भीमदशक — समास 2: चत्वारदेवनिरुपण

Fully populated

Chatvardev Nirupan (A Discourse on the Four Gods)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

येक निश्र्चळ येक चंचळ । चंचळीं गुंतलें सकळ । निश्र्चळ तें निश्र्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥

मराठी अर्थ

विश्वामध्यें दोन वस्तु आहेत. एक शाश्वत व दुसरी अशाश्वत. सारीं माणसें अशाश्वतांतच गुंतलेली आढळतात. शाश्वत मात्र जसेंच्या तसें शाश्वतच राहते.

English meaning

The One is still and the other is moving; and in this moving `all' one has been entangled. In the still, there is the still; It is just as It is.

2
मूळ

पाहे निश्र्चळाचा विवेक । ऐसा लक्षांमधें येक । निश्र्चळाऐसा निश्र्चयात्मक । निश्र्चळचि तो ॥ २ ॥

मराठी अर्थ

सारासार विवेक करुन शाश्वताचा शोध करणारा असाा लाखांत एखादाच सापडतो. शाश्वतासारखाच तोसुद्धा अत्यंत निश्र्चयी, स्थिर व शांत बनतो.

English meaning

Understanding is the vivek of the still; He is the One within this attention of knowledge. When there is only the stillness of the still then, that is paramatma.

3
मूळ

या निश्र्चलाच्या गोष्टी सांगती । पुन्हा चंचळाकडे धांवती । चंचळचक्रीं निघोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ लोक शाश्वराच्या गोष्टी करतात. परमतु परत ते अशाश्वताच्याच मागे धावतात. या अशाश्वतांतून बाहेर पडणारे फारच थोडे असतात.

English meaning

This moving `story' becomes still and then again that One runs towards the moving (ie. conviction is not imbibed for the real understanding has not truly come; there is only One). Few are those, who have escaped from the ever turning wheel of this moving and ephemeral existence.

4
मूळ

चंचळीं चंचळ जन्मले । चंचळाचि मधें वाढलें । अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥

मराठी अर्थ

अशाश्वतामध्येंच अशाश्वत जन्म घेते. त्यांतच ते वाढते. यामुळें माणसाच्या मनावर अशाश्वत सारखें परिणाम करीत राहते.

English meaning

In the moving `all', this moving `all' gets born as a jiva and in the moving `all' it grows. Due to these `many' desires and attractions, this moving `all' appears to take a form for a whole lifetime.

5
मूळ

पृथ्वी अवघी चंचळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे । चंचळ सांडून निश्र्चळीं पवाडे । ऐसा कैंचा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

या पृथ्वीवरील सर्व घटना अशाश्वत आहेत. येथें माणसाचे सर्व व्यवहार अशाश्वतामध्येंच घडतात. त्यामुळें अशाश्वतास दूर करुन शाश्वतामध्यें प्रवेश करणारा माणूस सापडणें फार कठीण आहे.

English meaning

Within these `many' forms there is the great element earth and that is in the charge of this moving `all'. Therefore whatever action gets done on this earth takes place in this moving `all'. But how to drop this ephemeral world and this moving `all' and enter within the still? (Within this `all experience' there are the great elements and these are merely the objectification of this `all'. The `many' gross objects and everything that takes place in this gross world made of the elements, are appearing within this `all'. And that is an appearance within the Self).

6
मूळ

चंचळ कांहीं निश्र्चळेना । निश्र्चळ कदापी चळेना । नित्यानित्यविवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

जे अशाश्वत आहे ते कधी स्थिरपणें टिकत नाही. जें शाश्वत आहे ते कधीच चळत नाही. नित्यानित्य विवेक केला तर माणसाला या गोष्टी थोड्याशा आकलन होतात.

English meaning

This *`thing' that moves, is not still and that still Self never moves. But first the man should understand this `thing' by vivek between what is destructible and what is indestructible. *(When every thought is dropped then, what remains is this world of knowledge; only this `thing' is there)

7
मूळ

कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे । कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचित मात्र ॥ ७ ॥

मराठी अर्थ

माणसानें नित्यानित्य विवेकाने कांहीं समजून घेतले तरी ते अशाश्वताच्या जोराने न समजल्यासारखें होते. तसेंच थोडे समजलें तरी तें न समजल्यासारखें वाया जाते.

English meaning

When this `thing' is awake then, the gross is asleep. When the `thing' understands then, the gross is not understood. When the `thing' overflows everywhere then, the very small mind is confounded.

8
मूळ

संदेह अनुमान आणी भ्रम । अवघा चंचळामधें श्रम । निश्र्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

संशय येणें, कल्पना करीत सुटणें, भ्रम होणें या सर्व गोष्टी अशाश्वतामधील कष्ट देणार्‍या घटना आहेत. शाश्वतामध्यें त्यांना स्थान नाही. पण हे माणसाला समजले पाहिजे.

English meaning

There are the doubts and conjectures of the gross and there is this delusion of the moving `all'. This gross existence is the tiresome distresses appearing within this moving `all. But both of these are never in the still and therefore that essence should be understood.

9
मूळ

चंचळाकरी तितुकी माया । माईजे जाये विलया । लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥

मराठी अर्थ

जे जे अशाश्वत आहे ते सारे मायानिर्मित आहे. तें तें नाशवंत असते. मायानिर्नित वस्तूंमध्यें लहान-मोठा हा फरक आढळत नाही.

English meaning

This moving form; this much is maya. And this illusion will get utterly destroyed. But this moving *action should not be called the small jiva or the great brahman. *(The moving `all' lies, like a bridge, between the jiva and brahman)

10
मूळ

सगट माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली । चित्रविचित्र विकारली । नाना रुपें ॥ १० ॥

मराठी अर्थ

विश्वामधें जिकडेतिकडे मायेचा विस्तार आहे. पंचभूतें आणि तीन गुण मिळून असणारी अष्टधा प्रकृति सगळीकडे पसरली आहे. नाना प्रकारच्या चित्रविचित्र रुपांनीं ती विस्तारलेली आढळते.

English meaning

This entirety of maya has expanded. This eight-fold prakruti has sprouted out and transformed itself into the `many' variegated forms.

11
मूळ

नाना उत्पत्ती नाना विकार । नाना प्राणी लाहान थोर । नाना पदार्थ मकार । नाना रुपें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

तिच्या विस्तारामधें अनेक प्रकारच्या निर्मित वस्तु, अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारचे लहान मोठे, नाना प्रकारचे जड द्रव्यमय पदार्थ आणि नाना प्रकारची रुपें आढलतात.

English meaning

Then there is the birth of the `many' and the modifications of the `many'. These `many' forms within the prana are the small jivas but that great brahman is also there. Under- stand that these `many' objects and their `many' ways are due to the `many' thoughts (ie. therefore drop these thoughts and be brahman).

12
मूळ

विकारवंत विकारलें । सूक्ष्म जडत्वास आलें । अमर्याद दिसों लागलें । कांहींचाबाहीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

अष्टधा प्रकृति विकारशील किंवा सतत बदलणारी असल्यानें तिच्या विकारवंत स्वभावांतून हे विश्व निर्माण झालें. अव्यक्त प्रकृति सूक्ष्म असते. ती व्यक्त स्वरुप धारण करतांना स्थूल पदार्थाचें रुप घेते. अशा रीतीनें अमर्यादपणें भरमसाट वाढलेलें हे दृश्य स्थूल विश्व दिसूं लागते.

English meaning

The possessor (ie. purush) of this modification (ie. prakruti) modified and that subtle brahman became gross; then everywhere is the unlimited expansion of this `thing'.

13
मूळ

मग नाना शरीरें निर्माण जालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं । भाषा परत्वें कळों आलीं । कांहीं कांहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

मग नाना प्रकारचे देह धारण केलेले प्राणी निर्माण झाले. त्यांना निरनिराळी नांवें ठेविली. मग त्यांच्यांत माणूस निर्माण झाला. त्याच्या कांहीं भाषा झाल्या मग एकमेकाचे एकमेकाला थोडे कळायला लागले.

English meaning

Due to this `all' body, the `many' bodies were created and the `many' objects were each given a name. And on account of the `many' languages, that nirgun Self became the `many' things of this `all thing'.

14
मूळ

मग नाना रीति नाना दंडक । आचार येकाहून येक । वर्तो लागलें सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मग माणसांत कांहीं कांहीं चालीरीती झाल्या. वागण्याचे अनेक प्रकार झाले. निरनिराळे आचार रुढ झाले. त्या लोकाचारांना अनुसरुन लोक वागतात.

English meaning

From that pure conduct of the One there has come the `many' methods and habits and the `many' customs and practices of the one jiva. And this world of the `all' began to behave according to conducts of this world of birth and death.

15
मूळ

अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण जालीं लाहानथोरें । पुढें आपुलाल्या प्रकारें । वर्तो लागती ॥ १५ ॥

मराठी अर्थ

थोडक्यांत अष्टधा प्रकृति प्रथम निर्माण झाली. तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरें झाली.नंतर आपापल्या स्वभावानुसार त्यांचे वागणें सुरु झाले.

English meaning

Due to this body of the eight-fold prakruti, the small jiva within that great brahman was created. And afterwards, that paramatma began functioning according to their ways.

16
मूळ

नाना मतें निर्माण जालीं । नाना पाषांडें वाढलीं । नाना प्रकारीचीं उठिलीं । नाना बंडें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

पण मानव समाजांतील जीवन अधिक गुंतागुंतीचें आहे. मानव समाजामध्यें अनेक प्रकारची मतें निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे व भ्रामक विचार वाढीस लागले. आणि नाना प्रकारच्या विलक्षण कल्पनांचा प्रसार झाला.

English meaning

The `many' opinions were created; the `many' false doctrines grew; the rising up of the `many' ways brought `many' commotions and prides.

17
मूळ

जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक चालिला । कोण वारील कोणाला । येक नाहीं ॥ १७ ॥

मराठी अर्थ

समाजामध्यें जो विचार प्रवाह प्रबळ असतो. त्याला अनुसरुन सामान्य लोक वागतात. त्यांनाआवरुन योग्य मार्गाकडे वळवणारा विचारवंत माणूस क्वचितच आढळतो.

English meaning

Once you have tumbled down into this flood, the world is set in motion. But how could anyone disentangle anyone else if that One is not there?

18
मूळ

पृथ्वीचा जाला गळांठा । येकाहून येक मोठा । कोण खरा कोण खोटा । कोण जाणे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

सध्याच्या काळी मानव समाजामध्यें जर सगळीकडें गोंधळ माजला आहे, प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजतो, अशा परिस्थितींत खरा कोण व खोटा कोण हे ठरवणे मोठें कठीण पडते.

English meaning

There were the confusions of this earth and so this One that moves within that still One, became important (this `all' was considered as the Reality). Tell me, where is there anyone who knows what is true and what is false?

19
मूळ

आचार बहुकाचेंत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला । अवघा वरपंगचि जाला । साभिमानें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आचार बहुरंगी होऊन गुंतागुंतीचा झाला आहे. कांहीं आचार पोट भरण्याच्या पायीं बुडाला. उरलेला अचार केवळ वरपांगीपणानें पाळला जातो. देहाच्या ाबहिमानानें लोक केवळ देखाव्यासाठीं लोक आचार पाळतात.

English meaning

That pure conduct fell into this great confusion. To fill the belly, that One in the `many' was drowned and then there was this outer show of everything. All because of this `I am' of the `all' (this `I am' became "I am so and so").

20
मूळ

देव जाले उदंड । देवांचें मांडलें भंड । भूतादेवतांचें थोतांड । येकचि जालें ॥ २० ॥

मराठी अर्थ

समाजामध्यें पुष्कळ देव निर्माण झालें आहेत. त्यांचे निरर्थक महत्व वाढलें आहे. भूतें व देवता यांचें भलतेंच माहात्म्य एकमेकांत मिसळलें गेलें आहे.

English meaning

Then that vast God manifested and the quarrelsome gods were established. Then the One appeared as the fictitious story of the elements and the gunas.

21
मूळ

मुख्य देव तो कळेना । काशास कांहींच मिळेना । येकास येक वळेना । अनावर ॥ २१ ॥

मराठी अर्थ

मुख्य देव तो कोणता हें कळेनासें झालें आहे. कशाचा कशाशी मेळ बसत नाही. स्वैराचारास आवर घालणारा कोणी आढळत नाही.

English meaning

That Supreme God has not been understood; how can it be, if even this `thing' has not been found? For the jiva is unrestrained and does not want to turn towards brahman.

22
मूळ

ऐसा नायेक सला विचार । कोण पाहातो सारासार । कैंचा लहान कैंचा थोर । कळेचिना ॥ २२ ॥

मराठी अर्थ

याप्रमाणें सर्व समाज विचारभ्रष्ट झाला आहे. सारासार विवेक करणारा कोणी उरला नाहीं. लहान कोण व मोठा कोण हे ठरवण्यास कांहीं मार्गच उरला नाहीं.

English meaning

1vishnu, brahma and mahesh, the gunas are constantly vying for dominance When there is no thoughtlessness then, who can understand the essence and the non- essence? For it has not been understood who is small and who is great.

23
मूळ

शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला । लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥

मराठी अर्थ

शास्त्रांचा जणू बाजार भरला आहे. देवांची तर नुसती गर्दी झाली आहे. आणि बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करणार्‍या व्रतांच्या नादी वेड्यासारखा लागला आहे.

English meaning

The scriptures grew and filled-up the market place and there was all the confusion of gods and the world ran madly after their own selfish worship (devotion with desires in mind; maharaj- first he asks for himself and then he asks for his wife and children).

24
मूळ

ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें । अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥ २४ ॥

मराठी अर्थ

अशारीतीनें लोक समाज सर्व अंगांनी बिघडून गेलेला आहे. सत्यासत्याचा फरक हरवल्यासारखा झाला आहे. चोहीकडे केवळ अराजकच माजलेले आढळते.

English meaning

In this way, due to the many names and forms, the greatest was destroyed and the vivek between Truth and false was lost. And due to so `many' things, anarchy ruled in every direction.

25
मूळ

मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ २५ ॥

मराठी अर्थ

नानात र्‍हेच्या मतमतांतराचा बुजबुजाट झाला आहे. कोणी कोणाला विचारी नासा झाला आहे. ज्याला जें मत आढळते तेच त्याला उत्तम व थोर वाटते.

English meaning

When there is the confusion of this doctrine and that doctrine then, there is no one for anyone to ask. But if mula maya discovers that purush then, it becomes Reality.

26
मूळ

असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन । ह्मणोनियां ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥

मराठी अर्थ

जो असत्याचा अभिमान धरतो त्याचे अधःपतन होते. म्हणून ज्ञानी माणसें सत्याचा शोध करतात.

English meaning

But when there is the pride of the false then, that Reality will be degraded and ruined. Therefore, people should search for the Truth, through knowledge.

27
मूळ

लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यास करतलमळ । आतां ऐका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥

मराठी अर्थ

सामान्य माणसांची देवाच्या बाबतींत असणारी कल्पना आणि त्यांची देवाशीं वागणूक दोन्ही खर्‍या नसतात. ही गोष्ट जाणत्या पुरुषांना अगदी स्पष्ट दिसते. आतां जाणत्या विवेकी माणसानें खर्‍या देवाविषयीं नीट श्रवण करावें.

English meaning

For a Knower, the functioning of this world of the `all' is as easily seen as a small fruit sitting on the palm of the hand. Now listen my dear viveki and there can be that pure knowledge.

28
मूळ

लोक कोण्या पंथें जाती । आणि कोण्या देवास भजती । ऐसी हे रोकडी प्रचिती । सावध ऐका ॥ २८ ॥

मराठी अर्थ

सामान्य लोक कोणत्या मार्गानें जातात आणि कोणत्या देवाला भजतात, याचे प्रत्यक्ष पाहिलेले वर्णन करतो. श्रोत्यांनी तें लक्ष देऊन ऐकावें.

English meaning

How to walk on this path and how to do the bhajan of that One God? Thoughtlessness is real bhajan and that is within this ever-present `experience'. And this `experience' is walking the path. Therefore listen carefully.

29
मूळ

मृतिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक । बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

धातु, दगड, माती वगैरेपासून तयार केलेल्या देवाच्या अनेक प्रतिमा असतात. या प्रतिमा म्हणजेच देव होय अशी बहुतेक लोकांची कल्पना असते.

English meaning

That One and true God is worshipped in four ways. There are the so many different idols made of clay, metal and stone. And that One in the `all' is within these idols but the people of this world have turned to rituals and customs.

30
मूळ

नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती येक नर । जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥

मराठी अर्थ

देवाचे अनेक अवतार होऊन गेले. पुष्कळ लोक त्या अवतारांची चरित्रें ऐकतात. त्यांची पूजा करतात. त्यांचा जप करतात. त्यांचे निरंतर ध्यान करतात.

English meaning

Or there are the `many' *incarnations of that God. But when one listens to their stories and their exploits then, that One has become a man. He makes japa, does meditation and that parabrahman makes puja (being yourself that parabrahman one starts worshipping). *(The Masters are said to be incarnations of that One God and the disciples do the japa, meditation and puja etc., but no more. maharaj- they like to worship the Master from a distance. "Oh you are so great", they say from a distance)

31
मूळ

येक सकळांचा अंतरात्मा । विश्र्वी वर्ते जो विश्र्वात्मा । द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा । मानिती येक ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

सर्वांचा जो अंतरात्मा आहे त्याला कांहीं लोक देव मानतात. विश्र्वांत व्यापून असणार्‍या आणि त्यास चालवणार्‍या विश्वात्म्यालाच कांहीं लोक देव मानतात. तर साक्षीपणानें असणारा जो ज्ञानात्मा द्रष्टा त्याला कांहीं लोक देव मानतात.

English meaning

Or that One is this antar-atma of the `all' and stays within this creation. Then that purush is called the atma of this creation; He is the seer, the Witness and the atma with knowledge, and He is believed to be that One still God. (But that purush is the moving, for as the Witness of the moving He accepts this moving `all' as Himself)

32
मूळ

येक ते निर्मळ निश्र्चळ । कदापी नव्हेति चंचळ । अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

कधीहीं न चळणारी अशी जी निर्मळ व निश्चल शाश्वत सद्वस्तु किंवा ब्रह्मवस्तु तिच्याशी अनन्यपणें तदाकार झालेले, स्वतः ब्रह्मरुप झालेले कांहीं लोक असतात.

English meaning

Or there is that One who is pure and still and can never move. Due to the understanding of `no-otherness' there is this pure knowledge of the Self.

33
मूळ

येक नाना प्रतिमा । दुसरा अवतार महिमा । तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

यावरुन असें दिसतें कीं देव चार प्रकारचे आहेत. १) नाना प्रकारच्या प्रतिमा २) अवतारांचा महिमा ३) सर्वांचा अंतरात्मा आणि ४) निर्विकार परब्रह्म.

English meaning

So first there are the `many' idols. Then there is the *greatness of the incarnations. Thirdly there is this inner-atma and the fourth is the never changing. *(My Master is so great.)2

34
मूळ

ऐसे हे चत्वार देव । सृष्टीमधील स्वभाव । यावेगळा अंतर्भाव । कोठेंचि नाहीं ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

असे हे चार प्रकारचे देव आहेत. मानवाच्या स्वभावाला धरुन हे चार प्रकार आढळतात. या चार प्रकारांच्या व्यतिरिक्त पांचवा प्रकार माणसांच्या अंतर्यामी आढळत नाहीं.

English meaning

In this way, that thoughtless Self is these four forms of God and each form is naturally present within this gross creation. But without the inner conviction of this `speech', they cannot all be found.

35
मूळ

अवघें येकचि मानिती । ते साक्ष देव जाणती । परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

देव येथून तेथपर्यंत एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. तो सर्व जाणतो. असें कांहीं लोक मानतात. पण देवाला जो साक्षीपणा येतो. तो अष्टधा प्रकृतिमुळें येतो. हें बरोबर समजले पाहिजे.

English meaning

If the people study the scriptures and listen to their Master then, respect will be given to this moving God. Then that Reality becomes the one who knows and that is the witness God. But one should understand that this is the eight-fold prakruti.

36
मूळ

प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातीत माहानभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

प्रकृतीला साक्षीपणें पाहणारा देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल किंवा अशाश्वत असणार हें उघड आहे. मूळ देवाला पाहणें ठाऊक नाही. प्रकृति निर्माण झाल्यावर त्याच्यावर साक्षीपणाने पाहण्याचा आरोप आला. प्रकृतीमधून निर्माण झालेला हा साक्षीपणाचा आरोप प्रकृतीप्रमाणेंच अशाश्वत असतो. म्हणून कोणत्याही होण्यापलीकडे किंवा कल्पनेपलिकडे असलेला दिव्य भाव म्हणजेच केवळ अस्तित्व तें विवेकानें जाणावें.

English meaning

For if God remains within prakruti then, He is the nature of prakruti (The witness becomes the witnessed). Beyond understanding there is that `great experience' and that should be known by vivek.

37
मूळ

जो निर्मळास ध्याईल । तो निर्मळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

मायामलरहित ब्रह्मवस्तूचें जो सतत चिंतन करतो तो ब्रह्मस्वरुपच बनतो. जो मायामय द्वैतास भजतो, भयानें भरलेल्या प्रकृतीचें जो सतत चिंतन करतो तो भयानें व्यापला जातो. हें समजावें.

English meaning

When that purush meditates on the pure then, He will become the pure only. But when that purush does His bhajan to mula maya then, He will know mula maya only.

38
मूळ

क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती । सारासार जाणती । ते महानभाव ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

दूध व पाणी जे वेगळे करतात त्यांना राजहंस म्हणतात. शाश्वत व अशाश्वत वेगळे करुन जे शाश्वतास जाणतात त्यांना थोर अनुभवी संत म्हणतात.

English meaning

When that One separates the milk from the water then, this is the `speech' of a royal swan. When that One knows the essence and non-essence then, that is that `great experience' (ie. Self- experience)

39
मूळ

अरे जो चंचळास ध्याईल । तो सहजचि चळेल । जो निश्र्चळास भजेल । तो निश्र्चळचि ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

अहो काय सांगावें जो अशाश्वताचे सतत चिंतन करतो, तो अस्थिरप्रज्ञच राहतो. जो शाश्वताचे सतत चिंतन करतो तो स्थिरप्रज्ञ बनतो.

English meaning

My dear, when that purush meditates on the moving then, He natural becomes the moving. When that purush does the bhajan of the still then, He is still.

40
मूळ

प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्र्वत वोळखावें । सत्य होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

म्हणून जाणत्या पुरुषानें देहानें अशाश्वत प्रकृतीप्रमाणें वागावें. परंतु अंतर्यामीं शाश्वत ब्रह्म ओळखून असावें. आंतून ब्रह्मस्वरुप असावें व बाहेरुन मात्र चार लोकांसारखें वर्तन ठेवावें.

English meaning

One should move like the prakruti, but recognize the eternal within this inner space. Then being the Truth one should stay just like the world. .