नामरूप — समास 8: कर्तानिरुपण

Fully populated

Karta Nirupan (A Discourse on the Doer)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्र्चयेंसीं । सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांनीं वक्त्याला असा प्रश्र्ण केला कीं, " हीं सगळीं सृष्टि आणि ब्रह्मांड कोणी रचले? निश्र्चितपणें याचा कर्ता कोण आहे? "

English meaning

The listener says to the speaker, "Who is truly the doer? And who has created this `all', the gross world and this whole universe/brahmanda?"

2
मूळ

तव बोलिले सभानायेक । जे बोलिके येकाहून येक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर ऐकावें ॥ २ ॥

मराठी अर्थ

तेव्हां सभेतून एकाहून एक हुशार असे लोक पुढें आले. आणि आपापल्या मतानें याचे उत्तर देऊं लागले. त्या उत्तराचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे.

English meaning

Even while there is a gross creation still, there is this `all' (prakruti) and also that leader (purush) of this meeting place called the `all'. His eloquent `speech' is `I am' and this is the moving within that One who is still. Therefore the wonder of this `I am' should be earnestly listened to by the good listener.

3
मूळ

येक म्हणती कर्ता देव । येक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राव । बोलते जाले ॥ ३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणाला कीं देव कर्ता आहे. त्यावर एकानें म्हटलें कीं हा देव कोण आहे? प्रत्येकानें आपले आपले मत सांगितलें.

English meaning

Otherwise someone will say, "God is the doer" and then, another will say, "Who is God?" This is all due to the appearance of this `I am' and our own importance (we say, "I am so and so and there is a God and doer" etc. because we have taken ourselves to be someone within this `I am' feeling. But when this `I am' is worshipped then, such questions and opinions will not arise).

4
मूळ

उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थें बोलती पष्ट । आपुलाली उपासना श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणें ज्यानें त्यानें उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ देवांना कर्तेपण बहाल केलें. प्रत्येकाला आपापला उपास्य देव श्रेष्ठ वाटणें हीं जनरीतच आहे.

English meaning

It all depends upon our faith whether the nature of our worship is of the best (I do not exist), the middle (`I am') or the inferior (idols etc.). However in this world, whatever worship the people make is considered by them as the best.

5
मूळ

कोणीयेक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती । येक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥

मराठी अर्थ

कोणी असें म्हणतात कीं मंगलमूर्ती म्हणजे गणपती हा कर्ता आहे. तर कोणी म्हणतात कीं, सरस्वती सर्व करते.

English meaning

Then that One who is within everyone (but due to its ignorance) says, "shri ganesh is the God and doer." And that One says, "saraswati does everything."

6
मूळ

येक म्हणती कर्ता भैरव । येक म्हणती खंडेराव । येक म्हणती वीरेदेव । येक म्हणती भगवती ॥ ६ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, भैरव, किंवा खंडेराव किंवा बीरदेव किंवा भगवती.

English meaning

The One says, "bhairav is the doer"; another says, "khandero"; and another says, "bi- radeva"; and yet another says, "bhagavati." (The One who is beyond doership becomes a jiva and there are so `many' opinions)

7
मूळ

येक म्हणती नरहरी । येक म्हणती बनशंकरी । येक म्हणती सर्व करी । नारायेणु ॥ ७ ॥

मराठी अर्थ

किंवा नरहरी किंवा बनशंकरी किंवा नारायण सर्व कांहीं करतो.

English meaning

The One says, "narahari"; another says, "banashankari"; and another says, "The doer of all is narayana."

8
मूळ

येक म्हणती श्रीराम कर्ता । येक म्हणती श्रीकृष्ण कर्ता । येक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराज भगवंत

English meaning

The One says, "shri ram is the doer"; another says, "shri krishna is the doer'; and another says, "The God who does is keshavaraj."

9
मूळ

येक म्हणती पांडुरंग । येक म्हणती श्रीरंग । येक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

किंवा पांडुरंग किंचा श्रीरंग किंवा झोटिंग सर्व कांहीं करतो.

English meaning

The One says, "panduranga'; the One says, "shriranga"; the One says, "zoting (a ghost) is the doer of all this."

10
मूळ

येक म्हणती मुंज्या कर्ता । येक म्हणती सूर्य कर्ता । येक म्हणती अग्न कर्ता । सकळ कांहीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, मुंज्या किंवा सूर्य किंवा अग्नि

English meaning

The One says, "munjya is the doer"; the One says, "The sun is the doer"; the One says, "agni/fire is the doer of all these things."

11
मूळ

येक म्हणती लक्ष्मी करी । येक म्हणती मारुती करी । येक म्हणती धरत्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥

मराठी अर्थ

किंवा लक्ष्मी किंवा मारुती किंवा पृथ्वी

English meaning

The One says, "lakshmi is the doer"; the One says, "maruti is the doer"; the One says, "The mother earth is the doer of all these things."

12
मूळ

येक म्हणती तुकाई । येक म्हणती येमाई । येक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥

मराठी अर्थ

किंवा तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई सर्व कांहीं करते.

English meaning

The One says, "tukai"; the One says, "yamai"; the One says, "satawai is the doer of all."

13
मूळ

येक म्हणती भार्गव कर्ता । येक म्हणती वामन कर्ता । येक म्हणती परमात्मा कर्ता । येकचि आहे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, भार्गव किंवा वामन परमात्मा कर्ता एकच आहे.

English meaning

The One says, "bhargava is the doer"; the One says, "vamana is the doer" and the One says, "paramatma is the one and only doer."

14
मूळ

येक म्हणती विरणा कर्ता । येक म्हणती बस्वंणा कर्ता । येक म्हणती रेवंणा कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात वीरण्णा किंवा बसवण्णा किंवा रेवण्णा

English meaning

The One says, `viranna is the doer"; the One says, "baswanna is the doer" and the One says, `ravanna is the doer of all these things."

15
मूळ

कोणी म्हणती रवळया कर्ता । येक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । येक म्हणती वेंकटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥

मराठी अर्थ

किंवा रवळनाथ किंवा कार्तिकस्वामी किंवा व्यंकटेश किंवा

English meaning

The One says, "rawalnath is the doer"; the One says, "swami kartik is the doer" and the One says, "venkatesh is the doer of all these things."

16
मूळ

येक म्हणती गुरु कर्ता । येक म्हणती दत्त कर्ता । येक म्हणती मुख्य कर्ता । वोढ्या जगन्नाथ ॥ १६ ॥

मराठी अर्थ

गुरु किंवा दत्त किंवा वोढ्या जगन्नाथ मुख्य कर्ता आहे.

English meaning

The One says, "guru is the doer"; the One says, `datta is the doer" and the One says, "The main doer is vodhya jagannath."

17
मूळ

येक म्हणती ब्रह्मा कर्ता । येक म्हणती विष्णु कर्ता । येक म्हणती महेश कर्ता । निश्र्चयेंसीं ॥ १७ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, ब्रह्मा किंवा विष्णु किंवा महेश निश्र्चयानें कर्ता आहे.

English meaning

The One says, "brahma is the doer"; the One says, "vishnu is the doer"; and the One says, "mahesh is definitely the doer."

18
मूळ

येक म्हणती प्रजन्य कर्ता । येक म्हणती वायो कर्ता । येक म्हणती करुन अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, पर्जन्य किंवा वायु कर्ता आहे. कोणी म्हणतात कीं, निर्गुण देव सर्व करुन अकर्ता आहे.

English meaning

The One says, "There is no God, the monsoon rains do"; the One says, "The wind does" and the One says, "The nirguna God is the non-doer, doing."

19
मूळ

येक म्हणती माया करी । येक म्हणती जीव करी । येक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, माया किंवा जीव किंवा प्रारब्धयोग सर्व कांहीं करतो.

English meaning

The One says, "maya is the doer"; the One says, "The jiva is the doer"; and the One says, "The doer of all this is karma."

20
मूळ

येक म्हणती प्रेत्न करी । येक म्हणती स्वभाव करी । येक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात कीं, प्रयत्न किंवा स्वभाव सर्व कांहीं करतो. तर कोणी म्हणतात कीं, हे सर्व कोण करतो कोण जाणे.

English meaning

The One says, "Effort is the doer"; the One says, "It all happens spontaneously" and the One says, "Who knows who the doer is?"

21
मूळ

ऐसा कर्त्याचा विचार । पुसतां भरला बाजार । आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

या सृष्टीचा कर्ता कोण? हा प्रश्र्ण विचारल्यावर असा उत्तरांचा बाजार भरला. आतां यांत कोणाचे उत्तर खरें मानायचे सांगा.

English meaning

If you ask who the doer is, then there is this overflowing market place of opinions. Now, whose answer should be valued as true?

22
मूळ

जेहिं जो देव मानिला । कर्ता म्हणती तयाला । ऐसा लोकांचा गल्बला । वोसरेना ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जो ज्या देवाला मानतो त्याला तो कर्ता म्हणतो, अनेक देवांना मानणार्‍या अनेक लोकांचा हा गोंधळ कांहीं कमी होत नाहीं.

English meaning

If that purush regards this mula maya as God (He, who is Himself God gets deluded and takes His prakruti as real. And on account of the delusion, more confusion comes) then, the people end up saying things like, "That Reality is the doer.' Such is the unending confusion within the world and it does not subside.

23
मूळ

आपुलाल्या साभिमानें । निश्र्चयेचि केला मनें । याचा विचार पाहाणें । घडेचिना ॥ २३ ॥

मराठी अर्थ

प्रत्येक माणूस स्वतःच्या देवतेचा अभिमान धरतो. आणि सर्व कर्तेपण तिथेंच आहे असा आपल्या मनानें निश्र्चय करतो. पण तें खरें कीं खोटे याचा तो विचार करीत नाहीं.

English meaning

Even if in our minds there is this conviction of this `all' still, this creates great pride and then this understanding of the `speech' will not accomplish thoughtlessness.

24
मूळ

बहु लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार । परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥

मराठी अर्थ

अशा प्रकारें पुष्कळ लोकांची पुष्कळ मतें आहेत. निरनिराळ्या मतांचा बाजार आपण बाजूस ठेवूं. मूळ प्रश्र्णाचा खरा विचार असा आहे.

English meaning

And when there is this world of the `many' then, thoughtlessness becomes the `many' thoughts. Therefore the `many' opinions are to be refrained from and left at the market place. But the thoughtlessness within this `speech' is such that, in a moment, it goes to that market place and accepts some opinion (though being ourselves that thoughtless Self still, we invite the `many' thoughts in; we like the `many' thoughts for they sustain our sense of being someone).

25
मूळ

श्रोतीं व्हावें सावधान । निश्र्चयें तोडावा अनुमान । प्रत्यये मानावा प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥

मराठी अर्थ

क्षोत्यांनी आतां सावधान व्हावें. कर्त्याचा निश्र्चय करुन कल्पना सोडावी. जाणत्या पुरुषांनीं प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्र्चय करावा.

English meaning

In the listener, there should be alertness and conjecture is to be severed by this conviction `I am'. And then only the nirgun understanding should be accepted as the Truth, by that knowing purush.

26
मूळ

जें जें कर्तयानें केलें । तें तें त्याउपरी जालें । कर्त्यापूर्वीं आडळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥

मराठी अर्थ

कर्ता जें जें कांहीं निर्माण करतो तें तें त्याच्यानंतर निर्माण झालेले असते. कर्त्याच्या आधीं तें अस्तित्वांत नसतें.

English meaning

Whatever has been created by a creator has appeared after the creator. This cannot occur before the creator.

27
मूळ

केलें तें पंचभूतिक । आणि पंचभूतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशें पंचभूतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥

मराठी अर्थ

आपल्या अनुभवास येणारें हें दृश्य विश्र्व पंचभूतिक आहे. ब्रह्मादिदेव हे देखील पंचभूतिकच आहेत. म्हणून पंचभूतिक देवांनी पंचभूतिक विश्व निर्माण केलें असें होणार नाहीं. पंचभूतांच्या अंशांनी पंचभूतिक विश्र्व निर्माण करणें शक्य नाहीं.

English meaning

And if whatever has been created is made up of the five great elements then, even lord brahma, vishnu and mahesh are elemental. And how can something else that is elemental create this elemental world? (It is said that brahma is the creator of this gross world, vishnu maintains it and mahesh destroys it. But these gunas have appeared from within this mula maya. How can they be the creator?)

28
मूळ

पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें । पंचभूतिक तें स्वभावें । कर्त्यांत आले ॥ २८ ॥

मराठी अर्थ

मग कर्ता शोधून काढण्यासाठीं पंचभूतांना बाजूस वेगळें काढावें आणि नंतर कर्ता कोण तें ओळखावें. याचें कारण असें कीं, पंचभूतें स्वतः जड असल्यानें ती स्वतः कांहीं निर्माण करत नाहींत. पण जो कोणी कर्ता आहे त्याच्यामध्यें ती सहजच अंतर्भूत आहेत.

English meaning

Therefore the five elements should be set aside and then the doer should be reco- gnized. Then this elemental will naturally appear within the doer (`I am everything, everywhere').

29
मूळ

पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण । निर्विकारास विकार कोण । लाऊं शके ॥ २९ ॥

मराठी अर्थ

पंचभूतांना वेगळें केलें कीं निर्गुण उरते. तेथें कर्तेपण नसतें. कर्तेपण हा विकार आहे. निर्विकार स्वरुपाला विकार लावता येत नाहीं.

English meaning

That nirgun is separate to these five great elements but there is no doership `there'. How can this quality of changing/modification possibly be attached to that change- less/unmodified? (That which is separate from the five elements is nirgun and that nirgun cannot be a doer, for in `no-otherness', nothing is happening)

30
मूळ

निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण जात्यांत सापडे । आतां कर्तव्यता कोणकडे । बरें पाहा ॥ ३० ॥

मराठी अर्थ

येथें अडचण अशी कीं, निर्गुणाला कर्तेपण लावता येत नाहीं. सगुण हें निर्माण झालेले असल्यानें त्यास कर्तेपण देता येत नाहीं. मग अखेर कर्तेपण कोणाला द्यायचे हा प्रश्र्ण शिल्लक राहतो.

English meaning

The power of doing cannot be placed with the nirgun and therefore it has to be in this created sagun that a doer is to be found. But it was already established that doership cannot be by something in the elements; so now who does doership belong to? Therefore understand the best (thoughtlessness).

31
मूळ

लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण । म्हणोनि हेंचि प्रमाण । जें स्वभावेंचि जालें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

याचें उत्तर असें कीं, ब्रह्मवस्तूकडून पाहिलें तर सारें दृश्य विश्र्व लटकें आहे. भ्रम आहे. जें मुळांत नाहींच नाहीं, त्याचा कर्ता कोण हे विचारणे गैर आहे. म्हणून हें विश्र्व स्वभावतःच झालें असें म्हणणे योग्य आहे.

English meaning

How can it be correct to ask, "Who is the creator of the false?" Therefore that thoughtless Self is the only Truth and this mula maya is by nature false.

32
मूळ

येक सगुण येक निर्गुण । कोठें लाऊं कर्तेपण । या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

एक सगुण व दुसरे निर्गुण आहे. या दोन्हीपैकी कोणाकडेही सृष्टिचें कर्तेपण देतां येत नाहीं. या अर्थाचे विवेचन कसें तें पाहा.

English meaning

When this sagun is that One nirgun then, where will doership be placed? (This ques- tion of doership, has arisen due to this false body concept) Make a careful examination of this `speech' and understand the best.

33
मूळ

सगुणें सगुण केलें । तरी तें पूर्वींच आहे जालें । निर्गुणास कर्तव्य लाविलें । नवचे कीं कदा ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

सगुणानें सगुण निर्माण केलें असें म्हणावें तर सगुण आधीच निर्माण झालेलें आहे. याचा अर्थ असा कीं, सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधींच असतो. तो सगुण निर्माण करतो. तो सगुणांत अंतर्भूत होत नाहीं. जें निर्गुण आहें तें निर्विकारी असल्यानें त्यास कर्तेपणाचा विकार स्पर्श करीत नाहीं.

English meaning

And even if it is said that, the sagun has created the sagun (ie. sagun is doer) still it means that, that Reality has appeared. But doer-ship can never be put upon that nirgun.

34
मूळ

येथें कर्ताचि दिसेना । प्रत्यये आणावा अनुमाना । दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें विचार केला तर सृष्टिचा कोणी कर्ता आढळत नाहीं. या प्रत्ययावरुन असें अनुमान काढावें लागतें कीं, हें दृश्य विश्र्व खरें नाहीं. म्हणून अशी अडचण उत्पन्न होतें.

English meaning

And if a doer cannot be seen in maya then, why should such conjecture be placed upon that nirgun? Therefore, understand there is no truth to this visible and that nirgun is the only Truth.

35
मूळ

केलें तें अवघेंच लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें । वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

कर्त्यानें जें केलें असें आपण म्हणतो तेंच जर मुळांत लटकें आहे, तर कर्ता कोण याची चौकशी व्यर्थ ठरते. वक्ता सांगतो कीं, याचा नीट विचार करुन तें समजून घ्या.

English meaning

When that Reality is made false by the `many' opinions then, there is the mea- ningless talk of thoughtlessness, a doer and this `speech'. The speaker says, by vivek understand the best.

36
मूळ

बरें पाहातां प्रत्यये आला । तरी कां करावा गल्बला । प्रचित आलियां आपणाला । अंतर्यामी ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

नीट विचार करुन ही गोष्ट मनाला एकदां पटली कीं घोटाळा उरणार नाहीं. आपल्या अंतर्यामी याची प्रचीति मात्र आली पाहिजे.

English meaning

When one understands the best, then that nirgun understanding has come. Then how will there be any confusion? Understand this sagun `experience' that has appeared within you (and as long as a `you' remains, there will be the thought of a doer. When no one remains then, doer, enjoyer, thoughtlessness etc, will not remain).

37
मूळ

आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे । पूर्वपक्ष लागे उडवणें । येरवीं अनुर्वाच ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

आतां हें बोलणें पुरें. जो विवेकीं असतो तोच हें जाणतो. पूर्वपक्षानें काढलेलें आक्षेप कसें सदोष आहेत हें दाखवावें लागतें. एरवी हा सिद्धांत शब्दानें वर्णन करतां येण्यासारखा नाहीं.

English meaning

Now, let this `speech' become thoughtless. Only the viveki can know thoughtlessness. The original hypothesis (ie. `God does all') needs to be discarded and then there can be that inexpressible brahman.

38
मूळ

तंव श्रोता करी प्रस्न । देहीं सुखदुःखभोक्ता कोण । पुढें हेंचि निरुपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

यावर श्रोत्यानें असा प्रश्र्ण केला कीं, " देहामध्यें सुख-दुःखाचा भोक्ता कोण? " पुढील समासांत या विषयाचे विवेचन आहे.

English meaning

But then the listener asked another question (ie. he stopped listening and a doubt arises in that doubtless), "In the body, who is the enjoyer of pleasures and pains?" Therefore ahead, this `speech' is to be always discoursed (and this question will not arise). .