मूर्खलक्षणनाम — समास 9: विरक्तलक्षण

Fully populated

Virakta Lakshan (The Characteristics of the Dispassionate)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका विरक्तांचीं लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें । जेणें आंगीं सामर्थ्यें बाणे । योगियाचें ॥ १ ॥

मराठी अर्थ

आता विरक्तांची लक्षणें ऐका. विरक्ताजवळ कोणते गुण असावेत, ज्यामुळे योग्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते.

English meaning

Listen to this `I am' for this is the attention of the dispassionate. When there is dispas- sion, then how will these three gunas of sattwa, raja and tama remain? (then objecti- fication cannot remain) Due to dispassion this power of `I am' is imbibed throughout the whole `all' body of the yogi (and then everywhere He looks He sees Himself).

2
मूळ

जेणें सदकीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे । जेणें करितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥

मराठी अर्थ

ज्या गुणांमुळे सद्कीर्ति वाढते व जन्माची सार्थकता होते आनि विरक्ताचा मोठेपणा वाढतो.

English meaning

Due to this mula maya (`I am'), one's pervasiveness increases and due to mula maya, the purpose of life is fulfilled. Due to mula maya, the dispassionate's greatness goes on increasing (maharaj- become so big that you finally go off).

3
मूळ

जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे । जेणें विरक्ती दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥

मराठी अर्थ

ज्यामुळे परमार्थ साधतो, आनंद वाढतो आणि विरक्तीही विवेकाने अधिक होते.

English meaning

Due to this `I am', paramarth/Ultimate Accomplishment becomes easy. Due to this `I am' there is blissful joy and that state of desirelessness gets enhanced by the power of discrimination/vivek.

4
मूळ

जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे । जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥

मराठी अर्थ

विरक्ताच्या गुणांनी सुख उचंळून येते. सद्विद्या वश होते. मोक्षाबरोबरच भाग्य फळफळून येते.

English meaning

Due to this `I am', happiness flows and due to this `I am', pure knowledge is understood. Due to this `I am' of mula maya there is an abundance of good fortune and the wealth of Liberation.

5
मूळ

मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती । मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥

मराठी अर्थ

सर्व मनोरथ पूर्ण होतात. सर्व इच्छांची पूर्ति होते. वाणी मधुर होते कारण जीभेवर, मुखांत सरस्वतीचा वास होतो.

English meaning

Then life's purpose is fulfilled and the desire of this `all' is achieved (ie. desire to simply be and just know); then saraswati, the goddess of speech, sits on the tongue to speak this sweet `word'.

6
मूळ

हे लक्षणें श्रवण कीजे । आणि सदृढ जीवीं धरिजे । तरी मग विख्यात होईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ही विरक्त पुरुषाची लक्षणें ऐका व मनांत घट्ट धरुन ठेवा म्हणजे मग या भूमंडळावर प्रसिद्धि, मोठेपणा मिळतो.

English meaning

If that thoughtless purush listens with this attention and holds on to this as if it were more important than life itself, then He will pervade the whole world.

7
मूळ

विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें । विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषंई ॥ ७ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा. जनांमध्ये अध्यात्म, परमार्थ वाढवावा. इंद्रियांची वासना ताब्यांत ठेवण्यासाठी मोठ्या धैर्याने वागावे.

English meaning

Dispassion brings vivek and then this understanding of Oneness grows; dispassion should bring great fortitude and the subjugation of the sense organs.

8
मूळ

विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावे भजन । विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटावावें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने आपले साधन व्यवस्थित व नियमीत करावे. लोकांना व भाविकांना भगवंताच्या भजनाविषयीं गोडी निर्माण करावी. विरक्ताने जनांना ब्रह्मज्ञानाबद्दल अधिक माहिती आपल्या अनुभवाने व निरुपणाने द्यावी.

English meaning

Through dispassion your sadhana is protected and through dispassion, you make proper bhajan; through dispassion this art of knowing and that knowledge of brahman are realized.

9
मूळ

विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्तें शांती दाखवावी । विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥

मराठी अर्थ

भगवंताची भाविकांमध्ये भक्ती वाढवावी. शांतीचे दर्शन लोकांना आपल्या अढळ शांतीने दाखवावे. हे सर्व करतांना प्रयत्नपूर्वक स्वतःची विरक्ती सांभाळावी.

English meaning

Through dispassion devotion is made to grow and through dispassion you display pea- cefulness; and by the effort of dispassion, you become the dispassionate.

10
मूळ

विरक्तें सदक्रिया प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी । विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसी ॥ १० ॥

मराठी अर्थ

विरक्ताने सद्क्रिया, सद्कर्मे यांचे महत्व वाढवावे. विरक्ताने विरक्ती, संसारिक नैमित्तीक कार्यांतून लोकांमध्ये निवृत्ती वाढवावी. विरक्ताने कर्मफलाविषयीं उदासिनता, नैराशता आपल्या मनांत घट्ट धरुन ठेवावी.

English meaning

Through dispassion you should remain established in the true action (ie. `He does everything') and through dispassion you should expand and become nivritti (without the desire/vritti to know); and by great might you should remain void of any hopes.

11
मूळ

विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी । विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने धर्माचे रक्षण करावे, त्याचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नीतिमान व अत्यंत क्षमाशील असावे.

English meaning

Through dispassion your inherent nature/dharma should be established and through dispassion you should hold firmly to justice (vivek) and truthfulness; and through dispassion you should very keenly maintain forgiveness.

12
मूळ

विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा । विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने परमार्थाचा मार्ग लोकांना स्वच्छ दाखवावा. सतत चिंतनशीलता जोपासावी. त्याने सत्वगुणी राहून नेहमी सन्मार्गाने चालावे.

English meaning

Through dispassion, paramarth is kindled and by means of this dispassion one searches for that thoughtless understanding and through dispassion one carefully walks along the path of the sattwa guna.

13
मूळ

विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं । विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने श्रद्धावान भाविकांचा सांभाळ करावा. भगवंतावर मनापासून प्रेम करणार्‍या भक्तांचा संशय, मनस्ताप दूर करावा. भोळ्याभाबड्या लोकांना दूर लोटू नये.

English meaning

Through dispassion faithfulness is protected and through dispassion deep love calms the troubled mind. You should not ignore this place of refuge that is reached through dispassion.

14
मूळ

विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष । विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने नेहमी अति दक्ष असावे. त्याने दुसर्‍यांचे अंतरंग ओळखून वर्तन करावे, त्याने नेहमी परमार्थाचीच बाजू घ्यावी.

English meaning

Through dispassion there is great alertness and through dispassion one becomes that Witness within this inner space of `I am'; and through dispassion one takes the side of the Ultimate Accomplishment/paramarth.

15
मूळ

विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा । विरक्तें वगत्रुत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने नेहमी अध्यात्माचा अभ्यास करावा. त्याने नेहमी कांहीतरी करत राहावे, ऐकत राहावे. आपल्या निरुपणाने, प्रवचनांनी परमार्थ जनांमध्ये वाढवावा. लोकांचे शंका, संशय निरसुन परमार्थ परत मार्गी लावावा.

English meaning

Through dispassion there should be constant practice of that which you have learnt and through dispassion you should maintain steadfast purpose. Through dispassion the proper `speech' (`I am He') is established and paramarth is strengthened.

16
मूळ

विरक्तें विमळ ज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें । विरक्तें निश्र्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा प्रसार करावा. नेहमी वैराग्य वृत्तीनेच राहावे व त्याचा लोकांनाही निश्र्चयात्मक उपदेश त्यांचे शंका समाधानकरुन करावा.

English meaning

Through dispassion you should `speak' of pure knowledge and through dispassion there should be the glorification of vairagya/renunciation; through dispassion you should be established in that complete contentment.

17
मूळ

पर्वें करावीं अचाटें । चालवावीं भक्तांची थाटे । नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥

मराठी अर्थ

मोठ्या प्रमाणावर पर्व, जयन्त्या वगैरे उत्सव करावे. भजने, निरुपणे, किर्तने, प्रवचने वगैरे करुन भक्तीमार्गाचा प्रसार करावा. त्यानिमित्य भक्तांना एकत्र आणावे.

English meaning

Your attention with regard to these things should be extra-ordinary and you should make your devotion truly magnificent. In this way, the `many' thoughts are subdued and this glorious deed is performed on the path of worship (`He does, I do not do anything').

18
मूळ

हरिकीर्तनें करावीं । निरुपणें माजवावी । भक्तिमार्गें लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

भगवंताची कीर्तनें, भजनें करावी, करवावी. निरुपणे करावी. पुष्कळ भक्त एकत्र आणून भक्तीमार्गाचा दणका उडवून द्यावा. यायोगे दुर्जन निंदक यांना भक्तीमार्गाच्या या वैभवाने दिपवून टाकावे.

English meaning

You should sing the `song' of hari and you should grow beyond all bounds; by this path of devotion you should shame the reproaching and far from the atma (ie. ego).

19
मूळ

बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार । पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥

मराठी अर्थ

रंजले, गांजले, भक्त या सर्वांवर त्याचे भले होईल असे कांही उपकार करावा. सज्जनपणाने वागणार्‍यांचा सत्कार, गौरव करावा. पुण्य मार्गांत जास्तीत जास्त लोक येतील असे जोरदार प्रयत्न करावे.

English meaning

That One (ie. atma) should uplift this jiva to become this `all' and then through wisdom the old gods should be replaced by the new God. But understand clearly, you require great determination to expand this path of virtue.

20
मूळ

स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भजन । नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥

मराठी अर्थ

आपण स्वतः नित्य नेमाने स्नानसंध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा करणे असा नित्य नेम नेहमी काळजीपूर्वक करुन पवित्रपण जपून अंतरंग शुद्ध ठेवावे.

English meaning

The sacred bath and prayer/sandhya, the japa and meditation; the pilgrimage and the bhajan of God should always be performed. Due to these purifications, this inner space is kept clear.

21
मूळ

दृढ निश्र्चयो धरावा । संसार सुखाचा करावा । विश्र्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

दृढ निश्र्चयाने वागून संसार सुखाचा करावा. लोकांना आपल्या संसर्गाने, संगतींत ठेवून भक्तीमार्गांत त्यांना आणुन त्यांचा उद्धार करावा.

English meaning

When there is such unwavering dispassion then, this samsar can be joyfully performed.8 Simply by this association with dispassion, the mind that has created all these `many' names and forms is lifted out to no-mind.

22
मूळ

विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार । विरक्तें असावें तत्पर । निरुपणाविषंई ॥ २२ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने नेहमी धीराने, धैर्याने सावध असावे. त्याने उदार असावे. तत्परतेने निरुपणे करुन भक्तीभाव लोकांत वाढवावा.

English meaning

Through dispassion you should be patient. Through dispassion you should be open and generous. Through dispassion you should be absorbed in this formless discourse (`I am everywhere').

23
मूळ

विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्धमार्गे जावें । विरक्तें झिजोन उरवावें । सदकीर्तिसी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

त्याने सावध असावे. नेहमी शुद्ध मार्गाचाच अवलंब करावा. प्रसंगी आपले धन खर्च करुन, मन भक्तीमार्गाला वाहून, देह झिजवून सद्कीर्तीस आपल्यानंतरही टिकवावे.

English meaning

Through dispassion you should be very alert and through dispassion you should follow the path of the pure. Through dispassion you should wear away this body so that you remain everywhere.

24
मूळ

विरक्तें विरक्त धुंडावें । विरक्तें साधु वोळखावें । विरक्तें मित्र करावें । संत योगी सज्जन ॥ २४ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने इतर विरक्तांचा शोध घ्यावा. साधु, सज्जन यांना ओळखून त्यांचा आदर करावा. त्याने संत, योगी व सज्जन अश्या योग्य लोकांशी मित्रत्व करावे.

English meaning

By dispassion, dispassion should be searched out. By dispassion the sadhu should be recognized. And by dispassion you should be the friend of the Saint, yogi and `true man'/sajjana.

25
मूळ

विरक्तें करावीं पुरश्र्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें । विरक्तें करावीं नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने पुरश्र्चरणे करावीत. तीर्थयात्रा कराव्यात. निरनिराळी रमणीय व पवित्र स्थाने करावीत.

English meaning

Through this dispassion there should be the repetition of the mantra, `I am He'. Through this dispassion you should turn inside on your pilgrimage. Through this dispassion the place of the `many' thoughts becomes the delight of the Supreme.

26
मूळ

विरक्तें उपाधी करावी । आणी उदास वृत्ति न संडावी । दुराशा जडों नेदावी । कोणयेकविषंई ॥ २६ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने निरनिराळ्या कामाद्वारे लोकांना मदत करावी, परोपकार करावा, पण त्यांतही आपली विरक्त वृत्ती कायम ठेवावी. कशाबद्दलही दुराशा जडवून घेउ नये.

English meaning

This limiting concept (ie. "I am a body") should have dispassion and you should not deviate from this vritti of detachment (`I want to know nothing, yet still He is there'). Therefore false hope should be avoided by that One who is within everyone.

27
मूळ

विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट । विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने अंतरमुख वृत्तीने असावे. त्याने वाईट काम करुन क्रियाभ्रष्ट होऊ नये, आचरण शुद्ध ठेवावे. दुसर्‍यांच्या आधिन होऊन कनिष्ठपण स्वीकारु नये.

English meaning

Through dispassion there is single pointed attention upon this inner space. Through dispassion there is not the confusion of false actions and through dispassion one does not become small by depending on another.

28
मूळ

विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा । विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने वेळप्रसंग ओळखून वागावे. सर्वप्रकारे चातुर्य विरक्ताजवळ असावे.

English meaning

Through dispassion, time and occasion are understood (there is only now, this ever present moment); for through dispassion the connection of this `all' is recognized. And then through dispassion the wise purush pervades this `all' form.

29
मूळ

विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें । विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥

मराठी अर्थ

विरक्तानें फक्त एकाच गोष्टीचे ज्ञान घेऊन थांबू नये, त्याला पुष्कळ गोष्टींचे ज्ञान असावे. सर्व ज्ञानाच्या शाखांचा त्याने अभ्यास करावा. जे जसे असेल तसे तसे ते समजून घ्यावे.

English meaning

Through dispassion limitation is destroyed when through dispassion this `all' is studied. Through the dispassion of that purush, the `many' things should be known as this `all'.

30
मूळ

हरिकथा निरुपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान । पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥

मराठी अर्थ

भगवंताच्या कथा ,निरुपण, भगवंताच्या सगुणरुपाचे भजन व उपासना, आत्मज्ञान, परमात्मस्वरुप ज्ञान, शरीराचे ज्ञान, तत्वज्ञान ह्या सर्वाचे ज्ञान त्याला असावे.

English meaning

Then this `story' of hari, this sagun bhajan, that knowledge of brahman, the knowledge of the individual body and the knowledge of these gross elements should be known as this `all'.

31
मूळ

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

परमार्थाची साधने म्हणजे कर्ममार्ग, कोणत्या उपासना केल्यावर, कोणचे ज्ञान मिळवणे परमार्थासाठी योग्य, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्ती कशाची व कशापासून परमार्थासाठी आवशक या सर्व मार्गांची माहिती व ज्ञान विरक्ताला असावे.

English meaning

Then the path of action, the path of worship, the path of knowledge, the path of si- ddhant, this path that leads to worldly concerns and that path beyond worldly concerns should be known as this `all'.

32
मूळ

प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती । विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

भगवंताचे प्रेम वाढू लागल्यावर होणारी अवस्था, इच्छा, वासनांचे पूर्ण निरसन होऊन येणारी उदासीन अवस्था, योग समाधी साधल्यावर, ध्यान साधल्यावर, विदेही अवस्थेचे ज्ञान झाल्यावर, सहज स्थिती हे अभ्यासाद्वारे विरक्ताने जाणावे.

English meaning

Then this state of divine love, that state of detached disregard, this state of union/yoga, this state of real meditation, that state of videha/without body and that natural state should be known as this `all'. (Now every concept, every path, everything that you have known up until now, should be left aside and through dispassion, you that purush, should witness this `all')

33
मूळ

ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें । नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

निरनिराळ्या प्रकारचे नाद, मुद्रा, आसनें, मंत्र, यंत्र यांचे विधी व विधानें, निरनिराळी मतें व दर्शने, या सर्वाचे ज्ञान घेऊन मग ते सोडून द्यावे. कारण परमार्थास ते उपयोगी नाही.

English meaning

There are the concentrations on various sounds and the concentrations on various posi- tions and postures; there are mantras, rituals and their rules, as well as yantra/ symbols; these `many' treasures of the mind should be understood and now left aside.

34
मूळ

विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र । विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने जगमित्र असावे. त्याने स्वतंत्र असावे. त्याने विचित्र अशा बहुविध गुणांनी युक्त असावे.

English meaning

Through dispassion one should be the friend of the world. Through dispassion one should be independent. Through dispassion one should be that pure sattwa guna within these `many' gunas.

35
मूळ

विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त । विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने कमालीचे विरक्त असावे. कोठल्याही आशा, अपेक्षा, इच्छा, नाती, भावना अशा गोष्टींना आपल्याजवळ थारा देऊ नये.

English meaning

Through dispassion one should be the dispassionate and through dispassion one should be a devotee of hari. Through dispassion one should be ever free, by remaining untou- ched.

36
मूळ

विरक्तें शास्त्रें धांडोळावी । विरक्तें मतें विभांडावी । विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने शास्त्रांचे शुद्ध व सखोल ज्ञान मिळवावे. निरनिराळी परमार्थाला मारक मते खोडून काढावीत. भगवंतच्या प्रेमाची व प्राप्तीची इच्छा असणार्‍यांना शुद्धमार्गास लावावे.

English meaning

Through dispassion one should churn the shasthras until their essence is understood (neti, neti); through dispassion one should conquer all the opinions and through dispas- sion an aspirant should be established within this pure path (ie. beyond opinions etc.).

37
मूळ

विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा । विरक्तें आपला म्हणावा । विश्र्वजन ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने परमार्थाचा शुद्धमार्ग सांगावा. निरुपणाद्वारे संशय, शंकांचे निरसन करावे. सर्व विश्र्वजनांस आपले म्हणावे.

English meaning

Through dispassion this pure path of `I am' becomes that thoughtless destination. Through dispassion this doubt of mula maya is removed and through dispassion you call this world of the `many', your world (`Myself is everywhere').

38
मूळ

विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे । विरक्तें बद्ध चेववावे । मुमुक्षुनिरुपणें ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने निंदकांना (वाद न घालता) वंदन करावे. साधकांना शुद्ध ज्ञानाद्वारे भक्तीमार्गाचे ज्ञान द्यावे. संसारांत अजुनही आसक्त असलेल्यांना प्रवचनाद्वारे भगवंताच्या भक्तीविषयी, परमार्थाविषयीं जागरुक करावे.

English meaning

Through dispassion you bow down to even those who reproach you; through dispassion the sadhak (3rd type)1 understands and through dispassion the bonded (baddha 1st type) is inspired and makes this discourse of the aspirant (mumukshu 2nd type).

39
मूळ

विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे । नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

विरक्ताने उत्तम गुण अंगी वाढवावे. अवगुणांचा त्याग करावा. परमार्थाच्या आड येणार्‍या सर्व संकटे, अडचणी यावर विवेकाने मात करावी.

English meaning

Through dispassion the superior guna (ie. pure sattwa) is accepted and through dispas- sion the wrong gunas (gunas mixed together) are dropped. Through this powerful vivek the `many' thoughts should be completely destroyed.

40
मूळ

ऐसीं हें उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें । याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

अशीही चांगली लक्षणे, मन एकाग्र करुन ऐकावीत. यांच्याकडे विरक्ताने दुर्लक्ष करु नये.

English meaning

Such is the attention of that attentionless, thoughtless and best; but this `all' has to be listened to with a single-pointed mind and that dispassionate purush should never neglect this `I am' (prakruti).

41
मूळ

इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें । श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

माझ्या स्वभावास अनुसरुन मी हे विरक्ताचे गुण सांगितले. त्यांतील मानवतील तेवढे स्वीकारावे. श्रोत्यांनी मी फार बोललो म्हणून उदास करु नये व होऊ पण नये.

English meaning

This spontaneous `speech' of the `all' is to be valued and accepted. The true listener (one who listens to this silently spoken `I am') should not get disheartened and these `many' saying should be this `speech' of the `all' (the mind should first establish the sagun `I am all').

42
मूळ

परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता । तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

परंतु ही चांगली लक्षणे अंगी बाणविली नाहीत व अवगुण अंगीकारले तर पढतमूर्खपणा येऊ लागतो.

English meaning

However, if you do not abide by this attention, then you will appear ridiculous because of your bad *attention. And then though being the Reality, that atma will become a knowledgeable fool. *("I am so and so and I so many good and bad things etc.")

43
मूळ

त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरुपण । बोलिलें असे सावधान । होऊन ऐका ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

पढतमूर्खाचे (अव)गुणवर्णन पुढले समासी (त्यागास्तव) सावधपणें ऐका.

English meaning

If that atma has the attention of a knowledgeable fool then, ahead there should be this sagun discourse that is within this collection of words. Therefore place your alertness on this `speech' and listen carefully. .