मायोद्भव अथवा ज्ञानदशक — समास 10: सुन्यत्वनिर्शन

Fully populated

Shunyatva Nirasan (The Refutation of Voidness)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिला अवचिता । हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥

मराठी अर्थ

सामान्य लोकांची मतें, त्यांचे अनुभव जर बघितले तर ते परस्पर विरुद्ध असतात. कलह उत्पन्न होण्याची वेळ येते. या मतांचा गोंधळ व अनुभवांची आरडाओरड श्रोत्यांनी गमतीनें ऐकावी.

English meaning

As soon as this `I am' experience is wiped out, there arises disagreements among the people. The good listener should put away every concept he has been holding on to and then hear the wonder of this `story'.

2
मूळ

येक म्हणती हा संसारु । करितां पावे पैलपारु । आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आपण हा संसार करावा. तो करतां करतां त्यांतून पार पडता येते. जीवांवर देवाचें नियंत्रण असल्यनें हा व्याप आपल्या मालकीचा नव्हे.

English meaning

Otherwise that One brahman starts to imagine and becomes a confused mind and says, "You have to stay in this worldly existence/samsar if you want to reach the other side (ie. brahman). Then the burdens of your jiva will not be placed upon God."

3
मूळ

येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे । पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, हे करुन चालणार नाहीं. संसार करतांना लोभ अंगी जडतो. मगआपल्या पोटासाठीं अपल्याला कुटुंबाची सेवा करावी लागते.

English meaning

Then that One says, "That is not possible, for samsar brings greed and then one gets attached to a body. Then one is required to spend one's life in the service of a wife and family."

4
मूळ

येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें । कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो संसार सहजपणें व सुखानें करावा. पण त्यानें सद्गती मिळणार नाही. म्हणून सद्गतीसाठीं कांहीं दान पुण्य करावें.

English meaning

That One (who has become confused) says, "samsar is your nature and you can be happy in that condition. And then if you give some of your wealth as a donation, you can gain the True state."

5
मूळ

येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा । येणें स्वर्गलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, संसार मुळीं खोटाच आहे. वैराग्य धारण करुन देशांतरास निघून जावें. असें केल्यानें स्वर्ग प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.

English meaning

Another says, "But samsar is false and it is only through vairagya the one can get that perfect state. Due to vairagya/renunciation the door to heaven is opened wide."

6
मूळ

येक म्हणती कोठें जावे । वेर्थचि कासया हिंडावें । आपुले आश्रमी असावें । आश्रमधर्म करुनी ॥ ६ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आपलें घर सोडून कोठें जायचे ? उगाच पायपीट करुन कशाला हिंडायचे ? आश्रमधर्म सांभाळून आपल्या घरींच असावें.

English meaning

Another (who is himself brahman) says, "Where is this heaven you speak of? Why should anyone leave their duties and wander aimlessly? You should be a householder and carry out your duties/dharma accordingly."

7
मूळ

येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म । ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, कसला आला आहे धर्म ? जिकडे तिकडे अधर्म बोकाळला आहे. या संसारांत निरनिराळीं कर्मे ( भली बुरी ) करावी लागतात.

English meaning

Another says, "How can there be dharma when everything is adharma/against dharma? For in this worldly existence you are performing many actions that are im- proper."

8
मूळ

येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी बरी । येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, शक्य तितकीं वासना चांगली ठेववी. वासना शुद्ध ठेवल्यास माणूस फार सायास न होता संसार तरुन जातो.

English meaning

Another says, "You should do according to what your many natural desires tell you. In this way, the one in samsar is effortlessly taken to the other shore."

9
मूळ

येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव । येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, निष्ठा हवी तर संसार तरता येतो. निष्थेनेंच भगवंताची प्राप्ती होते. बाकी सर्व गोष्टी वायफळ समजाव्यात.

English meaning

Another says, "Faith is required. Only by faith can God be reached. Those with no faith get lost in confusion."

10
मूळ

येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं । मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आईबापांना मनापासून देव मानावें व शुद्ध निष्ठा ठेवून त्यांना पूजीत जावें.

English meaning

That One says, "Our elders should be respected with all our heart. In fact everything should be regarded as God and our mother and father should be devoutly worshipped."

11
मूळ

येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन । मायेबाप नारायेण । विश्र्वजनाचा ॥ ११ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, देवाब्राह्मानांचे पूजन करावें. त्यामुळें सर्वांचा मायबाप नारायण प्रसन्न होतो.

English meaning

That One who has forgotten Himself says, "When you worship the brahmin priests and the idols of God then you are worshipping narayan, who is the mother and father of of this world."

12
मूळ

येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, शास्त्रामचा अभ्यास करावा. भगवंतानें त्यांत जो उपदेश केला आहे त्याप्रमाणें वागावें. म्हणजे परलोक प्राप्त होतो.

English meaning

Another says, "One should read the shasthras, for they are the words of God. By this means one will go to the world beyond."

13
मूळ

येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना । याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, अहो, शास्त्रें पुष्कळ आहेत, त्यांचे अध्ययन संपणार नाही. म्हणून साधुला शरण जावें.

English meaning

Another says, "Dear people, to read the shasthras is not enough. You have to go to the feet of the sadhu."

14
मूळ

येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, जाऊं द्या या सार्‍या गोष्टी, उगाच वायफळ बडबड नको. भूतदयेनें सर्वांनशीं वागावें.

English meaning

Another says, "Give up all these stories for they are just useless gossip. All you need to do is have compassion for all creatures."

15
मूळ

येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें । अंतःकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आपण आपल्या आचारधर्माप्रमाणें वागावें. अंतःकाळीं भगवंताचे नांव घ्यावें.

English meaning

Another says, "Each one should conduct themselves properly and then at the time of death, the name of God should be repeated."

16
मूळ

येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल । नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, पुण्य केलें असेल तरच अंतःकाळीं भगवंताचे नांव तोंडांत येईल. नाहीतर तेव्हांच माणसाला भ्रम होतो.

English meaning

Another says, "Only if you have accumulated sufficient merit will you take His name. If not then, when the end comes you will not remember it."

17
मूळ

येक म्हणती जीत असावें । तंवचि सार्थक करावें । येक म्हणती फिरावें । तीर्थाटण ॥ १७ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आपण जिवंत असेंपर्यंत आपलें सार्थक करुन घ्यावें. एक म्हणतो कीं, तीर्थाटन करीत फिरावें.

English meaning

Another says, "While you have still got life, you should make it meaningful." Another says, "You should go to many pilgrimage places."

18
मूळ

येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी । चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, तीर्थाटनाची यातायात करण्याची जरुरी नाही. कारण शेवटी पाणी व पाषाण यांचेच दर्शन घ्यावें लागते. व नाकातोंडांत पाणी जाऊन जीव कासावीस होतो.

English meaning

Another says, "Why to take all this trouble just to seen some water and some stones. Nothing is gained other than the long face that you have when you have to sink down under those cold waters."

19
मूळ

येक म्हणती सांडीं वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं । दर्शनमात्रें होये होळी । माहापातकाची ॥ १९ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, हा वाचाळपणा आवरा. तीर्थांचा महिमा थोर व अगाध आहे. नुसत्या दर्शनानें पापांची होळी होते.

English meaning

Another says, "Do not speak like this; the greatness of our holy places is incompa- rable to anywhere else in the world. By just seeing these places the greatest of sins are made to ashes."

20
मूळ

येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें । येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, मन आवरावें. हा सगळ्या साधनांचा हेतु आहे. शेवटीं मनच तीर्थ बनते. एक म्हणतो कीं, नेहमी सावकाश किर्तन करीत असावें.

English meaning

Another says, "Your mind is the only pilgrimage place when you have learnt to control it." Another says, "You should relax and sing kirtans."

21
मूळ

येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा । देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, योगसाधन सर्वांत उत्तम आहे. म्हणून सर्व बाजुला ठेवून आधीं योगसाधना करावी. त्यानें देह अमर करुन टाकावा.

English meaning

Another says, "Yoga is the best. That should first be practiced and on account of this your body will become immortal."

22
मूळ

येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करुं नये । येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, हें भलतेंच काय ? असें करुन काळाला फसवूं नये. एक म्हणतो कीं, भक्ती मार्गाचा अवलंब करावा.

English meaning

Another says, "How can this be? One cannot cheat death." Another says, "You should keep on the path of devotion."

23
मूळ

येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें । येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, ज्ञानमार्ग चांगला. एक म्हणतो कीं, साधना करावी. तर एक म्हणतो कीं, नेहमी मुक्तपनें वागावें.

English meaning

Another says, "Knowledge is the best." Another says, "You should do sadhana." Another says, "You are always liberated."

24
मूळ

येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा । येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, मुक्तपणें म्हणजे स्वैर वागणार्‍या माणसा पापाचा थोडासा तरी कंटाळा करावा. एक म्हणतो कीं, आमचा हा मार्ग बंधनरहित आहे.

English meaning

Another says, "If you are unrestrained and self-willed then there will always be the fear of sin." Another says, "Our way is free and unrestrained."

25
मूळ

येक म्हणती हे विशेष । करुं नये निंदा द्वेष । येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, परमार्थांत विशेष कांहीं म्हणजे कोणाची निंदा, द्वेष करुं नये. एक म्हणतो कीं, दुष्टांची संगत हळूहळू सोडून द्यावी.

English meaning

Another says, "The most important thing is to not criticize or be envious of others." Another says, "You should gradually abandon the company of the wicked."

26
मूळ

येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखांचे मरावें । तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आपण ज्याचे अन्न खातो. त्याच्याच चाकरींत त्याच्या समोर देह ठेवावा. असें करुन ताबडतोप मोक्षपद मिळवावें.

English meaning

That One who is himself brahman says, "You should die looking at the face of the one who makes and serves your food and in this way you will attain liberation."

27
मूळ

येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी । मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, या गोष्टीं राहूं द्या. आधीं खायला पोटभर अन्न हवें. तें मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाश बोलाव्या.

English meaning

Another says, "Give up all this useless talk. First you need your daily bread, no, then you can say whatever takes your fancy."

28
मूळ

येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा । कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आधीं पाऊस चांगला झाला पाहिजे. मग सगळ्या गोष्टी छान चालतात. कारण दुष्काळ पडूं नये म्हणजे मग सगळें ठिक चालते.

English meaning

Another says, "There has to be rain first, then any of these ways will be considered fine. First your belly has to be filled and as long as there is not a drought then you can call any of these ways the best way."

29
मूळ

येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी । येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, पुष्कळ तपश्चर्या करुन तप सांथवावें. त्यानें सर्व सिद्धी वश होतात. एक म्हणतो कीं, आधीं इंद्रपद साधून घ्यावें.

English meaning

Another says, "You should perform severe austerities for this will give you sidd- his/supernatural powers." Another says, "First you have to have to acquire lord indra's throne."

30
मूळ

येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करुन घ्यावा । तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, तंत्रशास्त्राचा अभ्यास करुन वेताळ प्रसन्न करुन घ्यावा. त्याच्या सहाय्यानें स्वर्ग मिळवून देव बनून रहावें.

English meaning

That One who is brahman says, "If you want proper understanding then, you have to get the blessings of vetal (ie. king of the ghosts) and then only can you reach the gods in the heavens."

31
मूळ

येक म्हणती म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र । श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, अघोरमंत्र साध्य करुन घ्यावा. म्हनजे त्यानें स्वतंत्र होता येईल. श्रीहरि जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्रसन्न होईल.

English meaning

Another says, "The *aghora-mantra will set you free, because then only will Goddess lakshmi be pleased." *(A dangerous tantric practice)

32
मूळ

ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचे क्रियाकर्म । येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

लक्ष्मीच्या भोवतीं सर्व धर्म गोळा झालेले असतात. मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकता राहात नाही. एक म्हणतो कीं, लक्ष्मीच्या मदानें सर्व वाईट कर्में घडतात.

English meaning

"When she is remembered then, every action is your dharma and you do nothing?" Another says, "Action only becomes harmful when you become proud of it."

33
मूळ

येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, एकच करा ते म्हनजे मृत्युंजयाचा जप करा. त्याच्या सामर्थ्यानें सर्व संकल्प सिद्धीला जातात.

English meaning

Another says, "Everyone should ardently perform the `victory over death' mantra. Due to this all your desires will be fulfilled and you will attain supernatural powers."

34
मूळ

येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, बटुभैरवाच्या कृपेनें वैभव प्राप्त होते. एक म्हणतो कीं, झोटींग सर्व कांहीं पुरवितो.

English meaning

Another says, "Worship child shiva to acquire great wealth." Another says, "If you worship zoting the ghost then you will get everything you desire."

35
मूळ

येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी । येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, काळी कंकाळी, एक म्हणतो कीं, भद्रकाळी, एक म्हणतो कीं, उचिष्ट चांडाळी प्रसन्न करुन घ्यावी.

English meaning

Another says, "Worship Goddess kali." Another says, "Worship bhadra kali." Another says, "Ask uchhista chandali for help."

36
मूळ

येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर । येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, विघ्नहर गणपति, एक म्हणतो कीं, भोळा शंकर, एक म्हणतो कीं, भगवती या देवता लवकर प्रसन्न होतात.

English meaning

Another says, "Ask ganesh, the remover of troubles" and another says, "Worship simple-minded and forgiving shankar." Another says, "By worshipping Goddess bhaga- vanti you can quickly attain any desire."

37
मूळ

येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी । येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, मल्हारी ताबडतोप भाग्यवान करतो. एक म्हणतो कीं, व्यंकटेशाची भक्ती सर्वांत उत्तम भक्ती आहे.

English meaning

Another says, "mallari makes one very fortunate, very quickly." Another says, "The highest good is gained by devotion to vyankatesh."

38
मूळ

येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा । येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, पूर्वपुण्याईवर सर्व अवलंबून असते. एक म्हणतो कीं, पुष्कळ प्रयत्न करावा. एक म्हणतो कीं, देवावर भार घालून आपण स्वस्थ बसावें.

English meaning

Another says, "It is all due to the merits of your past actions." Another says, "All is achieved by effort" and another says, "Every burden should be placed on God."

39
मूळ

येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा । येक म्हणती हा युगात्मा । युगधर्म ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, एक म्हणतो कीं, हा कसला सज्जनांचाअंत पाहणारा देव ? एक म्हणतो कीं, हा देवाचा दोष नाही. हा तर युगाचा युगधर्मच आहे.

English meaning

Another says, "What kind of God can this be who torments the virtuous, deserving and noble?" Another says, "This is the kali yuga/era and suffering cannot be avoided."

40
मूळ

येक म्हणती आश्र्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती । येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, आश्र्चर्य आहे. तर दुसरे परिस्थिती पाहून थक्क होतात. कांहीं लोक कंटाळून जें काय होईल तें पहावें असें म्हणतात.

English meaning

Then that One feels astonishment and that One gets surprised and that One gets exhausted and says, "We will just have to wait and see what will happen." (Then that One who is beyond all this gets confined to a body and feels many kinds of emotions at all these opinions)

41
मूळ

ऐसें प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन । परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

संसारिक माणसें अशा रीतीनें आपापली मतें सांगतात. ती सगळीं सांगता येणें शक्य नाही. त्यांची तर्‍हा ध्यानांत यावी म्हणून थोडे प्रकार वर्णान केले आहेत.

English meaning

Such are the opinions of those caught in this mundane existence. If you say any of these things then, you invite troubles and distress for you take this world as true. But, this `I am' should be understood, for it is a small indication of that One.

42
मूळ

आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

प्रापंचिक लोकांचा स्वभाव वर्णन आतां पुरें. ज्ञानी लोकांचे अनुभव किती प्रकारचे असतात. तें आतां सांगतो. तें लक्ष देऊन ऐका.

English meaning

Now, what is this `experience' of the Knower? If you listen carefully then, this `all' and also that paramatma will be understood.

43
मूळ

येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती । येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेचि होये ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, भक्ति करावी म्हणजे भगवंत चांगली गति देतो. एक म्हणतो कीं, कर्म करण्यानेंच ब्रह्मप्राप्ती होते.

English meaning

But no want wants to leave their concepts and listen to this `I am' and there is therefore only intellectual understanding and so one says, "If you have devotion then, shri hari will give you liberation." Another says, "brahman can only be attained through your actions performed."

44
मूळ

येक म्हणती भोग सुटेना । जन्म मरण हें तुटेना । येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, भोग भोगल्यावाचून कांहीं सुटत नाही. एक म्हणतो कीं, अज्ञानांतून सर्व उर्मि येतात. अज्ञान आहे तोपर्यंत त्या येत राहणार.

English meaning

That One who is ever free says, "Experience of pleasure and pain cannot be avoided and the cycle of birth and death cannot be avoided." Another says, "The waves of ignorance never end."

45
मूळ

येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, एका ब्रह्मा.खेरीज जर दुसरें कांहीं नाहीं तर मग क्रियाकर्माची जरुरच काय ? एक म्हणतो कीं, क्रियाकर्माच्या बाबतींत अशी भाषा वापरणें हा अधर्म आहे. असे बोलू नये.

English meaning

Another says, "If everything is brahman then, how can you talk about the actions of karma?" Another says, "You are talking nonsense and your thinking goes against the facts."

46
मूळ

येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे । येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, दृश्य सारें नाशवंत आहे. नंतर जें उरतें तेच ब्रह्म आहे. एक म्हणतो कीं, समाधानाचें स्वरुप असें नाही.

English meaning

Another says, "When everything is destroyed then only brahman remains." Another says, "That statement is unfounded."

47
मूळ

सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम । अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

सर्व ब्रह्म आहे असे म्हणणें व दृश्य नष्ट झाल्यावर उरणारे तें ब्रह्म आहे असें म्हणणें हे दोन्ही सिद्धान्त पूर्वपक्षाचे भ्रम आहेत. ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म कांहीं वेगळेंच आहे.

English meaning

Another says, "You say everything is brahman and then say that brahman is pure knowledge but, these two statements contradict each other. This everything cannot be the same as brahman."

48
मूळ

येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे । जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

एक म्हणतो कीं, ब्रह्माचे वर्णन करुं जातां वेदशास्त्रे मौन होतात. बोलणें थांबवावें लागते. ब्रह्म मन आणी वाणी यांच्या कक्षेंमध्यें येत नाही. तें मनाच्या म्हणजे अनुभवाच्या आवाक्यामध्यें येणें शक्य नाही.

English meaning

Another says, "When this experience `I am' is not met then that `inexpressible' Self is met and this `speech' of mula maya along with the vedas and shasthras fall silent."

49
मूळ

तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्र्चये कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

हें ऐकून श्रोत्यानें असेम विचारलें कीं, ब्रह्म असें आहें किंवा तसेआहे हा निश्र्चय कोणी केला ? कारण सिद्धान्तपक्षाप्रमाणें मी अनुभव घेतो असें द्वैत नसतें. तेथें अनुभव निर्माण होऊंच शकत नाही.

English meaning

At that time, the listener is not listening to this `I am' and repeats that which he has only read about, "When I am not then, who is there to make a conviction, for how can this `experience' remain when there is the understanding of that Reality?"

50
मूळ

अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वींच बोलिलें । आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥

मराठी अर्थ

यावर वक्ता म्हणतो कीं, प्रत्येक माणसाचे अनुभव वेगळे निरनराळे असतात. हें पूर्वींच सांगितलें आहे. ते सगळे आतां एक करता येणार नाहींत.

English meaning

"When there is this `I am' experience that is different from body consciousness then, it is that thoughtless swarup that is previous to this `I am' that has become this `I am'. Now, as that One has created this `thing', why can He not also destroy it?"

51
मूळ

येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती । आपण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

एक साक्षित्वानें वागतो. साक्षी वेगळा आहे असें तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत. केवळ पाहणारे साक्षी आहोत. ही खरी स्वानुभवाची अवस्था आहे.

English meaning

"That One exists by being the witness and this witness is separate," says another. "When you are the seer then, this is the state is Self-experience."

52
मूळ

दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला. म्हणजे दृश्यांत स्थिर राहून त्यापासून अलिप्त राहण्याची कला साधते. साक्षीरुपानें आपण निराळें आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो.

English meaning

"For the seer is separate from the seen and therefore remains untouched. Due to witnessing you remain separate and that is Self-experience." (But witnessing is not Self-experience, witnessing does take the touch of the known and maintains an inti- mate relationship with the witnessed. Therefore witnessing is duality and not true. Nevertheless when there is the experience of witnessing then, that nirgun Self is close by and by remaining in this triad, witnessing, of its own accord, will go off)

53
मूळ

सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता । देहीं असोनी अलिप्तता । सहजचि आली ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

सर्व पदार्थांना जो जाणतो तो त्या पदार्थांच्या पलिकडे असतो. त्यांच्याहून निराळा असतो. असा अनुभव आल्यावर देहांत असून देखील अगदीं सहज अलिप्तता साधते.

English meaning

"The Knower of this object of the `all' is therefore that which is beyond the object. Though being within the `all' body, that is naturally untouched."

54
मूळ

येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें । दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

ज्याला हा अनुभव येतो, तो म्हणतो कीं, आपण साक्षीपणें वागावें. दृश्य बाजूला असले तरी द्रष्टेपणानें त्यापासून वेगळें होऊन राहावें. मी केवळ पाहणारा आहे या भूमिकेनें दृश्यांत वावरावें.

English meaning

"Such is Self-experience," says another. Then another says, "You should exist by witnessing. Though being the seen, you should be separate by being the seer."

55
मूळ

येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंच अभेद । तेथें कैंचा मतिमंद । द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

यावर एक म्हणतो कीं, ब्रह्मवस्तूमध्यें मुळांत कसला भेद नाहीं. ती पूर्ण अभेद आहे. त्या अभेदरुप वस्तूमध्यें हा वेडा द्रष्टा कसा आणतां येईल?

English meaning

Another says, "There is no division. There is that natural Self and He is division-less. How can brahman be the seer? Only a confused intellect would say that."

56
मूळ

अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें । द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

समजा, एके ठिकाणी सगळीकडे साखरच भरली आहे. तिच्यामधून कडूपणा निवडून बाजूला काढता कसा येईल? त्याचप्रमाणें सगळीकडे घनदाट परब्रह्म भरलेलें असतां तेथें स्वानुभवानें द्रष्टा वेगळेपणानें बाजूला काढता येणार नाहीं.

English meaning

"If everything is sugar then, where will bitterness be found? When everything is brahman then, how can Self-experience have a seer?"

57
मूळ

प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद । परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

प्रपंच व परब्रह्म, दृश्य, विश्र्व आणि परमात्मवस्तु यामध्यें यत्किंचितही भेद नाही. तसे मानणारे उगीच भेद मानतात. एकच एक स्वानंदघन आत्मा विश्वरुपानें आकारास आला आहे.

English meaning

"prapanch and parabrahman are not different. Only the one who speaks of division beholds division. But it is that thoughtless atma, full of His own bliss, that has taken form."

58
मूळ

विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें । तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

गरम तूप पातळ असतें. तें थंड झालें कीं थिजते. तुपांत कांहीं फरक पडत नाही. त्याचप्रमाणें मूळ निर्गुण परमात्मवस्तु सगुण होऊन आकारास आली. तिच्यांत फरक नाही. तेथें द्रष्टेपणानें वेगळे काय करतां येणार? कांहींच नाही.

English meaning

"It is like the liquid ghee that solidified. In the same way, that nirgun only has appeared as the gunas. Why to make them separate with this idea of a seer?"

59
मूळ

म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश । द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

म्हणून द्रष्टा व दृश्य दोन्ही मिळून एक परमेश्र्वर आहे. मग दृष्टेपणाची खटपट कशाला हवी?

English meaning

"Therefore the seer and the seen and everything is that One `Lord of the world'. Why do you need to make the effort of being a seer?"

60
मूळ

ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव । ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥

मराठी अर्थ

थोडक्यांत हें दृश्यविश्र्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्म होय. असा कामहीं लोकांचा अनुभव असतो. अशा प्रकारचे हे दोन अनुभव सांगितलें. एकअनुभव असा कीं, द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे. तो साक्षीत्वानें दृश्य पाहातो. दुसरा अनुभव असा कीं, द्रष्टा वेगळेंपणानें नाहीच. द्रष्टा व दृश्य दोन्ही एकच परमात्मवस्तु आहेत.

English meaning

(Now this `I am' experience is being described) "That brahman has taken the form of this `all'." Such is the experience of one. "Therefore this experience within prakruti/purush is that thoughtless brahman."

61
मूळ

अवघा आत्मा आकारला । आपण भिन्न कैंचा उरला । दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

एकच एकआत्मस्वरुप जर विश्र्वरुपानें साकार झालेलें आहे तर द्रष्टेपणानें आपण वेगळें उरत नाहीं. हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला.

English meaning

"Everything is that atma having taken form. How can He remain separate from His form?" This experience of a second was told like this.

62
मूळ

ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारुनियां सर्व । कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

अनुभवाचा तिसरा प्रकार सांगतो. तो ऐकावा. सर्व दृश्य प्रपंच अथवा दृश्य विश्र्व बाजुस सारावें. तें बाजुस सारल्यावर जें कांहीं शिल्लकउरलें नाही असे वाटते तोच देव समजावा. असें कांहीं लोक म्हणतात.

English meaning

And a third said, "Listen, when the prapanch is set aside there is this `all'. And when this `thing' is not, then there is only God."

63
मूळ

दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥

मराठी अर्थ

जेवढें दृश्य म्हणून आहे तें सगळें बाजुस सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक उरतें. त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होय असें कांहीं लोक म्हणतात.

English meaning

And another said, "The visible had been made separate due to the `many' things and now that pure non-visible knowledge remains as this visible knowledge. That Reality has become the brahman experiencing." (These last four Knowers of this `experience', take this `experience' as true, that brahman or atma have become something. Now this will be explained by the Master)

64
मूळ

परी तें ब्रह्म म्हणो नये । उपायासारिखा अपाये । सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥

मराठी अर्थ

सगळें दृश्य बाजुस सारलें कीं शून्य उरतें. त्या शून्याला ब्रह्म म्हणतां येणार नाही. शून्याला ब्रह्म म्हटलें तर अपाय उपाय झाल्यासारखें होईल. ब्रह्मासारखें खरें अस्तित्व दुसरें नाहीं. तें ब्रह्म शून्य आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाला नाहींसे करण्यासारखेंच आहे. म्हणून ब्रह्म अनुभवण्यास जो उपाय केला तो अखेर अपाय ठरतो.

English meaning

But these `experiences' should not be called brahman. This `experience' that is the remedy for body consciousness is also a poison if one takes one self as true (this `experience' is knowledge or `I am' and this also has to be submerged in pure knowledge or no-knowledge). How can it be said that brahman is this nothing/zero? (Zero means all names and forms have been given up; and that which remains when this nothing or zero is, is called this `experience')

65
मूळ

दृश्य अवघें वोलांडिले । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥

मराठी अर्थ

दृश्य सगळें ओलांडलें म्हणजे अदृश्य शिल्लक उरते. तें शून्यरुप आहे., तेच शून्यच ब्रह्म आहे असें समजून साधक मागें फिरतो.

English meaning

This visible `all' becomes apparent when everything is given up but then, that non- visible brahman falls into nothingness or zero. Therefore one has turned ones back from that brahman.

66
मूळ

इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥

मराठी अर्थ

वास्तविक या कडेला दृश्य विश्र्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हीच्या मध्यें शून्याचें स्थान आहे. वेडा साधक या शून्यालाच ब्रह्म समजतो.

English meaning

Then on one side there is the visible and on the other side there is God and between them there is this place of zero (God has not been realised because this veil of nothingness separates God and the visible). Then that one in the prana, on account of a dull intellect/buddhi says, "This is brahman." (But it is the known, the `all' of maya)

67
मूळ

रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें । परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥

मराठी अर्थ

एकजण राजाला भेटला गेला. त्याला राजाचा नोकर भेटला. त्या नोकराला तो राजा समजला. नंतर खरा राजा भेटला तेव्हां त्या माणसाची पहिली समजूत अगदी चुकीची होती हे समजले.

English meaning

If the King has not been recognized then one may imagine that his servant is the King. But when King stands before you everything else is forgotten.

68
मूळ

तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म । सुन्यत्वाचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें दृश्य ओलांडल्यावर आढळलें शून्य ब्रह्म मानलें खरें. पण नंतर खरें परब्रह्मदर्शन झालें. तेव्हां शून्यपणाचा सर्व भ्रम नाहींसा झाला.

English meaning

In the same way, this nothingness was imagined to be brahman but later that parabrahman stands before you. Then everything and this delusion of zero is broken and gone.

69
मूळ

परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा । जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥

मराठी अर्थ

शून्याचा प्रांत हा सूक्ष्मांत येतो. परब्रह्म दर्शनांत येणारा हा अडथळा सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म विवेकानें बाजुस सारावा लागतो. दूध व पाणी वेगळें करुन फक्त दूध ग्रहण करणार्‍या राजहंसाप्रमाणें विवेकानें शून्य बाजूस सारुन विवकी साधक ब्रह्मस्वरुप ग्रहण करतो.

English meaning

But that subtle thoughtlessness of brahman has become this obstruction of nothing- ness and this space has to be passed over by vivek. Then you are just like the royal swan that takes the milk by leaving aside the water.

70
मूळ

आधीं दृश्य सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥

मराठी अर्थ

आधीं सर्व दृश्य बाजूस सारायचें. मग अदृश्य शून्य ओलांडून जायचें. त्यानंतर मूळमायेच्या पलीकडे असणार्‍या परब्रह्माचें दर्शन घडतें.

English meaning

If this visible `all' at the source is cast aside then this zero is passed over (first there is the vivek of `when nothing is there then, everything is there) and that parabrahman beyond this mula maya is revealed (neither everything nor nothing remain).

71
मूळ

वेगळेपणें पाहाणें घडे । तेणे वृत्ती सुन्यत्वीं पडे । पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥

मराठी अर्थ

आपण वेगळेंपणानें जोंपर्यंत पाहतों तों पर्यंत आपली वृत्ती शून्यपणापर्यंत जाऊन तेथें थांबते. त्यामुळें मनांत शून्यपणाची कल्पना वाढते.

English meaning

Experience requires an experiencer and something to be experienced. This under- standing is formed out of separateness and then that Reality falls into this vritti of nothingness. And then in this space of nothingness, separateness increases and body consciousness appears.

72
मूळ

भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें । वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥

मराठी अर्थ

जें अदृश्य सूक्ष्म वेगळेंपणानें अनुभवतां येते त्यांस शून्य असें म्हणतात. पण परमात्मवस्तु अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावें लागते. तिच्याशीं अभिन्न होऊनच ती पाहतां येते.

English meaning

It is because of separateness that, that Reality is `experienced' as zero and this is the `I am'. But to discern that Self, there should be absolutely no separateness.

73
मूळ

वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहाणें । निश्र्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥

मराठी अर्थ

आपण वस्तुरुप होऊन जाणें ही परमात्मवस्तु पाहण्याची रीत आहे. वेगळेपणानें पाहूं गेल्यास खात्रीनें शून्यदर्शनच घडते.

English meaning

Being yourself that Self, is to understand that Self. It is a conviction of separateness that brings zero/nothingness.

74
मूळ

याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । वस्तुरुप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥

मराठी अर्थ

या सर्व विवेचनावरुन हें स्पष्टपणें ध्यानांत येईल कीं, कांहीं केल्या शून्य परब्रह्म होऊं शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवें असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच तें घ्यावें लागते. ब्रह्मरुप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो.

English meaning

On account of this `I am' there is zero and when this `thing' is then, parabrahman is not. Self-experience is not this `experience'; Self-experience is being like that Self.

75
मूळ

आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥

मराठी अर्थ

आपला खरा मी ब्रह्मस्वरुप आहे. मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतःसिद्ध आहे. म्हणून मन मी आहे अशी कल्पना करुं नये. मी स्वतःसिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी. हा उपाय सत्पुरुष सांगतात.

English meaning

You are that perfect Self and therefore mind and `I' should not be imagined. The sadhu tells you, `You are that atma.'

76
मूळ

मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें । मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥

मराठी अर्थ

मुळांत मी मनरुप नाहींच. शिवाय संतांनी तसें कधींही सांगितलेंच नाही. मग उगाच कोणाच्यातरी सांगण्यावरुन किंवा बोलण्यावर विश्र्वास ठेवून मी मनरुप आहे असें मानूं नये.

English meaning

The mind is this `I' and non-existent. They are not known in the Saint. Why should there be respect for this `speech', for this is the mind and this `I'?

77
मूळ

संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥

मराठी अर्थ

संतवचनावर एकनिष्ठेनें श्रद्धा ठेवणें हाच शुद्ध स्वरुपानुभव येण्याचा मार्ग होय. मन पण मग ब्रह्मस्वरुप होऊंन जाते.

English meaning

But if you keep your understanding within this divine `speech' of the Saint, then that pure Self-experience will come. In this way, the mind itself naturally becomes that Self.

78
मूळ

जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव । आपुला घेती अनुभव । विश्र्वजन ॥ ७८ ॥

मराठी अर्थ

ज्या स्वरुपाचा अनुभव घ्यायचा ते निरावेव. विश्र्वजन मग आपला अनुभव घेतात.

English meaning

When you accept this `experience' of mula maya, then that indivisible and `without parts' becomes you. And afterwards this `experience' takes itself to be this world of `many' people and `many' concepts.

79
मूळ

लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले । मग तें भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥

मराठी अर्थ

एखादा लोभी धन मिळविण्याच्या मागें लागतो इतका कीं तो धन मिळविण्याचा हेतुच विसरुन जातो. धनाचा उपभोग न घेता नुसतेच सांठवून ठेवतो. नंतर कोणी भाग्यवान त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो.

English meaning

If the one who is greedy for wealth and acquires wealth then, at that time, that fortunate man will enjoy it at his leisure.

80
मूळ

तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥

मराठी अर्थ

साधकाच्या बाबतींत असेंच घडतें. स्वानंदासाठीं साधक आधी परब्रह्माच्या नादीं लागतो. पुढें त्याची देहबुद्धि कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतु नाहींसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. अर्थातच स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो.

English meaning

In the same way, when the sadhak gives up body consciousness, then, that fortunate purush will truly enjoy his own wealth, at his leisure. Then this rumour of `experience' is that Supreme and thoughtless Reality.

81
मूळ

आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥

मराठी अर्थ

आपला खरा मी आणि परब्रह्म मुळांत एकरुपच आहेत. असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. या ठिकाणीं ज्ञानदशक संपूर्ण झाला.

English meaning

You and that Self are absolutely the same. Such is the vivek of a gnyani and that thoughtlessness puts an end to the knowledge of the ten senses.

82
मूळ

आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें । न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥

मराठी अर्थ

माझ्या बुद्धीप्रमाणें मी आत्मज्ञानाचें विवेचन केलें त्यामध्यें जें कमीजास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी.

English meaning

If that knowledge of atma has been understood by means of the mind and this `I am' then, within the listener, the concepts of complete and incomplete are destroyed along with everything else. .