स्तवननाम — समास 8: सभास्तवन

Fully populated

Sabha Stavan (Praise of the Assembly)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015) — condensed here from his fuller annotated rendering

1
मूळ

आतां वंदू सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्टतु भरें ॥ १ ॥

मराठी अर्थ

आतां मी सर्व सभांना नमस्कार करतो. जेथे जन्म-मरणापासून मुक्ति सुलभ होते. आणि जेथे स्वतः जगदिश तिष्ठत उभा असतो.

English meaning

Now I bow to every gathering where liberation itself is easily won, and where the Lord of the World himself stands present in fullness.

2
मूळ

श्र्लोक । नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं । माझे भक्त गाती ठांईं ठांईं । तेथें मीं तिष्ठतु नारदा ॥ २ ॥

मराठी अर्थ

नारदाला भगवंत सांगतात मी वैकुंठांत नाही, योग्यांच्या हृदयांतही मी नाही, तर मी माझे भक्त जिथे माझे गुणगान गातात त्या ठिकाणी मी असतो.

English meaning

'I do not dwell in Vaikuntha, nor in the hearts of yogis; wherever my devotees sing, there, O Narada, I stand,' says the Lord.

3
मूळ

याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोषें धडधडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥

मराठी अर्थ

यामुळें सभा श्रेष्ठ आहे जेथे भगवंताचे नामाचे गायन व नामघोषाचा जयजयकार करतात तोच वैकुंठ आहे.

English meaning

For this reason such an assembly is supreme — wherever devotees sing, that itself is Vaikuntha, and the resounding chant of the divine name roars forth in victory.

4
मूळ

प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४ ॥

मराठी अर्थ

जेथे प्रेमळ भक्त गायन करतात, भगवंताच्या कथा, किर्तनें चाललेली असतात, वेद-व्याख्यान, पुराणें यांचे श्रवण नेहमी होत असते.

English meaning

Where loving devotees sing without end, where the stories of God and Hari's kirtan are told, where the Vedas are expounded and the Puranas heard.

5
मूळ

परमेश्र्वराचे गुणानुवाद । नाना निरुपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेंथें ॥ ५ ॥

मराठी अर्थ

परमेश्र्वराचे गुणगायन चालू असते, नानाप्रकारची निरुपणें, संवाद, अध्यात्मविद्येचे भेदाभेदांचे मंथन, चर्विचरण चाललेले असते.

English meaning

Where the virtues of God are sung, where discourses and dialogues abound, and the many distinctions of spiritual knowledge are churned over.

6
मूळ

नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

नाना प्रकारच्या शंकाकुशंका यांचे निरसन होते व त्या फिटतात व समाधान होऊन चित्तामध्ये भगवंताची मूर्ति स्थिर होते.

English meaning

Where every kind of contentment is found and every doubt dispelled, and the mind, through this delight of speech, settles upon the image of meditation.

7
मूळ

भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७ ॥

मराठी अर्थ

भक्त, प्रेमळ भाविक जन, सभ्य, ज्ञानाने सखोल, सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत.

English meaning

Devotees who are loving and faithful, courteous, deeply wise, virtuous, delightful and sweet-voiced singers, utterly steadfast.

8
मूळ

कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ । सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८ ॥

मराठी अर्थ

कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशूर, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यवान, शुद्ध अंतःकरणी, कृपाळू.

English meaning

Devoted to right action and right conduct, given to charity and righteousness, pure-minded and meritorious, of clean heart and full of compassion.

9
मूळ

योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस । विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

योगी, विरक्त, उदास, नेमी, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, वनांत वास करणारे.

English meaning

Yogis, the dispassionate and indifferent, the disciplined and self-restrained ascetics, the desireless — many of them dwelling in the forest.

10
मूळ

दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी । येक बाळ ब्रह्मचारी । योगेश्र्वर ॥ १० ॥

मराठी अर्थ

दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, बालब्रह्मचारी, मोठे योगी.

English meaning

Staff-bearers and matted-haired ascetics, followers of the Nath tradition and bearers of yogic seals, celibate youths, and masters of yoga.

11
मूळ

पुरश्र्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी । महायोगी आणी जनस्वी । जनासारखे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

पुरश्चरण करणारे, तपस्वी, तीर्थावर राहणारे, मन जिंकणारे, महायोगी, लोकांत राहुन अलिप्त असणारे.

English meaning

Those repeating sacred mantras and performing austerities, dwellers at holy places, masters of their own minds, great yogis living simply among the people.

12
मूळ

सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक । येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२ ॥

मराठी अर्थ

सिद्ध, साधु, साधक, मंत्रयंत्र देणारे, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही.

English meaning

The accomplished, the holy, and the striving seekers, students of mantra and sacred diagrams, single-minded worshippers who recognize true virtue.

13
मूळ

संत सज्जन विद्वजन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३ ॥

मराठी अर्थ

संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रौढ पंडित, सर्वज्ञानी, समाधान करुन निर्मळ करणारे.

English meaning

Saints and the virtuous, the learned, those versed in the Vedas and scriptures, great and noble souls, wise and all-knowing, bringing peace and purity to all.

14
मूळ

योगी वित्पन्न ऋषेश्र्वर । धूर्त तार्किक कवेश्र्वर । मनोजयाचे मुनेश्र्वर । आणी दिग्वल्की ॥ १४ ॥

मराठी अर्थ

योगी, विद्वान, ऋषीश्र्वर, धूर्त, तार्किक, महाकवि, मनावर विजय मिळविलेले मुनि, दिगंबर.

English meaning

Learned yogis, great sages, the shrewd and logical thinkers, master poets, sages who have conquered the mind, and ascetics who wear the very sky as their garment.

15
मूळ

ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी ।तत्वज्ञानी पिंडज्ञानी । योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन.

English meaning

Knowers of Brahman, knowers of the Self, knowers of first principles, knowers of the body, practitioners and knowers of yoga, and the truly detached.

16
मूळ

पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६ ॥

मराठी अर्थ

पंडित, पुराणीक, विद्वान, वैदिक, भट, यजुर्वेदी पाठक.

English meaning

Scholars and reciters of the Puranas, the learned and the ritual specialists, Brahmin priests and teachers, followers of the Yajurveda.

17
मूळ

माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री । वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७ ॥

मराठी अर्थ

मोठे चांगले लोक, मोठे श्रोते, यज्ञ करणारे, अग्नीहोत्र व्रती, वैद्य, पंचाक्षरी, परोपकार करणारे.

English meaning

The truly noble and the widely learned, performers of sacrifice and keepers of the sacred fire, physicians and healers, all working for the good of others.

18
मूळ

भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८ ॥

मराठी अर्थ

भूत, भविष्य व वर्तमानाचे त्रिकाळ ज्ञानी, बहुश्रुत, निराभिमानी, अपेक्षा रहित.

English meaning

Those with knowledge of past, present and future, widely read yet free of pride, desiring nothing for themselves.

19
मूळ

शांती क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ । अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्र्वरी पुरुष ॥ १९ ॥

मराठी अर्थ

शांत, दयाळू, क्षमाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंतःकरणाचे ज्ञानी, असे सर्व ते ईश्र्वरासारखे पुरुष.

English meaning

Peaceful, forgiving and compassionate, pure and virtuous, of clean inner mind and true knowledge — such are these godly persons.

20
मूळ

ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २० ॥

मराठी अर्थ

आतां या सभेंत कोणकोण असतात ते स्वामी समर्थ रामदास सांगत आहेत. त्या सभेचे नायकच जेथे नेहमी नित्य कोणते व अनित्य कोणते याचाच विचार चालतो. त्या सभेचा मोठेपणा किती सांगावा.

English meaning

Such are the leaders of this assembly, where the discernment between the eternal and the transient is ever practiced — how could their wondrous glory ever be fully described?

21
मूळ

जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये । तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१ ॥

मराठी अर्थ

अशा सभेमध्ये परमार्थी लोकच असल्याने परमार्थ श्रवणाचाच लाभ सामान्य जनांना विनासायास होतो.

English meaning

Where the means of true listening and the gathered company of ultimate truth exist, there people naturally find their own way to liberation.

22
मूळ

उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी । नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

अत्यंत सत्वगुणी, धैर्यवान, उत्तम गुणाने युक्त मंडळी तेथे असल्याने तेथे नेहमी नित्य नविन सुखच लाभते.

English meaning

Where a company of the finest qualities dwells, steadfast and full of goodness, there resides an ever-fresh and constant happiness.

23
मूळ

विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें । भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

विद्यावान, कलावंत, विशेषगुणयुक्त, भगवंताची आवडती मंडळी येथे एकत्र येतात.

English meaning

Where the worthy in learning, the worthy in art, the worthy in special virtue, and those beloved of God himself all come together.

24
मूळ

प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी । गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४ ॥

मराठी अर्थ

प्रवृत्त आणि निवृत्त, प्रपंची व परमार्थी, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थाश्रमी, संन्यासी.

English meaning

The active and the withdrawn, the worldly and the spiritual, householders and forest-dwellers, renunciates and the like.

25
मूळ

वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ । अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

वयस्कर, तरुण आणि बाळ, पुरुष, स्त्रीयां असे सगळे तेथे बसून त्या अंतर्यामी असलेल्या भगवंताचे ध्यान करतात.

English meaning

The old, the young and the children, men and women alike, all constantly meditate there upon the dark-hued Lord who dwells within.

26
मूळ

ऐसे परमेश्र्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन । जयांचेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥

मराठी अर्थ

अशा परमेश्र्वराच्या भक्तांना कीं, ज्यांच्यामुळें तत्काळ समाधान मिळते, त्यांना माझा नमस्कार आहे.

English meaning

To such devotees of God I offer my salutation, through whose very presence contentment is suddenly and unexpectedly attained.

27
मूळ

ऐसिये सभेचा गजर । तेथे माझा नमस्कार । जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

अशा त्या सभेमध्ये निरंतर भगवंताचे भजन-किर्तन चालते, त्या सभेला माझा नमस्कार आहे.

English meaning

To such a resounding assembly I bow, where the eternal, unceasing kirtan of God is forever sung.

28
मूळ

जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्र्चय बहुतां ग्रंथी । महंत बोलिले ॥ २८ ॥

मराठी अर्थ

मोठ्या लोकांनी पुष्कळ ग्रंथामधे असे म्हटले आहे की, जेथे भगवंताचे नामसंकिर्तन चालते तेथे उत्तम गति मिळते.

English meaning

Where the image of God resides, there the highest state is attained — such certainty has been declared by the great, in many scriptures.

29
मूळ

कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथे होय ते सभा श्रेष्ठ । कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९ ॥

मराठी अर्थ

कलियुगांत कीर्तन हेच वरिष्ठ आहे. त्या सभेंत कथा-संकिर्तन ऐकल्याने सर्व संदेह नष्ट होतात.

English meaning

In this age of Kali, kirtan is the highest practice; wherever it takes place, that assembly is supreme, and by hearing such stories, every doubt melts away.