पूर्णनाम — समास 3: सूक्ष्मनामाभिधान

Fully populated

Sukshma Namabhidhan (The Subtle Naming)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी । पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥

मराठी अर्थ

मूळमायेपासून चार प्रकारच्या जीवप्राण्यांपर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकारानें सांगितला आहे. त्याच्यावर पुनः पुनः मनन करुन आपली वृत्ति माघारी फिरवावी. आणि अखेर ती मूळमाये पर्यंत नेऊन सोडावी.

English meaning

From the root to the end there is this `speech' and this has expanded into the ways of the `many'. But when again one makes a careful investigation, that One turns away from objectifying and this knowing vritti (ie. `speech') rests, free of desire.

2
मूळ

च्यारी वाणी च्यारी खाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी । नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥

मराठी अर्थ

च्यार वाणी व च्यार खाणी मिळून चौर्‍याशीं लक्ष जीवयोनी आहेत. त्यांमधील अनेक प्रकारचे प्राणी जगांत जन्मास येतात.

English meaning

But when there are the four sources of birth and the four kinds of speech, then there is this attention of the eighty-four principles of a jiva.

3
मूळ

अवघे होती पृथ्वीपासुनी । पृथ्वीमधें जाती नासोनी । अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

हे सगळे प्राणी पृथ्वीपासून जन्मास येतात व अखेर पृथ्वींतच नाश पावतात. अनेक प्राणी आले आणी गेले पण पृथ्वी मात्र जशींच्या तशींच राहिली आहे.

English meaning

From the earth element these `many' things appeared and then, that One within the earth element gets destroyed (due to the `many' thoughts, that One becomes a jiva and then completely forgets Its true nature). Then that One is the numerous different shapes and It comes and goes, but still, the earth remains just as it is (the earth element is the gross objectified world of the waking state. And in this state `many' thoughts come and go ie. `many' forms appear to the eyes, ears, tongue etc.) (Note: now this objectification explained in the previous chapter is being reversed; here the first stage is the objective world)

4
मूळ

ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड । तिेसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरुपें ॥ ४ ॥

मराठी अर्थ

पृथ्वी आणी तिच्यावरील जीवप्राणी हा ब्रह्मांडवृक्षाचा शेंड्याकडील म्हणजे टोकाचा विभाग आहे. तो आतां सांगितला. पंचभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे. मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक सूक्ष्मत्तत्वांची नामें सांगितलीं. तो त्या वृक्षाचा तिसरा विभाग होय.

English meaning

Due to objectification, that thoughtless Self is the outermost part of the universe (ie. first stage or gross identification). On account of this second stage, the five elements that had expanded now turn around and due to the third stage, that vast paramatma gets called this `I am'.

5
मूळ

स्थूळ अवघें सांडून द्यावे । सूक्ष्मरुपें वोळखावें । गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥

मराठी अर्थ

जेवढें स्थूल आहे तेवढें सगळें टाकून द्यावें. शुद्ध जाणीव सत्वगुण जें सूक्ष्म आहे त्याचे गुणधर्म ओळखावें. गुणापासून मूळमायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीनें चिंतन करीत जावें.

English meaning

Therefore this gross world of `many' things, should be let slip away and this form with that brahman should be recognized. This `I am' has appeared on account of the pure sattwa guna and by subtle vision this should be understood.

6
मूळ

गुणांचीं रुपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव । सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

गुणांच्यामध्यें जाणीव आणि नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणांवर पुनः पुनः विचार करावा आणि हे रहस्य समजून घ्यावें. सूक्ष्मदृष्टीचें कौशल्य तर खरें येथून पुढेंच आहे.

English meaning

Due to this pure sattwa guna there is knowing (sattwa guna) and not-knowing (tamo guna). First, their importance should be understood (this play of knowing and not- knowing is the cause of the rajo guna and objectification and this should be understood if one is to transcend it). Then afterwards when established in this mula maya, there will be the mastery of that subtle vision (then always you understand nothing is there but yourself).

7
मूळ

शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥

मराठी अर्थ

तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण होय.

English meaning

When there is only not knowing then, this is tamo guna and when there only knowing then, this is sattva guna; and knowing and not knowing together is rajo guna. Due to the mixing of these two, you function in this world. (This pure sattwa guna is the ef- fortless knowing of the `all' ie. knowledge or this `world beyond'. From this has come the manifest three gunas and they mix together to create this gross world; maharaj- you know something and that is sattwa guna but you don't know what it is and this is tamao guna. And together they bring rajo guna)

8
मूळ

त्रिगुणाचीं रुपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं । गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हें बरोबर कळलें म्हणजे त्यांच्यापुढें जो काला आहे त्यास गुणक्षोभिणी म्हणतात हें समजेल.

English meaning

First in that natural brahman there had come the understanding of this `I am' form of these three gunas. When after this pure sattwa guna of prakruti/purush is called the `disturbance of the gunas'/guna-kshobhini (ie. guna maya; the appearance of the gunas).

9
मूळ

रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । तें जाणिजे महत्तत्व । कर्दमरुप ॥ ९ ॥

मराठी अर्थ

रज, तम आणि सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणीं अत्यंत गुप्तपणानें राहतात त्या अवस्थेला महत् तत्व म्हणतात. महत् तत्व चिखलाप्रमाणें मिश्रणरुप आहे.

English meaning

Then there is raja, tama and sattwa; still that hidden guna (ie. pure sattwa) of these three is `here'. And when the Reality gets known as the great element space then, there is this mix of purush and prakruti.

10
मूळ

प्रकृति पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्र्वर म्हणती । परी याची स्वरुपस्थिती । कर्दमरुप ॥ १० ॥

मराठी अर्थ

प्रकृतिपुरुष, शिवभक्ति, अर्धनारी नटेश्र्वर हीं नांवें देखील वापरतात. पण त्यांचे स्वरुप मिश्रणमयच आहे.

English meaning

It is called prakruti/purush, shiva/shakti or ardhanari-nateshwar (half male- half female Lord). Then that pure swarup is this `speech' and there is this mix of Knower and known and they cannot be separated apart.

11
मूळ

सूक्ष्मरुपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य । तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरुपी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

गुणक्षोभिणीमध्यें तिन्ही गुण अत्यंत सूक्ष्मरुपांत असतात. तसेच ते सौम्य असतात. त्या अवस्थेला गुणसाम्य म्हणतात. त्याचप्रमाणें अत्यंत सूक्ष्मरुप चैतन्य तेथेंच असतें. तें कळयाला फार कठीण असते.

English meaning

When there is this `all' form of that brahman then, the gunas are in equilibrium; this is called the balanced gunas. This is also called this moving principle/chaitanya, and just as this is within purush/prakruti, so too that unfathomable brahman also is.

12
मूळ

बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया । ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

मूळमाया अनेक तत्वांनी भरलेली आहे, मूळमाया म्हणजे ब्रह्मांडाचा माहाकारण देह होय. हीं तत्वें आणि त्यांचें संबंध सूक्ष्म आहेत. वारंवार विचार करुन त्यांचें दर्शन करुन घ्यावें.

English meaning

And this mula maya (prakruti) is also within the `many' objects. She is the great causal body of the brahmanda. Therefore to understand that brahman one should first understand this original connection of mula maya (ie. drop the `many' objects).

13
मूळ

च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें । काये पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

चार खाणी, पांच महाभूतें आणि मायेची चौदा सूक्ष्म संकेतमय नांवें, यांच्यावर विचार करुन सारी सृष्टीरचना शोधून पहावी.

English meaning

So there are the four sources of birth (ie. third form), the five elements (ie. second form) and the *fourteen indications (ie. first form/mula maya) of that brahman. The Reality cannot be understood `here' in maya but That can be understand if one searches through this maya (she will be a pointer that will lead you to the door of eternity). *(see 7.3: These are the fourteen brahmans.2 And there are also the fourteen names of this brahman with form or maya, see 20.5. Each method should be used to determine that One brahman)

14
मूळ

आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना । नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥

मराठी अर्थ

नुसतें वारंवार पाहिलें तर हें कळायचे नाहीं. उगीच तात्पुरता किंवा कामापुरता विचार केला तरी हे कळायचे नाहीं. सामान्यतः लोक अशा रीतीनें विचार करतात, म्हणून त्यांच्या मनांत अनेक संदेह उत्पन्न होतात.

English meaning

27.3.10 - For understanding that thoughtless swarup there are these fourteen brahmans. The essence of that swarup (ie. the inexpressible) will now be revealed by means of these various forms of this `speech'. 14. If one only understands superficially then, That cannot be known. For that Reality will not be grasped by a cursory glance and by haphazard thinking. For then that One is the mind of the people within the ways of the `many' and It has fallen into body consciousness.

15
मूळ

चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस । यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

मूळमायेची चौदा नांवें, त्यांत पांच महाभूतें मिळवली म्हणजे एकोणीस, त्यांत चार खाणी मिळवल्या म्हणजे एकंदर तेवीस तत्वें होतात. यापैकी मूळमायेच्या चौदा संकेतांचा पुनः पुनः विचार करावा आणि त्यांचें स्वरुप समजून घ्यावें.

English meaning

There are the fourteen, plus the five elements and that is nineteen. This nineteen and the four speeches/births make twenty-three. But within this `speech' with its fourteen indications of brahman, there is that One original inexpressible Self and therefore this `speech' should be understood over and over again (when there is this knowing or `speech' then, the fourteen or nineteen or twenty-three will become that One only).

16
मूळ

जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला । सकजल्याविण जो गल्बला । तो निरार्थक ॥ १६ ॥

मराठी अर्थ

जो अत्यंत सूक्ष्म मनन करुन मूळमायेचे व त्रिगुणांचें स्वरुप समजून घेतो, त्यास कोणताहि संदेह उरत नाहीं. तें न समजतां बडबड करणें व्यर्थ होय.

English meaning

For when one understands this `all' and investigates further then, `there' doubt does not remain. But when one does not understand then, there is confusion or if the implied meaning has not been realized then, that paramatma appears as this empty `word' (ie. tattwamasi, You are That. First there is the `word' meaning and you come to understand that you are this `I am'. Then there is the implied meaning; this `I am' is That only. One without a second. `There' you do not exist).

17
मूळ

सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥

मराठी अर्थ

या सगळ्या विश्र्वाचे बीज मूळमायेंत अगदी सहजपणानें आहे. आणि हें जर नीटपणानें कळलें तर परमार्थ सिद्ध होतो.

English meaning

This `all' is the seed of the gross creation and within this `all' also, there is that natural swarup. Then the `many' things are truly understood and that is paramarth (the Ultimate accomplishment).

18
मूळ

समजले माणूस चावळेना । निश्र्चइ अनुमान धरीना । सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

मूळमाया आणि त्रिगुण यांचें खरें स्वरुप ज्याला कळतें त्याच्या मनांत घोटाळा शिल्लक राहात नाहीं. त्याचा निश्रचय पक्का झाल्यानें तो उगीच कल्पना करीत राहात नाहीं. त्याच्या परमार्थामध्यें सावळागोंधळ आढळत नाहीं.

English meaning

This understanding is not the wild ravings of a man. For the convinced do not hold on to conjectures and guesswork. On account of paramarth, the net of entanglement is never created.

19
मूळ

शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें । शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

जें शब्दातींतच आहे, त्याच्याबद्दल कांहीं बोलता आलें तरी तो वाच्यांश समजावा. जो शुद्ध लक्षांश आहे तो अखेर विवेकाच्या ज्ञानदृष्टीनेंच पाहावा लागतो.

English meaning

When That which is beyond the `word' `speaks' then, to that paramatma there has come the `word' meaning. But that pure implied meaning should be concentrated on through vivek.

20
मूळ

पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया । माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥

मराठी अर्थ

मायेला पूर्वपक्ष म्हणतात. सिद्धांतानें पूर्वपक्ष विलयास जातो. म्हणजे परब्रह्माच्या साक्षात्कारानें माया नाश पावतें. माया नाहीशीं झाल्यावर जें कांहीं उरतें त्यास नांव तरी काय द्यावें? नांव देणें मायेच्या अलीकडचा प्रकार आहे. म्हणून माया विलीन झाल्यावर शब्दसुद्धां उरत नाहींत.

English meaning

The primary hypothesis is maya (ie. `I am') and that is destroyed by the Truth/si- ddhant (I am not). When maya is not then, what should be said to that paramatma (from where speech comes back)?

21
मूळ

अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

मााया हयात असतांना अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीनें विवेकाची क्रिया चालते. तेथें द्वैत असल्यानें हें शक्य होते. पण माया विलिन झाल्यावर " शुद्ध असेम एकमेव ब्रह्म आहे, दुसरें मुळीं नाहींच " असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथेम संपूर्ण अद्वैत असतें.

English meaning

By the two methods of vedantic logic,3 there is the vivek of the primary hypothesis, `I am'. But the Truth/siddhant means that pure One where there is no other.

22
मूळ

अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जीव अधोमुख असतो तेव्हां म्हणजे, मायेकडे तोंड करुन असतो तेव्हां भेद वाढतो. अनेकपणाच अनुभवास येतो. जीव ऊर्ध्वमुख होतो तेव्हां, भेद कमी होतो, एकपणाचा अनुभव येऊं लागतो. सर्वसंग सोडून जो अलिप्तपणानें निर्गुणाशीं समरस होतो, त्यालाच महायोगी म्हणतात.

English meaning

When that paramatma looks downwards, division increases but if that paramatma looks upwards, then divisions are cut. Thus due to detachment, there is the great yogi in nirgun.

23
मूळ

माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली । मायेचे भिडेनें घसरली । स्वरुपस्थिती ॥ २३ ॥

मराठी अर्थ

माया खरी नाहीं. हें एकदा कळल्यावर मग तीचे दडपण जीवावर पडूं नये. पण मायेचे दडपण पडतें आणि जीव आपल्या स्वस्वरुपावस्थेंतून खालीं घसरतो.

English meaning

maya is false when that nirgun is understood; then after what fear/regard can that One have? It is due to this fear/regard for maya that, the swarup was let slip away.

24
मूळ

लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्र्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥

मराठी अर्थ

मिथ्या मायेच्या दडपणाखालीं सांपडल्यानें सत्य परब्रह्म सोडणें बरोबर नाहीं. परब्रह्म तेवढेंच सत्य आहे अशी खात्री झाल्यावर मग संशयाच्या नादानें इकडेतिकडे हिंडणें बरोबर नाहीं.

English meaning

If the Reality is seized by the false maya then, that Truth, is let slip away. But when that Supreme has the conviction of Its own Self then, why should it wander? (The false cannot comprehend the Truth; only the Truth will recognize the Truth) 3 anvaya/vyatirek ie. methods of logic to prove existence of something. A popular example is there is no smoke without fire but there can be fire without smoke. In this case they prove that there is no waking, dream or sleep without `I am' but there can be `I am'/knowledge without these three states. Still such logic can lead to the understanding of `I am' but thereafter when there is One only then, such logic is of no use.

25
मूळ

पृथ्वीमधें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥

मराठी अर्थ

जगांत पुष्कळ मानसें आहेत. त्यामधें साधुपुरुष पण असतात. हें जरी खरें तरी साधूला साधूवांचून दुसरा कोणी ओळखूं शकत नाहीं.

English meaning

Within the earth element, there is this `all' and the world of the people. And in that `all' there is the Saint. But who can recognise that sadhu, other than the sadhu?

26
मूळ

म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा । फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥

मराठी अर्थ

म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे, त्यानें संसार सोडावा. आणि साधूचा शोध करावा. ठिकठिकाणीं फिरावें आणि साधुपुरुष धुंडून काढावे.

English meaning

Therefore one should let this *samsar slip from the mind and search out and accept that sadhu. That sadhu within the people should continuously wander freely (ie. forget the world and pervade everywhere) and then overthrow this place of the `all' (and then even give up this knowledge). *(maharaj- `two swords cannot fit in one sheath'; we want to put one foot in this `world beyond' and the other foot we want to keep in this world. In this way, both worlds are spoiled)

27
मूळ

उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत । प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

असे पुष्कळ संत पाहिले म्हणजे त्यांच्यांतच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आढळतो. साक्षात्कारावांचून आत्महित होत नाहीं.

English meaning

That vast paramatma and Saint should be searched out. That purush of this `ex- perience' should be found. For without this `experience' you will not gain your own Self.

28
मूळ

प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ । प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. सर्वांच्यामध्यें स्वानुभवाच्या ज्ञानानें संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष होय.

English meaning

In prapanch and in paramarth, without this `experience' there is the useless ima- ginings of the ignorant mind. And within this `all' there is that gnyani, and He is the Master.

29
मूळ

रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । परलोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥

मराठी अर्थ

साधकानें रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत असावें. अशा रीतीनें मनन करुन जो अर्थ शोधून काढतो, तोच समर्थ पुरुष होय. परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत होतो.

English meaning

Day and night the meaning (I do not exist) should be understood and then that Master within you will understand. Then within this `all' world `here', your own wealth and meaning `there' will be gained.

30
मूळ

म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥

मराठी अर्थ

म्हणून साधकानें जो अर्थ समजला आहे, त्याच्यावरच पुनः पुनः मनन करावें. ज्या स्वरुपाचा शोध केला आहे त्याचाच पुनः पुनः शोध करावा. या मार्गानें वाटचाल केली असतां सहजच सगळें कळलें म्हणजे सारें संदेह नाहींसे होतात.

English meaning

Therefore this original mula maya should be understood and then this that was searched out should be searched through. Then the nature of these `many' things will be truly understood and body consciousness will be destroyed. .