पूर्णनाम — समास 10: विमळब्रह्मनिरुपण

Fully populated

Vimal Brahma Nirupan (A Discourse on the Pure Brahman)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

धरुं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥

मराठी अर्थ

तें धरावें म्हटलें तर धरतां येत नाहीं, टाकण्याचा प्रयत्न केाला तर टाकतां येत नाहीं. हें परब्रह्म जिथें तिथें आहेच आहे. कधीं नाहीं असें होत नाही.

English meaning

Even if you try to hold It, It cannot be held and if you try to drop It, It cannot be dropped. `Here' and `there', It only is and that is parabrahman.

2
मूळ

जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्यां ॥ २ ॥

मराठी अर्थ

जिकडे तिकडे आणि जेथें तेथें असणार्‍या या परब्रह्माकडून तोंड फिरवावें म्हटलें तर जिकडे तोंड फिरवावें तिकडे समोर येतेच. कोणत्याहि दिशेला तोंड फिरवावें तिकडे तें समोर येते. कांहीं केल्या त्यास चुकविता येत नाहीं.

English meaning

Everywhere, `here' and `there' or when you turn away, still It is in front of you. But when It is kept only in front and not given up then, that Reality appears as this created `thing' (parabrahman is always there but, if you try to see It then what you will see will be this knowledge and then you think, `Something is there, I don't know what it is or what it is not but, it exists'. Then that One is made into two; Knower and known).

3
मूळ

बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

एखादा बसलेला माणूस उठून गेला तर तेथें आकाश राहतेंच. कोणत्याहि दिशेला तोंड वळवलें तरी आकाश आपल्या तोंडासमोर असतें.

English meaning

If you are watching a man who is sitting and if he gets up and goes away then, `there' has appeared as space. That space is in all four directions but, it is being seen only in front of you (ie. the man you were seeing has gone and space remains. Whenever `you' look `there', space appears; but in truth, that space is in all four directions and cannot be perceived. And that is parabrahman. `You' have to disappear and then only That remains; otherwise space will be seen in front of you)

4
मूळ

जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥ ४ ॥

मराठी अर्थ

समजा एखादा प्राणी पळून जाऊं लागला, तो ज्या ज्या दिशेला पळेल त्या त्या दिशेला त्याच्या भोवतीं आकाश असतेंच. अगदी फार मोठा प्रयत्न करुनसुद्धा कोणालाहि आकाशाबाहेर जातां येत नाहीं.

English meaning

Wherever one may run within the prana, everywhere there is space all around. But how can that Reality go outside of space, through effort? (You are that Reality, but if you try to see That then, you will see space. And only when you don't exist, will there be that Reality where even space and time do not exist)

5
मूळ

जिकडे तिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

प्राणि जिकडे जिकडे पहातो तिकडे तिकडे आकाश त्याच्या तोंडासमोर येतेच. मध्यान्हीचा सूर्य ज्याप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर असतो त्याचप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर आकाश असते.

English meaning

Whatever, wherever is seen within the prana, is seen in front of you (and your Reality appears as this). Still that Reality remains above everything, just like the sun in the mid-day sky (ie. It cannot be perceived; It is in every direction, for other than That, nothing else is true).

6
मूळ

परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी । कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

परंतु सूर्याचा हा दृष्टांत परब्रह्मास लागूं पडत नाहीं. सूर्य एकदेशी आहे. तर ब्रह्म सर्व दिशी आहे. ब्रह्माची कांहीं कल्पना यावी, यासाठीं हा चमत्कार सांगितला. एकच सूर्याचे बिंब अगदी कोट्यावधि लोकांना आपल्या डोक्यावर दिसतें. हा चमत्कारच आहे.

English meaning

But if That is limited then, though there is the `end of the visible' still, that Self has not been accomplished (the visible things may have gone away but space or knowledge remains). Then that One within the `thing' is given this `thing'.

7
मूळ

नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी । तैसें न लगे परब्रह्मासी । बैसले ठाईं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

अनेक देशांमध्यें अनेक तीर्थें आहेत. तीं पहायची असतील तर कष्ट सोसून दूर जावें लागतें. पण परब्रह्म दर्शन करण्यास तसें करावें लागत नाहीं. बसल्या ठिकाणीं तें पहाता येते.

English meaning

There are the `many' sacred places in the `many' different places and you make exhaustive efforts to go and see them. But such trouble is not required, for every place you sit is parabrahman.

8
मूळ

प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।रिकामें परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

समजा, एखादा प्राणी एका जागी बसून राहिला, नंतर तो पळत पळत दूर गेला. त्याच्या या दोन्ही अवस्थांमध्यें परब्रह्म अगदी त्याच्या बरोबर राहतें.

English meaning

If you remain in the prana and sit in one place or if you become this `I am' and get up and run very far; still it will be with the companionship of that parabrahman.

9
मूळ

पक्षी अंतराळीं गेलां । भोंवतें आकाशचि तयाला । तैसें ब्रह्म प्रााणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

एखादा पक्षी आकाशांत अगदी उंच उडाला. त्याच्याभोवतीं जिकडे तिकडे आकाशच असतें. त्याचप्रमाणें परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूनें व्यापून राहतें.

English meaning

Just as a bird is surrounded by space when it flies through the sky; so too, when you are in this prana still, you are pervaded by that brahman .

10
मूळ

परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥

मराठी अर्थ

ब्रह्म पोकळ म्हणजे रिकामें आहे. पण तें अगदी दाट भरलेलें आहे. ब्रह्म पोकळ आहे याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणीं त्याच्याखेरीज अन्य वस्तू नाहीं. म्हणून तें अगदी भरलेलें आहे. झाडून सगळ्यांचा शेवट अखेर ब्रह्मामध्येंच होतो. ज्याला त्याला सर्वकाळ ब्रह्म अगदी सरळ असतें.

English meaning

parabrahman is completely empty and so completely full. That is brahman, the end of end. But if that pure brahman is perceived by the purush (ie. when He tries to see Himself) then, there is this time of the `all'.

11
मूळ

दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । आ रे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

या अवाढव्य ब्रह्मांडाच्या पोटांत अगदी गच्चपणें भरलेलें ब्रह्म दृश्यांच्या आंत बाहेर व्यापून आहे. त्या निर्मळ ब्रह्माची सर कोणालाहि येऊं शकत नाहीं.

English meaning

That brahman is within your inner space and He is outside of this `all' also. That completely fills the womb of this brahmanda (creation). My dear! What can be compared to that pure brahman?

12
मूळ

वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । पन्नगादिकपाताळलोकी । तेथेंहि आहे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इहलोक, परलोक, इंद्रलोक, चौदालोक,महासर्पाचे पाताळ लोक या सर्व लोकांना ब्रह्म व्यापून राहिलेलें आहे.

English meaning

That brahman is in vaikuntha, kailas and swargalok (ie. places of vishnu/sattwa, mahesh/tamo and brahma/rajo guna). That brahman is in the world of indra (the lord of the senses) and in the fourteen worlds and in the lower world of the *serpents etc., and He is `there' also. *(In the causal body, zero, where the snakes of desire lie hidden)

13
मूळ

कासीपासून रामेश्र्वर । आवघें दाटलें अपार । परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

काशीपासून रामेश्र्वरपर्यंत सर्व जागीं अपार ब्रह्म गच्चपणें भरलेले आहे. त्याच्यापलीकडे जावे म्हणून कितीही दूर गेले तरी त्याला शेवट नाहीं. त्यामुळें जेथें ब्रह्म नाहीं अशी जागाच नाहीं.

English meaning

From kailas to rameshwar (ie. places of shiva), that limitless brahman is pervading everything. And still He is the beyond the beyond, for there is no limit to Him.

14
मूळ

परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥

मराठी अर्थ

परब्रह्म अगदी एकटे आहे, एकमेव व अद्वितीय आहे. त्यानें एकदांच सगळ्यांना व्यापून टाकलें आहे. सगळ्यांना स्पर्श करुन तें सगळ्या ठिकाणीं राहिलें आहे.

English meaning

There is only that parabrahman and at the same time, that brahman pervades this `all'. But then this `all' is touched and He remains at this `all' place (maharaj- shiva means to take a touch)

15
मूळ

परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

परब्रह्म पावसानें भिजत नाहीं किंवा चिखलानें माखलें जात नाहीं. पाण्याच्या पूरांतही तें वाहून जात नाहीं.

English meaning

That parabrahman does not get wet in the rain and is not smeared by the mud. It is in the flood but It is not swept away by Its association with the flood (ie. the rushing waters of maya).

16
मूळ

येकसरें सन्मुख विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक । आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥

मराठी अर्थ

एकाच वेळीं तें समोर असतें व मागें असतें. उजव्या बाजूला असतें व डाव्या बाजूला असतें. खालीं असतें व वर असतें. सर्व प्राण्यांना तें सर्व बाजूंनी व्यापून राहतें.

English meaning

It is in front and at the same time It is at the back (unlike space which is only seen in front); It is left and right and in the prakruti/purush, It is the One. It is below and above, It is in the prana and It is pervading this `all'.

17
मूळ

आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

परब्रह्मानें जणू काय आकाशाचा डोह भरुन टाकला आहे. पण या डोहामधील पाणी कधी उचंबळत नाहीं. कल्पना करतां येत नाहीं अशा अफाट विस्तारानें तों डोह जिकडे तिकडे पसरला आहे.

English meaning

It fills this `great river' of space (ie. knowledge); but It never overflows nor is It ever agitated. That unattainable brahman has expanded everywhere.

18
मूळ

येकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास । भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ज्याच्या ठिाकाणी दृश्याचा यत्किंचित भास नाहीं, असें अगदी एकजिनसी शन्य आकाश कल्पावें. अशा प्रकारचें इंद्रियांना न भासणारें, मनाला आकलन न होणारें, जें आकाश तेंच परब्रह्म समजावें. आपल्या प्रत्ययाला येणार्‍या आकाशांतून सर्व दृश भास नाहींसा केल्यावर जें केवळ आकाश उरतें तेंच परब्रह्म होय.

English meaning

It is the One within this `object'; and It is indifferent like the sky and does not appear as this visible `here'. That which is without any appearance and cannot be apprehended should be known as parabrahman.

19
मूळ

संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां । ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥

मराठी अर्थ

संत, साधु, महात्मे, देव, दानव आणि मानव या सगळ्यांना परब्रह्म हेंच खर्‍या विश्रांतीचें ठिकाण आहे. त्याच्यापाशी सर्वांना विसावा मिळतो.

English meaning

That is the Saint, sadhu and the `great experienced'. That is the God who knows, the demon who does not know and man (who knows and does not know also). brahman is the shelter for this `all' and the place of complete rest.

20
मूळ

कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें । असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥

मराठी अर्थ

कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणत्या बाजूला तें कसें पाहावें हें सांगणें अशक्य आहे. जें मुळांत अनंत आहे व अमर्याद आहे, त्याला कोणतीहि मर्यादा घालणें शक्य नाहीं.

English meaning

How can anyone go to the very end of this purush/prakruti? How can anyone see that Reality? (therefore this `you' must go off) And how can that unattainable be fixed to any particular place?

21
मूळ

स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे । ज्ञानदृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥

मराठी अर्थ

परब्रह्म स्थूळ नाहीं किंवा सूक्ष्महि नाहीं. या विश्र्वामधील कोणत्यही वस्तूसारखें तें नाहीं. फक्त ज्ञानदृष्टीला त्याचे स्वरुप आकलन होतें. आणि म्हणून ज्ञानदृष्टीनें मनाचे समाधान होतें.

English meaning

That is not the gross body and That is not the subtle body. Nothing is like that One within this `thing'. Yet without this vision of knowledge, there cannot be that complete contentment of brahman.

22
मूळ

पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी अवकास । भकासरुप ॥ २२ ॥

मराठी अर्थ

पिंड व ब्रह्मांड हीं दोन्ही भासरुप आहेत. त्यांचा निरास झाला कीम ब्रह्म निराभास किंवा भासरहित होतें. मग येथून तेथपर्यंत नुसता रिकामा अवकाश अनुभवास येतो.

English meaning

When there is the destruction of the pinda and brahmanda then, there is that brahman beyond appearance. Then from `here' to `there' there is this empty-form (ie. when you are He then, everything is there but it is as if a dream).

23
मूळ

ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म व्यापक आहे हें म्हणणें खरेंच आहे, पण जोपर्यंत व्याप्त दृश्य आहे तोपर्यंत हें बोलणें खरें असतें. ब्रह्माला व्यापून रहायला दृश्यच उरलें नाहीं तर मग ब्रह्म व्यापक आहे ही भाषाच संभवत नाहीं.

English meaning

That brahman is the `One who pervades' (ie. antar-atma) and He is that true thoughtless atma. And on account of this `reply', that thoughtless atma is this `all' also (maharaj- reply to the mind in such a way that, the mind goes off ie. `I am'). But when He is free of any kind of existence then, how can He be called the `One who pervades'?

24
मूळ

ब्रह्मासि शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

शब्द ब्रह्मापर्यंत पोचूं शकत नाहीं. मानवी कल्पना ब्रह्माची कल्पना करुं शकत नाहीं. अशा या कल्पनातीत निरंजन स्वरुपाला विवेकानें ओळखावें.

English meaning

This `word' cannot be found in brahman. Imagination cannot imagine Him. That which is beyond imagination, is beyond knowledge and that niranjan should be reco- gnized through vivek.

25
मूळ

शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानीं पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥

मराठी अर्थ

सर्व साधनाचे रहस्य असेल तर तें अध्यात्म श्रवण होय. श्रवण करुन सतत मनन करावें आणि स्वतः अनुभव घ्यावा. स्वानुभव प्राप्त झाला कीं ज्ञानाचें विज्ञान होतें. आणि मग आपोआपच उन्मनी अवस्था होते.

English meaning

That pure essence is shravan and that pure nirgun is manana. In vignyan, no- mind/unman is attained and then, there is that natural Self.

26
मूळ

जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुणब्रह्म तें निश्र्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

ज्याला उन्मनी साधतें, त्यास त्याच्या साधनेचें फळ मिळतें. त्याचा संसार सफळ झाला. निश्र्चळ व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतर्यामी स्थिर झालें.

English meaning

Then the fruit of sadhana has been achieved and your samsar is fulfilled, for that still nirgun brahman, has been established in your inner space.

27
मूळ

हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

मायेचा हिशोब झाला. मायेचे देणें घेणें संपलें. कांहीहि बाकी राहिली नाहीं. मूळमायेपासून चारी खाणीपर्यंत सारीं तत्वें अशाश्वत आहेत. हें निश्र्चित ठरलें. साध्य पदरांत पडल्यानें साधनाला अवकाश उरला नाहीं. साधना आपोआपच विराम पावली.

English meaning

The regard for maya is over. The choosing of the elements is over. The goal has been reached and there is no place for sadhana.

28
मूळ

स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥

मराठी अर्थ

स्वप्नांत जें जें पाहिलेले असतें तें सगळें जागेपणी नाहीसें होते. अशा रीतीनें सहजच अनिर्वाच्य स्वरुप बनल्यावर त्याबद्दल कांहीं बोलतां येत नाहीं.

English meaning

In the dream, mula maya was perceived and when this flew away upon awakening, there was only that Reality. When that natural inexpressible has been realized then, nothing will be `spoken' (all imagination has ended and this `speech' has become that inexpressible Reality).

29
मूळ

ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें । जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥

मराठी अर्थ

असें हें सगळें विवेकानें जाणावे. स्वतः अनुभव घ्यावा. त्या अनुभवांनी आत्मज्ञानाच्या खुणा अंगीं बाणाव्या. म्हणजे मग आपल्याला जन्म मृत्यु शून्यवत होतात. आपण अमृतपदास पोचतो.

English meaning

That thoughtless Self should be known through vivek and that nirgun should imbibe that complete nirgun understanding. Then on account of first understanding this `I am', birth and death have been reduced to nothing.

30
मूळ

भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥

मराठी अर्थ

श्रीरामरायानें भक्ताचा अभिमान धरला आणि त्याच्यावर कृपा केली. त्या समर्थाच्या कृपेनें हीं वचनें स्फुरलीं. त्या वचनांचा संग्रह म्हनजेच हा दासबोध होय.

English meaning

Lord ram bestows His grace on the devotees who worship Him with a pure pride/ab- himan (`I am'). By the power of His grace bestowing `word', there is this dasbodha and that thoughtless swarup (ie. dasbodha- one who is devoted to knowledge. The one who is devoted to this knowledge `I am' will attain that thoughtless swarup, I do not exist).

31
मूळ

वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध । मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

दासबोधाचे वीस दशक आहेत. तो श्रवण करुन त्यावर जो शोधपूर्वक मनन करील त्यास परमार्थ म्हणजे काय हें स्पष्टपणें कळेल.

English meaning

The dasbodha has twenty dashaka/chapters. By shravan search within these words and accept the inner meaning they convey. That thoughtless paramarth/Supreme Ac- complishment appears to the one who maintains this manana (to have forgotten eve- rything that one has learnt in this world up to now and to remain always with the understanding `I am').

32
मूळ

वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

दासबोधाचे हे वीस दशक आणि दोनशें समास साधकानें स्वस्थपणें आभ्यासावें. त्याच्यावर विचार केल्यास अधिकाधिक अर्थ कळूं लागेल.

English meaning

There are these twenty dashaka/chapters or two hundred samas/sub-chapters and gradually through these, this `I am' will be revealed to the sadhak. Then by constant investigation the best of the best, pure knowledge, will be realized.

33
मूळ

ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन । येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

ग्रंथाची स्तुति करण्याची पद्धत आहे. परंतु अशी स्तुति करण्याचे कारण नाहीं. या ठिकाणी अनुभव हा प्रधान आहे. ग्रंथामध्यें सांगितलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.

English meaning

There should be the praising of this spiritual composition. But what is the purpose of such praise? It is so that this `I am', the cause of that nirgun `here', should understand that nirgun `there' (the only praise you can give this composition is to be this `I am').

34
मूळ

देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

देह तर पंचभूतांचा बनलेला आहे. अंतरात्मा हा तेथिल खरा कर्ता आहे. हें जर खरें तर कवित्वाचें कर्तेपण आत्म्याकडेच आहे. माणसाकडे नाहीं.

English meaning

There is the body made of the five great elements, there is the `doer'/purush and there is that pure atma `there'. So tell me, how can this sacred `poem' (`I am') be composed by a man (someone who thinks "I am a body")?

35
मूळ

सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काये मानुशाचें । ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काये घ्यावें ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

जगामध्यें सगळें कर्तेपण जगदीश्वराचे आहे. अर्थांत कवित्वाचे कर्तेपण माणसाकडे असूं शकत नाहीं. माणसानें कवित्वाचे कर्तेपण स्वतःकडे घेणें अगदी अप्रमाण आहे.

English meaning

This `all' is the wonderful action of that Lord of the world (ie witnessing purush). So how can such a `poem' be made by a man (the man must understand and leave; then only there can be this `poem' and its Lord)? Therefore why should the imaginings of the mind be accepted, rather than this `speech'?

36
मूळ

सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला । तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

आपला देह संपूर्ण निरास केला म्हणजे तत्वांचा समुदाय उडून जातो. मग कोणत्याही वस्तूला आपलें म्हणतां येत नाहीं.

English meaning

And when this `all' body is discarded then, this place, where the gross elements all meet together, will simply fly away. For in brahman, how can there be this `all object' that you call your own? (When there is this `all' then you feel, `Everything, everywhere is myself')

37
मूळ

ऐसींहे विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें । जगदेश्र्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

अशीं ही विचारांची कामें आहेत. माणसानें भ्रमांत पडून उगीच भटकूं नये. जगदीश्वरानें व्यवस्थितपणें क्रमाक्रमानें सगळें रचलें आहे.

English meaning

You have need of this thoughtless understanding, for then that still and silent Self will not be confused, by the confused (ie. mind). That Lord of the world has created this world in an orderly sequence by first creating this `all'. Now by understanding this `all' once more, this process will be reversed and then you can understand thoughtlessness (there is the One parabrahman and then there was the `two' purush/prakruti; this `I am', `all' etc. concealing that knowing purush. Then the gunas appeared and from tamo comes the great elements, space, wind, fire, water and earth; then comes the most gross or objective when the mind becomes body conscious and sees many objects and thinks about many things. Now follow this process back to that thoughtless Lord, I do not exist). .