स्वगुणपरीक्षानाम — समास 9: मृत्यनिरुपण

Fully populated

Mrutyu Nirupan (A Discourse on Death)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार । मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १ ॥

मराठी अर्थ

संसार म्हणजे धांवणारा स्वार आहे. मरण हे उधारीवर नाही. माणसाच्या देहाला सारखे माप लावले आहे. क्षणाक्षणानें त्याचे आयुष्य संपत आहे.

English meaning

samsar is like a horseman galloping towards a death he does not want to postpone. And because of this body identification, each and every moment of the `all' body is being carefully measured (this `all' body or knowledge or consciousness is the base of this worldly life; the gross body appears within this `all'. In the morning this consciousness or `I am' appears and a moment afterwards when we think, "I must do this and that" etc., then samsar appears. Thus as long as we retain the concept of being this body, this `all' body of `I am' is at the mercy of our samsar. If we forget this then we remember this `all' and each and every moment, we are. When we are each and every moment then, where is samsar and where is death?).

2
मूळ

नित्या काळाची संगती । न कळे होणाराची गती । कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २ ॥

मराठी अर्थ

नेहमी काळ हा माणसासोबत असतो. कधी काय होणार ते कळत नाही. जसे कर्म तसे मृत्यने माणसे स्वदेशी अथवा परदेशी मरत असतात.

English meaning

When that Eternal One is accompanied by time then, its real nature will not be understood (there will be this knowledge and upon that a jiva will appear). And then on account of actions/karma, that (actionless) One within knowledge will fall into this state of the `many' in the prana.

3
मूळ

सरता संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे॥ ३ ॥

मराठी अर्थ

संचित संपले की क्षणाचाही विलंब नाही, वेळ आली की लगेच जावे लागते.

English meaning

Then as soon as the accumulated *sanchit karma has been used, there is not a moment's delay. Then whether there is the pervasiveness of this `all' or the pervasiveness of just this body still, in the twinkling of the eye, one has to go (but as long as ignorance is there, death is sure to come). *(The jiva is but its stock of accumulated karma)

4
मूळ

अवचिते काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें । नेऊन घालिती पुढारे । मृत्युपंथे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

काळाचे दूत एकदम येतात, जीवाला सारखे मारीत सुटतात.आणि पुढे घालून मृत्युच्या मार्गाने घेऊन जातात.

English meaning

Suddenly the obedient messengers of Time/Death will snatch you away. And they will beat you continuously as they take you on the path of death.

5
मूळ

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं । सर्वत्रांस कुटाकुटी । मागें पुढें होतसे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

एकदां वेळ आली व मृत्युचा वेढा पडला की, कोणीही त्या माणसास पाठीशी घालू शकत नाही. सर्वांना मृत्यु चूर्ण करुन टाकतो. कोणाची वेळ आधी येते तर कोणाची नंतर एवढाच फरक.

English meaning

When there comes the torments and harassment of death then, no one can be turned to for support. This struggling and suffering will come to this `all' as long as confusion persists (as long as one does not know, `Who am I?').

6
मूळ

मृत्यकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं । माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६ ॥

मराठी अर्थ

अंतकाळ ही एक काठी आहे. ती बलवान माणसाचे डोक्यांतसुद्धा बसते. मोठमोठे बलवान राजेसुद्धा यातून वाचू शकत नाहीत.

English meaning

The moment death places its powerful staff on one's head then, even the most powerful king cannot remain in this world.

7
मूळ

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार । मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरंगणीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

मृत्यु असा विचार करत नाही की, हा क्रूर आहे, हा झुंझार आहे का हा रणांगणावर शूर आहे.

English meaning

Death does not say, is he a cruel man? Death does not say he is a warrior. Death does not say he is a brave soldier on the battle field.

8
मूळ

मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी । मृत्य न म्हणे उग्ररुपी । माहांखळ ॥ ८ ॥

मराठी अर्थ

मृत्यु असा विचार करत नाही की, हा रागीट आहे, हा प्रतापी आहे का हा उग्र व दुष्ट आहे.

English meaning

Death does not say, is he passionate and angry? Death does not say he is a man of great valour and might. Death does not say he is ferocious and very wicked.

9
मूळ

मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य । मृत्य न म्हणे आढ्य । सर्वगुणे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की हा बलाढ्य, धनाढ्य किंवा सर्वगुणसंपन्न आहे.

English meaning

Death does not say he is powerful; death does not say he is wealthy. Death does not say he is pervasive due to this guna of the `all' (ie. pure sattwa guna).

10
मूळ

मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत । मृत्य न म्हणे हा अद्भुत । परक्रमी ॥ १० ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की हा विख्यात, श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे.

English meaning

Death does not say he is renowned; death does not say he is rich with spiritual wealth and death does not say he is a marvellous wonder with great power.

11
मूळ

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती । मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की हा भूपती, चक्रपती किंवा करामती मंत्र जाणणारा आहे.

English meaning

Death does not say he is a respected king; death does not say he is an emperor; death does not say he is very clever.

12
मूळ

मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती । मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की हा थोडे बाळगणारा आहे, गजपती किंवा नरपती म्हणजे मोठा प्रसिद्ध राजा आहे.

English meaning

Death does not say he is an owner of horses or an owner of elephants. Death does not say he is a famous king ruling over many people.

13
मूळ

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी । मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की हा लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, राजकारणी किंवा वतनदार आहे. का लोकांना वतनें देणारा आहे.

English meaning

Death does not say that he is superior among people or he is a politician or he is a person drawing a good salary.

14
मूळ

मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई । मृत्य न म्हणे ठांई ठांई । पुंडराजे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

हा देसाई, हा व्यापारधंदा करणारा, किंवा निरनिराळ्या गावांचे पुंडराज आहेत.

English meaning

Death does not say he is a revenue collector or a man of trade. Death does not say he is a leader of thieves who roams the countryside.

15
मूळ

मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी । मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५ ॥

मराठी अर्थ

हा सरकारी अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा ही राजकन्या आहे.

English meaning

Death does not say he is a religious person or a merchant or death does not say he will not touch a woman belonging to another or a princess.

16
मूळ

मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण । मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६ ॥

मराठी अर्थ

हे कार्य, हे कारण, हा उच्चवर्णिय, हा निचवर्णाचा हा कर्ननिष्ठ ब्राह्मण आहे.

English meaning

Death does not say this one is very capable; death does not follow logic or the system of castes and does not respect a brahmin faithfully observing rituals.

17
मूळ

मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न । मृत्य न म्हणे विद्वजज्जन । समुदाई ॥ १७ ॥

मराठी अर्थ

हा विद्यासंपन्न, हा द्रव्यसंपन्न किंवा हा सभेंतील मोठा पंडित आहे.

English meaning

Death does not say he is a scholar, a rich man or a man of great learning among everyone.

18
मूळ

मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे हा बहुश्रुत । मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८ ॥

मराठी अर्थ

हा धूर्त, हा बहुश्रुत, किंवा हा मोठा सज्जन पंडित आहे.

English meaning

Death does not say he is a shrewd person or highly learned or pious pandit and a very good man.

19
मूळ

मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक । मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९ ॥

मराठी अर्थ

हा पुराणिक आहे, हा याज्ञिक, हा वैदिक किंवा हा ज्योतिषी आहे.

English meaning

Death does not say he is a religious preacher or a man knowing the vedas or doing sacrifice, or a man who is a fortune teller.

20
मूळ

मृत्य न म्हणे अग्नहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री । मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २० ॥

मराठी अर्थ

हा अग्निहोत्री, हा वेदांचा ज्ञाता, हा मंत्रयंत्र जाणणारा किंवा ह्याने सारे वेद अभ्यासले आहेत.

English meaning

Death does not say he is a fire worshipper, a listener to scriptures, a man knowing charms or a philosopher.

21
मूळ

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ । मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही की, हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ आहे. कि हा सर्व जाणणारा आहे.

English meaning

Death does not say he is a scientist or a man knowing the scriptures. Death does not say he is a knower of this `all' (death means ignorance; and when ignorance comes to this `all'/knowledge then, how can the witness remain?).

22
मूळ

मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या । मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२ ॥

मराठी अर्थ

ही ब्रह्म हत्या, ही गो हत्या कि ही स्त्री-बालके इत्यादिं अनेकांची हत्या आहे.

English meaning

Death does not say he killed a brahmin. Death does not say he kills cows. Death does not say he has killed `many' woman and children.

23
मूळ

मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी । मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३ ॥

मराठी अर्थ

हा रागज्ञानी, तालज्ञानी, तत्वज्ञानी किंवा हा तत्ववेत्ता आहे.

English meaning

Death does not say he is a knower of song. Death does not say he is a knower of rhythm. Death does not say he is a philosopher and a knower of the elements.

24
मूळ

मृत्य न म्हणे योगाभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी । मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४ ॥

मराठी अर्थ

हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे. किंवा हा काळाला फसविणारा आहे.

English meaning

Death does not say he is yogi or a man of renunciation or a person who boasts that he can deceive death.

25
मूळ

मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध । मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

हा सावध, हा सिद्ध, किंवा हा प्रसिद्ध वैद्य, पंचाक्षरी आहे.

English meaning

Death does not say he is one who is alert or he is accomplished or a great doctor with occult knowledge.

26
मूळ

मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी । मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन ॥ २६ ॥

मराठी अर्थ

हा गोसावी, हा तपस्वी, किंवा हा मोठा अनासक्त आहे.

English meaning

Death does not say he is a monk who has conquered the senses or he is a man of penance or he is a ruler of his mind and disinterested in worldly affairs.

27
मूळ

मृत्य न म्हणे ऋषेश्र्वर । मृत्य न म्हणे कवेश्र्वर । मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७ ॥

मराठी अर्थ

हा ऋषीश्र्वर, हा कवीश्र्वर, हा दिगंबर किंवा हा समाधिस्थ आहे.

English meaning

Death does not say he is the Lord of the rishis. Death does not say he is the Lord of the poets. Death does not say he pervades the sky in the state of samadhi. (Death wants only that which belongs to it ie. the gross and subtle bodyand this `all'; death cannot be known by the One who is beyond death)

28
मूळ

मृत्य न म्हणे हटयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी । मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८ ॥

मराठी अर्थ

हा हटयोगी, हा राजयोगी, किंवा हा नेहमी विरक्त राहतो.

English meaning

Death does not say he is a yogi doing kundalini yoga or a rajayogi or he is one who has conquered his passion.

29
मूळ

मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी । मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्र्वर ॥ २९ ॥

मराठी अर्थ

हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे. हा निराहारी किंवा हा मोठा योगी आहे.

English meaning

Death does not say he is a brahmachari/celibate. Death does not say he is an ascetic with matted hair or he is someone observing a fast or he is a great yogi.

30
मूळ

मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत । मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

हा संत, हा महंत, किंवा हा कधिही गुप्त होणारा आहे.

English meaning

Death does not say he is a Saint or he is a spiritual authority. Death does not say he is the hidden purush (death cannot know these).

31
मूळ

मृत्य न म्हणे स्वाधेन । मृत्य न म्हणे पराधेन । सकळ जीवांस प्राशन । मृत्यचि करी ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

हा स्वाधीन आहे. हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यु हा अटळ आहे. मृत्यु सर्वांना खाऊन टाकतो.

English meaning

Death does not say he is independent or he is dependent. When this `all'/consci- ousness becomes a jiva, then death is there to devour it.

32
मूळ

येक मृत्युमार्गी लागले । येकी आर्ध पंथ क्रमिले । येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

कांही जीव जन्मास आल्याआल्या मृत्युमुखी पडतात. कांही अर्धेच जगतात. कांही वृद्धपणी मरतात.

English meaning

If that One takes itself to be a body then it sets out on this path of death. Then within the One, it will complete only half of its journey because, in the end, that One will die of old age (that One is deathless. But taking itself to be a body, it will pass its days as an entity and it can never reach its destination; it can never know its Self. This gross body appears within consciousness/knowledge and that appears within the One who is beyond consciousness/knowledge).

33
मूळ

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण । मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

मृत्यु हें बघत नाही कीं हा बालक, हा तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे.

English meaning

Death does not say he is a child or merely a youth. Death does not say he has proper attention. Death does not say he is a skilled speaker.

34
मूळ

मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार । मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही कीं, हा पुष्कळांचा आधार आहे. का हा उदार आहे. हा सुंदर आहे का हा चौफेर ज्ञानसंपन्न आहे.

English meaning

Death does not say he is the support of the `many'. Death does not say he is noble and ever open. Death does not say he is beautiful and wise.

35
मूळ

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास । मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

मृत्यु हा पुण्यवान आहे. हा हरिदास आहे. किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे.

English meaning

Death does not say he is a man of merit or a devotee of hari. Death does not say there is this art of knowing or there is this pure action or there is a man (what is death after all? Death is ignorance, the other side of knowledge; what does it know of knowledge? maharaj- unless knowledge goes off, you cannot die).

36
मूळ

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे । मागें पुढें विश्र्वास जाणें । मृत्यपंथे ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

आतां हे बोलणे पुरे झाले. मृत्युच्या ताब्यांतून कोणीही सुटु शकत नाही. या संपूर्ण विश्र्वातींल प्रत्येक जीवाला मृत्युच्या मार्गाने जावे लागते.

English meaning

Now if there is this `speech' `I am' then you can escape death. But if you remain with the thoughts of a before and after then, truly you are walking on the path of death (body consciousness brings the thoughts of a past and a future. But death does not come to this `now'/knowledge. It must first go off).

37
मूळ

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासी लक्ष जीवयोनी । जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे चार प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी. चौर्‍यांशी लक्ष जीवांचे प्रकार हे सर्व मृत्युमुखी पडतात.

English meaning

When there are the four forms of birth and the four forms of speech then, there is this attention that brings the *eighty-four principles of a jiva. Whenever that One takes birth in the prana then, that One will surely die. *(The eighty-four principles that make up a jiva; see 17.8 and 17.9)

38
मूळ

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा । मृत्यास न ये चुकवितां । कांही केल्या ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

मृत्युच्या भयाने, त्याला घाबरुन पळून गेले तरी मृत्यु कोणालाच सोडत नाही.

English meaning

If you run away being afraid of death still it is not possible to avoid it. Death does not even spare this created `all' (Knowledge/consciousness is also a created thing and it will go off and death will come. Thus only that uncreated One is beyond the clutches of death).

39
मूळ

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी । मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

हा स्वदेशी आहे. हा विदेशी आहे. हा नेहमी उपवास करणारा आहे. असे मृत्यु म्हणत नाही.

English meaning

Death does not say he is in his own country and death does not say he is in another country. Death does not say he is one who is always fasting.

40
मूळ

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर । मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४० ॥

मराठी अर्थ

मृत्यु म्हणत नाही कीं, हा थोर आहे. हा हरिहर आहे. का हा भगवंताचा अवतार आहे.

English meaning

Death does not say he is the greatest of the great. Death does not say he is *harihara. Death does not say he is an incarnation of God (death has no jurisdiction over that Reality, the greatest of the great; it takes only that which belongs to time). *(When vishnu and mahesh come together as one; ie. forgetting is remembering)

41
मूळ

श्रोतीं कोप न करावा । हा मृत्युलोक सकळां ठावा । उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्युपंथें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांनी रागावू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वांना माहित आहे. जन्मलेला प्राणी हा मृत्युच्या मार्गाने जाणार हे ठरलेलेच आहे.

English meaning

In the listener there should be no anger, otherwise this `all' will meet this world of death (ie. forget everything and listen to this `I am' of knowledge; if you give truth to these thoughts of this gross world then, desire and anger etc. will bring body consci- ousness once more). For when that thoughtless takes birth in the prana then, it walks on the path of death (you may be in your Self but, the very moment that emotions arise, again you meet with this world of death/waking state or rajo guna).

42
मूळ

येथें न मनावा किंत । हा मृत्युलोक विख्यात । प्रगट जाणती समस्त । लाहान थोर ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

याबद्दल संशय असू नये. हा लोक मृत्युलोक या नावानेच विख्यात आहे, हे सर्व लहान व मोठे जाणतात.

English meaning

`Here' in this `all' there should be no regard given to doubt (ie. forget everything, let no concept enter your natural Self and stay out of your small mind) and then that thoughtless Self can pervade this world of death; and when understanding is complete then the small jiva is that great brahman

43
मूळ

तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल । याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

परंतु कोणी संशय बाळगला तरी हा मृत्युलोक बदलणार नाही. त्या संशयामुळे जन्मलेला माणुस आपल्या जीवनाची नासाडी मात्र करुन घेईल.

English meaning

But if you continue to give regard to doubt then, this world of death can never be that thoughtless Self (if you stay in your small mind then you walk on the path of death). But by means of this `speech' there will not be the birth in the prana (when you are understanding `I am', then this prana on the inside and the wind on the outside are one and the same and you pervade everywhere. But as soon as this `I am' is forgotten, you take birth in the prana once more).

44
मूळ

ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें । जनी मरोन उरवावें । कीर्तिरुपें ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

हा मृत्युलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपल्या जीवनाचे सार्थक करुन घ्यावे. मृत्युने देह पडला तरी जनांत कीर्तिरुपाने उरावे.

English meaning

While there is this knowing by the jiva then, the meaning of life should be achieved (know thy Self; understand this knowing and you will be half way to your destination, ref. V. 32; siddharameshwar maharaj- you feel that you do not have this knowledge, but within you this knowledge is already there). Then there will be the death of the small mind of the jiva and you will remain as this form of pervasiveness (Only while there is this knowing ie. life, can we understand this life. The promises of acquiring understanding after death are foolish concepts that have appeared upon this knowing)

45
मूळ

येरवी प्राणी लाहान थोर । मृत्य पावती हा निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

एरवी माणुस लहान असो वा मोठा असो त्याला मृत्यु आहेच. याच्याशिवाय वेगळे बोललेले खोटेच मानावे.

English meaning

Otherwise that great brahman is this small jiva in the prana and then that thou- ghtless constant support will have to face death. Therefore, let there be this `speech' only and any reply that is different to this should not be respected (keep the mind quiet and be free of doubt and conjecture and reply only with this `I am'; and then this sagun will, of its own accord, go off and what will remain will be that thoughtless nirgun brahman)

46
मूळ

गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे । गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथे ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

मोठ्या वैभवाचे, मोठ्या आयुष्याचे, प्रभावी पुरुष शेवटी मृत्युपंथानेच गेले.

English meaning

The grandeur of this `all'/knowledge is gone; the lifetime of this `all' is gone; its greatness and importance are gone due to the path of death.

47
मूळ

गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी । गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

मोठ्या पराक्रमाचे, मोठीं कपटकर्मे करणारे पुरुष मृत्युनेच नेले. मोठे शूर योद्धे युद्धामध्येच मरण पावले.

English meaning

Gone is this `all' within your might and strength; gone is this `all' within your deceitful and fraudulent actions; gone is this `all' within your hostile attitudes and the boldness displayed in war (attitudes of mind steal away this understanding of the `all').

48
मूळ

गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे । गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

मोठ्या बळाचे, फार जगलेले, मोठ्या कुळांतील पुरुष, राजे मृत्युपंथानेच गेले.

English meaning

Gone is the convicton of this `all'; gone is the `time' of this `all'; gone is this dynasty of the `all'/prakruti that belonged to the King/purush.

49
मूळ

गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक । गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

पुष्कळांचे पोषक, मोठे बुद्धिवंत, मोठ्या युक्तीने तर्क करणारे, तर्कवादी याच मृत्युपंथाने गेले.

English meaning

Gone is the support of this `all'; gone is this activator of the intellect/buddhi; gone is the discerning of this `trick' (ie. forget everything) due to rational and logic.

50
मूळ

गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंगर । गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५० ॥

मराठी अर्थ

विद्येचा सागर असलेले, मोठे बलवान डोंगरासारखे, कुबेरासारखी संपत्ती असणारे या मृत्युपंथानेच गेले.

English meaning

Gone is this ocean of knowing; gone is this mountain of strength; gone is this wealth of kuber, due to the path of death.

51
मूळ

गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमाचे, मोठा व्याप सांभाळणारे सर्व याच मार्गे गेले.

English meaning

Gone is the great accomplishment of this `all'; gone is the heroism and valour of this `all'; gone is the constant activity of this `all'.

52
मूळ

गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे, सर्व याच मार्गे गेले.

English meaning

Gone is this `all', the upholder of the shasthras; gone is this `all', the bestower of good fortune; gone is this `all' the protector of dharma, within the ways of the `many' (due to the thoughts of the jiva).

53
मूळ

गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तिचे, मोठ्या नीतीचे नीतिवंत राजे या मृत्युपंथानेच गेले.

English meaning

Gone is the majesty and glory of this `all'; gone is the pervasiveness of this `all' and gone is the truthfulness of this `all', the leader of the righteous.

54
मूळ

गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत वेवादी । बहुतां परीचे ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे वाद घालणारे सर्व गेले.

English meaning

Gone is this `all', lost in the `many' opinions; gone is this `all' within the `many' achievements; gone is this `all' within the `many' conversations about this para `speech' of the `all' (ie. we may intellectually discuss the nature of this `speech'; but thoughts are thoughts and they are the only hindrance to understanding `I am').

55
मूळ

गेलीं पंडितांचीं थाटें । गेली शब्दांचीं कचाटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

पंडितांचे समुदाय गेले. शब्दांच्या खटपटी करणारे गेले. निरनिराळ्या मतांनुसार वाद घालणारे गेले.

English meaning

Gone is this `all' due to the pomp and show of the pandit; gone is this `all' due to the speculations about this `word'; gone is this `all' due to the strange arguments and the `many' opinions.

56
मूळ

गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

तापसी लोकांचे समूह गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंत मृत्युपंथानेच गेले.

English meaning

Gone is the importance of the ascetic; gone is the limitlessness of the sannyasi; gone is the maker of that thoughtless understanding, due to the path of death.

57
मूळ

गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करुनी ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ संसारी गेले. पुष्कळ वेषधारी गेले. नाना छंद असलेले लोक आपले छंद करुन मृत्युपंथाने गेले.

English meaning

Gone is this `all' within samsar; gone is this `all' within this disguise of the gross body; gone is this `all' within the ways of the `many' and the `many' longings and hankerings.

58
मूळ

गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य । गेले बहुत सांगो काये । किती म्हणौनि ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

ब्राह्मणांचे समुदाय गेले. पुष्कळ आचार्य गेले. असे बरेच गेले. किती म्हणून सांगावे.

English meaning

Gone is this meeting place of the brahmin (ie. where the elements, gunas, senses etc. come together as the `all'); gone is this `all', your teacher. And when this `all' is gone then, how can the `many' ever come to understand that thoughtless Reality?

59
मूळ

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले । जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

असे सारे गेले परंतु संत मात्र टिकले. याप्रमाणे सगळे गेले परंतु आत्मज्ञानी होऊन जे स्वरुपाशी एकरुप झाले. ते मात्र टिकले.

English meaning

Due to this path of death, even this *`all' goes away, but still that One rema- ins. For when this `all' of mula maya becomes that swarup then, there is the atma- gnyani/Knower of Self (knowledge and ignorance are the two sides of the same coin and both will be destroyed similtaneously. As long as ignorance remains then, even this `all'/knowledge cannot be maintained and sooner or later this `all' will fall back into body consciousness and then death is sure to come. Only when this `all' has been merged in that thoughtless Reality, like salt in the ocean, will death and birth be transcended). *(maharaj- knowledge must be forgotten otherwise death cannot come). .