निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ । घनदाट निर्मळ निश्र्चळ । सदोदित ॥ १ ॥
गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा निर्मळ आहे. आकाशाची पोकळी सदोदित भरीव, मळरहित व हालचाल नसलेली असते तसेंच आत्मा नेहमी निर्मळ, निश्र्चळ व घनदाट असतो.
That nirgun atma is pure just like the akash or space; it is completely full, pure, still and ever shining.