स्तवननाम — समास 4: सद्गुरुस्तवन

Fully populated

Sadguru Stavan (Praise to the Sadguru)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015) — condensed here from his fuller annotated rendering

1
मूळ

आतां सद् गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शो सकेना । तें स्वरुप मज अज्ञाना । काये कळे ॥ १ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुच्या रुपाला माया स्पर्श करु शकत नाही. आपले सर्व ज्ञान हे मायेच्या कक्षेंतील असते. त्यामुळे सद् गुरुस्वरुप आपल्यासारख्या माणसाला कळणे शक्य नसते.

English meaning

Sadguru cannot be described, for maya itself cannot touch him; how then could I, ignorant as I am, ever understand that true nature?

2
मूळ

न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २ ॥

मराठी अर्थ

श्रुतिसुद्धा हे नाही हे नाही; कळत नाही कळत नाही म्हणून गप्प झाली. तेथे माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धि त्या गुरुस्वरुपाचे वर्णन कसे करु शकेल.

English meaning

'It is not known, it is not known; not this, not that' — so speaks the Shruti itself. How then could my foolish mind ever reach there?

3
मूळ

मज न कळे हा विचार । दुर्‍हुनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववी मज ॥ ३ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुस्वरुपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरुनच नमस्कार करतो. हे गुरुदेवा मला या मायेच्या कक्षेंतून पलीकडे न्या.

English meaning

This thought is beyond me, so from afar I offer my namaskar: O Gurudev, carry me across to that far shore.

4
मूळ

होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा । आतां असाल तेसे असा । सद् गुरु स्वामी ॥ ४ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुचे स्तवन करावे ही आशा मी धरली होती. माया मला मदत करील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. म्हणून हे सद् गुरुस्वामी तुम्ही असाल तसेच असा.

English meaning

I had hoped to sing your praise, trusting maya's power to help me, but that trust has failed — so, Sadguru Swami, remain as you are.

5
मूळ

मायेच्या बळे करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्यायमान । काय करुं ॥ ५ ॥

मराठी अर्थ

मायेची मदत घेऊन तुमची स्तुति करावी ही इच्छा होती पण माया लाजली व ती मागे सरली त्यामुळेंच मला तुमची स्तुति करता येत नाही.

English meaning

My mind wished to praise you by the strength of maya, but maya herself grew abashed — what, then, can I do?

6
मूळ

नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनि करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद् गुरुचा ॥ ६ ॥

मराठी अर्थ

परमात्म्याचेही आकलन होत नाही म्हणून त्याचे प्रतिमा कल्पावी लागते. त्याप्रमाणे सद् गुरु स्वरुप अनाकलनीय असले तरी मायेच्या मदतीने मी त्यास्वरुपाचे वर्णन करेन.

English meaning

Since the Supreme cannot be grasped directly, an image must be fashioned; so, with maya's help, I shall now describe the greatness of Sadguru.

7
मूळ

आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं । तैसा सद् गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७ ॥

मराठी अर्थ

जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करुन मानव त्याचे ध्यान करतो, त्यालाच अनुसरुन मी आता सद् गुरुचे स्तवन करतो.

English meaning

Just as one calls God to mind in meditation according to one's own feeling, so now I shall offer this praise of Sadguru.

8
मूळ

जय जया जि सद् गुरुराजा । विश्र्वंभरा विश्र्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८ ॥

मराठी अर्थ

विश्र्वांत भरुन उरणार्‍या, विश्र्वाचे बीज असलेल्या, सर्वोत्तम परम पुरुष, मोक्षाची ध्वजा व दिनांचा बंधु असा सद् गुरु त्याचा जयजयकार असो.

English meaning

Victory, victory to you, Sadguru-raja — pervading the universe, the seed of the universe, the Supreme Purusha, the banner of liberation, friend of the helpless!

9
मूळ

तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९ ॥

मराठी अर्थ

सूर्यप्रकाशाने जसा अंधकार नाहीसा होतो, तसा सद् गुरुचा अभय देणारा हात शिष्याच्या डोक्यावर पडला की अनावर मायेचा प्रभाव नाहीसा होतो.

English meaning

By your fearless, blessing hand, unrestrainable maya recedes, just as darkness flees before the light of the sun.

10
मूळ

आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । नीसी जालिया नंतरें । पुन्हा काळोखें ॥ १० ॥

मराठी अर्थ

सूर्य अंधकार घालवितो हे खरे तरी संध्याकाळ झाल्यावर परत अंधार पडायला सुरवात होते.

English meaning

The sun dispels the darkness, true enough, but once evening comes the world fills with darkness once again.

11
मूळ

तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

सद् गुरु कृपेचे असे नाही, अज्ञानरुपी मायेला ती पूर्णपणे काढून टाकते. त्यामुळे जीवाची जन्म-मृत्युच्या चक्रांतुन सुटका होते.

English meaning

Swami-raja is not so: he makes birth and death of no account, wiping away the very root of ignorance.

12
मूळ

सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं । तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥

मराठी अर्थ

सोन्याचे लोखंड होत नाही तसेच दासाचे (शिष्याचे) मनांत संशय निर्माण होत नाही.

English meaning

Gold never turns back into iron; likewise, the servant of the Guru never again falls into the doubt of body-consciousness.

13
मूळ

कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जाली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥

मराठी अर्थ

एखादी नदी गंगेला मिळाली कीं, ती गंगाच होते, परत वेगळी करावयाची म्हटले तरी ती वेगळी होऊ शकत नाही.

English meaning

When a stream joins the Ganga it becomes the Ganga itself, and even if separated again, it can never truly be separate.

14
मूळ

परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४ ॥

मराठी अर्थ

त्या नदीला गंगेला मिळण्यापूर्वी लहान ओढा, नदी म्हणतात. तसेच शिष्य सद् गुरुची कृपा होण्याआधी सामान्य असतो पण नंतर मात्र सद् गुरुच होतो.

English meaning

Before joining the Ganga, that stream was thought a small river by the world; but the disciple, the moment grace comes, quickly becomes the Master himself.

15
मूळ

परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना । उपदेश करी बहुत जना । अंकित सद् गुरुचा ॥ १५ ॥

मराठी अर्थ

परीस मात्र असे करु शकत नाही. अशा सोन्याने लोखंड सोने बनु शकत नाही. मात्र गुरुकृपा झालेला शिष्य दुसर्‍या सामान्यांना आपल्यासारखे बनवु शकतो.

English meaning

The philosopher's stone does not make another stone of itself, and gold made from it cannot turn iron to gold again — yet Sadguru's teaching makes many people into his own likeness.

16
मूळ

शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करितां न ये । म्हणौनि उपमा न साहे । सद् गुरुसी परिसाची ॥ १६ ॥

मराठी अर्थ

त्याला गुरुपद प्राप्त झालेले असते म्हणुन तो इतर लोकांना उपदेश करुन तारुन नेऊ शकतो. परीसस्पर्शाने बनलेले सोने दुसर्‍या लोखंडाचे सोने बनवु शकत नाही. म्हणुन परीसाची उपमा गुरुला देता येत नाही.

English meaning

The disciple attains the very state of Guru-hood, though gold cannot make more gold; therefore even the philosopher's stone is not a fit comparison for Sadguru.

17
मूळ

उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतचि क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला सागर म्हणावे तर तो खारट असतो, तसेच क्षीरसागरसुद्धा कल्पांती नासतो. म्हणुन गुरुला सागराची उपमा देता येत नाही.

English meaning

One might compare him to the ocean, but that is utterly salty; or call him the ocean of milk, but even that is destroyed at the end of the age.

18
मूळ

उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोर । तैसा नव्हे कीं सद् गुरु । कोमळ दिनाचा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला मेरुपर्वतासारखा म्हणावे तर मेरु पर्वत अचेतन व कठीण दगड आहे, गुरु काहीं तसा नाही. तो चेतनेनेयुक्त, कोमल मनाचा आहे.

English meaning

One might compare him to Mount Meru, but that is inert and unfeeling stone; Sadguru is not so — he is tender and humble toward the lowly.

19
मूळ

उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण । या कारणें दृष्टांत हीण । सद् गुरुस गगनाचा ॥ १९ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला गगनासारखा म्हणणेही योग्य नाही कारण आकाश शून्य दिसले तरी गुरु शून्यापलीकडचा आहे. म्हणुन ही उपमा बरोबर नाही.

English meaning

One might call him the sky, but even the sky, compared to him, still carries an attribute; for this reason the sky too is an unfit comparison for Sadguru.

20
मूळ

धीरपणें उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं । म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २० ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय व गंभीर म्हणावे तर पृथ्वी कल्पांती नष्ट होईल पण सद् गुरु अभंग राहील. म्हणुन हीही उपमा बरोबर नाही.

English meaning

If his steadiness were compared to the earth's, that too will crumble at the end of the age; so even the earth falls short as an example of his steadiness.

21
मूळ

आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती । शास्त्रें मर्यादा बोलती । सद् गुरु अमर्याद ॥ २१ ॥

मराठी अर्थ

सद् गुरु सूर्यासारखाही म्हणता येत नाही कारण सूर्याच्या प्रकाशाला, तेजाला मर्यादा आहेत सद् गुरुच्याबाबतींत तसे नाही.

English meaning

Now one might compare him to the sun, but how much can the sun's light truly reach? The scriptures speak of its limits, while Sadguru is without limit.

22
मूळ

म्हणौनि उपमे उणा दिनकर । सद् गुरु ज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुच्या ज्ञानाच्या प्रकाशाला मर्यादा नाही, त्यामुळे सूर्याची उपमा देता येत नाही. शेषाची उपमा द्यावी तर शेषाच्या डोक्यावर ओझे आहे सद् गुरुच्या डोक्यावर तसे नाही.

English meaning

Thus the sun falls short as a comparison, for Sadguru's light of knowledge is far greater still; and comparing him to the great serpent Shesha fails too, for even Shesha bears a burden on his head.

23
मूळ

आतां उपमे द्यावे जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ । सद् गुरुरुप तें निश्र्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला पाणी म्हणावे तर पाणी चंचळ व नष्ट होणारे तर सद् गुरुस्वरुप निश्चल व नाश न पावणारे त्यामुळे सद् गुरुला पाण्याचीही उपमा देता येत नाही.

English meaning

Now if compared to water, that too will dry up entirely in time; but the form of Sadguru is unwavering and will never pass away.

24
मूळ

सद् गुरुसी उपमावें अमृत । तरी अमर धरिती मृत्युपंथ । सद् गुरुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला अमृत म्हणावे तर नित्य अमृत पिणारे देवही मृत्युच्या मार्गाने जातात या उलट सद् गुरु कृपा झालेला साधक अमर होतो. त्यामुळे अमृताची उपमा देता येत नाही.

English meaning

If Sadguru is likened to nectar, still even the immortals who drink it walk the path of death; only Sadguru's true grace makes one genuinely immortal.

25
मूळ

सद् गुरुसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु । कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला कल्पतरु म्हणावे तर कल्पतरु कल्पना केलेलेच तेवढे देतो, तर सद् गुरुकृपा झाल्यावर कल्पनेपलीकडील मोक्षप्राप्ती व जन्म-मृत्युंतुन मुक्ति शिष्यास मिळते.

English meaning

One may call Sadguru the wish-fulfilling tree, but he is a thought that lies beyond all imagining — who, then, could truly lay claim to that wishing-tree?

26
मूळ

चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला चिंतामणीची उपमाही योग्य नाही कारण सद् गुरु शिष्याच्या मनांत चिंताच उरुं देत नाही. असा शिष्य कामनारहीत असल्याने कामधेनुची धार काढालाच जाणार नाही.

English meaning

When the mind holds no anxious thought at all, who has need of the wish-granting gem? And to one free of desire, even the milk of Kamadhenu, the wish-fulfilling cow, is of no use.

27
मूळ

सद् गुरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥

मराठी अर्थ

सद् गुरुला श्रीमंताची उपमा देता येत नाही कारण सर्व धन नाश पावते. परंतु सद् गुरुच्या द्वारी मात्र मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते.

English meaning

Should Sadguru be called the lord of wealth, that wealth too is perishable; but at his door waits Moksha-Lakshmi, the imperishable wealth of liberation itself.

28
मूळ

स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरी विटंबती । सद् गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ॥ २८ ॥

मराठी अर्थ

स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य याचीही उपमा देता येत नाही कारण हे सर्व नाशिवंत आहे. परंतु सद् गुरुची कृपा नाश पावत नाही.

English meaning

Heaven, Indra's throne and their glory are all in time brought low; but the attainment of Sadguru's grace is never shaken by time.

29
मूळ

हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश येक । सद् गुरुपद ॥ २९ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मा, विष्णु व महेश यांना नाश आहे. सद् गुरुपदच एक अविनाशी आहे.

English meaning

Hari, Hara, Brahma and all the rest are in the end destroyed; the state of Sadguru alone is forever imperishable.

30
मूळ

तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी । पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३० ॥

मराठी अर्थ

सर्व सृष्टी नाश पावणारी असल्याने दृष्यमान विश्वांतील कोणत्याही वस्तुची उपमा सद् गुरुस देता येत नाही. पंचभूतांची लुडबुड तेथे चालत नाही.

English meaning

What comparison, then, could ever be given? All of visible creation is perishable, and the workings of the five elements have no power there.

31
मूळ

म्हणौनि सद् गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

म्हणुन सद् गुरुचे वर्णन करता येत नाही, त्यास्वरुपाचे वर्णन उपमेद्वारा करुनही करीता येत नाही हे सद् गुरुस्वरुपाचेच वर्णन समजावे. जे स्वान्तर्यामी स्थित झालेले आहेत तेच सद् गुरुस्वरुपास समजु शकतात.

English meaning

Therefore Sadguru cannot be described — this very statement is itself my only description of him; the mark of that inner state is known only to those established within.