दोघां ऐसीं तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती । अधोर्ध सांडून वर्तती । इंद्रफणी ऐसी ॥ १ ॥
शक्तिमय प्रकृति व जाणीवमय पुरुष या उभयतांच्या मार्गदर्शनाखालीं सत्व, रज व तम हें तीन गुण चालतात. तीन गुण व पंचभूतें मिळून अष्टधा प्रकृति बनतें. दृश्य विश्व व अव्यक्त परब्रह्म एकमेकांच्या उलट असतात. दृश्य जड विश्व जदत्वामुळें कांहीं करुं शकत नाहीं. परब्रह्म निश्चळ म्हणून तें कांहीं करत नाही. म्हणून या दोघांमधें वावरणारी अष्टधा प्रकृति विश्र्वरचनेचा सगळा खेळ खेळते.
That One has become two (purush/prakruti) and then It functions as three (ie. gunas). Within that unmanifest nirgun (purush) there is this eight-fold prakruti (pure sattwa guna). By looking downwards/outwards this prakruti is let slip and then that One becomes manifest, just like a rainbow in the sky.