शिकवण — समास 4: सदेवलक्षणनिरुपण

Fully populated

Sadev Lakshan Nirupan (A Discourse on the Attributes of the Godly)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें संपूर्ण । आतां ऐका सदेवलक्षण। परम सौख्यदायेक ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागील समासांत करंट्याची लक्षणें सांगितलीं. विवेकानें ती संपूर्ण सोडावी. आतां अतिशय सुख देणारी सदेव लक्षणें सांगतों तीं ऐका.

English meaning

Previous to this `speech' there is the attention of the miserable and impoverished jiva. That Reality should completely leave this through vivek. Now, if you listen with the attention that is with God (ie. forget everything; the natural guna) then, there will be that Supreme, the giver of happiness.

2
मूळ

उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥

मराठी अर्थ

ज्याच्या अंगीं कांहीं गुण उपजत असतात, तो अनेक मार्गांनी परोपकार करतो. आणि जो सर्वकाळ सर्वांना आवडतो तो सदेव होय.

English meaning

When there is this naturally acquired guna* of this `all' body then, the ways of the `many' will become that atma. Therefore one should always have fondness for this `all' within your inner space (He is content to know Himself only). *(The new born child is in this sattwa guna; it does not know anything other than `I am')

3
मूळ

सुंदर अक्षर लेहों जाणे । चपळ शुद्ध वाचूं जाणे । अर्थांतर सांगो जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

तो सुंदर अक्षर लिहीतो. भरभर पण शुद्ध वाचतो. आणि तो जें वाचतो त्याचा सगळा व सखोल अर्थ सांगू शकतो.

English meaning

That indestructible Self knows how to `write' beautifully and He knows how to *`read' quickly and without error. That purush understands the meaning of this `all thing' within His inner space. *(As one `writes' one is naturally `reading'/witnessing)

4
मूळ

कोणाचे मनोगत तोडीना । भल्यांची संगती सोडीना । सदेवलक्षण अनुमाना । आणून ठेवी ॥ ४ ॥

मराठी अर्थ

तो कोणाचे मन मोडित नाहीं. चांगल्यांची संगत सोडित नाहीं. भग्यवंताच्या लक्षणांची त्याला बरोबर कल्पना असते.

English meaning

The one who never breaks this inner intent to know, never leaves the company of the wise. This wish attention that is with God should be brought and placed upon any conjecture.

5
मूळ

तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं. ॥ ५ ॥

मराठी अर्थ

सर्वांना तो हवाहवासा वाटतो. जेथें जेथें तो जातो तेथें तेथें तो नवीनपणानें लोकांना आवडतो. म्हणजे त्याची लोकप्रियता वाढतच जाते. मूर्खपणामुळें उत्पन्न होणारा कल्पनेचा घोटाळा त्याच्याजवळ नसतो.

English meaning

Your mind should be this union of purush and prakruti and everywhere should be always ever new. However when there is foolishness, there is only the entanglement of conjecture and no `thing'.

6
मूळ

नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र । प्रगट कीर्ति स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

अनेक उत्तम गुणांचें स्थान असणारा म्हणून तो सत्पात्र असतो. असा मनुष्य खरा जगमित्र असतो. त्याची कीर्ति त्याच्या गुणांच्या योगानें स्वतंत्ररित्या जगांत पसरते. त्याच्या कीर्तिला कोणाचा आधार लागत नाहीं.

English meaning

When these `many' gunas become a worthy recipient of that best guna, then that man becomes a friend of the world. Then pervasiveness and independence manifest and He requires no support.

7
मूळ

राखे सकळांचे अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

तो सर्वांचें अंतःकरण सांभालतो. त्याचें पाठांतर खूप असते. नियमितआचरणाचा त्याला कधीच विसर पडत नाहीं.

English meaning

That vast paramatma is the supporter and protector of this inner space of the `all'. When His limitation (ie. to be a jiva) is forgotten then, He will never come tumbling down into the body.

8
मूळ

नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगो जाणे । बोलाऐसें वर्तो जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥

मराठी अर्थ

त्याचें कोणास कांहीं विचारणें नम्रपणाचे असते. ग्रंथाचा बरोबर नेमका अर्थ कसा सांगावा हे तो जाणतो.जसें तो बोलतों तसें तो चालतो. आणि त्याच्या हातून नेहमी उत्तम क्रियाच घडतात.

English meaning

He knows how to wipe out everything with His humility (I know nothing) and then He knows the innermost meaning of this `word' and tells that only. He only knows the best *`action' that functions through like this `speech'. *(chaitanya)

9
मूळ

जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥

मराठी अर्थ

त्याला पुष्कळ लोक मानतात. म्हणून त्याला कोणी उगीच कांहीहि बोलूं शकत नाहीं. तो मोठा तेजस्वी व पुण्यवान महापुरुष असतो.

English meaning

That purush respects this `all' and `speaks' to no other. He is the great purush from whom shines an abundance of merit.

10
मूळ

तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काये उणें तयाला। भूमंडळीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

तो अविरत परोपकार करीत जातो. या कारणानें ज्याला त्याला तो हवासा वाटतो.अशा परोपकारी पुरुषाला या जगांत कांहींच कमी पडत नाहीं.

English meaning

When that atma purush is doing then, that wants only to be with Himself. Then what does He lack for in the world?

11
मूळ

बहुत जन वाट पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ लोक त्याची वाट पाहातात. आणि तो देखिल प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळीं मदत करण्यासाठीं उभा राहतो. त्या महापुरुषाला कोणाचेहि उणे पडलेले सहन होत नाहीं.

English meaning

When the mind waits expectantly saying, "Let whatever has to come, come," then this `all' is understood. And at that time that purush comes to the assistance of this mind (when you don't care, then the Self takes care).4 And then there is that Reality, That does not tolerate even this fault of the `all' that is with the purush.

12
मूळ

चौदा विद्या चौसष्टी कला । जाणे संगीत गायेनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

त्याच्यापाशी चौदा विद्या व चौसष्ट कला असतात. तो संगीत जाणतो. स्वतः गाऊं शकतो. त्याच्या अंतर्यामीं आत्मविद्येविषयीं अतिशय जिव्हाळा असतो.

English meaning

He knows the fourteen learnings and the sixty-four arts and He knows the art of `singing and dance' (`I am and I move everything, everywhere'). He is the source of this knowledge of atma and that vast paramatma `there'. (When that atma is the Knower of this `all' then, that One atma gets called purush or antar-atma or shivatma. When that atma has the `many' worldly knowledges then, it gets called jivatma. And when He does not know even ie. when the knowledge dissolves within Him, then He gets called paramatma. But whether in duality or non-duality still, He is One)

13
मूळ

सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणीयेकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

सर्वांशीं तो नम्रपणें बोलतो. दुसर्‍याच्या मनांतलें ओळखून वागतो. केव्हांहि तो कोणाचे उणे पडूं देत नाहीं.

English meaning

He makes this humble `speech' to the `all' and He protects and moves this inner intent. That unbroken One within everyone should never be allowed to fall into the incomplete.

14
मूळ

न्याय नीति भजन मर्यादा । काळ सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥

मराठी अर्थ

न्याय, नीति, भजन, मर्यादा सांभाळून तो आपला काळ सार्थकीं लावतो. अशा माणसाच्या जीवनांत दारिद्र्याचे संकट येणें अशक्य असतें.

English meaning

When there is respect for bhajans, justice and equanimity then, His `time' is used to seek out the meaning of life.5 How can the adversity of poverty be `there'? (`Time' is this `now'; and within this ever present moment there is that `timeless' Reality)

15
मूळ

उत्तमगुणें श्रृंघारला । तो बहुतामधें शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥

मराठी अर्थ

अशा प्रकारच्या उत्तम गुणांनी शृमगारलेला तो पुरुष पुष्कळांच्यामध्यें शोभून दिसतो. सूर्य जसा उगवला कीं, त्याचा प्रखर प्रकाश पडतो, त्याचप्रमाणें अशा पुरुषाचे तेज पडते.

English meaning

When He is embellished with that best guna, then that atma within this `all' shines. Then His majesty becomes evident and He shines like the sun.

16
मूळ

जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथें । उत्तम गुणाविषीं रितें । तें प्राणी करंटे ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्या ठिकाणीं शहाणा पुरुष असतो त्या ठिकाणी भांडणतंटा होत नाहीं.ज्यांच्यापाशीं उत्तम गुण नसतात तें लोक करंटे असतात. त्यांच्यापाशीं भांडणतंटे होतात.

English meaning

When `here' is that knowing purush then, how can any disagreement arise `there'? But when devoid of that best guna then, that Reality becomes a wretched and destitute fool in the prana (with the mixed gunas).

17
मूळ

प्रपंची जाणे राजकारण । परमार्थी साकल्य विवरण । सर्वांमधें उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥

मराठी अर्थ

उत्तम पुरुष प्रपंचांत व्यवहारचातुर्य जाणतो. आणि परमार्थांत आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार जाणतो. सगळ्यांत जो उत्तम आढळेल त्याचा तो रसिक असतो.

English meaning

In His worldly life, He knows rajakarana (`I do nothing, He does everything') and in His spiritual life, He has investigated that nirgun. He is that best guna within the `all' and He is the enjoyer of all things.

18
मूळ

मागें येक पुढें येक । ऐसा कदापी नाहीम दंडक । सर्वत्रांसीं अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥

मराठी अर्थ

मागें एक व पुढें एक असा दुटप्पी वर्तनाचा प्रघात त्याच्यापाशीं नसतो. म्हणून सगळ्यांना त्या पुरुषाचे मोठे कौतुक वाटते.

English meaning

When that One is behind and that One is ahead then, traditions/customs can never exist there. Then everywhere is the wonder of that purush.

19
मूळ

अंतरासी लागेल ढका । ऐसी वर्तणूक करुं नका । जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥

मराठी अर्थ

कोणाचेहि अंतकरण दुखावेल असें तो कधीहि वागत नाहीं. प्रत्येक प्रसंगी वागण्यांत तो विवेक प्रगट करतो.

English meaning

One should not live a life where troubles touch this inner space. One should make vivek evident `here' and `there'.

20
मूळ

कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्याविधी । विशाळ ज्ञात्रुत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥ २० ॥

मराठी अर्थ

कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य हीं चारहि त्याच्या ठिकाणीं अगदी योग्य पद्धतीनें आढलतात. जाणतेपणाची त्याची बुद्धि मोठी विशाल असते. ती कधीं चुकत नाहीं, चळत नाहीं.

English meaning

When there is this way of action (`He does everything'), the way of worship (`He is everywhere'), the way of knowledge (`He knows') and the way of vairagya (`He wants nothing from this world'), then how can the buddhi of that vast Knower be obstructed?

21
मूळ

पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

माणसाच्याअंगीं असे उत्तम गुण दृष्टीस पडल्यावर मग त्याला कोणी वाईट म्हणत नाहीं. ज्याप्रमाणें सर्व देहांमध्यें आत्मा भरलेला आहे, त्याचप्रमाणें असा उत्तम पुरुष सर्वांच्या अंतःकरणांत प्रेमरुपानें आपलेपणानें भरुन राहतो.

English meaning

When you understand that the `many' things are that best guna then, how can they be called the worst (objective things)? And when there is that complete atma then, this `all' body within the gross body, is That only (then this knowledge of the `all' is also let slip away).

22
मूळ

आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लाहानथोर । तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणें लहान मोठी माणसें आपापल्या कार्याला तत्पर असतात, त्याचप्रमाणें हा उत्तम पुरुष परोपकार करण्यास मनापासून तत्पर असतो.

English meaning

When He is absorbed in His own `action' then, that great brahman within this small jiva, is this world of the `all'. In this way, that atma works from Its universal mind.

23
मूळ

दुसर्‍याच्या दुःखें दुखते । दुसर्‍याच्या सुखें सुखावे । आवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याच्या दुःखानें तो दुःखी होतो तसाच दुसर्‍याच्या सुखानें तो सुखी होतो. जगांत सारे सुखी असावेत अशी त्याची मनापासून इच्छा असते.

English meaning

One should suffer the sufferings of this `all' and one should enjoy the enjoyments of this `all'. But when there are the `many' things then, this vasana feels that there should only be pleasure (this vasana to be, meets pleasure and pain equally; but when body consciousness comes then, it seeks only to know pleasure).

24
मूळ

उदंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैसी अवघ्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४ ॥

मराठी अर्थ

समजा एखाद्याला बरीच मुलें आहेत. त्याचे लक्ष सगळ्या मुलांवर सारखेंच असते. त्याचप्रमाणें या महापुरुषाला सगळ्यांची काळजी असते.

English meaning

When there are the `many' kinds of children of that vast paramatma in this world then, the mind of that atma goes to the `many' things. And due to this, that great purush worries about everything. (When the `many' different things are born of the formless paramatma, then His mind that sees Himself only, starts objectifying and thinking about these objects)

25
मूळ

जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना । धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥

मराठी अर्थ

त्याला कोणाचे उणे सहन होत नाहीं. त्याला चूकुन कधी पैशाची वासना होत नाही. कोणी त्याचा धिक्कार केला तरी तो मनांत चळत नाहीं.

English meaning

If this `all' does not endure whatever comes then, this vasana of that atma becomes like a penniless beggar. But when one does not reproach the one who reproaches him, then he is that great purush who remains aloft. (If one meets this world without creating concepts; good, bad, pleasure, pain etc., and if one does not let anything trouble him then, body consciousness does not arise; and this is knowledge)

26
मूळ

मिथ्या शरीर निंद लें । तरी याचें काये गेलें । ज्ञात्यासी आणि जिंतिलें । देहबुद्धीनें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

आपल्या शरीराला तो मिथ्या समजतो. म्हणून कोणी त्याची निंदा केली तरी तो ती देहापुरती आहे या खात्रीनें स्वस्थ राहतो. जो खरा ज्ञाता आहे त्याला देहबुद्धि जिंकु शकत नाहीं. मी आत्माच आहे हें खरें ज्ञातेपणाचे लक्षण आहे. मी देहच आहे हें देहबुद्धिचें लक्षण आहे. दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असल्यानें एक असेल तेथें दुसरें असूं शकत नाहीं. म्हणून ज्ञात्याला देहाची निंदा स्पर्श करुं शकत नाहीं.

English meaning

He understands, "This false body has been insulted. Still, how has this `speech' been spoiled?" How can someone with body consciousness defeat that Knower? (He is forever aloft to the affairs of the world; one accepts insult only if the thought, "I have been insulted" arises in the mind. He does not feel insulted for that thought is not there)

27
मूळ

हें अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तर्‍ही उत्तम गुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धि हे सगळें अवलक्षण समजावें. ज्ञाता पुरुष देहामध्यें असला तरी तो देहापासून अलिप्त असतो. विलक्षणपणें देहांत राहतो. देहांत विदेहीपणें राहतो. सारांश माणसानें लोकांमधें कांहीं तरी उत्तम गुण प्रगट करावे.

English meaning

Due to the `many' things, that thoughtless paramatma has become the impure attention of the jiva. But that Knower within the body is quite different. Therefore that best guna within the people should reveal this `thing'.

28
मूळ

उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणासी प्राणी खेदे । तीक्ष्ण बुद्धि लोक साधे । काये जाणती ॥ २८ ॥

मराठी अर्थ

उत्तम गुण पाहून माणसें आकर्षिली जातात. वाईट गुणाची माणसें लोकांना दुःख देतात. जाणत्या माणसाच्या अंगीं असलेल्या तीक्ष्ण बुद्धिची कल्पना सामान्य लोकांना येत नाहीं. देहबुद्धि नाहींशी करुन उत्तम गुणांची जोपासना करण्यासाठीं ज्ञानी पुरुषास तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धि लागते.

English meaning

Man obstructs that best guna and then these worst gunas (ie. mixed gunas that bring objectification) bring sorrow in the prana. Tell me, what can that Knower accomplish with even a sharp buddhi of someone who thinks he is a body? (Even those considered very smart in this world are beggars ie. slaves to the mind)

29
मूळ

लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती । मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

थोर पुरुष लोकांचे अन्याय व अपराध यांना क्षमा करतो. जो पुरुष असा अत्यंत क्षमाशील असतो, त्याच्या क्षमेचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग लोक अनेक प्रकारें त्याच्या पाठीशी उभे राहतात.

English meaning

When that antar-atma is very patient in this world of the `all' then, He meets Himself within this `experience'. Afterwards that Reality is the support and protector of this `all' world (ie. then that Reality uses knowledge to stay in the world).

30
मूळ

बहुतांस वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥ ३० ॥

मराठी अर्थ

आपण थोर आहोत असें पुष्कळांना वाटते. पण सर्व लोक ज्याला थोर म्हणतात तोच खरा थोर असतो. महापुरुष सदैव धीर, उदार व गंभीर असतो.

English meaning

But if this `all' feels, `I am the greatest' then, this respected `all' still requires that thoughtless understanding (I do not exist). Patience, boldness, openness and thought- fulness all belong to the great purush.

31
मूळ

जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

जेवढें उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावें. मग अवगुण हें करंट्याचे लक्षण हें सहजच ठरते.

English meaning

When there is this `thing' of that best guna then, there can be the attention of the *Master. But where there are the impure gunas, then that Reality becomes the attention of the miserable and impoverished jiva. *(He uses knowledge to stay in this world) .