पूर्णनाम — समास 1: पूर्णापूर्णनिरुपण

Fully populated

Purnapurna Nirupan (A Discourse on the Complete and the Incomplete)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

प्राणी व्यापक मन व्यापक । पृथ्वी आप तेज व्यापक । वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥

मराठी अर्थ

प्राणी व्यापक आहे. न मन व्यापक आहे. त्याचप्रमाणें पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, हीं पंचभूतें आणि त्रिगुण, अंतरात्मा व मूळमाया हीं सारीं तत्वें व्यापक आहेत.

English meaning

There is the prana and the One who pervades it; there is the mind and the One who pervades it; there is the elemental earth, water and fire and the One who pervades them; there is the element wind, space and the three gunas and the One who pervades them; and then there is the antar-atma and this mula maya.

2
मूळ

निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें आवघेंच व्यापक । तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥

मराठी अर्थ

निर्गुण ब्रह्म देखील व्यापक आहे. अशा रीतीनें चंचळांतील सर्व तत्वें आणि निश्र्चळ ब्रह्म सगळेंच व्यापक आहेत. मग येथें प्रश्र्ण असा कीं, हे सारे एकसारखेच व्यापक आहेत किंवा यांच्या व्यापकपणांत कांहीं फरक आहे?

English meaning

The listener says, "So there is that nirgun brahman, that Reality and the One that pervades and then that One who pervades, appears as the `many' things. But still there is that thoughtless; so is that thoughtless the same or different from these?"

3
मूळ

आत्मा आणि निरंजन । येणेंहि वाटतो अनुमान । आत्मा सगुण किं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥

मराठी अर्थ

आत्मा आणि निरंजन याविषयीं देखिल मनांत कांहीं संदेह उत्पन्न होतो. आत्मा सगुण आहे किंवा निर्गुण, निरंजन आहे? असा प्रश्र्ण पुढें उभा राहतो.

English meaning

"I am confused as to whether this atma and the niranjan are the same or different. And is the atma, sagun or is it nirgun and is that niranjan?"

4
मूळ

श्रोता संदेही पडिला । तेणें संदेह वाढला । अनुमान धरुन बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥

मराठी अर्थ

श्रोत्याच्या मनांत असा संदेह निर्माण झाला आणि तो वाढतच चालला. कोण कसा आहे? याबद्दल श्रोता कल्पना करीत बसला.

English meaning

The listener has stopped listening to this `speech' and due to this, these many ques- tions arise and his doubts just kept on increasing. And when conjecture is held and delighted in, then how can there be that atma?

5
मूळ

ऐका पहिली आशंका । अवघा गल्बला करुं नका । प्रगट करुन विवेका । प्रत्यये पाहावा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

प्रथम पहिल्या शंकेचे उत्तर ऐका. सगळा गोंधळ करुं नका. विवेकानें विचार व विवरण करुन प्रत्यक्ष अनुभव पाहावा.

English meaning

The speaker says. Listen to this original doubt, it is this *`I am' and then do not get confused with these `many' thoughts. And when this original doubt is realized then, with further vivek you should understand that nirgun. (So, the speaker says, why do you keep asking these same questions? I have told you, just leave these questions and all the other thoughts from your mind and experience for yourself this `I am' and then no questions will remain) *(nisargadatta maharaj- this `I am' will be your guru. Remain in this and it will teach you everything you need to know)

6
मूळ

शरीरपाडें सामर्थ्यपाडें । प्राणी व्याप करी निवाडें । परी पाहातां मनायेवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

प्राण्याचे शरीर लहानमोठें असतें. त्यामानानें त्याचे सामर्थ्य असते. आपल्या सामर्थ्याला अनुसरुन प्राणी लहानमोठे व्यापार करतो.परंतु त्याचे शरीर स्थूल असतें. तें मनाइतके चपळ असूं शकत नाहीं.

English meaning

But to clear your doubts I will again tell you. The volume of this `all' body is the same as the volume of prakruti. But when this is active within the prana then, there has to be a doer. Still, when you understand that nirgun then, your mind becomes inactive (no-mind). (prakruti is this `all', the birth place of duality of space and per- vasiveness/volume. And then this pervasiveness becomes limited to only a gross body, then there is the question of a doer. If you simply know and understand this `all' then, the question of doer will not arise. That nirgun is when your mind is no more. `There', there is no duality, no prakruti and no `doer' and that nirgun cannot be considered as the pervader either)

7
मूळ

चपळपण येकदसी । पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी । पाहातां पृथ्वीच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

परंतु चपळपणा किंवा चंचळपणा एकदेशी असतो.तेथें पूर्ण व्यापकपणा असूं शकत नाहीं. म्हणून मनाच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. पृथ्वीची व्यापकता बघितली तरी तिलाहि सीमा आहे. अर्थांत प्राणी, मन आणि पृथ्वी संपूर्ण व्यापक नाहीं.

English meaning

Activity is limited and one-sided and it can never pervade That which is full and com- plete (in One, quality cannot remain, for knowing/knowledge is not there). Therefore it should be obvious that the pervasiveness of the earth element has its limits.

8
मूळ

तैसैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायो चपळ समज । येकदेसी ॥ ८ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें आप आणि तेज हीं दोन्हीं सहज अपूर्ण आहेत असें आढळतें. पृथ्वीप्रमाणें पाण्याला आणि अगनीला मर्यादा असल्यानें त्यांना संपूर्ण व्यापकपणा नाहीं. वायु तर मुळीं चपळ व चंचळ आहे. म्हणून तो सहजच एकदेशी आहे.

English meaning

In the same way, the elemental water and fire are also limited; for that which can be seen is naturally incomplete. And the wind (ie. prakruti) though extremely active is also limited.

9
मूळ

गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणीयेक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आकाश आणि निरंजन हीं दोन्ही पूर्णपणें व्यापक आहेत. आणि घनदाट आहेत. त्यांच्याबद्दल कांहीं संदेह असण्याचें कारणच नाहीं.

English meaning

Then what remains is the *sky/space and that niranjan. That niranjan is full and complete and the One that pervades (like the sky ie. antar-atma) is present everywhere. And when this One who is within everyone, is present everywhere then, it cannot be full and complete `there'. *(This atma/antar-atma is described as being like the sky ie. the backdrop on which all appears. Hence as the Witness or pervader, He cannot be that full and complete niranjan)

10
मूळ

त्रिगुण गुणक्षोभिणी माया । माईक जाईल विलया । अपूर्ण येकदेसी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥

मराठी अर्थ

त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया ही दोन्ही मायिक आहेत. जें मायिकअसतें तें नाशवंत असतें. जें नाशवंत असतें तें अपूर्ण व एकदेशी असते. त्यास पूर्ण व्यापकता असूं शकत नाहीं. म्हणून त्रिगुण व गुणक्षोभिणी माया पूर्ण व्यापक नाहींत.

English meaning

If we examine *mula maya, gunakshobhini (the bursting forth of the gunas) and the three gunas we will see that they are illusory, for they appear and then disappear. They are therefore incomplete and limited and can never pervade that complete Reality. *(The presence of the sky/antar-atma is only required when the cloud/maya appears)

11
मूळ

आत्मा आणि निरंजन । हें दोहिकडे नामाभिधान । अर्थसन्वये समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आत्मा आणि निरंजन हीं नांवें दोन्हीकडे एकच आहेत. परंतु अर्थाचा संदर्भ बघून मग बोलावें. आत्मा हा शब्द जीवात्मा या अर्थानें वापरतात. तर निरंजन हा शब्द ब्रह्म या अर्थानेंही वापरतात. म्हणून आत्मा शब्द कोणत्या अर्थानें वापरला आहे तें ध्यांनांत घेऊन बोलावें.

English meaning

When there is maya then, there is this antar-atma. But that thoughtless niranjan is separate from these and it is due to this union of maya/antar-atma (prakruti/purush), that there is this `I am'. But in order to understand the essence of what is being told here, there should be this `speech' (this all can only be truly understood through the experience of `I am'; intellectual knowledge will not suffice).

12
मूळ

आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेचि केवळ । सुचित अंतःकर्ण निवळ । करुन पाहावें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

आत्मा म्हणजे जीवात्मा असा अर्थ घेतला तर मग आत्मा व मन चपळ व चंचळ आहेत. त्यामुळें जीवात्मा व्यापकअसू शकत नाहीं. आपलें अंतज्ञकरण स्वस्थ आणि स्वच्छ करुन हें पाहावें म्हणजे कळेल.

English meaning

When there is that atma and the extremely active mind of this `I am' then, there is the One that pervades and that thoughtless niranjan is not. This can be understood by an alert antah-karana that has been made pure. (The One that pervades is this antar-atma. By His presence this mula maya or the very active mind appears and He remains hidden behind it. He is the illuminator or Knower of the illuminated or known. In that niranjan or pure knowledge there is no pervasiveness, for nothing other than That exists)

13
मूळ

अंतराळीं पाहातां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहातां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जीवात्मा अंतराळांत जातो तेव्हां तो पाताळांत नसतो; तसेंच तो पाताळांत जातो तेव्हां अंतराळांत नसतो. या कारणामुळें तो एकाच वेळीं सर्व ठिकाणीं व्यापून नसतो.

English meaning

But if your understanding is in the emptiness above (ie. this emptiness is required to know this world or the dream world), then it is not in world below (ie. deep sleep/ig- norance). And if it is in the world below (ie. deep sleep), then your understanding is not in this emptiness above. Thus, this emptiness not exist with completeness everywhere.

14
मूळ

पुढें पाहातां मागें नाहीं । मागें पाहातां पुढें नाहीं । वाम सव्य व्याप नाहीं । दशदिशा ॥ १४ ॥

मराठी अर्थ

तों पुढें असेल तर मागें नसतो. तो मागें असेल तर पुढें नसतो. तो डाव्या किंवा उजव्या बाजूला असतो. एकाचवेळीं दशदिशा व्यापून तो असत नाहीं.

English meaning

If this emptiness is understood in front then, it is not behind and when it is un- derstood behind then it is not in front. Similarly it is not at the right, if it is at the left side. And therefore it cannot be in all the ten directions at the same time and so cannot be called complete.

15
मूळ

चहुंकडे निशाणें मांडावीं । येकसरीं कैसीं सिवावीं । याकारणें समजोन उगवी । प्रत्ययें आपणासी ॥ १५ ॥

मराठी अर्थ

समजा, चारहि बाजूला निशाणें उभारलीं. एकाचवेळीं एक माणूस त्या सर्वांना स्पर्श करुं शकत नाहीं. म्हणजे माणूस एकदेशी असतो. तो सर्व व्यापीं असूं शकत नाहीं. यावरुन जीवात्मा एकदेशी आहे हें समजून घ्यावें. आणि या अनुभवावरुन आपण आपल्या संदेहाचे निरसन करावें.

English meaning

If four flags are placed in the four directions, how can they be touched at the same time? If you make this `speech' then, this can be understood and then, to you at the source (ie. purush/prakruti), there can come that nirgun understanding. (This `speech' or knowledge is limited and not like That thoughtless, beyond knowledge)

16
मूळ

सूर्य आला प्रतिबिंबला । हाहि दृष्टांत न घडे वस्तुला । वस्तुरुप निर्गुणाला । म्हणिजेत आहे ॥ १६ ॥

मराठी अर्थ

सूर्य उदय पावतो, त्याचे प्रतिबिंबही दृष्टीस पडतें. पण हाहि दृष्टांत वस्तुला म्हणजे ब्रह्माला लागूं पडत नाहीं. परब्रह्म वस्तूचे रुप निर्गुण असल्यानें त्यास हा दृष्टांत लागूं पडत नाहीं. हें म्हणणे योग्य आहे.

English meaning

The sun brings its reflection and therefore this simile cannot be used for that thoughtless Self (ie. that Self/niranjan has no reflection ie. it cannot be compared to this antar-atma and His `speech'). For then this speech of the `all' would get called the nirgun and this is not correct.

17
मूळ

घटाकाश मठाकाश । हाहि दृष्टांत विशेष । तुळूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥

मराठी अर्थ

घताकाश व मठाकाश हा दृष्टांत त्यांतल्ता त्यांत अधिक बरोबर आहे. कारण तुलना केलीं तर आकाशाचें निर्गुणाशीं साम्य आहे. मूळ आकाश संपूर्णपणें व्यापक आहे. त्यचप्रमाणें निर्गुण परब्रह्म संपूर्णपणें व्यापकआहे.

English meaning

The *space in the pot and the space in the house can be used as a simile for this pure sattwa (knowledge). And when this space goes beyond all limiting concepts then it can be compared to that nirgun (like space that atma is One only and it appears to be different according to its surrounding. It is the antar-atma when it is with the limiting concept of this `all'; it is the jivatma when it is with this limiting concept of individual prana and a mind full of `many' things, see V. 1; and it is the nirgun/niranjan when all limiting concepts are left).

18
मूळ

ब्रह्मींचा अंश आकाश । आणी आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

आकाश परब्रह्माचा अंश आहे. आणि मन आत्म्याचा अंश आहे. असें जरी आपण म्हटलें तरी आपली खात्री पटण्यास या दोन्हींचा अनुभव आपण घ्यावा.

English meaning

Thus it can be said that this space is a part of that still brahman and the mind is a part of the moving atma. Therefore this sagun `experience' of purush/prakruti should accept that nirgun understanding (ie. on account of the mind, that atma appears to move because, like the space in the limiting concept, He appears to be like this limiting concept called mind. But just like the space that leaves all its limiting concepts behind, when the atma leaves the mind then, He is One and therefore still. Then there is no atma as pervader and no mind, space, elements etc. and that is the thoughtless niranjan ).

19
मूळ

गगन आणि हें मन । कैसे होती समान । मननसीळ महाजन । सकळहि जाणती ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आकाश आणि मन यांची बरोबरी होऊं शकत नाहीं. मननशील थोर पुरुषांना ही गोष्ट माहीत असते. केव्हांही मन हें व्यक्तिला म्हणजे जीवात्म्याला धरुन असते. पण आकाश नेहमी व्यक्तिनिरपेक्ष असतें. म्हणून मन केंव्हाही आकाशाची बरोबरी करुं शकत नाहीं. हें ओळखावें.

English meaning

But how can the *space, the mind and that thoughtless niranjan be the same? For when that great purush (ie. who is like the space and who is the pervader) is the possessor of manana, then He is the Knower and this `all'. *(The space is like the purush; He is there but cannot be perceived. Then He becomes the mind or prakruti. But that thoughtless Self knows nothing of purush, space, `speech' or prakruti or mind)

20
मूळ

मन हें पुढें वावडे । मागें आवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥

मराठी अर्थ

मन पुढें भरकटूं लागलें म्हणजे मागें त्याचे अस्तित्व उरत नाहीं. तें एकदेशी असल्यानें एकतर तें पुढें तरी असतें किंवा मागें तरी असते. पण आकाश एकाचवेळीं मागें आणि पुढें असतें. तें सर्वदेशी आहे. सर्व व्यापक आहे. म्हणून पूर्ण व्यापक आकाशाशी मनाची बरोबरी होऊं शकत नाहीं.

English meaning

When there is the mind then that thoughtless Self has been left aside and afterwards that mind falls into emptiness and imagines so `many' things. Therefore how can that full and complete *parabrahman be the same as this sky/space? (space is required as the backdrop for delusion) *(maharaj- parabrahman has nothing to do with all this)

21
मूळ

परब्रह्महि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दोनीही येक केवळ । हें कैसें म्हणावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

अचळ म्हणजे न चळणारें अचळ शब्द परब्रह्माला लावतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात. पण हें दोन्ही एकच आहेत अेम म्हणता येत नाहीं.

English meaning

parabrahman is not moving and a mountain is also said to be not moving. But how can both be called that One pure thoughtless knowledge? (In the same way, space is said to be not moving but how can this be the same as that One)

22
मूळ

ज्ञान अज्ञान विपरीतज्ञान । तिनी कैसीं होती समान । याचा प्रत्ययो मनन । करुन पाहावा ॥ २२ ॥

मराठी अर्थ

ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान या तिन्हीं मधें ज्ञान शब्द आढळतो. पण तिन्ही कांहीं सारखीं नव्हेत. नीट मनन करुन अनुभवानें हें समजून घ्यावें.

English meaning

There is knowledge, ignorance and false knowledge (ie. rajo guna). How can the three be the same? Therefore one should make this `speech'/shravan and then manana (ie. stay in this `speech') and then understand that nirgun (ie. nijadhyas ie. to enter `there' and then satkshatkar).

23
मूळ

ज्ञान म्हणिजे जाणणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरीतज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें एक ॥ २३ ॥

मराठी अर्थ

ज्ञान म्हणजे वस्तु जशीं आहे तशी जाणणें. अज्ञान म्हणजे वस्तु आहे हें न जाणणें, वस्तुचे गुणधर्म न जाणणें. परंतु वस्तुचेरुप एक प्रकारचे असतां तें भलतेंच जाणणें, याचे नांव विपरित ज्ञान होय. ( साप व दोरी दृष्टांताचा विचार करावा. )

English meaning

Knowledge means to know and ignorance means not to know; and false knowledge means, the jiva of that One brahman sees a gross world.

24
मूळ

जाणणें नेणणें वेगळें केलें । ढोबळें पंचभूतिक उरलें । विपरीतज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥

मराठी अर्थ

जाणणें बाजूला केलें. अज्ञान किंवा न जाणणें बाजूला केलें मग ज्ञान व अज्ञान याहून वेगळें असें स्थूल पंचभूतात्मक दृश्य उरतें. त्या दृश्याच्या पसार्‍याला खरें मानणें हें जीवाच्या ठिकाणीं आढळणारें विपरीत ज्ञान होय.

English meaning

When this knowing and not knowing (ie. rajo guna) are passed over then, the five great elements remain (when the gross body full of `many' thoughts is left behind then, the mind begins to become more pervasive and less objective. Still there is that one who pervades these, V. 1). Therefore this false knowledge within the jiva should be understood and then knowledge will remain. (siddharameshwar maharaj- you think that you do not have this knowledge, but it is already with you: therefore we just have to expand it by forgetting the thoughts that make us a jiva)

25
मूळ

द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवात्माचि होये शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥

मराठी अर्थ

वास्तविक अंतरात्मा द्रष्टा आणि साक्षी आहे. तो सर्व पिंडांमधें समान आहे. एकाच पिंडापुरता पाहिला म्हणजे त्यास जीवात्मा म्हणतात. जीवात्मा देहबुद्धींतून बाहेर पडला म्हणजे त्यास सर्वव्यापक असा शिवात्मा बनतो. पण शिवात्मा जेंव्हा आपलें साक्षीपण घालवतो, आपलें व्यापकपण विसरतो, आणि आत्मबुद्धी सोडून देहबुद्धींत शिरतो,तेव्हां तो जीवात्मा बनून जन्म घेतो

English meaning

Then there will be the seer, witness or antaratma and the jivatma will have become shivatma. And afterwards it is that shivatma only that takes a birth as the jivatma (ie. shiva becomes jiva when He forgets His shakti and starts imagining and objectifying).

26
मूळ

आत्मत्वीं जन्ममरण लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे । संभवामि युगे युगे । ऐसें हें वचन ॥ २६ ॥

मराठी अर्थ

" मी आत्मा आहे " ही जाणीव उत्पन्न झाली कीं जन्ममरण पाठीस लागते. देहच आत्मा आहे असे मानणारा जीवात्मा आणि मी आत्मस्वरुप आहे असें मानणारा शिवात्मा, या दोघांना जन्ममरण चुकत नाहीं. जीवात्मा कर्माच्या आधीन होऊन देह धारण करतो तर शिवात्मा म्हणजे ईश्र्वर कर्माला आधीन ठेवून देह धारण करतो. ईश्र्वरहि युगानुयुगें भक्तांच्या रक्षणासाठीं अवताररुपानें जन्म घेतो.

English meaning

Within atma-ness, there is birth and death. Within atma-ness, birth and death are not destroyed. God said, "I am born again, age after age" (By taking Himself as this antar-atma, He initiates this creative process and He Himself takes birth as the jiva).

27
मूळ

जीव येकदेसी नर । विचारें जाला विश्र्वंभर । विश्र्वंभरास संसार । चुकेना कीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

जीव हा एकदेशी, परीछिन्न व अपूर्ण माणूस होय. समजा तो विवेकानें विश्र्व व्यापक शिवात्मा बनला. विश्र्वव्यापी ईश्र्वर जरी झाला तरी त्याला दृश्य विश्र्वाची उपाधी असतेच. म्हणून त्याला देखील अवताररुपी संसार चुकत नाहीं.

English meaning

The jiva is a limited man. On account of that thoughtless Self, there appeared the One who pervades the whole universe (ie. antar-atma). But that One who pervades the whole universe cannot avoid samsar.

28
मूळ

ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरुपें हें समान । निवृत्तिरुपें विज्ञान । जालें पाहिजे ॥ २८ ॥

मराठी अर्थ

" मी ब्रह्म आहे " ही भावना म्हणजे ज्ञान व " मी देह आहे " ही भावना म्हणजे अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही वृत्तिरुपानें समान आहेत. त्या दोन्ही वृत्तिंची निवृत्ती होऊन ज्ञानाचें विज्ञानांत रुपांतर झालें पाहिजे. ज्ञानांत आणि अज्ञानांत मीपणा असतो. तो संपूर्णपणें विलीन होऊन केवळ अनुभवरुप बनणें हेंच निर्वृत्तीस्वरुप विज्ञान होय.

English meaning

For then, there is knowledge and ignorance and then, that thoughtless Self appears like that only and takes Itself to be a jiva. Therefore there should be no knowledge and that is vignyan.

29
मूळ

ज्ञानें येवढें ब्रह्मांड केलें । ज्ञानें येवढें वाढविलें । नाना विकारांचे वळलें । तें हें ज्ञान ॥ २९ ॥

मराठी अर्थ

एका ज्ञानानें एवढें ब्रह्मांड निर्माण केलें आणि ज्ञानानेंच तें वाढवलें व चालचलें आहे. तें ज्ञान अनेक विकारांनीं भरलेलें आहे. परब्रह्मामधील मूळ स्फूरण तेंच ज्ञानस्वरुप आहे. त्याच्यातून अष्टधा प्रकृति प्रगट झाली आणि सबंध विश्र्व रचलें गेलें. म्हणून ज्ञान विकारांनी भरलेलें आहे.

English meaning

It is due to this knowledge that the brahmanda was created and this much knowledge has been made to expand into the world of the `many' (ie. pinda). This being the case, if this body of the `many' is made into this body of the `all' then, there is that thoughtless Reality and knowledge (ie. thoughtless purush who is called the Knower and the thought of prakruti that is called the known).

30
मूळ

आठवें देह ब्रह्मांडीचें । तें हें ज्ञान साचें । विज्ञानरुप विदेहाचें । पद पाविजे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

ब्रह्माडांतील आठवा देह म्हणजे मूळमाया, म्हणजे प्रथम संकल्प, तो खरोखर हें ज्ञान होय. प्रथम ज्ञानानें अज्ञानाचा नाश करायचा, नंतर विज्ञानानें ते ज्ञान ओलांडायचें आणि मग केवळ विज्ञानरुप विदेहपण प्राप्त करुन घ्यायचें.

English meaning

So when there is the eighth body of the brahmanda (ie. mula maya) then, there is that thoughtless Reality and this knowledge. Therefore this knowledge should achieve that `seat' beyond any body (ie. videha). (This atma should leave off the known and become niranjan) Note: This chapter shows how the One thoughtless atma appears to become the antar- atma, which then appears as knowledge and later becomes the elements and finally a jiva. And it shows how, if this process is reversed then, the jiva becomes that One thou- ghtless atma again. Still during this apparent creation, that niranjan or parabrahman is as He always is. .