पूर्णनाम — समास 9: सूक्ष्मनिरुपण

Fully populated

Sukshma Nirupan (A Discourse on the Subtle)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें । हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥

मराठी अर्थ

मातीचा देव आणून त्याची पूजा करायची नंतर विसर्जन म्हणून त्यालाच टाकून द्यायचा. हें आपल्या अंतःकरणाला स्वाभाविकपणें योग्य वाटत नाहीं.

English meaning

If one makes puja to a clay idol and then promptly immerses that idol in water then, that thoughtless swarup can never be accepted by your antah-karana (if you continue idol worship, how can you ever know your Self? maharaj- they go to a stone and they ask for something and miraculous things happen. But they don't understand; that power had come from themselves)

2
मूळ

देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा । याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥

मराठी अर्थ

ज्या देवाची पूजा करयची त्यालाच टाकून द्यायचा. हें माणसाच्या जीवाला प्रशस्त वाटत नाहीं. आपल्या मनांत याचा विचार करावा.

English meaning

If God is worshipped and then thrown away then, that most praiseworthy, thoughtless swarup can never appear and there is a jiva (if you act like a jiva and remain like a jiva then, how can you be that formless swarup?). Therefore that thoughtlessness (nirgun) of this `speech' (sagun) should be understood within.

3
मूळ

देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥

मराठी अर्थ

देव बनवतां येण्यासारखा नाहीं. तसाच तो टाकून देण्यासारखा पण नाहीं. म्हणून यावर कांहीं विचार करणें जरुर आहे.

English meaning

God cannot be made and God cannot be thrown away like this. Therefore you should understand this `thing' and thoughtlessness.

4
मूळ

देव नाना शरिरें धरितो । धरुनी मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥

मराठी अर्थ

देव अनेक देह धारण करतो. आणि धरल्यानंतर मागून तें टाकून देतो. देह धारण करणारा आणि देह सोडणारा हा देव कसा आहे, ते विवेकानें ओळखावें.

English meaning

God upholds the `many' bodies with His `all' body and after holding them for some time, He leaves. Still who is that God? By vivek that atma should be recognized.

5
मूळ

नाना साधनें निरुपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुले अंतःकर्णे । समजले पाहिजे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

देवाचा शोध कसा करावा हे सांगणारीं अनेक निरुपणें आहेत. तशीच अनेक साधनेंही आहेत. पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणानें समजून घेतली पाहिजेत.

English meaning

In order to search for God there are the `many' sadhanas and `many' discourses. But your antah-karana should understood this `all'.

6
मूळ

ब्रह्मज्ञानाचा उपाये । समजल्याविण देतां नये । पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतः समजून घ्यावा. तो स्वतःला समजल्यावांचून दुसरा कोणी देऊं शकत नाही. तो कांहीं असा पदार्थ नाहीं कीं, '" हा घेऊन जा "असें म्हणतां येईल.

English meaning

Without understanding this remedy of knowing, that pure knowledge of brahman cannot be accepted. This `object' is present here and now, but one should accept it and then only say, "Now take it away" (first understand this `object' of knowing ie. invocation of God, and then immerse it in thoughtlessness).

7
मूळ

सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

सर्वसाधारण माणसाच्या मनांत असा हेतु असतो कीं, " मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी " परंतु देवदर्शन करुन घेण्यास विवेकाचा उपाय कांहीं वेगळाच आहे.

English meaning

But if in your inner space there is this understanding of a lumped together gross world, then you will feel, "My eyes should see God." However this remedy of vivek is quite different (the viveki understands, "My sense organs and my intellect cannot know Him").

8
मूळ

विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना । परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

विचारानें परीक्षण केलें असतां, जें शाश्वतपणें टिकत नाहीं त्यास देव म्हणता येत नाहीं. पण लोक ऐकत नाहींत ते अशाश्वतालाच देव म्हणतात. याला कांहीं इलाज नाहीं.

English meaning

And even if you understand thoughtlessness but do not maintain it then, that un- derstanding cannot be called God. But the people do not stop thinking, so what to do! (Unless the mind is stopped one will continue as a body and continue to do `many' forms of worship and sadhana)

9
मूळ

थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती । तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥

मराठी अर्थ

थोर माणसें मरुन गेल्यावर त्यांच्या मूर्ति करुन ठेवतात. व ती मूर्ति तो माणूस आहे असें समजतात. उपासनेच्या बाबतींत असाच प्रकार होतो. आपल्या कल्पनेनें देवाची मूर्ति करुन त्यासच सामान्य लोक देव समजतात.

English meaning

That One has destroyed brahman and this world of the `all' (by body consciousness). Therefore now, that One is to make and understand this `all' form of that brahman. Truly everything is in your hands. For whatever worship that thoughtless Self makes, that It will gain (if you take yourself to be a jiva and make the worships that jiva make then, you will keep this body. But if you worship that thoughtless by being thoughtless then, you will gain Yourself).

10
मूळ

थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥

मराठी अर्थ

एखाद्या माणसाला मोठा व्यापार करणें जमेना, म्हणून त्यानें शाईचा व्यापार केला. तर त्या व्यापारांत त्याला राजासारखी संपत्ती मिळवणें कधींच शक्य नाही. उपासनेला हाच नियम लागूं आहे. खरा देव साध्य होत नाहीं म्हणून मातीच्या मूर्तिची उपासना करण्यानें खरें समाधान प्राप्त होणार नाहीं.

English meaning

The people do not know this pervasiveness of brahman and so they continue to perform some job for some remittance. How can they acquire the wealth of that King, when they continually take themselves to be a jiva?

11
मूळ

म्हणोनि जितुका भोळाभाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥

मराठी अर्थ

म्हणून जेवढा भोळा भाव आहे तेवढा अज्ञानाचा स्वभाव समजावा. अज्ञानानें परमात्मस्वरुपाची प्राप्ती होणें शक्य नाहीं. दृश्य मिथ्या आहे. तें खरें मानणें हाच अज्ञानस्वभाव आहे.

English meaning

When there is the blind faith of a jiva then, this effortless and spontaneous `all' is full of ignorance. But how can that God of the gods be realized through such ignorance?

12
मूळ

अज्ञानासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचीये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाहीं. तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाहीं. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध आहेत त्यांचे अनुभव प्रमाण धरुन त्यांच्या संकेतांनी आपण वागलें पाहिजे. आपले अनुभव संतांच्या अनुभवाशी जुळले पाहिजेत.

English meaning

Ignorance does not respect knowledge. And the Knower does not respect conjecture. Therefore He should acquire that pure nirgun understanding of the siddha (by dropping all conjecture and remaining with the conviction of the Knower).

13
मूळ

माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें । ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

माया बाजूस टाकून मूळ परब्रह्मापर्यंत गेल्यावर खरें समाधान लाभतें. असें झालें नाहीं तर साधक भलतीकडेच भरकटतो. त्याला समाधान लाभत नाहीं.

English meaning

One should go to the root of maya and then leave her aside. Then only will there be complete contentment. If this is not done then, that `fullness of being' will be wasted away on irrelevant things.

14
मूळ

माया उलंघावाकारणें । देवासी नाना उपाय करणें । अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणे । प्रत्ययानें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मायेचे उल्लंघन करतां यावें म्हणून भगवंतानें साधनेचे अनेक प्रकार निर्माण करुन ठेवलें आहेत. परंतु त्या सर्व प्रकारांत अध्यात्माचें श्रवणमनन ही सर्व श्रेष्ठ साधना आहे. साधकानें तसें करुन स्वतः अनुभव घेत पुढें जावें.

English meaning

And even if, in order to cross over this maya, the mind performs this remedy of shravan still, that nirgun is knowing this path of shravan (shravan is the remedy but one has to understand it is not the nirgun and He is being made to perform shravan).

15
मूळ

ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी । स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥

मराठी अर्थ

या राजमार्गानें न जातां सामान्य माणसें अन्य उपाय करतात. त्यामुळे त्यांची व देवाची चुकामुक होते. साधना खरी कोणती व खोटी कोणती अशा रीतीनें ओळखावीं.

English meaning

But if shravan is not made in this world then, one losses one's Self in the `many' actions. Therefore one should recognize that state that is true and the states that are false.

16
Unverified — under review
मूळ

खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरुं नये । खोटें संग्रहीं करुं नये । कांहींयेक ॥ १६ ॥

मराठी अर्थ

जें मिथ्या आहे त्याच्या वाटेनें जाऊं नये. त्याची संगत धरुं नये. कांहीहि मिथ्या संग्रही ठेवूं नये.

English meaning

One should not walk the path of the false. One should not keep company with the false. One should not hoard anything that is false.

Note: John Norwell's English translation is truncated to a single stray letter ('v') for this owi, cut off right before a page break in the source PDF with no continuation afterward. The English above is a direct rendering of the sourced Marathi meaning rather than an independently cross-checked translation.

17
मूळ

खोटें तें खोटेंचि खोटें । खर्‍यासीं तगेनात बालटें । मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

जें मिथ्या आहे तें कोणत्याहि कालीं कोणत्याहि परिस्थितींत मिथ्याच राहणार हें खरें आहे. त्याच्यापुढें खोट्याचा टिकाव लागत नाहीं. खोट्यामधें गुंतलेले मन खर्‍याकडे नेण्यासाठीं त्यास उरफाटे केलें पाहिजे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख केलें पाहिजे.

English meaning

That Reality gets made false by the false, but with the Truth, the fraudulent cannot remain. Therefore your mind which is looking outwards should turn around and look inwards.

18
मूळ

अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥

मराठी अर्थ

अध्यात्म श्रवण करीत जावें. त्या योगानें सर्व गोष्टी हस्तगत होतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातात.

English meaning

There should be shravan and when this `all thing' is acquired then, the entangle- ments of the ways of the `many' will be cut.

19
मूळ

सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें । मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

ज्याप्रमाणें सुताचा गुंता आपण उकलतो. त्याचप्रमाणें मनाचा झालेला गुंता उकलावा. मनाला हळूहळू मूळ परब्रह्माकडे वळवावे. मायेच्या पसार्‍यांत अनेक ठिकाणीं अनेक प्रकारें गुंतलेले मन क्रमाक्रमानें तेथून सोडवावे. त्यास अंतर्मुख करुन परब्रह्माकडे वाटचाल करण्याची हळुंहळुं सवय लावावी.

English meaning

The mind should be disentangled in the same way a knotted thread is made straight and by continuous respect for this `thing', the mind should be placed at its root.

20
मूळ

सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

मूळ मायेंतील सगळीम तत्वें एकत्र मिसळली आहेत. त्या मिश्रणापासून विश्वांतील सर्व वस्तु बनल्या आहेत. सर्व प्रकारच्या शरीरांमध्यें तेंच मिश्रण विभागशः भरलेले आहे.

English meaning

When that brahman is mixed with this `all thing' then, it appears as this `all' and of this `all'. And then while within this `all' body, this `all thing' gets divided up into the `many' things (maya's nature is to expand downwards. Therefore without vivek, she will lead that brahman to body consciousness).

21
मूळ

काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

हें मिक्षण कोणत्या तत्वांचे बनलेलें आहे व तें कसें बनतें हें या मानवदेहांतच शोधावें. सूक्ष्माची जी चौदा नांवें आहेत, ती येथेच समजून घ्यावी.

English meaning

How can that Reality be understood `here' (ie. if you stay in maya then, there is only maya. But that Reality `there' does not know of maya `here')? Still It can be searched for `here'? For this reason, the fourteen `names' `here' of that subtle brahman `there' should be understood. (Note: ahead are the fourteen names; these explain how that pure thoughtless swarup is ever present within maya; and that the `two' are, in truth, the One)

22
मूळ

निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक । देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

सर्व ठिकाणीं व्यापून असणारें निर्गुण व निर्विकारी असें एकच परब्रह्म आहे. तें निष्कलंक स्वरुप या देहामध्यें आहे किंवा नाहीं याचा शोध घ्यावा.

English meaning

Within that One unmodified nirgun there is this place of the `all' and that `one who pervades' (ie. antar-atma or purush). Now is this antar-atma within this `all' body, that immaculate One or is it not?

23
मूळ

मूळमाया संकल्परुप । तें अंतःकर्णाचें स्वरुप । जड चेतवी चैतन्यरुप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥

मराठी अर्थ

मूळमाया संकल्परुप आहे. अंतःकरणाचें तेंच स्वरुप आहे. जडाला चेतना देण्याचे चैतन्य तेंच आहे. संकल्प, अंतःकरण व चैतन्य तिन्ही या शरीरांतच आहेत.

English meaning

mula maya is this sankalpa form (ie. wish to be) and then, that thoughtless swarup is the antah-karana (knowing faculty). And even when the inert and inanimate are made to move by this chaitanya form still, that thoughtless Reality is also there within this `all' body.

24
मूळ

समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥

मराठी अर्थ

या अवस्थेंत गुण समान असतात. ती गुणसाम्य अवस्था होय. या साम्यावस्थेचा विचार अतिशय सूक्ष्म व अगम्य आहे. जे साधुपुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात, ते सर्वांना वंद्य असतात.

English meaning

When the gunas are in balance then, there is that thoughtless Self and gunasamya (ie. balanced gunas), but at that time, that brahman is unattainable. Only the sadhu knows that all His worship goes to that brahman.

25
मूळ

द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षणांग विचार । तोचि अर्धनारीनटेश्र्वर । पिंडीं वोळकावा ॥ २५ ॥

मराठी अर्थ

आपल्या शरीराला डावा व उजवा असें दोन विभाग आहेत. पण दोन्ही जसें एकच रुप आहेत. त्याचप्रमाणें पिंडांत अर्धनारीनटेश्र्वर असतो हें ओळखावें.

English meaning

`Here' two kinds of bodies have appeared. Then that thoughtless swarup has a `left body' (ie. known) and a `right body' (ie. Knower). Then that brahman has be- come *ardhanari-nateshwar and this should be recognized within the pinda. *(One half feminine and one half masculine)

26
मूळ

तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे । शडगुणईश्र्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥

मराठी अर्थ

तोच प्रकृतिपुरुष आहे. शिवशक्ती पण तोच आहे. त्याच मिश्रणाला षडगुणैश्वर सुद्धां म्हणतात.

English meaning

That brahman should know prakriti/purush and That should recognize shiva/shakti. When that brahman is this Lord with the six glories/shadguneshwara then, it should be called the `basic mix' (`here' brahman is mixed with maya).

27
मूळ

तयासीच म्हणिजे महत्तत्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व । अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणी ॥ २७ ॥

मराठी अर्थ

त्रिगुण ज्यांत गुप्तरुपानें राहतात तें महत्तत्व देखील तेंच समजावें. अर्मात्रा, शुद्धसत्व आणि गुणक्षोभिणी तिन्जी एकाच मूळ तत्वांची नांवें आहेत.

English meaning

Then that Reality should be called the maha-tattwa/great element (ie. space) and afterwards there is guna maya and the riddle of the three gunas. Then this pure sattwa guna represented by the half vowel above aum becomes gunakshobhini (the gunas are agitated and appear).

28
मूळ

त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

तीन गुणांच्या मिश्रणानें आपलें शरीर चालतें. हीं गोष्ट तर प्रत्यक्षच दिसते. मूळच्या मिश्रणाचे बनलेले हें शरीर आहे, असें यावरुन समजावें.

English meaning

When this `all' body moves by these three gunas then, that thoughtless Self sees by the sensory organs. Therefore this `all' body of the root made of this `basic mix' should be known.

29
मूळ

मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥

मराठी अर्थ

मन, माया आणि जीव या तीन गोष्टी तर शरीराचा स्वभावच आहे. अशा रीतीनें पिंडामध्यें चौदा नावांचा संकेत पहावा. त्यांचें अस्तित्व समजावें.

English meaning

For when there is the mind, maya and the jiva then, that natural atma sees a world of `many' forms. Therefore That which is being indicated by these fourteen names should be understood within this pinda.

30
मूळ

पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें । शाश्र्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥

मराठी अर्थ

पिंड पडला कीं हें सगळें जातें. परंतु परब्रह्म तेवढें राहातें. तें शाश्वत आहे. असें जाणून घट्ट धरुन ठेंवावें.

English meaning

When the pinda ceases to exist then, only the `many' things disappear, but pa- rabrahman still remains. Having understood that eternal, then that Reality should be firmly held and never thrown away (see V.1). .