गुणरूप — समास 10: स्थितिनिरुपण

Fully populated

Sthiti Nirupan (A Discourse on the State [of the Self])

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

देउळामधें जगन्नाथयेक । आणी देउलावरी बैसला काक । परी तो देवाहून अधिक । म्हणों नये कीं ॥ १ ॥

मराठी अर्थ

एखाद्या देवळांत गाभार्‍यांत देव व देवळाच्या शिखरावर कावळा बसला तर तो कावळा देवापेक्षां श्रेष्ठ असें कोणी म्हणत नाहीं.

English meaning

Within the temple (ie. this `I am') there is the `Lord of the world' and on this temple there sits a crow. But he should not be said to be greater than God.

2
मूळ

सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी । परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसें मानावें ॥ २ ॥

मराठी अर्थ

राजवाड्यांत राजसभा भरली आहे. अशावेळी सभामंडपाच्या खांबावर माकड चढून बसले तर सभासद खाली बसलेले असून माकड त्यांच्यापेक्षां उंच जागी बसले म्हणून माकडाला सभासदांहून मोठा मानीत नाहीत.

English meaning

The assembled are sitting in the royal palace and a monkey (ie. your mind) climbs up upon a pillar there. But why would the wise honour him more than this assembly (`I am')?

3
मूळ

ब्राह्मण स्नान करुन गेले । आणी बक तैसेंचि बैसले । परी ते ब्राह्माणास भले । कैसे मानावे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

कांहीं ब्राह्मण तळ्यावर स्नान करुन व ध्यान करुन गेले. तेथेंच बगळेसुद्धा डोळें बंद करुन बसून राहीले. तर त्यांना ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाहीत.

English meaning

The brahmin (Knower of brahman) has taken His bath in the sacred river (the ganga of knowledge) and gone away. And the crane continues to stand in the waters. But why should he be honoured as pure like the brahmin?

4
मूळ

ब्राह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त । आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

ब्राह्मणांमधें कांहींजण नियम पाळणारे तर कांहीं न पाळणारे अव्यवस्थित आहेत. कुत्रा तर सदा ध्यानस्त बसलेला. तरी तो कांहीं ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाही.

English meaning

Within the brahmin there is the one who is restrained in passions and the one who is disorderly and confused (ie. jiva). And this dog (ie. jiva) is always lost in thoughts but not in that thoughtless.

5
मूळ

ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें । परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥

मराठी अर्थ

एखाद्या वस्तूकडे एकाग्र होऊन बघण्याची संवय कित्येक ब्राह्मणांपाशी नसते. पण मांजर एखाद्या वस्तुकडे एकाग्र होऊन बघूं शकते म्हणून तें कांहीं ब्राह्मणांपेक्षां श्रेष्ठ मानता येत नाही.

English meaning

The *brahmin does not concentrate on a particular form of meditation/mudra and the wise cat is totally concentrating on the mouse below him. But who would say that this concentration of the cat is greater than that pure knowledge of the brahmin? *(He concentrates on That which cannot be concentrated upon)

6
मूळ

ब्राह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद । परी तीस जाला ज्ञानबोध । हें तो न घडे कीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. पण माशी कोणताही भेद पाळत नाहीं. तिला उकिरडा व उत्तम अन्न दोन्ही सारखेंच असतात. असें असलें तरी माशीला आत्मज्ञान झालें असें कधी होत नाही.

English meaning

The brahmin understands vivek and sees no differences in this world. Yet even the fly sees shit and sugar as the same. Still has the understanding of knowledge come to the fly? He has not accomplished that thoughtless swarup.

7
मूळ

उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला । परी तो आहे परीक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

समजा, एखाद्या कनिष्ठ प्रतीच्या माणसानें भारी कपडे घातले आहेत व एखादा थोर पुरुष उघडाच बसला आहे. तर खरी परीक्षा करणारे जाणते लोक श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हें बरोबर ओळखतात.

English meaning

The lowly man adorns this body with the most expensive of clothes and the Saint is resting, naked and completely open. But He is a Knower knowing.

8
मूळ

बाह्याकार केला अधीक । परी तो अवघा लोकिक । येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥

मराठी अर्थ

बाहेरुन पुष्कळ देखावा केला तर तो व्यवहारांत चालतो. पण परमार्थांत मुख्य अंतर्निष्ठा लागते. ती नसेल तर परमार्थ लटका पडतो. अंतर्निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय.

English meaning

If someone dwells in the external then, he can make so much but, everything that he makes is worldly. `Here', inner faith in that Supreme One is required.

9
मूळ

लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला । मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

एखाद्यानें व्यवहारांमध्यें उत्तम लौकिक मिळवला. पण अंतर्यामींच्या स्वरुपाकडे लक्ष दिलें नाहीं, तर मुख्य देव त्यास प्राप्त होत नाहीं. असा मनुष्य आत्मघातकी होय. तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो.

English meaning

The one who has acquired worldly wisdom but is not alert within this inner space, has missed that Supreme God and so is a killer of his atma.

10
मूळ

देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक । भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥

मराठी अर्थ

देवतांची उपासना केली तर देवलोक मिळतो. पितरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो. भूतांची उपासना केली तर भूतलोक मिळतो.

English meaning

The one who makes his bhajan to a god will attain the world of that god. The one who makes the bhajan to his ancestors achieves the world of his ancestors (ie. this world of birth and death). And whoever makes the bhajan of the elements, will attain the elements (ie. objectify). (siddharameshwar maharaj asked his disciples to be the earth element for a week; experience being made of all that is dry and hard. Then he asked them to be the water element; experience being everything that is soft and malleable. And then fire and then wind and finally experience being space)

11
मूळ

जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें । निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

जो ज्याची उपासना करतो त्यास तो लोक मिळतो. निर्गुणाची उपासाना केल्यास माणूस स्वतः निर्गुणी बनतो.

English meaning

If one makes their bhajan to mula maya and knows nothing is true then, one goes to this world of the `all'. And if one makes their bhajan in the nirgun then, naturally there is that nirgun only.

12
मूळ

निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य । अनन्य होतां होईजे धन्य । निश्र्चयेंसीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांनी विचारलें निर्गुणाची उपासना कशी करावी ? वक्त्यानें सांगितलें कीं, आपण निर्गुणाशी अनन्य व्हावें, मीपणा बाजूस सारुन त्यांत मिसळून जावें. अशा रीतीनें निर्गुणाशी समरस होणारा निश्र्चितपणें धन्य होऊन जातो.

English meaning

How to do that nirgun bhajan? In the nirgun there should be `no-otherness' and when there is `no-other' then you are truly blessed.

13
मूळ

सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक । आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

एक देव ओळखण्यामध्यें जीवनांतील सगळ्या खटपटीचें सार्थक आहे. मी कोण आहे ? यावर सूक्ष्म विचार करावा.

English meaning

If this `all' is to achieve its final goal then, that One God should be recognized. vivek is when should search and find out, who am I. And then you should make yourself thoughtless.

14
मूळ

देव पाहातां निराकार । आपला तों माईक विचार । सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥

मराठी अर्थ

देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाहीं. अशा रीतीनें खोल विचार केला तर " मी तोच आहे. मी आत्माच आहे. असा निःसंशय निर्धार अंगीं बाणतो.

English meaning

When you understand God is formless then, your form is false and there is thou- ghtlessness. This so-ham atma (`I am atma') should totally imbibe that thoughtless understanding, I do not exist.

15
मूळ

आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं । देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥

मराठी अर्थ

मग कल्पना करण्याची गरज नसते. ब्रह्म जसें आहे. तसेंच स्वस्थानीं निःश्चल असतें. त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला कीं, ती खरी नाहीं. असा अनुभव येतो.

English meaning

When you rest in the `now' then, how can there be conjecture? Then how could there possibly be any conjecture when that Self is in Its own place? For when body consci- ousness has been thoroughly investigated then, even this `thing' is not. (This `thing' is a body also, it is your form. While He is formless)

16
मूळ

सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान । मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥

मराठी अर्थ

" मी आत्माच आहे " असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्यास साधन चिकटवणें म्हणजे केवळ कल्पना होय. जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचें बंधन असणें शक्य नाहीं.

English meaning

If `many' sadhanas are brought to the siddha then, that thoughtless Self has become the conjectures of this world. If bondage is brought to the Liberated then that thoughtless swarup can never meet Its own Self. (You are the liberated siddha and there are so many different kinds of sadhanas when you feel, "I am bound". A change of mind is all that is required, `I was and am forever free, what need do I have of concepts now')

17
मूळ

साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें । आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥

मराठी अर्थ

साधन करुन जें कांहीं साधायचें तें आत्मस्वरुप स्वतःच बनल्यावर साधन संपतें. तेथें साधकावस्था संपते.

English meaning

If this `thing' is acquired through sadhana then, that thoughtless Reality has become you (`I am'). And when there is this `I am' of the sadhak then, he is dwelling in zero/nothing (sadhak/achiever, sadhana/ the achieving and sadhya/ the thing to be achieved).

18
मूळ

कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावीं । कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

समजा एका कुंभाराला राज्यपद मिळालें तर तो गाढवें सांभळण्याचें काम करत नाहीं. कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करत नाहीं.

English meaning

But if the potter attains the King's throne, why would he now continue to take care of his donkey (ie. the body)? For why would he need the toil and trouble of being a potter?

19
मूळ

तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव । साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें कोनतेही साधन करायचें म्हणजे त्याचा वृत्तीशी अती निकट संबंध असतो. आणि आत्मस्वरुप बनण्यासाठीं वृत्तीरहित व्हावें लागतें. यामुळें आत्मज्ञान साध्य झाल्यावर वृत्ति निर्माण होत नाहीं म्हणून साधन होऊं शकत नाहीं.

English meaning

In the same way, when everything in the world becomes the understanding of this knowing vritti then, why is there the need for the `many' sadhanas? And when there is the accomplished/siddha then, where is the place for accomplishing/sadhana (ie. knowing)?

20
मूळ

साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें । आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥

मराठी अर्थ

साधनानें आपल्याला काय साधावयाचें आहे. आणि नियमानें वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे. याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व योग्य असावा. आपण आत्मस्वरुप असल्यानें उगीच भलत्या कल्पनांनी चूकीच्या मार्गानें जाऊं नये.

English meaning

What then could possibly be achieved by achieving? What fruit can be obtained by the one who has reached their goal? When you are the Self, why should You wander?

21
मूळ

देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा । परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥

मराठी अर्थ

देहाचा विचार केला तर तो आहे पांच भूतांचा. जीवाचा विचार केला तर तर तो अंश आहे ब्रह्माचा. आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो हें लक्षांत ठेवावें.

English meaning

If you are a body then you are made up of five elements and if you are a jiva then, you are just a part of brahman. Understand, you are paramatma and then there is that place of no-otherness.

22
मूळ

उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेता कांहींच नसे । तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥

मराठी अर्थ

उगीच पाहिलें तर मीपण दिसते. पण विचारानें त्याचा शोध घ्यावयास गेल्यावर तें खरें नाहीं असें आढळतें. एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचें निरसन करत गेले असतां सगळें दृश्य खरें नाहीं असे अनुभवास येते. नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरुप तेवढें शिल्लक उरते.

English meaning

If you superficially look then, this I-ness sees a world of `many' forms. But when a thorough search is made then, this `thing' (I-ness) even is not. For when each element is dissolved into the previous element then, afterwards there is that pure atma.

23
मूळ

आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें । माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥

मराठी अर्थ

आत्मा- स्वस्वरुप हे आत्मपणानें असतें. जीव जीवपणानें राहतो. माया मिथ्यापणानें सगळीकडें पसरुन राहते.

English meaning

You are that atma by being the atma. You are the jiva by being a jiva. And maya/illusion is due to you being maya and then, this maya expanded. (You are wha- tever you believe your Self to be!)

24
मूळ

ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे । हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥

मराठी अर्थ

असें हें सगळें आहेपणानें दिसतें. आणि त्याचबरोबर मी कोणीतरी एक आहे असें वाटतें. यांपैकी खरें आहेपण कशाला आहे, शुद्ध अस्तित्व किंवा खरेपण कोणास आहे, हे शोधून काढतो तो खरा ज्ञानी होय.

English meaning

Because of this world, you are a jiva and yet you also are that One within this `I am'. When that thoughtless Self searches and understands this `all' (I-ness) then, He is the gnyani.

25
मूळ

शोधूं जाणें सकळांसी । परी पाहों नेणे आपणासी । ऐसा ज्ञानी येकदेसी । वृत्तीरुपें ॥ २५ ॥

मराठी अर्थ

ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्यें वावरणारा शोधक ज्ञेयरुपानें पुढें येणारें सर्व जग जाणतो. त्याचा शोध घेतो. पण मीपणानें जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता त्याचा शोध कोणी करत नाहीं. जगाचें ज्ञान वृत्तिरुप असल्यानें मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्णज्ञानी समजावा.

English meaning

If one *searches then, this `all' can be found. But if the one who understands this `all' does not know that He is knowing His own reflection then, such a gnyani is limited to this `I am' form. *(Seek and ye shall find; knock and the door will be opened; maharaj- where there is a will, there is a way)

26
मूळ

तें वृत्तिरुप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें । प्रकृतिनिरासें अवघें चि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीचे ज्ञान वृत्तिरुप असतें. त्या वृत्तिचें नीट परीक्षण केलें तर सगळ्या वृत्ति कल्पनेनें भरलेल्या आहेत हें लक्षांत येईल. कल्पनेनें निर्माण केलेलें खरें असूं शकत नाहीं. अशा रीतीनें प्रकृतीनें निर्माण केलेलें सर्व दृश्य विकारवंत व चंचल म्हणून खोटें ठरते.

English meaning

But when He understands this `I am' form, then this will not remain. When this world of many forms and this prakruti are cast off then, the Knower of these modifications is also gone. (When nothing is known, how can the Knower remain the Knower)

27
मूळ

उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण । ऐसी परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥

मराठी अर्थ

एकदेशी व परिछिन्न दृश्य लय पावलें कीं शेवटी केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरुप उरते. अधिक विवेक केल्यास तें स्वरुप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. परमार्थाची ही अशी अत्यंत खोल व गहन खूण आहे.

English meaning

Then that pure nirgun remains. Through investigation, you are That only. Such is that thoughtless understanding of paramarth. It is unfathomable (beyond mind and logic).

28
मूळ

फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक । फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥

मराठी अर्थ

परमार्थाचा विचार वेगळा आहे. वस्तु जाणणारा ज्ञाता आणि जाणायची वस्तु ज्ञेय ही दोन्ही या विचारांमध्यें वेगळे राहात नाहीत. या विचारामध्यें ज्ञाता स्वतः ज्ञेयरुप बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन तें ज्ञान घडते.

English meaning

But if there is this fruit of the known and the One who knows then, you are there, I-ness is there. Then that One and the other remain and there cannot be the vivek of no-otherness. The fruit of all fruit is that One within this `I am' and That should naturally be.

29
मूळ

रंक होता राजा जाला । बरें पाहातां प्रत्यये आला । रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥

मराठी अर्थ

एक भिकारी होता. तो राजा झाला. आपण खरोखर राजे आहोत असा त्यास अनुभव आला. मग भिकारीपणाची धडपड करणें त्यास शोभणार नाहीं. त्याचप्रमाणें आत्मज्ञानी पुरुष वृत्तिरुप ज्ञानाची धडपड करणार नाहीं.

English meaning

Then the beggar has become the King (ie. atma). When you understood thoughtlessness then, you are that nirgun Self. Only the beggar begs! (We beg from the objects of the world, please make me happy. But the one who is desireless, is the atma)

30
मूळ

वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरुपणें । सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥

मराठी अर्थ

वेद, शास्त्रें, पुराणें, नाना प्रकारची साधनें, निरुपणें, सिद्ध आणी साधु ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपडतात,

English meaning

There are the vedas, the shasthras and the puranas; there are the `many' discourses and `many' sadhanas. You are the siddha and sadhu but on account of all these sadhanas, That makes `many' great efforts.

31
मूळ

तें ब्रह्मरुप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें । करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

तें ब्रह्मस्वरुप आपण स्वतःच आहोंत असा अनुभव आल्यानंतर कर्म-अकर्माची समस्या उरत नाहीं. प्रसंग आला असतां सारासार विचार करुन हें करणें बरें कीं तें करणें बरें हा प्रश्र्ण लटका होऊन कांहीं कर्तव्यच शिल्लक उरत नाही.

English meaning

You are brahman's form on account of your `all' body but, when this becomes that thoughtless Self and this `thing' is not, then the question of `to do' or `not to do' does not arise. (To do or not do sadhana does not arise; am I there or am I not there, does not arise when there is no-otherness)

32
मूळ

रंक राजआज्ञेसि भ्याले । तेंचि पुढें राजा जालें । मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

एक गरिब माणूस राजाज्ञेला भीत असे. पुढें तो स्वतःच राजा झाला. राजा होताक्षणीच त्याची गरीबी जशी नाहीशीं झाली तसें त्याचे भयही नाहीसें झाले.

English meaning

The beggar had fear of the King's orders. But then the beggar became the King and left his fears, along with his begging.

33
मूळ

वेदें वेदाज्ञेने चालावें । सच्छास्त्रें शास्त्र अभ्यासावें । तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. तीर्थस्वरुप होतो. वेदानें वेदांची आज्ञा पाळावीत. वेदांतशास्त्रानें शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थानें तीर्थयात्रा करावी, हे जसें अशक्य व अयोग्य असते तसें ज्ञानी पुरुषास दृश्याची बंधनें किंवा मर्यादा घालणें योग्य नसतें.

English meaning

Then why would the vedas follow the dictates of the vedas? Then why would the shas- thras study the shasthras and why would the place of pilgrimage go to the pilgrimage place?

34
मूळ

अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत । भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

तसेंच अमृतानें अमृत प्यावें. अनंतानें अनंत पाहावा. भगवंतानें भगवंताचे ध्यान करावें. हें घडणें शक्य नसतें.

English meaning

Then why would the nectar of immortality drink the immortal nectar and how would the endless see the *endless and why would God concentrate on God? *(You are the immortal, endless God; maharaj- put an end to the `endless')

35
मूळ

संतें असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें । स्वरुपें स्वरुपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

संत म्हणजे सदा, सर्वत्र पूर्णपणें व्यापून असणारें ब्रह्मस्वरुप होय. असंत म्हणजे जें कधी नव्हतेंच नव्हतें तें भासरुप होय. जे सदा आहेच आहे त्याने जे कदा नाहींच नाहीं तें टाकावें, निर्गुणानें निर्गुणाचा भंग करावा. स्वस्वरुपानें स्वरुपामध्येंच रंगून जावें , हें घडणें शक्य नसतें.

English meaning

Then how could the Truth give up the untrue and how could the nirgun break the nirgun and how could that swarup have the pleasure of Its swarup?

36
मूळ

अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन । निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

अंजनानें स्वतःला अंजन घालावें. धनानेंच धनाची प्राप्ती करुन घ्यावी. शुद्ध परमात्मस्वरुपानें तशाच परमात्स्वरुपाचा अनुभव घ्यावा. हें घडणें शक्य नसतें.

English meaning

Then why would anjana be applied to the anjana (maharaj- that which gives the vision of knowledge)? And what wealth could wealth acquire? And how could that which is beyond experience, experience Itself?

37
मूळ

साध्य करावें साधनासी । ध्येंयें धरावें ध्यानासी । उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

जें स्वतः साध्य आहे त्यानेंच साधना करावी. जें स्वतः ध्येय आहे त्यानेंच घ्यान लावावें. जो स्वतः उन्मन बनला आहे त्यानें मन आवरावें या गोष्टी घडणें शक्य नसतें. संगण्याचा भावार्थ असा कीं, आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या व पंचमहाभूतांच्या कक्षेपलीकडे गेलेला असतो. दृश्याच्या सार्‍या कल्पना तेथें लटक्या पडतात. आपण त्याच्याबद्दल जी जी कांहीं कल्पना करुं ती देहबुद्धीची असल्यानें द्वैतप्रधान असते. आणि तो तर संपूर्ण अद्वैतसाम्राज्यांत राहतो. म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेनें त्याच्या स्थितिची कल्पना द्यावी लागते.

English meaning

Then what would achieving achieve? Then how could there be a meditation that holds an object of meditation? And then where would there be a mind that has to be cont- rolled by unmana (ie. no-mind)? .