मायोद्भव अथवा ज्ञानदशक — समास 3: सूक्ष्मआशंकानिरुपण

Fully populated

Sukshma Aashanka Nirupan (A Discourse on Subtle Doubts, Part 2)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी कायी । तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥

मराठी अर्थ

अरे जें उत्पन्न झालेंच नाही त्या विश्वाचे विवेचन करा असें म्हणतोस. तें कसेम करतां येईल ? तरीसुद्धा तुझी शंका फिटेल असें कांहीं सांगतो.

English meaning

Come on! mula maya has not happened. Why do you continue to ask about this rumour? (often quoted by maharaj in marathi) Nevertheless, let me tell you what this `all' is and then your doubt will not remain.

2
मूळ

दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग । मार्तंडााकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥

मराठी अर्थ

दोरीवर सर्पाचा , पअन्यावर लाटांचा भास होतो. सूर्य प्रकाशानें मृगजळ भासतें.

English meaning

On account of the rope, there is the snake. On account of the water, there is the bubble. On account of the sun, there is a beautiful mirage flowing by. (See 8.1.2; maya is a false attention; simply by placing one's attention somewhere, something in particular gets formed)

3
मूळ

कल्पनेकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे । निमिष्य एक ॥ ३ ॥

मराठी अर्थ

कल्पनेनें स्वप्न दिसतें, शिंपीवर चांदीचा भास होतो, पाण्यावर थोडावेळ बर्फ पडते.

English meaning

On account of imagination, a dream appears. On account of the shell, silver appears. And because of water, a hailstone stays for a moment. (Then there is the appearance of cause and effect in maya or duality; in brahman or Oneness there can be no cause and effect)

4
मूळ

मातीकरितां भिंती जाली । सिंधुकरितां लहरी आली । तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

माती असुन भिंत दिसते, समुद्र असुन लाटा भासतात. डोळ्यांतील बाहुलीमुळें पदार्थ दिसतो.

English meaning

On account of clay, a wall appears. On account of the sea, a wave arises. On account of the pupil of the eye, an image can be seen.

5
मूळ

सोन्याकरितां आळंकार । तंतुकरितां जालें चीर । कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

सोन्यावर दागिनें भासतात, तंतूमुळें धागे असून वस्त्र दिसते. कासवानें हातपाय पसरले कीं, नविन कांहीं असल्याचा भास होतो.

English meaning

On account of gold, there is the ornament. On account of thread, cloth appears. And because of the turtle, there is the expansion of its limbs.

6
मूळ

तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥

मराठी अर्थ

पातळ असलेलें तूप थिजलें कीं, नवीन कांहीं उत्पन्न झाल्याचा भास होतो. खाडीमधील समुद्राचे पाणी वाढलें कीं, मीठ तयार होते. बिंबाचें प्रतिबिंब पडलें कीं नवीन कांहीं झाल्याचा भास होतो.

English meaning

On account of the ghee, there is the liquid and the solid. On account of a created inlet (ie. salt-flats), there is salt. And because of the object, there is a reflection created.

7
मूळ

पृथ्वीकरितां जलें झाड । झाडाकरितां छ्याया वाड । धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥

मराठी अर्थ

पृथ्वींतून झाड येतें तेव्हां तें निराळें असल्याचा भास होतो. झाडाचीच छाया पडते. धतु धातुपणानें एकच असतात. पण त्यांच्या रंगानेम ते कमीजास्त मूल्याचे मानले जातात.

English meaning

On account of the elemental earth (ie. objectification), the tree grows (ie. a gross form). On account of that tree there is a reflected image of the infinite Self. And because of the dhatus (ie. primary components of creation) there is the expansion of the vast and continuous paramatma into many types and colours (ie. such is maya. She makes the One Self appear as `many' things).

8
मूळ

आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचे द्वैत । द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥

मराठी अर्थ

दृष्टांत देणें आताम पुरे झाले. जें अद्वैत आहे त्यामध्यें द्वैत असूं शकत नाही. तेथें द्वैतअसल्याचा नुसता भास होतो. खरी अडचण अशी आहे कीं, अद्वैत सांगण्यासाठीं द्वैताचा आश्रय घेतल्याखेरीज चालतच नाही.

English meaning

If now there are these examples then, how can duality ever become the non-dual Self? If you do not make this `speech' out of duality then, there can never be that non-duality. (Understand the nature of this cause and effect of duality. In truth, you are that attentionless, thoughtless Self. maya is the arising of this original intent or wish, to be. It is the arising of an attention and that is knowing. This knowing brings the feeling of you and something other to be know. Such an attention is not confined by the even more limiting concept, "I am a body." It simply wants to know and be. This is the `speech' of the `all' or knowledge and this is the cause of the gross world we see through the senses and mind. When upon this `speech' other thoughts are allowed to arise and remain then, gross body consciousness gets established and upon this knowledge, `many' things are imagined and these are the effects)

9
मूळ

भासाकरितां भास भासे । दृध्याकरितां अदृश्य दिसे । अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आपल्यावर अज्ञानाचें आवरण आहे. त्यामुळें जें मुळांत नाहीं तें दिसतें. भ्रम झाल्यानें भ्रमरुप विश्व आपल्याला भासते. दृश्य विश्र्व आपल्या अनुभवास येते म्हणून अदृश्य ब्रह्मस्वरुपाचा विचार करतां येतो. अदृश्य ब्रह्मस्वरुपासारखीं वस्तुच नाही. त्यामुळें ते निरुपमेय आहे.

English meaning

On account of appearance, an appearance appears. On account of this visible `all', that invisible Self appears and is perceived. There is be nothing that can be compared to that imperceivable Self and so it is called incomparable.

10
मूळ

कल्पनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत । द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥

मराठी अर्थ

या दृश्य विश्वाच्या क्षेत्रामध्यें कल्पनेशिवाय हेतु असुंच शकत नाही. दृश्य पदार्थांखेरीज दृष्टांत देतां येत नाहीं. द्वैत असल्याखेरीज द्वैताचा अनुभव येऊं शकत नाहीं.

English meaning

How can there be this original *intent, if there is no imagining? How can there be these examples if there is nothing visible? And how can duality appear if there is no duality? *(To be and to know)

11
मूळ

विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी । तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥

मराठी अर्थ

भगवमताची करणी फार विलक्षण आहे. हजार तोंडें असलेल्या शेषाला देखील तिचें वर्णन करणें कठीण आहे. त्या भगवंतानें या विश्वाची निर्मिति केली आहे.

English meaning

So marvellous is this play of God that even shesh with His one thousand *heads, cannot describe it (ie. He just keeps quiet and witnesses). Understand how that endless paramatma has been made into this structure we call the universe. *(On one of His one thousand heads the gross world sits ie. in this way, the One becomes purush and prakruti and then, the `many' are imagined; maharaj- every mind is a world)

12
मूळ

परमात्मा परमेश्र्वरु । सर्वकर्ता जो ईश्र्वरु । तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥

मराठी अर्थ

परमात्मा परमेश्र्वर असा जो सर्व कर्ता ईश्र्वर त्याच्यापासून या सर्व विश्र्वाचा विस्तार झालेला आहे.

English meaning

paramatma is *parameshwara and also ishwara (ie. purush), the doer of this `all'. In this way, from that Reality, this `all' has appeared and then expanded (ie. the One became two and then `many'). *(Beyond ishwara; paramatma, parameshwara and parabrahman are One. When there is the appearance of maya then we speak of atma, ishwara and brahman. They are all the names for that pure Self who remains hidden behind this appearance of maya. He can be described as the witness by whose light, form is illuminated. He is permanent, she is just a tempory appearance)

13
मूळ

ऐसी अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी । तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥

मराठी अर्थ

ईश्र्वराची अशी अनंत नांवें आहेत. त्याच्या अंगीं अनंत प्रकारच्या शक्तीं आहेत. अनंत शक्तीनीं संपन्न असणारा जो ईश्र्वर तोच मूळ पुरुष होय. हें शहाण्यांनी ओळखावें.

English meaning

When that endless paramatma holds this `I am' then, He becomes the creator of this creation and power/shakti (ie. He becomes the ishwara, the shiva of His shakti). Therefore that mula purush within the four bodies (supra-causal, causal, subtle and gross) should be known.

14
मूळ

त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण । सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मूळ माया हें त्या मूळ पुरुषाचे दुसरे नांव आहे. कारण मूळ मायेची ओळखण म्हणजे मूळ पुरुषाची ओळखण आहे. सगळें कर्तेंपण मूळमायेमध्यें असतें.

English meaning

When there is this `I am' of that mula purush then, that Reality has itself has become this mula maya. When there is this `all thing' then, doing-ness is brought to that brahman `there' (ie. where is the doer in Oneness? maya brings that thought of creation, creator and doer, action etc.).

15
मूळ

हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये । येरवीं हें पाहातां काय । साच आहे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

सिद्धांना येणारा शुद्ध परमात्मस्वरुपाचा अनुभव उघडपणें सांगितला तर साधनाची हानी होण्याचा संभव असतो. एरवी विचार केला तर हें दृश्य विश्व खरें नाहीं.

English meaning

The thoughtless Truth cannot be `spoken'. If it gets `spoken' then, that thoughtless understanding gets broken and there is this remedy of `I am' (ie. the remedy for the `many'/restless mind). Otherwise, when you understand that thoughtless swarup, where is true and what is false?

16
मूळ

देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें । परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥

मराठी अर्थ

देवापासून हें सगळें विश्व निर्माण झाले हा विचार सर्वांना मानवतो. पण ज्या देवानें विश्व निर्मिलें त्याला ओळखायला हवें.

English meaning

When from God/purush this `all' appears then, it is that thoughtless that is having regard for this `all' (ie. that thoughtless unattached swarup takes the touch and there is witnessing or knowing and maya appears). But then how can that God be recognized? (When that God takes its Self to be its reflection then, how can it be non-duality? maharaj- how to kiss yourself?)

17
मूळ

सिद्धांचे जें निरुपण । तें साधकांस न मने जाण । पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥

मराठी अर्थ

सिद्धाच्या भूमिकेवरुन केलेले ब्रह्मनिरुपण साधकाला आकलन होत नाही. त्याच्या बुद्धीला तें पेलत नाही. कारण त्याच्या अंतःकरणाची तयारी झालेली नसते.

English meaning

Therefore know that this understanding of the siddha that comes to the sadhak is not though his mind. His *antah-karana is not capable of understanding the Self. *(This is the faculty of knowing; it is a subtle form of attention in that `attentionless' Self and from it comes the mind, intellect and ego of the individual self)

18
मूळ

अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव । मूळमायागुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥

मराठी अर्थ

मूळ आत्मस्वरुप चैतन्य एकच आहे. अविद्येच्या आवरणानें त्यास जीव म्हणतात. तो देहांत राहातो. विद्या व अविद्या यांनीं संपन्न मायेच्या सहवासानें त्याच चैतन्यास शिव म्हणतात. तो विष्वांत राहातो. आणि केवळ ज्ञानमय व शक्तिमय चैतन्यास देव किंवा परमेश्र्वर म्हणतात. त्याच्या ज्ञानमय अंगास मूळपुरुष व शक्तिमय अंगास मूळमाया म्हणतात.

English meaning

On account of the mixed gunas of *avidya maya, there is the jiva; on account of sattwa guna of guna maya, there is shiva (ie. due to knowing of something outside of myself, one takes the touch; maharaj- shiva means, to take the touch) and on account of this pure sattwa guna of mula maya there is that God/purush (on account of effortless knowledge ie. only I am, there is no-knowledge). *(maya of ignorance, "I am a body")

19
मूळ

म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया । तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

म्हणून विश्वामध्यें ज्या अनंत शक्ति असतात त्याचें मूळ कारण मूळमाया होय. या म्हणण्याचा अर्थ ध्यानांत येण्यास अनुभवी पुरुषच पाहिजे.

English meaning

Therefore when there is the cause (ie. this `all' is there) then, there is mula maya and then that endless paramatma has to hold this power/shakti. However to know that meaning of that paramatma, this `experiencer' is required. (First one is required to understand this `I am' experience and cause of the world. This was the original sin; that paramatma took a step out of Himself and started to take His reflection as Himself. Thus by giving up this `I am' or knowledge, that causeless Self, beyond knowledge is understood).

20
मूळ

मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश । अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥

मराठी अर्थ

मूळमाया व मूळपुरुष हीं दोन्हीं एकच समजावीं. तोच सर्वांचा नियंता व स्वामी ईश्र्वर होय. अनंत नांवें असणारा ईश्र्वरच जगदीश नांवानें प्रसिद्ध आहे.

English meaning

When this mula maya is that mula purush then, she becomes the Lord of `all'. And when that `Lord of the world'/purush is within this `I am'/mula maya then, He becomes the `many' forms and so there should be this `speech'. (When mula maya forgets herself, she becomes her Lord and when her Lord of this world forgets Himself, He becomes this mula maya and then the gross body and world afterwards)

21
मूळ

अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली । ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

या विश्वामध्यें सगळीकडे मायेचा विस्तार आहे. पण तीं अगदी सर्वस्वीं खरी नाही. या म्हणण्याचा जो खोल सूक्ष्म अर्थ आहे तो बरोबर जाणणारा क्वचित आढळतो.

English meaning

But when this maya expands into the `many' things then, that thoughtless Self gets totally destroyed (ie. no understanding or the ignorance of the jiva). On account of this gross creation, very few come to know the depth of this divine `speech' (the mind of the `many' conceals this `speech' and one may not even consider asking, "Who am I?" and "Who is God?" and "Why am I here?" etc.).

22
मूळ

ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे । संतसंगेंविण नुमजे । कांहीं केल्यां ॥ २२ ॥

मराठी अर्थ

या मायेला अनिर्वाच्य म्हणतात. शब्दानें ती समजावून देता येत नाही. परंतु हें स्वानुभवानें जाणावें लागतें. संतसंगति केली तर तें आकलन होतें. तसें केलें नाहीं तर खूप प्रयत्न करुनही मायेचे स्वरुप समजत नाही.

English meaning

Therefore first that inexpressible Self should `speak' this `I am' and then He should be understood by Self-experience. But without the company of the Truth/Saint, this created `thing'/mula maya cannot understand that inexpressible Self (only the sadguru can take you out of this `I' of maya. You cannot kill yourself)

23
मूळ

माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष । परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

मूळमाया तीच मूळपुरुष व मूळपुरुष तोच मूळ माया. हे साधकाला कांहीं केल्या आकलन होत नाही. तो म्हणतों असें जर आहे तर अनंत नांवें असणारा जगदीश कोणाला म्हणायचें ?

English meaning

maya is herself that mula purush and when the sadhak does not use his mind (ie. no-mind) then, there is that whole, complete and thoughtless swarup. But when that endless paramatma is within this `I am' then, how can He be called thoughtless? (Then that unattached paramatma `looks out' ie. has an attention and mistakes His reflection for Himself).

24
मूळ

नामरुप माये लागलें । तरी हें बोलणें नीटचि जालें । येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४॥

मराठी अर्थ

मूळ चैतन्य अनाम व अरुप आहे. मायेनेम त्यास अनेक रुपें व अनेक नामें दिली. तेव्हा माया नामरुपाचें मूळ आहे हें म्हणणें बरोबर आहे. याविषयीं श्रोत्यांना शंका येण्याचे कारण नाही.

English meaning

When this `name' and `form' (this name is `I am'/existence and this form is the `all' of knowledge; see V.28) has been established by maya then, that thoughtless Self appears as this `speech'. But if there is this `I am' or `speech' then, why should there be any conjecture in the listener? (Now let there be this `I am'. Then only can that thoughtless Self be understood. What is the need any more to ask, "How has maya appeared in that brahman?" etc. Leave aside all your thoughts now, for nothing but thoughtlessness or no-mind can make you the Self)

25
मूळ

आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥

मराठी अर्थ

हें अवांतर बोलणें पुष्कळ झाले. तें आतां पुरें. मूळ प्रश्र्ण असा कीं, " निराकारी मूळ माया कशी झाली ? "

English meaning

Now, when that thoughtless Self is this `speech' then, the doubt remains. "In that formless Self, how has this mula maya appeared?"

26
मूळ

दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ । हेंचि आतां अवघें निवळ । करुन दाऊं ॥ २६ ॥

मराठी अर्थ

नजरबंदीचा खेळ करतात. त्यामधें अनेक वस्तु प्रत्यक्ष निर्माण करतात. पण त्या मिथ्या असतात. तसेंच हें विश्व म्हणजे नजरबंदीचा एक खेळच आहे. तो खेळ कसा खेळला गेला व हे दृश्यानें भरलेले जग कसें निर्माण झाले हें स्पष्ट विवेचन करुन सांगतो.

English meaning

This false `I am' is a restricted vision. It is just like hypnotism. Still you have to understand how it is that that paramatma appeared as His `play'. Now, I will show you how that pure thoughtless nirgun became this sagun and the `many' things.

27
मूळ

आकाश असतां निश्र्चळ । मधें वायो जाला चंचळ । तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥

मराठी अर्थ

आकाश अत्यंत निश्चळ आहे. त्यामध्यें चंचळ वायु निर्माण झाला. हालणारा वायु उत्पन्न झाला तरी आकाश न हालतां अगदी जसेंच्या तसें राहते. त्याचप्रमाणें अगदी निराकार व निश्चल ब्रह्मामध्यें मूळमाया उत्पन्न झाली.

English meaning

Just as in the still space/akash the moving wind appeared, so too, in that pure knowledge appeared this knowing of mula maya.

28
मूळ

रुप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें । ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥

मराठी अर्थ

वायु उत्पन्न झाल्यानें आकाशाला तडा गेला, आकाश भंगलें असें कधींच अनुभवास येत नाही.

English meaning

But when this form of the wind appeared, did that space get divided? Has that thoughtless Truth been disturbed? How could this ever happen?

29
मूळ

तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली । येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें मूळ माया उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणामध्यें यत्किंचितदेखील भंग होत नाहीं. तें अगदी जसेंच्या तसें राहतें. या दृष्टांतानें पहिली शंका निरसन करुन घ्यावी.

English meaning

In this way, mula maya has appeared and still that nirgun is completely pervading. By understanding this simile of space and wind, this original doubt can be destroyed.

30
मूळ

वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण । साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

वायु हा कांहीं आकाशाइतका पुरातन नाहीं,त्याचप्रमाणें मूळ माया कांहीं परब्रह्मासारखीं सनातन नाहीं. शिवाय वायु जसा आकाशांत लीन होतो त्याचप्रमाणें मूळमाया परब्रह्मामध्यें लीन होऊन जाते. म्हणून उत्पन्न होणारी व लीन होणारी माया संपूर्णपणें खरी नाही.

English meaning

The wind is not old, it has only just appeared. Know this mula maya in the same way. You may call her true but again she gets swallowed up (ie. when you awake in the morning, knowledge awakes and then, on account of worldly thinking there is the appearance of this world. When you go to sleep, knowledge goes off and that Reality remains. But That is unknowable, beyond the duality of maya).

31
मूळ

वायो रुपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें । भासे परी तें न लाहे । रुप तयेचें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

वायूचे रुप कसें आहें तर तो वाहूं लागला म्हणजे तो आहे असें भासते. परंतु त्यास रुप असें नाही. त्याचप्रमाणें मूळमाया कर्तृत्वानें आहे असें भासते. पण तिचें रुप अमुक आहे असें दाखवता येत नाही.

English meaning

You should understand that this mula maya is just like the wind. It appears but that Reality has not actually become this form of that Reality (ie. an appearance cannot be the eternal Truth).

32
मूळ

वायो सत्य म्हणों जातां । परी तो न ये दाखवितां । तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

वायु खरा आहे तो दाखवा असें म्हटलें तर दाखवता येत नाही. त्याला पाहायला गेलें तर नुसती धूळ दिसते.

English meaning

We may say that this wind is real, still it cannot be pointed to. We can only understand that it is there by the sight of the dust flying through the sky (maharaj- the whole world is dust only).

33
मूळ

तैसी मूळमाया भासे । भासे परी ते न दिसे । पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें मूळमाया आपलें अस्तित्व जाणवते, पण ती आहे असें जाणवून दिसत मात्र नाही. तिला पहायला गेलें तर दृश्य पदार्थांच्या रुपानें माया व अविद्या दिसतें.

English meaning

mula maya has appeared in the same way. She is an appearance but then, that Reality and the seeing of the `many' things are not (she is like a bridge between that Reality and this gross existence. From her, if you look inwards, that eternal Reality can be realized and if you look outwards then, she is the cause of the world). Afterwards when she expands, there is avidya maya and there are the `many' forms. (maya of igno- rance; "I am a body." The maya of knowledge is the cause and whatever we see through our senses is the effects. All this is on account of maya, the gunas and objectification).

34
मूळ

जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गे । मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

वायूच्या वहाण्यानें दृश्य वस्तु आकाशांत उडतात. त्याचप्रमाणें मूळ मायेच्या संयोगानें निर्गुण ब्रह्मामध्यें दृश्य जग दिसूं लागते.

English meaning

Just as due to contact with the wind, the visible is seen flying through the sky; so too, due to the contact with mula maya, there is the appearance of the world.

35
मूळ

गगनीं अभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें । मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

आकाश स्वच्छ असतें, निरभ्र असतें. त्यामध्यें ढग येतात. त्याचप्रमाणें मूळ परब्रह्म एकजिनसी निर्मळ असते. त्यामध्यें मायेमुळें दृश्य जग दिसूं लागते.

English meaning

In the sky there were no clouds and then suddenly they were created. In the same way, due to the gunas of maya (ie. objectification), this world has suddenly appeared (you go to sleep and have a dream or you `wake up' and have this dream).

36
मूळ

नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें । तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

वास्तविक आकाशामध्यें मूळांत कांहींच नसते. पण मूळमायेमुळें तेथें दृश्य जग भासते.

English meaning

This non-existent sky was not there even and `there' in brahman suddenly it appea- red. In this way, this visible `all' has appeared `here' in maya. (brahman is imperceptible but when you try to perceive it, then you the brahman, make Him an object of your perception and this `all' appears, like the appearance of a cloud with space/sky as its backdrop)

37
मूळ

परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्र्चळता । वाटे परी ते तत्वता । तिसीच आहे ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

आकाशांत अभ्र आल्यावर त्याची निश्र्चळता भंगली असें वाटते. पण ती आकाशाची निश्र्चळता पूर्ववतच असते.

English meaning

On account of the cloud, it is felt that the sky loses its stillness; but that sky truly, is as It always is.

38
मूळ

तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण । परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

त्याच प्रमाणें मूळमाया प्रगट झाल्यावर निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखें वाटतें. पण सूक्ष्म दृष्टीनें पाहिल्यास परब्रह्म संपूर्णपणें जसेंच्या तसें निर्गुणच असते.

English meaning

In the same way, on account of maya, that nirgun appears to have become sagun. But that Reality, one understands, is wholly complete and perfect and is as It always is. (maharaj- `when space is there, knowledge must be there': they are inseparable; you know `something is there')

39
मूळ

आभाळ आलें आणि गेलें । तरी गगन तें संचलें । तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

आभाळ आलें आणि गेलें तर आकाश ज्याप्रमाणें जसेंच्या तसें अभंग राहतें, त्याचप्रमाणें मायेमुळें दृश्य विश्व आलें आणि गेलें तरी निर्गुण ब्रह्म सगुण न होतां अगदी जसेंच्या तसेंच राहतें.

English meaning

The clouds come and go and still the sky pervades everywhere. In the same way, this sattwa guna has appeared but it is not that nirgun brahman.

40
मूळ

नभ माथं लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । तैसें जाणावें विश्र्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥

मराठी अर्थ

क्षितिजापाशीं आकाश अगदीं डोक्याला टेकलेले दिसतें. पण तें खाली आलेले नसते. जसेंच्या तसेंच असते. तसेंच दृश्य विश्वामध्यें ब्रह्माला सगुणपणा आल्यासारखें वाटते. पण त्याचा निर्गुणपणा अगदीं जसाच्या तसाच असतो. तसा विश्र्वास बाळगा.

English meaning

The sky appears to be touching the *head, but it is not like that at all, it is just as it always is. In the same way, this creation should be known as an appearance but that nirgun brahman is just as It is. *(When you place our attention upon someone then, out of knowledge, someone appears and a sky appears as something else. But is Oneness it is not like that at all. When an appearance appears then, within effortless awareness, something is created)

41
मूळ

ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास । परी तो जाणिजे मिथ्या भास । भासलासे ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

आकाशामध्यें वर पाहिले तर सगळीकडे निळारंग दिसतो. पण तो रंग तेथें नसतो. तो केवळ भास असतो.

English meaning

When you look above then, space is created and in that space blueness is seen (but space is not a colour; space and colour are imagined). But that paramatma (ie. you only) should know that it is a false appearance that has appeared upon it (maharaj- whatever is seen or perceived is not and still He is there).

42
मूळ

आकाश पालथें घातलें । चहूंकडे आतोपलें । वाटे विश्र्वास कोडिलें । परी तें मोकळेंचि असे ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

आकाश एखाद्या झाकणासारखें पालथे घातलेले आहे. सगळें विश्र्व त्यांत कोंडून धरल्यासारखें वाटते. पण हें खरें नाही. सर्व दिशांनी तें मोकळे आहे.

English meaning

Above the space is felt to be spread out and curved around enwrapping this earth. But that is imagination and space is completely open and unbound (ie. therefore stay open and unbound).

43
मूळ

पर्वती निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे । अलिप्त जाणावें तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

लांबून पाहिले तर पर्वतांचा रंग निळा दिसतो. पण तो रंग त्यांना लावलेला नसतो. त्याचप्रमाणें हें दृश्य विश्व परब्रह्माला चिकटलेले दिसते पण निर्गुण ब्रह्म त्यापासून अगदी अलिप्त राहतें.

English meaning

When you look at the mountains from a distance then, a blue colour is seen in- between. Still Reality is not affected by that blueness. In the same way, you should know that that nirgun brahman is untouched by the (imagined) sagun brahman.

44
मूळ

रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्र्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

रथ धावतांना पृथ्वी धावते असें वाटते. पण पृथ्वी स्थिरच असते. त्याचप्रमाणें सगुण विश्व पाहून परब्रह्म सगुण झाल्यासारखें वाटते. पण परब्रह्माची सगुण अवस्था अगदी जसींच्यातशींच असते.

English meaning

When on a racing chariot the earth appears to be moving but it is still (ie. you are in this racing chariot called the body and then, the whole world appears to be moving. Therefore expand your awareness and when there is nothing but you then, where is the moving world anymore?). That nirgun should be known in the same way and then there is that pure knowledge (ie. no-knowledge) and that is parabrahman.

45
मूळ

अभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक । परी तें अवघें माईक । अभाळ चळे ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

चांदण्या असतांना ढग आलें तर चंद्र पळतो आहे असें वाटते पण तसें नसते तो भ्रम असतो. चंद्र स्थिर असून ढगच धांवत असतात.

English meaning

On account of the clouds, the moon is felt to be continuously moving. But this is all illusion and the clouds are moving (taking ourselves to be something, `many' moving things are seen)5.

46
मूळ

झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ । वाटे परी तें निश्र्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

उन्हाची झळ किंवा आगीच्या ज्वाळा वर गेल्या म्हणजे आकाश कंप पावल्यासारखें दिसते. पण हा भ्रम असतो. कारण आकाश अगदी जसेंच्यातसे निश्र्चळ असते.

English meaning

When there is hot air or the flames of the fire then, that intervening space appears to move but it is still and it is as it is.

47
मूळ

तैसें स्वरुप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें । ऐसें कल्पनेसि गमलें । परी तें मिथ्या ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें निर्गुण व निश्र्चळ परब्रह्म एकच एकपणें जिकडे तिकडे पसरले आहे. तें दृश्य विश्र्वामुळें सगुण झाले असें आपल्याला वाटते. पण तें खरें नसतें. ब्रह्म जसेंच्या तसे निर्गुणपणें राहतें.

English meaning

In the same way, that thoughtless swarup is completely amassed but it is felt that this sattwa guna has come. When this is felt then, on account of imagination, that Reality has appeared as this false maya.

48
मूळ

दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ । वस्तु शाश्र्वत निश्र्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

नजरबंदिच्या खेळामध्यें निरनिराळ्या वस्तु तात्पुरत्या निर्माण केल्या जातात. त्याचप्रमाणें माया चंचल असून अनेक दृश्य पदार्थ निर्माण करते. पण ते सर्व तात्पुरतें असतात. दृश्य पदार्थ आले आणि गेले तरी परात्पर परब्रह्म अगदी जसेंच्या तसे शाश्वत आणि निश्र्चळ टिकते.

English meaning

It is just like the trickery of *hypnotism. Then that thoughtless Self appears like this moving maya. But that Self is eternal and still and It is as always It is. *(Literally translated as a restriction of vision).

49
मूळ

ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव । ईचा ऐसाच स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

वास्तविक परमात्मवस्तु अखंड आहे. अवयवरहित आहे. तिच्यामध्यें माया खंड पडल्याचा भास निर्माण करते. मुळांत जें नाहीं तें आहें असा भास निर्माण करणें हेच मायेचे काम आहे. म्हणून मायेची सृष्टी खरी नसते.

English meaning

Like this is that Self `without parts'. maya reveals parts. The `many' parts of maya naturally appear when that thoughtless Self is not.

50
मूळ

माया पाहातां मुळींच नसे । परी हे साचाऐसी भासे । उद्भवे आणि निरसे । अभाळ जैसें ॥ ५० ॥

मराठी अर्थ

माया मूल ब्रह्मस्वरुपांत नाहीं. पण ती खरी आहे असा भ्रम निर्माण होतो. आकाशांत आभाळ येतें आणी जातें. त्याचप्रमाणें माया मूळ स्वरुपांत दिसते आणि नासते. परंतु स्वरुपाला त्याचा धक्का लागत नाही.

English meaning

If you understand maya at the root then, she doesn't exist. But if she appears then, she is felt to be that thoughtless Self. However she has been created and she will get destroyed, just like the clouds.

51
मूळ

ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली । अहं ऐसी स्फूर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

आभाळाप्रमाणें ब्रह्मामध्यें माया निर्माण झाली तरी ब्रह्मस्वरुप जसेंच्या तसें राहते. ब्रह्माच्या ठिकाणी अहं अशी जी स्फूर्ति होते ती माया होय.

English meaning

Even when there is this creation of maya, still there is that nirgun Self totally amassed everywhere. But when this `I am' inspiration arises then, that Reality appears as maya.

52
मूळ

गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे । परी हें घडे आणी मोडे । सस्वरुपीं ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

गुणमायेचा सगळा खटाटोप चालतो. त्याचा आणी निर्गुण स्वरुपाचा कांहींच संबंध नसतो. स्वस्वरुपांत हें सर्व घडून येते.

English meaning

Due to the expansion of guna maya into the maya of ignorance (ie. body consci- ousness), even this `all' within that thoughtless nirgun does not appear. Still everything that has been formed, will be broken within that true swarup. (Note: when there is mula maya, this `all' gets formed and then there comes guna maya ie. the gunas begin to manifest. First there is simply the knowing of something ie. sattwa guna. But inherent in this is the not knowing of your Self ie. tamo guna. At that time the elements appear from this tamo guna ie. space, wind, fire, water and earth. These five elements explain the process of objectification ie. the appearance of things out of nothing or space. Each great element has its own properties and they become increasingly evident until finally the great earth element appears. At this point, `many' names and thus `many' forms become apparent. And when upon these names and forms there is further conceptualisation eg. this is good or this is bad, then all this is taken as the Truth and there are `many' thoughts. This objectification is not a slow process. It happens every morning when you awake. Thus it is know as the explosion of the gunas)

53
मूळ

जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली । पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

एखाद्या माणसाची नजर चंचल झाली म्हणजे त्यास आकाशांतील ढगामध्यें सैन्य दिसतें. पण तें आकाशांतील आभाळ आहे हें कळल्यावर सगळेंच खोटे असें कळतें.

English meaning

It is just like the hallucinations brought on by fever. Then that Reality appears as this army of the King (ie. this `all' with the gunas and elements restlessly waiting to explode into a world of names and forms). But when you understand that this whole creation is an appearance in space then, it becomes false (ie. this whole creation has appeared out of nothing. There is that Reality; It is as It always is. And when it takes one step outside of Itself, It become space. This is knowledge but as yet, nothing has been created. Then, on account of your thinking, a gross body and world appear before your eyes).

54
मूळ

मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ । नाना तत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें मायेचा खेळ कसा मिथ्या असतो हें सांगितलें. अनेक तत्वांचा विस्तार न करतां माया कशी उत्पन्न झाली हें सुद्धां समजावून सांगितले.

English meaning

This play of maya is false; it is the birth of this `I am'/existence and the `all'/knowledge. Therefore this long winding tale of these gross elements (the objectifi- cation of the `many') is to be left aside.

55
मूळ

तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती । तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

अहं ही जी मूळ स्फूर्ति तें स्फुरण वायुमय असते. तोच ओंकार होय. त्यामध्यें पंचमहाभूतें बीजरुपानें असतात. चतुर ज्ञानी पुरुषांना हे बरोबर माहित असते.

English meaning

The gross elements are present within the root and this root is aum. It is the motion of the wind. And the one who knows that essence `there' is an attentive gnyani. (The gross elements appear when this aum expands; they are present as a potential within this `I am' or aum. When there is the appearance of the gunas ie. something is there other than myself then, from tamo guna the five elements have began to manifest. The one who leaves off the thoughts of this world and exists as knowledge and then lets this also slip away, realizes the One without another)

56
मूळ

मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण । सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

निश्चल ब्रह्मामध्येम जी हालचाल होतें ती मूलमाया होय. तें चळण शक्तिमान आहे. शक्ति हेंच वायूचें लक्षण होय. वायूंतील शक्तीमुळें सूक्ष्म तत्वें स्थूल रुप घेतात.

English meaning

When there is this movement of maya then, that Reality has become like this attention or knowing of the wind. Know that then, that brahman becomes like these gross elements and it appears to be hard and gross (first there is this one moving form or `all' and then due to further limiting concepts, that One Self appears as `many', before your eyes).

57
मूळ

ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें । पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

पंचमहाभूतें प्रथम अव्यक्त होतीं. पण नंतर विश्वरचना होण्यासाठीं ती व्यक्त झाली.

English meaning

Such objectification is due to the five great elements. Previously they were un- manifest as mula maya and after they became manifest to create a gross world.

58
मूळ

मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण । त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

मूळमायेमध्यें जर विश्वरचनेंचे बीज आहे तर तिच्यामध्यें सूक्ष्मरुपानें पंचमहाभूतें असली पाहिजेत. जो सूक्ष्म विचार करील त्याच्या हे ध्यानांत येईल.

English meaning

First there is this attention/knowing of mula maya and then that Reality becomes like these five great elements. The one who understands all this has gained subtle vision.

59
मूळ

आकाश वायोविण । इछ्याशब्द करी कोण । इछाशक्ति तेचि जाण । तेजस्वरुप ॥५९ ॥

मराठी अर्थ

आकाश आणि वायु हीं तत्वें मूळमायेंमध्यें असली पाहिजेत. शब्द हा आकाशाचा गुण म्हणून अहंचे स्फूरण ओंकार नादरुपानें प्रगट झालें. चळण हा वायुचा गुण. म्हणून मी एक आहे अनेक व्हावें हीं इच्छा निर्माण झाली. बल हा तेजाचा गुण म्हणुन त्या इच्छेला सामर्थ्य प्राप्त झालें.

English meaning

If there was space without the wind then, how could there be a maker of this `word' (aum) or the `wish' to be? And when the power of this `wish' appears then, that is the fire element together with that swarup (without knowledge there could be no space. Wherever there is space, there must be the wind of knowledge. This is simply effortless knowing and afterwards when there appears the feeling or knowing of something other than myself, there is the fire element and one has become a little more objective. Still understand that with the manifestation of each of these elements, that swarup is also ever present).

60
मूळ

मृदपण तेंचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ । ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥

मराठी अर्थ

तें सामर्थ्य जीवाला बोचत नाही. तें मृद आहे. मृदुपण हा जळाचा गुण ,आणि हा सर्व खेळ जडद्रव्याच्या आधारानें चालतो. जडत्व हा पृथ्वीचा गुण. अशा प्रकारें मूळमायेंमध्यें पंचमाहाभूतें सूक्ष्मपणें व अव्यक्तपणें वास करतात.

English meaning

Then there is softness (becoming more objective; `soft' forms appear) and that Reality appears as the water element. And when that pure knowledge becomes hard then, there is the earth element (and a particular gross `hard' object is clearly seen. "This is a cup", you say). One should know how this `all' of mula maya is made up of these five great elements.

61
मूळ

येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी । सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

हीं पंचमाहाभूतें अव्यक्त असतांना किंवा व्यक्त असतांना एकमेकांपासून वेगळीं राहूं शकत नाहीत. एकमेकांत ती मिसळलेली असतात. विश्वरचनेकडे सूक्ष्म दृष्टीनें बघितलें तर हें सर्व ध्यानांत येईल.

English meaning

In the womb of each element there is the other elements. Such is this way of the five great elements (ie. from one element the next appears and disappears also). This `all' can be understood when you acquire subtle vision (these elements can be traced back to the `all' when your mind stops thinking the `many' thoughts).

62
मूळ

पुढें जडत्वास आलीं । तरीं असतीं कालवलीं । ऐसी माया विस्तारली । पंचभूतिल ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

पंचमाहाभूतें व्यक्त स्वरुपांत आल्यावरसुद्धां एकमेकांत मिसळलेली असतात. याप्रमाणें पंचमाहाभूतांच्या पोटांत असलेली ही माया संपूर्ण विश्वभर पसरलेली आहे.

English meaning

But if ahead these great elements get mixed together then, that One becomes gross and hard. So in this way, this expansion of maya is completely made up of the five great elements (ie. objectification).

63
मूळ

मूलमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं । स्वर्ग मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥

मराठी अर्थ

मूळमायेच्या बुडाशी जाऊन पाहा किंवा स्वर्ग, मृत्यु, पाताळांत पहा सगळीकडें पंचमहाभूतांचाच विस्तार आहे असें तुम्हाला आढळेल.

English meaning

Either there is this understanding of mula maya at the root or there is avidya maya (ie. "I am a body") and then these five elements become heaven, this world of death and hell (ie. there is the three states of dream, waking and deep sleep).

64
मूळ

सत्य स्वरुप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती । पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥

मराठी अर्थ

आरंभी व शेवटीं सत्य असें परमात्मस्वरुप आहे. मध्येम पंचभूतांच्या घडामोडी चालतात. मूळमाया पंचभूतात्मक आहे. हें श्रोत्यांनी ओळखून रहावें.

English meaning

Still from beginning to end there is that true swarup and in between there is the functioning of these five great elements. The good listener should know these five elements as mula maya (ie. the good listener is one who forgets everything. Then objectification will cease and these great elements return to where they came from ie. this `I am' inspiration. Still that is not knowledge and this has also to be dropped. Then what remains is that which always is).

65
मूळ

येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका । पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥

मराठी अर्थ

येथें एक शंका आली. ती लक्ष देऊन ऐका. एका तमोगुणापासून पंचभूतें निर्माण होतात.

English meaning

This original doubt `here' has arisen from `there' and so you should be alert and just listen. Otherwise that One appears as these five great elements within this tamo guna.

66
मूळ

मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं । ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ६६ ॥

मराठी अर्थ

मूळमायेमध्यें त्रिगुणांना स्थान नाही. मग येथें पंचभूतांचा उगम कसा काय होतो ? अशीही शंका श्रोत्यांनी आधीच घेतली.

English meaning

If this tamo guna does not appear in mula maya then, how can these great elements appear? And previous to this doubt (`I am' of mula maya) that the listener has accepted there is that thoughtless swarup (by just listening ie. just knowing, tamo guna will not manifest. Now turn your attention around and follow it back to the source from where this duality/otherness of knowledge has arisen. Then the listener and his original doubt will not remain).

67
मूळ

ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें । याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांनी ही शंका घेतली आहे. पुढील समासामध्येम त्याचे उत्तर दिलें आहे.

English meaning

The good listener had been distracted and this doubt had appeared. Therefore in the collection of words ahead, this `reply' (`I am He') is to be always given. .