देवशोधन — समास 10: अनुर्वाच्यनिरुपण

Fully populated

Anurvachya Nirupan (A Discourse on the Indescribable)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं । तरी तें कैसें आहे सर्वहि । निरोपावें ॥ १ ॥

मराठी अर्थ

समाधान कसें असतें, हें शब्दानें सांगता येण्यासारखें नाही. तरी समाधान आहे तरी कसे तें सगळे मला सांगावें.

English meaning

"It is said that, when *samadhan wipes out this `all' then you should not `speak' (such samadhan is beyond this sagun `speech'; it is no-knowledge). Nevertheless, when there is that Reality, can there also be this `all' or knowledge? This should be discoursed to me" (maharaj- the Saint uses knowledge...otherwise how could He speak). *(The indescribable contentment of being One without a second)

2
मूळ

मुक्यानें गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला । याचा अभिप्राव मजला । निरोपण कीजे ॥ २ ॥

मराठी अर्थ

एखाद्या मुक्यानें गुळ खाल्ला तर त्याची गोडी त्याला सांगता येणार नाही. तसेंच समाधानाचें आहे. तर त्या म्हणण्याचा खरा अर्थ मला समजावून सांगा.

English meaning

"It is said to be like a mute person eating jaggery, and the sweetness of that cannot be told (ie. pure direct experience is quite different from indirect experience). The meaning of this should be discoursed to me."

3
मूळ

अनुभवहि पुसों जातां । म्हणती न ये किं सांगतां । कोणापासीं पुसों आतां । समाधान ॥ ३ ॥

मराठी अर्थ

एखाद्याला तुझा अनुभव काय आहे असे विचारले तर तो सांगतो की, समाधान हें शब्दानें सांगता येण्यासारखें नाही. मग आतां मी समाधान कसें असतें हे कोणाला विचारु?

English meaning

"It is said that, when this `I am' experience (indirect) gets wiped out then, that samadhan (direct Self experience, I do not exist) cannot be expressed. For when this `I am' gets wiped out then, who is there to experience that samadhan? This should be discoursed to me."

4
मूळ

जे ते अगम्य सांगती । न ये माझिये प्रचिती । विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४ ॥

मराठी अर्थ

जो तो सांगतो की, समाधान जाणण्यास अशक्य आहे. पण मला हे पटत नाही. म्हणून स्वामी, माझ्या मनांत बसेल अशारीतीनें समाधानाचे स्वरुप मला सांगा.

English meaning

"It is said that, when this `I am' (of mula maya) is that unfathomable thoughtlessness then, it cannot appear within my experience. Therefore that thoughtless understanding should be completely established in my mind."

5
मूळ

ऐसें श्रोत्याचें उत्तर । याचें कैसें प्रत्योत्तर । निरोपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५ ॥

मराठी अर्थ

श्रोत्याचा प्रश्र्ण हा असा आहे. त्याचे उत्तर आतां मी सांगतो तें मनापासून ऐका.

English meaning

When the listener is understanding this `I am' then, what is the need to ask any of these questions? Listen and be completely absorbed in its discourse. (But alas, no...)

6
मूळ

जें समाधानाचें स्थळ । किं तो अनुभवचि केवळ । तें स्वरुप प्रांजळ । बोलोन दाऊं ॥ ६ ॥

मराठी अर्थ

केवळ अनुभव शुद्ध जाणीव हीच समाधानाची जागा आहे. त्या शुद्ध अनुभवाचे स्वरुप स्पष्ट करुन सांगतो.

English meaning

"So is this `I am'/mula maya the place of samadhan and is this experience that pure knowledge?" The speaker replied, that swarup will only be revealed if you maintain this `speech' (all this can be answered only if the sadhak stops asking questions and stays in this `I am').

7
मूळ

जें बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना । जयासी कल्पितां कल्पना । हिंपुटी होये ॥ ७ ॥

मराठी अर्थ

समाधान शब्दाने सांगावें म्हटलें तर शब्दबद्ध करता येत नाही. पण सांगितल्याशिवाय समजतही नाही. त्याची कल्पना करावी असे ठरविलें तरी कल्पनाशक्ती कमी पडते.

English meaning

Still this `speech' cannot grasp that swarup and yet without this `speech', that swarup cannot be understood. And if this `speech' of mula maya should start imagining then, that imagination will only bring the miseries of bondage ("I am so and so" and so many questions).

8
मूळ

तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम । धरिता संतसमागम । सर्वहि कळे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

तें समाधान परब्रह्मरुप आहे. तें वेदांचे परम रहस्य आहे. संतांच्या संगतींत राहीलें म्हणजे तें सर्व कांही समजते.

English meaning

This mula maya should know that parabrahman; for this mula maya of the vedas is that hidden Supreme Self. And if you hold firmly to the company of the Saint/Truth, then this `I am' will understand that Reality (as the name suggests, mula maya is not true. It is an illusion, the original illusion and it means that, anything seen or perceived is merely an appearance or dream within that One indivisible Self).

9
मूळ

तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल । ऐक अनुभवाचे बोल । अनुर्वाच्य वस्तु ॥ ९ ॥

मराठी अर्थ

अत्यंत सूक्ष्म असलेलें असें जे समाधान तेच आतां वर्णन करुन सांगतो. माझ्या अनुभवाचे शब्द तूं ऐक. ऐरव्ही समाधान शब्दांनी सांगण्यासारखीं वस्तु नाही.

English meaning

That Reality has become this `I am' experience and now with this understanding, thoughtlessness should be made and then this mula maya will be that most unfatho- mable samadhan. Therefore just listen to this `speech' of `I am' and then be that *inexpressible Self. (*maharaj where speech comes back, is my place)

10
मूळ

सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळाया गूळ देणें । ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

एखाद्या गोडी कशी असते. हे कळण्यासाठीं गुळ द्यावा. त्याचप्रमाणें सद्गुरुंनी दिल्यावाचून समाधान काय असतें हे बरोबर कळणार नाही.

English meaning

You do not have to say anything to understand that Reality (ie. say nothing because I don't exist. This is the greatest worship). But just as as the sweetness of jaggery can only be understood by the taking of jaggery, so too, only by direct experience can this be understood `there'. However this thoughtlessness cannot be understood, without sadguru (maharaj- you cannot kill yourself; for that the sadguru is required).

11
मूळ

सद्गुरुकृपा कळे त्यासीं । जो शोधील आपणासी । पुढें कळे अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११ ॥

मराठी अर्थ

जो स्वतःचा शोध घेतो त्या सद्गुरुकृपा समजते. पुढें मग आत्मवस्तु स्वानुभवानें आपोआप कळूं लागते.

English meaning

By the grace of sadguru, that atma purush is understood if mula maya goes on searching its own self. Then ahead, the understanding of that natural thoughtless Self will come to this experience.18

12
मूळ

दृढ करुनियां बुद्धी । आधी घ्यावी आपशुद्धी । तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२ ॥

मराठी अर्थ

बुद्धीचा पक्का निश्र्चय करावा. मग प्रथम मी कोण याचा शोध घ्यावा. तो शोध घेता घेता अकस्मात समाधी लागते.

English meaning

An intellect/buddhi steadfast in this `I am' should be accepted at the beginning and in this way, you will be purified. Due to this, there will *unexpectedly be the establishment of samadhi.19 *(When you stop looking for it then, it will be there; for it is always there)

13
मूळ

आपलें मूळ बरें शोधितां । आपली तो माईक वार्ता । पुढें वस्तुच तत्वता । समाधान ॥ १३ ॥

मराठी अर्थ

आपलें मूळ स्वरुप नीट प्रकारें शोधू लागलें तर देहबुद्धींतील मी मायानिर्मित आहे असे समजते. देहबुद्धीचा अशाश्वत मी बाजूस ठेवला की, शुद्ध आत्मवस्तु शिल्लक राहाते व तेच समाधानाचे ठिकाण होय.

English meaning

When you search out your own beginning then, `you' become an illusory rumour and there is only That. When ahead there is only that Self then, there is complete contentment/samadhan.

14
मूळ

आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं । जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि सिद्ध ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मी ब्रह्म आहे. मी सर्व साक्षी आत्मा आहे. ही अवस्था अखेरची स्थिती नव्हे. जो कोणी या अवस्थेच्या पलीकडे जातो. तो खरा सिद्ध होय.

English meaning

When that atma is the *witness of this `all' then, there is this `speech' and this is the original hypothesis (`I am He'). But when that purush within this `all' beholds the siddhant (I do not exist) then He is a siddha. *(Witnessing implies duality as there must be the witnessed ie. the purush is there but remains hidden behind His prakruti. He illuminates her and He is knowing her but only she appears and is known)

15
मूळ

सिद्धांतवस्तु लक्षूं जातां । सर्वसाक्षी तो अवस्ता । आत्मा तीहून पर्ता । अवस्तातीत ॥ १५ ॥

मराठी अर्थ

शेवटच्या अनुभवाच्या दृष्टीनें पाहिलें तर " मी सर्व साक्षी आहे " ही अवस्था आहे. या अवस्थेच्या पलीकडे असणारे आत्मस्वरुप सर्वसाक्षीपणाच्या पलीकडे राहाते.

English meaning

But if you try to behold that siddhant then, that Reality becomes this state of witnessing the `all'. That atma is beyond her, for it is beyond any state.

16
मूळ

पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे । ते समंई उतरे । फुंज मीपणाचा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्ञेयरुप पदार्थाचें ज्ञान जेव्हां निःशेष संपते. द्रष्ट्याचा द्रष्टेपणा संपूर्ण नाहींसा होतो, त्यावेळी मीपणाचा भ्रम संपूर्णपणें विरुन जातो.

English meaning

When the knowledge of this `all' ends, then the seer and the seeing are destroyed. Then, at that time, that Reality sets aside this swelling of I-ness.

17
मूळ

जेथें मुरालें मीपण । तेंचि अनुभवाची खूण । अनुर्वाच्य समाधान । या कारणें बोलिजे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

मीपणा संपूर्णपणें विरणें हीच परमात्मवस्तुच्या अनुभवाची खूण आहे. म्हणून समाधान शब्दांनी सांगता येण्यासारखें नाही, असे म्हणतात.

English meaning

When `here' I-ness is dissolved, there comes the nirgun understanding of that sagun experience. And on account of this `speech', there is that inexpressible samadhan.

18
मूळ

अत्यंत विचाराचे बोल । तरी ते माईक फोल । शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

अतिशय विचारांनी भरलेले शब्द जरी बोलले तरी ते दृश्य विश्र्वांतील मायेच्या क्षेत्रांतील असतात. मात्र त्यांचा जो अर्थ असतो तो सूक्ष्म असतो. त्या शब्दांना आत-बाहेर व्यापून असतो.

English meaning

No matter how profound this `speech' of that thoughtless Self may be, still it is illusory and empty. And though this `word' is inside and outside of everything, still only its meaning has true substance.

19
मूळ

शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे ते येथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९ ॥

मराठी अर्थ

शब्दामुळें अर्थ कळतो. अर्थ ध्यानांत आल्यावर शब्दाची गरज संपते. अर्थ सत्य व शाश्वत असतो. पण शब्द मात्र असत्य व अशाश्वत असतो.

English meaning

Due to this `word', the meaning is understood but when the meaning is understood then, this `word' becomes useless. That Reality is the meaning of this `word' but the `word' itself is false.

20
मूळ

शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहातां शब्द नासे । शब्द फोल अर्थ असे । घनवटपणें ॥ २० ॥

मराठी अर्थ

शब्दामुळें परमात्मवस्तुच्या अस्तित्वाचे ज्ञान होते. परंतु त्या वस्तुचें साक्षात् दर्शन झाल्यावर शब्द नाश पावतो. शब्द असार कवच असून त्याचा अर्थ भरीव सार असतो.

English meaning

The `word' is that Self appearing and when that Self is understood then, this `word' is forgotten. For then this `word' is understood to be false and its meaning fills everywhere completely.20 20 nisargadatta maharaj- I am the manifestation. I, the Absolute unmanifested, am the same `I' manifested. Consciousness is the expression of the Absolute, there are not two.

21
मूळ

भुंसाकरितां धान्य निपजे । धान्ये घेऊन भूंस टाकिजे । तैसें शब्द भूंस जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१ ॥

मराठी अर्थ

भुसामध्येंच धान्य निपजते. आपण धान्य घेऊन भुसा टाकून देतो. तसेच शब्द म्हणजे भुसा व अर्थ म्हणजे धान्य समजावे.

English meaning

On account of the husk the grain appears and then, the husk is thrown away and the grain accepted. Similarly, this `word' should be known as the husk and its meaning as the grain.

22
मूळ

पोचटामधें घनवट । घनवटीं उडे पोचट । तैसा शब्द हा फलगट । परब्रह्मीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

पोकळ कवचामध्यें भरीव सार सांपडते. सार घेतल्यावर असार कवच उडून जाते. त्याचप्रमाणें परब्रह्मरुपी अर्थ घेतल्यावर फोलपट शब्द गळून पडतात. म्हणून आत्मसाक्षात्कारापाशीं शब्द जाऊं शकत नाहीत. त्याचे वर्णन होऊं शकत नाही.

English meaning

Just as the flimsy husk is filled with a complete grain and in that completely full grain, the flimsy husk flies away, so too, when within parabrahman this `word' flies away then, that thoughtless understanding remains.

23
मूळ

शब्द बोलोनि राहे । अर्थ शब्दापूर्वींच आहे । या कारणें न साहे । उपमा तया अर्थासी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

उच्चार करण्याच्या आधीं अर्थ असतो. उच्चार होत असतांनाही अर्थ असतो व उच्चार होऊन शब्द नाहींसा झाला तरीही अर्थ असतो. त्यामुळें खरतर भुसा व धान्याची उपमा अर्थाला लागू पडत नाही.

English meaning

As long as you continue to `speak', then the `word' will remain. But the meaning is always there, even before the `word'. Still on account of the `word', the meaning becomes apparent, yet the meaning can never be compared to the `word'.

24
मूळ

भूंस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

भूस टाकून त्यांतील धान्याचा कण घेतात तसेच शब्दाचा वाच्यांश टाकावा व त्यांतील अर्थ तेवढा घ्यावा. शुद्ध आत्मसाक्षात्कारानें तो संपूर्णपणें ग्रहण होतो.

English meaning

Just as the husk should be left aside and the grain accepted, so too, the `word' meaning should be abandoned and the grain, that is the implied meaning, should be discerned by the pure experience of one's own Self.

25
मूळ

दृश्यावेगळें बोलिजे । त्यासी वाच्यांश म्हणिजे । त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५ ॥

मराठी अर्थ

" आत्मवस्तु दृश्याहून वेगळी आहे. " हा वाच्यांश होय. त्या अर्थ जो लक्ष्यांश तो समजून घ्यावा व त्याचे स्वानुभवामध्यें रुपांतर करावे.

English meaning

When this separate visible `I am' is `spoken' then, that is called the `word' meaning and when that atma knows the meaning of that atma then, this is the pure implied meaning (then you finally meet your own Self).

26
मूळ

ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला नवचे ॥ २६ ॥

मराठी अर्थ

शब्द ऐकल्यावर अर्थमय शुद्ध बोध किंवा लक्ष्यांश मनांत निर्माण होतो. पण तोही आत्मवस्तुच्या अलीकडेच थांबतो. आपले मन स्वस्वरुपाच्या अनुभवापर्यंत जाऊं शकत नाही. यामुळें सर्व अर्थ घ्यानांत येऊनही आत्मवस्तुचा अनुभव येत नाही.

English meaning

Like this is that purush, He is the pure implied meaning, but first He should under- stand the hypothesis (`I am brahman'/`Thou art That'/tattwasmi). For Self-experience is inconceivable or beyond perception and therefore by concentration you cannot go there.

27
मूळ

जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभवाचा गाभा । ऐसा तोहि उभा । कल्पित गेला ॥ २७ ॥

मराठी अर्थ

आत्मस्वरुप फार सूक्ष्म आहे. आपल्या अनुभवामध्यें आकाश अति सूक्ष्म आहे. तें गाळून घेतले तर त्याला आत्मस्वरुपाच्या सूक्ष्मपणाची सर येईल. असे तें स्वरुप सर्व अनुभवाचा गाभा आहे. त्याच्या सत्तेनें सर्व अनुभव येतात. पण हें सगळें स्वरुप वर्णन म्हणजे माणसानें आपली कल्पना ताणून उभारलेला डोलाराच आहे.

English meaning

`Here' (in mula maya) the sky is to be spread out and then let slip aside (first understand that everything you see and perceive is nothing ie. just like the sky. And then understand that this experience is also not true. The Truth will not be realized as long as you remain). That purush is the core of this experience and when He stops imagining this experience then, He will meet Himself.

28
मूळ

मिथ्या कल्पनेपासूनि जाला । खरेंपण कैंचें असेल त्याला । म्हणौनि तेथें अनुभवाला । ठावचि नाहीं ॥ २८ ॥

मराठी अर्थ

मुळांत कल्पना खरी नसते. म्हणून कल्पनेमुळें जे तयार होते, तेही खरे नसते. त्यामुळें आत्मस्वरुपाच्या ठिकाणी ज्याला अनुभव म्हणतात त्याला स्थान नाही.

English meaning

Because this `I am' experience has appeared from the false concept, "I am a body" then, how can there be any Truth to it? (the false will only make the false, it cannot make the Truth) Therefore, `there' (in brahman) is not the place of this experience.

29
मूळ

दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव । याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९ ॥

मराठी अर्थ

अनुभव येण्यास अनुभव घेणारा व ज्याचा अनुभव घ्यावयाचा तें असें दोन घटक आवश्यक असतात. पण आत्मस्वरुपामध्यें अनुभव घेणाराच उरत नाही. तेथें दोन घटकच नसतात. त्यामुळें " मी स्वरुपाचा अनुभव घेतो " या अवस्थेला स्वस्वरुपसाक्षात्कारांत जागाच नाही.

English meaning

How can there be an experience without another (experience requires duality)? When there is experience then that thoughtlessness is this `speech' and this, we have proved, is empty like the husk. Nevertheless, understand that on account of this expe- rience there is no place for experience (experience goes off and becomes that One who had the experience).

30
मूळ

अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे । म्हणौनि बोलणें साजे । अनुर्वाच्य ॥ ३० ॥

मराठी अर्थ

" मी अनुभव घेतला " असें म्हटलें कीं, अनुभव घेणारा मी; ज्याचा अनुभव घेतला ती वस्तु, आणि या दोहोंचा संबंध आल्यावर आलेला अनुभव अशी तीन अंगें उत्पन्न होतात. त्यांना त्रिपुटी म्हणतात. स्वस्वरुपाच्या ठिकाणीं केवळ अद्वैतच असल्यानें भाषा पोहोचूं शकत नाही. म्हणून स्वस्वरुप अनुर्वाच्य आहे. शब्दानें तें सांगता येत नाही. हे त्याबद्दल योग्य आहे.

English meaning

Due to this experience, the triad of Knower, knowing and known is created. Whereas in non-duality, duality is ashamed to enter. Still due to the company of this `speech', that inexpressible Self is achieved.

31
मूळ

दिवसरजनीचें परमित्य । करावया मूळ आदित्य । तो आदित्य गेलियां उर्वरित । त्यासी काये म्हणावें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

सूर्यामुळें आपण दिवस व रात्र वेगळें समजू शकतो. पण सूर्यच नाहींसा झाला तर दिवस व रात्र हा भेद राहणारच नाही.

English meaning

The separateness of day and night is there only because of the sun. If the sun had not been there then, what should one call that which remains? (ie. it would be beyond compare, inexpressible)

32
मूळ

शब्दमौन्याचा विचार । व्हावया मूळ वोंकार । तो वोंकार गेलियाउच्चार । कैसा करावा ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

सर्व शब्दांचे मूळ ओंकार आहे. शब्द बोलणें किंवा मौन धरणें म्हणजे शब्द न बोलणें हे ओंकाराच्या अस्तित्वावर आहे. तो ओंकारच नाहींसा झाला तर शब्द बोलणें व शब्द न बोलणें दोन्ही नाहीसे होतात.

English meaning

For thoughtlessness to be the beginning of this silent `word' then, there should be this aum form. But when that aum form is not then, what could that Self utter?

33
मूळ

अनुभव आणी अनुभविता । सकळ ये मायेचि करितां । ते माया मुळीं नस्तां । त्यासी काये म्हणावें ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

अनुभव व अनुभव घेणारा दोन्ही मायेमुळें निर्माण होतात. पण जर मायाच नसेल तर अनुभवाला जागाच नाही राहाणार.

English meaning

There is the experience, the experiencing and this `all' on account of maya only. But when that Reality is and this maya has never existed then, what should this be called?

34
मूळ

वस्तु येक आपण येक । ऐसी अस्ती वेगळिक । तरि अनुभवाचा विवेक । बोलों येता सुखें ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

आत्मवस्तु निराळी व अनुभव घेणारा मी निराळा असें वेगेळेपण असते तर मी आत्मवस्तुचा अनुभव घेतला असे सुखानें बोलता आले असते.

English meaning

There is the One Self and this other called `I'. If such difference still remains then, this is the vivek of the `I am' experience and this `speech' brings the pleasure of duality. (maharaj- your mind will say, `Am I there or am I not there?'; forget that also)

35
मूळ

वेगळेपणाची माता । ते लटिके वंधेची सुता । म्हणोनियां अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

वेगळेपणाची या भावनेची आई माया आहे. मायेमुळे हीचा जन्म झाला. पण वांझ बाईची मुलगी जशी खोटी तशी ही माया खोटी आहे. म्हणून वेगळेपण खोटे आहे. जीव मुलांतच परमात्म्याशी अभिन्न आहे.

English meaning

Due to such separateness there is this mother called maya and then that Reality becomes the false daughter of this barren woman (maya is merely imagined and then she imagines more). Therefore, at the root, let there be only unity/non-separation.

36
मूळ

अजन्मा होता निजेला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । सद्गुरुस शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

ज्याला जन्म मरण नाही असा अजन्मा निजलेला होता. त्यानें झोपेंत स्वप्न बघितले. त्यांत तो संसारदुःखाने सद्गुरुस शरण गेला आहे असें बघितलें.

English meaning

That which was never born has fallen asleep and on account of this, there was a dream ("I am a body", samsar) seen within this dream `I am'. And then due to the sufferings of samsar, you surrendered to sadguru.

37
मूळ

सद्गुरुकृपेस्तव । जाला संसार वाव । ज्ञान जालियां ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

मग सद्गुरुची आपल्यावर कृपा झाली. त्यामुळें संसार खोटा झाला. मग मी आत्माच आहे असें ज्ञान झालें. त्यामुळें मी देह आहे हें अज्ञान नाहींसे झाले.

English meaning

Due to sadguru's grace, samsar was made void and then pure knowledge came and wiped out this place of ignorance (`I am' or nothingness).

38
मूळ

आहे तितुकें नाहीं जालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन उरलें । नसोन कांहीं ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

जें आहे असें वाटत होते ते नाहींसे झाले. जें नाहीं असें माहीत होते तें कधी नव्हते म्हणून नाहीं असें झाले. अशा रीतीनें आहे व नाहीं हीं दोन्ही नाहींशी झाली.

English meaning

Whatever is, becomes nothing. And then nothing gets destroyed because it is no- thing. To be and not to be are then both gone and what remains is not this `all'. (maharaj quoted this in marathi so much. First the `many' things disappear from our mind when we stop thinking of them ie. nothing is there. Then this concept of nothingness or knowledge is also dropped in thoughtlessness) 21

39
मूळ

सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान । ऐक्यरुपें अभिन्न । सहजस्थिती ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

आहे व नाहीं यांत गोवलेले सर्व दृश्य विश्व लय पावलें. त्या ज्ञानानें समाधान झालें. आपण व आत्मा एकरुप आहोत या अभिन्नपणाच्या ज्ञानानें सहजस्थिती प्राप्त होते.

English meaning

Beyond this nothingness or zero there is that pure knowledge and due to that there is samadhan. Thus, on account of this one sagun form there is that Natural State that is without any division whatsoever. (maharaj if you know it is zero then, you are beyond it or not!)

40
मूळ

अद्वैतनिरुपण होतां । निमाली द्वैताची वार्ता । ज्ञानचर्चा बोलो जातां ॥ जागृती आली ॥ ४० ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें अद्वैताचे विवेचन ऐकले म्हणजे द्वैतानें भरलेले दृश्य खरें नाहीं हे पटते. आत्मज्ञानचे वर्णन ऐकले म्हणजे आपण अज्ञानांत वावरत आहोत ही स्पष्ट जाणीव होते. हीच जागृती होय.

English meaning

When there is that non-dual discourse then the rumour of duality is destroyed. But if this `gossip' of knowledge gets `spoken' then, an awakening has come (ie. first awakening ie. `I am' experience).

41
मूळ

श्रोता व्हावें सावधान । अर्थीं घालावें मन । खुणे पावता समाधान । अंतरीं कळे ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

आतां श्रोत्यांनी सहजस्थितीचे ऐकलेल्या वर्णनाने मन भरुन टाकावे. असें झालें म्हणजे आत्मज्ञानानें मिळणारें समाधान कसें असतें याची खूण अंतर्यामी बरोबर कळेल.

English meaning

In this awakened listener there should be constant alertness and then the mind can be established in the inner *meaning. Due to this there is that pure understanding beyond this `I am' and that is samadhan. *(maharaj the `word' is empty and the meaning is true. The meaning is paramatma)

42
मूळ

तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तुतिकें स्वप्नावारीं गेलें । अनुर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

अद्वैताच्या विवेचनामध्यें जेवढें ज्ञान सांगितलें तें शब्दरुप असल्यानें मायेच्या क्षेत्रांतील असते. देहबुद्धीला तें खरे वाटलें तरी स्वरुपानुभवाच्या दृष्टीने तें स्वप्नांतील ज्ञानाप्रमाणेंच आहे. आत्मसाक्षात्कार झाला कीं, तें नाहीसें होते. मग शब्दांच्या पलीकडे असणारे अनिर्वाच्य स्वानंदसुख तेवढें उरते.

English meaning

Due to that samadhan, this knowledge that was `spoken' in the dream went away together with the dream and that inexpressible pleasure that is beyond this `word' remained.

43
मूळ

तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता । ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानामध्यें संपूर्ण एकरुपता असते. अनुभव व अनुभव घेणारा हेदोन तेथें असत नाहीत. ज्ञानच्या या जागृतीमध्यें साधक अत्यंत शांत व स्तब्ध असतो.

English meaning

brahman is Oneness without this `word' and brahman is neither the experience nor experiencing. Such is the stillness that comes from the second `awakening' (when one awakes from the original dream to that Reality)

44
मूळ

तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊनि जागृती आला । तेथें शब्द कुंठित जाला । अंत नलगे ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

जीवानें स्वप्नांत स्वप्न पाहिलें. गुरुच्या उपदेशानें खरें जागेपण आले. आतां शब्दांची शक्ती लटकी पडली. तें अनिर्वाच्य समाधान शब्दांनी सांगणें शक्य नाही.

English meaning

Due to that Reality, there is the dream seen within the dream. Having been awake- ned from the dream of samsar, there came this second awakening and `there' in brahman the `word' was choked/confounded and an end could not be reached (ie. that endless, inexpressible paramatma/brahman).

45
मूळ

या निरुपणाचें मूळ । केलेंचि करुं प्रांजळ । तेणें अंतरी निवळ । समाधान कळे ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

आतां जे विवेचन केलें त्यांतील मुख्य मुद्दे पुन्हा सांगतो. त्यामुळें शुद्ध समाधान कसें असतें तें अंतर्यामी कळून येईल.

English meaning

If this sagun discourse is made and clearly `spoken' then, due to this, the inner space of `I am' is purified and samadhan is understood (I do not exist).

46
मूळ

तव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरोपिलें । तें पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

तेव्हां शिष्यानें विनविलें कीं, स्वामी आतांपर्यंत जें आपण सांगितलें तें मला पुन्हां सांगावें.

English meaning

At that time the disciple beseeched his Master, "Now, this has all been discoursed but please this should be spoken again swami."

47
मूळ

मज कराया कारण ।केलेंचि करावें निरुपण । येथील जे कां निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

हा विषय मला नीट कळावा म्हणून सांगितलेलें पुनः सांगावें. त्यांतील आत्मज्ञानाचें जें रहस्य आहें तें माझ्या अनुभवास येईल असें सांगावें.

English meaning

"The means to understand (ie. forget everything and you are there; the sagun dis- course) has been made by me and now that nirgun discourse should be made. Otherwise how can there ever be the understanding of my own Self? That Reality should be un- derstood by this `me'."

48
मूळ

अजन्मा तो सांग कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न । तेथें कैसें निरुपण । बोलिलें आहे ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

ज्याला जन्म मरण या कालाधीन घटना नाहीत. तो अजन्मा कोण? त्याला स्वप्न कसें पडलें? याप्रश्र्णांची उत्तरें कोणती? हें विवेचन पुनः करावे.

English meaning

"Who is that one without birth? What is this dream that he is seeing? And how can this `speech' become that pure knowledge of `there'?"

49
मूळ

जाणोनी शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्योत्तर । तेंचि आतां अति तत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी परत प्रश्र्णांची उत्तरें दिली. ती श्रोत्यांनी मनःपूर्वक ऐकावीत.

English meaning

Knowing the earnestness of the disciple, swami gave the reply. This `speech' within the listener should now be very carefully listened to.

50
मूळ

ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंच जाण । तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोहि आतां सांगतों ॥ ५० ॥

मराठी अर्थ

शिष्या, अगदी लक्ष देऊन ऐक. जो अजन्मा म्हणून सांगितला तो खरा तूंच आहेस हें ध्यानांत ठेव. तूं जें स्वप्नांत स्वप्न पाहिलेंस तें देखिल आतां सांगतो.

English meaning

(Forget everything and) Listen carefully dear disciple and you will know that you only are that `unborn'. This dream within the dream is being perceived by you and even now, in this `all', there is that `unborn' paramatma.

51
मूळ

स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार । येथें तुवा सारासार । विचार केला ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

स्वप्नामध्यें स्वप्न पाहिलें याचा अर्थ हा संसार होय. " मी आत्मा आहे " हा जागेपणा जाऊन " मी देह आहे " हे स्वप्न होय. माझा संसार आहे हें स्वप्नांतील स्वप्न होय. संसार स्वप्नमय पण त्यांत सार काय असार काय याचा तूं विचार केलास.

English meaning

That thoughtless Self had a dream within the dream and then that paramatma became you and that thoughtless understanding became samsar. But then `here' you made a careful investigation and understood the essence, I do not exist.

52
मूळ

रिघोनि सद्गुरुस शरण । काढून शुद्ध निरुपण । याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

नंतर तूं सद्गुरुला शरण गेलास. त्याच्या जवळून शुद्ध आत्मस्वरुपाचे विवेचन ऐकलेस. ही खरी खूण तुला पटली. हा प्रत्यक्ष अनुभव आतां तुला आला.

English meaning

Going to the feet of sadguru, that pure discourse was extracted and this sensory perception became that hidden nirgun understanding of this `word'.

53
मूळ

याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव । निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

यानंतर आत्मस्वरुपाचा अनुभव घेतलास कीं स्वस्वरुपाबद्दलचे शब्दज्ञान आपोाप नाहींसे होईल. अत्यंत निवांत असें विश्रांतीचे स्थान तुला सापडेल. हेंच खरें जागेपण असें समजावें.

English meaning

When the experience of only this `word' is accepted then, there is this `speech'. But this also becomes void and empty and then stillness is your place of rest and you have awakened to that Reality.

54
मूळ

ज्ञानगोष्टीचा गल्बला । सरोन अर्थ प्रगटला । याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

प्रथम ज्ञान विवेचनाची गडबड थांबेल. ती थांबल्यावर त्याचा अर्थ प्रगट होईल. त्यावर विचार केला कीं लय लागतो. व अंतरीं अनुभव येतो.

English meaning

When the disorder of this `I am' of knowledge ended (ie. when the restless mind full of `many' thoughts stopped) then, this `word' meaning became apparent. And when the thoughtless implied meaning of this `word' was accepted then, again there came another `awakening' (ie. from this original dreamto that Reality).

55
मूळ

तुज वाटे हे जागृती । मज जाली अनुभवप्राप्ती । या नांव केवळ भ्रांती । फिटली च नाहीं ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

तुला वाटेल कीं, जागृति म्हणतात ती हीच. आपल्याला अनुभव प्राप्ती झाली. पण हा केवळ भ्रम असतो. तो गेलेला नसतो.

English meaning

But if you feel that, that thoughtless Self has awakened then, it is this experience `I am' that has come to you (ie. you are still there). Then that no-knowledge is this delusion of knowledge and this `I am' has not been removed.

56
मूळ

अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला । हाहि स्वप्नीचा चेईला । नाहींस बापा ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

" मी अनुभव घेतो " ही वृत्ती जाऊन केवळ अनुभवरुपता तेवढी उरली. तरी बाबा, अजून तूं स्वप्नांतून जागा झाला नाहीस.

English meaning

When you have dissolved your experiences in this `experience' and this `experience' that is without your experiences has come, still there is not that thoughtless awakening from the dream, my good man! (that One is still caught within subtle concepts. The experiences gained from "I am a body" conviction have dissolved in the experience `I am'. But this should not be mistaken for that thoughtless Reality)

57
मूळ

जागा जालियां स्वप्नउर्मी । स्वप्नीं म्हणसी अजनमा तो मी । जागेपणें स्वप्नउर्मीं । गेलीच नाहीं ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

तूं जागा झालास तरी अजून तुझें स्वप्न नाहींसे झालेले नाही. मीच तो अजन्मा आहे असें तूं स्वप्नांत म्हणतोस. म्हणजेच जागेपणीं स्वप्नाची वृत्ती शिल्लक आहे.

English meaning

If you have awoken and arose from the dream and still say, `I am that unborn' then, there is wakefulness (from samsar), but the hidden dream has not gone away.

58
मूळ

स्वप्नीं वाटे जागेपण । तैसी अनुभवाची खूण । आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरुप ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

स्वप्नांत " मी जागा झालों " असें वाटते, त्याचप्रमाणें " मीच तो अजन्मा आहे " या अनुभवाचें लक्षण आहे. तो अनुभव खरा असतो पण अजून भ्रम शिल्लक असतोच.

English meaning

When one feels that this wakefulness in the dream is that nirgun understanding of this sagun experience then, still this Truth is a dream and of the nature of delusion (maharaj you take knowledge as true).

59
मूळ

जागृती या पैलिकडे । तें सांगणें केवि घडे । जेथे धाणाची मोडे । विवेकाची ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

संपूर्ण जागेपणा या अनुभवाच्या पलीकडे असतो. शब्दांनीं तो सांगता येणें शक्य नाही. ती सहजस्थिती आहे. तेथे विवेकाचा पाया उखडला जातो.

English meaning

The real awakening is beyond this experience but how is it something that can be accomplished (it is as it always is)? Even the holding on to vivek `here' gets broken `there'.

60
मूळ

म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण । निशब्दाची ऐसी खूण । वोळखावी ॥ ६० ॥

मराठी अर्थ

म्हणून तें समाधान वर्णन करुन सांगता येत नाहीं असें असतें. अनिर्वाच्य म्हणतात त्याचा हा असा अर्थ आहे. हें लक्षांत ठेवावे.

English meaning

That Reality is samadhan. Know that even this `speech' does not come `there'. In this way, the understanding of the `word'-less should be recognized.

61
मूळ

ऐसें आहे समाधान । बोलतांच न ये जाण । इतुकेन बाणली खूण । निशब्दाची ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

समाधान हें असें आहे. सांगून सांगता येण्यासारखें तें नाही. समाधान अनिर्वाच्य आहे याचा अर्थ ध्यानांत येईल.

English meaning

Like this is samadhan and this `speech' cannot be known there. By that much, the nirgun understanding of the `word'-less gets imbibed. .