shri Krishna) and Arjuna the greatest devotee are ready.

1659
मूळ

या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे । ऐसे गाजोनि बाहे । उभिली तेणे ॥1659॥

मराठी अर्थ

हे माझे बोल जर अन्यथा होतील तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे अशी बाहु उभारून संजयाने गर्जना केली.

English meaning

If this statement proves to be false, I swear that I will not claim to be the disciple of sage Vyasa!'' ``So declaring in a louder voice, Sanjay raised both his hands above in the air. Here Dnyaneshwar says -

1660
मूळ

एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका । संजये कुरुनायका । दिधला हाती ॥1660॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे सर्व भारताचे सार एका श्लोकात संजयाने, कौरवपति धृतराष्ट्र ह्याला ऐकविलें.

English meaning

In this way the whole gamut of the epic of Mahabharata was told by Sanjaya to the king Dhritarashtra, by putting it in this last verse.

1661
मूळ

जैसा नेणो केवढा वन्ही । परी गुणाग्री ठेऊनी । आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥1661॥

मराठी अर्थ

अग्निस्वरूप केवढे आहे हे सांगता न आले (न कळलें) तरी तो वातीच्या अग्रभागी स्थापित केला म्हणजे सूर्यास्ताने होणारी अडचण दूर करितो.

English meaning

If we consider the whole vastness of the fire as universal element, it is very great, but in order to give light at night time, to do the job which the Sun does in the daytime, it has to be used by lighting a small wick in a lamp.

1662
मूळ

तैसे शब्दब्रह्म अनंत । जाले सवालक्ष भारत । भारताचे शते सात । सर्वस्व गीता ॥1662॥

मराठी अर्थ

शब्दब्रह्म जे वेद ते अनंत आहेत; त्याचे सार सवालक्ष (श्लोक ) भारतांत आणिलें; आणि त्याचेही सर्व सार म्हणजे गीतेचे सातशे श्लोक हे होय.

English meaning

Similarly, the endless expanse of Brahman as Om, the sacred word, became smaller in the form of Mahabharat with its one lakh and twenty-five thousand verses; and Geeta with its seven hundred verses came as a summary of that Mahabharata.

1663
मूळ

तयांही साता शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥1663॥

मराठी अर्थ

त्या सातशे श्लोकाचाही व्यासशिष्य संजय ह्याचा निश्चयाचा उद्गाररूप असणारा जो हा अखेरचा श्लोक तो सारभूत होय.

English meaning

And this last verse of the seven hundred verses of Geeta, the most important verse, giving the final verdict of the narrator Sanjaya, is the summarized teaching of the Geeta, in a nutshell.

1664
मूळ

येणे येकेचि श्लोके । राहे तेणे असके । अविद्याजाताचे निके । जिंतले होय ॥1664॥

मराठी अर्थ

ह्या एकच श्लोकाला चिकटून त्याचे मनन जो करील त्याने सर्व अविद्याजात जिकल्या सारखेच होईल.

English meaning

It will be considered that the man who lovingly meditates in his heart upon this one single verse, has become victorious over all ignorance.

1665
मूळ

ऐसे श्लोक शते सात । गीतेची पदे आंगे वाहत । पदे म्हणो की परमामृत । गीताकाशींे ॥1665॥

मराठी अर्थ

याप्रमाणे, सातशे श्लोक हे गीतेतील पदांनी (शब्दांनीं) धारण केले आहेत (वाहिले आहेत) ह्या पदांना पदे ” म्हणावे की गीतारूप आकाशांतील अमृतवृष्टि म्हणावे हेच कळत नाही.

English meaning

These seven hundred verses may be considered as seven hundred steps of Geeta, or the verses are the supreme nectar in the heaven that is Geeta.

1666
मूळ

की आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे । मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥1666॥

मराठी अर्थ

किंवा, आत्मराजाच्या गीतारूपी सभामंडपाचे हे सातशे श्लोक म्हणजे जणू तेवढे खांबच होत असे वाटते.

English meaning

Or, to my imagination, these verses appear as seven hundred pillars of the Royal court of the king Atman, which is the Geeta.

1667
मूळ

की गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥1667॥

मराठी अर्थ

किंवा श्लोक रूपी सातशे मंत्रांनी जिचे प्रतिपादन केले आहे, अशी गीता ही देवी भगवतीच होय; व मोहमहिषासुर-वधाने ती आनंदित आहे.

English meaning

Or, this Geeta should be considered as the goddess who is praised by these verses which are also seven hundred as in the book of Saptashatee, which is the story of the greatness of the Goddess, who gives emancipation to the demon buffalo which is `ignorant confusion,' and has become pleased.

1668
मूळ

म्हणौनि मने काये वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥1668॥

मराठी अर्थ

म्हणून काया, वाचा, मने करून जो तिचा सेवक होईल त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती करील.

English meaning

Therefore, he who will be a devotee of this Geeta by his mind, body and speech will be the emperor of the empire of blissful joy.

1669
मूळ

की अविद्यातिमिररोखे । श्लोक सूर्याते पैजा जिंके । ऐसे प्रकाशिले गीतामिषे । राये श्रीकृष्णे ॥1669॥

मराठी अर्थ

किंवा अविद्यारूपी अंधकाराचा नाश करून गीतेचा एकेक श्लोक ही सूर्याला पैजेने जिंकील, असे सातशे श्लोक देवांनी गीतेच्या मिषाने प्रकाशित केले.

English meaning

Or in this Geeta, Lord ShriKrishna has given us all these seven hundred verses which surpass even the Sun, in the matter of dissipating the darkness of ignorance.

1670
मूळ

की श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंवावया ॥1670॥

मराठी अर्थ

किंवा संसारपथ. आक्रमण करीत असता दमल्या भागल्या जीवांना विसावा घेण्यासाठी, श्लोकाक्षररूपी द्राक्षवल्लींनी युक्त असा मांडवच गीता स्वत:झाली आहे.

English meaning

Or this Geeta has become the garden of grape-vine, where letters are grapes and which has become the place of cool rest for the tired travellers on the road of worldly life.

1671
मूळ

की सभाग्यसंती भ्रमरी । केले ते श्लोक कल्हारी । कृष्णाख्यसरोवरी । सासिन्नली हे ॥1671॥

मराठी अर्थ

किंवा भ्रमरप्रमाणे ज्या भाग्यवान साधुसंतांनी ह्या गीतेच्या श्लोक रूपी कमलांचा आस्वाद (मकरंद) लुटला आहे अशा श्रीकृष्णनामक सरोवरांतील भरास आलेल्या ह्या कमलिनीच होत.

English meaning

Or the Geeta may be imagined as a beautiful pool in the form of the mouth of the Lord Shrikrishna which pool has these seven hundred Lotus flowers and around which saints are hovering joyfully like black-bees.

1672
मूळ

की श्लोक नव्हती आन । गमे गीतेचे महिमान । वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥1672॥

मराठी अर्थ

किंवा मला वाटते हे श्लोक नसून गीतेचे अखंड महिमान वर्णन करणारे हे भाटच (स्तुति पाठक) होत.

English meaning

Or these seven hundred verses are none else than court-singers praising the Geeta.

1673
मूळ

की श्लोकांचिया आवारा । सात शते करूनि सुंदरा । सर्वागम गीतापुरा । वसो आले ॥1673॥

मराठी अर्थ

किंवा सातशे श्लोकाचा जणू रक्षणार्थं सुंदर कोट बांधून सर्व वेदशास्त्रे ह्या गीतानगरीत वास करण्यास आले आहेत.

English meaning

Or by erecting the compound wall of these seven hundred verses, in the beautiful town of Geeta, Vedas, like some Brahmins have come to reside.

1674
मूळ

की निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया । श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥1674॥

मराठी अर्थ

किंवा आपला कांत जो आत्मा त्याला आवडीने आलिंगन देण्यासाठी त्याची कांतारूप असलेली गीता ही सातशे श्लोक रूपी बाह्या पसरूनच जणू आली आहे !

English meaning

Or these verses may be said to be the arms extended by the loving wife Geeta to embrace her husband the Atman.

1675
मूळ

की गीताकमळींचे भृंग । की हे गीतासागरतरंग । की हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥1675॥

मराठी अर्थ

किंवा हे श्लोक म्हणजे गीताकमळावरील भृंगच होत; अथवा गीतासागरावरील हे तरंग म्हणा किंवा अशीही कल्पना करावी किं श्रीहरीच्या गीतारथाचे हे श्लोक हे अश्वच होत.

English meaning

These are seven hundred black-bees, on the lotus of Geeta, or waves on the sea of Geeta or the horses of the chariot of Geeta.

1676
मूळ

की श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥1676॥

मराठी अर्थ

किंवा, नर जो अर्जुन हाच जणु सिंहस्थ पर्वणीचा योग म्हणून गीतागंगेला मिळण्यासाठी हा श्लोक रूपी सर्वतीर्थमेळाच आला आहे !

English meaning

Or, having the auspicious Sinhastha of Arjuna at hand, there is the gathering of seven hundred pilgrims who have arrived at the river of Geeta for sacred bath. (Sinhastha is the period of time when Jupiter is in the position against Leo, the 5th zodiacal constellation.)

1677
मूळ

की नोहे हे श्लोक श्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी । की निर्विकल्पा लावणी । कल्पतरूंची ॥1677॥

मराठी अर्थ

किंवा ही श्लोक पंक्ति नसून अचिंत्य वस्तूची चित्ताला प्राप्ति करून देणारा हा चिंतामणीच होय, अथवा निर्विकल्प ब्रह्मप्राप्ति करून देणारे हे कल्पतरूच होत.

English meaning

Or, this is not a chain of seven hundred verses; but a rosary of gems Chitamanis or a line of wish-trees, which attract even the ascetic minds.

1678
मूळ

ऐसिया शते सात श्लोका । परी आगळा येकयेका । आता कोण वेगळिका । वानावा पा । ॥1678॥

मराठी अर्थ

असे एकापेक्षां एक बहारीचा असे सातशे श्लोक आहेत तेव्हा त्यातील कोणता एकच श्लोक पुढे घेऊन त्याची प्रशंसा करावी ?

English meaning

As each verse is better than another in this Geeta, how can one praise each and every verse?

1679
मूळ

तान्ही आणि पारठी । इया कामधेनूते दिठी । सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥1679॥

मराठी अर्थ

कामधेनु म्हटल्यावर मग, तान्ही की पारठी ही दृष्टि ठेवून जशा कोणीही तिच्या गोष्टी बोलत नाही.

English meaning

Just as the distinction of milching or non-milching, barren cow cannot be made about the Divine cow which supplies every need;

1680
मूळ

दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु । अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥1680॥

मराठी अर्थ

दिवा पहिला कोणता व मागील कोणता, सूर्य धाकटा की वडील, अमृतसागर खोल का उथळ ह्या चौकशीचा उपयोग काय ?

English meaning

Or just as there is no back side or front side for flame of a lamp; or no smaller or bigger Sun, or there is no shallowness or depth to be counted in respect of the sea of nectar.

1681
मूळ

तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनी नवी पारिजाते । आहाती काई ? ॥1681॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे हे पहिले, (उत्तम) हे अखेरचे, (सामान्य) असा गीतेच्या श्लोकाचा श्रेष्ठाश्रेष्ठतेचा क्रम लावणे शक्य नाही; स्वर्गतरू पारिजाताची नवीजुनी पुष्पे असा भेद असतो काय ?

English meaning

Similarly, we should not say that certain verses are first or last. Can we say that flowers of Parijaat are small or large, fresh or otherwise?

1682
मूळ

आणि श्लोका पाडु नाही । हे कीर समर्थु काई । येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥1682॥

मराठी अर्थ

आणि इलोकांमध्ये न्यूनाधिक भाव नाही हे काय सिद्ध केले पाहिजे ? शिवाय तिच्यात वाच्य व वाचक असा भेदभाव म्हणण्यासही अवसर नाही.

English meaning

And there is no further necessity of my justifying that there is no less or more important among the verses in Geeta, because one important thing is that in reading Geeta, there remains no difference as to who is the teacher, the reader, and who is the disciple to be taught.

1683
मूळ

जे इये शास्त्री येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु । हे प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥1683॥

मराठी अर्थ

कारण ह्या शास्त्रांत श्रीकृष्णच वाच्य व श्रीकृष्णच वाचक आहेत हे सामान्य जनही जाणतात.

English meaning

Even ordinary men know that in Geeta it is the God who is speaking and he is speaking about Himself only.

1684
मूळ

येथे अर्थे तेचि पाठे । जोडे येवढेनि धटे । वाच्यवाचक येकवटे । साधिते शास्त्र ॥1684॥

मराठी अर्थ

गीतेच्या अर्थाने जे फल जोडते तेच पाठानेही जोडते; ह्या फलाच्या एकाच मापावरूनही वाच्य व वाचक ह्यांचे ऐक्य गीताशास्त्रानेच सिद्ध केले आहे.

English meaning

This unity is so tight and strong that the benefit which a reader gets by knowing its meaning is also got by the one who only recites it merely by his mouth.

1685
मूळ

म्हणौनि मज काही । समर्थनी आता विषय नाही । गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥1685॥

मराठी अर्थ

म्हणून ते आता मी सिद्ध करण्याचे कारण नाहीं; ही गीता म्हणजे दुसरे कोणी नसून प्रभूची वाङमयीमूर्ती होय असे निश्चित समजा.

English meaning

So, I need no more justification to be made about Geeta. Geeta is the very image of the God in the form of literature.

1686
मूळ

शास्त्र वाच्ये अर्थे फळे । मग आपण मावळे । तैसे नव्हे हे सगळे । परब्रह्मचि ॥1686॥

मराठी अर्थ

कोणतेही शास्त्र वाच्यपद व नंतर त्याचा अर्थ असे फलद्रूप होऊन मग आपण मावळतें; गीताशास्त्राची तशी गोष्ट नाही. हे सर्व परब्रह्मस्वरूपच आहे.

English meaning

When any science has done its job to give its knowledge to the reader, it does not remain in its effective existence; but Geeta is not like that. It is eternal, ever living, not destructible, verily the Brahman.

1687
मूळ

कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा । अर्जुनव्याजे रूपा । आणिला देवे ॥1687॥

मराठी अर्थ

प्रभूने विश्वकरुणत्व काय सांगावे ? अर्जुनाच्या निमित्ताने लोकांना महानंदाची (ब्रह्मानंदाची) सहज प्राप्ति व्हावी म्हणन त्या निर्गुणालाही गीतेच्या रूपाने रूपास आणिले आहे.

English meaning

O! Just see how under the pretext of teaching Arjuna, the Lord has, out of his compassion, made easily available the supreme bliss of Atman for all the world!

1688
मूळ

चकोराचेनि निमित्ते । तिन्ही भुवने संतप्ते । निवविली कळांवते । चंद्रे जेवी ॥1688॥

मराठी अर्थ

चकोरांच्या निमित्ताने पूर्णकलायुक्त चंद्राने तिन्ही संतप्तलोक जसे शांत करावे;

English meaning

Just as pretending to quench the thirst of the bird Chakora, the Moon cools all the world,

1689
मूळ

का गौतमाचेनि मिषे । कळिकाळज्वरीतोद्देशे । पाणिढाळु गिरीशे । गंगेचा केला ॥1689॥

मराठी अर्थ

किंवा गौतम मुनींच्या निमित्ताने कलिकाळदोष ज्वरयुक्त जीवांच्या उद्धारार्थ शंकरांनी गंगा मृत्युलोक आपल्या जटांपासून सोडली.

English meaning

Or just as making a pretence of pleasing the sage Gautama, the Lord Shankara released the heavenly waters of Godavari for giving cool comfort to all the people,

1690
मूळ

तैसे गीतेचे हे दुभते । वत्स करूनि पार्थाते । दुभिन्नली जगापुरते । श्रीकृष्ण गाय ॥1690॥

मराठी अर्थ

त्या प्रमाणे, ही श्रीकृष्णधेनु आपले वत्स जो पार्थ त्याच्यासाठी पण जगाला पुरून उरेल अशा गीतारूपी दुग्धाचा पान्हा सोडती झाली.

English meaning

Similarly, making Arjuna a calf, the Lord Shrikrishna, as a cow, gave this milk of Geeta sufficient for the whole world.

1691
मूळ

येथे जीवे जरी नाहाल । तरी हेचि कीर होआल । नातरी पाठमिषे तिंबाल । जीभचि जरी ॥1691॥

मराठी अर्थ

ह्या ग्रंथांत जीवाभावाने बुडी द्याल तर तद्रूपच (मोक्षरूप) व्हाल अथवा पठणाच्या निमित्ताने नुसत्या जिभेला जरी श्रम द्याल,

English meaning

If you swim in this Geeta to your heart's contentment you will reach the non-duality; and if merely you will give your tongue the exercise of reciting this aloud-

1692
मूळ

तरी लोह एके अंशे । झगटलिया परीसे । येरीकडे अपैसे । सुवर्ण होय ॥1692॥

मराठी अर्थ

तरी, लोखंड एका अंगाने परिसाला लागले तरी जसे सर्वागाने आपोआप सुवर्णत्व पावते.

English meaning

Even then, just as all the parts of an iron piece become gold though the magic stone touches it at one point only.

1693
मूळ

तैसी पाठाची ते वाटी । श्लोक पाद लावा ना जव वोठी । तव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥1693॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, श्लोकाच्या पठणाची वाटी नुसती ओंठाला लावता न लावता तोच अंगाला ब्रह्मतेची पुष्टि येईल. (आंगे ब्रह्म व्हाल)

English meaning

As soon as you will put even one line of a verse in the pot of recitation to your lips, you will be nourished with the tonic of unity with Brahman.

1694
मूळ

ना येणेसी मुख वांकडे । करूनि ठाकाल कानवडे । तरी कानीही घेता पडे । तेचि लेख ॥1694॥

मराठी अर्थ

किंवा पठण न करण्याच्या उद्देशाने तोंड मिटून धरून नुसते एक कुशीवर पडून रहाल तरीही, (दुसऱ्याने म्हटलेली) गीतेची नुसती अक्षरे कानावर आली तरी हेच म्हणजे पठनाचे फल मिळेल.

English meaning

Even you may not put the pot of recitation to your lips but turn your ear to it, then also the result will be the same by hearing even a word or letter of this Geeta.

1695
मूळ

जे हे श्रवणे पाठे अर्थे । गीता नेदी मोक्षाआरौते । जैसा समर्थु दाता कोण्हाते । नास्ति न म्हणे ॥1695॥

मराठी अर्थ

कारण, समर्थ दाता जसा कोणाही याचकाला नकार देत नाही, त्याप्रमाणे, तिचे श्रवण घडो, पठण घडो अथवा अर्थ व्युत्पत्ति होवो, मोक्षाच्या अलीकडील फल देण्याचे गीतेला माहीतच नाही.

English meaning

Just as a really rich and generous man does not turn any beggar away, Geeta gives liberation and nothing short of liberation if you adhere to any means like listening, reading or meditation on its meaning, whatever you like!

1696
मूळ

म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा । काय कराल आघवा । शास्त्री येरी ॥1696॥

मराठी अर्थ

म्हणून, जाणत्यासुद्धां सर्वानी (जाणत्या नेणत्यांनी) एक गीतेचीच सेवा करावी; दुसरी सर्व शास्त्रे घेऊन करावयाचे आहे काय ?

English meaning

Therefore, only Geeta and Geeta alone should be adhered to, in the company of saintly persons of self-knowledge. What are you going to do by following other sciences?

1697
मूळ

आणि कृष्णार्जुनी मोकळी । गोठी चावळिली जे निराळी । ते श्रीव्यासे केली करतळी । घेवो ये ऐसी ॥1697॥

मराठी अर्थ

आणि कृष्णार्जुनांनी मोंकळेपणे ज्या स्वैर गोष्टी केल्या या जणू करतलावर घेता याव्या इतक्या व्यासमहर्षींनी सोप्या करून ठेवल्या.

English meaning

Further it should be noted that the sage Vyasa has put in a simple manner, the private heart- to-heart talk between the Lord and Arjuna, so that anybody can as if see it objectively by putting it on his palm.

1698
मूळ

बाळकाते वोरसे । माय जै जेवऊ बैसे । तै तया ठाकती तैसे । घास करी ॥1698॥

मराठी अर्थ

माता बाळाला प्रेमाने जेऊ घालू बसली, की त्याच्या बेताचेच जसे घास करिते.

English meaning

For example, when a mother sits for feeding her child, she makes tiny morsels of the food, easy for the child to take them in his mouth.

1699
मूळ

का अफाटा समीरणा । आपैतेपण शाहाणा । केले जैसे विंजणा । निर्मूनिया ॥1699॥

मराठी अर्थ

किंवा अमर्याद वायुरूपाचा आपल्या पुरता भोग घडावा म्हणून चतुर मनुष्य जसा पंखा निर्माण करितो.

English meaning

Or while wind is uncontrolled in the sky in its own element, man has invented a fan and made the wind a useful thing for his comfort.

1700
मूळ

तैसे शब्दे जे न लभे । ते घडूनिया अनुष्टुभे । स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविले ॥1700॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, विस्तृत व सुट्या शब्दांनी जो बोध होणे कठीण, तो स्त्रीशूद्रादिकांच्या बुद्धीत सहज आरूढ व्हावा अशा प्रकारची सुटसुटित अनुष्टुभ छंदात श्रीव्यासांनी त्या शब्दांची रचना केली.

English meaning

Similarly, the sage Vyasa has knitted in the format of Anushtubh meter, the knowledge which is originally not possible to be put into words, and made it followable for women, Shoodras and all.

1701
मूळ

स्वातीचेनि पाणिये । न होती जरी मोतिये । तरी अंगी सुंदरांचिये । का शोभिती तिये ? ॥1701॥

मराठी अर्थ

स्वातीनक्षत्राचे पाणी जर मोत्यांच्या आकाराला न येते तर, त्याला सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी प्राप्त झाली असती ?

English meaning

Sirs! If pearls are not formed in the shells by the drops of rain falling during the period of Swati star-constellation, how are they to adorn as ornaments on the beautiful bodies of young women?

1702
मूळ

नादु वाद्या न येता । तरी का गोचरु होता । फुले न होता घेपता । आमोदु केवी ? ॥1702॥

मराठी अर्थ

ध्वनि (नाद) जर वाद्यांचा आश्रय न करिता तर, श्रवण प्रत्यक्षता त्याला कशी येती ? किंवा आमोद (सुगंध) फुलांचे रूप धारण न करिता तर त्याचा व्यक्तिगत भोग कसा घडता ?

English meaning

If sound is not produced by a musical instrument, how can we listen? If flowers are not there, how can we smell them?

1703
मूळ

गोडी न होती पक्वान्ने । तरी का फावती रसने ? । दर्पणावीण नयने । नयनु का दिसे ? ॥1703॥

मराठी अर्थ

गोडी पक्वान्नाच्या रूपाने अवतरती ना तर रसनेला तिचा भोग कसा घडता ? किंवा आरशावाचून डोळ्याला डोळा कसा दिसता ?

English meaning

If food is not tasty, how can our tongue find it sweet? Without mirror, how can the eye see itself?

1704
मूळ

द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथी । तरी का ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥1704॥

मराठी अर्थ

ब्रह्म (द्रष्टा) श्रीगुरूचे रूप घेऊन जर आकारास आले नसते तर त्याची उपासना कशी करिता आली असती ? तसे अगणित जे ब्रह्मवस्तु ते सातशे श्लोक रूपाने (गीतारूपानें) प्रकट न होते तर त्याची जगात लोकांना कशी प्राप्ति होती ?

English meaning

If embodied Guru is not visible in person, whom is the disciple going to serve?

1705
मूळ

तैसे वस्तु जे असंख्यात । तया संख्या शते सात । न होती तरी कोणा येथ । फावो शकते ? ॥1705॥

मराठी अर्थ

तसे अगणित जे ब्रम्ह ते गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रगट झाले नसते, तर कोणाला तरी जाणता आले असते काय ?1705-

English meaning

Similarly if the abstract Brahman had not been put into so many verses, how could anybody have understood anything about it?

1706
मूळ

मेघ सिंधूचे पाणी वाहे । तरी जग तयातेचि पाहे । का जे उमप ते नोहे । ठाकते कोण्हा ॥1706॥

मराठी अर्थ

मेघांतील पाणी समुद्राचेच असते, पण लोकांची दृष्टि (आशा) तद्विषयकच असते. कारण जे अमर्याद ते (समुद्रस्वरूप) कोणालाही व्यवहारोपयोगी नसते.

English meaning

The world sees the sea as it is, though clouds are pulling water up from it: because, how can a thing which has no measure, be known as reduced or increased?

1707
मूळ

आणि वाचा जे न पवे । ते हे श्लोक न होते बरवे । तरी काने मुखे फावे । ऐसे का होते ? ॥1707॥

मराठी अर्थ

आणि वाणी जेथे पोंचू शकत नाही असे ते ब्रह्मवस्तु ह्या उत्तम श्लोकांचे रूप न घेते तर, श्रवणांना व वाणीला त्यांचा भोग कसा घेता आला असता ?

English meaning

So, if that which is beyond the ken of speech, would not have been confined nicely in these verses, how would our ears and minds have got the satisfaction?

1708
मूळ

म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु । जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥1708॥

मराठी अर्थ

म्हणून श्रीकृष्णार्जुनसंवादाला गीताग्रंथाचे रूप देऊन ठेवण्यात महर्षी व्यासांनी जगावर महान उपकार करून ठेविले आहेत.

English meaning

Therefore, it is the greatest obligation on the world, by the sage Vyasa that he has compiled the teachings of Lord Shrikrishna in these verses of Geeta.

1709
मूळ

आणि तोचि हा मी आता । श्रीव्यासाची पदे पाहता पाहता । आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥1709॥

मराठी अर्थ

आणि तोच श्रीव्यासजींचा ग्रंथ त्यातील पदांच्या अर्थाकडे लक्ष्य पोचवून, प्राकृत श्रोत्यांच्या श्रवणाला योग्य असा मराठी भाषेत आज लिहिला आहे.

English meaning

And I have brought the same knowledge before you for your listening, by keeping my mind continuously attentive to the terminology used by the sage Vyasa.

1710
मूळ

व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । चावळी करी ॥1710॥

मराठी अर्थ

व्यासादिकांसारखे थोर ज्ञानीही (आत्मवेत्ते) जेथे वर्णनाच्या व्यवहारांत क्वचित् साशंक असतात (अवर्णनीय वस्तु वर्णानांत आणू गेल्यामुळे) तेथे मीही एक गरीब वाङ्मयसेवा करीत आहें.

English meaning

I am aware that I am officiously dabbling in the depths of the subject, where the intellects of the sage Vyasa and others, only walk haltingly with lot of misgivings about their ability.

1711
मूळ

परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे की ॥1711॥

मराठी अर्थ

(कारण, मला पूर्ण विश्वास आहे) की हा गीतेश्वर अत्यंत भोळा आहे; व्यासोक्ति रूप सुमनांच्या माळा त्याने गळ्यात जरी धारण केल्या असल्या, तरी माझ्या रंकाच्या दूर्वादळाचाही तो अव्हेर करणार नाही

English meaning

But this Lord of Geeta is easily the most amiable god. While he is wearing the beautiful garland of the verses of sage Vyasa, he does not reject my humble bunch of little grass-blades of Doorvas!

1712
मूळ

आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा । तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥1712॥

मराठी अर्थ

पहा की, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर हत्तीचे कळप पाण्यासाठी येत असले तरी मशकाला तेथे काय मज्जाव असतो ?

English meaning

Sirs, is there no entry for a little insect to quench its thirst at the shore of the ocean of milk, only because that shore is frequented by big elephants for drinking its milk?

1713
मूळ

पांख फुटे पांखिरू । नुडे तरी नभीच स्थिरू । गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥1713॥

मराठी अर्थ

नूतन पंख फुटणारे पांखरू फार उडू शकले नाही तरी त्याला आकाशाचाच आश्रय असतो (आकाशांतच असतं) व भरारी सरसे (सत्वर) गगन आक्रमण करणारा गरुड घेतला तरी त्यालाही विश्रांतिस्थल आकाशच असते

English meaning

A tiny young bird is somehow floating on the air though it has no wings strong enough to fly high; and in the same sky, eagle is swiftly soaring to new heights!

1714
मूळ

राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणे । आणिके काय कोणे । चालावेचिना ? ॥1714॥

मराठी अर्थ

जगात राजहंसाची गति श्रेष्ठ ठरली असली तरी तेवढयासाठी, इतरांनी काय चालूच नये ?

English meaning

The king swan walks with elegance on the earth, but does it mean that others should not walk at all, according to their capacity?

1715
मूळ

जी आपुलेनि अवकाशे । अगाध जळ घेपे कलशे । चुळी चूळपण ऐसे । भरूनि न निघे ? ॥1715॥

मराठी अर्थ

कलशांत अधिक पाणी राहिले तरी आधार कलशाकाशाच असतो; तसेच चुळीत कमी पाणी असले तरी आधार मुखाकाशाचाच असतो (यात विशेष ते काय ? )

English meaning

Sirs, a big vessel can hold a lot of water in it, but does it mean that nobody should take a handful of water in his mouth to wash it?

1716
मूळ

दिवटीच्या आंगी थोरी । तरी ते बहु तेज धरी । वाती आपुलिया परी । आणीच की ना ? ॥1716॥

मराठी अर्थ

मशाल मोठी असली तर प्रकाश अधिक असतो व वात जरी लहान असली तरी ती आपल्या मानाने प्रकाशच देते नव्हे काय ?

English meaning

A torch is big and its light is also big enough, but is not a little wick having a tiny flame according to its own size?

1717
मूळ

जी समुद्राचेनि पैसे । समुद्री आकाश आभासे । थिल्लरी थिल्लराऐसे । बिंबेचि पै ॥1717॥

मराठी अर्थ

समुद्राच्या व्याप्ती प्रमाणं समुद्रांत आकाश प्रतिबिंबित झाले तर डबक्याच्या व्याप्तीच्या मानाने तेथेही ते तितकेच प्रतिबिंबित होते,

English meaning

The reflection of the sky in the ocean is vast, but the same sky is having its small reflection in a small pool of water.

1718
मूळ

तेवी व्यासादिक महामती । वावरो येती इये ग्रंथी । मा आम्ही ठाको हे युक्ति । न मिळे कीर ? ॥1718॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे व्यासांसारख्या महान बुद्धिमंतांनी ह्या ग्रंथाचा उहापोह केला असला तरी, आम्हीही आमच्या शक्तीप्रमाणे तसे करावे ह्याला वरील दृष्टांत मिळत नाहीत काय ?

English meaning

Similarly, it is not logical to say that we should not step in this subject only because great minds like that of sage Vyasa are delving deep into it.

1719
मूळ

जिये सागरी जळचरे । संचरती मंदराकारे । तेथ देखोनि शफरे येरे । पोहो न लाहती ? ॥1719॥

मराठी अर्थ

ज्या समुद्रामध्ये मंदरपर्वतसारखी थोर जलचरे संचार करितात, तेणे ते पाहून लहान माशांनी काय पोहूच नये ?

English meaning

Should not a small fish venture to swim in the sea, in which larger aquatic animals even of the size of mount Mandar are roaming about?

1720
मूळ

अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्याते देखे । मा भूतळीची न देखे । मुंगी काई ? ॥1720॥

मराठी अर्थ

सन्निध्या मुळे अरुण तेवढा सुर्याला पहातो असे म्हणावे तर पृथ्वीवरील मुंगीही काय त्याला पहात नाही ?

English meaning

Aruna, the driver of the chariot of the Sun sits very near the Sun, and sees him from very near, but does not the little ant scurrying on the earth see the Sun as best as it can?

1721
मूळ

यालागी आम्हा प्राकृता । देशिकारे बंधे गीता । म्हणणे हे अनुचिता । कारण नोहे ॥1721॥

मराठी अर्थ

यास्तव आम्ही प्राकृतजनांनी देशभाषेत गीताप्रबंध आणिला तर ते अनुचित होय असे म्हणता येणार नाही.

English meaning

Therefore, it is not at all prohibited or undesirable that simple men like me should write Geeta in our Marathi language.

1722
मूळ

आणि बापु पुढा जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावो कायी ? ॥1722॥

मराठी अर्थ

आणि पिता पुढे जात असून त्याच्याच मार्गे बालक चालत असले तर शेवटी ते तेथेच पोचणार नाही काय ?

English meaning

And will not the son who is closely following the footsteps of his father, reach the same destination as his father will reach?

1723
मूळ

तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकाराते वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । के जाईन ? ॥1723॥

मराठी अर्थ

व्यासांच्या मागोव्याने व भाष्यकार श्रीशंकराचार्यांना वाट विचारीत जाणारा माझ्या सारखा त्याप्रमाणे अल्पमतीही तेथेच पोचणार नाही तर कोठे जाईल ?

English meaning

Similarly, unworthy as I may be, if I walk taking the path which the sage Vyasa and others have taken and consulting the earlier great commentators, I shall reach the right destination- where else can I go and how?

1724
मूळ

आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा । जयाचेनि अमृते चंद्रमा । निववी जग ॥1724॥

मराठी अर्थ

आणि ज्याच्या सामर्थ्याने पृथ्वी स्थावरजंगम भूतांचा भार सहन करिते व ज्याच्या आधारावर अमृताच्या चंद्र जगाची शांति करितो,

English meaning

Further, by taking the virtue of forgiveness from whom the earth has become so tolerant of the animate and inanimate things, and from whom the Moon takes nectar on loan and cools the world,

1725
मूळ

जयाचे आंगिक असिके । तेज लाहोनि अर्के । आंधाराचे सावाइके । लोटिजत आहे ॥1725॥

मराठी अर्थ

ज्याच्या अंगचे असलेले तेज घेऊन सूर्य अंधाराचा प्रतिबंध दूर करितो.

English meaning

By taking the pure light from whom the Sun dissipates all the darkness,

1726
मूळ

समुद्रा जयाचे तोय । तोया जयाचे माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥1726॥

मराठी अर्थ

समुद्राला ज्याच्या सत्तेने पाणी आहे, पाण्याला ज्याच्यायोगे माधुर्य आहे व माधुर्याला ज्याच्यामुळे शोभा आहे;

English meaning

From whom the sea got water, water got its sweetness, sweetness has got the beauty,

1727
मूळ

पवना जयाचे बळ । आकाश जेणे पघळ । ज्ञान जेणे उज्वळ । चक्रवर्ती ॥1727॥

मराठी अर्थ

वाऱ्याच्या अंगचे सामर्थ्य ज्याचे आहे, आकाश ज्याच्या सत्तेवर व्यापक आहे, ज्ञानालाही ज्याचा प्रकाश आहे व ज्याच्यामुळेच त्याला सर्वश्रेष्ठता आहे.

English meaning

From whom the wind has its force, the sky its vastness, and knowledge has earned the royal glory,

1728
मूळ

वेद जेणे सुभाष । सुख जेणे सोल्लास । हे असो रूपस । विश्व जेणे ॥1728॥

मराठी अर्थ

ज्याच्य सत्तेने वेद हितवचनी आहेत, सुखाला सुखपणा ज्याचा आहे, हे राहो ! ज्याच्यायोगे विश्वाला रूप आहे.

English meaning

By whose grace Vedas have the sweetness of the speech, happiness has got enthusiasm, and the whole universe has its beautiful shape.

1729
मूळ

तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु । राहाटत असे मजही आंतु । रिघोनिया ॥1729॥

मराठी अर्थ

त्या सर्वोपकारी श्रीगुरु निवृत्तिनाथांचा माझ्या अंतःकरणात प्रवेश असून ते तेथे वास करीत आहेत.

English meaning

That Master, Sadguru Nivruttinath, who obliges all, has entered in my consciousness and is residing there.

1730
मूळ

आता आयती गीता जगी । मी सांगे मऱ्हाठिया भंगी । येथ के विस्मयालागी । ठावो आहे ॥1730॥

मराठी अर्थ

तेव्हां, जगात पूर्वीच आयती प्रसिद्ध असलेली गीता मी मराठी भाषेत सांगितली, तर त्यात आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे ?

English meaning

Then what is so surprising if I put into proper words the discussions in the Geeta, in Marathi language?

1731
मूळ

श्रीगुरुचेनि नांवे माती । डोंगरी जयापासी होती । तेणे कोळिये त्रिजगती । येकवद केली ॥1731॥

मराठी अर्थ

ज्याचे श्रीगुरु म्हणजे केवळ डोंगरच्या मातीची मूर्ति, त्या एकलव्य कोळ्यानेही त्या अचेतन गुरूपासून धनुविद्य प्राप्त करून घेऊन त्रैलोक्यात सर्व मान्यता मिळविली.

English meaning

Sir, Ekalavya, the Bhilla from the mountains, prepared an earthen image of Guru Dronacharya and studied Archery with faith in front of that image. Even in this way he could disarm many an archer in the world because of his devotion to his Guru!

1732
मूळ

चंदने वेधली झाडे । जाली चंदनाचेनि पाडे । वसिष्ठे मांनिली की भांडे । भानूसी शाटी ॥1732॥

मराठी अर्थ

चंदनाच्या भोवतालचे वृक्ष चंदनासारखे सुगधित झाले व वसिष्ठ मुनींची छाटीही तेजाने सूर्याची बरोबरी करू शकली.

English meaning

Trees near the sandalwood tree take up its fragrance, only by vicinity. The robe which the sage Wasishtha had hung for drying, became so brilliant that it did the work of the Sun!

1733
मूळ

मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदी ॥1733॥

मराठी अर्थ

मग मी तर सचेतन मनुष्य आणि केवळ कृपादृष्टीने शिष्याला निजपदप्राप्ति करून देणारे असे श्रीसद्गुरू माझे स्वामी. ?

English meaning

Compared to them, I am a living person and my Guru is so capable that by one glance of grace, he can lift his disciple up to the level of Atman.

1734
मूळ

आधीचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तै न दिसे ऐसी गोठी । केही आहे ? ॥1734॥

मराठी अर्थ

आधीच निर्दोष नेत्र, त्यात सूर्याची मदत, मग दिसणार नाही अशी गोष्ट कोठे होईल काय.

English meaning

If our eyesight is perfect without any defect and over and above that, the Sun is helpful, then, is there anything which we cannot see?

1735
मूळ

म्हणौनि माझे नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे । श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥1735॥

मराठी अर्थ

म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे नित्य व नवे वाहणारे श्वासोच्छ्वासही गीता प्रबंध होऊ शकतील; कारण, श्रीगुरुकृपेमे जगात काय होणार नाही ?

English meaning

Then even my breathing may become great volumes of wisdom! Sirs! I, Dnyandeva, would ask you- "Is there anything that cannot be successful by the grace of Guru?

1736
मूळ

याकारणे मिया । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया । केला लोका यया । दिठीचा विषो ॥1736॥

मराठी अर्थ

याकरिता मी मराठींत श्रीगीतार्थ केला; तो असा की, सर्व लोकांना तो विषय सहज ग्रहण व्हावा.

English meaning

On this count only, I have used Marathi language and conveyed the meaning of Geeta to people in such a way that they may visualize it by their eyes.

1737
मूळ

परी मऱ्हाठे बोलरंगे । कवळिता पै गीतांगे । तै गातयाचेनि पांगे । येकाढता नोहे ॥1737॥

मराठी अर्थ

परंतु, माझ्या मराठी शृंगाराच्या भाषेने कोणी गीतार्थाचे आकलन करू गेला, तरी मूळगीतेच्या वक्त्याच्या अभावी त्यात एकदेशित्व अथवा अपूर्णता मुळीच रहाणार नाही.

English meaning

If these Marathi verses will be sung by anybody, there will be nothing wanting in the captivating quality of his song.

1738
मूळ

म्हणौनि गीता गावो म्हणे । ते गाणिवे होती लेणे । ना मोकळे तरी उणे । गीताही आणित ॥1738॥

मराठी अर्थ

म्हणून कोणी गीतेचा वक्ता असेल, तर माझा मराठी अर्थ त्याच्या वक्तृवाला अलंकारच होईल; किंवा कोणी सुटा मराठी अर्थ (माझा) सांगितला तरीही मुळावरून सांगितल्या जाणान्या अर्थाला तो उणेपणा आणील ? (म्हणजे सरस ठरेल)

English meaning

Therefore, if somebody sets about to sing Geeta, it will be an ornament to his singing. Even if somebody simply reads these words in prose, Geeta will not leave anything short in that recitation.

1739
मूळ

सुंदर आंगी लेणे न सूये । तै तो मोकळा शृंगारु होये । ना लेइले तरी आहे । तैसे के उचित ? ॥1739॥

मराठी अर्थ

सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तरी, तो आपल्या सुटधा स्थितींतही श्रृंगार रूपाने असतोच, अथवा सुंदर शरीरावर तो घातला तर त्याच्यासारखी योग्य गोष्ट आणखी कोणती ?

English meaning

An ornament if seen as it is, without wearing it, is also beautiful to look at. Then is it not rather better to put it on?

1740
मूळ

का मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती । नातरी मानविती । अंगेंचि सडी ॥1740॥

मराठी अर्थ

किंवा मोती ही जातच अशी आहे की ती सुवर्णापाशी सहकार करून त्यालाही शोभा देतात, किंवा सुटी असली तरी आपल्या अंगानेच शोभतात.

English meaning

If you take the example of pearls, they are definitely improving the beauty of gold, when they are studded in it; but if not, they are not less attractive, if seen separately.

1741
मूळ

नाना गुंफिली का मोकळी । उणी न होती परीमळी । वसंतागमीची वाटोळी । मोगरी जैसी ॥1741॥

मराठी अर्थ

अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची वाटोळी मोगऱ्याची फुले, हारात असोत की सुटी असोत, त्यांच्या सुगंधांत फरक पडत नाही.

English meaning

The white roundish Jasmine flowers blossomed in the spring season do not become less fragrant either in a garland or when kept loose.

1742
मूळ

तैसा गाणिवेते मिरवी । गीतेवीणही रंगु दावी । तो लाभाचा प्रबंधु ओवी । केला मिया ॥1742॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे, गीतेवरील वक्तृत्वाला शोभा देणारा, स्वतंत्रपणेही रंग भरविणारा, असा माझ्या अवडीचा हा ओवीबद्ध प्रबंध मी रचिला आहे (असे महाराज म्हणतात).

English meaning

Similarly, I have written this book in ovi form in such a way that the quality of good singing befits it, but even without singing also, it is equally sweet.

1743
मूळ

तेणे आबालसुबोधे । ओवीयेचेनि प्रबंधे । ब्रह्मरससुस्वादे । अक्षरे गुंथिली ॥1743॥

मराठी अर्थ

त्या प्रबंधांत अबालवृद्धांस समजण्या सारख्या ओव्यांनी ब्रह्मरसाचा आस्वाद घेता यावा, अशा प्रकारे अक्षररचना केली आहे.

English meaning

I have sewn the letters in the ovi meter in such a manner that they are having fragrance of the bliss of Brahman and can be understood by everybody, even by children.

1744
मूळ

आता चंदनाच्या तरुवरी । परीमळालागी फुलवरी । पारुखणे जियापरी । लागेना की ॥1744॥

मराठी अर्थ

चंदनतरूपाशी गेल्यावर त्याला फुले येईपर्यंत सुगंधासाठी जशी वाट पहाणे पडत नाही.

English meaning

Now for the sake of fragrance, we have not to find out how many flowers there are on a sandalwood tree.

1745
मूळ

तैसा प्रबंधु हा श्रवणी । लागतखेवो समाधि आणी । ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥1745॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ह्या प्रबंधाचे नुसते श्रवण घडताच जर समाधि लागते, तर, त्याचे व्याख्यानपूर्वक श्रवण झाल्यावर तो काय व्यसन लाविल्यावाचून राहील

English meaning

Similarly, as soon as somebody listens to this book of ovis, he goes into a trance; then if he listens to a discourse giving explanation of its meaning, will it not be enchanting to the mind?

1746
मूळ

पाठ करिता व्याजे । पांडित्ये येती वेषजे । तै अमृताते नेणिजे । फावलिया ॥1746॥

मराठी अर्थ

पठणाच्या निमित्ताने आवृत्ति सुरू केली, तरी प्रसादाने आपोआप पांडित्य (अर्थविषयक) स्फुरते व मग त्या गोडीपुढे अमृताचा लाभही तुच्छ वाटतो.

English meaning

Even by simply reciting it, the learning rises to its peak in such a way that even if a stream of nectar may be flowing by one's side, one will not pay attention to it.

1747
मूळ

तैसेनि आइतेपणे । कवित्व जाले हे उपेणे । मनन निदिध्यास श्रवणे । जिंतिले आता ॥1747॥

मराठी अर्थ

तसे हे आयते प्राप्त झालेले (अमृताहून गोड) असे कवित्व विश्रांतिस्थान होऊन, त्याच्या श्रवणानेच मनन व निदिध्यासन ह्यांची आवश्यकता उरली नाही.

English meaning

So, the poetic content of this book is so perfect that it produces profound peace, and we can say that listening to this poetry has surpassed in quality, both the meditation and concentration on its meaning.

1748
मूळ

हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल । सर्वेंद्रिया पोषवील । श्रवणाकरवी ॥1748॥

मराठी अर्थ

हे श्रवण वाटेल त्या मनुष्यालाही आत्मानंदाचा शेलका भोग घडवील व त्याच्या सर्वेन्द्रियांना टवटवी देईल.

English meaning

By listening to this, anybody can gain the essential part of the joy of self- realization and will have his sense organs well-nourished with aesthetic sensitivity.

1749
मूळ

चंद्राते आंगवणे । भोगूनि चकोर शाहाणे । परी फावे जैसे चांदिणे । भलतयाही ॥1749॥

मराठी अर्थ

आपल्या आगच्या सामर्थ्याने चकोरांना चंद्रकिरणांच्या ठिकाणच अमृताचा भोग घडो; पण जगांतील कोणालाही चांदण्याचा भोग घडतोच.

English meaning

The birds Chakora are directly enjoying the moon-light and getting satisfaction according to their own capacity, but is not the benefit of moon-light available also for others?

1750
मूळ

तैसे अध्यात्मशास्त्री यिये । अंतरंगचि अधिकारिये । परी लोकु वाक्चातुर्ये । होईल सुखिया ॥1750॥

मराठी अर्थ

त्याप्रमाणे ह्या अध्यात्मशास्त्रांत अंतमखवृत्तीचे पुरुषच अधिकारी आहेत हे खरे असले तरी, ईतर लोक केवल माझ्या ग्रंथरचनेच्या चातुर्यानेही (मोहकपणाने) आनंदित होतील.

English meaning

Similarly, in this spiritual science only wise persons can enjoy the deep secret of its profound meaning, but others are also happy by the supremely attractive style of words, cleverly used.

1751
मूळ

ऐसे श्रीनिवृत्तिनाथाचे । गौरव आहे जी साचे । ग्रंथु नोहे हे कृपेचे । वैभव तिये ॥1751॥

मराठी अर्थ

असा श्रीगुरुनिवृत्तिनाथांचा महिमा आहे; हा माझा ग्रंथ नसून हे त्यांच्या कृपेचेच केवळ ऐश्वर्य होय.

English meaning

All this is really the greatness of my Guru Shri Nivrittinatha. Therefore, this is not only a book, but the glory of his grace.

1752
मूळ

क्षीरसिंधु परिसरी । शक्तीच्या कर्णकुहरी । नेणो कै श्रीत्रिपुरारी । सांगितले जे ॥1752॥

मराठी अर्थ

क्षीरसिंधूच्या सन्निध, देवी पार्वतीच्या कानांत त्रिपुरारि श्रीशंकरांनी जे ज्ञान केव्हा सांगितले ते नकळे.

English meaning

In the ancient times, near the shore of the ocean of milk, the lord Shankara revealed privately to his dear wife the Shakti, the most secret knowledge.

1753
मूळ

ते क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरी गुप्तु । होता तयाचा हातु । पैठे जाले ॥1753॥

मराठी अर्थ

पण, ते ज्ञान, क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात गुप्त असलेले (भगवान् विष्णु) (श्रीमत्स्येंद्रनाथ) यांना प्राप्त झाले.

English meaning

That knowledge was heard by Matsyendra Nath, who was in the womb of a crocodile in that ocean.

1754
मूळ

तो मत्स्येंद्र सप्तशृंगी । भग्नावयवा चौरंगी । भेटला की तो सर्वांगी । संपूर्ण जाला ॥1754॥

मराठी अर्थ

ते मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगीपर्वतावर संचार करीत गेले असता त्यांच्या दर्शनाने तेथे असलेला अवयव तुटलेल चौरंगीनाथ हा एकदम सर्वावयवपूर्ण झाला.

English meaning

Matsyendra Natha met on the slopes of the hill of Saptashring, Yogi Chourangi Natha, who was without hands and feet. By the kind vision of Matsyendra Natha, his limbs were restored and he became strong as ever.

1755
मूळ

मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनी ॥1755॥

मराठी अर्थ

मग स्वतःप्रमाणे अव्युत्थित (अखंड) समाधि भोगता यावी म्हणून ती ज्ञानमुद्रा मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांस दिली.

English meaning

Then thinking that it was time to take Samadhi, Matsyendra Natha gave the key of the secret knowledge to Goraksha Nath.

1756
मूळ

तेणे योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदी का सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥1756॥

मराठी अर्थ

त्या मुद्रादानाने, मत्स्येंद्रनाथांनी, योगरूपी कमलिनींचे सरोवर व विषयविध्वंस करणारा महाशूर, अशा जणु सर्वेश्वरालाच त्या योगमुद्राऐश्वर्यपदावर स्थापून अभिषेक केला.

English meaning

Matsyendra Natha bestowed upon Goraksha Natha all the spiritual authority, and gave him the spiritual seat of his Sampradaya. Goraksha Natha is the pure lake of lotus flower of Yoga, and the slayer of all sense-objects.

1757
मूळ

मग तिही ते शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिले सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥1757॥

मराठी अर्थ

मग त्या गोरक्षनाथांनी श्रीशंकरापासून परंपरेने प्राप्त झालेल्या अद्वयानंदैश्वर्याचा सामर्थ्यासहवर्तमान श्रीगहिनीनाथांवर कृपा प्रसाद केला.

English meaning

Then this knowledge which Goraksha Natha had received by succession, right from the Lord Shankara was taught by him completely to Gahini Natha, the very reservoir of the joy of non- duality.

1758
मूळ

तेणे कळिकळितु भूता । आला देखोनि निरुता । ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥1758॥

मराठी अर्थ

ते गहिनीनाथ कलिकाल पीडित जीवांकडे पाहून, श्रीनिवृत्तिनाथांपाशी येऊन त्यांना अशी आज्ञा करिते झाले,

English meaning

He in turn, seeing that the evil forces of Kaliyuga (the Dark Age) are advancing, gulping down all the beings very fast, gave orders to Nivritti Natha that

1759
मूळ

ना आदिगुरु शंकरा- । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला जो आमुते ॥1759॥

मराठी अर्थ

की आदिगुरु श्रीशंकरांपासून अशाप्रकारच्या गुरुशिष्यपरंपरेने बोधाचा जो उपदेश आमच्यापर्यंत आला आहे.

English meaning

"The treasure of knowledge and the way of imparting it received right from the Adishankara through the succession of the teacher and the disciple,

1760
मूळ

तो हा तू घेऊनि आघवा । कळी गिळितया जीवा । सर्व प्रकारी धावा । करी पा वेगी ॥1760॥

मराठी अर्थ

त्या सर्वाचे ग्रहण करून कलिपीडित जे जीव असतील त्यांच्या उद्धारार्थं सत्वर धावून जा.

English meaning

Should be accepted by you, and you should hasten to save the Beings, who are being swallowed by the evil forces of Kali."

1761
मूळ

आधीच तव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू । जाला जैसा वर्षाकाळू । खवळणे मेघा ॥1761॥

मराठी अर्थ

श्रीनिवृत्तिनाथ स्वभावानेच कृपाळू होते, त्यात अशी गुर्वाज्ञा झाल्यावर, तो कृपाळू स्वभाव वर्षाकाळच्या मेघांप्रमाणे जागृत होऊन जीवांवर कृपावर्षाव करू लागला.

English meaning

Nivritti Natha is naturally very kind and over and above this, he received the orders of his Guru. Therefore, he rose to the occasion with that force which the clouds of the rainy season have, in order to save people, and give them peace.

1762
मूळ

मग आर्ताचेनि वोरसे । गीतार्थग्रंथनमिसे । वर्षला शांतरसे । तो हा ग्रंथु ॥1762॥

मराठी अर्थ

मग आर्तजनांचा कळवळा येऊन, श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने, गीतार्थग्रंथाच्या मिषाने जीवांवर जो कल्याणार्थ शांत रसाचा वर्षाव केला, तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ होय.

English meaning

This Geeta is the result of the downpour of the peace, which he achieved through the teaching of the meaning of Geeta, which was the result of his compassion for people suffering from sorrow.

1763
मूळ

तेथ पुढा मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया । की यासाठी येवढिया । आणिलो यशा ॥1763॥

मराठी अर्थ

श्रीगुरूच्या कृपा मेघापुढे मी आपल्या चातकासारखा अनन्य होतोच, व त्या माझ्या अनन्यतेमुळेच गुरुप्रसादाने मला एवढे ग्रंथ यश प्राप्त झाले.

English meaning

At that time, I eagerly stood before him with the eagerness of bird Chataka and thus I have become successful in this adventure.

1764
मूळ

एवं गुरुक्रमे लाधले । समाधिधन जे आपुले । ते ग्रंथे बोधौनि दिधले । गोसावी मज ॥1764॥

मराठी अर्थ

असे गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले जे समाधिधन (नीजधन) ते श्रीगुरूनी ग्रंथरूप रचना करून माझ्या स्वाधीन केले.

English meaning

My great Guru has, in this way, given to me by this book, the treasure of spiritual trance in the state of Atman, which he has received through the succession of Sampradaya.

1765
मूळ

वाचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणे स्वामीची । ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता के असे ? ॥1765॥

मराठी अर्थ

एऱ्हवी, न पढलेला, न बहुश्रुत, किंवा स्वामीसेवेचेही ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्याला ह्या ग्रंथरचनेची योग्यता कोठून असणार ?

English meaning

If such is not the case, how could I become worthy of writing this book, when I do not read much nor recite anything properly, nor know how to serve my teacher in the right manner?

1766
मूळ

परी साचचि गुरुनाथे । निमित्त करूनि माते । प्रबंधव्याजे जगाते । रक्षिले जाणा ॥1766॥

मराठी अर्थ

परंतु, माझ्या श्रीगुरूनी मला निमित्त करून गीताप्रबंधाच्या योगाने सर्व जगाचे रक्षण केले हेच खरे

English meaning

Really, you should please note that my Guru has used me as an instrument and thus saved the world by creating this book.

1767
मूळ

तऱ्ही पुरोहितगुणे । मी बोलिलो पुरे उणे । ते तुम्ही माउलीपणे । उपसाहिजो जी ॥1767॥

मराठी अर्थ

तरी पुरोहिताच्या नात्याने मी जे काही न्यूनाधिक बोललो असेन, ते आपण मातेसमान संतसज्जनांनी मानून घ्यावे अशी प्रार्थना आहे.

English meaning

So I request that since I have been seated by my Guru before you to speak you may please forgive me for any words used improperly or omitted, just like a mother forgives her son.

1768
मूळ

शब्द कैसा घडिजे । प्रमेयी कैसे पा चढिजे । अळंकारु म्हणिजे । काय ते नेणे ॥1768॥

मराठी अर्थ

शब्दरचना कशी करावी, प्रमेय कसे व्यक्त वा सिद्ध करावे, किंवा भाषालंकार कशाला म्हणतात हे मला स्वतःला काही ज्ञान नाही !

English meaning

I have no knowledge how to use words, how to argue logically taking the subject to its heights and what are the figures of speech, etc..

1769
मूळ

सायिखडेयाचे बाहुले । चालवित्या सूत्राचेनि चाले । तैसा माते दावीत बोले । स्वामी तो माझा ॥1769॥

मराठी अर्थ

परंतु, कळसूत्री बाहुले जसे सूत्रधार हलवील तसे हलते, त्याप्रमाणे माझ्या स्वामींनी मला जशी स्फूर्ती दिली तसे मी बोललों.

English meaning

Just as the puppets dance as the holder of the strings wishes, so putting me in front of you, it is my Guru only, who is speaking.

1770
मूळ

यालागी मी गुणदोष- । विषी क्षमाविना विशेष । जे मी संजात ग्रंथलो देख । आचार्ये की ॥1770॥

मराठी अर्थ

यास्तव, ग्रंथाच्या गुणदोषाविषयी मी फारसे माफी, क्षमा मागणे करीत नाही; कारण मी ” आचार्यं संजात ” म्हणजे श्रीगुरुनी प्रकट केलेल्या अर्थाचे नुसते ग्रथन (गुंफणें) केले आहे.

English meaning

Therefore, I do not emphatically request you to forgive the errors if there are any in this book, because my Guru has given me the job of only becoming a mouth-piece.

1771
मूळ

आणि तुम्हा संताचिये सभे । जे उणीवेसी ठाके उभे । ते पूर्ण नोहे तरी तै लोभे । तुम्हासीचि कोपे ॥1771॥

मराठी अर्थ

शिवाय, आपणासारख्या संतसभेमध्ये जर आश्रय करणारा जो मी, त्याच्या ठिकाणी काही उणेपणा राहिला तर मी लडिवाळपणे तुमच्यावर व रुसेन.

English meaning

And if a man having no good qualities comes and stands before you who are saints, does not become well-qualified, the blame goes to the lack of influence of the saints and in a playful way, a person like me will be annoyed with you only.

1772
मूळ

सिवतलियाही परीसे । लोहत्वाचिये अवदसे । न मुकिजे आयसे । तै कवणा बोलु । ॥1772॥

मराठी अर्थ

परिसाचा स्पर्श झाल्यावरही जर लोखंडाचा लोहत्वाचा विटाळ फिटला नाही तर तो दोष कोणाचा ? (अर्थात् परिसाचाच)

English meaning

If the low-grade iron does not get rid of its bad quality even by the touch of the magic-stone 'Parees,' then whose fault is it?

1773
मूळ

वोहळे हेचि करावे । जे गंगेचे आंग ठाकावे । मगही गंगा जरी नोहावे । तै तो काय करी ? ॥1773॥

मराठी अर्थ

ओहोळावर इतकीच जबाबदारी आहे की त्याने वाटेल त्या मार्गाने गंगा गांठावी; इतके करूनही तो गंगात्व न पावेल तर त्याचा तो दोष नव्हेच.

English meaning

The ordinary stream has only one thing to do. It has to flow and merge into Ganges. Then if it also does not become the Ganges, what is its fault there?

1774
मूळ

म्हणौनि भाग्ययोगे बहुवे । तुम्हा संतांचे मी पाये । पातलो आता के लाहे । उणे जगी । ॥1774॥

मराठी अर्थ

म्हणून, परम पुण्याईने, तुम्हा संतांच्या चरणांपाशी मी प्राप्त झालो आहे. आता मला या जगात काय कमी असणार ?

English meaning

Thus, by my great good fortune, I have come to the feet of saints like you. Then what else is there for me to achieve?

1775
मूळ

अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्ही । दिधलेति तेणे सर्वकामी । परीपूर्ण जालो ॥1775॥

मराठी अर्थ

अहो, माझ्या गुरुमाउलीने मला आपणा संत चरणांची जोड करून दिली आहे, त्यायोगे माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत.

English meaning

O the revered Guru Maharaj! By your great grace, you have afforded me this benefit of the company of saints! Now all my aspirations are fulfilled.

1776
मूळ

पाहा पा माते तुम्हा सांगडे । माहेर तेणे सुरवाडे । ग्रंथाचे आळियाडे । सिद्धी गेले ॥1776॥

मराठी अर्थ

पहा की, आपल्यासारखे माहेर मला प्राप्त झाल्यामुळे माझा ग्रंथविषयक बुद्धींतील आग्रह सुखाते सिद्धीस गेला.

English meaning

O, my respected saints, because such a maternal home like your nearness is luckily available to me, this child-like naughtiness of writing commentary on Geeta has become successful.

1777
मूळ

जी कनकाचे निखळ । वोतू येईल भूमंडळ । चिंतारत्नी कुळाचळ । निर्मू येती ॥1777॥

मराठी अर्थ

अहो, सर्व पृथ्वीगोल सुवर्णाचा करिता येईल, चिंतामणीचे पर्वत निर्माण करिता येतील,

English meaning

Sirs, perhaps the whole earth can be moulded into gold; or mountains like Meru made of the gems Chintamani can be built.

1778
मूळ

सातांही हो सागरांते । सोपे भरिता अमृते । दुवाड नोहे तारांते । चंद्र करिता ॥1778॥

मराठी अर्थ

सप्तही सागर अमृताने सहज भरिता येतील किंवा जितक्या चांदण्या आहेत त्यांचे चंद्र बनविणेही कठीण नाही.

English meaning

It may be easy to fill all the seven seas by nectar and it may not be much difficult to create Moons from ordinary petty stars.

1779
मूळ

कल्पतरूचे आराम । लाविता नाही विषम । परी गीतार्थाचे वर्म । निवडू न ये ॥1779॥

मराठी अर्थ

कल्पतरूंच्या बागा लावणे कठीण नाही; (हे सर्वं संभवेल) पण, गीतार्थाचे रहस्य समजणार नाही.

English meaning

It is not perhaps very difficult to cultivate large gardens of divine Wish Trees, but it is not easy to make clear the secret of Geeta.

1780
मूळ

तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा । करी डोळेवरी लोका । घेवो ये ऐसे जे ॥1780॥

मराठी अर्थ

मनुष्याने सर्व लोकांना उघडया डोळ्यांनी ग्रहण करिता येईल असा मराठी भाषेत लिहावा.

English meaning

I, being just like a mute person, has been able to express the meaning of Geeta in such a way that all can see it by their eyes.

1781
मूळ

हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो का ॥1781॥

मराठी अर्थ

हा एवढा मोठा ग्रंथसागर उतरून जाऊन पलीकडे जो कीर्तीविजयध्वज फडकत आहे

English meaning

By crossing the whole sea of this great book of Geeta, I am holding the flag of fame in my hand, and dancing with ecstacy like a dancer who dances in front of the procession of a marriage ceremony.

1782
मूळ

गीतार्थाचा आवारु । कलशेसी महामेरु । रचूनि माजी श्रीगुरु- । लिंग जे पूजी ॥1782॥

मराठी अर्थ

अशाप्रकारे गीतेच्या अर्थरूप मंदिराची रचना करून अखेरचा कळस किंवा शिखर म्हणून अठराव्या अध्यायाची योजना करून त्यात श्रीगुरूरूपी शिवलिंग स्थापून त्याची मी पूजा करितो.

English meaning

I have built this temple of the meaning of Geeta, which appears like the mountain Meru because of this dome of the last chapter, and I have established the image of my Guru in its shrine room, and I am offering my worship to him.

1783
मूळ

गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हे हिंडे जे वाय । ते मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥1783॥

मराठी अर्थ

गीता ही निष्कपट प्रेम करणारी माउली होय; तिची चुकामुक होऊन जो मी तान्ह्या मुलाप्रमाणे व्यर्थं भटकत होतो त्या मायलेकांची गाठ घालून दिलीत ही आपली कृपा होय.

English meaning

A little child was lost and estranged from its kind-hearted and pious mother who is Geeta, and was roaming about aimlessly, being stranded. It is by your great grace only, that this child has again met its mother.

1784
मूळ

तुम्हा सज्जनांचे केले । आकळुनी जी मी बोले । ज्ञानदेव म्हणे थेंकुले । तैसे नोहे ॥1784॥

मराठी अर्थ

तुम्हा सज्जनांच्या कृपेने जसे गीतार्थाचे आकलन झाले, तसे मी बोललो असलो तरी ती काही सामान्य कृति नव्हे.

English meaning

Sirs, I have spoken by understanding the minds of all of you. This is not a mere babble of the child Dnyanadev.

1785
मूळ

काय बहु बोलो सकळा । मेळविलो जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥1785॥

मराठी अर्थ

उपकार किती म्हणून सांगावे ? आपल्या कृपेने ग्रंथ सिद्धीस जाऊन जो हा सोहळा मी पहात आहें, त्याने माझ्या जन्माचे साफल्य झाले आहे.

English meaning

What more can I say? By your blessing only I have been able to witness the grand ceremony of completion of this book, and my life's purpose is fulfilled.

1786
मूळ

मिया जैसजैसिया आशा । केला तुमचा भरवसा । ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलो सुखा ॥1786॥

मराठी अर्थ

तुम्हा सज्जनांवर पूर्ण भरवसा ठेवून ज्या ज्या कृपेची मी आशा धरून राहिलो ती सर्व आपण सफल करून मला सुखी केले आहे

English meaning

Every hope that I cherished in my heart, has been fulfilled by you, and therefore I am very happy.

1787
मूळ

मजलागी ग्रंथाची स्वामी । दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही । ते पाहोनि हांसो आम्ही । विश्वामित्रातेही ॥1787॥

मराठी अर्थ

महाराज, मजलागी म्हणजे माझ्याकडून ही ग्रंथरूपी दुसरी सृष्टि जी तुम्ही निर्माण केली, ती पाहून आम्हाला विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीचेही कौतुक वाटत नाही.

English meaning

Sirs, we are laughing at the Sage Vishwamitra today because you have created such a great book through me though I am very weak.

1788
मूळ

जे असोनि त्रिशंकुदोषे । धातयाही आणावे वोसे । ते नासते कीजे की ऐसे । निर्मावे नाही ॥1788॥

मराठी अर्थ

ती नश्वर सृष्टि त्रिशंकू राजाच्या उद्देशाने व ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याच्या हेतूने त्यांनी निर्माण केली; पण आपली कृति निर्हेतुक व शाश्वत आहे

English meaning

What laudable achievement is there in creating a world, which is eventually to be destroyed; only to tease God the creator, with a purpose of giving some honorable place to the king Trishanku? (which feat was achieved by the sage Vishwamitra.)

1789
मूळ

शंभू उपमन्युचेनि मोहे । क्षीरसागरूही केला आहे । येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ की ॥1789॥

मराठी अर्थ

शंकरांनी भक्त उपमन्यूसाठी क्षीरसागर उत्पन्न केला, पण तीही उपमा आपल्या कृपेला अपुरी पडते, कारण, त्या सागराच्या पोटात विष आहे.

English meaning

The Lord Shankara was pleased with Upamanyu, and gave him the ocean of milk, but that is also not comparable to your grace, because that ocean of milk contained the most dangerous poison Halahala.

1790
मूळ

अंधकारु निशाचरा । गिळिता सूर्ये चराचरा । धावा केला तरी खरा । ताउनी की तो ॥1790॥

मराठी अर्थ

अंधकाररूपी राक्षस चराचराला त्रास देत असता त्या चरचराचा धावा, सूर्याने ताऊन पुरविला (अंधकार नाशिला); पण त्यात उष्णतेच ताप झाला.

English meaning

It is true that when the whole world was covered by the demons of darkness, the Sun came to free and protect the world and destroy the darkness, but while doing so, he also harassed people with his extreme heat.

1791
मूळ

तातलियाही जगाकारणे । चंद्रे वेचिले चांदणे । तया सदोषा केवी म्हणे । सारिखे हे ॥1791॥

मराठी अर्थ

चंद्राने आपल्या चांदण्याला खर्ची घालून जगाचा ताप शान्त केला हे खरे, पण त्या कलंकयुक्त चंद्राची उपमा ह्या ग्रंथाला कशी द्यावी ?

English meaning

No doubt, the Moon has poured down her cool rays, and satisfied the world, but how can that Moon with dark patches on her face, stand in comparison with this great book?

1792
मूळ

म्हणौनि तुम्ही मज संती । ग्रंथरूप जो हा त्रिजगती । उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥1792॥

मराठी अर्थ

म्हणून, तुम्ही संतांनी मजकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा असा जो ग्रंथ निर्मिला तो निरुपम होय.

English meaning

Therefore, I again say that the creation of this book which the saints like you have done through me has no equal anywhere.

1793
मूळ

किंबहुना तुमचे केले । धर्मकीर्तन हे सिद्धी नेले । येथ माझे जी उरले । पाईकपण ॥1793॥

मराठी अर्थ

किंबहुना, माझे हे गीताधर्म कीर्तन सिद्धीस गेले हे केवळ आपल्या कृपेचे फल होय; मी आता करण्यासारखे एकच काम मजकडे उरले आहे; ते म्हणजे आपली सेवा हे होय.

English meaning

Finally, it is all your own achievement that this religious sermon in the shape of this book has become accomplished without hindrance, where my role is only of a courier servant. Universal Prayers by the Saint Dhyaneshwara

1794
मूळ

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥1794॥

मराठी अर्थ

आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर याने ह्या माझ्या वाग्यज्ञरूप सेवेने प्रसन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा.

English meaning

Now, may the Universal God be pleased by this sacrifice, where the oblations are of the speech, and by being so pleased, may He give me the following boon of His grace.

1795
मूळ

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥1795॥

मराठी अर्थ

खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी व सर्व भूतांच्या ठिकाणी परस्पराबद्दल मित्रभाव नांदावा.

English meaning

I request that the evil of the villains may be gone. Their interest in good deeds may increase, and all the beings should have soulful friendship with each other.

1796
मूळ

दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥1796॥

मराठी अर्थ

पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सूर्याच उदय असो व प्राणिमात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत.

English meaning

The darkness of sins may be dissipated. Let there be the dawn of performance of our own duty, in the universe, and then every being may receive what he really desires.

1797
मूळ

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥1797॥

मराठी अर्थ

ईश्वरनिष्टांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भेटो.

English meaning

Let the hosts of Saints, who are having real faith in God, and who constantly pour down all the auspicious things on the world, continuously meet all these beings.

1798
मूळ

चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥1798॥

मराठी अर्थ

ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरूचे बाग चेतन चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलते समुद्रच होत.

English meaning

The Saints who are the groups of moving divine 'Wish-trees', the Towns of living gems of Chintamani, and the speaking Oceans of nectar,

1799
मूळ

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥1799॥

मराठी अर्थ

निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो.

English meaning

Who are Moons without stigma, Suns without heat, may be related to all at all times.

1800
मूळ

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिही लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥1800॥

मराठी अर्थ

किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्वपालक जो आदिपुरुष त्याचे अखंड भजन करावे.

English meaning

Finally, let all the beings from the three worlds be completely happy in all respects and worship continuously the Primordial God, the divine Purusha.

1801
मूळ

आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ॥1801॥

मराठी अर्थ

आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य मानिले आहे (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजयसुखाचा लाभ घडत जावा.

English meaning

And especially in this world, those who live by the tenets of this book may be victorious over the visible as well as the invisible worlds.''

1802
मूळ

तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥1802॥

मराठी अर्थ

तेव्हा सद्गुरू निवृत्तिनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ” तथास्तु ‘; तुझी ही इच्छा सफल होईल असा तुला प्रसाद आहे; त्यायोगे ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले.

English meaning

Upon this prayer, the great King, the Lord of the Universe said, "So be it. Let this be the endowment of my grace!" By this boon, Dnyanadev became very happy.

1803
मूळ

ऐसे युगी परी कळी । आणि महाराष्ट्रमंडळी । श्रीगोदावरीच्या कूली । दक्षिणलिंगी ॥1803॥

मराठी अर्थ

याप्रमाणे कलियुगांत, महाराष्ट्र देशांत, गोदावरीच्या दक्षिण तीरावर,

English meaning

Thus in the age of Kali in Maharashtra region, on the southern bank of the river Godavari, there is a group of towns among which there is a very sacred and ancient place by name Newase, in which is seated God Mohiniraj who is the thread of the life force of the universe.

1804
मूळ

त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥1804॥

मराठी अर्थ

त्रिभुवनात पवित्र असलेले अनादि पंचक्रश क्षेत्र (नेवासे) येथे सर्व जगाचे जीवनसूत्र श्रीमहालय (मोहनीराज) आहे.

English meaning

Thus in the age of Kali in Maharashtra region, on the southern bank of the river Godavari, there is a group of towns among which there is a very sacred and ancient place by name Newase, in which is seated God Mohiniraj who is the thread of the life force of the universe.

1805
मूळ

तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥1805॥

मराठी अर्थ

त्या क्षेत्रांत यदुवंशाला भूषणभूत व सकलकलांचे स्थान असा न्यायनिष्ठ रामराजा होता.

English meaning

There, Shri Ramchandra, the king, who belongs to the family lineage of the Yadus and who is the supporter of all arts, is ruling with justice.

1806
मूळ

तेथ महेशान्वयसंभूते । श्रीनिवृत्तिनाथसुते । केले ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणे ॥1806॥

मराठी अर्थ

तेथे श्रीशंकरांपासून ज्यांची परपरा चालत आलेली आहे असे श्रीनिवृत्तिनाथ महाराज ह्यांचा शिष्य ज्ञानेश्वर ह्याने गीतेला देशी भाषेचा अलंकार चढविला. (रूप दिले)

English meaning

There, Dnyanadeo the son (disciple) of Shri Nivrittinatha belonging to the Sampradaya of Shri Mahesh (Lord Shankara) has given the ornament of indigenous language Marathi for Geeta.

1807
मूळ

एवं भारताच्या गावी । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी । श्रीकृष्णार्जुनी बरवी । गोठी जे केली ॥1807॥

मराठी अर्थ

ह्याप्रमाणे, भारतांतील प्रसिद्ध भीष्मपर्वात श्रीकृष्णार्जुनांचा जो गोड संवाद झाला.

English meaning

Thus in the town of Mahabharata, in the section dedicated to Bheeshma, which is well- known, there was a good dialogue between the Lord Shrikrishna and Arjuna.

1808
मूळ

जे उपनिषदांचे सार । सर्व शास्त्रांचे माहेर । परमहंसी सरोवर । सेविजे जे ॥1808॥

मराठी अर्थ

जो उपनिषदांचे सार व शास्त्रांचे आद्यस्थान (माहेरघर) व परमहंसांचे क्रीडासरोवरच होय,

English meaning

That is the essence of Upanishads, the maternal home of all scriptures, and a sacred lake in which the sages of the order of Adepts, called Paramhansa, happily enjoy their residence.

1809
मूळ

तिये गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु । म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥1809॥

मराठी अर्थ

निवृत्तिनाथशिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात, त्या गीतेचा. अठरावा अध्याय हा कलश म्हणजे शेवटचा अध्याय होय.

English meaning

Dnyandev, the disciple and the servant of NivrittiNath, says that here the Eighteenth chapter of that Geeta comes to an end.

1810
मूळ

पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखी सर्वभूती । संपूर्ण होईजे ॥1810॥

मराठी अर्थ

ह्या ग्रंथाच्या पुण्यरूपसंपत्तीने सर्व जीवमात्रांना उत्तरोत्तर संपूर्ण सुखप्राप्ति होवो.

English meaning

He prays that further on, by the riches of the merits of this book, all the beings may be totally happy and may fulfill their life.