जगज्ज्योतीनाम — समास 8: प्रचितनिरुपण

Fully populated

Prachit Nirupan (A Discourse on Direct Experience)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

ऐका प्रचितीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें । येर वेडे दैन्यवाणें । प्रचितीविण ॥ १ ॥

मराठी अर्थ

आतां प्रचितीची लक्षणें ऐकावी. जो प्रचीति पाहातो, जो स्वानुभव घेतो तो खरा शहाणा होय. प्रचीति न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे व खालच्या प्रतीचे समजावेत.

English meaning

If you listen with the attention of this `experience', then through wisdom, this sagun will reach that Reality. The rest who are without this `experience', foolishly chase after sense objects and make themselves miserable.

2
मूळ

नाना रत्नें नाना नाणीं । परीक्षून न घेतां हानी । प्रचित न येतां निरुपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥

मराठी अर्थ

अनेक प्रकारची नाणीं व रत्नें असतात. त्यांची पारख, परिक्षा न करतां ती घेतली तर नुकसान होतें. ज्या निरुपणामध्यें स्वानुभव नाहीं किंवा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन नाहीं, तेथें बसूच नये.

English meaning

If the `many' jewels and the `many' wealths are properly examined then, you will not have to suffer anymore. Therefore do not take delight in any discourse which does not bring this `experience'.

3
मूळ

तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहातां प्रचितीस आले । तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥

मराठी अर्थ

घोडा चालवून बघावा. शस्त्र वापरुन बघावें. असें केल्यावर तें उत्तम प्रतीचे ठरलें तरच तें जाणत्या पुरुषानें घ्यावें.

English meaning

When you become weary of these `prison glories' then, the understanding of this `expe- rience' can come. And afterwards, by simply remaining with this knowing one should accept the thoughtlessness of that purush.

4
मूळ

बीज उगवेलसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें । प्रचित आलियां ऐकावें । निरुपण ॥ ४ ॥

मराठी अर्थ

बी चांगलें उगवते असें पाहावें. मग तसें असेल तर पैसें देऊन विकत घ्यावें. निरुपण करणारा जें सांगतो त्याची प्रचिती आली तरच त्याचे निरुपण ऐकावें.

English meaning

The *sprouting of this seed of knowledge should be understood and then this objectifi- cation can be thrown away. And when this sagun `experience' comes then, one should listen to that discourse only. *(maharaj-`knowledge is the sprout house of the world'; Understand that knowledge or mula maya is the seed and from this seed there comes a sprout; this is the arising of a thought or concept and then there is the naming of the `many' forms that bring this gross world)

5
मूळ

देहीं आरोग्यता जाली । ऐसी जना प्रचित आली । तरी मग आगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

देहाला झलेला विकार एखाद्या मात्रेनें बरा होतो असा इतर लोकांना अनुभव आला असेल तरच आपण ती मात्रा अगत्यानें घेतलीं पाहिजे.

English meaning

If while in this body, this sagun `experience' can bring freedom from this disease of body consciousness then, that man should completely accept this medicine of `I am He' (if you understand once then, why can you not always understand?).

6
मूळ

प्रचितीविण औषध घेणें । तरी मग धडचि विघडणे । अनुमानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥

मराठी अर्थ

ज्या औषधाचा कोणीही अनुभव घेतलेला नसेल तर तें आपण घेतल्यास चांगली प्रकृति बिघडेल. उगीच अनुमानानें कार्य केलें तर मूर्खपणा होतो.

English meaning

But if you take a remedy that lacks this `experience' then, this `all' will get completely spoiled. For then that mula maya makes its action through conjecture and that Reality becomes foolish.

7
मूळ

प्रचितीस नाहीं आलें । आणी सुवर्ण करविलें । तरी मग जाणावें ठकिलें । देखतदेखतां ॥ ७ ॥

मराठी अर्थ

एखाद्यानें लोखंडाचे सोनें करुन देतो असें म्हटले व आपण त्याच्या विद्येचा अनुभव नसतां त्याला सोनें करुन देण्यास सांगितलें तर तो बघतां बघतां आपल्याला फसवितो.

English meaning

If this `experience' has not come and this divine place of the `all' has not been created then, you should know that you have been cheated in this life.

8
मूळ

शोधून पाहिल्याविण । कांहींतरी येक कारण । होणार नाहीं निर्वाण । प्राणास घडे ॥ ८ ॥

मराठी अर्थ

सुरवातीस चांगली चौकशी न करतां एखदे काम अंगावर घेतलें तर तें काम तडीस जाणार नाहीं उलट आपल्या जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव असतो.

English meaning

If this cause (ie. the seed of knowledge/`thing', that causes this world) and that One within this `thing' are not understood by thorough searching then, that One will die in the prana.

9
मूळ

म्हणोनी अनुमानाचें कार्य । भल्यांनी कदापि करुं नये । उपाय पाहातां अपाये । नेमस्त घडे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

म्हणून शहाण्या माणसानें कल्पना करुन अनुमानानें कोणतेंही कार्य करुं नये. नपेक्षा उपायाऐवजी अपाय मात्र खात्रीनें घडतो.

English meaning

Therefore the wise should never make their actions through conjecture, for such reme- dies are sure to be harmful (ie. they keep you in body consciousness).

10
मूळ

पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हें बुद्धिच खोटी । शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १० ॥

मराठी अर्थ

समजा एक म्हैस पाण्यांत बसली आहे. ती कशी आहे वगैरे न बघतांच तिची खरेदी करणें म्हणजे खोटीच बुद्धि होय. तिला नीट न पाहिल्यानें नंतर कष्टी व्हावें लागतें.

English meaning

For when this `frame filled with water' of a lazy and gluttonous man does the actions, then thoughtlessness becomes his deceitful buddhi. Therefore understand that without careful examination, the confusion of body consciousness will not go away.

11
मूळ

विश्र्वासें घर घेतलें । ऐसें किती नाहीं ऐकिलें । मैंदे मैदावें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥

मराठी अर्थ

स्वतः न पाहातां दुसर्‍याच्या भरवश्यावर घर घेतलें, असें कधी कोणी ऐकले आहें कां ? जगांत लबाड लोक फसवण्यचा प्रयत्न करणारच पण आपण नीट चौकशी करुन काम केलें पाहीजे.

English meaning

Then one takes the ownership of this `house'/body on the word of another. 6 Such is the deceit perpetuated by the cunning ego. Therefore the `many' thoughts should never be listened to and that Reality should be searched out. *(maharaj this body is so faithless, I tell you. It will not even say `good-bye').

12
मूळ

शोधल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मुकणें । लटिक्याचा विक्ष्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥

मराठी अर्थ

नीट तपास केल्यावाचून अन्नवस्त्र घेणें म्हणजे जीव गमावण्याची पाळी आणणे. खोट्याचा विश्र्वास बाळगणें मूर्खपणाच होय.

English meaning

If you accept the gross food without purifying it and if you accept this covering of a body as yours, then that Reality will be lost to the prana. If that thoughtless Self has faith in the false, then it has become foolish. (This `I am' is our real food and our covering is the sky; without these we could not live for a moment. If this gross body is carefully examined and understood, then only will it become this purified body of the `all')

13
मूळ

संगती चोराची धरितां । घात होईल तत्वता । ठकु सिंतरु शोधितां । ठाईं पडे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

चोराची संगत धरली तर नक्कीच आपला घात होतो. नीट तपास केला तर चोर, ठक, लबाड लोक तिथल्या तिथे ओळखूं येतात.

English meaning

If one keeps the company of the thief then, one is sure to be killed. This deceiver should be found out and his place should be avoided (maharaj- mind is the thief).

14
मूळ

गैरसमज तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी । नाना कपट परोपरीं । शोधून पाहावें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

खोटी नाणीं पाडणारें, तांब्याचें सोनें करतो म्हणणारे, चोरुन सरकारला न कळतां खरीं नाणीं करणारें, वगैरे नाना प्रकारच्या लबाड्या जगांत चालतात. आपण त्या समजून संभाळून असावें.

English meaning

There are these undisciplined `great' men in saffron and within this `all', they give some new *mudra to perform (therefore be He and leave all the `many' remedies); there are the `many' fraudulent practices and these should be examined and understood. *(A place of put your attention)

15
मूळ

दिवाळखोराचा मांड । पाहातां वैभव दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो कीं त्याच्याजवळ पुष्कळ धन आहे असें वाटते. पण त्याचा तो बडेजाव म्हणजे थोतांड असतें. पुढें त्याची फजीति होते.

English meaning

There is this lavish and extravagant assembly place of the `all' when you understood the glory of that paramatma. But when that vast paramatma sees through these eyes of flesh then, it becomes a false story made by your imagination and this leads you only into disgrace.

16
मूळ

तैसें प्रचितीवीण ज्ञान । तेथें नाहीं समाधान । करुन बहुतांचा अनुमान । अन्हीत जालें ॥ १६ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें ज्या पुरुषाला स्वानुभव नाहीं, त्याचें ज्ञान म्हणजें थोतांड होय. त्याच्यापाशीं खरें समाधान नसतें. आपल्या अनुभवरहित व अनुमानप्रधान ज्ञानानें तो अनेक लोकांना आपल्या नादीं लावतो. तसें करुन तो स्वतःचे व लोकांचे अनहीत करण्यास कारण होतो.

English meaning

Knowledge that is void of this sagun `experience' will never bring the perfect content- ment of `there'. By going along with these `many' conjectures, this `experience' will be made to suffer so much.

17
मूळ

मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें । जैसें झांकून मारिलें । दुखणाईत ॥ १७ ॥

मराठी अर्थ

अनुभवविहीन लोक गुरुपणाचा आव आणून अडाणी लोकांना मंत्र यंत्र चा उपदेश करुन त्यांत त्यांना गुंतवतात. व त्यांचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झांकून ठेवावा व त्याला मारुन टाकावा तसा हा प्रकार होय.

English meaning

Then mantras and yantras get taught and due to such ignorance, that Reality gets confined in the prana. They are about as much use as placing only a blanket on a patient dying of some terrible disease.

18
मूळ

वैद्य पाहिला परी कच्चा । तरी प्राण गेला पोराचा । येथें उपाये दुसर्‍याचा । काये चाले ॥ १८ ॥

मराठी अर्थ

समजा एखाद्याचा मुलगा फार आजारी आहे. त्याला औषध देण्यासाठीं अनुभव नसलेला व अपरिपक्व वैद्य आणला. त्यामुळें त्या मुलाचा मृत्यु ओढवला. अशावेळीं इतर माणसें कांहीं उपाय करुं शकत नाहींत.

English meaning

If a doctor lacking in this `experience' examines one, then the *`childish' will surely die. Then this remedy of the `all' is of what use? (A doctor can only help keep you in this body) *(We are like children playing; they take some stones and say this is a plate and this is a cup and this is a god etc; all imagination)

19
मूळ

दुःखें अंतरीं झिजे । आणी वैद्य पुसतां लाजे । तरीच मग त्यासी साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥

मराठी अर्थ

एक माणूस दुखण्यानें झिजत चालला आहे. पण वैद्यानें काय होतें म्हणून विचारलें तर मोकळेपणानें सांगण्यास त्याला लाज वाटते. असा माणूस स्वतःचा घात करुन घेतो असें म्हणणें बरोबर आहे.

English meaning

Then in this inner space of `I am' there is great suffering and if you feel too ashamed to get rid of that doctor (you feel ashamed of what the people might say if you walk on this path) then, you should be considered as a killer of your own atma.

20
मूळ

जाणत्यावरी गर्व केला । तरी नेणत्याकरितां बुडाला । येथें कोणाचा घात जाला । बरें पाहा ॥ २० ॥

मराठी अर्थ

जो जाणता आहे त्याला गर्वानें तुच्छ केलें तर नेणता माणूस आपल्या अज्ञानानें बुडतो, अशारीतीनें तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो.

English meaning

If you only shows off ("I know this and that") before the Knower then, you will surely drown due to your ignorance. Then who is at a loss tell me? Therefore understand thoughtlessness.

21
मूळ

पापाची खंडणी जाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

पाप संपूर्णपणें नाश पावलें. पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणें थांबलें, असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःला आला म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें.

English meaning

Thoughtlessness is the banishing of sin; thoughtlessness is the forgetting of the miseries of birth; thoughtlessness will come naturally when you stay with this `experience'.

22
मूळ

परमेश्र्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें । आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥

मराठी अर्थ

परमेश्र्वराची ओळखण झाली, मी खरा कोण हें कळलें, संपूर्ण शरणागति साधली म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें.

English meaning

parameshwara can be recognised when you have understood who you are (ie. `I am knowledge'). For when this knowledge is surrendered to that atma there is the thou- ghtlessness of pure knowledge.

23
मूळ

ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें । मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

हें विश्र्व कोणीं केलें हें समजलें, तें कशानें केलें हें कळलें, कर्ता खरा कोण हें ओळखलें म्हणजें आत्मज्ञान झालें असें समजावें.

English meaning

If one understands who and how the brahmanda has built (this gross perceived uni- verse was build from prakruti and objectification) then, the real `doer' (purush) can be recognized by thoughtlessness.

24
मूळ

येथें अनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला । प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥

मराठी अर्थ

वर सांगितलेल्या गोष्टींसंबंधीं थोडा जरी संशय मनांत असेल तर तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असें समजावें. साक्षात् स्वरुपानुभव नसल्यानें माणूस संशयानें घेरला जातो.

English meaning

But if conjecture remains `here' then, whatever paramarth is made will be worthless. For doubts will drown you in the prana, when there is not this `experience'.

25
मूळ

हें पमार्थाचें वर्म । लटिकें बोले तो अधम । लटिकें मानी तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥

मराठी अर्थ

परमार्थाचें रहस्य हे आहे. हें खोटे आहे असें जो म्हणेल तो अधम समजावा. हें खोटें असेम जो मानील तो तर अधमाहून अधम निश्र्चितपणें मानावा.

English meaning

That thoughtless Self is the essence of paramarth. But if this `speech' is falsified then, that thoughtless Self becomes a lowly body. Truly, one should know that when that atma accepts the false and is then proud of it, then there is the lowest of the low.

26
मूळ

येथें बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥

मराठी अर्थ

यापुढें सांगण्याची सोय उरली नाहीं. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्मस्वरुप कळणार नाहीं. ही गोष्ट खोटी नाहीं. सर्वोत्तम रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ तूं बरोबर जाणतोस.

English meaning

`Here' is the limit of this `speech'. If you are ignorant of this then, the atma cannot be understood. But know that when the untrue is not then, you are the greatest within this `all'.

27
मूळ

माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावें साचार । मिथ्या बोलला उत्तर । प्रभूस लागे ॥ २७ ॥

मराठी अर्थ

माझ्या उपासनेचें थोर वैशिष्ट्य असें आहें कीं, अगदी खरें आत्मज्ञान सांगावें. मी जर खोटे व वावगे बोलेन तर त्याचा दोष रामरायास लागेल.

English meaning

`Mine' is the false pomp of worship and so there should be that thoughtlessness of true knowledge. For even this `speech' of yours is not the true reply and then that Lord will have to suffer. (You are that Lord but you forget Yourself and said `I am'. But the truth is, `me and mine' have no existence)

28
मूळ

म्हणोनि सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे वोळखिलें । मायोद्भवाचें शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥

मराठी अर्थ

म्हणून जें सांगतों तें संपूर्ण सत्य आहे. खरा कर्ता कोण हें साधकानें ओळखलें पाहिजे. माया कोठे व कशी उत्पन्न झाली याचें मूळ शोधून काढलें पाहिजे.

English meaning

The Truth has become this `speech' and so the maker of this `speech' should be reco- gnized. Therefore the root of this rising of maya should be searched out and thoroughly understood.

29
मूळ

तेंचि पुढें निरुपण । बोलिलेंचि बोलिलें प्रमाण । श्रोतीं सावध अंतःकर्ण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥

मराठी अर्थ

या विषयाचेच विवेचन पुढें केलेलें आहे. मागें जे सांगितलें तेंच पुन्हा वर्णन केलेले आढळेल. श्रोत्यामनी तें एकदा ऐकलेले आहे पण परत त्यांनीं सावधवरुत्तीनें ऐकावें.

English meaning

The Truth has become this sagun discourse. Still if this `I am' is continuously made then, that Truth will be revealed. In the listener there should be this alert antah-karana and that which is already established should be established by you (ie. That which always is and only is should be realized).

30
मूळ

सूक्ष्म निरुपण लागलें । तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें । श्रोत्यांस पाहिजे उमजलें । म्हणौनियां ॥ ३० ॥

मराठी अर्थ

हा विषय सूक्ष्म आहे. त्याचें विवेचन चटकन ध्यानांत येत नाहीं. श्रोत्यांना तो नीट समजावा म्हणून तें परत सांगावें लागतें.

English meaning

It is that brahman who has made this discourse of maya and so `there' has become this `I am' feeling and then afterwards, there was only this `I am' and brahman was forgotten. Therefore the listener should understand that nirgun Truth.

31
मूळ

प्रचित पाहातां निकट । उडोन जाती परिपाठ । म्हणोनि हे खटपट । करणें लागे ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

सूक्ष्म अनुभव घेऊन बघितलें तर परंपरेनें चालत आलेल्या लोकांच्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुनः पुनः सांगणें जरुर पडतें.

English meaning

When this `experience' draws close, then the currently experienced names and forms jump up once again and that thoughtless Self once again starts making the `many' troublesome actions of this world.

32
मूळ

परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचित समाधान बुडालें । प्रचितसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

येथें पेच असा येतो कीं, परंपरागत जनसमजुतीप्रमाणें सांगायचे म्हटलें तर स्वानुभवाचें समाधान राहात नाहीं. आणि स्वानुभवाप्रमाणें बोलायचे म्हटलें तर परंपरागत लोककल्पना उडवल्यावाचून चालत नाहीं.

English meaning

If this `speech' becomes the currently experienced actions then, that contentment of this `experience' is drowned. And if the complete contentment of the `experience' is kept, then the currently experienced flies away. (Therefore remain aloft from these ever-changing experiences)

33
मूळ

ऐसी सांकडी दोहींकडे । म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे । दोनी राखोनियां कोडें । उकलून दाऊं ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

अशी दोन्हीकडून अडचण येते. म्हणून पूर्वीं जें सांगितलें तें पुनः पुनः सांगावें लागतें. आतां पूर्वपरंपरागत लोकसमजुती आणि स्वानुभव या दोन्हींचा समन्वय साधून हें कोडें उलगडून दाखवूं.

English meaning

This `experience' belongs to prakruti/purush and therefore this `I am' only is to be `spoken'. These two should be fondly protected and then, that purush should be disen- tangled from His relationship and realized.

34
मूळ

परिपाठ आणी प्रचित प्रमाण । दोनी राखोन निरुपण । श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

पूर्वपरंपरा व आत्मप्रचिती या दोन्हींचे प्रामाण्य भंग होणार नाहीं असें विवेचन करुं. बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचें खोलवर मनन करावें.

English meaning

There are the current experiences and this sagun `experience' and there is that Truth. If the listener protects this prakruti/purush with utmost alertness then, afterwards there will only be that thoughtless Supreme. .