गुणरूप — समास 4: जाणपणनिरुपण

Fully populated

Janapan Nirupan (A Discourse on Knowingness)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

पृथ्वीमधें लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ । येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्य ॥ १ ॥

मराठी अर्थ

या पृथ्वीवर असंख्य माणसें आहेत. त्यांपैकी कांहीं गरीब तर कांहीं श्रीमंत आहेत. कांहीं घाणेरडी तर कांहीं निर्मळ, स्वच्छ आहेत. असा फरक असण्याचे कारण काय ?

English meaning

"Within this gross elemental earth there is this world of the `all'. What is the reason for one being endowed with this great wealth of the `all' and the other being powerless due to body consciousness? What is the reason that one is pure and the other is impure?" (There are these two worlds. The world of the `all' and the world of the `many'. And within these two worlds there is that One atma)

2
मूळ

कित्येक राजे नांदती । कित्येक दरिद्र भोगिती । कितीयेकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमोद्धम ॥ २ ॥

मराठी अर्थ

कांहीं माणसें राजवैभव भोगतात तर कांहीं दारिद्र्य भोगतात. कित्येकांची स्थिति उत्तम असते तर कित्येक हीन स्थितिंत असतात.

English meaning

"That One who is within the `many' rules as the King or that One within the `many' suffers the misery of body consciousness. For that One within the `many' there is the highest state and for that One within the `many' there is the lowest of the low?"

3
मूळ

ऐसें काय निमित्य जालें । हें मज पाहिजे निरोपिलें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

माणसांमध्यें असा फरक, भेद असण्याचे कारण काय, तें आपण मला सांगावें. वक्ता म्हणतो या प्रश्र्णाचे उत्तर श्रोत्यांनी ऐकले पाहीजे.

English meaning

"What is the reason for this and tell to `me', what is that thoughtless discourse?" The speaker says, in the listener, there should be the listening to this reply (maharaj- reply to the mind in such a way that the mind goes off).

4
मूळ

हे सकळ गुणापासीं गती । सगुण भाग्यश्री भोगिती । अवगुण दरिद्रप्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

हा सगळा भेद आपल्या गुणांचा परिणाम आहे. जे गुणवान असतात ते भाग्यशाली असतात व चैभव भोगतात. जे अवगुणी असतात तें दारिद्र्य भोगतात. यांत संशय नाही.

English meaning

When that thoughtless swarup is this `all' state then, It is in the charge of the sattwa guna. It has become this sagun `experience' and enjoys good fortune. But when It accepts these inferior *gunas then, it becomes body conscious and stricken with poverty. For this reason, one should leave off these doubts that hold you in body consciousness. *(Objectification or imagination)

5
मूळ

जो जो जेथें उपजला । तो ते वेवसाईं उमजला । तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥

मराठी अर्थ

जो माणूस ज्या धंद्यांत जन्म घेतो. तो धंदा त्यानें जाणतेपणानें व समजून केला तर लोक त्याला चांगला म्हणतात. कार्यकर्ता मानतात.

English meaning

When that purush gets born `here' in mula maya then, it is understood to be a `doer'. Then He gets called wise, knowledgeable and capable, for He is ever engaged in doing this action of the `all' (ie. `Myself is everywhere').

6
मूळ

जाणता तो कार्य करी । नेणता कांहींच न करी । जाणता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥

मराठी अर्थ

जाणता माणूस कष्ट करतो व काम करुन पोट भरतो. नेणता माणूस कांहींच करत नाही. तो आळशी असतो. त्यामुळें त्याला भीक मागावी लागते.

English meaning

That Knower does this `all' action and those who don't know/ignorant cannot do this action of the `thing'. That Knower gets satisfied within (ie. ananda) and those who don't know have to beg (give me this and that and make me happy).

7
मूळ

हें तों प्रगटचि असे । जनीं पाहातां प्रत्यक्ष दिसे । विद्येवीण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥

मराठी अर्थ

या गोष्टी अगदी उघड असल्यानें समाजांत प्रत्यक्ष अनुभवास येऊन दिसून येतात. विद्याहीन माणूस करंटा तर विद्यासमपन्न माणूस भाग्यवान असतो.

English meaning

That One understands that all this is myself made manifest but when That takes birth in this world then, It sees through the sensory organs. When there is no knowledge then, that atma lives as a miserable wretch and when there is knowledge then, that atma is the possessor of good fortune.

8
मूळ

आपुली विद्या न सिकसी । तरी काये भीक मागसी । जेथें तेथें बुद्धी ऐसी । वडिलें सांगती ॥ ८ ॥

मराठी अर्थ

" आपली विद्या शिकला नाहींस तर भीक मागावी लागेल. असा जाणतेपणानें वागण्याचा सल्ला वडिल माणसें देत असतात.

English meaning

If you do not learn your own knowledge then, how much will you have to beg? (How can I find happiness? Please somebody or something give me some happiness) But when your buddhi `here' is `there' then, that elder, the atma, says, "I don't want nothing because nothing is true."

9
मूळ

वडिल आहे करंटा । आणी समर्थ होये धाकुटा । कां जे विद्येनें मोटा । म्हणोनियां ॥ ९ ॥

मराठी अर्थ

दोघे भाऊ आहेत. धाकटा भाग्यवान निघाला व मोठा करंटा तर धकट्याचे भाग्य त्याच्याजवळच्या विद्येंने आलेले असते, असेंच आढळते.

English meaning

But if that elder is a wretch and has no knowledge then, He becomes a servant. And how then can mula maya become brahman if there is this knowledge of the servant?

10
मूळ

विद्या नाहीं बुद्धि नाहीं । विवेक नाहीं साक्षेप नाहीं । कुशळता नाहीं व्याप नाहीं । म्हणौन प्राणी करंटा ॥ १० ॥

मराठी अर्थ

विद्या, हुषारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य आणि व्याप या गुणांपैकी एकही गुण अंगी नसेल तर माणूस करंटा असतो.

English meaning

If there is no knowledge and no buddhi; if there is no vivek and no alertness; if there is no cleverness and no pervasiveness then, He is a wretched fool in the prana.

11
मूळ

इतुकें हि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे । वैभव सांडितां अपैसें । पाठीं लागे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

आणि हे सगळे गुण ज्याच्या अंगी असतात त्याला वैभव कधींहीं कमी पडत नाही. आणि नको म्हटलें तरी वैभव त्याच्या मागें लागते.

English meaning

But whenever knowledge, vivek etc. are present `here' then, there is no lack of this grandeur `there'. And then even if one leaves aside this grandeur (ie. this `all'), still it will follow behind. (maharaj- knowledge runs after you, it wants to serve you)

12
मूळ

वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी । वडिलाऐसा व्याप न करी । म्हणौनियां ॥ १२ ॥

मराठी अर्थ

याउलट समजा मोठा भाऊ वैभव भोगतो व धाकटा भाऊ वैभवहीन असतो याचे कारण धाकटा मोठ्यासारखा व्याप करीत नाहीं.

English meaning

And if the father has that understanding but His son is a beggar then, he has not been listening to His father's `speech'? The pervasiveness that is with the Father has not therefore been created by the son.

13
मूळ

जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव । तोलासारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३

मराठी अर्थ

माणसाची विद्या जेवढी असेल तेवढी महत्वाकांक्षा त्यास असते. तो जेवढे व्याप करतो तेवढें वैभव त्यास मिळते. माणसाचें सामर्थ्य जेवढें असतें तितकी कर्तबगारी तो दाखवितो.

English meaning

As is one's knowledge, so will be one's desires. As is one's pervasiveness, so will be one's glory. The actions that we make will be the same as the inclination of our mind and we will create a world accordingly (ie. either this world of `many' imaginations or this world of the pervasive `all').

14
मूळ

विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे । करंटपणें वोखटा दिसे । वोंगळ आणी विकारी ॥ १४ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसाजवळ विद्या नसते व वैभवही नसते तो मलिनपणें वावरतो. भाग्यहीन असल्यानें तो अगदी वाईट दिसतो. तसेच तो अगदी अस्वच्छ व वाईट प्रवृत्तीचा असतो.

English meaning

When there is no knowledge then, there is no glory of this `all'. And if there is no glory then, how will there ever be the purity of `there'? Due to such wretchedness (ie. rajo guna), the filthy is seen and there is ugliness and many modifications.9

15
मूळ

पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नसतां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

पशु व पक्षी गुणी असतील तर भाग्यवान माणूस त्यांच्यावरही कृपा करतो. पण अंगी कांहींच गुण नसतील तर माणसाचें जीवन अगदी वायां जाते.

English meaning

Whereas the one who possesses this sattwa guna is the beast and the bird for he understands, `I am everything, everywhere' and he has received the grace of the Master. But if this guna is destroyed then, there is merely this empty living in the prana.

16
मूळ

गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं । कुशलता नाहीं तर्क नाहीं । प्राणीमात्रासी ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, समाजांत महत्व नसते, कौशल्य, बुद्धिमत्ता नसते त्यांच्या जीवनांत कांहीं स्वारस्य नाहीं. अशी कांहीं माणसें असतात.

English meaning

If this guna is not then there is no honour. Where this power is not then there is no greatness. For there is no pervasiveness and no glory for the one confined within the prana.

17
मूळ

याकारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण । लक्षणेंविण अवलक्षण । सहजचि जालें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

म्हणून उत्तम गुण अंगीं आणणें हेंच भाग्याचें लक्षण होय. हें लक्षण जेथें नाहीं तेथें अवलक्षण येणें हें स्वाभाविकच आहे.

English meaning

On account of this `speech' of that superior guna, that Reality becomes this attention of the fortunate (`I am everywhere'). But without this attention of `I am', that natural thoughtless Self becomes misfortune and bad habits ("I am a body").

18
मूळ

जनामधें जो जाणता । त्यास आहे मान्यता । कोणी येक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥

मराठी अर्थ

समाजांत जाणता जो असतो त्याला लोक मानतात. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला महत्व मिळते.

English meaning

That purush is the Knower within this world and He is the only one worthy of respect. When that One who is within everyone acquires this knowledge then, He is to be considered great.

19
मूळ

प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि समर्थ । नेणता जाणिजे वेर्थ । निःकारण ॥ १९ ॥

मराठी अर्थ

प्रपंचांत किंवा परमार्थांत जो जाणता असतो त्याचा प्रभाव असतो. जो नेणता असतो तो आपलें आयुष्य फुकट दवडतो.

English meaning

Whether there is this worldly life/prapanch or paramarth still, there is that One who knows. You should understand that to not know/ignorance is void of any glory and worthless.

20
मूळ

नेणतां विंचु सर्प डसे । नेणतां जीवघात असे । नेणतां कार्य नासे । कोणी येक ॥ २० ॥

मराठी अर्थ

अज्ञानानामुलें साप किंवा विंचु चावण्याचा प्रसंग येतो. अज्ञानामुळें जीवाचा घात होतो. आपण करीत असलेले एखादे काम अज्ञानामुळें बिघडते.

English meaning

The one who does not know gets bitten by scorpions and snakes (the poison of desire). The one who does not know loses this life. The one who does not know destroys this action of the moving `all'.

21
मूळ

नेणतां प्राणी सिंतरे । नेणपणें तर्‍हे भरे । नेणपणें ठके विसरे । पदार्थ कांहीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आज्ञनामुळें माणूस भ्रमांत पडतो. अज्ञानामुळें भलत्या भरीला पडून माणूस कांहींतरी वागतो. अज्ञानामुळें माणूस फसतो व आपली वस्तु विसरतो.

English meaning

The one who does not know is ensnared in the prana. By not knowing, one is tormented and by not knowing one is deceived and forgets this object that is this `thing'.

22
मूळ

नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपाई पडती । नेणतां संव्हारती घडती । जीवनास ॥ २२ ॥

मराठी अर्थ

आपल्या अज्ञानामुळें शत्रु आपल्याला जिंकतो. अज्ञानाच्यापायीं आपल्याला नुकसान सोसावें लागते. अज्ञानामुळें संहार होतो. व जीवाचा नाश होतो.

English meaning

The one who does not know gets conquered by the enemy (ie. ego). The one who does not know makes mistakes and suffers great lose. The one who does not know destroys everything and destroys this life.

23
मूळ

आपुलें स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना । ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥ २३ ॥

मराठी अर्थ

अज्ञानामुळें माणसाला स्वहीत कळत नाही. त्यामुळें त्याला यातना भोगाव्या लागताता. ज्ञान नसल्यानें अज्ञानी माणसाची अधोगती होते.

English meaning

The people do not understand this which is their own Self-benefit and therefore great suffering has to be endured. If this knowledge is not known then, there is ignorance and one falls down into the body and stays so very far away from the Self.

24
मूळ

मायाब्रह्म जीवशिव । सारासार भावाभाव । जाटिल्यासाठीं होतें वाव । जन्ममरण ॥ २४ ॥

मराठी अर्थ

माया व ब्रह्म, जीव व शीव, सार व असार यांचें बरोबर ज्ञान झाले म्हणजे जन्ममरण नाहींसे होते.

English meaning

Only through detachment will one come to understand maya and brahman, the jiva and shiva; the essence and non-essence and existence and non-existence, and then birth and death are made void.

25
मूळ

कोण कर्ता निश्र्चयेंसीं । बद्ध मोक्ष तो कोणासी । ऐसें जाणतां प्राणीयासी । सुटिकां घडे ॥ २५ ॥

मराठी अर्थ

खरा कर्ता कोण आहे ? बंध व मोक्ष कोणास घडतो ? याचें निश्र्चित ज्ञान झालें कीं माणसाच्या सुटका होते तो मुक्त होतो.

English meaning

When you know who is truly the doer and who is bound and who is liberated then, you are released from within the prana.

26
मूळ

जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण । जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ॥ २६ ॥

मराठी अर्थ

देव निर्गुण आहे याचें ज्ञान करुन घ्यावे. मी कोण आहे याचे ज्ञान करुन घ्यावें. मी आणी देव एकरुपच आहोत हें ज्ञान करुन घ्यावें म्हणजें माणूस मुक्त होतो.

English meaning

That nirgun God should be known; one should know, who am I? and who is God? One should know that `no-otherness' and that only should be called Liberation.

27
मूळ

जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य वोलांडिलें । जाणत्यास जाणतां तुटले । मूळ मीपनाचे ॥ २७ ॥

मराठी अर्थ

ज्ञान व्यवहारांत जितकें कांहीं जाणलें आणि मिथ्या म्हणून बाजूस सारलें तितकें दृश्य ओलांडलें असें समजावें. अखेर सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणलें कीं मीपणाचें मूळ नाहींसे होते.

English meaning

When whatever is known is let slip away and whatever is visible is left behind then, you are the Knower and the root of `I am-ness' is dissolved.

28
मूळ

न जाणतां कोटीवरी । साधनें केलें परोपरीं । तरी मोक्षाचा अधिकारी । होणार नाहीं ॥ २८ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनें जाणत्याला न जाणतां, करोडों साधनें नाना प्रकारानें केली तरी कोणी मोक्षाचा अधिकारी होणार नाही.

English meaning

The one who does not know up to that pure knowledge may do many kinds of sadhana, but still he will not be worthy of Final Liberation.

29
मूळ

मायाब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें । इतुक्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥

मराठी अर्थ

माया आणी ब्रह्म कसें तें जाणावें, आपणच "मी कोण" याचें ज्ञान करुन घ्यावें म्हणजे माणूस मुक्त होतो.

English meaning

maya and brahman should be recognized. You should know your Self. And on account of this, birth will naturally be avoided.

30
मूळ

जाणतां समर्थाचें अंतर । प्रसंगें वर्ते तदनंतर । भाग्य वैभव अपार । तेणेचि पावे ॥ ३० ॥

मराठी अर्थ

प्रथम भगवंताच्या खर्‍या स्वरुपाचें ज्ञान करुन घ्यावें. त्यानंतर व्यवहारांतील प्रसंग ओळखून वर्तन करावें. असें केल्यानें फार मोठे भाग्य व वैभव वाट्यास येईल.

English meaning

When you know the inner space of the Master and afterwards, exist and function through His knowledge then, you are truly blessed and acquire the glory of that limitless swarup.

31
मूळ

म्हणौन जाणणें नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य । कांहींच नेणतां अमान्य । सर्वत्र करिती ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

म्हणून ज्ञान हें सामान्य समजूं नये. ज्ञानी माणसाला सर्व लोक मानतात. जो कांहींच जाणत नाहीं अशा अज्ञानी माणसाला कोणीच मानीत नाही.

English meaning

Therefore, to know is not nirgun (ie. He does not know even). The One who knows has respect for this `all' and the One who does not know has no respect for this `thing' at all.

32
मूळ

पदार्थ देखोन भूत भावी । नेणतें झडपोन प्राण ठेवी । मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

एका अज्ञानी माणसानें अंधारांत कांहीं बघितलें तें भूत आहे अशा प्रकारे खोट्या कल्पनेनें झपाटून तो प्राणास मुकला. हा सगळा खेळ अज्ञानाच्यामुळें निर्माण झालेल्या खोट्या कल्पनेचा आहे. ही गोष्ट जाणते लोक ओळखतात.

English meaning

Though we are actually seeing by means of this `thing' still, the one who does not know this conceives of `many' objects and being possessed of the elements gets placed in the prana. But the Knower knows these elements are false and the source of only troubles and toil.

33
मूळ

जाणत्यास कळे वर्म । नेणत्याचें खोटे कर्म । सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

जाणत्याला रहस्य कळतें. नेणत्याचें कर्म खोटें असतें. तो चुकीचें कर्म करतो. धर्म कोणता व अधर्म कोणता हें जाणत्याला सर्व कळतें.

English meaning

To the One who knows, there comes the understanding of that thoughtless essence. And to the One who does not know there comes, his false karma. The Knower, He understands the difference between dharma and adharma and perceives this `all thing'. (He realizes that one's inherent nature or dharma is to stay in this `I am' or effortless knowing and so drops everything; all thoughts from His mind)

34
मूळ

नेणत्यास येमयातना । जाणत्यास कांहींच लागेना । सकळ जाणोन विवंचना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. पण ज्ञानी माणसाचा त्यांच्याशी संबंध येत नाही. सगळें जाणून तो सारासार विचार करतो तो मुक्त होतो.

English meaning

To the One who does not know, there are the sufferings of death. While the One who knows, does not take the touch of this `thing' even. For He has known this `all' and then investigated thoughtlessness and was liberated.

35
मूळ

नेणतां कांहीं राजकारण । अपमान करुन घेती प्राण । नेणतां कठीण वर्तमान । समस्तांस होये ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

व्यवहारामध्यें प्रसंगानुसार कसें वागावें हें ज्याला कळत नाहीं, असा माणूस दुसर्‍याचा अपमान करतो. आणि त्याचा प्राण देखिल घेतो. अशा अज्ञानी माणसाच्या वागण्यामुळें सर्वानांच मोठा कठीण प्रसंग प्राप्त होतो.

English meaning

The one who does not know this `thing' of *raja-karana has no authority and loses his life (lit. gets the prana). When one does not know this then, this `all' exists in the hard and gross objectified world. *(`He does everything'; see 11.5)

36
मूळ

म्हणौनियां नेणणें खोटें । नेणते प्राणी ते करंटे । जाणतां विवरता तुटे । जन्ममरण ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

म्हणून अज्ञान वाईट आहे. अज्ञानी माणूस करंटा असतो. भग्यहीन असतो. अज्ञानाचा हा परिणाम ओळखून जो आत्मानात्मविवेक करतो तो जन्ममरणांतून मुक्त होतो.

English meaning

Therefore to not know is useless. By not knowing, that Reality becomes a wretch in the prana. While the one who knows and then understands thoughtlessness, breaks the bond of birth and death.

37
मूळ

म्हणोन अलक्ष करुं नये । जाणणें हाचि उपाये । जाणतां सापडे सोये । परलोकाची ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करुं नये. ज्ञानाची हेळसांड करुं नये. ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्ञानच्या उपायानेंच परमार्थाचा लाभ घडणें सोपें होते.

English meaning

Therefore one should not be inattentive. Due to knowing, that thoughtless Self has become this remedy of `I am' (`I am' is the remedy for the poisonous bites of desires). When you know, you find the comfort of this world beyond.

38
मूळ

जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण । परंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

ज्ञानाचें थोरपण सर्वांनाच मान्य आहे. मूर्खाला तें पटत नाहीं. अलिप्त कसें राहतां येतें तें ज्ञान झाल्यावरच समजतें.

English meaning

Knowing substantiates this `all' and the foolish imagine the `many' unsubstantial ob- jects. But that understanding of the untouched Self should be understood by the One who knows (ie. we must go beyond Knower and knowledge).

39
मूळ

येक जाणणें करुन परतें । कोण सोडी प्राणीयातें । कोणी येक कार्य जें तें । जटिल्याविण न कळे ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

ज्ञानाल जर बाजूला सारलें तर माणसाला अज्ञानांतून मोकळे करणारें कोणी नाही. कार्य कोणतेंही असले तरी तें ज्ञानाशिवाय तें कसें करावें हें कळणार नाहीं.

English meaning

That One goes to the other shore by knowing and this `I am' will be released from its confinement within the prana (siddharameshwar maharaj- Liberation is beyond the breath). Unless there is great detachment, that One who is within everyone remains as this `all' action and will not understand that Reality.

40
मूळ

जाणणें म्हणिजें स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण । दोहींमधें कोण प्रमाण । शाहाणे जाणती ॥ ४० ॥

मराठी अर्थ

ज्ञान हें स्मरण तर अज्ञान हें विस्मरण आहे. या दोन्हीमध्यें मान्य कोणतें हें शहाणें पुरुष जाणतात.

English meaning

To know means remembering. To not know means forgetting. Who is there with the wisdom to know that established Truth that is hidden within this prakruti/purush?

41
मूळ

जाणते लोक ते शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे । विज्ञान तेहि जाणपणें । कळों आलें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

ज्ञानी लोक खरे शहाणें असतात. अज्ञानी लोक वेडे व दैन्यवाणें असतात. स्वरुपानुभव काय असतो हें ज्ञानानेंच कळायला लागतें.

English meaning

By knowing there is the world of the wise (ie. the world beyond)10 and by not knowing there is the world of madness, confusion and misery. That vignyan/ dissolution of knowledge can only be understood if you have gained knowledge.

42
मूळ

जेथें जाणपण खुंटलें । तेथें बोलणें हि तुटलें । हेतुरहित जालें । समाधान ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

ज्ञानानें अज्ञान नाहींसे होते. आणि नंतर ज्ञानदेखिल विलीन होऊन जातें. '" मी देव आहे " या अनुभवानें " मी देहच आहे " हें भान लोपतें नंतर " मी देव आहे" हें भान देखील परब्रह्मांत लीन होतें. त्या ठिकाणीं भाषा बंद पडतें. अत्यंत वासनारहित असें संपूर्ण समाधान लाभते.

English meaning

Then this knowingness of `here' is confounded and `there' the `speech' is stopped then, free of this original intent, there is that samadhan.

43
मूळ

श्रोते म्हणती हें प्रमाण । जालें परम समाधान । परी पिंडब्रह्मांडऐक्यलक्षण । मज निरोपावें ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

वरील विवेचन ऐकून श्रोत्यांना वक्त्याचें म्हणणें पटलें. त्यांना अगदी समाधान प्राप्त झालें. मग पिंड व ब्रह्मांड दोन्ही सारखें कसें तें ऐकण्याची इच्छा त्यांनी सांगितली.

English meaning

The listener said, "That thoughtless Truth has been realized and there is supreme sa- madhan. Still this attention that unites the pinda and brahmanda should be discoursed to me again."

44
मूळ

ब्रह्मांडी तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें । परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

" जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं " असें पुष्कळ लोक म्हणतात. याचा खरा अर्थ आम्हाला समजेल असें आपण विवेचन करावें.

English meaning

The Master/speaker said, you have not achieved that thoughtless samadhan. That Reality within the brahmanda and pinda has become this `speech' and this you have understood. But that nirgun understanding of this clear `speech' still has to be created. .