मंत्रांचा — समास 6: शुद्धज्ञाननिरुपण

Fully populated

Shuddha Dnyana Nirupan (A Discourse on Pure Knowledge)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ॥ १ ॥

मराठी अर्थ

शिष्या, ब्रह्मज्ञानाचे लक्षण ऐक. आपलें खरे स्वरुप पहाणें याचें नां ज्ञान होय.

English meaning

Leave the thoughts and listen. This attention is knowledge. But pure knowledge means Self-knowledge/atma-gnyan. When you understand yourself then, this `I am' disappears and pure knowledge remains.

2
मूळ

मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरुप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नाव ज्ञान ॥ २ ॥

मराठी अर्थ

मुख्य देव जो ईश्र्वर त्याला जाणावे. आपल्यांतील खरा मी तो आपलें खरें स्वरुप. तें ओळखावेआणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे नक्की करावे. याला ज्ञान म्हणतात.

English meaning

That Supreme God should be known; that true swarup should be recognized. When there is the thoughtlessness of that which is Eternal then, this `I am' becomes pure knowledge.

3
मूळ

जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे । समूळ द्वैत निवारे । या नाव ज्ञान ॥ ३ ॥

मराठी अर्थ

ज्या अवस्थेंत प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा खेळ संपतो, आणि मी-तू पणाचे द्वैतभेद संपतो, त्याला ज्ञान म्हणतात.

English meaning

Where this visible prakruti ends and the whole creation of the five elements is dissol- ved; where duality is totally negated then, this `I am' has become that pure knowledge.

4
मूळ

मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहूनि पर । या नाव ज्ञान ॥ ४ ॥

मराठी अर्थ

जो अनुभव मन व बुद्धि यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेंत येत नाही, परावाणीच्या पलीकडे तो आहे. त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात.

English meaning

That is beyond the mind and intellect/buddhi; that cannot be understood by logic. When there is that which is beyond this utterance `I am' of this para speech then, there is pure knowledge.

5
मूळ

जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान । विमळ शुद्ध स्वरुपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

जेथें दृश्याचे भान संपूर्ण नाहीसे होते, जेथें मी जाणतो, मला ज्ञान आहे ही जाणीव अज्ञान समजलें जाते, असें अत्यंत मलरहित, शुद्ध जें स्वरुपभान त्याला ज्ञान म्हणतात.

English meaning

That has no awareness of this visible maya and when this knowing of maya ap- pears then, that thoughtless swarup has become ignorant. Then that pure swarup of knowledge is called this `I am'.

6
मूळ

सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६ ॥

मराठी अर्थ

तूर्या ही चौथी अवस्था सर्वसाक्षिणी असते. म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात. परंतु त्या अवस्थेंत साक्षित्वानें पदार्थज्ञान असते. यामुळें तें पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही.

English meaning

This is the turya state. This is the witnessing of this `all' and it is said to be that pure knowledge. But one should know that then that Reality has become this worthless knowledge of an object (ie. the object being this `all' of knowledge).

7
मूळ

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरुप जाणिजे । या नाव स्वरुपज्ञान ॥ ७ ॥

मराठी अर्थ

पदार्थज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणें होय. दृश्यरहित शुद्ध स्वरुप जाणणें याचें नाव आत्मज्ञान होय.

English meaning

When this visible `all' is recognised then this should be known as objective knowledge. However, when that pure and alone swarup is understood then, this `I am' (objective knowledge) has become the (objectless) knowledge of the swarup.

8
मूळ

जेथें सर्वचि नाहीं ठाईचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचे । म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८ ॥

मराठी अर्थ

ज्या आत्मस्वरुपाचें ठिकाणी स्वरुपाशिवाय कांहींच उरत नाही, तेथें सर्वसाक्षीपणा असोों शकत नाही. म्हणुन तुर्येमध्यें होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानूं नये.

English meaning

Originally this `all' of maya was also not there. Therefore how can the Witness of this `all' within that Reality be true? Therefore the turya state should not be regarded as pure knowledge.

9
मूळ

ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणौनि शुद्ध ज्ञान तें सतंत । वेगळेंचि असे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानमध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळतें. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे. निराळेच आहे.

English meaning

Knowledge means non-duality and turya is the experience of duality. Therefore that Eternal pure knowledge is quite different.

10
मूळ

ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरुपची आपण । या नाव शुद्ध स्वरुपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

शुद्ध ज्ञानाचें लक्षण ऐक. जें शुद्ध परमात्मस्वरुप आहे, तेंच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचें नांव शुद्ध स्वरुपज्ञान होय. हे श्रोत्यांनी समजून घ्यावे.

English meaning

When you listen to this `I am' then, that pure attentionless knowledge has become an attention. Then that pure swarup has become you (`I am there'). This `I am' within the listener should know that pure knowledge.

11
मूळ

माहंवाक्य उपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला । तेथील तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. पण त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकानें महावाक्यांच्या अर्थाचा विचार करणें आवश्यक आहे.

English meaning

The four great statements of the vedas (eg. tattwamasi- `You are He') are wise teachings/upadesh that are to be understood and not taken as a japa/repetition. And once understood the sadhak has to understand, I do not exist.

12
मूळ

माहांवाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपे अंधकार । न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

महावाक्यांमध्यें परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे. हे निःसंशय पण त्यांचे मननच केले पाहिजे. जप केल्यानें अज्ञानाचा अंधकार नाहीसा होत नाही.

English meaning

There are the great statements (`I am') and the essence of this upadesh/teaching is, I do not exist. But that thoughtless understanding has to be accepted; it is of no use merely repeating these, for the darkness of illusion will not be dissipated.

13
मूळ

माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां । त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३ ॥

मराठी अर्थ

महावाक्यांचा नुसता अर्थ घेतला, तरी आत्मा ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहे. आणि आपण वास्तविक आत्मस्वरुप आहोत. या महावाक्यांचा जप केल्याने कांहीं आत्मज्ञान होत नाही. उगाचच शीण मात्र होतो.

English meaning

Accept the *meaning of the mahavakyas; you are truly that non-dual Self only. But it is a useless labour to make the repetition of these statements. *(maharaj- the meaning is paramatma)

14
मूळ

माहावाक्याचें विवरण । हें मुख्य ज्ञानाचे लक्षण । शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुच आहे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

माहावाक्यांचे उपदेश असा आहे. मी देह नसून आत्माच आहें, आणि आत्मा ब्रह्मस्वरुप असल्यानें मी ब्रह्मस्वरुप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे.

English meaning

When these great statements are investigated then, this knowledge of `I am' becomes that thoughtless Supreme. When the essence of the meaning is extracted then, you are the Self only.

15
मूळ

आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ । जें आदिअंतीं स्वयंम । स्वरुपचि स्वयें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

हा आपला आपणालाच होणारा लाभ आहे. हें आत्मज्ञान फार दुर्लभ आहे. जें आधी व नंतरही स्वतः स्वरुपच असते.

English meaning

You have attained Yourself, that thoughtless knowledge, the was most difficult to attain. Then this maya of `I am', from the beginning to the end, is that Self-existent and natural swarup.

16
मूळ

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणी सकळ ही जेथें आटे । तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्या ठिकाणाहून हे प्रगट होते व जेथे सर्व नाहीसे होते, ते ज्ञान झाल्यावर सर्व बंधनांपासून सुटका होते.

English meaning

In maya that thoughtless Self has become manifest as the `all' and so this `all' of maya will also get dissolved. When that pure knowledge comes, it breaks this binding of delusion.

17
मूळ

मते आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें । अति सूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७ ॥

मराठी अर्थ

जेथेसर्व मते व मतांतरे निर्विकार होतात आणि सूक्ष्मत्वाने विचार केल्यावर सर्व एकच आहे हे पटते. तेच आत्मज्ञान होय.

English meaning

Dogmas and diverse opinions are on account of that unmodified brahman appearing `here'. And when there is that most subtle and thoughtless understanding then, you will come to understand Oneness (ie. the unmodified brahman).

18
मूळ

जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरुप निर्मळ । या नाव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

वेदांच्या मताप्रमाणे जें या चराचराचे मूळ आहे. ते केवळ शुद्ध, निर्मळस्वरुप आहे. यालाच ज्ञान म्हणतात.

English meaning

When this maya, the root of the animate and inanimate creation, is that pure swarup without any stain then, this `I am' is that pure knowledge. Such an understanding is called vedanta.

19
मूळ

शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान । या नाव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९ ॥

मराठी अर्थ

वेदांच्या मते आपण कोठून आलो, याचा शोध घेता घेता सहजच अज्ञान नष्ट होते. हेच ते मोक्ष मिळवून देणारे ब्रह्मज्ञान होय.

English meaning

When you search for the place of your own origin, then ignorance flies away and what remains is that natural state. Then this `I am' has become the knowledge of brahman/brahman-gnyan; the giver of Final Liberation.

20
मूळ

आपणासि वोळखों जातां । आंगी बाणे सर्वज्ञता । तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २० ॥

मराठी अर्थ

आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा विचार करता, आत्मज्ञान होते. आात्मा सर्वव्यापी असल्यानें आपण आत्मज्ञानामुळें सर्वज्ञ होतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे आसा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकुंचित वृत्ती लोप पावते.

English meaning

You recognise Yourself when that Knower of this `all', within this `all', is met. Then the rumour of that Reality being limited is totally nullified. (ie. you are that indestructible Self that takes the role of the Witness/Knower when there is something to be witnessed/known; otherwise He is happy in His own Self)

21
मूळ

मी कोण ऐसा हेत । धरुन पाहातां देहातीत । आवलोकितां नेमस्त । स्वरुपचि होये ॥ २१ ॥

मराठी अर्थ

" मी कोण आहे " आसा हेतु मनांत बाळगुन जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असलेल्या मीला पाहता पाहता आपण निश्र्चितपणे आत्मस्वरुपच होतो.

English meaning

When you investigate `Who am I?' then, this original inspiration, `I am' is come upon. When you hold steady to this then, there comes the understanding that is beyond all the four bodies. When that is clearly understood then, there is only that swarup.

22
मूळ

असो पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञाने पैलपार । पावले ते साचार । ऐक आतां ॥ २२ ॥

मराठी अर्थ

असो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारांतून पार पडले, ते आता ऐका.

English meaning

The Greatest of the great is and was always there. But it is due to this knowledge of `I am' that, that other shore is reached and that Truth attained. Therefore listen now to this `I am' (ie. forget everything)

23
मूळ

व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी । जनकादिक माहांज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

महामुनि वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद, महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानाने मोठेपणास पोहोचलें.

English meaning

There were the great sages like vyas and vasishtha; shuka and narada were in that complete contentment; there were the great gnyanis, like King janaka who attained that thoughtless knowledge.

24
मूळ

वामदेवादिक योगेश्र्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्र्वर । शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

वामदेवादि योगेश्र्वर, वाल्मिकि, अत्री ऋषीश्र्वर, शौनकादि हे सर्व वेदान्त तत्वज्ञााचे रहस्य जें आत्मज्ञान त्यानेंच परमपदाला पोहोचलें.

English meaning

There were the great Masters of yoga like vamadev; the lords of the rishis like valmiki and atri; and there were those like shaunak who achieved that essence of Oneness due to the understanding of vedanta (ie. the end of knowing).

25
मूळ

सनकादिक मुख्य करुनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५ ॥

मराठी अर्थ

सनकादि थोर ज्ञानी आणि आदिनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ हे नाथपंथीय योगी आणखी असंख्य महात्मे आत्मज्ञानानेच समाधानी झाले.

English meaning

sanaka and others where in that Supreme knowledge; there was adinath, mat- syendranath and gorakshamuni. Now if you understand this `I am', then there can be that unfathomable knowledge that is within this divine `word'.

26
मूळ

सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६ ॥

मराठी अर्थ

मोठमोठे सिद्ध, मुनि, आणि माहानुभाव या सर्वांच्या अंतरंगांत जी अवस्था म्हणजेच आत्मज्ञान. ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेवही निरंतर डोलत असतो.

English meaning

There is the siddha, muni and the great experienced and there is that purush with this inner understanding of the `all'. And it is due to this `I am', that mahadev/shiva is always nodding in satisfaction.

27
मूळ

जें वेदशास्त्रांचे सार । सिद्धांतधादांत विचार । ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७ ॥

मराठी अर्थ

जें आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जें योग्य प्रमाणांनी निश्र्चित केलेले आहे, जें साक्षात् अनुभवाला येते. आणि जें अति सूक्ष्म विचारांती योग्य ठरतें, तें आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते.

English meaning

When this `I am' of the *vedas and shasthras becomes that thoughtless essence, I do not exist, then that is called siddhant/Final Truth and that is direct Self-experience. This greatest of fortune is gained by the one with sincere devotion. *(The scriptures can teach this much, You are That, or neti, neti)

28
मूळ

साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें सांगिजेल आतां ॥ २८ ॥

मराठी अर्थ

पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले, व पुढें होणारे सर्व साधुसंत आणि सज्जन यांचें गुप्त असलेले असें जें आत्मज्ञान, तें आतां मी सांगतो.

English meaning

The sadhus, Saints and sajjanas, in the past, the present and the future, have this hidden knowledge of this `all'. Now leave off the thoughts, remain in this understanding and this `all' will be dissolved.

29
मूळ

तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें । पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥

मराठी अर्थ

तीर्थयात्रा, व्रतें, तप, दान, धुम्रपान, पंचाग्नि साधन, गोरांजनें या साधनांनी आ्मज्ञान प्राप्त होत नाही.

English meaning

That `all' cannot be gained by pilgrimage, taking vows, performing penance; it cannot be gained by being charitable or by harsh tortures like inhaling smoke. By meditating within the five fires or eating the stones from the bladders of cows, this `all' cannot be gained.

30
मूळ

सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ । जेणे संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञान हेंच सगळ्या परमार्थसाधनेचे फळ आहे. तेंच ज्ञानाची परमावधि आहे. त्यामुळें संशयवृत्तीचे मूळच नष्ट होते.

English meaning

This `all' is the fruit of sadhana and the zenith of this knowledge is that pure knowledge (no-knowledge). Then this `all', the root and original doubt (ie. mula maya) is uprooted totally.

31
मूळ

छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरु वेदांत । या इतुकियां गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

जगांत कितीतरी भाषा आहेत. प्रत्येक भाषेमध्यें कितीतरी ग्रंथ आहेत. या सर्वांचा खोल अर्थ एकच आहे. आणि तो म्हणजे आत्मज्ञान होय.

English meaning

There are fifty-six languages and many spiritual texts in all of these languages. And within these languages there is vedanta. It contains the secret meaning of this `word' and it is that One Self only.

32
मूळ

जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

पुराणांचा अभ्यास करुन आत्मज्ञान प्राप्त होत नाही. तें ज्ञान सांगतांना वेद थकले. असें आत्मज्ञान आतां या क्षणीं गुरुकृपेने समजावून देतो.

English meaning

This maya within that ancient One should not be known. This `I am' of the vedas is maya and it will disappear. Now, that Reality can be understood at this very moment, by the grace of guru.

33
मूळ

पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मर्‍हाष्ट ग्रंथी । हृदईं वसल्यां कृपामूर्ती । सद्गुरुस्वामी ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

श्री समर्थ सांगतात की, संस्कृत ग्रंथांत काय आहे ते आपण पाहिले नाही. मराठी ग्रंथांत आपला प्रवेश नाही. पण आपल्या हृदयांत सद्गुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणें राहिली आहे.

English meaning

In sanskrit it is not understood and there is no access to this in the marathi text. But in my heart stays this `I am', this image of grace and sadguru swami. (Note: within the `many' languages there is this unspoken language language, `I am'. gurus and the vedas can give this understanding of `I am'/knowledge but only sadguru can give the understanding, I do not exist or no-knowledge).

34
मूळ

आतां न लगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदईं वसे ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

आतां संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाची गरज काय ? माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयांत बसलेला आहे.

English meaning

Now (that this `I am' understanding has come) sanskrit is not required nor the compositions of common language. For swami, along with His grace, is abiding in my heart.

35
मूळ

न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवण सायास । प्रेत्नेंविण सौरस । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

वेदांचा अभ्यास न करतां, अथवा श्रवणाचे कष्ट न घेतां, मला अगदी प्रयत्नांवाचून सद्गुरुकृपा लाभली आहे.

English meaning

Without the study of the vedas or even the effort of listening/shravan; without any effort whatsoever there is the sweetness of sadguru's grace.

36
मूळ

ग्रंथ मात्र मर्‍हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

मराठी भाषेंत ग्रंथ आहेत. पण संस्कृतमधले ग्रंथ त्याहून श्रेष्ठ आहेत. त्या संस्कत ग्रंथामधेही वेदांतावरील ग्रंथ सर्व श्रेष्ठ आहेत.

English meaning

sanskrit may be considered greater than these marathi scriptures. But when that thoughtless brahman within sanskrit is understood then, that is vedanta.

37
मूळ

त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाही । जेथें वेदगर्भ सर्व ही । प्रगट जाला ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

वेदान्तापेक्षां दुसरें कांहीं श्रेष्ठ नाही. कारण वेदांचे सारें रहस्य वेदान्तामध्ये प्रगट झाले आहे.

English meaning

Other than that vedanta there is this `all' and this is definitely not superior to vedanta (end of knowing/no-knowledge). maya is the womb of the vedas and this `all' was born from her.

38
मूळ

असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचा हि मथितार्थ । अति गहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

असो. अशा वेदान्ताचा जोतात्पर्यार्थ आहे. तसेच अति गहन जो परमार्थ आहे. तो आतां तूं ऐक.

English meaning

The purush is vedanta and that vedanta is the result of careful thinking. The purush is that most hidden and that is paramarth, the Ultimate accomplishment and That you are. Therefore now listen.

39
मूळ

अरे गहनाचें ही गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन । सद्गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

अतिशय खोल व अर्थगंभीर असें फक्त सद्गुरु वचनच आहे. या वचनाने निश्र्चित समाधान मिळते.

English meaning

My dear, the most hidden of the hidden is that thoughtless swarup. Know that you are the divine `word' of sadguru (first sadguru tells you that you are knowledge). And due to sadguru's divine `word' there is that thoughtless samadhan.

40
मूळ

सद्गुरुवचन तोचि वेदांत । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४० ॥

मराठी अर्थ

सद्गुरुवचन म्हणजेच खरा वेदान्त व तोच सिद्धान्तही आहे. तें वचन हेंच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय.

English meaning

Then this divine `word' of sadguru is vedanta; then this divine `word' of sadguru is siddhanta (non-dual Truth); then this divine `word' of sadguru is dhadanta (one's own indisputable Self-experience). Therefore now, let there be this pure experience.

41
मूळ

जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन । जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

माझ्या सद्गुरुचे जे वचन आहे तें अतिशय खोल अर्थाने भरलेले आहे. त्या वचनानें माझे पूर्ण समाधान झालें.

English meaning

Then this divine `word' of my swami is that most hidden, I do not exist. Due to my `I am-ness', that highest samadhan has been attained.

42
मूळ

तें हे माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतो तुज । जरी अवधान देसी मज । तरी आतां ये ची क्षणीं ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

तें वचन माझ्या जीवाचे रहस्य आहे. तें मी तुला सांगेन. माझ्या सांगण्याकडे तूं लक्ष दिलेस तर तें याच क्षणीं तुला सांगतो.

English meaning

That thoughtless swarup is the secret of my living. And I will tell that to you. If you give your complete attention to me, then now in this `I am' there will be that thoughtless, I do not exist.

43
मूळ

शिष्य म्लान्यवदनें बोले । धरिले सदृढ पउलें । मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

शरणागत होऊन शिष्याने श्री समर्थांचे पाय घट्ट धरले. आणि तो दीनमुखानें म्हणाला की, मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. मग गुरुदेवांनी सांगण्यास सुरवात केली.

English meaning

The shishya was speaking this `I am' softly and he held firmly to His Master's feet (ie. His understanding). Then gurudev started to speak.

44
मूळ

अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्यें । तो ही सांगतो ऐक्य । गुरुशिष्य जेथें ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

" अहं ब्रह्मास्मि " हें महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. तें मी समजावून सांगतो. त्या अर्थामध्यें गुरु व शिष्य दोघे एक होऊन जातात.

English meaning

`I am brahman' (aham brahmasmi) is one of the great statements of the vedas and its meaning defies the logic of maya. That tells of the Oneness between the guru and shishya.

45
मूळ

ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । ये विषईं संदेह भ्रम । धरुंचि नको ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

शिष्या या महावाक्यांतील मर्म ऐक. तूं स्वतः ब्रह्मरुप आहेस. याबद्दल किंचितही संशय बाळगु नकोस. त्याविषयीं भ्रम धरु नकोस.

English meaning

My dear shishya listen and then you will understand that essence that is beyond maya. `You only are that natural, effortless brahman.' Regard that thoughtless Self and do not keep this delusion of having a body.

46
मूळ

नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

भक्तीचे नऊ प्रकार मागें सांगितले. त्यापैकी आत्मनिवेदन हा मुख्य भक्तीचा प्रकार आहे. तें आतां संपूर्णपणें वर्णन करतो.

English meaning

There are nine forms of bhajan and within them the greatest is the offering of this `I' to that Self/atma. This will now be performed by means of this `I am'.

47
मूळ

निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें । प्रकृति पुरुष जीयें । ते ही ब्रह्म होती ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

विश्व निर्माण होते तेव्हा पंचमहाभूतें क्रमाने निर्माण होतात. व विश्वाच्या कल्पान्ती तीही त्याच क्रमाने नष्ट होतात. इतकेंच नव्हे तर उरणारी प्रकृति आणि पुरुष तीं देखिल परब्रह्मांत विलीन होतात.

English meaning

The five great elements were created and these are destroyed, one after another, when an end is brought to imagining/conceptualisation. Then the prakruti and purush becomes that thoughtless brahman (when the known does not remain then there is no need of a Knower and the non-dual thoughtless is).

48
मूळ

दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरुपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीने सर्व दृश्य वस्तु नाश पावल्या म्हणजे वास्तविक मी पणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळांतच परमात्मा एकरुप असल्यानें एकरुप होण्यास निराळें कांहीं करावेंच लागत नाही.

English meaning

When this perceptible prakruti is dissolved then in truth you also do not remain. First understand this `I am' of prakruti/purush and then that Oneness of non-duality at the root.

49
मूळ

सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता । पिंड ब्रह्मांड पाहो जातां । दिसेल कोठें ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

सर्व सृष्टी मूळ स्वरुपांत विलीन झाल्यावर मग ते एकस्वरुप ब्रह्मच तेवढें उरते. त्यामध्येम पिंड व ब्रह्मांड यांना पहावयाचे म्हटले तरी ते आढळणार नाहीत.

English meaning

Then there is no rumour of the gross creation and there is Oneness at the root. If then one wants to know the pinda and brahmanda, then where will one look?

50
मूळ

ज्ञानवन्ही प्रगटे । तेथे दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५० ॥

मराठी अर्थ

ज्ञानाचा वन्ही पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून नष्ट होतो. ज्ञाता स्वतः ज्ञानरुप झाल्यावर वेगळेपणाचें मूळच जळून जातें.

English meaning

When the fire of Self-knowledge burns then the refuse of the visible is burnt away and the root of separateness is uprooted due to no-otherness.

51
मूळ

मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे । सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व हें खोटे आहे हे पटले की वृत्ती पालटून हृदयांतील आत्मस्वरुपाकडे धांव घेऊ लागली कीं, दृश्य असोोन सुद्धा नसल्यासारखें होते व आपॉपच आत्मनिवेदन होते.

English meaning

Due to the falsity of everything, this `I am' turns within and when this visible is made to nothing, that Knower is realized (the visible is there but it is not touched; you understand it is as false as a dream). This is natural and thoughtless and this is the `surrender to the Self/atma'.

52
मूळ

असो गुरुचे ठाईं अनृदयांन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता । वेगळणे अभक्त । उरेंचि नको ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

असो, जो शिष्य आपल्या गुरुशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याचे कारण नसते. शिष्याचे जीवन सद्गुरुमय झाल्यानें आत्मनिवेदनासाठी आणखी वेगळें काहीं करावे लागत नाही.

English meaning

It is like this! This place of the guru is no-otherness, so how can `you' think there? You should not remain as a non-devotee by staying separate.

53
मूळ

आतां हेंचि दृढीकर्ण । व्हावया करी सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

असें आत्मनिवेदन एकदम साधत नाही. तें दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सद्गुरुचें चरित्र, गुण, महिमा, रुप इत्यादिंचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करुन त्यांचा अर्थ पुनः पुनः मनांत घोळवावयास हवा. अशा प्रकारचें सद्गुरुचे भजन केलें तर निश्र्चितपणें समाधान मिळते.

English meaning

Now, when that thoughtless understanding is steady and firm then, you are making the bhajan of sadguru. And due to sadguru's bhajan there is complete contentment.

54
मूळ

या नाव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

शिष्या, यालाच आत्मज्ञान असें म्हणतात. त्यामुळें समाधान मिळतें. संसारांतील भीति व काळजी यांचे बंधन मूळापासून नष्ट होते.

English meaning

When this `I am' of the shishya dissolves, there is Self-knowledge/atma-gnyan (shishya and guru no longer exist). Due to thoughtlessness, the fear and bondage of worldly life becomes completely false and complete contentmant is attained.

55
मूळ

देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा । देहाभिमानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

मी देहच आहे असे वाटणारा माणूस आत्मघातकी असतो. देहाभिमानाने त्या जन्ममरणाच्या येरझारा सतत भोगाव्या लागतात.

English meaning

When that purush feels "I am a body" then it has become a man and then you should know that, you are a killer of your Self/atma. For due to this pride of the body, that One has to suffer again and again in this cycle of birth and death.

56
मूळ

असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

खरा मी आत्मरुप आहे. म्हणून " मी " स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहांहून वेगळा आहे. त्या " मी" ला जन्ममरण नाही. कर्माचा स्पर्श नाही. या सगळ्या दृश्यरुप खिचडीला मी आंतबाहेर व्यापून आहे. तो मी म्हणजे आत्मा तूंच आहेस.

English meaning

Understand, you are separate from the four bodies; you are different from the karma of birth; you are inside and outside of this `all' and the whole of creation.

57
मूळ

कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिसव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

खर्‍या ज्ञनदृष्टीनें पाहिलें तर कोणाही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असें अज्ञानामुळें वाटते. तो भ्रम आहे व त्यानें लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरुन ठेवल्यानें मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो. व जीवाला भुलवून टाकतो.

English meaning

On account of this delusion `I am', to that One who is never bound there has come, infatuation and the forgetting of Its own Self and then you hold fast to the pride of being a body.

58
मूळ

शिष्या येकांती बैसावें । स्वरुपीं विश्रांतीस जावें । तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

या भ्रमांतुन सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतांत बसावें व स्वस्वरुपांत लीन व्हावें. तेथें विसावा घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्यास परमार्थ स्थिर होतो. आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो.

English meaning

My dear shishya, you should be seated in `aloneness' and rest in your swarup. By the firm establishment of this pure sattwa guna there should be that thoughtless Supreme Accomplishment/paramarth.

59
मूळ

अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

परमार्थाचे अखंड स्मरण व श्रवण करीत राहीले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचते. अंगांत वैराग्य भरुन जाते. दृश्याबद्दल थोडीही वासना मनांत उरत नाही.

English meaning

When you, that unbroken brahman, listen to this `I am' (ie. shravan) and remains there (ie. manana), then only is perfect contentment/samadhan attained. When this `I am' is renounced then, there is that complete and perfect knowledge of brahman.

60
मूळ

शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसी इंद्रियें बाष्कळ । तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६० ॥

मराठी अर्थ

शिष्या, कोणतेही बंधन न घालतां इंद्रियांना मनसोक्त भोग भोगून दिले तरी मनाची तळमळ शांत होणार नाही.

English meaning

My dear shishya, if due to `being liberated' you are self-willed and your sense organs are unrestrained then, anxiety will not disappear.

61
मूळ

विषईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें । मणी टाकितांची लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत. हे उमजून ज्याचे मन विरक्त बनते तेव्हां पूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. उदा. एका माणसानें मनी टाकला तेव्हां गेलेले राज्य त्याला परत मिळाले.

English meaning

But when vairagya arises towards the sense objects then, to that Reality does perfect knowledge come. Only by throwing away the gem does one attain the kingdom. (siddharameshwar maharaj- without giving up the thought of the objects, the giving up of objects is very difficult)

62
मूळ

मणी होता सीगटाचा । लोभ धरुनियां तयाचा । मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

एका राजाने शिंगाच्या मण्याच्या लोभाने राज्य देऊन टाकले पण मण्याचा काहींच उपयोग नाही हे लक्षांत येतांच त्यानें तो मणी परत देऊन टाकला व आपले राज्य परत घेतले.

English meaning

The gem was only made of horn but that Reality was holding on to it with intense desire. And due to Its foolishness, the kingdom was neglected.

63
मूळ

ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३ ॥

मराठी अर्थ

शिष्या आतां तुला मी एक निश्र्चित भविष्य सांगतो तें ऐक. माणसाला ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तीच गोष्ट त्याला मिळते.

English meaning

Dear shishya, if you listen carefully now (when you leave your thoughts and desires for this and that, and memories of yesterday and dreams of tomorrow, then this ever present `now' is met) then, the future and even this `I' will not remain (all concepts will dissolve). When mula maya meditates upon itself only then, that mula purush will realize Its Reality. (mula maya and mula purush are inextricably bound together; though that purush is the Knower, still He forgets Himself and feels He is His reflection. But if He understands `I am separate from anything that can be known' then, He will not forget Himself. And when that Knower gives up knowing then, what remains is Reality)

64
मूळ

म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या । तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४ ॥

मराठी अर्थ

म्हणून आपण अविद्या सोडावी व सद्विद्या धरावी. भगवंताच्या किंवा आत्मस्वरुपाच्या नादीं लागावे. आत्मज्ञान झाल्यावर जगाला वंद्य होण्याची योग्यता येण्यास वेळ लागत नाही.

English meaning

Therefore ignorance should be dropped and pure knowledge should be firmly held. Due to this pure sattwa guna, the one who is respected throughout the whole world (ie. purush) is quickly attained.

65
मूळ

सन्यपाताचेनि दुखे । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५ ॥

मराठी अर्थ

सन्निपात ज्वर मोठा दोषी असतो. त्यामध्यें रोग्याला भ्रम होतो. मग कांहींतरी भयंकर दृश्यें त्याला दिसूं लागतात. पण योग्य औषधोपचार झाल्यावर ताप उतरुन त्याचा भ्रम नाहींसा होतो. मग तो खरा आनंद भोगतो.

English meaning

If you get a high fever and delirium sets in then, you imagine many frightening things and are glad to take the medicine that brings relief.

66
मूळ

तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञान औषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें अज्ञानरुप सन्निपातानें जीवाला भ्रम होतोआणि मग कांहींतरी भलतेंच व खोटे दृश्य दिसूं लागते. त्यावर आत्मज्ञानाचें औषध घेतलें कीं अज्ञान नाहीसें होते. मग आपल्याला जें दृश्य दिसत होते तें मुळांतच नव्हतें असा प्रत्यक्ष अनुभव येतो.

English meaning

In the same way, due to the delirium of ignorance, the false has appeared in our vision, but when you take the medicine of pure knowledge then the false goes away completely.

67
मूळ

मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७ ॥

मराठी अर्थ

एका झोपी गेलेल्या माणसाला भयंकर स्वप्न पडले. तो घाबरुन ओरडू लागला. तेव्हां त्याला लोकांनी जागे केले त्यामुळे जागा झाल्यावर तो परत पहिल्यासारखा निर्भय झाला.

English meaning

That atma cried out in its dream and this brought an awakening. Then that fearless Reality attained this previous state of `I am' (one went to the Master and He told you this world is but a dream; you awoke by forgetting it but still the original dream is there).

68
मूळ

मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें । मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८ ॥

मराठी अर्थ

त्याला पडलेलें स्वप्न खोटें होतें. पण त्याला तें खरें वाटलें त्यामुळें त्याला दुःख झाले. जें खोटें असतें त्याचें संपूर्ण निरसन कधीच होत नसतें. त्याचा कांहींतरी परिणाम उरतोच.

English meaning

It is false only but it was felt to be true (maharaj- knowledge takes itself as true), and due to this pure sattwa guna of knowing, suffering appeared (this `I am' feeling and knowing is not that fearless Reality and it will bring body consciousness once again). There was the false notion "I am a body" but even if this was destroyed still, that thoughtless swarup had not been accomplished (you feel `I am awake' but you are not truly awakened. This is knowledge and not that no-knowledge of, I do not exist).

69
मूळ

मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी । जागा जालियां तयासी । भयेचि नाहीं ॥ ६९ ॥

मराठी अर्थ

जो जागा असतो त्याला स्वप्न खोटें असतें. जो झोपलेला असतो त्याला तें सर्व बाजूनीं वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीति उरत नाही.

English meaning

It is false to be awakened but it is better than the entangling infatuation of the one who is fast asleep. But if that One awakens to Its Reality then, there can be no fear whatsoever (then there is that fearless Reality for both dreams have gone; the dream "I am a body" and the dream `I am').

70
मूळ

परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगीं काविरें । पूर्ण जागृती श्रवणद्वारें । मननें करावी ॥ ७० ॥

मराठी अर्थ

ज्यावेळी अविद्यारुप झोप जीवाला भुलवून झोपच घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने त्यास पडतात, त्यामुळें तो घाबरतो व भयाने त्याचें सर्व शरीर कांपू लागते. या अविद्यारुप झोपेंतून संपूर्ण जाग येण्यास सारखें श्रवण व मनन केल्यास दृश्याचे भय नाहीसेम होते.

English meaning

But when the sleep of ignorance/avidya ("I am a body") prevails then, this `all' body of `I am' is filled with madness of "I am a body and I need this and that". Therefore by means of shravan and manana that One should be made awake (ie. liberation from gross body consciousness).

71
मूळ

जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण । जो विषईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१ ॥

मराठी अर्थ

जागेपणीं कसें ओळखावें त्याची खूण सांगतो. तीं ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रियभोगांविषयीं पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे.

English meaning

Once this awakening has been recognised then, you should listen to this `I am'. But still understand that, the one who is listening is, in truth, Reality (remain constantly with this feeling `I am' but understand this is also not true). And then, when that purush wants nothing at all from this `I am' (prakruti), He is complete (I don't even want to know).

72
मूळ

जेणें विरक्तीस न यावें । तो सावध ऐसे जाणावें । तेणें साधन करावें । थोरीव सांडुनि ॥ ७२ ॥

मराठी अर्थ

ज्याला संपूर्ण विरक्ति साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. जगामधील आपलें मोठेपण सोडून त्यानें साधन करीत रहावें.

English meaning

If this `I am' has not become desireless and still wants to know then, this you should be known as a seeker/sadhak. Then the sadhana that should be made is leaving aside your `greatness' (this `I am').

73
मूळ

साधन न मने जयाला । तो सिद्धपणें बद्ध जाला । त्याहुनि मुमुक्षु भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३ ॥

मराठी अर्थ

ज्याला साधन करावेसे वाटत नाहीं तो सिद्धपणाच्या अभिमानानें बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षां मुमुक्षु केव्हांही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्यानें तो ज्ञानाचा अधिकारी असतो.

English meaning

If the mind does not try to know this `I am' because it feels that life is complete then, one should be called bonded/baddha. An aspirant/mumukshu is wiser than him and he is worthy to receive knowledge.

74
मूळ

तंव शिष्यें केला प्रश्र्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण । साधन सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४ ॥

मराठी अर्थ

हें ऐकून शिष्याने प्रश्न केला कीं, बद्ध व मुमुक्षु यांचे लक्षण काय ? साधक आणि सिद्ध कसें ओळखावें?

English meaning

At that moment, a question arose in the disciple (in the stillness of understanding a question arose in his mind). What is the attention of the baddha/ bound and what is the attention of the mumukshu? And how to know the signs of the seeker/sadhak and the siddha/ accomplished? (In truth, a disciple has no need of these questions for his only duty is to remain in this understanding `I am He'. But his mind is habituated to ask something)

75
मूळ

याचें उत्तर श्रोतयांसि । दिधलें पुढिलीये समासीं । सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५

मराठी अर्थ

सद्गुरु म्हणाले कीं, या प्रश्नाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहें. तें वर्णन सावध श्रोत्यानीं लक्ष देऊन ऐकावें.

English meaning

This `reply' (`I am') will be given to the disciple in the collection of words ahead. Therefore stay alert and be a good listener by giving your attention to this `I am'. .