बहुजिनसी — समास 9: निद्रानिरुपण

Fully populated

Nidra Nirupan (A Discourse on Sleep)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विळास । निद्रा आलियां सावकास । जाणार नाहीं ॥ १ ॥

मराठी अर्थ

आदिपुरुषाला वंदन करुन निद्रेचा विलास सांगतो. एकदां का झोप आली कीं, ती सहज जात नाहीं.माणसाला झोप अवावरपणें येतें.

English meaning

I bow down to that original-purush (ie. the One who never sleeps), for this `speech' is the `play' of sleep (ie. this sleep is knowledge and it is ignorance of that Reality). But sleep has come to this knowledge and it will not go away (when this maya of knowledge was forgotten, there was the maya of ignorance. Then the gunas and elements manifested and there was the thought, "I am a body").

2
मूळ

निद्रेनें व्यापिली काया । आळस आंग मोडे जांभया । तेणेंकरितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥

मराठी अर्थ

झोपेनें शरीर व्यापलें म्हणजे सुस्ती येतें. अंग मोडून येते व जांभया येऊं लागतात. माणसाला मग बसवत नाहीं.

English meaning

Due to this sleep, this `all' body has been covered over and then this gross body yields to laziness and yawns. On account of this, patience and fortitude are not maintained.

3
मूळ

कडकडां जांभया येती । चटचटां चटक्या वाजती । डकडकां डुकल्या देती । सावकास ॥ ३ ॥

मराठी अर्थ

झोप आलेल्या माणसाला कडकडा जांभया येतात. तो चटाचट चुटक्या वाजवतो. आणि डकाडक डुलक्या खाऊं लागतो.

English meaning

Then this `all' body is a gross body and there is the making of loud sounds and noisy yawns and there is the cracking of joints and flopping and rolling around.

4
मूळ

येकाचे डोळे झांकती । येकाचे डोळे लागती । येक ते वचकोन पाहाती । चहुंकडे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

झोप आली कीं, एखाद्याचे डोळे मिटतात. एखाद्याचे डोळे अर्धवट लागतात. आणि एखादा दचकून इकडेतिकडे पाहुं लागतो.

English meaning

The eyes of that One (ie. that One who never sleeps and His eyes are knowledge) are then filled with tiredness. His eyes may be completely shut (ie. He may be fast asleep in body consciousness) or He may look around in all directions with awe at the wonder of this `all' (but still, even in this knowledge, is the sleep of ignorance).

5
मूळ

येक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले । हुडकाचे टुकडे जाले । सुधी नाहीं ॥ ५ ॥

मराठी अर्थ

झोपेच्या भरांत कीर्तन ऐकायला बसलेला माणूस एकदम उताणा पडतो. तो बुवाच्या विणेवर पडल्यानें विणा फुटते किंवा हुडकी नांवाच्या वाद्यावर पदल्यानें तिचे तुकडे होतात. पण त्या माणसाला त्याची शुद्ध नसते.

English meaning

That One has turned Its attention outwards and fallen into this gross body; that One has broken Its connection with brahman and searches around in semi-consciousness for Its broken parts (ie. in knowledge and ignorance/rajo guna that unbroken Self says, "Please somebody, something give me happiness." Every jiva is seeking completion in the incomplete).

6
मूळ

येक टेकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले । येक उताणें पसरले । सावकास ॥ ६ ॥

मराठी अर्थ

एखादा टेकून बसलेला बसल्याबसल्याच घोरायला लागतो. एखादा हळुहळु उताणा पसरतो.

English meaning

That One settles lazily into this lump of flesh and bones and goes sound asleep. That One has been scattered all over and then this knowledge lazily reclines in a gross body.

7
मूळ

कोणी मुर्कुंडी घालिती । कोणी कानवडें निजती । कोणी चक्रीं फिरती । चहुंकडे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

एखादा मुर्कुडी घालून निजतो. तर एखादा कुशीवर झोपीं जातो. एखादा झोपेंमध्यें वाटोळा लोळतो.

English meaning

In this sleep of ignorance, that One becomes a body and sleeps in his mother's womb; in this sleep of ignorance, that One within this `all' takes a birth and lies sleeping on its side. Then that One within this `all', whirls about and wanders around in all directions. (First that brahman falls asleep and there is knowledge; then this knowledge falls asleep and there is body consciousness)

8
मूळ

येक हात हालविती । येक पाये हालविती । येक दांत खाती । कर्कराटें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

झोपेंत एखादा हात तर एखादा पाय हलवतो. तर एखादा कराकरा दांत खातो.

English meaning

That One is made to move these hands; and that One is made to move these feet. That One makes a noise by grinding his teeth together. (Objectivity has drowned that One and He thinks He is a solid body of bones and flesh and blood. But it is just a dream)

9
मूळ

येकाचीं वस्त्रें निघोनि गेलीं । ते नागवींच लोळों लागलीं २ येकाचीं मुंडासीं गडबडलीं । चहुंकडे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

एखाद्याचे कपडे जागेवर राहार नाहींत. मगतो नागवाच लोळतो. तर एखाद्याच्या डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरते.

English meaning

By the covering over of that One, there is this disguise and then that Reality, naked and lost, starts crying and begging. That One becomes a servant to the mind and runs bewildered in every direction.

10
मूळ

येक निजेलीं अव्यावेस्तें । येक दिसती जैसीं प्रेते । दांत पसरुनी जैसीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥

मराठी अर्थ

एखादा अस्ताव्यस्त पडलेला असतो. तर एखादा अगदी प्रेतासारखा दिसतो. तर एखादा दांत पसरलेल्या भुतासारखा अगदीं वाईट दिसतो.

English meaning

That One is asleep in disorder and confusion and then that One sees by means of this corpse. That One with controlled passions has been scattered all around due to the elements and It sees this gross existence.

11
मूळ

येक वोसणतचि उठिले । येक अंधारीं फिरों लागले । येक जाऊन निजेले । उकरड्यावरी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

एखादा बडबडत उठतो. तर एखादा अंधारांत फिरु लागतो. तर एखादा सरळ उकिरड्यावर जाऊन निजतो.

English meaning

That One talks in Its sleep (`I am' it says) and then gets up and wanders around in the darkness. That One who is fast asleep goes and sits upon this dung-heap (ie. the gross body).

12
मूळ

येक मडकीं उतरिती । येक भोई चांचपती । येक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

एखादा शिंक्यावरची मडकी उतरवतो. तर एखादा जमीन चाचपतो. तर एखादा उठून झोपेंतच भलत्या वाटेंनें चालूं लागतो.

English meaning

That One has been placed in this `earthen pot' and then that One searches around for something amongst the many other things. That One wakes up from this sleep but then, starts to take the wrong path once again.

13
मूळ

येक प्राणी वोसणाती । येक फुंदफुंदों रडती । येक खदखदां हांसती । सावकास ॥ १३ ॥

मराठी अर्थ

एखादा उगीच ओरडत उठतो. तर एखादा स्फूंदून रडतो. तर एखादा खदखदा हासत सुटतो.

English meaning

That One in the prana, talks in this sleep. That One doesn't stop bragging. That One became this knowledge and then started crying and laughing aloud.

14
मूळ

येक हाका मारुं लागले । येक बोंबलित उठिले । येक वचकोन राहिले । आपुले ठाईं ॥ १४ ॥

मराठी अर्थ

एखदा हांका मारतो तर एखादा शंख करीत उठतो. तर एखादा निजलेला दचकून उठून बसतो.

English meaning

That One started shouting; that One gets up flustered and confused or that One is filled with awe and remains in His own place.

15
मूळ

येक क्षणक्षणा खुरडती । येक डोई खाजविती । येक कढों लागती । सावकास ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एखादा क्षणक्षणाला पायानें खुरडतो. तर एखादा डोकें खाजवतो. तर एखादा सारखा कण्हत असतो.

English meaning

That One spends every moment crawling around; that One scratches its head in confusion and that One who appeared as this knowledge then, becomes hot with pas- sion.

16
मूळ

येकाच्या लाळा गळाल्या । येकाच्या पिका सांडल्या । येकीं लघुशंका केल्या । सावकास ॥ १६ ॥

मराठी अर्थ

एखाद्याची लाळ गळते. तर एखाद्याची पिंक तोंडांतून सांडते. तर एखाद्याला झोपेंतर लघवी होते.

English meaning

That One becomes intimate and kisses. That One spits tobacco from his mouth. And that One who had appeared as this knowledge then, goes and urinates.

17
मूळ

येक राउत सोडिती । येक कर्पट ढेंकर देती । येक खांकरुनी थुंकिती । भलतीकडे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

एखादाला वारा सरतो तर एखाद्याला करपट ढेकरा येतात. तर एखादा झोपेंतच खांकरुन भलतीकडेच थुंकतो.

English meaning

That One farts loudly and that One makes a stinking belch. That One coughs and spits in any direction.

18
मूळ

येक हागती येक वोकिती । येक खोंकिती येक सिंकिती । येक ते पाणी मागती । निदसुर्‍या स्वरें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

एखाद्याला झोपेंत शौचाला होते तर एखादा ओकारी करतो. एखादा खोंकतो तर एखादा शिंकतो. तर एखादा झोपेंतच झोपाळू आवाजांत पाणी मागतो.

English meaning

That One throws mucus from his nose and that One passes a stool and that One vomits. That One coughs and that One sneezes and that Reality, half asleep asks for water.

19
मूळ

येक दुस्वप्नें निर्बुजले । येक सुस्वप्नें संतोषले । येक ते गाढमुढी पडिले । सुषुप्तिमधें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

एखादा वाईट स्वप्न बघून घाबरतो तर एखादा चांगलें स्वप्न पाहून खूष होतो. तर एखादाअगदी गाढ झोपेंत स्वस्थ पडलेला असतो.

English meaning

That One is confounded and scared by this bad dream and that One feels contented when his dream is happy. But that Reality has fallen in this deep sleep of ignorance.

20
मूळ

इकडे उजेडाया जालें । कोण्हीं पढणें आरंभिलें । कोणीं प्रातस्मरामि मांडिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥

मराठी अर्थ

इकडे दिवस उगवण्याची वेळ झालीकीं एखादा नित्यपाठ आरंभ करतो. तर एखादा प्रातःस्मरण करतो. आणि हरिकिर्तन सुरु करतो.

English meaning

Here a little light came and that One began to study. That One established the practice of remembering God in the morning and that One made kirtana.

21
मूळ

कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति । कोणी येकांतीं जप करिती । कोणी पाठांतर उजळिती । नाना प्रकारें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

एखादा ध्यानमूर्ति मनांत आठवतो. तर एखादा एकांतांत बसून जप करतो. तर एखादा अनेक प्रकारानें आपल्या पाठांतराची उजळणी करुं लागतो.

English meaning

That One remembered and meditated upon an image of God; that One made japa in a quiet place and that One revised and learnt by heart `many' passages from the scriptures.

22
मूळ

नाना विद्या नाना कळा । आपलाल्या सिकती सकळा । तानमानें गायेनकळा । येक गाती ॥ २२ ॥

मराठी अर्थ

प्रत्येकजण आपापल्या विद्या व कला शिकूं लागतो. एखादा तानाबीना घेऊन गायनकलेचा अभ्यास करतो.

English meaning

That One practiced the `many' learnings and the `many' arts. While that One gained knowledge of this `all' and then, that One sang this harmonious `song'.

23
मूळ

मागें निद्रा संपली । पुढें जागृति प्राप्त जाली । वेवसांई बुद्धि आपुली । प्रेरिते जाले ॥ २३ ॥

मराठी अर्थ

रात्रीची झोप झाली मग चांगली जाग आली. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायांत लक्ष घालूं लागला.

English meaning

Afterwards, when wakefulness came and His sleep of ignorance was over, that One sent away His worldly buddhi.

24
मूळ

ज्ञाता तत्वें सांडून पळाला । तुर्येपलिकडे गेला । आत्मनिवेदनें जाला । ब्रह्मरुप ॥ २४ ॥

मराठी अर्थ

ज्ञानी पुरुष दृश्य असणारीं अशाश्वत तत्वें टाकून दूर सरतो, तुर्येच्यापलीकडे जातो आणि संपूर्ण आत्मनिवेदन करुन ब्रह्मरुप होतो.

English meaning

That Knower left these elements and went to the side beyond this turya state (ie. beyond witnessing). In this way, this brahman-form (`all') was surrendered to that atma. .