मंत्रांचा — समास 10: सिद्धलक्षण

Fully populated

Siddha Lakshan (The Characteristics of the Accomplished One)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक । ऐका हो याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागील समासाच्या शेवटी श्रोत्यांने असा प्रश्र्ण केला कीं, संसाराचा त्याग केल्याशिवाय साधक होतां येणार नाही का? त्याचें उत्तर ऐका.

English meaning

Previous to this `speech' there is the world of samsar (samsar covers over this world of the `all'). Therefore without abandoning samsar one cannot become a sadhak. Listen, for such listening is vivek.

2
मूळ

सन्मार्ग तो जीवीं धरणें । अनमार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥

मराठी अर्थ

ज्याला साधक व्हावयाचे आहे, त्यानें मनापासून सन्मार्ग धरावा व अन्य मार्गांचा त्याग करावा. असा त्याग करणें संसारीकला शक्य आहे.

English meaning

When that atma within the jiva holds firmly to the true path and abandons the untrue path then, one can abandon the ways of samsar.

3
मूळ

कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । संसारिका त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय सुबुद्धी अंगी येणार नाही. प्रापंचिकाला अशा प्रकारे त्याग करता येतो.

English meaning

But without abandoning this impure conviction of being a body, this pure conviction of being the `all' cannot be established. The question was asked, "Can one become a sadhak without giving up samsar?" The answer is unless one leaves samsar, this `all' of knowledge cannot be understood (the one in samsar can only gain knowledge by abandoning one's concepts and thoughts; maharaj- two swords cannot fit into the one sheath).

4
मूळ

प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला । तरीच पुढें आवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥

मराठी अर्थ

प्रपंचाचा वीट आल्याने मनातून इंद्रियवासना भोगण्याची इच्छा काढून मगच साधक बनून परमार्थाची वाटचाल करणें शक्य होते.

English meaning

Only when you feel ashamed of being in this prapanch/worldly existence does the mind abandon these sense objects and then you can cherish the path of paramarth.

5
मूळ

त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५ ॥

मराठी अर्थ

प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा, संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे हळूहळू अज्ञानाचा त्याग करता येतो.

English meaning

Then very naturally there will be the giving up of faithlessness and the giving up of doubt and the giving up of ignorance.

6
मूळ

ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयांस घडे सांग । निस्पृहास बाह्यत्याग । विशेष आहे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

सांसारीक असो वा नसो दोघांना सूक्ष्म व आंतरीक त्याग करावा लागतो. जो प्रपंचापासून निस्पृह असतो तो बाह्य व्यवहाराचा त्याग करतो. हे विशेष आहे.

English meaning

When you internally abandon faithlessness, doubt and ignorance then, both prapanch and paramarth are perfectly performed.18 Then that desireless sadhak abandons this pure sattwa guna and the external is given up (when you are a sadhak then your external is this `all' and when it is abandoned because it is also not true then duality does not remain).

7
मूळ

संसारिकां ठाईं ठाईं । बाह्यत्याग घडे कांहीं । नित्यनेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७ ॥

मराठी अर्थ

संसारीकालही संसारांत थोडासा बाह्य त्याग घडतो. कारण तो घडल्याशिवाय नित्यनेमानें परमार्थश्रवण घडणार नाही.

English meaning

And for the one in samsar, if they at everyplace abandon the external (ie. his external is the sense objects) then, there is this `all'. For without such giving up, there cannot be this constant shravan. (So, the samsari abandons the sense objects and gains the `all' and the desireless sadhak abandons the `all' and gains His thoughtless swarup)

8
मूळ

फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे । पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८ ॥

मराठी अर्थ

असो. याप्रमाणें श्रोत्याला त्याच्या प्रश्र्णाचे उत्तर दिले की ज्यानें शंका सहज फिटली. आतां पुढील विषय लक्षपूर्वक ऐका.

English meaning

Then naturally this original doubt `I am' will be removed afterwards. But under- stand that without giving up the thoughts of the sense objects, there can be no sadhak. Therefore listen carefully to this `story' ahead (forget everything is giving up the thou- ghts).

9
मूळ

मागां जालें निरुपण । साधकाची वोळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९ ॥

मराठी अर्थ

मागील समासांत साधक कसा ओळखावा ते सांगितले. आतां सिद्धास कसें ओळखावे त्याची खूण सांगतो.

English meaning

Previously there had been this sagun discourse and there was the recognition of the sadhak. Now, that nirgun understanding will be told for that is the attention of the siddha.

10
मूळ

साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला । निश्र्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ॥ १० ॥

मराठी अर्थ

सिद्धपुरुष स्वतः ब्रह्मरुप होतो. त्याचा सर्व संशय ब्रह्माडाबाहेर जातो. " अहं ब्रह्मास्मी " हा त्याचा निश्र्चय ढळत नाही. त्याला सिद्ध असें म्हणतात.

English meaning

18See 12.1.1; Only when your prapanch is properly performed at the source (`I am'), can one accept the vivek of paramarth. My dear viveki, `here' do not become lazy and fall into body consciousness. 10. The sadhu establishes that Supreme Self and this `I am' disappears along with the whole created universe/brahmanda; when such conviction does not move then, this `all' has become a siddha.

11
मूळ

बद्धपणाचे अवगुणा । मुमुक्षपणीं नाहीं जाण । मुमुक्षपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥

मराठी अर्थ

बद्धावस्थेंत जे दोष असतात, ते मुमुक्षु अवस्थेंत उरत नाहीत. मुमुक्षु अवस्थेंत असणार्‍या कमतरता, लक्षणें साधक अवस्थेंत दिसत नाहीत.

English meaning

The objectification of the baddha is not known in the mumukshu. And the attention of the mumukshu is not in the attention of the sadhak.

12
मूळ

साधकासि संदेहवृत्ती । पुढें होतसे निवृत्ती । याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

साधकाच्या ठिकाणी असलेली संशय वृत्ती कलाांतराने साधनेच्या येोगे निघून जाते. म्हणूज जो निःसंदेह असतो तो सिद्ध होय असे जाणावे.

English meaning

The sadhak may still harbour the thought that a body is there (ie. this `I am' or `all' body), but later becomes thoughtless. On account of this `I am' within the good listener, the doubtlessness (I do not exist) of the sadhu is recognised.

13
मूळ

संशयरहित ज्ञान । तें चि साधूचें लक्षण । सिद्धाआंगीं संशय हीन । लागेल कैसा ॥ १३ ॥

मराठी अर्थ

अत्यंत संशयरहित ज्ञान हें सिद्धपणा अंगी आल्याचे लक्षण आहे. सिद्धाच्या अंगी संशयासारख हीन अवगुण असतच नाही.

English meaning

Then this *attention of that sadhu has become that pure knowledge, free of this doubt `I am'. For how is it possible that this doubt can remain in the body of the siddha? (The siddha uses this knowledge but understands that it no different from Myself ie. no-otherness) *(This knowledge is the original doubt; but His attention is `attentionless', His body is `beyond the body'/videhi)

14
मूळ

कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशये कालवला । सर्वांमधें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥

मराठी अर्थ

कर्ममार्ग समशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्यें संशय कालवलेला आहे. मानवी जीवनां सर्वत्र संशय भरुन राहीलेला आहे. एकटा सिद्धपरुषच संशयविरहित असतो.

English meaning

The path of action/karma is rampant with doubt, for where there is sadhana there has to be doubt. Even in this `all' this doubt overflows but that sadhu is doubtless. (In this `all' there is the subtle doubt, `Am I or am I not?' But you can never not be)

15
मूळ

संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५ ॥

मराठी अर्थ

संशयानें भरलेले ज्ञान खोटे असते. संशयासहित वैराग्य पोरटे दिनवाणें असते. तसेच भजन हे संशयानें भरलेले असेल तर तें वाईट व निर्फळ असते.

English meaning

Knowledge/gnyan with doubt is false, vairagya/ renunciation with doubt is baseless and bhajan with doubt is troublesome and futile.

16
मूळ

वेर्थ संशयाचा देव । वेर्थ संशयाचा भाव । वेर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांहीं ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्या देवाबद्दल संशय येतो, तो देव व्यर्थ असतो. संशयाने भरलेला भाव व्यर्थच. संशयानें भरलेलाा स्वभाव व्यर्थच असतो. संशयानें भरलेलें सर्व कांहीं व्यर्थ जाते.

English meaning

If one doubts that there is a God then, all this is useless. If one's faith has doubt then all this is useless. If one has doubt in one's own true nature then there is this empty `all'.

17
मूळ

वेर्थ संशयाचा व्रत । वेर्थ संशयाचें तीर्थ । वेर्थ संशयाचा परमार्थ । निश्र्चयेंविण ॥ १७ ॥

मराठी अर्थ

सांशयसहित व्रत व्यर्थ जाते. ज्या तीर्थाबद्दल संशय तें तीर्थ व्यर्थ असते. तसेच परमार्थांत निश्र्चितपणा नसेल व संशय असेल तर सर्व परमार्थ व्यर्थच जातो.

English meaning

Any vow or religious practice is fruitless if there is doubt and useless is a pilgrimage if there is a doubt. In the same way, useless is paramarth when doubt remains, for there is no conviction.

18
मूळ

वेर्थ संशयाची भक्ती । वेर्थ संशयाची प्रीती । वेर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८ ॥

मराठी अर्थ

संशयासहित केलेली भक्ती, प्रीति किंवा संगती व्यर्थ जाते. त्यामध्यें संशय कमी न होतां वाढतच जातो.

English meaning

Devotion with doubt is useless; love with doubt is useless and the companionship of doubt makes the doubt increase.

19
मूळ

वेर्थ संशयाचें जिणें । वेर्थ संशयाचें धरणें । वेर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९ ॥

मराठी अर्थ

संशयानें भरलेलें जीवन व्यर्थ जाते. संशय मनांत बाळगुन केलेले सर्व व्यर्थच जाते.

English meaning

To live with doubt is useless, to embark upon and hold on to knowledge with doubt is useless and the action of this `all' with doubt is useless.

20
मूळ

वेर्थ संशयाची पोथी । वेर्थ संशयाची वित्पत्ती । वेर्थ संशयाची गती । निश्र्चयेंविण ॥ २० ॥

मराठी अर्थ

संशयानें भरलेला ग्रंथ, विद्या दोन्ही व्यर्थ असतात. संशयानें व निश्र्चयाच्या अभावाने चांगली गति पण मिळत नाही.

English meaning

Useless is a religious book if there is doubt; useless is one's understanding of a treatise if there is doubt and useless is any progress achieved with doubt, for there has been no conviction.

21
मूळ

वेर्थ संशयाचा दक्ष । वेर्थ संशयाचा पक्ष । वेर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

संशयानें भरलेली तत्परता व्यर्थ असते. संशयानें धरलेला एखादा पक्ष व्यर्थ जातो. संशय असेल तर मोक्षसुद्धा व्यर्थ होतो.

English meaning

Doubt about your capability is useless. Doubt about your opinion also is useless. Doubt about liberation is useless, for it will never come.

22
मूळ

वेर्थ संशयाचा संत । वेर्थ संशयाचा पंडित । वेर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्र्चयेंविण ॥ २२ ॥

मराठी अर्थ

संशयानें भरलेले संत, पंडित, किंवा विद्यावंत देखिल निश्र्चय नसल्यानें व्यर्थ जातात.

English meaning

It is useless if one doubts the Saint, just as it is useless if one doubts the scholar. It is even useless if one has doubt in samsar, for then there is no conviction.

23
मूळ

वेर्थ संशयाची श्रेष्ठता । वेर्थ संशयाची वित्पन्नता । वेर्थ संशयाचा ज्ञाता । निश्र्चयेंविण ॥ २३ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, विद्वता व ज्ञान निश्र्चितपणा नसल्यानें व्यर्थ जातात.

English meaning

Useless is greatness with doubt; useless is the one who eloquently explains the scriptures if there is doubt; useless is the gnyani if there is doubt, for there is no conviction.

24
मूळ

निश्र्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं । वेर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४ ॥

मराठी अर्थ

कोणतीही गोष्ट संशयानें व निश्र्चितपणाच्या अभावाने खोटीच ठरते. खरी म्हणुन मान्य होत नाही. संशयाच्या प्रवाहांत पडलेले सर्व व्यर्थच जाते.

English meaning

Without the conviction of this `all', not even the smallest part of that Reality can ever be established. Then one tumbles down and is swept away by the doubt of having a body.

25
मूळ

निश्र्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचाळपें । निरार्थक ॥ २५ ॥

मराठी अर्थ

वक्त्याचे निश्र्चय नसतांना बोललेले सर्व कंटाळवाणेच होते. वाचाळपणें तो कांही अर्थहीन बडबड करतो. असेच समजावे.

English meaning

When this `speech' has no conviction then, that Reality becomes the tiresome and lazy mind. Therefore this frivolous and licentious mind should make this `speech' otherwise, there is only worthless prattle.

26
मूळ

असो निश्र्चयेविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना । संशयें कांहीं समाधान । उरी नाहीं ॥ २६ ॥

मराठी अर्थ

असो. निश्र्चयानें संपन्न ज्ञान नसतांना जो ज्ञानच्या मोठ्या बाता मारतो तो ज्ञानाचे विडंबन करतो. कारण संशयी मनामध्यें समाधान राहु शकत नाही.

English meaning

So be it! Without conviction, this `I am' becomes the mind and boasts; without conviction, that Reality that is within everything gets humiliated. Due to doubt this `all' and that samadhan do not remain.

27
मूळ

म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्र्चयााचें समाधान । तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्र्चयेंसीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

म्हणून अजीबात संशय नाही असें ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हें सिद्धाचें निश्र्चित खरे लक्षण समजावे.

English meaning

Therefore only that knowledge that is free of any body consciousness is conviction and this brings complete contentment/samadhan. This only is the true sign of the siddha.

28
मूळ

तव श्रोता करी प्रश्र्न । निश्र्चय करावा कवण । मुख्य निश्र्चयाचें लक्षण । मज निरोपावें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

मग श्रोत्यानें विचारलें कीं, निश्र्चय कोणता करावा? निश्र्चयाचें मुख्य लक्षण मला सांगावें.

English meaning

At this time of listening, the listener to this `I am' asks a question (ie. he has doubt; conviction is to remain always in this doubtless understanding; for if the listener asks a question then his conviction is spoiled). He says, "Discourse to `me' the sign of Supreme conviction!"

29
मूळ

ऐक निश्र्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवाचा वळसा । करुंचि नये ॥ २९ ॥

मराठी अर्थ

त्यावर श्रीसद्गुरु म्हणाले कीं, मुख्य देव कसा आहे हें निश्र्चितपणें ओळखणे यांचे नांव निश्र्चय होय. अनेक देवांच्या घोटाळ्यांत आपण पडूं नये.

English meaning

First listen and have the conviction of this `all' and then understand who that Supreme God is. One should not move around with the clamour of the `many' gods (God is not something that can be imagined, someone with long white beard or four arms etc.).

30
मूळ

जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें परमेश्र्वर । वोळखावा ॥ ३० ॥

मराठी अर्थ

ज्यानें हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्याविषयीं विचार करावा. अत्यंत शुद्ध, निःसंदेह व निःस्वार्थी विवेकाने परमेश्र्वराचें ज्ञान करुन घ्यावे.

English meaning

By listening the whole animate and inanimate creation is created (ie. this `all' is created). Then there should be that thoughtless understanding of the purush. By such vivek, parameshwara (Supreme God) should be recognized.

31
मूळ

मुख्य देव तो कवण । भक्ताचें कैसें लक्षण । असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

मुख्य देव कोण? भक्ताचे लक्षण काय? हे प्रश्र्ण मिथ्या दृश्य बाजूस सारुन सत्यस्वरुप परमात्म्याचें ज्ञान करुन घ्यावे.

English meaning

"That Supreme God is who and what is the sign of devotion?" (Still he doesn't listen and raises the questions)When the untrue is left and the true is firmly held then, that is devotion and that Supreme God will be recognized

32
मूळ

आपल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पाहावें । संग त्यागून राहावें । वस्तुरुप ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

आधी आपल्या देवास ओळखावें, मगच " मी कोण आहे? " याचे ज्ञान करुन घ्यावे. मग सर्व दृश्यांतून बाहेर पडून ब्रह्मस्वरुप होऊन राहावें'.

English meaning

First your God should be recognized and then when you should understand this *`I', that thoughtless swarup will be attained. Having given up this attachment to form, that formless Self should remain. *(This `I am' is the original inspiration and the original doubt. This is felt to be God but then you remain and this `I am' is your God)

33
मूळ

तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्र्चयो । पाहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून मोक्ष निळविण्याचा निश्र्चय करावा. जें जे आपल्या अनुभवांत येते तें तें आत्मीय भावनेने पहावे. व तें तें मिथ्या आहे या भावनेने पहावे.

English meaning

Cut out and throw away the doubt of confinement and have the firm conviction that you are liberated. One should understand this coming together of the great elements to form creation and then dissolve them through negation (ie. vivek).

34
मूळ

पूर्वपक्षेसिं सिद्धान्त । पाहावा प्रकृतीचा अंत । मग पावावा निवांत । निश्र्चय देवाचा ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

" मी देह आहे " हा पूर्व पक्ष व " मी आत्मा आहे " हा सिद्धान्त. पूर्वपक्ष खोटा ठरवून मग आत्मज्ञानामार्फत सिद्धांतापर्यंत दृश्य प्रकृतींत विलीन झालेले पाहवे. मग प्रकृती स्वरुपांत विलीन देवाचे शुद्ध स्वरुप निश्र्चितपणें कळते.

English meaning

You should understood that Final Truth (siddhant: non-duality) at the end of this prakruti, by first understanding this original hypothesis (this `I am' is my God; prakruti). Then you should have the conviction of that still and doubtless God.

35
मूळ

देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो । चळो नेदावा निश्र्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीच्या ज्ञानाने संशय निर्माण होतो मगसमाधानाचाही लोप होतो. यासाठीं आपल्या स्वस्वरुपाचा निश्र्चय मुळींच ढळूं देऊ नये.

English meaning

Union with this `I am' body brings doubt (ie. something is there) and therefore samadhan is destroyed. Therefore you should not deviate from the conviction of being that atma.

36
मूळ

सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान । आत्मनिश्र्चयें राखावें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

आपल्या अंतर्यामी आत्मज्ञान हें स्वतः सिद्ध आहे. पण देहाभिमान संशय निर्माण करतो. म्हणुन आत्मनिश्र्चय करुन समाधान राखावें.

English meaning

The siddha is the doubtless knowledge of the Self/atma gnyan and doubt brings pride of a body. Therefore by means of this `speech' you should protect the conviction of being the atma and gain its contentment/samadhan.

37
मूळ

आठवंता देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी । याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीची आठवण झाली की विवेक संपतो. म्हणून मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी सदृढ राखावी.

English meaning

When you remember body consciousness then, the power of vivek is surely destroyed. Therefore by means of this `speech', that atma conviction should be established.

38
मूळ

आत्मबुद्धि निश्र्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची । अहमात्मा हें कधींचि । विसरों नये ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

आत्मबुद्धीचा निश्र्चय दृढ असणें. मी आत्मा आहे हे निःसंशयानें अनुभवास येणे. हेंच मोक्षरुपी लक्ष्मीचे वैभव आहे. म्हणून मी आत्मा आहे ही जाणीव कधींहीं विसरु नये.

English meaning

When there is the conviction, `I am the atma' then, that Reality has become a state of liberation (ie. the liberation from the gross body conviction). But nevertheless that thoughtless Self should never forget this `I am atma' (though this is an attention by that attentionless Self, still it should never be given up).

39
मूळ

निरोपिलें निश्र्चयाचें लक्षण । परी हें न कळे संतसंगेंविण । संतांसि गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

निश्र्चय कोणता करावा हें सांगिंतलें पण सत्संगतीवाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानांत येत नाही. संतांना शरण गेल्यावर संशय आपोआप दूर होतात.

English meaning

To stay in this `I am' is the sign of conviction but still that thoughtless swarup cannot be understood without the company of the Truth/Saint (ie. understand the thoughtless by being the thoughtless). This doubt of `I am' gets broken when you go to the Truth/Saint for protection.

40
मूळ

आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धांची लक्षणें । मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

आतां हें बोलणें पुरें. सिद्धपुरुषाची लक्षणें थोडक्यांत ऐका. जो संपूर्ण निःसंशय झाला तो सिद्ध बनला.

English meaning

Now that thoughtless swarup is this `speech', so therefore listen to this `speech' for it is the attention of the siddha. And when this gets `spoken' with doubtlessness (lit. without any body) then there is that Supreme God and that is the siddha

41
मूळ

सिद्धस्वरुपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

सिद्धावस्थेंत देहाची आठवण उरत नाही. म्हणून तेथें संशयाला जागा रहात नाही. यामुळें सिद्धपुरुष सतत निःसंदेह असतो.

English meaning

Within the swarup of the siddha there is no body, therefore how can that thoughtless `there' have any doubt? By means of this knowing of `I am', understand the siddha and be that doubtless One.

42
मूळ

देवसमंधाचेनि गुणे । लक्षणासि काये उणें । देहातीताची लक्षणें । काये म्हणोनि सांगावी ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

जेथें देहाचा व दृश्याचा संबंध असतो, तेथें हवीतेवढी लक्षणें सांगता येतात. पण देहाच्या पलीकडे गेलेल्याची लक्षणें सांगता येत नाहीत. त्याचे वर्णन करता येत नाही.

English meaning

Attachment to the body brings the gunas and these bring objectification and by placing your attention on these objects, you become so small. Therefore place your attention on this `all' and then, be that attentionless swarup of the one `beyond the body'.

43
मूळ

जें लक्षवेना चक्षूसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं । निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैसीं ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

जे डोळ्यांनीं पाहतां येत नाहीं, त्याची लक्षणें सांगता येत नाहीत. सिद्ध हा शुद्ध ब्रह्मस्वरुप झालेला असल्यानें त्याची लक्षणें वर्णिता येत नाहीत.

English meaning

If the eyes cannot focus on mula maya then, how can they focus on that purush (hi- dden within mula maya)? When there is that pure Self and siddha then, what attention can there be?

44
मूळ

लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठाईची निर्गुण । तेचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरुप ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

त्रिगुणांना लक्षणें असतात. पण ब्रह्मस्वरुप झालेली वस्तु तर निर्गुण मग लक्षणें कशी? गुणरहित असणें हेच सिद्धपुरुषाचे लक्षण होय.

English meaning

Due to this attention of the pure sattwa guna there is that pure knowledge (ie. knowledge becomes no-knowledge). That is the Supreme Self beyond the gunas (ie. gunas become nirgun). Then this attention is that attentionless siddha, the Self with Its own form (ie. then knowledge is absorbed within that Self and though knowledge is used to stay in the world, still no separation is created in the One).

45
मूळ

तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणौनि वगतृत्व आटोपिलें । न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

परंतु हा विषय पुढें ज्ञानदशकांत सांगितला आहे. म्हणून हें वर्णन आतां पुरें. ह्यांत जें कमी असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी.

English meaning

Within the knowledge of the ten sense organs there is this `speech' and therefore, all other talk should dry up. And then the perfect and imperfect within the listener should be forgiven (duality should be abandoned; no questions should arise and then, of its own accord, this knowledge will go off and that is Reality). .