शिकवण — समास 7: येत्ननिरुपण

Fully populated

Yatna Nirupan (A Discourse on Effort)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

कथेचें घमंड भरुन द्यावें । आणी निरुपणीं विवरावें । उणें पडोंचि नेदावें । कोणीयेकचविषीं ॥ १ ॥

मराठी अर्थ

भगवंताच्या कथेनें सारे वातावरण भरुन टाकावें. निरुपणामधें अध्यात्माचे विवरण करावें. यापैकीं कशांतही उणीव पडूं देऊ नये.

English meaning

The sweet sound of this story `I am' should fill this whole world and then, within this `all', thoughtlessness should be understood. That One who is within everyone should not be allowed to feel that there is something lacking or missing (whatever is here is in knowledge and even this knowledge has appeared upon my thoughtless Self). (maharaj one should be perfect in one's thinking).

2
मूळ

भेजणार खालें पडिला । तो भेजणारीं जाणितला । नेणता लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥

मराठी अर्थ

एखादा कसरतीचे खेळ करणारा पडला तर काय चूक झाली म्हणून तो पडला हें असें कसरतीचें खेळ करणार्‍या माणसाच्याच लक्षांत येते. इतर अज्ञानी लोक मात्र इकडे तिकडे टकाटका बघत बसतात.

English meaning

If that One making bhajan forgets Himself then, that bhajani comes down into knowledge. And if that still and silent Self does not know this knowledge then, He just stares ahead with hopes and dreams.

3
मूळ

उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे महत्व उडालें । वक्तयाचें ॥ ३ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें श्रोत्यानीं वक्त्याला प्रश्र्ण विचारला, आणि वक्त्याला उत्तर देण्यास वेळ लागला, तर त्याला उत्तर सुचत नाहीं ही गोष्ट श्रोत्याच्या धा्यानांत येते. मग श्रोते वक्त्याची किंमत ओळखतात. आणि मग वक्त्याचे महत्व उडून जाते.

English meaning

If there is some hesitation in this `reply' (`I am He') then, the listener will come to know. And due to this hesitation, the greatness of the speaker will fly away (the listener and the speaker is within only. For in truth, there is no-one in this world but yourself. Therefore the listener who hears this `word' is you and the speaker who speaks this `word' is also you. And it is you who knows if you have stopped listening and at that time, it is you who falls down into the many thoughts and who shows disrespect to the speaker within)

4
मूळ

थोडें बोलोनि समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें । मनुष्य वेधींच लावणें । कोणीयेक ॥ ४ ॥

मराठी अर्थ

महंतानें थोडे बोलून समाधान करावें. राग आला तरी तो दाबून टाकावा, पण श्रोत्यामचें मन दुखवूं नये. प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करुन घ्यावे.

English meaning

A few were making this `speech' and this action brought complete contentment. But then some emotion arose and was held fast to by the mind. See how it is the man himself who creates this obstruction between himself and that One who is within everyone! (ie. the speaker)

5
मूळ

सोसवेना चिणचिण केली । तेथें तामसवृत्ती दिसोन आली । आवघी आवडी उडाली । श्रोतयाची ॥ ५ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांचें वागणेम सहन न होऊन महंतानें जर चिडचिड केली तर त्याची तामसी वृत्ती दिसून येते. मगत्याच्यावर असलेले श्रोत्यांचे प्रेम उडून जातें.

English meaning

If this restless wanting is not endured (let whatever will come, come) then, in that brahman, ignorant desires arise and then that brahman sees through the senses and in these `many' thoughts, the fondness for listening to this `I am' flies away.

6
मूळ

कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनी भंगिले । क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजे लोक ॥ ६ ॥

मराठी अर्थ

आपल्यावर कोण प्रसन्न आहेत. आपण कोणाचा मनोभंग केला आहे. आपण कोणाचे मन दुखावलें आहे. हें वारंवार लोकांची परीक्षा घेऊन बघावें.

English meaning

Some willingly keep this `all' and some break this `all' with their minds. Therefore each and every moment one should examine this world (and this `all' world ie. heaven, should be perceived).

7
मूळ

शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु मागें मागें धंवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥

मराठी अर्थ

एखादा शिष्य भलताच शंका काढणारा आहे. तसें करतांना तो विकल्पाच्या फसतो व गुरुही त्याच्यामागें समजूत काढण्यासाठीं त्याच्या मागें धावतो. तर ते दोघेही संदेहाच्या चक्रांत अडकलें आहेत असें समजावें.

English meaning

But if the shishya accepts these vikalp/doubts then, he is confused and lost; still time and time again the guru comes running to show him the way (if there is faith in the guru then, you have faith in your Self and such longing will bring you back to His teachings). However if he truly tries to understand that thoughtless Self then, these `many' doubts will become That.

8
मूळ

आशाबद्धी क्रियाहीन । नाहीं च्यातुर्याचें लक्षण । ते महंतीची भणभण । बंद नाहीं ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जो महंत आशाळभूत आहे, आचारभ्रष्ट आहे व चातुर्यनहीन आहे, अशा महंताची महंती उगीच कटकटी निर्माण करते. तिला कांहीं घरबंद उरत नाहीं.

English meaning

These bindings of hopes and inferior actions ("I am doing everything and I will receive the fruits of my actions later") are not the attention of the wise. And the desolate dreariness of samsar has not stopped for that purush.

9
मूळ

ऐसे गोसावी हळु पडती । ठाईं ठाईं कष्टी होती । तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैचें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

असले महंत नालायक ठरतात. ठिकठिकाणीं त्यांना दुःखी होण्याचे प्रसंग येतात त्यांच्या संगतींत राहणार्‍या लोकांना सुखसमाधान मिळणें अशक्य होते.

English meaning

Then slowly that renunciate slides downwards into body consciousness and this place of the `all' becomes full of tiresome difficulties. How can the happiness of `there' be attained in this world of attachment?

10
मूळ

जिकडे तिकडे कीर्ति माजे । सगट लोकांस हव्या उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

महंतानें असें वागावें कीं, चहूंकडे त्याची कीर्ति पसरावी. सगळ्या लोकांना त्यांच्याविषयीं आवड उत्पन्न व्हावी. लोकांना संतुष्ट राखून त्यानें सगळें कांहीं करावें.

English meaning

`Everywhere is within my pervasiveness'. Such a longing for this world beyond should be born. Therefore in the mind that has created all these things, there should arise a longing to protect this `all thing' only.

11
मूळ

परलोकीं वास करावा । समुदाव उगाच पाहावा । मागण्याचा तगादा न लवावा । कांहीं येक ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आपण आत्मानुसंधानाच्या उच्च पातळीवर मनानें राहावें. त्याभूमिकेवरुन लोकसमुदायाचे निरीक्षण करवें. कोणाकडेहीं कांहींही मागण्याचा तगादा लावूं नये.

English meaning

One should live in this world beyond and then this meeting place of the `all' should understand that still and silent swarup. Therefore that One within this `thing' should not go begging for reward (maharaj- hopes are dupes).

12
मूळ

जिकडे जग तिकडे जगन्नायेक । कळला पाहिजे विवेक । रात्रीदिवस विवेकी लोक । सांभाळीत जाती ॥ १२ ॥

मराठी अर्थ

ज्या बाजूला बहुजन समाज असतो त्याच बाजूला जगाचा स्वामी जगन्नाथ असतो. हा विचार नीट कळला पाहिजे. विवेकीं महंत हा विचार रात्रंदिवसडोळ्यांपुढें ठेवून वागतात.

English meaning

`Where there is a world then, there is the Master of that world.' This should be your vivek. But first, day and night, the mind of the viveki should cherish this world beyond.

13
मूळ

जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघेच नष्ट येकला भला । काशावरुनी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जो माणूस दृष्टीस पडतो तो वाईट, बेकार आहे असें समजणे बरोबर नाहीं. जगामधील सर्व माणसें वाईट व आपण तेवढें चांगलें हें कशावरुन खरें मानायचे?

English meaning

When that purush descends into this `all' world then, He has lost His understan- ding. And then, when that One gets destroyed by the `many' things, how can there be wisdom?

14
मूळ

वोस मुलकीं काये पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें । तर्‍हे खोटी सांडतें घ्यावें । कांहीं येक ॥ १४ ॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणें ओसाड प्रातांत पाहाण्यासारखें कांहीं नसते त्याप्रमाणें जनतेला सोडून महंताला राहाता येणार नाहीं.महंतानें तर्‍हेवाईकपणा करणें वाईट असतें. प्रसंगीं त्यानें पडतें घ्यावें पण लोकांना राजी राखावें.

English meaning

Why does one need to understand that which is naturally existing? Therefore, other than in this world beyond where should one stay? That One who is within this `thing' is always there and He should let slip these false things (maharaj- how can you be that which is ever changing).

15
मूळ

तस्मात लोकिकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्र साधनाचा उपाये । श्रवण करुन असावें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

सांगण्याचे कारण असें कीं, महंताला जनतेशी वागता येत नसेल तर त्यानें लोकसंग्रह करुं नये. परमार्थसाधनामधें श्रवण मनन करीत आपला काळ घालवावा.

English meaning

One should not come and stay in this worldly life. Therefore that purush should have no desire. The sadhana that is beyond these three worlds is listening/shravan and this should be made.

16
मूळ

आपणासी बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसाला नीट पोहता येत नाहींत्यानें लोकांना बुडवू नये. अशा अपात्र महंताच्या नादी लागल्यानें माणसाची परमार्थाची आवड व गोडी वाया जाते व गैरसमज पसरतो.

English meaning

If you have not learnt how to swim well then, how can you save this world of the drowning (this `all' will be drowned in a mind full of `many' things)? Then due to your spoiled and useless likings, there will be the desires for `many' things.

17
मूळ

अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें । प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

साधनाचा उत्तम अभ्यास करुन मग जनतेंत महंतपण प्रगट करावें. नाहींतर साधकानें जनतेपासून स्वतःस झाकून दूर राहावें. जनतेंमधें प्रगट झाल्यावर साधनांतून खाली घसरणें चांगलें नाहीं.

English meaning

Therefore one should have no desire and then this `all' world will not remain hidden. But if this `all' becomes apparent and then gets destroyed, that thoughtless wisdom will never arise (ie. if firm conviction is not maintained, thoughts will steal your under- standing away. Therefore a change of mind must come. I am not a body).

18
मूळ

मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा अटोपतो । अरबी फिरवणार तो । कैसा असावा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसाला हळु घोडें चालवण्याची सवय आहे त्याला चपळ घोडा चालविता येत नाहीं. अरबी घोडा मोठा चपळ व हुशार असतो. त्यावर स्वार होणारा माणूससुद्धां तसाच चपळ व हुशार लागतो.

English meaning

If you are dull and slow then, how will that smart and active gather up all these `many' thoughts (the antar-atma is the smartest and most active)? If you want to ride a noble Arabian horse then, you must be vigilant and prepared.

19
मूळ

हे धकाधकीचीं कामें । तिक्षण बुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थें संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

हीं सगळीं धक्काबुक्कीची कामें आहेत. ती करण्यासाठीं मोठी तीक्ष्ण बुद्धी लागते. मगवर्म ओळखून ती करावीं लागतात. नुसती श्रद्धा ठेवून ती सुखासुखी करतां येत नाहींत.

English meaning

If this sharpness and keenness that is the essence of the buddhi makes only tiresome pushing and shoving then, there is only haste and confusion and the forgetfulness of blind faith.

20
मूळ

सेत केलें परी वाहेना । जवार केलें परी फिरेना । जन मेळविलें परी धरेना । अंतर्यामीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

जसें शेतांत पीक घेतलें पण तें विकाला बाजारांत नेलें नाही. जवाहीर विकण्याचा व्यापार आहे, पण ते विकण्यासाठीं हिंडलें नाहीं तर नुकसान होते. तसेंच महंतानें चार लोक गोळा केले पण त्यांचे अंतःरंग सांभाळले नाहीं तर त्याची महंती वाया जाते व फजिती होते.

English meaning

One may sow good seeds on the field but not water them. One may be a jeweller but just store away one's jewels. You will be no better than them, if you meet with the people but do not hold this essence of your buddhi within (maharaj- be with the people but do not be like the people).

21
मूळ

जरी चढती वाढती आवडी उठे । तरी परमार्थ प्रगटे । घसघस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥

मराठी अर्थ

जनतेमध्यें आपल्याबद्दल असणारे प्रेम वाढत गेले तरच परमार्थ प्रगट होतो. अशा महंताच्या प्रयत्नांना यश येते व लोक परमार्थ आचरु लागतात. पण जर आपण व जनता यांच्यामधें संघर्ष निर्माण केला, तर लोक अशा महंताला विटतात. तो त्यांना नकोसा होतो.

English meaning

If a fondness for such thinking is awakened and that wise thinking rises higher and higher and spreads out further and further then, the Supreme meaning (ie. paramarth) will be understood. But, if there is only haggling and discontentment then, there is only a tarnished lumped together world.

22
मूळ

आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणांस मानेना । आवघा विकल्पचि मना । समाधान कैचें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

ज्या महंताचे लोकांना पटत नाहीं, पसंत पडत नाहीं आणि लोकांचें महंताला पटत नाहीं, पसंत पडत नाहीं, अशा ठिकाणीं दोघांच्या मनांत संशय व गैरसमज असतात. समाधान कोठेंच नसतें.

English meaning

If you have no respect for your own world (ie. `I am') then, this world will have no respect for you. If your mind is full of doubts then, how can it gain complete contentment?

23
मूळ

नासक दीक्षा सिंतरु लोक । तेथें कैचा असेल विवेक । जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

ज्या ठिकाणीं गुरुचा आचारविचार व साधना बिघडलेली असते, त्याचप्रमाणें त्याच्याभोवती जमलेले अनुयायी लबाड, फसवे असतात. तेथें विवेक आढळणें शक्य नसतें. असा अविवेक जेथें असतो तेथें राहाणें चुकीचे असते.

English meaning

If this pure conduct (`He does everything') is spoiled and the mind is entangled then, how can there be the vivek of `there'? If `here' a-vivek grows stronger, then `there' is full of illusion.

24
मूळ

बहुत दिवस श्रम केला । सेवटीं अवघाचि वेर्थ गेला । आपणास ठाकेना गल्बला । कोणें करावा ॥ २४ ॥

मराठी अर्थ

एखाद्या महंतानें पुष्कळ दिवस कष्ट सोसले आणि चांगलें अनुयायी मिळविलें, तरी त्या समुहांतील सर्वांना संतुष्ट राखणें, त्यांचे अंतःकरण राखणे शक्य नसतें. हे जर नाहीं केले तर समुह विस्कटतो आणि सर्व श्रम वाया जातात. जनतेची उपाधी व गडबड जर आपल्याला झेपत नसेल तर त्याची जबाबदारी सुरवातीपासूनच आपण घेऊं नये.

English meaning

Then this `all' makes wearisome toil and yet in the end when you die, everything becomes nothing. Therefore you should not be decked out in the confusion of the `many' things and be established in this `all'.

25
मूळ

संगित चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप । क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि सांगावा ॥ २५ ॥

मराठी अर्थ

लोकसंग्रहाचे रहस्य हें असें आहे कीं, समूह सरळीत चालला तर तो व्यापक होतो. व त्याचा मनाला त्रास होत नाहीं. पण जर समुह बिघडला तर संघर्ष निर्माण होतो व मनाचा संताप होतो. समुह जीवनांत पदोपदी पुष्कळ अडचणी व गैरसमज निर्माण होतात. त्या सर्वांचे वर्णन करणें शक्य नाहीं.

English meaning

If you sing His song and dance His dance (`I am everything everywhere' or chaitanya is this dance of knowledge) then, that atma pervades. If not, then everything is angu- ish and distress. Then that moment of the One is only confusion, anger and trouble. Therefore the `many' thoughts should understand thoughtlessness.

26
मूळ

मूर्ख मूर्खपणें भरंगळती । ज्ञाते ज्ञातेपणें कळ्हो करिती । होते दोहीकडे फजीती । लोकांमधें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

समूहांतील मूर्खमाणसें मूर्खपणानें भलतेंच वागतात. तर शहाणी माणसें शहाणपणाच्या अभिमानानें आपसांत भांडतात. मग महंत दोन्ही बाजूंनी कात्रींत सापडतो. मग त्याची फजिती होते.

English meaning

The foolish get lost due to their foolishness and knowledgeable quarrel due to their knowledge. Then to both there comes the disgrace of this world.

27
मूळ

कारबार आटोपेना करवेना । आणि उगेंचि राहेना । याकारणें सकळ जना । काये म्हणावें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

कारभार झेपत नाहीं, आवरत नाहीं, व करवत नाहीं. असे असून स्वस्थही बसवत नाहीं. अशा माणसांना म्हणायचे तरी काय?

English meaning

If these worldly affairs, that should not even be done, are not properly managed then, they will sweep us away and then that still and silent cannot remain. Tell me, what should this `speech' say to the people? (Don't care for the talk and affairs of the world and remain in your Self)

28
मूळ

नासक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें । परिभ्रमणें कंठावें । कोठे तरी ॥ २८ ॥

मराठी अर्थ

नाश पावणारी उपाधी बाजूस सारावी. परमार्थ साधनाकरुन आपलें वय सार्थकीं लावावे. आणि देशामधें भ्रमण करीत आपलें जीवन कोठेंतरी घालवावें.

English meaning

The spoiled limited concept, "I am body", should be left and your life should be used to seek out its meaning (to know my Self). And then as you wander freely through this `all', everything everywhere should be endured (maharaj The world is my Self).

29
मूळ

परिभ्रमण करीना । दुसर्‍याचें कांहींच सोसीना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥

मराठी अर्थ

जो महंत परिभ्रमण करीत नाहीं, दुसर्‍यासाठीं कांहीं झीज सोसत नाही, त्याला संशयाच्या, देहबुद्धीच्या फार यातना सोसाव्या लागतात.

English meaning

If one does not wander freely (ie. does not forget everything) then, this `all thing' cannot be maintained. And then afterwards, that vast paramatma gets the troubles and vexations of body consciousness.

30
मूळ

आतां हें आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी । अनकूळ पडेल तैसी । वर्तणूल करावी ॥ ३० ॥

मराठी अर्थ

आतां हें सगळें आपल्यावरच अवलंबून आहे, आपणच आपल्याशी याचा विचार करावा. आणि जे योग्य व अनुकूल वाटेल त्याप्रमाणें वर्तन करावें.

English meaning

Now, when you understand this `all' then, thoughtlessness is near you and if you keep this `all' in your care then, thoughtlessness will come to you. Therefore let whatever has to come, come and with this understanding meet the world but don't care for anything. .