विवेकवैराग्य — समास 2: प्रत्ययनिरुपण

Fully populated

Pratyaya Nirupan (A Discourse on Direct Experience)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका संसारासी आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो। सुचितपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥

मराठी अर्थ

संसार करणार्‍या स्त्री पुरुषांनो ! मी काय सांगतों तें निर्मळ मनानें व शांतपणें ऐका. माझ्या सांगण्याचा अर्थ नीट समजून घ्या.

English meaning

Stop and listen dear people who have come to this samsar. Stop dear woman and man and be desireless. Stop and with a pure chitta understand that essence within.

2
मूळ

काये म्हणे वासना । काये कल्पिते कल्पना । अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥

मराठी अर्थ

आपली वासना कांहींतरी मागते, आपली कल्पना मनोराज्यें रचते. आपल्या मनामध्यें असें अनेक प्रकारचे तरंग उठतात.

English meaning

Why has this vasana to say anything? (The vasana wants only to be; it does not need to say anything more) Why to imagine that which is only imagined? For then the `many' ways and `many' things will not arise like waves upon your inner space.

3
मूळ

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । मनासारिखें असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

आपल्याला खायला प्यायला चांगलें मिळावें, आपल्याला नेसायला, पांघरायला चांगलें वस्त्र मिळावें सगळें कांहीं आपल्या मनासारखें मिळावें, असें आपल्याला वाटते.

English meaning

"I should eat the best foods; I should enjoy only the best fruits of my past actions; I should be adorned with the best jewellery and accessories and I should wear the best of clothes." When the mind thinks like this then, you should understand this `all thing' (the best is that `thoughtless' swarup. What wish does It have of these things? These thoughts of your mind should be forgotten and then this knowing of the `all' can be understood)

4
मूळ

ऐसे आहे मनोगत । तरी ते कांहींच न होत । बरें करितां अकस्मात । वाईट होतें ॥ ४ ॥

मराठी अर्थ

आपलें मनोगत असें असले तरी त्याप्रमाणें कांहींच घडून येत नाहीं. उलट बरें करायला गेलें तर अनपेक्षितपणें भलतेंच घडून जातें.

English meaning

When the inner intentions of the mind are like this then, that Reality and even this `thing' cannot be found. Then while trying to gain the best, the worst suddenly appears (when the mind wants only the best then one is entangled in body consciousness and the mind always wants, `better than this'. Due to such thinking, that `best' ie. the Self, can never be found).

5
मूळ

येक सुखी येक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकी । कष्टी होऊनियां सेखीं । प्रारब्धावरी घालिती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

एक सुखी असतो तर दुसरा दुःख भोगत असतो. ही गोष्ट प्रपंचांत दिसते. जे दुःखी होतात ते कष्ट भोगतात. आपल्या दुःखाचे कारण प्रारब्धावर टाकतात.

English meaning

The One (ie. brahman) has pleasure and the other (ie. jiva) has pain when it functions in this world through sensory perception. Then everything becomes so confusing and exhausting and in the end, it is all put down to one's destiny.

6
मूळ

अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना । आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ॥ ६ ॥

मराठी अर्थ

परंतु हे बरोबर नाहीं. माणूस योग्य प्रयत्न करत नाहीं. म्हणून तो जें करतो त्याचे चांगलें फळ त्याला मिळत नाहीं. दोष आपल्याकडे आहे आपला अवगुण आपल्या आड येतो ही गोष्ट कांहीं केल्या माणसाच्या लक्षांतच येत नाहीं.

English meaning

The mistake was that proper effort had not been made and therefore that Reality has not been gained. This created `thing' should not know your faults and vices (if this `thing' is to be understood then, the vices and habits of the mind have to be left. This is proper effort)

7
मूळ

जो आपला आपण नेणे । तो दुसर्‍याचें काये जाणे । न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक ॥ ७ ॥

मराठी अर्थ

आपण स्वतः कसें आहोंत हें ज्या माणसाला कळत नाहीं त्याला दुसरा कसा आहे हे कळणार नाहीं. योग्य मार्गानें जाणें सोडल्यानें माणसें दिनवाणी बनतात.

English meaning

When that purush does not know Its own Self then, that knows so many other things. Thus leaving aside equanimity, a world of misery has appeared.

8
मूळ

लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्तवेना । मूर्खपणें लोकीं नाना । कळह उठती ॥ ८ ॥

मराठी अर्थ

लोकांच्या मनांत काय आहे हे ज्यास कळत नाही. लोकांना जसें आवडते असा जो वागत नाही, त्याच्या मूर्खपणामुळें त्याची लोकांशी भांडणें-तंटे होतात.

English meaning

When the mind is full of intentions then, it cannot understand that nirgun nor can it conduct itself like this `all' even. Due to its foolishness, quarrelling starts in this world of `many' thoughts.

9
मूळ

मग ते कळो वाढती । परस्परें कष्टी होती । प्रेत्न राहातां अंतीं । श्रमचि होयें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

हीं भांडणें वाढतच जातात व त्यामुळें तो व ते लोक दुःखीकष्टी होतात. यामुळें प्रपंचांत योग्य प्रयत्न घडत नाही व शेवटीं विनाकारण श्रम होतात.

English meaning

Then that Reality increasingly quarrels and due to insults and reprisals there is only wearisome distress (maharaj- he says, "One day I will pay him back in his own words"). If proper effort is not maintained until understanding comes then, there is only this trouble and strife.

10
मूळ

ऐसी नव्हे वर्तणुक । परीक्षावे नाना लोक । समजलें पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥

मराठी अर्थ

वागण्याचा हा प्रकार योग्य नव्हें. आपल्याशी ज्या लोकांचा संमध येतो त्या नाना प्रकारच्या लोकांची पारख करावी. कोण कसा आहे याची माहिती आपल्याला असणें बरें.

English meaning

One should not conduct one's Self in this way and this world of the `many' should be properly examined. Therefore clear cut understanding of that purush is required.

11
मूळ

शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं येक कळे दक्षा । मनोगत नतद्रक्षा । काय कळे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

चतुर व सावध माणसाला दुसर्‍याच्या बोलण्यावरुन व हेतूवरुन त्याची परीक्षा करता येते. बुद्धिहीन माणसाला दुसर्‍याच्या मनांतील हेतु कळत नाहीं.

English meaning

This `word' is to be examined; this inner space is to be examined; this `thing' and that One are to be understood by those who are alert. But tell me, what can a mind full of these selfish intentions understand?

12
मूळ

दुसर्‍यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें । पाहों जातां लोकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याला नांवे ठेवायची व आपलें ते खरें असें वागायचे असा सर्वसाधरण लोकांचा स्वभाव असतो.

English meaning

It blames others and takes sides and then, when you try to understand that One within the `many' with such worldly attention, that One becomes worldly.

13
मूळ

लोकीं बरें म्हणायाकारणें । भल्यास लागतें सोसणें । न सोसितां भंडवाणें । सहजचि होयें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

ज्या चांगल्या लोकांना असें वाटतें कीं लोकांनी आपल्याला चांगलें म्हणावें त्यानें लोकांसाठी झीज सोसली पाहिजे. अशी झीज जो सोशीत नाहीं त्याची फजितीच होते.

English meaning

Within this gross world there is the best and that is pure knowledge. But for the sake of being someone and saying something, that most virtuous One starts agreeing with this world (and then you have so many opinions and concepts and take it all true). But if you do not agree with this slanderous talk then, you become that natural swarup.

14
मूळ

आपणास जें मानेना । तेथें कदापि राहवेना । उरी तोडून जावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

जेथील लोकांचें वागणें आपल्याला पटत नाहीं, तेथें आपण कदापी राहूं नये. पण सर्वसाधारणपणें दुसर्‍याचे मन मोडून तेथून निघून जावेसे वाटत नाहीं.

English meaning

If mula maya does not respect its own self, then `there' cannot remain. That *remainder gets broken up into the `many' thoughts and there cannot be the company of the One. *(That which remains when everything is negated, Self without self)

15
मूळ

बोलतो खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें । न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

ज्याचें बोलणं व वागणें खरें असतें, त्याला लहानथोरांतही मान मिळतो. बरोबर व योग्य काय आणि चूक व अयोग्य काय याचा निकाल मग आपोआप लागतो.

English meaning

When that purush `speaks' the Truth and moves with the Truth then, He has respect for Himself. Then both justice and injustice are understood to be that natural swarup.

16
मूळ

लोकांस कळेना तववरी । विवेकें क्ष्मा जो न करी । तेणेंकरितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥

मराठी अर्थ

आपण कोण आहोत व आपली लायकी काय आहे हे लोकांना जोपर्यंत कळत नाहीं, तोपर्यंत खर्‍या थोर पुरुषानें विवेकपूर्वक क्षमाशील असलें पाहिजें. जर तो क्षमाशील राहिला नाही, तर तो व इतर लोक यांत फरकच राहणार नाही.

English meaning

As long as this world is taken to be true then, that purush cannot maintain the pa- tient endurance of vivek. On account of this, equanimity comes and goes (ie. there is a wavering mind).

17
मूळ

जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥ १७ ॥

मराठी अर्थ

जोपर्यंत चंदन झीजत नाहीं तोपर्यंत लोकांना त्याचा सुगंध कळत नाही. आणि जोपर्यंत सुगंध कळत नाहीं तोपर्यंत लोकांना चंदन व इतर वृक्ष सारखेंच असतात.

English meaning

If the sandalwood* is not rubbed, its fragrance cannot be known and then this sanda- lwood tree and the `many' trees appear to be just the same. *(This `all' body is the fine sandalwood tree and this has to be worn away through worship. But the `many' different bodies are valued and this `all' has been disregarded)

18
मूळ

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥ १८ ॥

मराठी अर्थ

माणसांत असणारा उत्तम गुण जोपर्यंत लोकांत प्रगट होऊन त्यांना कळत नाहीं तोपर्यंत त्याच्या योग्यतेची कल्पना लोकांना नसते. पण एकदा कां तें उत्तम गुण लोकांना कळले कीं लोकांचे मन पालटू लागते.

English meaning

As long as the best guna has not been understood then, that paramatma and this `I am' are made into so many different things. And when that best guna is understood then, this inner space of the world becomes pure.

19
मूळ

जगदांतर निवळत गेलें । जगदांतरीं सख्य जालें । मग जाणावें वोळले । विश्र्वजन ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आपल्याबद्दल लोकांचे मत स्वच्छ झालें म्हणजे लोकांची आपल्याला मान्यता मिळते व त्यांचे प्रेम प्राप्त होते. मग लोक आपले झाले, त्यांच्याशी जवळीक झाली हें समजावें.

English meaning

When this inner space is made pure then, happiness appears within. For when there is this joy of knowing, then the mind turns around and does not seek sensory delight (maharaj- the world is going east and the Master takes you to the west).

20
मूळ

जनींजनार्दन वोलला । तरी काये उणें तयाला । राजी राखावें सकळांला । कठीण आहे ॥ २० ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें ज्या माणसाला जनतारुपी जनार्दन वश झाला त्याला काहींही कमी पडत नाहीं. परंतु सर्व लोकांना खूष ठेवणें कठीण आहे.

English meaning

When that Lord of the world draws near to you then, what will this mind want for? Still know that though this consent of the `all' should be protected, it is nevertheless maya.

21
मूळ

पेरिलें तें उगवतें । उसिणें द्यावें घ्यावें लागतें । वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आपण जें पेरतो तेंच उगवते. जर आपण उसनें घेतलें तर तें फेडावें लागते. आपण जर कोणाचे वर्म, गुप्त रहस्य लोकांत प्रगट केलें तर त्याचें अंतःकरण दुखावलें जातें.

English meaning

Wherever it is sown, there that Reality will *sprout. But one should be able to accept the reprisals of whatever one has given out (endure the karma you have created in ignorance; let whatever has to come, come and whatever has to go, go). And when that essence is extracted then, the broken mind is that unbroken swarup. *(If you place that Reality in the `many' forms then It will appear like the `many' forms; if you place It in the formless, It will be formless. Where you place It, is up to you)

22
मूळ

लोकिकीं बरेंपण केलें । तेणें सौख्य वाढलें । उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥ २२ ॥

मराठी अर्थ

आपण लोकांशीं चागलें वागलो तर आपल्या जीवनांत सुखाची वाढ होते. उत्तरासारखेम उलट उत्तर येते हा तर नियमच आहे.

English meaning

When on account of thoughtlessness, this world within is made, then happiness grows. Then this *reply and its counter-reply are just the same. *(`I am')

23
मूळ

हें आवघें आपणापांसीं । येथें बोल नाहीं जनासी । सिकवावें आपल्या मनासी । क्षणाक्षणा ॥ २३ ॥

मराठी अर्थ

आपल्या जीवनांत सुख भोगावें कां दुःख हें सारें आपल्याच हातीं आहे. या बाबतींत दुसर्‍याला दोष देता येत नाही. आपण आपल्या मनाला ही गोष्ट सतत शिकवीत राहिलें पाहिजें.

English meaning

Thoughtlessness and this world of `many' thoughts are both with you (ie. you are this `I am' and liberation and bondage are in our hands only). `Here' there should be no `speaking' to this gross world and your own mind should be taught this from moment to moment (maharaj- check your mind. Why has this thought come to me?).

24
मूळ

खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मोनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

समजा कोणी दुष्ट किंव दुर्जन माणूस आपल्याला भेटला व त्याच्याशी वागतांना आपल्या क्षमाशीलतेचा तोल सुटूं लागला तर साधकानें मौन धरावें आणि ती जागा सोडून दुसरीकडें निघून जावें.

English meaning

When the wicked minded and the `far from the atma' are met and your power of forbearance cannot endure then, the sadhak should, by mouna/keeping silent, leave that place (of the mind). (When you understand nothing is there then, everything will be there, only now you will not want to experience anything and spoil your state; then why to think and imagine?)

25
मूळ

लोक नाना परीक्षा जाणती । अंतरपरीक्षा नेणती । तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥

मराठी अर्थ

सामान्यपणें माणसाला बाहेरील खुणांवरुन परीक्षा करता येते. परंतु माणसाच्या अंतरंगाची परीक्षा करता आली पाहिजे. ती पुष्कलांना करतां येत नाही. त्यामुळें माणसें भाग्यवान होत नाहीत. यांत संशय नाहीं.

English meaning

If you know how to examine the things of this world but do not know how to examine this inner space then, that Reality, which is free of all body attachment, appears as a miserable beggar in the prana.

26
मूळ

आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण । कठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

आपण एक दिवस मरणार आहोत हें जाणिवेंत ठेवून लोकांशी प्रेमानें वागावें. हा विवेक टिकवून धरणें कठीण जातें.

English meaning

Then death is sure to come to you. Therefore thoughtlessness should be protected. For even this `I am' that is come upon through vivek, is still in maya.

27
मूळ

थोर लाहान समान । आपलें पारिखे सकळ जन । चढतें वाढतें सनेधान । करितां बरें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

आपल्याहून लहानमोठे व आपल्या बरोबरीचे आपले व परकें अशा सर्व लोकांशी वाढतें प्रेमसंबंध असावेत हें चांगलें.

English meaning

When the great and the small are the same (ie. brahman and jiva); when you and another are the same; when that world beyond and this world are the same; when less objectivity and more objectivity are the same; then it is on account of thoughtlessness (ie. understanding has come).

28
मूळ

बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास येते । आतां पुढें सांगावें तें । कोणास काये ॥ २८ ॥

मराठी अर्थ

आपण दुसर्‍याचे चांगलें केलें तर आपलेंहि चांगलें होतें. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. यापेक्षां जास्त चांगलें सांगणें कांहीं नाही.

English meaning

On account of thoughtlessness, one becomes thoughtless; on account of thoughtlessness, you do not exist. Then now and ahead, what will that Reality have to tell to anyone? (If there is only One then what need is there of thoughts of another?)

29
मूळ

हरिकथानिरुपण । बरेपणें राजकारण । प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥

मराठी अर्थ

भगवंताची कथा काय, निरुपण काय, उत्तम राजकारण काय या सगळ्या गोष्टी प्रसंग पाहून कराव्या. प्रसंग ओळखून केल्या तर त्यांत यश मिळते. पण प्रसंग न ओळखतां केल्यास त्या वाया जातात.

English meaning

Therefore there should be this `story' of hari and wise rajakarana (see 11.5), for without this knowing, this `all' will be forgotten and lost.

30
मूळ

विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

समजा, एखादा माणूस खूप विद्या शिकला, पण प्रसंगानुरुप त्याला वागता आलें नाहीं तर मग त्याचे शिकणें वायाच जाते. त्या विद्येला कोणी विचारत नाही.

English meaning

And when that paramatma learns worldly knowledge then, this pure knowledge will be forgotten and lost. Then, what and to whom will you ask about that knowledge of brahman? (If this knowledge is lost then you are lost but, maharaj- there is only yourself in this world; then tell me, where does the answers come from?) .