मंत्रांचा — समास 9: साधकलक्षणनिरुपण

Fully populated

Sadhak Lakshan Nirupan (A Discourse on the Characteristics of the Practitioner)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागील समासांत मुमुक्षुची लक्षणें सांगितली. आतां साधकाची लक्षणें सावधपणें ऐका.

English meaning

Previously there had been the attention of the mumukshu. The worldly thoughts where left aside and this `story' of God had been created (this `I am' was understood). Now listen carefully, to how that sadhak/seeker is.

2
मूळ

अवगुणाचा करुनि त्याग । जेणें धरिला संतसंग । तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥

मराठी अर्थ

अवगुणांचा त्याग करुन ज्याने संतांचा संग धरिला त्याला मग साधक असें म्हटले आहे.

English meaning

When there is the abandonment of objectification and when one keeps the company of the Truth/satsang then, there is this `speech' and that is the sadhak/seeker.

3
मूळ

जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्र्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

जो संतांना शरण गेला. संतांवर ज्यानें विश्र्वास ठेवला त्याला ग्रंथांमध्यें साधक म्हटले आहे.

English meaning

When one takes refuge in the Saint and gets the reassurance that only the Saint can give then, there is this `speech' of the sadhak that is within the many compositions of words.

4
मूळ

उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें करी साधन । या नाव साधक ॥ ४ ॥

मराठी अर्थ

संतांनी ज्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो श्रवण केल्यावर आपल्याला संसाराचे बंधन नाहीं हें ज्याला पटलें. तो दृढतेने साधन करुं लागतो त्याला साधक म्हणतात.

English meaning

Due to the teaching of knowledge and atma gnyan/Self-knowledge the bindings of samsar are cut. When this sadhana is established (ie. knowledge; everything is forgot- ten, each and every moment), then there is this `speech' of the sadhak.

5
मूळ

धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरुपणाची गोडी । मननें अर्थांतर काढी । या नाव साधक ॥ ५ ॥

मराठी अर्थ

ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते. अद्वैत निरुपणाची ज्याला गोडी असते. जो गूढ व खरा अर्थ मननाने बरोबर समजतो. तो साधक समजावा.

English meaning

The sadhak is fond of shravan and that non-dual discourse; the sadhak uncovers the essence of the meaning by the practice of manana (ie. constantly remaining in shravan as knowledge).

6
मूळ

होता सारासारविचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तर । आत्मज्ञान पाहे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

कोणी आत्मानात्मविवेक मांडीत असेल तर ते विवेचन मनापासून ऐकतो. संशय नाहींसा करुन जो आत्मज्ञान पाहातो त्याला साधक म्हणतात.

English meaning

When the mind becomes completely absorbed in this `I am' (manana) then, there can be that thoughtless essence. For when body consciousness is removed by the firm reply of `I am He' then, Self-knowledge can be understood.

7
मूळ

नाना संदेहनिवृत्ती । व्हावया धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसि आणी ॥ ७ ॥

मराठी अर्थ

नाना प्रकारचे संशय नाहींसे व्हावेत म्हणून जो सत्संगती धरतो. शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति या तीन्हींत ऐक्य अनुभवतो.

English meaning

When the `many' doubts caused by body consciousness end and one holds fast to the company of the Saint/Truth then, one's own experience confirms the teaching of the scriptures and the guru.

8
मूळ

देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी । श्रवण मनन केलेंचि करी । या नाव साधक ॥ ८ ॥

मराठी अर्थ

मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकने बाजूस सारतो, मी आत्माच आहे ही सत्य भावना दृढपणें धरण्याचा अभ्यास करतो, निरंतर श्रवण मनन करतो, तो साधक असतो.

English meaning

When by vivek one discards the conviction of being a body and holds firmly to the conviction of being the atma; when one makes shravan and manana then, there is this `speech' of the sadhak.

9
मूळ

विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखें समाधान । या नाव साधक ॥ ९ ॥

मराठी अर्थ

दृश्याचे दिसणें नाहींसे करुन जो आत्मज्ञान घट्ट धरतो, आणि मी आत्मस्वरुप आहे, या विचारांत आपलें समाधान राखतो, तो साधक असतो.

English meaning

The sadhak then forgets the visible and holds fast to Self-knowledge and with thou- ghtlessness protects the perfect contentment of non-duality.

10
मूळ

तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी । लावी ऐक्यतेची समाधी । या नाव साधक ॥ १० ॥

मराठी अर्थ

आपल्यामागें लागलेलें वेगळेपणाची उपाधी जो तोडून अभेदानें विलसणरे स्वस्वरुप जो साधनद्वारे साध्य करुन घेतो, आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्यानें समाधींत जातो तो साधक असतो.

English meaning

The sadhak cuts away the limiting concept of duality and by sadhana achieves that non-dual Self; the sadhak is the one who attains the samadhi of total unity.

11
मूळ

आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नाव साधक ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञान फार जुनें झालें. स्वतः आत्मसाक्षात्कार करुन घेऊन जो ते पुनरुज्जीवीत करतो. आत्मसाक्षात्काराने जो प्रपंचांतुन पार पडतो. तो साधक असतो.

English meaning

Self-knowledge had become the old and worn-out knowledge but the sadhak renews this by vivek and crosses over this worldly life.

12
मूळ

उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरुपणें । बळेंचि स्वरुपाकार होणें । या नाव साधक ॥ १२ ॥

मराठी अर्थ

अध्यात्म निरुपणांत श्रवण केलेली सांधूंची उत्तम लक्षणें जो अंगी आणण्याचे जो यत्न करतो. अभ्यासाच्या जोरावर जोआपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो, तो साधक असतो.

English meaning

On account of this pure sattwa guna there is this attention of the sadhu and an acceptor of that non-dual discourse. When by sheer determination one dwells in the swarup' then, that one is a sadhak.

13
मूळ

असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली । स्वरुपस्थिती बळावली । या नाव साधक ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जो वाईट कृत्यें सोडून देतो. चांगली कृत्यें वाढवितो, ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची पात्रता वाढत जाते, तो साधक असतो.

English meaning

When that Reality drops the untrue action and makes to spread this true action; when that swarup state is established then, that is a sadhak.

14
मूळ

अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास । स्वरुपीं लावी निजध्यास २ या नाव साधक ॥ १४ ॥

मराठी अर्थ

आपलें अवगुणांचा दिवसेंदिवस त्याग करतो, उत्तम गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास करतो, आत्मस्वरुपाचे चिंतन करतो, तो साधक असतो.

English meaning

When the wrong gunas of objectification have been abandoned in this time of the `all' and that pure sattwa guna is understood; when one remains as this knowing and then there is the natural absorption/nijadhyas in that swarup then, that is a sadhak.

15
मूळ

दृढ निश्र्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे । सदा स्वरुपीं मिसळे । या नाव साधक ॥ १५ ॥

मराठी अर्थ

आत्मस्वरुपच सत्य आहे, सगळें दृश्य मिथ्या आहे, असा निश्र्चय करुन स्वस्वरुपांत मिसळलेला राहतो, तो साधक असतो.

English meaning

Due to the constant conviction that `nothing is true', the visible remains but it is not touched. Then it is merged within that Eternal swarup and that is a sadhak.

16
मूळ

प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नाव साधक ॥ १६ ॥

मराठी अर्थ

माया प्रत्यक्ष दिसत असूनही मनांतुन काढुन टाकतो, दिसत नसलेली आत्मवस्तु अंतरांत स्थिर व धारण करतो, तो साधक असतो.

English meaning

When this perceptible world of maya becomes imperceptible then, that impercep- tible Self is apperceived within; when this atma state is firmly established then, that is a sadhak.

17
मूळ

जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नाव साधक ॥ १७ ॥

मराठी अर्थ

आत्मस्वरुप लोकांपासून लपविलेले आहे. आपल्या मनाला त्याची कल्पना करतां येत नाही. तें स्वरुप जोअभ्यासानें मनांत दृढ करतो. तो साधक असतो.

English meaning

This knowing of mula maya cannot be reached by conjecture and so it appears hidden to the minds of the people. But when one holds firmly to mula maya then, that is a sadhak.

18
मूळ

जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहतांचि अंध करी । तें साधी नाना परी । या नाव साधक ॥ १८ ॥

मराठी अर्थ

आत्मस्वरुपाचें करतांना वाचा कुंठीत होते. जें डोळ्यांनी पाहूं गेल्यास दृष्टी लटकी पडते, तें स्वरुप नाना प्रयत्न व अभ्यास करुन जो आपलेसें करुन घेतो, तो साधक असतो.

English meaning

When you speak this divine `word' and understand this `all' that the eyes cannot see; when the `many' forms are made complete then, you are a sadhak.

19
मूळ

जें साधूं जातां साधवेना । जें लक्षू जातं लक्षवेना । तेंचि अनुभवे आणी मना । या नाव साधक ॥ १९ ॥

मराठी अर्थ

ज्याचा अनुभव घ्यावा म्हटला तर तो घेता येत नाही, पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहता येत नाही, तें स्वस्वरुप जो अभ्यासानें अंतरांत दृढ करतो, तो साधक असतो.

English meaning

When this mula maya tries to achieve That then, That cannot be achieved; if this mula maya tries to concentrate on That, still That cannot be concentrated on. But when That is understood by means of this mind and the `I am' experience then, that is a sadhak.

20
मूळ

जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे । तेंचि अनुभवा आणी बळें । या नाव साधक ॥ २० ॥

मराठी अर्थ

ज्या स्वस्वरुपाशीं मन मावळतें, तर्क पांगळें पडतात, त्या आत्मस्वरुपाचा जोअभ्यासनें अनुभव घेतो, तो साधक असतो.

English meaning

If the mind `here' is dissolved and the logic `here' becomes lame; then that Reality that had appeared as this `I am' experience and conviction will be that Reality once more and that is a sadhak.

21
मूळ

स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें । तेंचि वस्तु होये आंगें । या नाव साधक ॥ २१ ॥

मराठी अर्थ

स्वस्वरुपाचा जो अनुभव घेतो, त्यामुळें आत्मवस्तु त्याला त्वरीत प्राप्त होते, तसेच तो स्वतः आत्मस्वरुप होऊन जातो, तो साधक असतो.

English meaning

The Self is quickly achieved when the mind is merged in Self-knowledge. Then this `all' body becomes that Supreme Self and that is a sadhak/ seeker.

22
मूळ

अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नहोन असणें । या नाव साधक ॥ २२ ॥

मराठी अर्थ

स्वस्वरुपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो. योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बाणतात, काहींच नसून असणे असा जो राहतो, तो साधक असतो.

English meaning

That pure knowledge of the yogi is deeply imbibed through the knowing of this `all'. When you remain without even this arising of the `thing'/`all', then you are a sadhak.

23
मूळ

परती सारुन उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी । स्वरुपीं करी दृढ बुद्धी । या नाव साधक ॥ २३ ॥

मराठी अर्थ

दृश्याची सर्व बंधनें जो बाजुस टाकतो, व असाध्य वस्तु साधना करुन व अभ्यासानें जो साधतो, आणि आपली बुद्धी स्वस्वरुपांत स्थिर करतो, तो साधक असतो.

English meaning

When you set aside the limiting concepts and by sadhana achieve that unattainable Self; when you place your mind firmly in that swarup then, you are a sadhak.

24
मूळ

देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ । साध्यचि होये तत्काळ । या नाव साधक ॥ २४ ॥

मराठी अर्थ

देव कोण व भक्त कोण याचें मूळ जो शोधून पाहातो, आनि साध्य जें आत्मस्वरुप त्याच्याशी जो त्वरित एकरुप होऊन जातो, तो साधक असतो.

English meaning

If the root of God and the devotee is searched out and this `all' is understood and when even this `all' does not remain then, you are a sadhak.

25
मूळ

विवेकबळें गुप्त जाला । आपोंआप मावळला । दिसतो परी देखिला । नाहींच कोंणी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

विवेकाच्या सामर्थ्यानें जो मीपणाने गुप्त होतो. ज्याचा अभिमान आपोआप निघून जातो. तो देहानें जरी लोकांना दिसत असला तरी त्याचे खरे स्वरुप कोणी जाणतच नाही.

English meaning

If by determined vivek that hidden purush is understood and you naturally merge in That, then that purush sees but no-one sees Him.

26
मूळ

मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें । तुर्येसहि वोलांडिलें । या नाव साधक ॥ २६ ॥

मराठी अर्थ

ज्यानें मीपणा मागें टाकला, आपला खरा मी शोधून काढला, तुर्यावस्थेलाही जी द्वैतच सांगते तीलाही मागें टाकले, तो साधक असतो.

English meaning

When `I'-ness is let slip then, there can be the search for your natural Self and when even this turya state of witnessing is stepped over, then you are a sadhak.

27
मूळ

पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी । अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नाव साधक ॥ २७ ॥

मराठी अर्थ

तेथें उन्मनी अवस्था असते. शेवटीं आपल्या " मी "ची आपल्यला कधीं भंग न पडणारी अखंड भेट घडते. त्या स्वरुप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते, तो साधक असतो.

English meaning

When from beginning to end there is no-mind then that unbroken brahman meets Its own Self; then there is the experience of that unbroken purush within this visible `all' and that is a sadhak.

28
मूळ

द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला । देहीं असोनि विदेह जाला । या नाव साधक ॥ २८ ॥

मराठी अर्थ

जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो, दृशाचा भास जो नाहींसा करतो, आणि जो देहांत असूनही विदेही बनतो, तो साधक असतो.

English meaning

When the connection of duality is cut and the appearance of the perceptible is broken; when being in the body one is without a body/vi-deha then, that is a sadhak.

29
मूळ

जयास अखंड स्वरुपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेहनिवृत्ती । या नाव साधक ॥ २९ ॥

मराठी अर्थ

जो अखंड स्वरुपाकार असतो, ज्याला देहाभिमान नसतो, ज्याचे सारे संशय फिटलेले असतात, त्याला साधक म्हणतात.

English meaning

When to this `I am' there comes that unbroken swarup and there is not the ego of doing; when this body of the `all' is put to an end, then there is a sadhak.

30
मूळ

पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार । या नाव साधक ॥ ३० ॥

मराठी अर्थ

पंचभूतांनीं गुंफलेला हा पसारा, ज्याला एखाद्या स्वप्नासारखा खोटा वाटतो, निर्गुण तेंच खरें असा ज्याचा निर्धार असतो, तो साधक असतो.

English meaning

When this expansion of the five great elements is like a dream and this sagun rests in nirgun then, there is a sadhak.

31
मूळ

स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें । सकळ मिथ्या निर्धारिलें । या नाव साधक ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

स्वप्न भयानक पडले, भीति वाटली. पण जाग आल्यावर भीति कसली? सगळेंच खोटे. तसेच दृश्य विश्र्व हे खोटे आहे. हे जो ओळखतो. तो साधक होय.

English meaning

But if this `I am' of mula maya feels fear in this dream (of the world, "I am somebody"), then one has not awakened to that Reality. And it is only when there is the conviction of the falsity of this `all' that you are a sadhak.

32
मूळ

मायेचें जे प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

मायेनें निर्माण केलेले दृश्य विश्र्व प्रत्यक्ष दिसते. म्हणून सामान्य माणसे ते प्रमाण मानतात. परंतु स्वस्वरुपाचे ज्ञान झाल्यावर साधक जगाचें खरेपण अज्ञान मानतो.

English meaning

When this `I am' of mula maya becomes these sensory experiences then, it is that thoughtless nirgun appearing in the mind. But by the Self-experience of the sadhak these feelings are all proved to be false.

33
मूळ

निद्रा सांडूनि चेइरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला । माया सांडून तैसा गेला । साधक स्वरुपीं ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

एखादा झोपी गेलेल्या माणूस जागा झाल्यावर स्वप्नभयापासून मुक्त होतो. त्याचप्रमाणें मायानें निर्माण केलेले दृश्य खोटे आहे हे ओळखून साधक आत्मरुपी स्थिर होतो.

English meaning

Leaving aside this sleep of ignorance brings wakefulness and then that purush is freed from the fears of this dream ("I am so and so" becomes, I do not exist). Then maya is left aside and the sadhak is in that swarup.

34
मूळ

ऐसी अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली । संसारउपाधी त्यागिली । या नाव साधक ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

अशारीतीनें जो अंतर्यामी आत्मस्वरुपी लीन आहे, बाहेर व्यवहारांत जो निःस्पृहपणें वागतो आणि जो संसारबंधनानें बांधलेला नसतो, तो साधक असतो.

English meaning

When, inside this state of `I am' is accepted and outside one clings to the refuge of desirelessness then, the limiting concepts of samsar are abandoned and you are a sadhak.

35
मूळ

कामापासून सुटला । क्रोधापासून पळाला । मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

साधक कामवासनेच्या विळख्यांतून सुटलेला असतो. क्रोधापासून दूर राहतो. मदव मत्सर यांचा त्याग करतो.

English meaning

Then that Reality is freed from passion and anger has run away; then the pride and jealousy that that One was holding is left aside.

36
मूळ

कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें । परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

साधक कुलाभिमान सोडून देतो. लोकलाजेला हरवितो. वैराग्याच्या बळावर परमार्थ खूप वाढवितो.

English meaning

The pride of family has been dropped and the shameful has been made ashamed and through this power of dispassion, paramarth is made to spread and grow.

37
मूळ

अविद्येपासून फडकला । प्रपंचापासून निष्टला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

साधक अविद्येशी संबंध तोडतो. प्रपंचातून निसटतो. लोभाच्या मोहांतून तो एकदम बाहेर पडतो.

English meaning

Then you separate yourself from ignorance/avidya ("I am a body") and escape from prapanch (with the five elements); then suddenly greed loses you from her grasp.

38
मूळ

थोरपणासि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

साधक जगांतील मोठेपणाचा त्याग करतो. वैभवाला किंमत देत नाही. वैराग्याच्या बळावर मानसन्माला झुगारुन देतो.

English meaning

By the power of dispassion, this `being someone great' is thrown to the ground and even this grandeur of the `all' is tossed away and its importance ridiculed.

39
मूळ

भेदाचा मडघा मोडिला । अहंकार सोडून पाडिला । पाईं धरुनि आपटिला । संदेहशत्रु ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

साधक भेद मोडून काढतो. अहंकाराला हरवून त्याला बाजुस टाकतो. संशयरुपी शत्रुला पायाखाली लोळवतो.

English meaning

The house of separation has been demolished and the ego/ahamkar has been thrown away and the enemy doubt has been tied up and soundly beaten.

40
मूळ

विकल्पाचा केला वधु । थापें मारिला भवसिंधु । सकळ भुतांचा विरोधु । तोडून टाकिला ॥ ४० ॥

मराठी अर्थ

साधक त्याच्या विकल्पाचा नाश करतो. मोठा प्रहार करुन भवसागर मारुन टाकितो. तसेंच पंचभूतांमधें असणारा विरोध तो नाहीसा करुन टाकतो.

English meaning

The modifications (ie. concepts) within that natural state have been killed and this ocean of mundane existence has been slapped in the face. The obstructions of the great elements and this `all' have been broken up and thrown aside.

41
मूळ

भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें । मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. काळाची तंगडी मोडतो. तो मृत्युच्या मस्तकावर प्रहार करुन तें फोडून जन्ममृत्युचे भयही नाहीसे करतो.

English meaning

The fear of worldly life has been cast away; the feet of time has been broken and the head of birth and death has been soundly slapped.

42
मूळ

देहसमंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

साधक देहरुपी पिशाच्चावर हल्ला करुन त्यास काढून टाकतो. म्हणजेच मी आत्मा असतांना मी देह आहे अशी भ्रामक कल्पना, भावना टाकून देतो. म्हणजेच तो कल्पना करणेंही बंद करतो.

English meaning

The ghost of the body has been driven away and this original intent has been conquered and imagination has been killed at that very moment.

43
मूळ

अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें । पाषांडास पछ्याडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

साधक स्वतःचें स्वतःला जें भय वाटते त्याला बडवून बाहेर काढतो. साधक आपल्या सूक्ष्म देहास जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहांत राहतात. साधक त्यांना पराभूत करतो. विवेकाच्या बळावर पाखंडी लोकांचा व पाखंडी मतांना विरोध करुन पराभूत करतो.

English meaning

Dread has been punished and mental constructs broken to pieces; for by the power of vivek, this doctrine of duality has been overpowered.

44
मूळ

गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थी घातला । अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

मी ब्रह्म आहे या अभिमानानें साधक मी देह आहे हा अभिमान नष्ट करतो. तो देहबुद्धिच्या स्वार्थी अहंकाराला नाहींसा करतो. तो दुर्दैवाला सरळ शास्त्रोक्त मार्गाने मारुन टाकतो.

English meaning

Arrogance has been stepped on; selfishness has been covered with abundance; that purush has utterly destroyed this `great calamity' though truthfulness and justice.

45
मूळ

मोहासी मधेंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें । शोकास खंडून सांडिलें । येकीकडे ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

साधक मोहाला उभा चिरतो. दुःखाचे दोन तुकडे करतो. शोकाचे तुकडे तुकडे करुन बाजूला फेकून देतो. म्हणजेच मोह. दुःख व शोक यांना साधक जीवनांतून नाहींसे करतो.

English meaning

Infatuation has been broken in the middle and suffering has been cut in two; sorrow has been taken outside and thrown away.

46
मूळ

द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी । धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

साधक द्वेषाला देशोधडीस लावतो. नास्तिकपणाला नरडे दाबून मारुन टाकतो. कुतर्काला इतका दम देतो की, त्याचे हृदय धडधडते.

English meaning

Hatred has been banished and non-existence has been choked. The anxiety and fears in the belly of wrong thinking have been ripped open.

47
मूळ

ज्ञानेंविवेक माजला । तेणें निश्र्चयो बळावला । अवगुणाचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानानें साधकाचा विवेक बलवान होतो. त्यामुळें स्वस्वरुपाबद्दल निश्र्चय बळकट होतो. वैराग्याच्या सामर्थ्यानें तो अवगुणांचा संहार करतो.

English meaning

Due to vivek, knowledge/gnyan expanded and due to this, conviction gained stren- gth; then those wrong gunas were destroyed by powerful vairagya/ renunciation.

48
मूळ

अधर्मास स्वधर्मे लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झगटिलें । लांटून वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचें सर्वस्व काढून घेतो. सत्कर्मांनी कुकर्मास हाकलून लावतो. सद्विचारांनी अविचारांना वाटेस लावतो.

English meaning

adharma has been stripped of its property by one's own True Nature/swadharma; the impure action was thrown away by that pure action; wrong thinking has been disposed of by thoughtlessness.

49
मूळ

तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला । विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

साधक तिरस्कार चिरडून टाकतो. द्वेष खरडून काढतो. खेदाला स्वानंदाच्या पायतळीं तुडवतो.

English meaning

That purush has crushed scorn, hatred has receded and eagerness has placed its feet on dejection.

50
मूळ

कोपावरी घालणें घातलें । कापट्या अंतरी कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्र्वजनीं ॥ ५० ॥

मराठी अर्थ

साधक क्रोधावर हल्ला करुन त्याचा नाश करतो. कपटाचा मनामध्येंच कुटुन नायनाट करतो. तो विश्र्वांतील सर्व भूतांमधें मित्रत्वानें पाहातो.

English meaning

Anger has been attacked and the deceit that is within this inner space has been deceived and there is friendship with the whole world for it is regarded as one's own Self.

51
मूळ

प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिपंथे ज्ञानयोग । साधिता जाला ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

साधक दृश्याकडे धांव घेणार्‍या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो. आणि वृत्तीला अंतर्यामी आत्मस्वरुपाकडे वळवून आत्मज्ञान करुन घेतो.

English meaning

pravritti (worldly activity) has been abandoned and the company of friends (and enemies etc.) has been cut and that union with pure knowledge has been attained through the path of non-activity/nivritti (siddharameshwar maharaj doing nothing is the greatest worship).

52
मूळ

विषयेमैंदास सिंतरिलें । कुविद्येसि वेढा लाविलें । आपणास सोडविलें । आप्ततश्करापासुनी ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

साधक दृश्यरुपी चोराला फसवितो. दृश्याच्या कचाट्यांतून निसटतो. विपरीत ज्ञानाला सर्व बाजुनीं वेढून तें नाहीसें करतो. आप्तरुपी चोरांपासून आपली सुटका करुन घेतो.

English meaning

The deception of sense-objects has been deceived and wrong knowledge has been confused and one's own Self has been freed from the robbers called relatives.

53
मूळ

पराधेनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । येकायेकी ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

साधक पराधिनतेवर रागावतो. ममतेवर संतापतो. लगेचच दुराशेचा त्याग करतो.

English meaning

That purush got angry on dependence; he became furious at attachment; and the hopes that are far from the atma were abandoned by that One (brahman) within the one (jiva).

54
मूळ

स्वरुपीं घातलें मना । यातनेसि केली यातना । साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

साधक मनाला स्वस्वरुपी लीन करतो. त्यामुळे यातनेला यातना होतात. कारण यातना भोगायला मन उरतच नाही. तो उद्योग, श्रम आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो.

English meaning

The mind has been firmly placed in that swarup; suffering has been punished and wisdom and right effort has been rewarded.

55
मूळ

अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला । प्रेत्न सांगाती भला । साधनपंथें ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

साधक आपल्या साधनमार्गांत अभ्यासावर भर देतो. तो प्रयत्न आणि कष्ट यांनी साधनापंथ अभ्यासितो.

English meaning

Study was taken as his companion, they set out together along with determined purpose and effort; and that purush walked on the path of sadhana telling this kind word `I am'.

56
मूळ

सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्य विवेक । संग त्यागूनि येक । सत्संग धरी ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

साधक अति सावध व दक्ष असतो. तो शाश्वत, अशाश्वत विवेकाने जाणतो. इतर सर्व संग सोडून एक सत्संग तेवढा धरतो.

English meaning

That sadhak is always alert and attentive and understands that vivek between the Eternal and non-eternal. He drops all attachment and only accepts the One as his companion.

57
मूळ

बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

साधक प्रपंचाला विवेकाच्या बळावर बाजूला टाकून देतो. संसाराचा बोजा फेकून देतो. स्वतःच्या शुद्धाचरणाने अनाचाराला हरवितो, भ्रष्ट करतो.

English meaning

Through determination samsar has been cast off; through vivek, his family has been renounced and through pure conduct, the impure conduct has been bewildered.

58
मूळ

विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्र्चित्त जाला । दुश्र्चित्तपणासी ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

साधक स्वस्वरुपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो. कामचुकारपणाचा स्वीकार करत नाही. म्हणजे आळसाचा आळस करतो. चित्ताची व्यग्रता नसते. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन व्यग्र नसते.

English meaning

Forgetfulness was forgotten, laziness was never regarded and due to his alertness his own Self was ever present.

59
मूळ

आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरुपणें । तो साधक ऐसा येणें प्रमाणें । बुझावा ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

आतां हें बोलणें पुरें. उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो. हें या वर्णनावरुन ओळखावें.

English meaning

When the wrong gunas have been left aside then, that thoughtless Self is this speech `I am' and now the sadhak should understand, I do not exist.

60
मूळ

बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणौनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तो जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६० ॥

मराठी अर्थ

मुद्दाम बळजबरीनें आपल्या देहबुद्धीचा त्याग करणारास साधक म्हणतात. आतां सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासांत सांगितलें आहे.

English meaning

Through determination the mind full of `many' things should be abandoned. There- fore the sadhak should make this `speech' (having understood this gross creation is but a figment of my own imagination, the mind stops chattering and becomes quiet. In this way, this `all' appears from behind the thoughts and `many' words). And then within the collection of words ahead, that siddha/ accomplished should be known (when the sadhak learns how to abandon this `speech' then, he becomes thoughtless. And when he abandons all sense of being, then like the salt dropped in the ocean, he becomes a perfect siddha and is forever free).

61
मूळ

येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक जाला । त्याग न घडे संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

येथें एक शंका येते ती अशी की जो निस्पृह होतो तो सादक बनतो. पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही. मग तो साधक बनूं शकत नाहीं कीं काय?

English meaning

Then `here' a doubt arose (as long as maya remains then doubts or thoughts are sure to arise sooner or later. Therefore one must find rest in that doubtless Self). "The sadhak has no desire. But if one does not abandon samsar then, can one ever be a sadhak?"

62
मूळ

ऐसे श्रोतयांचें उत्तर । याचें कैसें प्रत्योत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊन ऐका ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांच्या या प्रश्र्णाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहे. ते श्रोत्यांनी तत्पर हौऊन ऐकावें.

English meaning

Such was the question of the listener. But if there was this `speech' then, why would there be any need of a reply? (when all there is, is this `I am', then why allow questions to arise?) Therefore listen by being absorbed completely within the collection of words, ahead. .