मंत्रांचा — समास 4: उपदेश

Fully populated

Upadesh (Teaching / Spiritual Initiation)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें । सांगता तें असाधारणें । परी कांहीं येक सांगो ॥ १ ॥

मराठी अर्थ

आतां उपदेशाची लक्षणें ऐका. ती नाना तर्‍हेची व पुष्कळ आहेत. परंतु कल्पना येण्यासाठी थोडी सांगतो.

English meaning

Leave your thoughts and listen to this `I am' feeling, for this attention is the only real *teaching/upadesh that there is (remain in this feeling `I am' and it will be your teacher). Tell me, how and who could know all of the `many' different sadhanas and rules? Whatever is explained is on account of that thoughtless Self. Even this knowledge `I am' is being told by the One within this knowledge (the `many' sadhanas and even this `I am' are because you are there ie. that Reality is there). *(A mind that is placed near God)

2
मूळ

बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती । येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २ ॥

मराठी अर्थ

उपदेश देणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्रांचा उपदेश करतात. कोणी नामस्मरण करातम्हणता तर कोणी ॐ काराचा जप सांगतात.

English meaning

It is He who teaches the mantra, `I am' and it is He who tells this *nam-mantra. And it is that One who makes the repetition of this aum. *(maharaj: na-aham means, I am not)

3
मूळ

शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहालक्ष्मीमंत्र । अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३ ॥

मराठी अर्थ

कोणी शिवमंत्र, भवानीमंत्र तर कोणी विष्णु, महालक्ष्मीचा मंत्र, कोणी अवधूत मंत्र, गणेश मंत्र, कोणी मार्तंड मंत्र सांगतात.

English meaning

It is that One who tells the mantra of shiva, of bhavani, of vishnu, of maha-lakshmi, of avadhoot, of ganesha and the mantra of martand.

4
मूळ

मछकूर्मवर्‍हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र । भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४ ॥

मराठी अर्थ

कोणी मच्छ, कूर्म किंवा वराह मंत्र, तर नृसिंह, वामनमंत्र तर कोणी भार्गव, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात.

English meaning

It is that One who tells the mantra of matsya, kurma and varaha (the fish, tortoise and bear are incarnations of vishnu); and the mantra of nrusinha, waman, bhargawa, raghunath and krishna (the other incarnations of vishnu).

5
मूळ

भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र । नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

कोणी भैरव, मल्लारिमंत्र, तर कोणी हनुमान, यक्षिणी मंत्र, नारायण, पांडुरंग मंत्र तर कोणी अघोर मंत्र सांगतात.

English meaning

It is He who tells the mantra of bhairava, mallari, hanumant, yakshini, narayana, pandurang and the aghor-mantra.

6
मूळ

शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमंत्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे॥ ६ ॥

मराठी अर्थ

कोणी शेष, गरुडमंत्र, तर कोणी वायु, वेताळ मंत्र, कोणी झोटिंग असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात.

English meaning

There is the mantra of shesha and garuda and the mantras of the wind and of vetal and zoting (said to be the king of ghosts and zoting is a kind of spirit). There are so many different mantras but understand, they are all being told by Him.

7
मूळ

बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र । बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

कोणी बाळामंत्र, बगुळामंत्र, काळिमंत्र, कंकाळिमंत्र बटुकमंत्र असे नाना शक्तिचे नाना मंत्र सांगतात.

English meaning

There are the mantras of the goddess bala, bagula, kali, kankali and the mantra of batuk. These mantras are so many and they only have the power of the `many' (mantras are made of words and their power is prevalent within this world of names and forms; every word is a mantras; you say, "I am a body" and with that mantra you create so many other mantras or concepts like, "this is a god", "this is a stone", "this is a friend/enemy" etc. Is that not the power of words?)

8
मूळ

पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जितके देव आहेत तितके प्रत्येकाचे स्वतंत्र मंत्र आहेत. त्यांत काहीं सोपे तर कांहीं अवघड आहेत. काहीं बीजमंत्र असतात.

English meaning

By remaining as these separate self-willed forms ("I am so and so") then, wherever there is god, there is a mantra for that god. These empty words cause a multitude of troubles. But understand, space is the origin of all these gross and harsh words (ie. mantras).

9
मूळ

पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी । तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

खरोखर पाहिले तर पृथीवरिल देवांची गणना कोणालाच करता येत नाही. म्हणुन इतके मंत्र वाणीने सांगणे शक्य नाही.

English meaning

As long as objectivity remains then, this knowledge `I am' becomes the counting of so many gods and this knowledge `I am' becomes the `many' mantras of gross spoken words.15 Therefore the `many' thoughts should be made to understand this `I am'.

10
मूळ

असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा । विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १० ॥

मराठी अर्थ

मंत्रमाळा पुष्कळ आहेत. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्य असलेल्या आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्रकळा माणसाला कळणे अशक्य आहे.

English meaning

Within that immeasurable Reality there is a garland of mantras but each mantra has become distinct from the other. Still, understand that these `many' different mantras are known due to this `art' of maya (ie. knowledge and this silent mantra `I am').

11
मूळ

कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती । कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११ ॥

मराठी अर्थ

कांहीं मंत्रांनी भुतें जातात. काहीं मंत्रांनी आजार जातात. कित्येक मंत्रांनी थंडीताप बरा होतो. तर कांहीं मंत्रांनी विंचू, सर्प यांचे विष उतरते.

English meaning

That One within the `many' mantras puts an end to the elements. That One within the `many' mantras puts an end to mental and physical pain. That One within the `many' mantras alleviates the fever from snake and scorpion bites (desires).

12
मूळ

ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं । जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२ ॥

मराठी अर्थ

असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. ते गुरु शिष्याच्या कानांत सांगतात. जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहीती ही सांगतात.

English meaning

Within the `many' kinds of mantras placed in the ears of the recipient there is this teaching, `You are He'. Understand that One who tells us of the various kinds of japa, meditation and puja that take place within this body.

13
मूळ

येक शिव शिव सांगती । येक हरि हरि म्हणविती । येक उपदेशिती । विठ्ठल विठ्ठल म्हणोनी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

कोणी शिव, शिव तर कोणी हरि, हरि तर कोणी विठ्ठल, विठ्ठल म्हावयास सांगतात.

English meaning

It is that One who is telling shiv, shiv; it is that One who says, hari, hari; and it is that One who is teaching us to say, vitthal, vitthal.

14
मूळ

येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्णु विष्णु । येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४ ॥

मराठी अर्थ

कोणी कृष्ण, कृष्ण तर कोणी विष्णु, विष्णु तर अजुन कोणी नारायण, नारायण म्हणायचा उपदेश देतात.

English meaning

It is that One who is telling krishna, krishna; it is that One who is telling, vishnu, vishnu; and it is that One who is teaching us to say narayana, narayana.

15
मूळ

येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत । येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

कोणी म्हणतात अच्युत, अच्युत म्हणा, तर कोणी अनंत, अनंत; तर कोणी दत्त दत्त म्हणावे असे सांगतात.

English meaning

It is that One saying achyut, achyut; it is that One saying anant, anant; and it is that One who is telling us to say, datta, datta.

16
मूळ

येक सांगती राम राम । येक सांगती ॐ ॐम । येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

कोणी राम राम; कोणी ॐ ॐ; तर कोणी मेघशामाचे अनेक नांवांनी स्मरण करावे.

English meaning

It is that One who is telling ram, ram; it is that One who is telling aum, aum; and it is that One saying *meghashyam, meghashyam and it is that One who says, this `I am' should be remembered. *(krishna)

17
मूळ

येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्र्वरु । येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७ ॥

मराठी अर्थ

कांही म्हणतात गुरु गुरु; कांहीं सांगतात परमेश्र्वर; तर कोणी विघ्नहर्त्या गणेशाचे चिंतन करावयास सांगतात.

English meaning

It is that One telling guru, guru; it is that One saying parameshwara; and it is that One who is saying *vighna-haru should be kept in the mind. *(ganesh, destroyer of calamity)

18
मूळ

येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज । येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

कोणी शामराज, कोणी गरुडदध्वज, तर कोणी अधोक्षज म्हणावे असे सांगतात.

English meaning

It is that One telling shyam-raj; it is that One telling garuda-dhwaj; and it is that One that tells us to say adhokshaj.

19
मूळ

येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव । येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

कोणी देव देव; तर कोणी केशव केशव तर कोणी भार्गव भार्गव म्हणावयास सांगतात.

English meaning

It is that One who is telling dev, dev; it is that One who says keshav, keshav; and it is that One who says, you should say bhargava, bhargava.

20
मूळ

येक विश्र्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती । येक ते जप करविती । तुकाई तुकाई म्हणौनी ॥ २० ॥

मराठी अर्थ

कोणी विश्र्वनाथ, तर कोणी मल्लारि, कोणी तुकाई तुकाऊचा जप करावयास सांगतात.

English meaning

It is that One saying vishwanath; it is that One who is telling mallari and it is that One who is making japa and saying tukai, tukai.

21
मूळ

हे किती म्हणौनि सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें । इच्छेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१ ॥

मराठी अर्थ

भगवंताची नावें हे कितीतरी मंत्र आहेत. ते किती सांगावे. शिवशक्तींची नांवे असंख्य आहेत. ज्या गुरुला जे नांव आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो.

English meaning

That thoughtless swarup has become the many mantras and therefore that One should be understood. By means of this `I am' you will come to understand that endless swarup that resides within this `I am'. When this spontaneous `I am' comes upon its own self then, this should be known as the guru's teaching/upadesh.

22
मूळ

येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी । येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२ ॥

मराठी अर्थ

कोणी चार मुद्रा खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी कराव्या असे सांगतो. तर कोणी निरनिराळी आसनें करावी म्हणून सांगतो.

English meaning

It is that One who tells of the four mudras (yogic gestures) khechari, bhoochari, chachari and agochari; and it is that One who teaches the various asana/ postures.

23
मूळ

येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी । येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३ ॥

मराठी अर्थ

कोणी अतिंद्रिय प्रकाश दाखवितात. कोणी अनाहत ध्वनी ऐकवितात. कोणी शरिराचे ज्ञान देतो.

English meaning

It is that One who reveals the hidden treasure (`I am' or aum) and that One is this sound aum that is heard within (He is the knower and the known, other than Him there is nothing). That One is the guru who has knowledge of the pinda/body and that One is the guru who shows us that this knowledge of the pinda is Himself only.

24
मूळ

येक सांगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग । येक सांगती अष्टांग । नाना चक्रें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

कोणी कर्ममार्गाचा, तर कोणी उपासनेचा मार्ग, तर अजुन कोणी अष्टांगयोग सांगतात व सात चक्रांचे भेदन शिकवतात.

English meaning

It is that One who tells of the path of action/karma; it is that One who is this path of worship (`He does everything'); it is that One who tells of the eight-fold yoga and the many whirling realms of the mind.

25
मूळ

येक तपें सांगती । येक अजपा निरोपिती । येक तत्वें विस्तारिती । तत्वज्ञानी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

कोणी तपें करावयास सांगतात. कोणी अजपाजप करावयास सांगतात. कोणी तत्वचिंतक विश्र्वाच्या मूलतत्वाची विस्तारानें चिकित्सा करतात.

English meaning

It is that One who tells of the austerities; it is that One who gives the discourse on ajapa (see 17.5, the silent continuous support of japa); it is that One who has expanded due to the gross elements and it is that One who is the Knower of these gross elements (ie. this world of names and forms).

26
मूळ

येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण । येक उपदेशिती तिर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६ ॥

मराठी अर्थ

कोणी सगुणाचा तर कोणी निर्गुणाचा उपदेश करतात. कोणी तीर्थयात्रा कराव्या असे सांगतात.

English meaning

It is that One alone who tells of this sagun (`I am everywhere') and it is also that One who gives the discourse of the nirgun (I do not exist); it is that One who teaches about these sacred places (sagun and nirgun) and says, "You should make your pilgrimages there."

27
मूळ

येक महावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती । येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनि ॥ २७ ॥

मराठी अर्थ

चार वेदांतील चार महावाक्ये त्यांचाजप करावा असे कांहीं सांगतात. तर कोणी सर्व जे कांहीं आहे ते ब्रह्मच आहे असा उपदेश करतात.

English meaning

It is that One who is telling the great vedic statements (mahavakyas eg. aham brahmasmi `I am brahman') and He says, "Your japa should be, I am That." It is that One alone who gives this teaching and says, "This `all' is brahman." (He teaches this sagun and then that nirgun)

28
मूळ

येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती । येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

कोणी शाक्तमार्ग सांगतात. कोणी मुक्तमार्ग म्हणजे स्वैराचाराने वागण्यास सांगतात. तसेच इंद्रियांची पूजाही करुन घेतात.

English meaning

It is that One who tells of this path of shakti (`I am the power/I do everything'); it is that One who establishes this `I' and it is He who remains on this path to liberation. And it is that One who destroys the sense organs with His understanding (other than myself there is nothing).

29
मूळ

येक सांगती वशीकर्ण । स्तंवन मोहन उच्चाटन । नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९ ॥

मराठी अर्थ

कोणी वशीकरण सांगतात. स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची नाना चेटकें उपदेशीतात व करवून घेतात.

English meaning

It is the One who explains mesmerism/hypnotism (being deluded by `many' names and forms); and it is that One who tells you how to be still and silent. It is that One alone who distracts, captivates and turns one into an idiot who leaves His own abode (Self). It is that One who is this ever present discourse of `I am' and it is that One who by His sorcery makes you become a mind full of many thoughts. (There is that One only and He becomes the `I am' and He assumes the many forms and concepts)

30
मूळ

ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती । ऐसे हे उपदेश असती । असंख्यात ॥ ३० ॥

मराठी अर्थ

उपदेशांची अवस्था ही अशी आहे. असे असंख्य उपदेश आहेत. ते किती म्हणून सांगावेत ? हे आतां पुरे झाले.

English meaning

This teaching of `I am' has become the `many' teachings. Therefore understand that they are all made by that One only. Then the teaching is of that thoughtless and immeasurable swarup.

31
मूळ

ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेंविण निरार्थक । येविषईं असे येक । भगद्वचन ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

उपदेशाचे असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञानावाचून त्यांना कांहीं अर्थ नाही. याबद्दल एक भगवद् वचन आहे.

English meaning

There are so many different kinds of teaching but without this understanding of knowledge, they are devoid of meaning and empty (`I am' is their base, you are always there; whether a teaching is accepted or rejected, still you are there).16 That One is the 16Siddharameshwar maharaj-By knowing that one skill of the Ultimate Accomplishment, one gets the essence of this `I am'; He is God and this divine `word' has come from Him.

32
मूळ

या कारणें ज्ञाना समान । पवित्र उत्तम न दिसे अन्न । म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

या कारणासाठी आत्मज्ञानासारखें पवित्र दुसरें कांहीं नाही. म्हणून आधी आत्मज्ञान समजून घेतले पाहीजे.

English meaning

On account of this `I am', there is this knowledge where differences do not remain. That is the best purifier, for it sees with equal vision. Therefore, one must acquire this knowledge of the Self/atma-gnyan that is at the source.

33
मूळ

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।. येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

सर्व उपदेशांमध्ये आत्ज्ञानाचा उपदेश सर्व श्रेष्ठ आहे. याबद्दल भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे.

English meaning

Within the knowing of this `all' there is that knowledge of the Self/atma-gnyan. It is on account of that `Lord of the world' (ie. Self) that there is this meeting place and this `speech' of `I am' (acute discrimination is required to separate that Knower/purush from this known/prakruti; then only will the knowledge of Self be gained).

34
मूळ

आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा । प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

चार तोंडांच्या ब्रह्मदेवालासुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाहीतर मग गरीब जीवात्म्याला तो कसा समजणार.

English meaning

*brahma, the four-faced god does not know the greatness of atma- gnyan/Self-knowledge. So, how can a poor confused jiva in the prana know this? *(His four faces are the four kinds of birth. He is said to be the creator of this world. It means he is the intellect and as such, whatever name he gives to that Self, that it becomes)

35
मूळ

सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती । त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादि सर्व साधनांनी मिळविलेले पुण्य पुष्कळ असते. पण आत्मज्ञानाची पुण्याई या सर्वांहून कोटीगुणांनी अधिक असते.

English meaning

The company of this sacred place `I am' is gained by giving up of the gross and bathing in these waters of knowledge. And greater than this state of the pure sattwa guna is that pure knowledge of the atma (ie. no-knowledge).

36
मूळ

म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

म्हणून गहनाहून गहन, अत्यंत गूढ असें जें आत्मज्ञान त्याचें लक्षण आतां सांगतो.

English meaning

When this `I am' of mula maya gains that Self-knowledge/atma-gnyan then, there is that Reality, the secret of secrets. But first listen to this `I am' and then that, pure knowledge will be understood. .