पूर्णनाम — समास 4: आत्मानिरुपण

Fully populated

Atma Nirupan (A Discourse on the Atma)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेना । निरुपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥

मराठी अर्थ

सर्व लोकांना माझी प्रार्थना अशी आहे कीं, कोणीहि उगीच उदासीन होऊं नये. मी सांगतो हें निरुपण स्वानुभवाचें आहे. तें नीट समजून घ्यावें.

English meaning

This `all' has been praying to the `people' (ie. it has been devoted to this body and mind). Even so, that silent and still should not get disheartened and now, this mind should bring that nirgun discourse.

2
मूळ

प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे । तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥

मराठी अर्थ

स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धांवतों भलतीकडे. अशा परिस्थितींत सार व असार यांच्या बरोबर निवाडा करतां येणें शक्य नाहीं.

English meaning

That nirgun understanding is with that One. But if He Himself runs in a different direction (ie. towards this `all' and then the `many people') then, how can He chose between that essence and non-essence?

3
मूळ

उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं । परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥

मराठी अर्थ

सृष्टीकडे जर आपण सहज पाहिलें तर जिकडे तिकडे गोंधळ नजरेस पडतो. पण राजसत्तेची गोष्टच निराळी असते. ज्याप्रमाणें व्यवहारांत गोंधळ आढळला तरी त्याच्या पाठीशीं अदृश्य राजसत्ता असते, त्याचप्रमाणें या जगांत आपल्या दृष्टीला गोंधळ किंवा अव्यवस्था आढळतें. तरी त्याच्यामागें ईश्र्वरी सत्ता कार्य करत असते. हें अगदी खरें आहे.

English meaning

When that still and silent understanding is a gross world, then, that One sees with confused vision. But when this `I am' is understood then, He speaks with the power of the King (ie. atma purush) and his confused vision is left behind.

4
मूळ

पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताची घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥

मराठी अर्थ

पृथ्वीवर जेवढीं म्हणून शरीरें आहेत तेवढी सारी भगवंताची घरें आहेत. प्रत्येक शरीरांत भगवंत राहतो. त्या शरीराच्या द्वारानें जीव अनेक प्रकारची सुखें भोगतो.

English meaning

All that is within this earth element is due to this `all' body and this `all' body is the house of God. And on account of this `all', the `many' thoughts acquire happiness. (Even when there is gross objectification, this `all' is not destroyed; it is the support of the objective world and it is God's form; it is His manifestation)

5
मूळ

त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कुपाळु जाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

त्या ईश्र्वराचा महिमा कोणालाही कळलेला नाहीं. भगवंतानें आपला कृपाळूपणा जगांतील अयांच्या ठिकाणीं वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्र्वरच जगाचे रक्षण करतों. ज्या कृपाळूपणानें ईश्र्वर जगाचे रक्षण करतअसतो, त्याची कल्पना येण्यास मातेचे कृपाळूपण बघावें.

English meaning

Who understands the greatness of that paramatma? He is the mother (ie. maya) and she distributes His kindness (ie. He gives you life. Out of nothing, He has created you by this `I am' of maya. And then He makes you He. This is His kindness. But the jiva takes this `I am' and makes his own world out of it). Even sensory perception is that Lord of the world protecting the gross world (in this way, He protects the jiva each and every moment).

6
मूळ

सत्ता पृथ्वीमध्यें वांटली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ईश्र्वराची सत्ता जगामधें वातलेली आहे. जेथें ते थें ती विभागलेली आहे. भगवंताच्या कलेनेंच सर्व सृष्टी चाललेली आहे. ईश्र्वरी सत्ता जाणीवरुप आहे. जगांमधील प्रत्येक वस्तूंत ती अंतर्यामीं वास करते. तिच्या सामर्थ्यानेंच वस्तूची हालचाल होत असते.

English meaning

After `there' got divided `here', His power (ie. existence of this `I am') was distributed out within this earth element. But it is due to this *`art' of God, that the whole gross creation functions. *(This `art' of knowing appears as the sensory organs with which each jiva functions)

7
मूळ

मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता । सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

मूळ पुरुष जो ज्ञानी अंतरात्मा त्याची सत्ता सर्व ठिकाणीं वावरते, सर्व जीवांच्या देहामध्यें जाणीवरुपानें ती विभागली आहे. जीवांच्या ठिकाणी आढळणारें कौशल्य व चातुर्य या सत्तेचाच परिणाम आहे.

English meaning

This original knowing is the power of that purush and this has been divided, but truly it is in this `all' (we say, "I know this and that" but that authority actually belongs to the knowing of that purush. The jiva steals his authority from there). And truly this `all', `art' and wisdom dwell `there' (the Knower is truly `there' and He manifests `here' as the known and knowing).

8
मूळ

सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश । नाना शरीरीं सावकास । करुं लागे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

सगळ्या देहरुपी नगरांचा तो स्वामी असून जगामधील जगदीश किंवा जागाचा स्वामी देखील तोच आहे. तो अनेक शरीरांत वास करतो आणि जीवनाचा व्यवहार स्वस्थपणें चालवतो.

English meaning

The Lord/isha of this `all' body/pura is that purush and He is within the world. But then, He started to function in the `many' bodies within this `all' body (ie. for this reason, we know, we feel eternal and secretly think "There is none like me").

9
मूळ

पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना । येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

सृष्टीची रचना पाहिली तर असें दिसतें कीं, एवढा हा विशाल पसारा एखाददुसर्‍याला आवरणें अशक्य आहे. मूळ चालवणारा एकच असला तरी तो अनेक देह धारण करुन एवढा अवाढव्य पसारा चालवीत असतो.

English meaning

When you have thoroughly understood this construction of the gross world then, that One does not move. But that One is being made to move by holding the `many' bodies.

10
मूळ

नाही उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥

मराठी अर्थ

सृष्टि निर्माण केली त्यावेळीं ईश्र्वरानें श्रेष्ठ व कनिष्ठ हा विचार केला नाहीं. किंवा चांगलें वाईट हा भेद पाहिला नाहीं. कोणीकडून तरी सृष्टीचें कार्य चालावें, अशा हेतुनें त्यानें अनेक देह निर्माण केले आणि त्यांच्यांत आपलें अधिष्ठान ठेवलें.

English meaning

But where there is neither superior nor inferior thinking and there is neither the best nor the worst understanding then, that Lord moves with this `all' action.

11
मूळ

किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासी घातलें । हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

कांहीं जीवांच्या आड अज्ञान घातलेंकांहीं जीवांना त्यानें अभ्यासांत घातलें तें कां घातलें? अशा रीतीनें त्यानें जग कसें कसें निर्माण केलें हें त्याचा तोच जाणे.

English meaning

Otherwise due to not knowing, the obstruction of body is created. Or where there is proper study then, this `all' is being created. But, how the thoughtlessness of that paramatma (ie. Lord) is created, that is only known by paramatma (ie. worship Him by being Him).

12
मूळ

जगदांतरी अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान । ध्यान आणी तें ज्ञान । येकरुप ॥ १२ ॥

मराठी अर्थ

जगांत घडणार्‍या घटनांच्या अंतर्यामीं ईश्र्वराची सत्ता कार्य करते असें सतत भान ठेवणें, हें भगवंताचे अनुसंधान होय. अनुसंधानामध्यें स्वतःचा विसर पडणें हें ध्यान होय. स्वतःचा पूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झालें म्हणजें तेंच ज्ञान होय. ध्यान आणि ध्यान अखेर एकरुपच आहेत.

English meaning

To understand that thoughtless, one has to first place one's attention upon this `all' within the gross world. To know this form is meditation/dhyana and this form is knowledge/gnyana; here they are one and the same thing. (This meditation is gone beyond traditional meditation, for it means to forget everything; to have no particular object of meditation)

13
मूळ

प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला । मग तो विवेरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

माणूस जगामध्यें जन्माला येतो. तो थोडाबहुत शहाणा होतो. आणि मग तो जगाबद्दल विचार करुं लागतो.

English meaning

When one's samsar within the prana has become this knowledge then, that One has become wise. Then that one should begin to carefully investigate this knowledge that is within this mundane existence.

14
मूळ

प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन । विश्र्वंभर विद्यमान । भग्यें कळे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

त्या अंतरात्म्याचे निशाण जगांत प्रगट आहे. म्हणजे त्याच्या सत्तेची खूण प्रगटपणें जगांत अनुभवास येते. तो ज्ञानमय आहे. ज्ञानानें आंतबाहेर दाटपणें भरलेला आहे. विश्वाला सांभाळणारा तो अंतरात्मा सर्व ठिकाणीं विद्यमान आहे. परंतु त्याच्या अस्तित्वाचें ज्ञान एखाद्यालाच भाग्यानें प्राप्त होतें.

English meaning

Then the ensign of ram can be raised, for there is that atmaram, full of knowledge. This is vishwambhara (ie. the atma who fills the whole creation), He is the possessor of knowledge and the most fortunate can understand Him.

15
मूळ

उपासना धुंडून वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली । महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एखाद्यानें आपल्याला हवी तशी उपासना शोधून काढली, पण ती करीत असतां कांहीं वासना मनांत धरली, तर ती वासना नाहींशी होत नाही. उलट वाढतच जाते. त्यामुळें अंतरात्म्याचा महिमा कळत नाहीं. असें जें म्हणतात तें अगदी बरोबर आहे. उपासनेमधें जोपर्यंत वासना प्रधान आहे तोपर्यंत मन अधोमुख राहते. तें उर्ध्वमुख झाल्यावांचून ईश्र्वराचा महिमा कळत नाहीं. आणि वासना असे पर्यंत मन ऊर्ध्वमुख होत नाही.

English meaning

But if your worship holds the desire to search for Him then, that Reality goes very far away (leaving all desire, even the desire to know or be, is the greatest worship). For the greatness of that nirgun cannot be understood and when you try to find Him then, this `speech' appears (ie. duality is maintained).

16
मूळ

द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरुपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

अंतरात्मा द्रष्टा व साक्षी आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अनंतरुपांनी द्रष्टेपणा व साक्षीपणा दाखवणारा असा अनंत अंतरात्मा आपण ओळखावा.

English meaning

The seer means the one who understands the seen. He is the Witness and the Knower that knows. Therefore that endless Self within this endless form should be recognized (that paramatma is called endless when He is the Witness within this never ending knowledge). (maharaj- knowledge is never ending. Put an end to the endless!)

17
मूळ

संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरुपणाची । कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

सज्जनांची संगत ठेवावी आणि कथा निरुपणें ऐकण्याची संवय असावी. त्या योगानें मनाला थोडीफार विश्रांति लाभते.

English meaning

When one is in the company of the wise then, there is the skilful discourse of His `story'. And when there is that One within this `story' then, for the mind, there is complete rest/vishranti.

18
मूळ

त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान । प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

त्यातल्यां त्यांत अनुभवाचे ज्ञान असावें. त्या ज्ञानानें अनुमानाचें भस्म होऊन जातें. प्रत्यक्ष अनुभवावांचून मनाला समाधान मिळत नाहीं.

English meaning

In that nirgun knowledge, conjecture and guesswork are burnt and cast away. But how can there be that perfect contentment without understanding this `I am' experi- ence?

19
मूळ

मूळ संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदांतरीं तेंचि रुप । देखिजेतें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळमायेचा सारा खटाटोप या संकल्पामुळें चालतो. जगाच्या अंतरंगांत हा मूळ संकल्प भरलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणें जगांतील सार्‍या घटना घडतात.

English meaning

When there is this original desire then, that paramatma is this desire of vishnu and then that paramatma is within mula maya, as an intention (to know or to be). Therefore that Reality that has appeared as this *form within the world should be searched for. *(This form is called knowledge or existence; then there is only myself knowing and my existence)

20
मूळ

उपासना ज्ञानस्वरुप । ज्ञानी चौथा देह आरोप । याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥

मराठी अर्थ

मूळमाया हा ब्रह्मांडाचा चौथा व महाकारणदेह आहे. तो ज्ञानस्वरुप आहे. तोच उपासनेचा ईश्र्वर होय. ईश्र्वराची उपासना म्हणजे ज्ञानस्वरुपाचीच उपासना असते. पण ही मूळमाय संकल्परुप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. यासाठी साधकानें सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे.

English meaning

Worship is this knowledge. And when there is this knowledge then, that swarup must also be there (ie. sagun/nirgun). But for a gnyani, this fourth body of knowledge is a defect. Therefore by means of this `speech', this desire to know should be left off (by listening to only this `speech'/knowing, this understanding also slips away of its own accord).

21
मूळ

पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ । घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

सर्व संकल्पांचा त्याग केल्यावर मूळमाया बाजूस सरते. मग त्याच्या पुढें आकाशासारखें विशाल व पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे अनुभवास येते. त्या स्वरुपाला घनदाट म्हणावें कां पातळ म्हणावें किंवा नाजूक कोमल म्हणावें, काय म्हणावें तें कळत नाहीं.

English meaning

Then ahead there is that clear parabrahman, full and empty like the sky. What should one say to that completely full, subtle and soft? (krishna- where words come back, that is my abode)

22
मूळ

उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रीतीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेचे पर्यवसान ज्ञानामध्यें होतें. ज्ञानानें नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीनें योग्यांना समाधान लाभतें.

English meaning

Worship means knowledge and through this knowledge, that niranjan should be attained. That is the complete contentment of the yogi and it is on account of thou- ghtlessness.

23
मूळ

विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे । येक जाये एक राहे । देह धरुनी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

निश्र्चयानें नेट लावून जर विचार केला तर असें आढळेल कीं, ज्याची उपासना करायची तें उपास्य आपणच आहोंत. उपासनेला द्वैत लागते. पण उपासक उपास्याची उपासना करतां करतां स्वतः आपण उपास्यामध्यें विलिन होतो. अर्थात एक जातो व एक राहतो. ज्या देहांत उपासक राहात होता त्याच देहांत आतां उपास्य राहतो.

English meaning

When thoughtlessness is continuous understood then, you are truly worshipping (lit. with God). But when that One (brahman) is destroyed then, there is the other `you' who remains attached to a body.

24
मूळ

अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली । आताम हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥

मराठी अर्थ

अशी ही उलाढाल पूर्वींपासून होत आली आहे. आतांहि उत्पत्ति व स्थिति तशीच चालली आहे.

English meaning

Then that unbroken swarup is the hustle and bustle of confusion and That which is beyond the beginning, comes and goes in the `many'. So therefore understand that even when there is the creation and maintenance of the gross world, still that One is functioning as this `all' (ie. first understand this `all', His power).

25
मूळ

वनावरी वनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥

मराठी अर्थ

वनावर वनचरांची सत्ता चालते, जलावर जलचरांची सत्ता चालते, याच न्यायानें पृथ्वीवर सगळ्या राजांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्र्वावर भगवंताची सत्ता चालते.

English meaning

The animals in the forest are His *power and the fish in the sea are His power. Within this world of birth and death there is His power and due to thoughtlessness there is its Lord. *(existence)

26
मूळ

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥

मराठी अर्थ

कर्मामध्यें सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्यास सामर्थ्य प्राप्त होईल. परंतु त्या कर्मास भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे. आपण निमित्तमात्र आहोत, खरा कर्ता भगवंत आहे. त्याच्या सत्तेनें कर्म घडणार व फळ प्राप्त होणार. अशी निष्ठा असणें हें भगवंताचे अधिष्ठान होय. अशा निष्ठेनें माणूस कर्म उत्तम करुन देखील त्यापासून अलिप्त राहील, त्यास कर्तेपणाचा अभिमान होणार नाहीं.

English meaning

When there is this power of moving then, that purush is said to be the doer. Then `here', that original place of God is required (ie. the non-doer `there' is required).

27
मूळ

कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें । तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥

मराठी अर्थ

खरा कर्ता जगदीश्र्वर भगवंत आहे. ही गोष्ट पूर्णपणें खरीं आहे. परंतु त्याची सत्ता प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणीं विभागली आहे. ईश्र्वर स्वतः वेगळेपणानें कांहीं करत नाहीं. निरनिराळ्या प्राण्यांकडून तो आपल्या सत्तेनें कर्में घडवून आणतो. म्हणून आपल्या हातून जें जें कर्म घडतें, त्याच्या अहंकाराचे वेड जाणत्याला बाधत नाहीं.

English meaning

The Lord of the world (ie. purush) is called the doer and that thoughtless paramatma is called the Truth. But `here' that One atma has been divided into two separate forms. `There' (in thoughtlessness) is not affected by this madness of this ego (on account of this ego `I am' there is the ego "I am a body" and the feeling of differences and this talk of a doer and that One being divided etc.).

28
मूळ

हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता । ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥

मराठी अर्थ

भगवंत दाता तसा भोक्ता पण आहे. ही खरी वस्तुस्थिति आहे. या गोष्टीचा नीट विचार करावा.

English meaning

hari (ie. vishnu/knowing) is the giver and hari is the enjoyer; and due to hari, there is movement. Therefore now (ie. with this understanding of knowledge), that thoughtlessness, within this `story' of knowing, should be understood.

29
मूळ

सकळ कर्ता परमेश्र्वरु । आपला माइक विचारु । जैसें कळेल तैसें करुं । जगदांतरें ॥ २९ ॥

मराठी अर्थ

परमेश्र्वर सकळ कर्ता आहे. आपण मायिक आहोत, आपलें कर्तेपण मायिक आहे. खोटें आहे. म्हणून जगाचा अंतर्यामी ईश्र्वर जेवढें ज्ञान देईल तेवढें समजून जें कर्म करतां येईल तें करावें.

English meaning

When parameshwara is the doer and there is this `all' then, His thoughtlessness becomes an illusory thought (`I am'). As is the understanding, so will be inner space (the wonder of this knowledge is that it becomes whatever you want it to become. And if you don't want it also then it doesn't become anything and there is no knowledge).

30
मूळ

देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्र्चळ नाहीं । पाइरीनें पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥

मराठी अर्थ

देवाइतकें म्हणजे अंतरात्म्याइतकें चपळ दुसरें कोणी नाहीं. परब्रह्मा इतकें निश्र्चळ दुसरें कांहीं नाहीं, पण हे कळण्यासाठीं पायरी पायरीनें चढत मूळमायेपर्यंत जावें. आणि तेथें स्वानुभवानें पहावें.

English meaning

There is nothing as active as God (ie. the moving antaratma) and there is nothing as still as brahman. Therefore step by step rise up higher and understand the origin of this `all'. .