स्तवननाम — समास 6: श्रोतेस्तवन

Fully populated

Shrote Stavan (Praise of the Listeners)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015) — condensed here from his fuller annotated rendering

Norwell's translation leans heavily on his own Advaita-Vedanta gloss for this samas; the English here follows the plainer sense given in the Marathi meaning above, cross-checked for agreement with Norwell's core narrative rather than his interpretive layer.

1
मूळ

आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १ ॥

मराठी अर्थ

आतां मी भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न आणि सत्यवादी या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो.

English meaning

Now I bow to all these listeners — devotees, the wise, saints and the virtuous, dispassionate yogis rich in good qualities, and speakers of truth.

2
मूळ

येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर । येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नाचे ॥ २ ॥

मराठी अर्थ

एकजण सत्वगुणाचा सागर आहे, तर दुसरा एक अत्यंत बुद्धिमान आहे, तर तिसरा शब्दप्रभु म्हणजे त्याच्याजवळ शब्दरुपी जणु खाणच आहे.

English meaning

One is an ocean of goodness, another a mine of intellect, and yet another a treasury of words, a mine of many rare jewels of speech.

3
मूळ

जे नाना अर्थांवृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते । नाना संशयातें छेदिते । निश्र्चै पुरुष ॥ ३ ॥

मराठी अर्थ

त्यांतील कांही वक्त्याच्या बोलण्यांत लक्ष देऊन अर्थ समजुन घेणारे, कोणी उत्तम वक्तृत्व गाजविणारे, तर कोणी निश्र्चित मताने संशयाचा छेद करणारे.

English meaning

Among them are those who attentively grasp the speaker's meaning, some who are themselves eloquent speakers when called upon, and resolute souls who cut through every doubt.

4
मूळ

ज्यांची धारणा अपार । जे ईश्र्वराचे अवतार । नातरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

कोणी अपार ज्ञानी व बु्द्धिमान असे जणु सभेंत आलेले प्रत्यक्ष देवच.

English meaning

Some hold boundless understanding, as if very incarnations of God, or as if the gods themselves had come and taken their seats among us.

5
मूळ

किं हे ऋषेश्र्वरांची मंडळी । शांतस्वरुप सत्वागळी । जयांचेनि सभामंडळीं । परमशोभा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

अशा श्रोत्यांमुळे शांती व सत्वगुणयुक्त ऋषिच सभेची शोभा वाढवित आहेत असे वाटते.

English meaning

It is as though an assembly of great sages, peaceful in nature and full of goodness, has gathered, lending supreme beauty to this hall.

6
मूळ

हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६ ॥

मराठी अर्थ

त्यांच्या अंतःकरणांत वेदांचा समग्र अर्थ भरलेला आहे. त्यांच्याजवळ सरस्वतीचा वास आहे व ते साहित्याचा प्रकार वर्णु लागले कीं, देवगुरु बृहस्पतीच वाटतात.

English meaning

The essence of the Vedas dwells in their hearts, Sarasvati plays upon their tongues; when they speak of literature, they seem like Brihaspati, guru of the gods, himself.

7
मूळ

जे पवित्रपणें वैश्र्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥

मराठी अर्थ

ते पवित्रपणांत अग्निसारखे, सूर्याच्या किरणांसारखी स्फूर्ति पसरविणारे, आपल्या अमर्याद ज्ञानाने दृश्य सृष्टीला किंमत न देणारे.

English meaning

Pure as sacred fire, radiant as the sun scattering rays of inspiration, so vast is their knowledge that the visible universe holds no weight before them.

8
मूळ

जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥

मराठी अर्थ

ते नेहमीेसावधच असतात. त्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते. ते आत्मज्ञानाने संपन्न व अभिमानरहित असतात.

English meaning

Ever alert, possessing knowledge of all three times, always free of pride, and endowed with true knowledge of the Self.

9
मूळ

ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रासी लक्षिलें मनें जयांच्या ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानी असल्याने त्यांच्या दृष्टींतून कांहींच सुटत नाही. सर्व दृश्य वस्तु त्यांच्या मनाने पाहीलेल्याच असतात.

English meaning

Nothing at all escapes their sight; every single thing has already been beheld by their minds.

10
मूळ

जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वींच ठावें । तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरुनी ॥ १० ॥

मराठी अर्थ

आपल्याला जे जे आठवते ते ते त्यांना आधींच माहीत असते. आपल्याला माहीतआहे व त्यांना माहीत नाही असे काहींच नसल्याने त्यांना कांहीं सांगताच येत नाही.

English meaning

Whatever one might think to recall, they already know beforehand; what, then, is left to explain to such knowers?

11
मूळ

परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥

मराठी अर्थ

परंतु असे असले तरी ते भाग्यवंत लोक गुणग्राहक असलेने व ते अव्हेर करणारे नसल्याने मी निःशंकपणे दासबोध सांगत आहे.

English meaning

Yet since these fortunate ones are appreciative of merit and do not spurn what is offered, I speak on without hesitation.

12
मूळ

सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें । तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

नेहमी संस्कृत वेदवचने ऐकणारे म्हणजेच दिव्य अन्ने सेवन करणारे केवळ रुचिपालट म्हणुन प्राकृतांतील माझा दासबोध ऐकत आहेत.

English meaning

Those who ever partake of divine fare take plain food too, now and then, for a change of taste; just so, my humble vernacular words are received by you.

13
मूळ

आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्र्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

आपापल्या शक्तिनुसार भगवंताची पूजा करावी परंतु पूजाकरुच नये असे कोठेंच नाही.

English meaning

Each should worship the Lord with devotion according to one's own capacity; but the notion that one should not worship at all has no place anywhere.

14
मूळ

तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्र्वरचि केवळ । यांची पूजा वाचाबरळ । करुं पाहे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मी तसाच एक वाचा कमी म्हणुन दुर्बळ असलेला आहे. श्रोते हे परमेश्र्वर आहेत. मी माझ्या ओबडदोबड शब्दांनी त्या परमेश्र्वराची पूजा करत आहे.

English meaning

So I too, feeble in speech, seek with my clumsy words to worship you, the listeners, who are none other than God himself.

15
मूळ

वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५ ॥

मराठी अर्थ

माझ्याजवळ विद्वत्ता नाही, चातुर्य नाही, कला नाही, व्यवस्थित लिहीलेला प्रबंध नाही, भक्ति, ज्ञान, वैराग्य, शब्दवैभव नाही.

English meaning

I have no scholarship, no skill, no cleverness, no well-composed treatise; no devotion, no knowledge, no renunciation, nor sweetness of speech.

16
मूळ

ऐसा माझा वाग्विळास । म्हणौन बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६ ॥

मराठी अर्थ

माझा वाग्विलास असा असूनही मी सावकाश बोलतो आहे कारण भगवंतरुपी आपण श्रोते भावाचे भोक्ते व रसग्रहण करणारे आहात.

English meaning

Such is my poor gift of speech; and so I speak slowly and carefully, since it is Jagadish, the Lord of the World, who truly savours this feeling.

17
मूळ

तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती । बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७ ॥

मराठी अर्थ

तुम्ही सर्व श्रोते परमात्मा असे जगदीश आहात. त्यामुळे अल्पमती व मंदबुद्धि मी माझ्या कमी विचार शक्तीने आपल्याशी सलगी करत आहे.

English meaning

You, the listeners, are the very image of the Lord of the World — before you, what is my learning? Yet I, of dull wit and shallow understanding, take this liberty with you.

18
मूळ

समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगी । तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८ ॥

मराठी अर्थ

मोठ्या माणसाचा मूर्ख मुलगासुद्धां सामर्थ्यवान असतो तसाच मी तुम्हां संतांचा असल्याने धारिष्ट्य करत आहे.

English meaning

Even a foolish son of a great man carries something of his father's power in him; so, being a child of you saints, I take this same liberty.

19
मूळ

व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक । परी त्यांची पिलीं निःशंक । तयांपुढें खेळती ॥ १९ ॥

मराठी अर्थ

अति भयानक वाघ, सिंह असले तरी त्यांची पिल्ले निःशंक होऊन त्यांच्याजवळच खेळतात.

English meaning

Though people flee in terror at the sight of a fearsome tiger or lion, its own cubs play fearlessly right before it.

20
मूळ

तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत । तरी माझी चिंता तुमचें चित्त । वाहेलच कीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणे मी तुमचाच असल्याने निःशंक मनाने दासबोध सांगत आहे. माझी तुम्हीच काळजी घ्यालच.

English meaning

So too, I, devoted to you saints, speak here among you saints; surely, then, your hearts will carry the burden of my care.

21
मूळ

आपलेंचि बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे । परंतु कांहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आपले माणूस कांहीं चुकिचे बोलले तरी आपण त्याला सांभाळून घेतो, तसे माझे दासबोध निरुपणांत कांही चुकीचे असले तरी ते तुम्ही सांभाळून घ्यालच.

English meaning

One overlooks the careless words of one's own kin and quietly makes up for them; so too, whatever falls short here needs no pointing out — simply complete it for me.

22
मूळ

हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंचि करी मन । तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्र्वाचे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

तुम्ही संतसज्जन सर्व जगाचे मायबाप आहात. त्यामुळे स्वाभाविकच प्रेमाने तुम्ही मला सांभाळून घ्याल.

English meaning

This is the very mark of true affection, done naturally by a loving heart; and you, saints and sajjans, are truly the mother and father of the whole world.

23
मूळ

माझा आशय जाणोनि जीवें । आतां उचीत तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३ ॥

मराठी अर्थ

माझा सांगण्याचा आशय ओळखून आपणास योग्य असे उचित आपण करावे व मी सांगत असलेला दासबोध लक्षपूर्वक ऐकावा, अशी हा दासानुदास रामदास आपल्याला विनंती करत आहे.

English meaning

Knowing my true intent, please do now what is fitting, and give your full attention to the story that follows — so requests this servant of servants, Dasanudas.