जगज्ज्योतीनाम — समास 7: सगुणभजननिरुपण

Fully populated

Sagun Bhajan Nirupan (A Discourse on Sagun Worship)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

अवतारदिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त । त्यांचें सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥

मराठी अर्थ

रामकृष्णादि अवतार, मोठे ज्ञानी पुरुष आणी संत सारासारविचारानें मुक्त झालेले असतात. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचें सामर्थ्य येथें चालतें. तें कसें चालतें ?

English meaning

"Due to that thoughtless essence, this `I am' etc. is set free from its confines and there is the gnyani and Saint. But does their power continue to work?"

2
मूळ

हे श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्र्ण केला निका । सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥

मराठी अर्थ

ही श्रोत्यांची शंका आहे. हा प्रश्र्ण खरोखर चांगला आहे. वक्ता म्हणतों कीं, याचे उत्तर लक्ष देऊन ऐकावें.

English meaning

That thoughtless swarup had become this doubt of the listener. But if one understands that thoughtless swarup then, this question will not be asked. Therefore be alert and listen, says the speaker (leave off every concept and then no questions will arise).

3
मूळ

ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले । परंतु ते नाहीं आले । वासना धरुनी ॥ ३ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात. नंतर प्रारब्ध संपलें कीं देह ठेवतात. देह थेवल्यानंतरही त्यांची सत्ता चालते, कार्य करते. पण वासना धरुन ते परत येतात असें नाहीं.

English meaning

The gnyani has achieved liberation and gone and afterwards this power of that para- matma (ie. gnyani) continues to work. But He is that Reality and cannot come back again by holding this desire/vasana to be (the whole world functions and is caught is this knowledge of maya. On account of this vasana, ie. the desire to be, every creature takes birth again and again. Only the gnyani has freed Himself from this vasana and is liberated). (maharaj how can I come back, I don't exist)

4
मूळ

लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार । परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥

मराठी अर्थ

लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार अनुभवास येतात. लोक त्यांना सत्य मानतात. पण याचा खरा अर्थ काय याचा विचार केला पाहिजे.

English meaning

Miracles appear to people and they believe that they are true. Therefore thoughtlessness should be understood (and then no so-called miracles will appear).

5
मूळ

जीत आस्तां नेणों किती । जनामध्यें चमत्कार होती । ऐसियाची सद्यप्रचिती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥

मराठी अर्थ

एखादा सत्पुरुष जिवंत असतां त्याच्याकडून लोकांसाठीं पुष्कळ चमत्कार झाले असतील. हें शक्य आहे. पण त्यानें देह ठेवल्यावर जे चमत्कार घडतात त्याची मात्र खरी प्रचिती तत्काळ बघितली पाहिजे.

English meaning

If while living one gives up these `many' names and forms and this `I am' that supports this world appears, then this should be called a real miracle. And afterwards one should directly understand that thoughtless Self that is within this ever-present `experience' (ie. miracle).

6
मूळ

तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला । ऐसा हा चमत्कार जाला । यास काये म्हणावें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

समजा तो सत्पुरुष जिवंत असतांना त्याच्याच घरीं आहे. तेथून तो बाहेर गेलेला नाहीं असें असतांनाा एकाच दिवशीं, एकाच वेळीं तो दोन किंवा अधिक स्थानीं लोकंना प्रत्यक्ष दिसतो. या चमत्काराचे कारण काय असावें ?

English meaning

That paramatma is always there even if `you' have not left, but in this world the people cannot see Him for they are staring through their senses (they cannot see this miracle nor can they see that gnyani; they can only see his body made of dust). Therefore when this miracle of `I am' appears, one should *say nothing to this `speech'? (maharaj- keep mum!) *(The chattering mind will become quiet and this `speech' will be heard when one understands that, these `many' things have been created by my chattering mind only)

7
मूळ

तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ । अनेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥ ७ ॥

मराठी अर्थ

याचें कारण असें कीं, लोकांच्या शुद्ध भावनेनें हें घडून येते. संत देवरुप असतो. व जशी ज्याची भावना असतें तसा त्याला देव फळतो. चमत्काराचें हेंच एकमेव कारण आहे. इतर कल्पना करणें म्हणजे निष्कारण वेडेपणानें तर्क करणें होय.

English meaning

And when this *faith in this `speech' becomes thoughtless then, the faithful truly be- come God. All else is really empty imagination and foolish fancy (maharaj- they see gods and many things in their meditation, but they have a passionate mind). *(maharaj- what faith is required when you are He)

8
मूळ

आवडे तें स्वप्नीं देखिलें । तरी काय तेथून आलें । म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

मनापासून आपल्याला जें आवडतें तें स्वप्नांत दिसतें. पण जें दिसतें तें बाहेरुन कोठून आलेले नसते. यावर आक्षेप असा कीं, त्या वस्तुचें आपल्याला स्मरण होतें म्हणून ती दिसतें हें खरें नाहीं. कारण वस्तूचें स्मरण झालें तर ती प्रत्यक्ष दिसतें असें नाहीं. परंतु स्वप्नामध्यें ती प्रत्यक्ष दिसतें, याचें कारण काय ?

English meaning

Though one may wish to percieve that Reality in this `all' dream still, how can that Reality ever leave `there'? (If you try to see that Reality then, you will see something else ie. the `all' of this original dream; then you see your reflection. Therefore every desire should be abandoned, even this dream and the desire to be that Reality) And if due to this dream, one was to say that that Reality was being remembered still, this is only objective knowledge that is being seen (then we create another dream within this original dream and we may say we seen a wonderful miracle at the gnyani's samadhi. But that Reality cannot be remembered nor can it be imagined by the mind. It was just our desire to see Him that brought about this apparation)? 5

9
मूळ

एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना । परी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥

मराठी अर्थ

थोडक्यांत आपण कल्पना केली त्यामुळें अनेक वस्तु स्वप्नामध्यें दिसतात. त्या वस्तुंचें स्मरण होतें म्हणून त्या दिसतात हें खरें नाहीं. तसेंच त्यांचा व्यवहारांत कांहीं उपयोग नाहीं. हेही खरें आहे.

English meaning

Thus it is your imagination that `many' things have appeared within this original dream of `I am'. But that Reality is not this moving `object' nor is it a thing remembered.

10
मूळ

येथें तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पूं नका । उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥

मराठी अर्थ

येथें श्रोत्यांच्या शंकेचें निरसन झालें. ज्ञानी पुरुषाला जन्म येतो ही कल्पना करुं नये. माझें सांगणें ाकलन होत नसेल तर सूक्ष्म विचार करुन बघा म्हणजे कळेल.

English meaning

This doubt has been cleared up; one should not imagine rebirth for the gnyani. If you have not understood this nirgun then, vivek is required and thoughtlessness should be understood.

11
मूळ

ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगेंचि चाले । कां जे पुण्यमार्गें चालिलें । म्हणोनियां ॥ ११ ॥

मराठी अर्थ

जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास व आपोआप चालते. खर्‍या पुण्यमार्गानें तें गेलेले असतात. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच खरा पुण्यमार्ग होय.

English meaning

That gnyani is liberated and gone and the power of that gnyani silently, effortlessly continues (as it always has).

12
मूळ

याकारणें पुण्यामार्गें चालावें । भजन देवाचें वाढवावें । न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

यासाठीं माणसानें पुण्यमार्गानें चालावें. जगामध्यें भगवंताची भक्ति वाढवावी. न्यायाचा पक्ष सोडून अन्यायाच्या मार्गानें जाऊं नये.

English meaning

By means of this `I am', you should walk on this path of great virtue and make this sagun bhajan of God expand. You should never let this conviction slip and go on the roads of doubt.

13
मूळ

नाना पुरश्र्चरणें करावीं । नाना तीर्थाटणें फिरावीं । नाना सामर्थें वाढवावी । वैराग्यबळें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारची पुरश्र्चरणें करावीत. अनेक तीर्थें करावीत. आणि प्रबळ वैराग्य धारण करुन अनेक प्रकारच्या शक्ति अंगीं वाढवाव्यात.

English meaning

The `many' should make this mantra (`I am He') and the `many' should make this pilgrimage to `I am'; the `many' should make this power grow, through powerful renun- ciation/vairagya.

14
मूळ

निश्र्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेहि सामर्थ्य चढे । कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

'" मी आत्मस्वरुप आहे " असा मनाचा निश्र्चय झाला तर ज्ञानमार्ग साधतो. व त्यानें अंगी मोठे सामर्थ्य येते. जेथें आपली निष्ठा असेल त्याला धक्का लागेल असें कांहीं करु नये.

English meaning

*And when there is the conviction of that Self (I do not exist), then on this path of knowledge your power will grow. You are that One within everyone and your `aloneness' should never be broken. (maharaj- be out of the clutches of thoughts) *(siddharamesh- war maharaj gave many lectures on this one verse)

15
मूळ

येक गुरु येक देव । कोठें तरी असावा भाव । भावार्थ नस्तां वाव । सर्व कांहीं ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एक सद्गुरु किंवा एक देव यापैकीं कोणावर तरी संपूर्ण निष्ठा ठेवावी. तसें नसेंल तर बाकीं सारें वाया जातें.

English meaning

One's faith should either be placed in guru or God (ie. purush). Otherwise without this faith, there is this vain and empty `all thing' (this `all' vainly speaks `I am He").

16
मूळ

निर्गुणी ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें । तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥

मराठी अर्थ

समजा एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला. निर्गुणाचे ज्ञान झालें म्हणून त्यानें सगुणाकाडे दुर्लक्ष केलें. सद्गुरु किंवा देवाची उपासना त्यानें सोडून दिली. असा ज्ञानी पुरुष दोन्हीकडून नागावला जातो. त्याला धड निर्गुण स्वाधीन होत नाही. तसेंच धड ना सगुण हाताशीं लागत नाहीं.

English meaning

Then in that nirgun there has appeared this knowledge. Therefore this sagun knowledge should be made that *imperceptible brahman (sagun should be dissolved in nirgun). But if that Reality gets plundered then, there is this known in the possession of pu- rush/prakruti (then again duality arises; the Knower/purush and the known/prakruti.

17
मूळ

नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान । म्हणौनियां जपध्यान । सांडूंच नये ॥ १७ ॥

मराठी अर्थ

त्याच्यापाशीं ज्ञान म्हणावें तर तें नसते. व भक्ति म्हणावी तर ती पण नसते. म्हणून जप व ध्यान कांहीं केल्या सोडूं नये.

English meaning

And if there is no devotion and no knowledge then, the pride of the body comes in between that purush and His prakruti. Therefore this repetition of `I am' should not be left.

18
मूळ

सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी । म्हणौनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥

मराठी अर्थ

जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडून देतो तो ज्ञानी खरा पण अपयशी असतो. म्हणून सगुणाची उपासना कधीं सोडू नये.

English meaning

When that Knower lets slip this sagun bhajan of God then, he will be a failure (one may understand sagun devotion but if faith in lacking then, one will tumble down into body consciousness once more; maharaj- faith in Yourself is the best). Therefore this sagun bhajan should never be given up. (sagun bhajan ie. effortless knowing, will leave of its own accord when the nirgun understanding comes; but if it is not maintained and increased then, one will suddenly be swept away in maya's flood)

19
मूळ

निःकाम बुद्धीचिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा । समर्थेविण घडेना । निःकाम भजन ॥ १९ ॥

मराठी अर्थ

अत्यंत निष्कामबुद्धीनें केलेली म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवतां केलेली भगवंताची उपसना अनमोल आहे. या त्रैलोक्यांत तिची बरोबरी करणारी दुसरी वस्तु नाहीं. मोठें आत्मबल असल्याशिवाय कोणीही माणूस अशी उपासना करुं शकणार नाहीं.

English meaning

There is no equal in the three worlds to this sagun bhajan done with a desireless buddhi. But without the Master that desireless bhajan will not be fully accomplished.

20
मूळ

कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे । फळभगवंत कोणीकडे । महदांतर ॥ २० ॥

मराठी अर्थ

कांहीं अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते. कांहींही अपेक्षा न ठेवतां उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंत भेटतो. एखादी अपेक्षा पूर्ण होणें व प्रत्यक्ष भगवंत भेटणें यांत फार मोठे अंतर आहे, फरक आहे.

English meaning

When bhajans are performed with desire then, that fruit may be acquired but when there is desireless bhajan then, there will be union with God. Still understand that between these fruits and God there is this great intervening space of the `all'.

21
मूळ

नाना फळें देवापासी । आणी फळ अंतरीं भगवंतासी । याकारणें परमेश्र्वरासी । निःकाम भजावें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

भगवंताजवळ आपल्या सर्व अपेक्षा, वासना, मागण्या, इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. पण आपण आपल्या इच्छाच पूर्ण करण्यामागें लागलों तर आपण भगवंताला अंतरतो. म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीनें भगवंताची उपासना करावी.

English meaning

`Many' fruits are in the possession of God but God is the true fruit that is hidden within this `all'. Therefore by the means of this `speech', there should be this desireless bhajan to parameshwara (beyond ishwara/purush; I do not even want to know; I do not even want to be).

22
मूळ

निःकामभजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें । तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

निष्काम बुद्धीनें केलेल्या उपासनेचे फळ कांहीं आगळेंच असतें. अशा उपासकाच्या अंगीं मोठे सामर्थ्य येते. तेथें कामनापूर्ती मुळींच किंमत राहत नाही.

English meaning

one's power grows beyond all limits. What are these fruits acquired by the poor and helpless jivas compared to that fruit of brahman? That fruit of desireless bhajan is so great, that one's power grows beyond all limits. What are these fruits acquired by the poor and helpless jivas compared to that fruit of brahman?

23
मूळ

भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें । तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥

मराठी अर्थ

कांहीं व्हावें असा संकल्प भक्ताच्या मनीं आला कीं, भगवंत तो आपणहून सिद्धीस नेतो. त्यासाठीं भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाहीं.

English meaning

If the devotee holds this `I am' in the mind then, he becomes himself God. Therefore `there' the feeling of separateness should never be allowed to rise (ie. desireless).

24
मूळ

दोनी सामर्थें येक होतां । काळास नाटोपे सर्वथा । तेथें इतरांची कोण कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥

मराठी अर्थ

आत्मज्ञान व भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्ये एकत्र आल्यावर तो ज्ञानी भक्त काळाला देखिल अनावर होतो. मग इतरांना तो भारी होतो यांत नवल काय ? इतर सारे त्याच्यापुढें क्षुद्र किड्यासारखें होतात.

English meaning

When this power that is within this prakruti/purush becomes that One God then, death can never touch one. And in brahman, this story of the `all' is like a small insect.

25
मूळ

म्हणोन निःकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळितां त्रिभुवन । उणें वाते ॥ २५ ॥

मराठी अर्थ

म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्यापुढें त्रिभुवनसुद्धां उणे पडते.

English meaning

Therefore, desireless worship/bhajan (ie. I want nothing from this world, I don't even want knowledge) should be maintained until that pure knowledge of brahman has been acquired. These three worlds pale in comparison to that Reality.

26
मूळ

येथें बुद्धीचा प्रकाश । आणीक न चढे विशेष । प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥

मराठी अर्थ

ज्ञानी भक्ताचा महिमा यापेक्षां अधिक आकलन होणें बुद्धीला शक्य नसतें. त्याचा प्रताप, कीर्ति, व यश निरंतर वर्धमान होत राहतात.

English meaning

`Here' in sagun, the light of the buddhi has not ascended to that pure knowledge. But this glory, pervasiveness and success of `I am' is that parabrahman (therefore maintain this understanding until that God is achieved)

27
मूळ

निरुपणाचा विचार । आणी हरिकथेचा गजर । तेथें होती तत्पर । प्राणीमात्र ॥ २७ ॥

मराठी अर्थ

ज्या ज्ञानी भक्तापाशीं अत्मज्ञानाचें विवेचन असतें आणि भगवंताच्या उपासनेचे बळ असतें तेथें पुष्कळ लोक आकर्षित होतात व त्या सत्पुरुषाशीं लिन होतात.

English meaning

When the roar of His song leads to that thoughtless discourse then, the one who was only in the prana gets absorbed `there'. (maharaj- roar like a lion, `I am He')

28
मूळ

जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि दडेना । समाधान विघडेना । निश्र्चयाचें ॥ २८ ॥

मराठी अर्थ

ज्या सत्पुरुषापाशीं भ्रष्टाचाराला स्थान नाहीं, जो नीतिधर्माला धरुन असतो, त्याचा परमार्थ लपून राहात नाहीं. आणि लोक जरी भोवती गोळा झाले तरी निश्र्चयाच्या आत्मज्ञानामुळें लाभलेलें समाधान भंगत नाहीं.

English meaning

Then the confusion of delusion `here' does not appear. Then that paramarth is not hidden and complete contentment is not spoiled.

29
मूळ

सारासारविचार करणें । न्याये अन्याये अखंड पाहाणें । बुद्धि भगवंताचें देणें । पालतेना ॥ २९ ॥

मराठी अर्थ

याकारणासाठीं साधकानें नेहमीं सारासार विचार करावा. न्याय कोणता, अन्याय कोणता, हें अखंड शोधावें. तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. पण ही भगवंताची देणगी आहे. ती एकदां प्राप्त झालीं कीं, मग तिच्यांत बदल घडत नाहीं.

English meaning

By discriminating continuously between justice and injustice, thoughtlessness is im- bibed and you are given the buddhi of God and that never turns or changes.

30
मूळ

भक्त भगवंती अनन्य । त्यासी बुद्धि देतो आपण । येदर्थीं भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥

मराठी अर्थ

जो भक्त भगवंतापाशीं अनन्य होतो, त्याला भगवंताचें मार्गदर्शन लाभते. त्याला योग्य बुद्धी व विचार करण्याची दिशा दाखवितो. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे. तें ऐका. श्र्लोकार्ध ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥ अर्थः मी त्यांना बुद्धी देतो. त्यायोगें तें मला येऊन मिळतात.

English meaning

When the devotee is totally inseparable from God then, that paramatma gives its own buddhi to that paramatma. For this reason there is to be this sagun `speech' of God. Therefore be ever alert and listen. lokrdha || dadmi buddhiyoga ta yena mmupayti te || half-shloka || I, myself gave them the intelligence by which they came unto me.

31
मूळ

म्हणौन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । प्रयत्नांचें समाधान । दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळें स्वनुभवाचें खरें समाधान या गोष्टीं जगांत फारच दुर्लभ आहेत.

English meaning

This sagun bhajan should be performed until there is that pure knowledge of brahman. Then there is the complete contentment of that nirgun, the most difficult to gain in this world (if you stay in this world then, He is most difficult to attain). .