जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १ ॥
जन्म हा दुःखरुपी वृक्षाचा अंकुर आहे. जसा जसा हा अंकुर वाढतो, म्हणजेच वृक्ष होतो तसे तसे दुःखही वाढत जाते. जन्म हा शोकाचा सागर आहे. समुद्र हा जसा नेहमी भरलेला असतो, तसेच मानसाचे जीवन दुःखांनी नेहमी भरलेलेच असते. जन्म हा भय भीतिचा डोंगर आहे. डोंगराप्रमाणेच भय पण हालत नाही.
Birth is the sprout of suffering. Birth is the ocean of sorrow. Birth is the mountain of fear which does not slip aside.