मंत्रांचा — समास 2: गुरुलक्षण

Fully populated

Guru Lakshan (The Characteristics of the Guru)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

जे करामती दाखविती । ते हि गुरु म्हणिजेती । परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १ ॥

मराठी अर्थ

कांहीं माणसें विलक्षण करामती करुन दाखवतात. त्यांनाही गुरु म्हणतात. पण मोक्ष देणारे हे गुरु नव्हेत.

English meaning

The one that can reveal this wondrous play of `I am' should be called a guru. But sadguru is not that, for He is the giver of Final Liberation. (A guru can give the understanding of knowledge, of this `all', but only a sadguru can take one beyond knowledge)

2
मूळ

सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें । नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २ ॥

मराठी अर्थ

सभेतील लोकांची नजरबंदी करणे, चेटुक करुन भुरळ पाडणे, साबरमंत्र व कौटाळे या नाथ पंथीय मंत्राद्वारे चमत्कार करणे, अशक्य वाटणार्‍या गोष्टी करुन दाखविणे,

English meaning

Due to this alluring meeting place of `I am', one gets beguiled and deceived. Then mantras (ie. mere words), sorcery and magic (ie. imagination; this is a boy and this is a woman etc, is all the magic of mankind) are performed and there is the creation of numerous different shapes and forms in the `many'. These miracles of the `many' are due to this wonder of the `all' and this is due to that inconceivable Reality.

3
मूळ

सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग । दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३ ॥

मराठी अर्थ

अनेक वनस्पती व रसायनांचे औषधीप्रयोग सांगणे, दुसर्‍या धातुचा सोन्यांत रुपांतर करण्याचा प्रयोग सांगणे, नजरबंदी करुन ताबडतोप इच्छापुर्तीचा मार्ग सांगणे,

English meaning

When that One Self starts using `many' medicines then, how can these gross elements ("I am a body") be turned into this gold (`I am')? For that One has been suddenly hypnotised by desires and greed (becomes deluded into seeing that which is not; the gross world of many names and forms).

4
मूळ

साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान । नाना वाद्यें सिकविती जन । ते हि येक गुरु ॥ ४ ॥

मराठी अर्थ

साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, ताना, निरनिराळी वाद्यें शिकवीणारे, तेही एक प्रकारचे गुरु समजावे.

English meaning

Then this harmonious `song' of the `all' is a mind with knowledge of the nine sen- timents like anger, desire, fear etc. Then this `song' of the `all' and `dance' of the `all' becomes the `many' voices and musical pieces. Then that One teaches the people about `many' musical instruments and becomes one kind of guru.

5
मूळ

विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी । कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

कांहीं मंत्र जाणणारे मंत्र शिकवतात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवतात, कांहीं पोट भरण्याची कला शिकवतात.

English meaning

There is the knowledge that teaches the casting out of *ghosts and all the hocus- pocus of the ways of the `many'. When the mind covers over this `I am' then, that One teaches these various subjects. *(Only those who believe in superstition and ghosts can be possessed of ghosts; the concept needs to be planted first, then all kinds of things will be imagined and manifest themselves before the believer)

6
मूळ

जे यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर । ते हि गुरु परी साचार । सद्गुरु नव्हेती ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातींतील लोकांना पोट भरण्याससाठी शिकवतात. ते सुद्धा एक प्रकारचे गुरुच पण सद्गुरु मात्र नव्हेत.

English meaning

When that pervasiveness of that witnessing purush has become the `many' castes (ie. body consciousness), then that One teaches only how to fill the belly. This is a kind of guru, but truly it is not sadguru.

7
मूळ

आपली माता आणी पिता । ते हि गुरुचि तत्वता । परी पैलपार पावविता । तो सद्गुरु वेगळा ॥ ७ ॥

मराठी अर्थ

आपली आई व वडिल हे पण गुरुच पण संसारांतुन पैलतीराला नेणारा तो सद्गुरु वेगळाच असतो.

English meaning

Our own mother and father are also actually gurus.4 But sadguru, who takes one to the other shore, is quite different.

8
मूळ

गाईत्रीमंत्राचा उचारु । सांगे तो साचार कुळगुरु । परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८ ॥

मराठी अर्थ

गायत्रीमंत्राचा उपदेश देणारा कुळगुरु. पण तो कांही आत्मज्ञान देत नाही. त्याज्ञानवाचून पैलपारास जातां येत नाही.

English meaning

The One who correctly utters the *gayatri mantra is the true guru of the `all'. And without this knowledge the other shore cannot be reached. *(siddharameshwar maharaj- to know the sandi/space between every thought is to utter the gayatri correctly)

9
मूळ

जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानअंधारें निरसी । जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहींसा करतो, व जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो. तो सद्गुरु होय.

English meaning

That witnessing purush teaches the knowledge of brahman and He dissipates the darkness of ignorance and unites the atma of the jiva and that paramatma/Supreme Self.

10
मूळ

विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत । तया देवभक्ता येकांत । करी तो सद्गुरु ॥ १० ॥

मराठी अर्थ

देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असल्यामुळे जीव व शिव असे द्वैत निर्माण झालेले असते, तें द्वैत नाहीसे करुन देव व भक्त यांची गांठ घालून देऊन ऐक्य करतो, तो सद्गुरु होय.

English meaning

The separation of God and devotee is due to this duality of jiva and shiva. That One who makes this unity between God and the devotee into that Reality is sadguru.

11
मूळ

भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद्गुरु जाणावा ॥ ११ ॥

मराठी अर्थ

भवरुपी वाघाने उडी घालून गाय-वासराची ताटातूट केली हे पाहून दया येऊन त्या भवरुपी वाघापासून सोडविणारा तो सद्गुरु.

English meaning

The tiger of worldliness has jumped in between this cow (knowledge) and her calf (disciple) and separated them. The One who sees this and hastens to release them from this great danger should be known as sadguru.

12
मूळ

प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें । ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्गुरु जाणावा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

प्राणी (जीव ) मायेच्या जाळ्यांत अडकून प्रपंचांतील दुःखाने दुःखी होतात. अशांना मायेच्या जाळ्यांतून जो सोडवितो. तो सद्गुरु होय.

English meaning

The one in the prana has fallen in the net of maya and suffers so much from the sorrows of samsar. That One who liberates them by means of this `I am', should be known as sadguru.

13
मूळ

वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी । तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरु जाणावा ॥ १३ ॥

मराठी अर्थ

वासनारुपी नदीला महापूर आलेला असतां जीव त्यामधें गटांगळ्या खात बुडू लागतो. त्यावेळी तेथें उडी घालून जो तारतो, तो सद्गुरु होय.

English meaning

In the prana, we get completely exhausted and end up drowning in the flooding river of desires. `There', the One who jumps in and saves us, that you should know is sadguru.

14
मूळ

गर्भवास अति सांकडी । इच्छाबंधनाची बेडी । ज्ञान देऊन सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ॥ १४ ॥

मराठी अर्थ

वासनेच्या बंधनाची बेडी त्यामुळे जीवाला गर्भवासाचे दुःख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन त्या बंधनांतून जीवास जो मुक्त करतो, तो सद्गुरु होय.

English meaning

There are great burdens and constrictions in these countless births and deaths and there is the confinement of this binding wish of `I am'. That One who gives us the knowledge that swiftly releases us is sadguru swami (maharaj- at this moment you are He, how long does it take...just understand).

15
मूळ

फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार । तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

शब्दांचे अंतरंग अर्थ त्यावरुन आत्मसोरुपाकडे नेणारा सद्गुरु हा अनाथांचे जणूं माहेरघरच असतो.

English meaning

The One who opens up this inner space of the `word' and clearly reveals that thoughtless Self which is our own essence; that One is sadguru only and He is the maternal home of the destitute.

16
मूळ

जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्म चि करी रोकडें । फेडी संसारसांकडें । वचनमात्रें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

जीव हा एकांगी असतो. अपूर्ण असतो. ब्रह्म सर्वांगी, पूर्ण स्थळ काळ परिस्थिती यांच्या पलीकडे असते. आपल्या उपदेशाने सद्गुरु जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुप बनवितो.

English meaning

The jiva is a pitiable limited being. Due to this ever-present sagun experience, the sadguru makes this jiva that brahman (maharaj- at this moment, you are He). Due to only this divine `word' the bondage of samsar is shattered.

17
मूळ

जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी । शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गारवचनें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

वेदांच्या अंतरंगामधे म्हणजे उपनिषदामधे जे ज्ञान गुप्तरुपे आहे ते ज्ञान सद्गुरु लहान मुलाला जसे घास भरवितात तसे शिष्याला आपल्या बोलण्यांतून हळूहळू कानांत सांगतात.

English meaning

Within the vedas there is this `I am' and this He takes out and gives to the shishya, just like the mother feeding her child. Within this listening of the shishya there is the fullness of that pure knowledge, on account of His rescuing divine `word'.

18
मूळ

वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव । तोचि येक गुरुराव । ऐक्यरुपें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

वेद, शास्त्र व सद्पुरुष ज्ञानानुभवाने एकरुप झालेले असतात. तेच ज्ञान तोच अनुभव सद्गुरुचा असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वांचे ज्ञान सारखेंच असते.

English meaning

The veda and the shasthras become that great experience, I do not exist, when you understand that it is that One alone who has become this experience of `I am'. There is only that One guru-raya and His form is this feeling of oneness.

19
मूळ

संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आदरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी । करुंच नेणे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

सद्गुरु भक्ताचे सर्व प्रकारचे संशय मुळापासून नष्ट करतो. तो मोठ्या आदराने स्वधर्माचे पालन करतो. वेदरहित म्हणजे आत्मज्ञान असलेले सर्व मिथ्या भाषण तो करत नाही.

English meaning

When body consciousness is totally burnt and our own inherent nature/swadharma is lovingly and carefully protected then, all the loose talk that is different to the vedas is never known.

20
मूळ

जें जें मन आंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे भिकारी । झडे आला ॥ २० ॥

मराठी अर्थ

मनांत जें जें येते ते ते लज भीड न बाळगता जो उघड करतो. तो कांहीं सद्गुरु नव्हे. तो भिकारी आपल्यामागे लागण्यासाठी आला आहे असे सनजावे.

English meaning

When the mind becomes the acceptor of this `I am' then, that Reality can naturally liberate that Reality. That guru is not a beggar hungry for objects. (maharaj an acceptor is required)

21
मूळ

शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन । ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

जो आपल्या शिष्याला साधनांत कसें राहावे हे शिकवत नाही. इंद्रियें ताब्तांत कशी ठेवावीत हे शिकवत नाही. असले गुरु दमडीला तीन मिळाले तरी त्यांच्यापासून लांब राहावे.

English meaning

If the shishya is not established in this sadhana nor made to control his sense- organs then, such a guru may be available even at three for a penny, but he should be discarded.

22
मूळ

जो कोणी ज्ञान बोधी । समूळ विद्या छेदी । इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जो आत्मज्ञान समजावून सांगतो, सर्वच्या सर्व अविद्या म्हणजे आत्मज्ञाना व्यतिरिक्त असलेले मिथ्या ज्ञान समूळ नष्ट करतो. इंद्रियें आवरुन कशी धरावी हे शिष्याला शिकवीतो. तो सद्गुरु समजावा.

English meaning

The One who teaches the pure knowledge that is within this `all', who uproots ignorance/avidya ("I am a body") totally and establishes the control of the sense- organs; that you should know is sadguru.

23
मूळ

येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले । अति दुराशेनें केले । दीनरुप ॥ २३ ॥

मराठी अर्थ

कांही गुरु पैशाचे मिंधे होतात. शिष्याच्या आधीन होतात. वासनेच्या नादी लागून दिनवाणें बनतात.

English meaning

But when that One gets sold off for the wealth of the `many' (ie. conceptualisation and desires) then, that guru has become no more than a servant of the shishya. That One has become a very miserable form, due to its hopes that are far from the atma.

24
मूळ

जें जें रुचे शिष्या मनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडळी गळां ॥ २४ ॥

मराठी अर्थ

असे गुरु शिष्याच्या एवढे आधीन होतात की, शिष्याला जे जे आवडेल ते ते सर्व करतात कारण वासनेचा विळखा त्यांच्या मानेभोवती बसलेला असतो.

English meaning

He enjoys staying in the mind and the shishya is only being flattered in order to gain something (How can the conviction of the utter falsity of anything be there?). In this way, sinful passions embrace him.

25
मूळ

जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु । चोरटा भैंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५ ॥

मराठी अर्थ

शिष्याच्या भीडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अधमाहूनही अधम असतो. असा गुरु चोरट, द्रव्याचा लोभी, दुष्ट, नीच व फसवा असतो.

English meaning

When that guru lavishes respect on his disciple then, that great brahman has surely become the lowest of the low; he is a robber and hypocrite, void of morals and a deceiver who is after money (maharaj- the one who says he is a Master, is not a Master, I tell you!).

26
मूळ

जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी । आणी सेखी भीड करी । घातघेणा ॥ २६ ॥

मराठी अर्थ

वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुराचारी वैद्य रोग्याला सर्वस्वी लुबाडतो. तसेच रोग्याला भीड घालून शेवटी त्याचा घात करतो.

English meaning

He is like an immoral doctor and he will plunder your only wealth (`I am') and in the end will fail to help the one who respected him.

27
मूळ

तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा । भीड करुनियां गोवा । घाली बंधनाचा ॥ २७ ॥

मराठी अर्थ

तसे हे नामधारी गुरु असतात. ज्यांच्यामुळे भक्त व देव यांतील अंतर वाढते. जो भीड घालून भक्ताला देहबुद्धिच्या बंधनांत अधिकाधिक अडकवितो. असा गुरु नसावा.

English meaning

The guru should not be like this, for then that God is missed. Due to respect or fear for this false teacher that One gets bound in entanglement (maharaj- gurus put you in more bondage, I tell you!).

28
मूळ

जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८ ॥

मराठी अर्थ

ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान व प्रत्यक्ष व्यवहारांत साधनेचे आचरण आहे. असा सद्गुरु आपल्याला आपले आत्मस्वरुप दाखवितो.

English meaning

When the gross sadhana is this action of the `all' and `here' has become that pure knowledge of brahman then, that only is because of sadguru and before your very eyes that hidden treasure is revealed.

29
मूळ

देखणें दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेंच ज्ञान तें पामरें । अंतरलीं भगवंता ॥ २९ ॥

मराठी अर्थ

कांहीं गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश, नाद, सुगंध यांचे अनुभव दाखवितात. कांहीं शिष्याच्या कानांत मंत्र सांगतात. इतकेच ज्ञान त्यांच्यापाशी असते, पण ते बिचारे भगवंतापासून दूरच असतात.

English meaning

But if a show is eagerly displayed and a mantra whispered in the ear of the disciple then, only that much is that guru's knowledge. Then that Reality has become this lowly knowledge that is so far from God.

30
मूळ

बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण । तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३० ॥

मराठी अर्थ

शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती ज्याच्यापाशी आहे, तोच उत्तम लक्षणांनी संपन्न अशी सद्गुरुची खूण आहे. ज्याला मोक्ष मिळवून घेण्याची इच्छा आहे, त्याने अशा सद्गुरुस शरण जावे.

English meaning

Only where that pure understanding within this *triad has been fully imbibed is there that pure attention of the guru. `There' only should the aspirant approach, with complete respect and love, and surrender himself. *(Knower, known, knowing)

31
मूळ

अद्वैत निरुपणें अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता । ऐसियागुरुचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

कांही वेळेस एखादा माणूस वेदांत उत्तम प्रकारे सांगतो. पण मन मात्र इंद्रियसुखाला लालचावलेले असते. असा गुरु केल्याने आपले सार्थक होणार नाही.

English meaning

On account of the non-dual discourse there is that unfathomable speaker (I do not exist). But if you bow down to the sense-objects then, sadguru will not be able to fulfil your life's purpose.

32
मूळ

जैसा निरुपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो । कृतबुद्धीच जयो । जालाच नाहीं ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

उत्तम वक्ता जसा प्रसंग तसा त्यांत रंग भरतो. परंतु देहबुद्धिचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मज्ञानाचा जय झालेला नसतो.

English meaning

And if his discourse is of the `many' then the mind will also become useless like the `many' thoughts and there cannot be that victory of that established Truth.

33
मूळ

निरुपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

पुष्कळवेळां निरुपणामधे वक्ता आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगतो. त्यामुळे प्राप्त होणार्‍या सिद्धिंचे वर्णन करतो. त्या वर्णनाने श्रोत्यांची बुद्धि आत्मज्ञानापासून ढळूं लागते.

English meaning

Within that pure discourse there is this power of the `all' and siddhis (powers that should be allowed to come naturally through understanding). But if while liste- ning/shravan your mind is affected by false hopes that are far from the atma then, your mind is attracted to the `many' miracles.

34
मूळ

पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत । आणी सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

साधकांना असे वाटते की, पूर्वी मोठे ज्ञाते, विरक्त आणि भक्त होऊन गेले. त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीची होती. सिद्धि वश झाल्याने त्यांच्या अंगी मोठे सामर्थ्य होते.

English meaning

That previous state of pure knowledge was created by the Knower who is desireless; that one is a true devotee and just like God. Then there is this wondrous power of the `all' and these siddhis associated with it (ie. they come naturally but they are within maya).6

35
मूळ

ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ । ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

त्याच्या अंगी जेवढे सामर्थ्य तेवढे आपल्याकडे नसल्याने आपले ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या सामर्थ्यप्राप्तीचा विचार साधकाच्या मनांत दृढ होऊ लागतो. हा विचर आत्मज्ञानाला मारकच असतो.

English meaning

Such is the power of that Reality; while the knowledge that we have is simply worthless and empty. Such `greed' for this power resides within this inner space of `I am' (when this understanding grows then it becomes your need and you long to be in that only; maharaj- one should have the greed for Reality).

36
मूळ

निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

दृश्यांतून सुख मिळविण्याची वासना समूळ नष्ट होते, तेव्हांच भगवंत भेटतो, आत्मज्ञान होते. वासना बाळगणारे शब्दज्ञानी चांगले नसतात.

English meaning

When false hopes are completely broken, then only will God be met. When false hope is retained in our mind, then that Reality becomes vile and that One who knows this `word' becomes full of desires.

37
मूळ

बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं । कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

कोणत्या तरी वासनेनें वेडी झालेली शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधखरल्यामुळे फुकट गेली. अशी माणसें बिचारी मरुन गेली.

English meaning

Then this `all' within the Knower becomes uncontrolled and maddened by desires. And these poor fools die, due to the longings of this wish to be (this `I am' is not satisfied to remain in itself and longs to be satisfied by other things).

38
मूळ

निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत । अवघ्यां वेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

ज्याला कशाचीही वासना असत नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. तो अक्षै भगवंताबद्दलच बोलत असतो.

English meaning

Rare is that Saint who is completely free of desire. The understanding of that `indestructible' is quite different from the understanding of a man.

39
मूळ

अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्र्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

खरोखर पाहीले तर भगवंत हा सर्वांचा कधीही नाहींसा न होणारा असा ठेवा आहे. परंतु देहापासून सुख मिळविण्याची वासना कमी होत नाही. त्यामुळे भगवंताकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही व रस्ता चुकतात.

English meaning

That `indestructible' has the treasure of this `all' in its possession but, if these chains of this `all' body are not broken then, that way of God will be missed.

40
मूळ

सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्व आलें । तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

एखाद्याने कांहीं साधन केले व त्याला सिद्धि प्राप्त झाल्या तर त्याचे सामर्थ वाढते. त्यामुळे देहाचे महत्व वाढते. त्यामुळे देहबुद्धिचे झुंबाड वाढते.

English meaning

When these siddhis and this power of the `I am' appear then, importance is brought to this `all' body and that Reality is forcefully seized by body conviction.7

41
मूळ

सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नसे ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

भगवंताचे सुख अक्षय आहे. त्याला विनाश नाही. त्याला दूर सारुन जे सामर्थ्य मिळविण्याच्या मागे लागतात, ते मूर्ख असतात. वासनेसारखे दुःख दुसरे कोणतेच नाही.

English meaning

When that Reality is a fool then, it leaves aside the joy of the `indestructible' and has the wish for this power `I am'. And afterwards when there comes the sufferings caused by incessant and ever-changing desires then even this `I am' is not.

42
मूळ

ईश्र्वरेंविण जे कामना । तेणेंचि गुणें नाना यातना । पावती होती पतना । वरपडे प्राणी ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

मला भगवंत हवा या वासनेखेरीज इतर वासना या दुःख देणार्‍या व अधःपतन करणार्‍या आहेत.

English meaning

`Many' desires arise when this `I am' is without its purush. Then that Reality be- comes the mixing together of the three *gunas and there is objectification and `many' sufferings. When these are accepted as your own then, that One falls into this cor- pse within the prana. *(maharaj- you know/sattwa something is there, but you don't know/tamo what it is and that is rajo guna).

43
मूळ

होता शरीरासी अंत । सामर्थ्य हि निघोन जात । सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

शरीराचा शेवट झाला की, सामर्थ्यही निघून जाते. भगवंताची कामना न धरता इतर कामना धरल्याने भगवंत मिळत नाही.

English meaning

Then due to body consciousness, this `all' body comes to an end and this power of `I am' is taken away. Finally in the end, due to these *gunas of desire, God is disregarded and lost. *(maharaj- you do everything knowingly and unknowingly. Therefore you don't know what the result will be. In this world you are always thinking, what will happen and what will not happen? What to do and what not to do?)

44
मूळ

म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

यावरुन असे दिसते की, जो अत्यंत निष्काम आहे वासनारहीत आहे, आणि ज्याच्या बुद्धिमधे आत्मस्वरुपाविषयी दृढ निश्र्चय आहे असा स्वानुभवी सद्गुरु या संसारसागरांतून पलीकडे नेतो.

English meaning

Therefore the one who is desireless and is the constant support of a steadfast intellect becomes the sadguru and is taken beyond the ocean of worldly life.

45
मूळ

मुख्य सद्गुरुचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्र्चयाचें समाधान । स्वरुपस्थिती ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

सद्गुरला शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे हे सद्गुरुचे प्रथम लक्षण आहे. तो निश्र्चल समाधानी पाहीजे. आत्मस्वरुपांत तो नेहमी स्थिर राहिला पाहीजे.

English meaning

That thoughtless understanding is the attention of sadguru and at the source it wants only pure knowledge. It is the doubtless and complete contentment of that swa- the change.... Therefore not only does that ego not die but it starts roaring, "I am brahman." Without killing that "I" the ego is not destroyed. Though we may kill everything else, the killing of own self still remains to be done and that task is very difficult without sadguru. rup.

46
मूळ

याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषईं ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

याच बरोबर तो अतिशय वैराग्यसंपन्न असतो. त्याचे मन कशांतही गुंतलेले नसते. त्याचा स्वधर्माविषयीं आचार अत्यंत निर्मळ असतो.

English meaning

When this `I am' has been understood and powerful vairagya is maintained (`I want nothing') then, this vritti of detachment (by forgetting everything, this knowing is there) becomes that pure knowledge. But first there has to be this pure sattwa guna, for this being knowledge and behaving as knowledge is closely related to swadharma (beyond knowledge; to be in your swarup).

47
मूळ

याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरुपण । जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

त्याचे सद्गुरुजवळ बसून अध्यात्माचे श्रवण चालू असते. त्याच्यापाशी नेहमी हरिकथा व निरुपण चालते.

English meaning

When this `I am' is being understood then, you are listening to this `story' of hari. And when `here' there is that thoughtless understanding then, that is the Ultimate Accomplishment/paramarth and that is parabrahman.

48
मूळ

जेथें सारासारविचारु । तेथें होये जगोद्धार । नवविधा भक्तीचा आधार । बहुत जनासी ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

जेथें सारासार विचार किंवा आत्मानात्मविवेक चालतो, तेथे जगाचा उद्धार होत असतो. बर्‍याच लोकांना नवविधाभक्ति कशी करावयाची हे त्याच्यापाशी समजते.

English meaning

When `here' is that thoughtless essence, then you are lifted out of this world and afterwards only brahman only remains `there'. But first with the support of these nine devotions, the mind should become this `all'.

49
मूळ

म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन । हें सद्गुरुचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

म्हणून ज्याठिकाणी नवविधा भक्ती आचरली जाते, आणि साधनमार्गास महत्व दिले जाते, हे सद्गुरुचे लक्षण आहे असे श्रोत्यानी ओळखावे.

English meaning

And when `here' the nine forms of bhajan are the established sadhana, then there comes that thoughtless state. This pure attention of the sadguru should be recognized within the listener.

50
मूळ

अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन । तेथें बहुत भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५० ॥

मराठी अर्थ

अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान व बाह्यात्कारी मनापासून केलेली उपासना जेथें असते तेथे अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळते.

English meaning

When in this inner space (of `I am') there is that pure knowledge of brahman then, the *senses are absorbed in the making of His bhajan. And `there' the devotee of the mind attains the peace and rest of no-mind. *(The individual senses that were constantly going outside to find satisfaction in something new have found satisfaction in letting whatever experience comes, come and whatever goes, go without care or concern)

51
मूळ

नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

ज्या परमार्थाला उपासनेचा, प्रत्यक्ष आचरणांत असणार्‍या भक्तीचा आधार नाही, तो परमार्थ कामाला येत नाही. कर्मांची जी शिस्त ती पाळली नाही तर अनाचार, स्वैराचार माजून माणसे भ्रष्ट होतात.

English meaning

Where there is not the support of this worship/upasana then, paramarth has no support and nothing of worth is accomplished. Without this conduct of knowledge (ef- fortless knowing) there is only improper conduct and that brings nothing but confusion ("Should I do this or that; is it right or wrong").

52
मूळ

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन । कथा निरुपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

या कारणासाठी आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्मकर्माचे आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा निरुपण, श्रवण, मनन, नीति, न्याय, मर्यादा

English meaning

Therefore there should be knowledge/gnyan, renunciation/vairagya and bhajan. This is the action of swadharma and it is the only proper sadhana. This is liste- ning/shravan to God's `story' and the establishment of this discourse is called manana. And maintenance of this is respect for truthfulness and justice.

53
मूळ

यामधें येक उणें असे । तेणें ते विलक्षण दिसे । म्हणौन सर्व हि विलसे । सद्गुरुपासीं ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

यामधे एकजरी कमी असले तरी परमार्थाच्या दृष्टीने विपरीत दिसते. म्हणून सद्गुरु असतो तेथे या सर्व परमार्थपूरक गोष्टी असतात.

English meaning

But if that One (Witness purush) within this `I am' is lost then, that Reality appears as something else. Therefore understand that the `many' and even this `all' exist and shine on account of sadguru.

54
मूळ

तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता । नाना साधनें समर्था । सद्गुरुपासीं ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

सद्गुरु अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचे पालनपोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशासामर्थ्यवान सद्गुरुपाशी परमार्थाची अनेक साधने असतात.

English meaning

The sadguru is the protector of this `all' and the thinking of this `all' is His. The `many', this sadhana of `I am' and non-duality all belong to sadguru.

55
मूळ

साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुता सवेंच भ्रष्टे । याकारणें दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

साधनाशिवाय परमार्थ पोसण्याचा प्रयत्न केला तर तो कांहीं काळ चालतो. पण तो लगेचच विलयास जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टीने साधनाची प्रतिष्ठा वाढवितात.

English meaning

If paramarth is honoured without this sadhana of `I am' then, that atma will again, of its own accord, fall into confusion. But if this `I am' is maintained then, the one whose vision is far from the atma (who sees many names and forms) will become that great experience (I do not exist).

56
मूळ

आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

जे परमार्थाची सदाचार, उपसना सोडतात ते भ्रष्ट दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारतो?

English meaning

When this conduct of worship/upasana (`I am He') is let slip then that Reality sees only through the confusion of non-devotion. And then, within the greatness of that Reality, the fires of desires burn (and desires bring anger, fear etc.) and this fire can only be extinquished by the understanding of this `all'.

57
मूळ

कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव । तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

ज्या परमार्थामधे कर्म व उपासना या दोन्हींना जागा नाही. तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सांपडतो. अशा लोकांचा परमार्थ खोटा असतो. प्रापंचिक लोक त्याला हसतात.

English meaning

Where this action of worship/upasana is faithless (and the mind goes out and sits with the objects) then, there will be a straying from `there', that place of God and that Supreme Self/paramatma will become a lowly mind and it will cower before this meeting place of `I am' and in the worldly life it will get ridiculed.

58
मूळ

नीच यातीचा गुरु । तो हि कानकोंडा विचारु । ब्रह्मसभेस जैसा चोरु । तैसा दडे ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

खालच्या जातीचा गुरु केला तर अडचणीची परिस्थिती येते. संतांच्या सभेंत ब्रह्मस्वरुपाची चर्चा चालू असतां जर एखादा चोर तेथे आला तर त्याला जसे कानकोडें येते. तशी त्या शिष्याची समाजांत अवस्था होते.

English meaning

If the guru belongs to this lower caste (or you retain body consciousness and your mind is your guru) then, that understanding, I do not exist, will be shamed and in this meeting place of the brahmin (ie. Knower), he will hide like a thief (the mind steals a small part of this knowledge to uses it for itself and brazenly proclaims, "I am doing").

59
मूळ

ब्रह्मसभे देखतां । त्याचे तीर्थ नये घेतां । अथवा प्रसाद सेवितां । प्राश्र्चित पडे ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

त्याला लोकांसमोर गुरुचे तीर्थ घेता येत नाही. गुरुचाप्रसाद खाल्ला तर प्रायश्र्चित घ्यावे लागते.

English meaning

Then though you are, in truth, in the presence of this meeting place of that brahmin (ie. though everything takes place in this `I am' of knowledge), still you do not accept this sacred water that comes from His feet and do not taste of His prasad/blessings then, you will have to be purified (if having met the Master, you continue to take yourself to be the body and act as a body then, of what use is His blessings, `You are He'? If He shows you your true nature but you do not accept it then whose fault and how can you be purified?).9

60
मूळ

तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६० ॥

मराठी अर्थ

गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही, टाकून दिला तर कमीपणा येतो. त्यात गुरुभक्ति एकदम नाश पावते.

English meaning

If this sacred water and prasad are not accepted then, `there' the objects of the world will be seen and sadguru's devotion is suddenly ruined.

61
मूळ

गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्त्वतां । तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न करावा तर ब्राह्मण रागावतात. आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळाला जावे तर गुरुचें मन मोडल्या सारखेंच होते. त्याचा राग ओढवून घेतल्यासारखे होते.

English meaning

And if you should maintain respect for this guru of the `many' then truly, that brahmin's peace is disturbed. And if you seek the protection of that brahmin `there' then, this guru will get upset (this peace of the meeting place or `all' of the brahmin is a new experience for a mind that is accustomed to run here and there. It feels uncomfortable and agitated and wants to return to the place it knows well ie. body consciousness).

62
मूळ

ऐसीं सांकडीं दोहीकडे । तेथें प्रस्तावा घडे । नीच यातीस गुरुच न घडे । याकारणें ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

खालच्या जातीचा गुरु केला तर अशी दुहेरी अडचण होते. त्यामुळे पश्र्चाताप करण्याचा प्रसंग येतो. या कारणाने कनिष्ठ जातीला वरच्या जातीच्या गुरुत्वाचा अधिकार नाही.

English meaning

When there is this confinement of mula maya and mula purush then, there is only regrets `there'. But by means of this `I am', the guru of this inferior caste (ie. your confused and doubting mind) is not touched.

63
मूळ

तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३ ॥

मराठी अर्थ

हें सगळे जरी खरे तरी एखाद्यास कनिष्ठ जातींतील गुरु आवडला, तर त्याने एकट्याने भ्रष्ट व्हावे. पण आपल्या बरोबर अनेकांना भ्रष्ट करु नये.

English meaning

And if one is still fond of remaining a jiva then, you are only deluding yourself. Then this `all' has been deluded by the mind and that thoughtless swarup has been spoiled.

64
मूळ

आतां असो हा विचारु । स्वयातीचा पाहिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥

मराठी अर्थ

आतां हे जातीच्या गुरुचे विवेचन पुरे. गुरु आपल्या जातीचा असावा नाहींतर निश्र्चितपणे भ्रष्टाचार घडतो.

English meaning

Now that this `I am' understanding has come, let there be that thoughtless essence. Therefore the guru should be of your own caste (you are a brahmin; this is sadguru's teaching). If not, then you are sure to get deluded (how can a guru take you to Reality if he does not know Reality?).

65
मूळ

जे जे कांहीं उत्तम गुण । तें तें सद्गुरुचें लक्षण । तथापि सांगो वोळखण । होये जेणें ॥ ६५ ॥

मराठी अर्थ

सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरु लक्षण म्हणून मानावयास हरकत नाही. तरी सद्गुरुची बरोबर ओळख होण्यास इतर गुरुंबद्दल माहिती सांगणे जरुरचे आहे.

English meaning

This `all' of mula maya is the superior guna (ie. pure sattwa guna) and it is the attention of the attentionless sadguru. And that thoughtless sadguru can only be reco- gnised by means of this thought `I am'.

66
मूळ

येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु । येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६ ॥

मराठी अर्थ

एक नुसता गुरु, तर एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु तर एक तंत्रगुरु असतो. एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात.

English meaning

That One has become the gurus; some gurus give mantra; some gurus teach yantra (symbolic representations of gods) and some teach rituals and actions related to sacri- fices etc. (tantra). Some gurus teach the physical arts like dance and music etc. and some are even called the guru of the King by the people of this world.

67
मूळ

येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु । येक असद्गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७ ॥

मराठी अर्थ

एक कुलगुरु तर एक मानलेला गुरु असतो. एक अविद्या म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा गुरु तर एक खोटा गुरु तर एक जातीचा शिक्षा देणारा गुरु असतो.

English meaning

Some are the family gurus; some are the gurus so decided by their disciples. Some gurus teach the various knowledges and some teach harmful knowledge. Some claim to be sadguru but they are false gurus; some are the gurus of a particular caste and they are deemed fit to pass judgement and punishment.

68
मूळ

येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु । येक बोलिजे जगद्गुरु । सकळकळा ॥ ६८ ॥

मराठी अर्थ

एक मातागुरु तर एक पिता गुरु असतो. एकराजाचा गुरु तर एक देवांचा गुरु असतो. ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरु म्हणतात.

English meaning

One guru is the mother and one guru is the father; one guru is the king and one guru is God. And the one who speaks this art* of the `all' should be called the jagadguru (guru of the world). *(Art of knowing; forget everything and be He)

69
मूळ

ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु । ऐका तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९ ॥

मराठी अर्थ

अशा प्रकारचे हे सतरा गुरु सांगितले. याहून वेगळे आणखी गुरु आहेत त्यांचेही वर्णन ऐका.

English meaning

In this way, that thoughtless swarup has become these seventeen gurus. There are many more gurus other than these also. Therefore listen to this `all' and then that thoughtlessness of paramatma can be understood (therefore leave all other gurus and be that thoughtless Reality as taught by sadguru).

70
मूळ

येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु । येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७० ॥

मराठी अर्थ

एक स्वप्नगुरु तर एक दीक्षा गुरु असतो. कोणी देवाच्या प्रतिमेला गुरु मानतात. कोणी म्हणतात की, ते स्वतःच त्यांचे गुरु आहेत.

English meaning

Some gurus come in dreams; some gurus give initiation. Some say, `The image of god is the guru' and some say, `You yourself are your own guru.'

71
मूळ

जे जे यातीचा जो व्यापार । ते ते त्याचे तितुके गुरु । याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१ ॥

मराठी अर्थ

ज्या जातीचा जो धंदा आहे. तो धंदा शिकवणारा गुरुच मानतात. असा विचार केला तर गुरुंच्या संख्येला शेवटच नाही.

English meaning

Whatever business or occupation one may pursue, that Reality becomes a guru for that particular vocation (body consciousness divides that one Reality). But when you understand that thoughtless state of this thought `I am' then, there is only that vast Supreme Self/paramatma (only the thoughtless sadguru can lead you to that thoughtless stateless state).

72
मूळ

असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु । परी जो मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२ ॥

मराठी अर्थ

असो अशा रीतीनें गुरुंची संख्या व त्यांची निरनिराळी मते आहेत. परंतु मोक्ष मिळवून देणारा गुरु वेगळाच असतो.

English meaning

In this way, that vast thoughtless Self has become the gurus with the `many' under- standings. But that One who is the giver of liberation is quite different, He is sadguru. (There are the `many' gurus; there is the guru who can give this sagun understanding of knowledge and there is sadguru)

73
मूळ

नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । हें सद्गुरुचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानांतून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण व त्यापेक्षाही अज्ञानी जीवांबद्दल दया असणे हे सद्गुरुचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानांत ठेवावे.

English meaning

There are the `many' thoughts and concepts, this pure sattwa guna and that thou- ghtless pure knowledge. Even this `I am' is a blessing bestowed by sadguru. It is the attention of the thoughtless attentionless sadguru and it should be known by the good listener. .