बहुजिनसी — समास 2: सर्वज्ञसंगनिरुपण

Fully populated

Sarvadnya Sanga Nirupan (A Discourse on the Company of the All-Knowing)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें । जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥

मराठी अर्थ

आपण अज्ञानी असल्यानें अजाणतेपणानें आजपर्यंत जें कांहीं घडलें, तें घडून गेलें. आतां यापुढें जाणतेपणानें नीट व्यवस्थित वागावें.

English meaning

Due to the appearance of ignorance, that Reality has become manifest. And having appeared, That has then to disappear. Therefore this limited jiva should exist with knowingness.

2
मूळ

जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी । जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळुहळु ॥ २ ॥

मराठी अर्थ

जाणत्याची संगत धरावी. त्याची सेवा करावी. त्याची सद्बुद्धि आपण हळुहळु आपलीशी करुन घ्यावी. सूक्ष्म ज्ञानदृष्टीनें अंतरात्मा पाहण्याची जी बुद्धीची स्थिती तिला सद्बुद्धि म्हणतात.

English meaning

One should cherish the company of the Knower (by effortless knowing, one stays in the company of the Knower). One should have the experience of the Knower. Gradually that pure buddhi of the Knower should be accepted.

3
मूळ

जाणत्यापासीं लेहों सिकावें । जाणत्यापासीं वाचूं सिकावें । जाणत्यापासीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

जाणत्यापाशी लिहायला, वाचायला शिकावें. सगळें कांहीं त्याला विचारावें.

English meaning

One should learn to `write'2 while in the company of the Knower. One should learn to `read' while in the company of the Knower. And then there should be the wiping out of this `all thing' while in the company of the Knower.

4
मूळ

जाणत्यास करावा उपकार । जाणत्यास झिजवावें शरीर । जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

जाणत्या माणसाशी उपकार करावा. त्याच्यासाठी शरीर झिझवावें. तो कसा विचार करतो तें पाहावें.

English meaning

One should gain the grace of the Knower; then this `all' body will be worn away by the Knower and the thoughtlessness of the Knower will be understood.

5
मूळ

जाणत्याचे संगतीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें । जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥

मराठी अर्थ

जाणत्याच्या संगतीनें भजन करावें. दुसर्‍यासाठीं झिझावें. पुनः पुनः मनन करुन मनाला प्रसन्न करावें.

English meaning

bhajan should be made in the company of the Knower. Great efforts should be 2From one small point of knowledge this `story/I am' should be written and then it should be properly read ie. witnessing. made to understand this bhajan that is in the company of the Knower. By constant investigation there should be the delight that is only in the company of the Knower.

6
मूळ

जाणत्यापासीं गांवें गाणें । जाणत्यापासीं बाजवणें । नाना आळाप सिकणें । जाणत्यापासीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

जाणत्यापाशीं गाणें बजावणें शिकावें. आलाप कसें घ्यावे ते त्याच्याजवळ शिकावें.

English meaning

This `song' should be sung in presence of the Knower. This instrument (ie. the body) should be played in the presence of the Knower. And in the presence of the Knower, the `many' thoughts should learn this harmonious tune `I am'.

7
मूळ

जाणत्याचे कासेसी लागावें । जाणत्याचे औषध घ्यावें । जाणता सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचा आधार घ्यावा, तो सांगेल तें औषधपाणी करावें. तो सांगेल तें पथ्य करावें.

English meaning

The shelter of the Knower should be kept. The medicine of the Knower should be taken and if the Knower reveals to you that thoughtlessness at the source, then you should practice that only.

8
मूळ

जाणत्यापासीं परीक्षा सिकणें । जाणत्यापासीं तालिम करणें । जाणत्यापासीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जाणत्यापाशी परीक्षा करायला शिकावें. त्याच्यापाशी तालीम करावी. व्यायाम शिकावा. तसेंच त्याच्यापाशीं पोहण्याचा अभ्यास करावा.

English meaning

In the company of the Knower you should learn how to properly investigate this source (prakruti/purush). Then all physical activity should be made in the presence of the Knower. In the presence of the Knower, you should learn how to swim over this worldly ocean.

9
मूळ

जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें । जाणत्याचें ध्यान घ्यावें । नाना प्रकारीं ॥ ९ ॥

मराठी अर्थ

जाणता जसें बोलतों तसें बोलायला शिकावें. तो सांगेल तसें आपण वागावें. तो जसें ध्यान करतो तसें ध्यान करण्याचा प्रयत्न आपण करावा.

English meaning

Whatever the Knower `speaks', this you should `speak' and when the Knower explains thoughtlessness to you then, you should perform that only. The meditation of that Knower within these ways of the `many' should be your meditation.

10
मूळ

जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या । जाणत्याच्या गोष्टी विवराव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

जाणत्याच्या कथा शिकाव्या. त्याच्या युक्त्या समजून घ्याव्या. त्याच्या सगळ्या गोष्टींचे विवरण करावें.

English meaning

This `story' of the Knower should be learnt. This `art' of the Knower should be understood. This `all thing' is the `story' being told by that Knower and this should be carefully investigated until you meet that Knower.

11
मूळ

जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे । जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

जाणता पेच कसें घालतो तें समजून घ्यावें. त्याचे पीळ उकलावे. तो लोकांना जसें खूष ठेवतो तसें आपण पण लोकांना खूष ठेवावे.

English meaning

The trick (ie. forgetting) of the Knower should be learnt (maharaj- understanding is a trick...a change of mind is required). The aloofness of the Knower should be under- stood. When that which the Knower protects is kept protected then, this `other world' is content.

12
मूळ

जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग । जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्यासावे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

जाणत्यावर आलेले प्रसंग ओळखावें. निरनिराळ्या प्रसंगांत त्याचे वागण्याचे प्रकार शिकून घ्यावें. त्याला जी स्फूर्ति येते तिचा सर्वांगीण अभ्यास करावा.

English meaning

The connection of the Knower should be known. The splendour of the Knower should be accepted. And this arising inspiration of that Knower should be studied.

13
मूळ

जाणत्याचा साक्षेप घ्यावा । जाणत्याचा तर्कजाणावा । जाणत्याचा उल्लेख समजावा । न बोलतांचि ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा. त्याची विचारपद्धती समजून घ्यावी. आणि त्याच्या शब्दांवरुन त्यानें न सांगतांच त्याचा सगळा भावार्थ समजून घ्यावा.

English meaning

That steadfast purpose of the Knower should be accepted. The logic of the Knower should be known (maharaj- how can you be that which is changing every moment?). And this `I am' utterance of the Knower should be understand and then afterwards not `spoken'.

14
मूळ

जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण । जाणत्याचें निरुपण । ऐकत जावें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचे धूर्तपण व राजकारण पाहावें. त्याचे निरुपण ऐकत जावें.

English meaning

The intelligence of the Knower should be known. The rajakarana of the Knower should be understood and the discourse of the Knower should be heard.

15
मूळ

जाणत्याचीं कवित्वें सिकावीं । गद्यें पद्यें वोळखावीं । माधुर्यवचनें समजावीं । अंतर्यामी ॥ १५ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचे कवित्व शिकावें. त्याचे गद्य व पद्य शिकून घ्यावें. त्याची मधुर वचनें आपल्या अंतर्यामीं समजावी.

English meaning

The `poem' of the Knower should be learnt. The difference between common prose and this *inspired poem should be recognized. In this inner space the sweetness of this divine `speech' should be understood. *(See 14.3)

16
मूळ

जाणत्याचें पाहावें प्रबंद । जाणत्याचे वचनभेद । जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचे प्रबंद पाहावें. त्याची निरनिराळी वचनें पाहावी. त्याचे अनेक संवाद नीट शोधून पाहावें.

English meaning

The continuous composition made by the Knower should be understood. This dis- tinct `speech' of the Knower and that best *dialogue of the Knower should be searched out by the `many' thoughts. *(The silent dialogue between the Master and disciple)

17
मूळ

जाणत्याची तीक्षणता । जाणत्याची सहिष्णुता । जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥

मराठी अर्थ

जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी, त्याची सहनशीलता, त्याची उदारता समजून घ्यावी.

English meaning

The alertness of the Knower, the patience of the Knower and the generosity of the Knower; that One should understand and accept.

18
मूळ

जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घ सूचना । जाणत्याची विवंचना । समजोन घ्यावी ॥ १८ ॥

मराठी अर्थ

जाणत्याच्या अनेक कल्पना, त्याची दीर्घसूचना, त्याची विवंचना आपण समजून घ्यावी.

English meaning

The `many' thoughts should become the thoughtlessness of the Knower; the intimate acquaintance (ie. sagun) with the Knower and the investigation of that Knower (ie. nirgun) should be understood and accepted.

19
मूळ

जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अध्यात्मविवेक । जाणत्याचे गुण अनेक । आवघेच घ्यावे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

जाणता आपला काळ कसा सार्थकीं लावतो, अध्यात्माचा विवेक तो कसा करतो या गोष्टी व त्याचे अनेक गुण समजून घ्यावें.

English meaning

The Knower fulfils His `time'3 properly, for the Knower understands the nature of vivek. Therefore the numerous different forms created by the `many' thoughts should accept this sattwa guna of the Knower.

20
मूळ

जाणत्याचा भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग । जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन घ्यावा ॥ २० ॥

मराठी अर्थ

जाणत्याचा भक्तिमार्ग, त्याची वैराग्यपद्धती, निरनिराळ्या प्रसंगी त्याचे वागणें आपण समजून घ्यावें.

English meaning

The way of devotion/bhakti of the Knower; the way of vairagya of the Knower and this connection to the Knower should be understood and accepted by the `many' thoughts.

21
मूळ

जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचे सिकावें ध्यान । जाणत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

जाणत्याचे ज्ञान पाहावें. त्याचे ध्यान शिकावें. जाणत्याच्या ज्या सूक्ष्म खूणा आहेत त्या आपण समजून घ्याव्या.

English meaning

The knowledge of the Knower should be understood; the meditation of the Knower should be learnt and the subtle companionship with the Knower should be realized.

22
मूळ

जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेहलक्षण । जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जाणता अलिप्तपणें कसा राहतो, त्याच्या विदेहावस्थेचे लक्षण कोणतें, तो ब्रह्मविवरण कसेम करतो हें सगळें आपण समजून घ्यावें.

English meaning

One should understand how the Knower remains untouched; one should under- stand that attention that is beyond the body (ie. attentionless videha) and one should understand the thoughtlessness of brahman.

23
मूळ

जाणता येक अंतरात्मा । त्याचा काये सांगावा महिमा । विद्याकळागुणसीमा । कोणें करावी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

अंतरात्मा तेवढा खरा जाणता आहे. त्याचा महिमा सांगणें शक्य नाहीं. त्याची विद्या, कला व गुण याचा अंत कोणास लागत नाहीं. तो सत्य आहे, ज्ञानमय आहे, आणि अनंत आहे.

English meaning

That One Knower is the antaratma (ie. though ever pure still it identifies with or touches this `all'), but then how can the greatness of that paramatma be told? Who is there even who overflows with this knowledge, this `art' of knowing and the sattwa guna?

24
मूळ

परमेश्र्वराचे गुणानुवाद । अखंड करावा संवाद । तेणेंकरिता आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥

मराठी अर्थ

अशा अंतरात्मारुपी परमेश्र्वराचे गुणानुवाद करावे. त्याच्याच विषयीं सतत संभाषण करावें. असें केल्यानें अतिशय आनंद अनुभवास येतो.

English meaning

Therefore there should be this continuously connection with that pure sattwa guna of parameshwar and then that unbroken Self should have the dialogue of Oneness. Then on account of this ananda/bliss of this `all', there is that vast paramatma.

25
मूळ

परमेश्र्वरें निर्मिलें तें । अखंड दृष्टीस पडतें । विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥ २५ ॥

मराठी अर्थ

परमेश्र्वरानें निर्माण केलेलें हें विश्र्व सतत आपल्या दृष्टीस पडते. विवेकी माणसें जाणत्या पुरुषाकडून वारंवार विवरण करुन तें समजून घेतात.

English meaning

When that parameshwar creates then, that unbroken swarup has fallen into this visible `all'. But when there is continuous investigation of this `all', that Reality is understood by the viveki who is within the people (within each jiva there is the power of vivek).

26
मूळ

जितुकें कांहीं निर्माण जालें । तितुकें जगदेश्र्वरें निर्मिलें । निर्माण वेगळें केलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥

मराठी अर्थ

जें जें कांहीं निर्माण झालें आहे, तें तें सगळें जगदीश्र्वरानें निर्माण केलें आहे. पण ते जगनिर्मात्या जगदीश्र्वराहून निराळें आहे. हें प्रथम कळलें पाहिजे.

English meaning

Whenever this `thing' is created then, it is created by that Lord of the world/purush and it is at the source that this separation has taken place (taking yourself to be a body, you feel you are a separate individual; but understand that separateness, though very subtle, is at the root; you are the purush separate from whatever is seen or perceived and created).

27
मूळ

तो निर्माण करतो जना । परी पाहों जातां दिसेना । विवेकबळें अनुमाना । आणीत जावा ॥ २७ ॥

मराठी अर्थ

तो लोकांना निर्माण करतो, हें खरें. पण तो सूक्ष्म असल्यानें पाहूं गेल्यास दृष्टीस पडत नाहीं. म्हणून विवेकाच्या शक्तीनें त्याला आपण आपल्या कल्पनेंच्या कक्षेंत आणावा.

English meaning

That purush is the creator and He has become a man; and then he tries to see Himself but He cannot be seen (ie. taking himself as a man, He cannot know Himself). Therefore determined and constant vivek should be brought to his conjecture (only by leaving off the thought that "I am somebody". can there be vivek).

28
मूळ

त्याचें अखंड लागतां ध्यान । कृपाळुपणें देतो आशन । सर्वकाळ संभाषण । तदांशेंचि करावें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

अंतरात्म्याचे जर अखंड ध्यान लागलें तर तो कृपाळूपणानें योगक्षेम चालवतो. खायला प्यायला घालतो. साधकाला जें जें कांहीं बोलायचे असेल तें तें त्यानें अंतरात्म्याच्या अनुसंधाने बोलावें.

English meaning

When you make the meditation of that unbroken atma then, by His Grace, He gives everything required (let whatever come, come; He knows what I need better that I can know). Therefore there should be this `time of the all' and your conversation should be with that purush only.

29
मूळ

ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त । संसारापासुनी मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥

मराठी अर्थ

जो ध्यान धरीत नाही, तो अभक्त होय. तर जो ध्यान धरतो तो भक्त होय. अंतरात्मा आपल्या भक्ताला संसारांतून मोकळा करतो.

English meaning

When this meditation is not firmly held then, you are a non-devotee and when this meditation is established then, that you are a devotee (ie. to be one with) and are liberated from this worldly existence.

30
मूळ

उपासनेचे सेवटीं ॥ देवां भक्तां अखंड भेटी । अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥

मराठी अर्थ

उपासना करतां करतां देवाची व भक्ताची अखंड ऐक्यता होते. ही अनुभवाची गोष्ट आहे. अनुभवी लोकच तें जाणतात.

English meaning

At the end of this worship, the God and his devotee have unbroken union. Only the `experienced' will come to know that nirgun understanding that is within this `I am'. Note: In the company of the Knower means, to effortlessly know. maharaj- He is not anything that you can see or perceive with the mind, but still He is there. .