विवेकवैराग्य — समास 1: विमळलक्षण

Fully populated

Vimal Lakshan (The Attributes of Purity)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करुं नका । विवेकी हो ॥ १ ॥

मराठी अर्थ

विवेकी माणसानों आधीं प्रपंच व्यवस्थित करावा. नंतर विवेकाला परमार्थाकडे वळवावे. असें करण्यांत आळस नको.

English meaning

Only when your *prapanch is properly performed at the source, can one accept the vivek of paramarth. My dear viveki, `here' do not become lazy and fall into body consciousness. *(See 5.10. 4; to go beyond the five gross elements and return to the source ie. `I am', is to make proper prapanch. Then only can one transcend knowledge and achieve that Ultimate Accomplishment/paramarth)

2
मूळ

प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥

मराठी अर्थ

प्रपंच सोडून परमार्थ कराल तर तुम्ही दुःखी, कष्टी व्हाल. प्रपंच व परमार्थ दोन्ही बरोबर कराल तरच तुम्ही विवेकी म्हणून ओळखले जाल.

English meaning

If this prapanch is let slip, then your paramarth will be only toil and suffering (for gross body consciousness has not been given up). You are a viveki when prapanch and then paramarth are properly maintained.

3
मूळ

प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥

मराठी अर्थ

प्रपंच टाकून परमार्थ केला तर पोटाला खायला कांहीं मिळणार नाहीं. मग अशा दुर्दैवी मानसाला परमार्थ साधणार नाही.

English meaning

If this prapanch is let slip and paramarth is made, then one will not get this `food' to eat (first understand this essential `food', the bliss of `I am'; that is proper prapanch). Then how can that beggar make paramarth? (Following paramarth without understanding this `I am' is only begging)

4
मूळ

परमार्थ सांडून प्रपंच । तरी तूं येमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥

मराठी अर्थ

तसेंच परमार्थ टाकून नुसता प्रपंच केला तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. व यमयातना भोगतांना जीवाला फार दुःख भोगावे लागते.

English meaning

If paramarth is let slip and your prapanch is made, then there will be the law of yama to endure (ie. your karma or destiny). And then when the body dies, that Supreme will have to endure the sufferings of yama's judgement (when you perform actions with desire in mind, then you, who are that Supreme atma, will have to take another birth to endure their fruits. And that is destiny or yama's judgement).

5
मूळ

साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवाडोन बैसला । तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥

मराठी अर्थ

समजा एखादा नोकर मालकाकडे कामाला न जातां घरींच बसला तर मालक त्याला ठोकून काढेल व लोक तमाशा बघतील.

English meaning

If one sits lazing at home (ie. in the body) and does not do the duty of his Master, then the Master will beat him while this world beyond, can only look on. (When you take yourself as a body then what can this world beyond do? It will remain unnoticed within and watch from there)

6
मूळ

तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें । दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

असें झालें तर लोकांत आपली अब्रू जाते. दुर्जन आपल्याला हसतात. त्यामुळें आपल्या जीवाला फार दुःख होते.

English meaning

Then one's greatness is lost and one will be laughed at by this world that is far from the Self (ie. in this world we suffer insult and enjoy praise). And then that paramatma has to endure the sufferings of its own jiva.

7
मूळ

तैसेंचि होणार अंतीं । म्हणौन भजावें भगवंतीं । परमार्थाची प्रचिती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥

मराठी अर्थ

परमार्थ सोडून नुसता प्रपंच करणारांची अवस्था अशीच होते. म्हणून भगवंताची भक्ति करावी व याच आयुष्यांत त्याचा अनुभव घ्यावा.

English meaning

Then that paramatma will have to endure death. Therefore one should rest within God and make His bhajan (say, `I know nothing' and become one self God) and in this way, one should accept that paramarth (ie Supreme Meaning/Accomplishment) that is within this ever present `experience'. (Then your prapanch becomes paramarth)

8
मूळ

संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

संसारामध्यें राहून जो मुक्तदशा अनुभवतो तोच खरा योगी समजावा. या जीवनांत आपल्याला योग्य काय व अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या अंतरंगीं सतत जागृत असतो.

English meaning

The one who is liberated while in samsar, he only can know this union of the jiva with shiva (ie. properly performed prapanch). And when this union is carefully investigated then, there is that unbroken brahman (paramarth).

9
मूळ

प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण । प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थीं खोटा ॥ ९ ॥

मराठी अर्थ

जो माणूस प्रपंच सावधानतेनें करतो, तोच तेवढ्याच सावधानतेनें परमार्थही करुं शकतो. प्रपंचांत जो धड नसतो, त्याला परमार्थही धड साधत नाही.

English meaning

When that purush is alert in prapanch then only, will He know paramarth. But if that purush stays in prapanch and holds fast to body consciousness, then His paramarth is not real paramarth.

10
मूळ

म्हणौन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालवणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥

मराठी अर्थ

म्हणून माणसानें प्रपंच व परमार्थ मोठ्या सावधनतेने चालवावे. असें केलें नाहीं तर निरनिराळीं दुःखें भोगावी लागतात.

English meaning

For only through constant attentiveness is prapanch and paramarth accomplished. If one fails to do this, then there is the enduring of the `many' pains.

11
मूळ

पर्णाळि पाहोन उचले । जीवसृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन भ्रमले । यासी काय म्हणावें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

झाडाच्या पानावर बसलेला किडा पाय उचलतांना आधीं पुढें आधार आहे असें पाहूनच पाय उचलतो. आणि पुढें सरकतो. जगांतील सर्व प्राणी असेंच विचारपूर्वक वागतात. मात्र सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असणारा माणूसच अविचारानें वागतो. याला काय म्हणावे ?

English meaning

Only when there is some secure place to place its feet does the caterpillar then raise a foot towards the next leaf. Thus, if even ordinary creatures move with such vivek then, what then can be said of that purush who wanders here and there in confusion? (First place your foot firmly on this `I am'/proper prapanch and then raise yourself up to, I do not exist/paramarth)

12
मूळ

म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

म्हणून माणसाच्या अंगी विवेकानें विकसीत झालेली दृष्टी असावी. भोवतालच्या परिस्थितीचा सतत विचार करावा. आणि पुढें काय घडणार आहे याचा विवेकानें विचार करावा.

English meaning

There should be this understanding of `I am' and then that unbroken brahman should be searched out. Therefore conjecture and guessing about the future should be left aside.

13
मूळ

सुखी असतो खबर्दार । दुःखी होतो बेखबर । ऐसा हा लोकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

परिस्थिती लक्षांत ठेवून त्याप्रमाणें जो वागतो, जगतो, तो सुखी होतो. जो बेसावधपणें वागतो, जगतो, तो दुःखी होतो. लोकांच्या नेहमीच्या प्रापंचिक जीवनामध्यें याचा सतत अनुभव येतो.

English meaning

That purush who is very careful has pleasure, but when that purush is careless then there is pain, for then, thoughtlessness is seeing this worldly life.

14
मूळ

म्हणौन सर्वसावधान । धन्य तयाचें महिमान । जनीं राखो समाधान । तोचि येक ॥ १४ ॥

मराठी अर्थ

म्हणून सर्वांगीण सावधतेनें जो जीवनांत वागतो व जगतो, तोच खरा महान होय. असा मनुष्य स्वतःचे व लोकांचे समाधान टिकवून ठेवतो.

English meaning

Therefore that purush is blessed only when His power is the alertness of this `all'. And when this `all' which is within this gross world is carefully protected then, there is the perfect contentment of that One paramatma.

15
मूळ

चाळणेचा आळस केला । तरी अवचिता पडेल घाला । ते वेळे सावरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥

मराठी अर्थ

परिस्थिती नीट समजून घेण्याची हयगय केली तर कोणतें संकट कधीं येईल हें कांहीं समजणारच नाही. मग त्यांतून सावरायला वेळही उरणार नाही.

English meaning

If one is lazy with regards to proper discrimination, then a sudden blow is sure to come and how then will the mind be able to say, "Nothing is there"? (Firm conviction has to be established, otherwise one day, one is sure to drown in the troubles of samsar)

16
मूळ

म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक । लोकांकरितां लोक । शाहाणे होती ॥ १६ ॥

मराठी अर्थ

यासाठीं दूरदृष्ट ठेवणारे लोक कसा विचार करतात तें पाहावें. त्यांच्यकडून शहाणपण शिकून घ्यावें. लोकांकडूनच लोक शिकतात ही रीतच आहे.

English meaning

Only when this world of `I am' has been established can there be the vivek of that purush. Therefore first this world should become wise on account of that world beyond.

17
मूळ

परी ते शाहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे । अवगुण देखोन सांडावे । जनामधें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

पण असे दूरदृष्टीचे लोक शोधून काढावेत. गुणवंताकडून गुण घ्यावेंत व लोकांमध्यें आढळणारे दुर्गुण सोडून द्यावेत.

English meaning

Then through wisdom that Reality should be recognized when, that pure sattwa guna of the mula maya has been accepted. Therefore first these mixed gunas within this gross world should be left aside and this world beyond should be witnessed.

18
मूळ

मनुष्य पारखूं राहेना । आणि कोणाचें मन तोडीना । मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

आपल्याशी संमंध येणार्‍या माणसांची बरोबर परीक्षा करावी. मात्र असें करतांना कोणाचे मन दुखवू नये.

English meaning

If the man does not make this continuous examination of the `all' and if the mind does not break this concept of being someone then, there is only a man and his understanding brings only conjecture.

19
मूळ

दिसे सकळांस सारिखा । पाहातां विवेकी नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

असा माणूस वरवर पाहिले तर चारचौघांसारखाच साधा दिसतो. पण त्याच्या अंतर्यामीं विवेक जागा असतो. त्यामुळें काम कोण करेल व कोण करणार नाहीं हें तो बरोबर ओळखून असतो.

English meaning

But if you understand that whatever is seen is the same as this `all' then, you are a proper viveki. Then in this world of desire, the desireless see with this pure sattwa guna.

20
मूळ

जाणोन पाहिजेत सर्व । हेंचि तयाचें अपूर्व । ज्याचें त्यापरी गौरव । राखों जाणे ॥ २० ॥

मराठी अर्थ

प्रत्येकाची लायकी, योग्यता पाहून तो सर्वांना जवळ करतो, हाच त्याचा अलौकिक गुण होय. ज्या माणसाला जेवढें महत्व किंवा मोठेपण द्यायचे तेवढें त्यास देण्याचें ज्ञान त्याच्यापाशीं बरोबर असते.

English meaning

When knowingness wants only this `all' then, thoughtlessness can become Its Reality. It is by this knowingness of that purush that respect for that paramatma is protected. .