शिकवण — समास 2: विवरणनिरुपण

Fully populated

Vivaran Nirupan (A Discourse on Explanation)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद । नाना प्रकारीचे संवाद । समजोन घ्यावे ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागील समासांत ग्रंथ कसा लिहून काढायचा तें सांगितलें. आतां या समासांत ग्रंथाचा अर्थ कसा समजून घ्यावा तें सांगतो. समाजनेत्यानें अनेक प्रकारचे संवाद समजून घ्यावें.

English meaning

Previously this `speech' had been the `many' different writings of the people. Now, listen carefully and afterwards penetrate the meaning within this `speech'. Then the ways of the `many' can be understood and this wordless dialogue between the Master and disciple can be accepted.

2
मूळ

शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंदभेद । नाना शब्दाचे शब्दभेद । जाणोनी पाहावे ॥ २ ॥

मराठी अर्थ

शब्दांचे वेगवेगळे प्रकार, अर्थाचे निरनिराळे प्रकार, मुद्रांचें वेगवेगळे प्रकार, काव्याचे निरनिराळे प्रकार, निरनिराळ्या शब्दांचे निरनिराळे अर्थ त्यानें समजून घ्यावें.

English meaning

In this world there are the `many' different words and their `many' different mea- nings; there are the `many' different kinds of prints and different compositions. But by forgetting all these and effortlessly knowing, one can penetrate this *`word' within the `many' words and understand its innermost meaning. (From this original `word', many words have come. Now drop the many words and experience this `word'. Then only can its meaning be understood; maharaj- the words are empty; the meaning is paramatma) *(Penetrate within this present `moment' and find life)

3
मूळ

नाना आशंका प्रत्योत्तरें । नाना प्रचित साक्षात्कारें । जेणेंकरितां जगदांतरें । चमत्कारती ॥ ३ ॥

मराठी अर्थ

नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची उत्तरें, अनेक प्रकारच्या अनुभवाच्या गोष्टी व अनेक प्रकारच्या साक्षात्काराच्या घटना त्यानें समजून घ्याव्या, त्यास त्या माहित असाव्या. त्या गोष्टी व घटना ऐकून लोकांना आश्र्चर्य वाटते.

English meaning

The `many' doubts will be removed by this reply, `I am'. And these `many' doubts and this `I am' are due to that nirgun Self. Then on account of this `I am', this world will be filled with awe and wonder.

4
मूळ

नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्ययो पाहावा नेमस्त । अनुमानाचें खस्तवेस्त । बोलोंचि नये ॥ ४ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारचे पूर्वपक्ष व सिद्धान्त यांचा स्वतः खात्रीपूर्वक अनुभव घेतलेला असावा. असें असलें म्हणजे लोकांना ठासून सांगता येते. नाहींतर निश्र्चयपूर्वक सांगता येत नाही. समाजनेत्यानें केवळ अनुमानानें उगीच कांहींतरी अस्ताव्यस्त बोलूं नये.

English meaning

Within this world there are the `many' thoughts, this understanding `I am' and that eternal Truth (I do not exist). The limited jiva should understand that nirgun Self and therefore, this `speech' should not be full of wild conjecture.

5
मूळ

प्रवृत्ति अथवा निवृत्ती । प्रचितीविण अवघी भ्रांती । गळंग्यामधील जगज्जोति । चेतेल कोठें ॥ ५ ॥

मराठी अर्थ

प्रवृत्ति असो वा निवृत्ति असो, प्रपंच असो वा परमार्थ असो, दोन्हीकडे जर अनुभव नसेल तर सगळा भ्रमाचा घोटाळा असतो. ज्याप्रमाणें चघळचोथ्यामध्यें अग्नि पेट घेत नाहीं, त्याचप्रमाणें केवळ अनुमानाच्या वक्तृत्वानें आणि ज्ञानानें लोकांच्या अंतःकरणांतील जगत्ज्योत पेटणार नाहीं. लोकांच्या अंतरांतील अंतरात्मा जागा होणार नाहीं.

English meaning

In this world, there can be this worldly activity ("I am a body") or there can be the cessation of all this worldly activity/nivritti (no-knowledge or pure knowledge). But without understanding this `I am', the incoherent whirl of these `many' thoughts will remain and tell me, how then can this `light of the world' (`I am'/existence) be kindled within a bundle of confusion?

6
मूळ

हेत समजोन उत्तर देणें । दुसर्‍याचे जीवीचे समजणें । मुख्य च्यातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

प्रश्र्ण विचारणार्‍याचा हेतु ओळखून उत्तर द्यावें. दुसर्‍याचे अंतर्गत समजून घ्यावें. चतुरपणाची लक्षणें ही अशी आहेत.

English meaning

The understanding of this original intent (ie. `I just want to be') is the giving of the proper *`reply'.2 It is the understanding of this `all' body within the jiva. And that Supreme is understood due to this attention of the wise. *(maharaj reply to the mind so nicely, that the mind goes off.)

7
मूळ

च्यातुर्येविण खटपट । ते विद्याचि फलकट । सभेमधें आटघाट । समाधान कैचें ॥ ७ ॥

मराठी अर्थ

ज्याच्या अंगी असा चतुरपणा नाहीम त्याची खटपट व्यर्थ आहे. त्याची विद्या फोलकट असते. सभेमध्यें विनाकारण वाटाघाट केल्यानें समाधान होणार नाहीं.

English meaning

Without such wisdom there is only trouble and squabbling and then that Reality becomes the empty and vain learnings of this world. If within this meeting place of the `all', there is only the exchange of arguments then truly, how will there ever be complete contentment?

8
मूळ

बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें । अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याचे पुष्कळ बोलणें ऐकून घ्यावें. पण आपण मात्र मौन धरावें. लहानशा खुणेवरुन लोकांच्या मनांत काय आहे तें ओळखावें.

English meaning

First this `speech' of the `all' should be listened to and then, `there' in brahman, silence/mouna should be maintained. Therefore this delicate `speech' within the gross world should be understood.

9
मूळ

बाष्कळामध्यें बैसों नये । उद्धटासीं तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

वात्रट लोकांत बसूं नये. उद्धट माणसाच्या तोंडी लागूं नये. आपल्या वागण्यानेम लोकांचे समाधान कधीं मोडूं नये.

English meaning

With the wild and frivolous mind one should not sit. With the rough and rude mind, one should not quarrel. And that complete contentment within the `people' should not be broken on account of you.

10
मूळ

नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगों नये । नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥

मराठी अर्थ

आपले अजाणतेपण सोडूं नये. जाणतेपणानें कधीहीं ताठा धरुं नये. गोड व मृदु शब्दांनीं अनेक लोकांच्या अंतःकरणांतील भाव उकलावा.

English meaning

`I know nothing', this thought should never be left, for you should not get puffed up with this knowing. In this way, by this soft `word', the heart of the man in the `many' thoughts will be opened and disentangled.

11
मूळ

प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु घेऊं नका । खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥

मराठी अर्थ

प्रसंग कसाआहे, तें बरोबर ओळखावें. फार माणसांबरोबर उगीच हुज्जत घालूं नये. अशा हुज्जतीमुळें आपले म्हणने खरें असूनही लोकांना पटत नाही. आणि त्यामुळें समुहामध्यें बेदिली होते.

English meaning

This proper connection should be known and then there should be no quarrelling with this `all' (ie. keep your mind away and simply know). Otherwise the Truth will get spoiled and It will all end up like a circus.

12
मूळ

शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये । बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥

मराठी अर्थ

कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्याचा कंटाळा करुं नये. भ्रष्ट लोकांत बसूं नये. बसावेच लागले तर त्यांच्यावर खोटे आरोप करुं नयेत.

English meaning

Accept this search wholeheartedly and do not become lazy. Therefore do not sit in the company of the degraded and confused (ie. stay out of your mind). However if one sits there, then one should not find fault with it (ie. remain disinterested and detached).

13
मूळ

अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडें चि वाचावें । चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जें दुःखी लोक असतील त्यांच्या अंतरांत शिरुन त्यांचे दुःख हलके करावें. वेळप्रसंगी थोडेंच वाचावें. पण भलत्या माणसांना आपली चटक लावूं नये.

English meaning

This inner space should search out the cause of its sufferings and the Knower should be its witness. The wise should leave the longings and likings to mankind.

14
मूळ

मज्यालसींत बैसों नये । समाराधनेसी जाऊं नये । जातां लेळीलवाणें होये । जिणें आपुलें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

सभेमध्यें बसूं नये. यात्रा किंवा अनुष्ठान यांच्या उद्यापनास जावूं नये. अशा प्रसंगाना आपण जात राहिलो तर आपल्या अंगी मिंधेपणा उत्पन्न होतो.

English meaning

One should not stay idle within one's power (exert this `God-given' power to know; see 18.6, the gifts acquired through witnessing); one should not go after entertainment and gratification and then your living will be with dignity.

15
मूळ

उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासी बोलतां फावे । भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥

मराठी अर्थ

प्रथम आपल्या अंगचे उत्तम गुण प्रगट करावें. आणि मगआपण कोणाशीही बोललो तरी त्याची किंमत होते. सज्जन माणसें पाहून त्यांच्याशी स्नेह जोडावा.

English meaning

That pure sattwa guna should become apparent and then this `speech' will be present wherever and with whosoever you may be with. The wise (ie. Witness) therefore should be searched out and understood and made a friend.

16
मूळ

उपासनेसारिखें बोलावें । सर्व जनासी तोषवावें । सगट बरेंपण राखावें । कोण्हीयेकासी ॥ १६ ॥

मराठी अर्थ

उपासनेला शोभेल असेंच बोलाचें. सर्व लोकांना संतुष्ट करावें. सरसगट सर्व लोकांशी चांगलें संबंध ठेवावेत.

English meaning

Your worship should be this `speech' and this worship should make the people happy (maharaj- when you are happy the whole world is happy). Then within this lumped together world of so `many' things, thoughtlessness should be protected by that One who is within everyone.

17
मूळ

ठाईं ठाईं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा । प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

ज्या गावांत जायचे त्या गावाबद्दल आधीं माहिती मिळवावी. मग त्या गावांत जावें. गांवांतील लोकांना आपलेपणानें स्वतःकडे बोलवावें.

English meaning

This place of the `all' should be searched out and one should enter and stay there. When the entire prana resounds with this thought `I am' then, everywhere belongs to you.

18
मूळ

उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदये । अस्तमानीं जाऊं नये । कोठें तर्‍ही ॥ १८ ॥

मराठी अर्थ

आपल्याकडे आलेल्या लोकांमधे उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, असा भेद करुं नये. सगळ्यांचे अंतःकरण शांत करावें. सूर्यास्त झाल्यावर उगीच कोठेंतरी जाऊं नये.

English meaning

That highest and ever constant paramatma should say nothing to this world and then, the heart of this `all' will be made peaceful. Then one should not go anywhere where the dark night of ignorance has come.

19
मूळ

जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र । कोठें तर्‍ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

जगांत जगन मित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेपाशी आहे. आपण कोठेंही गेलो तरी तेथें उत्तम माणसें शोधून काढावीत.

English meaning

Within this world of ignorance there is the friend of this world. This is the `all' connection at the source. The true and worthy recipient of knowledge should search out and take this.

20
मूळ

कथा होती तेथें जावें । दुरी दीनासारिखें बैसावें । तेथील सकळ हरद्र घ्यावें । अंतर्यामीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

जेथें कथा होत असेल तेथें आपण जावें. पण नम्रतेनें सामान्यासारखें अगदी दूर बसावें. त्या कथेंमधील सर्व रहस्य आपल्या अंतरी घ्यावें.

English meaning

There should be this `story' and then one can go near `there' and sit humbly at a distance (ie. witnessing). Then this `all' will be able to accept the inner meaning that is within `there'.

21
मूळ

तेथें भले आडळती । व्यापक ते हि कळों येती । हळुहळु मंदगती । रीग करावा ॥ २१ ॥

मराठी अर्थ

या समुदायामधें भली माणसें आढळतात. व्यापक किंवा विशाल मनाचें कोण आहे तेंहि कळतें. अशा रीतीनें हळुहळु गावांतील लोकांत शिरकाव करुन घ्यावा.

English meaning

`There' is where the wise is met. `There' the one who pervades (ie. atma purush) and that Reality can be understood. Therefore gradually, `there' should be entered.

22
मूळ

सकळांमधें विशेष श्रवण । श्रवणाहुनी थोर मनन । मननें होये समाधान । बहुत जनाचें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

सर्व उपायांमधे विशेष असेल तर तें श्रवण होय. पण श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे. मननामुळें पुष्कळ लोकांचे समाधान होतें.

English meaning

Within this `all', shravan is most important. Greater than this shravan/listening, is *manana. For when there is manana then, this `all' within the people can get complete contentment. *(manana means to continuously hold this `all' in the mind)

23
मूळ

धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें । समजल्याविण सिणावें । कासयासी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

चाणाक्षपणें सर्व गोष्टी समजून घ्याव्या. आपल्या अंतःकरणांत दुसर्‍याच्या अंतःकरणाची बरोबर कल्पना असावी. कोणतीही गोष्ट समजल्याखेरीज उगीच श्रम करणें म्हणजे स्वतःला उगीच शिणवणें होय.

English meaning

By being very astute, this `all' will be known and then only this inner space should be accepted in your inner space (ie. no other thoughts other than this `I am' should be accepted by this `I am'). Tell me, why should one fruitlessly toil, without this under- standing? .