चौदा ब्रह्मांचा — समास 2: ब्रह्मनिरुपण

Fully populated

Brahma Nirupan (A Discourse on Brahman)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥

मराठी अर्थ

साधु असें सांगतात कीं, ब्रह्म गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित आणि मर्यादासुद्धा नसलेले आहे.

English meaning

brahman is without the gunas (ie. nirgun) and without form; brahman is without attachment or disturbance. brahman is the other shore where the `speech' cannot go.

2
मूळ

ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं येक । ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म सर्वांना व सर्वाला व्यापून आहे. अनेकांमध्यें एकपणानें आहे. तें शाश्वत आहे, असे शास्त्रांत सांगितलें आहे.

English meaning

brahman pervades the `all'. brahman is the One within the numerous different forms. There is that thoughtless eternal brahman and there is the vivek that brings this `speech' that is within the shasthras (there are the `many' different forms and by vivek there is this `I am' and there is always the changeless Truth that is brahman).

3
मूळ

ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत । ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म कधीं न ढळणारें, अंत नसणारे, तें नेहमी स्थिर आहे. त्याची कल्पना करतां येत नाही. तें कल्पनारहित आहे.

English meaning

brahman is everlasting and endless. brahman is sadodita/ ever shining and the Truth. brahman is without thought, it is nirvikalpa (without kalpana, thought).

4
मूळ

ब्रह्म या दृश्यावेगळें । ब्रह्म सुन्यत्वास निराळें । ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म दृश्याहून अगदीं वेगळें आहे. दृश्य लय पावल्यावर शून्य उरतें. त्याहूनसुद्धा ब्रह्म वेगळें आहे. सर्व इंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न केला तरी तें त्यांना कळत नाही.

English meaning

brahman is separate from this visible `all'. brahman is different from nothingness/zero. brahman cannot be understood even if all the senses are gathered together (ie. the meeting place of the `all').

5
मूळ

ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खासी असेना । ब्रह्म साधुविण येना । अनुभवासी ॥ ५ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही. म्हणून मूढ लोकांना तें नसल्यासारखेंच, साधूच्या मार्गदर्शनाशिवाय ब्रह्माचा अनुभव येत नाही.

English meaning

brahman does not see the visible. brahman does not exist to the fool. Without the sadhu, brahman does not come to this `I am' experience.

6
मूळ

ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्म ऐसें नाहीं सार । ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मासारखें दुसरें काहींच चांगलें नाही. ब्रह्म अती सूक्ष्म आहे. ते ब्रह्माआदि देवांनासुद्धा जाणता येत नाही.

English meaning

brahman is greater than the `all'. There is no essence like brahman. brahman is subtle and is not knowable even to the gods brahma, vishnu etc (ie. beyond the gunas).

7
मूळ

ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहुनि अनारिसें । परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म हें असें आहे, तसें आहे असें वर्णन केले तरी तें त्याहूनही वेगळेंच आहे. श्रवण व साधना अभ्यास करुन ते ब्रह्म जाणणें शक्य आहे.

English meaning

brahman is within this `word', for He is different to that which is `spoken'. But one can attain that brahman by the practice of this listening/shravan (ie. by forgetting everything).

8
मूळ

ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हेतदृष्टांत । देता न शोभती ॥ ८ ॥

मराठी अर्थ

ब्रह्माला पुष्कळ नांवे आहेत. पण ब्रह्म या सर्व नामांच्या पलीकडेच आहे. कोणतेही नाम स्वरुप कसें आहे तें सांगू शकत नाही. दृश्यांतील वस्तुंच्या द्वारे ब्रह्म समजत नाही.

English meaning

Due to listening to this `name'/`I am' there is that endless brahman but that brahman is beyond this `name' (when one stays as this `I am' or `name' then, that nameless brahman can be understood). This original intent (ie. to be/existence/`I am') has been given as an simile for brahman but an simile is not apt for Him (the two aspects of mula maya ie. original illusion are sat and chid, existence and knowing. Existence is also called `I am' and knowing can be called the `all'. And when these are understood then you feel bliss/ananda. He is beyond the feeling of being and knowing but these are an indication of Him. He is when one puts an end to every concept, example etc.).

9
मूळ

ब्रह्मासारिखें दुसरें । पाहातां काय आहे खरें । ब्रह्म दृष्टांतउत्तरें । कदा न साहे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

या ब्रह्मांडामध्यें ब्रह्मासारखें दुसरें कांहीं नाही. त्यामुळें दृष्टांत देऊन ब्रह्माचे वर्णन करता येत नाही. श्रुति ॥ यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥

English meaning

It may be said this `all' is like brahman but when you understand then, this is not the case? brahman cannot be compared to anything nor does He tolerate this `reply' (maharaj- `reply to your mind in such a way that your mind goes off': the reply is `I am' and when you give this `reply' to your mind then, your mind goes off)

10
मूळ

जेथें वाचा निवर्तती । मनासी नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसी बोलिली श्रुती । सिद्धांतवचन ॥ १० ॥

मराठी अर्थ

ब्रह्मापाशी वाणी माघार घेते. मनाला ब्रह्माची प्राप्ती होत नाही. असें अंतिम सत्य श्रुति बोलली आहे.

English meaning

The four speeches `here' come back from `there', for the mind cannot attain that brahman. This `speech' is the *vedas and the divine `word' of that siddhant but it is not that siddhant/non-duality. *(By churning over the four great statements of the vedas eg. aham brahmasmi- `I am brahman' and coming to the conclusion that everything is nothing ie. neti, neti, there is this this `speech'. It is the para speech, the first of the four speeches that lead to the `many' thoughts and spoken words. But none of these can go to that thoughtless brahman)

11
मूळ

कल्पनारुप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं । म्हणौनि वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

सारख्या कल्पनाकरीत राहणें हे मनाचे स्वरुप आहे. पण ब्रह्मामध्यें कल्पनेला स्थान नाही. म्हणून श्रुतिनें सांगितलेला सिद्धांत खोटा नाही.

English meaning

The mind, by its nature, understands thought forms but in brahman there is no thought. Therefore either there should be this `all' or there should be no thought what- soever (just as two swords cannot stay in the same sheath, so too, two thoughts cannot stay in the mind at one time. Either there should be the thinking over the great sta- tements in an attempt to understand this `I am' or there should be this `I am'. But the `many' other thoughts should be left behind. And when the mind comes to under- stand that implied meaning of these statements then, there will be that thoughtless brahman).

12
मूळ

आतां मनासि जें अप्राप्य । तें कैसें होईल प्राप्त । ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

मनाला जें प्राप्त करुन घेता येत नाही. तें कसें प्राप्त करुन घ्यावें असें विचाराल तर सद्गुरुशिवाय तें होणार नाहीं हें समजून घ्यावें.

English meaning

Now if the mind does not acquire this mula maya then, how can there ever be the attainment of that Reality? And though it may be said that the Master is not required still, this feat cannot be accomplished without the sadguru.

13
मूळ

भांडारगृहें भरलीं । परी असती आडकिलीं । हातास न येतां किली । सर्व हि अप्राप्त ॥ १३ ॥

मराठी अर्थ

कोठारें धान्यादिंनी भरलेली आहेत. पण ती कुलुपें लावून बंद करुन ठेवलीं आहेत तर किल्ली आपल्याजवळ नसेल तर कोठारांतील वस्तु आपल्याला अप्राप्यच आहेत.

English meaning

It is like you are having a storehouse that is completely full but no key to open it. And truly without getting the key, even this `all' of mula maya is unattainable.

14
मूळ

तरी ते किली ते कवण । मज करावी निरुपण । ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४ ॥

मराठी अर्थ

तेव्हां श्रोत्यानें वक्त्यास विचारलें कीं, मग (ब्रह्मज्ञान प्राप्त करुन घेण्याची) ती किल्ली कोणती तें मला सांगा.

English meaning

Then the listener asks the speaker "Well what then is this key? This should be discoursed to me."

15
मूळ

सद्गुरुकृपा तेचि किली । जेणें बुद्धि प्रकाशली । द्वैतकपाटें उघडलीं । येकसरीं ॥ १५ ॥

मराठी अर्थ

सद्गुरुची कृपा संपादन करणें हीच ती किल्ली होय. त्यानेच द्वैताची घट्ट कपाटें एकदम उघडली जातात. असे वक्यानें श्रोत्यास सांगितले.

English meaning

The *grace of sadguru is the key, for due to this, the conviction/buddhi `I am' shines in all its glory and then the doors of duality open to Oneness. *(maharaj- grace is krupa; karu- to do, paha- to see; do and see for yourself)

16
मूळ

तेथें सुख असे वाड । नाहीं मनास पवाड । मनेंविण कैवाड । साधनाचा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

आत्मबुद्धीमध्यें सुखाला कमतरता नाही. तेथें पुष्कळ सुख मिळते. तेथें मनाचा शिरकाव होत नाही. पण साधना चालूंच राहाते.

English meaning

`There' the pleasure is so great for it is not the place of your mind and such accomplishing is accomplished without the mind.

17
मूळ

त्याची मनेंविण प्राप्ती । किं वासनेविण तृप्ती । तेथें न चले वित्पत्ती । कल्पनेची ॥ १७ ॥

मराठी अर्थ

स्वस्वरुपाच्या प्राप्तीसाठीं मनाची आवश्यकता नाही. वासना तृप्त न करतां तृप्ती मिळते. अशा त्या अवस्थेची कल्पनानें आकलन होणें शक्य नाही.

English meaning

That brahman `there' is attained without the mind and it is the contentment that is beyond this vasana that simply wants to *be. Understand that you cannot go `there' by the skill of your thought. *(It is the uncreated bliss beyond the bliss/ananda of being/sat)

18
मूळ

तें परेहूनि पर । मनबुद्धीअगोचर । संग सोडितां सत्वर । पाविजेतें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मस्वरुप अनुभवाप्रमाणें आपण समजतो त्याच्याही पलीकडे आहे. तें मन व बुद्धीच्या आटोक्याबाहेंरचे आहे. पण जर साधकानें देहाचा संबंध सोडला तर तें लगेच प्राप्त होते.

English meaning

That Reality is beyond this para speech and That cannot be reached by the mind or intellect/buddhi. It is attained as soon as the attachments to these are given up completely.

19
मूळ

संग सोडावा आपुला । मग पाहावें तयाला । अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मस्वरुप पाहाता येईल. जे स्वानुभवी आहेत त्यांना माझ्या बोलण्याने बरे वाटेल.

English meaning

When you leave your attachment to these then, that Reality is understood. Within this `I am' experience there is that paramatma, this `speech' and the happy times of the `many' (the choice is yours, it depends on where you place your attention. You can remain in the `many' and get some moments of happiness; you can give them up and discover this thought `I am' and the bliss of knowing; or you can be that attentionless, thoughtless Self and immeasurable bliss).2 2sadachar V. 306- Even the pleasures of a great emperor are the pleasures of body consciousness. If this body consciousness is given up then, there is this `all'-body and an abundance of bliss. And this bliss will remain with you up until there is the attainment of brahman. Still one should know that this bliss/ananda of `I am' can be measured and it is not immeasurable brahman.

20
मूळ

आपण म्हणिजे मीपण । मीपण म्हणिजे जीवपण । जीवपण म्हणिजे अज्ञान । संग जडला ॥ २० ॥

मराठी अर्थ

ज्याचा संबंध सोडायचा ते आपण म्हणजे आपला मीपणा होय. मीपणा म्हणजेच जीवपणा आणि जीवपणा म्हणजे आपले अज्ञान होय. म्हणजेच देहबुद्धीचा संग सोडणें.

English meaning

Then you means I-ness and I-ness means jiva-ness and jiva-ness means ignorance and due to ignorance these attachments of mind and intellect have been firmly established (maharaj quoted this often in marathi).

21
मूळ

सोडितां तया संगासी । ऐक्य होये निःसंगासी । कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१ ॥

मराठी अर्थ

जीवपणाचा संबंध सोडला कीं, संबंधरहित ब्रह्मस्वरुपाशीं ऐक्य घडून येते. कल्पनेशिवाय स्वस्वरुपाशी तादात्म्य होण्याचा अधिकार प्राप्त होतो.

English meaning

But as soon as that Reality leaves its attachments to these then there is the Oneness that is beyond all attachment. For when there is no thinking then, that nirgun Self is attained.

22
मूळ

मी कोण ऐसें नेणिजे । तया नाव अज्ञान बोलिजे । अज्ञान गेलियां पाविजे । परब्रह्म तें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

" मी खरा कोण आहे " हे न कळणें म्हणजेच अज्ञान होय. अज्ञान गेल्यावर परब्रह्म प्राप्त होते.

English meaning

"Who am I?" Such doubt should be unravelled. But even when this `I am' is `spoken' still, there is ignorance and yet as soon as this ignorance goes, there is the attainment of that parabrahman.

23
मूळ

देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण । तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीचा अहंकार परब्रह्मांत चालत नाही. त्याठिकाणी अहंभावाचे पूर्ण निरसन करावयाचे असते.

English meaning

Know that in parabrahman the greatness of a body buddhi/intellect does not even begin (even the greatness of this `all' body does not begin). `There', the sense of ego has been totally extinguished.

24
मूळ

उंच नीच नाहीं परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरुष अथवा नारी । येकचि पद ॥ २४ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मस्वरुपामध्यें उच्च नीच असा भेदभाव नाही. तेथें राजा व रंक सारखेच असतात. स्त्री किंवा पुरुष सर्वांना ब्रह्मपद सारखेंच प्राप्त होते.

English meaning

There is no highest and lowest `there' and the king and the pauper are One only. There may be the purush (ie. the Knower) or there may be a woman (ie. gross body consciousness) but they are that One parabrahman.

25
मूळ

ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५ ॥

मराठी अर्थ

ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळें, शूद्राचे ब्रह्म औवळें असे वेगळेपणाचे लहान-मोठे भेद तेथें नसतात.

English meaning

That the brahman of the brahmin priest is sacred and the brahman of an untouchable is polluted. Such separating distinctions are not `there'.

26
मूळ

उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी । ऐसा भेद तयापासीं । मुळिंच नाहीं ॥ २६ ॥

मराठी अर्थ

राजाला उत्तम ब्रह्म व परिवारांतील लोकांना कनिष्ठ ब्रह्म असा भेदाभेद त्यापाशी मुळींच नसतो.

English meaning

That there is a higher brahman for the king and a lower brahman for the servants. Understand that there is absolutely no such difference in that Reality.

27
मूळ

सकळांसि मिळोन ब्रह्म येक । तेथें नाहीं हे अनेक । रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७ ॥

मराठी अर्थ

अगदीं सगळ्या जीवांना ब्रह्म एकच आहे. रंक किंवा ब्रह्मादिक देव असोत सर्वजण एकाच ब्रह्माला जातात.

English meaning

When this `all' meets the brahman then, there is One. Then that thoughtless Self is not the numerous different forms and both the poor man and lord brahma go `there' only.

28
मूळ

स्वर्ग मृत्य आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ । सकळांसि मिळोन येकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांतील आत्मज्ञानी सर्वांना विश्रांतीचे एकच ठिकाण म्हणजे परब्रह्मच.

English meaning

By knowing (ie. forget everything), there is this world of the `all' that supports these three worlds of *heaven/sattwa, this world of death/raja and hell/tama. And when this `all' fades away then, there is that One, the place of complete rest/vishranti. *(ie. dream, waking and deep sleep states)

29
मूळ

गुरुशिष्या येकचि पद । तेथें नाहीम भेदाभेद । परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९ ॥

मराठी अर्थ

सद्गुरुला व शिष्याला दोघांनाही एकच ब्रह्मपद तेथें भेदाभेद नाही. देहाशी संबंध मात्र सोडला पाहिजे.

English meaning

The guru and disciple/shishya are that One only and there is no difference `there'. But first this connection to the `I am' body has to be cut.

30
मूळ

देहबुद्धीचा अंतीं । सकळांसि येक चि प्राप्ती । येक ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतिवचन ॥ ३० ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीचा अभिमान, संबंध सोडल्यावर तीचा अंत घडून आल्यावर एकच ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म दुसरे नसते. असे श्रुति वचन आहे.

English meaning

When body consciousness ends then, that One becomes this `I am' and when there is that One brahman beyond all duality then, this divine `word' of the vedas is that wordless Self.

31
मूळ

साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरुपीं मिळाले । अवघें मिळोन येकचि जाले । देहातीत वस्तु ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

साधु देहानें वेगळें दिसतात. तरी अंरंगाच्या दृष्टीनें तें एकाच आत्मस्वरुपांत मिसळून जातात. आत्मस्वरुपांत मिसळले कीं, सर्व मिळून एकच देहाच्या पलीकडील एकच ब्रह्मवस्तु होऊन जातात.

English meaning

The sadhu sees an apparent separateness though any separateness is merged within His swarup (the Saint still says, I and you etc. but His understanding is no-otherness). When every thing is merged within His swarup then, there is the One Self beyond the body.

32
मूळ

ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अदिक उणें । उणें भाविल तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म हें नवें अगर जुनें नाही. तें अधिक नाही तसेच उणे नाही. ब्रह्म उणे आहे असे ज्याला वाटते तो माणुस देहबुद्धीचा गुलाम असतो.

English meaning

brahman is neither new nor old; brahman is neither more or less. But when there is the feeling that something is still lacking then, that One complete Reality has become the empty vanity of being a body (ie. beingness; whether it is this `all' or a gross body, it is form and form brings the feeling of incompleteness to the formless and complete).

33
मूळ

देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो । चुके समाधानसमयो । देहबुद्धीयोगें ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीमध्यें अविद्या, अज्ञान असते. त्यामुळें अनेक संशय निर्माण होतात. संशयांमुळें समाधान नष्ट होते.

English meaning

The *doubt that arises out of being this `all' body is the destroyer of that samadhan and due to this union with the body intellect, the union with samadhan is missed. *(The doubt is `I am' and the body is this `all'. When ignorance comes and you say, "I have slept" then, where is this `I am'? Therefore it is a feeling also and not eternal)3

34
मूळ

देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोनि विचक्षण । निंदिती देहो ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

देहच (मी आहे) मोठा आहे असे वाटणे. हे देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु शहाणें लोक देहाचा अशाश्वतपणा, खोटेपणा ओळखतात व देहाचे दोष पाहतात.

English meaning

Then this `all' body is felt to be the greatest and that Reality has become this attention that comes along with the feeling `I am'. Only the wise know that this feeling is also false and therefore forbid this `all' body.4

35
मूळ

देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

देह जीवंत आहे तो पर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो. मात्र मरणाधीन झाल्यावर हीच देहबुद्धी परत जन्म घ्यावयास लावते.

English meaning

3nisargadatta maharaj- The unmanifest ever exists but this manifest knowingness arises and departs. 35. Even if one remains with this `all' body until one dies still, one is holding the ego of a body and again one will have to take a rebirth and again one will hold the conviction of being a body.

36
मूळ

देहाचेनि थोरपणें । समाधानासी आलें उणें । देहो पडेल कोण्या गुणें । हें हि कळेना ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धीमुळें देहाला महत्व येते. परंतु त्यामुळें समाधानाला कमीपणा येतो. हाच देह कधीं, केव्हां पडेल हें देखिल कळत नाही.

English meaning

The greatness of this `all' body reduces that pure samadhan and this greatness is sure to come to an end for it is due to the created sattwa guna and therefore that thoughtless discourse cannot be understood.

37
मूळ

हित आहे देहातीत । म्हणौनि निरोपिती संत । देहबुद्धीनें अन्हित । होंचि लागे ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

साधु संत देहाच्या पलीकडे जाण्यांत जीवाचे कल्याण आहे, असेच सांगतात. देहबुद्धी वाढल्यानें आपलेंच नुकसान होते.

English meaning

Our greatest benefit is to be gained when we go beyond all the bodies and there is the discourse of the Saint. But due to this conviction of being a body, that thoughtlessness gets destroyed.

38
मूळ

सामर्थ्यबळें देहबुद्धी । योगियांसि तेहि बाधी । देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

देहबुद्धी फार शक्तीशाली असते. ती योग्यांनासुद्धा त्रास देते. सिद्धीचा उपयोग करुन मोठेपण मिळवणें, व्याप वाढविणें हा देहबुद्धीच प्रभाव आहे.

English meaning

This power of `I am' is a body conviction and it is detrimental to the yogi and then this limiting concept of being a body starts to open out and scatter into the `many' names and forms (ie. this `I am' becomes "I am so and so").

39
मूळ

म्हणौनि देहबुद्धि हे झडे । तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीनें विघडे । ऐक्यता ब्रह्मीची ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

म्हणुन देहबुद्धी क्षीण झाली, तरच परमार्थांत पाऊल पडते. अन्यथा देहबुद्धीमुळें ब्रह्माशी ऐक्यता होत नाही.

English meaning

Therefore it is only when that thoughtless understanding wears away any body conviction that paramarth is accomplished. For due to body conviction, the unity with brahman is disturbed.

40
मूळ

विवेक वस्तूकडे वोढी । देहबुद्धि तेथूनि पाडी । अहंता लाऊन निवडी । वेगळेपणें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

आत्मानात्मविवेक जीवाला परमार्थाकडे ओढतो. तर देहबुद्धी त्याला मागें ओढते. नंतर देहबुद्धींतून निर्माण झालेल्या अहंकारानें तो सद्वस्तुपासून वेगळा होतो.

English meaning

vivek is a turning to the Self and body consciousness pulls one away from `there' and then the ego of a body gets established and chooses separateness.

41
मूळ

विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें । सत्यब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

म्हणुन शहाण्यानें देहबुद्धी सोडावी. ब्रह्म जे सत्य आहे, त्याच्याशी समरुप व्हावे.

English meaning

It is on account of this `speech' that you become wise for, by listening to/shravan this `speech', body conviction can be given up (only this `speech' brings an end to the `speech'; maharaj- become so big that you disappear). Understand that brahman is the only Truth and then due to His trueness, this body conviction should be merged in that Truth.

42
मूळ

सत्यब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्र्ण । प्रत्योत्तर हे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

ती सद्वस्तु कशी आहे? असा श्रोत्यानें प्रश्र्ण केला. त्याला आता वक्ता उत्तर देत आहे.

English meaning

Then the listener raised the question, "What is this true brahman?" The speaker gave his reply.

43
मूळ

म्हणे ब्रह्म येकचि असे । परी तें बहुविध भासे । अनुभव देहीं अनारिसें । नाना मतीं ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म एकच आहे. पण तें अनेक प्रकारांनीं भासते. वेगवेगळ्या माणसांना तें त्यांच्या त्यांच्या मनोरचनेप्रमाणें अनुभवास येते.

English meaning

It is said that brahman is One only but He appears as the `many' forms and it is said that this `I am' experience is different from these `many' opinions (there are so `many' opinions in this world and due to gross body consciousness, it is said that there is the brahman and this `I am'. But these have to become your own direct experience and not just intellectual understanding).

44
मूळ

जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासि मानलें । तेथेंचि त्याचें विस्वासलें । अंतःकर्ण ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

माणसाला ज्या प्रकारें अनुभवास येते, तेच तो खरे मानतो. त्या स्वरुपाबाबत त्याच्या मनांत विश्र्वास निर्माण होतो.

English meaning

When mula maya experiences itself (ie. `I am'), then that Reality is starting to give value to Its own Self and then one's *antah-karana can have faith in that brahman `there'. *(General called mind but it specifically relates to an individual's ability to know)

45
मूळ

ब्रह्म नामरुपातीत । असोनि नामें बहुत । निर्मळा निश्र्चळ निवांत । निजानंद ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म हें नामारुपाच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला नाम व रुप यांची जरुरी नसूनही त्याला (साधकांनी) नावे दिली आहेत. त्याला निर्मळ, निश्र्चळ, निवांत व निजामंदांत असलेले, अशी कांहीं नामें दिली आहेत.

English meaning

brahman is beyond this `name' and form of the `all'. It is pure, still, without distur- bance and is Self-bliss.

46
मूळ

अरुप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरांपर । अदृश्य अतर्के अपार । ऐसीं नामें ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म अरुप आहे कारण त्यास रुप नाही. अलक्ष आहे कारण त्यास पाहाता येत नाही. अगोचर आहे कारण इंद्रियांना आकलन होत नाही. अच्युत कारण स्थान सोडत नाही. अनंत आहे कारण त्याचा आदि अंत लागत नाही. तें अपरंपार आहे कारण त्यास मर्यादा नाहीत. तें अदृश्य आहे, अतर्क्य आहे. ते अपार आहे. अशी ब्रह्माची नावें आहेत.

English meaning

Due to this `name', that brahman is said to be formless, inconceivable, non- perceptible, steady, endless, unseen, beyond logic and limitless (all these terms arise out of our ignorance of that brahman. These names are all pointers to that nameless brahman and it is only by understanding this `I am'/`name' that one can understand that nameless Self).

47
मूळ

नादरुप ज्योतिरुप । चैतन्यरुप सत्तारुप । साक्षरुप सस्वरुप । ऐसीं नामें ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म नादरुप, ज्योतिरुप, चैतन्यरुप, सत्तारुप,साक्षरुप व स्वसरुप आहे.

English meaning

This `name' is `I am', it is this sound-form (aum), light-form, energy/chaitanya- form, existence-form, witness-form and due to this, there is that true swarup.

48
मूळ

सुन्य आणी सनातन । सर्वेश्र्वर आणी सर्वज्ञ । सर्वात्मा जगजीवन । ऐसीं नामें ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

तें शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर, सर्वात्मा व सर्व जगाचे जीवन आहे. अशी त्याची नावें आहेत.

English meaning

There is this nothing/zero (or `all' of prakruti) and that eternal Self (or purush); He is the `Lord of the all' or the `Knower of the all'. Due to this `name', there is this `life of the world' (ie. this `all') and that atma of this `all'.

49
मूळ

सहज आणी सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत । शाश्वत आणी शब्दातीत । ऐसीं नामें ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म सहज आहे. ते नेहमी आहेच आहे. शुद्धबुद्ध आहे. सर्वातीत आहे. शाश्वत आहे. तें शब्दाच्या पलीकडे आहे.

English meaning

There is that One natural and ever-arisen Self. He is pure wisdom and beyond this `all'. Still it is on account of this `word' that there is that indestructible who is beyond the `word' (first understand this mula maya/original illusion and then understand that Reality; see V. 12).

50
मूळ

विशाल विस्तीर्ण विश्र्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार । आत्मा परमात्मा परमेश्र्वर । ऐसीं नामें ॥ ॥ ५० ॥

मराठी अर्थ

तें विशाळ आहे, विस्तीर्ण आहे, तें विश्र्वाला भरुन आहे, तें मलरहित आहे, तें आत्मा, परमात्मा, व परमेश्र्वर आहे.

English meaning

There is that brahman and He is the expansive pervader of the whole universe (ie. He is the purush when there is the appearance of a universe separate from Him). There is that spotless Self and the One who dwells within the sky (ie. purush hidden within prakruti). Due to this `name', there is that atma purush, the paramatma and parameshwara. (That purush is the Witness of this `name' and He is also the brahman or paramatma etc. who is beyond witnessing)

51
मूळ

परमात्मा ज्ञानघन । येकरुप पुरातन । चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

तें परमात्मा आहे. तें ज्ञानाने भरलेले आहे. तें एकरुप आहे. पुरातन आहे. तें चिद्रूप, चिन्मात्र आहे. अशी अनाम ब्रह्माची नावें आहेत.

English meaning

There is that paramatma and this `full of knowledge' (sagun); there is the one sagun form and that most ancient Self. Due to this `name' of that nameless Self, you come to know this knowledge-form (ie. sagun `all') and that pure intelligence of nirgun.

52
मूळ

ऐसी नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा करावा निश्र्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

ब्रह्माला अशी बरीच नावें आहेत. पण तो परमेश्र्वर नामांच्या पलीकडे आहे. त्याच्या स्वरुपाची कांहींशी कल्पना यावी म्हणुन हीं इतकीं नामें ठेवली आहेत.

English meaning

Due to this `name' there is that immeasurable Self but that God of Gods is beyond this `name'. Still, it is due to this `name' that the conviction of that Self gets established.

53
मूळ

तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम । तें येकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

जेथें विश्रांतीला विश्रांती मिळते, असा तो आदिपुरुष आत्माराम आहे. नामें जरी भिन्न दिसली तरी तें एकच एक परब्रह्म आहे. तें दुसरें कांही नाहीं.

English meaning

That is the resting place of the rest and the original purush and atmaram. And when there is that One parabrahman then, this `name' is not (this `name' is duality, but by means of this `I am' that Reality is understood. maharaj- the mind becomes your best friend and finally the mind itself goes off).

54
मूळ

तेंचि कळायाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्र्चयो बाणे ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

हें समजावें म्हणून आतां चौदा ब्रह्मांची लक्षणें सांगतो. त्यांच्या श्रवणाने ब्रह्म एकच एक आहे हें तत्व मनांत ठसते.

English meaning

In order to know that Reality there are the attentions of fourteen brahmans and that One will be understood if you resolve to listen very carefully to these.

55
मूळ

खोटे निवडितां येकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्में शास्त्राधारें बोलिजेती ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

जेवढें खोटे तेवढें बाजुस सारलें कीं, जें उरतें तें खरें असते. चौदा ब्रह्मांचे वर्णन शास्त्राच्या आधारें करतो.

English meaning

When all that is false is once and for all discarded then, that which remains should be known as the only Truth. However according to the shasthras, there are said to be fourteen brahmans (Truly there is only One brahman but to understand That there are first said to be fourteen. And by knowing these in sequence, your understanding will become more and more subtle until finally, you go off). .