भीमदशक — समास 1: सिद्धांतनिरुपण

Fully populated

Siddhant Nirupan (A Discourse on the Truth)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

आकाशापासून वायो होतो । हा तो प्रत्यये येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥

मराठी अर्थ

आकाशापासून वायु होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. वायूपासून अग्नि होतो, तो कसा होतो ते लक्ष देऊन ऐका.

English meaning

From the space (ie. mula purush) there appears the wind (ie. mula maya) and due to *thoughtlessness the understanding, I do not exist, comes. From the wind that atma becomes the fire (due to further objectification). Therefore that purush should remain alert and listen. *(Thoughtlessness is like the mula purush; He is ever aloft. His mere presence gives illuminates mula maya)

2
मूळ

वायोची कठिण घिसणी । तेथें निर्माण झाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥

मराठी अर्थ

वायूमध्यें जें कठीण घर्षण होते त्याच्यापासून अग्नि निर्माण होतो. मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते.

English meaning

The wind has a *hardness and so there is some friction and `there', fire is created. This cools down when the wind is very slow and from `there', water appears (ie. becoming more and more objective). *(Ignorance is there)

3
मूळ

आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरुप जाणावी । बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते. पृथ्वीमधें अनेक बीजे आहेत. बीजापासून वनस्पतींची, प्राणीमात्रांची निर्मिती होते हा निसर्गाचा नियमच आहे.

English meaning

Then from this water appears the earth element and this should be known as the seed of the `many' thoughts. From this seed that thoughtless Self takes birth in the gross world of `many' forms (therefore this gross creation can be traced back to that thoughtless Reality).

4
मूळ

मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । जयेपासून देवत्रयाची । काया जाली ॥ ४ ॥

मराठी अर्थ

हें दृश्य विश्व कल्पनामय आहे. कल्पना मुळ मायेपर्यंत पोहोचते. ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव मूळमायेंतूनच आले.

English meaning

At the root this gross creation is an *idea/concept and even this root is an idea. From this mula maya there has appeared the gross body made up of three gods/gunas. *(Like the great banyan tree within the seed, the potential is in the root but the root is not the world)

5
मूळ

निश्र्चळामधें चंचळ । ते चि कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारुप ॥ ५ ॥

मराठी अर्थ

निश्चल ब्रह्मामधें चंचल दिसणें हें कल्पनेचें अगदी प्रथम स्वरुप होय. म्हणून अष्टधा प्रकृति कल्पनेतून निर्माण झाली.

English meaning

In the still there is a movement and that pure knowledge becomes an idea/concept. The root of the eight-fold prakruti is this form and it is a concept.

6
मूळ

कल्पना तेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामूर्ती । मुळापासून उत्पत्ति । अष्टधा जाणावी ॥ ६ ॥

मराठी अर्थ

कल्पना आकार घेऊन आली ती अष्टधा प्रकृति होय. म्हणून अष्टधा प्रकृति कल्पनारुप आहे. मुळापासून शेवटपर्यंत सर्व सृष्टि अष्टधा आहे हे जाणावे.

English meaning

When there is this concept then, that Reality has become like the eightfold creation. Therefore this eightfold creation is the created image of that Reality. This birth of the eightfold creation should be known at the root of all creation (therefore understand this prakruti/purush).

7
मूळ

पांच भूतें तीन गुण । आठ जालीं दोनी मिळोन । म्हणौनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥

मराठी अर्थ

पांच भूतें व तीन गुण मिळून आठ तत्वें होतात. यामुळें सृष्टिला अष्टधा असे म्हणतात.

English meaning

There are the five elements and the three gunas and these eight appeared due to this coming together of prakruti and purush. Know that the eightfold prakruti at the root is this `speech' (the gunas and the elements are unmanifest `here' but manifest due to desire, thinking etc. Still by vivek they dissolve back into their source and then, what remains is prakruti/purush ie. forget everything and there will be this effortless knowing only).

8
मूळ

मुळीं कल्पनारुप जाली । पुढें तेचि फापावली । केवळ जडत्वास आली । सृष्टिरुपें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

मुळांत सूक्ष्म कल्पना होती. नंतर ती फोफावली व वाढली नंतर विश्र्वाच्या रुपानें तिनें दृश्य आकार धारण केला.

English meaning

At the root appeared this concept-form `I am' and after, this became noisy and arrogant and that pure knowledge became these gross forms of creation.

9
मूळ

मुळीं जाली ते मूळमाया । त्रिगुण जाले ते गुणमाया । जडत्व पावली ते अविद्या माया । सृष्टिरुपें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

अगदी मूळ ब्रह्मामध्यें जी कल्पना झाली ती मूलमाया होय. तिच्यांत गुण प्रगटले तेव्हां ती गुणमाया झाली. आणि दृश्य, इंद्रियगोचर विश्वाच्या रुपानें ती जडत्व पावली तेव्हां ती अविद्यामाया बनली.

English meaning

At the root that Reality has appeared as mula maya and then the three gunas became evident and that Reality became guna maya; and when grossness increased then that Reality was avidya maya (ie. maya of ignorance) and the gross world appeared. (All is nothing but that Reality)

10
मूळ

पुढें च्यारी खाणी जाल्या । च्यारी वाणी विस्तारल्या । नाना योनी प्रगटल्या । नाना वेक्ती ॥ १० ॥

मराठी अर्थ

त्यानंतर जीवाच्या चार खणी झाल्या. चार वाणींचा विस्तार झाला. शेवटी अनेक प्रकारच्या योनी व त्यांत अनेक जीवप्राणी उत्पन्न झालें.

English meaning

Ahead, the four sources of birth appeared and the four speeches expanded. Then there are the `many' wombs and the `many' individual forms. (V. 9-10 have described the three stages of creation, this is described in detail in 20-2/3)

11
मूळ

ऐसी जाली उभारणी । आतां ऐका संव्हारणी । मागील दशकीं विशद करुनि । बोलिलें असे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

याप्रमाणें विश्र्वाची उभारणी झाली. आतां विश्र्वाची संहारणी ऐकावी. संव्हारणीचा क्रम मागील दशकांत सविस्तर सांगितला आहे.

English meaning

Like this the creation appeared. Now, listen to its destruction, for this clear `speech' that is previous to these individual forms had been entangled within the ten senses (this `I am' had been reduced to body consciousness).

12
मूळ

परंतु आतां संकळित । बोलिजेल संव्हारसंकेत । श्रोते वक्ते येथें चित्त । देऊन ऐका ॥ १२ ॥

मराठी अर्थ

या ठिकाणीं सव्हांर क्रम थोडक्यांत सांगतो. श्रोत्यावक्त्यांनी लक्ष देऊन ऐकावें.

English meaning

But now, that will be reversed and by the forming of this `I am' there will be the destruction of body consciousness. The listener `here' should give his mind to that speaker `there'. Therefore just listen.

13
मूळ

शत वरुषें अनावृष्टि । तेथें आटेल जीवसृष्टि । ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्रीं निरोपिल्या ॥ १३ ॥

मराठी अर्थ

शंभर वर्षें पाऊस न पडल्यानें पृथ्वीवरील सर्व जीव नाश पावतील. हा कल्पान्त कसा घडून येईल याचे वर्णन शास्त्रां मध्यें आढळते.

English meaning

Then there will be no rain for a hundred years (the mind will be void of ideas and concepts) and `there', the world of the jiva will dry up. Such is this `story' of God; it is the end of thoughts and concepts and this is the discourse within the shasthras (neti,neti).

14
मूळ

बाराकळीं तपे सूर्य । तेणें पृथ्वीची रक्षा होये । मग ते रक्षा विरोन जाये । जळांतरी ॥ १४ ॥

मराठी अर्थ

बारा प्रकारच्या किरणांनी सूर्य तापेल. त्यामुळें पृथ्वीची राख होईल. ती राख पाण्यांत विरुन जाईल.

English meaning

In this *`time of the twelve' the sun shines brilliantly (all is forgotten and there is only knowing) and due to this, the earth element will be turned to ashes. Then this ash will get dissolved in the waters. *(Where the One has become two, prakruti/purush)

15
मूळ

तें जळ शोषी वैश्र्वानरु । वन्ही झडपी समीरु । समीर वितुळे निराकारु । जैसें तैसें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

अग्नि ते पाणी शोषून घेईल. त्या अग्नीला वायु विझवून टाकील. शेवटी वायूही नाहींसा होतो व निराकार ब्रह्म मात्र जसेंच्या तसे शिल्लक राहते.

English meaning

These waters will dry it up due to the fire element and after the wind will extinguish the fire. Then the wind will dissipate and that formless is, just as it always is.

16
मूळ

ऐसी सृष्टिसंहारणी जाली । मागां विस्तारें बोलिली । मायानिरासें उरली । स्वरुपस्थिति ॥ १६ ॥

मराठी अर्थ

सृष्टिचा संव्हार असा घडतो. मागे तो सविस्तर सांगितला आहे. अशा रीतीनें विश्र्वाचा संव्हार झाल्यावर मायेचा निरास होतो. मायेचा निरास झाल्यावर केवळ निर्विकार स्वरुपस्थिती उरते.

English meaning

Like this is the dissolution of the gross world. Previously, this `speech' had expanded out and become the `many' thoughts, but if maya is discarded, then that swarup will remain.

17
मूळ

तेथें जीवशिव पिंडब्रह्मांड । आटोन गेलें थोतांड । मायेअविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

तेथें जीव नाही, शिव नाही, पिंड नाही तसेंच ब्रह्मांडही नाही. हें सगळें कल्पनेचे थोतांड नाहीसें होते. माया व अविद्या यांचे बंड मावळून जाते.

English meaning

`There' the jiva and shiva and the pinda and brahmanda dry up and these fabrications are destroyed. `There' the hearsay and commotion of guna maya and avidya maya melt away.

18
मूळ

विवेकेंचि बोलिला क्षये । म्हणोनि विवेकप्रळये । विवेकी जाणती काये । मूर्खास कळे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

विवेकानें जो दृश्याचा संहार करायचा त्याला विवेकप्रळय म्हणतात. हा प्रलय कसा करावचा ते विवेकी पुरुष जाणतात. मूर्खांना ते कळणार नाही.

English meaning

With vivek even this `speech' gets utterly destroyed and therefore, there is the disso- lution by vivek. The viveki (one who uses vivek) knows these things but what can the foolish understand of this?

19
मूळ

सृष्टि शोधितां सकळ । येक चंचळ येक निश्र्चळ । चंचळास कर्ता चंचळ । चंचळरुपी ॥ १९ ॥

मराठी अर्थ

सारें विश्र्व शोधून पाहीलें तर दोन तत्वें आढळतात. एकचंचळ व दुसरें निश्र्चळ. चंचळाचा कर्ता चंचळ असून तो चंचळ स्वरुप असतो.

English meaning

When the gross creation is searched through, this `all' is discovered and then, the One is moving (ie. sagun) and the One is still (ie. nirgun). When there is this moving then, that `doer' within the moving form is moving (the Knower forgets Himself and takes this moving form as His own self).

20
मूळ

जो सकळ शरीरीं वर्ते । सकळ कर्तुत्वास प्रवर्ते । करुन अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥

मराठी अर्थ

तो सर्व प्राण्यांच्या शरीरांत राहतो. ती शरीरें चालवतो. शरीराच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. तो करुन अकर्ता आहे. अशा शब्दांनी त्याचे वर्णन करतात.

English meaning

That purush exists within this body of the `all' and it is this `all' that is engaged in the role of doing. And while there is this doing then, that non-doing thoughtless Self exists as this `I am' of mula maya. (This doing or knowledge is due to this subtle relationship of prakruti and her ever-present purush)

21
मूळ

राव रंक ब्रह्मादिक । सकळांमधें वर्ते येक । नाना शरीरें चाळक । इंद्रियेंद्वारें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

गरीब, श्रीमंत आणि ब्रह्मांदिक देव या सर्वांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवतो. इंद्रियांच्या मार्फत अनेक देहांचे व्यवहार तो चालवतो.

English meaning

The king, the pauper and lord brahma etc. are in truth, that One that exists within this `all'. But on account of this `all' body, these `many' bodies (like king, pauper etc.) are made to move by the sense-organs (five of knowledge and five of action; the eyes see something and you want and then the legs make the body to move).

22
मूळ

त्यास परमात्मा बोलती । सकळ कर्ता ऐसें जाणती । परि तो नासेल प्रचिती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

त्याला परमात्मा असे म्हणतात. तो सर्व कर्ता आहे ही गोष्ट सर्व जाणतात. परंतु तो देखील अखेर नाश पावणारा आहे, याचे खरें-खोटेपण विवेकानें शोधून पहावें.

English meaning

When that paramatma `speaks' then, He becomes the Knower and there is this `all' and a `doer'. Still through vivek one will come to understand that, that purush is truly not in this `experience'.

23
मूळ

जो स्वानामधें गुरगुरितो । जो सूकरांमधें कुरुकरितो । गाढवीं भरोन भुंकतो । आटाहास्यें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

कुत्र्यामधें तो गुरगुरतो. डुकरामधें तो कुरकुरतो. गाढवाच्या अंतर्यामी भरुन तो अट्टहासानें ओरडतो.

English meaning

That atma purush barks in the dog; and that purush squeals in the pig; and in the donkey it brays loudly and toils hard.

24
मूळ

लोक नाना देह देखती । विवेकी देहांत पाहाती । पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

सामान्य माणसे प्राण्यांचा वरवरचा तेवढा देह पाहतात. पण विवेकी माणसें त्यांच्या अंतर्यामी राहणार्‍या जाणीवकलेकडे पाहतात. अशा रीतीनें जाणते लोक सर्व प्राण्यांना सारखेपणानें समजतात. व तसें वागवतात.

English meaning

Yet still that One perceives this world and the `many' bodies. The viveki understands the end of this body and due to this, He accepts the pandit (ie. scholar) and the `many' creatures with equal regard.

25
मूळ

देह पाहातां वेगळाले । परंतु अंतर येकचि जालें । प्राणीमात्र देखिलें । येकांतरें ॥ २५ ॥

मराठी अर्थ

प्राण्यांचे देह पाहीले तर ते वेगवेगळे दिसतात. पण सर्वांचे अंतःकरण मात्र एकच असते. त्यामुळे विवेकी माणसे अंतरंगाकडे लक्ष देऊन सर्वांना सारखेपणाने पाहतात.

English meaning

The gross body is understood and passed over, but then that One appears like this inner space. Still understand that it is on account of that One within the inner space that the one in only the prana is perceived (ie. He is the One and He is the Knower and He is whatever is known also).

26
मूळ

अनेक प्राणी निर्माण होती । परी येकचि कळा वर्तती । तये नांव जगज्जोती । जाणतीकळा ॥ २६ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारचे प्राणी निर्माण होतात हे खरें. परंतु त्या सगळ्याांना वागवणारी व चालवणारी जीवनकला एकच आहे. तिला जगत्ज्योति किंवा जाणीवकला म्हणतात.

English meaning

That One is the numerous different forms that have been created in the prana and still that One also exists as this `art of knowing'. Therefore understand that that Reality has become the `light of the world' and this `art of knowing' (existence and knowledge).

27
मूळ

श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमधें सीतोष्ण जाणे । चक्षुमधें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥

मराठी अर्थ

कानाच्या द्वाराने ती अनेक शब्द जाणते. त्वचेच्या द्वारानें ती थंडगरम जाणते. डोळ्यांच्या द्वारानें ती अनेक पदार्थ पहाणें जाणते.

English meaning

In the ears, He knows that the `many' words are this `word'; in the skin, He knows hot and cold (He knows but He does not say good, bad etc.); in the eyes, He understands that the `many' objects are this `object' of the `all' (ie. He sees what the ignorant sees, but He knows the true nature of that which is before His eyes).

28
मूळ

रसनेनधें रस जाणे । घ्राणामधें वास तो जाणे । कर्मइंद्रियामधें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥

मराठी अर्थ

जिभेच्या द्वारे ती रस जाणते. नाकाच्या द्वारे ती वास घेणे जाणते. कर्मेंद्रियांच्या द्वारे ती अनेक प्रकारच्या देहसुखाची गोडी घेण्याचे जाणते.

English meaning

In the tongue He knows the taste; in the nose, that purush knows the smell; in the organs of action He knows the experience of the `many' sense objects.

29
मूळ

सूक्ष्म रुपें स्थूळ रक्षी । नाना सुखदुःखे परीक्षी । त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥

मराठी अर्थ

स्वतः ती सूक्ष्मरुप आहे. पण आपण सूक्ष्म असून ती स्थूल देहाचें रक्षण करते. नाना प्रकारच्या सुखदुःखांची बरोबर परीक्षा करते. अंतर्यामी राहणार्‍या या सूक्ष्म जाणीवकलेला अंतरसाक्षी किंवा अंतरात्मा म्हणतात.

English meaning

That brahman protects these gross forms through His form (He uses knowledge but remains untouched). He examines the `many' pleasures and pains and it is He only who calls that paramatma, the inner-witness and inner-atma (the ignorant may say the paramatma and the antar-atma are the same but understanding is required. He is the knowledgeable and the ignorant also; He is everything).

30
मूळ

आत्मा अंतरात्मा विश्र्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा । जीवात्मा शिवात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारुप ॥ ३० ॥

मराठी अर्थ

तिची आणखी नांवे अशी आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, परमात्मा, शिवात्मा, द्रष्टा, साक्षी व सत्तारुप.

English meaning

He is the atma, the inner-atma and the universal atma; He is the chaitanya, atma of `all' and the subtle atma; He is the jivatma, shivatma and paramatma; the seer, the witness and this form called existence.

31
मूळ

विकारामधील विकारी । अखंड नाना विकार करी । तयास वस्तु म्हणती भिकारी । परम हीन ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

जगत् ज्योती विकारामधिल विकार आहे. व ती अखंडपणें नाना विकार निर्माण करते. तरी कांहीं झाले तरी ती निश्र्चळ परब्रह्म वस्तु होऊं शकत नाही. परंतु अनुभवाने व विवेकानें दरिद्री असलेले हीन पातळीवरील लोक त्याजगत ज्योतीलाच ब्रह्मवस्तु म्हणतात.

English meaning

When that unbroken brahman is in the modifications that are within this modification (within the `many' that is within the `all') then, He is the doer of `many' modifications (ie. the ego). Then that Self says `many' things and that Supreme becomes the lowest of beggars (and imagines all kinds of concepts and seeks happiness in all kinds of ways).

32
मूळ

सर्व येकचि दिसती । अवघा येकंकार करिती । ते अवघी माईक स्थिती । चंचळामधें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

अशा अध्यात्मदरिद्री लोकांना निश्चळ व चंचळ सगळें एकच दिसते. सगळ्यातत्वानां एकत्र घालून त्यांचा ते सबगोलांकार करतात. असें करणें हेही चंचळामध्यें असणार्‍या मायिक स्थितीचा परिणाम आहे.

English meaning

This `all' is the One appearing and everything in this gross world is that One doing. That One is the falseness of everything and that One is the still within the moving.

33
मूळ

चंचळ माया ते माईक । निश्र्चळ परब्रह्म येक । नित्यानित्यविवेक । याकारणे ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

चंचळ किंवा विकारी तेवढें सगळें मूळमायेंतून निर्माण होते. ते खरे नसते. निश्र्चळ परब्रह्म तेवढें एकटेंच खरें असते. या खर्‍याखोट्याचा निश्र्चित अनुभव येण्यासाठीं नित्य किंवा निश्र्चळ काय आणि अनित्य किंवा चंचळ काय याचा विवेक करायचा असतो.

English meaning

When there is this moving maya then, that One is the illusion and when there is the still then, that One is parabrahman. By means of this `speech' there is this vivek between the destructible one and the indestructible One.

34
मूळ

जातो जीव तो प्राण । नेणे जीव तो अज्ञान । जन्मतो जीव तो जाण । वासनात्मक ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

जीव जातो असे आपण म्हणतो तेव्हां माणसाचा प्राण जातो. जीवाला कळत नाहीं असें आपण म्हणतो तेव्हां तें अज्ञान असते. जीव जन्मतो असे आपण म्हणतो तेव्हां वासना साकार होऊन येते.

English meaning

When the jiva passes away, then that atma is the *prana that leaves the body; when the jiva does not know, then that atma is its ignorance; know that when that atma takes birth as the jiva, it is that atma who is the vasana (ie. great desire to be). *(maharaj the whole world rides on the breath)

35
मूळ

ऐक्य जीव तो ब्रह्मांश । जेथें पिंडब्रह्मांडनिरास । येथें सांगतले विशेष । चत्वार जीव ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो असें आपण म्हणतो तेव्हां जीवांतील ब्रह्मांशाला उद्देशून बोलतो. ब्रह्माशी तदाकार स्थितीमध्यें पिंडब्रह्मांडाचा निरास होतो. येथे जीव देखील चार प्रकारचे सांगितले आहेत.

English meaning

When the jiva which is a part of brahman unites with shiva which is a part of brahman then, that atma is shiva and then the pinda and the brahmanda are dissolved `here' (and His shakti is perceived). On account of this pure sattwa guna of mula maya there are these *four and the jiva. *(prana, ignorance, vasana and shiva)

36
मूळ

असो हे अवघें चंचळ । चंचळ जाईल सकळ । निश्र्चळ तें निश्र्चळ । आदिअंतीं ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

असो. हे सगळें चंचळ आहे. तें चंचळ आहे म्हणून विनाशी आहे. पण जें निष्चळ आहे ते आरंभापासून अखेरपर्यंत अविनाशी असते.

English meaning

Thus, that thoughtless swarup is the world of `many' forms and this moving `all'. But even this moving will be destroyed (even knowledge should not be taken as true) and that still Reality, is from beginning to end.

37
मूळ

आद्य मध्य अवसान । जे वस्तु समसमान । निर्विकारी निर्गुण निरंजन । निःसंग निःप्रपंच ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

आरंभ, मध्य व अखेर या तिन्ही अवस्थांमध्यें जी वस्तु विकाररहित राहते , थोडाही बदल न होतां जशीच्या तशी राहते, ती परब्रह्म वस्तु होय. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निःसंग व निःप्रपंच असते.

English meaning

If in the beginning, in the middle and in the end this mula maya is the same as that Self then, it will be without distortion, without attributes/nirgun, without blemish/ni- ranjan, without any attachment and free from the five elements.

38
मूळ

उपाधीनिरासें तत्वता । जीवशिवास ऐक्यता । विवंचून पाहों जातां । उपाधि कैंची ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

जीवाला उपाधी असतात. त्यांचा निरास झाला कीं जीव शिवाशी ऐक्य पावतो. उपाधीचा निरास करण्यास विवेक हाच उपाय आहे. विवेक केल्यानें उपाधी उरत नाही.

English meaning

When the limiting concepts are completely removed, then the jiva and the shiva are One only. For when one investigates and understands, then how can these limiting concepts remain?

39
मूळ

असो जाणणें तितुकें ज्ञान । परंतु होतें विज्ञान । मनें वोळखावें उन्मन । कोण्या प्रकारें ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

आपण जे जे जाणतो ते ते ज्ञान होतें. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की ज्ञानाचें विज्ञान बनते. विज्ञानाना मध्यें मन उन्मन होते. उन्मन कसें होते हे सध्याच्या मनाला आकलन होत नाही.

English meaning

To know; this much only is knowledge/gnyan, but this has to become vignyan (no knowledge). The mind should recognize unmana (no mind) through this way of the `all'.

40
मूळ

वृत्तीस न कळे निवृत्ति । गुणास कैंची निर्गुणप्राप्ती । गुणातीत साधक संतीं । विवेकें केलें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

वृत्तिरुप ज्ञानाला निवृत्ती कशी असते हें कळत नाहीं. गुणांच्या अंमलाखाली राहणार्‍यास त्याच्या पलीकडे असणार्‍या निर्गुणापर्यंत पोचंता येत नाही. जो साधक असतो त्याला संत सद्गुरु विवेकाच्या योगानें गुणातीत करुन सोडतात.

English meaning

This knowing vritti cannot understand nivritti (no-knowledge) and how can the gunas attain nirgun? But when the sadhak within that eternal Self has made vivek then, he goes beyond the gunas.

41
मूळ

श्रवणापरीस मनन सार । मननें कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । निःसंग वस्तु ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

सद्गुरुकडून श्रवण करणें ही पहिली पायरी आहे. त्या श्रवणाहून मनन श्रेष्ठ आहे. कारण मननाने सारासार समजते. मननाहून निदिध्यास श्रेष्ठ, कारण निदिध्यासानें निःसंग आत्मवस्तूचा साक्षात्कार घडतो.

English meaning

manana (ie. constant shravan) is greater than shravan and when there is manana then, the essence can be understood. By *nijadhyas there is that sakshatkar; the unatta- ched Self. *(nijadhyas is the transending of duality and satshatkar is leaving it forever behind)

42
मूळ

निर्गुणीं जे अनन्यता । तेचि मुक्ति सायोज्यता । लक्ष्यांश वाच्यांश आतां । पुरे जाला ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

निर्गुण ब्रह्माशी तदाकार होणें यास सायुज्यमुक्ति म्हणतात. येथपर्यंत पोचल्यावर लक्ष्यांश आणि वाच्यांश आपोआप मागे राहतात.

English meaning

When mula maya is inseparable from that nirgun, then there is sayujyata/Final libe- ration. Now the word meaning (ie. sagun) and the implied meaning (ie. nirgun) get destroyed (even understanding has no place `there').

43
मूळ

अलक्षीं राहिलें लक्ष । सिद्धांतीं कैंचा पूर्वपक्ष । अप्रत्यक्षास कैचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

निर्गुणाशी अनन्य होणें म्हणजे जेथें लक्ष पोचूं शकत नाहीं तेथें लक्ष ठेवणें होय. सिद्धन्त हस्तगत झाल्यावर तेथें पूर्वपक्षाचे काम संपते. ब्रह्मस्वरुप अतिंद्रिय असल्यानें इंद्रियांनी प्रत्यक्षपणें ते पाहता येत नाही. इंद्रियांच्या दृष्टीनें तें स्वरुप असून नसल्यासारखें होते.

English meaning

When the concentration remains in that which cannot be concentrated upon (nijadhyas) then, how can the `I am' (manana) remain within that Truth/siddhant? How can the sensory perception perceive this imperceptible? Being, yet being nothing.

44
मूळ

असोन माईक उपाधी । तेचि सहजसमाधी । श्रवणें वळावी बुद्धी । निश्र्चयाची ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

मायामय दृश्याची उपाधी भोवंती असून निर्गुणाशी अनन्यता टिकली म्हणजे त्या स्थितीला सहज समाधि म्हणतात. ती साध्य होण्याकरितां प्रथम श्रवणानें बुद्धीमध्यें स्वरुपाबद्दल निश्र्चय निर्माण होणें आवश्यक असते.

English meaning

To still remain even after the limiting concepts are made false, this is natural samadhi (maharaj as you were before). By means of shravan, this conviction of the buddhi ("I am a body") should be turned around. .