चौदा ब्रह्मांचा — समास 4: विमळब्रह्मनिरुपण

Fully populated

Vimal Brahma Nirupan (A Discourse on Pure/Stainless Brahman)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ब्रह्म नभाहून निर्मळ । पाहातां तैसेंचि पोकळ । अरुप आणी विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म आकाशाहून मलरहित आहे. पाहायाला गेलो तर तें आकाशासारखें पोकळ, कोणतेंही रुप नसलेले आणि मर्यादा नसलेले असे विशाळ आहे.

English meaning

That brahman is more pure than the sky. When you understand it then it appears empty and it is said to be formless and huge beyond any limits (ie. endless).

2
मूळ

येकविस स्वर्गे सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ । ऐसीं अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥

मराठी अर्थ

एकवीस स्वर्ग व सात पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनेक ब्रह्मगोलांना या निर्मळ ब्रह्मानें व्यापून टाकले आहे.

English meaning

That One is mixed in the twenty-one heavens (ie. dream) and seven lower hells (ie. deep sleep) and the created universe/brahmanda. In this way, that pure Reality is endless and pervades like the sky (when there are the three worlds of waking, dream and sleep then, brahman remains hidden within them and He is said to be pervasive and endless. But, in truth, that pure brahman is beyond the beyond, for there is nothing but Him and therefore nothing for Him to pervade).

3
मूळ

अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें । तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

अनंत ब्रह्मांडांच्या वर आणी अनंत ब्रह्मांडांच्या खालीं जिकडे तिकडे ब्रह्म पसरले आहे. जेथें ब्रह्म नाही अशी कोठेही रीकामी जागा नाही.

English meaning

That endless brahman is below the *brahmanda and that endless brahman is above the brahmanda. There is no space, even as small as an atom, without that brahman. *(Universal body ie. whatever can be seen or perceived, of which the individual body/pinda is a part)

4
मूळ

जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी । तेणेंविण रिता प्राणी । येकहि नाहीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

लोक म्हणतात कीं, जळीं, स्थळीं, काष्ठीं व पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्म नाहीं असा एकही प्राणी नाही.

English meaning

That brahman is within the water, within the land, within the wood and within the stone. But when that gets publicly declared by the voices of this world then, only the water, the land, the wood and the stone are seen (when the people of the world say, "I am so and so" then, they say, "This is water and that is a stone" etc. and the brahman is as if not there). Then without that brahman there is only the emptiness within the prana (and there is waking and dreaming and sleeping and nothing is real nor eternal).

5
मूळ

जळचरांस जैसें जळ । बाह्याभ्यांतरीं निखळ । तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥

मराठी अर्थ

समुद्रामधें जळचरांना पाणी जसें आंत बाहेर व्यापून असते, त्याचप्रमाणें सर्व जीवांना ब्रह्म हें आंतबाहेर व्यापून आहे.

English meaning

Just as water is completely outside and inside for the creatures of the water, so too, outside and inside of every jiva there is that thoughtless pure brahman.

6
मूळ

जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां नये । म्हणौनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥

मराठी अर्थ

पाण्याची उपमा ब्रह्माला देता येत नाही कारण पाण्याला मर्यादा आहे. ते संपले की जमीन असते. पण ब्रह्माचे तसे नाही. ब्रह्म कोठेंच संपत नाही. ब्रह्माला ओलांडून पलीकडे जाता येत नाही.

English meaning

But the comparison with water is not appropriate for that brahman because there are dry places beyond water, but outside of brahman one cannot go.

7
मूळ

आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्वता । तैसें तयां अनंता । अंतचि नाहीं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

आकाशाच्या पलीकडे जावें असे कोणाला वाटलें व तो पळत निघाला तरी तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यापुढें त्याला आकाश दिसते. त्याचप्रमाणें अनंत ब्रह्माला कोठे अंतच नाही.

English meaning

Even if one tries to run outside of space still, ahead there is truly only space. That brahman is like that, for it has no end

8
मूळ

परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगटलें । अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जन्मापासूनच तें आपल्या अंगाला चिकटलेले आहे. इतकें जवळ असूनही तें सर्वांच्यापासून लपून राहीलेले आहे.

English meaning

But when that unbroken brahman meets with this mula maya then, it gets attached to this `I am' body. And though it is so extremely close, still it has been covered over by this `all' of mula maya.

9
मूळ

तयामधेंचि असिजे । परी तयास नेणिजे । उमजे भास नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आपण सर्व त्या ब्रह्मांतच असतो. पण त्यामधें आहोत याची जाणीव आपल्याला नसते. भ्रमानें निर्माण होणारा भास समजतो पण ज्याच्यामुळें हा भास निर्माण होतो ते ब्रह्म समजत नाही.

English meaning

This mula maya is within that Reality but it does not know that Reality. Appearance is born out of that parabrahman but that parabrahman does not know this appearance.

10
मूळ

आकाशामधें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १० ॥

मराठी अर्थ

आकाशांत ढग येतात त्यामुळें तें मलिन झाल्यासारखे वाटते. पण ढगांमुळें आलेला मलिनपणा आकाशाला चिकटत नाही. ढग गेल्यावर आकाश परत जसें तसेंच असते व दिसते. तसाच संबंध ब्रह्म व विश्र्व यामधें आहे.

English meaning

If clouds appear in the space then, it is felt that the space is disturbed but this is just an illusion, for the space is ever pure and remains untouched.

11
मूळ

नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी । तैसे दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारुप ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आकाशाकडे सारखें टक लावून पाहिलें तर डोळ्यापुढें प्रकाशाची चक्रें दिसतात. तीं कांहीं खरी नसतात. त्याचप्रमाणें अज्ञानी माणसांच्या अनुभवाला येणारे दृश्यविश्र्व ज्ञानी पुरुषांना त्यांच्या अनुभवानें खोटेपणाने प्रतीत होते.

English meaning

When we focus intently upon the space, then swirls are seen before our eyes (ie. then in the space or nothing, something appears). Alternatively, when the gnyani carefully examines this visible `all' with vivek, then he comes to realize that it is an illusory form caused by the act of focusing. (siddharameshwar maharaj- when you look up at the moon you do not see that which is between the moon and the eye. Only when you try to see that which is between the moon and the eye, does space appear. You were there as that imperceptible brahman but when That tries to see its Self then you feel, `I am there')

12
मूळ

मिथ्याचि परी आभासे । निद्रिस्तांस स्वप्न जैसें । जाग जालियां अपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

दृश्य खोटें म्हटलें तरी इंद्रियांना ते दिसते. पण माणसाला झोपेंत स्वप्न पडते. झोपेंत त्या स्वप्नांतील सर्व त्याला खरेच वाटते. पन जागें झाल्यावर स्वप्न व ती दृश्यें खरी नाहीत, नव्हती हें त्याला समजते.

English meaning

And though the gnyani knows it is illusory, still it appears. It is like the dream of a sleeping man who has awoken. He automatically understands that it was never true.

13
मूळ

तैसें आपुलेन अनुभवें । ज्ञानें जागृतीसि यावें । मग माईक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

ह्याचप्रमाणें जो स्वस्वरुपाचा अनुभव घेतो त्यास आत्मज्ञान होते. त्या ज्ञानाने त्याची अज्ञानरुपी नीद्रा जाते. मग त्याला दृश्य विश्र्व खरें नसून माईक आहे. हे कळूं लागते.

English meaning

In the same, when you experience an awakening through knowledge then, automa- tically the illusory is understood.

14
मूळ

आतां असो हें कुवाडें । जे ब्रह्मांडापैलिकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोन दाऊं ॥ १४ ॥

मराठी अर्थ

आतां ही गहन व दुर्बोध भाषा पुरे. ब्रह्मांडाला व्यापून उरणारे जें परब्रह्म तें उमजेल असें सांगतो.

English meaning

When now, the `babbling abroad' of the great elements (ie. each element brought more and more objectivity until the gross world appeared) has become this mula maya beyond the created universe/brahmanda then, that Reality can be selected out and understood (first understand mula maya and then understand brahman).

15
मूळ

ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थासी व्यापून ठेलें । सर्वांमधें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म ब्रह्मांडांमधे कालवलेले आहे. सर्व पदार्थांस व्यापून आहे. सर्वांत पसरलेले असले तरी तो पसारा अंशमात्रेंच आहे.

English meaning

brahman is mixed within this whole universe and He is pervading this object of the `all' also. And due to a mere fraction of Him there has come within this `all', the expansion we call the gross world.

16
मूळ

ब्रह्मामधें सृष्टी भासे । सृष्टीमधें ब्रह्म असे । अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

त्या ब्रह्मांत सर्व विश्र्व मावते. तसेंच सर्व विश्र्वांतही ते व्यापून आहे. मात्र त्याचा अनुभव घ्यावा तर तें अंशमात्रेच आहे. असा अनुभव येतो.

English meaning

In brahman, the gross creation has appeared and in the gross creation, brahman is. This `I am' experience that you get is but a semblance of Him and even this is only a fraction of Him.

17
मूळ

अंशमात्रे सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी । सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरी । माईल कैसें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

या अवाढव्य विश्र्वामधें ब्रह्म जर अल्प अंशमात्रेच आहे. तर विश्र्वाच्याबाहेर तें किती आहे ह्याचे मोजमाप कोण करेल? तें अपरंपार, अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वांच्या पोटांत मावेलच कसें.

English meaning

Though only a mere fraction of that brahman is within this gross creation still, outside of this creation, who could limit Him? Really how could the whole of brahman ever be confined within this universe?

18
मूळ

अमृतीमधें आकाश । सगळें सांठवतां प्रयास । म्हणौन तयाचा अंश । बोलिजेतो ॥ १८ ॥

मराठी अर्थ

देवाचें तीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्यें सगळें आकाश साठवण्याचा प्रयत्न वाया जातो. तसें करतां येत नाही. त्याचप्रमाणें विश्र्वामधें संपूर्ण ब्रह्म सामावून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो. म्हणून विश्र्वामध्यें ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणालो.

English meaning

It is like trying to put the whole of space in a pot (ie. our small individual mind). Therefore this small part of that brahman should be made into this `all' (when nothing is there then, only space is there ie. `all'. This `all' or knowledge is not brahman but at least it is a semblance of that brahman and now that brahman can be understood).

19
मूळ

ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें । सर्वांमधें परी संचले । संचलेपणें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

सर्व पदार्थांत ब्रह्म मिसळले आहे. तें अखंड स्थिर आहे. तें कधीं हललेच नाही. तें इतके घट्टपणें सांचलेले आहे की त्यास हलणें शक्य नाही.

English meaning

That brahman is mixed within this `all' but it is not disturbed like this `all'. He is within this `all' and due to this collecting together of everything into this `all' (ie. un- derstanding nothing or no things are true), the brahman appears to have been collected together (this understanding of `I am' is mistaken as that Reality).

20
मूळ

पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत । पंकीं आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥

मराठी अर्थ

पंचभूतामध्यें तें मिसळले आहे. पण त्यांना चिकटलेलें नाही. जसेंकी चिखलामध्यें आकाश दिसते पण आकाशाला चिखल चिकटत नाही.

English meaning

He is mixed within the five great elements but He is beyond the five elements. He is just like the space in the mud and He remains untouched.

21
मूळ

ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताही दृष्तांत योग्य वाटत नाही. परंतु तें कसें आहे याची थोडी कल्पना येण्यासाठीं दृश्य विश्र्वांतील दृष्टांत द्यावा लागतो. त्यासाठीं वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. त्या दृष्टीनें विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरुप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो.

English meaning

Though a simile cannot accomplish that brahman, still it can bring that under- standing, for within this simile of space/akash (ie. zero/nothing) one can come upon thoughtlessness (ie. brahman) (maharaj- nothing was in the room, he said, but the bloody fool forgot he was there)

22
मूळ

खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणौनि ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

खंब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असें श्रुति सांगते. श्रुतिनें तसे सांगितल्यानें ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात.

English meaning

The shruti says, `The sky is brahman' and the smriti says, `That thoughtless Self is like the sky'. Therefore, space/akash has been given as a simile for that brahman (see V.1).

23
मूळ

काळिमा नस्तां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । सुन्यत्व नस्तां निवळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥

मराठी अर्थ

पितळाच्या पिवळेपणांत किंचीत काळसरपणा नसतां तर तें पितळ नसून सोनेंच आहे असे म्हटले असते. तसेंच आकाश हें ब्रह्मासारखेंच सूक्ष्म व विशाळ आहे. पण आकाशांत शून्यत्व असतें तेंच ब्रह्मामध्यें नसते. नाहींतर आकाश ब्रह्मस्वरुपच झालें असते.

English meaning

If brass did not have any stains then, it could be compared to pure gold. And similarly, when there is not the `nothingness' of space then, there is that pure brahman.

24
मूळ

म्हणौनि ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आडळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म आकाशासारखें आहे व माया वायुसारखी आहे असे म्हणतात. वायु आहे पण तो प्रत्यक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो पण माया दिसत नाही.

English meaning

Now if brahman is likened to the sky then, maya can be likened to the wind. And maya like the wind, can be felt but this is not that `vision' of brahman.

25
मूळ

शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा । परंतु ते स्थिरावेना । वायुच ऐसी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

शब्दसृष्टींत सारखी रचना बदलत असते. कारण लोक सारखें शब्द बोलत असतात. पण ही शब्दसृष्टी अशाश्वत असते. वायुला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण स्थिरता नसते.

English meaning

When there is this world constructed of words (see V. 4, "This is water, stone" etc.), then a world gets created and destroyed every *moment. And when that Reality cannot be made still then, it appears just like the wind (even if the thoughts of a world are left still, that original thought of maya remains). *(maharaj- one word has to be forgotten before the other word can br heard)

26
मूळ

असो ऐसी माया माईक । शाश्वत तें ब्रह्म येक । पाहों जातां अनेक । व्यापून आहे ॥ २६ ॥

मराठी अर्थ

मायासुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत असते. फक्त ब्रह्म तेवढें शाश्वत आहे. एकच ब्रह्म अनेकांना व्यापून आहे असे सूक्ष्म दृष्टीनें पाहातां आढळतें.

English meaning

So like this is this illusory maya and that One eternal brahman. And if one tries to understand Him, then He becomes the pervader of the numerous different forms (ie. then you remain and He is felt to be just like the space).

27
मूळ

पृथ्वीसी भेदून आहे । परी तें ब्रह्म कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदत्वासी ॥ २७ ॥

मराठी अर्थ

जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखें जड नाही. किंबहुना तें इतकें सूक्ष्म आहे कीं त्याच्या इतकें सूक्ष्म अजुन कांहींच नाही.

English meaning

Then He permeates the earth element/prithvi but, that brahman is not hard, for there is nothing that can equal the softness of Him.

28
मूळ

पृथ्वीहूनि मृद जळ । जळाहूनि तो अनळ । अनळाहूनि कोमळ । वायो जाणावा ॥ २८ ॥

मराठी अर्थ

पृथ्वीपेक्षां सूक्ष्म पाणी असते. पाण्यापेक्षां तेज सूक्ष्म असते. तेजाापेक्षां वायु सूक्ष्म असतो.

English meaning

Water is softer than earth and fire is softer than water and you should know that the wind is softer than fire.

29
मूळ

वायोहूनि तें गगन । अत्यंतचि मृद जाण । गगनाहून मृद पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९ ॥

मराठी अर्थ

वायुपेक्षा आकाश अत्यंत सूक्ष्म असते. आणि आकाशाहून ब्रह्म सूक्ष्म असते. या सूक्ष्म ब्रह्मास पाहण्यास जीवही अती सूक्ष्म व्हावा लागतो. त्यावेळीं त्याला ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होण्याची पात्रता येते.

English meaning

Now know that this sky is much more delicate than the wind and then known that that full and complete brahman is softer than the sky even.

30
मूळ

वज्रास असे भेदिलें । परी मृदत्व नाहीं गेलें । उपमेरहित संचलें । कठिण ना मृद ॥ ३० ॥

मराठी अर्थ

वज्र अति कठीण पण त्यासही ब्रह्म भेदून जाते. तरीही ब्रह्माचे सूक्ष्मपण कमी होत नाही. खरें म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही. तें जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणीं भरलेले आहे.

English meaning

That penetrates even steel but it does not lose its softness. That is incomparable, for It is neither hard nor soft.

31
मूळ

पृथ्वीमधें व्यापून असे । पृथ्वी नासे तें न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म पृथ्वीला आंतून बाहेरुन व्यापून आहे. परंतु पृथ्वीचा नाश झाला तरी त्याला नाश नाही. ब्रह्म पाण्याला व्यापून आहे. पण पाणी शोषलें जाते, नाश पावते. पण ब्रह्म शोषलेही जात नाही व त्याचा नाशपण होत नाही.

English meaning

It pervades within the elemental earth but still It is not destroyed when the earth is destroyed. And being in the elemental water still It is not dried up when the water dries up.

32
मूळ

तेजीं असे परी जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म तेजाला व्यापून असते. पण तेजानें तें जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून असते. पण वायूसारखें तें चळत नाही. ब्रह्म आकाश व्यापून असते पण तें आपल्याला कळत नाही.

English meaning

It is in the fire but It is not burnt. It is in wind but It does not move. It is in the sky but It cannot be understood and that is parabrahman.

33
मूळ

शेरीर अवघें व्यापलें । परी तें नाहीं आडळलें । जवळिच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

आपल्या सर्व शरीरभर ब्रह्म त्याला व्यापून आहे. परंतु तें आपल्याला आढळत नाही. तें इतकें जवळ असून फार दूर झाले हें नवलच आहे.

English meaning

But when there is this `all' body pervading everything then, that brahman cannot be met. How can this marvel be so near and yet be so far away?

34
मूळ

सन्मुखचि चहुंकडे । तयामधें पाहाणें घडे । बाह्याभ्यांतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

सगळीकडे चारी दिशांना ब्रह्म समोरच असते. आपले पाहाणे व इतर सर्व गोष्टी ब्रह्मांतच घडतात. आंतून व बाहेरुन व्यापून असलेले ब्रह्म स्वयंसिद्ध आहे.

English meaning

When it is in front of us and in all four directions around us then, within that Reality, It is being understood as space. But inside and outside of this `I am' experience, there is that siddha/perfect One.

35
मूळ

तयामधेंचि आपण । आपण सबाह्य तें जाण । दृशावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

आपण ब्रह्मामधेंच जगतों व राहातों. आपल्या आंत बाहेर तेंच आहे. अवकाशांतील सर्व दृश्य विलीन केल्यावर जें केवळ निव्वळ आकाश उरतें तसें ब्रह्म आहे. हे खूणेनेच समजावे.

English meaning

You are within that Reality. Know that That is inside and outside of you. And though that thoughtless Reality is separate from this visible `all' still, It is said to be like the sky (ie. the state of witnessing or zero).

36
मूळ

कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें । जैसें न दिसे आपलें । आपणासि धन ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

इथें कांहीं नाही असे जेथें वाटते तेथेंच ब्रह्म पुष्कळ भरलेले असते. आपण स्वतः बाजूला ठेवलेले धन आपल्याला दिसत नाही. तसेंच ब्रह्माच्या बाबतींत घडून येते.

English meaning

And when this thing called the `all' is not felt then, that brahman `there' fills everywhere. He is like your own treasure but you cannot see Him.

37
मूळ

जो जो पदार्थ दृष्टी पडे । तें त्या पदार्था ऐलिकडे । अनुभवें हें कुवाडें । उकलावें ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

जी जी गोष्ट आपण पाहातों ती दृष्टीस पडण्या आधी मध्यें ब्रह्म असते. स्थूल दृष्टीस ब्रह्म न दिसणारे असल्यानें स्वरुपानुभावेंच तें कोडे उलगडून घ्यावें

English meaning

*When the purush's vision falls on this visible `all' object then, know that it is that Reality `there' that has become this object `here' on this side (ie. that Reality perceives its own Self as its reflection). Still by means of this `I am' experience, that thoughtless brahman should be disentangled from the `babbling abroad' of the elements (ie. the becoming objective and creating a gross body and world of `many' names and forms). *(When you try to see that which is between the moon and the eye ie. brahman then, you are looking at your Self and you imagine space)

38
मूळ

मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस । पृथ्वीविण भकास । येकरुप ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

सर्व पदार्थांना आकाश मागेंपुढें व्यापून असते. सर्व पदार्थ समजा नाहींसे झालें तरी अवका उरेल. त्यांतच पृथ्वीही नाहीशी झाली तर सगळीकडे ओसाड पोकळी दिसेल.

English meaning

When this space is behind as well as in front then, there is that purush without the expansive space of this `all' object (ie. when you feel that there is only this space in front of you then, the brahman it seeing His own refection and you feel there is this `I am' of space. But when this space is behind, in front, as well as in every direction then, this space cannot remain as space anymore and there is the understanding of that One thoughtless purush). Then there is not the empty gross creation of `many' forms and there is this One form/rup (ie. swarup).

39
मूळ

जें जें रुप आणी नाम । तो तो नाथिलाच भ्रम । नामरुपातीत वर्म । अनुभवी जाणे ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

इंद्रियांना दिसणारा नामरुपांचा आकार मुळांतच नसणारा भ्रम आहे. नामरुपांच्या पलीकडे असलेले ब्रह्मरुप रहस्य साक्षात्कारीच जाणतात.

English meaning

But when there is this mula maya of `name'/existence and `form'/knowledge then, that purush has become this non-existent delusion. Still, that essence beyond this `name' and `form' can only be known by the `experienced' (only one who has understood this `I am' experience can go beyond this experience of `name'/beingness and `form'/knowing- ness and be that thoughtless, formless purush or brahman).

40
मूळ

नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबर । माया देवी ॥ ४० ॥

मराठी अर्थ

आकाशामध्यें मोठमोठे धुराचे डोंगर दिसतात. पण तें सगळें तात्पुरतें असतात. आकाशाला त्यांचा स्पर्श होत नाही. त्याचप्रमाणें शुद्ध ब्रह्मांमधें मायेने विश्र्वाचे अवडंबर आढळतें.

English meaning

That great brahman within the sky has assumed a form and then that is said to be like a mountain of smoke (ie. our imagination/words plays and then many forms get created out of the cloud in the sky). In this way, the goddess maya displays her magic (everywhere He is there and though He is everything, something else appears ie. the `all' of maya appears just like the cloud appears in the sky. And then our thoughts and imagination create something else upon this cloud and we say, "It is like a mountain of smoke" etc. First we imagine the `all' and upon that we then imagine the `many' forms).

41
मूळ

ऐसी माय अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत । सर्वां ठाईं सदोदित । भरलें असे ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें माया अशाश्वत असून ब्रह्म मात्र शाश्वत आहे. ते सर्वत्र सर्व ठिकांणी कायम भरलेलें आहे.

English meaning

Like this is the non-eternal maya; therefore that eternal brahman should be known. Truly, this place of the `all' is completely full of that ever-arisen brahman.

42
मूळ

पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमधेंचि आहे । नेत्रीं निघोनि राहे । मृदपणें ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

ग्रंथ, पोथी वाचीत असतां ब्रह्मच वाचत असतें. अक्षरांतील कानामात्रांमधें तेंच असते. सूक्ष्मपणें डोळ्यांत राहून पाहण्याची क्रिया तेंच करतें.

English meaning

He is seeing when you read this spiritual text; He only is within the letters and He stays within and goes out through your eyes.

43
मूळ

श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहातां । मना सबाह्य तत्वता । परब्रह्म तें ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

कानानें शब्द ऐकतां, मनानें विचार करीत असतां, मनाच्या आंतबाहेर खरोखर ब्रह्मच असतें.

English meaning

And He hears this `word' (ie. `I am') by means of shravan and He understands thoughtlessness by means of this mind. Truly inside and outside of this mind there is only that parabrahman.

44
मूळ

चरणें चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

पायांनी वाट चालत असतां ब्रह्म सर्व शरीरांत व्यापून असते. हातांनीं वस्तु घेत असतां त्या वस्तुला व्यापून ब्रह्मच येतें.

English meaning

Whether you are walking with your feet (ie. "I am a body") or you are moving along this path of understanding still, He is forever being met within this `all' body (He is always there and everything is truly taking place in this `all' of knowledge; however these things cannot be understood as long as you remain with the conviction, "I am a body"). But when you take that pure Self as a possession in your hand (ie. when you objectify) then, that One brahman is being obstructed.5

45
मूळ

असो इंद्रियेंसमुदाव । तयामधें वर्ते सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

आपल्या सर्व इंद्रियांना आंतबाहेर ब्रह्मच व्यापून आहे. त्यामध्यें इंद्रियांची सर्व कामें होत असतात. परंतु इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यास मोडून जातो. ब्रह्म अतिद्रिय असल्यानें इंद्रियांची गति खुंटते.

English meaning

Such is this meeting place (ie. `all') of the *senses. This `all' place exists and functions within that pure brahman and if you try to know Him then, the desire to `see' through your senses gets broken and this `all' remains (then you see with the `eyes' of knowledge and not with your senses). *(maharaj- you should listen with all your senses)

46
मूळ

तें जवळिच असे । पाहों जातां न दिसे । न दिसोन वसे । कांहीं येक ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

ब्रह्म आपल्या अगदीं जवळच आहे. परंतु तें पहावें म्हटलें तर दिसत नाही. तरी न दिसतासुद्धा त्याच्या असण्यांत फरक पडत नाही. तें असतेंच

English meaning

And though that brahman is so very near, if you try to see Him then, He will not be seen and this `all' will be seen. But by not trying to see Him, this `all' will stay as that One.6

47
मूळ

जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेन स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

प्रथम हें सारें दृश्य विश्र्व मनांतून नाहीसें झालें पाहिजे. आपल्या देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाहीं अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव येण्याची पात्रता अंगीं येते. त्यानंतर ब्रह्माचा साक्षात्कार होतो व जीव ब्रह्मरुप होऊन जातो.

English meaning

Through this `experience' one should know the non-existence of the gross creation. And then by your Self-experience that brahman should be attained.

48
मूळ

ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहो नेणे । अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ती साक्ष ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

ज्ञानदृष्टीनेंच ब्रह्म जाणता येते. त्याला जाणण्यासाठीं आपली स्थूल दृष्टी उपयोगी पडत नाही. अंतरंगांत वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनणें ही ज्ञानदृष्टीची खूण आहे. आणि हे ज्याचे त्यालाच अंतरंगांत समजते.

English meaning

This `vision of knowledge' is your hidden treasure but it is not something that can see through your eyes. It is the inner knowing vritti and the witness and due to this, that pure knowledge can be gained.

49
मूळ

जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया । ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तीन अज्ञानवृत्तीच्या अवस्था आहेत. चवथी अवस्था तुर्या ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. तुर्या अवस्थेंमध्यें एकीकडे ब्रह्माचे भान असते तर दुसरीकडे दृश्य विश्र्वाचे देखील भान असते. स्वानुभव येण्यासाठीं वृत्ति कोठें ठेववी हें तुर्येमधें बरोबर समजते. ती सर्वसाक्षीणी अवस्था आहे.

English meaning

To know brahman means, to know maya and it is to know this place of the `expe- rience'. Then the One Reality should be known as the turya state and the witness of this `all'.

50
मूळ

साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण । जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥

मराठी अर्थ

" मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहें, मी केवळ त्याचा साक्षी आहे अशी अवस्था असली तरी तिच्यामध्यें साक्षित्वाची सूक्ष्म वृत्ती असते. साक्षित्व मावळून ती वृत्तीसुद्धां विलीन झाली म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी होय. त्या निवृत्ती अवस्थेंमध्यें सर्व जाणतेपण विरते. तेंच विज्ञान होय.

English meaning

The cause of this knowing vritti is witnessing and witnessing takes place within unmana (ie. no mind) and that should be called as nivritti (without vritti). It is when knowingness `here' dissolves and it is also called vignyan (dissolution of knowledge). (unmana, nivritti and vignyan are all the One pure brahman)

51
मूळ

जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ती मुरे । परब्रह्मीं ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

प्रथम अज्ञान नाहींसे होऊन ज्ञान उदय पावतें. पुढें ज्ञान नाहींसे होऊन विज्ञान येते. अखेर विज्ञान देखील परब्रह्मामतजिरतें. मग केवळ शुद्ध व विमळ ब्रह्म तेवढें शिल्लक उरते.

English meaning

When `here' the ignorance ceases and knowledge also disappears then, this knowing vritti of vignyan is absorbed in that parabrahman.

52
मूळ

ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत । योगी जना येकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

असें हें शाश्वत ब्रह्म आहे. तेथें सर्व कल्पना नाहींशा होतात. योगी लोकांचा हा एकान्त आहे. तो अनुभवानें आपण समजून घ्यावा.

English meaning

been to that place because there is no knowing nor not knowing of brahman. There is you and only you. 52. When all thoughts `here' end then, there is that eternal brahman. Therefore through this experience of `I am' the mind should become that `aloneness' of the yogi. .