जगज्ज्योतीनाम — समास 2: देहआशंका

Fully populated

Deha Aashanka (Doubts about the Body)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

स्वामीनें विचार दाखविला । येथें विष्णूचा अभाव दिसोन आला । ब्रह्मा विष्णु महेशाला । उरी नाहीं ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागल्या समासांत स्वामींनी एक विचार मांडला. तो असा कीं, ब्रह्मा, विष्णु, महेश या देवतां शरीरांत आहेत. परंतु या देवतांना कोठें स्थानच नाहीं. त्या शरीरांत आहेत असा अनुभव येत नाहीं.

English meaning

When swami reveals that thoughtless Self then, vishnu is proved to be non-existence (even knowing is illusion). Then neither brahma, vishnu nor mahesh remain.

2
मूळ

उत्पत्ति स्थिति संहार । ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥

मराठी अर्थ

ब्रह्मा, विष्णु, महेश उत्पत्ति, स्थिति, संव्हार घडवितात काय ? याचा विचारानें शोध घेतला तर तसा अनुभव येत नाहीं.

English meaning

If this world is created, maintained and destroyed then, there is brahma, vishnu and mahesh. And when there is this mix of the gunas then, this `I am' and that thoughtless nirgun cannot be understood.

3
मूळ

ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौमुखांचा । येथें प्रत्ययो नाहीं त्याचा । पाळणकर्ता विष्णु चौभुजांचा । तो हि ऐकोन जाणों ॥ ३ ॥

मराठी अर्थ

उत्पत्ति करणारा ब्रह्मदेव चार तोंडांचा आहे असें सांगतात. पण त्याचा कधीं अनुभव येत नाहीं. पालन करणारा विष्णु चार हातांचा आहे असें म्हणतात. परंतु त्याला कधीं कोणी पाहिला नाहीं. तो नुसता ऐकून माहीत आहे.

English meaning

brahma, the creator has four faces representing the four forms of birth. When he is here creating names and forms then, thoughtlessness cannot be. vishnu with his four arms protects every jiva and when he is knowing then, forget everything and just listen to this `I am'.

4
मूळ

महेश संव्हार करितो । हाहि प्रत्ययो कैसा येतो । लिंगमहिमा पुराणीं तो । विपरीत बोलिला ॥ ४ ॥

मराठी अर्थ

महेश संहार करतो असें म्हणतात. पण त्याचा अनुभव कसा तें माहीत नाहीं. पुराणांमध्यें शंकराच्या लिंगाचा महिमा वेगळाच सांगितला आहे. तो विपरीत भासतो.

English meaning

mahesh is the destroyer (ie. not knowing) but how can he bring that thoughtless un- derstanding? And when He is shiva (ie. forget everything and He is there) then, there is this false `I am' that resides within that ancient and eternal paramatma.

5
मूळ

मूळमायेस कोणें केलें । हें तो पाहिजे कळलें । तिही देवांचे रुप जालें । ऐलिकडे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

या तिन्ही देवांचे प्रगटपणें रुप धारण करणें मायेच्या अलीकडचें आहे. ती मूळमाया कोणी केली हें कळलें पाहिजे.

English meaning

But how can there really be a creator of this non-existence mula maya? Therefore thoughtlessness should be understood. These three gods/gunas have appeared on this side of mula maya.

6
मूळ

मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी । गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी । जन्म देवा ॥ ६ ॥

मराठी अर्थ

मूळमाया ही खरी विश्वजननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी जन्मली. गुणक्षोभिणीपासून सत्व, रज, तम हे तीन गुण जन्मले. त्या तीन गुणांपासून त्रिदेव जन्मले आहेत.

English meaning

mula maya is the mother of the world. From her has come this `agitation of the gunas'. From the `agitation of the gunas' these three gods have been born.

7
मूळ

ऐसें बोलती शास्त्रकारक । आणि प्रवृत्तीचेहि लोक । प्रत्यये पुसतां कित्येक । अकांत करिती ॥ ७ ॥

मराठी अर्थ

शास्त्र रचणारे शास्त्रकर्ते व शास्त्र प्रमाण मानणारे सामान्य लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असें सांगतात. हे देव आहेत याविषयीं कांहीं प्रत्यक्ष अनुभव आहे काय ? असें विचारलें कीं त्यांपैकीं बरेच लोक आकांडतांडव करतात.

English meaning

This mula maya is the creator of the shasthras and the creator of this worldly existence also. For when that nirgun understanding gets wiped out then, that One within is made to shout out loud (first it shouts out `I am' and then he shouts out "I am so and so, I know better than you" etc. etc).

8
मूळ

म्हणोन त्यास पुसावेना । त्यांचेन प्रत्ययो आणवेना । प्रत्ययेंविण प्रेत्न नाना । ठकाठकी ॥ ८ ॥

मराठी अर्थ

म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाहीं. त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊं शकत नाहीत. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाहीं त्यासाठीं नाना प्रयत्न करणें म्हणजे नुसती फसवाफसवी होते.

English meaning

But when thoughtlessness is not wiped out, then where are these gunas? And if this understanding is not then, there is only the deception and dishonesty of `many' efforts.

9
मूळ

प्रचितीवीण वैद्य म्हणवी । उगीच करी उठाठेवी । तया मूर्खाला गोवी । प्राणीमात्र ॥ ९ ॥

मराठी अर्थ

एखादा माणूस रोग व त्यांचे उपचार यांचें ज्ञान नसतांना उगाच आपल्याला वैद्य म्हणवूं लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नस्ती उठाठेव होते. अशा मूर्खाला सर्व लोक अडचणींत टाकतात.

English meaning

If the doctor who does not know this `experience' is called for, then his patient will suffer unnecessarily (he can give `many' remedies and sadhanas but he can only offer a continued life in the prana). For he is also a fool entangled in the prana.

10
मूळ

तैसाच हाहि विचार । प्रत्यये करावा निर्धार । प्रत्ययें नस्तां अंधकार । गुरुशिष्यांसी ॥ १० ॥

मराठी अर्थ

या देवांच्या बाबतींत असाच प्रकार होतो. येथें प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपलें निश्र्चित मत बनवावें. प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु व शिष्य दोघेहि अज्ञानाच्या अंधारामध्यें भ्रमत राहातात.

English meaning

This `experience' therefore should be gained and so too, the conviction of that thought- less nirgun. Where there is not that nirgun understanding, then the guru and shishya are both stumbling around in darkness.

11
मूळ

बरें लोकांस काये म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें । परंतु स्वामीनें सांगावें । विशद करुनी ॥ ११ ॥

मराठी अर्थ

बरें लोकांना तरी नांवें कां ठेवावीत? लोक म्हणतील तेंच बरोबर आहे असें म्हणावें लागतें. म्हणून स्वामीनीं हा विषय स्पष्ट करुन सांगावा.

English meaning

10.2. These Bodies are Doubt Why should the wise *say anything about this world of darkness? (maharaj- don't care for anything) This world calls itself wise but only the swami can tell you what wisdom truly is. *(Be quiet in your mind)

12
मूळ

म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रुपें मायेंत आलीं । जरी म्हणो मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

देवांनीं माय केली असें म्हणावें तर देवचमुळीं मायेनें निर्माण केले आहेत. देवांचीं रुपें मायामय आहेत. मायेनें माया निर्माण केली म्हणावें तर मूळमाया एकच आहे, दोन नाहींत.

English meaning

If a guru says, "maya has been created in God" then, these forms in maya are God. Or if he says, "maya has been made by maya", then there is nothing other than maya.

13
मूळ

जरी म्हणों भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली । म्हणावें जरी परब्रह्में केली । तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

पंचभूतांनी माया केली म्हणावें तर मूळमायेमध्यें पंचभूतें भरुन आहेत. म्हणून तें शक्य नाहीं. परब्रह्मानें माया निर्माण केलीं म्हणावें तर परब्रह्मामध्यें कर्तेपण नाहीं.

English meaning

If he says, "That Reality within the five great elements has made everything" then, even that Reality is made of the great elements. And if he says, "It was made by parabrahman then, there would be no creative capacity of maya."

14
मूळ

आणी माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तुत्वाची गोवी । माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तुत्व कैंचें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

शिवाय माया जर खरी असती तर परब्रह्माकडे कर्तेपण देण्याचा प्रश्र्ण होता. माया जर खरीच नाहीं तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्र्णच येत नाहीं.

English meaning

And if he says, "maya is true" then, in brahman there comes this entanglement of doing. But if maya is known to be false, then how can He do anything?

15
मूळ

आतां हें अवघेंचि उगवें । आणी मनास प्रत्यये फावे । ऐसें केलें पाहिजे देवें । कृपाळूपणें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

शेवटीं श्रोता म्हणतो कीं, हें सारें प्रश्र्ण सुटून मनाला अनुभव येईल असें विवेचन सद्गुरुनीं कृपाळू होऊन करावें.

English meaning

Now the `many' things should shine (become knowledge) and that mind should reach that nirgun understanding. Such should be made, by the grace of God (grace means do what the Master says and see for yourself).

16
मूळ

वेद मातृकावीण नाहीं । मातृका देहावीण नाहीं । देह निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

वेद शब्दमय आहेत. शब्द अक्षरापासून बनतात. सर्व अक्षरांचें मूळ ओंकाराच्या साडेतीन मात्रांमध्यें आहे. म्हणून वेद हें मात्रामय आहेत. ओंकार देहाशिवाय साकार होत नाहीं. आणि देहावाचून देह निर्माण होत नाहीं.

English meaning

Without this `word' of mula maya there are no vedas. And without this `all' body there is no `word' (ie. to know and to be). And the other bodies of the causal, subtle, gross cannot be created without this `all' body.

17
मूळ

तया देहामधें नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो । तया ब्राह्मणदेहास पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥

मराठी अर्थ

देहांमध्यें नरदेह उत्तम मानतात. नरदेहामध्यें ब्राह्मणदेह श्रेष्ठ मानतात. ब्राह्मणदेहाला वेदांचा अधिकार आहे.

English meaning

Within this `all' body there is the human body and in that human body there is that body (`all') of the brahmin (Knower of brahman). This brahmin uses this `all' but He does not touch it and He is the only one who understands the inner meaning of the vedas (He uses knowledge to be in the world. But this knowledge is no different from Himself ie. no-otherness).

18
मूळ

असो वेद कोठून जाले । देह कासयाचे केले । देव कैसे प्रगटले । कोण्या प्रकारें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

असो. येथें प्रश्न येतों कीं वेद कोठून निर्माण झाले ? देह कशाचे बनवले ? आणि देव कोणत्या रीतीनें दृश्य आकाराला आलें ?

English meaning

He knows from where the vedas have come. He knows how the bodies are made. He knows how the gods (ie. gunas) have appeared and what their nature is.

19
मूळ

ऐसा बळावला अनुमान । केलें पाहिजे समाधान । वक्ता म्हणे सावधान । होईं आतां ॥ १९ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांचा तर्कअसा धावूं लागला. त्यांचे समाधान करणें जरुर आहे. म्हणून वक्ता म्हणाला कीं, अगदीं लक्षपूर्वक उत्तर ऐकावें.

English meaning

He gives complete contentment to those drowning in conjecture. The speaker/Master says, forget everything and now listen very carefully to this `I am'.

20
मूळ

प्रत्यये पाहातां सांकडी । अवघी होते विघडाविघडी । अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥

मराठी अर्थ

प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते. कारण शास्त्रें जें प्रतिपादन करतात त्याच्याशी अनुभवाचा विरोध होतो. आणि त्यावर तर्क करीत राहिलें तर निकाल लागत नाहींच उलट क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो.

English meaning

For if that nirgun understanding is caught in the confinement of a human body then, it gets completely spoiled and then every moment is passed away in conjecture and opinions.

21
मूळ

लोकधाटी शास्त्रनिर्णये । येथें बहुधा निश्र्चये । म्हणोनियां येक प्रत्यये । येणार नाहीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

लोकांचीं मतें काय व शास्त्राचे निर्णय काय नाना प्रकारचे असतात. म्हणून त्यांच्यामध्यें एकनिश्र्चित असा सिद्धान्त आढळत नाहीं.

English meaning

In the distress and clamour of this world there are the laws set down by the scriptures. But they can only bring the many different convictions of a worldly life and therefore there cannot be that one conviction of thoughtlessness.

22
मूळ

आतां शास्त्राची भीड धरावी । तरी सुटेना हे गथागोवी । गथागोवी हे उगवावी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

त्यामुळें असें होतें कीं, शास्त्राचे निर्णय सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाहीं. आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्यें एकमत आढळत नाहीं.

English meaning

If now respect for the scriptures/shasthras is kept, then that thoughtless swarup cannot be cut from this entanglement. And if that thoughtless unravels this entanglement then, it will disagree with the scriptures (shasthras can teach up to this `I am experience' ie. 10.2. These Bodies are Doubt neti, neti but they have no capacity to go beyond this knowledge).

23
मूळ

शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला । पूर्वक्ष त्यागून सिद्धांत पाहिला । शाहाणा मूर्ख समजाविला । येका वचनें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

आपलें उत्तर असें पाहिजे कीं, एकीकडे शास्त्राच्या प्रामाण्याला धक्का लागूं नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशीं त्याचा विरोध येऊं नये. आधीं पूर्वपक्ष मांडावा. त्यांतील दोष दाखवून तो बाजूस सारावा, आणि मग आपला सिद्धान्त प्रतिपादन करावा. एकच उत्तर द्यावें पण त्यानें शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावें.

English meaning

The scriptures are to be protected therefore and then that understanding of nirgun is to be brought. When this original hypothesis `I am' is abandoned then, that Truth/si- ddhant (I do not exist) is understood. The foolish therefore should understand the wisdom of this divine `speech' (neti, neti).

24
मूळ

शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला । विचार पाहातं आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥

मराठी अर्थ

शास्त्रामध्यें पूर्वापार सांगण्याची रीत आहे. पूर्वपक्ष अपुरा असतो. खरा नसतो. म्हणून येथें पूर्वपक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केलें तर आम्हांला त्यांत दोष देता येणार नाहीं.

English meaning

Within the scriptures there is this original hypothesis and this is `I am'. Still, you should understand that this hypothesis is false and when thoughtlessness is understood then, this `word' should not be uttered.

25
मूळ

तथापि बोलों कांहीयेक । शास्त्र रक्षून कौतुक । श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ २५ ॥

मराठी अर्थ

तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करुन या विषयाचें कौतुकानें थोडे विवेचन करतो. श्रोत्यांनी आदरानें त्याचा विचार करावा.

English meaning

Still as long as there is this `speech' then, the scriptures are protected and this will bring the wonder of `I am everywhere'. Therefore in the listener there should be respect for this vivek (not this, not that). Note: It is said there are three kinds of experience. The experience gained from the shrasthras; the experience gained from the guru and finally one's own direct experience. .