बहुजिनसी — समास 8: अंतर्देवनिरुपण

Fully populated

Antardev Nirupan (A Discourse on the God Within)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ब्रह्म निराकार निश्र्चळ । आत्म्यास विकार चंचळ । तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म निराकार व निश्चळ आहे. आत्मा चंचळ असून त्यास विकार आहे. त्याला सगळे लोक देव म्हणतात.

English meaning

brahman is formless and still. And when there is a disturbance or movement then, that brahman is called the atma (ie. antar-atma). And then they say that this `all' and God is the same as that Reality. (brahman is formless and still; and when there is this `I am' feeling then He assumes the roles of the hidden purush and His prakruti and there is the feeling, `I am everywhere'. And those who don't understand, they say, this pair is Reality)

2
मूळ

देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना । येक देव ॥ २ ॥

मराठी अर्थ

वस्तुस्थिति अशी आहे कीं, देवाचा पत्ता लागत नाहीं. एक देव कोणता हें निश्चयपूर्वक कळत नाहीं.पुष्कळ देव पाहिलें कीं, यापैकीं खरा एक देव कोणता त्याची कल्पना करतां येत नाहीं.

English meaning

But that place of God cannot be met; for the limited cannot understand that One God. If even this `all' within that God cannot be found from surmise then, how can that One God ever be found?

3
मूळ

म्हणोनी विचार असावा । विचारें देव शोधावा । बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥ ३ ॥

मराठी अर्थ

म्हणून माणसापाशीं विचार असावा. विचारानें देव शोधावा. पुष्कळ देवांचा गोंधळ होऊं देऊं नये.

English meaning

There should be that thoughtless understanding and with that thoughtlessness, God should be searched out. Therefore keep this `I am' away from the entanglement of the `many' gods.

4
मूळ

देव क्षत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला । पृथ्वीमधें दंडक चालिला । येणें रीतीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

एकानें एका क्षेत्रांत एक देव पाहिला.त्यासारखी धातूची एक मूर्ति तयार केली.जगांध्यें हा असा प्रकार चालत आला आहे.

English meaning

Otherwise that God within the kshetra (within the sacred place) is taken as the `many' images made up of the metal and stone. And due to this, there are `many' rites and rituals in this world.

5
मूळ

नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ । नाना क्षत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥

मराठी अर्थ

क्षेत्रामधील देव अनेक प्रतिमादेवांचे मूळ आहे. पृथ्वीवर अनेक क्षेत्रें आहेत ती शोधून पाहावीत.

English meaning

The source of these images of god is the `many' thoughts, but that God of the kshetra (`all') is thoughtless. Therefore the `many' kshetras of this world should be searched through and understood.

6
मूळ

क्षत्रदेव पाषाणाचा । विचार पाहातां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

क्षेत्रांतील देव पाशाणाचा केलेला असतो. तो कसा झाला याचा विचार केला तर त्याचे मूळ एखाद्या अवतारापर्यंत पोचतें.

English meaning

That God of the kshetra has been made into a stone image, but if you understand thoughtlessness then, you are He. And that thoughtlessness at the root can only be understood by means of this `all'.

7
मूळ

अवतारी देव संपले । देहे धरुनी वर्तोन गेले । त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७ ॥

मराठी अर्थ

अवतारी देव तर संपले, ते देहांत आलें आणि मोठें कार्य करुन गेलें, ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव त्यांच्याहून मोठें अशी कल्पना केली.

English meaning

But if that God within this `all' gets destroyed then, there is the staying in and the acting through the body. Then brahma, vishnu and mahesh (ie. three gunas) are considered to be greater than Him/brahman.

8
मूळ

त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पहातां । कर्ता भोक्ता तत्वता । प्रतक्ष आहे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

पण या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते. खरें पाहिलें तर तोच प्रत्यक्ष कर्ता आहे व भोक्ता आहे.

English meaning

Then the power of that purush is in possession of these three gods and that inner- atma that sees through the eyes of knowledge and who is truly the doer and enjoyer, sees through these eyes of flesh and the other sense organs.

9
मूळ

युगानयुगें तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक । हा निश्र्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥

मराठी अर्थ

हा अंतरात्मा अनेक युगें तिन्ही लोक चालवतो आहे. तो स्वतः एकटा असून अनेकांस चालवतो. वेदशास्त्रांत असा निश्र्चयपूर्वक निर्णय केलेला आढळेल.

English meaning

Age after age, in these three worlds, it is that One alone who makes the numerous different shapes to move. To have this conviction is vivek and that is the understanding of the vedas and shasthras (neti, neti; not this, not that). (maharaj- whatever is seen or perceived is not true; still He is there)

10
मूळ

आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर । जाणीवरुपें कळिवर । विवेकें वर्तवी ॥ १० ॥

मराठी अर्थ

अंतरात्मा शरीर चालवतो. त्याचा शोध केला तर जाणिवेच्या रुपानें व विवेकानें तोच देव शरेर चालवतो अशी प्रचीति येईल.

English meaning

It is that atma, who makes this `all' body function and it is that God only that has become this `all'. When there is vivek then, you will understand that this corpse is functioning with this knowledge.

11
मूळ

तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती । प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥

मराठी अर्थ

त्या अंतर्देवाला लोक चुकतात. आणि तीर्थाकडे धांव घेतात. खरा देव कोणता तें न कळल्यानें बिचारीं माणसें कष्ट भोगतात.

English meaning

But the jiva has forgotten that inner God and it runs to the various places of pilgrimage. In the prana, that One due to Its helplessness and foolishness, takes so much trouble and still It cannot know God.

12
मूळ

मग विचारिती अंतःकर्णी । जेथें तेथें धोंडा पाणी । उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

तीर्थांत जाऊन न भेटल्यावर मगात्यांच्या मनांत असा विचार येतो कीं, प्रत्येक तीर्थामध्यें धोंडा व पाणी याशिवाय देसरें कांहींच नसतें. हें जर खरें तर उगीच वणवण फिरुन कांहींच फायदा नाहीं.

English meaning

Then there comes some proper thinking in the antah-karana. "Everywhere in these places, there is only stones and water. Why am I, that still and silent brahman, fruitlessly wandering around like this?"

13
मूळ

ऐसा ज्यासी विचार कळला । तेणें सत्संग धरिला । सतसंगें देव सांपडला । बहुत जनासी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

हा विचार बरोबर ज्याला कळतो,तो मग सतसंग धरतो. पुष्कळ लोकांना सत्संगानें देव सापडलेला आहे.

English meaning

And when thoughtlessness is understood by that purush then, He keeps the com- panionship of the Truth. When the mind keeps the companionship of the Truth, then this `all' and God have been found (prakruti/purush).

14
मूळ

ऐसीं हे विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें । अविवेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥

मराठी अर्थ

अशीं हीं विवेकाची कामें आहेत. विवेकशील माणसांना ती बरोबर समजतात. भ्रमानें भुरळ पडलेली जीं विवेकहीन माणसें असतात, त्यांना हे कळत नाहीं.

English meaning

That thoughtless Self needs to make such vivek and then, by proper practice of this, the viveki can come to understand thoughtlessness. However the a-viveki is confused, for he has totally forgotten Himself and then that thoughtless swarup can never understand Its own Self (ie. one can be that thoughtless Self only by being thoughtless).

15
मूळ

अंतरवेधी अंतर जाणे । बाहेरमुद्रा कांहींच नेणें । म्हणोन विवेकी शाहाणे । अंतर शोधिती ॥ १५ ॥

मराठी अर्थ

अंतर्मुख होऊन जो आंत बघायला शिकतो त्यालाच अंतरंगामधून सूक्ष्माचें ज्ञान होतें. जो बहिर्मुख असतो त्याला या गोष्टी कांहींच कळत नाहींत. म्हणून जे विवेकी व शहाणें असतात तें आपलें अंतरंग शोधतात.

English meaning

The one ever absorbed in this inner space knows only this inner space. While the one whose attention is turned outward does not know this `thing' even. Knowing this, the wise viveki goes on searching this inner space (for he longs to meet His thoughtless Self).

16
मूळ

विवेकेंविण जो भाव । तो भावचि अभाव । मूर्खस्य प्रतिमा देव । ऐसें वचन ॥ १६ ॥

मराठी अर्थ

विवेकपूर्ण म्हणजे नीट समजून श्रद्धा ठेवणें आवशक आहे. विवेक न वापरता जी श्रद्धा ठेवली जाते ती एकप्रकारें अश्रद्धाच होय. " प्रतिमा मूर्खांचा देव असतो. " असें एक वचन आहे.

English meaning

When that purush has no understanding of vivek then, that understanding becomes misunderstanding. Then this divine `speech' becomes the worship of a stone idol of the fool's god.

17
मूळ

पाहात समजत सेवटा गेला। तोचि विवेकी भला । तत्वें सांडुनी पावला । निरंजनीं ॥ १७ ॥

मराठी अर्थ

विचारानें व साधनानें जो आंत पाहात गेला आणि अंतरंग समजत गेला तो शेवटास जातो. तो आत्मस्वरुपापर्यंत पोचतो. तोच उत्तम विवेकवान होय. अशाश्वत तत्वांना मागें टाकून तो निर्मळ ब्रह्मापर्यंत पोचतो.

English meaning

But if there is intelligence and understanding right to the end (until all concepts are given up), then that purush becomes the wise viveki. Then the elements are left aside and He stays in parabrahman.

18
मूळ

आरे जे आकारासी येतें । तें अवघेंच नासोन जातें । मग गल्बल्यावेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

अरें, जें जें कांहीं आकाराला येते, तें तें सर्व नाश पावतें. आकारमय अशाशव्ताच्या गोंधळापलीकडे राहणारें तें परब्रह्म होय.

English meaning

My dear! When mula maya assumes a shape, then that Reality is surely destroyed by every thing. Therefore that parabrahman which is separate from all these confusions should be known

19
मूळ

चंचळ देव निश्र्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम । प्रत्ययज्ञानें निभ्रम । होईजेतें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

देव चंचळ तर परब्रह्म निश्र्चळ आहे. परब्रह्माच्या ठिकाणीं भ्रम नाहीं. आपण भ्रमांत आहोंत. म्हणून ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण भ्रमरहित व्हावें.

English meaning

There is this talk of the moving God and that still brahman but in parabrahman there is no such confusion. Due to this knowledge of that nirgun, you will be freed from any delusion.

20
मूळ

प्रचीतीविण जें केलें । तें तें अवघें वेर्थ गेलें । प्राणी कष्टकष्टोंचि मेलें । कर्मकचाटें ॥ २० ॥

मराठी अर्थ

अनुभव न घेतां जें जें कांहीं आपण करतों तें सारें व्यर्थ जातें. कर्माच्या कचाट्यांत सापडून माणूस कष्ट भोगीत मरुन जातो.

English meaning

But when this mula maya does anything without this `experience' then, that Reality goes far away and there are the `many' futile and vain experiences. Then in the prana, that Reality that has taken so much trouble and toil dies due to its allotted karma.

21
मूळ

कर्मवेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें । विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

कर्माहून जर वेगळें व्हायचे नाहीं, तर मग देवाचे भजन कशासाठीं करायचे? विवेकी पुरुषांना हें बरोबर समजतें. मूर्खांना नाहीं.

English meaning

If one is not separate from this karma then, how can there be the bhajan of God (ie. within every action, I am in my swarup)? The viveki naturally knows that which the foolish do not know. (If I am the Witness then, I cannot be anything that is seen or perceived. Then, naturally I remain untouched by whatever so called, fruits of past actions or karma that appears before me. By detachment there can be the proper enjoyment of the already created karma without adding to it further)

22
मूळ

कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदांतरें । सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

विचार केला तर देव जगाच्या अंतर्यामी भरुन आहे अशी कल्पना येते. त्याला भजण्यास सगुणाचाच आधार घेतला पाहिजे. अशारीतीनें सगुणाची उपासना केली कीं, निश्र्चयानें निर्गुणाची प्राप्ती होते.

English meaning

This `thing' is the conjecture of that thoughtless Self and then, due to this inner space of the world there is that God (prakruti/purush). Still by means of this sagun, that nirgun God should be attained.

23
मूळ

सगुण पाहातां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला । संगत्यागें मोकळा जाला । वस्तुरुप ॥ २३ ॥

मराठी अर्थ

नामरुप सगुणाचा शोध घेतां घेतां उपासक मूळमायेपर्यंत पोचतो. तेथें त्याला सहजच निर्गुणाची प्राप्ती होते. उपासनेच्या शेवटीं उपासक मीपणानें संपूर्ण नाहींसा होतो. म्हणजेच तो सर्व दृश्यरुप सगुणापासून मोकळा होतो. असा मोकळा होऊन तो ब्रह्मरुप होतो.

English meaning

And when you have gone to this root and when you have seen this sagun then, understand that, in truth, it is natural nirgun that has done this. Then, giving up all company and attachment, this form of the Self (ie. sagun), is set free (when one realizes that this sagun understanding is the nirgun seeking Its Self, then the companionship of this sagun can be given up).

24
मूळ

परमेश्र्वरीं अनुसंधान । लावितां होईजे पावन । मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

अमतरात्म्याचे अखंड अनुसंधान लावावें. तें लागलें कीं, मनुष्य पावन होतो. त्याला आत्मज्ञान होतें. पुढें विज्ञान प्राप्त होतें.

English meaning

When you place this sagun connection in parameshwara then, that pure Self will be attained. On account of there being only this One pure knowledge, that vignyan/beyond knowledge should be acquired (everything we see and perceive is that One appearing. This `I' is that One appearing as another).

25
मूळ

ऐसीं हे विवेकाचीं विवर्णें । पाहावीं सुचित अंतःकर्णें । नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदोदहार ॥ २५ ॥

मराठी अर्थ

अंतःकरण एकाग्र करावें आणि विवेकानें अशा प्रकारचे विवरण करावें. नित्यानित्यविवेकाच्या श्रवणानें जगाचा उद्धार होतो.

English meaning

When that thoughtless Self makes vivek then, his antah-karana will become pure. Therefore first there should be listening. It is the vivek between the indestructible and the destructible and due to this, one is lifted out of this mundane existence. .