देवशोधन — समास 1: देवशोधन

Fully populated

Dev Shodhan (The Search for God)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

चित्त सुचीत करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमिष्य येक ॥ १ ॥

मराठी अर्थ

प्रथम मन एकाग्र करावे. या समासांत जें सांगितलें आहे तें अंतरी ठेवावे. क्षणभर सावध होऊन बसावे. सांगितलेले ऐकावे.

English meaning

The mind should be stilled and this `speech' that is within every jiva should be firmly held.1 And then by remaining alert, that One can be realized in a fraction of a moment. (maharaj- `how much time does it take?'; you are already That and understanding this is realizing)

2
मूळ

कोणी येके ग्रामीं अथवा देसीं । राहाणें आहे आपणासी । न भेटता तेथिल प्रभूसी । सौख्य कैचें ॥ २ ॥

मराठी अर्थ

एखाद्या गांवांत किंवा देशांत आपल्याला राहायचे असेल तर तेथील प्रमुखास भेटले तर आपल्याला त्रास न होता सुख लाभते.

English meaning

Whether you are staying in a village (ie. body) or in the state (ie. `all') still it is because of that One within everyone (ie. atma). But staying in this body or even in this `all' state, if you do not get to meet that Lord `there', then how can there be happiness?

3
मूळ

म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होणें श्र्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

म्हणून ज्याला जेथें रहाणें असेल तेथील वरिष्ठाची भेट घ्यावी. म्हणजे तेथे आपले राहाणें सुखकर होते.

English meaning

Therefore if that purush staying `here' (in maya) wants to be happy then, he has to meet that Lord (unless you meet your Self there will always be estrangement and then how can there be happiness?). And He can be met only if there is respect for this `all'.

4
मूळ

प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता । आपुले महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

वरिष्ठाची भेट घेतली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला कोणी किंमत देत नाही. आपले कांहीं महत्व राहात नाही.

English meaning

If that Lord is not met then, how can you be accepted `there'? Then your importance will be lost in no time.

5
मूळ

म्हणौन रायापासून रंक । कोणी येक तरी नायेक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणें योग्य असते असे विचारी माणसे ओळखतात.

English meaning

Whether you are a king or a beggar, still that One within everyone is the Lord. And to meet that atma, thoughtless vivek is required and that is known only by a viveki (one who has vivek).

6
मूळ

त्यास न भेटता त्याचे नगरीं । राहातां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी । आंगीं लागे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

वरिष्ठाला न भेटता तेथें राहीले तर फुकट काम करुन घेण्यासाठी बिगारी म्हणून धरुन नेतात. चोरी न करतां आपल्यावर चोरीचा आळ आणतात.

English meaning

If you do not meet Him in His city then, you will be forcibly seized and made to do hard labour ("I am a body"). `There' you are doing nothing, but within this `all' body a thief has appeared (maharaj`mind is a thief.' Mind steals things from this `all' and claims them as its own. You are the King `there' but you have become a slave of the mind).

7
मूळ

या कारणें जो शाहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥

मराठी अर्थ

यासाठीं शहाण्यानें तेथील वरिष्ठास भेटावे. असे केले नाहीं तर प्रपंचांत त्याला निरनिराळे त्रास भोगावें लागतात.

English meaning

When that purush becomes wise by means of this `speech' then, he realizes that the Lord should be met. However if you don't do that then, you will only get the misery of samsar.

8
मूळ

ग्रामीं थोर ग्रामधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती । देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥

मराठी अर्थ

गांवामध्यें ग्रामधिपती वरिष्ठ असतो. त्याच्याहून वरिष्ठ देशाधिपती असतो. तर राजा देशाधिपतीहून वरिष्ठ असतो.

English meaning

In the village the greatest is the village leader (mind or intellect/buddhi ie. brahma). Greater than him is the ruler of the state (`all'/prakruti ie. vishnu). Then you should know that ruler *(ishwara/purush) who is greater than the state ruler. *(Witness)

9
मूळ

राष्ट्रांचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो माहाराजा । माहाराजाचाहि राजा । तो चक्रवती ॥ ९ ॥

मराठी अर्थ

राष्ट्राचा वरिष्ठ तो राजा, पुष्कळ राष्ट्रांचा वरिष्ठ तो महाराजा अशा बर्‍याच महाराजांचा वरिष्ठ तो चक्रवर्ति असतो.

English meaning

That ruler of the kingdom is the King (atma). The ruler of many kingdoms is that great King (ie. paramatma). The King of that great King is the emperor (Reality/pa- rabrahman; maharaj- He has nothing to do with all this). (See 8.7.45-59; There is in truth, one atma and He gets given many names depending on the role He plays. He is the three gunas, this prakruti and that purush or ishwara; and when His prakruti no longer remains then He has no need to witness and He is beyond maya and is called paramatma or parameshwara. But in truth, He is and was forever free and nothing to do with all this).

10
मूळ

येक नरपति येक गजपती । येक हयपति येक भूपती । सकळांमध्यें चक्रवती । थोर राजा ॥ १० ॥

मराठी अर्थ

कोणी नरपति, तर कोणी गजपति तर कोणी हयपति असतो. कोणी भूपति असतो या सर्वांहून चक्रवर्ति हा श्रेष्ठ राजा असतो.

English meaning

That One is the Lord and Master of mankind; that One is the Lord and Master of the elephants; that One is the Lord and Master of the beasts and that One is the Lord and Master of this earth. When that Reality/parabrahman is within this `all' then, He gets called the King or purush (He is within every animate and inanimate form).

11
मूळ

असो ऐसियां समस्तां । येक ब्रह्मा निर्माणकर्ता । त्याब्रह्मयासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

असो. या सर्वांना ब्रह्मदेव निर्माण करतो. पण ब्रह्मदेवाचा निर्माता कोण?

English meaning

He is this whole creation! That One is brahma the creator of your world and He is the One who created brahma also (ie. brahma is rajo guna and this is the buddhi/intellect; something is there/knowledge, but you don't know/ignorance what it is; and once the buddhi decides and gives it a name, it will stay that way until the end of time, unless the buddhi decides otherwise. There are two worlds as such; the first is seen by vivek, through the eyes of knowledge, when we drop the thoughts and the other is the world we each create by our individual intellects and say, "This is good, bad, right, wrong, happy, sad" etc.etc.).

12
मूळ

ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर । तो वोळखावा परमेश्र्वर । नाना येत्नें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो परमेश्र्वर. त्याला नाना प्रयत्न करुन ओळखावें.

English meaning

There is brahma, vishnu and mahesh. And the One who created them is the greatest. Therefore the mind should make tremendous effort to recognise that parameshwar (or paramatma ie. beyond ishwara, the witnessing atma).

13
मूळ

तो देव ठाईं पडेना । तरी येमयातना चुकेना । ब्रह्मांडनायेक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत. ब्रह्मांडनायक परमेश्र्वरास ओळखता येत नाही हें कांहीं बरे नव्हे.

English meaning

If that God is not found then, you cannot avoid the punishment of yama. You cannot marvel at that `Lord of the universe' unless that thoughtless Self is understood.

14
मूळ

जेणें संसारीं घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥

मराठी अर्थ

ज्या परमात्म्याने आपल्याला संसारांत घातलें, ज्यानें संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. त्याला जो ओळखत नाही तो खरोखर पतितच असतो.

English meaning

This `I am' has been pushed into samsar and then the universe and everything was created (the buddhi starts giving names and then forms appear). If that greatest God is not recognized then, that greatest God becomes a fallen and limited jiva.

15
मूळ

म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग धरावा । म्हणिजे कळे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

म्हणून खर्‍या देवास ओळखावे. म्हणजे जन्म सार्थकीं लागेल. कळत नसला तरी सत्संग धरीला म्हणजे कळेल.

English meaning

Therefore God should be recognized and in this way the meaning of your life will be understood. If He has not been understood then, you should keep the company of the Truth/Saint until He is understood.

16
मूळ

जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । जो शाश्र्वत आणि अशाश्र्वत । निवाडा करी ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्याला भगवंत म्हणजे कोण याचे ज्ञान असते, त्याला संत म्हणतात. शाश्वत व अशाश्वताची तो बरोबर निवड करतो.

English meaning

The one who knows God should be called the Saint. He has differentiated between the Eternal and non-eternal.

17
मूळ

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ॥ १७ ॥

मराठी अर्थ

खरा देव कधी बदलत नाही व आपल्या ठिकाणावरुन भ्रष्ट होत नाही असा विश्र्वास ज्याच्या अंतर्यामी असतो, तो महान साचात्कारी संत किंवा साधु असतो.

English meaning

`God does not move, He is never spoiled and is never lost.' When such is the inner understanding of that purush then, he should be known as the Saint and sadhu.

18
मूळ

जो जनामधें वागे । परि जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥

मराठी अर्थ

तो देहानें लोकांत वावरतो. परंतु तो लोकांना माहीत नसलेल्या स्वस्वरुपाबद्दल सांगतो. ज्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान नेहमी जागृत असते. तोच खरा साधु होय.

English meaning

That purush exists within the people but tells this `story' that is different from the people. Pure knowledge has been awaked in His inner space and He is a sadhu.

19
मूळ

जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥

मराठी अर्थ

परमात्मा हा निर्गुण आहे हेच खरे ज्ञान होय. इतर सर्व कांहीं अज्ञानच समजावे.

English meaning

One should know that nirgun paramatma and that should be called true knowledge. Other than this pure knowledge, that Reality remains ignorant and there is this `all'.

20
मूळ

पोंट भराव्याकारणें । नाना विद्या अभ्यास करणें । त्यासी ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २० ॥

मराठी अर्थ

पोट भरण्यासाठी ज्या निरनिराळ्या विद्या आपण शिकतो त्याला ज्ञान म्हणतात पण ते खरे ज्ञान नाही त्याने जीवनाचे सार्थक होत नाही.

English meaning

For to fill the belly and mind, `many' knowledges are practiced and though these are called knowledge still, with these knowledges one cannot understand the meaning of life.

21
मूळ

देव वोळखावा येक । तेंचि ज्ञान तें सार्थक । येर आवघेंचि निरार्थक । पोट विद्या ॥ २१ ॥

मराठी अर्थ

एका देवाचा अनुभव करुन घ्यावा. तेच खरें ज्ञान, त्यानेंच जीवनाचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोट भरण्यासाठीं, त्या विद्यांनी, त्याच्या ज्ञानाने सार्थक होत नाही.

English meaning

That One God should be recognized. That is knowledge and to gain that knowledge is the purpose of this life. The rest are just meaningless knowledges useful only for filling the belly and mind.

22
मूळ

जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें । पुढें अवघेंचि वेर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जन्मभर पोटसाठींच सर्व केले. देह सांभाळला. परंतु पुढे अतंकाळी सर्व फुकटच जाते.

English meaning

Throughout one's life one is busy filling the belly and mind and protecting the body. Yet at the time of death, of what use are these knowledges?

23
मूळ

येवं पोट भराव्याची विद्या । तयेसी म्हणो नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३ ॥

मराठी अर्थ

पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये. सर्व व्यापक आत्मवस्तु ज्या अनुभवाने तत्काळ प्राप्त होते तें खरें ज्ञान होय.

English meaning

Thus this knowledge which is used to fill the belly and mind should not be called true knowledge. At this very moment you should attain that One who pervades this `all' (ie. witnessing) and then be that One Self. That is real knowledge.

24
मूळ

ऐसें जयापासीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन । तयापासीं समाधान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥

मराठी अर्थ

परमात्मवस्तुचे ज्ञान ज्याच्याजवळ तो सज्जन म्हणून जाणावा. समाधान मिळविण्याचा मार्ग त्याला विचारावा.

English meaning

Such knowledge is close to this `all' of mula maya. The one who knows that knowledge should be known as a sajjana or Saint. You should ask Him how to at- tain that contentment/samadhan.

25
मूळ

अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचे सांपडेल ज्ञान । करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचे ॥ २५ ॥

मराठी अर्थ

एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याला ज्ञान कसें मिळणार? दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले भाग्य कसे उजळेल?

English meaning

When someone who is ignorant meets another who is ignorant then, how can knowledge be found there? If one unfortunate meets another unfortunate, how can good fortune be there?

26
मूळ

रोग्यापासीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला । निर्बळापासीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६ ॥

मराठी अर्थ

एक रोगी दुसर्‍या रोग्याजवळ गेला तर त्याला आरोग्य कसे मिळणार? दुबळ्या माणसाजवळ दुसर्‍या दुबळ्याकडून संरक्षण कसें मिळणार?

English meaning

If the *diseased goes to one who is diseased then how can that disease-less atma be there? If the weak goes to the weak, how can there be any support? *(Taking yourself to be a body is the disease; maharaj- this body is a great boil on you)

27
मूळ

पिशाच्यापासीं पिशाच्य गेलें । तेथें कोण सार्थक जालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणु ॥ २७ ॥

मराठी अर्थ

एक पिशाच्च दुसर्‍या पिशाच्चापाशी गेले तर त्याची त्या योनींतून कशी सुटका होईल? उन्मत्त माणसाकडून दुसर्‍या उन्मत्ताची समजुत कशी होईल?

English meaning

If the mad goes to the mad then how will the meaning of life be acquired? If the intoxicated meets with the intoxicated then what can be understood?

28
मूळ

भिकार्‍यापासीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापासीं दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८ ॥

मराठी अर्थ

भिकार्‍याजवळ भिक मागितली, दीक्षाहीनाजवळ दीक्षा दे म्हणून दीक्ष मागितलीा, किंवा कृष्णपक्षांत चांदण्यांच प्रकाश कसा मिळेल?

English meaning

What will a beggar beg from a beggar and how can the uninitiated give initiation? What light can you see on the night of the new moon?

29
मूळ

अबद्धापासीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबुद्ध । बद्धास भेटता बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥

मराठी अर्थ

एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी गेला तर तो कांहीं सदाचारी होत नाही. तसेच एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो सिद्ध पुरुष कसा होणार?

English meaning

If one disorderly person meets another of his kind then, how can there be discipline? If one in bondage/baddha meets a baddha, then there is no siddha.

30
मूळ

देहापासीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही । म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३० ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा माणुस गेला तर तो विदेही होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषावाचुन आत्मज्ञानाचा मार्ग सांपडत नाही.

English meaning

If one with a body goes to one with a body then how will he become a videhi (ie. without body)? Therefore, without that Knower/gnyani, the path of knowledge cannot be walked upon.

31
मूळ

याकारणें ज्ञाता पाहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासार विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

या कारणानें आत्मज्ञानी माणुस शोधुन काढावा व त्याच्याकडून अनुग्रह घ्यावा. त्याच्या मार्गदर्शनाने सारासार विचारानें मोक्ष मिळतो.

English meaning

By means of this `speech', that Knower should be understood (`I cannot be anything that is seen or perceived') and then His blessing should be accepted. Only by that thoughtless essence, I do not exist, does the jiva attain total freedom (See 8.7.45-59; jiv-atma becomes nirmal-atma). .