पूर्णनाम — समास 5: चत्वारजिनस

Fully populated

Chatvar Jinas (The Four Kinds)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

येथून पाहातं तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं । येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥

मराठी अर्थ

या विश्र्वरचनेमध्यें येथून तेथपर्यंत फक्त चारच पदार्थ आहेत. ते ऐकून ठेवा. एकब्रह्म, चौदा मायेची नांवें, पांच महाभूतें आणि चार खाणी असें हें पदार्थ आहेत.

English meaning

When from `here' up to `there' is understood then, the four objects have been de- termined. There is the One (ie. purush), the fourteen names (ie. prakruti) of That, the five (ie. great elements) and the four (ie. sources of birth).

2
मूळ

परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें । नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥

मराठी अर्थ

परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळें आणि आगळें म्हणजे श्रेष्ठ आहे. मानवी कल्पनांहून निराळे ासें तें ब्रह्म आहे.

English meaning

parabrahman is different from this `all'. parabrahman is greater than this `all' and that parabrahman is separate from the `many' thoughts.

3
मूळ

परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्र्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

आपण अनेक प्रकारच्या कल्पना केल्या तरी त्यांच्यापलीकडे परब्रह्माचा विचार जातो. परब्रह्म निर्मळ, निश्र्चल, निर्विकार, आणि अखंड आहे.

English meaning

The thoughtlessness of parabrahman is beyond the `many' thoughts. That is unbro- ken, blotless/nirmal, still/nishchal and unmodified/nirvikar.

4
मूळ

परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना । दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥

मराठी अर्थ

परब्रह्म हाच या विश्र्वरचनेमधील मुख्य जिन्नस आहे. त्याच्याबरोबर दुसर्‍या कशाचीही तुलना करतां येत नाहीं. अनेक कल्पनांनी भरलेली मूळमाया हा दुसरा जिन्नस आहे.

English meaning

This `thing' cannot be compared to parabrahman and so there are these four objects (see 20.4.30; step by step rise up higher to understand the origin of this `all'). That thoughtless One (ie. mula purush) is the most superior `object'. And mula maya is this other `object' and then there are the `many' objects and concepts.

5
मूळ

नाना सूक्ष्मरुप । सूक्ष्म आणी कर्दमरुप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥

मराठी अर्थ

मूळमायेची अनेक सूक्ष्मरुपें आहेत. ती अतिशय सूक्ष्म असून मिश्रणमय आहे. निर्भेळ नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं जें मूळ स्फूरण झालें, त्याच्यावर जो आरोप करतात, त्यास मूळमाया म्हणतात.

English meaning

There are the `many' objects and there brahman's form. This means brahman and form. This form is the planting of the root and this is the original desire and this is mula maya.

6
मूळ

हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६॥

मराठी अर्थ

या मूळच्या संकल्पाला हरिसंकेत असें म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामीं वास करणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नांवें दिलेली आहेत त्याचे संकेत पुढीलप्रमाणें आहेत.

English meaning

When there is this original desire of hari at the root then, that atmaram appears as this `all'. Then that thoughtless Self has been assigned this `name' (or `I am').

7
मूळ

निश्र्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें । गुणसमानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥

मराठी अर्थ

निश्र्चल ब्रह्मामध्यें चैतन्य जागें झालें म्हणून त्यास चैतन्य म्हणतात. तेथें गुणांचे प्रमाण सम किंवा सारखें असतें म्हणून त्यास गुणसाम्य म्हणतात.

English meaning

In the stillness, a movement was kindled and this is chaitanya or the `speech'. `Here' there is a balancing of the gunas and such gets called the balanced gunas.

8
मूळ

अर्धनारीनटेश्र्वर । तोचि शडगुणैश्र्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥

मराठी अर्थ

अर्धनारीनटेश्र्वर व षडगुणेश्वर तोच आहे. शिवशक्ति आणि प्रकृतिपुरुषाचा विचारही तोच आहे.

English meaning

Then that brahman has become *ardhanari-nateshwar or *shad-guneshwara or it is said that the thoughtless has become prakruti/purush or shiva/shakti. *(Half male/fe- male Lord and *Lord with the six qualities)

9
मूळ

शुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥

मराठी अर्थ

शुद्धसत्व गुणाची कल्पना, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यामधून पुढें प्रगट होणारे सत्व, रज व तम हे तीन गुण, मूळमायेची नांवें आहेत.

English meaning

When there is expansion out of this pure sattva guna then, this half-vowel of aum (ie. beyond the three states of a, u, m) is this gunakshobhini (agitation of the gunas; guna maya) and ahead this manifests as the doings of the three gunas.

10
मूळ

मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥

मराठी अर्थ

मन, माया, अंतरात्माअसें मायेच्या नांवाचें एकंदर चौदा प्रकार आहेत. सदैव अस्तित्वांत असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदिसंकल्प इतक्या प्रकारानें प्रत्ययास येतो.

English meaning

All this is mind, it is maya and that antar-atma. These fourteen names are this other `object' (of mula maya) and that knowing atma (ie. antar-atma) is the possessor of this. This much is His place.

11
मूळ

ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

चौदा नावांचा हा दुसरा जिन्नस आहे. पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस होय.

English meaning

Like this is second object of these four objects and here it has been assigned fourteen names. Now the third object is the five great elements (from the tamo guna comes the five great elements).

12
मूळ

येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी । खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥

मराठी अर्थ

पंचमहाभूतांमध्यें जाणीवेचा अंश कमी प्रमाणांत आढळतो. परंतु त्यांच्या आधी व नंतर म्हणजे शेवटी जाणिवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते. आधीं मूळमायेमध्यें जाणीव असते. आणि नंतर चार खाणींमध्यें जाणीव दिसतें. म्हणून पंचभूतांच्या आदिअंती जाणीव असते. पूर्वी चात खाणी म्हणून घाईघाईनें सांगितलें तो चौथा जिन्नस होय.

English meaning

Few understand this knowing `here' (ie. second object) and from the beginning to the end, that thoughtless (ie. first object) is within this ever present `experience' `here'. The four sources of birth are a hurried discourse and then that brahman is the fourth object (ie. a jiva).

13
मूळ

च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी । च्यारी जिनस येथुनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥

मराठी अर्थ

चार खाणी अनंत प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या अंतर्यामीं जाणिवेची जणूं काय गर्दी झाली आहे. त्यांच्या ठिकाणीं पुष्कळच जाणीव आढळते. असो. असे हे विश्र्वरचनेचे चार जिन्नस सांगितलें.

English meaning

When there are these four sources of birth then, that endless paramatma is in the prana. They appear due to the `thickening' (ie. objectification) of this knowledge. But because of these four objects that have come from within maya, parabrahman can be understood. (Even this first object, that thoughtless purush, has come due to the appearance of maya; otherwise there was only parabrahman)

14
मूळ

बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥

मराठी अर्थ

आपण थोडें बीज पेरतों. पण त्यापासून पुढें उदंड धान्य प्राप्त होते. चार खाणींमधील अनंत प्राण्यांमध्यें प्रगट होतांना अंतरात्म्याची स्थिति या बीजासारखी होते.

English meaning

Just as this `all' that is sown by the very few becomes that vast paramatma after- wards. So too, to that atma there comes the manifestation of the four sources of birth and the four speeches.

15
मूळ

ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची उदंड जाली । मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें सत्तेची वाढ झाली. मूळच्या थोड्या सत्तेचा सपाटून विस्तार झाला. अखेर मनुष्यदेहामध्यें ती सत्ता सृष्टीचा अनेक प्रकारे भोग घेते.

English meaning

In this way, His power expanded into this gross existence and only to the few has there come that paramatma of this power. And through the guise of a man in the gross world, that One enjoys and suffers the ways of the `many'.

16
मूळ

प्राणी मारुन स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे । नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥

मराठी अर्थ

एखादा हिंस्त्र पशु दुसर्‍याला मारुन पळून जातो. त्याला यापेक्षां अधिक कांहीं कळत नाहीं. पण अनेक प्रकारचे भोग भोगण्यांत माणूस मोठा पटाईत आहे. उदा. पशु मारुन त्याच्या मांसाचे अनेक प्रकार करुन खाण्याचे ज्ञान त्याला आहे. इतर प्राण्यांना नाहीं.

English meaning

In the prana, the beast kills and runs away. How can this and those like it, under- stand that paramatma? In the human body, there are the `many' enjoyments and that pure atma.

17
मूळ

नाना शब्द नाना स्पर्श । नाना रुप नाना रस । नाना गंध हे विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध यांचे नाना प्रकार माणूस विशेष रीतीनें जाणतो.

English meaning

When there are the `many' words and the `many' forms of touch; when there are the `many' shapes, the `many' tastes and the `many' smells then, that pure knowledge is knowing a human body.

18
मूळ

अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें । नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारची अमोल रत्नें, वस्त्रें वाहनें, शस्त्रें, नाना तर्‍हेच्या विद्या, कला, शास्त्रें माणसालाच माहित आहेत.

English meaning

When there are the `many' priceless jewels and the `many' guises; when there are the `many' modes of transport and the `many' skills; when there are the `many' learnings and the `many' arts and shasthras then, that pure knowledge is knowing a human body.

19
मूळ

पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं अटोपिली । नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥

मराठी अर्थ

त्या अंतरात्म्याच्या किंवा ईश्र्वराच्या सत्तेनें पृथ्वी व्यापली आहे. ठिकठिकाणीं ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. ज्या सत्तेच्या प्रेरणेनें अनेक प्रकारच्या विद्या, कला आणि धारणा प्रगट होतात.

English meaning

That One pervades the earth element due to His power and He controls every place due to His power. But then this `art' of knowing (ie. His power) becomes the `many' learnings and the `many' understandings.

20
मूळ

दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें । सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥

मराठी अर्थ

म्हणून नरदेह हातीं आल्यावर हें सगळें दृश्य पहावें. व्यवहारामधील आपलें स्थान आणी मान दोन्ही सांभाळावेत. आणि सारासार विचार करावा.

English meaning

He should understand that this `all' has appeared as these `many' things and He should protect this most respected of places. And then, on account of this human body, there should be that thoughtless essence.

21
मूळ

येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक । विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

इहलोक आणि परलोक अनेक प्रकारचे इतर विवेक, शिवाय विवेक आणि अविवेक या गोष्टी माणूसच जाणतो.

English meaning

This world and the world beyond; the `many' forms of vivek; vivek and avivek are all known to man.

22
मूळ

नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना । नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांडरचना, मूळमायेंतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यान धारणा माणूस जाणतो.

English meaning

Man knows this construction of the brahmanda within the `many' pindas; man knows that the `many' is the imaginings of this root and man knows the `many' forms of understanding.

23
मूळ

अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास । वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥

मराठी अर्थ

अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या व अलंकार हे आठही प्रकारचे भोग किंवा सुगंध, स्त्री, तांबूल,वस्त्र, गायन, भोजन, शय्या आणि मादक द्रव्य हे आठ भोग, नऊ प्रकारचे रस, अनेक विलास, वाच्यांश, लक्ष्यांश व सारांश या गोष्टी माणूसच जाणतो.

English meaning

Man knows the eight pleasures, nine types of emotions/sentiments, the `many' forms of playfulness; the word meaning and the implied meaning, the essence.

24
मूळ

मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें । ऐसे हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

माणूसइतर सर्व प्राण्यांना आपल्या ताब्यांत ठेवतो. पण माणसाला देव पाळतो, सांभाळतो. आपल्या ताब्यांत ठेवतो. या सार्‍या गोष्टी मानव देहांतच कळतात.

English meaning

When that man has control over this `all' then, that man is protected by God. In this way, thoughtlessness or the `many' things can be understood, due to ones union with a human body.

25
मूळ

नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ । दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥

मराठी अर्थ

मानवदेह अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगानें अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे ती सुलभ होते.

English meaning

But when this human body remains then, that Supreme is most difficult to attain; still on account of thoughtlessness, that unattainable is attained and this most difficult to acquire is easily acquired.

26
मूळ

वरकड देहे हे काबाड । नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥

मराठी अर्थ

इतर देह हे रसहीन आहेत. नुसते कष्टकारक आहेत. पण मानवदेह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यास अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे.

English meaning

In other bodies, thoughtlessness has become a heavy load. The human body is a great treasure, because that brahman can be understood. But for this, the forming of real vivek is required.

27
मूळ

येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

माणसाचा देह मिळूनही जो आळशीपणानें वागतो, तो सर्व बाजूंनी बुडतो. त्याचे सर्वस्वीं नुकसान होते. कारण विवेकाच्या बळानें तो देवाची ओळख करुन घेत नाहीं.

English meaning

If this mula maya becomes lazy `here' then, that brahman and this wealth of the `all' are drowned. But through powerful, continuous vivek even God is not (ie. when the known is merged in that swarup, then the Knower does not remain).

28
मूळ

नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण । मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥

मराठी अर्थ

ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असतें आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. तो देहानें माणूस असला तरी देवपदाच्या पदवीला चढतो.

English meaning

If a man/nara makes shravan then, due to this nirgun understanding he becomes narayana. Then His antah-karana should possess manana all the `time'.

29
मूळ

जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें । स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

ज्याला स्वतःला पोहायला येते, त्याला दुसर्‍याची कास धरण्याची गरज लागत नाहीं. त्याचप्रमाणें जो मननशील आहे, त्यानें सर्व कांहीं स्वतंत्रपणें शोधून पहावें.

English meaning

Due to this mula maya, one will naturally be kept afloat and then, what will be required by Him? Then by remaining independent, this `all thing' will be purified.

30
मूळ

सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला । पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

आशा रीतीनें सर्व विष्वाचा जो स्वतंत्रपणें शोध घेतो, त्याला कोणताहि संदेह उरत नाहीं. अशा रीतीनें संपूर्ण संदेहरहित झाल्यावर पुढें जी अवस्था येते ती त्याची त्यालाच समजते.

English meaning

When this `all' has been purified then, how can body consciousness remain for Him? Then afterwards when thoughtlessness has come, how will this `all' be know by that brahman? .