पूर्णनाम — समास 7: आत्मानिरुपण

Fully populated

Atma Nirupan (A Discourse on the Atma)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें । बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तो घडेना ॥ १ ॥

मराठी अर्थ

आत्मसाक्षात्कार होऊन शब्दांनीं सांगता न येणारे समाधान प्राप्त झालें. तरी पण तें सांगितलें पाहिजे. कारण या समाधानाचे शब्दांनी वर्णन केलें तर तर तें समाधान नाहींसें झालें असें कधी होत नाही.

English meaning

Even if that inexpressible complete contentment has come, still that Reality requires this `speech' (by means of this `speech'/knowledge that Reality can function in the world). But if one takes oneself to be this knowledge then, that complete contentment is destroyed and that thoughtless paramatma has not been accomplished.

2
मूळ

कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं । येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥

मराठी अर्थ

समाधान प्राप्त करुन घेण्यासाठीं कांहीं सोडावें लागत नाहीं. व कांहीं नवीन मांडावें लागत नाहीं. एका विचारानें शोध घेतला म्हणजे तें कळतें.

English meaning

This `thing' does not have to be dropped nor does it have to be established for it is already present (only the thoughts have to be dropped; maharaj- at this moment you are He). And with this `thing', one should search out and understand that thoughtless swarup.

3
मूळ

मुख्य कासीविश्र्वेश्र्वर । श्र्वेतबंद रामेश्र्वर । मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

मुख्य काशीविश्र्वेश्र्वर, मग सेतुबंध रामेश्र्चर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर,

English meaning

The temples of kashi-vishweshara;5 setubandha rameshwara; mallikarjuna and bheema-shankar (ie. north, south, east and west) and that thoughtless Supreme are all due to this guna of that atma. (This atma is the antar-atma and on account of Him there is this pure sattwa guna and due to this effortless knowing, the world has appeared and also, that Reality can be realized. This knowledge is everywhere, it is north, south, east and west)

4
मूळ

जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें । प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

अशीं मुख्य बारा ज्योतिर्लिंगें आहेत. त्याशिवाय आणखी पुष्कळ लिंगें आहेत. त्यांची प्रचीति अनेक लोकांना येते. पण हें आत्म्याचे गुण आहेत.

English meaning

Due to this guna of knowledge, that thoughtless Supreme has appeared as the twelve jyoti lingams (due to this guna, thoughtlessness is not and there appears this gross world where there are the twelve important jyoti lingams and `many' sacred sites). This knowing is different to thoughtlessness and these lingams. And to stay as this `I am' experience one should know this guna of that atma (we are that atma and It possesses this effortless knowing; but to understand these things, the thoughts of this world, of lingams and sacred places, have to be left).

5
मूळ

भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती । नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

पृथ्वीवर अनंत शक्ति आहेत. अनेकांना त्यांचा साक्षात्कार होतो. त्या शक्तीचें अनेक चमत्कार दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणें अनेक देवांच्या सामर्थ्यसंपन्न मूर्ति आहेत. हे आत्म्याचे गुण आहेत.

English meaning

That endless atma and His power/shakti is within this world. Thus the `many' miracles and that satkshatkar (nirgun realization), the `many' gods and this powerful image (`all') of that God; are due to this guna of that atma.

6
मूळ

नाना सिद्धांची सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें । नाना मोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

अनेक सिद्धपुरुषांचे सामर्थ्य, अनेक मंत्रांचें सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावर असणार्‍या मण्याचे सामर्थ्य, अनेक वनस्पतींचें सामर्थ्य,

English meaning

Due to this power of the accomplished there are the `many' accomplishments; due to this the power of mantra (`I am') there are the `many' mantras;6 due to this power of the `experience' there are the `many' experiences upon this creeper called maya; and all this is due to this guna of that atma.

7
मूळ

नाना तीर्थांची सामर्थ्यें । नाना क्षेत्रांची सामर्थ्यें । नाना भूंमडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

अनेक तीर्थांचें व क्षेत्रांचे सामर्थ्य, जगांतील अनेक प्रकारचे सामर्थ्य अशी अनेक प्रकारची सामर्थ्यें आत्म्याचे गुण आहेत.

English meaning

The powers of the `many' sacred rivers are due to this power; the powers of `many' pilgrimage places are due to this power; for the `many' powers within this world are due to this power of that atma.

8
मूळ

जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचे लक्षण । बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जेवढे म्हणून उत्तम गुणआहेत, तेवढें सगळें आत्म्याचे लक्षण समजावें. परंतु जेवढें बरें वाईट आढळतें तेवढें सारें आत्म्यामुळें असतें. हें ओळखावें.

English meaning

Whenever there is this `thing'/prakruti there is this best guna and then that atma is knowing. Know that this best guna and the worst gunas are all on account of that atma.

9
मूळ

शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी । बरी वाईटआवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आत्मा शुद्ध असला म्हणजे उत्तम गुण प्रगट करतो. तोच आत्मा मिश्रित असतो तेव्हां अवलक्षणें प्रगट करतो. बरी आणि वाईट करणी अखेर आत्म्याचीच असतें.

English meaning

6 siddharameshwar maharaj what you say is a mantra, `bring me water' and water appears. Is this not power! 9. That atma is pure within the best guna and that atma is impure within this false attention (ie. then It takes Itself to be a body); therefore the best guna and the worst gunas that are within everyone are the wondrous doing of that atma.

10
मूळ

नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें । नाना श्रापउश्रापलक्षणें । आत्मयाचेनी ॥ १० ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारचा अभिमान धरणें, प्रतिसृष्टि निर्माण करणें, अनेक प्रकारचे शाप देणें व उःशाप देणें ही सगळी आत्म्याची लक्षणें आहेत.

English meaning

To hold the `many' arrogances and the `many' actions of the gross world; to have the attention that brings this curse of `many' bodies ("I am a body and this is my boy, wife" etc.) and the attention that brings the mitigation of that curse (ie. understanding `I am He'), are due to this guna of that atma.

11
मूळ

पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा । तत्वें आत्माशोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥

मराठी अर्थ

साधकानें आपल्या देहाचा शोध नीटपणें घ्यावा. त्यामध्यें स्थूल, सूक्ष्म तत्वें नीट शोधावीत. त्तवांचा शोध केल्यानें पिंडाची सबंध रचना कळून येते.

English meaning

Therefore the *wise should accept this search of the pinda; they should search through these gross elements that make up this body; if you search these gross elements then, the pinda and this world of `many' things can be understood by that atma. *(The wise are the ones who drop this inferior attention and witness).

12
मूळ

जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा । निश्र्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

तत्वांचा शोध केला तर असें आढळतें कीं, देह जड आहे. पंचभूतांचा आहे. देहामधील चंचळपणा किंवा जाणीव हा अंतरात्म्याचा गुण आहे. त्याचबरोबर निश्र्चळ परब्रह्म सर्वव्यापी असल्यानें तें नाहीं असें स्थानच नाहीं.

English meaning

The inert, gross body that has come from the great elements and this moving `all' are on account of this guna of that atma. But when `here' goes `there' then, how can there be any place other than that still brahman? (tukaram- sagun and nirgun, everything is govinda)

13
मूळ

निश्र्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

आपला पिंड जड देह, चंचळ आत्मा आणि निश्र्चळ परब्रह्म ही तीन तत्वें मिळून बनतो. या तत्वांचा निवाडा आपल्या पिंडांतच करुन घ्यावा. आनुभव घेतल्यावांचून बोलण्यास वजन येत नाहीं.

English meaning

There is the still, the moving and the inert/gross and these should be determined within the pinda. Therefore understand that this `speech' could not be present without that pure thoughtless nirgun.

14
मूळ

पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥

मराठी अर्थ

अंतरात्मा पिंडांतून निघून जातो. त्याप्रसंगी तत्वांचा निर्णय ध्यानांत येतो. आपल्या देखत पाहतां पाहतां देह जड होऊन पडतो.

English meaning

When that atma within the *pinda leaves then, one can easily understand that they were quite separate (maharaj- this body is a dead body at the moment. The power is there so it can speak). But taking ourself to be this inert body, that atma has come tumbling down from Its place, before your very eyes. *(When a dead corpse is seen on the funeral pyre, some get what is called, burning ground vairagya)

15
मूळ

जड तितुके पडिले । चंचळ तितुकें निघोनी गेलें । जडचंचळाचें रुप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥

मराठी अर्थ

जड तेवढें निश्र्चेष्ट पडतें.चंचळ तेवढें देह सोडून निघून जातें. पण या शनुभवावरुन जड व चंचळ यांचें स्वरुप आपल्या अनुभवास येते.

English meaning

But when due to that thoughtless understanding, the inert ceases and the moving goes away (ie. both the gross body and knowledge are rejected), then the inert and moving form becomes that nirgun understanding.

16
मूळ

निश्र्चळ आहे सकळां ठांई । हें तों पाहाणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्र्चळासी ॥ १६ ॥

मराठी अर्थ

निश्चळ मुळीं सर्व ठिकाणीं व्यापून आहे. तें कांहीं पहावें लागत नाहीं. निश्चळ स्वरुपांत कोणताच गुणविकार नसतो. केव्हांहि व कोठेंहि तें अगदी जसेंच्या तसेंच राहतें.

English meaning

This place of the `all' is that still brahman and if that thoughtless swarup wants to understand Its Self then, this `thing' is not required (ie. no-knowledge is required). For when this modified guna of knowing is not then, `there' is that still swarup.

17
मूळ

जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

पिंडाच्या बाबतींत जें खरें तेंच ब्रह्मांडाच्या बाबतींत खरें असतें. हा विचार अगदी उघड आहे. स्पष्ट आहे. जड आणि चंचळ नाहींसें झालें कीं, सर्व व्यापी घनदाट परब्रह्म तेवढें शिल्लक उरते.

English meaning

When one understands that the brahmanda is inert just like the pinda then, that thoughtless atma is seeing clearly. Then the inert and moving are destroyed and there is the Truth, and that is parabrahman.

18
मूळ

माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला । चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रीतीं ॥ १८ ॥

मराठी अर्थ

महाभूतांचा खंबीर केला-----म्हणजे रांधा करुन आंबवलेली कणिक----- त्यामध्यें आत्मा घातला, म्हणजे त्यामध्यें जाणीव घातली, तेव्हा त्याचा पुतळा तयार झाला. अशा रीतीनें पृथ्वीचा खटाटोप चालतो.

English meaning

When this structure made of the five great elements gets created (by objectification) then, that atma is taken to be this inert statue. And in this way, there are the confused actions of the gross world.

19
मूळ

आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥

मराठी अर्थ

खरें म्हणजे माया व अंतरात्मा सर्व बदल घडवून आणतात. पण ब्रह्मावर त्याचा आरोप घातला जातो. जो कोणी या सगळ्या गोष्टींचें विचारानें विवरण करतों तोच मनुष्य उत्तम होय.

English meaning

This antar-atma and maya create the modifications but the blame is put on brahman. However if one investigates this `all thing' then, it gets merged in that brahman and one becomes That.

20
मूळ

ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पाहातां जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

ब्रह्माची व्यापकता अगदी अखंड आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणीं बदल घडण्यास अवकाश असतो. नीट विचार करुन शोधून पाहिलें तर यांत समजण्यास अवघड असें कांहीं नाहीं.

English meaning

brahman is the One who pervades (ie. antar-atma) and that unbroken parabrahman. But the people of this world have a broken pervasiveness. However if they make a careful search then, this inanimate creation will be understood and this `thing' even will not remain.

21
मूळ

गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये । जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आकाशाला खंडित करतां येत नाहीं. आकाशाला आपण भेगा पाडूं शकत नाहीं. म्हणून महाप्रलय होऊन सृष्टीचा संव्हार झाला तरी आकाशाचा मुळींच नाश होत नाहीं.

English meaning

There should be no break in the sky. How can there be the destruction of the sky? For even when there is the great dissolution by vivek then, it is the gross creation that gets destroyed (therefore be like the sky).

22
मूळ

जें संव्हारामध्यें सांपडले । तें सहजचि नासिवंत जालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जें संहातामधें सांपडते ते स्वाभाविकपणें नाशवंत असतें. विचारवंत जाणत्या लोकांनी हें कोडें सोडविलें पाहिजे. त्यांनीं या गूढ गोष्टीचा उलगडा करणें जरुर आहे. जड आणि चंचळ दोन्ही आलें आणि गेलें तरी परब्रह्म अगदी जसेंच्या तसें कसें राहतें, हें सृष्टीचें कोडें आहे. जाणत्या लोकांनी त्याचा उलगडा करावा.

English meaning

However when this mula maya is discovered after the dissolution of the gross then, that natural Reality is appearing as this destructible `all'. Still by this knowing, this riddle/puzzle within the world, can be opened out and understood.

23
मूळ

न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें । म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥

मराठी अर्थ

पण या विश्र्वरचनेची गंमत अशी आहे कीं, जोपर्यंत ती कळत नाहीं तोपर्यंत ती गूढ वाटते. पण ती कळली कीं तिच्यामध्यें कांहीं गूढ नाहीं, ती अगदी सरळ व उघडी आहे, असें कळतें. म्हणून एकांतामध्यें जावें आणि अत्यंत विचार करुन हें गूढ उकलावें.

English meaning

When you do not understand that nirgun then, that hidden purush appears as some- thing else and when you understand that nirgun then, the seeing of the confused mind gets opened out (maharaj- be so open nothing remains). Therefore in your `aloneness', thoughtlessness should be understood.

24
मूळ

मिळतां प्रत्ययाचे संत । येकांतापरीस येकांत । केली पाहिजे सावचीत । नाना चर्चा ॥ २४ ॥

मराठी अर्थ

स्वानुभवसंपन्न असा कोणी संत भेटला तर मोठ्या सावधान चित्तानें अनेक विषयांवर त्याच्याशी चर्चा करावी. कारण अशा संताची भेट म्हणजे एकांतापेक्षांही मोठा एकांत असतो.

English meaning

When your thoughtlessness meets the nirgun of the Saint then, your `aloneness' is like His `aloneness'; then the `many' rumours become that pure knowledge.

25
मूळ

पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥

मराठी अर्थ

माणसानें शोधून पाहिलें नाहीं तर काहींच कळत नाहीं. त्याला कळूं लागले कीं कळतां कळतां त्याचे संदेह नाहींसे होतात. विवेकानें शोध केला तर मायाजाळ खरेंपणानें कोठेंच नाहीं अशी खात्री होते.

English meaning

But without first understanding this sagun, that nirgun cannot be understood and if this understanding is maintained continuously, then any body consciousness does not remain (ie. all eight bodies are dissolved). For when you completely understand vivek then, this net of maya is nowhere!

26
मूळ

गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें । आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

आकाशांत अभ्र येतें आणि लगोलग लगेच नाहींसे होऊन जाते. या अंतरात्म्याच्या आश्रयानें हें दृश्य विश्र्व भासतें. पण विवेकानें भ्रम नाहींसा झाला कीं तें लगेच नाहींसे होतें.

English meaning

In the sky, the clouds gathered and after, they dispersed of their own accord. Similarly, due to the atma, this visible appeared and due to its having appeared, it will fly away also (when you decide).

27
मूळ

मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी । तोचि निश्र्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥

मराठी अर्थ

विवेकी साधक विवेकानें विवरण करतां करतां अगदीं मूळमायेपासून अगदी शेवटपर्यंत जातो. आपल्या सूक्ष्म विवेकानें अशाश्वत तत्वांना तो बाजूस सारतो आणि जो कधी चळणार नाहीं असा स्वस्वरुप निश्र्चय करतो. त्याचा आत्मनिश्र्चय अत्यंत स्थिर असतो.

English meaning

When the viveki investigates from the beginning through to the end then, there arises the conviction of that paramatma and that does not deviate.

28
मूळ

वरकड निश्र्चय अनुमानाचें । अनुमानें बोलतां काये वेंचे । जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥

मराठी अर्थ

बाकीचे निश्र्चय अनुमानाच्या बळावर केलेले असतात. अनुमानाच्या आधारानें बोलायला माणसाचें कांहींच जात नाहीं. पण जे साक्षात्कारी जाणते पुरुष असतात ते अनुमानाच्या बोलण्याला मानत नाहींत.

English meaning

The convictions of the rest are conjectures and how can conjecture select this `speech'? But even when that purush knows this `experience' still, He is having no regard for His own Reality.

29
मूळ

उगें न बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

अनुमानाचें उगीच बोलणें कामास येत नाहीं. येथें सरसकट तर्क चालवून काम भागत नाहीं. माणसाचा तर्क देखिल अखेर दृश्यामधें घोटाळत असल्यानें, अतींद्रिय क्षेत्रामध्यें त्याला योग्य संचार करतां येत नाहीं. तेथें तो लटका पडतो.

English meaning

And tell me, if this `speech' of that still and silent swarup does become conjecture, then of what use is this conjecture? But `here' and this lumped together world of the `many' have no use of thoughtlessness (nobody wants to die).

30
मूळ

सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार । येकंकार भ्रष्टाकार । करुं नये ॥ ३० ॥

मराठी अर्थ

जो विचार दृश्यामधें उपयोगी पडतो तोच जर सूक्ष्माच्या क्षेत्रांत वापरला तर तेथें अविचार ठरतो. कांहीं लोक त्याला एकंकार म्हणतात. एकंकार हा भ्रष्टाचार असतो. आपण तो करुं नये.

English meaning

For when that thoughtless atma is this lumped together world then, that atma cannot think clearly. Then that One within the `many' is a jiva and says, "All this you see is Oneness." But that Oneness should not be made into this whirling confusion of a jiva (they may say, "Everything is One" but that is not their experience, it is intellectual understanding and so they are still lost in maya).

31
मूळ

कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें । जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

जें कृत्रिम आहे तें सारें सोडावें. जें शुद्ध असेल तें घ्यावें. पुनः पुनः समजून सारासार निवडावें. कृत्रिम म्हणजे सत्य नसून सत्यासारखें दिसतें तें, अर्थात् मिथ्या होय.

English meaning

Therefore the `many' artificial things that have been created by imagination should be dropped and that One pure Self within this `thing' should be accepted. By continuous knowing (forget everything that is seen or perceived by the mind), that essence (I am not) should be chosen from this non-essence (`I am'). .