भीमदशक — समास 8: अंतरात्माविवरण

Fully populated

Antaratma Vivaran (The Nature of the Antaratma)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

आधीं वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता । त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥

मराठी अर्थ

सर्व घटनांचा कर्ता, तसेंच सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा त्याचें ज्ञान करुन घेण्याचा कोणीतरी प्रयत्न करावा.

English meaning

At the source, the doer of this `all' is to be *bowed down to; for that purush is the supporter of all these gods/gunas. When the mean and beggarly (ie. your individual mind) bows down to Him then, you are doing His bhajan. *(When your mind becomes His mind)

2
मूळ

तेणेविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले । अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥

मराठी अर्थ

त्याच्याशिवाय कांहींही कार्य होत नाही. त्याच्या सत्तेवाचून झाडाचे पडलेले पानही हालत नाहीं. त्याच्यापासून मिळणार्‍या शक्तीनेंच त्रैलोक्य चालते.

English meaning

This action of the `all' cannot take place without that Reality and yet that Reality cannot move even a fallen leaf. Therefore everything in the three worlds is functioning on account of this mula maya. (Due to the mula purush/Witness there is this action of mula prakruti but, to that Reality, nothing is happening)

3
मूळ

तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा । चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥

मराठी अर्थ

देव, दानव, मानव, चार खाणी व चार वाणी या सर्वांचा प्रवर्तक एकटा तो अंतरात्मा आहे.

English meaning

That inner atma is the director of this `all' and He is the director of these three worlds of knowledge (ie. dream), ignorance (ie. deep sleep) and this world of mankind (ie. waking state of knowledge and ignorance). He is the director of the four streams of life and the four levels of language.

4
मूळ

तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी । सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी ॥ ४ ॥

मराठी अर्थ

सर्व प्राण्यांच्या देहामध्यें तोच वास करतो. आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारे वागायला शक्ति व प्रेरणा देतो. सार्‍या विश्र्वाचे चालन करणार्‍या त्याचें संपूर्ण कर्तृत्व सांगता येणार नाही.

English meaning

He alone is, the only One within this collection of the `all' and He is the doer of the `many' different ways. That antar-atma is within this story of the `all' and from this `story' the gross world has appeared. Therefore the `many' thoughts should become that thoughtless Self (the `many' is born of this `all' and this `all' is born of that paramatma. Therefore by means of this `all', this gross world can become that paramatma).

5
मूळ

ऐसा जो गुप्तेश्र्वर । त्यास म्हणावें ईश्र्वर । सकळ ऐश्र्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

असा जो गुप्त मालक आहे त्यालाच ईश्र्वर म्हणतात. त्याच्या सत्तेनेंच लोक मोठी ऐश्र्वर्य भोगतात.

English meaning

That antar-atma is the hidden Lord (ie. purush) and it is He who should be called ishwara (ie. God). In this way, that `greatest of the great' enjoys this glory and grandeur of the `all' by means of this illusion called maya. (That Reality cannot do or know anything, but by the medium of maya, That enjoys everything. Still, It never takes the touch of Its maya/illusion)

6
मूळ

ऐसा जेणें वोळखिला । तो विश्र्वंभरचि जाला । समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

अशा अंतरात्म्याचें ज्याला ज्ञान होतें तो स्वतः विश्र्वव्यापी विश्र्वंभर बनतो. मग समाधि व सहजस्थिति यांचें कांहीं महत्व उरत नाही. ईश्र्वराशी तदाकार होण्याची स्थिति इतर सर्व अवस्थांच्या मानानें फारच पलीकडची असते.

English meaning

When that atma knows this mula maya, then He has become the Lord of creation (ie. antar-atma; He becomes the Knower and then He is knowing His reflection). But how can His creation wipe out that natural state of samadhi? (Still that paramatma remains aloft from all this.)

7
मूळ

अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें । आवचतें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

या सगळ्या दृश्य विश्र्वाचे विवरण करीत गेल्यानें अंतरात्म्याचें रहस्य आपोआप आकलन होते. एकाएकी प्रचंड लाभ हातीं येतो. त्यासाठीं निराळे श्रम करावें लागत नाहींत.

English meaning

If everything in these three worlds is investigated then, that essence is discovered. When that essence is *unexpectantly come upon then, the wearisome toil and this `thing' even are not required. *(When one stops trying to know Him, He is there).

8
मूळ

पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे । अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

बुद्धीनें विवरण करुन अंतरात्म्याचे ज्ञान करुन घेणें कोणासहि शक्य नाही. त्याचे ज्ञान होण्यासाठीं बुद्धीनें धडपडणार्‍यांना त्याचें येवढेंतेवढें ज्ञान होते. व त्यावरच तें समाधान मानतात.

English meaning

When you understand who that antaratma is; when He has been carefully investigated and determined; when that subtlest of the subtle has been understood then, He remains, completely content.

9
मूळ

आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें । वाचिलेंचि वाचावें । पुन्हपुन्हा ॥ ९ ॥

मराठी अर्थ

अल्पस्वल्प ज्ञानानें अंतरात्म्याचें जें किंचित दर्शन झालें असेल तें वारंवार पुन्हपुन्हा घ्यावे. पुन्हपुन्हा त्याचे विवरण करावें. त्याच्याबद्दल वाचलेले पुन्हपुन्हा वाचावे.

English meaning

My dear! If that thoughtless Self has been understood then, He should be understood again. If that thoughtless Self has been investigated then, He should investigated again. If He has witnessed then, He should witness again and again (if you have understood once then why can you not understand each and every moment?).

10
मूळ

अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा । देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥

मराठी अर्थ

हा अंतरात्मा केवढा आहे व कसा आहे, त्याला जो पाहातो त्याची दशा काय होते.,याबद्दल जो सांगतो तें अपूर्ण असते. कारण त्यानें जें पाहिले असते व ऐकलेले असतें तेवढेच तो सांगतो.

English meaning

What is the size of that antaratma and how big is the space of that One who knows? It is as big as that which is `seen' and `listened to'. And when there is such `seeing' and `listening' then, thoughtlessness arises (you become so big that you disappear). (maharaj- what is the volume of knowledge? You can't say. If you make it this big then it becomes that big)

11
मूळ

उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें । प्राणी देहधारी बाउलें । काये जाणे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

माणसानें कितीही ऐकलें आणि पाहिलें तरी अंतरात्म्याचे संपूर्ण वर्णन करण्यास तें पुरें पडत नाही. देहधारी माणूस अनंत व अपार अंतरात्म्यास संपूर्णपणें जाणणे शक्य नसते.

English meaning

That vast paramatma has become the `seen' and `listened to' (ie. Its own reflection). Still, whatever is `seen' and `listened to' cannot pervade that antaratma. But tell me, how much can the one who holds this doll's body in the prana, know? (While He knows all that is known)

12
मूळ

पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना । विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करुं शकत नाहीं. याचें कारण असें कीं माणूस पूर्णाचे अखंड चिंतन करीत नाही. तसें जर केलें तर माणूस देवाहून वेगळेपणानें उरत नाहीं.

English meaning

The incomplete cannot make complete, the complete. How can that mula maya inves- tigate that unbroken brahman? Still if there is this unrelenting investigation, then the separation with God does not remain.

13
मूळ

विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें । नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

देवाशी वेगळेपण नसावें. म्हणजेच मग भक्त म्हणून घेणें शोभतें. देवाशीं तादात्म्य साधलें नाहीं तर खटाटोप श्रम व्यर्थ वाया जातात.

English meaning

One should be called a devotee only when there is no separation. Otherwise, there is only the empty and wearisome show of the `many' devotees.

14
मूळ

उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला । राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

एक माणूस घर पाहून गेला पण त्यानें घराच्या मालकास पाहिलेंच नाहीं. ओळखलें नाही. दुसरा एक माणूस एका राज्यामधून आला, पण येथील राजा कोण याची चौकशी त्यानें केली नाहीं.

English meaning

It is like going as a guest to a house and not recognizing the master of that house. It is like, coming into a kingdom and not knowing there is a King.

15
मूळ

देहसंगें विषये भोगिले । देहसंगे प्राणी मिरवलें । देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

हें जसें घडतें त्याचप्रमाणें माणूस देहाच्या संगतीनें इंद्रियांचे सुख भोगतो, जन्मभर देहाच्या संगतीनें मिरवतो. पण जो अंतरात्मा देहास चालवतो त्याला माणूस जाणत नाहीं. हें एक मोठें नवलच आहे.

English meaning

Due to the company of this body, these objects of the senses are enjoyed. Due to the company of this body, there is this disgraceful exhibition in the prana and this holder of the body (see 13.1.24, ie. the jiva; by means of vishnu/knowing, brahma/conceptualizing and mahesh/not knowing) misses that great marvel of nirgun.

16
मूळ

ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें लोक विवेकहीन असून देखील स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. एकंदरींत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसें तो जगतो.

English meaning

Like this is the world of the a-viveki (one without vivek) and they say, "We are vivekis." But the thoughtlessness of that purush that should be kept, has been tossed away.

17
मूळ

मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे । ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥

मराठी अर्थ

ज्याला आपलें अंतरंग सांभालता येत नाहीं तो मूर्ख होय. म्हणून माणसानें शहाणपण शिकावें असें म्हणतात. म्हणून शहाण्यास पाहावे तर ते देखील अंतरंगाचें ज्ञान नसल्यानें दिनवाणें झालेलें असतात.

English meaning

The fool does not know how to protect this inner space. Therefore be wise and stay as that purush. However this wisdom that was, has been lost due to this weak and piteous condition of body consciousness.

18
मूळ

अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें । तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

समजा, एखाद्याच्या घरांतच संपत्ती ठेवलेली आहे. ती तो विसरला आणि मग संपत्तीसाठीं दारोदार हिंडूं लागला. त्याच प्रमाणें अज्ञानी माणसाची अवस्था होते. स्वतःच्या अंरंगात असलेला ईश्र्वर त्यास कळत नाहीं, तो त्यास बाहेर शोधायला जातो.

English meaning

When that treasure within this inner space is forgotten then, one wanders from door to door begging (ie. body to body). Such is the case for the ignorant who do not know God.

19
मूळ

या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी । वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा या विश्र्वांत कोणीही नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. तिची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थळकालांनीं मर्यादित असणार्‍या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचें ध्यान करण्याइतकी पुरीं पडत नाहीं.

English meaning

When one's meditation is this `speech' of God then, what will be seen of the gross world (ie. gross objectification disappears)? Still this knowing vritti is limited; how can its smartness be capable of knowing God?

20
मूळ

ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरुपें बहुवाणी । भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥

मराठी अर्थ

या जगामध्यें जीवप्राणी नुसतें गर्दी करुन आहेत. त्यांची रुपें व भाषा नाना तर्‍हांची आहेत. पृथ्वीच्या पोटांत व पाषाणांत देखील असे कितीतरी प्राणी आहेत.

English meaning

He is within the brahmanda and completely filling the prana; He is the `many' forms and the `many' voices. That One in the `many' is within the caves and the stones.

21
मूळ

इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला । गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥

मराठी अर्थ

या सर्वांमध्यें अंतरात्मा भरुन पुनः उरला आहे. अशा रीतीनें अनेकांमध्यें एकच एक अंतरात्मा नटला आहे. कांहीं ठिकाणीं तो गुप्त असतो तर कांहीं ठिकाणी तो प्रगटपणें दिसतो.

English meaning

He pervades this place of the `all' and by this much only (ie. knowledge), that One stays in the numerous different forms. That One within the `many' is the hidden purush and His manifestation also.

22
मूळ

चंचळें न होईजे निश्र्चळ । प्रचित जाणावी केवळ । चंचळ तें नव्हे निश्र्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

आपण अशाश्र्वत मायेमध्यें जोपर्यंत आहोत तोपर्यंत शाश्र्वत ब्रह्मवस्तु हस्तगत होणार नाही. प्रत्यक्ष अनुभवानें आपण हें ओळखावें. जें अशाश्र्वत आहें तें शाश्र्वत परब्रह्म मुळींच नव्हें.

English meaning

The moving should stop and be still and then this `experience' should know that pure knowledge. But when that Reality is moving then, it cannot be that still parabrahman.

23
मूळ

तत्वें तत्व जेंव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्र्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥

मराठी अर्थ

एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचा जेव्हां निरास होत जातो तेव्हां देहबुद्धीचा क्षय होतो. मग चोहीकडे एक निर्मल, निश्र्चल व निरंजन ब्रह्म अनुभवास येते.

English meaning

When the elements are eliminated, one after the other, then the body buddhi drops away and that pure and still *niranjan is in every direction. *(Beyond knowledge)

24
मूळ

आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥

मराठी अर्थ

विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्यें " मी कोण, मी कोठून आलो व मी कसा आहे " हे प्रश्र्ण सोडवावे लागतात. जो माणूस स्वतः विवेकानें कच्चा आहे. त्याला हें कळत नाहीं.

English meaning

The path of vivek is, "Who am I; from where have I come and how have I come?" But if that natural purush stays in the prana then, it is timid and has no conviction and cannot understand His own thoughtless swarup.

25
मूळ

भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा । अचघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करुनी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

म्हणून भल्या माणसानें विवेकाची कास धरावी. तरण्यास कठीण असा हा संसार विवेकाच्या बळावर तरुन जावा. भगवंताची भक्ती करुन आपल्या वंशाचा उद्धार करावा.

English meaning

Vivek should be firmly held by the wise and one should go beyond this impassable samsar. By devotion to hari (ie. knowledge) one should be lifted out of this family of `many' names and forms. .