आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान । जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १ ॥
आतां मी संतांना जे सज्जन असून परमार्थाचा आधार आहेत त्यांना नमस्कार करतो. त्यांच्यामुळे जे गुप्त असे आत्मस्वरुपाचे ज्ञान लोकांमधे प्रगट होते.
Now I bow to the sajjana, the true saints who are the very foundation of ultimate truth, through whom the hidden knowledge of the Self becomes manifest to people.