भीमदशक — समास 5: राजकारणनिरुपण

Fully populated

Rajakaran Nirupan (A Discourse on Statecraft)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

कर्म केलेंचि करावें । ध्यान धरिलेंचि धरावें । विवरलेंचि विवरावें । पुन्हा निरुपण ॥ १ ॥

मराठी अर्थ

एकच कर्म पुनः पुनः करावें. भगवंताचे ध्यान पुनः पुनः धरावें. आत्मज्ञानाबद्दल ऐकलेल्या विषयावर पुनः पुनः मनन करावें.

English meaning

This action (`He is doing everything') that has been done should be continued; this understanding that has come to the mind, should be retained and then, that thoughtless understanding within this sagun discourse should be brought again and again.

2
मूळ

तैसें आम्हांस घडलें । बोलिलेंचि बोलणें पडिलें । कां जें बिघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥

मराठी अर्थ

माझ्या बाबतींत असेंच घडलें आहे. मागें जें मी एकदा सांगितलेआहे. तेंच पुनः पुनः सांगावे लगत आहे. पण याचें कारण असें कीं ऐकणाराचे समाधान पुनः पुनः बिघडते. समाधान पूर्ववत होण्यासाठीं तेंच तेंच सांगावें लागतें.

English meaning

Like this it was accomplished by us, for due to this `speech', this `speech' ceased. But how can that complete contentment of the Reality be acquired if, that `speech' has been spoiled?

3
मूळ

अनन्य राहे समुदाव । इतर जनास उपजे भाव । ऐसा आहे अभिप्राव । उपायाचा ॥ ३ ॥

मराठी अर्थ

आपले अनुयायी, त्यांचा समुदाय आपल्यापाशी राहणें जरुर आहे. म्हणजे मगसमुदाया बाहेरील लोकांना आपल्याबद्दल विश्र्वास उत्पन्न होतो. हें साध्य होणें म्हणजे पुढारीपण यशस्वी होणें समजावें. असें पुढारीपण यशस्वी होण्यास कसें वागावें तें पुढें सांगितले आहे.

English meaning

If the mind understands this meeting place of the `all' and remains there then, `no- otherness' will surely come. Such is the importance of the sagun remedy.

4
मूळ

मुख्य हरिकथा निरुपण । दुसरें तें राजकारण । तिसरें तें सावधपण । सर्वविषंई ॥ ४ ॥

मराठी अर्थ

आध्यात्माची पार्श्वभूमी हें पहिलें लक्षण होय.भगवंताचा विसर कधीं पडू देतां कामा नये. व्यवहारानें वागणें हें दुसरे लश्रण होय. व्यवहार उत्तम रीतीनें करण्यास लागणारें चातुर्य असावे. सर्व बाबतींत सावधपणें असावे. हें तिसरे लक्षण होय. पुढार्‍याचे लक्ष चौफेर असलें पाहिजे.

English meaning

There are four things required; first this `story' of vishnu (forget everything and knowing is there); second, there should be rajakarana and thirdly, utmost regard should be given to this `all'.

5
मूळ

चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप । अन्याये थोर अथवा अल्प । क्ष्मा करीत जावे ॥ ५ ॥

मराठी अर्थ

अतिशय उद्योगीपणा हे चौथे लक्षण होय. अविरत उद्योगावाचून कायम टिकणारे यश मिळत नाही. आपल्या ध्येयाबद्दल व कामाबद्दल नाना प्रकारचे निघणारे आक्षेप व संशय असतात. त्यांचे निरसन करावें अनुयायी लहान मोठ्या चुका करतात. त्याबद्दल त्यांना क्षमा करावी.

English meaning

And fourth, there should be determined and steadfast purpose. These four things will remove the `many' obstructions and doubts and then the mistakes of the great brahman or the small jiva will be forgiven (ie. the brahman takes Himself to be this `all' and the jiva takes itself to be a body; such are the mistakes that have been committed).

6
मूळ

जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर । नीतिन्यायासि अंतर । पडोंच नेदावें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याच्या मनांत काय आहे तें ओळखावें. आपण आपली वृत्ती नेहमी अलिप्त ठेवावी. आपले वागणें नीतिन्यायास धरुनच असावें.

English meaning

The One who is detached and beyond this inner space should know this inner space where the para speech, `I am', arises. Therefore this inner space should never give up its nature and maintain its equanimity.

7
मूळ

संकेतें लोक वेधावा । येकूनयेक बोधावा । प्रपंचहि सावरावा । येथानशक्त्या ॥ ७ ॥

मराठी अर्थ

केवळ खुणेनें माणूस जवळ करावा. मग त्याला ज्ञान देऊन शहाणा करावा. हें करीत असतां आपला प्रपंचही सांभाळावा.

English meaning

By the making of this `I am', the world beyond should be established and then that One within this moving `all' should be understood. Do not worry for your prapanch, for it will be taken care of when you remain in your own power (ie. `I am'). (siddharameshwar maharaj the one who follows paramarth will have his family and properties taken care of) 5

8
मूळ

प्रपंचसमयो वोळखावा । धीर बहुत असावा । संमंध पडों नेदावा । अति परी तयाचा ॥ ८ ॥

मराठी अर्थ

प्रपंचांत कमीजास्त प्रसंगांचे गांभिर्य ओळखावें. अंगी पुष्कळ धीर असावा. पण प्रपंच्याच्या मर्यादेपलीकडे संबंध लावून घेऊं नये.

English meaning

You should understand through steady enduring patience and courage that this pra- panch is the `all'. And then this very intimate connection with that purush should never cease. (prapanch is this `all' with concepts and worries and the `all' is prapanch without concepts and worries)

9
मूळ

उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपडावें । नीचत्व पहिलेंच घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आपला व्याप वाढवावा. आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवावें. पण त्यामध्यें गुंतून जाऊं नये. मनानें त्यांत अडकू नये. सुरवातीपासून आपल्याकडे कमीपणा व अज्ञानपणा घ्यावा.

English meaning

This limiting concept `I am' should be expanded, so much so that one should not be found in that limiting concept anymore. But first you have to accept your lowliness and foolishness! (Look how small I have become. What can this `me' know? Now the time has come to throw of these concepts that have reduced me to this)

10
मूळ

दोष देखोन झांकावे । अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करुनी ॥ १० ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याचे दोष दिसतात. पण त्यावर पांघरुण घालावें. दुसर्‍याचे अवगुण आपण कधीहीं बोलून दाखवूं नयेत. दुर्जनावर उपकार करुन त्याला आपलासा करावा.

English meaning

The *sin is to be exposed and then overlooked. And that unbroken brahman should never `speak' of these sinful qualities. When that one who is far from the atma (ie. ego) is found out and left aside then, that atma is doing. *(maharaj- the only sin is taking Yourself to be a body)

11
मूळ

तर्‍हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये । नव्हे तेंचि करावें कार्ये । दीर्घ प्रेत्नें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

उगीच तर्‍हवाईकपणें वागूं नये. प्रसंग आला असता नाना प्रकारचे उपाय सुचावेत. जें कार्य घडून येणें कठीण असते तें दीर्घ प्रयत्नाने घडवून आणावे.

English meaning

This remedy of the `all' should not keep the `many' ways and their fruits in its mind. For this action of the `all' cannot be achieved through long burdensome efforts.

12
मूळ

फड नासोंचि नेदावा । पडिला प्रसंग सांवरावा । अतिवाद न करावा । कोणीयेकासी ॥ १२ ॥

मराठी अर्थ

एका कामासाठीं जमलेल्या समुदायांत फुट पडूं देऊं नये. कठीण प्रसंग धीरानें निभावून न्यावा. कोणाशीही मर्यादेबाहेर वाद घालूं नये.

English meaning

Therefore one should not disturb this `meeting place' nor cease to preserve this con- nection. And one should not have any harsh conversation with that One who is within everyone ("I am like this and I have to do this and she is good and he is bad" are harsh words).

13
मूळ

दुसर्‍याचें अभिष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें । न सोसे तरी जावें । दिगांतराप्रती ॥ १३ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍यांचे कल्याण कशांत आहे हें ओळखून त्याप्रमाणें वागावे. पुष्कळ लोकांसाठी भरपूर कष्ट सोसावेत. असें कष्ट सोसत नसतील तर सर्व सोडून एकांतात जावें.

English meaning

To simply know, brings great love for the other (this `all' is not you, it is the other and you are the atma) and this `all' should always agree with this `all'. And when you no longer agree with this `all' then, you go beyond the limits of space even. (maharaj- the Master makes you so big and then He bursts you)

14
मूळ

दुःख दुसर्‍याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें । बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याचे दुःख ओळखावें. ऐकावे व ऐकून आपणही त्यांत वाटेकरी व्हावें. समुदायाच्या सुखांत व दुःखांत आपण सहभागी व्हावे.

English meaning

The sufferings of the other should be known and by listening these *sufferings should be broken and then accepted (understand that these sufferings are concepts caused by objectification and I have taken them as mine; then only can they be accepted as knowledge. When you see the sufferings of another still, you do not feel their suffering. How can you? For you hold the strong concept that, I am not that body. Then naturally you are the witness. And if you hold the strong concept that, `I am not this body either' then, you will naturally be its witness also). When that thoughtless Self can endure the worst ("I am a body with so many troubles"), then there is this `meeting place' (this `meeting place' is the `all'; the prana, gunas, elements, senses, `many' thoughts etc. all come together `here' and rest in bliss). *(maharaj- pain is simply a sensation we are not accustomed to)

15
मूळ

अपार असावें पाठांतर । सन्निधचि असावा विचार । सदा सर्वदा तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥

मराठी अर्थ

खूप पाठांतर असावें. पुष्कळ ग्रंथांचें अवलोकन करावें. नेहमी विचारानें वागण्याची, विवेकपूर्वक कर्म करण्याची सवय असावी. परोपकार करण्यास केव्हांही मनापासून तयार असावें.

English meaning

Learn by heart that which has no limit. Have the thoughtless understanding of that which is most close to you and always, everywhere be absorbed in That which is most beneficial to the other (pure knowledge is the only thing that is of any benefit to the other/`all').

16
मूळ

शांती करुन करवावी । तर्‍हे सांडून सांडवावी । क्रिया करुन करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥

मराठी अर्थ

कठीण प्रसंगी आपण शांत असावें. आणि इतरांना शांत राहण्यास शिकवावे. आपण कर्म करावें व इतरांकडूनही करवून घ्यावें

English meaning

By creating peace, the other is made peaceful; by leaving aside any differences of things and kinds, the other leaves aside differences of things and kinds. And by the doing of this `all' action, the other does this `all' action (maharaj this understanding becomes your hobby).

17
मूळ

करणें असेल अपाये । तरी बोलो दाखऊं नये । परस्परेंचि प्रत्यये । प्रचितीस आणावा ॥ १७ ॥

मराठी अर्थ

एखाद्याला अपाय करावयाचा असेल तर त्याची वाच्यता करुं नये. आपण त्यांत न सापडता दुसर्‍याकरवीं तो घडवून आणावा.

English meaning

If the action is going to be harmful ("I am doing") then, it should be `spoken' and not revealed (ie. not allowed to become objective). And then by understanding that any action is utterly apart from Myself, that nirgun understanding can be brought to this sagun `experience' (siddharameshwar maharaj doing nothing is the greatest worship).

18
मूळ

जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना । बहुत सोसितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥

मराठी अर्थ

जो पुष्कळांचें सुखदुःख सोशीत नाहीं. त्याच्याकडे पुष्कळ लोक आकर्षित होत नाहीत. पण दुसर्‍यांचे किती सोसावें यास मर्यादा आहे. या मर्यादेबाहेर सोसल्यानें आपली किंमत उरत नाहीं.

English meaning

When that purush is not in agreement with this `all', then this world of the `all' cannot come together with that purush. And when this `all' agrees with this world of the `many' then, your importance will be lost (first you forget your Self and become knowledge and when this knowledge is forgotten, you become a jiva).

19
मूळ

राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें । परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥

मराठी अर्थ

लोकसंग्रह होण्यासाठी पुष्कळ गुप्त कार्य करावें लागते. तें करावें पण लोकांना कळूं देऊं नये. दुसर्‍याला छळण्याचा, त्रास देण्याचा विचारही मनांत आणूं नये.

English meaning

One should make this raja-karana of the `all' (ie. the King/atma does) but there should not be any quarrelling with it (ie. "I do"). In this way, this *antah-karana should not become a distress and torment for the other/`all'. *(The antar-karana simply knows but when it accepts body consciousness then there comes mind, buddhi, chitta and ego)

20
मूळ

लोक पारखून सांडावें । राजकारणें अभिमान झाडावे । पुन्हा मेळऊन घ्यावें । दुरील दोरे ॥ २० ॥

मराठी अर्थ

लोकांची परीक्षा करुन त्यांना बाजूस सारावें. अभिमानी माणसांचा अभिमान मोठ्या युक्तीनें नाहींसा करावा. या कारणांनी दुरावलेली माणसें परत समुदायांत आणावीत.

English meaning

The world should be examined and continually dropped, and by raja-karana your pride should be dismissed. Again and again you should bring the people together by this far-reaching connection, "Everyone is my Self".

21
मूळ

हिरवटासी दुरी धरावें । कचरटासी न बोलावें । समंध पडता सोडून जावें । येकीकडे ॥ २१ ॥

मराठी अर्थ

तापट व विवेकहीन माणसांना लांबच ठेवावे. भित्र्या व अंगचोर माणसांना आपले गुप्त बेत सांगू नयेत. अशा लोकांशी संबंध आला तर आपण दुसरीकडे निघून जावे.

English meaning

The arrogant (ie. ego) should be kept at a distance and that lowly character (ie. mind) should not be `spoken' with. Therefore this connection with body consciousness should be dropped and left behind.

22
मूळ

ऐसे असो राजकारण । सांगतां ते असाधारण । सुचित अस्तां अंतःकरण । राजकारण जाणे ॥ २२ ॥

मराठी अर्थ

असो. राजकारण म्हणजे लोकसंग्रहाचें काम हें असें असतें. त्याचें संपूर्ण वर्णन करणें शक्य नाही. ज्याचें चित्त एकाग्र होऊं शकते त्यास तें आकलन होतें.

English meaning

Now when there is such rajakarana then, thoughtlessness is not being understood; for it is the very alert antah-karana that knows rajakarana (ie. it is knowing; knowing has to be dropped if there is to be pure knowledge).

23
मूळ

वृक्षीं रुढासी उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें । कारबारावें सांगावें । आंग कैसें ॥ २३ ॥

मराठी अर्थ

आपला जीव वाचवण्यासाठीं माणूस भयानें झाडावर चढून बसतो. समाजामध्यें असें जें भयग्रस्त व दुबळें असतात त्यांच्या मदतीसाठीं आपण धावावें. त्यांना जे छळणारे असतात त्या युद्धकर्त्यांना हाकलून लावावें. अशा या परोपकार वर्तनाचे सांगोपांग वर्णन करणें शक्य नाहीं.

English meaning

That which is *common in all beings (ie. knowledge/knowing) should be made to grow and that which causes all troubles and fighting and sees differences should be pushed aside. But still these are matters of the `all' and not thoughtlessness. *(maharaj see the common in all)

24
मूळ

पाहाता तरी सांपडेना । कीर्ति करुं तरी राहेना । आलें वैभव अभिळासीना । कांहीं केल्यां ॥ २४ ॥

मराठी अर्थ

खरा निःस्वार्थी लोकसंग्रही माणूस कार्य झालें की निघून जातो. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नाहीं. त्याचा मानसन्मान करावा म्हटला तर तो राहात नाहीं. चालून आलेल्या वैभवाचीही अभिलाषा तो धरत नाहीं.

English meaning

You can understood this `all', yet He cannot be caught. His pervasiveness is everywhere, yet He stays no-where. He has *majesty and splendour but has no desire for this `thing'. *(The qualities of the `thing' but He is beyond all these.)

25
मूळ

येकांची पाठी राखणें । येकांस देखो न सकणें । ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥

मराठी अर्थ

एकाच्या पाठीशी उभा राहून त्यास संरक्षण देणें व त्याचबरोबर दुसर्‍याचा उत्कर्ष सहन न होणें अशी मनोवृत्ति असणें हें कांहीं चातुर्याचें लक्षण नाही.

English meaning

Do not keep the support of this jiva and search out and understand that One; otherwise how can there be the attention of the wise?

26
मूळ

न्याय बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना । येथें कांहींच चालेना । त्यागेंविण ॥ २६ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसाला योग्य व न्याय्य काय आहे तें सांगूनसुद्धां पटत नाहीं, आपल्या कल्याणाचे जें आहे ते जो माणूस मनावर घेत नाहीं, अशा माणसापुढें उपाय नाही. त्याला सोडणें हाच उत्तम मार्ग होय.

English meaning

If justice (ie. that eternal Self) and this `speech' are not valued then, the benefit of thoughtlessness can never come to the mind. But this `thing' `here' will never happen without first giving up this world.

27
मूळ

श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणौन बोलिलेंचि बोलिलें । न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यांना हे सारें माहीत आहे. तरी त्यांनी शंका काढली म्हणून मागें सांगितलेलें पुनरपि सांगावें लागलें. त्यामध्यें जें कमीजास्त झालें असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी.

English meaning

In the listener there has to be definite and determined understanding. Therefore, only this `speech' is to be `spoken' and in the listener the incomplete and the complete should be patiently endured (ie. let whatever comes, come and whatever goes, go). .